Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गडहिंग्लजमध्ये एकाची आत्महत्या

$
0
0
येथील महेश भैरान्ना पाटील (वय २८, रा.पाटील गल्ली, काळभैरी रोड) या तरुणाने राहत्या घरी तुळीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, महेश यांनी रात्री साडे नऊच्या सुमारास घरात कोणी नसताना दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

राधानगरी, गारगोटीत उस्फूर्त बंद

$
0
0
टोलप्रश्नी शिवसेनेच्यावतीने आज पुकारलेल्या कोल्हापूर जिल्हा बंदला राधानगरीत व गारगोटीतही प्रतिसाद मिळाला. सकाळपासून सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून टोल वसुलीस विरोध असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी शिवसेनेच्या तीन आमदारासह महापौर व दोनशे कार्यकर्त्यावर गुन्हे नोंद केले.

‘इटेतील धान्य दुकानाचा बचत गटांना परवाना द्या’

$
0
0
इटे (ता. आजरा) येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान परवानाधारक मंगल शिवाजी कांबळे यांचे पती शिवाजी कांबळे नागरिकांना शिवीगाळीबरोबरच अनियमित धान्य व रॉकेल पुरवठा करतात. त्यामुळे त्यांचा परवाना रद्द करावा. त्याऐवजी ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी किंवा महिला बचत गटास हा परवाना द्यावा.

चौपदरीकरण कासवगतीने

$
0
0
रखडलेले भूसंपादन, सरकारकडे नव्या प्रस्तावाच्या खोळंबलेल्या फायली यामुळे सांगली-कोल्हापूर रस्ता चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सुप्रीम इन्फ्रास्ट्र्नचर कंपनीकडे येत्या १९ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.

पोषण आहार अपहाराप्रश्नी तक्रार घेण्यास नकार

$
0
0
शालेय पोषण आहारात झालेल्या अपहाराची खातेनिहाय चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर फौजदारी दाखल करावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर शिवसेनेच्या वतीने सोमवारी शिक्षण मंडळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रशासन अधिकारी पी. एल. हणबर यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

‘खुशाली’त लूट

$
0
0
तालुक्यातील ऊसतोड करणाऱ्या स्थानिकांसह बीडकडील टोळ्यांनी खुशालीच्या नावाखाली चंदगडसह जिल्ह्यात सर्वत्र लूट सुरू केली आहे. ट्रक, ट्रॅक्टरपाठीमागे अडीच हजारांपासून साडेतीन हजारांपर्यत खुशाली घेतली जात असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

अंगणवाडीसेविकांचा उद्या रास्ता रोको

$
0
0
पेन्शन योजना २००४ पासून लागू करा, मानधनात वाढ करा या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. मात्र याबाबत सरकारने कोणतेही लेखी आश्वासन न दिल्याने हा संप सुरूच ठेवण्याचा निर्धार अंगणवाडीसेविकांनी केला आहे.

भाड्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक

$
0
0
‘मोबाइल टॉवरसाठी टेरेस भाड्याने द्या आणि लाखो रूपये मिळवा,’ अशा जाहिरातीला भुललेल्या शहरातील अनेकजणांना लाखोंचा गंडा बसला आहे. फसवणूक झालेली मंडळी पोलिस ठाण्याची पायरी चढण्यासाठी पुरावे गोळा करू लागली आहे.

थेट पाइपलाइनसाठी BOT ला रामराम

$
0
0
‘टोल’ च्या प्रकरणाने धडा घेत महापालिकेने थेट पाइपलाइन योजनेसाठी बीओटी तत्वावर जाण्याऐेवजी कर्ज उभारण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकारच्या निधीतून भूसंपादन व एमएसईबीचा खर्च दिला जाणार असल्याने केवळ दहा टक्के वाट्याप्रमाणे सध्या तरी ४२ कोटीच्या आसपास कर्ज घ्यावे लागणार आहे.

कारखान्यांची साखर विक्री रोखू

$
0
0
टनाला २६५० एकरकमी उचल न देणाऱ्या साखर कारखान्यांची चिमूटभर साखरही गोदामाबाहेर विक्रीसाठी जावू देणार नसल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दुपारी दिला. एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी खासदार शेट्टी यांनी केली.

कामच अपूर्ण, खर्च देण्याचा प्रश्नच नाही

$
0
0
मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर नगरसेवकांनी रस्ते प्रकल्पाचा खर्च देण्याबाबतचा ठराव करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र महापालिका आयुक्त अजूनही ९५ टक्के कामाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. कराराप्रमाणे ९५ टक्के काम पूर्ण झालेले नाही.

एक कोटीचे नुकसान

$
0
0
टोल नाके व आयआरबीच्या कार्यालयावर केलेल्या जाळपोळ, मोडतोडीत पाच टोलनाके व गांधीनगर येथील आयआरबी कर्मचाऱ्यांच्या हॉस्टेलचे एक कोटी दोन लाख ३८ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा दावा आयआरबीने केला आहे.

पोलिसांचीही झाली कोंडी

$
0
0
टोलवसुली बंद करावी तर उच्च न्यायालयाचा आदेश न पाळल्यामुळे न्यायालयाचा अवमान होणार. त्यामुळे एवढ्या आंदोलनानंतरही आयआरबी कंपनी टोल वसूल करणार असल्याचे दाखवत आहे.

टोलमुक्तीसाठी राज्यभर जनआंदोलन

$
0
0
‘कोल्हापुरातील जनतेचा संताप अनावर झाल्याने बेकायदेशीर टोलनाके उद‍्ध्वस्त केले आहेत. लोकांकडून बेकायदेशीर पैसे वसूल करणारे हे टोलनाके आता सरकारने बंदच करावेत अन्यथा राज्यभर टोलमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.

टोल सुरू करण्याच्या भानगडीत पडू नका

$
0
0
कोल्हापूरकरांच्या उद्रेकामुळे रविवारी दिवसभर टोलनाक्यांची प्रचंड मोडतोड, जाळपोळ होऊनही रविवारी मध्यरात्री आयआरबीने वसुलीची तयारी चालवल्याने महापालिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यामुळे ती पुन्हा थांबली.

संक्रांत खरेदीवर बंदचा परिणाम

$
0
0
टोलप्रश्नी सोमवारी शिवसेनेने कोल्हापूर बंद पुकारल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. संक्रातीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना बंदमुळे चांगलाच फटका बसला.

कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय

$
0
0
कंपनीच्या वकिलांचा सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कायदेशीर सल्ला घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही टोल सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार आहोत असा खुलासा आयआरबी कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकिय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी केला आहे.

गुरुवारच्या सभेत टोल रद्दचा ठराव

$
0
0
प्रकल्पाचा खर्च भागवण्याबरोबरच करार रद्द करण्याचा ठराव महापालिकेच्या गुरुवारच्या विशेष सभेत केला जाणार आहे. त्यासाठी एकीकडे मंत्री, महापालिका प्रकल्पाचा मूळ खर्च किती याच्या मूल्यांकनासाठी आग्रही असताना दुसरीकडे या प्रकल्पाचा खर्च १ हजार कोटींवर पोहचला असल्याचे आयआरबीने महापालिकेला सांगितले असल्याचे समजते.

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

$
0
0
बेळगाव-वेगुर्ला मार्गापासून जवळच असलेल्या पिळणी (ता. चंदगड) येथील शेतकरी भिकू गंगाराम जांबरेकर (वय ६० ) यांचा कामत नावाच्या शेतातील उसाच्या फडात असलेल्या गव्याने अचानकपणे केलेल्या हल्यात जागीच मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली.

अग्निकांडानंतर धुमारे

$
0
0
टोलवसुलीविरोधात रविवारी झालेल्या अग्निकांडानंतर सोमवारी कोल्हापूर बंदच्या रूपाने धुमारे अनुभवायला मिळाले. कडकडीत बंद पाळून नागरिकांनी टोलविरोधातील रोष व्यक्त केला. बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images