Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कुस्तीच्या विकासासाठी नवा आराखडा

0
0

लोगो : टॉकटाइम

कोल्हापूरला कुस्तीची मोठी परंपरा आहे. कुस्तीचे माहेरघर ही ओळख जगभरात आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या खेळाला अवकळा आल्याचे चित्र आहे. मल्लांना पायाभूत सोयीसुविधांचा अभाव, खेळातील करिअरची कमी झालेली शाश्वती, आर्थिक अडचणी कुस्ती क्षेत्रासमोर आव्हान म्हणून उभ्या राहिल्या आहेत. नुकत्याच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा झाली. उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्याकडे तालीम संघाच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. कुस्तीला उर्जितावस्था आणण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचे पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले. सचिन पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न : कुस्तीच्या विकासासाठी नेमके कोणते प्रयत्न करणार आहात?

सर्वात आधी मल्लांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. लोकवर्गणीतून ५० लाख रुपयांचा निधी उभारून २०० मल्लांसाठी वसतिगृह उभारणार आहे. चांगले प्रसाधनगृह, व्यायामासाठी प्रशस्त जागा आदी सुविधा देणार आहोत. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कुस्तीच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. नव्याने येणाऱ्या सरकारकडे पाठपुरावा करून अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे. किमान मोठ्या तालमींना प्रशासकीय खर्चासाठी भरीव अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे. त्याचबरोबर यंदा हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल.

प्रश्न : मल्लांना आर्थिक पाठबळासाठी आपली भूमिका काय असेल?

मल्लांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे ही आमची मुख्य भूमिका आहे. राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूला नोकरी मिळणे गरजेचे आहे. अनेक खेळाडू सरावाचा खर्च पेलत नसल्याने कुस्तीपासून लांब जातात. इतर खेळांतील खेळाडूंना ज्या प्रमाणात शासकीय नोकरीत सामावून घेतले जाते, त्याच पद्धतीने कुस्तीपटूंना नोकरीत अधिक स्थान मिळावे यासाठी राज्यातील सर्व तालीम संघाच्या माध्यमातून सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी शासनावर धोरणात्मक दबाव आणणार आहे.

प्रश्न : कोल्हापूरमधूनही नवा महाराष्ट्र केसरी घडलेला नाही?

गेली काही वर्षे कुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कोल्हापुरातून महाराष्ट्र केसरीसाठी मल्ल घडविण्यात अडचणी आल्या आहेत. यातील समस्यांवर काम करून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने नवे खेळाडू तयार होतील यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात आला आहे. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने नव्या खेळाडूंना तयार केले जाईल. मोठ्या संख्येने जिल्ह्याबाहेरून मल्ल कोल्हापूरला येत आहेत. त्याचबरोबर स्थानिक खेळाडूंचा सहभाग वाढेल याकडे लक्ष दिले जाईल. स्थानिक गुणवत्तेला अधिक वाव दिला जावा यासाठी सर्व तालीमींना एकत्र घेऊन आराखडा तयार करणार आहे.

प्रश्न : कुस्तीमधील मुलींचे प्रमाण कमी आहे. यासाठी काय उपाययोजना असतील?

मुलींचा कुस्ती क्षेत्राकडे चांगला ओढा आहे. रेश्मा माने हिने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे अधिकाधिक मुली कुस्तीमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहत आहेत. मुरगुडमधील मुली कुस्तीमध्ये चमकत आहेत. मुलींना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी तालीम संघाच्या माध्यमातून निश्चितपणे काम होईल. त्याचबरोबर पालकांमध्ये कुस्तीबाबत जाणीव जागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल. ग्रामीण भागातून अधिकाधिक मुली कुस्तीकडे वळाव्यात यासाठी स्थानिक तालमींना घेऊन विशेष मोहीम राबवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रब्बीचा पिक आराखडा पाण्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेल्या क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्याच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पेरणीयोग्य जमिनीला ओपसा नसल्याने जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टांपैकी केवळ ४.३८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीला विलंब होत असल्याने रब्बी हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून जाण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे महापुराच्या तडाख्यातून वाचलेला पिकांना फटका बसला. खरीप हंगाम हातचा गेला असताना, उर्वरीत काढणीयोग्य झालेल्या पिकांना परतीच्या पावसाने तडाखा दिला. सततच्या पावसामुळे खरीप पिकांची कापणी लांबत गेली. अनेक ठिकाणी पिके पावसामुळे कुजून गेली. महापूर आणि अतिवृष्टीने खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई शेतकरी रब्बी हंगामात करण्याच्या प्रयत्नात होते. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली होती. जिल्हा कृषी विभागानेही रब्बी हंगामाचे उद्दीष्ट निश्चित करून त्यादृष्टीने उपायोजनाही सुरू केल्या.

जिल्ह्यात ज्वारी, गहू, मका आदी तृणधान्याखाली २९ हजार ९५५ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. त्यापैकी केवळ १ हजार ५६१ हेक्टरवर पेरणी झाली असून त्यामध्ये सर्वाधिक पेरणी ज्वारीची आहे. हरभरा, उडीद, मूग अशा कडधान्याचे १० हजार २६७ हेक्टर क्षेत्र निश्चित केले असताना आतापर्यंत केवळ शंभर हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊ शकली. करडई, सूर्यफूल या गळीत धान्याबाबतही स्थिती फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे ४० हजार हेक्टर उद्दिष्टापैकी केवळ १ हजार ७६४ हेक्टरवर म्हणजेच एकूण क्षेत्राच्या केवळ ४.३८ टक्के जमिनीवर रब्बीची पेरणी झाली आहे.

कृषी अभ्यासकांच्या मते रब्बी हंगामातील पिकांची नोव्हेंबरअखेर पेरणी आवश्यक असते. पेरणीचा हंगाम लांबत गेल्यानंतर जमिनीतील ओलावा नष्ट होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. सुमारे चार महिन्यांत पिके मार्चअखेर पक्व अवस्थेत येतील. त्यांदरम्यान उन्हाची तीव्रता वाढून ओलावा कमी होऊन उत्पादन घटण्याची अधिक शक्यता असते. या परिस्थितीचा विचार करता खरीप पाठोपाठ रब्बी हंगामातील उत्पादन कमी होईल. त्याचा गंभीर परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडेल, अशी भिती व्यक्त होत आहे.

रब्बी पेरणीचे पिकनिहाय उद्दीष्ट (हेक्टरमध्ये)

१५,९६२

ज्वारी

७,७६७

गहू

५,७९१

मका

१०,२६७

कडधान्य

७५

गळीत धान्य

४०,२९७

एकूण पेरणीखालील क्षेत्र

१,७६४

प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र

परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामाला बसला. मात्र, जमिनीमध्ये चांगला ओलावा निर्माण झाला आहे. त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी लवकरात लवकर करावी.

- चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

कोट

खरीप हंगामाची काढणी खोळंबल्याने रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडली आहे. ज्वारीसारखे पिक पक्व अवस्थेत असताना जमिनीतील ओलावा तीव्र उन्हामुळे कमी होईल. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.

- किशोर जमादार, शेतकरी, अतिग्रे

०००

(मूळ कॉपी)

रब्बीचा पेरा लांबला

परतीच्या पावसाचा उत्पादनावर परिणाम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेल्या क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्याच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पेरणी योग्य जमिनीला ओपसा नसल्याने जिल्ह्याच्या एकूण उद्दीष्टापैकी केवळ ४. ३८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीला विलंब होत असल्याने रब्बी हंगाम पुढे जावून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून जाण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. तर अतिवृष्टीमुळे महापुराच्या तडाख्यातून सुटलेला पिकांना फटका बसला. खरीप हंगाम हातचा गेलेला असताना, उरली, सुरली काढणी योग्य झालेल्या पिकांना परतीच्या पावसाने तडखा दिला. सततच्या पावसामुळे खरीप पिकांची कापणी लांबत गेली. अनेक ठिकाणी पिके पावसामुळे कुजून गेली. महापूर आणि अतिवृष्टीने खरीप हंगामातील भरपाई रब्बी हंगामात करण्याचा प्रयत्नात शेतकरी होते. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली होती. तसेच जिल्हा कृषी विभागानेही रब्बी हंगामाचे उद्दीष्ट निश्चित करुन त्यादृष्टीने उपायोजनाही सुरू केल्या होत्या.

ज्वारी, गहू, मका आदी तृणधान्याखाली २९,९५५ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. त्यापैकी केवळ १,५६१ हेक्टरवर पेरणी झाली असून त्यामध्ये सर्वाधीक पेरणी ज्वारीची झाली आहे. हरभरा, उडीद, मूग अशा कडधान्याचे १०,२६७ हेक्टर क्षेत्र निश्चित केले असताना आतापर्यंत केवळ शंभर हेक्टर क्षेत्रावर फेरणी होऊ शकली आहे. करडई, सूर्यफूल या गळीत धान्याबाबतही फारसी स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे ४० हजार हेक्टर उद्दीष्टापैकी केवळ १,७६४ हेक्टरवर म्हणजेच एकूण क्षेत्राचा केवळ ४.३८ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

कृषी अभ्यासकांच्या मते नोव्हेंबर अखेर सर्व रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आवश्यक असते. पेरणीचा हंगाम लांबत गेल्यानंतर जमिनीतील ओलावा नष्ट होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. सुमारे चार महिन्यातील सर्व पिके मार्चअखेर पक्व अवस्थेत येतील. त्या दरम्यान उन्हाची तीव्रता वाढून ओलावा कमी होऊन उत्पादन घटण्याची अधिक शक्यता असते. या सर्व परिस्थितीचा विचार करता खरीप पाठोपाठ रब्बी हंगामातील उत्पादन कमी होईल. त्याचा गंभीर परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडेल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

......................

रब्बी पेरणीचे पिकनिहाय उद्दीष्ट (हेक्टरमध्ये)

१५,९६२

ज्वारी

७,७६७

गहू

५,७९१

मका

१०,२६७

कडधान्य

७५

गळीत धान्य

४०,२९७

एकूण पेरणीखालील क्षेत्र

१,७६४

प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र

.......................

कोट

परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामाला बसलेला असला, तरी जमिनीमध्ये चांगला ओलावा निर्माण झाला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेवून रब्बीची पेरणी लवकरात लवकर करावी.

चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

.......................

कोट

खरीप हंगामाची काढणी खोळंबल्याने रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडली आहे. ज्वारी सारखे पिके पक्व अ‌स्थेत असताना जमिनीतील ओलावा उन्हाच्या तीव्रतेने ओलावा कमी होईल. त्याचा फटका उत्पादनावर होणार आहे.

किशोर जमादार, शेतकरी, अतिग्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडीची गणिते बदलणार

0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे महापालिकेत सत्तेच समीकरण गेल्या पाच वर्षांपूर्वी आकाराला आहे. अशाच पद्धतीच्या समीकरणाची नांदी राज्यपातळीवर होऊ लागली आहे. नव्या समीकरणाप्रमाणे राज्यात सत्ता स्थापन झाल्यास त्याचे परिणाम महापालिकेच्या महापौर निवडीत आघाडीची डोकेदुखी कमी होईल. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दुरावलेला शिवसेनेचा गट सत्तारुढ गटाबरोबर कायम राहील. त्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळेल. तसेच पक्षांतर विरोधामुळे दोनवेळा महापौरपदाने हुलकावणी दिलेल्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांचाही मार्ग अधिक सुकर होईल.

महापालिकेच्या २०१५ च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक ४४ जागा पटकावत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्तेचा सोपान पूर्ण केला. त्याला शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा नेहमीच पाठिंबा मिळाला. तर भाजप-ताराराणी आघाडीने ३३ जागांपर्यंत मजल मारली. काँग्रेस आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळाले. अनेकजणांना महापौरपदाची संधी देण्यासाठी पदाची खांडोळी करण्यात आली. परिणामी दर तीन ते सहा महिन्यांनी होणाऱ्या निवडीच्या निमित्ताने नगरसेवकांमधील रुसवे-फुगवे समोर आले. भाजप-ताराराणी आघाडीनेही नेहमीच विरोधी आघाडीमध्ये बिघाडी करण्याचा प्रयत्न केला. निवडीवेळी आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चाही झडली. त्यामुळे दरवेळी होणाऱ्या महापौर निवडीवेळी सत्ता दोलायमान स्थितीत निर्माण होत होती. डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडीवेळी तर मुदतीत सादर न केलेल्या जात वैधता प्रमाणपत्रावरुन चांगलेच रणकंद माजले होते. मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे महापालिकेच्या राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

महापालिकेतील सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवारांपेक्षा प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्याची पक्षाने गंभीर दखल घेतली, पण त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. विधानसभा निवडणुकीमध्येही अशीच स्थिती दिसली. प्रत्येक महापौर निवडीवेळी भाजपच्या उमेदवार असलेल्या जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत विजयही मिळवला. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. त्यामुळे आगामी निवडीदरम्यान सेनेचे नगरसेवक सत्तारुढ गटाला पाठिंबा देणार नसल्याची कुजबूज सुरू झाली. महापालिका वर्तुळात अशी चर्चा सुरू असताना राज्यपातळीवर वेगळ्याच समीकरणाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच नगरसेवकांचा नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. राज्यपातळीवर सुरू असलेल्या सर्व घडामोडीमुळे विशेषत: सत्तारुढ गटामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापौरपदाच्या उमेदवार अॅड. लाटकर यांना राष्ट्रवादीमधील दोन ते तीन नगरसेवक विरोध करण्याच्या भूमिकेत आहेत. अशावेळी राज्यस्तरावरील हे नवीन समीकरण राष्ट्रवादीसाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. मात्र असे समीकरण आकाराला न आल्यास नेहमीप्रमाणे भाजप-ताराराणी चमत्काराच्या आशेने आपली रणनीती आखण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस : ३१

राष्ट्रवादी : १३

ताराराणी आघाडी : १९

भाजप : १४

शिवसेना : ४

अनुपस्थितीच्या फंड्याची चर्चा

विधानसभा निवडणुकीमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांच्या कुटुंबीयांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. प्रथम राष्ट्रवादीच्या नगरसेविका अनुराधा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारात उडी घेतली. अवघ्या एका दिवसानंतर भाजपच्या अश्विनी बारामते व संतोष गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी खेडकर यांचा कित्ता गिरवत काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव व भाऊ संभाजी जाधव भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी जे पक्षांतराच्या भूमिकेत होते, ते सर्वजण निवडी दरम्यान अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ताराराणी व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नगरसेवक सहभागी होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.तही ‘महाशिवआघाडी’?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात सत्तेची नवी समीकरणे आकाराला येत असताना जिल्हा परिषदेतही त्याच धर्तीवर 'महाशिवआघाडी' अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाजूला काढण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे नवे समीकरण आकाराला येऊ शकते. मात्र यासाठी सात नेत्यांच्या गटात विभागलेली शिवसेना सदस्य एकत्र येण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणाचा संदर्भ विचारात घेतल्यावर माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संजय घाटगे वगळता शिवसेनेतील अन्य गट, दोन्ही काँग्रेस व इतर घटकांची जुळवाजुळव होऊ शकते.

जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ६७ इतकी आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त आहे. ६६ जागापैकी ३४ ची जुळवाजुळव झाल्यास जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारता येऊ शकते. सध्या शिवसेनेचे सात सदस्य भाजपच्या बाजूने तर पाच सदस्य हे दोन्ही काँग्रेससोबत आहेत. राज्यातील घडामोडीनंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या आणि दोन्ही काँग्रेस, शिवसेना एकवटल्यास जिल्हा परिषदेतील भाजपच्य सत्तास्थानाला सुरुंग लागू शकते.

दरम्यान सध्या जिल्हा परिषद सदस्यांना, अध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते याकडे लक्ष लागले आहे. येत्या आठवड्याभरात आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. एससी अथवा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होईल, अशी शक्यता सदस्य व्यक्त करत आहेत. राज्यातील 'महाशिवआघाडी'च्या धर्तीवर जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात. शिवसेनेला मानणाऱ्या सदस्यांची संख्या १२ आहे. मात्र हे १२ सदस्य सात नेत्यांमध्ये विभागले आहेत. त्यापैकी सध्या सात जण भाजपआघाडी सोबत तर अन्य पाच जण दोन्ही काँग्रेससोबत आहेत.

माजी आमदार चंद्रदीप नरके व माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या गटाचे प्रत्येकी तीन, माजी आमदार संजय घाटगे गट, माजी आमदार सुजित मिणचेकर गट व माजी आमदार उल्हास पाटील गटाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. विधानसभा निवडणुकीत शाहूवाडी पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना तीनही ठिकाणी पराभूत व्हावे लागले ही भावना त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे तीनही गट भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेतली आहे. संघटनेचे दोन सदस्य असून त्यांच्यासह एक अपक्ष सदस्य काँग्रेसशी निगडीत आहे. यामुळे भाजपविरोधी सक्षम आघाडी तयार होण्याची शक्यता आहे.

नरके, घाटगे गटाची कसोटी

कागलमध्ये संजय घाटगे यांना पराभव झाला. गेल्या अडीच वर्षांत घाटगे गट हा जिल्हा परिषदेत पालकमंत्री पाटील यांना जवळचा समजला जात होता. करवीर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रदीप नरके यांना काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. जिल्हा परिषदेत सत्तेची नवी समीकरणे आकाराला आली तर नरके आणि घाटगे गटाची कसोटी लागणार आहे. अध्यक्षपदाचे आरक्षण एससी प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर झाले आणि काँग्रेसचे आमदार पी. एन. यांच्या गटाचे सदस्य सुभाष सातपुते हे अध्यक्षपदाचे उमेदवार असल्यास नरके गट त्यांना पाठिंबा देणार नाही.

चंद्रकांत पाटील यांच्या मर्यादा

अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत सत्तेची समीकरणे जुळवताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी विविध गटांशी चर्चा करत जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणली. शिवसेना, जनसुराज्य, आवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, चंदगड विकास आघाडी, ताराराणी आघाडीची मोट बांधली. आता राज्यातील गमाविल्यामुळे व मंत्रिपद नसल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना सत्ता स्थापनवेळी मर्यादा पडू शकतात. सध्या भाजपसोबत जनसुराज्य शक्ती पक्ष, स्वाभिमानी, आवाडे गट, शिवसेना, ताराराणी विकास आघाडी, चंदगड विकास आघाडी सोबत आहे. भविष्यात शिवसेना, स्वाभिमानी सोबत राहील याची शाश्वती नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरण स्पर्धेत मृदुलाला रौप्यपदक

0
0

जलतरण स्पर्धेत

मृदुलाला रौप्यपदक

सातारा :

गोवा येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल ऍक्वा स्विमिंग चॅम्पियनशिप, या राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत साताऱ्याच्या मृदुला पुरी-गोसावी या चिमुकलीने रौप्यपदक पटकावले. राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत सातारा येथील गडकर आळीतील मृदुला पुरी-गोसावी या इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीने ५० मिनिटांमध्ये २ किलोमीटर सागरी अंतर पार करून महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले. तिला प्रशिक्षक नितीन गुजर आणि हेमंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मृदुला हिचे उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

ªªªªªªªªªªªªªªªª

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजच्या बैठकीत मल्टिस्टेट माघार ठराव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) बुधवारी (ता.१३) होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करण्याचा ठराव मांडण्यात येणार आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो सेंट्रल रजिस्ट्रार कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

२०१८ च्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळात मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाला. यावेळी सभेत चप्पलफेक झाली होती. मल्टिस्टेट विरोधात विरोधकांनी रान पेटवले होते. मल्टिस्टेटचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी मल्टिस्टेटच्या विरोधी मत व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीतही मल्टिस्टेटचा फटका बसला. विधानसभा निवडणुकीनंतर ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत 'मल्टिस्टेट'ला विरोध करण्याची भूमिका गोकुळचे नेते आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घेतला. त्यानंतर गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी निवेदन प्रसिद्ध करुन 'दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांच्या भावना लक्षात घेऊन सेंट्रल रजिस्ट्रारकडे नोंदणीसाठी पाठविलेला मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करण्यात येत आहे', असे सांगितले होते.

दरम्यान सर्वसाधारण सभेत तांत्रिक कारणामुळे 'मल्टिस्टेट'चा ठराव रद्द करता येत नाही, असे अध्यक्ष आपटे यांनी स्पष्ट केले होते. त्यावरून सभेत गोंधळ झाला. 'मल्टिस्टेट'चा ठरावाची प्रक्रिया सेंट्रल रजिस्ट्रार कार्यालयात पोचली असल्याने संचालकाच्या बैठकीत हा प्रस्ताव रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्याचा सल्ला कायदेतज्ज्ञांनी दिला. त्यानुसार बुधवारच्या सभेत 'मल्टिस्टेट'चा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर सेंट्रल राजिस्ट्राकरकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मल्टिस्टेटचा ठराव कायदेशीरदृष्ट्या बारगळणार आहे.

'मल्टिस्टेट' प्रस्ताव रद्द करण्याच्या प्रस्ताव मांडण्याला आमदार पी. एन. पाटील, माजी महादेवराव महाडिकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बुधवारच्या सभेत प्रस्ताव एकमताने मंजूर होण्याची शक्यता आहे.

प्रस्तावाला दोन्ही राज्याची मंजुरी

'गोकुळ' मल्टिस्टेट करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी दोन्ही राज्यांनी मान्यता दिली आहे. त्यानंतर तो प्रस्ताव सेंट्रल रजिस्ट्रार कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत मल्टिस्टेटचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर होण्याची गरज आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सेंट्रल रजिस्ट्रारकडे पाठवावा लागणार आहे. त्यानंतर मल्टिस्टेट रद्द प्रक्रिया होण्याची सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-ताराराणीच ठरेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माधवी गवंडी व भूपाल शेटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम पुणे विभागीय आयुक्तांनी सोमवारी जाहीर केला. दोन्ही पदासाठी मंगळवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा होणार आहे.

तत्पुर्वी शुक्रवारी (ता. १५) दुपारी तीन वाजता दोन्ही पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सत्तारुढ आघाडीकडून महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित आहे. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे नगरसेवक संजय मोहिते व अशोक जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र भाजप-ताराराणी आघाडीकडून दोन्ही पदांसाठी अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाहीत.

नूतन पदाधिकारी निवडीसाठी सत्तारुढ आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र विरोधी भाजप-ताराराणी आघाडीमध्ये शांतता दिसत आहे. महापौरपदाची निवडणूक ताराराणी आघाडी लढवणार आहे. त्यांच्याकडून नगरसेविका स्मिता माने यांच्या नावाची जोरदार चर्चा असली, तरी अद्याप त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अशीच स्थिती उपमहापौरपदाबाबत आहे. या पदाची निवडणूक भाजपकडून लढवली जाणार आहे. मात्र राज्यस्तरावर सुरू असलेल्या घडामोडींमुळे दोन्ही पदांबाबत विरोधी आघाडीमध्ये अद्याप विचारविनिमय झालेला नाही. दोन्ही पदासाठी भाजप-ताराराणी आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आघाडीकडून उमेदवारांची नावे निश्चित होतील.

दरम्यान सत्तारुढ आघाडीने मात्र महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापौरपदाचे उमदेवार अॅड. लाटकर यांच्यावतीने त्यांचे पती व माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी नगरसेवकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. उपमहापौरपदासाठी मात्र काँग्रेसचे नगरसेवक मोहिते व जाधव यांच्यामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान सोमवारी पुणे विभागीय आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असल्याने दोन्ही आघाडीकडून राजकीय व्यूहरचनेला सुरुवात होणार आहे.

शुक्रवारी (ता.१५) : दुपारी ३ ते पाच अर्ज दाखल व माघार

मंगळवारी (ता.१९) : सकाळी ११ वाजता निवड सभा

पीठासन अधिकारी : जिल्हाधिकारी दौलत देसाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर

0
0

दमदार पाऊस झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरालगतचा ओढा हिरवागार झाला आहे.

सूर्यकांत आसबे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

0
0

कराड :

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिले. राज्यात पडलेल्या अतिपावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. महापुरामुळे अगोदरच पिकांचे अतोनात नुकसान झाले होते, त्यातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच, अतिपावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा, अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे वीजबिल बील माफ करा, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्या, सरसकट कोणत्याही अटी, शर्थी निकष न लावता बाधित शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आदी मागण्यांचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

..........

रास्ता रोको करण्याचा इशारा

कराड :

बळीराजा शेतकरी संघटना व बळीराजा वाहतूक संघटना बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कुष्णा पुलावर, कार्वे पूल-साईबाबा मंदिर रस्त्यावर पडलेल्या खड्डे तत्काळ भरण्याच्या मागणीसाठी कृष्णा पुलावर करणार रास्ता रोको करणार आहे.

कृष्णा पुल, कार्वे पूल-साईबाबा मंदिर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची वर्दळ असते. विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. अनेकांचा बळी खड्ड्यांमुळे गेला आहे. आता साखर हंगाम सुरू होणार आहे. बैलगाड्या, ट्रँक्टरमुळे वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे. प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागांना रस्ता दुरुस्त करण्यास भाग पाडावे, अन्यथा आम्ही बळीराजा शेतकरी संघटना आणि बळीराजा वाहतूक संघटना सर्वांना बरोबर घेऊन कृष्णा पुलावर रास्ता रोको करील, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिराळ्यात येणार ‘फॉरेनची पाटलीन’

0
0

स्पेनची वधू-कोकरुडच्या वरांचा लग्नसोहळा रंगला

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

स्पेनची वधू नागोरी लुईस आणि शिराळा तालुक्यातील कोकरूड गावातील धनराज शामराव गमे यांचा आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा शिराळा तालुक्यातील आसवलेवाडी येथील आचल मल्टीपर्पज कार्यालयात रविवारी पार पडला.

स्पेनची मुलगी नागोरी लुईस चवारी आणि कोकरूड येथील धनराज शामराव गमे यांची लग्नगाठ भारतीय परंपरेनुसार रविवारी ३ वाजून २८ मिनिटांनी बांधली गेली. लग्न सोगळ्यानिमित्त स्पेनच्या पाहुण्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन दिले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सहा नोव्हेंबरपासूनच स्पेनचे पाहुणे लग्न सोहळ्यासाठी कोकरूड गावात दाखल झाले होते. कोकरूड परिसरासह परिसरातील निसर्गाचा मनमुराद आंनद या गोऱ्या पाहुण्यांनी घेतला. वराकडील काही हौशी नातलगांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात भाषेचा अडसर आला. त्यामुळे केवळ हातवारे करून मूक संमती दिली गेली. या पाहुण्यांचे स्वागतही केवळ हसूनच करण्यात आले. आठ नोव्हेंबरला मेहंदी, नऊ नोव्हेंबरला हळद, असे भारतीय संस्कृती प्रमाणे सोपस्कार पार पडले. हा भारतीय लग्नाचा सोहळा स्पेनच्या लोकांनी डोळ्यात साठवून ठेवला. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातावर मेहंदी, भाळी मळवट, संगीतमय मंगलाष्टका, अशा कार्यक्रमाने ते भाराहून गेले.

स्पेनच्या महिलांना खास करून भारतीय साडी देण्यात आली होती, नेहमी ड्रेसवर मिरवणाऱ्या स्पेनच्या महिला यावेळी भारतीय पोशाखात शोभून दिसत होत्या. काही शिराळावासियांना शेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

वधू नागोरीचे वडील लुईस चवारी आणि आई जुलिया चवारी यांनी मुलीने लग्नासाठी घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचे यावेळी अनेकांना सांगितले. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीची प्रशंसाही केली. जावई धनराजचे कुटुंबीय मुलीचा चांगला सांभाळ करतील, यावर आमचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. चार वर्षांपूर्वी धनराज गमे नोकरीनिमित्त इंग्लंडला गेला होता. त्यावेळी नागोरी स्पेनमधून इंग्लडला शिक्षणासाठी आली होती. तेथेच त्या दोघांची ओळख झाली. त्या नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एक वर्षांपूर्वी ते दोघेही कोकरूड येथे आले होते. त्यावेळी नागोरी हिचे आई-वडीलही बरोबर होते. भारतीय संस्कृतीनुसार लग्न करावे, असा त्यांचा निर्णय होता. त्यामुळे ते सर्व नातेवाईकांबरोबर कोकरूड येथे दाखल झाले. त्यांच्या बरोबर राचीओ, मारिसोल, आलबेरतो, रूबेन, रिकार्डो, एल्सा, नारिया, बेलेन, इराटी, जुलीया, सारा, मारिया आणि मार्कोस आदी मंडळीही शिराळ्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी बुधवारी मुंबईत सोडत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरसह राज्यातील २७ महापालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत मुंबई येथे बुध‌वारी (ता.१३) काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडती दरम्यान उपस्थित राहण्यासाठी सोमवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापतींना पत्र पाठवले आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर नवीन आरक्षण कोल्हापूर महापालिकेला लागू होणार आहे. सायंकाळी सहा वाजता मंत्रालयात सोडत होणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या सभागृहाचा कार्यकाल नोव्हेंबर २०२० मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर अस्तित्वात येणाऱ्या नवीन सभागृहासाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. २०१० पासून महापालिकेचे महापौरपद महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. २०१० मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण होते. त्यानंतर खुला, इतर मागासवर्ग पुन्हा खुला महिला प्रवर्ग असे, अडीच वर्षांसाठी आरक्षण निघाले. सलग दहा वर्षे महिला प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्याने या पदासाठी इच्छुक असलेल्या पुरुष प्रवर्गातील नगरसेवकांमध्ये निराशा होती.

पुढील सभागृहासाठी आरक्षण सोडत निघण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्याने महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. नवीन सभागृहासाठी होणारी निवडणूक पॅनेल पद्धतीने होणार आहे. महापौरपद सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यास निवडणुकीमध्ये अधिक रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत फलकप्रकरणी गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने सोमवारी ठिकठिकाणी अतिक्रमण कारवाई अनधिकृत फलक हटवण्यात आले. लविरसन सोलर वॉटर हिटर, कायन स्कूल, जोग ज्वेलर्स यांच्यावर विनापरवाना फलक लावल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

मुख्य चौक व वाहतुकीला अडथळा ठरणारे फलक हटवण्यास सोमवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने सुरुवात केली. हुतात्मा पार्क, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, कावळा नाका, टेंबलाई उड्डाण पूल, शिवाजी विद्यापीठ व सायबर चौकात कारवाई केली. यावेळी दहा स्टँड बोर्ड, दोन डिजिटल बोर्ड, तीन डिजिटल कमान व ३३ छोटे जाहिरात फलक पथकाने जप्त केले. विनापरवाना फलक लावल्याबद्दल तीन फर्मवर गुन्हा दाखल केला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार त्यांच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये अतिक्रमण विभागाचे १८ कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषण करणाऱ्या १९ दुचाकींवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात वायू आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या, विमा संपलेल्या यामाहा कंपनीच्या १९ दुचाकींवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सोमवारी कारवाई केली. शहरातील विविध चौकात वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली.

ज्या वाहनधारकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही, अशा वाहनधारकांवर पुढील कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी नियमित होत राहील, त्यामुळे वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेऊन इतर बाबी पूर्ण ठेवाव्यात, अन्यथा मोटार वाहन कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्चात बचत करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत किती वसुली झाली. उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी वसुलीचे नियोजन करताना अनावश्यक खर्च टाळून उत्पन्नात भर घाला,' असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व विभागप्रमुखांना केले. सोमवारी वसुलीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रथम आयुक्तांनी विभागनिहाय वसुलीचा आढावा घेताना आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर समाधानकारक वसुली आहे का? अशी विचारणा करताना ते म्हणाले, 'उत्पन्नवाढीवर भर देत वसुली मोहीम तीव्र करा. वसुलीचे नियोजन करताना अनावश्यक खर्च टाळल्यानंतर विकासकामाना निधी मिळेल.' त्यानंतर त्यांनी जलदगतीने व पारदर्शकपणे परवाने देण्यासाठी १५ दिवसांत ऑनलाइनद्वारे परवाने देण्याचे आदेश दिले.

नगररचना विभागातील प्रलंबित फायलींचा निपटारा करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा विशेष कँप घेतला आहे. शनिवारी (ता.२३) पुन्हा नगररचा विभागाला कँप घेण्याचे आदेश दिले. तसेच शहरात सुरू करण्यात येत असलेल्या रस्त्यांचा दर्जा व गुणवत्तेबाबत पाहणी करण्याचे निर्देश उपशहरअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना आयुक्तांनी दिले.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, उपशहर नगररचनाकार नारायण भोसले, परवाना अधीक्षक राम काटकर, इस्टेट अधीक्षक प्रमोद बराले, अतिक्रमण विभागप्रमुख पंडितराव चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युतपुरवठ्याअभावी पाणीपुरवठा बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा आणि आपटेनगर येथील पाणी पुरवठा करणाऱ्या केंद्रावरील विद्युतपुरवठा खंडीत झाला. खंडीत विद्युतपुरवठ्यामुळे पाणी उपसा होऊ न शकल्याने शहराच्या सी, डी, व ई वॉर्डामध्ये सोमवारी पाणीपुरवठा ठप्प होता. सायंकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण झाल्याने मंगळवारपासून पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

बालिंगा पंपिंग स्टेशन येथील एमएसईबीचे जम्प व इन्स्लेटर केंद्र आहे. केंद्रामध्ये रविवारी रात्री बिघाड झाला. त्यामुळे बालिंगा पंपिंग स्टेशनवर अवलंबून असलेल्या सी, डी, व ई वॉर्डातील काही भागाना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सकाळी हाती घेतलेले दुरुस्तीचे काम दुपारी तीन वाजता संपले. तसेच आपटेनगर येथील ट्रान्स्फार्मरमध्येही बिघाड झाला होता. ट्रान्स्फार्मरमधील बिघाड काढण्यास यश आले असले, तरी दुरुस्तीमुळे दिवसभर पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सोमवारी सायंकाळी दोन्ही ठिकाणची दुरुस्ती पूर्ण झाली. मंगळवारी पहाटेपासून पाणी उपसा सुरू झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समितीच्या शिफारसी बेदखल

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळणे आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी सरकारने बेदखल केल्या आहेत. त्यांनी सुचविलेल्या उपाययोजना कागदावरच राहिल्याने वन्य प्राण्यांचा उपद्रव सुरू आहे. पावसाळा संपल्याने प्रतिवर्षीप्रमाणे आता आजरा, चंदगड तालुक्यात हत्तीचा कळप दाखल झाला आहे. अतिवृष्टी, अवकाळीच्या पावसात बचावलेल्या डोंगरालगतच्या पिकांत हत्ती, रानडुक्कर, गव्यांचे नुकसानसत्र सुरू आहे.

जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र सात हजार ६८५ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १३३४.२२ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र प्रामुख्याने चंदगड, आजरा, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, गारगोटी, पाटणे परिसरात आहेत. तेथील वन क्षेत्रात गवे, हत्ती, बिबट्या, रानडुक्कर, सांबर, भेकर, मोर अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. मुबलक खाद्य आणि पाणीसाठ्यामुळे गेल्या दशकभरात हत्तीच्या कळपाचा संचार वाढला आहे. पावसाचे दिवस संपल्याने कर्नाटक, दांडेली, तळकोकणातून हत्ती जिल्ह्यात आले आहेत. सन २०१६ पासूनच्या त्यांच्या उपद्रवामुळे १२ हजार, ८२१ शेतकऱ्यांचे विविध पिकांचे नुकसान झाले आहे. हत्तीच्या हल्यात आठ व्यक्ती, १३२ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला असून ३५ जण जायबंदी झाले आहेत. जखमींचा आकडा प्रत्येक वर्षी वाढतोच आहे. यामुळे जंगलाशेजारील शेती संकटात आली आहे.

दिवसेंदिवस जंगले विरळ होणे, मानवी वस्तीचे आक्रमण वाढणे, पाण्याचे स्रोत आटणे अशा विविध कारणांमुळे हत्तीसह सर्वच जंगली प्राणी मानवी वस्तीजवळ आणि शेत पिकांत येत आहेत. वनविभागाकडील त्रोटक यंत्रणेच्या सहाय्याने त्यांचा बंदोबस्त करणे अशक्य झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करणे आणि तुटपुंजी मदत मिळवून देणे, त्यांच्यावर नजर ठेवून राहणे इतकेच काम वन प्रशासन करते आहे. यापलिकडे जाऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे, त्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाय योजना सूचवण्यासाठी १९ मार्च, २०१८ रोजी सरकारने पाच सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. त्यामध्ये वन्यप्राणीप्रवण अशा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा सामावेश होता.

समितीने ७ जुलै, २०१८ रोजी सरकारकडे शिफारसी दिल्या. यावर २८ नोव्हेंबर, २०१८ रोजी वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत समितीने सूचवलेल्या उपाय योजना, शिफारसीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या पातळीवर प्रचंड उदासीन चित्र राहिले. समितीच्या उपाय योजना बेदखल झाल्या. वन्यप्राण्यांकडून नुकसानीचे सूत्रच सुरू आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुका झाल्या. समितीमधील एक सदस्य कुपेकर आत्ता आमदार नाहीत त्यामुळे त्यांना पाठपुरावा करण्यात मर्यादा येत आहेत. आबिटकर पुन्हा निवडून आले असून त्यांनी ठोस पाठपुरावा करण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या शिफारसी

गस्त ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे

हत्ती गस्ती शिबिर आयोजित करणे

आवश्यक वाहनांचा पुरवठा करणे

हत्ती प्रतिबंधक चर खोदणे

सौर कुंपन तयार करणे

ट्रिपल अलार्म, हरित अडथळे

जनजागृती करणे

ड्रोनद्वारे हत्तीवर नियंत्रण ठेवणे

ऊस, भाजीपाला, फळबागच्या नुकसानभरपाईची रक्कम वाढवणे

नारळाच्या झाडावर गिधाडाच्या घरट्याने नुकसान झाल्यास भरपाई

पशूधनाचा मृत्यू, जखमी झाल्यास भरपाईची रक्कम वाढवणे

लाभार्थीकडून घेण्यात येणाऱ्या कागदपत्रात सुधारणा करणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा नदीत अनोळखी मृतदेह

0
0

कोल्हापूर : पंचगंगा नदीत वडणगे (ता. करवीर) गावच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत व्यक्तीचे वय ४५ असून उंची पाच फूट तीन असल्याची माहिती दिली आहे. अंगाने निमगोरा असून अंगात पिवळ्या-निळ्या रंगाचा चौकडा हाफ शर्ट, निळ्या रंगाची पँट, निळ्या रंगाची निकर आहे. पोलिस मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसहा लाखांचा मद्यसाठा जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील घरपण फाटा येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक पकडून सुमारे साडेदहा लाख किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. पोलिसांनी ट्रक चालक काशीराम चंद्रकांत आंगणे (वय ३४, रा. पोईप, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याला अटक केली.

कोल्हापूर विभागाचे उपआयुक्त यशवंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक आणि मद्यसाठा असा सुमारे २२ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैद्य मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एस. एस. साळवे, कुमार कोळी, जवान सुहास वरुटे, जयसिंग खुटावळे, सुखदेव सिद, योगेश शेलार, मोहन पाटील, नितीन ढेरे यांनी सोमवारी गगनबावडा रस्त्यावर सापळा रचला. घरपण (ता. पन्हाळा) गावच्या हद्दीत अवैध मद्याची वाहतूक करीत असताना ट्रक (एम. एच. ०७ एजे-११६३) मिळून आला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता १९२० सिलबंद प्लास्टिक बाटल्या, १६५ बिअरचे बॉक्स असा सुमारे साडेदहा लाख किंमतीचा मद्यसाठा मिळून आला. पोलिसांनी मद्यसाठा आणि ट्रकही जप्त केला. हे मद्य गोव्याहून आणले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपना बँकेतून डिव्हीआरची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टिंबर मार्केट येथील अपना बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्याने डीव्हीआर आणि सीपीयू चोरून नेला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बँकेचे किशोर रसाळ (वय ३६, रा. राजारामपुरी सहावी गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्याने बँकेच्या टेरेसवरील दरवाज्याचा कडी कोयंडा उचकटून बँकेत प्रवेश केला. चोरट्यांनी डीव्हीआर, सीपीयू चोरून नेला. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता चोरीची घटना उघडकीस आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वार्षिक अहवाल

0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा एकत्रित वार्षिक प्रशासन अहवाल तयार झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ११ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेने त्याला मंजुरी दिली. जि. प. प्रशासनाने यासंदर्भातील अधिसूचना काढत अहवाल प्रसिद्ध करत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या नियम १९६४ मधील नियम ९ अन्वये, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images