Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘पदवीधर मतदारनोंदणी प्राधान्याने पूर्ण करा’

$
0
0

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेतली.

जिल्हाधिकरी देसाई यांनी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील पदवीधर मतदार नोंदणी जास्तीत जास्त प्राधान्याने पूर्ण करावीत. पाच नोव्हेंबर रोजी त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करावेत, अशा सूचनाही दिल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सुरुवातीला संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले,' कार्यालय प्रमुखांनी सेवापुस्तकांची साक्षांकित प्रत सोबत जोडावी. तसेच एकत्रित मतदार नोंदणीबाबत पत्र द्यावे. सहा नोव्हेंबर ही मतदार नोंदणीची अंतिम तारीख आहे. ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत प्राप्त पदवीधराला नोंदणी करता येणार आहे. तसेच एक नोव्हेंबर २०१३ ते एक नोव्हेंबर २०१९ या कालावधीत शिक्षण म्हणून तीन वर्षे सेवा केलेल्या शिक्षकाची शिक्षक मतदार संघात नोंदणी करण्यात येईल.'

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'सर्व कार्यालय प्रमुखांनी जास्तीतजास्त मतदार नोंदणी करावी. सर्व मतदारांचे एकत्र अर्ज कार्यालय प्रमुखांच्या पत्रासह संबंधित तहसीलदार, प्रांताधिकारी, गट विकास अधिकारी, महापालिका उपायुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करु शकतात. या कामास कार्यालय प्रमुखांनी प्राधान्य द्यावे.'

या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, प्रियदर्शनी मोरे, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार अर्चना शेटे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रब्बीही वाया जाण्याचा धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची धूळदाण उडाली आहे. काढणी, मळणी खोळंबली असल्याने खरीप हातचे गेले असतानाच रब्बीच्या पेरण्या लांबल्याने रब्बी हंगाम जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत केवळ पाच टक्के पेरण्या झाल्याने पाण्याअभावी रब्बीची पिके जाण्याची शक्यता शेती अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे.

खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. विशेषत: सोयाबीन, भुईमुगाची काढणी झाल्यानंतर गहू, हरभरा, सूर्यफूल, ज्वारीची पेरणी केली जाते. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. जमिनीतील ओलाव्यावर पिके घेतली जात असताना शेतकऱ्यांना हमखास उत्पादनाची खात्री असते. पण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपल्याने महापुराच्या तडाख्यातून वाचलेल्या सर्व पिकांची अक्षरश: धूळधाण झाली आहे.

भात, सोयाबीन, भुईमूग पिके काढणीयोग्य झालेली असताना शेतकऱ्यांची पावसामुळे कापणी व मळणीमध्ये मोठा व्यत्यय येत आहे. खरिपाची काढणीच पूर्ण झालेली नसल्याने रब्बीचा पेरा खेळंबला आहे. पेरणी विलंब होईल तशी उत्पादनात मोठी घट होणार आहे. रब्बी हंगामातील पिकांचा कालावधी चार ते पाच महिन्यांचा असतो. जमिनीतील ओलाव्याबरोबर थंडीमुळे शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळते. पेरणीला विलंब होत असल्याने हा कालावधी लांबत जाऊन जमिनीतील ओलावा व थंडीचा कालावधी पिकांना कमी मिळणार असल्याने रब्बी हंगामातील उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप गेल्याने चिंतातुर झालेले शेतकरी रब्बीचाही पेरा साधला जात नसल्याने तो अधिकच चिंतातुर झाला आहे. दरम्यान शिरोळ, हातकणंगले, कागल तालुक्यातील शेतकरी सोयबीन काढणीनंतर उसाची लागण करतात. सोयबीनची काढणी झालेली नसल्याने उसाच्या लावणी थांबल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये केवळ दहा टक्के क्षेत्रावर उसाची लागण करण्यात आली आहे.

दरम्यान, १७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा कृषी कार्यालयाला दिले असून, पाच नोव्हेंबरपर्यंत पंचनामे करून नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.

००००

रब्बी पेरणीचे उद्दिष्ट (हेक्टरमध्ये)

१५,९३२

ज्वारी

७,७६७

गहू

५,७९१

मका

७५

गळीत धान्य

१०,२३३

कडधान्ये

१,९१७

चारा पिके

१,४८३

भाजीपाला

००००

कोट...

पावसाने अद्याप उघडीप न दिल्याने खरिपात पेरणी केलेल्या सोयाबीनची काढणी करता येत नाही. आठवड्यात काढणी झाली तरी रब्बीची पेरणी करण्यास नोव्हेंबरअखेर उजाडणार आहे. त्यामुळे पक्व अवस्थेत पिके असताना जमिनीतील ओलावा कमी झाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.

किशोर जमादार, शेतकरी, रुकडी

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी उद्योग, वाहन कंपन्यांच्या शेअर्सकडे ओढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेअर बाजारात सन्सेक्सने उसळी घेतल्याने स्थानिक गुंतवणूकदारांकडून सरकारी उद्योग, स्टील उद्योग आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्स खरेदी करण्याकडे ओढा वाढला आहे. विदेश गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने स्थानिक गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन खरेदी करत आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेअर बाजारात घसरण सुरू झाली. अर्थसंकल्पात त्यांनी अतिश्रीमंतांच्या करात वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे विदेशी गुंतवणुकदारांनी गुंतवणूक मागे घेण्यास सुरुवात केली. जागतिक मंदीचे पडसादही उमटले. आखातातील युद्धजन्य परिस्थिती, अमेरिका चीन ट्रेड वॉरचा फटकाही भारतीय बाजारपेठेला बसला. त्यामुळे सेन्सेक्स घसरला होता. त्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत सोने खरेदीकडे कल वाढला होता. पण केंद्र सरकारने चुका दुरुस्तीवर भर देत नवीन घोषणा केल्या. अतिश्रीमंतांवरील आणि कंपनी करात कपात केल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याने सेन्सेक्स वाढू लागला आहे. ठेवीवरील व्याजाचे दर कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी शेअर्स बाजाराला पसंती दिली आहे. तसेच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी शेअर बाजारकडे मोर्चा वळवला आहे.

ऑटो सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. इलेक्ट्रॉनिक वाहने वापरण्यासंदर्भात सरकारने घोषणा केली होती. पण कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक वाहनाबरोबर इंधनावर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्याचे संकेत दिल्याने टाटा मोटर्स, मारुती, सुझुकी या कंपन्यांच्या शेअर्सचे दर वाढले आहेत. टाटा स्टील, एशियन पेंटस्, एल अॅन्ड टी, इन्फोसिस, टेक महिंद्रा रिलायन्स इंडस्ट्रीज या नामवंत आणि प्रसिद्ध कंपन्यांच्या शेअर्सला पसंती दिली आहे. प्लास्टिक बंदीच्या घोषणेमुळे पेपर तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स दरातही वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय बँकांना मदत केल्याने त्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. स्टेट बँकेचा शेअर्स २१० रुपयांवरुन ३८० रुपयांवर पोचला आहे. रेल्वेने बाजारात आणलेल्या शेअर्सचा दर पहिल्या दिवशी ३०० रुपये होता. शेअर्सला गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिल्याने ९०० ते ९५० रुपयांपर्यंत वाढला आहे. स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदीकडे गुंतवणूकदार रुची दाखवू लागले आहेत.

....

' विदेशी गुंतवणूक वाढल्याने शेअर बाजार उसळी घेऊ लागला आहे. स्थानिक गुंतवणूकदार प्रसिद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकीमुळे भविष्यात चांगला परतावा मिळणार आहे.

मणिलाल कंगटाणी, अध्यक्ष इन्व्हेस्टर असोसिएशन

....

'केंद्र सरकारने अतिश्रीमंतावरील करात कपात केली असून विदेश गुंतवणूक वाढली आहे. सरकारकडून बँकांना मदत झाली आहे. त्यामुळे शेअर बाजार स्थिरस्थावर होऊन उसळी घेत आहे. ऑटो सेक्टर, स्टील उद्योगाकडे गुंतवणूकदारांचा ओढा आहे.

राजीव शहा, संचालक इन्व्हेस्टर असोसिएशन

....

'अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात शेअर बाजारात सन्सेक्सने उसळी घेतल्याने दीपावली साजरी होत आहे. सरकारी कंपन्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असून रेल्वेच्या शेअर्सला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मनिष झवंर, संचालक, इन्व्हेस्टर असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश तलावात मृतदेह सापडला

$
0
0

गणेश तलावात मृतदेह सापडला

मिरज :

शहरातील शनिवार पेठ केदार अपार्टमेंट येथे राहणारे बब्रु शिवय्या स्वामी (वय ६५) हे दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. त्यांचा मृतदेह शुक्रवारी गणेश तलावात आढळून आला. बब्रु स्वामी बेपत्ता असल्याची फिर्याद मिरज शहर पोलिसात नोंद झाली होती.

बब्रु स्वामी ३० ऑक्टोबर २०१९ पासून घरातून कोणास काही न सांगता निघून गेले होते. घरातील सर्वांनी त्यांची शोधाशोध केली. परंतु कुठेच मिळून आले नाहीत. या बाबत त्यांचा मुलगा प्रकाश बब्रु स्वामी यांनी मिरज शहर पोलिसात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. शुक्रवारी दुपारच्या दरम्यान गणेश तलावामध्ये मृतदेह तरंगत होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

..........

बेकायदा सिलिंडरचा साठा जप्त

कराड :

तळबीड पोलिस ठाण्याचे हद्दीत वराडे गावात लोकवस्तीमध्ये बेकायदा भारत गॅसचे गॅस सिलिंडरचा (टाक्यांचा ) विनापरवाना असुरक्षितपणे साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता एकूण १६२ घरगुती व व्यवसायीक गॅस सिलिंडर आढळून आले. जप्त केलेल्या सिलिंडरती किंमत ५७,८२८ रुपये आहे. सिलिंडरचा साठा करून ठेवणाऱ्यांचे नाव नारायण जगन्नाथ कारंडे (ढेबेवाडी) आणि अंकुश रामचंद्र हजारे (वराडे) असे आहे. सदरचा साठा विनापरवाना व बेकायदा असल्याचे मान्य केल्यामुळे पुरवठा अधिकारी विकास गभाले यांनी तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

...........

विषबाधेमुळे बिबट्याचा मृत्यू

कराड : तुळसण (ता. कराड) येथील एका शिवारात अन्नातील विषबाधेमुळे अत्यवस्थ झालेल्या बिबट्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिबट्याला विषबाधा कशामुळे झाली या मागील नेमके कारण वन विभागाला सापडले नाही. बिबट्याला सर्पदंशाने विषबाधा झाली नसल्याचे त्याच्या उत्तरीय तपासणीवरून स्पष्ट झाल्याने त्याची अन्नातून विषबाधा करून हत्या करण्यात आली का? याची चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी प्राणीमित्रांमधून होत आहे. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एक बिबट्या तडफडत असल्याचे तेथील काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. वन विभागाने तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ताराराणी पास अभियान राबवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी 'ताराराणी अग्रक्रम पास' ही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय 'बेटी बचाओ, बेटी

पढाओ' जिल्हा कृती दल समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुलींना जन्म देणाऱ्या पालकांसाठी ही योजना असून, सरकारी कार्यालयातील कामकाजारासाठी पास असणाऱ्या पालकांना रांगेत उभे राहावे लागणार नाही.

गेल्या पाच वर्षांतील एका मुलीवर तसेच दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याला ताराराणी अग्रक्रम पास देण्यात येणार आहे. ही योजना तत्काळ राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. या पासधारकांना जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी अग्रक्रम देण्यात येईल. कोणत्याही रांगेमध्ये त्यांना उभे राहण्याची आवश्यकता असणार नाही. या पाससाठी संबंधित दाम्पत्यांनी महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या पासवर संबंधित दाम्पत्याचे छायाचित्र असणार आहे. त्यावर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी असेल. सरकारी कार्यालयातील कोणत्याही योजनेसाठी पासधारकाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी पासधारकाला रांगेत उभे राहण्याची आवश्यकता असणार नाही.‍

बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, डॉ. विलास देशमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी वैभव कांबळे, मनीषा पालेकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, अॅड गौरी पाटील, आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमाप्रश्न तडीला लावणारच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव,

बेळगावसह सीमाभागातील अनेक गावांत शुक्रवारी काळा दिन पाळण्यात आला. त्यानिमित्त रॅली आणि निदर्शनाच्या माध्यमातून सीमावासीयांनी एकजुटीचे दर्शन घडवले. बेळगावसह निपाणी, चंदगड येथेही काळा दिन पाळण्यात आला. निपाणीमध्ये मराठी बांधवांनी कडकडीत बंद पाळला, तर चंदगड येथील हलकर्णी फाटा येथे रास्ता रोको आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सायकल फेरी काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत सीमाप्रश्न तडीला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार अनेक नेत्यांनी बोलून दाखवला. मराठा मंदिर येथे झालेल्या सभेच्या आधी शहरात निषेध फेरी काढण्यात आली.

फेरीदरम्यान 'बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे', 'रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में', 'कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही', अशा घोषणांनी मराठी भाषिकांनी शहर दणाणून सोडले. फेरीत हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते. दंडाला काळ्या फिती, हातात भगवे झेंडे, भगवे फेटे परिधान करून अनेकजण सहभागी झाले होते. समितीतील दोन गटांना एकत्र येण्याचे आवाहन करणारे 'सीमालढ्यासाठी एकत्र या', असे फलक लक्ष वेधून घेत होते.

सायकल फेरी कपिलेश्वर पुलावर आल्यावर फेरीचे विराट दर्शन घडले. पुलापासून शिवाजी उद्यानाच्याही पुढच्या भागापर्यंत भगवे झेंडे घेतलेला मराठी भाषिकांचा जनसागर दिसत होता. शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या पोशाख परिधान केलेली मुले लक्ष वेधून घेत होती. महिलाही काळ्या साड्या परिधान करून सायकल फेरीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक जसजशी पुढे जाईल, तसा मराठी जनतेचा सहभाग वाढत गेला. युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण काळे पोशाख परिधान केले होते. फेरी मोठी असल्यामुळे अनेक ठिकाणी थांबावे लागत होते. सायकल फेरीच्या मार्गावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पोलिसांकडून फेरीचे छायाचित्रण आणि चित्रीकरण करण्यात येत होते.

दरम्यान,

'राष्ट्रवादी काँग्रेस सदैव सीमावासीयांच्या पाठीशी आहे. कर्नाटकच्या अत्याचाराला दाद न देता लढा सुरू ठेवणे ही बाबत कौतुकास्पद आहे, हा प्रश्न तडीला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सीमावासीयांचे प्रश्न, समस्या विधानसभेत नक्की मांडून', अशी ग्वाही चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी दिली. मराठा मंदिर येथे मए समितीच्या काळ्या दिनाच्या सभेत ते बोलत होते. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी मोबाइलवरून सभेच्या ठिकाणी जनतेशी संवाद साधला. सीमावासीयांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना पाठीशी राहील. सीमावासीयांच्या भावना केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

.. .. .. ... .. ... .. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा: अंबाणी गावात बिबळ्याचा घरात घुसून शेळीवर हल्ला

$
0
0

सातारा: सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कास पठारापासून जवळच असलेल्या अंबाणी गावात एका बिबट्यानं घरात घुसून शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. शेळीची तडफड ऐकून जागे झालेल्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबळ्यानं धूम ठोकली. या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अंबाणीचे ग्रामस्थ संतोष भोसले यांच्या घराच्या दरवाज्याला छोटीसी फट आहे. या फटीतून बिबळ्या आत घुसला. आत घुसल्यावर गोठ्यात असलेल्या शेळीवर त्यानं हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळं शेळी बिथरली आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली. त्यामुळं गोंधळ होऊन भोसले यांच्या घरातील लोक जागे झाले. समोर बिबळ्या पाहून तेही दचकलेच, पण लगेचच सावरून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर बिबळ्या शेळीला सोडून पळून गेला. शेळीच्या मानेला बिबळ्याचे दात लागले आहेत. रक्तबंबाळ झालेल्या या शेळीवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अंबाणी गावचे लक्ष्मण गोगावले यांनी दिली.

गावातील ग्रामस्थांनी भोसले यांच्या घरी धाव घेतली असून धोंडवड येथील वनखात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. थोड्याच वेळात अधिकारी गावात पोहोचून पंचनामा करणार आहेत. भोसले यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आजूबाजूच्या गावांतही घबराट

घरात घुसून बिबळ्यानं हल्ला केल्याचं वृत्त आजूबाजूच्या गावांतही पसरलं असून त्यामुळं प्रचंड घबराट उडाली आहे. अनेक गावांमध्ये घरांना पक्के दरवाजे नसतात. अनेक लोक गोठ्यांच्या दरवाजांना केवळ फळ्या लावून रात्रीपुरता त्याला आतून काहीतरी आड लावतात. मात्र, थोडासा जोर लावला तर हे दरवाजे उघडतात. अशी परिस्थिती असल्यानं गावकऱ्यांमध्ये अधिकच चिंता आहे. बिबळे असे घरात घुसू लागले तर काय करायचं, असे प्रश्न लोक एकमेकांना विचारत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेचे रेस्टहाऊस कुचकामी

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ९० लाख रुपये खर्च करून बांधलेले रेस्टहाउस सुविधांअभावी कूचकामी ठरत आहे. आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था नसल्याने प्रवाशांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरील रेस्टहाउसकडे पाठ फिरवली आहे. गेल्या सहा महिन्यात केवळ १०० प्रवाशीच रेस्टहाउसमध्ये थांबले. मात्र, त्यांनीही रेस्टहाउसमधील त्रुटींमुळे रेल्वे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. राज्यासह परराज्यातून रोज हजारो भाविक, पर्यटक कोल्हापुरात येतात. सुट्ट्यांच्या काळात तर सर्वच हॉटेल्स, लॉजेस फुल्ल असतात. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना काही काळ रेल्वे स्थानकात राहता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने ९० लाख रुपये खर्च करून रेस्टहाउस (डॉरमेंटरी) बांधले आहे. एप्रिल २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रेस्ट हाउसचे उद्घाटन झाले. या रेस्टहाउसमध्ये २४ बेड आहेत. एका बेडसाठी १२ तासांना ९० रुपये, तर २४ तासांसाठी १५० रुपये शुल्क आकारले जाते. बुकिंगची व्यवस्था रेल्वे स्थानकासह ऑनलाइन पद्धतीनेही केली आहे. मात्र, रेल्वे स्थानकावर रेस्टहाउसची सुविध असल्याची जाहिरात करण्यात रेल्वे प्रशासन कमी पडले आहे. यामुळेच सहा महिन्यात कसेबसे १०० प्रवासीच रेस्टहाउसकडे फिरकले आहेत. रेस्ट हाउसमध्ये थांबलेल्या प्रवाशांनी गैरसोयींबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत. ९० लाखांचा खर्च करून आवश्यक सुविधाही मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाने केलेला खर्च पाण्यात गेल्याची भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत.

रेस्टहाउसमध्ये सध्या केबिन, बेड, पंखे यासह शौचालय आणि आंघोळीची व्यवस्था आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरील नळाकडे धाव घ्यावी लागते. बाथरुममध्ये गरम पाण्याची सोय नाही. केबिनमध्ये लॉकर नाहीत. यामुळे प्रवाशांना साहित्य रामभरोसे सोडावे लागते. रस्त्याकडेच्या भिंतीवरून काही तरुणांची ये-जा सुरू असते, त्यामुळे बाथरुमला जाऊन येईपर्यंत साहित्य केबिनमध्ये असेल की नाही, याची खात्री नसते. सुरक्षेसाठी पुरेसे कर्मचारीही उपलब्ध नाहीत. सहकुटुंब येणाऱ्या प्रवाशांची रेस्टहाउसमध्ये गैरसोय होते, यामुळे बहुतांश प्रवासी याकडे पाठ फिरवतात. प्रवाशांची गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने रेस्टहाउसच्या तळ मजल्यावर खोल्या बांधल्या असत्या तर, त्या अधिक सोयिस्कर ठरल्या असत्या, असे प्रवाशांना वाटते. रेल्वे प्रशासनाने तातडीने पाणी आणि सुरक्षेची व्यवस्था करावी, अन्यथा हे रेस्टहाउस असूनही उपयोगाचे ठरणार नसल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.

रेल्वेने मोठा खर्च करून प्रवाशांसाठी रेस्टहाउसची सोय केली, पण आवश्यक सुविधा आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले आहे. केबिनऐवजी रुमची व्यवस्था गरजेची होती. रेल्वे प्रशासनाने कुठेच याची जाहिरात केलेली नाही. रेल्वे स्थानकातही याची व्यवस्थित माहिती मिळत नाही. उपयोग होत नसेल तर रेस्टहाउस काय कामाचे?

- शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभाग रेल्वे सल्लागार समिती

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन रेस्टहाउसमध्ये सुविधा देणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र रेल्वेचे रेस्टहाउस फारसे उपयुक्त वाटत नाही. कुटुंबासह येणाऱ्या प्रवाशांना याचा काहीच उपयोग होत नसल्याने प्रवासी इतर पर्याय शोधतात. याशिवाय रेस्टहाउसची माहितीही प्रवाशांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

- गजानन सुतार, प्रवासी, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वांगी १०० रुपये किलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परतीचा पावसाचा फटका शेतीला बसला असून भाजीपाल्याची आवक घटली आहे. फळभाज्या, पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. वांग्याचा दर प्रतिकिलो १०० ते १२० रुपये असून कोथिंबीर पेंढीचा दर ५० ते ७० रुपये झाल्याने ग्राहकांनी महाग भाज्यांकडे पाठ फिरवून माफक दर असलेल्या भाज्यांकडे मोर्चा वळवला आहे.

दसरा, दिवाळीनंतर दरवर्षी भाज्यांची आवक थोड्याफार प्रमाणात घटते. पण, यंदा परतीचा पाऊस आणि वादळी वारे पावसाने झोडपल्याने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम मंडईत जाणवू लागला आहे. गेल्या चार दिवसांत वांग्याचा दर प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांवर पोचला आहे. पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे. त्यामुळे कोथंबीर पेंढीचा दर बाजारात ५० ते ७० रुपये होता. विक्रेत्यांनी पेंढी सुट्टी करुन २० रुपयांला कोथिंबीरीची विक्री सुरू केली. फ्लॉवर आणि कोबीचा दर वाढला आहे. कोबीचा लहान गड्डा १० ते १५ रुपयांना तर मोठा गड्डा २० ते ३० रुपयांना विकला गेला. फ्लॉवर गड्ड्याचा दर १५ ते ५० रुपये इतका होता.

भेंडी, गवार, वरणा, दोडका, घेवड्याचा दर प्रतिकिलो ८० रुपये होता. त्यामुळे ग्राहकांनी या भाज्यांच्या खरेदीकडे कल दाखवला. टोमॅटोचा दर प्रतिकिलो ४० रुपयांवर टिकून आहे. मंडईत पालेभाज्यांची आवक खूपच घटली आहे. मेथी पेंढीचा दर २० रुपये होता. पोकळा, पालक, शेपू पेंढीचा दर १० ते २० रुपये होता. डाळींब आणि सिताफळांची मोठी आवक झाल्याने प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने विक्री झाली. कांद्याचा दरही ६० रुपयांवर पोहोचला आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : १०० ते १२०

टोमॅटो : ३५ ते ४०

भेंडी : ५० ते ६०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ६० ते ८०

कारली : ६०

वरणा : ६०

हिरवी मिरची : ४० ते ५०

बटाटा : २० ते २५

लसूण : १४० ते १८०

कांदा : ३० ते ४०

आले : १०० ते १२०

फ्लॉवर : १५ ते ५० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते ३० (प्रति गड्डा)

मुळा : १० (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : २०

कांदा पात : १० ते १५

कोथिंबीर : ५० ते ७०

पालक : १० ते २०

शेपू :१० ते १५

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १२० ते १४०

डाळिंब : ३० ते ६०

सिताफळ : ३० ते ५०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परती’चा दणका दहा हजार हेक्टरवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सुमारे दहा हजार हेक्टरवरील पिके बाधीत झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. तहसिलदारांनी बाधीत झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे सुरू असून मंगळवारपर्यंत (ता. ५) तालुका पातळीवरुन नुकसानीचा अहवाल जिल्हा कृषी कार्यालयाकडे येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी राज्य सरकारला अहवाल पाठविला जाईल अशी शक्यता आहे.

१७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे काढणी योग्य झालेली पिके कुजून गेली. अनेकांना पिकांची काढणीही करता आली नाही. खरीप हंगामात सलग दोनवेळा नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने शेतकरी गर्भगळीत झाला आहे. वर्षाचे आर्थिक गणितच कोलंमडून गेले आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळाली नसताना पुन्हा नवी नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. राजकीय पक्ष सत्तेच्या साठमारीमध्ये गुंतल्याने शेतकऱ्यांची अधिकच चिंता वाढली आहे.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांना महापूर आला. महापुरामध्ये विशेषत: नदीकाठच्या पिकांची धुळधाण उडाली. पुरापासून वाचलेली पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. अतिवृष्टी व महापुरामुळे सुमारे ७० हजार हेक्टरवरील पिके कुजून गेली. पंचनाम्याचे सोपस्कर पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. अतिवृष्टीच्या तडाख्यातून सुटलेली पिकांची काढणी योग्य झालेली असताना परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने उरलीसुरली पिकेही कुजली.

परतीच्या पावसाचा फटका बसल्याचे लक्षात आल्यावर जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयाने आदेश दिल्यानंतर पंचनाम्यांना सुरुवात झाली. प्रत्यक्ष बांधावर जाऊन कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी दोन पंचांसमवेत पंचनामे करत आहेत. त्यानंतर गावनिहाय नूकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तहसिलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी तयार करणार आहेत. या अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल मंगळवारपर्यंत जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पडताळणी करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. त्यानंतर अहवाल राज्य सरकारला पाठविला जाईल. जिल्हा प्रशासनाने पंचनाम्यासाठी केवळ पाच दिवसांचा अवधी दिल्याने कमी कालावधीत नुकसानग्रस्तांची यादी तयार करताना कृषी विभागासह महसूल प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे. त्याचबरोबर पात्र लाभार्थी या भरपाईपासून वंचित राहू नये, याची दक्षता दोन्ही विभागांना घ्यावी लागणार आहे.

नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील ऊस क्षेत्रासह सुमारे ७० हजार हेक्टरमधील पिके बाधीत झाली. त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. ऊस पिक वगळता सुमारे एक लाख ७० हजार हेक्टरवर इतर पिकांची पेरणी झाली होती. सप्टेंबरअखेर व ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले नाही. मात्र उशीरा पेरणी झालेल्या पिके वायाच गेली. प्रत्यक्षात पंचनामे हाती पडल्यानंतर नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता शेती अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

कोट

तहसिलदारांचे आदेश मिळाल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. मंगळवारी गावनिहाय यादी मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली जाईल. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारला पाठवण्यात येईल.

- डी. डी. वाकुरे, जिल्हा कृषी अधिकारी

पेरणी झालेले क्षेत्र

५३,३१३

सोयाबीन

३८,५३५

भुईमूग

८३,६५९

भात

११,९८४

नाचणी

१,७२३

ज्वारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छठ पूजेचा उत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीच्या पात्रात पूर्वेत्तर भारतातील महिलांनी छठ पूजा करून मावळतीकडे झुकलेल्या सूर्याची आराधना केली. पंचगंगा घाटावर उसाचे मंडप घालून पारंपरिक पद्धतीने पुजाविधी करण्यात आला. पूर्वेत्तर नागरिकांच्या उपस्थितीने नदीचा परिसर फुलून गेला होता. रविवारी (ता. ३) सकाळी सूर्योदयानंतर छठ पूजेची सांगता होणार आहे.

कार्तिक महिन्यातील षष्टी या तिथीला देशाच्या उत्तर पूर्व भागातील नागरिक छठ पर्व हा सण साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा नदी घाटावर राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्यावतीने या सणानिमित्त कार्यक्रम होतो. बिहारसह अन्य राज्यांतील महिला ४८ तास उपवास करतात. छठ पूजेसाठी नदीघाटावर नागरिकांनी सहकुटूंब गर्दी केली होती. मुख्य घाट, मधला घाट, ब्राह्मण घाटावर नागरिकांनी उसाचे मंडप घातले होते. मंडपात तांब्याचा कलश आणि मातीच्या घटावर दिवे लावण्यात आले. फळे आणि भाज्यांनी आरास करण्यात आली. फराळाचे पदार्थही मांडले होते.

उपवास करणाऱ्या सुवासिनींनी नदीपात्रात सूप घेऊन मावळतीकडे झुकलेल्या सूर्याची प्रार्थना केली. सुपात श्रीफळ, भाजी आणि फळे मांडण्यात आली होती. राजर्षी शाहू पूर्वोत्तर संघाच्यावतीने उपस्थित नागरिकांचे स्वागत करण्यात आले. प्रतिमा पाटील वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांनी नदी परिसरात महिलांना छठपूजेच्या शुभेच्छा दिल्या. इचलकरंजी, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, जाधववाडीसह शहरातील अनेक भागात राहणारे पूर्वेत्तर भारतातील नागरिक उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष ओम मिश्रा, नारायण झा, कामेश्वर मिश्रा, शशिकांत चौबे, रविकांत त्रिपाठी उपस्थित होते. बबलू गुप्ता, ललन कुमार, नरेंद्र झा, विजय मिश्रा, सुजीत झा, राजीव पाठक यांनी उत्सवाचे आयोजन केले. पूजेवेळी महानगरपालिकेच्यावतीने सुरक्षेसाठी दोन अग्निशमन दलाचे बंब सज्ज ठेवले होते. घाटावर पोलिस बंदोबस्तही ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे, पाणी टंचाईवरून प्रशासन धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक चौकांना अतिक्रमणांचा विळखा पडला असून पाणी पुरवठ्याचा वारंवार बट्ट्याबोळ उडत आहे. शहरवासियांना होणाऱ्या नाहक त्रासाचे तीव्र पडसाद शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. वारंवार सूचना देवून अतिक्रमण निर्मूलन का करत नाही? असा प्रश्न उपस्थित करत सदस्यांनी या विभागासह टंचाईबद्दल पाणीपुरवठा विभागालाही धारेवर धरले. सोमवारपासून (ता. ४ नोव्हेंबर) चारही विभागीय कार्यालयांच्यावतीने संयुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. बैठकीत जिल्ह्यातील सर्व नूतन आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

'शहरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी स्थायी समितीमध्ये वारंवार सूचना केल्या जात आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रस्ते, फूटपाथवर विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असल्याने पादचाऱ्यांना चालणे मुश्कील बनले आहे. विक्रेत्यांचे साहित्य आणि बेवारस वाहने जप्त करा' अशी सूचना करत सभापती शारंगधर देशमुख, संजय मोहिते व दीपा मगदूम यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी सोमवारपासून चारही विभागीय कार्यालयांच्यावतीने संयुक्त मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

माधुरी लाड यांनी कसबा बावड्यासह ई वॉर्डातील अठरा प्रभागांत पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचे निदर्शनास आणून देत प्रशासनाला धारेवर धरले. नवीन विद्युतपंप बसवल्यामुळे डिस्चार्ज वाढला असून त्यामुळे विद्युत पुरवठा ट्रीप होत आहे. ओव्हरलोड विद्युत पुरवठा नियंत्रणात आणण्यासाठी नाशिकमधून १५० अँम्पिअर क्षमतेच्या कॉईल मागवण्यात आल्या आहेत. त्या बसवल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.

दीपा मगदूम म्हणाल्या, 'निकम पार्कची संरक्षक भिंत अद्याप काढली नसल्याने पावसाचे पाणी परिसरातील तीन कॉलन्यांत जात आहे. पार्कच्या मालकांना नोटीस देण्यापूर्वी याचिका दाखल करा.' याबाबत पार्क परिसरातील जागा ताब्यात घेण्यासाठी नगररचना विभागाच्यावतीने नोटीस काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

'सेंट्रल किचनमध्ये आढळलेल्या त्रुटीबाबत काय कारवाई केली?' अशी विचारणा सचिन पाटील यांनी केली. याबाबत संबंधीत कंपनीला नोटीस दिली आहे. दोषींवर कारवाईसाठी आयुक्तांसमोर प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट करण्यात आले.

'स्वच्छता कर्मचारी कमी आहेत. नियुक्त केलेले कर्मचारी नियमित सेवा बजावत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा' अशी सूचना गीता गुरव यांनी केली. याबाबत गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. पहिल्यांदा ५०० व त्यानंतर एक हजार रुपये दंड केला आहे. तरीही गैरहजर राहिल्यास कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सभापती देशमुख यांनी, 'झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी पाणी बिलात सवलत देण्याच्या प्रस्तावाचे काय झाले? कर्मचारी वैद्यकीय विम्यासंदर्भात काय कार्यवाही केली?' अशी विचारणा केली. पाणी बिलातील सवलतीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात सादर करण्यात येईल. वैद्यकीय विम्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कामाच्या वेळेत आरोग्य निरीक्षक महाद्वार रोडवर फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधितांना एक हजार रुपये दंड करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. शनिवारी शहरातील विहिरींच्या पाहणीसाठी आयुक्तांच्या फिरतीवेळी हा प्रकार घडला. सुशांत कावडे असे आरोग्य निरीक्षकांचे नाव आहे. दरम्यान, राजारामपुरीच्या पहिली गल्लीतील विहिरीच्या पाण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी नुमने घेतल्यानंतर शनिवारी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी शहरात विविध ठिकाणच्या विहिरींची पाहणी केली. महाद्वार रोड, घाटी दरवाजा, कपिलतीर्थ मार्केट येथील विहिरींची पाहणी करून त्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याबाबत दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या.

महाद्वार रोड, घाटी दरवाजा, कपिलतीर्थ मार्केट व बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील अनेक विक्रेते साहित्य विक्रीनंतर राहिलेले साहित्य रस्त्यावरच टाकून जातात. कचरा व प्लास्टिक रस्त्यावर पडून राहिल्याने प्रदूषणात भर पडत आहे. त्याबाबत उपाययोजनेसाठी सकाळी आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली. 'रस्त्यावरचा कचरा कमी करण्यासाठी रात्रीच्यावेळी सफाईसाठी स्वतंत्र पथक स्थापन करा. व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा' असे डॉ. कलशेट्टी यांनी आरोग्य निरिक्षकांना आदेश दिले. येथील व्यापाऱ्यांनी दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

आयुक्तांच्या पाहणी दरम्यान गांधी मैदान विभागीय कार्यालयामधील आरोग्य निरीक्षक सुशांत कावडे हे कामाच्या वेळेमध्ये महाद्वार रोडवर फिरत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांना १००० रुपयांचा दंड करण्याचे आदेश आयुक्तांनी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना दिले. दरम्यान, त्यांनी राजारामपुरीतील विहिरीची पाहणी केली. पाहणीनंतर विहिरीची तातडीने स्वच्छता करण्याची सूचना केली. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार व विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, सहायक निरिक्षक मनोज लोट आदी उपस्थित होते.

रिंगरोडची पाहणी

आचारसंहिता संपल्यानंतर रिंगरोडच्या कामाला बुधवारी सुरुवात झाली. कळंब्यातील साई मंदिर व फुलेवाडी चौक अशा दोन्ही बाजूंनी कामाला सुरुवात केली आहे. त्याची पाहणी शनिवारी आयुक्तांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व ठेकेदारांसमवेत केली. त्यांनी ठेकेदारांना त्वरीत कामाची तर कामावर देखरेखीची सूचना सरनोबत यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर महिन्याला पगाराची प्रतीक्षा

$
0
0

लोगो : शिक्षकांचे खाते रिकामे

Anuradha.Kadam@timesgroup.com

Tweet@Anuradhakadam_MT

कोल्हापूर : प्रवास भत्ते बिल मंजुरी प्रक्रिया थंडावल्याने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना दिवाळी शिल्लक रकमेवर उसनवारीवर भागवावी लागली. दिवाळीसारख्या सणातही हातात पुरेसा पैसा नसल्याने तसेच वेळेवर पगार करण्याबाबत वारंवार केलेल्या मागणीला केराची टोपली दाखवणाऱ्या प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी शिक्षकांनी केली आहे. दर महिन्याला अशी वेळ येत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील १७८० प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना गेल्या दोन वर्षांपासून पगार महिन्याच्या एक तारखेला मिळत नाही. पगाराची रक्कम हातात येण्यास महिन्याचा तिसरा आठवडा उजाडत असल्याने साडेनऊ हजार प्राथमिक शिक्षकांची आर्थिक कुचंबणा होत आहे. सण, उत्सवाच्या काळात पैशांची गरज असूनही शिक्षण विभागातील प्रशासन च्या वतीने बिल भत्ते व त्यांच्या मंजुरी मध्ये त्रुटी काढल्या जातात. याबाबतही शिक्षकांच्या अनेक तक्रारी आहेत. जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळा ग्रामीण भागात आहेत. अनेकदा प्रवास करून शिक्षक शाळेमध्ये येतात. अनेक गावांमध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षक कसरत करतात. मात्र, वेळेवर पगार करण्यात प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दिरंगाईमुळे महिना उलटून गेला तरी शिक्षकांना पगार जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ऑक्टोबर महिन्याचा पगार शिक्षकांना दिवाळीच्या पूर्वी मिळावा, यासाठी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद शिक्षण विभाग पगारपत्रक विभाग तसेच कोषागर कार्यालयाकडे प्रस्ताव दिला होता. मात्र ऑनलाइन प्रक्रियेतील घोळाचे कारण देत शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. दिवाळीत हातात पैसे द्यावेत, यासाठी शिक्षकांनी प्रशासनाकडे हेलपाटे मारले. मात्र तरीही पगार न झाल्याने उसनवारीवर दिवाळी सण साजरा करण्याची दुर्दैवी वेळ शिक्षकांवर आली आहे.

जबाबदारी झटकण्याचा प्रकार

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या पगार पगाराच्या दिरंगाईबाबत शिक्षण विभाग पगार पत्रक विभागाकडे बोट दाखवत आहे. आमच्याकडे वेळेत पगार पत्रकाचा तपशील येत नसल्याचे कारण देत कोषागार कार्यालयाने हात वर केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १७८० शाळांमधील साडेनऊ हजार शिक्षकांना दिवाळीतही पगार मिळण्याबाबत प्रशासनातील जबाबदार विभागांकडून जबाबदारी झटकण्याचे काम सुरू आहे.

महिन्याला मिळणाऱ्या पगारावर केवळ सण-उत्सव नव्हे तर मुलांच्या गरजा कौटुंबिक गरजा अवलंबून आहेत. कर्जाचे हप्ते, घरखर्च अशा अनेक आर्थिक गोष्टींचे नियोजन पगारावर केले जाते. मात्र पगार वेळेवर होत नसल्यामुळे हप्ते अडतात. याचाही फटका बसतो. कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडते. यंदाच्या दिवाळीत पगार न झाल्याने मला नातेवाईक, मित्रांकडून उसने पैसे घेऊन दिवाळीचा किमान खर्च करावा लागला. किमान यापुढे वेळेवर पगार व्हावेत, यासाठी संघटितपणे मागणी केली जाईल.

- मारुती पाटील, शिक्षक-हातकणंगले

प्राथमिक शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न गेल्या दोन-तीन वर्षापासून प्रलंबित आहे. शिक्षकेतर कर्मचारी व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतात. मात्र, शिक्षकांनाच महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पगारासाठी वाट पाहावी लागते ही अन्यायी गोष्ट आहे. याबाबत शनिवारी शिष्टमंडळ व प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये शिक्षकांच्या वेळेवर पगाराबाबत निवेदन देण्यात आले आहे. याची दखल न घेतल्यास येत्या आठवड्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- राजाराम वरुटे, अध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक संघटना

(उत्तरार्ध)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीसाठी शिक्षकांनाहजर राहण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीसाठी शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

सध्या शाळांना दीपावलीची सुट्टी आहे. तरीही मतदार नोंदणीसाठी सोमवारी (ता. ४) आणि मंगळवारी (ता.५) शाळेत उपस्थित राहून मतदार नोंदणीचे कामकाज करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जासोबतची आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करण्यासाठी राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. एस. खेमनार, शासकीय आयटीआयचे प्राचार्य डॉ. रविंद्र मुंडासे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. प्रशांत पट्टलवार, जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकारी व कार्यरत पब्लिक नोटरी अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नेमणूक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिवबा नाना जाधव पार्क परिसरातील भगवान पार्कमध्ये शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दीपावली सुट्टीमुळे परगावी गेलेल्या कुटूंबांयांचे दोन बंद बंगले फोडून रोख रक्कम आणि दागिने असा १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या दोन बंगल्यांशेजारीच आणखी एका बंगल्यात चोरीचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, करवीर पोलिसांनी घटनास्थळी येऊन एका घराचे सीसीटीव्ही फूटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

भगवान पार्कात अंकुश दत्तात्रय राजमाने भाड्याने राहतात. ते राधानगरी तहसिलदार कार्यालयात नोकरीला आहेत. दीपावली सुट्टीनिमित्त राजमाने त्यांच्या मूळ गावी सरवडे (ता. राधानगरी) येथे कुटुंबीयासह गेले होते. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील तिजोरी फोडून त्यातील ड्राव्हरमधील तीन हजार रुपयांची रोकड आणि चांदीचे कडे चोरले. नंतर चोरट्यांनी याच परिसरात राहणारे रामचंद्र वरणे (मूळ रा. राशिवडे) यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला. वरणे हे पाचगणीत शिक्षक म्हणून काम करतात. दीपावली सुट्टीनिमित्त ते सहकुटूंब त्यांच्या मूळ गावी मडिलगे (ता. भुदरगड) येथे गेले होते. त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या तिजोरीतील ५ हजारांची रोकड आणि काही मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. या दोन बंगल्यांनंतर चोरट्यांनी परिसरातील आणखी एका बंगल्यात चोरीचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी चोरीचा प्रकार रहिवाशांना समजला. त्यांनी चोरीची माहिती भाडेकरू आणि मूळ मालकांना दिली. त्यानंतर राजमाने, वरणे कोल्हापुरात आले. त्यांनी घरातील चोरीची माहिती घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनस्थळी पंचनामा केला.

चोरटे सीसीटीव्हीत कैद

रामचंद्र वरणे यांच्या घरात सीसीटीव्ही आहे. त्याच्या कॅमेऱ्याच्या फूटेजमध्ये संशयित चोरटा दिसला आहे. या फूटेजवरुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरात दोन महिन्यांत झालेल्या चोरी झालेल्या ठिकाणच्या रहिवाशांना संशयित चोरट्याचे छायाचित्र दाखविले जात आहे. सराईत गुन्हेगाराने ही चोरी केली असावी किंवा दिवसभरात रेकी करणारा हा परिसरातील चोरटा असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सराईत गुन्हेगारांचा फोटो आणि यादी एकत्र करून गुन्हे शोध शाखेने तपास सुरू केला आहे.

घरफोड्यांचे सत्र, लुबाडणुकीचे प्रकार

जिवबा नाना जाधव पार्कातील फेज क्रमांक तीन परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी दादासाहेब पांडुरंग पाटील (वय ३२, रा. राजगड चौक, कळंबा, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. २० ते २१ ऑक्टोबर दरम्यान घरफोडीचा हा प्रकार घडला. त्यासह परिसरात एका महिलेचे दात पाडून दोन चोरट्यांनी चोरी केली होती. चार महिन्यांपूर्वी जाधव पार्कातील फेज तीनमध्ये तीन बंगले फोडले होते. बंद बंगले टार्गेट करून चोरीचे सत्र पार्कात सुरू असल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. दारात पार्क केलेल्या दुचाकीमधील पेट्रोल आणि दुचाकीचे पार्ट काढून घेतले जात असल्याचे प्रकारही घडले आहे. कळंबा पाणंद येथून एमएसईबीकडे जाणारा रस्ता आणि जिवबा नाना जाधव पार्काच्या बसस्टॉपपासून बीपीएड कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लूटमारीचे प्रकार घडले आहे. जवळच असलेल्या पुईखडी जलउपसा केंद्राच्या परिसरात तरुणांना लुबाडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुमजली पार्किंगसाठी चार निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सरस्वती चित्रमंदिर येथे उभारण्यात येणाऱ्या बहुमजली पार्किंगसाठी चार निविदा दाखल झाल्या आहेत. मंगळवारी (ता. ५) तांत्रिक प्रकारे निविदा खुली करण्यात येणार आहे. चारपैकी कमर्शिअलदृष्ट्या तीन निविदा पात्र न ठरल्यास पुन्हा निविदा दाखल होण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे.

तीर्थक्षेत्र आराखड्यातील सात कोटी ८६ लाखांच्या कामासाठी १८ सप्टेंबरपासून निविदा दाखल करण्यास सुरूवात झाली. २४ मीटर उंचीच्या तीन इमारतींमध्ये पार्किंग सुविधा देण्यात येणार आहे. पार्किंग उभारणीसाठी नैसर्गिक वाळुचा वापर गृहीत धरुन निविदा मागवली होती. मात्र नैसर्गिक वाळुचा तुटवडा असल्याने अन्य प्रकारच्या वाळू वापरामुळे दरामध्ये बदल होणार आहे. या तांत्रिक कारणांबाबत प्री बीड बैठकीत चर्चा झाल्यानंतर दरात बदल होणार आहे. त्यामुळे निविदा दाखल करण्याची मुदत शनिवारपर्यंत (ता. २) होती. त्यानुसार आजअखेर चार निविदा दाखल झाल्या. निविदा मंगळवारी खुल्या होतील. चारपैकी तीन निविदा पात्र ठरल्या तरच पुढील प्रक्रिया पार पडेल. अन्यथा पुन्हा निविदा दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांचे अनुदान आठवड्यात देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे करवीर तालुक्यात शेतीचे, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई अनुदान पुढील आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर बँकेमार्फत जमा होईल, अशी माहिती करवीर तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे करवीर तालुक्यातील घरे, गोठे, दुकान व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले. त्यांना सानुग्रह अनुदान, निर्वाह भत्ता, पूर्णत: पडलेल्या घरांच्या मालकांना निवारा भाडे, गोठा, कारागीर, दुकानदार, व्यावसायिक, मृत जनावरे, बेपत्ता जनावरांबाबतचे अनुदान बँकेमार्फत जमा केले आहे. हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पुढील आठवड्यात जमा होणार आहे. नुकसानग्रस्त लाभार्थ्यांची यादी संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवकांकडे देण्यात आली आहे. याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास संबंधित गावच्या तलाठ्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहनही तहसिलदारांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मंत्री पाटील यांच्यावरील टीका पूर्वग्रहदूषीत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्याच्या विकासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील जनतेला नेहमीच सहकार्य केले आहे. टोल हद्दपार करण्यात त्यांचे मोठे योगदान असताना त्यांच्यावर विरोधक पूर्वग्रहदूषित व चुकीच्या पद्धतीने टीका करत आहेत. त्यांच्यावरील टीका शहरवासीय कधीही खपवून घेणार नाहीत. आम्ही त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहू' अशी माहिती चंद्रकांत पाटीलप्रेमी नागरिक मंचचे निवासराव साळोखे यांनी दिली.

साळोखे म्हणाले, 'मंत्री पाटील यांनी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. देशात कोठेही टोलमाफी झाली नसताना कोल्हापूर मात्र त्याला अपवाद ठरले. शहरवासियांच्या जनआंदोलनाची दखल घेत त्यांनी सरकार दरबारी हा प्रश्न निकालात काढला. जनतेशी एकरुप होऊन प्रत्येक प्रश्नाला न्याय देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. केवळ राजकीय विरोधापोटी चुकीची माहिती प्रसारित करुन त्यांना बदनाम केले जात आहे.'

'मंचच्यावतीने शाहू मिल पुनर्वसन, अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासह अन्य विकासकामांचा आराखडा तयार करून त्यांच्याकडे पाठपुरवा करणार आहे' असे स्पष्ट करत साळोखे म्हणाले, 'साडी वाटपाचा निषेध म्हणून लंगोट वाटण्याचा इशारा देऊन कोल्हापुरी कुस्ती आणि तालिम संस्थांचा अपमान केला जात आहे ही निषेधार्ह बाब आहे. मंत्रीपदाच्या कालावधीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले. मात्र स्वत:च्या नावापुढे पैलवान ही खोटी बिरुदावली लावणाऱ्यांनी कोणती मैदाने मारली? याचे उत्तर द्यावे.'

पत्रकार परिषदेला प्रसाद जाधव, गिरीष सोनी, संतोष माळी, गौरव लांडगे, दिलीप माने, सुभाष माळी, गौरव भागवत, स्वयंभू आडनाईक, भरत जाधव, सौरभ आडके, मारुती गुरव, अनिलराव झुरळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासूनरसिकांसमोर सादर होतील १७ नाटके

$
0
0

राज्य नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून

सोलापूर :

५९व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धांना १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. सोलापुरात होणाऱ्या प्राथमिक फेरीत एकूण १७ नाटके सादर होतील.

हुतात्मा स्मृती मंदिरात दररोज सायंकाळी सात वाजता ही नाटके होतील. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्याचे आयोजन केले आहे. रसिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १५ तारखेपासून १ डिसेंबरपर्यंत विविध नाटके सादर होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images