Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मनपा कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी संजय भोसले

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी परिवहन विभागाचे व्यवस्थापक संजय शिवाजीराव भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची घोषणा संघाच्या बैठकीत सोमवारी करण्यात आली. फेब्रुवारी २०२० मध्ये अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.

कर्मचारी संघाो अध्यक्ष रमेश देसाई यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. अध्यक्षपदासाठी विद्यमान कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, अजित तिवले, दिनकर आवळे व विजय चरापले इच्छुक होते. त्यासाठी संघातंर्गत असलेल्या कौन्सिलची बैठक बोलवण्यात आली होती. पुणे धर्मादाय आयुक्तालयाच्या मान्यतेने सदस्यपद देणे, संघटना पदाधिकारी निवड, मागील सभेचे प्रोसिडिंग कायम करणे आदी विषयांवर चर्चा होणार होती. त्यासाठी भोसले यांची पीठासन अधिकारी म्हणून निवड केली. अध्यक्षपदासाठी चार सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने फेब्रुवारी २०२० पर्यंत पद रिक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण उपस्थित अन्य सदस्यांनी गेल्या तीन महिन्यापासून संघटनेच्या कामकाजामध्ये मरगळ आल्याने पद रिक्त न ठेवण्याची मागणी केली. अध्यक्षपदासाठी भोसले यांचे नाव दिनकर आवळे यांनी सुचवले. त्याला सर्वांनी मान्यता दिला. उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या निवडी फेब्रुवारीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एफआरपी’वरून संघर्ष अटळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर एकरकमी एफआरपी आणि चालू हंगामात जादा दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामातही संघर्ष अटळ असल्याचे दिसत आहे. स्वाभिमानीने ऊस वाहतूक रोखण्यास सुरूवात केली आहे. आता माजी खासदार राजू शेट्टी ऊस परिषदेत कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकरी आणि कारखानदारांचे लक्ष लागले आहे.

दरवर्षी एक नोव्हेंबरला पश्चिम महाराष्ट्रातील ऊस हंगाम सुरू होतो. मात्र यंदा महापूर आणि अतिवृष्टीमुळे हंगाम उशिरा सुरू झाला. राज्यात सरकार स्थापन न झाल्याने मंत्रिगट समितीची बैठकही झालेली नाही. मात्र सध्या ऊस तोडणीला वातावरण अनुकूल असल्याने जिल्ह्यातील कारखान्यांनी हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यादरम्यानच, २३ नोव्हेंबरला स्वाभिमानीची ऊस परिषद होत आहे. परिषद होईपर्यंत हंगाम सुरू करु नये, अशी विनंती स्वाभिमानीने केली आहे. मात्र गगनबावडा तालुक्यातील पद्मश्री डी. वाय. पाटील, कागलमधील सेनापती घोरपडे कारखाने सुरू झाले आहेत. दोन्ही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्याची घोषणा केली असून, त्यामुळे हंगाम सुरू केल्याचा दावा केला आहे.

कारखाने सुरू करण्यासंदर्भात कारखानदार आणि स्वाभिमानीच्या बैठकीत एफआरपीची तुकडे पाडण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्वाभिमानीने संघर्षाची भूमिका जाहीर केली. ऊस परिषद झाल्यानंतरच कारखाने सुरू करावेत अन्यथा वाहने आडवण्याचा इशाराही संघटनेने दिला. त्यांचे प्रत्यंतरही सोमवारी जिल्ह्यात मिळाले. आमदार हसन मुश्रीफ यांच्या सेनापती घोरपडे कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक स्वाभिमानीने रोखली. दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत बिद्री येथील दूधगंगा साखर कारखानाही सुरू करु दिला जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

स्वाभिमानीची ऊस परिषद जाहीर झाल्यानंतरच शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील कारखान्यांनी हंगाम सुरू करण्याची तयार दर्शवली आहे. ज्या कारखान्यांचे डिस्टीलरी, वीज प्रकल्प आहेत त्यांनी एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची तयारी दाखवली आहे. काहींनी तर एकरकमी एफआरपी देण्याचीही तयारी आहे. पण वीस ते तीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कारखान्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असून, त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तयार झालेल्या साखरेची विक्री झाली नसल्याने त्यावरील कर्जाचा भार वाढतच आहे. अशा परिस्थितीत एफआरपीचे तुकडे पाडून दर देण्याची त्यांची भूमिका आहे. त्यातच स्वाभिमानीने एकरकमी एफआरपी आणि वाढीव दराची मागणी केली असल्याने अडचणीत असलेल्या कारखान्यांसमोर मोठा प्रश्न आहे. स्वाभिमानीने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. अन्य शेतकरी संघटनाही हाच कित्ता गिरवणार असल्याने यंदाच्या हंगामात संघर्ष अटळ दिसत आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर-उपमहापौर निवड आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर, उपमहापौर निवडीची सभा मंगळवारी (ता.१९) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड. सुरमंजिरी लाटकर आणि भाजपच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांच्यात लढत होईल. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे संजय मोहिते विरुद्ध ताराराणी आघाडीचे कमलकार भोपळे अशी लढत होणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज होईल.

आज, मंगळवारी होणाऱ्या महापौर- उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर सत्तारुढ काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पन्हाळा मुक्कामी आहेत. सर्व नगरसेवक मंगळवारी सकाळी नऊ वाजता अजिंक्यतारा कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत. तेथून ते आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची भेट घेवून सभेसाठी उपस्थित राहतील. आघाडीचे दोन्ही नेते निवडीदरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असले, तरी त्यांच्याकडून फारशा राजकीय हालचाली दिसत नाहीत. यामागे विधानसभा निवडणुकीचा निकाल कारणीभूत असल्याची चर्चा आहे. मात्र ऐनवेळी राजकीय चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक निवडीदरम्यान विरोधी गट सहलीवर जात असतो. पण यंदा निवडीदरम्यान त्यांनी सहलीवर जाण्याची परंपरा खंडीत केली आहे. त्यामुळे पदाधिकारी निवड केवळ औपचारिकता असल्याची चर्चाही महापालिका वर्तुळात रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेला दांडी शिक्षकांना पडणार महागात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होऊनही गगनबावडा तालुक्यातील चार शाळांमधील शिक्षक काही दिवस गैरहजर होते. वरिष्ठांची परवानगी न घेता गैरहजर राहणाऱ्या व मर्जीने शाळेत हजर होणाऱ्या शिक्षकांवरील कारवाईप्रश्नी शिक्षण समितीची सभा गाजली. प्रशासनाने या संदर्भात मुख्याध्यापकांकडून म्हणणे मागवून चौकशीअंती शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. याप्रश्नी शिक्षकांना नोटीस लागू होण्याची शक्यता आहे. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी याप्रश्नी मुख्याध्यापकांकडून त्या शिक्षकांसंदर्भात खुलासा मागवून घेऊ असे सांगितले. त्यानंतर पुढील कार्यवाहीचा निर्णय घेऊ, असे सभेत सांगितले. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत उपलब्ध निधी, आतापर्यंत खर्च झालेला निधी याविषयी विचारणा झाली. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीच्या समान वाटपाबाबत चर्चा झाली.

जिल्हा परिषदेच्या शाळेला एका व्यक्तीचे नाव देण्याचा विषय सभेत फेटाळण्यात आला. एका व्यक्तीने जि.प.शाळेला नाव देण्यासाठी ठराविक रक्कम अनामत म्हणून देण्याची भूमिका मांडली होती. मात्र जिल्हा परिषद शाळेला अशा पद्धतीने नाव देण्याची नियमावली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. चर्चेत सदस्य विनय पाटील, भगवान पाटील, प्रा. अनिता चौगुले,वंदना जाधव, मनिषा कुरणे, रसिका पाटील आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण मंगळवारी (ता. १९) मंत्रालयात जाहीर होणार आहे. अध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर होणार या उत्सुकतेपोटी सगळयांच्या नजरा मंत्रालयाकडे लागल्या आहेत. गेली अनेक वर्षे एससी व ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेले नाही, तेव्हा यंदाच्या सोडतीत या दोन्हीपैकी एका प्रवर्गासाठी आरक्षण निघेल अशी शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत. या प्रवर्गातील सदस्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

राज्यातील बदलल्या राजकीय स्थितीचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणावर परिणाम संभवत आहे. सध्या जि.प.मध्ये भाजप, शिवसेना, जनसुराज्य, आवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांच्या आघाडीची सत्ता आहे. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीचा फायदा उठवित शिवसेनेला सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ६७ आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांचे निधन झाल्यामुळे सदस्य संख्या ६६ इतकी राहिली आहे. बहुमतासाठी ३४ सदस्य संख्या आवश्यक आहे.

विद्यमान अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षपदाची मुदत २१ सप्टेंबरपर्यंत होती. त्यांची अध्यक्षपदी निवड ही सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून झाली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जि.प.अध्यक्ष व इतर समिती पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत मंगळवारी (ता. १९) सकाळी साडेअकरा वाजता परिषद सभागृह क्रमांक चार सातवा मजला मंत्रालय येथे सोडत निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थलांतरित मुलांचा शाळा प्रवेश निश्चित करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीटभट्टी व ऊसतोडणी कामगारांच्या सहा ते चौदा वयोगटातील बालकांचा शाळा प्रवेश निश्चित करावा, त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक चळवळ गतिमान करावी, या मागणीसाठी अवनि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांची भेट घेतली.

साखर कारखान्याच्या ट्रक व ट्रॅक्टरमध्ये काम करणाऱ्या पालकांचे सातत्याने स्थलांतर होत असते. त्यांच्यासोबत असलेल्या मुलांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे. याविषयी गावस्तरावरील समिती, गटशिक्षणाधिकारी व खासगी प्राथमिक शाळांना सूचना कराव्यात अशी मागणी केली.

याप्रसंगी स्थलांतरित मुलांची 'कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय' येथे तात्पुरती व्यवस्था करावी. स्थलांतरित कालावधीत शाळेत दाखल मुलांना शिक्षण हमी कार्ड मिळावे. तसेच नजीकच्या शाळेत दाखल झालेल्या मुलांना शाळेने मध्यान्ह भोजनासह सरकारच्या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासंदर्भातही 'अवनि'च्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. शिष्टमंडळात संस्थेचे साताप्पा मोहिते, शाहरुख आटपाडे, विक्रांत जाधव, वनिता कांबळे आदींचा समावेश होता.

अवनि ही अनाथ, निराधार, वंचित, शाळाबाह्य मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. संस्थेने जिवबा नाना जाधव पार्क येथे ४० मुला-मुलींसाठी निवासी बालगृह सुरू केले आहे. याव्यतिरिक्त शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. स्थलांतरित वीटभट्टी व ऊसतोड मजुरांच्या तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांसाठी आनंद व साखर शाळा सुरू केल्या जातात. यामध्ये १००० हून अधिक मुलांना शिक्षण दिले जाते. शिक्षणाचा मूलभूत हक्क कायद्यानुसार हजारो बालकांना शाळेत दाखल केले आहे. कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान नसताना ९८०० बालकांना शाळेच्या प्रवाहात आणून बालकामगारातून मुक्त केल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार श्रीनिवास पाटील यांना यशवंतराव चव्हाण

$
0
0

खासदार श्रीनिवास पाटील यांना यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

म. टा. वृत्तसेवा, कराड

श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद दीक्षित उपस्थित राहणार असून, शिवम् प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा इंद्रजित देशमुख सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याची माहिती श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अशोक चव्हाण व चेअरमन डॉ. जयवंत सातपुते यांनी दिली.

..............

'कृष्णा'चा बुधवारपासून

गळीत हंगाम

कराड :

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ६०वा ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते येत्या बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्यासह संचालक मंडळ व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली.

कृष्णा कारखान्याच्या सन २०१९-२० या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण करण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेची पूर्वतयारी झालेली असून, बैलगाड्या, अंगद, ट्रॅक्टर, ट्रक यांच्याशी करार करण्यात आले आहेत. कारखान्याच्या ऊस गाळप करणाऱ्या मशिनरींची ओव्हर ऑइलिंग व देखभालीची कामे त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरुस्त्या इत्यादी कामेही पूर्ण झाली आहेत.

...........

कराडमध्ये वीज वितरणवर 'प्रहार'

कराड :

औद्योगिक वसाहतीतील व परिसरातील सुमारे ४० उद्योगांचा वीज पुरवठा त्वरीत अखंड व सुरळीत न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित बानगुडे यांनी उद्योगांच्या वतीने निवेदनाद्वारे विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता अभिमन्यु राख यांना दिला. तत्पूर्वी प्रहार संघटनेच्या वतीने येथील औद्योगिक वसाहतीपासून विद्युत मंडळाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढून कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.

ज्येष्ठ नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या येथील औद्योगिक वसाहत व परिसरातील उद्योगांचे चालक, कामगार तसेच प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेसह सुमारे ६०० जण मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या वतीने उद्योजक अजित बानगुडे, मनोज माळी, विजय मोरे, शेखर कलबुर्गी, साजीद पटेल, श्रीधर कलबुर्गी, प्रदीप शिंदे, संदिप कोटणीस, रामचंद्र वंजारी, मनोज वीर यांनी कार्यकारी अभियंता राख यांना निवेदन देवून आपल्या मागण्या मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटण दरावर परिणाम

$
0
0

कोल्हापूर

बाजारात बकऱ्यांचा दर वाढल्याने व बकऱ्यांची पुरेशी उपलब्धता नसल्याने जादा दरानेच बकरी खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे मटण दरावर परिणाम झाला आहे, असे पत्रक खाटिक समाजाने प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, महापूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर बकरी दगावली आहेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्यातील व्यावसायिक महाराष्ट्रात खरेदीसाठी येत आहेत. या राज्यात मटणाचा दर जास्त असल्याने ते चढ्या दराने बकरी खरेदी करत आहेत. त्यामुळे बकऱ्यांचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम मटण दरावर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धारदार शस्त्राने हल्ला

$
0
0

कोल्हापूर

दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरुन महादेव कांबळे याने गिरमल मुरग्याप्पा कांबळे (वय, ५०, रा. सुधाकर जोशी नगर) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबतची फिर्याद जखमी कांबळे यांचा मुलगा महेश कांबळे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. संशयित महादेव कांबळे याच्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस लाइनमधील झाडांना इजा नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुना बुधवार पेठेतील पोलिस लाइनमधील गृहप्रकल्पासाठी झाडे तोडण्याच्या प्रकाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक मिलिंद यादव यांनी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे तक्रार केली होती. वृक्ष प्राधिकरण समितीने, त्या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला झाडांना कोणत्याही प्रकारची इजा पोहचणार नाही यासंबंधी काळजी घ्यावी, अशी नोटीस काढली आहे. झाडे तोडण्याच्या विरोधातील आंदोलनाला यश मिळाल्याचे यादव यांनी म्हटले आहे. समितीने काढलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे, ' खोदाईमुळे झाडांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे मातीचा भराव टाकून झाडांची मुळे झाकावीत तसेच झाडांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासंबंधी काळजी घ्यावी असे समितीने कळविले आहे. झाडे तोडू नयेत तसेच त्यांना कसलाही धोका पोहचू नये. झाडे तोडावयाची असल्यास त्याची रितसर परवानगी वृक्षप्राधिकरण समितीकडून घ्यावी, असेही नोटीसीत म्हटले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय व शहर पोलिस अधीक्षक कार्यालयालाही यासंबंधी पत्र पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांबवडे शाखेचे उद्घाटन

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या बांबवडे शाखेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सोसायटीचे अध्यक्ष राजीव परीट यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष दिनकर तराळ यांनी स्वागत केले. संचालक रामदास पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी काळे यांनी आभार मानले. यावेळी सुकाणू समितीचे निमंत्रक एम. एम. पाटील, राजाराम वरुटे, शिवाजीराव कोळी, प्रकाश देसाई, भालचंद्र माने यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी सुरमंजिरी लाटकर

$
0
0

कोल्हापूर: महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड . सुरमंजिरी लाटकर तर उपमहापौरपदी काँग्रेसचे संजय मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.

लाटकर यांनी भाजप-ताराराणी घाडीच्या उमेदवारांचा पराभव केला.लाटकर यांना ४३ तर विरोधी उमेदवार भाग्यश्री शेटके यांना ३२ मते मिळाली. मोहिते यांना ४३ तर विरोधी ताराराणीचे कमलाकर भोपळे यांना ३२ मते मिळाली. महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे होतं. मात्र शिवसेनेचे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं.

महापौर, उपमहापौर निवडीची सभा मंगळवारी (ता.१९) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात पाडली. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड. सुरमंजिरी लाटकर आणि भाजपच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांच्यात लढत झाली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे संजय मोहिते विरुद्ध ताराराणी आघाडीचे कमलकार भोपळे अशी लढत झाली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदी सूरमंजिरी लाटकर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४९व्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सूरमंजिरी राजेश लाटकर यांची तर ४५ व्या उपमहापौरपदी संजय वसंतराव मोहिते यांची निवड झाली. अॅड. लाटकर यांनी भाजपच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांचा तर मोहिते यांनी ताराराणी आघाडीचे उमेदवार कमलाकर भोपळे यांचा ४३ विरुद्ध ३२ असा पराभव केला. निवडीनंतर सत्तारुढ काँग्रेस आघाडीच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोषी वातावरणात मिरवणूक काढली.

महापौर माधवी गवंडी व उपमहापौर भूपाल शेटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात निवड सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी दौलत देसाई होते. सभेपूर्वी पन्हाळा येथून सर्व सत्तारुढ गटाचे सदस्य आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयात पोहोचले. त्यानंतर एका खासगी ट्रॅव्हल्समधून सभास्थळी दाखल झाले. राजस्थानी फेटे परिधान केलेल्या सर्व सदस्यांनी पावणे अकरा वाजता सभागृहात प्रवेश केला. नंतरच्या दहा मिनिटांत विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे सदस्य विजयाच्या घोषणा देत सभागृहात आले. काही वेळात पीठासन अधिकारी देसाई आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह स्थानापन्न झाले. नंतर निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. विषयपत्रिकेचे वाचन नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी केले.

महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या अॅड. लाटकर व भाजपच्या शेटके यांचे अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर करत माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी पीठासन अधिकाऱ्यांनी दिला. दोन्ही अर्ज कायम राहिल्याने हात वर करुन निवड करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रथम लाटकर यांच्यासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. त्यांना ४३ मते मिळाली. तर शेटके यांना ३२ मते मिळाली. लाटकर यांना ११ मतांनी विजयी घोषीत करण्यात आले.

त्यानंतर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे मोहिते व ताराराणी आघाडीचे भोपळे यांच्यामध्ये लढत झाली. अपक्षेप्रमाणे मोहिते यांनी ४३ मते मिळवत भोपळे यांचा ११ मतांनी पराभव केला. देसाई यांनी मोहिते यांना विजयी घोषीत केले. विजयी उमेदवारांचा पीठासन अधिकारी व आयुक्तांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्याला आला. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी नूतन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते फित कापून कार्यालयात प्रवेश केला. यावेळी सत्तारुढ आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

कार्यालय प्रवेशानंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या जल्लोषी मिरवणुका काढण्यात आल्या. फटक्यांची आतषबाजीने महापालिका चौक दणाणून गेला. खुल्या जीपमध्ये पदाधिकारी स्थानापन्न झाल्यानंतर सदर बाजार, विचारे माळ प्रभागात आणि साइक्स एक्स्टेशन प्रभागात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन्ही प्रभागांत मिरवणूक सुरू होती. सर्व कार्यकर्ते गुलालामध्ये न्हावून निघाले होते. फटाक्यांच्या आतषबाजीत 'राजूदादा सच्चा है'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

पॉइंटर

- लाटकर या पहिल्या महिला वकील महापौर

- ताराराणी आघाडीच्या नगरसेविका तेजस्विनी इंगवले गैरहजर

- नगरसेवक राजू दिंडोर्ले विरोधी आघाडीसोबतच

- नगरसेविका जयश्री जाधव, नगरसेवक संभाजी जाधव यांचा स्वतंत्र प्रवेश

- नगरसेवक अशोक जाधव यांची नाराजी कायम

- निवड सभेला पाच सदस्य गैरहजर

आमदार ऋतुराज पाटील यांनी केले सारथ्य

सत्तारुढ आघाडीचे सर्व नगरसेवक अजिंक्यतारा कार्यालयावर सकाळी साडेनऊ वाजता पोहोचले. आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ मुंबईत असल्याने सर्वांचे स्वागत आमदार ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांनी केले. त्यानंतर खासगी ट्रॅव्हल्समधून उमेदवारांचे सारथ्य करत आमदार पाटील हे जाधव यांच्यासह महापालिकेत दाखल झाले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार उपस्थित होते. निवड प्रक्रिया होईपर्यंत आमदार जाधव महापालिकेत थांबले होते.

चौथ्या वकील महापौर

यापूर्वी अॅड. सुभाष राणे, महादेवराव आडगुळे व शामराव शिंदे या तीन वकिलांना महापौरपदाची संधी मिळाली होती. आता अॅड. लाटकर यांना संधी मिळाली आहे. महापौर होणाऱ्या अॅड. लाटकर पहिल्या महिला वकील आहेत.

सेनेचे चार नगरसेवक

निवड सभेला गैरहजर

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या आजच्या महापौर, उपमहापौर निवडीला फारशी चुरस नसतानाही काही अनपेक्षीत घडामोडी घडल्या. शिवसेनेचे चारही नगरसेवक सभेला अनुपस्थित राहीले तर सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळ घटल्याचे पहायला मिळाले.

यंदाच्या सभागृहात शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी नेहमीच सत्तारुढ आघाडीसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. यापूर्वीच्या निवड सभेदरम्यान अनुपस्थित राहून अथवा निवडीवेळी तटस्थ राहून त्यांनी सत्तारुढ गटालाच मदत केली. आजच्या पदाधिकारी निवडीवेळीही असेच चित्र दिसले. फारशी चुरस नसताना राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण, नियाज खान व प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे हे चारही नगरसेवक गैरहजर राहिले. त्यांना सभेला गैरहजर राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन आल्याची चर्चा सभेनंतर सुरू होती.

दरम्यान, सत्तारुढ व विरोधी आघाडीचे संख्याबळ घटल्याचेही पहायला मिळाले. सलग सहा महिने महासभेस गैरहजर राहिल्यामुळे अपात्र ठरलेल्या शमा मुल्ला यांच्यामुळे सत्तारुढ गटाचे संख्याबळ एकने कमी झाले. तर ताराराणी आघाडीच्या नगरसेविका तेजस्विनी इंगवले गैरहजर राहिल्याने त्यांचेही संख्याबळ घटले. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री व भाऊ संभाजी यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. मतदानापूर्वी दोन्ही आघाड्यांकडून पक्षाचा व्हीप लागू करण्यात आला होता.

अॅड. लाटकर कुटुंबीय भावूक

लाटकर यांना महापौरपदाने दोनवेळा हुलकावणी दिली. त्यामुळे आजच्या निवड सभेवेळी लाटकर कुटुंबीय उपस्थित होते. सूरमंजिरी यांचे सासरे आणि सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भरत लाटकर, सासू अंजली, वडील सुरेंद्र बसगौडर, आई चंद्रक्का यांच्यासह मुले, भावजय, नणंद असा परिवार महापालिकेत दाखल झाला होता. कार्यालय प्रवेशानंतर राजू यांच्यासह सर्वांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत. कुटुंबीय भावूक झाल्याने अन्य महिला नगरसेविकांचेही डोळे पाणावले.

लक्षवेधी फलक

नूतन महापौर अॅड. लाटकर यांची मिरवणूक काढण्यासाठी ओपन टप जीप आणली होती. जीपच्या मागील बाजूस डिजिटल फलक लावला होत्या. फलकावर आमदार मुश्रीफ व पाटील यांचे फोटो होते. फोटोखाली 'साथ एकनिष्ठेने - वाट ध्येयनिष्ठेने, चाल तत्वनिष्ठेने' असा मजकूर होता. हा आशय सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

०००

(मूळ कॉपी)

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या ४९ महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सुरमंजिरी राजेश लाटकर यांची तर ४५ उपमहापौरपदी संजय वसंतराव मोहिते यांची निवड झाली. अॅड. लाटकर यांनी भाजपच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांचा तर मोहिते यांनी ताराराणी आघाडीचे उमेदवार कमलाकर भोपळे यांचा ४३ विरुद्ध ३२ असा ११ मतांनी पराभव केला. निवडीनंतर सत्तारुढ काँग्रेस आघाडीच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोषी वातावरणात मिरवणूक काढली.

महापौर माधवी गवंडी व उपमहापौर भूपाल शेटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी महापालिकेच्या छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात निवड सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी दौलत देसाई होते. सभेपूर्वी पन्हाळा येथून सर्व सत्तारुढ गटाचे सदस्य आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयात पोहोचले. त्यानंतर एका खासगी ट्रॅव्हल्समधून सभेसाठी दाखल झाले. राजस्थानी फेटे परिधान केलेल्या सर्व सदस्यांनी पावणे आकरा वाजता सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर दहा मिनिटांनी विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे सदस्य विजयाच्या घोषणा देत सभागृहात आले. १०.५७ ला पीठासन अधिकारी देसाई आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह स्थानापन्न झाले. त्यानंतर निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. विषय पत्रिकेचे वाचन नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी केले.

महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या अॅड. लाटकर व भाजपच्या शेटके यांचे अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननी नंतर दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर करत माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी पीठासन अधिकाऱ्यांनी दिला. दोन्ही अर्ज कायम राहिल्याने हात वर करुन निवड करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रथम लाटकर यांच्यासाठी हात वर करुन मतदान घेण्यात आले. त्यांना ४३ मते मिळाली. तर शेटके यांना ३२ मते मिळाली. लाटकर यांना ११ मतांनी विजयी घोषीत केले. त्यानंतर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे मोहिते व ताराराणीचे भोपळे यांच्यामध्ये लढत झाली. अपक्षेप्रमाणे मोहिते यांनी ४३ मते मिळवत भोपळे (३२) यांचा ११ मतांनी पराभव केला. मोहिते यांना देसाई यांनी विजयी घोषीत केले. विजयी उमेदवारांचा पीठासन अधिकारी व आयुक्तांच्या हस्ते तुळसीचे रोप देवून सत्कार केला. ४९ व्या महापौर म्हणून लाटकर यांनी तर ४५ वे उपमहापौर म्हणून मोहिते यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी नूतन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते फित कापून कार्यालयात प्रवेश केला. यावेळी सत्तारुढ आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

कार्यालयीन प्रवेशानंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या जल्लोषी मिरवणुकीला सुरुवात झाली. फटक्यांची आतषबाजी करत महापालिका चौक दणाणून गेला. ओपन टप जीपमध्ये पदाधिकारी स्थानापन्न झाल्यानंतर सदर बाजार विचारे माळ प्रभागात व साईक्स एक्स्टेशन प्रभागात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन्ही प्रभागात मिरवणूक सुरू होती. सर्व कार्यकर्ते गुलालामध्ये न्हावून निघाले होते. फटाक्यांच्या आतषबाजीत 'राजूदादा सच्चा है'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

...................

पॉइंटर

पहिल्या वकिल महिला महापौर

ताराराणी आघाडीच्या नगरसेविका तेजस्विनी इंगवले गैरहजर

नगरसेवक राजू दिंडडोर्ले विरोधी आघाडीसोबत कायम

नगरसेविका जयश्री जाधव व नगरसेवक संभाजी जाधव यांचा स्वतंत्रपणे प्रवेश

नगरसेवक अशोक जाधव यांची नाराजी कायम

निवड सभेला पाच सदस्य गैरहजर

......................

चौकट

आमदार ऋतुराज पाटील यांचे सारथ्य

सत्तारुढ आघाडीचे सर्व नगरसेवक अजिंक्यतारा कार्यालयावर सकाळी साडेनऊ वाजता पोहोचले. आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ मुंबईत असल्याने सर्वांचे स्वागत आमदार ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांनी केले. उमेदवारांचे सारथ्य करत आमदार पाटील आमदार जाधव यांच्यासह महापालिकेत दाखल झाले. त्यांच्यासोबत शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार उपस्थित होते. संपूर्ण निवड प्रक्रिया होऊपर्यंत आमदार जाधव महापालिकेत थांबले होते.

.....................

चौथ्या वकिल महापौर

यापूर्वी अॅड. सुभाष राणे, महादेवराव आडगुळे व शामराव शिंदे या तीन वकिल पदवी असलेल्या व्यक्तींना महापौरपदाची संधी मिळाली होती. १९९१ नंतर पुन्हा महापौरपदी वकिल पदवी असलेल्या अॅड. लाटकर यांना संधी मिळाली आहे. वकिल महापौर होणाऱ्या अॅड. लाटकर पहिल्या महिला महापौर बनण्याचा मान मिळवला.

.......................

शिवसेनेचे चार नगरसेवक निवड सभेला अनुपस्थित

२०१५ नंतर अस्तित्वात आलेल्या सभागृहात शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी नेहमीच सत्तारुढ आघाडीसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. निवड सभे दरम्यान अनुपस्थित राहणे किंवा तटस्थ राहत त्यांनी सत्तारुढ गटाला मदत केली. आजच्या पदाधिकारी निवडी दरम्यान चुरस नसतानाही सेनेचे राहूल चव्हाण, अभिजित चव्हाण, नियाज खान व प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे गैरहजर राहिले. सभेस गैरहजर राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन आल्याची चर्चा सभेनंतर सुरू होती.

.......................

सत्तारुढ व विरोधी आघाडीचे संख्याबळ घटले

सलग सहा महिने महासभेस गैर हजर राहिल्यामुळे अपात्र ठरलेल्या शमा मुल्ला यांच्यामुळे सत्तारुढ गटाचे संख्याबळ एकने कमी झाले. तर ताराराणी आघाडीच्या नगरसेविका तेजस्विनी इंगवले गैरहजर राहिल्याने त्यांचेही एकने संख्याबळ घटले. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री व भाऊ संभाजी जाधव यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. मतदानापूर्वी दोन्ही आघाडीकडून पक्षाचा व्हीप लागू करण्यात आला होता.

...................

अॅड. लाटकर कुटुंबीय भावूक

महापौरपदाने अॅड. लाटकर यांना दोनवेळा हुलकावणी दिली. त्यामुळे निवड सभेदरम्यान संपूर्ण लाटकर कुटुंबीय उपस्थित होते. सासरे भरत लाटकर, सासू अंजली लाटकर, वडिल सुरेंद्र बसगौडर, आई चंद्रक्का यांच्यासह मुले, भावजय, नणंद असा संपूर्ण परिवार दाखल झाला होता. कार्यालयीन प्रवेशानंतर राजू लाटकर यांच्यासह सर्वांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत. लाटकर कुटुंबीय भावूक झाल्याने अन्य महिला सदस्यांचेही डोळे पाणावले.

...................

लक्षवेधी फलक

नूतन महापौर अॅड. लाटकर यांची मिरवणूक काढण्यासाठी ओपन टप जीप आणली होती. जीपच्या मागील बाजूस मोठा डिजीटल फलक लावण्यात आला होत्या. फलकावर आमदार मुश्रीफ व पाटील यांचे फोटो होते. फोटोखाली 'साथ एकनिष्ठेने', 'वाट ध्येयनिष्ठेने', 'चाल तत्वनिष्ठेने' या आशयातील मजकूर असलेला फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीटर बंद रिक्षांवर कारवाई

$
0
0

लोगो : मटा इम्पॅक्ट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करून रिक्षांच्या मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओ विभागाने कारवाई सुरू केली. मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात केलेल्या तपासणीत दहा रिक्षा दोषी आढळल्या. दोषी रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे उद्धट आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रिक्षाचालकांकडून प्रवाशांसोबत उद्धट वर्तन होत असल्याच्या तक्रारी आरटीओ अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. बिलावरूनही अनेकदा रिक्षाचालक आणि प्रवाशांचे वाद होतात. रिक्षाचालक जाणीवपूर्वक मीटरमध्ये फोरफार करून प्रवाशांकडून जादा पैसे उकळतात. बरेच रिक्षाचालक मीटरनुसार भाडे घेण्यास नकार देऊन मनमानी करतात. याबाबत विचारणा केल्यास प्रवाशांसोबत वाद घालण्याचे प्रकार वाढले आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'ने रिक्षाचालकांची मुजोरी आणि उद्धटपणा समोर आणला होता. यानंतर काही प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे रिक्षाचालकांची तक्रार केली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १८) झालेल्या ग्राहक पंचायतीच्या बैठकीत प्रवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उद्धट रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार आरटीओ अधिकाऱ्यांनी मंगळवारी उद्धट आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली.

मोटार वाहन निरीक्षक सुभाष देसाई यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील राजर्षी शाहू महाराज रिक्षा मंडळ येथे रिक्षांची तपासणी केली. तपासणीत दहा रिक्षा दोषी आढळल्या. मीटर बंद, मीटरमध्ये फेरफार, धूर तपासणी प्रमाणपत्र नसणे, फिटनेस सर्टिफिकेट नसणाऱ्या रिक्षांवर अधिकाऱ्यांनी कारवाई केली. दोषी दहा रिक्षाचालकांना कागदपत्रे घेऊन आरटीओ कार्यालयात येण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. 'कागदपत्रांची खात्री करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे,' अशी माहिती देसाई यांनी दिली. मंगळवारी सुरू केलेली कारवाईची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. शहरासह जिल्ह्यातही याची अंमलबजावणी होणार आहे. उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांनी आरटीओ कार्यालयात लेखी तक्रारी कराव्यात, असे आवाहनही आरटीओ अधिकाऱ्यांनी केले आहे. या कारवाईमुळे रिक्षाचालकांची मुजोरी थांबेल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

या रिक्षाचालकांवर झाली कारवाई

अमित दीपक बाटुंगे (एमएच ०९ जे. ७२७९), आशिष डेव्हिड कांबळे (एमएच ०९ क्यू. ९८७८), अस्लम अजिज बारगीर (एमएच ०९ सीडब्ल्यू. २७१०), सतीश आनंदराव कोरवी (एमएच ०९ सीओ १५३३), सचिन खंडेराव कडूकर (एमएच ०९ जे. ७६६४), अविनाश अशोक देसाई (एमएच ०९ जे. ५१५६), सागर भागोजी गावडे (एमएच ०९ जे. ७२१८), दगडू शिरू गोडेकर (एमएच ०९ इएल ११४२), प्रशांत अशोकराव माने (एमएच ०९ जे. ७०७८) आणि आत्माराम राजाराम देशमुख (एमएच ११ एजी ३७१) या रिक्षाचालकांवर कारवाई झाली.

रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणेच बिलांची आकारणी करणे बंधनकारक आहे. मीटरमध्ये फेरफार करणे किंवा मीटर बंद ठेवून भाड्याची आकारणे करणे बेकायदेशीर आहे. रिक्षाचालकांनी भाडे नाकारणेही योग्य नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. प्रवाशांनी तक्रारी द्याव्यात.

- डॉ. एस. टी. अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी

अशी होणार दंडात्मक कारवाई (रुपयांत)

मीटर बंद, फेरफार १२००

विना परवाना चालक १०००

फिटनेस सर्टिफिकेट नाही ४७००

परमिट नाही ४०००

धूरतपासणी प्रमाणपत्र नाही १०००

इन्शुरन्स नाही २३००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइनची दुरुस्ती सुरुच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा रिंगरोडवरील बुद्धीहाळकरनगर येथील शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीला काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे क्रॉस कनेक्शन देण्याचे काम मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यानंतर साळोखेनगर पाण्याच्या टाकीजवळील गळती काढण्यास सुरुवात झाली. बुध‌वारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीमुळे पाणी न आलेल्या भागात महापालिकेच्या सात टँकरमधून ३५ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

कळंबा साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोडच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेच्या वाहिनीला शिंगणापूर योजनेची जलवाहिनी जोडण्यात आली. दिवसभर दोन्ही जलवाहिन्या क्रॉस करून वेल्डिंग करण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी काम पूर्ण झाल्यानंतर साळोखेनगर टाकीजवळील हॉटेल आनंद येथील दुरुस्तीला सुरुवात झाली. दुरुस्तीचे काम बुध‌वारी दुपारपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर तिन्ही उपसा केंद्रांतून पाणी उपसा सुरू होऊन गुरुवारी (ता. २१) सकाळपासून पूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.

दरम्यान, दुरुस्तीमुळे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद आहे. विशेषत: साळोखेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या भागात सोमवार सकाळपासून पुरवठा बंद आहे. दुरुस्तीचा परिणाम ए. आणि ई. वॉर्डवर होणार असल्याचे जाहीर केले होते. पण, साळोखेनगर टाकीजवळ जलवाहिनी राजेंद्रनगरकडे जाणाऱ्या जलवाहिनीला जोडण्यात आल्याने या भागाला फारसा फटका बसला नाही. दरम्यान, कळंबा फिल्टर हाऊस व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून अनुक्रमे १९ व १६ अशा एकूण ३५ टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. राजाराम चौक, उद्यमनगर, नाना पाटील नगर, राजकपूर पुतळा, राजेंद्र नगर, तुळजाभवानी कॉलनी, राजलक्ष्मी नगर, फुलेवाडी रिंगरोड, मोरे-माने नगर, रायगड कॉलनी, मोहिते कॉलनी, शिवाजी पार्क, शाहू मिल चौक सह्याद्री हौसिंग सोसायटी, सिद्धार्थ नगर आदी ठिकाणी टँकरने पाणी देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अध्यक्षपदासाठी दिग्गज दावेदार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांची मांदियाळी दिसत आहे. विविध पक्षांकडून १९ सदस्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत असली तरी खरी लढत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये पाहावयास मिळणार आहे. भाजपचे ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे तर काँग्रेसकडून पांडूरंग भादिंगरे, राष्ट्रवादीकडून जयवंत शिंपी, सतीश पाटील, युवराज पाटील हे प्रबळ दावेदार समजले जातात. पाच गटांत विभागलेली शिवसेना एकत्र आल्यास सेना महत्वाची भूमिका बजावू शकते. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता अध्यक्षपदात कोण बाजी मारणार याविषयी वेगवेगळे तर्क आहेत.

मंगळवारी सकाळी आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषदेतील लगबगही वाढली. ओबीसी प्रवर्गातील इच्छुक सदस्यांनी सदस्यांच्या गाठीभेठीला सुरुवात केली. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्ष निवडीची शक्यता आहे. सर्वसाधारण खुल्या गटातून अध्यक्ष झालेल्या शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी २१ सप्टेंबर रोजी संपला आहे.

सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व इतर समिती सभापतींना चार महिन्यांची मुदतवाढ मिळाली. विद्यमान पदाधिकाऱ्यांना ही मुदतवाढ दिली. मात्र आता आरक्षण जाहीर झाल्यामुळे २१ जानेवारीपुर्वी अध्यक्ष निवड होऊ शकते. २०१७ मध्ये झालेल्या जनिवडणुकीत भाजप व मित्रपक्ष आघाडीने बाजी मारली. भाजपच्या सदस्या शौमिका महाडिक यांनी अध्यक्षपदाची निवडणूक ३७ विरुद्ध २८ मतांनी जिंकली होती. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या सदस्या रश्मी देसाई आणि राष्ट्रवादीचे सदस्य विजय बोरगे गैरहजर राहिले होते.

इंगवलेंना संधी शक्य, खोबरेही चर्चेत

भाजपचे अरुण इंगवले हे सभागृहातील सिनीअर आहेत. ते सभागृहात चौथ्यांदा प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांच्या पत्नी स्मिता याही एकदा निवडून आल्या होत्या. पाचवेळा निवडून येऊनही इंगवले यांना अद्याप कुठलेही पद मिळाले नाही. भाजपकडून ते अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. भाजप नेते व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पदाचा शब्द दिला होता. दुसरीकडे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेले तारदाळचे भाजप सदस्य प्रसाद खोबरे यांचे नावही चर्चेत आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा विधानसभेत पराभव झाल्यामुळे ते आपल्या मतदारसंघाला पद देण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी चर्चा आहे.

संभाव्य उमेदवार (सत्तारुढ)

भाजप : अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, विजया पाटील, स्मिता शेंडुरे.

शिवसेना : प्रविण यादव, हंबीरराव पाटील (भेडसगाव), आकांक्षा पाटील (पाटीलवाडी)

जनसुराज्य शक्ती पक्ष : मनीषा माने

आवाडे गट : वंदना मगदूम

विरोधी आघाडी

काँग्रेस : पांडुरंग भादिंगरे (पुगांव), सविता चौगुले (पंडेवाडी), अरुण सुतार (शिनोळी).

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : जयवंत शिंपी (आजरा), सतीश पाटील (गिजवणे), युवराज पाटील (सांगाव), विजय बोरगे (साळशी) , प्रियांका पाटील (आसुर्ले), परवीन पटेल (औरवाड)

शिवसेना : वंदना जाधव (तळाशी)

एससी प्रवर्गातील सदस्यांचा हिरेमोड

१९९७ नंतर अध्यक्षपदासाठी एससी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले नाही. त्यामुळे यंदा या प्रवर्गासाठी आरक्षण पडेल अशी अशी दाट चर्चेत होती. या प्रवर्गात काँग्रेसचे सदस्य सुभाष सातपुते, भाजप आघाडीकडून दलितमित्र अशोक माने, मनीषा टोणपे, महेश चौगुले यांच्या नावांचा समावेश संभाव्य उमेदवारांत होता. काँग्रेस आघाडीकडून सातपुते हे एकमेव सदस्य होते. या प्रवर्गातील सदस्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली. मात्र मंगळवारी सोडतीत ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने एससी प्रवर्गातील सदस्यांचा हिरेमोड झाला.

हातकणंगलेत सर्वाधिक इच्छुक

अध्यक्षपदासाठी सर्वाधिक इच्छुक उमेदवार हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. भाजपचे इंगवले (आळते), खोबरे (तारदाळ), विजया पाटील (कबनूर), स्मिता शेंडुरे (हुपरी) शिवसेनेचे प्रविण यादव (मिणचे), जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सदस्या मनीषा माने (अंबप), आवाडे गटाच्या सदस्या वंदना मगदूम (माणगाव) यांचा समावेश आहे. यापैकी मगदूम सध्या महिला व बालकल्याण समिती सभापती आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमने सामने

$
0
0

आमने सामने

एंट्रो...

यंदा साखर हंगाम उशिरा सुरू झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषद झाल्याशिवाय आणि दर जाहीर केल्याशिवाय हंगाम सुरू करू नये, अशी कारखान्यांना विनंती केली आहे. साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने एकरकमी एफआरपी देण्याबाबत कारखान्यांकडून दर जाहीर केलेले नाहीत, तर कारखाने एफआरपीचे तुकडे पाडून दर देणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी संघटना एकरकमी एफआरपीवर ठाम आहेत. त्यासंदर्भात कारखानदार आणि स्वाभिमानीची भूमिका...

००००

एफआरपीचे तुकडे पाडू देणार नाही

महापूर, अतिवृष्टीमुळे यंदा ऊस उत्पादन घटणार असून, त्याचा फटका साखर उद्योगासह शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संघर्षाऐवजी समन्वयाची भूमिका घ्यावी, असे कारखानदारांनी आवाहन केले होते. पण कारखानदारांकडून एफआरपीचे तुकडे पाडण्याची भाषा होत असल्याने आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागत आहे. साखर हंगाम सुरू झाल्यानंतरही यंदा एफआरपीचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत. तसे झाल्यास हंगाम सुरू असताना कारखाने बंद पाडले जातील.

यंदा महापुराने जिल्ह्यातील ६० ते ६२ हजार हेक्टरवरील ऊस बुडाला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादनात ३० लाख हेक्टरची घट येण्याची शक्यता आहे. त्याचा फटका साखर उद्योगाला बसणार आहे. त्यामुळे यंदाच्या साखर हंगामाला टोकाचा, कडवा विरोध करता येणार नाही याची आम्हाला जाणीव आहे. कारण साखर उद्योग संपला तर शेतकऱ्यांची हक्काची बाजारपेठ अडचणीत येऊ शकेल. कारखान्यांनी महापुरातील बुडीत ऊस काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी, पण रिकव्हरी कमी येते म्हणून कारखानदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. यंदा साखर उतारा कमी येणार असल्याने त्याचा फटका साखर कारखान्यांना बसला तरी त्याच्या कैक पटीने शेतकऱ्यांना बसणार आहे.

गतवर्षी कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले. कायद्यानुसार १४ दिवसांत एफआरपी दिली नाही तर १५ टक्के दंड द्यावा लागतो. राज्यातील दंडाची रक्कम १५०० कोटी रुपये होते. गेल्यावर्षी कारखान्यांनी एफआरपी अधिक २०० रुपये देण्याचीही घोषणा केली होती. मात्र, राज्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. जिल्ह्यातील वारणा, आजरा, गायकवाड कारखान्यांची एफआरपी थकीत आहे. साखर उद्योग अडचणीत आहे, पण सहकार्याची भूमिका घेतली जात असताना यंदाच्या हंगामात एफआरपीचे तुकडे पाडण्याचा निर्णय घेतला तर स्वाभिमानी कडवा संघर्ष करेल. प्रसंगी हंगाम सुरू असताना कारखाने बंद पाडेल.

प्रा. डॉ. जालिंदर पाटील, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

०००००००

एफआरपीपेक्षा जादा दर देणार

महापूर, अतिवृष्टीने यंदा उसाचे उत्पादन घटणार असल्याने साखर हंगामाचा कालावधी कमी होणार आहे. गेली दोन वर्षे साखरेचे दर प्रचंड घसरल्याने कारखाने कर्ज काढून शेतकऱ्यांना एफआरपी देत आहेत. अनेक कारखान्यांनी गेल्या हंगामात एफआरपीपेक्षा जादा रक्कम दिली आहे. या हंगामातही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची भूमिका घेतली असून, ती दिली जाईल. साखर कारखान्यांना बँकेकडून मिळणारे कर्ज आणि साखर विक्री याच्या आर्थिक गणिताचा ताळमेळ साधून कोणत्याही परिस्थितीत एफआरपी दिली जाईल.

महापुरामुळे नदीकाठचा पूर्ण ऊस बुडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बुडीत ऊस काढून शेतकऱ्यांना नवीन रान तयार करून देणे हे कारखानदारांचे कर्तव्य असून ते प्राधान्याने पार पडतील. नदीकाठच्या उसाचे नुकसान झाले असून, उसाचे शेंडे मोडले आहेत. डोळे फुटले असून, तो ऊस कसा काढायचा? हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी तोडणी मजुरांना समजावून सांगावे लागणार आहे. बुडीत क्षेत्रातील साखर उतारा चार ते पाच टक्क्यांनी, तर अतिवृष्टीमुळे अन्य ठिकाणच्या उताऱ्यात दोन टक्क्यांनी घट येणार आहे. त्याचा परिणाम शेतकरी आणि कारखानदारीवर होणार आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकारने झोनबंदी जाहीर केल्याने मल्टिस्टेट कारखान्यांना कर्नाटकातील ऊस आणता येत नाही, तर दुसरीकडे महाराष्ट्रात झोनबंदी नसल्याने जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर कर्नाटकातील बेडकिहाळ, हालसिद्धनाथ, संकेश्वर, गोकाक या कारखान्यांकडे जात आहे. त्यासाठी कारखाने लवकर सुरू करण्याची आमची भूमिका आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे साखरेचा उतारा एक ते दीड टक्क्याने घटणार आहे. त्याचा फटका शेतकरी आणि कारखान्यांनाही बसणार आहे. एक टक्का उतारा घटला तर १० किलोने साखर घटणार आहे. हे नुकसा कारखान्यांना सोसावे लागणार आहे. उसाचा दर आणि साखरेचा दर यामध्ये शॉर्ट मार्जिन यापूर्वीच तयार झाले असून,क यंदा ते वाढणार आहे.

जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी यापूर्वी दरातील स्पर्धेमुळे एफआरपीपेक्षा जादा रक्कम दिली आहे. कारखाने मोठ्या आर्थिक संकटातून जात असून यंदा साखर उतारा कमी होणार असल्याने कारखाने आणि ऊस उत्पादकांना फटका बसणार आहे. शेतकरी आणि कारखानदारांच्या अडचणी लक्षात घेऊन शेतकरी संघटनांही सामंजस्यांची भूमिका घेऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.

आमदार प्रकाश आवाडे, अध्यक्ष जवाहर साखर कारखाना

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची लागणार कसोटी

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : राज्यातील नवी सत्ता समीकरणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भाजपवरील वाढता रोष, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांचा पराभव या साऱ्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमटण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. सध्या सत्तारूढ भाजप आघाडीसोबत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन, माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे दोन, चंदगडमधील युवक क्रांती आघाडीचे दोन आणि माजी आमदार सुजित मिणचेकर गटाचा एक आणि एक अपक्ष सदस्य असे आठजण विरोधी काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे. या सदस्यांनी भाजपची साथ सोडल्यास जिल्हा परिषदेत भाजप आघाडीचे संख्याबळ ३७ वरून २९ पर्यंत येऊ शकते.

दुसरीकडे काँग्रेसचे संख्याबळ या नाराज घटकांना धरून २८ वरून ३६ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बदलत्या राजकीय स्थितीमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता कायम राखताना भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची कसोटी लागणार आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर काँग्रेस आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील व हसन मुश्रीफ यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. काँग्रेस आघाडीच्या या नेतेमंडळींनी जि.प.मध्ये पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

नवी विरोधी आघाडी

भाजपविरोधात जिल्हा परिषदेत विरोधी काँग्रेस आघाडी विविध गटाची मोट बांधणीच्या प्रयत्नात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचे भाजपसोबत बिनसले आहे. यामुळे या गटाचे दोन सदस्य काँग्रेस आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. अपक्ष सदस्या रसिका अमर पाटील भाजपची साथ सोडून आघाडीसोबत येऊ शकतात. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर गटाचे तीन, खासदार संजय मंडलिक व माजी आमदार उल्हास पाटील गटाचे प्रत्येकी एक सदस्य आघाडीसोबत असतील. याशिवाय सध्या भाजपसोबत असलेला शाहूवाडी तालुक्यातील माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या गटाचे दोन सदस्य विधानसभेच्या निकालाचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेसला मदत करू शकतील. हातकणंगले तालुक्यातील माजी आमदार सुजित मिणचेकर गटाचा एक सदस्य आहे. या साऱ्यावर विरोधकांची भिस्त आहे.

दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता कायम ठेवण्यासाठी नेतेमंडळी रणनीती आखत आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांचा गट, माजी आमदार चंद्रदीप नरके व माजी आमदार संजय घाटगे यांचा गट, ताराराणी आघाडी हे भाजपसोबत राहण्याची शक्यता आहे.

००००

सध्याचे बलाबल

सत्तारूढ आघाडी :

भाजप १४, शिवसेना ७, जनसुराज्य शक्ती पक्ष ६, ताराराणी आघाडी ३, स्वाभिमानी शेतकरी संघटना २, आवाडे गट २, युवक क्रांती आघाडी २, अपक्ष १

०००

विरोधी काँग्रेस आघाडी :

काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ११, शिवसेना आबिटकर गट ३, खासदार संजय मंडलिक गट १, माजी आमदार उल्हास पाटील गट १

(गेल्या वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रश्मी देसाई व राष्ट्रवादीचे विजय बोरगे गैरहजर होते)

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील यांना पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर : यवतमाळच्या वसुधा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 'वीरशैव लिंगायत महाराष्ट्र रत्न' पुरस्कार बसव उपासक बाळासाहेब मलगोंडा पाटील यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पाटील हे गेली अनेक वर्षे बसव विचाराच्या प्रचारात सक्रिय आहेत. २००२ पासून कोल्हापुरात बसवदृष्टी केंद्र स्थापन करून ते शरण सिद्धांत, साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य करत आहेत. हिरेमठ संस्थान भालकीच्या महाराष्ट्र बसव परिषद ग्रंथ प्रकाशन कार्यात सक्रिय आहेत. महात्मा बसवेश्वरांच्या मूळ कन्नड वचनांचा मराठीत अनुवाद केला आहे. महात्मा बसवेश्वर व वचनावर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर सहसंचालक पद भरण्याची मागणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

साखर हंगामाची लगबग सुरू असताना रिक्त असलेले साखर विभागाचे कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालक पद भरावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या सचिवांना निवेदन दिले.

निवेदनात असे म्हटले आहे की, कोल्हापूर विभागात ३८ कारखान्यांचा समावेश आहे. प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडून साखर हंगामात नियमित रोज होणाऱ्या गाळप झालेला ऊस आणि तयार झालेल्या साखरेची माहिती घेतली जाते. ही माहिती साखर आयुक्तलायाला पाठवली जाते. साखर कारखान्यांचे प्रस्ताव स्वीकारणे, त्यांचा आढावा घेणे, आयुक्तालयाकडे शिफारस पाठवणे ही महत्वाचे कामे करावी लागतात. तसेच नाबार्ड आणि साखर उद्योग संबधित कार्यालयाशी संपर्क ठेवावा लागणार आहे. गेले चार महिने सहसंचालक पद रिक्त आहे. यंदाच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर हे पद भरावे, अशी मागणी खासदार माने यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images