Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘प्रबोधनातून पर्यावरणजागृती करणार’

0
0

फ्रायडे फॉर फ्युचर कोल्हापूरचे नितीन डोईफोडे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पर्यावरणामध्ये असमतोलपणा निर्माण झाल्याने एकीकडे महापूर, तर दुसरीकडे भीषण दुष्काळ अशी स्थिती वारंवार निर्माण होत आहे. जगभरात या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याला सर्वस्वी बदललेली जीवनशैली व मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखून त्याचे संतुलन राखण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला गांभीर्य लक्षात आणून देऊन जनजागृती करणार आहे,' अशी माहिती फ्रायडे फॉर फ्युचर कोल्हापूरचे नितीन डोईफोडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

डोईफोडे म्हणाले, 'ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम संपूर्ण जगाला सोसावे लागत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी जागतिक पातळीवर फ्रायडे फॉर फ्युचरने चळवळ हाती घेतली आहे. कोल्हापुरातही अशाच प्रकारची चळवळ हाती घेतली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विशेषत: प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोल्हापूर शाखेच्या वतीने मानवी साखळी व शाळा, महाविद्यालयांमध्ये चर्चासत्रे व परिषदा आयोजित केल्या जात आहेत.'

'चळवळीची व्याप्ती वाढवण्यासाठी पुढील काळात कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी पर्यावरण खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे, तर महाविद्यालयीन विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी चर्चासत्रे व परिषदांचे आयोजन केले आहे,' असे डोईफोडे यांनी सांगितले. पत्रकार बैठकीस डॉ. सुभाष आठल्ये, महेश शेटे, सागर बकरे, आनंद अगळगावकर, मनीष मिश्रा, उमाकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्वलनशील वस्तूच्या स्फोटात ट्रकचालक ठार

0
0

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील टोल नाका जवळील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ज्वलनशील वस्तूच्या स्फोटात दत्तात्रय गणपती पाटील (वय ५६ रा.न्यू गणेश कॉलनी जाधव वाडी कोल्हापूर) हे ट्रकचालक ठार झाले. आहे विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अज्ञात जीवन शील वस्तूचा स्पोर्ट झाल्याने शहरात खळबळ उडाली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दत्तात्रय गणपती पाटील हे ट्रक व चालक म्हणून काम करत शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या आपला ट्रेन मधील माळ गोकुळ शिरगाव येथे उतरून कोल्हापूरकडे परतत होते उजळाईवाडी जवळ त्यांच्या ट्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे त्यांनी तिथेच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग पोलीस ठाण्याच्या लगत लावला आणि आपले मित्र आशिष आनंदराव चौगुले यांना मोबाईल करून आपणास नेण्यासाठी यावे अशी विनंती केली. त्यानंतर चौगुले हे आपल्या घरातून दुचाकीवरून पाटील यांना आणण्यासाठी उजळाईवाडी येथील शाहू टोल नाक्याजवळ आले. तोपर्यंत जोरात पाऊस सुरु झाल्यानंतर पाटील हे निवाऱ्यासाठी उड्डाणपुलाखाली गेले. याच वेळी चौगुले यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत पाठीमागे राहिले.पाटील हे चालत पुढे अंधारात गेल्यावर अचानक स्फोटाचा आवाज झाला आणि सर्वत्र धूर पसरला सुदैवाने चौगुले पाठीमागे असल्याने बचावले अचानक झालेल्या स्फोटाच्या आवाजाने आसपास या वाहनांच्या काचा फुटल्या चौगुले यांनी यातून पाटील यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी पाटील गंभीर जखमी अवस्थेत येथे पडले होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळे केले नसते तर पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती: उद्धव ठाकरे

0
0

माण: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माणमध्ये घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते भर पावसात सभा घेत आहेत. पण गावांमध्ये ठणठणाट आहे. तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच, सर्वच पक्षाचे राजकीय नेते प्रचारसभा, रोड शो करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नगर जिल्ह्यात प्रचार सभा होत असतानाच, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माणमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भर पावसात सभा घेत आहेत, पण गावांमध्ये ठणठणाट आहे, असा टोला लगावतानाच तुम्ही तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा घणाघात त्यांनी केला. जेव्हा करायचं होतं, तेव्हा काही केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत होऊन पुढे पाऊल टाकत असताना, त्याला अपशकुन करायचा, अशी टीकाही त्यांनी केली.

निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

वारं फिरलंय, इतिहास घडणार... बाबांच्या सभेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

>> एका विचारांचं स्थिर सरकार आपण या महाराष्ट्राला दिले.

>> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भर पावसामध्ये सभा घेत आहेत, पण गावांमध्ये ठणठणाट आहे.

>> तेव्हा जर तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर, तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आलीच नसती.

>> जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत पणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा.

>> समाजा-समाजांमध्ये भिंती उभ्या करायच्या. असे का करायचे? शिवरायांनी या भिंती तोडून टाकल्या होत्या आणि समाजाला एका पवित्र भगव्या झेंड्याखाली एकवटले होते.

>> ४५० वर्षांनंतरसुद्धा हा देश असा आहे की 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' म्हटल्यानंतर अंगावर रोमांच उभा राहतो.

>> मराठा समाजाच्या मागे जशी शिवसेना उभी राहिली, तशीच धनगर समाज, माळी समाजाच्या पाठिशीही शिवसेना उभी आहे.

>> प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. शिवसेना प्रमुखांनी ही शिकवण दिली आहे.

>> प्रत्येक उपाशी पोट हे भरले गेले पाहिजे ही शिवरायांची शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला वारंवार दिली.

>> पाणी हे काय समाज बघून देतात का ?

>> युती सरकार देईल ते पाणी माझ्या प्रत्येक बांधवांच्या घरामध्ये जाईल. तेव्हा कोणताही समाज बघितला जाणार नाही. हे माझे वचन आहे.

>> १० रुपयांमध्ये मी माझ्या गरीब जनतेला जेवण देणार म्हणजे देणारच.

>> एका रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी करणार म्हणजे करणारच.

>> माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांसाठी विमानसेवेचेही बुकिंग

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

निवडणुकीत काटाजोड लढती होत असल्याने आपली बाजू भक्कम करण्यासाठी अन्य राज्यांसह परदेशातील मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी विमानाची तिकीटे बूक केली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत बाहेरगावी असणारे मतदारही सोमवारी रांगेत पहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप शिवसेना महायुती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत यंदा जोरदार मुकाबला दिसून येत आहे. प्रचारात सत्तारुढ आणि विरोधी अशा दोन्ही गटांनी कसर ठेवलेली नाही. स्टार प्रचारकांच्या सभा, कोपरा सभा, रॅलींनी गल्लीबोळ गजबजून गेले आहेत. दुसरीकडे उमेदवारांच्या 'बी' टीमकडून मतदारांना आणण्यासाठी यंत्रणा लावली आहे. जिल्ह्यातील अनेक मतदार पुणे, मुंबई, ठाण्यात नोकरी व कामधंद्यानिमित्त वास्तव्याला आहेत. अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी जाऊन मेळावे घेतले आहेत. मतदानादिवशी मतदारांना आणण्यासाठी वाहने बूक केली आहेत. मतदारांना येण्या-जाण्याच्या खर्चासह बक्षिशीही दिली जाणार आहे. ज्या मतदारांचे स्वत:चे वाहन असेल त्यांच्या वाहनांच्या इंधनाची टाकी फुल्ल करून दिली जाणार आहे.

एकीकडे परजिल्ह्यातील मतदारांना आणण्यासाठी यंत्रणा लावली असताना दुसरीकडे पर राज्यातील आणि परदेशातील मतदार आणण्यासाठी यंत्रणा लावली आहे. लोकसभा निवडणूकीत ज्यांचे मतदान झालेले नाही, अशा मतदारांची यादी करण्यात आली आहे. त्यामध्ये बहुतांशी मतदार हे परराज्यात आणि परदेशात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मतदानास येण्याची तयारी दर्शवल्यावर त्यांच्या विमानांची तिकीटे बूक करण्यात आली आहेत. अंतिम क्षणी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना तिकीटाची रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे.

बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, कोलकातासह देशभरात ज्या शहरांत मतदार वास्तव्यास आहेत, त्यांना दोन दिवसांची रजा काढण्याची सूचना दिली आहे. मतदान करून पुन्हा ते कामावर जातील असे नियोजनही केले आहे. अमेरिका, इंग्लंड या देशातील मतदारांना एक महिन्यापूर्वी मतदानाची कल्पना दिली आहे. ज्यांची रजा मंजूर झाली आहे, ती मंडळी मतदान आणि दीपावली करून परत परदेशी परततील. आखातातील दुबई, सौदी, कतार या देशांतील मतदार दोन ते तीन दिवस रजा घेऊन मतदानासाठी येतील, असे एका पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्तव्य भावनेतून मतदान प्रक्रियेत भाग घ्या

0
0

लोकशाहीचा हक्क बजावा

भारतीय घटनेने मतदानाचा पवित्र अधिकार दिला आहे. विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानात जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा. आपापल्या कुटुंबांतील सदस्यांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे. भारतीय लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान प्रक्रियेत भाग घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. युवक, युवती, नागरिक अशा सर्वच घटकांनी त्या कर्तव्य भावतेतून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. आणि लोकशाही आणखी मजबूत करण्याच्या प्रक्रियेचा हिस्सा बनावे.

- अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका सभा तहकूब

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बोलवलेली महापालिकेची सभा अपेक्षेप्रमाणे नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे तहकूब करण्यात आली. सुमारे तासभर नगरसेवकांची प्रतीक्षा केल्यानंतर नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी कोरमअभावी सभा तहकूब करत असल्याची घोषणा केली. तहकूब सभा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये तहकूब झालेली सभा शनिवारी सकाळी १२ वाजता बोलवली होती. सभेची कार्यप्रत्रिका गुरुवारी सर्व नगरसेवकांना देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने सभेची तयारी केली. मात्र निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने नगरसेवक सभागृहात आले नाहीत. बहुतांश नगरसेवकांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभा व रॅलीमध्ये उपस्थिती लावली. सर्वच नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवली. नगरसचिव सुमारे तासभर सभागृहात बसले होते. सभेची वेळ निघून गेल्यानंतर त्यांनी कोरमअभावी सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवेदनाचा प्रवास देश-परदेशांत

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : महापुराने उद्ध्वस्त कुटुंबीयांचे संसार फुलविण्याची संवेदनाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. मानवसेवी विचारांनी प्रेरित होऊन ठिकठिकाणचे चित्रकार एकवटले. पुणे, कोल्हापुरात त्यांनी चित्रांचे प्रदर्शन भरवत पूरबाधितांसाठी निधी जमविला. 'आर्ट फॉर ह्युमॅनिटी' हा संवेदनाचा प्रवास मुंबईपर्यंत पोहोचला आहे. मानवी संवेदनाची हाक आठ राज्यांतील कलाकारांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्यासह ऑस्ट्रेलिया, बेल्जियमधील चित्रकार सहभागी होत आहेत. या सर्वांच्या चित्रांच्या विक्रीतून मिळणारे शंभर टक्के उत्पन्न थेट नाम फाउंडेशनच्या खात्यावर जमा होणार आहे. नाम फाउंडेशनमार्फत शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांसाठी बांधणाऱ्या घरकुलासाठी निधीचा विनियोग होईल.

मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, पु. ल. देशपांडे कला अकादमी प्रभादेवी येथे २० ऑक्टोबर रोजी चित्रांचे प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनात जवळपास ३५० हून अधिक चित्रकारांच्या ५०० हून अधिक चित्रकृती प्रदर्शनात असतील. सामाजिक बांधिलकीशी नाळ जपणाऱ्या या उपक्रमामध्ये महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थानमधील चित्रकार सहभागी होत आहेत. संयोजकांकडे आतापर्यंत जवळपास ५०० चित्रे जमा झाली आहेत. ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराची आपत्ती ओढवल्यानंतर पुणे येथे 'वाटा खारीचा' आणि कोल्हापुरात 'रंग भावनांचे' या संकल्पनेंतर्गत ठिकठिकाणच्या चित्रकारांनी प्रदर्शन भरवून पूरग्रस्तांसाठी निधी संकलित केला. पूरग्रस्त भागातील शाळेतील मुलांना चित्रकलेच्या साहित्याचे वाटप केले.

आता 'आर्ट फॉर ह्युमॅनिटी' नावाने पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील चित्रकार, शिल्पकार एकत्र येत आहेत. चित्रकार खिलवान नांद्रे (कोल्हापूर), संतोषकुमार पाटील (बदलापूर), योगेश बरवे (चेंबूर) आणि गोरख घोलप (दादर) यांनी पुढाकार घेत या उपक्रमाचे संयोजन केले आहे. या उपक्रमामध्ये कोल्हापुरातील चित्रकारांनी योगदान दिले आहे. स्थानिक पातळीवर चित्रकार नांद्रे आणि विजय टिपुगडे नियोजन करत आहेत.

'मुंबईतील प्रदर्शनात मांडल्या जाणारी चित्रे व शिल्पकृतीची किंमत ५००० रुपये निश्चित केली आहे. चित्रांची विक्री करून जमणारा निधी हा थेट नाम फाउंडेशनकडे जमा होणार आहे. माणुसकीचे नाते आणि परस्पर सहकार्याचे बंध घट्ट करणाऱ्या या उपक्रमात राज्यासह अन्य भागातील चित्रकारांनी सहभाग नोंदवला आहे. कोणी एक, कोणी दोन, काहींनी पाच चित्रे दिल्याचे चित्रकार नांदे यांनी सांगितले.

००००

ख्यातनाम चित्रकारांच्या चित्रांचा समावेश

राज्यभरातील ख्यातनाम चित्रकार या सामाजिक उपक्रमात सहभागी आहेत. यामध्ये चित्रकार प्रभाकर कोलते, प्रकाश वाघमारे, सुहास बहुलकर, माधव इमारते, विजयराज बोधनकर, विजयराज बोधनकर, जयप्रकाश जगताप, श्रीकांत कदम, श्रीकांत जाधव, सुधाकर चव्हाण, शिरीष देशपांडे, दिलीप रानडे यांच्या चित्रकृती प्रदर्शनात मांडल्या जातील.

०००

माणुसकीच्या नात्याने भरले रंग

मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर चित्रप्रदर्शनासाठी कोल्हापुरातील चित्रकारांनी रंग भरले आहेत. चित्रकार अस्मिता जगताप, शिवाजी म्हस्के, एस. निंबाळकर, विजय टिपुगडे, अर्चना देसाई, राजा उपळेकर, बबन माने, अजेय दळवी, संतोष पोवार, अशोक धर्माधिकारी आकाश जैन, शिल्पकार सतीश घारगे, आदींसह २५ चित्रकारांची चित्रे प्रदर्शनात असतील. प्रदर्शनाच्या नियोजनासाठी कोल्हापुरातील तरुण चित्रकारांची टीम मुंबईला रवाना झाली आहे. यामध्ये विजय उपाध्ये, आकाश झेंडे, शुभम चेचर, पुष्पक पांढरबळे, प्रतीक्षा व्हनबट्टे, दुर्गा आजगावकर, अनिषा पिसाळ, अनिकेत संत यांचा समावेश आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो - उजळाई वाडी उड्डाण पुलाखाली ट्रक अपघात

0
0

फोटो - उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली ट्रक अपघात

फोटो - उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली ट्रक अपघात

Arjun Takalkar

9545787709

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समर्थभक्त मारुती बुवा रामदासी यांचे निधन

0
0

समर्थ भक्त मारुती बुवा रामदासी यांचे निधन

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह आणि ज्येष्ठ प्रवचनकार मारुतीबुवा रामदासी यांचे शनिवारी सकाळी येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. हनुमान जयंतीच्या वेळी त्यांचा जन्म झाला, म्हणून त्यांचे नाव मारुती असे ठेवण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील बुवाचे वाठार येथे त्यांचा जन्म झाला होता.

सज्जनगडावर रामदासी म्हणून कार्यरत असलेल्या बुवांनी श्रीधरस्वामी यांचे मार्गदर्शन घेऊन बुवांनी आजपर्यंत रामदासस्वामींच्या विचारांचा प्रसार केला. अनेक पुस्तकांचे लेखन केले. मनाचे श्लोक, आत्मबोध आदींवर सज्जनगड मासिकातून विपुल लेखन केले. त्यांना सातारा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. बुवांनी सिंगापूर येथे ही प्रचारासाठी समर्थ पादुका दौरा केला होता. देशातील विविध राज्यांत पादुका दौरा करून समर्थ विचारांचा त्यांनी प्रसार केला. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रक्षेपित केलेला त्यांनी लिहिलेला साक्षेप समर्थांचा हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय ठरला. रविवारी सकाळी आठ ते दहा, या वेळेत बुवांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी समर्थ सदन येथे ठेवण्यात येणार असून, सकाळी अकरा वाजता संगम माहुली येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती मंडळाचे विश्वस्त योगेशबुवा रामदासी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ उमेदवारांच्या खर्चात तफावत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाच्या तिसऱ्या तपासणीत नऊ उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळून आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी तफावतीची आकडेवारी जाहीर केली आहे.

कागलमध्ये उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या निरीक्षण नोंदवहीनुसार १३ लाख ९६ हजार ७०८ रुपये खर्च झाला असताना नोंदवहीत १३ लाख ४० हजार ११२ रुपये नोंदवला आहे. संजय घाटगे यांच्या नोंदवहीत आठ लाख ५९ हजार रुपये खर्च झाले आहेत. पण त्यांनी सात लाख १५ हजार ६८३ रुपये खर्च नोंदवला असल्याने एक लाख ४३ हजार ४११ रुपयांची तफावत आहे. समरजितसिंह घाटगे यांचा नोंदवहीनुसार ११ लाख ५८ हजार १३२ रुपये खर्च असताना नोंदवहीत १० लाख ७० हजार १७१ रुपये नोंद झाली आहे. त्यांच्या खर्चात ८७ हजार ९६१ रुपयांची तफावत आढळली आहे. त्याचबरोबर रविंद्र कांबळे, सिद्धार्थ नागरत्न यांच्या खर्चातही तफावत आढळली आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील उमेदवार अमल महाडिक यांचा छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार १५ लाख ३३ हजार ८४४ रुपये खर्च झाला असताना त्यांच्या नोंदवहीत दोन लाख ९४ हजार ७३४ रुपये खर्चाची नोंद झाली आहे. त्यांच्या खर्चात तब्बल १२ लाख ३९ हजार ११० रुपये खर्चाची तफावत आढळली आहे. ऋतुराज पाटील यांचा छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार ११ लाख ५८ हजार ४४९ रुपये नोंदवला आहे. तर त्यांच्या नोंदवहीनुसार चार लाख ९१ हजार ५१९ रुपयांची नोंद झाली आहे. त्यांच्या खर्चात सहा लाख ६६ हजार ९२९ रुपयांची नोंद झाली आहे. सचिन कांबळे, बबनराव ऊर्फ दिलीप कावडे यांचा खर्चातही तफावत आढळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने उडविली तारांबळ

0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूरसह परिसराला झोडपून काढले. शनिवारी सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे दिवाळीच्या खरेदी-विक्रीच्या उत्साहावर पाणी फेरले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील प्रमुख मार्गावरील फेरीवाले, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मात्र आर्थिक फटका बसला.

शनिवारी सकाळपासूनच कोल्हापूर आणि परिसरात पावसाळी वातावरण होते. सायंकाळी चारच्या सुमारास अंधारून आले. सव्वाचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास पाऊणतास पावसाने झोपडून काढले. पावसाने काही वेळातच रस्ते जलमय झाले. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत पावसाचे पाणी पसल्याने दिवाळी सणाच्या खरेदीसाठी दुपारनंतर बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.

शहरातील विविध भागातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूकही रेंगाळली. सातच्या सुमारास खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. शिवाय पावसाच्या तडाख्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला. सायंकाळ सातनंतर व्यावसायिकांनी प्लास्टिक आवरण टाकून साहित्यांची विक्री सुरू केली. मात्र, बाजारपेठेत एरव्ही जाणवणारा गजबजाट पाहावयास मिळाला नाही. लक्ष्मीपुरीतील बाजारपेठ मार्गावर पावसाचे पाणी साठल्याने फळे, भाजीपाला विक्रेत्यांचे हाल झाले. दुपारपर्यंत सफरचंदाची शंभर रुपये किलो दराने विक्री झाली. मात्र, पावसामुळे विक्री थंडावल्यामुळे १०० रुपयाला दीड किलो दराने विक्री केली. अन्य फळे आणि भाजीपालाही कमी दराने विकावा लागला.

महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, पापाची तिकटी परिसर, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरीतील बाजारपेठेवरही परिणाम झाला. शहरातील प्रमुख बाजारपेठेत रस्त्यावर विक्रेत्यांनी स्टॉल टाकून दिवाळी साहित्याची खरेदी विक्री सुरू केली होती. मात्र पावसामुळे सजावटीचे साहित्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फराळाचे साहित्य सुरक्षित ठेवताना धांदल उडाली. पाचच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला. मात्र, सायंकाळनंतर बाजारपेठ थंडावल्याचे चित्र होते. पावसामुळे पाचगावसह परिसरातील वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला होता.

००००

पावसात जळाले झाड

शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याकडून गांधी मैदानाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याच्या बाजूला वडाचे झाड होते. सायंकाळी ६.१५ च्या सुमारास झाडाने पेट घेतल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. नागरिकांनी अग्निशमन दलाला यासंबंधी कळविल्यानंतर काही वेळातच अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली. कर्मचाऱ्यांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. मात्र संपूर्ण झाड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगाव: एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

0
0

बेळगाव: गोकाक तालुक्यातील होसुर गावात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री घडली आहे. पाहिल्यांदा दोन्ही मुलांना गळफास लावून नंतर पती, पत्नीने एकाच दोऱ्याने फास लावून घेत आत्महत्या केली. भिमाप्पा सिद्धप्पा चुनप्पगोळ (३०), मंजुळा चुनप्पगोळ (२५), प्रदीप (८) आणि मोहन (६) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चुनप्पगोळ कुटुंबाचे प्रमुख भिमाप्पा यांना नैराश्याने ग्रासले होते. भिमाप्पा हे सिंडिकेट बँकेत गार्ड म्हणून काम करत होते. प्राथमिक तपासात पोलिसांनी ही माहिती दिली आहे. असे असले तरी, या आत्महत्येमागे नेमके कारण कोणते याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. पोलीस या घटनेचा कसून तपास करत असून, तपासाअंती याबाबतचे कारण कळण्यास मदत होणार आहे.

भिमाप्पा चुनप्पोळ यांनी पहिल्यांदा आपल्या दोन्ही मुलांचा गळफास लावून त्यांचे जीवन संपवले. ते मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर लगेचच भिमाप्पा यांनी आणि त्यांची पत्नी मंजुळा चुनप्पगोळ या दोघांनी फास घेत आपल्या जीवनानाची यात्रा संपवली.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट दिली. गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सिंडिकेट बँकेत गार्डचे काम करणारे भिमाप्पा चुनप्पगोळ हे कर्जबाजारी झाले होते का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. तसेच, या घटनेमागे आणखी कोणते कारण असू शकते का, याचाही गोकाक पोलीस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'रुस्तम-ए-हिंद' हरपला; कोल्हापुरात दादू चौगुलेंचे निधन

0
0

कोल्हापूर: देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविणारे पैलवान 'रुस्तम-ए-हिंद' दादू चौगुले यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

दादू चौगुले यांनी दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकांची कमाई त्यांनी केली होती. या बरोबरच 'रुस्तुम ए हिंद', 'महान भारत केसरी' अशा पुरस्कारांनीही त्यांना सन्मानीत करण्यात आले. भारत सरकारने मानाच्या मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानेही त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

दादू चौगुले यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या छोट्याशा गावात कुस्ती खेळायला सुरुवात केली. या छोट्या कुस्तीपटूने वस्ताद गणपतराव आंदळकरांचे मन त्यात काळात जिंकले. आंदळकरांनी मोठे परिश्रम घेत दादूंना कुस्तीचे डावपेच शिकवले. त्यानंतर तयार झालेला हा कुस्तीपटू उत्तरेतील बुरुजबंद मल्लांशी भिडू लागला. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत दादूंनी अनेक मानाच्या गदा पटकावल्या. पैलवान आंदळकर, बाळ गायकवाड, बाळू बिरे यांच्या तालमीत घडलेल्या या पैलवानाने कोल्हापूरचा जरीपटका सर्वत्र मानाने फडकवत ठेवला.

राष्ट्रकुल स्पर्धेतही फडकावला भारताचा झेंडा

दादू चौगुलेंनी लाल मातीबरोबर मॅटवरही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला. १९७३ साली न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या शंभर किलो गटातील कुस्ती स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावले. तत्पूर्वी त्यांनी महान भारत केसरी, रूस्तम ए हिंद या मानाच्या गदा कोल्हापुरात आणल्या होत्या. त्यामुळे त्यांचा कुस्तीत चांगलाच दरारा निर्माण झाला.

काही वर्षांनतर ते कुस्तीपासून दूर झाले असले तरी त्यांनी पुढे कुस्तीच्या विकासासाठी सक्रिय योगदान दिले. सध्या ते कोल्हापूर शहर व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष आहेत. या माध्यमातून ते कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी संघटनात्मक काम करत आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी विशेष मेहनत घेत घडविले. अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेशी चांगले संबंध ठेवत कोल्हापुरातील मल्लांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेले. मुलालाही चांगला मल्ल घडविला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा विनोद हिंदकेसरी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपावलीसाठी किराणा मार्केट सज्ज

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दीपावलीसाठी किराणा मार्केट सज्ज झाले असून फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. बहुतांशी पदार्थांचे दर स्थिर असून शेंगदाण्याच्या दरात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. फराळासाठी लागणाऱ्या तयार मसाल्यांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

फराळाचे तयार पदार्थ खरेदी करण्याचा कल वाढला असला तरी घरी फराळाचे पदार्थ तयार करण्याची पध्दत कोल्हापुरात अजूनही टिकून आहे. त्यामुळे किराणा मालाच्या दुकानातून साहित्य खरेदी करुन फराळाचे पदार्थ तयार करण्याची तयारी घरोघरी सुरु आहे. कपिलतीर्थ मार्केट, शिवाजी मार्केट या ठिकाणी किराणा मालांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. रवा, मैदा, हरभरा डाळ, साखर या तीन पदार्थांना मोठी मागणी आहे. करंजी, बाकरवडी, पुडाची वडीसाठी खास राजापूरच्या काळ्या वाटीच्या सुक्या खोबऱ्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. सारणासाठी खोबऱ्याचा खिस खरेदी करण्याला पसंती दिली जात आहे. शेंगदाण्याच्या दरात गेल्या आठ दिवसात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी शेंगदाण्याचा दर ११० रुपये होता. तो आता १२० ते १३० रुपयांवर पोचला आहे. किराणा दुकानादारांनी एकाच छताखाली दिवाळीचे साहित्य मिळावे यासाठी भाजके पोहे, तळलेली बुंदीही ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे.

कोट

'यंदा दीपावली महिनाअखेरीस आली असल्याने पगार झाले नसले तरी भिशी फुटल्याने ग्राहक खरेदीकडे येऊ लागला आहे. एकाच छताखाली दीपावलीच्या सर्व वस्तू मिळाव्यात यासाठी किराणा दुकानदार सज्ज झाले आहे. रविवारी धुमधडाक्यात खरेदी होण्याची अपेक्षा आहे.

- संदीप वीर, किराणा व्यावसायिक, कपिलतीर्थ मार्केट

फराळ तयार करण्यासाठी

साहित्याचे दर रुपयांत

भाजके पोहे : ६४ ते ७०

तळायचे पोहे : ४८

नॉयलॉन पोहे : ६८ ते ७२

मका पोहे : ४८

साखर : ३८

पिठ्ठी साखर : ४४

लिसा साखर : ४८

शेंगदाणा : १२० ते १३०

भाजके शेंगदाणे : १३० ते १४०

मैदा : ३२ ते ३४

आटा : ३२ ते २४

रवा : ३२ ते ३४

उडीद डाळ : ७० ते ८८

हरभरा डाळ : ६८

बेसन : ८०

फुटाणा डाळ : १००

जाडा तांदूळ : ३०

अनारस पीठ : १४०

खोबरे राजापूर : १८० ते २२०

खोबरे खिस : १९० ते २३०

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १३५ ते १४०

सरकी तेल : ९०

खोबरेल : २४०

सूर्यफूल : १००

तूप : ५४०

सूर्यफूल : ८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसूण, कोथिंबीर महागली

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

बाजारपेठेला दीपावलीची चाहूल लागली असून मंडयांमध्ये भाज्यांची मोठी आवक झाली आहे. लसूण, कोथिंबीर महाग झाली असून फळभाज्या आणि पालेभाज्या आवाक्यात आल्या आहेत. पावसाचा भाजी मार्केटवर मोठा परिणाम झाला असून पालेभाज्या आणि फळभाज्या स्वस्त झाले आहेत.

कांद्याचा दर प्रतिकिलो ५० रुपयांवरून ३० ते ४० रुपये इतका कमी झाला आहे. पण लसूण दर वाढला आहे. प्रतिकिलो १६० रुपयांपासून २४० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. लहान आकाराचा लसूण प्रतिकिलो १६० रुपये, मध्यम आकाराचा २०० तर मोठ्या आकाराचा लसूण २४० रुपये आहे. कोथिंबीरीचा दर वाढला असून प्रतिपेंढी २० रुपयावरुन ३० ते ४० रुपये दराने विक्री सुरू आहे.

दीपावलीतील फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी लसूण आणि कोथिंबीरीचा वापर होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट बसण्याची शक्यता आहे. टोमॅटोचा दर अजूनही प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांवर स्थिर आहे. कोबी आणि फ्लॉवर गड्ड्याचे दर दहा ते वीस रुपयांनी कमी झाले आहे. दोडका, भेंडी, वांगी या फळांचे दर प्रतिकिलो ४० रुपयांवर स्थिर आहेत. सफरचंद आणि सिताफळांची मोठी आवक झाली असून सफरचंद प्रतिकिलो ५० ते १५० तर सिताफळाचा दर ४० ते ६० रुपये आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ४०

टोमॅटो : ३० ते ४०

भेंडी : ५० ते ६०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ४० ते ६०

कारली : ४०

वरणा : २० ते ४०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १५ ते ४० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : २०

लसूण :१६० ते २४०

कांदा : ३० ते ४०

आले : १०० ते १२०

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १५

कांदा पात : १०

कोथिंबीर : ३० ते ४०

पालक : १०

शेपू :१०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : ५० ते १५०

डाळिंब : ३० ते ८०

सिताफळ : ४० ते ८०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पडद्याआड घडामोडी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. जाहीर प्रचाराची सांगता होऊन पडद्यामागून हालचालीने वेग घेतला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना 'लक्ष्मी'चे दर्शन देण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली असून अखेरच्या टप्प्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. पाठिंबा देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून मतदारांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदानाच्या शेवटच्या घटकेपर्यंत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लुप्त्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून रात्रभर लढवल्या जात होत्या.

विधानसभा निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच पक्षातील उमेदवारांचा प्रचार टिपेला पोहोचला होता. पंधरा दिवसांपासून पदयात्रा, मोटारसायकल रॅली, कोपरा व जाहीर सभेच्या माध्यमातून दहाही मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले. स्टार प्रचारकांच्या उत्साहपूर्ण भाषणांनी वातावरण निर्मिती केली. स्थानिक पातळीवरील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी उमेदवारांवर जोरदार टीका केली. तर अनेक उमेदवारांनी फोडाफोडीच्या राजकारणात अधिक रुची दाखवली. एकमेकांचे कार्यकर्ते फोडत विरोधी उमेदवारांमध्ये धडकी भरवण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी अशा प्रयत्नांना यश आले.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीतील हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. झालेल्या आणि न झालेल्या विकासकामांवर विद्यमान आमदार व विरोधी उमेदावारांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांच्या सहकारी संस्थांवर टिकेची झोड उठवली गेली. शनिवारी सायंकाळी सहानंतर मात्र प्रचाराची रणनितीच बदलली. रात्रीपासून छोट्या-मोठ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर वॉच ठेवण्यात येऊ लागला. मंडळांना विविध अमिषे दाखवून एकगठ्ठा मते खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला. तो रात्री उशीरापर्यंत सुरू होता. साम, दाम, दंड आणि भेद या चतु:सूत्रीचा वापर करण्यात येऊ लागला आहे. यापैकी दाम आणि दंड याचा जोरदार वापर रविवारी रात्रभर झाला. दबावाचे राजकारण करताना मुक्तहस्ताने मतदारांना 'अर्थ' पुरवठा केला. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात ठेवली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून जेवणावळीही झडत असताना मतदारांना पास देवून हॉटेल व धाब्यावर पाठवले जात आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंब्याचे व्हीडिओ व्हायरल केले जावू लागले आहेत.

सोमवारी सकाळी मतदानापर्यंत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विविध प्रलोभने दिली जाणार आहेत. सर्वच मतदारसंघांत कमालीची चुरस असल्याने अखेरची रात्रही अनेकांसाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

मद्य विक्री बंद

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बिअरबारसह मद्यविक्री आज रविवारपासून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तर गुरुवारी (ता.२४) होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी बिअरबार बंद राहणार आहेत. त्यामुळे तळीरामांची अडचण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांनीही हाती घेतला झाडू

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावला. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारामुळे रविवारच्या महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाला. पण ज्येष्ठ नागरिकांनी ही कसर भरून काढत भरपावसात स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिकांनी कर्मचाऱ्यांसोबत पंचगंगा घाटाची स्वच्छता केली. विविध परिसरात स्वच्छता करत सुमारे ५५ टन कचरा व प्लास्टिकची उचल करण्यात आली.

महापालिकेतर्फे दर रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविली जाते. मे महिन्यापासून सुरू झालेल्या मोहिमेला सामाजिक संस्था, विद्यार्थी व पर्यावरणप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजचा रविवार मात्र अपवाद ठरला. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचारात व्यस्त असलेल्या शहरवासियांनी व विद्यार्थ्यांनी मोहिमेकडे पाठ फिरवली. रविवारी जाहीर प्रचार नसला, तरी पडद्यामागील घडामोडीत सहभागी असलेले कार्यकर्ते आले नाहीत. मात्र त्यांची अनुपस्थिती ज्येष्ठ नागरिकांनी भरुन काढली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह या ज्येष्ठ नागरिकांनी पंचगंगा घाट व यल्लमा मंदिर, रंकाळा तलावावरील शाहू स्मृती बाग, हुतात्मा पार्क आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. घाट परिसरातील पात्रातील मंदिरांवर साठलेला कचरा काढून टाकण्यात आला. घाटावरील पायऱ्यांचीही स्वच्छता करण्यात आली. विविध ठिकाणी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेतून ५५ टन कचरा व प्लास्टिकची उचल करण्यात आली.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह सहायक आयुक्त संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाी, डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान यंत्र वाटपात पावसाचा व्यत्यय

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभेसाठी मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचविण्याच्या प्रक्रियेत रविवारी दिवसभर पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे अनेक केंद्रांवर साहित्य पोहोचण्यास उशीर झाला. पावसाळी वातावरण असल्याने विवेकानंद कॉलेजमध्ये साहित्य वाटपाच्या ठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला होता. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसामुळे मंडपातही पाणी आले. परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे निवडणूक प्रशासनास काही काळ साहित्य वाटपाचे काम थांबवावे लागले.

जिल्ह्यातील ३ हजार ३४२ मतदान केंद्रावर आज, सोमवारी मतदान होणार आहे. सकाळी सातला मतदानाला प्रारंभ होणार आहे. केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी, पोलिस सर्व साहित्य घेऊन पोहोचत आहेत. त्यासाठी दहा ठिकाणी सकाळी ११ वाजल्यापासूनच साहित्य वाटपाला सुरूवात करण्यात आली. कर्मचारी, पोलिस कर्मचारी सकाळी सात वाजताच साहित्य वाटपाच्या हजर होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन त्यांना साहित्य वाटपाच्या ठिकाणच्या मंडपात केंद्रनिहाय आखून दिलेल्या जागांवर बसविण्यात आले. नंतर केंद्रनिहाय मतदान यंत्रांसह आवश्यक साहित्य केंद्राध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले.

स्वामी विवेकानंद कॉलेजमधील हॉलमधून शहरातील उत्तर मतदारसंघातील साहित्य वाटप करण्यात आले. त्यासाठी येथे मंडप उभारला होता. साहित्य आणि कर्मचारी नेण्यासाठी केएमटीच्या गाड्यांची रांग लागली होती. त्यामुळे कॉलेजसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. साहित्य वाटप सुरू असताना दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पाऊस आला. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी हातात व्हीव्हीपॅट, इव्हीएम, शाईची बाटली आदी साहित्य घेऊन पाऊस जाण्याची प्रतिक्षा करीत थांबले होते.

व्यासपीठावर उपस्थित निवडणूक अधिकारी, 'पावसात मतदान यंत्र, साहित्य भिजवू नका' असे आवाहन करीत होते. शेवटी पाऊस थांबल्यानंतरच मतदान अधिकारी, कर्मचारी केएमटी बसमधून 'उत्तर' मतदानसंघातील मतदार केंद्रांवर जाऊन पोहचले. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान साहित्याचे वाटप राजारामपुरीत ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील हॉलमधून तर करवीर मतदारसंघातील साहित्याचे वाटप रमणमळा परिसरातील शासकीय गोदामांतून करण्यात आले. तेथेही साहित्य वाटपात पावसामुळे तारांबळ उडाली.

मंडपातच डब्यातील जेवण

मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्यात आली आहे. त्यामुळे शहर, करवीरमधील केंद्रातील कर्मचारी गडहिंग्लज, आजरा, चंदगड आदी तालुक्यातील आहेत. त्यांनी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर त्याच ठिकाणी बसून डब्यातून आणलेल्या जेवणावर ताव मारला. त्यानंतर प्रशासनाने सोय केलेल्या वाहनातून ते केंद्रावर पोहचले. दरम्यान, केंद्रांवर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या पोस्टल मतदानाच्या पेट्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या. यासाठी पोलिस बंदोबस्त असलेले विशेष वाहन तैनात केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी

0
0

जिल्ह्यातील १०६ उमेदवारांचे आज ठरणार भवितव्य

विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवार :

चंदगड : रमेश रेडेकर (अपक्ष), शिवाजी पाटील (अपक्ष), संग्राम कुपेकर (शिवसेना), सुभाष देसाई (अपक्ष), श्रीकांत कांबळे (बसपा), अप्पासाहेब भोसले (अपक्ष), अनिरुध्द रेडेकर (अपक्ष), संतोष पाटील (अपक्ष), प्रकाश रेडेकर (अपक्ष), नामदेव सुतार (अपक्ष), राजेश पाटील (राष्ट्रवादी), अप्पी पाटील (वंचित बहुजन आघाडी), अशोक चराटी (जनसुराज्य शक्ती), महेश पाटील (अपक्ष).

राधानगरी : प्रकाश आबिटकर (शिवसेना), के.पी. पाटील (राष्ट्रवादी), युवराज येडूरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), गोविंदा शिंदे (बसपा), जीवन पाटील (वंचित बहुजन आघाडी), अरुण डोंगळे (अपक्ष), प्रविण कोरगांवकर (अपक्ष), कृष्णा देसाई (अपक्ष), चंद्रकांत पाटील (अपक्ष), दिनकर चांदम (अपक्ष), राहुल देसाई (अपक्ष), सत्यजित जाधव (अपक्ष).

कागल : हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), रवींद्र कांबळे (बसपा), संजय घाटगे (शिवसेना), सिध्दार्थ नागरत्न (बहुजन मुक्ती पार्टी), समरजित घाटगे (अपक्ष), श्रीपती कांबळे (अपक्ष).

कोल्हापूर उत्तर : अजय प्रकाश कुरणे ( बहुजन समाज पार्टी), चंद्रकांत जाधव (कॉँग्रेस), राजेश क्षीरसागर (शिवसेना), सतीशचंद्र कांबळे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), राहुल राजहंस (वंचित बहुजन आघाडी), अमित अतिग्रे (अपक्ष), सलीम बागवान (अपक्ष), संभाजी साळुंखे (अपक्ष).

कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक (भाजप), ऋतुराज पाटील (काँग्रेस), सचिन कांबळे ( बहुजन समाज पार्टी), चंद्रकांत नागांवकर (बहुजन मुक्ती पार्टी), बबनराव कावडे (वंचित बहुजन आघाडी), अमित महाडिक (अपक्ष), राजेंद्र कांबळे (अपक्ष), सलीम बागवान (अपक्ष).

करवीर : चंद्रदीप नरके (शिवसेना), पी. एन. पाटील (काँग्रेस), बजरंग पाटील (बसपा), डॉ. आनंदा गुरव (वंचित बहुजन आघाडी), गोरख कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. प्रगती चव्हाण (संभाजी ब्रिगेड पार्टी), ॲड. माणिक शिंदे (बळीराजा), अरविंद माने (अपक्ष).

शाहूवाडी : गौतम कांबळे (बसपा), सत्यजीत पाटील (शिवसेना), भारत पाटील (शेकाप), डॉ. विनय कोरे (जन सुराज्य शक्ती), डॉ. सुनिल पाटील (वंचित बहुजन आघाडी) , अफजल देवळेकर (अपक्ष), आनंद यादव (अपक्ष), विनायक गुजर (अपक्ष), विनायक जाधव (अपक्ष),सत्यजित पाटील (अपक्ष), संतोष खोत (अपक्ष).

हातकणंगले : राजू आवळे (काँग्रेस), चंद्रशेखर कांबळे (बसपा), डॉ. सुजित मिणचेकर (शिवसेना), दलितमित्र डॉ. अशोकराव माने (जनसुराज्य शक्ती), किरण कांबळे (ताराराणी पक्ष), एस. पी. कांबळे (वंचित बहुजन आघाडी), सागर शिंदे (एमआयएम), डॉ. अविनाश सावर्डेकर (अपक्ष), शिवाजी आवळे (अपक्ष), प्रदीप कांबळे (अपक्ष), ॲड. तेजस पठाणे (अपक्ष), प्रशांत गंगावणे (अपक्ष), राजीव किसनराव आवळे (अपक्ष), राजू वायदंडे (अपक्ष), राहुल पाटोळे (अपक्ष), संदीप दबडे (अपक्ष).

इचलकरंजी : उमेश खांडेकर (बसपा), राहुल खंजिरे (काँग्रेस), सुरेश हाळवणकर (भाजपा), शशिकांत आमणे (वंचित बहुजन आघाडी), इस्माईल समडोळे (स्वराज इंडिया), संतोष कोळी (बाळमहाराज) (अखिल भारतीय हिंदू महासभा), अभिजीत खोत (अपक्ष), कुबेरसिंग रजपूत (अपक्ष), नितीन लायकर (अपक्ष), प्रकाश आवाडे (अपक्ष), बाळकृष्ण म्हेत्रे (अपक्ष), शकुंतला मगदूम (अपक्ष), शाहूगोंडा पाटील (अपक्ष), संजय पोळ (अपक्ष).

शिरोळ : आदम मुजावर (बसपा), उल्हास पाटील (शिवसेना), सावकर मादनाईक (स्वाभिमानी पक्ष), अनिलकुमार यादव (जन सुराज्य शक्ती), सुनिल खोत (वंचित बहुजन आघाडी), जितेंद्र ठोंबरे (अपक्ष), प्रमोद पाटील (अपक्ष), राजेंद्र पाटील - यड्रावकर (अपक्ष), शिवाजी संकपाळ (अपक्ष).

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी, २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी यंत्रे आणि इतर साहित्य तालुक्याच्या ठिकाणी पोहच करून ती स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत मतदान होणार आहे.

मतदार

चंदगड : ३१८९१३

राधानगरी : ३२५५३८

कागल : ३२२४६९

कोल्हापूर दक्षिण : ३२४३६७

करवीर : ३०३१७७

कोल्हापूर उत्तर : २८५४४७

शाहूवाडी :२८७४४७

हातकणंगले : ३१७६६८

इचलकरंजी : २९३२४३

शिरोळ : ३१२३९१.

एकूण ३० लाख ९० हजार ६६०

...

१०

निवडणूक निर्णय अधिकारी

३१

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

एका मतदान केंद्रावर कर्मचारी

२६ हजार ९८२

एकूण कर्मचारी

७०

संवेदनशील केंद्रे

मतदानासाठीची ११ प्रकारची कागदपत्रे

- पासपोर्ट

- वाहनचालक परवाना

- शासकीय, निमशासकीय, महामंडळ कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र

- छायाचित्र असलेले बँकेचे आणि पोस्टाचे पासबूक

- पॅनकार्ड

- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत स्मार्ट कार्ड

- जॉब कार्ड

- हेल्थ इन्शूरन्स स्मार्ट कार्ड

- छायाचित्रासहीत निवृत्तीवेतन कागदपत्रे

- खासदार, आमदारांना दिलेले शासकीय ओळखपत्र

- आधारकार्ड

दहा सखी केंद्रे

चंदगड : नेसरी

राधानगरी : फेजिवडे, अनाप खुर्द

कागल : गोपालकृष्ण गोखले विद्यामंदिर

कोल्हापूर दक्षिण : रोटरी विद्यालय, केडीसीसी बँकेजवळ

शाहूवाडी : उकळी

हातकणंगले : रामराव इंगळे हायस्कूल

इचलकरंजी : बाबासाहेब खंजिरे नाईट कॉलेज

शिरोळ : पद्माराजे विद्यालय

दहा आदर्श केंद्रे

चंदगड : अडकूर

राधानगरी : गारगोटी

कागल : म्युनिसिपल हॉल, कागल

कोल्हापूर दक्षिण : रोटरी विद्यालय

कोल्हापूर उत्तर : इस्टर्न पॅटर्न गर्ल्स स्कूल

शाहूवाडी : पन्हाळा कुमार विद्यामंदिर

हातकणंगले - रामराव इंगवले हायस्कूल

इचलकरंजी : गंगामाई गर्ल्स हायस्कूल

शिरोळ : छत्रपती शिवाजी विद्यामंदीर

मतदारांसाठी हेल्पलाइन : १९५० टोल फ्री

दिव्यांग मतदारांसाठी अॅप : pwd

मतमोजणीचे ठिकाण

चंदगड : नगरपरिषद पॅव्हेलियन हॉल गडहिंग्लज

राधानगरी, भुदरगड : जवाहर बाल भवन मौनी विद्यापीठ, गारगोटी

कागल : जवाहर नवोदय विद्यालय सांगाव रोड

शाहूवाडी : जुने शासकीय गोदाम

हातकणंगले : नवीन प्रशासकीय इमारत

इचलकरंजी : राजीव गांधी भवन, कापड मार्केटसमोर

शिरोळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा तर होणारच

0
0

जिंकण्यासाठीच सारे काही

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली तर गेल्या महिनाभरातील आरोप-प्रत्यारोप, व्यक्तीगत टिकाटिप्पणीमुळे आणखी काही दिवस राजकीय धुरळा उडत राहणार आहे. वास्तविक विधानसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघातील सर्वांगिण विकासाचा अजेंडा, उद्योगधंदा, रोजगार निर्मितीला चालना, तरुणांच्या हाताला काम याविषयी चर्चा घडायला हवी होती. मात्र नेहमीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही हे सारे बाजूला पडले आणि बहुतांश सर्वच उमेदवारांनी व्यक्तीगत टिकाटिप्पणी करत प्रचाराची दिशाच बदलली. 'जिंकण्यासाठी सारे काही' या सुत्राचा अवलंब झाला. भोजनावळी, सहली आणि 'लक्ष्मी'दर्शनाचा कार्यक्रम घडला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तर प्रचाराची पातळी आणखी घसरली. कोल्हापूर दक्षिण आणि कागल मतदारसंघात तर प्रचारात कुटुंबीयांना गोवले गेले.

जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढाई आहे. या निवडणुकीत ज्या त्या मतदारसंघातील विकासकामाचा अजेंडा, परराज्यात निघालेले उद्योग, खुंटलेली रोजगार निर्मिती, रोजगाराच्या शोधातील तरुण या अनुषंगाने पक्ष आणि उमेदवारांकडून अपेक्षित कृती कार्यक्रम आवश्यक होता. मात्र युद्धात आणि प्रेमात सारे काही माफ असते याची प्रचित घडवित विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी व्यक्तीगत उणीदुणी काढत फड गाजविला. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कालावधीत शिवसेना, भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र होते.

प्रचाराला कालावधी उलटत गेला तसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी पक्षाने जिल्ह्यात कडवे आव्हान उभे केले. खरं तर हा जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत भाजप, सेनेने जिल्ह्यातील एकेक गड सर केले. दोन्ही काँग्रेसच्या मातब्बर मंडळींना आपल्यात सामावून घेतले. प्रत्येकाला काही ना काही शब्द दिला. कोणाला विधानसभेची उमेदवारी, कोणाला महामंडळाचे अध्यक्षपद यामुळे युतीमध्ये भरपूर 'इनकमिंग'झाले. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत युती आणि आघाडी धर्म पाळला नाही. प्रत्येकाला आमदारकीची वेध लागलेले. यामुळे अनेकांनी 'तिकीट दिले तर पक्षासोबत, उमेदवारी नसल्यास स्वतंत्र'असा बाणा ठेवत निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

बंडखोरीचे ग्रहण सुटावे म्हणून काही ठिकाणी दबावतंत्राचा अवलंब झाला. निलंबनाची भिती घातली. काही जणांना अन्य ठिकाणी सामावून घेण्याचे ठरले. मात्र बंडखोरांनी लढण्याचा बाणा कायम ठेवला. राजकारणातील जुने हिशेब चुकते केले. पडद्याआड राहून रसद पुरविली. आघाडी आणि युतीतही काही ठिकाणी संशयकल्लोळ निर्माण झाला. शिरोळ तालुक्यात आघाडीतील काही मंडळी गेल्या निवडणुकीत हातात हात घालून काम करत होते. आता आता एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये युती आणि आघाडीधर्माचा पुरता खेळखंडोबा झाला. कोणी विरोधी उमेदवारांच्या गळ्यात गळे घातले.

कुणी पक्षात राहूनच स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केले. त्याला ना पदाधिकारी अपवाद ना कार्यकर्ते. सगळयांचेच सोयीचे राजकारण. दक्षिण आणि करवीरमध्ये फोडाफोडीचे राजकारण रंगले. 'चंदगड'मध्ये भाऊबंदकी उफाळली. हातकणंगलेमध्ये उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे निकालाचा अंदाज लागेना अशी स्थिती बनली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची समजून प्रत्येक मतदारसंघात अख्खे कुटुंब प्रचारात उतरले. यामुळे प्रचाराला कौटुंबीक झालर लाभली. परिणामी एक, दोन मतदारसंघात उमेदवारापुरती मर्यादित ही निवडणूक कुटुंबाभोवती फिरली. कार्यकर्त्यांतील राजकीय ईर्षा आणखी वाढली. सर्वच मतदारसंघात जाहीर सभेपेक्षा पदयात्रा, गाठीभेटीवर भर दिला. मतदानाची अंतिम टप्प्यात सर्व भोजनावळींना ऊत आला. आर्थिक घडामोडी वेगावल्या. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा गाजल्या. मतांचे पॉकेट मिक्स करण्यासाठी कारभाऱ्यांनी रात्र जागवली.

- आप्पासाहेब माळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images