Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जि.प.मध्ये आता ई टपाल सिस्टीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा परिषदेने आता उपलब्ध टपालांची नोंद मॅन्युअल पद्धतीने करण्याऐवजी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी पुढाकार घेऊन ई टपाल ट्रॅकिंग सिस्टीम तयार केली आहे.

सध्या सामान्य प्रशासन विभागात त्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू आहे. एक डिसेंबरपासून जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांत ई टपाल ट्रॅकिंग सिस्टीमचा अवलंब होणार आहे. या सिस्टीममुळे दफ्तर दिरंगाई कमी होणार आहे. जि.प.तील १४ प्रकारच्या टपालांची नोंद होणार आहे. यामध्ये प्रशासनाचे निर्णय, सरकारी आदेशाचा समावेश आहे. विविध विभागांमध्ये मिळून रोज ४०० हून अधिक टपालांची आवक होते. ऑनलाइन सिस्टीममुळे टपाल विभागाची आवक नोंद कधी झाली, त्याची सद्य:स्थिती काय आहे हे एका क्लिकवर समजणार आहे. ई टपाल ट्रॅकिंग सिस्टीमअंतर्गत प्रत्येक विभागातील पाच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गव्हर्न्मेंट बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव पंदारे

0
0

कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र पंदारे यांची तर उपाध्यक्षपदी विलासराव कुरणे यांची निवड झाली. जिल्हा उप निबंधक अमर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी पंदारे यांचे नाव सुचवले. मावळते उपाध्यक्ष भरत पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी कुरणे यांचे नाव संचालक मारुती पाटील यांनी सुचवले. शशिकांत तिवले यांनी त्यास अनुमोदन दिले. निवडीनंतर अध्यक्ष पंदारे यांनी नवीन संकल्पनाचा अवलंब करून बँकेचा नावलौकिक वृद्धिंगत केला जाईल, असे मत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी स्वागत केले. भरत पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुऱ्हाळघरांसाठी दिवसा आठ तास वीजपुरवठा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील गूळ उत्पादक शेतकऱ्यांना १५ मार्चपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत वीजपुरवठा होणार आहे. महावितरणने गूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवसाचे भारनियमन रद्द करून वीजपुरवठ्याचे सुधारित परिपत्रक जाहीर केले आहे. आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय झाला.

महावितरणच्या आंबेवाडी, निगवे, केर्ले आणि करवीर मळा या कृषी परिक्षेत्रात शेतीपंपांना वीजपुरवठा केला जातो. कंपनीकडून रात्री सव्वा बारा ते सकाळी सव्वा दहा आणि सकाळी सव्वा दहा ते सायंकाळी सव्वा सहा असा वीजपुरवठा आठवडाभर दोन स्लॉटमध्ये होत होता. या भागात गुऱ्हाळघरांची संख्या मोठी आहे. या गुऱ्हाळघरांसाठी दिवसा वीजपुरवठा गरजेचा असतो. या भागातील शेतकऱ्यांनी दिवसा वीजपुरवठ्यासाठी आमदार पाटील यांची भेट घेऊन या भागातील भारनियमनात बदल करावा अशी मागणी केली होती.

आमदार पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना संबंधित भागातील गुऱ्हाळघरांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना कली. त्यानुसार महावितरणने १५ मार्चपर्यंत वीजपुरवठ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या भागात सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत एकूण आठ तास वीजपुरवठा सुरू राहील. परिणामी गुऱ्हाळघरांचे बंद असलेले धुराडे पेटणार आहे. यावर 'आमदार पाटील यांच्या प्रयत्नांमुळे गुऱ्हाळघराला दिवसाचे भारनियमन रद्द होऊन आता वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गूळ उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला,' अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकमान्य मल्टिपर्पज’ची चौकशी

0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी बंगलोर येथील सहकार खात्याचे अतिरिक्त सचिव आणि त्यांचे पथक बेळगावात दाखल झाले असून त्यांनी मुख्य कार्यालयाला भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.

आमदार अभय पाटील यांच्यासह साठ आमदारांनी अंमलबजावणी संचालनालय, अर्थ मंत्रालय, सहकार खाते, कृषी आणि अन्य खात्यांकडे 'लोकमान्य'मधील गैरव्यवहार, अवैध सावकारी यांविषयी तक्रारी केल्या होत्या. बेनामी व्यवहार, कर्ज प्रकरणे, गुंतवणूकदारांना पैसे परत न देणे, कागदपत्रांशिवाय बेकायदेशीररित्या कर्ज मंजूर करणे आदी बाबी त्यांनी तक्रारीत नमूद केल्या होत्या. त्याची दखल घेऊन अंमलबजावणी संचालनालयाने कर्नाटक राज्याच्या सहकार खात्याला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कर्नाटकच्या सहकार सचिवांनी अतिरिक्त सचिवांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अतिरिक्त सचिवांना चौकशीत मदत करण्यासाठी बेळगावच्या सहकार खात्याचे संयुक्त संचालक आणि धारवाड, हावेरी येथील सहकार खात्याच्या उपनिबंधकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील व्यवहारांविषयी साठ आमदारांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे केलेल्या तक्रारींनुसार चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सहकार खात्याच्या सचिवांनी चौकशीसाठी माझी नियुक्ती केली आहे. चौकशीचा सविस्तर अहवाल त्यांना मी सादर करणार आहे' अशी माहिती चौकशीसाठी नियुक्त बेंगलोरचे अतिरिक्त सचिव शिवप्रकाश यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळमध्ये नोकर भरतीची तयारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) पंचवार्षिक निवडणूकीपूर्वी आकृतीबंधानुसार नोकरभरती करण्याची तयारी संचालक मंडळ आणि प्रशासनाने सुरू केली आहे. सुमारे २५० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून या प्रक्रियेत मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच संचालकांच्या घरचे उंबरठे झिजवण्यास सुरूवात केली आहे.

'गोकुळ'ला नोकरभरतीच्या आकृतीबंधाला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. संघाच्यावतीने २० लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारला जात असून त्यासाठी तांत्रिक आणि मार्केटिंग कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. सध्या गोकुळमध्ये दररोज ११ ते १३ लाख लिटर दूध संकलन केले जाते. म्हशीच्या दूध संकलनावर भर असून सध्या कर्नाटक, सांगली, कोकणातून दूध संकलन केले जाते. नियोजित प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी २५० हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती होईल. वर्षभरात १००हून अधिक कर्मचारी निवृत्त होणार आहे. त्यांच्याजागीही नवीन कर्मचारी भरती केली जाणार आहे. नवा प्रकल्प, निवृत्त कर्मचारी या रिक्त जागी भरती होणार तांत्रिक आणि मार्केटिंगसाठीची पदे भरली जातील. यात सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. काही अधिकारी निवृत्त होत आहेत. त्यांच्याजागी सध्या असलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली जाईल.

एरव्ही शिपाई, क्लार्क यांची भरती नेते, संचालकांच्या मर्जीतील उमेदवारांकडून केली जाते. पण तांत्रिक नोकरभरतीवेळी सहकार विभाग, डेअरी विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रक्रिया होईल. शहरातील शिक्षण संस्थातील तज्ज्ञ प्राध्यापकांनाही आमंत्रित केले जाणार आहे. तांत्रिक आणि मार्केटिंगच्या पदभरतीसाठी अनेक संचालकांनी इच्छुक उमेदवारांना तांत्रिक प्रशिक्षण, पदवी पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नोकरभरतीसाठी संचालकांकडून आग्रह धरला जात आहे.

दरम्यान, यापूर्वी संचालक मंडळाने गेल्या वर्षभरात नोकरभरती केली. त्याला कामगार संघटनेने आक्षेप घेतला. हा वाद कोर्टात गेल्यानंतर प्रशासन आणि कामगार संघटनांनी चर्चेच्या फेऱ्यांतून तोडगा काढला. गोकुळ प्रशासन आणि कामगार संघटनांनी कायम ३२० आणि ३०४ प्रशिक्षणार्थी कर्मचारी अशा ६२४ कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यातील कायम कर्मचाऱ्यांकडून काही संचालकांनी रक्कम वसूल केल्याची चर्चा आहे.

उलाढाल होणार

गोकुळमध्ये नोकरभरतीची प्रक्रिया दरवेळी वादग्रस्त होते. संचालकांना जागांचा कोटा ठरवून दिला जात असल्याची चर्चा आहे. पदासाठी संचालकांकडून दर काढले जातात. भरतीपूर्वी आणि नंतर नोकरीत कायम झाल्यावर अशा दोन टप्प्यांत पैसे द्यावे लागत असल्याचे उमेदवार सांगतात. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काहीजणांनी नोकरभरतीतूनही रक्कम उभारल्याची चर्चा आहे. पाच ते पंधरा लाखांपर्यंत यापूर्वी दर गेल्याचे यापूर्वी भरती झालेले उमेदवार खासगीत सांगतात. पण, हा आकडा फुगवून सांगितला जात असल्याचेही म्हटले जाते.

भाजपने संधी गमावली

नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाकडून १०० कोटी रुपये कर्ज घेऊन गोकुळने २० लाख लिटर क्षमतेचा विस्तारीत प्रकल्प उभारला. विस्तारीत प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी गेले सहा महिने गोकुळचे नेते, अध्यक्ष आणि संचालक मंडळाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती केली. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणूक, महापूर, अधिवेशन ही कारणे सांगून उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला गेला. निवडणुकीनंतर उद्घाटनाची इच्छा भाजप नेत्यांची होती. मात्र बदलत्या राजकीय स्थितीत भाजपने ही संधी गमावल्याची चर्चा गोकुळमध्ये आहे.

१५००

गोकुळमध्ये कायम कर्मचारी

६२४

नवीन कायम कर्मचारी

२५० (सुमारे)

नियोजित भरती

७५ कोटी

कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार

१.२५ कोटी

कर्मचारी प्रवासी भत्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म टा

0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी बंगलोर येथील सहकार खात्याचे अतिरिक्त सचिव आणि त्यांचे पथक बेळगावात दाखल झाले असून त्यांनी मुख्य कार्यालयाला भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.

आमदार अभय पाटील यांच्यासह साठ आमदारांनी अंमलबजावणी संचालनालय, अर्थ मंत्रालय, सहकार खाते, कृषी आणि अन्य खात्यांकडे 'लोकमान्य'मधील गैरव्यवहार, अवैध सावकारी यांविषयी तक्रारी केल्या होत्या. बेनामी व्यवहार, कर्ज प्रकरणे, गुंतवणूकदारांना पैसे परत न देणे, कागदपत्रांशिवाय बेकायदेशीररित्या कर्ज मंजूर करणे आदी बाबी त्यांनी तक्रारीत नमूद केल्या होत्या. त्याची दखल घेऊन अंमलबजावणी संचालनालयाने कर्नाटक राज्याच्या सहकार खात्याला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कर्नाटकच्या सहकार सचिवांनी अतिरिक्त सचिवांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अतिरिक्त सचिवांना चौकशीत मदत करण्यासाठी बेळगावच्या सहकार खात्याचे संयुक्त संचालक आणि धारवाड, हावेरी येथील सहकार खात्याच्या उपनिबंधकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील व्यवहारांविषयी साठ आमदारांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे केलेल्या तक्रारींनुसार चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सहकार खात्याच्या सचिवांनी चौकशीसाठी माझी नियुक्ती केली आहे. चौकशीचा सविस्तर अहवाल त्यांना मी सादर करणार आहे' अशी माहिती चौकशीसाठी नियुक्त बेंगलोरचे अतिरिक्त सचिव शिवप्रकाश यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

संस्थेचे कामकाज पारदर्शकच

दरम्यान, लोकमान्य संस्था अतिशय विश्वासार्ह आहे. नागरिकांच्या ठेवी अतिशय विश्वासाने जपून गुंतवणूक करून योग्य मुदतीत योग्य त्या भावाने परतफेड करण्यात लोकमान्यने आघाडी मिळवली. पतसंस्थेचे काम सुरळीत आणि पारदर्शक सुरू आहे. तक्रारीमध्ये काही तथ्य नाही. आमच्या संस्थेविषयी सहकार खात्याकडे काही तक्रारी केल्या गेल्या. त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, संस्थेचे काम पारदर्शक असल्याचे तपासणीअंती सिद्ध होईलच. त्यामुळे गुंतवणूकदार, सभासदांनी कोणतीही काळजी करू नये' असे संस्थेचे सीईओ अभिजित दीक्षित यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्र’च्या विद्यार्थ्यांचे ‘वाचन छंद मंडळ’

0
0

फोटो अर्जुन टाकळकर

................

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : रोज शाळेत जीवनाची सुट्टी झाली की अनेक विद्यार्थ्यांची पावले ग्रंथालयाकडे वळतात. थोरामोठ्यांचे जीवनचरित्र, साहस व संस्कारकथेचे सामूहिक वाचन होते. मधल्या सुट्टीतच वाचलेल्या प्रकरणावर चर्चाही घडते. प्रत्येक विद्यार्थी पुस्तकातून काय शिकवण मिळाली याविषयी आपआपली मते मांडतो आणि उद्या नवीन पुस्तक वाचण्याच्या ओढीने पुन्हा वर्गाकडे धाव घेतो. वाचनाविषयी गोडी वाढविणारा या साहित्यविषयक उपक्रम गेली दहा वर्षे महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरू आहे. सहा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झालेल्या वाचन छंद मंडळाची सभासद संख्या आता १०० वर पोहचली आहे.

महाराष्ट्र हायस्कूलमधील 'ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील वाचन छंद मंडळ'मुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या वेगळा विश्वाची सफर घडत आहे महत्त्वाचे म्हणजे, मुलांमध्ये संभाषण कौशल्य, वक्तृत्वाची आवड निर्माण झाली आहे. वाचनाच्या प्रभावामुळे विविध विषयावर उत्स्फूर्तपणे भाषण करण्याचे धाडस मुलांमध्ये प्राप्त झाले आहे.'असे निरीक्षण वाचन छंद मंडळाचे समन्वयक व सहायक शिक्षक विश्वजित शिंदे यांनी नोंदविले. हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून २००८-०९ मध्ये या अनोख्या उपक्रमाची सुरुवात झाली.

शाळेच्या जेवणच्या सुट्टीत मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. सुरुवातीला केवळ सहा विद्यार्थ्यांचा सहभाग होता. हळूहळू त्यामध्ये विद्यार्थी सहभाग वाढत गेला. कालांतराने इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी आणि दहावीतील मुले आकर्षित झाली. हायस्कूलमधील ग्रंथालयात मुलासाठी बाकडी ठेवून बैठक व्यवस्था केली आहे. हायस्कूलच्या ग्रंथालयात २०,००० हून अधिक पुस्तके आहेत. त्यामध्ये कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, विज्ञान, खेळ, साहस कथा, शौर्य कथा, संस्कारकथांचा समावेश आहे.

दुपारी मधली सुट्टी झाली की मुले ग्रंथालयात जमतात. त्यांच्यापैकी कोणी एखाद्या पुस्तकातील ठराविक प्रकरणाचे वाचन करतो. आवडललेल्या प्रसंगावर चर्चा करतात. पुस्तकाचे वेगळेपणे, पुस्तकातील संदेश, विषय आणि पुस्तक का आवडले याविषयी मुलांमध्ये चर्चा रंगते. काही मुले पुस्तके वाचायला घरी नेतात. अभ्यासाच्या जोडीला वाचन करतात. काही मुलांनी एका शैक्षणिक वर्षात वीसहून अधिक पुस्तके वाचल्याच्या नोंदी ग्रंथालयाकडे आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाबा आमटे, स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे, क्रांतिकारकांच्या जीवनावरील पुस्तकाविषयी मुलांमध्ये वेगळे कुतूहूल आहे. याशिवाय 'ययाती', 'स्वामी', 'एक होता कार्व्हर', 'मन की बात' यासह विविध पुस्तकांचे वाचन केल्याचे मुलांनी सांगितले.

वाचन छंद मंडळ उपक्रमाला संस्थेनेही पाठबळ दिले आहे. संस्थेचे व्हाईस चेअरमन आर. डी. पाटील-वडगावकर, संचालक विनय पाटील, सविता पाटील, मुख्याध्यापक ए. एस. रामाणे, उपमुख्याध्यापक ए. एन. जाधव, पर्यवेक्षक उदय पाटील, के. ए. ढगे आदींनी या उपक्रमाला नेहमीच प्रोत्साहित केले. शालेय जीवनातच संस्कारक्षम मूल्यांची रुजवात व्हावी. मुलांना वाचनाची गोडी लागावी. थोरामोठ्यांच्या चरित्रकार्यातून जीवनात सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व विकास घडविण्याची प्रेरणा लाभावी, हा उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचन छंद मंडळाची सभा

वाचन छंद मंडळाची वर्षातून एकदा सर्वसाधारण सभा होते. वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला जातो. दरवर्षी वाचन छंद मंडळावर मुला, मुलींच्या गटातून प्रमुख निवडले जातात. या शैक्षणिक वर्षात मुलींच्या गटाच्या प्रमुख दीक्षा पाटील तर उपप्रमुख ज्ञानेश्वरी घारे आहेत. मुलांच्या गटाचे प्रमुख अविष्कार पोवार व उपप्रमुखपदी सिद्धेश चव्हाण आहेत.

पुस्तकामुळे अनेक फायदे

वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो. सामान्यज्ञानात भर पडते. भाषणासाठी आवश्यक धीटपणा प्राप्त होतो. थोरामोठ्यांच्या जीवनचरित्रातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, अशा भावना विद्यार्थी केदार पाटील, ज्ञानेश्वरी घारे, दीक्षा पाटील, वेदिका गुरव, मुग्धा चव्हाण, दीप्ती शिंदे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमुक्तीचा शब्द पाळणार; उध्दव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना दिलासा

0
0

म. टा .वृत्तसेवा, सांगली
‘आम्ही दिलेला कर्जमुक्तीचा शब्द पाळणार आहोत. अद्याप सरकार सत्तेवर आले नसले तरी शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये. दिलेल्या शब्दाला जागणारी शिवसेना आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये’, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगलीच्या दौऱ्यावर असताना केले.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा आणि कडेगाव तालुक्यातील नेवरी गावच्या परिसराला ठाकरे यांनी भेटी दिल्या. द्राक्ष, डाळींब आणि टोमॅटो शेतीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी हताश झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचे वर्णन करताना अश्रू आवरणे कठीण झाले होते. शेतकऱ्यांची अवस्था पाहून ठाकरे यांनी , मी तुमच्या मदतीला आहे. मनात कसलाही वाईट विचार आणायचा नाही. पुन्हा जिद्दीने उभा रहायचे, असा विश्वास देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला.'

उध्दव ठाकरे यांनी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील आनंदा शिंदे यांची उद्ध्वस्त झालेली टोमॅटोची बाग, विटा येथील रामभाऊ लोटके यांची डाळींब व प्रकाश गायकवाड यांच्या द्राक्षबागांची पाहणी केली. यादरम्यान अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ठाकरे यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. या दौऱ्यात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार अनिल बाबर, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, प्रकाश शेंडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, तानाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

72074277

आमदार बाबर म्हणाले, ‘यापूर्वी हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. दुष्काळामुळे पिके करपून जात होती आणि आता अवकाळी मुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमचा शेतकरी मोठा जिद्दी आहे. त्याने दुष्काळात टँकरने पाणी आणून बागा जगविल्या, परंतु हातातोंडाशी आलेल्या बागा या अवकाळी पावसाने नेस्तनाबूत केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याच्या मदतीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र उभारले आहे. प्रसंगी शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर व घरी जाऊन नुकसानीची माहिती घेत आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिकप्रश्नी तीन व्यापाऱ्यांना दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लास्टिक वापरण्यास बंदी असतानाही साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन व्यापाऱ्यांवर कारवाई केली. महाद्वार रोडवरील दुकानांची तपासणी करताना प्लास्टिकचा साठा निदर्शनास आल्यानंतर तीन व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड केला. दिवसभरात पथकाने १५ हजारांचा दंड वसूल करत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातल्यानंतर त्याची विक्री, साठवणूक करणाऱ्या व्यक्ती व व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून नियमितपणे कारवाई केली जात आहे. आज महाद्वार रोडवरील दुकानांची तपासणी केली. तपासणी दरम्यान देवकी साडी सेंटर, फॅशन बिग बझार सेंटर व हंसराज स्वीट मार्टमध्ये प्लास्टिक पिशव्या निदर्शनास आल्या. त्यांना पथकाने प्रत्येकी पाच हजाराचा दंड केला. पथकामध्ये मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, महेश भोसले, अरविंद कांबळे, दिलीप पाटणकर, शुभांगी पोवार, गीता लखन आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी अॅड. लाटकर, शेटके यांचे अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदासाठी सत्तारुढ काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नगरसेविका अॅड. सुरमंजिरी राजेश लाटकर तर भाजपकडून भाग्यश्री उदय शेटके यांनी शुक्रवारी नामनिर्देशपत्र नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे सादर केले. उपमहापौरपदासाठी संजय वसंतराव मोहिते तर ताराराणी आघाडीकडून कमलाकर यशवंत भोपळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी (ता.१९) महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात महापौर, उपमहापौर निवड सभा पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

महापौर माधवी गवंडी व उपमहापौर भूपाल शेटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवारी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार महापौरपदासाठी भाजपच्या शेटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विलास वास्कर व आशिष ढवळे यांनी सूचक व अनुमोदन दिले आहे. तर उपमहापौरपदासाठी ताराराणीच्या भोपळे यांनी अर्ज भरला. उमा इंगळे सूचक असून पूजा नाइकनवरे यांनी अनुमोदन दिले आहे. त्यांच्यासमेवत भाजप-ताराराणी आघाडीचे बहुतांशी नगरसेवक उपस्थित होते.

अर्ज दाखल करण्यास अर्धा तासाचा अवधी असताना काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे नगरसेवक दाखल झाले. महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या अॅड. लाटकर यांनी दोन अर्ज दाखल केले. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख सूचक तर गटनेते सुनील पाटील अनुमोदक आहेत. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या मोहिते यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला सूचक राहुल माने तर दीपा मगदूम यांनी अनमोदन दिले आहे. मंगळवारी होणाऱ्या निवड सभेपूर्वी महापालिकेचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

...

अॅड. लाटकर समर्थकांची

फटाक्यांची आतषबाजी

दोनवेळा नाट्यमय घडमोडीनंतर महापौरपदाची संधी हुकलेल्या अॅड. लाटकर यांच्या नावाला पक्षातून कोणताही विरोध झाला नाही. त्यामुळे नामनिर्देशपत्र दाखल करताना त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधी आघाडीकडून त्यांच्या पारंपरिक विरोधक स्मिता माने यांच्या ऐवजी शेटके यांना उमेदवारी दिल्याने लाटकर समर्थकांच्या उत्साहाला उधाण आले. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी देवस्थानकडे निधीची मागणी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ऑगस्टमध्ये कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सामाजिक कामासाठी किंवा नागरिकांच्या सुविधांच्यादृष्टीने काही प्रकल्पांसाठी निधी देऊ शकते. सध्या कोल्हापुरातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. खड्ड्यांत पडून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील ३०० किलोमीटरचे रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत. ते सुस्थितीत आणण्यासाठी मोठ्या रकमेच्या निधीची गरज आहे. सध्या रस्त्यांच्या दुरुसाठी किंवा नव्याने रस्ते करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पुरेसा निधी नसल्याने सरकारच्या निधीवर अवलंबून रहावे लागते. यासाठी शहरातील काही रस्ते देवस्थान समितीच्यावतीने दत्तक घेऊन त्यासाठी निधी द्यावा,असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी, निधी देण्याबाबत देवस्थान समितीच्या अधिकारातील निकष तपासून निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी बाबा पार्टे, आर. के. पोवार, महादेवराव आडगुळे, प्रशांत चिटणीस, रणजित गावडे, विवेक घाटगे, अशोक भंडारे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघाच्या तोट्यास विरोधक जबाबदार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'होम केअर मार्टबरोबर डोळे झाकून करार करुन शेतकरी सहकारी संघाला सात कोटी रुपयाला खड्ड्यात घालण्यास विरोधक जबाबदार आहेत', असा आरोप संघाचे अध्यक्ष अमर माने यांनी पत्रकार परिषदेत केला. विभागीय निबंधकांकडे बँकेच्या माजी संचालकांनी केलेल्या तक्रारीचा खुलासा करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. गेली चार वर्षे संघ तोट्यातून फायद्यात आला असून २०१८ ते २०१९ या वर्षात संघाला २८ लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष माने म्हणाले, 'भवानी मंडपातील शेतकरी बाजारची जागा तत्कालीन अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर, उपाध्यक्ष अॅड अशोकराव साळोखे, कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते, सहाय्यक कार्यकारी संचालक सुरेश देसाई यांनी १८ वर्षे कराराने होम केअर मार्टला भाड्याने दिली होती. तत्कालीन संचालक मंडळाने हा करार एकतर्फी केला होता. संचालक मंडळाने दोन करार केले आहेत. एका करारावर पदाधिकाऱ्यांनी सह्याही केलेल्या नाहीत. चुकीचा करार केल्यामुळे संघाला सात कोटी रुपयांचा फटका बसला आहे.'

संघाने २३ हजार अक्रियाशिल सभासदांचे सदस्यत्व रद्द केले नसून त्यांना सहकारी कायद्यानुसार आजही क्रियाशील सभासद होता येते, असा खुलासा अध्यक्ष पाटील यांनी केला. ते म्हणाले, '१९९८ मध्ये तक्रार करणाऱ्या तत्कालीन संचालकांनी शेअर्सची रक्कम २५ रुपयांवर १०० रुपये केली. ज्या सभासदांनी ७५ रुपये भरले नाहीत अशा ११ सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. २०१३ मध्ये १७ वी घटनादुरुस्ती झाली. यावर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्या कारकिर्दीत सभासदांच्या शेअर्सची रक्कम १०० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात आली. ज्या विरोधकांनी डीडीआरकडे तक्रार केली आहे, त्यावेळी ते सत्तेत होते. आजही अक्रियाशील सदस्य शिल्लक रक्कम भरुन क्रियाशील सदस्य होऊ शकतात. पण ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत जे क्रियाशील सभासद झाले आहेत त्यांना मतदान, निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अधिकार आहे.' संस्थेच्या हिताविरोधात काम करणाऱ्या सुरेश देसाई यांचे सभासदत्व रद्द झाल्याचा खुलासाही अध्यक्ष पाटील यांनी केला. सध्या १४ हजार ९७७ क्रियाशील सभासद असून २० हजार ७८२ अक्रियाशील सदस्य आहेत. अक्रियाशील सदस्यापैकी १० हजार सभासद मयत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील भुयेकर, माजी अध्यक्ष युवराज पाटील, गणपती पाटील, बाळकृष्ण भोपळे, विजयकुमार चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, विनोद पाटील, मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तारुढ आघाडीची वाटचाल सुकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यपातळीवर सरकार स्थापनेच्या सुरू असलेल्या घडामोडीचे परिणाम शुक्रवारी महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करताना दिसून आले. सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना गट एकसंध राहणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळाले. तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीतील चार नगरसेवक अर्ज दाखल करताना अनुपस्थित राहिल्याने त्याला अधिक पुष्टी मिळाली. या घडामोडींमुळे पदाधिकारी निवडीदरम्यान सत्तारुढ गटाची वाटचाल अधिक सुकर होणाची शक्यता बळावली आहे.

प्रत्येक महापौर, उपमहापौर निवडीवेळी सत्तारुढ आघाडीला पळायला भाग पाडणाऱ्या भाजप-ताराराणी आघाडीमध्ये मंगळवारी (ता.१९) होणाऱ्या निवडीदरम्यान कमालीची शांतता होती. राज्यपातळीवर सुरू असलेल्या घडामोडी या शांततेला कारणीभूत ठरल्या. सुरुवातीस अॅड. लाटकर यांच्याविरोधात त्यांचे पारंपरिक विरोधक स्मिता माने यांना उमेदवारी देण्याची रणनीती होती. पण सत्तारुढ काँग्रेस आघाडीसह शिवसेनेतील नगरसेवक हाताला लागणार नसल्याची शक्यता बळावल्यानंतर त्यांनी ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. दुपारी कविता माने यांचे नावही चर्चेत आले. पण त्यांच्याऐवजी भाग्यश्री शेटके यांना उमेदवारी देण्यात आली. तर उपमहापौरपदासाठी कमलाकर भोपळे यांना ताराराणी आघाडीकडून उमेदवारी दिली. सकृतदर्शनी विरोधी आघाडीत शांतता दिसत असली, तरी ही वादळापूर्वीची शांतता ठरु नये, यासाठीची खबरदारी मात्र सत्तारुढ गटाकडून घेतली जात आहे.

महापौरपदासाठी अॅड. लाटकर यांची एकमेव दावेदारी असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. गुरुवारी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सर्वच नगरसेवकांनी लाटकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला होता. काँग्रेसमध्ये मात्र उपमहापौरपदाबाबत मोहिते व जाधव यांच्यामध्ये चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती. जाधव यांनी अखेरपर्यंत आपली मागणी लावून धरली. गटनेते देशमुख यांच्या कार्यालयात सर्व काँग्रेसचे नगरसेवक घोषणेच्या प्रतीक्षेत होते. सव्वाचार वाजता देशमुख आल्यानंतर त्यांनी पुन्हा आघाडीतील नगरसेवकांची चर्चा केली. त्यामुळे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहत होते. बैठकीत मोहिते यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नगरसेवक अर्ज दाखल करण्यासाठी आले. या निमित्ताने राज्यपातळीवरील आणि महापालिकेत यापूर्वीच आकाराला आलेला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पॅटर्न कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सत्तारुढ आघाडीची वाटचाल अधिक सुकर झाली.

दरम्यान, रविवारी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक सहलीवर जाणार आहेत. तर सत्तारुढ गटातील नगरसेवकांची एक टीम शनिवारी तर दुसरी टीम रविवारी सहलीसाठी रवाना होणार आहे.

...

चौकट

अपक्षांनी फिरवली पाठ

पदाधिकारी निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व नगरसेवकांची उपस्थिती ठरलेली असते. यावेळी मात्र भाजपच्या तीन नगरसेवकांसह आघाडीला पाठिंबा दिलेल्या अपक्ष नगरसेवकांनी अर्ज दाखल करताना पाठ फिरवली. नगरसेविका जयश्री जाधव, नगरसेवक संभाजी जाधव यांनी परगावी असल्याचे तर अश्विनी बारामते यांनी आजारी असल्याचा निरोप आघाडीच्या नेत्यांना दिला होता. तर विरोधी आघाडीला यापूर्वी पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक राजू दिंडोर्लेही गैरहजर राहिले. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका अनुराधा खेडकर या अॅड. लाटकर यांच्यासमवेत अर्ज दाखल करताना हजर राहिल्या.

....

पुन्हा एकदा जाधव यांची निराशा

उपमहापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक अशोक जाधव इच्छुक होते. दोनवेळा त्यांची संधी हुकल्याने यावेळी उमेदवारी मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र आजही त्यांच्या पदरी निराशा पडली. जाधव यांच्याऐवजी मोहिते यांना उमेदवारी जाहीर झाली. बैठकीतच नाराजी व्यक्त करून ते बाहेर पडू लागले. अन्य नगरसेवकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ते अर्ज दाखल करण्याच्या वेळी आले, पण 'कारभाऱ्यांनी फसवलं' असल्याचा आरोप करु लागले. त्यांना फोटोसाठी पुढे येण्याची विनंती केली, पण ते शेवटपर्यंत फोटोसाठी पुढे आले नाहीत. सर्वांना नमस्कार करत 'मी आहे, तेथे बरा आहे' असे स्पष्ट करत त्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाचनामुळे मानवी जीवन समृद्ध’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'पुस्तकांचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाचनामुळे माणूस सजग बनतो. मानवी स्वभावामध्ये सृजनशीलता वृद्धिंगत होते. समाजातील प्रत्येक घटकाने पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे,' असे मत गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी व्यक्त केले.

येथील ग्रंथ कॉर्नर संस्थेतर्फे विविध विषयांवरील पुस्तकांचे शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन भरविले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आठ डिसेंबरअखेर सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे.

प्रदर्शनात सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये कथा, कादंबरी, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक, आरोग्य, महिला, पाककला, ऐतिहासिक, बालवाङ्मय, विज्ञान, शेती, पर्यटन, शेती, संगीत, धार्मिक विषयासंबंधीची पुस्तके आहेत. पुस्तक खरेदीवर सवलत आहे. शैक्षणिक संस्था, ग्रंथालयांनी व वाचकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रंथ कॉर्नरचे सुभाष पाटील, अरुण पाटील, शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक कृष्णाजी हरगुडे, वाचककट्टा संकल्पक युवराज कदम, प्राचार्य मिलिंद बोळसे, आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन विभागातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर तत्काळ अनुदानाची रक्कम जमा करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने प्रशासनाला दिले. जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पात्र लाभार्थ्यांना अर्थसाह्य मिळण्यात उशीर होऊ नये यासाठी पुढील आर्थिक वर्षापासून गटविकास अधिकाऱ्यांच्या खात्यावर आगाऊ स्वरूपात निधी जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेत झाला.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये व्यक्तिगत लाभार्थी योजना अडकली होती. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा विषय उपस्थित झाला. सदस्यांनी विविध विभागांतील रखडलेल्या अर्थसाह्याकडे लक्ष वेधले. लाभार्थ्यांनी दुकानातून वस्तू खरेदी करून पावत्या प्रशासनाकडे जमा करूनही त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच अतिवृष्टी व महापुरामुळे पडझडीस आलेल्या अंगणवाडी व शाळांच्या इमारतींचे निर्लेखन करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले. दरम्यान, पुढील वर्षापासून व्यक्तिगत लाभार्थी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मुदतीत अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांच्या नावावर अनुदान जमा करण्याचे ठरले. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, सभापती वंदना मगदूम, राहुल पाटील, जयवंतराव शिंपी, राहुल आवाडे, राजवर्धन निंबाळकर, संध्याराणी बेडगे, आदी उपस्थित होते.

०००

हालसवडेतील कारखान्याविषयी सुनावणी

करवीर तालुक्यातील हालसवडे येथे पद्मावती कास्टिंग कारखाना सुरू करण्यासंदर्भातील सुनावणी स्थायी समितीसमोर झाली. कारखानदारांने फाउंड्री उद्योगासाठी आवश्यक परवानग्या विविध विभागांकडून घेतल्या आहेत. मात्र, ग्रामस्थांनी प्रदूषणासह अन्य काही कारणास्तव त्याला विरोध केला. सुनावणीदरम्यान इंडस्ट्रीजविषयी ज्या शंका उपलब्ध केल्या आहेत त्याचे निरसन करावे, अटी व शर्तींची पूर्तता करावी, असे सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. याशिवाय पाटपन्हाळा आणि बुधवार पेठ ग्रामपंचायत व नागरिकांशी निगडीत जागेसंदर्भातील सुनावण्याही झाल्या.

०००००

परस्पर विषय आणल्याने माघारी पाठविले

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अपारंपारिक ऊर्जा विकास कार्यक्रमाद्वारे पथदिवे पुरवठ्यासाठी राखून ठेवलेल्या अनामत रक्कम परत करण्यास मंजुरी देण्याचा विषय मान्यतेसाठी होता. मात्र, हा विषय कृषी समितीसमोर न आणता थेट स्थायी समितीसमोर मांडला. प्रशासनाकडून असा परस्पर विषय समितीसमोर आणल्यामुळे सदस्यांनी आक्षेप नोंदविला. कृषी समितीची मान्यता मिळाल्यानंतर हा विषय स्थायीसमोर मांडण्याचे आदेश दिले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात २२ अनधिकृत फलकांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी केलेल्या धडक कारवाईमध्ये शहर व उपनगरातील २२ अनधिकृत डिजिटल फलक हटवले. त्याचबरोबर दुकानासमोर लावलेले ५५ स्टँडी व विद्युत खांबावरील विविध पक्षाचे ५० झेंडे काढून टाकण्यात आले. डिजिटल फलकांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांचा अधिक समावेश होता.

सोमवारपासून (ता. ११) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने शहरातील अनधिकृत डिजिटल फलक हटवण्यास सुरुवात केली आहे. फलक जप्त करण्याबरोबर आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी पुन्हा पथकाने संभाजीनगर, गांधी मैदान, रामानंदनगर, मंगळवार पेठ, त्यागीनगर आदी ठिकाणी कारवाई केली. शहरासह पथकाने उपनगरातील फलकांना लक्ष केले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांना शुभेच्छा देणारे फलक विविध ठिकाणी लावले होते. मात्र त्यामधील बहुतांशी फलक अनधिकृत असल्याचे कारवाईवरून दिसून आले. शुभेच्छा फलकासह गृह प्रकल्प व अन्य उत्पादनाच्या जाहिरात करणारे फलक हटवण्यात आले. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे व दुकानासमोर लावलेले स्टँडी बोर्डे पथकाने ताब्यात घेतले. पुढील आठवड्यातही ही कारवाई सुरू राहणार असल्याच अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-सातारा महामार्गाच्यादुरुस्तीसाठी गडकरींना निवेदन

0
0

पुणे-सातारा महामार्गाच्या

दुरुस्तीसाठी गडकरींना निवेदन

सातारा

पुणे-सातारा महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, महामार्गावरील रखडलेली कामे लवकर पूर्ण करावीत आदी मागण्यांचे निवेदन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिले. दरम्यान, गडकरी यांनी भोसले यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांना महामार्गाच्या दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून महामार्गावरील कामे रखडली आहेत. प्रवाशी आणि वाहन चालक वैतागून गेले आहेत. टोल विरोधी सातारी जनता, या सामाजिक समुहाने आधी रस्त्यांची दुरुस्ती, मगच टोल वसुली, अशी चळवळ सुरू केली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची शुक्रवारी पुण्यात भेट घेऊन महामार्ग दुरुस्ती आणि अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवण्याच्या मागणी बाबतचे निवेदन दिले. या संदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी ही शिवेंद्रसिंहराजे यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, गडकरी यांनी ही दूरध्वनीवरुन संबंधीत अधिकाऱ्यांना महामार्ग दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. महामार्गावर खड्डयांमुळे चाळण झाली आहे. मोठमोठ्या खडड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. महामार्ग प्रशासनाचा लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. रस्त्याची दुरवस्था असतानाही टोल मात्र, सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स ठेकेदार कंपनीला वठणीवर आणण्यासाठी टोल विरोधी सातारी जनता या सामाजिक समुहाने आधी सुविधा द्या, मगच टोल वसुली करा, ही भूमिका घेऊन आंदोलन सुरू केले आहे. त्याला शिवेंद्रसिंहराजे यांनी सक्रिय पाठींबा देत महामार्ग प्राधिकरणाला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अकराव्या दिवशी टोल बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा ही दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकातून घडणार राधानगरी अभयारण्याची सफर

0
0

शुभवार्ता

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर :

जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट राधानगरी अभयारण्य हा जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न प्रदेश. १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती, ४२ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद असलेला हा भाग नेहमीच पर्यटकांच्या व अभ्यासकाच्या दृष्टीने आकर्षणाचा ठरला आहे. देशातील सर्वात मोठे व सर्वात लहान फुलपाखराचे वास्तव्य याच ठिकाणी. सह्याद्रीमधील महत्वाचा जंगलपट्टा समजल्या जाणाऱ्या राधानगरी अभयारण्याची सफर नेहमीच कुतुहूलाची ठरणारी असते. पर्यटन हंगामाला चालना देताना वन्यजीव विभागाने अभयारण्यमधील वन्यजीव आणि फुलपाखरांची दुनिया पुस्तकरुपातून उलगडली आहे.

अभयारण्यमधील प्राणीसंपदा आणि पक्षीविश्वावर 'कॉफी टेबल' बुक व 'राधानगरी अभयारण्यमधील फुलपाखरे' या नावांनी पुस्तकाची निर्मिती केली आहे. येथील विभागीय वनअधिकारी वन्यजीव कोल्हापूर कार्यालयाने याकामी पुढाकार घेतला आहे. लवकरच अभयारण्यमधील समृद्ध जैवविविधतेचा खजिना शालेय विद्यार्थी, वन्यजीव अभ्यासक, पर्यटकांच्या हाती उपलब्ध होणार आहे. राधानगरी अभयारण्य हा दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा सह्याद्रीमधील महत्वाचा जंगलपट्टा आहे. दरवर्षी हजारो पर्यटक राधानगरी अभयारण्याला भेट देताता. साधारणपणे जून ते ऑक्टोबरपर्यंत अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असते. यंदा अतिवृष्टी व महापुरामुळे अभयारण्य परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. नव्या हंगामात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नशील आहे.

'वन्यजीव विभागातर्फे रस्त्यांची दुरुस्ती, निसर्ग माहिती केंद्र अद्ययावत केले जात आहे. तंबू निवास व इको कॅन्टीनची सुविधा आहे. माहितीफलक लावले जात आहेत. डिसेंबर महिन्यापासून अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. गाइड ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे,'असे विभागीय (वन्यजीव) वनअधिकारी विजय खेडकर यांनी दिली. पर्यटक, अभ्यासकांसाठी राधानगरी अभयारण्यमधील जैवविविधतेची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती केली आहे. शिवाय माहितीपत्रके, छायाचित्रयुक्त बुकलेटस तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील सर्वात मोठे फुलपाखरु

राधानगरी अभयारण्यमध्ये फुलपाखरांच्या १४५ प्रजाती आढळतात. येथील अभयारण्यात कीटकांमधील फुलपाखरांची विविधता वाखाणण्यासारखी आहे. देशातील सर्वात मोठे फुलपाखरु 'सदर्न बर्डविंग' येथे आढळते. या फुलपाखराच्या पंखांची रुंदी १९० मिली मीटर आहे. तर 'ग्रास ज्युवेल' हे सर्वात लहान फुलपाखरु सुद्धा पाहावयास मिळते. या फुलपाखराच्या पंखांची रुंदी १५ मिली मीटर आहे. याव्यतिरिक्त हजारोंच्या संख्येने एकत्र जमून स्थलांतर करणारी ब्ल्यू टायगर, ग्लॉसी टायगर, स्ट्राईप टायगर ही फुलपाखरे येथील अभयारण्यात आढळतात. वन्यजीव विभागाने तयार केलेल्या 'राधानगरी अभयारण्यातील फुलपाखरे' या पुस्तकात विविध प्रजातीच्या फुलपाखरांच्या नोंदी, फोटो समाविष्ट आहेत.

.......

'पर्यावरण परिस्थिती बदलल चालली आहे.पर्यावरण चक्रात मधमाशी आणि फुलपाखरे हे परागीकरण करणारे घटक आहेत. त्यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे. शालेय जीवनात हा विषय विद्यार्थ्यापर्यंत पोहचल्यास संरक्षण व संवर्धनाच्या कामाला चालना मिळेल. पुस्तकांच्या निर्मितीमुळे राधानगरी अभयारण्यमधील जैवविविधतेची एकत्रित माहिती संकलित झाली. विद्यार्थ्यांपासून अभ्यासकापर्यंत सगळयांना उपयुक्त ठरेल.'

सुनील करकरे, वन्यजीव अभ्यासक

...

वनस्पती, प्राणी व पक्षीविश्व

राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. अभयारण्यमध्ये ४२ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झाली आहे. बिबट्या, अस्वल, लहान हरिण गेळा, सांबर, भेकर, रानडुक्कर, साळिंदर, शेकरु, खवलेमांजर,उदमांजराचा समावेश आहे. अभयारण्यमध्ये २३५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. पक्ष्यांमध्ये निलगिरी वृक्ष कबूतर, मलबारी पोपट, मलबारी चंडोल, राखी डोक्याचा बुलबुल, तांबसू सातभाई, पांढऱ्या पोटाचा नाचरा, लांब चोचीचे गिधाड, पांढरे गिधाड, पांढ्या पुठ्ठ्याचे गिधाडे आढळली आहेत. फुलझाडांच्या १५०० प्रजाती आढळतात. शिवाय ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पती आहेत. अभयारण्यात ३३ प्रजातींच्या सापांची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक नुकसान

हताश होऊ नका, सर्वतोपरी प्रयत्न करू

0
0

हताश होऊ नका, सर्वतोपरी प्रयत्न करू

उद्धव ठाकरे यांची कातर खटाव येथे ग्वाही

सातारा :

'शेतकऱ्यांनो पिकाचे नुकसान झाले म्हणून, हताश होऊ नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत, सर्वतोपरी प्रयत्न करू,' अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कातर खटाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून त्वरीत त्याचे पंचनामे सादर करावेत,' असे आदेश ही त्यांनी दिले.

कातर खटाव येथील नामदेव कृष्णा बागल व दिगंबर यशवंत बागल यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते. या वेळी विधानसभेच्या उपसभापती निलम गोरे, माजी पालक मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे गटनेते नितीन बानुगडे पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे पुढे म्हणाले, 'नुकसान झालेल्‍या सर्व शेतकऱ्यांनी पंचनामा प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच गावोगावी मदत केंद्र उभारून आपल्या समस्या मदत केंद्रावर सांगाव्यात. पिक विमा, कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधी, दुष्काळी अनुदान या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना मदत केंद्रावर बोलावून याद्या तयार करा. त्या माझ्यापर्यंत पोहोचवा. प्रलंबित राहिलेल्या याद्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.' अवकाळीमुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे काही शेतकऱ्यांनी ठाकरे यांना सांगितले. त्यावर ठाकरे म्हणाले, 'तुम्ही खचून जाऊ नका, वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्‍त्यावर उतरू.'

........

'सरसकट कर्जमाफी, नुकसान भरपाई द्या'

सरकारी यंत्रणेमार्फत पिकाचे पंचनामे केले आहेत, मात्र खरीप हंगामातील मका, बाजरी, तूर, मुग आदी पिके पूर्णपणे खराब झाली आहेत. त्याचे पंचनामे होईपर्यंत पिके कुजून गेलेली होती. शेतात पाणी असेल व पिके उभी असतील तरच पंचनामे केलेले आहेत. त्यामुळे फक्त दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनाच भरपाई मिळू शकते. त्यामुळे वस्तूस्थितीजन्य विचार करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कणसेवाडी येथील काही शेतकऱ्यांनी केली.

.....

मायणीतील शेतकऱ्यांची गाऱ्हाणी

'आम्हाला दुष्काळी अनुदान, केंद्राचे वार्षिक सहा हजार रुपये मिळाले नाहीत. विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले नाहीत. सोयाबीन, डाळींब, मका अशी पिके हातातून गेली आहेत,' अशी गाऱ्हाणे मायणीतील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना धीर देताना म्हणाले, '२५ वर्षांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वस्व पणाला लावून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार आहोत. आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही. खचून जाऊ नका. आम्ही दिलेला शब्द फिरविणारे नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images