Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ताराराणी आघाडी युतीच्या प्रचारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याबद्दलची नाराजी दूर करत महापालिकेतील ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री उशीरा 'उत्तर'चा तिढा सोडवण्यात भाजपचे नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांना यश आले. तत्पूर्वी आमदार क्षीरसागर यांनी माजी महापौर शिवाजीराव कदम व ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली.

उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार, आमदार क्षीरसागर यांचा प्रचार करण्यास महापालिकेतील भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी नकार दिला होता. भाजपने नगरसेवकांना युतीधर्माचे पालन करण्याचे निर्देश दिल्यानंतर नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्या प्रचाराला सुरुवात केली. शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीचे उमेदवार क्षीरसागर यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा घेतल्या. त्यानंतर क्षीरसागर यांनी कदम पितापुत्रांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यानंतर रात्री उशीरा ताराराणीसह भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. नगरसेवकांनी आमदार क्षीरसागर यांच्या महापालिकेतील कारभाराविषयी तक्रारींचा पाढा वाचला. पण युतीधर्म म्हणून प्रचार करण्याची सूचना वरिष्ठपातळीवरुन दिली असल्याने अखेर क्षीरसागर यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे, रुपाराणी निकम, स्मीता माने, अर्चना पागर, रत्नेश शिरोळकर, उमा इंगळे यांच्यासह भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते. मात्र बैठकीस काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी व नगरसेविका जयश्री जाधव, भाऊ नगरसेवक संभाजी जाधव अनुपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधनवृत्त

$
0
0

वसंत साने

कोल्हापूर : अंबाई टँक परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक वसंत चिंतामण साने (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

००००

सई इंडी

कोल्हापूर : येथील सई रोहन इंडी (वय ३३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिरोळ’मध्ये आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी (ता. १४) शिरोळ येथे बैठक आयोजित केली आहे. भाजपचे ग्रामीाण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप युतीकडून आमदार उल्हास पाटील हे निवडणूक लढवित आहेत. मात्र, भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात भेट घेतली होती. याप्रसंगी तालुक्यातील बंडखोरीबाबत चर्चा झाली होती. पालकमंत्री पाटील यांनी युती धर्म पाळण्याबाबत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरांची लिस्ट तयार !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

युतीधर्माला प्राधान्यक्रम देत भारतीय जनता पक्षाने बंडखोरी शमविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील बंडखोरांची लिस्ट तयार केली जात आहे. चंदगड, शिरोळमध्ये भाजपाचे काही पदाधिकारी युतीधर्माला फाटा देऊन अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय आहेत. भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल करत सेनेच्या उमेदवारालाच आव्हान दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांच्या रविवारी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्यानंतर बंडखोरांवर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजप महानगरचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी कोल्हापूर उत्तरमधील युतीचे उमेदवार व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात भूमिका घेतली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील बंडखोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चंदगड, शिरोळ , कागल आणि हातकणंगले तालुक्यात युतीसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान आहे. चंदगड तालुक्यात शिवसेनेकडून संग्रामसिंह कुपेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. या ठिकाणी भाजपच्या शिवाजी पाटील, रमेश रेडेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भाजपचेच अशोक चराटी हे जनसुराज्यचे उमेदवार आहेत.

माथाडी कामगारांचे नेते असलेल्या पाटील यांच्या प्रचारात भाजपवासी झालेले माजी मंत्री भरमू पाटील, गोपाळ पाटील सक्रिय आहेत. गडहिंग्लज भाजपा तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर, चंदगडचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, आजऱ्याचे अरुण देसाई यांनी तीनही तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार युतीधर्म पाळण्याचे आवाहन केले. मात्र आजही तीनही तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात आहेत.

शिरोळमध्ये शिवसेनेचे उमेदवार व आमदार उल्हास पाटील यांच्या विरोधात भाजपमधील एक गट सक्रिय आहे. भाजपचे पदाधिकारी व गोकुळचे संचालक अनिल यादव यांनी बंडखोरी करत जनसुराज्यकडून निवडणूक लढवित आहेत. भाजपाचे पदाधिकारी माधवराव घाटगे, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, रामचंद्र डांगे, राजवर्धन निंबाळकर आदी मंडळींनी पुढाकार घेत बहुजन विकास आघाडी स्थापन केली आहे. बहुजन विकास आघाडी व आमदार पाटील यांच्यात बिनसले आहे. विकास आघाडीतील काही मातब्बर मंडळी अनिल यादवांच्या प्रचारात सक्रिय असल्याच्या शिवसेनेच्या तक्रारी आहेत. त्यांच्यापैकी कोणी प्रत्यक्ष व तर कोणी अप्रत्यक्षरित्या युतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली आहे. भाजप त्यांना कशा पद्धतीने रोखणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

समरजित, अशोक मानेंचा पदाचा राजीनामा

कागलची जागा शिवसेनेकडे गेल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांची पंचाईत झाली. गेल्या दोन,तीन वर्षापासून त्यांची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी म्हाडा पुणे विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. हातकणंगले मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या दलितमित्र अशोक माने यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्य व जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेणार याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे गेली चार, साडेचार वर्षे भाजपमध्ये होते. भाजपकडून तिकिट न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उत्तरची उमेदवारीही मिळवली.

शहर शिवसेनेतही धुसफूस

कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेतही सारे काही आलबेल नाही. आमदार क्षीरसागर यांच्या विरोधातील शिवसेनेचा गट अजूनही प्रचारात सक्रिय नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस,सुजित चव्हाण हा आमदार विरोधी गट निवडणुकीच्या धामधुमीत सेनेच्या व्यासपीठावर दिसत नाही. कोल्हापूर दक्षिणमधील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय गायन

$
0
0

कोल्हापूर : गायन समाज देवल क्लब, झंकार आणि माजिद भाई नईम सतार मेकर यांच्या संयुक्त विद्यमाने रईस बालेखान आणि अमेरिकास्थित मनू श्रीवास्तव यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम १९ ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. संस्थेच्या अच्युतराव भांडारकर कलादालन येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रम सर्वांसाठी मुक्त प्रवेश आहे. संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रम समिती प्रमुख श्रीकांत डिग्रजकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीचा जोरदार प्रचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मतदानास दहा दिवस शिल्लक असले तरी प्रचारास अवघा आठवडा शिल्लक असल्याने भाजप, शिवसेना महायुतीने प्रचारात जोर धरला आहे. सकाळच्या सत्रात प्रचारफेरी तर रात्री कोपरा सभा घेऊन मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. उत्तर मतदारसंघात आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने कार्यकर्त्यांकडून गल्लोगली फेरी काढून प्रचार सुरू आहे. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेसाठी युतीकडून तयारी दिवसभर सुरू राहिली

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी सकाळच्या सत्रात शाहूपुरीत प्रचार फेरी काढली.

'महापुराच्या काळात शाहूपुरी नागरिकांना मदतीसाठी सर्वप्रथम धावलेल्या आमदार क्षीरसागर यांच्या पाठीशी जनता उभी राहील,' अशा विश्वास नगरसेवक राहूल चव्हाण यांनी व्यक्त केला. शाहूपुरी कुंभार गल्लीतून फेरीस सुरुवात झाली. शाहूपुरीत सर्व गल्ल्यांमध्ये फेरी काढण्यात आली. रॅलीत अमर समर्थ, शाखा प्रमुख प्रशांत नलवडे, आप्पा लाड, मंगेश पाटील, शैलेश पाटील, राजू शिंदे, रमजान गनीभाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेच्यावतीने प्रचाराच्या रिक्षा ठिकठिकाणी फिरताना दिसत आहेत. चौकाचौकात गीतांमधून प्रचार करण्यात येत आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांनी गोकुळ शिरंगाव येथे प्रचार फेरी काढली. फेरीत कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते. रात्री माजी खासदार धनंजय महाडिक यांची फुलेवाडी चौथा स्टॉप येथे सभा झाली. त्यांनी भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, रविवारी अमित शहा यांची तपोवन येथे सभा होणार आहे. सभेच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजीसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांना सभेस उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सभास्थळी लवकर यावे, असे आवाहन केले आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहिणी हट्टंगडी यांना भावे पदक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मराठी रंगभूमीवरील मानाचे समजले जाणारे आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक यंदा जेष्ठ रंगकर्मी रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आले आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी येथे ही घोषणा केली. रंगभूमीदिनी, ५ नोव्हेंबरला पदक वितरण सोहळा होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते कार्यक्रम होईल.

हट्टंगडी तब्बल ४९ वर्षे रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रात कार्यरत आहेत. 'गांधी' चित्रपटातील कस्तुरबाच्या भूमिकेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. नाटकांबरोबरच मराठी, हिंदी सिनेमा तसेच सहा तेलुगू चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. शिवाय अनेक हिंदी-मराठी मालिकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. हट्टंगडी दाम्पत्याने 'कलाश्रय' ही नाट्याभ्यास करणारी आणि प्रयोगशीलतेला चालना देणारी संस्था स्थापन केली. त्या संस्थेतर्फे त्यांनी वाडा भवानी आईचा, अपराजिता (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना भावे पदक जाहीर करण्यात आले आहे.

.. .. . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार प्रचारकांच्या सभांना फटका?

$
0
0

स्टार प्रचारकांच्या

सभांना फटका?

सातारा :

सातारा शहरासह जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर पाणी पडत आहे. त्यामुळे उमेदवारांची पंचाईत होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अशा स्टार प्रचारकांच्या सभा पुढील आठवड्यात जिल्ह्यात होणार आहेत. त्यांच्या सभांना पावसाचा फटका बसण्याची भीती राजकीय पक्षांना वाटत आहे.

साताऱ्यासह पश्‍चिम महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांत १५ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, निर्णायक टप्प्यातील प्रचार सभा अडचणीत आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या सभांसह अन्य अकरा सभांचे नियोजन राजकीय पक्षांनी केले आहे. अगोदरच प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला असताना पावसाने जोर धरल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचणे मुश्‍कील झाले आहे. कोपरा सभा, पदयात्रांसाठी कार्यकर्ते जमवताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकरावी प्रवेशाची आणखी एक संधी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीत प्रवेश घेलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी मिळणार आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी ही विशेष फेरी सुरू होणार आहे. जुलैच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी, या उद्देशाने ही फेरी होणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा गतवर्षीच्या तुलनेत आठ दिवस उशिरा सुरू झाली. १ ऑक्टोबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू होती. या काळात तीन नियमित, एक विशेष आणि तीन प्रथम प्राधान्य फेरी अशा सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता ऐन परीक्षेच्या काळात आठव्या प्रवेश फेरीचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शालेय शिक्षण विभागाला दिला हा प्रस्ताव मान्य झाला असून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष फेरी पार पडणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत आपली सर्व कागदपत्रे घेऊन उपसंचालक कार्यालयात हजर राहावे, असे आवाहन उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. तेथेच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांचे आक्षेपार्ह हातवारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'आमचे उमेदवार अंगाला तेल लावून कुस्ती खेळायला मैदानात उतरले आहेत. मात्र, त्यांच्यासमोर कुस्ती खेळायला कुणीच तयार नाही, ' अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह हातवाऱ्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बार्शी येथे झालेल्या जाहीर सभेत शनिवारी शरद पवार बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली. विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांना पवारांनी लक्ष्य केले. 'विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,' असे वक्तव्य फडणवीस यांनी एका जाहीर सभेत केले होते. त्या अनुषंगाने बोलताना पवार म्हणाले, 'कुस्ती पैलवानांशी होते, या 'अशांशी' होत नाही.' हे वाक्य बोलताना पवार यांनी आक्षेपार्ह हातवारे केले. पवारांच्या भाषणाचे चित्रण करणाऱ्या टीव्ही कॅमेऱ्यांनी ते हातवारे टिपले. काही वेळातच ते सर्वत्र व्हायरल झाले आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण म्हणाले, 'इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसाने असे करणे शोभत नाही. त्यांचा तोल आधीच गेलाच होता, आता पराभवाच्या भीतीने ते अधिकच बिथरले आहेत.'

...........

पक्ष सोडून गेलेल्यांच्या

दुःखवट्याचा ठराव करायचाय : पवार

'राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून द्या. हे सांगावयाला मी आलो आहे. आपल्याला राज्याच्या राजकारणात बदल करावयाचा आहे. जे पक्ष सोडून गेलेत त्यांची चर्चा कशासाठी उलट त्यांच्या दुःखवट्याचा ठराव करावयाचा आहे. आजवर निवडणुकांची तिकिटे दिली, विधीमंडळात शक्ती दिली. या भागाचे प्रश्‍न सुटावेत म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. मात्र, थोडीशी परिस्थिती बदलली की, काहीजण रस्ता बदलतात. हे आज मला बार्शीचा विकास करावयाचा आहे, असे सांगतात. पण, आजवर तुम्हाला निवडून दिले तेव्हा तुम्ही काय केले? असले पळपुटे राजकारण करणाऱ्यांना बार्शीकर त्यांची जागा दाखवतात, हा माझा पन्नास वर्षांचा अनुभव आहे. बार्शीकर शब्दाला पक्का होता. मात्र ज्या बार्शीकरांनी विधानसभेत काम करण्याची संधी दिली, मोठे केले, शक्ती दिली, त्यांच्याशी शब्दाला न जागणारी भूमिका घेणाऱ्यांना बार्शीकर त्यांची जागा दाखवून देतील,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेत दाखल झालेले दिलीप सोपल यांचे नाव न घेता केली. बार्शी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीच्या विजयाचा संकल्प कराः अमित शहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः येत्या २१ तारखेला जनतेला महाराष्ट्राचे नवीन सरकार निवडायचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या महायुतीच्या विजयाचा संकल्प करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा यांची रविवारी सकाळी येथील तपोवन मैदानावर महाजनादेश संकल्प सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेमध्ये त्यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

कृषी, दूध, उद्योग, एफडीआय, शिक्षण या क्षेत्रांमध्ये एक क्रमांकावर असलेला महाराष्ट्र १५ वर्षांत कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत १५ क्रमांकाच्याही खाली गेला. पण पाच वर्षांतच फडणवीस सरकारच्या कालखंडात महाराष्ट्र एफडीआयमध्ये एक क्रमांकावर आला. शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर तर कृषी व उद्योग क्षेत्रात पाचव्या क्रमांकावर आणला आहे. आणखी पाच वर्षे द्या, महाराष्ट्र या सर्वच क्षेत्रामध्ये एक नंबरचे राज्य बनवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

राज्यातील काँग्रेस आघाडीच्या काळात भ्रष्टाचार होता. ७० हजार कोटी सिंचन प्रकल्पावर खर्च करूनही पाणी आले नव्हते. पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने नऊ हजार कोटी खर्च केले व जलयुक्त शिवारातून १८ हजार गावांत पाणी दिले. कोल्हापुरात रस्ते बांधणी करण्यात आली, पण त्यासाठी टोल आकारला जात होता. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ४५० कोटी देऊन जनतेच्या मानगुटीवर बसणारा टोल रद्द केला. केंद्र व राज्यात एकच सरकार असल्यानेच महाराष्ट्राचा विकास झाला, असे शहा यांनी नमूद केले.

३७० कलमाबाबत बोलताना शहा म्हणाले की, काँग्रेसने ३७० कलम देऊन काश्मीर भारतात आणण्यापासून रोखले होते. त्यामुळे तेथील युवकांच्या हातात पाकिस्तानने हत्यारे सोपवली आणि ४० हजार लोक दहशतवादामुळे बळी पडले. अनेक सरकार, पंतप्रधान आले व गेले. पण त्यांची हिम्मत झाली नव्हती. देशातील जनतेने लोकसभेच्या ३०० वर जागा भाजपला दिल्यानंतर मोदी यांनी पहिल्याच अधिवेशनात ३७० व ३५ ए काढून टाकत काश्मीर भारताशी जोडून टाकले. ५६ इंचाची छाती असलेल्या मोदी यांनीच ते कलम रद्द करून टाकले. ते लोकांना आवडले आहे, पण शरद पवार विचारतात हे कलम का हटवले? त्यांना काय अडचण आहे हेच समजत नाही. आता काँग्रेस, राष्ट्रवादीवाले प्रचाराला येतील त्यावेळी त्यांना, तुम्ही ३७० च्या विरोधात आहात की बाजूने आहात, हे विचारा. काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात दहशतवादी देशात घुसत होते. जवानांना क्रूरपणे मारत होते. त्यावेळी मौनीबाबा पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया दिली जात नव्हती. या दहशतवादाविरोधात मोदींनी सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी सरकार जवानांच्या रक्ताची दलाली करत असल्याची टीका केली. पण त्यांनी जवानाच्या आईचा, पत्नीचा, अनाथ झालेल्या मुलांचा आक्रोश बहुधा ऐकलेला नाही. त्या शहीद झालेल्या जवानांचा बदला भाजपने पाकिस्तानमध्ये घुसून घेतला. काँग्रेस सरकार केवळ विरोधासाठी विरोध करण्याचे काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला चार लाख ३५ हजार कोटी

शरद पवार केंद्रात मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी एक लाख १५ हजार कोटी निधी आणला. पण मोदी सरकारने विविध योजनांसाठी महाराष्ट्राला ४ लाख ३५ हजार कोटी देण्याचे काम केले आहे, असे सांगत शहा म्हणाले की, फडणवीस सरकारच्या कालावधीत अंबाबाई विकासाला ८० कोटी दिले आहेत. बंद असलेले विमानतळ सुरू केले. पासपोर्ट कार्यालय सुरू केल्यामुळे मुंबई, पुण्याला जाण्याचा त्रास कमी झाला. कोकण रेल्वेला जोडणारा वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर केला आहे. सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी केला असून, शेतकऱ्यांना सबसिडी देण्याबरोबरच इथेनॉलचे दर वाढवले आहेत. कोल्हापूरच्या चप्पल उद्योगाला चालना देण्यासाठी जीआय मानांकन दिले आहे. राज्यात मुद्रा योजना १ कोटी ४ लाख बँक अकाऊंट उघडली असून, चार लाख लोकांना ५२ हजार कोटींचे कर्ज दिले आहे, असे शहा यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीशी द्रोह खपवून घेणार नाही

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्व दहाही जागा जिंकण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. मात्र, काही मतदारसंघात भाजप-सेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावे. महायुतीशी द्रोह कदापी सहन केला जाणार नाही' असा पुन्हा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. 'पराभवाची छाया दिसत असल्याने शरद पवार हे हातवारे करीत खालच्या पातळीवर टीका करीत आहेत' असा टोलाही त्यांनी लगावला. तपोवन मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

कलम ३७० व ३५ 'अ' वरुन त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'लोकसभा आणि राज्यसभेत कायदा केला जात असताना पवार दोन्ही सभागृहात अनुपस्थित होते. त्यांची कन्या व खासदार सप्रिया सुळे यांनी थातूर-मातूर शब्दात विरोध केला. पवार हे ३७० कलम रद्द करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत होते. मात्र, आता तेच समर्थन करू लागले आहेत. घेतलेला निर्णय राष्ट्रहिताचा असल्याचे त्यांना उशीरा लक्षात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर पैलवानच नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे पराभव समोर दिसू लागल्याने हातवारे करत पवार खालच्या पातळीवर टीका करीत आहेत. भाजप टार्गेट करीत असल्याचा आरोप पवार करतात. पण तुम्हीच तेवढे शिल्लक राहिला आहात हे त्यांनी लक्षात घ्यावे. ते प्रचाराच्या निमित्ताने विकासाच्या मुद्यावर न बोलता जातीयवाद पसरवत आहेत' असा आरोपही त्यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, 'काँग्रेसने जिल्ह्यावर टोलचे भूत बसवले. टोल हटविण्यासाठी जनआंदोलन उभे राहिले. त्याची दखल घेत युती सरकारने प्रकल्पाची पूर्ण रक्कम भागवली. विमानसेवा सुरू करण्याबरोबरच अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ८८ कोटींचा निधी मंजूर केला. देश, राज्य आणि जिल्ह्याच्या हिताचे निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतल्याने सर्वत्र अनुकूल वातावरण आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेमधून २२० पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचे दिसले आहे. त्यामुळे युतीच्या बंडखोरांनी तातडीने सुधारणा करावी. महायुतीबरोबर केलेला द्रोह सहन केला जाणार नाही.'

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. त्यामुळे विरोधकांकडून ईडीची चौकशी लावली जात असल्याचा आरोप करून इव्हीएमवर शंका घेतली जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे उमेदवारी घेण्यासाठी उमेदवारच नसल्याने 'अबकी बार २२० के पार' निश्चित आहे. एखादं बेणं निवडून आलं तरी त्याला सभागृहात तोंड उघडण्याची संधीही मिळणार नाही.'

आमदार डॉ. सुजीत मिणचेकर म्हणाले, 'मतदारसंघात विरोधक शोधूनही सापडत नाहीत. 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया'च्या माध्यमातून युतीने सरकारने उद्योगाचे जाळे विस्तारले. माणगाव येथे बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांसाठी अडीच कोटीचा निधी दिला. तरी विरोधकांना विकास दिसत नाही. नुकत्याच आलेल्या महापुरामध्ये युतीचे कार्यकर्ते मदतीला धावून आले. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोठे होते?

सभेस गोकुळचे संचालक बाबा देसाई, शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे, राजेश क्षीरसागर, प्रकाश अबिटकर, उल्हास पाटील, संग्रामसिंह कुपेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, हिंदुराव शेळके, आशोक देसाई आदी उपस्थित होते. महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी स्वागत केले. आमदार अमल महाडिक यांनी प्रास्ताविक केले. विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

गोकुळ, महादेवराव महाडिकांवर टीका का?

'दक्षिणमध्ये आमदार अमल महाडिक यांनी ११५० कोटींची विकासकामे केली. त्यामुळे विरोधकांकडे मुद्दे नसल्याने जिल्हा दूध संघ (गोकुळ) व महादेवराव महाडिक यांच्या टीका केली जात आहे. द्वेषाचे राजकारण करणारे सूर्याजी पिसाळ वृत्तीने ग्रासलेले मनोरुग्ण आहेत' अशा शब्दात प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली.

सरकारच्या शिवस्मारक, बाबासाहेब आंबेडकर स्मारक, उज्ज्वल गॅस योजना, कृषी सन्मान कर्जमाफी योजना आदी कामांचा आढावा घेताना महाडिक म्हणाले, 'आमदार महाडिक यांनी रस्ते, गटर या पायाभूत सुविधांबरोबर २३ हजार एलईडी दिव्यांनी मतदारसंघ उजळून काढला आहे. विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ द्वेषातून महाडिक कुटुंबीयांवर टीका केली जात आहे. आम्हाला संपविण्याची भाषा करणाऱ्यांनी टोलचे भूत जिल्ह्याच्या मानेवर बसवून त्यात ढपला पाडला. थेट पाइपलाइनद्वारे स्वच्छ पाणी नातवंडाना तरी मिळेल का? अशी स्थिती आहे. गर्भगळीत काँग्रेसकडे उमेदवार नसताना, ज्यांनी पक्ष संपवला त्यांच्या हाती जिल्ह्याची सूत्रे दिली आहेत. २०१४मध्ये त्यांना स्टार प्रचारक केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस भुईसपाट झाली. जेथे त्यांनी सभा घेतल्या तेथील उमेदवारांचाही पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी चारवेळा समजूत काढूनही त्यांनी आघाडीविरोधात काम केले. तेच आज आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहेत ' असा टोला माजी खासदार महाडिक यांनी लगावला.

दोन्ही खासदारांसह नरके, पाटील अनुपस्थित

सभेला जिल्ह्यातील महायुतीचे दहापैकी आठ उमेदवार उपस्थित होते. सेनेचे खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक या दोघांसह करवीरचे उमेदवार आमदार चंद्रदीप नरके व पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीची चर्चा सभास्थळी सुरू होती.

बंटी अन् बबली

'माजी गृहाराज्यमंत्र्यांची राजकारणात बंटी अशी ओळख आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत वावरताना बंटीसोबत 'बबली' (राजीव सातव) होता. त्यांना सत्तेचा माज आला होता. अमल महाडिक यांनी सत्तेचा माज उतरवून पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभारला' असा टोला आमदार हाळवणकर यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. 'धनंजय महाडिक यांची थोडी राजकीय दिशा चुकली. अन्यथा ते विक्रमी मतांनी निवडून आले असते' असेही ते म्हणाले. 'सुप्रिया सुळेंनी आयकर विभागाला सादर केलेल्या विवरणपत्रात वांग्याच्या उत्पन्नातून १५० कोटी रुपये मिळाल्याचे नमूद केले आहे. माजी गृहमंत्री चिदंबरम यांनी शेतीचे १००० कोटींचे उत्पन्न दाखवले आहे. या गोष्टींची चौकशी सुरू असताना ईडीच्या माध्यमातून सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे' असा आरोप हाळवणकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिंदू चौक, शिवाजी पुतळा परिसरात शिवसेनेचा प्रचार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात बिंदू चौक, शिवाजी पुतळा, ट्रेझरी ऑफीस परिसरात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जनआर्शीवाद फेरीला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन ताराराणी आघाडीचे नगरसेवक ईश्वर परमार यांनी केले. तसेच आमदार क्षीरसागरांची हॅटट्रिक साजरी होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

शिवाजी पुतळा येथून प्रचार फेरीस सुरुवात होण्यापूर्वी झालेल्या सभेत बोलताना नगरसेवक परमार म्हणाले, 'आमदारांनी शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले. छत्रपती शिवाजी चौकाचे सुशोभिकरण हे उत्तम उदाहरण आहे. बिंदू चौकातील ड्रेनेज लाइनचा प्रश्नही मार्गी लावला आहे.'

नंतर जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात फेरीस सुरुवात झाली. चप्पल लाइन, भेंडे गल्ली, सबजेल परिसर, हुजुर गल्ली, गुजरी, आझाद गल्ली, हत्तीमहल रोड, मेढे तालीम, अकबर मोहल्ला, कोंडा ओळ, स्वयंभू गणेश मंदिर, घिसाड गल्ली महाराणा प्रताप चौकात प्रचार फेरी समाप्त करण्यात आली. फेरीत शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, कपिल केसरकर, उदय शिंदे, मारुती भागोजी, विवेक कुलकर्णी, सुरेश जरग, आसावरी जुगदार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहांच्या सभेने युतीच्या प्रचारात जोश

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष, कलम ३७०, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट अतिरेकी तळावरील हल्ला या सरकारच्या धोरणांना कार्यकर्त्यांनी दिलेला आवाजी प्रतिसादामुळे खऱ्या अर्थाने युतीच्या प्रचारात तपोवन मैदानावर जोश पहायला मिळाला. सभेला तब्बल दोन तास उशीर होऊनही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि कर्नाटकातून भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मैदान फुलून गेले होते.

गेले दोन तपोवन मैदानाचा पोलिसांना ताबा घेतला होता. सभामंडपात प्रवेश करताना प्रत्येक कार्यकर्त्यांची कसून तपासणी केली जात होती. आमदार आणि पदाधिकाऱ्यांचीही तपासणी झाली. पावसाची शक्यता लक्षात घेऊन अर्धगोलाकार मंडप होता. तो सभेसाठी मंडप अपुरा पडला. सकाळी दहा वाजल्यापासून सभामंडप भरू लागला. भाजपचे झेंडे, मोदी, शहा आणि अमल महाडिक यांच्या चेहऱ्याचे मास्क घालून कार्यकर्ते आले होते. सुरुवातीला प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांची भाषणे झाली. महाडिकांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर, हाळवणकरांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेतून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न झाला. दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी अमित शहा यांचे स्टेजवर आगमन होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकटात त्यांचे स्वागत केले. महानगर अध्यक्ष चिकोडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार महाडिक यांनी प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाषणानंतर दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी शहा भाषणाला उभारले. त्यांनी 'भारत माता की जय' ची घोषणा दिली. कार्यकर्त्यांनी त्यास प्रतिसाद दिला.

सुभाष वोरांना आदरांजली

शहा यांनी सभेस विलंब झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. त्याचबरोबर उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष वोरा यांचा भाषणात उल्लेख करत त्यांना आदरांजली वाहिली. वोरा यांच्या आठवणीनी ज्येष्ठ कार्यकर्ते गहिवरुन गेले.

धनुष्यबाण गायब

व्यासपीठामागे उभारलेल्या फलकावर मोदी, शहा, फडवणीस यांच्या प्रतिमा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह युतीच्या सर्व उमेदवारांचे फोटो होते. पण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि धनुष्यबाण चिन्ह फलकावर नव्हते.

सभास्थळावर काटेकोर तपासणी

सभास्थळावर कार्यकर्त्यांची काटेकोर तपासणी केली गेली. २५ मेटल डिटेक्टर उभारले होते. पैशाचे पाकिट आणि मोबाइल वगळता सर्व वस्तू बाहेर ठेवण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांना तंबाखू, गुटखा, चुना पुडी, अडकित्ते, पाण्याच्या बाटल्या या वस्तू मेटल डिटेक्टरजवळील बॉक्समध्ये ठेवाव्या लागल्या. महिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष होता. साडीची व हातातील पिन, पर्स, पिशव्या बाहेर ठेवावा लागल्या. काही कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वादही झाला.

कर्नाटकातील कार्यकर्त्यांचा भरणा

सभा मंडपात कर्नाटकातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. महिलांसह लहान मुलेही सभेला आली होती. कर्नाटकातील कार्यकर्त्यांना मराठी व हिंदी या दोन्ही भाषा येत नव्हत्या. निपाणी, चिकोडी, बेळगाव, खानापूरातून कार्यकर्ते आले होते. कर्नाटक पासिंगची वाहनेही पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर सभास्थळी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ वातावरणामुळे शहांचे विमान उशिरा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विमान दिल्लीतील ढगाळ वातावरणामुळे कोल्हापुरातील विमानतळावर एक तास उशिरा आगमन झाले. यामुळे ते विमातळावरून थेट तपोवन मैदानात सभेच्या ठिकाणी गेले. सभा संपल्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेऊन ते विशेष हेलिकॉप्टरने कराडकडे प्रचारसभेसाठी रवाना झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी विमानतळावर स्वागत केले.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. भाजपने शहा यांची प्रचार सभा येथे आयोजित केली होती. तेथे सव्वाअकरा वाजता शहा पोहचणार होते. मात्र दिल्ली विमानतळावर ढगाळ वातावरण असल्याचे सांगण्यात आले. हवामान स्वच्छ झाल्यानंतर विमान साडेबारा वाजता दाखल झाले. तेथे भाजपचे पदाधिकारी सुजय देसाई, गणेश देसाई, दिलीप मैत्राणी, संपत पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तेथून थेट सभेच्या ठिकाणी रवाना झाले. सभेनंतर हेलिकॉप्टरने ते कराडला गेले. दरम्यान, ते रवाना झाल्यानंतर निवडणूक प्रशासनाचे भरारी पथक दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सरकारने सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा कोल्हापूर शालेय पोषण आहार संघटनेने दिला आहे.

याबाबत कोल्हापूर शालेय पोषण आहार संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 'महिला बचत गटातर्फे गेली १६ ते १७ वर्षे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजवून दिला जातो. अचानक काम काढून घेतल्यामुळे महिला बचत गटावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बचत गटातील महिलांच्या पुढे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बचत गटातील महिलांचा संसार त्यावर अवलंबून होता. सरकारने या साऱ्या बाबीचा गांभीर्याने विचार करुन सेंट्रल किचन पद्धत त्वरित रद्द करावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने यासंबंधी निर्णय घेतला नाही तर जिल्ह्यातील शालेय पोषण आहार करणाऱ्या महिला बचत गट सामुदायिकरित्या मतदानावर बहिष्कार घालतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराराणी आघाडी युतीच्या प्रचारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याबद्दलची नाराजी दूर करत महापालिकेतील ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री उशीरा 'उत्तर'चा तिढा सोडवण्यात भाजपचे नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांना यश आले. तत्पूर्वी आमदार क्षीरसागर यांनी माजी महापौर शिवाजीराव कदम व ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली.

उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार, आमदार क्षीरसागर यांचा प्रचार करण्यास महापालिकेतील भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी नकार दिला होता. भाजपने नगरसेवकांना युतीधर्माचे पालन करण्याचे निर्देश दिल्यानंतर नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्या प्रचाराला सुरुवात केली. शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीचे उमेदवार क्षीरसागर यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा घेतल्या. त्यानंतर क्षीरसागर यांनी कदम पितापुत्रांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यानंतर रात्री उशीरा ताराराणीसह भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. नगरसेवकांनी आमदार क्षीरसागर यांच्या महापालिकेतील कारभाराविषयी तक्रारींचा पाढा वाचला. पण युतीधर्म म्हणून प्रचार करण्याची सूचना वरिष्ठपातळीवरुन दिली असल्याने अखेर क्षीरसागर यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे, रुपाराणी निकम, स्मीता माने, अर्चना पागर, रत्नेश शिरोळकर, उमा इंगळे यांच्यासह भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते. मात्र बैठकीस काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी व नगरसेविका जयश्री जाधव, भाऊ नगरसेवक संभाजी जाधव अनुपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनालाइट जादा बिलाचा शॉक

आमदारकीसाठी ‘नेक्स्ट जनरेशन’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी सहा मतदारसंघातून माजी आमदारांची मुले यावर्षी विधानसभा निवडणूक लढवित आहेत. विधानसभा लढवायची म्हणून त्यांनी गेल्या तीन चार वर्षांपासून तयारी सुरू केली होती. काहींनी पक्षांतरही केले. ऐनवेळी ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी करत विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. राधानगरी, कागल, चंदगड, हातकणंगले मतदारसंघात ते नशीब आजमावत आहेत.

माजी आमदार दिनकरराव जाधव यांचा मुलगा सत्यजित, माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगा राहुल, माजी आमदार नरसिंग पाटील यांचे मुलगा राजेश आणि महेश, माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांचा मुलगा समरजितसिंह, माजी आमदार जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजू हे विविध मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. वडिलांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी नेक्स्ट जनरेशन सरसावली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नरसिंग पाटील यांचा मुलगा राजेश यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून नरसिंग पाटील यांचा मुलगा आणि शिक्षण समितीचे माजी सभापती महेश यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरत घरातच आव्हान दिले आहे. हातकणंगले मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजू आवळे हे निवडणूक लढवित आहेत. इचलकरंजीमध्ये खंजिरे कुटुंबीयांतील तिसरी पिढी आमदारकीसाठी सरसावली आहे. राहुल खंजिरे काँग्रेसच्या चिन्हावर लढत आहेत.

सत्यजित जाधव, राहुल देसाई यांनी राधानगरी मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. जाधव यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र राधानगरी मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला आहे. तर राहुल देसाई यांनी विधानसभा लढवायची म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपच्या वजनदार नेत्यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता. मात्र सेना, भाजपची युती झाल्यानंतर राधानगरीची जागा शिवसेनेला मिळाली. यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

समरजित घाटगेंचा भाजपला रामराम

कागलमध्ये भाजपकडून समरजित घाटगे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. भाजपने त्यांना, म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्षपद दिले होते. मात्र युतीधर्मानुसार ही जागा शिवसेनेकडे गेली. पण गेली पाच वर्षे जोरदार तयारी करणाऱ्या समरजित यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी करत शड्डू ठोकला आहे.

उमेदवार भाजपचा, चिन्ह जनसुराज्यचे

गेली पाच वर्षे विनय कोरे आणि भाजपमध्ये सख्य आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवत कारखान्याला पॅकेजही दिले. विधानसभा निवडणुकीत कोरे आणि भाजपची हातमिळवणी झाली आहे. शिवसेना, भाजप युतीमुळे ज्या मतदारसंघात भाजप उमेदवारांची कोंडी झाली, त्या ठिकाणी भाजपमधील इच्छुकांना जनसुराज्यने उमेदवारी बहाल करत त्यांच्या लढण्याचा मार्ग सुकर केला. हातकणंगले, शिरोळ आणि चंदगड येथे उमेदवार भाजपाचा आणि चिन्ह जनसुराज्यचे अशी स्थिती आहे. हातकणंगलेमध्ये जनसुराज्यकडून दलितमित्र अशोक माने यांना उमेदवारी मिळाली. याठिकाणी जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष म्हणून लढत आहेत.

रिंगणातील माजी आमदारांची मुले

समरजित घाटगे (अपक्ष, कागल)

राहुल देसाई (अपक्ष, राधानगरी)

सत्यजित जाधव (अपक्ष, राधानगरी)

राजू आवळे(काँग्रेस, हातकणंगले)

राजेश पाटील (राष्ट्रवादी, चंदगड)

महेश पाटील (अपक्ष, चंदगड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमित शहा यांच्याकडून अंबाबाईला शालू प्रदान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष व विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तपोवन मैदानावरील भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारसभेची तोफ गाजवल्यानंतर शहा यांनी दुपारी पावणेदोन वाजता अंबाबाई मंदिरात येऊन देवीला शालू प्रदान केला. त्यांच्यासमवेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. देवस्थान समितीच्यावतीने शहा यांना अंबाबाईची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली. 'कितीही व्यस्त कार्यक्रम असला तरी अंबाबाईचे दर्शन मी चुकवत नाही' असे शहा यांनी यावेळी सांगितले.

रविवारी सकाळी विमानतळावरून गृहमंत्री शहा थेट अंबाबाई दर्शनासाठी येऊन नंतर तपोवन मैदानावरील येथील सभेसाठी रवाना होणार होते. रविवारची सुट्टी तसेच कोजागिरी पौर्णिमेदिवशी अंबाबाईचा महाप्रसाद असल्यामुळे मंदिरातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. शनिवारपासूनच शहा यांच्या आगमनाची तयारी भाजपने जोरात केली. पोलिस व सुरक्षा यंत्रणेनेही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली. मंदिर परिसराला पोलिस छावणीचे रुप आले होते.

सकाळी दहा वाजल्यापासूनच भाजपचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मंदिरात थांबले होते. दिल्लीतील खराब हवामानामुळे विमान उड्डाणास उशीर झाल्याने शहा यांना कोल्हापुरात पोहोचण्यास साडेबारा वाजले. त्यामुळे भाविकांसाठी थांबविलेले देवीचे दर्शन सुरू ठेवण्यात आले. मंदिराच्या आवारात महाप्रसाद वाटप सुरू करण्यात आले.

तपोवन मैदानावरील सभा संपल्यानंतर दुपारी पावणेदोन वाजता शहा यांचे मंदिरात आगमन झाले. दर्शन घेऊन ते दहा मिनिटांत बाहेर पडले. यावेळी त्यांनी अंबाबाईसाठी आणलेला शालू देवस्थान समितीकडे सुपूर्द केला. शहा यांना भेटण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून विविध संघटनांची शिष्टमंडळे थांबली होती. मात्र वेळ व सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाच त्यांची भेट घेता आली नाही.

पुजारी अजित ठाणेकर सोवळ्यात

अंबाबाईला घागरा-चोली पोषाख परिधान केल्याप्रकरणी पुजारी अजित ठाणेकर यांच्याविरोधात पुजारी हटाओ संघर्ष समितीने दोन वर्षापूर्वी आंदोलन केले. त्यानंतर ठाणेकर यांना मंदिरात पुजारी म्हणून प्रवेश बंदी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र, रविवारी अमित शहा यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांसह अजित ठाणेकर यांनी मंदिरात प्रवेश केला. ठाणेकर हे सोवळे नेसून गाभाऱ्यापर्यंत गेल्याने मंदिरात त्यांना प्रवेश बंदीच्या निर्णयाची चर्चाही यावेळी रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images