Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हत्तींचा कळप आजऱ्याजवळ

$
0
0
आजरा तालुक्यात शेतीचे नुकसान केल्यानंतर हत्तींचा कळप आता आजऱ्याजवळ पोहोचला आहे. गावाजवळून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी बागेतील केळी, नारळाच्या झाडांवर ताव मारून हत्तींनी सोमवारी रात्री प्रचंड नुकसान केले.

पर्यायांचा धांडोळा

$
0
0
टोल रद्द करण्याची घोषणा होऊन तीन दिवस झाल्यानंतरही आयआरबीला द्यायची रक्कम कशी उभारण्यासाठी नेमका पर्याय महापालिकेला सापडलेला नाही. विविध पर्यायांवर चर्चाच सुरू आहे.

‘एसटीपी’ मुदतवाढीच्या चक्रात

$
0
0
पंचगंगा प्रदूषणाचा मोठा भार दूर करण्यासाठी महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) मुदतवाढीचा भार वाढतच चालला आहे. टेंडरनुसार काम पूर्ण करण्याची मुदत वर्षभरापूर्वी संपल्याने आतापर्यंत चारवेळा मुदतवाढ दिली आहे.

‘रिडालोस’ लवकरच विसर्जित

$
0
0
गेल्या विधानसभा निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यानंतर विसर्जित झालेल्या ’रिपब्लिकन डावी लोकशाही समिती’च्या (रिडालोस) पार्श्वभूमीवर आता राज्यातील काही डाव्या पक्षांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोतवाल होण्यासाठी हाताला बँडेज

$
0
0
नुकत्याच झालेल्या कोतवाल परीक्षेवेळी खडकेवाडा येथील महिलेने हाताला बँडेज बांधून लेखणीक घेतल्याच तक्रार करण्यात आली आहे. खडकेवाडा (ता. कागल) येथील महिला उमेदवाराविरुद्ध रविवारी गावातील उमेदवार व ग्रामस्थांनी प्रांताधिकारी मोनिका सिंह यांच्याकडे तक्रार केली.

हत्तींचा कळप आजऱ्यात

$
0
0
सोमवारी सायंकाळपासून आजरा गावापासून हाकेच्या अंतरावरील कर्पेवाडीतील सरकारी बागेतील केळी, नारळाच्या झाडांवर हत्तींनी ताव मारून प्रचंड नुकसान केले. आजरा गावालगत हत्ती आल्याने नागरिकांत प्रचंड भीती निर्माण झाली आहे. काल (ता. १३) सायंकाळपासून आज सकाळपर्यंत हत्तींनी आपला मुक्काम या बागेमध्येच केला होता.

तटकरेंची 'मावळ'साठी ना ना!

$
0
0
मावळमधून स्थानिक उमेदवार द्यावा असे नमूद करताना रायगड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास मी लोकसभा निवडणुक लढण्यास तयार आहे, असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

विठ्ठलाची बडव्यांपासून सुटका!

$
0
0
बडवे आणि उत्पात यांच्या कचाट्यातून अखेर पंढरीचा विठ्ठल आणि रखूमाई 'मुक्त' झाले आहेत. पंढरपूर मंदिरात बडवे आणि उत्पातांना असेलेले सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे संपले आहेत. त्यांना या मंदिरात आता पुजेचाही मान मिळणार नाही.

पोलिसप्रमुखांचे जुने कार्यालय अडगळीत

$
0
0
पोलिस मुख्यालयाची नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर पोलिस अधिक्षकांच्या जुन्या कार्यालयाची सर्व सोयींनीयुक्त इमारत अडगळीत पडली आहे. एकीकडे पोलिस खात्यातील अन्य कार्यालये शहरात ठिकठिकाणी विस्कळीत अवस्थेत असताना या कार्यालयाचा वापर योग्य पध्दतीने व्हावा यासाठी पोलिस खात्याकडून कोणतेच प्रयत्न केले गेलेले नाहीत.

सेट परीक्षेच्या उत्तरसूचीची प्रतीक्षा

$
0
0
विद्यापीठ किंवा महाविद्यालय स्तरावर प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता म्हणून राज्यस्तरावर सेट तर देशपातळीवर नेट परीक्षा घेतली जाते. मात्र, गेल्या काही वर्षात या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रक, गुणपडताळणी आणि निकालाबाबत अनेक वाद निर्माण झाले आहेत.

रेल्वे स्थानकाचा विकास करा

$
0
0
राजर्षी शाहू महाराज टर्मिनसच्या प्रलंबित मागण्यांची दखल रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी घ्यावी. अधिकाऱ्यांचे केवळ दौरे होतात, प्रत्यक्षात कोल्हापूरला काहीच मिळत नाही, केवळ आतापर्यंत आश्वासनाचा धूर निघाला आहे.

टोलचा बोजा सरकारने सोसावा

$
0
0
शहरातील टोलचा प्रश्न सुटला आहे असे म्हटले जात आहे. मात्र, टोलचे पैसे नेमके कोणी भरायचे हाच आता खरा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सर्व औद्योगिक संघटनांनी एकत्रित येऊन या टोलचा बोजा महापालिकेवर न टाकता राज्यसरकारने आपल्यावर घ्यावा अशी मागणी केली आहे.

मागण्यांची अंमलबजावणी हवी

$
0
0
अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या उदरनिर्वाहाबद्दल, पेन्शसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. ही योजना जाहीर झाली. मात्र, आर्थिक तरतुदीअभावी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

बुद्धिबळाने बुद्धीला चालनाच...

$
0
0
आपल्यापैकी किती जणांना बुद्धिबळाचे ज्ञान आहे? किती जणांना ‘बुद्धिबळ’ कसे खेळावे याची प्राथमिक माहिती आहे? मला खरोखर, अगदी मनापासून वाटते की, प्रत्येकाला बुद्धिबळाचे प्राथमिक ज्ञान तरी असलेच पाहिजे.

शारीरिक शिक्षणाचा तास ‘ऑफ’

$
0
0
विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, कुशाग्र बुद्धिमत्तेबरोबरच मन आणि मनगट मजबूत राहावे यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास अनिवार्य केला आहे.

रेल्वे स्टेशनवर होणार ‘फूड प्लाझा’

$
0
0
प्रवाशांना चहा, नाष्टा आणि जेवणाची डे-नाइट सुविधा उपलब्ध होण्यासाठी राजर्षी शाहू टर्मिनसवर लवकरच फूड प्लाझाची सुरुवात होणार आहे. स्टेशन व्यवस्थापकांच्या केबीनजवळील सुमारे पाचशे चौरस फूट जागेत या मॉलची सुरुवात मार्चमध्ये होणार आहे.

समाजातील या आनंदवाटा

$
0
0
सामाजिक बांधिलकी जपत अनेक संस्था, व्यक्ती, मंडळे विविध उपक्रम राबवत असतात. गाजावाजा न करता विना मोबदला त्यांचे काम ‘आम्ही सेवेकरी’ या भावनेतून अव्याहतपणे सुरु असते.

‘कनवा’ बांधकाम परवानगी रद्द, मात्र आदेश नाहीत

$
0
0
करवीर नगर वाचन मंदिरचा प्रिन्स शिवाजी हॉल पाडून तिथे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी घेतलेल्या वादग्रस्त बांधकाम परवानगीबाबत बुधवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी संस्थेचे व ​स्थानिक कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले.

अनुदानावरील करातून पाकीटमारी

$
0
0
अनुदानाचे पैसे थेट ग्राहकाच्या हातात पडावेत या चांगल्या उद्देशाने गॅस सिलिंडरबाबत सुरू झालेली थेट अनुदान योजना जनतेच्या दृष्टीने गैरसोयीची बनत चालली आहे. कारण बँकेत जमा होणारी रक्कम काढण्यासाठी अर्धा दिवस घालवूनही अनुदानाच्या सिलिंडरसाठी जादा पैसे मोजावे लागतात. कारण एलबीटी, व्हॅट आणि टोल असे सगळे टॅक्स सरकारने अनुदानाच्या रकमेला लावले आहेत.

निपाणीच्या बाजारात कलिंगडाची आवक

$
0
0
ऐन थंडीतच निपाणीत यावर्षी मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक झाली आहे. त्याला ४० ते ५० रुपये प्रतिनग दर मिळत असल्याने उत्पादकांसह ग्राहकही सुखावला आहे. मागील वर्षी या काळात अवकाळी पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images