Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाचगाव, जरगनगरमध्ये मतदारांची गर्दी

0
0

appasaheb.mali @timesgroup.com Tweet : @appamali_MT कोल्हापूर : संवेदनशील गाव म्हणून समजल्या जाणाऱ्या पाचगावमध्ये अतिशय चुरशीने मतदान झाले. तर जरगनगर, रामानंदनगरमधील मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. जवाहरनगर येथील वीर कक्कया विद्यालय येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदारांना काही

वेळ वाट पाहावी लागली. एक मशिन जवळपास सव्वा तास बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले.

प्रशासनाने मतदान यंत्र बदलण्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाचगाव हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव समजले जाते. महाडिक आणि पाटील गटाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. पाचगाव केंद्र शाळा, शांतीनगर येथील षटकोनी शाळा, वस्ती शाळा आणि आरकेनगर येथील शाळेत मतदानाची सोय होती. पाचगाव केंद्र शाळेत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महिलांची संख्या लक्षणीय होती. भाजपचे उमेदवार व आमदार अमल महाडिक यांच्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ, दत्ता गवळी, संभाजी शिंदे, अमर कारंडे, प्रकाश गाडगीळ, विशाल पाटील आदींची यंत्रणा राबत होती. काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यासाठी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रविण कुंभार, सदस्य प्रकाश गाडगीळ, संग्राम पोवाळकर, कृती समितीचे संजय पाटील, नारायण गाडगीळ आदी सक्रिय होते. जरगनगर-रामानंदनगर भागात मिळून जवळपास आठ हजार मतदार आहे. या भागात जरगनगर विद्यामंदिर येथील मतदान केंद्र आहे. येथील आठही मतदान केंद्रावर सकाळपासून मतदार मोठ्या संख्येने नजरेस पडत होते. काही ठिकाणी मतदारांची ने, आण करण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनाची व्यवस्था केली होती. नेहरुनगर विद्यामंदिर परिसरात पाटील आणि महाडिक गटातील कार्यकर्त्यांतील ईर्षा दिसली. भाजपकडून सयाजी आळवेकर, शिवाजी आळवेकर, जयसिंग शिंदे, सुधीर देसाई, प्रितम यादव मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करत होते. काँग्रेसकडून जगमोहन भुर्के, प्रसन्न वैद्य, अरुण बारामते आदींची यंत्रणा सक्रिय राहिली. बारामते हे भाजपच्या नगरसेविका अश्विनी बारामते यांचे पती आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापुरात मतदान केंद्रांत पाणी

0
0

सोलापुरात मतदान केंद्रांत पाणी

आडम मास्तर-माने आमने-सामने; करमाळ्यात आमदार नारायण पाटलांच्या समर्थकांचे डोके फोडले

सोलापूर :

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी दहा वाजता उघडला. रात्रभर सुमारे ७० मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात पाणी शिरले होते. सकाळी नऊ वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रांबाहेर गुडघाभर पाणी होते. अनेक मतदान केंद्रांतही पाणी शिरल्याने केवळ पाच टक्केच मतदान झाले. दहा वाजता सूर्यदर्शन झाल्यानंतर मतदानाला वेग आला.

पावसामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात पुरती दाणादाण उडाली होती. सकाळच्या सत्रात पावसाचा आनंद लुटत अनेकांनी छत्रीचा आधार घेत केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सकाळी धो-धो पाऊस होता, पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. सकाळच्या सत्रातील मतदानाची अवस्था पाहून उमेदवार धास्तावले होते. मात्र, अकरानंतर पाऊस थांबल्यानंतर मतदानासाठी नागरिक बाहेर पडल्यानंतर उमेदवारांचे चेहरे फुलले.

सोलापूर शहरातील सम्राट चौक, शेळगी, बुधवार पेठ, दमाणी नगर सुंदराबाई हायस्कूल, पाणी गिरणी आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांवर पावसामुळे दलदल निर्माण झाली होती. बऱ्याच केंद्रामध्ये थेट पाणी शिरल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाण्यात उभे राहूनच कामकाज पाहावे लागले. ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेरील पायऱ्या ही पाण्यात असल्याने अन्य ठिकाणांहून टेबल आणून वेगळी सोय करावी लागली. बोरामणी नाका, मातंग वस्ती परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने येथील नागरिक रस्त्यावर उतरले. शाहीर वस्ती येथील केंद्राबाहेर उभारण्यात आलेला मंडप पोलिसांच्या अंगावर कोसळला. मात्र, कोणीही जखमी झाले नाही. रामवाडी, कोतम चौकातील मतदान केंद्रात पाणी होते. शहरातील अनेक मतदान केंद्रांना पाण्याचा वेढा पडल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर ही कर्मचाऱ्यांचे हाल सुरूच होते.

आडम मास्तर- दिलीप माने आमने-सामने

दत्त नगरातील मतदान केंद्रात माकपचे उमेदवार नरसय्या आडम बराच वेळ आताच असल्याने कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. सेनेचे उमेदवार दिलीप माने यांना समजताच ते तत्काळ मतदान केंद्रावर आले. तेव्हा आडम आणि माने यांच्याच बाचाबाची झाली. काही वेळाने वाद निवळला. ज्या रिक्षातून मतदारांना आणून मतदान करण्यात येत होते, ती रिक्षा माकपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे दिली.

नारायण पाटलांच्या कार्यकर्त्याचे डोके फोडले

करमाळा विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच तणाव होता. सेनेचे आमदार, अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या एका समर्थकाला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार संजय शिंदे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव झाला. रक्तबंबाळ अवस्थेतील समर्थकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. माढा तालुक्यातील दहिवली गावात हा प्रकार घडला. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढविल्याने अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांना सवलतीची भेट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध पातळीवर प्रयत्न झाले. प्रशासनाच्या या प्रयत्नांना शहरातील लहानसहान व्यावसायिक, नाष्टा सेंटर व बिर्याणी विक्रेत्यांनी साथ दिली. प्रत्यक्ष मतदानादिवशी त्यांनी, 'मतदान करा आणि लाभ मिळवा'अशी संकल्पना राबवली. मतदान करुन आलेल्या ग्राहकांसाठी डोसा, बिर्याणी, मिसळच्या बिलात दहा टक्के सवलत दिली.

शुक्रवार पेठेतील अविज बिर्याणी हाऊसने 'योग्य उमेदवाराला मतदान करा व लोकशाही बळकट करा. बोटावरील शाई दाखवा आणि बिर्याणीवर दहा टक्के सवलत मिळवा'अशी ऑफर जाहीर केली होती. मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी वेगळी शक्कल लढवली. दुपारी बारा ते रात्री दहा या वेळेत जवळपास ४० हून अधिक ग्राहकांनी लाभ घेतला'असे अविराज गवस यांनी सांगितले. शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या बिर्याणीवर ही सवलत होती.

उद्यमनगर येथील लक्ष्मी मिसळ येथे सवलतीच्या दरात मिसळीचा आस्वाद चाखण्याची संधी मतदारांना उपलब्ध करुन दिली होती. मिसळच्या बिलावर दहा टक्के सवलत दिली. राजारामपुरी खाऊ गल्लीतील आवटी खानावळने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपल्यापरीने हातभार लावला. खवैय्यांसाठी या ठिकाणी बिलावर दहा टक्के सवलत जाहीर केली होती. उजळाईवाडी फाटा परिसरातील सात बारा हॉटेलनेही 'बोटावरील शाई दाखवा आणि सवलतीचा लाभ घ्या'म्हणून मतदारांना बिलात दहा टक्के सवलतीची भेट दिली. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे यासाठी हा वेगळा प्रयत्न केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर शहरातमतदान केंद्रांत पाणी

0
0

सोलापूर : सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी दहा वाजता उघडला. रात्रभर सुमारे ७० मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात पाणी शिरले होते. सकाळी नऊ वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रांबाहेर गुडघाभर पाणी होते. दहा वाजता सूर्यदर्शन झाल्यानंतर मतदानाला वेग आला.

पावसामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात पुरती दाणादाण उडाली होती. सकाळच्या सत्रात पावसाचा आनंद लुटत अनेकांनी छत्रीचा आधार घेत केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. शहरातील सम्राट चौक, शेळगी, बुधवार पेठ, दमाणी नगर सुंदराबाई हायस्कूल, पाणी गिरणी आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांवर पावसामुळे दलदल निर्माण झाली होती. बऱ्याच केंद्रामध्ये थेट पाणी शिरल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाण्यात उभे राहूनच कामकाज पाहावे लागले. ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेरील पायऱ्या ही पाण्यात असल्याने अन्य ठिकाणांहून टेबल आणून वेगळी सोय करावी लागली. शाहीर वस्ती येथील केंद्राबाहेर उभारण्यात आलेला मंडप पोलिसांच्या अंगावर कोसळला. अनेक मतदान केंद्रांना पाण्याचा वेढा पडल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची उघडीप; महिला मतदारांची संख्या लक्षणीय

0
0

पावसाची उघडीप; महिला मतदारांची संख्या लक्षणीय

सातारा :

सातारा जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६४.४७ टक्के मतदान झाले. पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतांश नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सातारा येथे राजमाता कल्पनाराजे भोसले, उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले आणि दीपक पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मदन भोसले आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या दोन घटना वगळता जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातारा, पाटण, कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. माण मतदारसंघात मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काहीकाळ मतदान थांबल्याचे प्रकार घडले

सोमवारी पहाटेपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदान करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदानसाठी सातारा जिल्ह्यात २९७८ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. त्यासाठी २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपआपल्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली होती. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना मतदान स्लिप देणे, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे या कामात कार्यकर्ते दिवसभर व्यस्त होते. प्रशासनाच्या वतीने दिव्यांग, गरोदर महिला यांना मतदान करण्यासाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मतदान प्रक्रिया दरम्यान सातारा येथे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सातारा जिल्ह्यांत सरासरी ६४.४७ टक्के मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची उघडीमुळे वाढला मतदानाचा टक्का

0
0

पावसाची उघडीमुळे वाढला मतदानाचा टक्का

सातारा :

सातारा जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६४.४७ टक्के मतदान झाले. पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतांश नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सातारा येथे राजमाता कल्पनाराजे भोसले, उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले आणि दीपक पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मदन भोसले आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या दोन घटना वगळता जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातारा, पाटण, कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. माण मतदारसंघात मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काहीकाळ मतदान थांबल्याचे प्रकार घडले.

माजी मुख्यमंत्री, येथील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण, महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी रेठरे बुद्रुक तर अपक्ष उमेदवार अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उडाळकर यांनी उंडाळे येथे आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.

कराड दक्षिण, उत्तरमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रित मतदान होत असल्याने मतदारांना मतदानासाठी वेळ लागत होता. अनेक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाल्याने त्या ठिकाणी नवीन यंत्रे दिल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले.

सोमवारी पहाटेपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदान करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदानसाठी सातारा जिल्ह्यात २९७८ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. त्यासाठी २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपआपल्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली होती. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना मतदान स्लिप देणे, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे या कामात कार्यकर्ते दिवसभर व्यस्त होते. प्रशासनाच्या वतीने दिव्यांग, गरोदर महिला यांना मतदान करण्यासाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मतदान प्रक्रिया दरम्यान सातारा येथे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सातारा जिल्ह्यांत सरासरी ६४.४७ टक्के मतदान झाले.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्तर’ कोणाला तारणार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभा निवडणुकीचा प्रचारात कमालीची चुरस पहायला मिळाली. सर्वच मतदारसंघात ईर्ष्या असल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अटकळ बांधली जात होती. काही मतदारसंघांत टक्केवारी वाढलीही पण त्याला जिल्ह्यातील उत्तर विधानसभा मतदारसंघ अपवाद ठरला. मतदानाची टक्केवारी केवळ ५९ टक्केच राहिली. या मतदारसंघात मतदारांचा निरुत्साह दिसत असला, तरी घटलेला टक्का कोणाला तारणार आणि कोणाला झटका देणार, अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. गुरुवारी (ता.२४) प्रत्यक्ष मतमोजणीनंतर उत्तरचा किंगमेकर विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर की काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे स्पष्ट होणार आहे.

उत्तरचे उत्तर म्हणून आमदार क्षीरसागर यांच्याविरोधात अनेक नावे निवडणुकीपूर्वी समोर आली. क्षीरसागर यांच्याबाबत असलेली नाराजी चर्चेत घेऊन अनेक नावांची चर्चेत ठेवून आपले इप्सित साध्य करण्याचा डाव टाकला जात होता. पण अनेकजणांनी मैदानातून मागार घेतली. शेवटी उद्योगपती चंद्रकांत जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी देऊन जोरदार आव्हान निर्माण केले. क्षीरसागर, जाधव यांच्यासह अपक्ष व वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार रिंगणात होते. पण प्रत्यक्ष लढत सेना विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी झाली.

जाहीर सभा पेक्षा दोन्ही उमेदवारांनी थेट संपर्कावर भर दिला. पेठा-पेठात विभागलेल्या मतदारसंघामध्ये कसबा बावडा व कदम वाडी, भोसलेवाडीचाही समावेश आहे. मात्र दोन्ही उमेदवारी सर्वात जास्त लक्ष पेठांवर केंद्रित केले. तालीम संस्था, फुटबॉल मंडळांच्या माध्यमातून एकगठ्ठा मतदान मिळवण्यावर भर दिला. प्रचार करताना एकमेंकावरील नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. प्रचाराच्या धुरळा उडत असताना येथे आघाडीत बिघाडी तर युतीमध्येही बेबनाव दिसून आला. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या प्रचारात, तर सेनेतील एक गट छुप्या पद्धतीने काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सक्रीय होता. त्यामुळेच मतदानानंतर आकडेमोड करताना कार्यकर्त्यांना कोणताही अंदाज बांधणे कठीण बनले आहे. बूथनिहाय मतदानाची आकडेवारी समोर ठेवून प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परीने विजयाचा दावा करू लागले आहेत. विशेषत: पेठांमध्ये आकडेमोड करताना कार्यकर्ते दिसत होते. तर कट्ट्यांवरील चर्चेमध्ये आपल्याच पक्षाचा उमेदवार कसा निवडून येणार याचा दावा करत होते.

भाजपची मते निर्णायक

शहरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मोठा गट नेहमीच सक्रिय आहे. संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे यांच्या रुपाने अपक्ष उमेदवारी होती. हिंदुत्ववादी कार्यकर्ते नेहमीच युतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे आपली ताकद लावतात. मात्र यावेळी स्वत: साळुंखे मैदानात असल्याने हिंदुत्ववादी विचारसरणीचे मते ते किती घेणार याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यामध्ये राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर स्वत: पाटील यांनी पुढाकार घेत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना युतीच्या प्रचारात सक्रीय राहण्याच्या सूचना केल्या. पण घटलेला टक्का भाजपचे मतदार न आल्याचा परिणाम असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दक्षिण’चा लागेना थांगपत्ता

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काटाजोड लढतीमुळे निकालाचा थांगपत्ता लागेना, अशी स्थिती बनली आहे. महाडिक आणि पाटील या दोन्ही गटांनी ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनवली आहे. निवडणूक जिंकायचीच या ईर्षेने दोन्ही बाजूंनी हात 'सैल' सोडल्याने आणि दोन्ही गटांची मजबूत बांधणी असल्याने या मतदारसंघाचा थांगपत्ता लागत नाही अशीच स्थिती आहे.

एकमेकांच्या गटाची फोडाफोडी, पाठिंब्यासाठी मंडळांना, प्रमुख कार्यकर्त्यांना दिला जाणारा शब्द यामुळे निवडणुकीत कमालीची ईर्षा निर्माण झाली. चुरशीने मतदान झाल्यामुळे आता आकडेमोड सुरू आहे. भाजपचे उमेदवार व आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यापुरती ही निवडणूक सीमित राहिली नाही. तर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली. निवडणुकीची सारी सूत्रे या दोघांनी हाती घेतल्यासारखे होते. आरोप, प्रत्यारोपापासून व्यक्तिगत पातळीवरील आरोपापर्यंत प्रचाराची पातळी घसरली. दक्षिण मतदारसंघात अन्य सहा उमेदवार असले तरी संपूर्ण निवडणूक या दोघांभोवती केंद्रित होती. भाजपच्या उमेदवारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, खासदार अमोल कोल्हे हे प्रचारासाठी आले.

महाडिक गटाकडून गेल्या पाच वर्षांतील विकासाभिमुख कारभार, ११५० कोटी रुपयांची विकासकामे आणि दक्षिण भयमुक्त बनल्याचा दावा केला. ग्रामीण व शहरीभागाचा विकास साधल्याचा महाडिकांचे म्हणणे आहे. पाटील गटाकडून गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाचा विकास खुंटल्याचा, रोजगार निर्मिती थंडावल्याचा आरोप झाला. मतदारसंघाच्या विकासासाठी ऋतुराजसारखा आश्वासक चेहरा आवश्यक असल्यावर पाटील गटांनी भर दिला. मतदारसंघातील मोठ्या गावांवर दोन्ही गटांची भिस्त होती. कोल्हापूर महापालिका हद्दीत समाविष्ठ प्रभाग हा शहरी मतदार आहे. शहरी भागातील मतदान, झोपडपट्टीतील मतदान मिळवण्यासाठी कमालीची चुरस होती. शेवटच्या दोन दिवसांत झोपडपट्टीतील मतदानासाठी मोठ्या उलाढाली झाल्या.

\Bशिवसेना पाटील यांच्या तर

घाटगे गट महाडिकांच्या पाठिशी

\Bदक्षिणमधील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते 'आमचं ठरलयं' म्हणत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात होते. तर शाहू कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावात घाटगे गटांनी महाडिकांना पाठिंबा दिला होता. पाचगाव, उचगाव, कळंबा, मोरेवाडी, कणेरी, गडमुडशिंगी, गांधीनगर, वळीवडे, चिंचवडमधील अधिकाधिक मतदान खेचण्यासाठी दोन्ही गटाच्या यंत्रणा सक्रिय होत्या. मोठ्या लोकवस्तीतील मतदानावर दोन्ही गटांनी दावा केला आहे. यामुळे निकालाविषयी उत्कंटा वाढली आहे. पाटील गटाने गेल्या निवडणुकीतील पराभवाचा हिशेब चुकता करण्याचा तर महाडिक गटांनी पुन्हा दक्षिणेत 'अमल'साठी चंग बांधल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ईर्षेने मतदान झाल्यामुळे निकालाचे पारडे कुणाकुडे झुकणार याविषयी मात्र दोलायमान स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेते गुंतलेस्वत:च्या मतदार संघात

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

निवडणुकीच्या धामधुमीत जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते अंतिम टप्प्यात स्वत:च्या मतदार संघात अडकले होते. त्याचा फटका अन्य मतदार संघांत बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रमुख नेत्यांसाठीच लढत चुरशीची झाल्याने त्यांना अन्यत्र लक्ष देणे शक्य झाले नाही. यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री विनय कोरे यांना मतदारसंघाबाहेर जाणे शक्य झाले नाही.

जिल्ह्यात भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर पक्षाची जबाबदारी होती. तर शिवसेनेचे आमदारच आपापल्या मतदारसंघांत प्रमुख नेते म्हणून काम करत होते. पालकमंत्री पाटील यांना पुणे जिल्ह्यात कोथरुड मतदार संघात उमेदवारी दिल्याने त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले. प्रमुख पदाधिकारी पुणे आणि कोल्हापूरच्या फेऱ्या करत प्रचार करत होते. पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांचा उमेदवारीचा अर्ज भरण्यास उपस्थित होते. तसेच त्यांनी एक मेळावाही घेतला. त्यानंतर त्यांनी दक्षिणेची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे सोपवली.

पाटील यांनी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही व्यस्त कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी लक्ष कोथरुड व राज्याच्या निवडणुकीकडे केल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांवरील नियंत्रण सुटल्याचे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यात भाजप दोन तर शिवसेना आठ जागावर लढत होती. पण सेनेच्या प्रचारात दोन चार पदाधिकारी वगळता बूथचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात दिसले नाहीत. शिरोळ, कागल, राधानगरी, हातकणंगले, चंदगड या मतदार संघात भाजपचे कार्यकर्ते थेट बंडखोराच्या पाठीशी राहिल्याची चर्चा आहे. त्यामुळे युतीला फटका होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

प्रकाश आवाडे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार सतेज पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सांभाळावे लागले. पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणेत काँग्रेसचे उमेदवार होते. आमदार पाटील यांनी गटात विभागलेली काँग्रेस एकत्र करुन मोट बांधून प्रचार केला. करवीर, शिरोळ, कोल्हापूर उत्तर मतदार संघात प्रचार सभा घेतल्या. पण शेवटच्या टप्प्यात त्यांनी कोल्हापूर दक्षिणवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्यांचे कोल्हापूर उत्तरेतील समर्थकही दक्षिणेत तळ ठोकून होते. कोल्हापूर उत्तर मध्येही काँग्रेसचे नगरसेवक अपवादानेच पहायला मिळाले. पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण नव्हते.

\Bमुश्रीफ कागल तर शेट्टी शिरोळमध्ये

\Bसमरजित घाटगे यांनी राजकारणात एंट्री केल्यापासून गेली चार वर्षे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ कागलमध्ये अडकून राहिले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी काही प्रमाणात चंदगड, राधानगरी, शिरोळमध्ये लक्ष घातले पण मतदार संघात प्रबळ विरोधक आणि काटा जोड लढत असल्याने मुश्रीफांना जिल्ह्यातील अन्य मतदार संघात लक्ष घालता आहे. मुश्रीफ यांच्याप्रमाणे माजी खासदार राजू शेट्टी यांचे स्वाभिमानीच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात प्रचार सुरू असला तरी शेवटच्या टप्प्यात त्यांना शिरोळमध्येच अडकून रहायला लागले. आघाडीचा धर्म पाळताना त्यांनी करवीर, कोल्हापूर दक्षिण मतदार संघात सभाही घेतल्या. त्यांचे पदाधिकाऱ्यांनी सभा घेतल्या. पण आघाडीत सहकारी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे शाहूवाडी मतदारसंघातील उमेदवार भरत पाटील यांच्याकडे काँग्रेस राष्ट्रवादीसह स्वाभिमानीच्या नेत्यांचे दुर्लक्ष झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० टेबलवर होणार मतमोजणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी गुरूवारी (ता.२४) मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. कागल, शिरोळ विधानसभा मतदासंघात १४ तर उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघात २० टेबलवर मतमोजणी होणार आहे. सर्वच मतदारसंघांचा निकाल दुपारी दोनपर्यंत जाहीर होईल, असा विश्वास निवडणूक प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. सर्वत्र चुरशीने लढत झाल्याने निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

मतमोजणीच्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने पहिले प्रशिक्षण दिले आहे. पुन्हा आज, बुधवारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी पाच वाजता सर्व कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या ठिकाणी येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्मचारी दाखल झाल्यानंतर टेबलनिहाय मतमोजणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. प्रत्यक्षात मतमोजणी आठ वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येईल. हातकणंगलेत उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या मतमोजणीला थोडा उशिर होणार आहे. उर्वरित मतदारसंघात दुपारी दोनपूर्वीच निकाल स्पष्ट होईल.

...

कडक सुरक्षा

रात्री उशिरा मतमोजणीच्या ठिकाणच्या स्ट्रॉंगरूममध्ये इव्हीएम यंत्र ठेवण्यात आले. केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये ते सील करण्यात आले. यंत्रांच्या सुरक्षितेतेसाठी तिहेरी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. स्ट्राँग रूमबाहेर सीआयएसएफ, राज्य राखीव दलाचे पोलिस आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही वॉच आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळीच स्ट्राँग रूमचे सील फोडण्यात येणार आहे.

...

मतदारसंघ मतमोजणी ठिकाण टेबल संख्या फेऱ्या

चंदगड पॅव्हेलियन हॉल, नगरपरिषद, गडहिंग्लज २० १९

राधानगरी तालुका क्रीडा संकुल, मौनी विद्यापीठ, गारगोटी २० २२

कागल जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल १४ २६

कोल्हापूर दक्षिण शासकीय गोदाम, राजाराम तलाव २० १७

करवीर शासकीय गोदाम, रमणमळा २० १८

कोल्हापूर उत्तर शासकीय गोदाम, राजाराम तलाव २० १६

शाहूवाडी जुने शासकीय धान्य गोदाम, शाहूवाडी २० १७

हातकणंगले धान्य गोदाम, नवीन प्रशासकीय इमारत, हातकणंगले२० १७

इचलकरंजी राजीव गांधी भवन, इचलकरंजी २० १३

शिरोळ तहसील कार्यालय, पहिला मजला, शिरोळ १४ २१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक भत्त्यात घोळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल विधानसभा मदारसंघातील निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यास नियमापेक्षा २५० रूपये भत्ता कमी दिला आहे, अशा आशयाच्या तक्रारींचे निवेदन मंगळवारी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले आहे. यामुळे भत्त्याच्या रकमेवर कागलच्या अधिकाऱ्यांचे 'डोळे' असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी देसाई यांनी घेतली आहे. संबंधितांना नियमाप्रमाणे भत्ता देण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळास दिले.

नियमाप्रमाणे केंद्रावरील केंद्राध्यक्षास २०५०, प्रथम मतदान अधिकाऱ्यास १५५०, मतदान अधिकारी एक यांना १३००, मतदान अधिकारी दोन यांना १३००, शिपाई कर्मचाऱ्यांना ६००, पोलिस कर्मचाऱ्यास ८०० रूपये दिणे अपेक्षित आहे. मात्र कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी नियमापेक्षा प्रत्येक कर्मचाऱ्यास २५० रूपये भत्ता कमी देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप निवडणूक कर्मचाऱ्यांचा आहे. यामुळे निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

कमी भत्ता दिल्यानंतर शिल्लक रक्कमेचे काय केले, असाही प्रश्न निर्माण होत आहे. 'कागल'मधील हजारांवर कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी २५० रूपये कमी दिल्याने आणि राखीव कर्मचाऱ्यांना भत्ताच न दिल्याने शिल्लक राहणारी रक्कम मोठी होते. या शिल्लक रकमेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा 'हात' मारण्याचा डाव असल्याचाही आरोप होत आहे. काही मतदारसंघात राखीव महिला कर्मचाऱ्यांना नाहक रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवले. याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संजय पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड, संजय कांडगावे, अनील सरक, विजय सुतार, सुधाकर सावंत, संतोष आयरे आदींचा समावेश होता.

.....

लोकसभेची पुनरावृत्ती

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक मतदानावेळी गडहिंग्लज येथेही कमी भत्ता देऊन शिक्षकांची बोळवण करण्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळीही शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघात कमी भत्ता देण्याचा प्रकार घडला आहे. नियमाप्रमाणे भत्ता देण्यात यावा, असे स्पष्ट आदेश जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिले असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कमी भत्ता देण्याच्या निर्णयामागचे गौडबंगाल हा प्रश्न अनुत्तरीत राहत आहे.

....

कोट

'मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे भत्ता मिळायला हवा. ज्या कर्मचाऱ्यांना भत्ता कमी मिळाला आहे. त्यांची माहिती घेतली जाईल. त्यांनाही नियमाप्रमाणे भत्ता दिला जाईल.

दिप्ती सूर्यवंशी, कागल, निवडणूक निर्णय अधिकारी

......

कोट

'कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे भत्ता दिला नाही. प्रत्येकास नियमापेक्षा २५० रूपये कमी दिले आहेत. त्यांनी प्रशिक्षणावेळीही कर्मचाऱ्यांना भोजनाची सोय केली नव्हती. त्याचा भत्ता दिला नाही. यामुळे त्यांचे भत्ता वाटप प्रकरण संशयास्पद बनले आहे. यासंबंधीची तक्रार निवडणूक आयोगाकडेही करण्यात येईल.

राजेश वरक, अध्यक्ष, महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीधर’च्या निवडणुकीचे नगारे

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर आता पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीचे नगारे वाजण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात सद्य:स्थितीत भाजपचा वरचष्मा आहे. जून २०२० मध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपकडून पाचजणांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात ताकद असल्यामुळे त्या पक्षाकडून पुन्हा सारंग पाटील निवडणूक लढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि पुण्यातील इच्छुकांनी अपक्ष लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हानिहाय दौरे करत इच्छुक मतदार नोंदणी करत आहेत.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. गेली दहा वर्षे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पालकमंत्री चंद्रकांत पाटील करत आहेत. यंदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली आहे. सलग दोन टर्म त्यांनी पदवीधरची निवडणूक लढविल्यामुळे भाजप या ठिकाणी नवा चेहरा देणार आहेत. भाजपकडून राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर (सातारा), राज्यस्तरीय लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन (पुणे), भाजपचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे (सांगली), शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य अमित कुलकर्णी (सातारा) आणि कोल्हापुरातील माणिक पाटील-चुयेकर यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून काहींनी मतदार नोंदणीला सुरुवात केली आहे. गेली दहा वर्षे पदवीधरचे प्रतिनिधित्व कोल्हापूरकडे असल्यामुळे यंदा भाजप ही संधी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील उमेदवाराला देण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे.

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत संघटनेची ताकत महत्त्वपूर्ण ठरते. कार्यकर्त्यांचे संघटन, ठिकठिकाणी सत्ता यामुळे भाजपच्या उमेदवाराला ताकद मिळू शकते म्हणून अनेकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेच्या निकालानंतर पदवीधरसाठी हालचाली गतिमान होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र व गेल्या निवडणुकीतील उमेदवार सारंग पाटील यांना पुन्हा उमेदवारीचे संकेत आहेत. २०१४ मधील निवडणुकीत त्यांनी पालकमंत्री पाटील यांना चांगली टक्कर दिली होती. त्यावेळी पहिल्या पसंतीचा कोटा ७६,२०१ इतका निश्चित केला होता. मात्र, पहिल्या पसंतीची मते कुठल्याच उमेदवाराला मिळाली नाहीत.

पालकमंत्री पाटील यांना ६१,४५३, तर सारंग पाटील यांना ५९,०७३ मते मिळाली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अरुण लाड यांनी व्यक्तिगत पातळीवर लढा देत ३७,१८९ मते मिळवली होती. पालकमंत्र्यांना निसटता विजय मिळाला, तर राष्ट्रवादीच्या विजयाचा घास हिरावला होता. भाजप आणि राष्ट्रवादीचे पाचही जिल्ह्यांत चांगले नेटवर्क आहे. राष्ट्रवादी ही निवडणूक ताकतीने लढविणार अशी माहिती सूत्रांनी दिली.

०००

अपक्ष म्हणून तयारी

'पदवीधर'मधून निवडणूक लढवायची म्हणून पुण्यातील युवराज पवार आणि कोल्हापुरातील डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी तयारी सुरू केली आहे. दोघेही व्यक्तिगत पातळीवर नावनोंदणी करत आहेत. पवार यांनी यापूर्वी विविध लोकप्रतिनिधींचे मतदारसंघातील काम पाहिले आहे, तर कोडोलीकर माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय आहेत. गेल्या वेळी निवडणूक लढविलेले उमेदवार काय भूमिका घेणार याकडेही लक्ष आहे.

०००

२०१४ मधील पदवीधर

निवडणुकीचा निकाल

पालकमंत्री चंद्रकांत पाटील ६१,४५३

सारंग पाटील ५९,०७३

अरुण लाड ३७,११९

शैला गोडसे १०,५९४

शरद पाटील ८५११

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प. सदस्यांच्या कामगिरीकडे लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य व त्यांच्या नातेवाईकांनी विधानसभा निवडणूक लढविली आहे. मंत्रालय गाठण्यासाठी कोणी जि.प.सदस्यपदाचा राजीनामा दिला, तर कोणी पक्ष व आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष लागले आहे.

शिरोळ तालुक्यातील सदस्य दलितमित्र अशोक माने यांनी जनसुराज्यच्या चिन्हावर हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व जि.प.सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे. भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील यांनी बंडखोरी केली आहे. ते वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर राधानगरी मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.

माजी सदस्य राहुल देसाई यांनी निवडणूक लढवायची म्हणून भाजपात प्रवेश केला. मात्र युती झाल्यामुळे त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. जिल्हा परिषद सदस्या सुनिता रेडेकर यांचे पती रमेश हे चंदगड मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव यांनी अपक्ष म्हणून राधानगरीतून निवडणूक लढविली आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व आमदार अमल महाडिक यांनी जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व केले आहे. याशिवाय बांधकाम समितीचे माजी सभापती संग्राम कुपेकर, सावकार मादनाईक यांनी अनुक्रमे चंदगड व शिरोळमधून निवडणूक लढविली आहे. त्यांच्या निकालाविषयी उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: हातकणंगलेतील मुडशिंगी गावातून ६९ गावठी बॉम्ब जप्त; दोन भाऊ अटकेत

0
0

कोल्हापूर: राहत्या घरात गावठी बॉम्ब तयार करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना मंगळवारी रात्री हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथून अटक करण्यात आली. कोल्हापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून ६९ गावटी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळं खळबळ उडाली आहे.

वाचा: हुबळी रेल्वे स्टेशनवरील स्फोटाचे कोल्हापूर कनेक्शन

विलास राजाराम जाधव (वय ५२ ) व आनंदा राजाराम जाधव (५४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असून हे दोघे भाऊ आहेत. त्यांनी डुक्कराची शिकार करण्यासाठी बॉम्ब बनविल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांचे उजळाईवाडी स्फोटाशी कनेक्शन असण्याची शक्यता आहे.

उजळाईवाडी येथील उड्डाण पुलाखाली १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या स्फोटात ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) हे ठार झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्ब शोधक, नाशक पथक, विशेष तपास पथक (एसआयटी) आणि स्थानिक पोलिसांची पथके तैनात केली होती. विधानसभा निवडणुकीत स्फोट झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. उड्डाण पुलाखाली झालेल्या स्फोटाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष माने, हरिश पाटील यांना माले मुडशिंगी येथे दोघे भाऊ गावठी बॉम्ब बनवून त्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिली. त्यांनी या ठिकाणी सापळा रचून छापा टाकण्याचे आदेश दिले. या दोन संशयितांच्या घरावर छापा टाकला असता बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह पांढऱ्या व गडद तपकिरी रंगाचे एकूण ६९ गावठी तयार बॉम्ब, असा सुमारे ७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दोघा संशयितांकडे कसून चौकशी केली. सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे आदी साहित्य वापरुन गावठी बॉम्ब बनवित असल्याची कबुली त्यांनी दिली. बॉम्बला रक्ताच्या आवरणाचा वापर करुन रानडुकरांची शिकार करण्यासाठी त्याचा वापर करीत असल्याचे सांगितले. संशयित भुईबावडा, धुंदवडे (ता. राधानगरी) येथील शेतामध्ये डुकरे मारण्यासाठी या बॉम्बचा वापर करीत होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही बॉम्बची विक्री करीत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य आणि संशयितांकडे मिळून आलेले साहित्य एकाच प्रकारचे आहे. दरम्यान, त्यांनी स्फोटके ठेवली होती की या प्रकरणी यापूर्वी ताब्यात घेतलेल्या तिघा संशयितांनी उड्डाणपुलाखाली साहित्य ठेवले होते, याची चौकशी सुरु केली आहे.

वाचा: उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली स्फोट; ट्रकचालक ठार

कोल्हापुरातील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सतर्क झाले आहेत. रेल्वे स्थानक, बसस्थानके, धार्मिक स्थळे, आदी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गासह शहरात नाकेबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुमजली पार्किंगच्या निविदेला मुदतवाढ

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बहुमजली पार्किंग उभारणीसाठी नैसर्गिक वाळूचा वापर गृहीत धरून निविदा मागवली होती. मात्र नैसर्गिक वाळूचा तुटवडा असल्याने अन्य प्रकारच्या वाळूच्या वापरामुळे दरामध्ये बदल होणार आहे. या तांत्रिक कारणांबाबत प्री बीड बैठकीत चर्चा झाल्यानंतर दरात बदल होणार आहे. त्यामुळे पार्किंग उभारणीसाठी सादर करण्यात येणाऱ्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल झाल्यानंतर पाच रोजी खुली करण्यात येणार आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्राप्त झालेल्या निधीतून दर्शन मंडप उभारण्यात येणार होता. पण जागांबाबत निर्माण झालेल्या वादामुळे हा निधी ताराबाई रोडवरील सरस्वती चित्रमंदिर जवळ बहुमजली पार्किंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. १८ सप्टेंबर रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. १२ ऑक्टोबरपर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती. निविदा प्राप्त झाल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी निविदा खुली करण्यात आली होती. त्यासाठी सहा ठेकेदारांनी असमर्थता दर्शवली.

तत्पूर्वी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत ठेकेदरांची प्री बीड मिटिंग घेण्यात आली. पार्किंग उभारणी करताना नैसर्गिक वाळूचा वापर करुन बांधकाम करण्याची अट घालण्यात आली होती. सद्यस्थितीत वाळू उपसावर बंदी असल्याने वाळू मिळणार नसल्याचे बैठकीत सागण्यात आले. त्यामुळे बांधकामासाठी अन्य पर्यायांवर चर्चा झाली. मात्र त्यामुळे दरामध्ये तफावत होणार असल्याचे ठेकेदारांनी निदर्शनास आणून दिले. या तांत्रिक मुद्यामुळे निविदा सादर करण्याचा कालावधी वाढवण्यात आला. सात कोटी ८६ लाख खर्चाच्या कामासाठी दोन नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर पाच नोव्हेंबर रोजी निविदा खुली करण्यात येणार आहे.

२४ मीटर उंचीची तीन मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. त्यामध्ये १६४ चारचाकी व १५८ मोटारसायकल पार्किंग होईल अशी रचना केली आहे. गुरुवारी निवडणूक निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार असल्याने त्यानंतर या कामाला अधिक गती येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सततच्या पावसामुळे महावितरणही बेजार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुराच्या कालावधीत उद्धवस्त झालेल्या भागात महावितरण कंपनीकडून वीज खांबाची उभारणी, विजेच्या साहित्याची वाहतूक अशी कामे सुरू आहेत. मात्र परतीच्या पावसामुळे महावितरणच्या यंत्रणेसमोर नदीकाठच्या भागात काम करताना आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

नियमित वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ज्या दलदलीतून एकट्या माणसाला चालणे शक्य नाही, तिथे कर्मचारी रोहित्र व खांबाची वाहतूक करत आहेत. दहा ते बारा कर्मचारी एकत्र येऊन खांब वाहून नेत आहेत. वीज पुरवठ्यासाठी सातत्याने प्रयत्न महावितरणतर्फे सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॅपटॉप, मोबाइलचा स्मार्ट धमाका

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

यंदाच्या दिवाळीसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह स्मार्टफोन आणि लॅपटॉपची खरेदी जोरात सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल आणि लॅपटॉपवर भरघोस सवलत दिली जात आहे. शहरातील लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, मिरजकर तिकटी, गांधीनगर परिसरातील इलेक्ट्रॉनिक दुकानात खरेदीसाठी गर्दी होत आहे.

दिवाळीच्या अनुषंगाने आघाडीच्या मोबाइल व लॅपटॉप कंपन्यांनी विविध मॉडेल्स बाजारात आणले आहेत. स्मार्टफोन्समध्ये साधारणत: ५ हजार ते १ लाख २० हजारापर्यंत मॉडेल उपलब्ध आहेत. स्मार्टफोन कंपन्यानी मार्केटमध्ये ७० हून अधिक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. याआधी केवळ एक ते दोन स्मार्टफोन कंपन्यांचे मार्केटमध्ये वर्चस्व होते. मात्र, यंदा पाच ते सहा कंपन्यांनी जोरदार एन्ट्री केली आहे. अनेक भारतीय ब्रँडने स्वस्त आणि किफायतशीर स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

यंदा अॅपल, सॅमसंग, वनप्लस, एमआय, ओप्पो, विवो, रियलमी, ऑनर, एलजी, लिनोवा, पॅनासॉनिक, जिओनी याबरोबरच भारतीय मायक्रोमॅक्स, आयबॉल, व्हिडिओकॉन, कार्बन आदींचे मॉडेल उपलब्ध आहेत. ग्राहक फीचर्स पाहून स्मार्टफोन निवडत आहेत. काहीना मोठी स्क्रीन तर काहीजण बॅटरी बॅकअप, रॅम मॅनेजमेंटला महत्त्व देतात. सेल्फीची क्रेझ असलेल्या तरुणाईला कॅमेरा अधिक भावतो. गेमिंगचे आकर्षण असलेल्या युजर्सने रॅमला अधिक महत्त्व दिले आहे. तरुणींची कॅमेरा फोन्सला अधिक पसंती आहे. ज्येष्ठाचा कीपॅड फोनकडे कल आहे. लॅपटॉपची रेंज साधारणतः १४ हजार ते १ लाखापर्यंत आहे. ४ जीबी रॅम आणि १ टीबी हार्डडिस्कचे लॅपटॉप अधिक खरेदी केले जात असल्याची माहिती संतोष पाटील यांनी दिली. स्क्रीन टच लॅपटॉप उपलब्ध आहेत. यामध्ये डेल, लिनोव्हा, एचपी, ऍपल, असूस कंपन्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना खरेदीवर सवलत दिली जात आहे.

कॅशबॅकबरोबर नो कॉस्ट ईमएआय

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल व फायनान्स कंपन्यांनी कंबर कसली आहे. कॅशबॅकबरोबर सुलभ हप्ता व नोकॉस्ट ईमएआय दिले जात आहे. डाऊन पेमेंट सेवा उपलब्ध आहे. साधारणतः ६ व ९ महिन्यांचे सुलभ हप्ते करून दिले जात आहेत. तसेच खरेदीवर मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, हेडफोन, स्क्रीनगार्ड दिले जाते.

कोट

मोबाइल लॅपटॉप खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात असल्याने ऑनलाइनच्या तुलनेत ग्राहकांचा ऑफलाइन पद्धतीने खरेदीकडे कल वाढत आहे. ऑनलाइनचे दर पाहून ग्राहक चौकशी करतात. त्याच दराने दुकानातही विक्री केली जात आहे. तसेच कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. त्यामुळे खरेदीदारामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

- सतीश पटेल, विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालादिवशीचाही खर्च उमेदवारांवर

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या खर्चात निकालादिवशी मिरवणूक, गुलालाची उधळण आदींच्या खर्चाचा समावेश होणार आहे. यामुळे निकाल लागल्यानंतर एक महिन्याची मुदत अंतिम खर्च देण्यासाठी उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी केलेल्या खर्चाची तीन टप्यातील माहिती निवडणूक प्रशासनाकडे दिली आहे. खर्चात विद्यमान आमदार आघाडीवर आहेत.

निवडणुकीतील प्रत्येक उमेदवारास २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनचा खर्च नोंदवला जातो. माघारीनंतर रिंगणातील उमेदवार रोज करीत असलेला खर्च निवडणूक प्रशासन ठेवत असते. उमेदवारानी दैनंदिन खर्च प्रशासनाकडे देणे बंधनकारक आहे. प्रशासन आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या खर्चाच्या पडताळणीत तफावत आढळलेल्या उमेदवारांना नोटीस काढण्यात आली होती. खुलासा आल्यानंतर, तफावतीसंबंधीत सबळ पुरावे दिल्यानंतर नोटिसीनंतरची पुढील कारवाई करण्यात आली नाही. मात्र तुल्यबळ लढत असलेल्या मतदारसंघात उमेदवारांनी कोट्यवधींचा चुराडा केला. मात्र प्रत्यक्षात निवडणूक प्रशासनाकडे कमी खर्च दाखवला आहे. उमेदवारांची यंत्रणा व्यापक आणि प्रशासनाची यंत्रणा तोकडी पडल्याने सर्वच खर्च नोंदवण्यात प्रशासनास यश आले नाही.

तिसऱ्या फेरीअखेर प्रमुख उमेदवारांचा खर्च (रुपयांत)

अमल महाडिक : १५ लाख ३३ हजार

ऋतुराज पाटील : ११ लाख ५८ हजार

समरजित घाटगे : ११ लाख ५८ हजार

संजय घाटगे : ८ लाख ५९ हजार

हसन मुश्रीफ : १३ लाख ९६ हजार

चंद्रदीप नरके : ७ लाख ५७ हजार

पी. एन. पाटील : ६ लाख ४७ हजार

सुरेश हाळवणकर : १० लाख १० हजार

प्रकाश आवाडे : ६ लाख ५१ हजार

विनय कोरे : ३ लाख ६४ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्नदान दिन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कमला कॉलेजमधील बी. व्होक फूड प्रोसेसिंग विभागामार्फत जागतिक अन्नदान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त पोस्टर, रांगोळी व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व भेसळ विभागाचे उपायुक्त मोहन केंबळकर हे उपस्थित होते. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्या तेजस्विनी मुडेकर यांची उपस्थिती होती. प्रा. रेखा पंडित यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बेनझीर शिकलगार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रविना कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रा. स्नेहा बुगडे व प्रा. प्रत्यंचा राजाज्ञा यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चेतना’च्या मुलांसोबत वाढदिवस

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी आपला वाढदिवस चेतना विकास मंदिरातील मुलांसोबत साजरा केला. याप्रसंगी मित्तल यांनी मुलांसोबत केक कापला. शाळेतील प्रत्येक वर्गात जाऊन आस्थेने माहिती घेतली तसेच संस्थेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही शाळा व्यवस्थापनला दिली. जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे उपस्थित होते. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबूडकर यांनी प्रास्ताविक केले. सुधीर मोरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका उज्ज्वला खेबूडकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images