Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोयनेत भूकंप

0
0

कोयनेत भूकंप

कराड :

कोयना धरण परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. कोयना धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूंकपाचा धक्का सौम्य असल्यामुळे धरणाला कोणताही धोका नाही, असा निर्वाळा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाळासाहेब नेवाळे यांची ‘राष्ट्रवादी’ला सोडचिठ्ठी

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

' गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमाणिकपणे काम करून ग्रामीण भागासह शहरी भागात ताकद वाढवली. तरीही पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारत भाजपमधील बंडखोराला उमेदवारी दिली,' असा आरोप करून मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुणे जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली. याचा फटका 'राष्ट्रवादी'चे उमेदवार सुनील शेळके यांना बसणार आहे.

वडगाव मावळ येथे नेवाळे यांनी बुधवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असल्याची घोषणा केली. निवडणुकीतील प्रचार ऐन रंगात आला असताना नेवाळेंच्या या निर्णयामुळे मावळातील राजकीय वातावरण तापले आहे. नेवाळे हे येत्या दोन दिवसांत आगामी राजकीय दिशा ठरविणार असून, ते भाजप किंवा शिवसेनेत जाणार का, स्वतंत्र राजकीय संघटना उभारणार याबाबत मावळात तर्कवितर्क सुरू आहेत.

मावळ तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागातील एक प्रभावी चेहरा म्हणून बाळासाहेब नेवाळे यांना ओळखले जाते. मागील पंधरा वर्षांपासून ते 'राष्ट्रवादी'कडे मावळ विधानसभेची उमेदवारी मागत होते. मात्र, पक्षाने त्यांना तिन्हीवेळा डावलले. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत 'राष्ट्रवादी'चे सदस्य निवडूण आणण्यात नेवाळे यांचे मोठे योगदान आहे.

ज्या पक्षासाठी आम्ही दिवसरात्र प्रामाणिकपणे काम करून पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली. तोच पक्ष जर ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अस्मितेचा वारंवार अपमान करून अन्याय करत असेल, तर अशा पक्षात राहण्यात काय अर्थ आहे. मावळातील ग्रामीण व निम शहरी भागात जवळपास दोन लाख मतदान असताना 'राष्ट्रवादी'ने सातत्याने ग्रामीण भागावर अन्याय केला आहे. या दुटप्पी धोरणाला कंटाळून राजीनामा देत आहे. ग्रामीण भागाची ताकद काय आहे, हे दाखवून देऊ.

- बाळासाहेब नेवाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या सभेची तयारी

0
0

मोदींच्या सभेची तयारी

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवारी उदयनराजे भोसले व पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांच्या प्रचारारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गुरुवारी, १७ रोजी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. सभामंडपाचे भूमीपूजन विजयादशमीच्या मुहुर्तावर मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता पथकाची करडी नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. प्रचारावेळी आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सतर्क झाले आहे. उमेदवारांच्या गाठीभेटी, प्रचार सभा, बैठकांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. उमेदवार आणि पक्षाच्या सोशल मिडियाच्या अधिकृत पानावरून केलेल्या प्रचाराच्या मजकुरावर नजर ठेवली जात आहे. माध्यमातून उमेदवार किंवा नेत्यांचे वैयक्तिक चारित्र्यहनन करणाऱ्यांना नोटीस देण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबरला लागू झाली. तेव्हापासून नव्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. तालुका, जिल्हा पातळीवरील प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे. परिणामी महसूल विभागाची इतर कामे थांबली आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आचारसंहिताभंगाची तक्रार ऑनलाईन नोंदवून घेण्यासाठी सीव्हीजील अॅप कार्यान्वित केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. यावर आलेल्या तक्रारींची दखल १०० मिनिटांत घेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पथक कार्यरत आहेत. यावर उमेदवारांच्या डिजीटल फलकांच्या जाहिरातीच्या तक्रारींचा ओघ अधिक आहे. तक्रार येताच संबंधित फलक हटवले जात आहे.

बँकांमध्ये वैयक्तिक खात्यावर मोठी रक्कम जमा झाल्यास त्याची चौकशी केली जात आहे. संशयास्पद खात्यातील व्यवहारांवर आयकर विभागाने विशेष लक्ष ठेवले आहे. पेटीएमवरून देवाणघेवाण होणाऱ्या रक्कमेचीही माहिती घेतली जात आहे. सीमाभागातून येणारी अवैध दारू, मोठ्या प्रमाणातील रोख पैशांची वाहतूक रोखण्यासाठी १४ ठिकाणी तपास नाके सुरू करण्यात आले आहेत. तिथे सीसीटीव्हीही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. नाक्यावर पोलिस, राज्य उत्पादन विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. सर्वच मतदारसंघात स्थिर निरीक्षण, भरारी पथके फिरत आहेत. जेवणावळी, पार्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री ११ नंतर उघडे असणारे बार, धाबा, हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरा येणारे पर्यटक, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी या कारवाईतून बसस्थानक, रेल्वे स्थानकातील आणि परिसरातील हॉटेल वगळण्यात आले आहेत.

...

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरूच

जुलै ते सप्टेंबरअखेर झालेल्या अतिवृष्टी आणि महापूरबाधित भागात सरकारी मदत आणि पुनर्वसनाची कामे सुरूच ठेवण्यात आली आहेत. यास निवडणूक आयोगानेच परवानगी दिली आहे. यामुळे तातडीने पाच हजारांची मदत दिलेल्या बाधीतांच्या बँक खात्यांवर १५ हजार रूपये जमा करण्याची प्रक्रिया कायम आहे.

...

उमेदवारास नोटीस

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल, अशी पोष्ट टाकल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली आहे. नोटिशीवर चोवीस तासात खुलासा करावा, खुलासा मुदतीत न आल्यास अथवा समाधानकारक न वाटल्यास कारवाई करण्यात येईल, असेही नोटिशीमध्ये म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणे आंदोलन

0
0

कोल्हापूर

उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील मनमानी व गैरकारभाराविरोधात उद्या, शुक्रवारी प्राध्यापकांच्यावतीने प्रा. रघुनाथ ढमकले हे धरणे आंदोलन करणार आहेत. दुपारी एक ते पाच या वेळेत राजाराम कॉलेज परिसरातील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर करण्यात येणाऱ्या या आंदोलनात सातव्या वेतन आयोगाची कार्यवाही करण्यामध्ये प्रस्तावात अनावश्यक त्रुटी काढून प्राध्यापकांची अडवणूक होत असल्याबाबत निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाची दखल न घेतल्यास उच्चशिक्षण संचालक कार्यालयाकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठात आज चंद्र महोत्सव

0
0

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश केंद्रातर्फे पदार्थ विज्ञान अधिविभाग येथे आज, गुरूवारी आंतरराष्ट्रीय चंद्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने चंद्राच्या पृष्ठभागांचे निरीक्षण १२ इंच दुर्बिणीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा या वेळेत चंद्र निरीक्षण करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय चंद्र महोत्सव हा चंद्र विज्ञान आणि त्या संबंधीचे शोध याच्या स्मरणार्थ २०१० सालापासून दरवर्षी साजरा करण्यात येतो. तसेच इस्त्रोच्या 'चांद्रयान २' या मोहिमेमुळे या वर्षीच्या चंद्र महोत्सवास विशेष महत्व आहे. यावेळी चांद्रयान २ मोहिमेचा माहितीपट पदार्थविज्ञान विभागामध्ये दाखवण्यात येणार आहे. खगोलप्रेमींनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन अवकाश संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गामूर्तींचे विसर्जन

0
0

कोल्हापूर

गेले दहा दिवस नवरात्रकाळात चैतन्यदायी वातावरणात प्रतिष्ठापित केलेल्या दुर्गामूर्तींचे बुधवारी विसर्जन करण्यात आले. रोषणाईचा झगमगाट आणि वाद्यांच्या गजरात सायंकाळी पाचनंतर सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीने दुर्गामूर्तींचे विसर्जन केले. ट्रॅक्टर ट्रॉलीवर फुलांची सजावट करून दुर्गामूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या. शिवाजी पेठ, संभाजीनगर, फुलेवाडी, गुजरी, मंगळवार पेठ येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेसर लायटिंग करून भव्य मिरवणूक काढली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आलेल्या पावसाच्या हलक्या सरीतही उत्साहात विसर्जन मिरवणूक सुरूच राहिली. पंचगंगा नदी, इराणी खण येथे दुर्गामूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, विसर्जनस्थळावर महापालिकेच्यावतीने सुरक्षायंत्रणा सज्ज ठेवली होती. इराणी खण येथे क्रेन व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरशिवाजी विद्यापीठाच्या अवकाश

0
0

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश केंद्रातर्फे पदार्थ विज्ञान अधिविभाग येथे आज, गुरूवारी आंतरराष्ट्रीय चंद्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने चंद्राच्या पृष्ठभागांचे निरीक्षण १२ इंच दुर्बिणीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा या वेळेत चंद्र निरीक्षण करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय चंद्र महोत्सव हा चंद्र विज्ञान आणि त्या संबंधीचे शोध याच्या स्मरणार्थ २०१० सालापासून दरवर्षी साजरा करण्यात येतो. तसेच इस्त्रोच्या 'चांद्रयान २' या मोहिमेमुळे या वर्षीच्या चंद्र महोत्सवास विशेष महत्व आहे. यावेळी चांद्रयान २ मोहिमेचा माहितीपट पदार्थविज्ञान विभागामध्ये दाखवण्यात येणार आहे. खगोलप्रेमींनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन अवकाश संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खरेदीचे सीमोल्लंघन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम,

गेली सहा महिने सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताने बाजारात खरेदीचे सीमोल्लंघन झाले. वाहन, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह सराफ बाजार आणि बांधकाम क्षेत्रातही जोरदार खरेदी-विक्री झाली. मुहूर्तावरील खरेदीमुळे जिल्ह्यात सुमारे ५०० कोटींची उलाढाल झाली. या उलाढालीमुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाहनांची मागणी वाढली

आर्थिक मंदीमुळे वाहन उद्योगास मोठा फटका बसला होता. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात दहा हजार वाहनांची विक्री घटली होती. याचा परिणाम जिल्ह्यातील उद्योगांवरही सुरू होता. या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या मुहूर्तावरील खरेदीने विक्रेते आणि उद्योजकांना काहीअंशी दिलासा मिळाला. विशेषत: वाहनांची मागणी वाढल्याने या क्षेत्रातील उत्साह वाढला. दुचाकी, चारचाकी, रिक्षा यासह शेतीच्या कामांसाठी लागणारे ट्रॅक्टर, ट्रॅली आणि शेती अवजारांची खरेदी वाढली. दसऱ्याला नवीन वाहन दारात यावे, यासाठी गेल्या १५ दिवसांपासून बुकिंगला गर्दी होती. दसऱ्याच्या मुहूर्तावरही मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले. यामुळे सर्वच वाहनांच्या शोरुम्समध्ये गर्दी होती. दिवाळीपर्यंत ही उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचा उत्साह

सणासुदीच्या दिवसात घरात नवीन फर्निचर घेण्यास अधिक पसंती दिली जाते. यामुळे फर्निचर खरेदीसाठी मोठी गर्दी होती. लाकडी, लोखंडी कपाटे, शोकेस, सोफासेट, डायनिंग टेबल, आराम खुर्ची, झोपाळे यासह टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, घरगुती वापराच्या वस्तू, आकर्षक झुंबर, विद्युत दिवे खरेदी करण्यास ग्राहकांनी प्राधान्य दिले. फर्निचर खरेदीसाठी शहरासह गांधीनगरमध्ये मोठी गर्दी होती. अनेक विक्रेत्यांनी खरेदीवर बंपर ऑफर्स जाहीर केल्या होत्या. मूळ किमतीवर ३० ते ४० टक्के सवलत मिळाल्याने ग्राहकांनी खरेदीचा योग साधला. सहज कर्जाची उपलब्धता, हप्त्यांवर सवलत यामुळे फर्निचर खरेदीच्या उत्साहाला उधान आले होते.

सराफ बाजारास झळाळी

सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या तीन महिन्यांपासून सराफ बाजार अस्थिर होता. उलाढाल घटल्याने सराफ व्यावसायिक चिंतेत होते. दसऱ्याच्या निमित्ताने मात्र सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. किरकोळ खरेदीसह गुंतवणूकदारांनीही सोने खरेदीस प्राधान्य दिले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी ऑफर्सही जाहीर केल्या होत्या. घडणावळीवर सवलत, विशिष्ठ किमतीचे सोने खरेदी केल्यास चांदीचे नाणे मोफत अशा ऑफर्समुळे सराफ बाजारातील उलाढाल वाढली. येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. हुपरीच्या चांदी बाजारातही तेजीचा परिणाम दिसला. दसऱ्याला सराफ बाजारात सुमारे १०० कोटींची उलाढाल झाली.

बांधकाम क्षेत्रातही तेजीची नांदी

दसऱ्याच्या मुहूर्तावर बांधकाम क्षेत्रातही मोठी उलाढाल झाली. शहरात अनेक ठिकाणी रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी-विक्रीचा मुहूर्त साधला. गेली पंधरा दिवस अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून जाहिराती सुरू होत्या. ग्राहकांनी बांधकामांचे प्रत्यक्ष ठिकाण पाहून बुकिंग करण्यास प्राधान्य दिले. ११ लाखांच्या फ्लॅटपासून सुमारे एक कोटींचे अलिशान फ्लॅट, बंगलो, व्यावसायिक गाळे यांचे बुकिंग आणि विक्रीही झाली. गेल्या वर्षभरात या क्षेत्रात काही प्रमाणात मंदी होती. दसऱ्याच्या निमित्ताने ग्राहकांनी खरेदीला प्रतिसाद दिल्याने बांधकाम क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे.

सणासुदीच्या निमित्ताने बाजारात खरेदीचा उत्साह वाढत आहे. आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी याची काही प्रमाणात मदत होईल. मात्र, ऑनलाइन खरेदीमु‌ळे स्थानिक विक्रीवर गंभीर परिणाम होत आहे. सरकारने ऑनलाइन विक्रीचे धोरण तातडीने बदलावे.
- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

फर्निचर खरेदीला ग्राहकांनी विशेष प्राधान्य दिले. सोफासेट यासह कपाटांचीही मागणी वाढली. मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने दसऱ्याचा दिवस विक्रेत्यांसाठी आनंदाचा ठरला. दिवाळीपर्यंत खरेदीतील तेजी कायम राहील, अशी अपेक्षा आहे.
- प्रशांत कुचेकर, व्यावसायिक


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुझ्या बापाला तुरुंगात घालणार; प्रणिती शिंदेंना धमकी

0
0

सोलापूर: 'महाराष्ट्रात माझ्या इतके गुन्हे कुणावर आहेत? तुमच्यावर फक्त पाच गुन्हे दाखल झालेतर लटपटायला लागता. तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही. जो माणूस पंतप्रधानांना इथे आणू शकतो, तो काहीही करू शकतो,' अशी धमकी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिली.

आडम म्हणाले, 'वृत्तपत्रांनी काही दिवसांपूर्वी छापले नरसय्या आडम यांच्यावरील गुन्ह्यांत वाढ झाली. इतर सर्वांच्या संपत्तीत वाढ झाली आणि माझ्यावरील गुन्ह्यांत. माझ्यावर १७५ गुन्हे वाढलेत. माझ्यावर २०० गुन्हे दाखल झाले तरी चालतील. माझ्यावर चोरी, दरोडा, फसवणुकीचे गुन्हे नाहीत. परवानगी नसताना सभा घेणे, मोर्चे काढले, सत्याग्रह केला, धरणे आंदोलन केले, रस्ता रोको केला याचे गुन्हे आहेत. हे गुन्हे माझ्यासाठी अलंकार आहेत.'

‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापूरामध्ये आणण्याची ताकद ठेवतो तो कोणालाही तुरुंगामध्ये घालू शकतो,’ असं आडम मास्तर आपल्या भाषणात म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझ्यावर १७० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असून हा आकडा २०० झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असंही सांगितलं. ‘हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत,’ असे वक्तव्यही आडम यांनी केले. आडम यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल गांधींनी मैदान सोडले; गृहमंत्री अमित शहा यांची टीका

0
0

म. टा. प्रतिनिधीः कोल्हापूर: 'निवडणुकीत पक्षाच्या नेत्याने आपल्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम राहणे गरजेचे असते. या स्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी मैदान सोडून बाहेर गेले आहेत. विरोधी पक्षासाठी हा प्रकार चांगला नाही,' अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. जत येथील प्रचार सभेसाठी जाताना कोल्हापूर विमानतळावर थांबल्यानंतर ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार सभेचे आयोजन जत येथे केले होते. या सभेला जाण्यासाठी ते गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास खास विमानाने कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि राहुल चिकोडे यांनी शहा यांचे स्वागत केले. यावेळी शहा दहा मिनिटे विमानतळावरील विश्रामकक्षात थांबले. त्यांनी कोल्हापूरसह परिसरातील पक्षीय बलाबल आणि उमेदवारांचा आढावा घेतला. बंडखोरी केलेल्या उमेदवारांसह जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांचीही त्यांनी माहिती घेतली. कोल्हापुरात काँग्रेसकडून अद्याप मोठी प्रचार सभा झाली नसल्याची माहिती मिळताच त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.

गृहमंत्री शहा म्हणाले, 'लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. त्रिपुरामध्ये आम्ही रस्त्यावर उभे राहून भाजपचे २५० सदस्य बनवले. यानंतर एक हजार लोकांची सभा घेतली. आज त्रिपुरात भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना राहुल गांधी मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेच होते. हा प्रकार विरोधी पक्षासाठी चांगला नाही.' राज्यातील युतीच्या प्रचाराबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. राज्यात युतीचे २२० हून अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरातील सभेबाबत मात्र त्यांनी साशंकता व्यक्त केली. या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी सभांचे नियोजन असल्याने कोल्हापूरसाठी वेळ मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. अखेरच्या दोन दिवसात शक्य झाल्यास कोल्हापूरसाठी सभा घेण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी मंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, अशोक देसाई, विजय जाधव, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटबाजीची सर्वपक्षीय डोकेदुखी

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : सर्वच मतदारसंघांत प्रचाराची धामधूम सुरू असताना गटबाजीनेही डोके वर काढले आहे. शाहूवाडी, करवीर या दोन मतदारसंघात काहीसा अपवाद वगळता इतरत्र सर्वच पक्षांतील स्थानिक राजकारण, गटबाजी उफाळली आहे. युती आणि आघाडी धर्माला हरताळ फासून व्यक्तिकेंद्रित आणि गटातटाच्या राजकारणाचा डाव खेळला जात आहे. शिवसेनेने सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली. मात्र त्यांना प्रत्येक मतदारसंघात भाजपमधील नाराज घटकांचा सामना करावा लागत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतही स्थानिक पातळीवरील कुरबुऱ्या थांबल्या नाहीत. चारही प्रमुख पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी आवाहन करूनही बंडखोरांनी त्याला भीक घातली नाही.

कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत जाधव यांच्यामध्ये थेट लढत आहे. सेना-भाजप युती असली तरी आमदार क्षीरसागर एकाकी किल्ला लढवित आहेत. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रससह जुन्या पदाधिकाऱ्यांचा गट प्रचारापासून अलिप्त आहे. गेल्या पाच वर्षात क्षीरसागर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा मुद्दा भाजप कार्यकर्ते निवडणुकीत उगाळत आहेत. पालकमंत्री पाटील यांनी युतीधर्म पाळण्याचे आवाहन केले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे हे क्षीरसागरांच्या प्रचारात सहभागी झाले. मात्र भाजपचे बहुतांश कार्यकर्ते, नगरसेवकांनी सवतासुभा मांडला आहे.

दुसरीकडे ऐनवेळी काँग्रेसमध्ये दाखल होऊन उमेदवारी मिळवलेल्या चंद्रकांत जाधव यांना शहरातील मतदारांपर्यंत आपली उमेदवारी पोहोचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना एकत्र आणून प्रचार यंत्रणा गतिमान करावी लागेल. मुळात शहर काँग्रेसचे लक्ष 'उत्तर'पेक्षा दक्षिणमध्ये जास्त आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते व बहुतांश नगरसेवक दक्षिणमध्ये सक्रिय आहेत. 'दक्षिण'मध्ये आमदार अमल महाडिक विरुद्ध काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत आहे. येथे शिवसेना अजूनही तटस्थच आहे.

कागलमध्ये म्हाडाचे माजी अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या बंडखोरीमुळे तिरंगी लढत रंगली आहे. आमदार हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे सारा फोकस त्यांच्याभोवती फिरत आहे. शिवसेनेचे माजी आमदार

संजय घाटगे यांच्या प्रचारार्थ मेळावा घेऊन शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. मात्र, सर्वांचा झोत मुश्रीफ विरुद्ध समरजित यांच्यावरच आहे.

राधानगरीत 'मेहुणे-पाहुणे' वाद मिटला तरी राष्ट्रवादीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्यासमोर बंडखोरीचे आव्हान कायम आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजित रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य जीवन पाटील वंचितकडून लढत आहेत. इचलकरंजीत प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, राहुल खंजिरे अशी तिरंगी लढत आहे. तिथे काँग्रेसचे गट आवाडेंच्या पाठीशी असल्याचा दावा केला जात आहे. त्याची डोकेदुखी खंजिरे यांच्यासमोर आहे.

हातकणंगेलत जनसुराज्य-शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण

हातकणंगलेमध्ये शिवसेना आणि जनसुराज्यला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. सेनेचे आमदार सुजित मिणचेकर यांची हॅटट्रीक रोखण्यासाठी जनसुराज्यच्या माध्यमातून भाजपने राजकीय खेळी केल्याचा आरोप कार्यकर्त्यांचा आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने जनसुराज्यच्या चिन्हावर लढत आहेत. माने यांना जनसुराज्यने उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार राजीव आवळे यांनी बंडखोरी केली. ताराराणी पक्षाकडून समाजकल्याण समितीचे माजी सभापती किरण कांबळे निवडणूक लढवित आहेत. आवाडे गट काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे येथे काँग्रेसच्या मतविभागणीचा धोका काँग्रेसचे उमेदवार राजू आवळे यांच्यासमोर आहे.

शिरोळमध्ये दोन्ही आघाडीत बिघाडी

शिरोळमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी आघाडी आहे. आघाडीकडून स्वाभिमानीचे सावकार मादनाईक रिंगणात आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बंडखोरीमुळे आघाडी नावापुरतीच उरली आहे. तालुक्यात राष्ट्रवादी यड्रावकरांसोबत आहे. दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांची भूमिका निर्णायक ठरेल. शिवसेनेकडून लढणाऱ्या आमदार उल्हास पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. भाजपची त्यांना साथ मिळण्याची शक्यता कमी आहे. शिवाय बहुजन विकास आघाडीने सवतासुभा मांडत स्वतंत्र उमेदवार उभा केला. भाजपचे अनिल यादव यांनी बंडखोरी करत जनसुराज्यची उमेदवारी घेतली. बहुजन आघाडीत उमेदवारीवरुन शेवटपर्यंत काथ्याकूट सुरू होता.

चंदगडमध्ये बंडखोरी, भाऊबंदकीही

चंदगडमध्ये शिवसेनेचे उमेदवार संग्राम कुपेकर यांना भाजपमधील बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. भाजपच्या अशोक चराटी यांनी जनसुराज्यकडून तर रमेश रेडेकर, शिवाजी पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यांतील भाजपमध्येही पाठिंब्यावरुन एकवाक्यता नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांना दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन विरोधकांशी सामना करावा लागणार आहे. त्यांचे बंधू व शिक्षण समितीचे माजी सभापती महेश यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे भाऊबंदकी उफाळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राफेल’ची पूजा केली तर बिघडले कुठे?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची भारतीय परंपरा आहे. मग राफेल विमानाची पूजा केली तर बिघडले कुठे?' असा प्रश्न करत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राफेल पूजेचे समर्थन केले. डॉ. सावंत विधानसभा निवडणूक प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

कलम ३७० रद्द करण्याचेही त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले, 'हे कलम रद्द केल्याने भारताची एकसंधता साधता आली. एक निशाण, एक सरकार आणि एक घटना लागू झाली. या निर्णयानंतर काश्मीरमधील अतिरेकी कारवाया कमी झाल्या असून अतिरेकी हल्ल्यात एकही मृत्यू झालेला नाही. काश्मीरच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. महाराष्ट्रात दोन तृतीयांश जागा मिळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल. गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारने नियोजनबद्ध विकास केला आहे. शेती, उद्योग, शिक्षण, रस्ते, वीज आणि आरोग्य या क्षेत्रांत मोठी प्रगती साधली. 'मेक इन इंडिया', 'स्टार्ट अप'मधून रोजगार उपलब्ध होत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनादेश यात्रेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे जनाधार युतीलाच मिळणार आहे.' दरम्यान, गोवा सरकारने पेट्रोलदरात वाढ केली असली तरी रोड टॅक्स ५० टक्क्यांनी कमी केला असल्याचे सांगत सावंत यांनी पेट्रोल दरवाढीचे समर्थन केले.

...

माजी मंत्र्यांच्या पुतण्याचा

पराभव करणे अवघड नाही

'मागील निवडणुकीत अमल महाडिक यांनी मंत्र्यांचा पराभव केला होता. गेल्या पाच वर्षांत त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे आता या माजी मंत्र्यांच्या पुतण्याचा पराभव करणे आमदार महाडिक यांना अवघड नाही', असे मत सावंत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,'आमदार महाडिक यांनी पाच वर्षांत विमानतळासारखी पायाभूत सुविधा निर्माण करुन विकासाचे दार खुले करुन दिले आहे. दुर्लक्षित राहिलेल्या सीपीआर हॉस्पिटलचे विस्तारीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारच्या सर्व आरोग्य योजनांतून सामान्यांना सेवा उपलब्ध करुन दिली आहे. पुढील टर्ममध्ये शेती, उद्योग, आयटी क्षेत्रासाठी ते काम करतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दसरा दिवाळी धमाका शॉपिंग फेस्टिव्हल

0
0

दसरा दिवाळी धमाका लोगो वापरावा......

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा, दिवाळीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'डीवायपी सिटी मॉल'च्या सहकार्याने दसरा दिवाळी धमाका शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या फेस्टीव्हल अंतर्गत डीवायपी सिटी मॉलच्या कोणत्याही शोरूममधून केल्या जाणाऱ्या खरेदीवर ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षीसे मिळणार आहेत. रविवारी, सहा ऑक्टोबरला फेस्टिव्हलची सुरुवात होणार असून तो २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

या फेस्टीव्हल अंतर्गत विजेत्या ग्राहकांना बक्षीसाच्या स्वरुपात चारचाकी, दुचाकी वाहनांसह अन्य वस्तू मिळणार आहेत. 'शॉपिंग फेस्टिव्हल'च्या माध्यमातून 'महाराष्ट्र टाइम्स' गेली चार वर्षे ग्राहकांना खरेदीच्या उत्तमोत्तम संधी देत आहे. सलग पाचव्या वर्षी ग्राहकांना ही संधी मिळणार आहे. त्यासाठी शॉपिंग फेस्टिव्हलचा बिग धमाका आणण्यात आला आहे. या योजनेमध्ये सहभागी होताना डीवायपी सिटी मॉलमधील शोरूममध्ये खरेदी केल्यानंतर ग्राहकांना एक कुपन मिळेल. या कुपनमध्ये ग्राहकांनी स्वत:ची माहिती भरायची आणि संबंधित शोरूममध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये ते जमा करायचे आहे.

कुपनसोबत तुमच्याकडे ठेवण्यासाठीची प्रत मिळेल, ती जपून ठेवणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये २९ ऑक्टोबरपर्यंत सहभागी होता येणार आहे. या कालावधीत एकूण तीन साप्ताहिक लकी ड्रॉ आणि एक बंपर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या दोन्ही ड्रॉ मधून विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. यात बंपर ड्रॉचे पहिले बक्षीस क्विड कार, दुसरे बक्षीस अल्टो कार तर तिसरे बंपर बक्षीस बुलेट मोटारसायकल आहे.

फेस्टीव्हल अंतर्गत ग्राहकांना गिफ्ट व्हाउचर्स मिळणार आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. लकी ड्रॉमध्ये जे विजेते ठरतील, त्यांनी गिफ्ट व्हाउचर 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयातून सकाळी दहा ते पाच या वेळेत घेऊन जायची आहेत. २४९, ई, गुलमोहर रेसिडन्सी, नागाळा पार्क, कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक ०२३१-६६२२३०० हा कार्यालयाचा पत्ता आहे. गिफ्ट व्हाउचर घेताना ग्राहकांनी कुपनची प्रत आणि पॅनकार्डसह फोटो ओळखपत्राची झेरॉक्स देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९६८९८८६६३० या मोबाइलवर क्रमांकावर संपर्क साधावा.

....

नामवंत कंपन्यांचे ब्रॅण्डस

कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ समजली जाते. आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकही खरेदीसाठी कोल्हापूरला पसंती देतात. सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी खरेदीची ही अनोखी संधी असणार आहे. आधुनिक लाइफस्टाइल, बदलत्या आवडीनिवडीनुसार वस्तू, कपडे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. बदलत्या जगाचा वेध घेत अनेक नाविन्यपूर्ण व्हरायटींचा नजराणा घेऊन शॉपिंग फेस्टिव्हल कोल्हापूरकरांच्या भेटीस येत आहे. डीवायपी सिटी मॉलच्या एकाच छताखाली येथे सर्व प्रकारची खरेदी करता येणार आहे. शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंचा खजिना खुला होणार असून नामवंत कंपन्यांचे ब्रॅण्डसही उपलब्ध असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराराणी आघाडीचा क्षीरसागरांना पाठिंबा शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांचा आज, शुक्रवारी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात 'कोल्हापूर उत्तर'मध्ये ताराराणी आघाडीच्या भूमिकेबाबतचा निर्णय जाहीर होणार आहे. विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आहे. यामुळे भाजपच्या बरोबरीने ताराराणी आघाडी शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेला पाठिंबा आणि दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक यांना शिवसेनेचे सहकार्य अशी रणनिती ठरण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, ताराराणी आघाडीचे स्वरुप महाडिक, गटनेते सत्यजित कदम, भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विलास वास्कर, ताराराणी मार्केट सभापती राजसिंह शेळके यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी १२ वाजता गणेश हॉल, लोणार वसाहत येथे हा मेळावा होणार आहे.

महापालिकेत ताराराणी आघाडीचे १९ नगरसेवक आहेत. आघाडीचे गटनेते सत्यजित कदम हे गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार क्षीरसागर यांच्या विरोधात लढले होते. महापालिकेच्या राजकारणात भाजप ताराराणी आघाडी एकत्र तर शिवसेनेचे नगरसेवक दोन्ही काँग्रेससोबत आहे. विधानसभेसाठी युती झाल्यामुळे शिवसेना, भाजप एकत्र आहेत. मात्र कोल्हापूर उत्तरच्या प्रचारात भाजप, ताराराणी आघाडीचे नगरसेवक फारसे सक्रिय नाहीत तर दक्षिणमध्ये शिवसेना भाजपासून लांब असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या मेळाव्यात दोन्ही मतदारसंघांसाठी रणनिती आखली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाकिस्तानला ‘जशास तसे’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'त्यांनी एक मारला तर आम्ही दहा मारतो. याचा प्रत्यय पाकिस्तानला बालाकोटमधील कारवाईने आला आहे. यापुढेही जशास तसे उत्तर देऊ', असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिला. महायुतीचे जत येथील उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शहा बोलत होते. राजे रामराव महाविद्यालयाच्या मैदानावर सभा झाली.

'जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवून एका देशात दोन पंतप्रधान आणि दोन संविधान चालणार नाहीत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. हे कलम हटवल्याबद्दल आपले मत काय आहे, याचे उत्तर कॉंग्रसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राला द्यावे', असे आव्हानही शहा यांनी दिले.

शहा म्हणाले, 'भाजपला लोकसभेत पुन्हा निवडून देण्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. ३७० कलम हटवून अखंड भारताचे सरदार पटेल यांचे स्वप्न मोदी यांनी पूर्ण केले. आता पाकिस्तान एकाकी पडला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत मोदी यांनी हात आखडता घेतला नाही. पायाभूत सुविधा, सिंचन योजनांना निधी दिल्यामुळे योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या पवारांनी जनतेला काय दिले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राला जेवढे दिले तेवढे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला पंचावन्न वर्षांत देता आलेले नाही. त्यामुळे केवळ घराणेशाही जोपासत भ्रष्टाचार करणाऱ्या आघाडीला पुन्हा थारा देऊ नका.'

आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.

.. .. .. ..

जतला कर्नाटकातून पाणी

जत पूर्व भागासाठी तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची लवकरच चर्चा होईल, अशी ग्वाही देऊन शहा म्हणाले, 'फडणवीस यांनी केवळ पाच वर्षांत राज्यातील सिंचन क्षेत्र ३२ लाख हेक्टरवरून ४० लाख हेक्टरवर नेण्याचे काम केले. कर्जमाफीही दिली. शरद पवार यांनी सांगलीला काय दिले, याचा हिशेब दिला पाहिजे.'

०० ०० ०००० ०० ०० ०० ०० ०० ००

राहुल गांधींनी मैदान सोडले...

दरम्यान, 'निवडणुकीत नेत्याने आपल्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम राहणे गरजेचे असताना कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी मैदान सोडून बाहेर जातात. हा प्रकार विरोधी पक्षासाठी चांगला नाही,' अशा शब्दांत शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. जतच्या सभेसाठी जाताना कोल्हापूर विमानतळावर थांबल्यानंतर ते भाजप पदाधिकाऱ्यांशी बोलत होते.

'लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. त्रिपुरात आम्ही रस्त्यावर राहून भाजपचे २५० सदस्य बनवले. आज त्रिपुरात भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना राहुल गांधी मैदान सोडून बाहेर गेले आहेत. हा प्रकार विरोधी पक्षासाठी चांगला नाही,' असे शहा म्हणाले.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोष्टल मतदानाची प्रक्रिया सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी आणि सैनिक मतदारांसाठीची पोष्टल मतदानाची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली . विधानसभा मतदारसंघनिहाय सुरू असलेल्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांना पोष्टल मतपत्रिका देऊन तातडीने देणाऱ्यांकडून पत्रिका स्वीकारली जात आहे. ही प्रक्रिया मतमोजणीच्या आदल्या दिवसांपर्यंत म्हणजे २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकूण पोष्टल मतदारांची संख्या निश्चित होणार आहे.

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबरला मतदान आहे. या दिवशी राज्य, केंद्र सरकारच्या विविध विभागाचे १४ हजार ७०५ कर्मचारी तैनात असतील. याशिवाय राज्यातून निवडणुकीच्या कामासाठी पोलिसांसह इतर कर्मचारी त्या दिवशी येणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार सैनिक सेवा बजावत आहेत. ते मतदानादिवशी हक्क बजावण्यासाठी येऊ शकत नाहीत. त्यांना व निवडणूक कामावरील कर्मचाऱ्यांना पोष्टल मतपत्रिका पाठवण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. गुरूवारी सर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी पोष्टल मतपत्रिका देण्यात आली. त्याची आकडेवारी जिल्हास्तरावर एकत्र केली जात आहे. प्रशिक्षणाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर पोष्टल मतदारांची संख्या निश्चित होणार आहे.

...

चौकट

प्रक्रिया कशी ?

उमेदवार माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टपाली मतपत्रिकेच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. निवडणूक कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघांनुसार आवश्यक मतपत्रिकेची माहिती संकलित केली जात आहे. याशिवाय महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या मतदारसंघाची मतपत्रिका देण्यात येणार आहे. मतपत्रिकेची मागणी नोंदवल्यानंतर संबंधित मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नाव पाठवले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नाव गेल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून पोष्टल मतपत्रिका पाठवली जात आहे.

...

- निवडणूक कामावरील कर्मचाऱ्यांना पोष्टल मतपत्रिका

- सैनिक मतदारांच्या पत्त्यावर मागणीनुसार पत्रिका पोष्टाने पोहच

- मतमोजणीच्या आदल्या दिवसांपर्यंत मतपत्रिकांचा स्वीकार

- निवडणूक प्रक्रियेतील मतदार मतपत्रिका स्वहस्ते देऊ शकतात किंवा पोष्टाने पाठवू शकतात.

...

कोट

'विधानसभा निवडणुकीसाठी पोष्टल मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतपत्रिका दिल्या जात आहेत. प्रशिक्षणाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकूण पोष्टल मतदारांची संख्या निश्चित होणार आहे. पोष्टल मतपत्रिकेवरील मतदान मतमोजणीच्या आधीपर्यंत स्वीकारले जाते.

रामहरी भोसले, नोडल अधिकारी, पोष्टल मतदान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराचे रान तापू लागले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शक्तीप्रदर्शन करणाऱ्या रॅली, प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, छोट्या मेळाव्यांमुळे शहरासह ग्रामीण भागात प्रचाराचे रान तापू लागले आहे. सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात प्रचाराचा जोर असताना रात्री मात्र पावसामुळे प्रचाराला ब्रेक लागत आहे.

दसऱ्याचे सोने लुटल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडले आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली आहे. गुरूवारी सकाळी लक्ष्मीपुरी परिसरात आमदार क्षीरसागर यांनी प्रचार फेरी काढली. फेरीत महिलांची संख्या लक्षणीय होती. तसेच संपर्क नेते अरुण दूधवडकर यांच्या उपस्थितीत मंगळवार पेठेतील प्रॅक्टिस क्लब परिसरात सभा घेण्यात आली. दूधवडकर यांनी क्षीरसागर यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

एकीकडे प्रचारात शिवसेनेने आघाडी घेतली असताना काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. पेठेतील प्रमुख तालमी, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह उद्योजक, व्यापाऱ्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. सकाळी त्यांनी शहरातील रंकाळा परिसर , महावीर गार्डन, हुतात्मा पार्क येथे मॉर्निंग वॉक करत मतदारांना मत देण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन गाठीभेटींवर भर दिला जात आहे. पुढील काही दिवसांत शहरातून रॅलीचे नियोजन केले जाणार आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात हाय होल्टेज निवडणूक असल्याने दोन्ही उमेदवारांकडून प्रचारात कोणतीही कसर ठेवली जात नाही. भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना चुलतभाऊ माजी खासदार धनंजय महाडिक तर काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना चुलते आमदार सतेज पाटील यांची साथ मिळत आहे. भाजपच्यावतीने गुरूवारी सकाळी शिवाजी विद्यापीठाजवळील राम मंगल कार्यालय येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी युवकांच्यासमवेत संवाद साधला. 'कॉफी विथ गोवा सीएम' या कार्यक्रमात युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत पुन्हा भाजपला सत्ता देण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी चुये, कावणे आणि निगवे गावात प्रचार फेरी काढल्या. प्रचार फेरीत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तीनही गावांमध्ये पाटील यांचे जंगी स्वागत झाले. मतदारसंघाच्या विकासासाठी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.

...

विरोधी उमेदवारांच्या प्रचारावर लक्ष

दुपारच्या सत्रात नेते मंडळींकडून भेटीगाठींवर भर दिला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनीही वैयक्तिक प्रचारावर भर दिला आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे काढून त्यांना प्रचारात सक्रीय करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विरोधी उमेदवारांच्या प्रचाराकडेही बारीक नजर ठेवली जात आहे. सायंकाळच्या सत्रात राजकीय पक्षांनी कोपरा सभा आणि प्रचार फेऱ्यांचे आयोजन केले होते. पण सात वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाल्याने सभा व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. उमेदवारांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरात भेटी घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शहरात मेळावे

0
0

कोल्हापूर

आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी राग आळवल्यानंतर भाजप शिवसेना युतीचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत युतीचे मेळावे होत आहेत. पाटील यांच्या उपस्थितीत सकाळच्या सत्रात तीन मेळावे होणार असून दुपारी भाजपच्या बूथ प्रमुखांची प्रचाराच्या नियोजनासाठी सभा होणार आहे. राज्यात दोन्ही पक्षांची युती झाल्यानंतर जिल्ह्यात शिवसेना आठ तर भाजप दोन जागा लढवत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली असून शिरोळ, राधानगरी, चंदगड, कागल, हातकणंगले मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांनी फॉर्म भरुन बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी युतीचे मेळावे होत आहेत. आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजता पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे मेळावा होणार आहे. अकरा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन तर बारा वाजता कावळा नाका येथील गीता मंदिर येथे सभा होणार आहे. या मेळाव्याला आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.चे निम्मे कर्मचारी निवडणूक कामात

0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील तब्बल २२५ हून कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती केली आहे. यामुळे जि.प.तील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मुख्यालयात क आणि ड वर्गातील मिळून ४०६ कर्मचारी आहेत. त्यापैकी २२५ कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीच्या कामासाठी नेमणुका झाल्या आहेत. ७५ कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या कामासाठी तर १३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. दरम्यान, आचारसंहितेमुळे पदाधिकारी व सदस्यांची जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images