Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापुरी बनावटीची इलेक्ट्रिक स्कूटर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कोल्हापूर

इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन कोल्हापूरचे तरुण उद्योजक तनय शहा यांनी खास कोल्हापुरी बनावटीची इलेक्ट्रिक स्कूटर तयार केली आहे. मेड इन कोल्हापूर आरगॉन इलेक्ट्रिक स्कूटरच्या पहिल्या शोरुमचे उद्घाटन शनिवारी उद्यमनगर येथे झाले.

कोल्हापुरातील तनय शहा हे अभियांत्रिकीतील उच्च शिक्षणासाठी सन २००५ मध्ये अमेरिकेत गेले. शिक्षण घेतल्यानंतर २०१५ पर्यंत त्यांनी अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली येथे नोकरी केली. नोकरी करताना त्यांना इंधनाची मर्यादा आणि पेट्रोल, डिझेल वाहनांच्या वाढत्या वापरामुळे निसर्गावर होणाऱ्या विपरित परिणामांची जाणीव झाली. यामुळे प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांना ई-वाहनांच्या पर्यायाचा अभ्यास त्यांनी सुरू केला. इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याचा ध्यास घेऊन त्यांनी गेली तीन वर्षे संशोधन केले. मित्रांच्या मदतीने त्यांनी जगभरातील ई-स्कूटर्सना टक्कर देणारी आरगॉन इलेक्ट्रिक स्कूटर तयार केली. या स्कूटरची निर्मिती कोल्हापुरात करण्याचा निर्णय शहा यांनी घेतला. यानुसार त्यांनी आरगॉन मोबॅलिटी कंपनीची स्थापना करून स्कूटर तयार करण्यासाठी लागणारे सर्व परवाने घेतले. सुनील पाटील आणि पांडुरंग पाटील या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आधुनिक फिचर्सने सज्ज असलेली आरगॉन स्कूटर तयार केली.

खास कोल्हापुरी बनावटीच्या इ-स्कूटरची माहिती देताना तनय शहा म्हणाले, ‘इंधनाचे वाढते दर, कमी होत असलेला इंधन साठा आणि वाढते प्रदूषण हे येणाऱ्या काळातील गंभीर प्रश्न आहेत. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर हाच पुढचा पर्याय ठरू शकतो. हे जाणून आम्ही अत्यंत दणकट, स्टायलिश, कमी मेंटेनन्स असणारी आरगॉन मोबिलिटी स्कूटर तयार केली. फक्त एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर ७५ किलोमीटर अंतर धावते. फक्त १२ पैसे प्रतिकिलोमीटर आणि वर्षाला २० हजारांची बचत करणारी स्कूटर स्टायलिश आणि उत्तम पिकअप देणारी आहे. यामध्ये खास अॅडव्हान्स लिथियम बॅटरी वापरली आहे. ही बॅटरी वजनाने हलकी असून, ती कुठेही नेऊन चार्ज करता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास विचार करू: पृथ्वीराज चव्हाण

$
0
0

सातारा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत. सत्ता स्थापण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडशी चर्चा करू, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी हे विधान करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

कराड येथे प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेससाठी सर्व पर्याय खुले असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्यासमोर प्रस्ताव दिला तर तो प्रस्ताव आम्ही हायकमांड समोर ठेवू. तसेच आमच्या आघाडीतील मित्रपक्षांबरोबर त्या संदर्भात चर्चा करू. मात्र, शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं चव्हाण म्हणाले.

शिवसेना-भाजपमध्ये जर परस्पर विश्वासच राहिला नसेल तर ते सरकार कसं बनवू शकतील? हा विश्वास निर्माण करण्यासाठी निवडणुकीपूर्वी त्यांच्यात काय बोलणी झाली होती. हे त्यांनी राज्यातील मतदारांना उघडपणे सांगायला हवं, असं त्यांनी सांगितलं. चव्हाण यांच्या या वक्तव्यावर अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. शिवसेना-भाजपमधील वादाचा लाभ उठविण्यासाठीच चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं बोललं जात आहे. तर भाजपला राज्याच्या सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठीच काँग्रेसने शिवसेनेला साथ देण्याची मानसिकता तयार केल्याचंही सांगण्यात येत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही शिवसेनेबरोबर घरोबा करण्याचं वक्तव्य केलं होतं. शिवसेनेकडून सरकार स्थापनेसंदर्भात कोणताही प्रस्ताव आम्हाला मिळाला नाही. अधिकृत प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, असं थोरात यांनी म्हटलं होतं. आम्हाला या निवडणुकीत ४४ जागा मिळाल्या आहेत. अपेक्षित नसतानाही जनतेने आम्हाला चांगला कौल दिला आहे. मतदारांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असून आम्ही विरोधी पक्षात बसून जबाबदारीने काम करणार आहोत, असं सांगतानाच जनमताचा कौल पाहता मतदारांनी भाजप आणि शिवसेनेविरोधात कौल देऊन त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खऱ्या अर्थाने हा सत्तेविरोधातील कौल आहे, असं थोरात यांनी सांगितलं होतं. शिवसेनेकडून सत्ता स्थापण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, पण त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रस्ताव आल्यावर विचार करू, असंही ते म्हणाले होते.

पक्षीय बलाबल

भाजप- १०५
शिवसेना - ५६
राष्ट्रवादी काँग्रेस- ५४
काँग्रेस- ४४
बहुजन विकास आघाडी- ३
एमआयएम- २
समाजवादी पार्टी- २
प्रहार जनशक्ती पार्टी- २
माकप- १
जनसुराज्य शक्ती- १
क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १
राष्ट्रीय समाज पक्ष- १
स्वाभिमानी पक्ष- १
अपक्ष- १३
एकूण जागा- २८८

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास उत्सुक; काँग्रेसची खुली ऑफर

‘...तर शिवसेनेबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायलॉन मांजा बेततोय जिवावर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनचा, चीनी मांजा नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. पक्ष्यांसह माणसेही जखमी होऊ लागली आहेत. ऐन दिवाळी सणात दीड वर्षाच्या बालकाच्या गळ्याला दोरा अडकून सहा टाके पडले. तर पतंग काढण्यासाठी गेलेल्या समर्थ चौगुले या शाळकरी मुलाला जीव गमवावा लागला. यापूर्वी एका घटने, २०१८ मध्ये मांजामुळे एका युवतीचा चेहराच कापला गेला होता. नायलॉन दोऱ्यामुळे अनेक दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. धारधार, घातक मांजावर बंदी असतानाही पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका यापैकी कुणीही कारवाईसाठी पुढाकार घेतला नसल्याने मांजावरील बंदीची अनास्था आहे.

दरवर्षी दिवाळी सुट्टीदरम्यान, पतंग उडविण्याची क्रेझ बच्चेकंपनीत असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत पतंग उडवण्यासाठी साध्या, सुती दोऱ्याचा वापर केला जात होता. मात्र, हा दोरा तुटत असल्याने आणि स्पर्धांमध्ये विरोधकांचा पतंग कापण्यासाठी, आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चीनी, नायलॉनच्या मांजाचा वापर वाढला. नायलॉनच्या दोऱ्यावर डिंकाचा वापर करून काचेचा चुरा लावण्यात येतो. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो. या दोऱ्यात एकादा पक्षी अकडल्यास त्याची सुटका सहजासहजी होत नाही.

हा मांजा चिनी असून त्याच्यावर सरकारने बंदी घातली आहे. मात्र, अजूनही बाजारपेठेत हा मांजा ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होत आहे. पतंग काटण्यासाठी स्पर्धकांकडून या दोऱ्याचा सर्रास वापर केला जात आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय हरित न्यायालयाने नायलॉन, चिनी मांजावर बंदी घातली आहे. तरीही शहरात महापालिका, पोलिसांसह अन्य स्थानिक यंत्रणांनी आजपर्यंत एकाही मांजा विक्रेत्यावर मोठी कारवाई केलेली नाही. अनेक अधिकाऱ्यांना बंदी आहे, हेच माहिती नाही. हकनाक जीव घेणाऱ्या या मांजाबाबत इतकी उदासीनता आहे. पतंग उडवणाऱ्यांनीही वापरलेला मांजा पक्षी आणि दुचाकी, पादचाऱ्यांना धोक्याचा ठरू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, चीनी मांजा विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनांनी यापूर्वी केली. मात्र प्रशासनाकडून काहीही कारवाई झालेली नाही.

दिवाळीतील दोन घटना

२६ ऑक्टोबर रोजी राजारामपुरीतील पाचव्या गल्लीत विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढत असताना विजेचा धक्का बसून समर्थ अविनाश चौगुले (वय ११) हा शालेय विद्यार्थी ठार झाला. परिसरातून तुटून आलेला पतंग विजेच्या खांबावर अडकला होता. पतंग आणि मांजा दोरा काढण्यासाठी गेला असता त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. दीपावलीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. दुसरी घटना २७ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-गगनबावडा रोडवर नागदेववाडी फाटा येथे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना गळ्याला पतंगाचा मांजा अडकून दीड वर्षाचा वरद अमृत पाटील (रा. शिंगणापूर, ता. करवीर) गंभीर जखमी झाला. त्याला सहा टाके पडले असून अद्याप प्रकृती गंभीर आहे. वरदचे वडील अमृत आनंदा पाटील किरकोळ जखमी झाले. दोन्ही घटनात पतंगासाठी मांजा दोरा वापरल्याचे पोलिस तपासात दिसून आले आहे.

गेल्यावर्षीही गंभीर अपघात

मांजात पक्षी अडकल्याने जखमी होऊन खाली कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. हवेत तरंगणारा मांजा दुचाकीवरून जाणाऱ्यांचा चेहरा, गळ्याभोवती आवळला गेल्याने अनेकजण जखमीही झाले आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या ऐश्वर्या निंबाळकर या युवतीच्या चेहऱ्यावर मांजा कापल्याने तिला १२ टाके पडले होते. त्याच महिन्यात वडणत्तील गजेंद्र नरदेकर या तरुणालाही मांजामुळे गंभीर जखमी व्हावे लागले होते.

संयुक्त कारवाई गरजेची

पोलिसांनी यापूर्वी पतंगासाठीच्या घातक मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे पत्र महानगरपालिकेस दिले आहे. प्रत्यक्ष कारवाईवेळी पोलिसांचे सहकार्य राहील, असे सांगितले. मात्र कारवाई झालेली नाही. विक्रेत्यांवर कारवाईसाठी महापालिका, पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

मांजामुळे पक्षी आणि वाहनधारक जखमी झाल्याच्या घटनांच्या फिर्यादी दाखल होत आहेत. विक्रेत्यांवर कारवाईसाठी महापालिकेला पोलिसांचे सहकार्य राहील. मात्र नागरिकांकडूनही दोरा खरेदी करण्यापूर्वीच भान असायला हवे.

- प्रेरणा कट्टे, शहर डीवायएसपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक करून दाखवावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्हा उत्पादक सहकारी उत्पादक संघ (गोकुळ) बहुराज्य (मल्टिस्टेट) नोंदणी करण्यासाठी सेंट्रल रजिस्टर कार्यालयाकडे पाठवलेला ठराव मागे घेत असल्याचे पत्रक चेअमरन रवींद्र आपटे यांनी दिले आहे. त्यानुसार संघाने इतिवृत्त तयार करून सेंट्रल रजिस्ट्रार व राज्य सरकारकडे पाठवावे. ठरावाबाबत त्यांना कायदेशीर अथवा तांत्रिक बाबी उपस्थित करता येणार नाहीत. ठराव न पाठवून उत्पादकांची फसवणूक करायची असल्यास त्यांनी फसवणूक करून दाखवावीच,' असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, 'गोकुळ कृती समितीची बैठकीनंतर आमदार पी. एन. पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना मल्टिस्टेटच्या ठराव रद्द करत असल्याचे सांगितले. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणानंतर सभेला मी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संघाचे चेअरमन आपटे यांनी काढलेल्या पत्रावर विश्वास ठेवला. त्यामुळे संघाला ठरावाबाबत कायदेशीर अथवा तांत्रिक बाबी पुढे करता येणार नाहीत. पत्रक काढण्यापूर्वी त्यांनी वकिलांचा अभिप्राय घेतला नव्हता का? पत्र काढताना त्यांना कोर्टात दावा सुरू आहे, याची माहिती नव्हती का? जर त्यांनी सभेपूर्वी पत्रक काढले नसते, तर माझ्यासह खासदार संजय मंडलिक, आमदार मुश्रीफ ताकदीने सभेला उपस्थित राहिलो असतो. एकदा निर्णय घेतल्यानंतर उत्पादकांमध्ये संदिग्धता ठेवता येणार नाही. सभेमध्ये झालेला ठराव सेंट्रल रजिस्ट्रार व राज्य सरकारकडे पाठवून त्याबाबतचे लेखी निवेदन प्रसिद्ध करावे. फसवणूक करायचीच असे ठरवले असेल तर त्यांनी फसवणूक करावीच. कोणत्याही परिस्थितीत गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय हाणून पाडू. कृती समितीच्या एकाही ठरावधारकांने सभेत गोंधळ केला नाही. मात्र सभेच्या पहिल्या दहा रांगेत बसलेल्या लोकांनी गोंधळ घातला. नेत्यांनी घेतलेला निर्णय त्यांचा समर्थकांना कदाचित रुचला नसेल. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे ठराव रद्द केला असेल,' असा टोलाही त्यांनी लगावला.

'गोकुळ' निवडणुकीत

नवीन मित्र जोडणार का?

गोकुळ निवडणुकीमध्ये नवीन मित्र जोडणार का? या प्रश्नाला बगल देताना ते म्हणाले, 'कृती समितीच्या बैठकीमध्ये गोकुळ मल्टिस्टेट करु नये, यासाठी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार चंद्रदीप नरके, संपतबापू पवार-पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांचे आभार मानले आहेत.' पाटील यांनी दिलेल्या या उत्तराने आगामी गोकुळ संघाची निवडणुकीमध्ये जिल्ह्यात कोणकोणत्या जोडण्या लागणार याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत देवाळे कॉलेज विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत १९ वयोगट मुलींची स्पर्धा करवीर तालुक्यातील देवाळे विद्यालय, ज्युनिअर कॉलेजने जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी शिरोळ संघावर आठ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. संघाची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अंतिम सामन्यात सानिका चिलेने उत्कृष्ट गोलंदाजी करत आठ धावात दोन बळी मिळवले. दीपाली मदने आणि अमृता पोवार यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. उपांत्य सामन्यात संघाने इचलकरंजीतील ए.एस.सी. कॉलेजवर विजय मिळवला. विजयी संघात दीपाली मधणे (कर्णधार), अमृता पोवार, सानिका चिले, सुचिता पाटील, भारती यादव, वैष्णवी चिले, श्रुतिका बुराण, साक्षी पाटील, अपूर्वा गुरुब यांचा समावेश होता. संघास प्रा. समीर घोरपडे यांचे प्रशिक्षण लाभले. तर यु.जी. कोरवी, सी.एस. सुर्वे, प्रा. जी.डी. भोसले, अध्यक्ष डी.बी. पाटील, उपाध्यक्ष आर.डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात उद्यापासून अस्थिरोग परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या वतीने एक ते तीन नोव्हेंबर दरम्यान हॉटेल सयाजी येथे ३६ व्या महाराष्ट्र राज्य अस्थिरोग परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी (ता.१) सायंकाळी सव्वापाच वाजता अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचिती यांच्या हस्ते होणार आहे. दहा वर्षांनंतर कोल्हापूरला परिषद आयोजनाचा बहुमान मिळाला असून, परिषदेत देश-विदेशातील एक हजार अस्थिरोग तज्ज्ञ सहभागी होणार आहेत,' अशी माहिती जिल्हा अस्थिरोग असोसिएशनचे सचिव भरत कोटकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कोटकर म्हणाले, 'परिषदेला शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे. सिंगापूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अँडी. व्ही., डॉ. दिवेकर दाम्पत्य, हैदराबाद येथील डॉ. गुरुवा रेड्डी, मुंबईचे डॉ. हरीश भेंडे, गुजरातचे डॉ. मनीष शहा, डॉ. जवाहर पाचोरे, डॉ. निमिष पटेल, डॉ. प्रकाश दोशी व डॉ. पराग संचिती यांची व्याख्याने, चर्चासत्रे होणार आहेत. तीन दिवसांच्या व्याख्यानांबरोबर अस्थिरोग शस्त्रक्रियांबाबत बदललेले तंत्रज्ञान याची माहिती देण्यात येणार आहे. त्याचा फायदा रुग्णांवर उपचार करताना होणार आहे.'

डॉ. किरण दोशी म्हणाले, 'वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. विशेषत: शस्रक्रिया उपकरांमध्ये बदल झाले आहेत. या उपकरणांची माहिती व मेडिकल क्षेत्रातील प्रोडक्ट परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याचा फायदा कोल्हापूर मेडिकल हब होण्यासाठी करण्यात येणार आहे. परिषदेचा समारोप रविवारी डॉ. संतोष काकडे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.'

पत्रकार परिषदेस राज्य असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन देशपांडे, जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील, डॉ. उमेश जैन, डॉ. अभय शिर्के, डॉ. नचिकेत पाटील, जिनेश्वर कपाले, अमेय गोवईकर उपस्थित होते.

००००

चौकट

डॉ. अनंत जोशींचा सायकल प्रवास

कोल्हापुरात होणाऱ्या अस्थिरोग परिषदेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे डॉ. अनंत जोशी सायकल प्रवासाने दाखल होणार आहेत. परिषदेमध्ये डॉ. जोशी खेळाडूंना होणारे फ्रॅक्चर्स, गुंतागुंतीच्या शस्रक्रिया, गुडघारोपण शस्रक्रिया, दुर्बिनीद्वारे शस्रक्रिया, आदींबाबत माहिती देणार आहेत, असे कोटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाचन संस्कृती वाढविण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकात विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन तयार करण्याची ताकद आहे. जीवनातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी वाचन आवश्यक आहे,'असे मत न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी व्यक्त केले.

येथील न्यू कॉलेजमधील एच. टी. अपराध ग्रंथालय विभाग, समाजशास्त्र विभाग व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील वाचन छंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'चला वाचू या'हा साहित्यविषयक उपक्रम झाला. प्राचार्य पाटील यांनी आजच्या काळात वाचन संस्कृती वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा. अरविंद घोडके यांच्या प्रेरणेतून ५० विद्यार्थ्यांना 'साधना' अंकाचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. घोडके यांनी केले. संयोजन ग्रंथपाल आर. पी. आडाव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवर सामूहिक अत्याचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

रस्त्यावर खेळत असलेल्या आठ वर्षीय मुलीचे अपहरण करून सोमवार इचलकरंजीत चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी चार युवकांना अटक केली असून रोहित गजानन जाधव (रा. गणेशनगर), शुभम नितीन भोसले (रा. कोरोची), सौरभ मकरध्वज माने (जयभीमनगर झोपडपट्टी), शाकिब अब्दुल शेख (रा जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या ३६ तासांत संशयितांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, बुधवारी या सर्व संशयितांना कोर्टात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सोमवारी पहाटेच्या सुमारास लक्ष्मी पुजनानिमित्त पीडित मुलीचे कुटुंबीय जागे होते. पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. फटाके लावून रस्ता पार करीत असतानाच दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी तिचे अपहरण केले. काही क्षणातच मुलगी घरासमोरून गायब झाल्याने कुटुंबीय हादरून गेले. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी तिची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण ती मिळून न आल्याने नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेतली. तपास सुरू असतानाच शिवनाकवाडी परिसरात नागरिकांना एक मुलगी रस्त्यावरून रडत जात असल्याचे आढळून आले. नागरिकांनी तिची विचारपूस केली असता तिने नातेवाईकांचा मोबाइल क्रमांक दिला. त्यावर संपर्क साधून नागरिकांनी मुलीच्या नातेवाईकांना कल्पना दिली. नातेवाईकांनी तातडीने शिवनाकवाडी गाठून मुलीला ताब्यात घेतले. तिला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता अत्याचाराचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेतला.

चोरीची मोटारसायकल, दोघांना लुटले

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून चार संशयितांची नावे निष्पन्न झाली. या चौघानाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणातील चारही संशयित हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून दोन जबरी चोरी, हाणामारी, खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या दिवशीच या चौघांनी मोटारसायकली चोरल्याचा संशय असून त्याचाच वापर केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या चौघांनी थोरात चौक येथे भाजीपाला विक्रेते मारुती शिवाप्पा यंगारे (वय ५७ रा. मंगळवार पेठ) यांना मारहाण करून त्यांच्याकडील ८६०० रुपयांची रोकड आणि मोबाइल हिसकावून नेला. त्यानंतर जुने संजीवनी हॉस्पिटल परिसरात याच चौघांनी सुरेश विष्णू गुरव या वार्पिंग कामगाराला लुबाडले. त्याच्याकडील बोनसची २१ हजाराची रोकड व एक मोबाइल असा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेनंतर त्यांनी मुलीचे अपहरण केले. शिवनाकवाडी परिसरात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले.

पोलिस, सेफ सिटीच्या कर्मचाऱ्यांन बक्षीस

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी १२ पथके तयार केली होती. तसेच कोल्हापूर व इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक यांची पथके, हुपरी पोलिस ठाणे आदी पथके कार्यरत होती. या प्रकरणातील संशयितांना गजाआड करण्यात मोलाची कामगिरी बजावणारे इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा व सेफ सिटी विभागाकडे कार्यरत कर्मचाऱ्यांना ५० हजारांचे बक्षिस पोलिस दलाकडून जाहीर करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशियांतावर ५० दिवसांच्या आत परिपूर्ण दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी दिली. संशयितांवर अपहरणसह 'पोक्सो' अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

संतप्त महिलांचे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

संशयितांना कोर्टात हजर करण्यात येत असताना शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी, राष्ट्रवादी महिला आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांच्यावतीने तीव्र निदर्शने करत संशयितांना चपला दाखविण्यात आल्या. या घटनेमुळे कोर्टाच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस बंदोबस्तात संशयितांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी आदींनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच पोलिस प्रशासनास सूचनाही केल्या.

सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती दुपारनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. नराधमांना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी होऊ लागताच पोलिस प्रशासनानेही घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. या अमानवीय घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले. सर्वच नागरिकांसह विविध पक्ष, सामाजिक संघटना यांच्यावतीने घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे. या प्रकरणातील नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चारही संशयितांना दुपारी पोलिस बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांना संशयितांच्या दिशेने चप्पल उंचावत त्यांचा निषेध नोंदविला. या चौघांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अचानक उडालेल्या या गोंधळाने कोर्टाच्या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर पोलिस बंदोबस्तात संशयितांना बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्तारुढ गटाकडून उत्पादकांची मुस्कटदाबी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळ' मल्टिस्टेट करण्याबाबतचा ठराव रद्द करण्याचे पत्रक सोमवारी (ता.२८) संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी दिले होते. त्यानुसार हा ठराव करताना अन्य विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते. संघाचा भ्रष्ट कारभार लपवण्यासाठी इतर विषयावर चर्चा केली नाही. सत्तारुढ गटाने उत्पादकांची मुस्कटदाबी केली,' असा आरोप गोकुळ बचाव कृती समितीने करत संचालकांच्या कृतीचा समांतर सभेत निषेध केला.

बहुचर्चित गोकुळच्या मल्टिस्टेट ठराव रद्द करणार असल्याचे सत्तारुढ गटाने तीन दिवस अगोदर जाहीर केले असले, तरी इतर विषयावर चर्चा करण्यासाठी गोकुळ कृती समितीचे ठरावधारक मोठ्या संख्येने आले होते. ड्रीम वर्ल्ड येथे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांनी मार्गदर्शन केल्यानंतर सर्वजण सभास्थानी हजर झाले. तासाभरात सभा झाल्यानंतर मल्टिस्टेट ठराव रद्द करत असल्याची घोषणा करण्यात आली. सभा संपल्यानंतर आमदार सतेज पाटील समर्थक 'आमचं ठरलयं, गोकुळ उरलयं' अशा घोषणा देतच सभागृहाबाहेर आले. मात्र अन्य विषयावर चर्चा न झाल्याने त्यांनी सत्तारुढ गटाचा निषेध केला.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, 'विषयाचे वाचन सुरू असताना सत्तारुढ गटाने कृती समितीच्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. संघात सुमारे १५० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. संघातील हा भ्रष्ट कारभार उघड होऊ नये, त्यासाठी ठरावधारकांची मुस्कटदाबी केली. मागील सभेचे प्रोसीडिंग कायम करताना त्याला उपसूचना देण्याची आवश्यकता होती.' नितीन पारखे म्हणाले, 'कायद्यानुसार ठरावधारकांना बोलू दिले नाही. सभासदांच्या हक्कावर सत्तारुढ गटाने गदा आणली असली, तरी निवडणुकीला केवळ पाच महिन्यांचा कालावधी राहिला आहे.' असा इशारा दिला.

निषेध सभेवेळी भैय्या कुपेकर, सचिन चौगुले, अमर पाटील, मधुकर आप्पा देसाई, अमित कांबळे, विद्याधर गुरबे, मधुकर रामाणे, सदाशिव चरापले, विलास साठे, मोहन सालपे, प्रदीप पाटील-भुयेकर आदी आमदार पाटील गटाचे समर्थक उपस्थित होते.

संघाला पोलिस छावणीचे स्वरूप

गेल्यावर्षीच्या सर्वसाधारण सभेचे अनुभव लक्षात घेता. संघाच्या ताराबाई पार्क येथील सभास्थळाचा पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपाधीक्ष डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक संजय मोरे, प्रमोद जाधव, वसंत बाबर, नवनाथ घोगरे, अनिल गुजर यांच्यासह सहा पोलिस व्हॅन, एक फायर फायटर, अॅब्युलन्स यांच्यासह सुमारे २०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते. त्यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

गुलाबी रंगात ठराव

मल्टिस्टेटवरून गेल्यावर्षीच्या सभेत प्रचंड गोंधळ झाला होता. सभेसाठी दिलेल्या प्रवेशावरून वाद निर्माण झाला होता. यावर्षीही ठरावधारक सभासदांना गुलाबी रंगाच्या कागदावर केलेला ठराव घेऊन येण्याची सूचना केली होती. त्यानुसार ठरावधारक येत होते. सभेची वेळ सकाळी ११ असल्याने बाहेरून येणाऱ्या ठरावधारकांची अडचण झाली. सभा तासात अटोपल्याने अनेक ठरावधारक सभा संपल्यानंतरही आत जात होते.

कावणेकरांची आक्षेभार्ह भाषा

समांतर सभा सुरू असताना महाडिक गटाचे प्रताप पाटील-कावणेकर समर्थकांसह बाहेर आले. सभेकडे पाहत त्यांनी आक्षेपाहार्य भाषेचा वापर केला. त्याला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले यांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे काहीकाळ तणावर निर्माण झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबड्डीपटूचा मृत्यू

$
0
0

कबड्डीपटूचा मृत्यू

सातारा : फलटणनजीकच्या शिंदे वस्ती येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी कोमल प्रकाश शिंदे हिचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी दुधाची बादली लोखंडी शेडमधील अँगलला अडकविण्यासाठी कोमल गेली होती. दुधाची बादली लोखंडी अँगलला अडकवित असतानाचा तिला वीजेचा धक्का बसला. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. कोमल कबड्डीपट्टू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाचा बुडून मृत्यू

$
0
0

सातारा : माण तालुक्यातील पळशी येथे मंगळवारी माणगंगा नदी पात्रात चार जण वाहून गेले होते, त्यापैकी तीन जण सापडले असून, तुकाराम खाडे (वय २८) हा युवक वाहून गेला आहे. आपत्कालीन पथक त्याचा शोध घेत आहे. पळशी (ता. माण) येथील अनेक तरुण दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आले आहेत. भाऊबीज झाल्यानंतर चार तरुणांनी माणगंगा नदीपात्रा शेजारी पार्टीचा बेत केला होता. या चार जणांत दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा ही समावेश होता. दुपारी उशीरा पार्टी आटोपल्या नशेत असतानाच काही जणांना नदीच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला. नशेत असल्यामुळे नदीत पोहत ते बुडू लागले.

जयश्री गुजर यांचे निधन

सातारा : सातारा येथील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री जयश्री गुजर यांचे बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, नातवंडे, असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक जयवंत गुजर यांच्या त्या पत्नी होत. त्यांनी अनेक कथा स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू

$
0
0

वीजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू

सातारा :

फलटणनजीकच्या शिंदे वस्ती येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी कोमल प्रकाश शिंदे हिचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी दुधाची बादली लोखंडी शेडमधील अँगलला अडकविण्यासाठी कोमल गेली होती. दुधाची बादली लोखंडी अँगलला अडकवित असतानाचा तिला वीजेचा धक्का बसला, तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

कोमल कबड्डीपट्टू होती.

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकांचे आजपासूनराज्यस्तरीय अधिवेशन

$
0
0

मुख्याध्यापकांचे आजपासून

राज्यस्तरीय अधिवेशन

सोलापूर :

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ५९वे तीन दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन सोलापुरात आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाचे उद्घाटन आज, गुरुवारी दुपारी तीन वाजता ऑर्किड स्कूलमध्ये होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता शोभायात्रा व अधिवेशन ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी व प्रिसिजन उद्योग समुहाचे यतीन शहा व संचालिका सुहासिनी शहा यांच्या हस्ते आणि अधिवेशनाचे अध्यक्ष संभाजीराव पाटील, स्वागताध्यक्ष कुमार करजगी यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. तीन दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज अंगावर पडूनमुलगी मृत्युमुखी

$
0
0

वीज अंगावर पडून

मुलगी मृत्युमुखी

सोलापूर :

बीबीदारफळ येथील समृद्धी संतोष साठे (वय ९) ही मुलगी वीज अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडली. ऐन भाऊबीजे दिवशी समृद्धीचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेली समृद्धी सुट्टी असल्याने आईसोबत शेतात गेली होती. दुपारी साडेतीन वाजता वीजेचा कडकडाट व पाऊस सुरू होता. समृद्धी ज्या झाडाखाली थांबली होती, त्याच झाडावर वीज पडली. वीजेच्या धक्क्याने समृद्धी खाली कोसळली. उपचारासाठी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणगंगा नदीत एक जण वाहून गेला

$
0
0

सातारा :

माण तालुक्यातील पळशी येथे मंगळवारी माणगंगा नदी पात्रात चार जण वाहून गेले होते, त्यापैकी तीन जण सापडले असून, तुकाराम खाडे (वय २८) हा युवक वाहून गेला आहे. आपत्कालीन पथक त्याचा शोध घेत आहे. वाहून जाताना बचावलेल्यांवर म्हसवडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पळशी (ता. माण) येथील अनेक तरुण दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आले आहेत. भाऊबीज झाल्यानंतर चार तरुणांनी माणगंगा नदीपात्रा शेजारी पार्टीचा बेत केला होता. या चार जणांत दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा ही समावेश होता. दुपारी उशीरा पार्टी आटोपल्या नशेत असतानाच काही जणांना नदीच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला. नशेत असल्यामुळे नदीत पोहत ते बुडू लागले. तीन जणांना वाचविण्यात यश आले. मात्र, तुकाराम खाडे यांचा शोध लागला नाही. आपत्कालीन शोध पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे.

...

लेखिका जयश्री गुजर यांचे निधन

सातारा :

सातारा येथील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री जयश्री गुजर यांचे बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, नातवंडे, असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक जयवंत गुजर यांच्या त्या पत्नी होत. त्यांनी अनेक कथा स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती. मुलाच्या निधनानंतर त्यांनी लिखाण बंद केले होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गळफास लावून आत्महत्या

$
0
0

गळफास लावून आत्महत्या

सातारा :

माण तालुक्यातील पाटोळे खडकी गावच्या विवाहित महिला गौरी महादेव जाधव (वय २०) हिने भाऊबीजेच्या सणादिवसी किरकोळ कारणावरून सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्यांना तीन महिन्यांचा लहान मुलगा असून, या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन वर्षांपूर्वी जाशी (ता. माण) येथील गौरी यांच्या पाटोळे खडकी (ता. माण) येथील महादेव आत्माराम जाधव यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्यांचा लहान मुलगा आहे. पती पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करतात. पंधरा दिवसांपूर्वी मार्डी गावच्या यात्रेला येण्यासाठी गौरी हिच्या आईने आग्रह धरला होता. त्यावेळी वती महादेव जाधव यांनी यात्रेला जाण्यासाठी विरोध केला होता, या वरून सासू व जावई यांच्यात शिवीगाळ झाली होती. पती दिवाळीसाठी पुण्यावरून गावी आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. गौरीच्या माहेरच्या लोकांना ही घटना समजताच त्यांनी पाटोळे खडकी येथे धाव घेऊन महादेव जाधव यांना लाथा बुक्क्यांनी मारहान केली. जखमी महादेव जाधव यास सातारा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसखाली झोपलेल्याक्लीनरचा जागीच मृत्यू

$
0
0

बसखाली झोपलेल्या

क्लीनरचा जागीच मृत्यू

सोलापूर :

हॉटेल अॅम्बेसिडर समोरील नाकोडा रेसिडेन्सीजवळ खासगी बस खाली झोपलेल्या क्लीनरच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश वसंत सुरवसे (वय ३८, रा. शिवाजीनगर, बाळे, सोलापूर) असे ठार झालेल्या क्लीनरचे नाव आहे. गणेश सुरवसे मंगळवारी नाकोडा रेसिडेन्सीजवळ लावलेली बस पाण्याने स्वच्छ करीत होता. बस धुवून झाल्यानंतर तो खासगी बस (एमएच ४३ : ४३०७३३) च्या खाली आराम करण्यासाठी झोपला होता. सोलापूर-पुणे धावणारी प्रवासी बस पुण्याकडे जाण्यासाठी चालक दुपारी दीड वाजता गडबडीने बाहेर काढत होता. बस काढत असताना पाठीमागच्या चाकाखाली सापडून गणेश सुरवसे जागीच ठार झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी खासगी बस चालकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून ठोस प्रस्ताव आल्यास पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेऊ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पुनरुक्ती

$
0
0

शिवसेनेकडून ठोस प्रस्ताव आल्यास पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेऊ

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पुनरुक्ती

म. टा. वृत्तसेवा, कराड

'शिवसेना आणि भाजपच्या वाटाघाटी फिसकटल्या आणि शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे ठोस प्रस्ताव ठेवला गेला तर, त्या बाबत पक्षश्रेष्ठींशी निश्चितपणे चर्चा केली जाईल. मात्र, अद्याप आमच्या कोणताही प्रस्ताव आला नाही,' अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

चव्हाण म्हणाले, 'भाजप-शिवसेना एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे स्थिर सरकार देण्याची जबाबदारी त्या दोन्ही पक्षांचीच आहे. सध्यस्थितीत शिवसेना नेते सत्तेतील ५० टक्के वाट्याबाबत बोलत आहेत. तसा फॉर्म्युला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीत ठरल्याचे सेना नेते सांगत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस अशा कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत, असे सांगत आहे. त्यामुळे दोघांपैकी एक जण निश्चितपणे खोटे बोलत आहे.'

महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेने लवकर सरकार स्थापन करून महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यावे. मात्र, दोन्ही पक्षांकडून जाहीरपणे जे बोलणे चालू आहे, त्या वरून काहीतरी अडचण निर्माण झाली आहे, असे दिसते, असेही चव्हाण म्हणाले.

'विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला २५ ठिकाणी फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकी वेळी आम्ही वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करण्यासाठी तयार होतो. आम्ही एकत्र लढलो असतो तर स्वतः प्रकाश आंबेडकर खासदार झाले असते. या शिवाय त्यांचे अन्य सहा ते सात खासदार विजयी झाले असते. वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष वाढीला आमचा विरोध असण्याचे कारणच नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून, विधिमंडळात राहून त्यांनी आपला पक्ष वाढवावा, असेही चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्तिकीनिमित्त विठ्ठल-रुखमाईचे२४ तास दर्शन सुरू

$
0
0

कार्तिकीनिमित्त विठ्ठल-रुखमाईचे

२४ तास दर्शन सुरू

पंढरपूर :

कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी बुधवारी दुपारी देवाचा पलंग निघाला. यामुळे कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना चोवीस तास दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. देवाचे सर्व राजोपचार आजपासून बंद झाले आहेत. पंढरपूरमध्ये आषाढी एवढीच कार्तिकी यात्रा मोठी भरते. त्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक कार्तिकी सोहळ्यासाठी येत असतात. राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने कार्तिकी सोहळ्यासाठी विक्रमी संख्येने भाविक येण्याचा अंदाज आहे. आठ नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा सोहळा होणार आहे. कार्तिक यात्रेसाठी आजपासून सुरू झालेले २४ तास दर्शन व्यवस्था १७ नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे. देवाला या काळात थकवा जाणवू नये यासाठी देवाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीशी कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेनळी घाटात एसटी अपघात

$
0
0

आंबेनळी घाटात एसटी अपघात

सातारा

अक्कलकोटहून महाडकडे जाणाऱ्या एसटी बसला आंबेनळी घाटात अपघात झाला. ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. घाटातून जाणारी बस घसरून घाटातील एका झाडाला बस धडकून थांबली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातात बारा जण जखमी झाले असून, जखमी प्रवाशांना तातडीने पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णलयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघात झाल्यावर जखमी प्रवाशांना इतरांनी सुखरूप बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत महाबळेश्वर येथील अनेक सेवाभावी संघटना, ट्रेकर्स मदत करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images