Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उन्हाळ्यात टंचाई, पावसाळ्यात महापूर

$
0
0

लोगो : मटा अजेंडा

शिरोळ

अजय जाधव,जयसिंगपूर

कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या बारमाही वाहणाऱ्या चार नद्यांमुळे शिरोळ तालुका समृद्ध झाला आहे. मात्र, येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई आणि पावसाळ्यात महापुराचे संकट उभे ठाकते. नद्यांच्या प्रदुषणाचा प्रश्‍न गंभीर आहे. अनेक गावांच्या पाणी योजना रखडल्या आहेत. त्यामुळे शुद्ध पाणी मिळणार कधी? असा प्रश्‍न आहे. तालुक्यात सुमारे २० हजार एकरहून अधिक शेतजमीन क्षारपड आहे. या जमिनीच्या सुधारणेसाठी उपाययोजना करण्याबरोबरच जयसिंगपूर, उदगाव येथील वाहतुकीच्या कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना, महिला व तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योगांची उभारणी असे अनेक प्रश्‍न आहेत. शिरोळ तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी आराखडा तयार करून नूतन अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निधी खेचून आणावा लागणार आहे.

शिरोळ मतदारसंघात जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ या तीन शहरासह एकूण ५५ गावांचा समावेश आहे. गेल्या १५ वर्षात या मतदारसंघात दिग्गजांच्या सहभागामुळे लढती लक्षवेधी ठरल्या. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात २००४ साली मतदारांनी 'एक नोट, एक व्होट' देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना विजयी केले. २००९ साली काँग्रेसच्या सा. रे. पाटील यांना मतदारांनी संधी दिली. २०१४ साली शिवसेनेच्या उल्हास पाटील यांचा भगवा फडकाविला तर यावेळच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यांना कौल देवून त्यांचे आमदारकीचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात उतरविले.

निवडणुकीत बाजी मारणारे आमदार राजेंद्र पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी यासाठी झुंज देत होते. त्याचबरोबर विविध माध्यमातून ते सामाजिक कार्यातही कार्यरत होते. शिरोळ तालुक्याच्या सर्वांगिण विकासाची ग्वाही देत ते निवडणुकीत विजयी झाले आहेत.

जयसिंगपूर व शिरोळ येथील नगरपालिकांचे नेतृत्व यड्रावकर यांच्याकडे आहे. त्यामुळे या दोन शहरांबरोबरच कुरुंदवाड शहराचा विकास साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्‍न, पंचगंगा नदीचे प्रदुषण, गावोगावच्या रखडलेल्या पाणीयोजना, पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच रस्ते, जयसिंगपुरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुरेशा लांबीच्या उड्डाणपुलाची उभारणी होणे गरजेचे आहे. या प्रश्‍नांची सोडवणूक त्यांना करावी लागणार आहे.

शिरोळ तालुक्याला दरवर्षी चार नद्यांमुळे पुराचा प्रचंड तडाखा बसतो. हे संकट टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अशी स्थिती असली तरी उन्हाळ्यात वेगळाच प्रश्न डोके वर काढतो. अनेक गावांना पाणी टंचाईचा प्रश्‍न भेडसावतो. त्याचबरोबर नदीच्या प्रदुषणामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनतो. अनेक गावामध्ये पाणी योजनांवर जलशुध्दीकरण केंद्रे नाहीत. परिणामी कोणत्याही प्रक्रियेशिवाय पाणी नागरिकांना प्यावे लागते. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठीही काम करावे लागणार आहे. तालुक्याला नुकतेच महापुराचे संकट येऊन गेले. महापुरानंतर अजूनही घरे कोसळत आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांचे पंचनामे करून त्यांच्यापर्यंत सरकारी मदत पोहचविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.

शाळांची अवस्था बिकट

शिरोळ तालुक्यात महापुराच्या तडाख्यात जिल्हा परिषदेच्या शाळा पाण्याखाली गेल्या. दगड, मातीने बांधलेल्या अनेक शाळांच्या भिंती कोसळल्या, तर काही शाळांच्या भिंतींना तडे गेले. यापैकी काही शाळा शाहूकालीन तर काही शाळा त्यापूर्वीच्या आहेत. महापुरानंतर शाळांची अवस्था दयनिय आहे. या शाळामध्ये बसून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागते. या शाळांची डागडुजी गरजेची आहे.

महापुरानंतर कोसळताहेत घरे

शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुरामुळे ५५ पैकी ४३ गावांना फटका बसला. अनेक गावांना बेटाचे स्वरूप आले. महापुरात घरे कोसळली, त्यांचे पंचनामे झाले. मात्र, आता उन्हाच्या तडाख्यामुळे मातीच्या घराच्या भिंती ढासळू लागल्या आहेत. यामुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत.

नियोजनातून विकास हवा

गेल्या पाच वर्षांत मी मतदारसंघात ४५० कोटी रुपयांचा विकासनिधी आणला. नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्व काळाच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील विकासकामे मार्गी लागावीत या हेतुने अधिकाधिक निधीसाठी आग्रह धरला. निधीसाठी प्रसंगी 'मातोश्री'वर ठाण मांडले. भरीव निधीतून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांस जोडणारे रस्ते, तालुक्यातील अंतर्गत रस्ते, कृष्णा नदीकाठचे घाट, शिरोळ, कुरुंदवाड, नृसिंहवाडी येथील बसस्थानकांची कामे मार्गी लागली. राजापूर हा शिरोळ तालुक्यातील महत्वाचा बंधारा आहे. या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी प्राधान्य दिले. उन्हाळ्यात तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर प्रसंगी स्वतः धरणांचे बरगे काढले. धरणातून पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागास भाग पाडले. यापुढील काळात विद्यमान आमदारांनी मंजूर विकासकामांना चालना द्यावी. पंचगंगा नदी प्रदूषण, क्षारपड जमिनींची सुधारणा या प्रश्‍नांना प्राधान्य देण्याबरोबरच महापुराच्या संकटातून कायमस्वरूपी मार्ग निघण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

-उल्हास पाटील, माजी आमदार

सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न

शिरोळ तालुक्याचा सर्वांगिण विकास हाच माझा अजेंडा आहे. नियोजनबध्द आराखडा करून तालुक्याच्या विकासासाठी त्याचा पाठपुरावा करू. लोकप्रतिनिधी नसताना, गेल्या ५५ वर्षांपासून विकासकामांचा वारसा आम्ही जपला आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून, कामांच्या माध्यमातून १५ हजारहून अधिक बेरोजगारांच्या हाताला काम दिले आहे. सामान्य जनतेला मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी सुसज्ज रूग्णालयाची उभारणी, जयसिंगपूर शहरातील झोपडपट्टीवासीयांचा प्रश्‍न सोडविण्याबरोबरच सामान्य शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. क्षारपड जमीन सुधारणेसाठी यापुर्वी काम केले आहे. यापुढेही क्षारपड जमीन, पंचगंगा नदी प्रदूषण हे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत अधिक ताकदीने कार्यरत राहू. तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी उद्योगांना चालना देण्यात येईल. जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे. त्याचा पाठपुरावाही करण्यात येईल. कुरूंदवाड शहराच्या पाणी योजनेच्या रखडलेल्या कामास चालना देणार आहे.

- राजेंद्र पाटील, आमदार

दृष्टिक्षेपात शिरोळ

एकूण मतदार- ३,१२,७३२

झालेले मतदान - २,२५,७०६

मतदानाची टक्केवारी - ७४.४१

मतदार संघातील गावे - ५५

मतदारसंघातील महत्वाचे प्रश्‍न

- पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणे

- महापुराचे संकट टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना

- सुमारे २० हजार एकर शेतजमीन क्षारपडमुक्त करणे

- गावांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न

- रोजगाराची संधी उपलब्ध करण्याची गरज

- मतदारसंघात पर्यटनवाढीसाठी प्रयत्नांची गरज

- तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था

- सामान्य जनतेसाठी अल्पदरात आरोग्यसेवा हवी

- शेतीमालावर प्रक्रिया उद्योगांची उभारणी गरजेची

- जयसिंगपूर येथे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना हवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसाहित्य सादरीकरण स्पर्धा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्यावतीने लोकसाहित्य सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. शालेय व खुल्या गटासाठी ही स्पर्धा होणार आहे.

डॉ. बाबर या ३२ वर्षे राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत होत्या. या काळात त्यांनी अनेक उपक्रमांमधून लोकसाहित्याबाबत जागृती केली. त्यांच्या या योगदानाची दखल घेत समितीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी उखाणा, ओवी, स्त्रीगीते, भारूडे, गवळणी हे विषय देण्यात आले आहेत. शालेयगटात आठवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. निवडलेल्या विषयातील लोकसाहित्य सादर करत असताना त्यासोबत अर्थासह निवेदन करणे बंधनकारक आहे. यासाठी ७ मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांनी अर्जासह शाळा प्रशासनाचे पत्र जोडणे आवश्यक आहे. अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी सचिव डॉ. आनंद काटीकर यांनी केले आहे. इच्छुकांनी www.rmvs.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी ९९२३३८८७३५ या क्रमांकावर उपक्रम अधिकारी अहमद शेख संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवाने उजळली पंचगंगा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

हजारो पणत्यांच्या मंद प्रकाशात आज, मंगळवारी पहाटे पंचगंगा नदीघाट उजळून निघाला. सुखद वाऱ्याची येणारी झुळूक आणि हलकीशी, बोचरी थंडी अंगावर घेत हजारो करवीरकरांनी दीपोत्सवाचा साज डोळ्यात साठवला. पंचगंगा नदीघाट परिसरासह कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, कात्यायनी कुंड, रंकाळा तलाव, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप सायंकाळी दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला.

त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त पंचगंगा नदीघाटावर शिवमुद्रा फाउंडेशन आणि संदीप देसाई फाउंडेशनने दीपोत्सवाचे आयोजन केले होते. सोमवारी मध्यरात्रीपासून युवक, युवती, कलाकार, तालीम मंडळांचे कार्यकर्ते घाटावर जमू लागले. घाट परिसरात आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या जात होता. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोर्णिमेचा चंद्र मावळतीकडे झुकू लागला. गार वाऱ्याने पहाटेची नांदी दिली आणि परिसरातील ब्राह्मण घाट, मधला घाट, परिट घाटासह मंदिरे, दीपमाळा, समाधी मंदिराच्या शिखरांवर पसरून ठेवलेल्या पणत्या प्रज्वलीत करण्यात येऊ लागल्या. मेणबत्त्यांनी पेटविलेल्या पणत्यांच्या ज्योतींनी आकार धरला. उभ्या, आडव्या, चौकोनी, आयताकृती दीपरेखा आकारास येऊ लागल्या आणि परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीने दीपोत्सव सुरू झाल्याची घोषणा झाली.

दीपोत्सव पाहण्यासाठी नदीकडे भल्या पहाटे नागरिकांची गर्दी होऊ लागली. कॅमेरे, मोबाइलचे फ्लॅशमध्ये दीपोत्सव साठवला जाऊ लागला. शिवाजी पुलावरुन नदीपात्रात सोडलेल्या लेसर किरणांनी पाणी चमकू लागले. हनुमान मंदिराजवळील १०१ शिवलिंगाच्या मूर्तीसमोर दिवे पाजळण्यात आले. समाधी मंदिरातील शिवलिंगासमोर भाविक नतमस्तक होत होते. या पोर्णिमेचे औचित्य साधत पंचगंगा नदीत महास्नानाचा लाभ भाविकांनी घेतला. पहाटेच्या नीरव शांततेही स्नान करणाऱ्या भाविकांची 'हर हर महादेव'ची गर्जना रोमांच फुलवत होती. सुहासिनींकडून द्रोणातून दिवे सोडून दीपदान करण्याचा विधी सुरू झाला. नदीपात्रात शेकडो दिवे तरंगू लागले. आकाशात फटाक्यांची आतषबाजी, लेसकिरणे आणि जमिनीवर प्रज्वलीत केलेल्या पणत्यांमुळे परिसर झगमगला.

दीपोत्सवाचा आनंद लुटण्यात तरुणाई आघाडीवर होती. हातात पणत्या घेऊन सेल्फी काढण्यात येत होत्या. दीपोत्सव पाहण्यासाठी अनेकजण सहकुटूंब आले होते. कलाकारांनी रेखाटलेल्या रांगोळ्यांभोवतीही गर्दी झाली.

दीपोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही होती. महेश हिरेमठ यांच्या 'अंतरंग' संस्थेतील कलाकारांनी गायलेल्या भक्तीगीतांना पहाट प्रसन्न झाली. नारायण जांभळे आणि ढवण ग्रपने मसाले दूधाचे वाटप केले. अनहद ग्रुपने कराओके ट्रॅकवर कला पेश केली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंधाराचे साम्राजाचा छेद करणाऱ्या दीपोत्सवाची जागा सूर्यकिरणांनी घेतली आणि दीपोत्सवाची सांगता झाली.

रांगोळीला दाद

दीपोत्सवाचे औचित्य साधत अनेक मंडळे, कलाकारांनी रांगोळ्या रेखाटल्या. सुप्रिम कोर्टाने अयोध्येबाबत दिलेल्या निकालाचे प्रतिबिंब रांगोळीत पहायला मिळाले. राम मंदिराच्या प्रतिकृतीसह प्रभू रामचंद्रांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. वाहने चालवताना मोबाईलवर बोलू नका, ओला कचरा, सुका कचऱ्याचे वर्गीकरण या आशयाच्या रांगोळ्या सामाजिक भान दर्शवणाऱ्या होत्या. अर्धनारी नटेश्वराची रेखाटलेली रांगोळीही प्रेक्षणीय ठरली. श्रीप्रेमी तरुण मंडळाने 'बेरोजगारी एक अभियान' या विषयावरील व्यंगचित्रातून ज्वलंत विषयाची मांडणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना, संभाजी ब्रिगेडही मैदानात

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापाठोपाठ शिवसेना, संभाजी ब्रिगेडही शड्डू ठोकणार आहे. पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून पदवीधर नोंदणीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतही भाजपला शह देण्यासाठी अन्य पक्ष एकवटण्याची शक्यता आहे.

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कारखानदार, उद्योजक, इतिहास अभ्यासक ही मंडळी 'पदवीधर'वर प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पदवीधरच्या निवडणुकीत काँटे की टक्कर पाहावयास मिळणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात गेल्या काही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळेला पदवीधरचे प्रतिनिधित्व केले. भाजपकडून यावर्षी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश सचिव व पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष संघटक राजेश पांडे यांची नावे आघाडीवर आहेत. कोल्हापुरातील माणिक पाटील-चुयेकर हे भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक असून ते तयारी करत आहेत. त्यांनी पदवीधर मतदार नोंदणीत पुढाकार घेतला आहे.

राज्याच्या सत्ताकारणावरून भाजप, शिवसेनेत कमालीचे वितुष्ठ निर्माण झाले आहे. पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात विधानसभेला युती असूनही दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात खेळी केल्या. 'पदवीधर'मध्ये भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेना धक्कातंत्राचा अवलंब करण्याच्या पावित्र्यात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग यांनी गेल्या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघात जोरदार टक्कर दिली होती. २८३० मतांनी त्यांनी निसटता पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी यंदा उमेदवार बदलणार की त्यांनाच संधी देणार यावरही पुढील राजकारण अवलंबून आहे. गेल्या वेळचे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अरुण लाड पुन्हा पदवीधरच्या मैदानात उतरले आहेत. लाड हे कारखानदारी, बँका, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सक्रिय आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व सोलापूर जिल्हा परिषदेतील सदस्य उमेश पाटील, इतिहास व्याख्याते प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची म्हणून नाव नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र व इतिहास विषयक कार्यक्रमांच्या माध्यमातून कोकाटे परिचित आहेत. तर उमेश पाटील हे महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाच्या माध्यमातून सक्रिय आहेत. ते जिल्हा परिषद नरखेड गटातून विजयी ठरले आहेत.

इच्छुकांच्या पाठिंब्यासाठी हालचाली, पण...

पुणे येथील युवराज पवार, अमृतवेल फाउंडेशनचे धर्मेंद्र पवार, शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. मधुकर पाटील, विद्यार्थी कृती समितीचे प्रवीण कोडोलीकर, सोलापूर जिल्ह्यातील शैला गोडसे यांची नावे पदवीधरसाठी चर्चेत आहेत. व्यक्तीगत पातळीवर पदवीधर नोंदणी करत आहेत. त्यांच्यापैकी काहींनी उमेदवारी व पाठिंब्यासाठी प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. आघाडी धर्मानुसार पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे. भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी तगडा उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. त्यामुळे ते अपक्षांना ताकत देण्याऐवजी स्वत:चा उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. यामुळे अपक्षांना स्वतची यंत्रणा राबवावी लागेल.

संभाजी ब्रिगेडकडून मनोज गायकवाड

गेली १३ वर्षे उद्योग क्षेत्र आणि विविध व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नांशी निगडीत असणारे पुणे येथील इंजिनीअर व उद्योजक मनोज गायकवाड हे पदवीधर निवडणुकीची तयारी करत आहेत. संभाजी ब्रिगेडची अधिकृत उमेदवारी मिळाली असल्याचा त्यांचा दावा आहे. संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्रात संघटन आहे.

पदवीधरसाठी चर्चेतील प्रमुख नावे

शेखर चरेगावकर

राजेश पांडे

माणिक पाटील चुयेकर

सारंग पाटील

अरुण लाड

उमेश पाटील

प्रा. श्रीमंत कोकाटे

मनोज गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा

$
0
0

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा

सातारा :

शाहू क्रीडा संकुलात सुरू असलेल्या सरकारी अॅथलेटिक्स स्पर्धेच्या वेळी गेटवर पालकांचा गोंधळ सुरू होता. क्रीडा अधिकाऱ्यांनी या गोंधळाचे चित्रीकरण करण्यास सांगितल्याने छायाचित्रकार या घटनेचे चित्रीकरण करीत असताना तिथे असलेल्या नरेंद्र पाटील, राम हादगे व बाळा ढेकणे यांनी शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली असल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या बाबत सचिन रामचंद्र लिंबकर (वय ३९, रा. बुधवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दाखल केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व बाबर यांना ही या वेळी शिवीगाळ, दमदाटी झाल्याचे लिंबकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

..............

'स्वाभिमानी'चे धरणे आंदोलन सुरू

सातारा : सन २०१७-१८ व २०१८-१९मधील गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचे बिल देण्यासह अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे. आम्ही आपणाकडे या अगोदर वारंवार निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष भेटून सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये गाळप झालेल्या उसाचे बिल काही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांनी दिले नाही, अशी तक्रार करून, आपल्याकडे पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. कारखान्यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची बिले एफआरपी कायद्यानुसार देणे बंधनकारक असतानाही आपल्याकडून कायद्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक कारखानदारांनी शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे देण्यास चालढकल सुरू केली आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत उसाची बिले तत्काळ मिळावीत. महापूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात संघटनेचे कार्यकारणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, उपाध्यक्ष देवानंद पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सातारा तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ आणि दादासाहेब यादव, धनंजय महामुलकर आदी सहभागी झाले आहेत.

..............

सातारा पालिकेच्या नऊ प्रकरणांवर होणार सुनावणी

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा पालिकेच्या गैरकारभाराच्या नऊ प्रकरणांची अंतिम सुनावणी येत्या १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ओंकार तपासे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी त्यांच्याशी चर्चा करून अंतिम सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी तपासे यांच्याशी चर्चा करून नगर परिषद प्रशासनाला एकूण किती तक्रारींचा निपटारा करण्यात आला याचा अहवालच पाच जणांच्या पथकाकडून मागविला आहे. हे पथक दिवसभर नगर परिषद संकलन विभागात तळ ठोकून होते. या पथकात सामान्य प्रशासनाचे अधिकारी असल्याची माहिती आहे. ओंकार तपासे यांनी गेल्या दीड वर्षांत सातारा पालिकेच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकरणात एकूण तेरा तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी नऊ तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असूनही त्या प्रकरणांचा निकाल लागत नाही म्हणून ओंकार तपासे यांनी सातारा पालिका व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना सोमवारी उपोषणाचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तपासे यांना पाचारण करुन त्यांच्याशी चर्चा केली व येत्या १८ नोव्हेंबर रोजी नऊ प्रकरणांची अंतिम सुनावणी घेण्याची ग्वाही दिली. युआयडीएसएमटी योजनेअंतर्गत सदर बझार घरकुल योजनेवर झालेला खर्च, आयुर्वेदिक गार्डन येथे झालेला खर्च, वकिलांच्या पॅनलवर झालेल्या वकिलांच्या बेकायदा नेमणुका, सभापतींच्या बेकायदा निवडी, नगरसेवकांची अनधिकृत बांधकामे, ठेका पद्धतीने अनावश्यक नेमणुका, कास बंगला दुरुस्ती व सुरक्षा रक्षकांची नेमणूक आदी नऊ प्रकरणांमध्ये सातारा पालिकेने नगरपालिकेने नियमांचे उल्लंघन केल्याचा तक्रारदारांचा आक्षेप आहे. या प्रकरणांची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या नऊ प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद संकलन विभागाचे प्रशासन अधिकारी रवींद्र पवार यांच्याकडे निर्गतीकरणाचा (निपटारा) अहवाल मागितला आहे. सामान्य प्रशासनाकडून या प्रकरणाच्या फायली व तत्सम कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात आली. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा तपासे यांनी दिला आहे.

..............

वासोटा पर्यटन लवकरच होणार सुरू

सातारा :

आमदार शिवेंद्रराजे, कोयना धरण प्रकल्प प्रशासन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास आणि साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या एकत्रित प्रयत्नातून वासोटा पर्यटन पुन्हा सुरू होणार आहे.

जावली तालुक्यातील कसबे बामणोली या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर बोट पर्यटन होत आहे. वासोटा पर्यटन हे येथील पर्यटनाचा एक महत्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड कार्यालय अंतर्गत येणाऱ्या बामणोली वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून वासोटा किल्ल्यावर जाण्याची परवानगी १६ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे वासोटा पर्यटन पूर्णपणे ठप्प झाले होते, याची माहिती सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेकडे बोट चालकांकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वी देखील बोट चालकांनी शिवेंद्रसिंहराजे यांना भेटून होत असलेल्या नुकसानी बाबत सांगितले होते. त्यावर स्वतः शिवेंद्रसिंहराजे यांनी बामणोली येथील सर्व बोट चालकांना सोबत सोमवारी दुपारी साडेबारा वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेतली. बोट चालकांच्या सर्व समस्या जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडून त्वरित बोटिंगसाठी परवानगी देण्याची मागणी केली. पोलिस प्रशसनासही मी बोलतो, असे त्यानी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी लगेचच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांना दूरध्वनी करून जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याबाबत सूचना केल्या. दुपारी दोन वाजता डॉ. विनिता व्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर पुन्हा अडीच वाजता शिवेंद्रसिंहराजे भोसले व सर्व बोट चालक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. या वेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी डॉ. विनिता व्यास यांना तुम्ही फक्त वासोट्याला जाण्यासाठी पर्यटकांना तिकिटे द्या, बाकी बोटिंगसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आम्ही लवकरच घेऊ, तसेच कोयना धरण व्यवस्थापन यांचे जे पत्र आपल्याकडे आले आहे.त्या संदर्भात मी वरीष्ठ पातळीवरून पाठपुरावा करतो. मात्र, तुम्ही वासोटा पर्यटन लवकरात लवकर सुरू करा, असे त्यानी सांगितले. त्यावर विनिता व्यास यांनी मला एक दिवसाचा वेळ द्या, मी वरिष्ठांशी बोलून घेते, अशी ग्वाही दिली. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी मुबईस्थित पश्चिम विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना फोनवरून संबंधित प्रकाराविषयी माहिती दिली. लिमये यांनी दोन दिवसांत वासोटा पर्यटन सुरू करू, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्र पक्षीमित्र’चे पुरस्कार जाहीर

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bगेली चार दशकांपासून राज्यात काम करणाऱ्या महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने यावर्षीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार बाळासाहेब कृ. कुलकर्णी यांना तर पक्षीमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार येथील मुकुंद धुर्वे यांना आणि पक्षीमित्र संशोधन व जनजागृती पुरस्कार डॉ प्रशांत वाघ व अश्विन पाटील यांना विभागून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे यावर्षी २०१९पासून या पुरस्कारांची सुरुवात केली आहे. यासाठी दरवर्षी प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत. यावर्षीचा स्व. रमेश लाडखेडकर पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार हा दीर्घकाळ पक्षीमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन व जनजागृतीसाठी कार्यरत असलेले आणि पर्यावरण लेखक बाळासाहेब कुलकर्णी, पुणे यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख पाच हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षी हा पुरस्कार विदर्भ पक्षीमित्र मंचद्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. यावर्षीचा दुसरा पुरस्कार स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षीमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार हा पक्षीमित्र चळवळीतील पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन तथा जखमी पक्षी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत असलेले आणि विदर्भातील सारस ह्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी काम करणआरे गोंदियाचे मुकुंद धुर्वे यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख दोन हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे आहे. या वर्षी हा पुरस्कार जीएनव्ही मेमोरिअल फंड तर्फे स्व. डॉ. जी. एन. वानखेडे यांच्या विद्यार्थ्यांनी प्रायोजित केला आहे. यावर्षीचा तिसरा पुरस्कार स्व. डॉ. व्ही. सी. आंबेडकर स्मृती पक्षीमित्र संशोधन व जनजागृती पुरस्कार हा पक्षीमित्र चळवळीतील संशोधन क्षेत्रात कार्यरत सिन्नरचे डॉ प्रशांत वाघ आणि पक्षी विषयक अभ्यास व जनजागृती क्षेत्रात कार्यरत चाळीसगावचे पक्षीमित्र अश्विन पाटील यांना विभागून देण्यात आला आहे.रोख दोन हजारे रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षी हा पुरस्कार वाइल्ड लाइफ हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटी नाशिकतर्फे प्रायोजित करण्यात आला आहे.

पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी ३३ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन रेवदंडा (जि. रायगड) येथे ११ व १२ जानेवारी २०२०दरम्यान होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

\B- किशोर गठडी, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी प्रतिबंधांसाठी विशेष पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरामध्ये डेंगी सदृश रुग्ण आढळल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून त्यासाठी डेंगी प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. १३ विशेष पथकाद्वारे एकचावेळी १३ प्रभागात औषध व धूर फवारणी आणि जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे.

जानेवारी २०१९ पासून डेंगी व साथीच्या रोगांची साथ फैलावू नये, यासाठी आरोग्य पथकाची स्थापना केली आहे. घरोघरी सर्व्हे आणि जनजागृती करणे सुरू केले होते. पण गेल्या महिन्यापासून डेंगी सदृश रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. ९ ते १८ नोव्हेंबरअखरे डेंगी प्रतिबंधक ‌विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आरोग्य विभाग, सॅनिटेशन वॉर्ड व नागरी आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १३ पथक तयार केली आहेत. त्यामध्ये २०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पथकामार्फत महापालिकेच्या ८१ प्रभागामध्ये तापाच्या रुग्णांचा सर्व्हे, डास व अळी सर्वेक्षण, औषध व धूर फवारणी आणि नागरिकांमध्ये डेंगीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. साचलेल्या पाण्यात अळी नाशक टेमिफोस सोडणे, गप्पी मासे सोडणे, जुन्या टायर जप्त अशी मोहीम राबवली जात आहे. १३ पथके जवळच्या १३ प्रभागात एकाचवेळी मोहीम राबवत आहेत. ३९ प्रभागामध्ये ही मोहीम पूर्ण करण्यात आली आहे. ६५ स्प्रे पंप, २३ धूर फवारणी मशीन व तीन ‌व्हेइकल मशीनद्वारे मोठ्याप्रमाणात उर्वरित प्रभागात औषध फवारणी केली जात आहे.

महापालिकेमार्फत डेंगी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये पाणी साचून राहणार नाही. याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडच्या राही कुलकर्णीची सायकलिंग क्रीडा स्पर्धेमध्ये निवड

$
0
0

कराडच्या राही कुलकर्णीची सायकलिंग क्रीडा स्पर्धेमध्ये निवड

कराड :

कराडच्या राही उदयन कुलकर्णी हिची चौदा वर्षांखालील मुलींच्या सायकलिंग क्रीडा स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी निवड झाली आहे. ती या महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत तिने हे यश मिळवले. त्या पूर्वी सातारा येथेच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तिने विभागीय पातळीही गाढली होती. राज्य पातळीवर सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारी कराडमधली ती पहिलीच मुलगी आहे. कराड येथील क्षितिज बेलापुरे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. राही इयत्ता सातवीत लाहोटी कन्याशाळेत शिकते. सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

...................

स्नेहा जाधवला हॅमर थ्रो राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक

खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठीही निवड

कराड :

कराड अर्बन स्पोर्टस् क्लब आणि वेणुताई चव्हाण कॉलेजची विद्यार्थीनी, तसेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.,यांची शिष्यवृत्ती प्राप्त हजारमाची, ता. कराड येथील स्नेहा सूर्यकांत जाधव हिने गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या ३५व्या ज्युनिअर राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत हॅमर थ्रो स्पर्धेमध्ये रौप्य पदक संपादन केले. त्याचबरोबर तिने सन २०१२मधील सोनिया शिंदे हिचा महाराष्ट्रचा ४९.६९ मीटरचा विक्रम मोडत ४९.९८ मीटर थ्रो करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तिची जानेवारी २०२०मध्ये आसाम येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

................

तन्मय कुंभारचे शुटिंग स्पर्धेत यश

सातारा :

तन्मय सुविचार कुंभार याने मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे झालेल्या एअर पिस्टल शुटिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघातून सहभाग घेत सुवर्ण पदकाची कामगिरी बजावली आहे. या पूर्वी त्याने कोल्हापूर बिहार व अन्य राज्यस्तरीय स्पर्धातून चमकदार कामगिरी केली आहे.

तन्मय पाचवड (ता. वाई) येथील तिरंगा इंग्लिश मेडियम स्कूलच्या प्राचार्या वैशाली कुंभार यांचा मुलगा आहे. तो शुटिंगचा सराव कोल्हापूर मुंबई व पुणे येथे करीत आहे. त्याच्या या कामगिरीचे कौतुक जिल्हाभरातून होत असून, त्याचे मूळगाव बावडा (ता. खंडाळा) आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीपोत्सव

$
0
0

दीपोत्सव..

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सातारा येथे यादोगोपाल पेठेतील श्री मुरलीधर मंदिरात सायंकाळी सहा वाजता शेकडो पणत्यांची आरास केली होती. ॉ

अतुल देशपांडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा ड्रमिक्स प्लँट सुरू

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क तातडीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. कसबा बावडा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाजवळील ड्रमिक्स प्लँट सुरू करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी बॉयलर सुरू केला असून संपूर्ण प्लँट सुरू करण्यासाठी मंगळवारपासून मशीन दुरुस्तीला सुरुवात झाली. मध्यरात्री काम झाल्यानंतर आज, बुधवारपासून डांबरमिश्रीत खडी पॅचवर्कसाठी पाठवली जाण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची पुरती दैना उडाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण झालेले असतानाच निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्क कामावरुन प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे. नवीन रस्त्यांची कामे सुरू होण्यास अडचणी आहेत. त्यातच यापूर्वी झालेले रस्ते पावसाने धुवून गेले आहेत. पावसाची संततधार सुरू असताना महापालिकेने मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही फारसे यश आले नाही. त्यामुळे रस्त्यांची अधिकच दुरवस्था झाली.

ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबल्यानंतर बॉयलर सुरू करुन रुस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्याचा प्रयत्न झाला. पण परतीच्या पावसाचे पाणी प्लँटमध्ये आल्याने त्यावर मर्यादा आल्या. तातडीची उपाययोजना म्हणून बाहेरुन डांबर आणून पॅचवर्कला सुरुवात झाली. मात्र कामामध्ये डांबराचा वापर कमी असल्याने त्या विरोधात आंदोलन करुन काम बंद पाडण्यात आले. त्यानंतर महापालिकेने स्वत: डांबरमिश्रीत खडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. पण महापुराच्या पाण्यात बुडालेला ड्रमिक्स प्लँट खराब झाल्याने त्यावर मर्यादा आल्या. त्यामुळे संपूर्ण प्लँटच दुरुस्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. तत्पूर्वी बॉयलरला आवश्यक ते तापमान देवून डांबर वितळवून घेतले जात आहे. ड्रमिक्सची दुरुस्ती मंगळवारी मध्यरात्री पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वितळलेले डांबर मिक्सरमध्ये टाकून डांबरयुक्त खडी पॅचवर्कच्या कामासाठी पाठवण्याची शक्यता आहे.

...

खडी टाकण्यासाठी जागेचा शोध

प्लँट दुरुस्त होण्यापूर्वी येथे डांबराची बॅरेल आणून डांबर वितळवले जात आहे. कचरा प्रकल्पाजवळ हा प्लँट असल्याने आणि कचऱ्याचे ढीग साचल्याने प्लँटशेजारी खडी टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे कचऱ्याची जागा रिकामी केल्यानंतर खडी टाकण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. तसेच येथे कर्मचाऱ्यांची संख्याही नगण्य आहे. वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांद्वारे प्लँटची दुरुस्ती करण्यात आली. प्लँट पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मात्र आवश्यक मनुष्यबळही पुरवावे लागणार आहे.

.....

कोट

'ड्रमिक्स प्लँटमध्ये पावसाचे पाणी आल्याने योग्यवेळी बॉयलर प्रज्वलित करण्यास मर्यादा आल्या. पुराच्या पाण्यामुळे काही मशिनरी नादुरुस्त झाल्या असून मध्यरात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. बुध‌वारपासून डांबरमिश्रीत खडी कामासाठी पाठवण्याचा प्रयत्न आहे.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभा आज

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (ता.१३) होणार आहे. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पहिल्यांदाच स्थायी समितीची सभा होत आहे. यामध्ये विविध सरकारी योजना व आणि व्यक्तिगत लाभार्थी योजनेच्या अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित होणार आहे. समाजकल्याण विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभागातर्फे लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी अर्थसहाय्य केले जाते. पात्र लाभार्थ्यांनी वस्तू खरेदी करून त्याच्या बिलाची पावती जमा केल्यानंतर खात्यावर अनुदान जमा होते. लाभार्थ्यांनी पावत्या जमा करुनही त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. त्यावरुन प्रशासनाला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोक्यात वार करून खून

$
0
0

सातारा : मेणवली (ता. वाई) येथे दिलीप कृष्णा शिखरे (वय ५२) याचा अज्ञाताने मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात वार करून खून केला. दिलीप शिखरे मेणवली येथे एकटेच राहत होते. त्यांची गावी असणारी शेती ते करीत होते. त्यांची मुले व पत्नी पुणे येथे तर भाऊ व वडील मुंबई येथे राहत आहेत. सोमवारी रात्री त्यांनी काही व्यक्तींसोबत जेवण केल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे.

दरम्यान, त्यांच्या घराजवळ दोन दुचाकी उभ्या होत्या, त्या पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणल्या आहेत. त्यांच्या खुनाचा संशय असणाऱ्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. दिलीप शिखरे यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्यांचा मध्यरात्रीच्या सुमारास खून करून आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्या तपासासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. शिखरे यांचे वडील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आहेत तर भाऊ मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग येथे कार्यरत आहेत. त्यांना खुनाची घटना कळविण्यात आली आहे. या बाबत पोलिस स्थानिकांकडून माहिती घेत आहेत. पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे,उपनिरीक्षक रमेश मोतेवार व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट तज्ज्ञ दाखल झाले होते, अधिक तपास पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेमबाज शाहूला दोन पदके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोहा-कतार येथे झालेल्या १४ व्या आशियाई शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचा युवा नेमबाज शाहू तुषार माने याने ज्युनिअर गटात भारतीय ज्युनिअर संघाचे प्रतिनिधित्व करताना वैयक्तिक कांस्य व सांघिक सुवर्ण अशी दोन पदके मिळवली.

पात्रता फेरीमधे ६२९:३ गुणांसह तो पहिल्या स्थानावर होता. अंतिम फेरीमधे खराब सुरुवात होऊनही त्याने कामगिरी उंचावत सहाव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तृतीय स्थानी असणाऱ्या झांग जुनाले या चायनीज नेमबाजासोबत शाहूचे समान गुण झाले. त्यानंतर रौप्य पदकासाठी एका शॉटचा शूटआउट घेण्यात आला. त्यामध्ये शाहूने १०:४ गुणांचा वेध घेतला. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शाहूने सर्वाधिक ६२९:३, तर त्याचे सहकारी धनुष ( तामिळनाडू ) याने ६२५:३ तसेच ह्रदय (आसाम) याने ६२२ : ५ गुणांची कमाई करत सांघिक सुवर्णपदक जिंकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे तीस कोटी रुपये जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यापोटी ३० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ३६ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. गडहिंग्लजच्या प्रांताधिकाऱ्यांनी ही रक्कम तातडीने संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करावी, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे की, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सुरुवातीला जमिनी मिळत नव्हत्या, त्यामुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता. मी जलसंपदा मंत्री असताना दर हेक्टरी ३६ लाखांचे पॅकेज सरकारला पाठवले होते, त्याला सरकारने मंजुरी दिली असून, ही रक्कम प्रशासनाकडे वर्ग केली आहे. प्रस्ताव सादर केलेल्या १६८ शेतकऱ्यांच्या नावावर ३० कोटी रक्कम तत्काळ जमा करावी.

या प्रकल्पातून वाहून जाणारे पाणी पुढे अडविण्यासाठी आणि त्यांचा शेतकऱ्यांना उपयोग होण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे नियोजित आहेत. या बंधाऱ्यांच्या बांधकामाच्या निविदाही निघालेल्या आहेत. आठ दिवसांच्या आत निविदा मंजूर होऊन कामास सुरुवात होईल. त्यापैकी उत्तूरच्या शिवारात चार व पुढे शिपूर तर्फ आजरा, करंबळी, गिजवणे या गावांच्या शिवारामध्ये प्रत्येकी एक असे हे सात बंधारे होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांत पणत्या लावून ‘त्रिपुरारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्त्यांवरील खड्ड्यांप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी आंदोलन करत चप्पल लाइन परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत खड्ड्यांत दिवे लावून महापालिका प्रशानसाना निषेध केला. कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. सोमवारी बिंदू चौक येथे खडी आणि डांबरचे लग्न लावण्याचे आंदोलन झाल्यानंतर पुन्हा पौर्णिमेनिमित्त झालेल्या आंदोलनामुळे शहरवासियांचा उद्रेक ठळकपणे दिसून आला.

मंगळवारी पहाटेपासून अनेकठिकाणी दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. मनसेने मात्र पौर्णिमेचे औचित्य साधून चक्क खड्ड्यातच पणत्या लावल्या. जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी छत्रपती शिवाजी चौकात कार्यकर्ते जमले. त्यानंतर ते जोरदार घोषणा करत चप्पल लाइन येथे दाखल झाले. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांत कार्यकर्त्यांनी पणत्या लावल्या. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही केली. खड्ड्यात लावलेल्या पणत्यांच्या उजेडात प्रशासनाला खड्डे दिसून त्याची दुरुस्ती करण्याची सदबुद्धी देण्याची अपेक्षाही आंदोलनकांनी व्यक्त केली. या अनोख्या आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली. आंदोलनात तानाजी जाधव, कृष्णात शिंदे, महादेव चितारे, विनोद सातपुते, दयानंद लोकरे, नितीन पोवार, संजू कांबळे, मारुती गवळी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात विविध ठिकाणी दीपोत्सव

$
0
0

कोल्हापूर: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाट परिसर, कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर, कात्यायणी परिसरात दीपोत्सव साजरा झाला. दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

पंचगंगा घाटावर मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पणत्या प्रज्वलित करुन दीपोत्सवास सुरुवात झाली. नदीवरील घाट, मंदिरे, दीपमाळ्यावर दिवे प्रज्वलित करण्यात आले. दीपोत्सव पाहण्यासाठी नदी परिसरात नागरिकांनी फुलून गेला होता. रात्री राजाराम बंधारा येथेही दीपोत्सव साजरा झाला. बंधाऱ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या सभोवती उभारण्यात आलेल्या स्टँडवर भाविकांनी पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. शहरातील अनेक मंदिरातही दीपोत्सव साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी साठवणूक टाक्या स्वच्छ होणार

$
0
0

कोल्हापूर: शहरातंर्गत पाणी वितरणासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून बांधण्यात आलेल्या साठवणूक टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे. दोन डिसेंबर रोजी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. आपटेनगर, पुईखडी, साळोखेनगर, राजारामपुरी, टेंबलाईवाडी, कावाळा नाका आदी ठिकाणी उंच टाक्या बांधण्यात आलेल्या उंच टाक्याद्वारे पाणी वितरण केले जाते. त्याचबरोबर अनेकठिकाणी भूमीगत टाक्याही आहेत. शिंगणापूर व बालिंगा पंपिंग हाऊसमधून उपसा केलेले पाणी थेट या टाकीमध्ये येत असल्याने पाण्याबरोबर गाळही वाहून येतो. हा गाळ काढण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. ३० नोव्हेंबर पर्यंत निविदा दाखल करण्याची अंतिम मूदत असून दोन डिसेंबर रोजी निविदा खुली करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरंकारी मिशनतर्फे हरियाणात संत समागम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संत निरंकारी मिशनचा ७२ वा वार्षिक निरंकारी संत समागम हरियाणा येथे १६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमात ठिकठिकाणचे अनुयायी सहभागी होणार आहेत. मानवता व विश्वबंधुत्व स्थापित करण्याच्या हेतूने संत समागमचे आयोजन केल्याचे संत निरंकारी मंडळाने म्हटले आहे. या संत समागमसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पाच हजाराहून अधिक जण जाणार आहेत.

संत निरंकारी मिशनच्या स्वतच्या जागेवर यंदाचा कार्यक्रम होत आहे. हरियाणा येथील समालखा येथे जवळपास चार किलोमीटर जागेवर भक्तगणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. संत निरकारी मिशनतर्फे गेल्या ७० वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी संत समागम पार पडले. १९८० पासून बाबा हरदेवसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मिशनचा आवाज सर्वत्र पोहोचला. त्यांच्या जवळपास ३६ वर्षांच्या मार्गदर्शनाखाली मिशनच्या ३००० शाखा स्थापन झाल्या. भारतासह जगभरात मिशनची ७०० सत्संग भवन निर्माण केले आहेत.

दरम्यान, सद्गुरू सविंदर हरदेवजी यांनी १६ जुलै २०१८ रोजी मिशनचे भावी मार्गदर्शक म्हणून सुदीक्षा यांच्या नावाची घोषणा केली. सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ७२ वा संत समागम हरियाणा येथे होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याचे निरंकारी मंडळाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसासह दोन होमगार्डना जमावाची बेदम मारहाण

$
0
0

पाचगाव परिसरातील घटना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुन्ह्याची माहिती घेण्यास गेलेल्या पोलिस आणि दोन होमगार्डना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पाचगाव (ता. करवीर) येथील रुमाले माळ येथे घटना घडली. याप्रकरणी दोन महिलांसह पाचजणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्योती सातपुते, पूजा पोवार, शुभम पोवार, सौरभ पोवार, संजीव सातपुते (सर्व रा. रुमाले माळ) अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक दादाहरी अभिमन्यू बांगर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आर.के. नगर, पाचगाव परिसरातील रुमाले माळ येथे संशयितांच्या घरी विद्यार्थी भाडेकरु राहतात. त्यांच्याशी वाद झाल्याने संशयितांनी त्यांना लाकडाची दांडके, बांबू आणि विटांनी बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. या प्रकाराची माहिती कळताच पोलिस नाईक दादाहरी बांगर, होमगार्ड पंकज पाडळकर, दशरथ यादव घटनास्थळी गेले. यावेळी परिसरात मोठा जमाव जमला होता. पोलिस आणि होमगार्डनी संशयितांना जिल्ह्यात जमावबंदी आदेश असल्याचे सांगितले. त्यावर चिडलेला जमाव पोलिस आणि दोन्ही होमगार्डच्या अंगावर धावून गेला. पोलिस आणि होमगार्ड हे संशयितांना समजावून सांगत असताना शुभम पोवार, सौरभ पोवार आणि संजीव सातपुते आणि त्यांच्या सुभाषनगरातील साथीदारांनी पोलिस नाईक बांगर, होमगार्ड पाडळकर यांची कॉलर धरुन जमिनीवर पाडले. त्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत दोघांचेही कपडे फाटले. त्यांना सोडवण्यास आलेल्या होमगार्ड यादव यालाही धमकी देऊन मारहाण करण्यात आली. संशयितांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणून सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभोळकर कॉर्नरला रास्ता रोको

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील खराब रस्तेप्रश्नी जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने आंदोलन हाती घेतले आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून बुध‌ावारी दाभोळकर कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांमध्ये कलम १४४ ची भीती निर्माण झाल्याने केवळ पाच मिनिटांत आंदोलनाची सांगता करावी लागली. सिग्नलवर रास्ता रोकोसाठी साखळी करुन उभा राहिल्यानंतर पोलिसांनी तातडीने आंदोलकांना हटवण्यात आले. अवघ्या काही मिनिटात संपलेल्या आंदोलनाची नंतर चांगलीच चर्चा झाली.

खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी महासंघाने गेल्या चार दिवसांपासून आंदोलन हाती घेतले आहे. खडी, डांबराचे लग्न, रास्ता रोको व त्यानंतर महापालिकेला महासभेवेळी घेराव असे टप्पे निश्चित केले आहेत. खडी, डांबरीचे लग्न करून प्रशासनाचा निषेध केल्यानंतर बुधवारी दाभोळकर कॉर्नर येथे रास्ता रोका आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात पोलिस प्रशासनाकडे निदर्शने करण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्यानंतर वाहतूक पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी रास्ता रोको न करता बाजुला निदर्शने करण्याची सूचना केली. मात्र तरीही आंदोलकांनी काही मिनिटाचा रास्ता करुन महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलनानंतर शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे नंतर केली. आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, चंद्रकांत भोसले, राजू जाधव, विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, अशोक जाधव, इंद्रजित आडसुळे, नीलेश हंकारे, भारत चव्हाण, तानाजी पाटील, रियाज जमादार आदी सहभागी झाले.

अशीही पळवाट

जिल्ह्यात कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे. आदेशामुळे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी नागरिकांना मोठ्या संख्येने एकत्र येण्यास बंदी आहे. परिणामी आंदोलनाची परवानगी मागताना महासंघाने पोलिस प्रशासनाकडे दाभोळकर कॉर्नर येथे निदर्शनाची परवानगी मागितली होती. तर प्रसार माध्यमाना दिलेल्या पत्रकामध्ये रास्ता रोको आंदोलन असा उल्लेख केला होता. जमावबंदी आदेशाचा भंग होऊ नये, यासाठी महासंघाने पळवाट शोधली असल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images