Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत देवाळे कॉलेज विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत १९ वयोगट मुलींची स्पर्धा करवीर तालुक्यातील देवाळे विद्यालय, ज्युनिअर कॉलेजने जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी शिरोळ संघावर आठ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. संघाची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अंतिम सामन्यात सानिका चिलेने उत्कृष्ट गोलंदाजी करत आठ धावात दोन बळी मिळवले. दीपाली मदने आणि अमृता पोवार यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. उपांत्य सामन्यात संघाने इचलकरंजीतील ए.एस.सी. कॉलेजवर विजय मिळवला. विजयी संघात दीपाली मधणे (कर्णधार), अमृता पोवार, सानिका चिले, सुचिता पाटील, भारती यादव, वैष्णवी चिले, श्रुतिका बुराण, साक्षी पाटील, अपूर्वा गुरुब यांचा समावेश होता. संघास प्रा. समीर घोरपडे यांचे प्रशिक्षण लाभले. तर यु.जी. कोरवी, सी.एस. सुर्वे, प्रा. जी.डी. भोसले, अध्यक्ष डी.बी. पाटील, उपाध्यक्ष आर.डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनाथांचा आधार शिवाजी तरुण मंडळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आई वडिल कोण यांची त्यांना जाणीव नाही, पालक दगावल्याने ही मुले अनाथ झाली आहेत. अशा अनाथ मुलांनी सर्वसामान्यप्रमाणे दीपावली साजरी करावी यासाठी शिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने गेली ३९ वर्षे मुलांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात येते. यंदा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब लाड यांच्या उपस्थितीत मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.

दीपावली म्हणजे काय हे अनाथ मुलांना माहित नसते. पण त्यांना नवीन कपडे देण्याचा पायंडा मंडळाने कायम ठेवला आहे. सहा महिन्याच्या बालकापासून अठरा वयोगटातील मुले आणि मुलींना त्यांच्या आवडी, निवडीनुसार कपडे देण्यात येतात. त्यासाठी महिनाभर अगोदर मुलांकडून ड्रेसची आवड, डिझाईन, रंगाची माहिती घेतली जाते. त्यानुसार कपडे बाजारात शोधून वाटप केले जाते. यंदाही नवनवीन फॅशनचे कपड्यांचे वाटप करण्यात आले.

मंडळाचे उपाध्यक्ष सुहास भेंडे यांनी उपक्रमाची माहिती दिली. बाल संकुलाच्या सदस्या पद्मजा तिवले यांनी मंडळाचे आभार मानले. मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी गणेशोत्सवाच्या वर्गणीतून अनाथ मुलांना कपडे दिले जातात, अशी माहिती दिली. यावेळी संग्राम खवरे, अजिंक्य जाधव, ऋतुराज क्षीरसागर , सेवकराम दुल्हानी, किशोर तांदळ आदी उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप खोत, प्रफुल्ल भेंडे, संदीप सिन्नूर, दत्तात्रय लाड, गणेश वळंजू यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'गेल्या पाच महिन्यापासून काम रेंगाळत असल्याने येथील व्यवसायिक व रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एखाद्या पेठेत असे, काम रेंगाळले असते, तर नागरिकांनी अधिकाऱ्यांना सोडले नसते. नागाळ पार्कवासी सहनशील आहेत. त्यामुळे त्यांची सहनशीलता पाहू नका. काम पूर्णत्वाची डेडलाइन लेखी दिल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही' असा इशारा नागाळा पार्कातील रहिवाशांनी नूतन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांना दिला. त्यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी व महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

कसबा बावडा ते भाऊसिंगजी रोडवरील नागाळा पार्क येथील खानविलकर पेट्रोल पंपाजवळ क्रॉसड्रेनचे काम सुरू आहे. पाच महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात झाली. पण सध्या हे काम बंद आहे. येथील नागरिकांनी अनेकवेळा महापालिका प्रशासनाला काम त्वरीत करण्यासाठी पत्रव्यवहार केला. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दसरा, दिवाळी सणामध्ये येथील व्यवसायिकांचा पूर्ण व्यवसाय ठप्प झाला असून स्थानिक रहिवाशांना घरात प्रवेश करणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी शनिवारी गांधीगिरी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनादरम्यान आमदार जाधव यांच्यासह माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट देवून कामाची पाहणी केली. जाधव यांनी रविवारी सकाळी पुन्हा भेट देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ते १२ वाजता दाखल झाले.

तत्पूर्वी जलअभियंता कुलकर्णी व आर. के. जाधव हे नगरसेवक राहुल चव्हाण यांच्यासह दाखल झाले. आमदार जाधव यांनी पाहणी करत असताना नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पाढा वाचला. कुलकर्णी व ठेकेदार लक्ष्मीकांत शहाणे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. क्रॉसड्रेनसाठी नागाळा पार्ककडून आलेली ड्रेनेज लाइन बंद केल्यामुळे सांडपाणी घरात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. काम कधी पूर्ण होणार त्याची लेखी पत्र देण्याची मागणी केली. अखेर कुलकर्णी यांनी डिसेंबरअखेर काम पूर्ण होईल, असे स्पष्ट केले. पण तसे पत्र देण्याची मागणी नागरिकांनी केली.

'कामाला सुरुवात होण्यापूर्वी येथे काम कधी पूर्ण होणार असा फलक का लावला नाही? केवळ चर्चेचा फड रंगवण्यापेक्षा समस्या निर्गत करा. कामाची संपूर्ण माहिती फलकावर प्रसिद्ध करा' अशी सूचना करत आमदार चंद्रकांत जाधव यांनी बैठक घेण्याची मागणी महापालिका अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर बुधवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक घेऊ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

नगरसेवक संभाजी जाधव, राजाराम गायकवाड, बांधकाम व्यवसायिक उत्तम फराकटे, जगन्नात लिदडे, आप्पासाहेब होडगे, डॉ. बुद्धीराज पाटील, डॉ. दीपक पाटील, अभिजित शिंदे, दिलीप देसाई यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पावसामुळे कामात अडथळा

२४ मे रोजी नागाळा पार्कातील कामाला सुरुवात झाली. जुलैअखेर काम पूर्ण करण्याची मुदत होती. पण संततधार पाऊस आणी सुमारे वीस फूट काळी माती असल्याने कामात अडथळा निर्माण झाला. त्यानंतर आलेल्या महापुरामुळे तर काम ठप्प झाले. सप्टेंबरमध्ये काम सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. पण, त्यानंतर सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे कामाला ब्रेक लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होऊन त्याचा शनिवारी उद्रेक झाला.

फोटो ओळी

नागाळा पार्कातील क्रॉसड्रेनच्या कामाची पाहणी करताना आमदार चंद्रकांत जाधव. यावेळी नगरसेवक राजाराम गायकवाड, संभाजी जाधव, राहुल चव्हाण, दिलीप देसाई, जलअभियंता सुरेश कुलकर्णी आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधायक उपक्रमांनी दिवाळी

$
0
0

कोल्हापूर : निराधार व्यक्तींना दिवाळीच्या कालावधीत इतरांसारखा फराळाचा आस्वाद लुटता यावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पाचगाव येथील स्वाती व सुनील गायकवाड हे दाम्पत्य गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. गेली २० वर्षे ते दिवाळीला दहा व्यक्तींना दिवाळी अंक भेट देतात तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी दहा व्यक्तींना फराळाचा बॉक्स भेट देतात.

गायकवाड पती, पत्नी हे दोघेही पेशाने शिक्षक आहेत. स्वाती गायकवाड या न्यू इंग्लिश स्कूल चंदूर येथे शिक्षिका आहेत. हे दोघे पती, पत्नी दरवर्षी जून महिन्यात गरीब मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत करतात. शिवाय दर महिन्याला एक दिवसाचा पगार गरीब कुटुंबासाठी खर्च करतात. गेल्या वीस वर्षांपासून ते दरवर्षी दिवाळीला दिवाळी अंक दहा लोकांना भेट स्वरुपात देतात. तर दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरातील निराधार व्यक्तींना मिठाईचा बॉक्स व सोबत पाण्याची बाटली देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभेच्छापत्रात सामाजिक विषयांचे प्रतिबिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्याचा जमाना हा सोशल मिडियाचा आहे. व्हॉटसअॅप, ई मेल, एसएमएस, ई कार्डची सध्या चलती आहे. तरीही मनातील भावना एकमेकापर्यंत पोहचविण्याचे व स्नेहीजणांना विविध समारंभाचे औचित्य साधून शुभेच्छा देणाऱ्या शुभेच्छापत्रांचे स्थान वेगळेच आहे. यंदाही मराठी व इंग्रजीतील शुभेच्छापत्रे दिवाळीच्या आनंदाचा दरवळ पसरवित आहेत. दुसरीकडे काही संस्था व व्यक्तींनी शुभेच्छापत्रांतून दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. या शुभेच्छापत्रांत सामाजिक विषयांचे प्रतिबिंबही उमटले आहे.

मनाला भावणारा मजकूर, नेमक्या शब्दांमध्ये आशय आणि आकर्षकरित्या मांडणी यामुळे काही वर्षापूर्वी शुभेच्छापत्रांना पहिली पसंती होती. गेल्या काही वर्षात सोशल मिडिया प्रभावी ठरला. तरीही दिवाळी, वाढदिवसाला शुभेच्छापत्रे पाठविणाऱ्यांचीही संख्या आहे. दिवाळी सणानिमित्त भेटवस्तू विक्रीच्या दुकानात सध्या लहानमोठ्या आकारातील शुभेच्छाकार्डे उपलब्ध आहेत.'आपल्या जीवनात उत्साहाने फुललेली आणि आनंदाने बहरलेली दिवाळी असो' या आशयाच्या, आकर्षक डिझाइनमधील शुभेच्छापत्रे भुरळ घालत आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील भेटवस्तू विक्री दुकानाचे मालक किरण सावंत म्हणाले, 'तंत्रज्ञान आणि सोशल मिडियाचा शुभेच्छापत्रांच्या खरेदी विक्रीवर परिणाम झाला आहे. पूर्वीसारखी आता शुभेच्छापत्रांची देवघेव होत नाही. आजही काहीजण वाढदिवस, सण समारंभ असला की जवळच्या व्यक्तीला हमखास शुभेच्छापत्रे पाठवितात.'

...

खंडपीठाच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी शुभेच्छापत्रातून खंडपीठाच्या रखडलेल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी शुभेच्छापत्रातून कोल्हापूरला खंडपीठाची गरज, खंडपीठासाठी कृती समितीने दिलेला लढा, मुंबईपर्यंतचा पाठपुरावा याकडेही लक्ष वेधले आहे. तसेच बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांनी सुरू केलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला आहे. तसेच महापुराच्या कालावधीत नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदत कार्याचाही उल्लेख केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाचन संस्कृती वाढविण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकात विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन तयार करण्याची ताकद आहे. जीवनातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी वाचन आवश्यक आहे,'असे मत न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी व्यक्त केले.

येथील न्यू कॉलेजमधील एच. टी. अपराध ग्रंथालय विभाग, समाजशास्त्र विभाग व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील वाचन छंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'चला वाचू या'हा साहित्यविषयक उपक्रम झाला. प्राचार्य पाटील यांनी आजच्या काळात वाचन संस्कृती वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा. अरविंद घोडके यांच्या प्रेरणेतून ५० विद्यार्थ्यांना 'साधना' अंकाचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. घोडके यांनी केले. संयोजन ग्रंथपाल आर. पी. आडाव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीचे पर्यटन बहरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्याने छोटेखानी, तीन ते पाच दिवसांच्या सहलीसाठी पर्यटनस्थळांची निवड पर्यटक करीत आहेत. राज्याबाहेर पर्यटनासाठी बुकिंग होत असून यंदाच्या दिवाळी सुट्टीत बुकिंगमध्ये १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विधानसभेची निवडणूक नुकतीच आटोपल्याने कोल्हापूरकर सध्या विश्रांती आणि सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा तिकीट महागले असूनही त्याचा परिणाम पर्यटनाच्या बुकिंगवर झाल्याचे दिसून येत नाही. देशांतर्गत पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापुरातून स्थानिकांनी गोवा आणि कोकणात पर्यटनासाठी प्राधान्य दिले आहे. बाहेरून आलेल्या पर्यटकांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, ज्योतिबा, पन्हाळा आणि पुढे कोकण, गोव्याला जाण्याचा बेत आखला आहे. अंबाबाई मंदिरासमोरील विद्यापीठ हायस्कूलजवळील महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या नोंदणी कार्यालयात चौकशी आणि बुकिंगसाठी गर्दी होत आहे. कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, पावस या ठिकाणांना प्राधान्य दिले जात आहे. तर स्थानिक पर्यटकांनी गोवा, केरळ, महाबळेश्वर, तिरुपती, भंडारदरा, आंबोली, माथेरान या नेहमीच्या आवडत्या ठिकाणाबरोबरच अंदमान आणि निकोबारला जाण्याचे नियोजन केले आहे. स्थानिक बुकिंग कंपन्या सहलीवर आकर्षक सवलती देत आहेत. अनेकांनी १५ ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत देणारी पॅकेजेस आणली आहेत.

जंगल टुरिझमकडे कल

समुद्र किनारे, थंड हवेच्या ठिकाणांबरोबरच जंगल पर्यटनाला छोट्या पर्यटकांची पसंती मिळत आहे. वन्यजीवांबद्दल वाढलेल्या आकर्षणामुळे जंगल सफारीची मागणीही वाढली आहे. पावसाळ्यानंतर अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यामुळे ताडोबा, नागझिरा, पेंच या राज्यातील तर परराज्यातील कान्हा, रणथंबोर, बांधवगड, काझीरंगा या अभयारण्यांच्या जंगल सफारींचे बुकिंग सुरू आहे. हिवाळा हा हंगाम भटकंतीसाठी सुखकर असल्याने जंगल भटकंतीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे असल्याचे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

यंदाच्या दिवाळीत दरवाढ होऊनही पर्यटन बुकिंग तेजीत आहे. पावसाने उघडीप दिल्याने पर्यटकांनी आठ दिवसांहून अधिक कालावधीच्या सहलींचे नियोजन केले आहे. कोकण पर्यटनासाठी स्थानिक वाहतूक संघटनांच्या माध्यमातून वाहन उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान, यंदाचा पर्यटन हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. राज्याबाहेर कुटुंबीयांसह सहलीसाठी जाण्याकडेही कल आहे.

- अक्षय आगवेकर, कर्मचारी पर्यटन सेवा देणारी कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीच्या उमेदवारांचा शरद पवारांमुळे पराभव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तयार केलेल्या लाटेमुळे महायुतीसह माझा पराभव झाला' असे शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. 'पक्षातील कोणी ऐरागैरा मला पराभूत करू शकत नाही' असे त्यांनी सांगितले. नागाळा पार्कातील खानविलकर पेट्रोलपंप परिसरातील रखडलेल्या क्रॉसड्रेनच्या कामासाठी केलेल्या आंदोलनावेळी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते.

माजी आमदार क्षीरसागर म्हणाले, 'पक्षातील विरोधकांचे काम विरोध करण्याचेच आहे. पक्षातील विरोधकांकडे मी फारसे लक्ष देत नाही. कामाच्या जोरावर मला दोनवेळा आमदारकी मिळाली. त्यामुळे पुन्हा जनतेच्या कामासाठी रस्त्यावर येणार आहे. मााझा पराभव झाला असला, तरी राज्यात महायुतीचे सरकार आले असून नियोजन मंडळाच्या माध्यमातून जनतेचे काम सुरू राहील.'

'पवार यांना ईडीने पाठवलेली नोटीस आणि सातारा येथे मुसळधार पावसात झालेल्या सभेमुळे पवारांची लाट निर्माण झाली. या लाटेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये माझाही समावेश असला, तरी माझे मताधिक्य कमी आहे. पक्षातील विरोधकांनी प्रामाणिक काम केले नसले, तरी मित्रपक्षाने चांगले काम केले' असेही क्षीरसागर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किल्ल्यांच्या प्रतिकृतीला बालचमुंची पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीपूर्वी आलेल्या परतीच्या पावसाने किल्ले तयार करण्यात मग्न असणाऱ्या बालचमुच्या आनंदावर विरजण पडले. मात्र, त्यातूनही मार्ग काढत बालचमुंनी तयार किल्ल्यांच्या प्रतिकृती घेऊन आपला आनंद द्विगुणित केला. किल्ला, कमान, मावळे, उंट, हत्ती घोडे, तोफा अशा साहित्यांनी सजलेल्या किल्ले अनेकांना आकर्षित करत आहेत.

दिवाळीची चाहूल लागण्यापूर्वी बच्चे कंपनी किल्ला तयार करण्यासाठी आतूर झालेले असतात. सहामाही परीक्षा संपून सुट्यांना सुरुवात झाली मुलांचा मेळा प्रत्येक घराच्या अंगणात जमतो. रायगड, राजगड, शिवनेरी, पन्हाळा, विशाळगड, तोरणा आदी शिवरायांनी उभारलेल्या गडांच्या प्रतिकृती हे बालचमू तयार करत असतात. पण, यावर्षी परतीच्या पावसामुळे अनेकांना किल्ले बनवण्याचा आनंद घेतला नाही. भर पावसातही अनेक मुलांनी किल्ले तयार केले. दगड, विटा, माती त्याला रंगरेषांची जोड देत अनेक किल्लांच्या प्रतिकृती तयार केल्या.

ज्यांना पावसामुळे किल्ले तयार करता आले नाहीत, त्यांनी तयार प्रतिकृती आणून आनंद साजरा केला. शंभर रुपयांपासून तब्बल दोन हजार रुपयांचे किल्ले खरेदी करण्यासाठी मिरजकर तिकटी, गंगावेश, महाद्वार रोड येथील मुलांनी पालकांसह गर्दी केली होती. ढाल-तलवार घेतलेले मावळे, हत्ती, उंट, सिंह यांच्याबरोबर आकर्षक बुरुज आणि तटबंदीही विक्रीसाठी उपलब्ध होती. छत्रपती शिवरायांची सिंहासनरुढ व अर्ध पुतळा मुले खरेदी करत होते. दरवर्षी मुलांनी तयार केलेल्या किल्ल्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी अशा स्पर्धा नाहीत. तरीही शहराच्या विशेषत: पेठांमध्ये विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहक, चालकांसोबत फराळामुळे वाढला गोडवा

$
0
0

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांनाही मिळाला फराळ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एसटी महामंडळाला नोकरीला असलेल्या वाहक, चालकांना सणासुदीला कामानिमित्त कटुंबांपासून दूर राहावे लागते. अशा चालक, वाहकांसाठी कोल्हापूर आगारतर्फे दिवाळीनिमित्त सामूहिक फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये आगार व्यवस्थापकापासून अन्य कर्मचारी सामील होतात. एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा गोडवा आणखी वृद्धीगंत होतो. प्रवाशांच्या सेवेत आनंद शोधणाऱ्या वाहक, चालकांनी दिवाळीही गोड झाली.

बाहेरील आगारातून १२५ हून अधिक चालक, वाहक हे मुक्कामी गाडी घेऊन कोल्हापुरात दाखल होते. आगार व्यवस्थापनतर्फे अशा वाहक, चालकासाठी अभ्यंगस्थानाचे आयोजन केले होते. त्यांच्यासाठी गरम पाणी, साबण, सुवासिक तेल पुरविले होते. पहाटे पाच वाजता अभ्यंगस्थान झाले. दिवाळी सणानिमित्त आगारात कर्मचाऱ्यांची लगबग सुरूह होती. अभ्यंगस्नानानंतर सकाळी सामूहिक फराळाचा कार्यक्रम झाला.

आगार व्यवस्थापक अजय पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक दयानंद पाटील, स्थानकप्रमुख सागर शिंगाडे, वाहतूक नियंत्रक दिपक घारगे, रवींद्र कदम, प्रतिक शिंदे, इफरान सांगावकर, आय. एस. मुजावर, बी. आर. साळोखे, वाहतूक निरीक्षक श्रीधर वनमोरे, राजेंद्र भोसले आदींनी वाहक, चालक व कर्मचाऱ्यांसमवेत फराळाचा आस्वाद घेतला. सामूहिक फराळासोबतच बसस्थानक परिसरातील प्रवाशांना फराळ वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता हीच आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी सणानिमित्त सर्वत्र मंगलमय वातावरण असताना महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य बजावूनच दिवाळी साजरी करतात. लक्ष्मीपूजनाची एकच दिवसाची सुटी घेऊन स्वच्छतेचे नियमित काम करीत त्यांनी आपली दिवाळी साजरी केली. त्यांच्या या कामाचे कौतुक नेहमीच केले जाते.

महापालिकेकडे सुमारे १५०० झाडू व स्वच्छता कर्मचारी आहे. स्वच्छता ही अत्यावश्यक सेवा असल्याने स्वच्छता कर्मचारी नियमितपणे आपले कर्तव्य बजावत असतात. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अनेक इतर सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सलग तीन ते चार दिवस सुटी असते. मात्र महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केवळ एक दिवस सुटी मिळते. दिवाळीच्या मुख्य दिवसाची सुटी घेतल्यानंतर हे सर्व कर्मचारी सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत शहरातील प्रत्येक भाग स्वच्छ करत असतात. अनेक कर्मचारी एकाच भागात असल्याने तेथील नागरिकांसोबत त्यांचे ऋणानुबंध तयार झालेले असतात. त्यामुळे अनेक कर्मचारी आपल्या कर्तव्यात कधीही कसर सोडत नाहीत. त्याची खुशालीही त्यांना अशा सणांच्या माध्यमातून मिळत असते. आपले काम पूर्ण केल्यानंतर ते दुपारनंतर कुटुंबासमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. सणासुदीच्या दरम्यान त्यांच्याकडून केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपक्षांनी आणले युती-आघाडीला जेरीस

$
0
0

Mahesh.Patil@timesgroup.com

Tweet@Maheshp_MT

कोल्हापूर : अत्यंत अटीतटीने आणि ईर्ष्येने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील चार मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी भाजप-सेना महायुतीसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना जेरीस आणले. काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले माजी आमदार प्रकाश आवाडे आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी संघटनकौशल्य, आपल्या गटाच्या प्रचंड ताकदीवर विजय मिळवला. कागल मतदारसंघात अपक्ष उमेदवार समरजित घाटगे तर चंदगड मध्ये शिवाजी पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर राधानगरी, चंदगड मतदारसंघातही पक्षांच्या उमेदवारांची अपक्षांमुळेच दमछाक झाली.

जिल्ह्यातील दहा मतदारसंघात एकूण ५१ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सर्वाधिक चंदगड मतदारसंघात ९ तर सर्वात कमी एकच अपक्ष उमेदवार करवीर मतदारसंघात होता. चंदगडपाठोपाठ हातकणंगले आणि इचलकरंजी मतदारसंघात प्रत्येकी ८, राधानगरीमध्ये ७ तर शाहूवाडीत ६ अपक्ष रिंगणात होते. शिरोळमध्ये ४ तर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन मतदारसंघात प्रत्येकी ३ अपक्ष होते. कागल मतदारसंघातही दोन अपक्ष उमेदवारांनी टक्कर दिली.

'इचलकरंजी'मध्ये माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी १ लाख १६ हजार ८८६ मते मिळवत बाजी मारली. भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे उमेदवार राहुल खंजीरे यांना अवघी ७२६२ मते मिळाली. मतदारसंघात आणखी सात उमेदवार अपक्ष होते. मात्र, गटाची ताकद आणि हाळवणकर यांच्याविरोधातील नाराज मते यांची बेरीज करीत आवाडे यांनी मैदान मारले.

'शिरोळ'मध्ये निवडणूक रिंगणातील चार अपक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बाजी मारली. यापूर्वी अपयश पदरी पडलेले पाटील हे शिक्षण आणि सहकारातील विविध संस्थांच्या जोरावर मतदारांच्या संपर्कात राहिले. आघाडी अंतर्गत जागा स्वाभिमानीच्या वाट्याला गेल्यावर बंडखोरी करत निवडणूक लढवलेल्या पाटील यांनी ९० हजार ३८ मते मिळवली. शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्यासह आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार अनिल मादनाईक यांनाही त्यांनी पराभव केला. उल्हास पाटील यांना ६२ हजार २१४ तर मादनाईक यांना ५१८०४ मते मिळाली. येथे आणखी एक अपक्ष उमेदवार प्रमोददादा पाटील यांनाही २८२१ मते मिळाली.

नऊ अपक्षांच्या भाऊगर्दीने 'चंदगड'मध्ये अटीतटीची लढत झाली. मतदारसंघात तब्बल १४ उमेदवार होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील यांना अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी झुंजवले. त्यामुळे वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील हे तिसऱ्या तर शिवसेनेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. राजेश पाटील यांना ५५५५८ तर अपक्ष शिवाजी पाटील यांना तब्बल ५११७३ मते मिळाली. मतदारसंघातील अन्य अपक्ष उमेदवारांपैकी रमेश रेडेकर यांना १० हजार १३३ तर अनिरुद्ध रेडेकर यांना ५१३३ मते मिळाली. येथे राजेश पाटील यांना ४३८५ एवढे मताधिक्य मिळाले. रेडेकर, पाटील यांनी घेतलेली मते पाहता शिवसेनेचा फटका बसल्याचे स्पष्ट होते.

अशीच स्थिती कागल मतदारसंघात झाली. शिवसेनेकडे मतदारसंघ गेल्याने पुणे 'म्हाडा'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या समरजित घाटगे यांच्यामुळे सेनेचे उमेदवार संजय घाटगे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. समरजित यांना ८८ हजार ३०३ तर संजय घाटगे यांना ५५ हजार ६५७ मते मिळाली. गटाची मते, भाजपकडून छुपी रसद मिळालेल्या समरजित यांच्यामुळे शिवसेनेला चांगलाच फटका बसला.

राधानगरी मतदारसंघात तब्बल सात उमेदवार होते. त्यापैकी अपक्ष उमेदवार अरुण डोंगळे, राहुल देसाई आणि चंद्रकांत पाटील कौलवकर यांनी घेतलेली मते पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार के. पी. पाटील यांना बसलेला फटका बसल्याचे दिसून येते. गोकुळचे संचालक असलेल्या डोंगळे यांना १५ हजार ४१४, भाजपमधून बंडखोरी केलेल्या राहुल देसाई यांना १२ हजार ८९५ मते मिळाली. चंद्रकांत पाटील यांना ८ हजार ९३ मते मिळाली. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांना १८ हजार ३२६ इतके मताधिक्य मिळाले. 'हातकणंगले'मध्येही आठ अपक्ष रिंगणात होते. त्यापैकी माजी आमदार राजीव आवळे यांना ६७११ मते मिळाली. अन्य अपक्षांना तीनअंकी मते मिळवता आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचा धोका वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यासह जिल्ह्यात ऑक्टोबर महिना संपत आला तरी पावसाचे प्रमाण कमी झालेले नसल्याने साथीच्या आजारांचा जोर वाढत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर याकाळात राज्यात स्वाइन फ्लूमुळे २३९ मृत्यू झाले आहेत. तर कोल्हापूरमध्ये २३ रुग्णांचा बळी गेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद पुण्यात झाली आहे, दहा महिन्यांत पुण्यात ५२ रुग्णांचा बळी गेला आहे. तर कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे स्वाइन फ्लू वेगाने पसरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा जानेवारीपासून राज्यात २२५९ स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूरमध्ये २४४ संशयित रुग्ण होते. त्यापैकी ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मुंबईत ६४२ रुग्ण, नागपूरमध्ये ३७५, नाशिकमध्ये ३२८, ठाणे १२९ आणि पुणे पालिका क्षेत्रात १७३ रुग्णांची नोंद झाली आहे. याखेरीज नागपूरमध्ये ४४, नाशिकमध्ये ३३ आणि मुंबईत २२ जणांचा मृत्यू ओढावला आहे.

याविषयी, राज्याचे साथरोग अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, या आजारास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या आजाराची लक्षणे रुग्णांमध्ये दिसल्यास त्यास तत्काळ औषधोपचार केले जात आहेत. नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. स्वाइन फ्लूचे उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा उशिराने उपचार सुरु करण्याचे निरीक्षण आढळून येते. त्यामुळे रुग्णांनी प्राथमिक लक्षणे आढळल्यावर त्यावर त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

नागरिकांनी स्वत:हून काळजी घ्यावी

सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. स्वाइन फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वत:हून काळजी घेतली पाहिजे. कोणताही आजार वाढू नये आणि त्याचा संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहेत. तीव्र घसादुखीचा त्रास होत असेल, घशाला सूज आली असेल आणि ताप ३८ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर अशा अतिजोखमीच्या रुग्णांचा (गरोदर माता, उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, कर्करोग, दमा असे विकार असणाऱ्या व्यक्ती) स्वॅब घेऊन त्याची तपासणी आवश्यक आहे. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावा. फ्लूवरील उपचार ४८ तासांच्या आत सुरू झाल्यास ते अधिक गुणकारी ठरतात. फ्लू प्रतिबंधक लस घेतल्याने संभाव्य धोका टळतो. विशेषत: गरोदर माता, मधुमेह, अथवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि स्थूल व्यक्ती यांनी ही लस घेणे आवश्यक आहे.

हवामानातील बदलामुळे सातत्याने साथीच्या आजारांना पोषक वातावरण मिळत आहे. स्वाइन फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारच्यावतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसतात तातडीने उपचार घेण्यास प्राधान्य द्यावे. वेळेत उपचार मिळाल्यास आजाराची तीव्रता कमी करता येते.

- डॉ. प्रदीप आवटे, राज्याचे साथरोग अधिकारी

कोल्हापूर जिल्हा स्वाइन फ्लू (जानेवारी २०१९पासून)

स्क्रिनिंग ८६७

प्रगतीपर १ लाख ५७ हजार ६६

एकूण संशयित २४४

एकूण पॉझिटिव्ह ८१

एकूण मृत्यू २३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरीमुळे जागा घटल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप आणि शिवसेनेमध्ये बंडखोरीमुळे दोन्ही पक्षाच्या जागा घटल्या अशी कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष, चंद्रकांत पाटील यांनी दिली. युतीला वीस जणांनी पाठिंबा दिल्याने राज्यात भाजप-शिवसेना युतीचेच राज्य स्थापन होणार, असा दावाही त्यांनी केला. भाजपची पिछाडी झाली हा डांगोरा पिटला जात असून तो चुकीचा आहे असेही पाटील म्हणाले.

कोथरुड विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर प्रदेशाध्यक्ष आज दीपावलीनिमित्त कोल्हापुरात आले होते. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. 'उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वाविरुद्ध राजकारण करणार नाहीत,' असा दावा करत प्रदेशाध्यक्ष म्हणाले, 'काँग्रेसवाले राजकारण करून अनेकांना बाद करतात. अशा लोकांबरोबर शिवसेना जाणार नाही. उद्धव ठाकरे हे समंजस आहेत. युती झाल्यावर दोन्ही पक्षातील लोकांचा सन्मान राखण्याचे होईल. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युल्याबाबत मला काहीही माहीत नाही. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच सरकार स्थापन करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील.'

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, 'गेल्या पंधरा वर्षांत भाजपने पश्चिम महाराष्ट्रात बांधणी केल्याने २०१४मध्ये आम्हाला घवघवीत यश मिळाले. केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आम्ही महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूकीत यश मिळवले. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतही भाजपने दणदणीत विजय मिळवला. पण विधानसभा निवडणूकीतील यशाबद्दल आम्ही चिंतेत आहोत. भाजपच्या जागा घटल्या असल्या तरी गेल्यावेळच्या तुलनेत कमी जागा लढवून आमचा स्ट्राइक रेट ४४ टक्के आहे. राज्यात सर्वात जास्त भाजपला एक कोटी ४१ लाख १७ हजार ९०३ मते पडली आहेत.'

प्रदेशाध्यक्ष म्हणाले, 'आमच्या १०५ जागा आल्या असून आणखी २० जण जोडले गेले आहेत. काँग्रेसच्या फक्त पाच तर राष्ट्रवादीच्या १३ जागा वाढल्या आहेत. त्यांच्या जागा बंडखोरीमुळे वाढल्या आहेत. युतीच्या १६१ जागा असून आणखीन वीस आमदारांनी पाठिंबा दिल्याने १८१ संख्याबळ झाल्याने महायुतीची सत्ता येणार आहे.'

कोल्हापूरकरांनो काय चुकले?

'गेली पाच वर्षे आम्ही चांगले काम करुनही नेमके आमचे काय चुकले हे जनतेने सांगावे?' असा प्रश्न करत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेतील बंडखोरीने जिल्ह्यातील जागा घटल्याची कबुली दिली. बंडखोरी रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. पण निवडणूक संपल्याने आम्ही काहीच करू शकलो नाही. बंडखोरावर कारवाई करण्यात येईल,' असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ ची सभा वादळी ठरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सर्वसाधारण सभा बुधवारी (ता.३०) होणार असून मल्टिस्टेट ठरावाबाबत विरोधकांकडून विचारणा होणार आहे. सभेतील रणनिती ठरवण्यासाठी सोमवारी आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.

'गोकुळ'च्या सभेत गतवर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटच्या ठरावाला आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पवार यांनी विरोध केला. सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने मोठा राडा झाला. सभेत चप्पलफेकही झाली. अवघ्या तीन मिनिटात घाईगडबडीत गुंडाळली. मल्टिस्टेटचा फटका लोकसभेत राष्ट्रवादीला बसला. दूध उत्पादक मल्टिस्टेटच्या विरोधात असतील तर मी त्यांच्यासमवेत अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली. पण गोकुळचे नेते पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेराव महाडिक यांनी मल्टिस्टेटमुळे दूध संघ खासगी होणार नसून तो दूध उत्पादकांचा राहील, अशी भूमिका घेतली.

लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघात मल्टिस्टेटचा प्रश्न पुढे आला होता. निवडणूक संपल्यानंतर गोकुळची सभा होत असून या सभेत मल्टिस्टेटवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. सभेमध्ये गेल्यावर्षीचे प्रोसिडिंग मंजूर करण्याचा ठराव पहिल्या क्रमांकावर आहे. या सभेत मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाला आहे का, अशी विचारणा विरोधकांकडून होणार आहे. त्यासाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी सोमवारी आमदार पाटील आणि मुश्रीफ कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. सभेदिवशी रमणमळा वॉटरवर्ल्ड येथून सभेला जाण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे.

सभेच्या पार्श्वभूमीवर ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयाबाहेर मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. तसेच सभेत दूध उत्पादकाव्यतिरिक्त अन्य कुणी घुसू नये यासाठी पत्र्यांची सरंक्षण भिंत उभारण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेत विधानसभेला निवडून आलेले गोकुळचे नेते पी.एन. पाटील आणि संचालक राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत पी.एन आणि सतेज पाटील यांनी एकत्रित प्रचार करुन कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर मतदारसंघात काँग्रेसला एकहाती विजय मिळवून दिला. त्यामुळे पाटील यांच्या सत्काराच्यावेळी गोंधळ उडू नये यासाठी पी.एन. समर्थकांकडूनही तयारी सुरू आहे. मल्टिस्टेटला विरोध करणारे चंद्रदीप नरके यांच्या कुंभी कासारी साखर कारखान्याची सभा गुरुवारी (ता.३१) होणार आहे. त्यामुळे नरके गोकुळच्या सभेला उपस्थित राहणार का याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. एकदंरीतच गेल्या वर्षाप्रमाणेच गोकुळच्या सभेत मल्टिस्टेट प्रश्नावर उकळी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

.......

प्रकरण न्यायप्रविष्ठ ...

मल्टिस्टेटच्या प्रश्नावर विरोधक कोर्टात गेले आहेत. त्यावर अद्याप सुनावणी सुरू असून कोर्टाने कोणताच निर्णय दिलेला नाही. मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी संचालक मंडळाकडून सभेत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रदेशाध्यक्षांकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीच्या पराभवाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दीपावलीदिवशीच पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील अमल महाडिक यांचा पराभव पाटील यांच्या जिव्हारी लागला असून बूथनिहाय मतदानाचा आढावा घेतला जाणार असल्याने पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पुण्यातील कोथरुड मतदारसंघातील विजयानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील पहिल्यांदा कोल्हापुरात आले. मात्र रेल्वे स्टेशनवर त्यांच्या स्वागताला एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील तडक नाळे कॉलनीतील बंगल्यावर आले. दीपावलीचे अभ्यंगस्नान झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी आले होते. बुके घेऊन आलेल्या पदाधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी कानउघाडणी केली. त्यांनी स्वीय सहाय्यकालाही झापले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासह सर्व मतदारसंघांत पदाधिकाऱ्यांकडून प्रचारात ढिलाई झाल्याबद्दल त्यांनी कानउघाडणी केली. पाटील यांचा रुद्रावतार पाहून पदाधिकारी बंगल्याबाहेर थांबून होते. नंतर दीपावली शुभेच्छा देण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्ते आले. पाटील यांचा राग शांत झाल्यानंतर त्यांनी नियोजनाप्रमाणे कार्यक्रम पूर्ण केले. कानउघाडणी केलेले कार्यकर्ते त्यांच्यासोबत दिवसभर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाशांनी उजळल्या दाहीदिशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आकाशकंदिलाचा झगमगाट, पणत्यांचा शीतल प्रकाश आणि सायंकाळनंतर फटाक्यांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत अशा उत्साही वातावरणात आणि थाटात लक्ष्मी आणि कुबेर पूजन झाले. घरोघरी आणि दुकानामध्ये विधीवत लक्ष्मी पूजनमुळे सर्वत्र मांगल्यमय वातावरण निर्माण झाले होती. बच्चे कंपनीसह मोठ्यांनीही फटाके उडवित दिवाळी सणाचा आनंद लुटला.

रविवारी सायंकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत पूजेचा मुहूर्त होता. या कालावधीत पूजेची सर्वत्र एकच लगबग पाहावयास मिळाली. दुकानदारांनी दुकानांची आकर्षक सजावट केली होती. विद्युत रोषणाईच्या माळा, कागदी पताकांची सजावट केल्यामुळे परिसराचे सौंदर्य उजळले. पूजाविधीनंतर गूळ, लाह्या, बत्तासे व मिठाईचे वाटप करुन सणाचा गोडवा वाढविला.

दीपावली सणाचा रविवारचा दिन हा लक्ष्मीपूजनाचा दिवस. अश्विन अमावस्या, नरकचतुर्थी आणि कुबेर व लक्ष्मीपूजन असल्यामुळे सकाळपासूनच घरोघरी लगबग होती. महिला वर्गांची तर एकच धांदल सुरू होती. घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. हाराफुलांनी व पानाच्या तोरणांनी प्रवेशद्वार सजविले होते. आकाशकंदिल, रोषणाईच्या माळांनी सौंदर्यांत आणखीन भर पडली. अभ्यंगस्नान उरकल्यानंतर फराळाचा आस्वाद, एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव यामुळे सणाची लज्जत वाढली.

दुपारनंतर घरोघरी आणि बाजारपेठेत लक्ष्मीपूजन व कुबेर पूजनाच्या तयारीने वेग घेतला. पूजेसाठी आवश्यक साहित्यांनी बाजारपेठ बहरली होती. झेंडूची फुले, हार, पूजेसाठी आवश्यक पाच फळांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. पन्नास ते साठ रुपये प्रति किलो या दराने झेंडूची विक्री झाली. महद्वार रोड, ताराबाई रोड, गंगावेश, रंकाळा बस स्थानक परिसर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शिवाजी रोड, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी यासह शहरातील सगळ्या बाजारपेठ ग्राहकांनी फुलल्या होत्या.

सायंकाळी सहानंतर पूजेचा मुहूर्त होता. घरोघरी पूजेचा थाट सुरू होता. नवीन कपडे, दागिने घालून लक्ष्मी पूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजन झाल्यावर लहान मुलांनी फटाके उडवित आनंदोत्सव साजरा केला. शहरातील लहानसहान विक्रेत्यांनी, दुकानदारांनी सायंकाळनंतर व्यवहार कमी करत दुकानाच्या सजावटीवर भर दिला. लक्ष्मीपूजनासोबतच वह्या, खाते पुस्तकाचे पूजन केले. तसेच सुखसमृद्धीसाठी प्रार्थनाही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात युतीचा पराभव मंडलिकांमुळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना उमेदवारांच्या पराभावाचे खापर शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिकांवर फोडले. लोकसभा निवडणुकीतील पैरा फेडण्यासाठी मंडलिकांनी महायुतीच्या विरोधात काम केले असून शिवसेनेतील निष्ठावंतांनी त्यांना शिवसेनेचे कल्चर समजवण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.

प्रदेशाध्यक्ष पाटील रविवारी दीपावलीनिमित्त कोल्हापुरात आले होते. त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रा.मंडलिक यांना लक्ष्य केले. शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पैरा फेडण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेमुळे युतीत ठिणगी पडली. त्यांच्या कृतीमुळे भाजपमध्येही प्रतिक्रिया उमटली. पण आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना युती धर्माचे पालन करायचे आहे, असे सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रचार केल्याचा दावा पाटील यांनी केला.

पाटील म्हणाले, 'मंडलिकांनी आपले मेव्हुणे राजेश पाटील यांच्यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करुन शिवसेनेविरोधात काम केले. कागल विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील पैरा फेडला. लोकसभा निवडणुकीत मंडलिकांना मिळालेले मताधिक्य कुठे गेले? गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय घाटगे यांना एक लाख चार हजार मते पडली असताना यावेळी केवळ ५० हजार मते कशी पडतात हे मंडलिकांनी स्पष्ट करावे. कोल्हापूर उत्तरमध्ये त्यांनी राजेश क्षीरसागरांच्या विरोधात प्रचार केला. राधानगरी मतदारसंघात मात्र ते लोकसभा निवडणुकीत मदत केलेल्या आमदार प्रकाश आबिटकरांच्या पाठीशी राहिले. त्यामुळे आबिटकर वगळता कोल्हापूर दक्षिण, कागल, चंदगड, कोल्हापूर उत्तरमध्ये युती पराभूत झाली. शिवसेनेतील निष्ठावंत राजेश क्षीरसागर, विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांनी शिवसेना बळकट करावी. प्रत्येक निवडणुकीत याला निवडून आणायचा, याला पाडायचा ही वृत्ती खासदारांनी बंद केली पाहिजे. शिवसेनेचे कल्चर काय असते हे त्यांना नेतृत्वाने सांगितले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत पेटाळा येथे झालेल्या आमदार क्षीरसागर यांच्या प्रचाराच्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मंडलिकांच्या पक्षविरोधी कृतीची माहिती दिली होती. मंडलिक सातत्याने सोयीची भूमिका घेतात.'

......

शिवसेनेने कागलमध्ये एबी

फॉर्म देण्याची घाई केली

कागल मतदारसंघात शिवसेनेने एबी फॉर्म देण्याची घाई केली, असे पाटील म्हणाले. या मतदारसंघात समरजीत घाटगे यांना तिकीट देण्यासाठी मुंबईत बोलावून घेतले. समरजीत किंवा संजय घाटगे या दोघांपैकी एकाला थांबवले असते तर कागलमध्ये युतीचा विजय झाला असता', असेही ते म्हणाले.

....

आमचे काय चुकले?

'टोल आणणारे विजयी झाले आणि घालवणारे पराभूत झाले. आम्ही कोल्हापूर सुंदर केले. विमानसेवा सुरू केली, रेल्वेचे विद्युतीकरण केले. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी आणला. मग आमचे काय चुकले हे जनतेने सांगावे', असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे यांना पीएच.डी

$
0
0

कोल्हापूर : कुरुंदवाड येथील सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालय येथील सहाय्यक प्रा. शैलजा श्रीधर शिंदे यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांनी 'दलित आत्मकथनामधील बोलींचा भाषा वैज्ञानिक अभ्यास' या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना विलिंग्डन महाविद्यालयमधील माजी उपप्राचार्य डॉ. संपतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. त्यांना संस्थेचे चेअरमन जयराम पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉ. टी. के. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचा दिवाळीनंतर राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेल्या महापौर बदलाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. माधवी गवंडी दिवाळीनंतर महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अॅड. सूरमंजिरी लाटकर प्रमुख दावेदार असल्या तरी राजकीय गणिताची फेरमांडणी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडीमध्ये राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे.

जुलैमध्ये झालेल्या महापौर निवडीमध्ये अॅड. लाटकर यांच्याऐवजी गवंडी यांना संधी मिळाली. संधी देताना पक्ष नेतृत्वाने दोन महिन्यानंतर, सप्टेंबर महिन्यात त्यांना राजीनामा देण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकीदरम्यान मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ गवंडी यांना लागू होणार का? याबाबत संभ्रमावस्था होती. दरम्यान आचारसंहितेमुळे नव्या महापौरांची निवड होणे अशक्य असल्याने त्यांचा राजीनामा लांबणीवर पडला. रविवारी (ता. २७) आचारसंहिता संपुष्टात येणार असल्याने दिवाळीनंतर गवंडी पदाचा राजीनामा देणार आहेत. निवडणुकीदरम्यान महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलली असल्याने नवी निवड औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

गवंडी यांचा राजीनामा रेंगाळल्याने दोन महिन्यानंतर महापौरपदाची संधी मिळणाऱ्या अॅड. लाटकर यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. गवंडी राजीनामा देण्यास तयार असताना राष्ट्रवादीतील काही कारभारी नगरसेवकांनी महिला व बालकल्याण सभापती अनुराधा खेडकर यांचे नाव पुढे आणले. त्यामुळे पुन्हा लाटकर यांना महापौरपद हुलकावणी देणार का? अशी शक्यता निर्माण झाली होती. कारभारी नगरसेवक खेडकर यांच्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या कुटुंबीयांनी दक्षिण मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना पाठिंबा दिला. खेडकर यांच्या निर्णयामुळे आघाडीत खळबळ उडाली.

अॅड. लाटकर यांचे पती व स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर हे उत्तर व दक्षिण मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय होते. त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्याकडून त्यांच्या नावाला पसंती असेल. पक्षाकडून अन्य कोणतेही नाव नसल्याने अॅड. लाटकर प्रमुख दावेदार आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नगरसेवक वगळता इतर सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने सत्तारुढ आणि विरोधी संख्याबळावर चांगलाच परिणाम होणार आहे. शिवसेना नगरसेवकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा महापौर निवडीच्या निमित्ताने राजकीय फेरमांडणी वेग घेणार आहे.

भाजपचे दोन नगरसेवक राजीनामा देणार

भाजपच्या नगरसेविका जयश्री जाधव यांचे पती व नगरसेवक संभाजी जाधव यांचे बंधू चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला. प्रचारात पक्षांकडून कारवाई होऊ नये, यासाठी या दोन्ही नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. प्रचारादरम्यान पक्षाकडून त्याबाबतचा कोणताही आदेश त्यांना आला नाही. मात्र, त्यांच्या राजीनाम्याबाबत पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, आमदार जाधव यांनी कुटुंबातील दोन्ही नगरसेवक भाजपकडे राजीनामा देतील असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images