Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रस्ते सुरक्षिततेसाठी ओमकारचा ध्यास

$
0
0

लोगो : युवामुद्रा

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : देशात दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्याने किंवा त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अपघात घडतात. त्याच अनुषंगाने रस्ते सुरक्षितता व वाहतूक नियमावलीबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने कोल्हापूरचा बाइक रायडर ओमकार बुधले याने २७ दिवसांत ३ देशांमध्ये १२ हजार १५४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत रस्ते सुरक्षिततेचा संदेश पोहचविण्याची धडपड केली आहे.

अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित असलेल्या ओमकार बुधले याला दुचाकीवरून भ्रमंती करण्याची आवड आहे. वाढते रस्ते अपघात पाहता स्वतःच्या दुचाकीवरून भारतासह, भूतान, नेपाळमध्ये बाइकवरून जाऊन जनजागृतीचा निर्णय त्याने घेतला. १२ सप्टेंबरला त्याने कोल्हापुरातून प्रवासाला सुरुवात केली. वडोदरा येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन पुढे जात त्याने जगातील सर्वात उंच रस्ता असलेल्या खारदोंगला पासवरून जाण्याचा अनुभव घेतला. प्रवासात त्याने जयपूर, चंदिगड, मनाली, लेह आदी ठिकाणी स्थानिकांशी संवाद साधत वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. सुनोली बॉर्डर, पोखरा, काठमांडूत त्याचे स्थानिक बायकर्सनी जल्लोषी स्वागत केले. इठोरी, गंगटोक, भूतान प्रवासात त्याला स्थानिक संस्कृतीची ओळख झाली. त्याला प्रवासात पाऊस, ऊन आणि थंडी अशा वातावरणाचा सामना करावा लागला.

परतीचा प्रवास त्याने शेलेला पास, सिलीगुडीमार्गे कोलकाता असा केला. त्यानंतर विशाखापट्टणम, चेन्नई, कन्याकुमारी असा प्रवास करीत तो कोल्हापुरात आला. त्याने केलेला सर्वाधिक कमी वेळेत आणि लांब पल्ल्याचा प्रवास असून याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बूक ऑफ रेकॉर्डसाठी व्हावी यासाठी त्याचा प्रयत्न सुरू आहे.

ओमकार आर. के. नगर परिसरात कुटुंबीयांसमवेत राहतो. बुधले परिवाराच्या पिढीजात व्यवसायात हातभार लावतो. कंपनीत मार्केटिंग टेंडर डेव्हलपमेंटची जबाबदारी त्याच्याकडे आहे. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण पाचगणीतील बिलीमोरिया हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने कोटा (राजस्थान) येथे शिक्षण घेतले. नंतर कोल्हापुरातील न्यू पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

दहा देश फिरण्याचा संकल्प

ओमकारने २०२० मध्ये बाइकवरून ४५ दिवसांत १० देशांची भ्रमंती करण्याचा संकल्प केला आहे. या प्रवासात तो १६ हजार किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. कोल्हापूर ते सिंगापूरमार्गे हा प्रवास होणार आहे.

कोट

रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळावेत. महागड्या दुचाकी घेताना त्यासोबत हेल्मेट जरूर घ्यावे, त्याचा वापर रोज करा. हेल्मेट व सीटबेल्ट लावून वाहन चालवावे. कुटुंबाला आपली गरज आहे या भावनेतून नियम पाळल्यास रस्ते अपघात काही प्रमाणात रोखता येतील.

- ओमकार बुधले, बाइक रायडर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोंडचा घास हिरावला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

परतीच्या पावसाने घातलेल्या थैमानामुळे राधानगरी तालुक्यात खरीप पिकांना जबरदस्त फटका बसला असून उभी पिके आडवी झाली आहेत. ठिकठिकाणी भात शेतीची पावसामुळे दैनाच झाल्याने हातातोंडाशी आलेला पिकांचा घास हिरावला आहे. पेरणीसाठी उसनवारी करून घेतलेल्या बी बियाण्यांचे पैसेही या परतीच्या पावसामुळे निघणे मुश्किल झाले.

अनेक ठिकाणी खरीपाचे भात व भुईमूग पीक कुजून जात आहे. प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी दुबार संकटाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकसान ग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

प्रतिवर्षीच्या सरासरी इतका पाऊस पडणार की नाही याविषयी तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात अति अतिवृष्टी झाली. सर्वच नद्यांना महापूर आला. नदीकाठची ऊस आणि भात शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. चांगले आलेले भात पीक महापुराच्या पाण्यात कुजून गेले. तर नदीपासून दूर असलेल्या शेतीत आणि पठारी भागात असलेली खरिपाची भात पिके भरघोस आली होती. भाताचे पीक उत्पादन पठारी भागात चांगले मिळणार अशी स्थिती असताना पुन्हा निसर्ग कोपला सलग आठवडाभर पावसाने थैमान घातल्याने हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे जमिनीवर पडले. वाफ्यांत पाणी साचल्याने भाताला कोंब फुटू लागले आहेत. नागली पीक काळपट पडत आहे. भात पिकाची मळणी केल्यानंतर मिळणारे पिंजर पाण्यात कुजू लागल्याने वैराणीचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत.

भात झाले 'जरायुज'

वृक्षावरच असताना फळाच्या बियांना कोंब फुटतात आणि नवीन रोप झाडाखाली पडते, विकसित होण्यास सुरुवात होते त्यांना जरायुज वनस्पती म्हणतात. अशा वनस्पती समुद्र किनारी खारफुटी जंगलात असतात. त्यांच्या बिया झाडावरच फळ असताना उगवतात. अशी अवस्था भात आणि भुईमूग पिकांची अनेक ठिकाणी राधानगरी तालुक्यात झाली आहे. यामुळे मिळणारे उत्पादन उणे असते.

पेरणीसाठी लागणारी बी बियाणे विकत घेण्यासाठी तसेच शेतीसाठी शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्या, जिल्हा बँकांमधून कर्ज काढले आहे. मात्र आता भात व खरीप शेतीच उद्ध्वस्त झाल्याने कर्जाचे पैसे फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासकीय यंत्रणेमार्फत पंचनामे करून मदत मिळावी.

जनार्दन पाटील ,शेतकरी परिते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रोटोकॉलच्या नावाने डल्ला

$
0
0

मालिका भाग ३

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

महसूल विभागात तलाठी, सर्कल, तहसीलदार आणि प्रांत कार्यालयातील काहीजण वरिष्ठांच्या प्रोटोकॉलसाठी खर्च करावा लागतो, असे सांगून पैसे उकळतात. ते प्रोटोकॉलवर झालेल्या खर्चाच्या आठ ते दहापट पैशावर डल्ला मारतात, अशी कार्यालयातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांत नेहमी चर्चा असते. प्रोटोकॉलच्या नावाने अर्थपूर्ण व्यवहारांना संधी मिळत असल्याने शहराजवळील तलाठी, सर्कलपदावरील निवडीसाठी प्रचंड स्पर्धा लागलेली असते. यातील अनेक व्यवहार 'हवाला' असल्याने कोणाकडून किती पैसे घेतले, खर्च किती केले आणि स्वत:कडे किती राहिले, याचा हिशेब मागण्याचे धाडस कुणीही करीत नाहीत. असे लुबाडण्याचे रॅकेट मोडून काढण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई टप्प्याटप्प्याने कडक भूमिका घेत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या आकडेवारीनुसार अलिकडच्या काही वर्षात महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर राहिला. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी देसाई यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर घेतली. मात्र लोकसभा, विधानसभा निवडणूक प्रक्रियेमुळे प्रांत आणि तालुका पातळीवर त्यांना बारीक लक्ष घालण्यास वेळ मिळाला नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्याशी संबंधित विभागात पारदर्शकता आणण्यासाठी ते विविध उपक्रम राबवत आहेत. त्याचे सकारात्मक बदल दिसत आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेताच माझ्या प्रोटोकॉलच्या नावे कुणी चुकीचा, गैरप्रकार गेल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा कडक इशारा कनिष्ठांना दिला. अशीच कडक भूमिका सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदारांनी घेतल्यास प्रोटोकॉलच्या नावाने डल्ला मारण्याचे मार्ग बंद होणार आहेत.

....

ऑनलाइन लाभातूनही

पैसे वसुलीचा फंडा

महापुरामुळे नुकसान झालेल्यांच्या बँक खात्यावर थेट भरपाईची रक्कम जमा होत आहे. यामुळे पारंपरिक पैसे वसुलीला ब्रेक लागला आहे. यामुळे लाचखोरीला चटावलेले तलाठी, सर्कल आणि तहसीलदार, प्रांत कार्यालयातील काहीजणांनी पळवाट शोधली आहे. नुकसानग्रस्त, लाभार्थीच्या लाभासाठीचा अर्ज भरतानाच त्रुटी ठेवायच्या आणि दुरूस्तीसाठी संबंधित आल्यानंतर कोतवालातर्फे तलाठी पैसे वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. लाभाच्या रक्कमेवरून ५०० रूपयांपेक्षा अधिक पैसे गोळा केले जात आहे. अशाप्रकारे पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला मारण्याचे प्रमाण शिरोळ तालुक्यात अलिकडे वाढले आहे. इतर तालुक्यातही कमी अधिक प्रमाणत अशा तक्रारी आहेत.

....

गुंठ्याला १५० रूपये

सरकारच्या आदेशानुसार वर्ग दोनच्या जमिनीची खरेदी विक्री, फेरफार होऊ शकते. यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी देताना परवान्याच्या प्रस्तावाची फाईल तयार करणारा लिपिक हा साहेबांना द्यावे लागते, असे सांगून गुंठ्याला १५० रूपयांची लाच मागत असल्याच्याही तक्रारी आहेत. तहसीलदारांचा परवाना मिळाल्याशिवाय वर्ग दोनच्या जमिनीचा व्यवहार, फेरफार होत नसल्याने सामान्य शेतकऱ्यांना मागेल तितके पैसे द्यावे लागत असल्याचे चित्र आहे.

...

मटा भूमिका

लाच मागणाऱ्यांविरोधात

तक्रार देण्यास पुढे यावे

महसूल विभागासह सर्वच सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार वाढत आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशा सार्वत्रिक तक्रारी आहेत. मात्र केवळ तक्रारी करून न थांबता लाच मागणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाकडे पकडून देण्याचे धाडस दाखवण्याची गरज ठळक बनली आहे. अशा तक्रारींचे प्रमाण वाढल्यास लाचखोरीला काही प्रमाणात का असेना चाप बसणार आहे. अशा तक्रारी वाढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागानेही केवळ टोल फ्री क्रमांक देणे, सरकारी कार्यालयात फलक लावणे यावरच न थांबता गावागावात जाऊन व्यापक प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर सरकारी शुल्कचे दरपत्रक दर्शनी भागात लावले पाहिजे. असे फलक न लावणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सामाजिक संस्था, संघटनांनी आवाज उठवण्याची गरज आहे.

..........

कोट

'लाचखोर तलाठी, सर्कल आणि 'महसूल'मधील इतर कर्मचाऱ्यांनी पैसे गोळा करण्याचे विविध मार्ग शोधले आहेत. मंत्री आणि 'साहेबां'च्या प्रोटोकॉलचे नाव सांगून कामासाठी येणाऱ्यांकडून लाच म्हणून पैसे गोळा केले जातात.

अभिजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते

...........

समाप्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेल्या विकासाला चालना देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्याचा विकास रखडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पश्चिम महाराष्ट्राचा दुस्वास केला. सगळा निधी विदर्भाकडे वळविला. भाजपने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांना निधी पुरवला नाही. जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाला चालना प्रयत्नशील राहू. सर्वजण एकत्रितपणे काम करत जिल्हातंर्गत राजकीय संघर्ष संपविण्याचा प्रयत्न करु,'अशी ग्वाही कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

आमदार मुश्रीफ यांनी मंगळवारी, 'महाराष्ट्र टाइम्स' च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. जिल्ह्यात भाजपविरोधी वातावरण होते, दोन्ही काँग्रेसचे मिळून आठ आमदार निवडून येणार हे आपण दोन वर्षांपूर्वी जाहीर केले होते याची आठवणही त्यांनी करुन दिली. मुश्रीफ म्हणाले, 'आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना चालना देणे हा आपला अजेंडा आहे. आंबेओहोळ व नागनवाडी प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण केले जातील. कागल औद्योगिक वसाहत, गडहिंग्लज औद्योगिक वसाहतीला आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या कंपन्या, संस्था दाखल व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील राहू.'

मुश्रीफ पुढे म्हणाले, 'कोल्हापुरात आयटी पार्क विकसित झाला तर विकासाचे नवे पर्व सुरू होईल. सरकारकडे पाठपुरावा करुन आयटी पार्कसाठी आवश्यक सुविधा दिल्या जातील. आघाडी सरकारच्या कालावधीत कोल्हापूर शहरासाठी १२०० कोटी रुपयांहून अधिक निधी दिला. थेट पाइलाइन योजना, केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण, जिल्हा कोर्टाची इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाचा कायापालट केला. थेट पाइपलाइन योजना शहराच्या जिव्हाळयाचा विषय आहे. पाइपलाइन योजनेचे काम रखडणार नाही यासाठी येत्या आठवडाभरात बैठक घेऊन आढावा घेऊ. स्मार्ट सिटी बनण्याची कोल्हापूरची क्षमता आहे. या शहरात अधिकाधिक सोयी सुविधा निर्माण करुन शहर स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे.' याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, प्रविण भोसले, गणपतराव फराकटे, मधुकर जांभळे आदी उपस्थित होते.

.....

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी

विधीमंडळात आवाज

मुश्रीफ म्हणाले, 'महापुरामुळे जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टी आणि पुरामुळे पिके कुजून गेली. घरांची पडझड झाली. शिवाय परतीच्या पावसाचा फटकाही बसला. शेतकरी व पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी विधीमंडळात आवाज उठवू. सरकारला शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यास भाग पाडू.'

....

संस्थात्मक राजकारणात

विनय कोरे आमच्यासोबत

मुश्रीफ म्हणाले, 'जिल्ह्यातील संस्थात्मक राजकारणात जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व आमदार विनय कोरे हे आमच्यासोबत राहतील. गोकुळ, बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँकेत आम्ही एकत्रच आहोत. पुढील काळातही आम्ही एकत्रितपणे काम करु. काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील आणि मी जिल्ह्याच्या राजकारणात एकत्रित काम करणार आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा घाला, उत्पादन घटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

ऐन सुगीच्या हंगामात पावसाने झोडपल्याने सर्वच पिकांचे उत्पादन कमालीचे घटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्याचे आयुष्यच उद्ध्वस्त होणार आहे. खरिपातील भात, सोयाबीन, भुईमूग, मिरची आणि ऊसपिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतातील दलदलींमुळे आगामी रब्बी हंगामावरही परिणाम होणार आहे.

तब्बल पंधरवड्यातून अधिक काळ अवकाळी पावसाने येथे धुमाकूळ घातला. थांबण्याचे नावच न घेणाऱ्या परतीच्या पावसाचा फटका संपूर्ण तालुक्यालाच बसला आहे. त्यातही विशेषतः उत्तूर विभागात आणि किणे-कोळीन्द्रे परिसरातील धूळवाफ पेरणी केलेल्या भाताच्या काढणी-मळणीला मोठ्या प्रमाणात दणका बसला आहे. पश्चिम भागातील जास्त दिवसांची घनसाळ सारखी गरव्या जातीच्या भातावाणांना तेवढा हा पाऊस उपकारक ठरल्याचे चित्र आहे. मात्र येथेही पावसाने झोडपून काढल्यामुळे अनेक ठिकाणी भातपिक शेतात आडवे पडले आहे.

कापणीला आलेल्या पिकांच्या शेतीवाडीत पाणी साचून राहिले. परिणामी लोंबांसह भात पीक पडल्याने निम्म्याच्या वर लोंबे झडून गेली. केवळ भात पीकच नव्हे, तर भुईमुगाच्या शेंगांना कोंभ फुटले आहेत. ज्वारी आणि नागलीची कणसे काळवंडली आहेत. मिरची आणि बंधावरच्या वरणासारख्या वेलीही कुजण्याचे प्रमाण मोठे आहे. मोठ्या प्रमाणात भात खाचरात पाणी साचून राहिल्याने कापणी अडचणीची बनली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

परतीच्या पावसाने भुदरगड तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भात कापणी हंगामातच पाऊस सुरू झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. अचानक झालेल्या पावसाने बळीराजा मात्र चिंतेत सापडला असून भात पीक कापणी, मळणीच्या सुगीतच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाच्या माऱ्याने भात पिक भुईसपाट होऊन कष्टानं पिकवलेले पीक वाया जाण्याची वेळ आली असून गवताच्या गंज्या भिजल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही उद्यापासून (बुधवार) सुरू करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंगळवारी गारगोटी म्हसवे मार्गे कूर मार्गावरील परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता बहुतांश भागात भाताचे पीक आडवे पडल्याचे निदर्शनास आले. त्यापुढील दारवाड, निळपण परिसरात जनावरांसाठी साठवणूक केलेल्या गवताच्या गंज्यांत पावसाचे पाणी घुसल्याने जनावरांच्या चाऱ्याचीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातूनही हाताला मिळेत ते घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसते. तालुक्यातील ऊस, सोयाबीन, नाचणा, भुईमुगासह अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पिकांना कोंब फुटल्याचे दिसले. अतिवृष्टीतून वाचलेल्या डोंगर भागातील शेतीचे नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने नुकसान केले आहे. अजूनही काही ठिकाणी वाफ्यात साचलेले पाणी आजही असल्याचे दिसते. काढणीला आलेले भात पीक पूर्णतः कोलमडले आहे. यंदा डोंगरी भागातील पिके फुलली होती. पण पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसात पिके उद्ध्वस्त झालीच पण जनावरांसाठी ठेवलेल्या गवताच्या गंजीत पाणी घुसल्याने गवतही खराब झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वत्र पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू झाली असली तरी तालुक्यात मात्र उद्यापासून पंचनामे करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्ती पूर्ण, पाणीपुरवठा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर योजनेच्या चंबुखडी येथील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यास महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाला मंगळवारी मध्यरात्री यश आले. दुरुस्तीनंतर पहाटे पाणी उपसा करण्यात आला. दुरुस्तीअभावी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा न झालेल्या भागांना कळंबा व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून ३३ टँकर फेऱ्यांद्वारे पिण्याचे पाणी देण्यात आले.

चंबुखडी येथे ११०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली होती. गळती काढण्याच्या कामाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. दोन जेसीबी, पाणी उपसा करण्यासाठी मोटर, ब्रेकर आणि १५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुरुस्तीचे काम करण्यात आले. जलवाहिनीची खोदाई करुन त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले. सोमवार सकाळपासून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, कामाची पाहणी जलअभियंता सुरेश कुलकर्णी, उपजल अभियंता व्यंकट सुरवेश यांनी केली. शाखा अभियंता मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेण्यात आली. त्यानंतर पहाटे सहापासून नियमितपणे पाणी उपसा करण्यास सुरुवात झाली.

दुरुस्तीमुळे ए, बी, ई व संलग्न उपनगरांचा पाणीपुरवठा बंद होता. सोमवारी शहरवासियांना फारशी पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र सकाळच्या सत्रात पाणी न आल्याने त्यांना टँकरचा आधार घ्यावा लागला. कळंबा फिल्टर हाऊस येथून १८ टँकरच्या फेऱ्यांद्वारे संभाजीनगर, वारे वसाहत, राजेंद्रनगर, उद्यमनगर, राजेंद्रनगर येथे तर कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून १५ टँकर फेऱ्यांद्वारे राजारामपुरी, लोणार वसाहत व महापालिका चौक परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला. सायंकाळच्या सत्रात पाणी येणाऱ्या भागाला मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसासह अन्य पिकेही धोक्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

अतिवृष्टी मुळे हातकणंगले तालुक्यातील वारणा व पंचगंगा नदीकाठासह अनेक गावातील ऊस, सोयाबीन, भूईमूग आदी पिकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊन पिकांवर लोकरी मावा, तांबेरा या रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. महाभयंकर महापूर त्यानंतर अतिवृष्टीमुळे तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या उसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

सर्वात सधन तालुके म्हणून शिरोळ व हातकणंगले तालुका गणले जातात. वारणा आणि पंचगंगा या दोन्ही नद्या बारमाही वाहत असल्याने पिकांची स्थिती दर्जेदार व चांगली असते. कोठेही दुष्काळ सदृश्य स्थिती असली तरी तालुक्यातील काही गावांना फरक पडत नाही. दरम्यान गेल्या महिन्यांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने वारणा व पंचगंगा नदीला दोनवेळा महापूर आला तसेच वारणा नदीकाठावरील निलेवाडी, पारगाव, चावरे, भेंडवडे, भादोले, खोची, कुंभोज व पंचगंगा नदीकाठावरील रुकडी, माणगाव, रुई, इंगळी, पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, रांगोळी आदी गावातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या होत्या. त्यानंतर मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने नदीकाठावरील तसेच माळरानावरील सोयाबीन, भूईमूग, भात आदी पिके पाण्याखाली राहिल्याने कोंब येऊन कुजण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या ऊस सारख्या पिकांवर लोकरी मावा, तांबेरा या रोगांचा प्रादुर्भावाची शक्यता होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन घातलेला उत्पादन खर्च निघणे अवघड होणार आहे. सोयाबीन, भूईमूग, भात आदी पिकांचे कोंब फुटण्यास येत असताना या अतिवृष्टीने पिकांचे कुजले आहेत. यामुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असून सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

महापुरानंतर अतिवृष्टीने शेतकरी कोलमडून जाणार असून ऊसासह सोयाबीन, भूईमूग, भात, ताग आदी हातातोंडाशी आलेली पिके या अतिवृष्टीने वाया जाण्याची शक्यता आहे. उत्पादन खर्च देखील निघणे अवघड असल्याने सोसायटी, बँकांची कर्जे फेडणे कठीण जाणार आहे. याकडे सरकारने या अतिवृष्टीत बाधक शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

-शीतल घोरपडे, हुपरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

ऑगस्ट महिन्यात दोनदा आलेल्या महापुराच्या तडाख्यातून शेतकरी कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करतो तोच परतीच्या पावसामुळे हाताशी आलेली भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ज्वारी आदी खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाल्यामुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे. सरकारी पातळीवरून नुकसानभरपाई मिळण्यास कुचराई होत असल्याबद्दल शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे.

परतीच्या पावसामुळे काढणीयोग्य आलेले चांगले भात झडल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. या बदलत्या वातावरणामुळे भात पिकांवर काणी, काजळी व लोंब्या कुरतडणारी लष्करी अळी यासारख्या रोगांनी थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी भात पिके जमिनीबरोबर पडल्यामुळे भाताची धूळधाण उडाली आहे. भात कापणी करताना येणाऱ्या अवेळी पावसामुळे भात कापणे, झोडणे, भरणे, पिंजर वाळवणे आदी कामे आटोपताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचा वारंवार व्यत्यय येत असल्याने एका दिवसाच्या कापणीला चार दिवस घालावे लागत आहे तसेच त्याचा खर्चही वाढत आहे. परतीचा पाऊस आला की शिवारात सगळी शेतकऱ्यांची, मजुरांची पळापळ व धावाधाव सुरू होते.

नाचणीची उभी पिके पडल्यामुळे जमीन व ओलीचा संबंध आल्याने त्यांना आसवं फुटू लागले आहेत. पावसामुळे नाचणी, ज्वारी काळी पडू लागले आहेत. तसेच अनेक कणासांना अंकुर फुटू लागले आहेत. भात कापणीनंतर पूर्व हंगामी ऊस लागणीस सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसामुळे भातकापणीची कामे लांबणीवर जात आहेत. भात कापून झाले तरी पावसामुळे मशागत करता येत नाही. परिणामी पूर्व हंगामी ऊस लागण्याही खोळंबल्या आहेत.

राजकारणी खुर्चीत मश्गूल

महापुरात उसाचा पाला कुजला आणि आता परतीच्या पावसाने भाताचे पिंजरही भिजून कुजू लागले आहे. ही वैरण तरी वाचवावी म्हणून शेतकरी आटापिटा करत आहे. परतीच्या पावसाने शेतीचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अजून पंचनाम्याचा पत्ताच नाही अशी परिस्थिती आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी मश्गुल असलेल्या सरकारने पंचनाम्याची कामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊन आधार देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलमध्ये कागदोपत्री पंचनामे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

अवकाळी पावसामुळे कागल तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडला असून या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तालुक्याच्या कृषी विभागाकडे जरी केवळ सुमारे ५० एकरची नुकसानीची नोंद असली तरी प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा आहे. तालुक्यात सोयाबीन आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .कागल तालुक्यात केवळ १० गावांत नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडे नोंद आहे.

कागल तालुक्यात ११ गावांमध्ये २० हेक्टर म्हणजेच ५० एकर पिकांचे नुकसान झाल्याचे माहिती आहे. तमनाकवाडा, बेलेवाडी मासा, बाळेघोल, व्हन्नूर, कागल, बामणी, करंजीवणे, निढोरी, कुरणी, भडगाव आणि हळदी अशा गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात आता शेतामध्ये पाणी तुंबल्याने खरीप हंगामाला उशीर झालाच आहे, याशिवाय रब्बी हंगामही लांबला आहे.

आता शेतामध्ये पाणी तुंबल्याने भाताचे पिंजर कुजू लागले आहे. वारंवार पावसाने भिजल्याने पिंजोला कुबट वास येऊ लागला आहे. तीच अवस्था भाताची आहे. पावसामुळे हंगामाला उशीर होणार असून उसाला तुरे येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांनाही बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकन सेंटरचा कचरा जयंती नाल्यात

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

शहरातील चिकन सेंटर दुकानांतील कचरा थेट जयंती नाल्यात टाकला जात आहे. कोंबड्यांची पिसे, मांस, विष्ठा नाल्यात टाकली जात असून हा कचरा थेट पंचगंगा नदीत वाहत जात असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकीकडे महापालिकेचे आयुक्त जयंती नाल्याची स्वच्छता मोहिम राबवत असताना दुसरीकडे थेट जयंती नाल्यात जैविक कचरा जात असल्याने 'उलटी गंगा वाहत असल्याचे' चित्र पहायला मिळत आहे.

कोल्हापूर शहरात मटण विक्रीची ८५ अधिकृत दुकाने असून चिकन विक्री दुकानांची संख्या मोठी आहे. बकऱ्याचे मटण महाग झाल्याने चिकन विक्रीकडे खवय्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे शहरात मटण मार्केटसह गल्लीबोळात चिकन विक्री सेंटरची दुकाने सुरू आहे. शहरात रोज २० ते २५ टन चिकनची विक्री होते. चिकन सेंटरमध्ये कोंबड्यांसाठी खुराडी बांधली जातात. त्यामुळे विष्ठेचे प्रमाणही वाढते. तसेच कोंबड्या कापल्यानंतर पिसे, मांस, हाडे अशा प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होतो. चिकन सेंटरमधील कचरा गोळा करण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाकडून पाँईट केले असून महानगरपालिकेचा कचऱ्याचा डंपर संबंधित पाँइटवर जातो. सेंटरमधील कचरा टाकण्याची जबाबदारी चिकन सेंटरची आहे. त्यासाठी महानगरपालिका कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. तरीही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक चिकन विक्रेते थेट जयंती नाल्यात कचरा टाकत आहेत.

रात्री नाल्याच्या परिसरात वर्दळ नसल्याने वाहनातून कचरा नाल्यात फेकला जातो. कसबा बावडा रस्त्यावरील जयंती नाल्याच्या दगडी पुलावरुन चिकन सेंटरवाले मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत कचरा टाकतात. कचऱ्यातील मांस खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांची गर्दी सकाळी मोठ्या प्रमाणावर जमते. काही कचरा थेट रस्त्यावर पडतो. त्यामुळे मांस पटकावण्यासाठी कुत्री भांडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. जयंती पूल, संभाजी, पूल, विल्सन पुलावरुन कचरा टाकला जात आहे. गोखले कॉलेजनजीकच्या हुतात्मा पार्कजवळील नाल्यातही मोठ्या प्रमाणात चिकन सेंटरमधील कचरा टाकला जात असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. शास्त्रीनगर नाल्यात हीच स्थिती पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी नागरी वस्ती नाही त्या ठिकाणच्या पुलावरुन जयंती नाल्यात कचरा फेकला जात असल्याचे सार्वत्रिक चित्र पहायला मिळते.

नाल्यातील चिकन सेंटरमधील कचरा थेट पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील नाल्यातून थेट नदीत जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे. कचरा कुजून कावीळ, गॅस्ट्रो, कॉलरा रोगाची भिती व्यक्त केली जात आहे. कचऱ्यातील मांस खाण्यासाठी कुत्र्यांच्या झुंडी येत असल्याने ही कुत्री काहीवेळा हिंसक होतात. जर त्याना मांस मिळाले नाही तर नागरिकांच्या अंगावर हल्ला करतील, अशी भितीही व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेने जयंती नाल्यात जैविक कचऱ्यासह सुका कचरा टाकण्यावर कडक कारवाईचा बडगा उचलावा, अशी मागणी होत आहे.

....

चिकन सेंटरची जबाबदारी

अन्न औषध प्रशासनाकडे

मटन विक्री दुकानांना महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते तर चिकन सेंटर सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी असते. पण या विभागाकडे अपुरे कर्मचारी असल्याने चिकन सेंटरवर नियंत्रण नसल्याने कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दोन्ही विभागांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रजिस्टर ठेवावे, अशी सूचना नागरिकांकडून केली जात आहे.

....

कोट

'शहरातील चिकन सेंटरमधील कचरा जमा करण्यासाठी महानगरपालिकेकडून मोफत यंत्रणा राबवली जाते. शहरातील प्रमुख चौक आणि मटण मार्केट परिसरातील कचरा डंपरमार्फत गोळा करुन विल्हेवाट लावली जाते. सेंटरमधील कचरा उघड्यावर टाकू नये, अन्यथा कारवाई केली जाईल.

विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका

.....

विक्रेत्यांची वाहने दिवसभर रस्त्यावर

मटण मार्केटजवळ होलसेल कोंबड्या विक्रेत्यांची जाळीची वाहने दिवसभर पडून असतात. या रस्त्यांवर कोंबड्यांची विष्ठा आणि पिसे पडतात. विष्ठेमुळे कोंबड्याची पिसे रस्त्यावर चिकटून बसली आहेत. कोंबड्यांची पिसे हवेत उडून शरीरात गेल्यास दमा, अस्थमा रोग होण्याची भिती असते. महानगरपालिका आरोग्य विभागाने दिवसभर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीतील नोकरभरतीला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेती उत्पन्न बाजार समितीतील नोकरभरतीला सरकार नियुक्त संचालक अॅड. किरण पाटील यांनी विरोध केला आहे. बेकायदेशीर नोकरभरती करु नये, अशी तक्रार त्यांनी बाजार समितीकडे केली आहे. तसेच दिवाणी कोर्टात नोकरभरतीला मनाई दावाही दाखल केला असल्याचे संचालक पाटील यांनी सांगितले.

बाजार समितीचे सभापती बाबा लाड आणि उपसभापती संगीता पाटील यांनी कार्यकाल संपूनही राजीनामा दिलेला नाही. नोकर भरतीनंतर राजीनामा देण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांत नोकरभरती करुन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यासाठी खलबते सुरु असताना संचालक अॅड. पाटील यांनी बेकायदेशीर नोकरभरती करु नये, अशी तक्रार समितीच्या सचिवांकडे केली आहे.

त्यांनी केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, बाजार समितीत सध्या १४५ पैकी १२१ पदे कार्यरत आहेत. केवळ २४ पदे रिक्त आहेत. २०१३ मध्ये तत्कालिन संचालक मंडळाने ३७ कर्मचाऱ्यांची भरती केली होती. भरती प्रक्रियेला विरोध करत काहीजण कोर्टात गेले आहेत. या ३७ कर्मचाऱ्यांना कामावर हजर करुन घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. पण या निर्णयाला औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भविष्यात या ३७ कर्मचाऱ्यांना हजर करुन घेण्याचे आदेश दिले तर कर्मचाऱ्यांची संख्या १५८ वर पोचणार आहे. मंजूर पदापेक्षा जादा संख्या झाल्यास समितीचा आस्थापन खर्च जास्त होणार आहे, याकडे अॅड पाटील यांनी पत्रात लक्ष वेधले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाशिवगडावर अन्नछत्र

$
0
0

सदाशिवगडावर अन्नछत्र

कराड :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगड येथे मंदिर परिसरात अन्नछत्र उभारण्याच्या कामास सोमवारी प्रारंभ करण्यात आला. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देत कराडमधील व्यावसायिक सलीम मुजावर यांनी अन्नछत्रासाठी पुढाकार घेतला असून, ते या वास्तूच्या उभारणीचा सर्व खर्च उचलणार आहेत. किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी सन २००७ पासून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान कार्यरत आहे. गडावर पाणी नेण्यासाठी प्रतिष्ठानकडून २२ लाखांचा खर्च आला आहे.

...........

कराडमध्ये डेंगीने मुलीचा मृत्यू

कराड :

कराड नगरपालिका क्षेत्रातील बुधवार पेठेतील सोनाक्षी प्रवीण कांबळे (वय ८) हिचा मंगळवारी पहाटे डेंगीने मृत्यू झाला. दरम्यान, तिचा दोन वर्षांचा सख्खा भाऊ रियांश व परिसरातील सुमारे वीस नागरिकांना डेंगीचे निदान झाले असल्याने खळबळ उडाली आहे.

कराडच्या बुधवार पेठेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाशेजारी कांबळे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. सोनाक्षी नूतन मराठी शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान तिला अचानक ताप आला. खासगी रुग्णालयात तपासण्या करण्यात आल्यानंतर डेंगी झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, शनिवारी सकाळी तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले. मात्र, मंगळवारी पहाटे तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, तिचा दोन वर्षांचा भाऊ रियांश याला ही डेंगीची लागण झाल्याचे समोर आले असून, त्याच्यावर कराडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवार पेठ परिसरात डेंगी व डेंगी सदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आंबेडकर क्रीडांगणावर गवत व घाणीचे साम्राज्य वाढले असून, स्वछता सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवल्याचा डंका पिटणारी नगरपालिका या परिसरातील स्वच्छतेच्या बाबतीत मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

सोनाक्षी कांबळे

.........

पोलिस कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

कराड :

पत्नीच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या व सध्या पोलिस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीने पोलिस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ब्लॅकेटचा काट फाडून त्याच्या साह्याने दरवाज्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ही बाब वेळीच पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी संशयिताचा जीव वाचला आणि पुढील अनर्थ टळला. विनोद रामचंद्र कांबळे (रा. येवती, ता. कराड) असे पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.

विनोद कांबळे यांने चारित्र्याच्या संशयावरून शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून केला होता. त्या नंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला आठ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे दिले होते. त्यानुसार संशयित आरोपी विनोद कांबळे कराड ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस कोठडीत होता.

...........

कोयना पुलावरून उडी मारून आत्महत्या

कराड

येथील नव्या कोयना पुलावरून अंदाजे ३५ ते ४0 वर्षे वयाच्या युवकाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह जुन्या कोयना पुलाजवळ सायंकाळी पोलिसांना आढळून आला. दरम्यान, आत्महत्या केलेल्या युवकाची मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांना ओळख पटू शकली नव्हती. त्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

........

अपघातात मुलगी ठार

कराड :

कोल्हापूर नाक्यावर ट्रकची दुचाकीला जोराची धडक बसून अपघात झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एक नऊ वर्षांची मुलगी जागीच ठार झाली, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सोनाक्षी सतिश शेटे (वय ९, रा. कुंभारगाव, ता. पाटण) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. तर तानाजी शंकर खराडे (वय ६०), रुक्मिणी तानाजी खराडे (वय ५०, रा. कालेटेक ता. कराड) असे गंभीर जखमींची नावे आहेत. विक्रम शंकरलाल विष्णोदी (वय २७, रा. जोधपूर-लांभा, राजस्थान) असे गुन्हा नोंद झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

तानाजी खराडे दुचाकीवरून आपल्या पत्नी व नातीसह कालेहून कराडच्या दिशेने येत होते. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाक्याच्या ठिकाणी आले असता कोल्हापूरच्या बाजूने आलेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये सोनाक्षी शेटे ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तानाजी खराडे व रुक्मिणी खराडे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तत्काळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातस्थळी जमलेल्या संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्याने तणाव निर्माण झाला होता, काहीकाळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

.............

आराम बसच्या धडकेत एक ठार

कराड :

पुणे-बेंगळुरू महामार्गावर भुयाचीवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला उभा असणाऱ्या एका युवकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आराम बसने धडक दिली. या घटनेत महेंद्र रामचंद्र माने (वय. २८ रा. कारी ता. जि. सातारा) यांचा मृत्यू झाला. या बाबत गणेश एकनाथ सूर्यवंशी (रा. भुयाचीवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महामार्गावर भुयाचीवाडी गावचे हद्दीत महामार्गाच्या कडेला महेंद्र माने उंब्रजकडे जाण्यासाठी उभे होते. दरम्यान, सातारा-कराड अशी भरधाव वेगात जाणारी आराम बस क्रमांक के. ऐ. २५ डी.४८८२ ची माने यांना जोराची धडक बसली, यामध्ये गंभीर जखमी झालेले माने यांचा मृत्यू झाला. सदर अपघाताची नोंद उंब्रज पोलिसांत झाली असून, आराम बस चालक आनंदा विठ्ठल चव्हाण (वय ३६, रा. दरबार गल्ली, विजापूर) याच्यावर अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास उंब्रज पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात ३२ लाखांचे मद्य जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाच्या आजरा तालुक्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत अवैध मद्याचे सुमारे ३६ बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन मिळून सुमारे ३२ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत राजस्थानमधील एकास अटक केली गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

कोल्हापूर विभागातील उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची गस्त येथील आजरा-उत्तूर मार्गावर घालण्यात येत होती. यावेळी या मार्गावरून जात असलेल्या आयशर कंपनीच्या चारचाकी वाहन (क्र. जीजे-२३, एटी, ३१३२) हेरून आरदाळ गावच्या हद्दीतील पाटील मळ्यानजीक ही कारवाई करण्यात आली. या वाहनातून विदेशी बनावटीच्या ७५० मिलीच्या ३६०० काचेच्या बाटल्या भरलेले बॉक्स नेण्यात येत होते. या मद्याची बाजारपेठेतील किंमत सुमारे २३ लाख ४० हजार रुपये इतकी होते. अवैध मद्याचे बॉक्स आणि चारचाकी वाहन मिळून ३३ लाखांचा मुद्देमाल या कारवाईत ताब्यात घेण्यात आला. तसेच या वाहनाचा चालक कमलेश बाबूलाल बिष्णोई (वय-२४, रा. सांडगवा, ता. संचोर, जि. जालोर, राजस्थान) याला अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक कुमार कोळी, जितेंद्र पवार, सुहास वरुटे, जयसिंग खुटावळे, सुखदेव सिद, दीपक कापसे, मोहन पाटील, योगेश शेलार, नितीन ढेरे यांनी कारवाईत भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांडी मशिनमध्ये पदर अडकून वृद्धेचा मृत्यूकांडीमशिनमध्ये पदर अडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

वृंदावन कॉलनी परिसरातील यंत्रमाग कारखान्यात कांडी मशिनमध्ये साडीचा पदर अडकून झालेल्या दुर्घटनेत वृद्धेचा मृत्यू झाला. शेवंताबाई दत्तू टिपुगडे (वय ७८ रा. आसरानगर) असे वृद्धेचे नाव आहे. या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनीमध्ये सुरेश टेके यांच्या मालकीचा यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्यात कांडीमशीनवर शेवंताबाई टिपुगडे या काम करत होत्या. मंगळवारी काम करत असताना अचानकपणे त्यांच्या साडीचा पदर मशिनमध्ये सापडला. त्यामुळे पदराचा त्यांच्या गळ्याला फास लागून त्या जाग्यावर कोसळल्या. कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी टिपुगडे यांच्याकडे धाव घेतली. परंतु टिपुगडे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच याबाबतची माहिती गावभाग पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयाकडे पाठविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निकृष्ट पॅचवर्कमुळे पुन्हा दैना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापूर आणि अतिवृष्टीमुळे शहरातील रस्ते पॅचवर्क कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. डांबरापेक्षा खडी, मुरुम व मातीचा वापर केला जात असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे शहरवासीयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशाच पद्धतीने पॅचवर्क मोहीम सुरू राहिल्यास खड्ड्याच्या समस्येतून वाहनधारकांची सुटका कधी होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील एकही रस्ता खड्डेमुक्त दिसत नाही. महापालिका प्रशासन तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करते. पण नंतर काही दिवसांतच पुन्हा वाहनधारकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. शहरातील रस्त्यांची अशी स्थिती असताना त्यामध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची भर पडली. शहरातील सुमारे २९९. ७७ किमीच्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जीवघेण्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत दिवसेंदिवस शहवासीयांमध्ये रोष निर्माण होत आहे.

दरवर्षी १५ ऑक्टोबरनंतर पॅचवर्क व नवीन रस्त्यांच्या कामाला सुरुवात होते. पण परतीच्या पावसामुळे कामाला विलंब झाला. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर सोमवारपासून पॅचवर्कच्या कामाला सुरुवात झाली. पण सुरू असलेले काम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. केवळ पॅचवर्कच्या कामासाठी महापालिकेकडे ५० लाखांचा निधी आहे. पण या निधीतून पॅचवर्कचे काम पूर्ण होणार का? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मुरुम काढून खड्डा खडीकरण व डांबरीकरण केले जात आहे. पण यामध्ये मातीचा समावेश केला जात असल्याने पॅचवर्क केलेला रस्ता पुन्हा उखडण्याची शक्यता आहे. महापालिकेकडे निधीचा ठणठणाट असताना नित्कृष्ट दर्जाचे पॅचवर्क करून निधीचा अपव्यय केला जात असल्याचा शहरवासियांकडून होत आहे.

\Bरात्री महापालिका ते सीपीआर चौकाचे पॅचवर्क

\Bस्थायी समितीने सूचना केल्यानंतर पॅचवर्कच्या कामाला सुरुवात झाली. काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याने कोल्हापूर शहर व जिल्हा कृती समितीने थेट सायंकाळी महापालिकेत धाव घेतली. त्यामुळे प्रशासनाला बिंदू चौक येथील पॅचवर्कचे काम बंद करावे. त्यामुळे पॅचवर्कचे काम मंगळवार रात्रीपासून करण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिका ते सीपीआर चौक, जाऊळाचा गणपती आदी मार्गांचा समावेश आहे. पॅचवर्कचे काम नित्कृष्ट दर्जाचे असल्याने रात्रीचे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचा आरोप शहवासीयांतून होऊ लागला आहे.

पॅचवर्कच्या कामाला तब्बल एक महिन्यानंतर सुरुवात झाली. काम करताना डांबरापेक्षा मातीचा जास्त वापर होत असल्याचे दिसून येते. तात्पुरती डागडुजी करताना किमान एक ते दीड वर्ष काम चांगले राहिले पाहिजे. त्याचबरोबर नवीन रस्ते बांधणीसाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.

रमेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता बझारच्या कंपाउंडवरुन वादावादी

$
0
0

फोटो आहे. ८४८२ अर्जुन टाकळकर - वादावादी वाढत गेल्यानंतर फेरीवाले व स्थानिक नागरिकांना रस्त्यावर ठाण मांडले.

८५१५ - महेश उत्तुरे व रहिम सनदी यांची रमेश उलपे यांच्यासोबत शाब्दीक वादावादी झाली.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने राजारामपुरी जनता बझारजवळ केलेल्या कारवाईला मंगळवारी वेगळे वळण लागले. केबिनमुक्त झालेल्या जागेवर जनता बझार व्यवस्थापनाने कंपाउंड घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांचे पती महेश उत्तुरे व बझारचे व्यवस्थापक रमेश उलपे यांच्यामध्ये चांगलीच वादावादी झाली. इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांनी मध्यस्थी करत परवानगीनंतर कंपाउंड घालण्याचे आदेश दिल्यानंतर वादावर तात्पुरता पडदा पडला.

राजारामपुरी खाऊ गल्लीसह जनता बझारच्या इमारतीला अनधिकृत आणि अधिकृत केबिनचा विळखा पडला आहे. सोमवारी (ता.४) अतिक्रमण विभागाने येथील ५१ केबिन ताब्यात घेत परिसर मोकळा केला. कारवाईमुळे जनता बझारचा परिसरही केबिनमुक्त झाला. आपली जागा ताब्यात मिळाल्याने बझारच्या व्यवस्थापनाने पे अँड पार्किंगसाठी कंपाउंड घालण्यास सुरुवात केली. बझारला महापालिकेने भाडेतत्वावर जागा दिलेली असली, तरी महापालिकेच्या परवानगीशिवाय कंपाउंडचे काम सुरू असल्याने महापालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

तत्पूर्वीच बझारचे व्यवस्थापक उलपे यांच्याबरोबर उत्तुरे व रहिम सनदी यांनी वाद घालत कामाला विरोध केला. कारवाई केलेल्या ठिकाणी स्थानिक केबिनधारकांना जागा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. त्याला उलपे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. उत्तुरे व सनदी यांनी कंपाउंड बांधण्याची परवानगी घेतली आहे का, ही जागा तुमची आहे का, सर्व्हेअरचा नकाशा आहे का? असा प्रश्‍नांचा भडिमार केला. उलपे यांनीही जागा आमचीच आहे, आम्ही रेडिरेकनरनुसार महापालिकेला भाडे भरतो. आमच्याकडे सर्व्हेअरचा नकाशा आहे. त्याची नोंदही आहे. तुम्ही कायद्याने बोला. चुकीचे काही करू नका,असे स्पष्ट करत सर्व्हेअरचा नकाशाही दाखवला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. वाद वाढत गेल्यानंतर बझारचे उपाध्यक्ष मदन चोडणकर, संचालक आकाराम पाटील, रवीकिरण चौगले, डॉ. सुहास बोंद्रे आदी दाखल झाले.

त्याचवेळी उत्तुरे व सनदी यांच्या कार्यकर्त्यांनी राजारामपुरीतील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तणावात अधिकच भर पडली. इस्टेट अधिकारी बराले यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. त्यांनी कंपाउंड बांधणीस परवानगी नसल्याने काम थांबण्याची सूचना केली. त्यानंतर संचालकांनी काम थांबवत असल्याचे सांगितले. फेरीवाल्यांना आहे, त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी देण्यासाठी बुध‌वारी (ता. ५) आयुक्त कार्यालयात फेरीवाल्यांची बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदी अॅड. लाटकर निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी नगरसेविका अॅड. सुरमंजिरी लाटकर एकमेव इच्छूक असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या निवडीचे सुतोवाच पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केले. दरम्यान, नगरसचिव यांनी शुक्रवारी (ता. ८) दुपारी साडेबारा वाजता सभा बोलवली आहे. सभेत महापौर माधवी गवंडी आपला राजीनामा देणार आहे.

गेल्या वर्षापासून अॅड. लाटकर यांना सातत्याने महापौरपदाने हुलकावणी दिली आहे. जुलैमध्ये झालेल्या निवडीमध्ये तर पडद्यामागे प्रचंड घाडमोडींनंतर महापौरपदावर गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीदरम्यान अॅड. लाटकर यांचे पती व माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी प्रचंड नाराजी दाखवली. मात्र लाटकर यांनी झोकून देत पक्ष कार्य सुरू केले. सरिता मोरे व गवंडी यांच्या निवडीदरम्यान अन्याय होऊनही त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून पक्षनेतृत्वाने त्यांच्या पत्नीचे नाव महापौरपदासाठी निश्चित केले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघात लाटकर यांनी प्रचाराची मुख्य धुरा सांभाळली. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव व ऋतुराज पाटील यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. त्यामुळे महापालिकेत आघाडी असलेल्या दोन्ही काँग्रेसमधील नगरसेवकांनी त्यांच्या नावाला संमती दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नगरसेवकांमध्ये नाराजी असली, तरी ती दूर करण्याची जबाबदारी स्वत: आमदार मुश्रीफ यांनी घेतल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

अॅड. लाटकर यांना रोखण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीकडून त्यांच्या पारंपरिक विरोधक स्मिता माने रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्यामागे माजी खासदार धनंजय महाडिक यांची ताकद उभी राहणार आहे. मात्र त्याचवेळी राज्यात स्थापन होणाऱ्या सरकारानंतर त्याला अधिक गती येणार आहे. युतीचे सरकार स्थापन झाल्यास पुन्हा एकदा जातवैधता प्रमाणपत्रावरुन नगरसेवकांना पात्र-अपात्र ठरवण्याचा खेळ सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी आमदार मुश्रीफ यांनी गवंडी यांना राजीनामा देण्याची सूचना केल्यानंतर त्यांनी सभा बोलवण्यासाठी नगरविकास विभागाला पत्र पाठवले. त्यानुसार शुक्रवारी (ता. ८) दुपारी साडेबारा वाजता १९ ऑक्टोबर रोजी झालेली तहकूब सभा बोलवण्यात आली. सभेमध्ये गवंडी आपला राजीनामा सादर करतील. त्यानंतर दहा दिवसांत नवीन महापौर निवडीची तारीख जाहीर होईल.

....

कोट

'अॅड. लाटकर यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नावावर चर्चा होणार नाही. त्यामुळे त्यांची महापौरपदी निवड निश्चित आहे. पक्षाकडून अन्य कोणीही पदासाठी इच्छुक नाही. ठरल्याप्रमाणे गवंडी यांचा राजीनामा घेतला जाईल.

हसन मुश्रीफ,आमदार

....

चौकट

कार्यकालाबाबत अनिश्चितता

सत्ता स्थापनमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये पदांचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या वाट्यातील महापौरपदाचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यानंतर शेवटच्या वर्षाचा कालावधी काँग्रेसकडे जाणार आहे. मात्र लाटकर यांना केवळ सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यांना काँग्रेसच्या वाट्यातील काही महिन्याचा कालावधी देण्याचा एक मतप्रवाह आहे. पण काँग्रेसमधूनही या पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने अॅड. लाटकर यांना नेमका किती कालावधी मिळणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकाच्या वाताहतीने डोळ्यांत पाणी

$
0
0

चंद्रकांत मुदूगडे, शाहूवाडी

तालुक्यात परतीच्या पावसाचे थैमान सुरूच राहिल्याने खरीप हंगामाची लय पूर्ण बिघडून गेली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे शेतातील उभ्या भाताची कापणी, मळणी आणि झोडणी करणे शेतकऱ्यांसाठी अग्निदिव्य ठरले आहे. उभे पीक जमीनदोस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून झोडपणाऱ्या पावसाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कापलेल्या भातपिकांची कडपे जोरदार पावसात भिजण्याचा दिनक्रम सुरूच आहे. कडपे एकत्र करून रचण्याची आणि रचता रचता ती झाकण्याची संधीही पावसाने हिरावली जात आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यात ना सुगी हातात राहिली.. ना जनावरांकडे लक्ष, संपूर्ण खरीप हंगामाचे दिवाळं निघाल्याने यंदाची दिवाळी भीषण कडू ठरल्याची व्यथा शिवाजी खडके (खुटाळवाडी) या युवा शेतकऱ्याने बोलून दाखवली. असेच काहींसे असह्य दुःख व्यक्त करण्याचे त्राणही शेतकऱ्यांजवळ उरलेले दिसत नाही. 'बस्स तो पाऊस... अनं पुरे ती आता शेती', शेतकऱ्यांची अशी टोकाची हतबलता एकूण समोरच्याला कापरे भरत नसेल तरच आश्चर्य.

शाहूवाडी तालुका जसा पावसाचे आगार तसाच तो भाताचे (धान) कोठार म्हणूनही सुपरिचित आहे. ऑगस्टच्या महापुरात बहुतांश शेतीचा नायनाट होऊन घटलेल्या कृषीउत्पन्नाने चिंतेचे सावट अद्याप पांगले नसताना गेल्या पंधरवड्यात अवकाळी परतीच्या अतिवृष्टीमुळे खरीप शेती पार उद्ध्वस्त झाली आहे. शेतात पाणी साचून भुईमूग जाळीची मुळे वाढलीच नाहीत, तर सोयाबीन नावालाही शिल्लक राहिले नाही. आता तर भात काढणीही पूर्ण अडचणीत सापडली आहे. शेतात पीक ठेवावे तरी नुकसान आणि काढणी करावी तरीही नुकसान आशा विचित्र संकटात सापडलेला शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. रब्बी हंगामही हातून निसटण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना पुरते सतावले आहे. 'सुगीच्या हातघाईत गडी माणसंच (मजूर) मिळंणात.. भात घराकडं यावं म्हणून पै-पावणं जमवून संजोग केला पण पावसानंच हट्ट धरल्यावर काय करावं', अशी सूचक अगतिकता करंजोशीजवळ घराकडे जाणाऱ्या श्रीपती आणि बयाबाई या जोडप्याने व्यक्त केली. तर आठ दिवस ताडपद्रीत झाकलेले भात घराच्या माडीवर विजेच्या चार बल्बखाली सुकवावे लागले. यादरम्यान कमीअधिक वाळून आणि पुन्हा पुन्हा भिजणाऱ्या पिंजराचे कूट झाल्याने शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न उभा राहिला आहे, असे कुंडलिक पाटील (शिंपे) या शेतकऱ्याने सांगितले.

भात शेतीत गुंतलेला अल्पभूधारक शेतकरी महापूर आणि परतीच्या पावसामुळे दबून गेला आहे. निसर्गाच्या अवकृपेत नाशवंत ठरलेली सुगी बहुतांश हातावेगळी झाल्यानंतर प्रशासन यंत्रणा कशाचे पंचनामे करणार आहे. खळे उलगल्यानंतर यंत्रणेला जाग येण्याचा प्रकार संतापजनक आहे.

केशव डिगे, जांबूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृह परिसरात भालकर यांचे स्मारक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दिवंगत चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे स्मारक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात उभारण्याचा निर्णय मंगळवारी महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते. स्मारक उभारणीसाठी सुमारे २५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

भालकर यांचे स्मारकाच्या उभारणीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वी समितीच्या अनेक बैठका झाल्या. स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी महापौरांच्या दालनामध्ये बुधवारी बैठक झाली. बैठकीमध्ये नाट्यगृह परिसरात असलेल्या खाऊ गल्ली येथील कमानीजवळ स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली. त्यासाठी सुमारे २५ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आला आहे. सुलत अंजली आर्किटेक्ट आसोसिएटच्या प्रीती दीक्षित यांनी स्मारक उभारण्याच्या कामाचा आराखडा सादर केला. कामाला साडेचार महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भालकर यांचे शिल्प उभे करण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले. 'कामाला सुरुवात झाल्यानंतर तीन महिन्यांत ते पूर्ण करा' अशी सूचना त्यांनी केली. प्रभाग समिती सभापती शोभा कवाळे, नगरसेवक अर्जुन माने, नगरसेविका सरिता मोरे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, प्रकल्प अभियंता अनुराधा वाडरे, संग्राम भालकर, संदीप भालकर, संदीप जाधव, मिलिंद अष्टेकर, स्वप्ना जाधव-भालकर, शिल्पकार किशोर पुरेकर यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images