Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बोधचिन्हाचा गैरवापर करणाऱ्यांना चाप

$
0
0
लेटरपॅडवर स्वतःचे नाव ठळक अक्षरात आणि एका कोपऱ्यात विद्यापीठाचे बोधचिन्ह, व्हिजिटींग कार्डावर बंगल्याचा फोटो, नावही ठळक आणि विद्यापीठाचा लोगो मात्र लहान आकारात. विद्यापीठाचे बोधचिन्ह वापराबाबत ना कसले नियम, ना निश्चित असा पॅटर्न. सोयीनुसार प्रत्येकजण शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा वापर करीत आहे.

गप्पांमध्ये उलगडणार उद्योगाची जडणघडण

$
0
0
गुणवत्ता व सचोटीच्या जोरावर धरंजय दातार यांनी दुबई येथे अल् अदिल ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला आहे. मराठी तरुणांना रोलमॉडेल ठरेल असा त्यांचा प्रवास समोर येण्यासाठी सोमवार (ता. २०) रोजी शाहू स्मारक येथे सायंकाळी साडेपाच वाजता ‘बिझनेस गप्पा’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

भ्रष्टाचाराविरोधात ‘भाकप’चे अभियान

$
0
0
‘भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भ्रष्टाचार विरोधी अभियान राबविण्यात येणार आहे. सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेल्या तक्रारी हेल्पलाईन आणि संकेतस्थळावर दाखल कराव्यात. सामान्य माणसाच्या मनातील भीती दूर करून न्याय देण्यासाठी अभियान सुरू होत आहे’ अशा माहिती ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंदराव पानसरे, सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अत्याचाराविरोधात शहरी महिला सजग

$
0
0
महिलांना तत्काळ मदत मिळावी म्हणून सरकारने जिल्हा पोलिसप्रमुखांच्या कार्यालयात महिलांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. फेब्रुवारी २०१३ पासून ‘१०९१’ या क्रमांकाची ही हेल्पलाइन सुरू असून गेल्या वर्षभरात ५० हून अधिक तक्रारींची नोंद यावर झाली आहे.

तीळगूळ

$
0
0
सूर्याच्या मकर राशीतल्या प्रवेशाबद्दल आजवर किंवा आज नि काल बरंच लिहून सांगून झालंय. पंचांग संस्कृतीबद्दल विश्वास असणाऱ्या अगर विश्वास देणाऱ्या मंडळींना संक्रांतीचा दिलासा नि धसका नेहमीच वाटत आला आहे.

वीज दर कपातीचे भिजत घोंगडे

$
0
0
उद्योगांसाठी वाढलेल्या वीज आणि पाणीदराच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून उद्योजकांना सरकारकडून फक्त आश्वासनच मिळत आहे. याला आता उद्योजक कंटाळले असून आम्हाला आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी मागणी उद्योजक करू लागले आहेत.

एक अध्याय संपला

$
0
0
रस्ते पूर्ण झाल्यानंतर आयआरबी तीस वर्षे टोल आकारणार ही भीती साडेतीन वर्षांपूर्वीच कोल्हापूरकरांच्या मनात होती. त्याच वेळी कंपनीच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष खदखदत होता. अखेर प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात येताच कंपनीने टोलवसुलीला प्रारंभ केला. त्यामुळे संताप अनावर होत गेला.

नायजेरिया टू कोल्हापूर

$
0
0
कोल्हापूर फुटबॉलचे शहर. क्रिकेटपेक्षा फुटबॉल जास्त लोकप्रिय असलेले शहर. कोल्हापुरातील वि‌विध फुटबॉल संघात अफ्रिकेतील खेळाडूंची हजेरी ठरलेली असते. पूर्वी काही कॉलेजमध्ये शिकणारे आफ्रिकन खेळाडू असायचे. पण, यंदाच्या हंगामात निव्वळ फुटबॉल खेळण्यासाठी नायजेरियातील खेळाडूंनी कोल्हापुरात हजेरी लावली आहे.

अपघातांत वर्षभरात ३१३ बळी

$
0
0
खराब रस्ते, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यासह अनेक कारणांमुळे २०१३ मध्ये जिल्ह्यात झालेल्या अपघातात ३१३ बळी पडले, तर ५५१ गंभीर अपघातांमध्ये ९१८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मोठा विचार, छोटे शिलेदार

$
0
0
लहान मुलांना काय, कम्प्युर्सवर गेम ऑप्शन दिले की दुसरे काही नको. कॉमिक्सपुरतच त्यांचे जग आहे. स्मार्टफोनमधील एक अन् एक अॅप्समध्ये सराईतपणे फिरणारी ही पिढी, यांना कुठला आलाय सोशल सेन्स? असा प्रश्न कुणाच्या मनात डोकावत असेल तर त्यांना चपराक देण्याचे काम राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेतील सामाजिक कथा आणि सशक्त अभिनयातून भाष्य करणाऱ्या बालकलाकारांनी केले आहे.

रविवारी ‘मैफल रंगसुरांची’

$
0
0
कला तपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर स्मृती सोहळा रविवारी (ता. १९) आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ‘मैफल रंगसुरांची’ हा कार्यक्रम सकाळी ९ ते दुपारी एक या वेळेत आयोजित केल्याची माहिती ‘रंगबहार’चे अध्यक्ष अजेय दळवी व कार्यवाह धनंजय जाधव यांनी दिली.

देवस्थान समितीच्या दारात भंगार

$
0
0
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त येतात. साहजिकच या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून महालक्ष्मी मंदिराच्या आवारात आणि देवस्थान समिती कार्यालयाच्या दारात लोखंडी भंगार पडून आहे.

‘स्वाभिमानी’ जागावाटपात अडकलेलीच

$
0
0
महायुतीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि माढा या दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबईत मंगळवारी बैठक झाली पण निर्णय न झाल्याने तिढा वाढला आहे. माढा मतदार संघावर ‘रासप’चे महादेव जानकर यांचा दावा कायम आहे. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

आता गाफील नाही, सतर्कच

$
0
0
कोल्हापूरकरांनी रविवारी अंत्यसंस्कार केलेल्या शिरोली टोल नाक्याचे मंगळवारी प्रतिकात्मक रक्षा​विसर्जनही करण्यात आले. नाक्याच्या ठिकाणी हा विधी करण्यात आला आहे.

तोडपाणी करणाऱ्यांची चौकशी करा

$
0
0
ज्यांनी रस्ते विकास प्रकल्प आणला आणि करविला तेच यामध्ये भ्रष्टाचारी असल्याची शक्यता आहे. या प्रकल्पातील तोडपाणीत सहभागी असलेल्यांची माहिती देऊनही पोलिसांनी ठोस पुरावा नसल्याची भूमिका घेतली.

पोषण आहार, घरकुलावरून खडाजंगी

$
0
0
शालेय पोषण आहारातील अपहार व झोपडपट्टीवासीयांच्या घरकुलांचे बांधकाम या दोन विषयांवरून इचलकरंजी नगरपालिकेच्या सभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला.

खानविलकर गटासाठी फिल्डिंग

$
0
0
माजी मंत्री दिग्वीजय खानविलकर यांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या खानविलकर गटाला काँग्रेसमध्ये आणण्याची​ फिल्डिंग सध्या करवीर मतदारसंघात जोरात सुरू आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.

संजय घाटगेंना आमदार करणारच

$
0
0
आगामी निवडणुकीत काहीही झाले तरी संजय घाटगे यांना आमदार करणारच अशी घोषणा खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केले. ते व्हन्नाळी येथे ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीची चॅम्पियनशीप पटकावलेला पैलवान मुकुंद वाडकर यांच्या सत्कार समारंभात व्हन्नाळी (ता. कागल) येथे बोलत होते.

यंत्रमाग कामगारांचा शनिवारी संप

$
0
0
५२ पिकाला चार पैसे मजुरीवाढ देण्याचा निर्णय अमान्य करीत चार ऐवजी १० पैसे वाढ न मिळाल्यास शनिवारी (१८ रोजी) लाक्षणिक संप करण्याचा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या सभेत देण्यात आला.

जागा विक्रीचा पर्याय अडथळ्यांचा

$
0
0
आयआरबीचे रस्ते प्रकल्पाचे पैसे भागवण्यासाठी महापालिकेची जागा विकण्याचा प्रस्ताव सर्वांत मोठा आधार वाटत असला तरी ही बाब वाटते तितकी सोपी नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images