Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शेकापचे भाऊसाहेब रूपनर शिवसेनेत

$
0
0

शेकापचे भाऊसाहेब रूपनर शिवसेनेत

सोलापूर :

सांगोला विधानसभा मतदारसंघात तिकिट जाहीर होऊन ऐनवेळी उमेदवारी नाकारली गेल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या भाऊसाहेब रूपनर यांनी शनिवारी मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचा फायदा शहाजीबापू पाटील यांना होईल, असे दिसते आहे.

आमदार गणपतराव देशमुख यांनी विधानसभा न लढविण्याचा निर्णय घेतल्याने यंदा शेकापच्या समितीने पाच इच्छुकांच्या मुलाखती घेऊन भाऊसाहेब रूपनर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, नंतर कार्यकर्त्यांचा आग्रह व नाराजी पाहून पक्षाने आमदार देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाऊसाहेब रूपनर यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शनिवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन हाती बांधून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारदीय नवरात्रौत्सवात शनिवारी, सप्तमी दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची कनकधारा लक्ष्मीरुपात पूजा बांधण्यात आली. रविवारी अष्टमीनिमित्त नगरप्रदक्षिणा व रात्री जागर होईल. शनिवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. देवीच्या दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

शनिवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शन रांगेत हजेरी लावली. पहाटे पावणेपाच वाजल्यापासून मंदिरात दर्शनासाठी दरवाजे खुले करण्यात आले. रात्री अकरा वाजेपर्यंत दर्शन रांगा गर्दीने फुलल्या. दिवसभरात मंदिरात अष्टमीच्या जागराची तयारी सुरू होती. शनिवारी एकूण ४६ हजार ५०८ भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

दरम्यान, रविवारी रात्री ९.३० वाजता अंबाबाईची नगरप्रदक्षिणा होईल. देवीची उत्सवमूर्ती फुलांनी सजवलेल्या वाहनात विराजमान होऊन, तोफेच्या सलामीनंतर महाद्वारातून नगरप्रदक्षिणा सोहळा सुरू होणार आहे. महाद्वार रोड, गुजरी मार्गे वाहन भवानी मंडपात येईल. येथे तुळजाभवानी व अंबाबाईची भेट होईल. देवीची आरती झाल्यानंतर पुढे मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा मंदिरात येईल. रात्री १२ वाजल्यानंतर महाकाली मंदिरासमोर देवीची जागराची पूजा व होम, जागर सुरू होईल. यामुळे सोमवारी अंबाबाई दर्शन सकाळी ८ नंतर सुरू होणार आहे. दरम्यान, लाइव्ह मोबाइल ॲपच्या माध्यमातून लाखो लोकांनी घरबसल्या देवीचे दर्शन घेतले. उत्सवकाळात भाविकांना उपचारासाठी मोफत वैद्यकीय सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. करवीरनिवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ आणि व्हाइट आर्मीच्यावतीने नवरात्रोत्सवाची सांगता रक्तदान शिबिराने होणार आहे. बुधवारी मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळील वैद्यकीय कॅम्पमध्ये रक्तदान शिबिर होईल. देवीची पूजा श्रीपूजक मंदार मुनीश्वर, मयूर मुनीश्वर आणि आशुतोष ठाणेकर यांनी बांधली.

नृत्य सादरीकरण

नर्तराज नृत्य संस्था व व देवस्थान समितीच्यावतीने भवानी मंदिराच्या प्रांगणात नृत्य सादरीकरणाचा मनोहरी कार्यक्रम झाला. एमएलजी हायस्कूलच्या ४०० विद्यार्थिनींनी उपक्रमात सहभाग घेतला. नृत्य शिक्षिका कविता नायर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेया कामत, शरण्या मेनन, राई पाटील, देविका मेनन, गायत्री जिरगे, सात्विका वेरणेकर, सिद्धी प्रभू, कामाक्षी शानभाग यांनी कला सादर केली. संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या कार्यालयीन सहायकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाणिज्य प्रकारातील वीज मीटर बंद करुन कुळाच्या नावे नवीन वीज जोडणी करण्यासाठी ५५०० हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या शाखा कार्यालयातील कनिष्ठ कार्यालयीन सहायकाला अटक करण्यात आली.

शेंडा पार्कातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी ही कारवाई केली. जीवन महादेव कांबळे (वय ३०, सध्या रा. त्रिमूर्ती कॉलनी, कणेरीवाडी, मूळ बाळे, जि. उत्तर सोलापूर) असे त्याचे नाव आहे.

पोलिस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमोद नारायण कदम (रा. जवाहरनगर हाऊसिंग सोसायटी) यांच्या घरातील जोडणीचे वाणिज्य वापरासारखे वीज बील येत होते. म्हणून त्यांनी मीटरवापरात बदल करण्यासाठी कांबळे यांची भेट घेतली. वाणिज्य प्रकारातील मीटर बंद करुन तेथे भाडेकरुच्या नावे नवीन जोडणी घ्यावी लागेल, असे सांगून कांबळेने ५५०० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर कदम यांनी २६ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. २७ तारखेला सरकारी पंच साक्षीदारांच्या समक्ष लाचेची मागणी केली असता ही रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेंडा पार्क येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी कांबळे लाच स्वीकारताना रंगेहात सापडला. कारवाईत सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस नाईक नवनाथ कदम, मयूर देसाई, सूरज अपराद आदींनी सहभाग घेतला.

.. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविद्यालयीन तरुणीचीफुलेवाडीत आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलेवाडी येथील पहिला बसस्टॉप येथे महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मुबीना जँहागीर अंबी (वय २०, रा. फुलेवाडी पहिला बसस्टॉप) असे या तरुणीचे नाव आहे. या

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

पोलिसांनी सांगितले की, मुबीना हिच्या वडिलांचे वर्षापूर्वी निधन झाले आहे. ती आई आणि आजीसोबत राहत होती. दसरा चौकातील एका महाविद्यालयात ती वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. कौटुंबीक जबाबदारी असल्याने ती शिक्षण घेताना नोकरीही करीत होती. तिची आई हॉटेलमध्ये धुण्याभांड्याची कामे करते. तर आजी एका खासगी रुग्णालयात काम करते. शनिवारी सकाळी तिची आई कामावर गेली. मुबीना एकटीच घरी होती. दरम्यान आजी खुदेजाबी इब्राहीम आंबी या नाइटड्यूटी करून घरी आल्या. त्यावेळी दरवाजा उघडल्यावर मुबीनाने गळफास लावून घेतल्याचे दिसले. बेशुद्धावस्थेत तिला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीपीआरमध्ये तिची आई आणि आजीने केलेल्या आक्रोशने उपस्थितांची मने हेलावली. करवीरचे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याच्या आठ विधानसभामतदारसंघात १०८ अर्ज वैध

$
0
0

साताऱ्याच्या आठ विधानसभा

मतदारसंघात १०८ अर्ज वैध

सातारा :

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात एकूण १०८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. सात ऑक्टोबर रोजीपर्यंत अर्ज मागार घेण्याची मुदत आहे.

फलटणमधून आगवणे दिगंबर रोहिदास (भाजप), दीपक प्रल्हाद चव्हाण (राष्ट्रवादी), प्रदीप सुरेश मोरे (बसप), अरविंद बाबुराव आढाव ( वंचित आघाडी). यांच्यासह अन्य अकरा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. वाईत दीपक केशव काकडे (बसप), धनराज मारुती कांबळे (भाकप), मकरंद लक्ष्मणराव जाधव-पाटील (राष्ट्रवादी), मदन प्रतापराव भोसले (भाजप) यांच्यासह अन्य नऊ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. कोरेगावमध्ये किरण काशीनाथ सावंत (बसप), महेश संभाजीराजे शिंदे (शिवसेना), शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी), बाळासाहेब संतु चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह आठ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.

माणमध्ये नारायण तातोबा काळेल (बसप), जयकुमार भगवानराव गोरे (भाजप), शेखर भगवानराव गोरे (शिवसेना), गावडे प्रमोद रामचंद्र (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह अन्य बारा अर्ज वैध ठरले आहेत. कराड उत्तरमध्ये जगन्नाथ लक्ष्मण वाघमारे (बसप), धैर्यशिल ज्ञानदेव कदम (शिवसेना), शामराव उर्फ बाळासो पांडुरंग पाटील (राष्ट्रवादी) सुभाष बाबुराव पिसाळ (वंचित बहुजन आघाडी), मनोज भिमराव घोरपडे (अपक्ष) यांच्यासह सहा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. कराड दक्षिणमध्ये अतुल सुरेश भोसले (भाजप), आनंदा रमेश थोरवडे (बसप), चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब (काँग्रेस), पंजाबराव महादेव पाटील (बळीराजा) बाळकृष्ण शंकर देसाई (वंचित बहुजन आघाडी), शिकलगार अलताफ अब्दुलगणी (एमआयएम) उदयसिंह विलासराव पाटील (अपक्ष), बारा अर्ज वैध ठरले आहेत. पाटणमध्ये शिवाजी भिमाजी कांबळे (बसप), शंभुराज शिवाजी देसाई (शिवसेना), सत्यजित विक्रमसिंह पाटणकर (राष्ट्रवादी), अशोकराव तातोबा देवकांत (वंचित बहुजन आघाडी) यांच्या नऊ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. साताऱ्यात दीपक साहेबराव पवार (राष्ट्रवादी), शिवेंद्रसिंह अभियसिंहराजे भोसले (भाजप), अशोक गोरखनाथ दिक्षित (वंचित बहुजन आघाडी), अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले (अपक्ष) यांच्यासह चार जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.

लोकसभेसाठी आठ अर्ज वैध

सातारा :

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आठ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उदयनराजे भोसले (भाजप) श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी) यांच्यासह अन्य सहा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्वव ठाकरे

$
0
0

मेट्रोच्या नियोजित कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीच्या संदर्भात शिवसेना अजिबात गप्प बसणार नाही. आम्ही यासंदर्भात लवकरच रोखठोक भूमिका मांडणार आहे. आम्ही हा विषय अद्याप सोडलेला नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. आरेबाबत मी स्‍वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. आम्ही पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून येऊ. आमचे सरकार आल्‍यानंतर आरेमधीर झाडांचे जे कोणी खुनी असतील त्‍यांचे काय करायचे ते आम्‍ही ठरवू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात १३७ जणांचे अर्ज बाद

$
0
0

सोलापुरात १३७ जणांचे अर्ज बाद

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकूण ३७४ अर्ज दाखल झाले होते. शनिवारी छाननीत १३७ जणांचे अर्ज बाद झाले असून, २३७ अर्ज शिल्लक वैध ठरले आहेत. मोहोळमध्ये ३४ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २२ अर्ज वैध ठरले आहेत. करमाळ्यात २६ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १८ अर्ज वैध ठरले आहेत. माळशिरसमध्ये ३० अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १६ अर्ज वैध ठरले. बार्शीत ३३ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २० अर्ज वैध ठरले. माढ्यात २० अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १६ अर्ज वैध ठरले. सोलापूर दक्षिणमध्ये ३४ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २६ अर्ज वैध ठरले आहेत. सोलापूर शहर उत्तरमध्ये १९ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १६ अर्ज वैध ठरले आहेत. अक्कलकोटमध्ये २७ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १७ अर्ज वैध ठरले आहेत. सोलापूर शहर मध्यमध्ये ६८ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २७ अर्ज वैध ठरले आहेत. सांगोल्यात ४२ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ३१ अर्ज वैध ठरले. पंढरपूर-मंगळवेढ्यात ४१ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २८ अर्ज वैध ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुजा पाटीलची भारतीय संघात निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट टी-व्टेंटी स्पर्धेसाठी कोल्हापूरची खेळाडू अनुजा पाटील हिची निवड झाली. नऊ ते २० नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहे. तसेच श्रीलंका दौऱ्यात ती पाच टी-व्टेंटी सामने खेळणार आहे. अनुजाला जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रोत्साहन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अग्रणी नदीच्या पाणीपातळीत वाढ; बाप-लेक गेले वाहून...

$
0
0

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पावसामुळे अग्रणी नदीला मोठ्याप्रमाणात पाणी आले आहे . या पाण्यात बाप-लेक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली . देशिंगहून कवठेमहांकाळकडे आरती साठी येत असताना मोरगाव येथील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेक वाहून गेले. योगेश पवार आणि त्याची ६ वर्षांची मुलगी श्रेया पवार असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

पहाटे च्या सुमारास दुचाकीवरून योगेश पवार हे मुलगी श्रेया आणि पुतण्या असे तिघेजण देशिंगहुन कवठेमहांकाळ येथे आरतीसाठी येत होते. यावेळी मोरगाव गावााातीलल पुलावरून अग्रणीचे पाणी वाहत होते.पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह हे तिघेजण पाण्यात वाहून गेले. यात पुतण्या पोहत बाहेर आला ,त्यामुळे त्याचा जीव वाचला. वाहून गेलेल्या बाप लेकीचा शोध कवठेमहांकाळ पोलीस आणि नागरिक करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवाराच्या संमतीशिवाय 'सोशल' प्रचार केल्यास कारवाई

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करताना नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या अधिकृत खात्यावरुनच प्रचार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. मल्टिपल खात्यांवरुन प्रचार झाल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल. उमेदवाराच्या संमतीशिवाय सोशल मीडियावरुन अन्य कोणी प्रचार केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय माध्यम कक्षास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी अन्य दुसऱ्या उमेदवाराबाबत चुकीची पोस्ट करणे किंवा एका उमदेवाराने मल्टिपल खात्यावरुन पोस्ट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या खात्यावरुनच सोशल मीडियाचा प्रचार होत आहे याची खात्री करावी. उमदेवाराच्या नावाने इतर कोणी खाते सुरू करुन उमदेवाराच्या संमतीशिवाय वापर करीत असेल तर अशांवरही कारवाई केली जाईल. विधानसभा निवडणूक प्लास्टिक विरहीत करण्यावर निवडणूक आयोगाने भर दिला असून सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक कामकाज प्लास्टिक विरहीत करावे. प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सुनेत्रा यांचे न्यूरोसायन्समध्ये संशोधन

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

tweet:satishgMT

कोल्हापूर : ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील विद्यापीठात न्यूरो सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवून कोल्हापूरच्या डॉ. सुनेत्रा ससे या सध्या लहान मुलांमधील मेंदूशी संबधित ल्युकोडिसट्रॉफी (Leukodystrophy) या आजारावर संशोधन करत आहेत. अमेरिकेतील दहाहून अधिक मेडिकल जर्नल व अधिवेशानात त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल 'अल्वी डोबेरी रिसर्च इन एक्सलन्स' या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील नामांकित चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये त्या सध्या कार्यरत आहेत.

डॉ. सुनेत्रा आणि त्यांचे पती अजिंक्य हे शनिवार पेठेतील खोलखंडोबा मंदिर परिसरातील रहिवासी. हे दाम्पत्य न्यूरो सायन्समध्ये संशोधक आहेत. सुनेत्रा यांना लहानपणापासून पेशी कशा काम करतात याविषयी उत्सुकता होती. याच आवडीतून त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये बी. एसस्सी. मायक्रोबॉयालॉजीसाठी प्रवेश घेतला. शिक्षण घेताना २००२मध्ये त्यांना स्कॉलरशीप मिळाली. एमएससी करण्यासाठी त्यांनी कराडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांना एक्लेव्ह स्कॉलरशीप मिळाली.

२००७ मध्ये शिवाजी विद्यापीठात मायक्रोबॉयालॉजीमध्ये फस्ट रँक मिळाली. त्यानंतर त्यांनी विवेकानंद महाविद्यालय, हुबळी येथे अध्यापनाचे काम केले. संशोधन आणि नोकरी करत असताना २००८ मध्ये अजिंक्य ससे यांच्याशी सुनेत्रा यांचा विवाह झाला. विवाहानंतर अजिंक्य दुबईला गेले तर सुनेत्रा कोल्हापुरात अध्यापन आणि संशोधन करत राहिल्या. अध्यापनापेक्षा त्यांचा ओढा संशोधनाकडे जास्त होता. न्यूरो सायन्समध्ये डॉक्टरेट करण्याची त्यांनी इच्छा होती. परदेशात संशोधनाची संधी कुठे मिळेल याचा शोध घेत असताना त्यांना ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी.साठी ससे दाम्पत्याला फेलोशिप मिळाली.

व्हिएन्ना विद्यापीठात त्यांनी ग्रेट लिब्युकप्रोटोमिक्स या विषयात २०१५ पी. एचडी. मिळवली. प्रसूतीमुळे त्यांनी मधल्या काळात ब्रेक घेतला. नंतर पुढच्या संशोधनासाठी ससे दाम्पत्य २०१७ ला अमेरिकेत आले. सध्या त्या फिलाडेल्फिया येथील नामांकित चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये डॉ. अॅडलाइन व्हॅड्रेस यांच्या प्रयोगशाळेत काम करीत आहेत. लहान मुलांमध्ये ल्युकोडिसट्रॉफी हा मेंदूच्या संबधित रोग बळावत आहे. यामध्ये डॉ. सुनेत्रा यांनी जेनेथेरपीच्या ट्रिटमेंट डेव्हलपमेंटवर काम करत आहे. जेनेथेरपीची ट्रिटमेंट वापरुन ल्युकोडिसट्रॉफी हा आजार बरा होऊ शकतो का यावर संशोधन करत आहे. प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये १२ लेख त्याचे छापून आले आहेत. 'अमेरिकन अॅकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजी' या बैठकीत त्यांनी संशाधनाचा पेपर सादर केल्यावर उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्या संशोधनाची प्रशंशा करत त्यांना प्रोत्साहन दिले.

'लहानपणापासून आपण का घाबरतो याविषयी उत्सुकता होती. त्यामुळे भीतीशी संबधीत फिअर मेमरीविषयी संशोधन केले. सध्या लहान मुलांमधील मेंदूशी आजारासंबधीत ल्यूकोडिस ट्रॉफीवर संशोधन सुरू आहे. जेनेटिक ट्रिटमेंटवर संशोधन असून त्याचे चांगले रिझल्ट येत आहेत. भविष्यात त्यावर उपचार पद्धत विकसित होईल' असे डॉ. सुनेत्रा ससे यांनी सांगितले.

लोगो : नवदुर्गा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेंडूचा बाजार फुलला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

देवीचा जागर, खंडेनवमी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी झेंडूची आवक मोठी झाल्याने मंगळवार पेठेतील शिंगोशी मार्केटमधील फूल बाजारात झेंडू चांगला फुलला होता. प्रतिकिलो ६० ते ८० रुपये झेंडूचा दर होता. झेंडूच्या फुलांबरोबर ऊस, लव्हाळा, ज्वारीच्या धाटांनाही मोठी मागणी होती.

नवरात्रोत्सवात घट बसवण्यात आले असून दररोज झेंडूंच्या फुलांची माळ बांधली जाते. त्यामुळे उत्सव काळात फुलांना मागणी होती. उत्सवाच्या अंतिम टप्प्यात आज देवीचा जागर होता. सोमवारी खंडेनवमी असल्याने झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीस आणली होती. राधानगरी, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांसह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी झेंडू विक्रीस आणला होता. शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, निवृत्ती चौक, पापाची तिकटी, ताराबाई रोड, संभाजीनगर, रेसकोर्स, कसबा बावडा या ठिकाणी झेंडू खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

फुलांच्या माळा, दारांना तोरणे आणि वाहनांना हार घालण्यासाठी झेंडू फुलांचा वापर केला जातो. खंडेनवमी आणि विजयादशमीला व्यापारी आणि उद्योजकांकडून झेंडूला मागणी असते. फुलांच्या तोरणांनी शोरुम, दुकाने, कारखाने सजवली जातात. ज्वारीच्या धाटांना मोठी मागणी होती. पाच धांटाचा दर वीस रुपये होता. पाच उसांचा दर ५० ते ७५ रुपये होता. जागर, खंडेनवमीला उसाची कमान देव्हाऱ्यात केली जाते. व्यापारीही उसाची कमान उभारतात. त्यामुळे शहरातील चौकाचौकात ऊस, लव्हाळा आणि आपट्यांची पाने विक्रीसाठी ग्रामीण भागातून शेतकरी शहरात मोठ्या संख्येने आले होते. फूले, विड्याची पाने आणी पूजा साहित्य विक्रीत मोठी उलाढाल झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव बुधवारपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे केले आहे. बुधवारी (ता. ९) सायंकाळी ५.३० वाजता महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवाच्या समारोप सत्रात 'वसुंधरा सन्मान' पुरस्काराने महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा गौरव करण्यात येणार आहे' अशी माहिती समन्वय समितीचे उपाध्यक्ष धीरज जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवादरम्यान शॉर्टफिल्म, छायाचित्र प्रदर्शन, हेरिटेज वॉकसह चर्चासत्रांचे आयोजन केल्याचे सांगताना जाधव म्हणाले, 'उद्घाटन समारंभानंतर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन व राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'द वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर' लघूपट प्रसारित होणार आहे. गुरुवारी (ता.१०) सकाळी सात वाजता कात्यायनी परिसरात हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, सायबरचे प्रा. डॉ. एस. व्ही. शिरोळ व डॉ. दीपक भोसले यांचा वसुंधरा गौरव पुरस्कारने सन्मान केला जाणार आहे. वसुंधरा मित्र पुरस्काराने रॉबिनहूड आर्मी व चिंदबर शिंदे यांचा गौरव केला जाणार आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळी दहा वाजता सायबर कॉलेजच्या एम. बी. ए. विभागात 'वेष्टनासाठी प्लास्टिक' या विषयावर मुक्त संवाद होणार आहे. सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवन येथे किर्लोस्कर कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. १२) सायंकाळी ५.३० वाजता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा वसुंधरा सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराने खडकवासला धरणाच्या पुनरुज्जीवनासाठी कार्यरत निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.'

उदय गायकवाड म्हणाले, 'महोत्सवादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या अनेक शॉर्टफिल्म दाखवल्या जातील. त्यासाठी स्टेजची सजावट पारंपरिक साहित्याद्वारे केली जाणार आहे. विविध सन्मानचिन्हे वेगळ्या पद्धतीने तयार केली आहेत. महोत्सवासाठी नाव नोंदणी निसर्गमित्र, साइक्स एक्स्टेशन येथे दुपारी तीन ते सात आणि शाहू स्मारक भवनात दुपारी चार ते सात वाजेपर्यंत करावी.' असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार परिषदेस राहुल पवार, प्राचार्य अजेय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे, अनिल चौगुले, भाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अष्टमीचा जागर अन् गर्दीचे शिखर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शारदीय नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा दिवस असलेल्या अष्टमीदिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या जागरउत्सवाला भाविकांनी गर्दीचे शिखर गाठले. रविवारच्या सुटीची पर्वणी साधत साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची गर्दी लाखाच्या घरात पोहोचली. अष्टमीनिमित्त देवीची महिषासूरमर्दिनी रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली होती.

दुर्गा सप्तशती महात्म्यामध्ये येणारा अष्टदशभूजा हा ध्यानमंत्र आहे. या दहा हातांमध्ये जपाची माळ, परशु, गदा, बाण, व्रज, पद्म, धनुष्य, कमंडलु, दंड, भाला, तलवार, ढाल, शंख, घंटा, पानपात्र, त्रिशूल, पाश व चक्र धारण केले आहे. आद्य शंकराचार्यांच्या स्तुतीमध्ये अंबाबाईची उत्पत्ती झाली याचा उल्लेख आहे. यामध्ये तिच्या आयुधांबाबत असलेल्या स्तोत्रावरून ही पूजा बांधण्यात आली. देवीच्या आत्मशक्तीचे स्वरूप असलेली महिषासूरमर्दिनी. महिषासुराचा वध करण्यासाठी तिने धारण केलेला अवतार रविवारच्या पूजारूपातून अधोरेखित झाला. मंदार मुनिश्वर, श्रीपद्म मुनिश्वर, मयूर मुनिश्वर, रवी माइणकर यांनी पूजा बांधली.

करवीरकाशी अशी ओळख असलेल्या अंबाबाई मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सवातील अष्टमीचा दिवस देवीचा जागर सोहळा म्हणून साजरा केला जातो. अष्टमी व रविवार असा योग जुळून आल्यामुळे पर्यटक भाविकांनी अंबाबाई मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी केली. भाविकांमध्ये पर्यटक महिलांसह स्थानिक महिला भाविकांची संख्या जास्त होती. फलटण येथून आलेल्या अडीचशे महिला भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

पहाटे सहा वाजता महिला भाविकांची रांग भवानी मंडपातील शेतकरी बाजारपर्यंत तर पुरुषांची रांग सरलष्कर भवनमार्गे जोतिबा रोड कॉर्नरपर्यंत गेली होती. उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे दर्शन मंडपाबाहेर रांगेत असलेल्या भाविकांना देवस्थान समिती तसेच स्वयंसेवकांनी जाग्यावर पाणी देण्याची व्यवस्था केली. दुपारी दोनच्या सुमारास महिलांची रांग भवानी चेंबर्सपासून एमएलजी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरपर्यंत गेली. तर दुपारी चार वाजता पुरूष भाविकांची रांग गुजरी कॉर्नरपर्यंत पोहोचली.

रविवारच्या प्रचंड गर्दीमुळे पार्किंग सुविधेची जागाही अपुरी पडली. त्यामुळे मोठ्या ट्रॅव्हल बसना खानविलकर पंपामागील रिकाम्या जागेत पार्किंग करण्यासाठी जागा देण्यात आली. पार्किंगच्या ठिकाणांपासून भाविकांनी मंदिरापर्यंत चालत येण्याचा मार्ग स्वीकारला. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिवशी दीड लाखांवर भाविकांची गर्दी झाली होती. तर रविवारी भाविकांचा आकडा दोन लाखांच्यावर गेला.

२२ हजार लाडूंची विक्री

नवरात्रकाळासाठी २ लाख लाडू प्रसाद तयार करण्यात आला आहे. रोज कळंबा जेलमधील महिला कैदी लाडू बनवण्याचे काम करत आहेत. गेल्या सात दिवसात एक लाखांहून अधिक लाडूची विक्री झाली आहे. तसेच महालक्ष्मी भक्ती मंडळ व अन्नछत्र मंडळातर्फेही लाडूप्रसाद केंद्र स्थापन करण्यात आले आहे. रविवारी एका दिवशी २२ हजार लाडूची विक्री झाली.

वैद्यकीय कक्षाचा आधार

रविवारी उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे दर्शनरांगेतून अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी किमान चार ते पाच तासांचा अवधी लागत होता. सकाळी प्रवास करून थेट रांगेत उभे राहिल्याने अनेक महिलांना चक्कर येण्याचे प्रमाण जास्त होते. यासाठी देवस्थानचे कर्मचारी तसेच सेवेकरी स्वयंसेवक दर्शन रांगेजवळ फेरी मारून ज्येष्ठ भाविकांना सरबत, पाणी, लिमलेटच्या गोळ्या वाटत होते. गर्भवती कुणी आहे का? अशी विचारणा करून त्यांच्यासाठीही सरबत व पाणी वाटप सुविधा करण्यात येत होती. रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे यावर उपचार म्हणून मंदिर परिसरातील वैद्यकीय कक्षाचा भाविकांना मोठा आधार मिळाला. दिवसभरात साडेपाचशे भाविकांनी वैद्यकीय कक्षातील उपचारांचा लाभ घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारी वडिलांचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च पेलत नसल्याने मुलगा आणि चुलत्याने मिळून नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३ रा. कुडित्रे, ता. करवीर) यांचा सीपीआरमध्ये उपचार घेत असतानाच गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. मे २०१९ मध्ये झालेल्या खूनाचा पाच महिन्यानंतर उलगडा झाला. याप्रकरणी मुलगा गिरीश नामदेव भास्कर (वय ३२) याला अटक केली असून चुलता तुकाराम पांडुरंग भास्कर (वय ५३, दोघे. रा. कुडित्रे ता. करवीर) हा पसार झाला आहे.

करवीरचे पोलिस निरीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव भास्कर हे मजूर होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या जांगेत गाठ उठली होती. दिवसेंदिवस ही गाठ वाढत गेल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया करुन ही गाठ काढण्यात आली. मात्र त्यांना पुन्हा दीड वर्षानंतर त्रास होऊ लागल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आला. या दोन्ही शस्त्रक्रियेवेळी भास्कर कुटुंबीयांचा लाखांहून अधिक खर्च झाला होता. त्यांच्यावर होत असलेला खर्च आणि औषधोपचारामुळे भास्कर कुटुंबीय हतबल झाले होते. त्यांच्या उपचारासाठी काहींकडून उसने पैसे घेतले होते. त्यामुळे यापुढील खर्च करणे शक्य नव्हते. मात्र मे २०१९ मध्ये त्यांना पुन्हा वेदना होऊ लागल्याने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. वडिलांना होणारा त्रास मुलाला पाहवत नव्हता. वेदना सहन करण्यापेक्षा वडिलांचा मृत्यू झाल्यास ते वेदनामुक्त होतील, असे त्यांचा मुलगा गिरीश याचे म्हणणे आहे. २१ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका यांची नजर चुकवून गिरीश याने वडिलांच्या हाताचे सलाईन काढले. नाकात कापसाचे बोळे घालून रुमालने नाक व तोंड, गळा दाबून खून केला. दरम्यान या सर्व प्रकारानंतर आजारी असलेल्या नामदेव यांचा आकस्मित मृत्यूची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला होता. पाच महिन्यानंतर या खुनाला वाचा फुटली. हा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्यांच्याकडे वर्ग केला आहे.

व्हिसेरामुळे खून उघड

उपचार घेत असलेले मृत नामदेव भास्कर यांचा आकस्मित मृत्यू कसा झाला, असा संशय सीपीआरमधील डॉक्टरांना होता. त्यामुळे शवविच्छेदनाच्या वेळी करताना व्हिसेरा राखून ठेवला होता. पाच महिन्यानंतर व्हिसेराचा अहवाल आल्यानंतर हा खून असल्याचे निष्पन झाले. यामध्ये नाक, तोंड व गळा दाबून खून झाल्याचा उल्लेख अहवालात आहे. त्यातून खुनाचा वाचा फुटली.

संशय येऊ नये म्हणून गोंधळ

डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णाकडे लक्ष देत नसल्याच्या कारणावरून संशयित गिरीश आणि त्याचा चुलता तुकाराम याने गोंधळ घातला होता. सुमारे तासभर त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत भांडण केले होते. प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची धमकी त्यांनी डॉक्टरांना दिली होती. अखेर त्यांचा बनाव उघड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर उपअधीक्षक कट्टे यांच्या पथकाला लाखाचे बक्षीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या चार राज्यांतील मटका बेटिंगचे रॅकेट उघडकीस आणून त्यामागील सूत्रधारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करून सर्वोत्कृष्ट तपास केल्याप्रकरणी शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व त्यांच्या पथकाला पोलिस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. देशातील मटका व्यवसायामध्ये सर्वांत मोठी ही पहिलीच कारवाई ठरली.

यादवनगर-पांजरपोळ येथे ८ एप्रिल रोजी मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर सलीम मुल्ला गँगने हल्ला केला होता. याप्रकरणी 'मुल्ला गँग'चा मुख्य म्होरक्या सलीम मुल्ला, त्याची पत्नी शमा, भाऊ फिरोज, राजू, जावेद यांच्यासह मटकाकिंग सम्राट कोराणे, जयेश शहा, शैलेश मणियार, जितेंद्र गोसालिया, जयेश हिरजी सावला, राजेंद्र धरमसी, मनीष अग्रवाल, प्रकाश सावला अशा ४४ जणांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, सरकारी कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, एकत्र जमाव करून हाणामारी करणे, अवैध व्यवसाय चालविणे या प्रकारचे गुन्हे दाखल करुन 'मोक्का' ची कारवाई केली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आदी राज्यांतील मटक्याचे जाळे उखडून टाकण्यात पोलिसांना यश आले. तसेच त्यामागील सूत्रधारांनाही अटक केली. या टोळीविरोधात भक्कम पुरावे गोळा करून १२०० पानी दोषारोपपत्र पुणे येथील विशेष मोक्का कोर्टात दाखल केले. मटका व्यवसाया विरोधातील देशातील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली. त्यामुळे मुंबई मटका दीर्घकाळ बंद राहिला. या कौशल्यपूर्ण तपासाची दखल घेऊन राज्याचे पोलिस महासंचालक जयस्वाल यांनी कट्टे व त्यांच्या पथकाला बक्षीस जाहीर केले.

टीममधील अधिकारी, कर्मचारी

शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार देसाई, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ पानारी, अभिजित पाटील, सायबर सेलचे पोलिस कॉन्स्टेबल वासुदेव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ठरणार लढती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत असून त्यानंतर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिंगणातील उमेदवारांच्या प्रचाराला गती येणार आहे. पंधरापेक्षा अधिक उमेदवार एका मतदारसंघात असल्यास मतदान यंत्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. यामुळे जास्त उमेदवारांच्या मतदारसंघातील माघारीकडे निवडणूक प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात एकूण २२२ जणांकडून २९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शनिवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत १९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले तर १८६ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. अर्ज माघारीची अंतिम मुदत आज, सोमवारी दुपारपर्यंत आहे. त्यानंतर रिंगणात किती उमेदवार राहणार हे स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर दक्षिण, उत्तर, कागल, इचलकरंजी, शिरोळ या मतदारसंघात हायहोल्टेज लढत आहे.

तुल्यबळ उमेदवारांत जोरदार लढत होणार असल्याने विजयी उमेदवारांचे मताधिक्य कमी राहील, असा राजकीय विश्लेषकाचा अंदाज आहे. यामुळे प्रबळ उमेदवार मतांची विभागणी टाळण्यासाठी बंडखोर तसेच अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यांची मनधरणी केली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेला खर्च आणि संघटनेला निधी द्या, तरच उमेदवारी अर्ज माघार घेतो, असे काही उमेदवार गळ घालत आहेत. त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू असल्याचे दिसत आहे. परिणामी मतांच्या विभागणीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांचा भाव वधारला आहे.

एका मतदान यंत्रावर १५ उमेदवार आणि एक 'नोटा' अशी १६ उमेदवारांची नावे बसतात. यामुळे उमेदवारांची संख्या १५ पेक्षा अधिक झाल्यास एक यंत्र वाढवावे लागणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रशासनाचे काम वाढणार आहे. निवडणूक प्रशासनाचेही १५ पेक्षा अधिक उमेदवार असलेल्या शिरोळ, चंदगड, राधानगरी, हातकणंगले, इचलकरंजी या मतदारसंघातील उमेदवारांच्या माघारीकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. शेवटच्या क्षणी दबावातून उमेदवारी अर्ज माघार होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनही सतर्क आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात आणि परिसरात जादाचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अर्ज माघारीनंतर तातडीने चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

...

चौकट

मतदान : २१ ऑक्टोबर

मतमोजणी : २४ ऑक्टोबर

...

बंडखोरांच्या घरी गर्दी

बहुतांशी मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. यामुळे पक्षाचे उमेदवार सैरभैर झाले आहेत. यातूनच बंड थंड करण्यासाठी रविवारी दिवसभर बंडखोरांच्या घरी रिघ लागली होती. बंडखोरांचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळींना बरोबर नेऊन माघारीसाठी मनपरिवर्तन केले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडा,खूनप्रकरणी एकजण अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उदगाव (ता. शिरोळ) येथे १८ ऑगस्ट, २०१७ मध्ये निकम कुटुंबावर टाकलेला दरोडा आणि खून प्रकरणातील पसार संशयित मानेसाहेब उर्फ मन्या चरण पवार (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव, जि. सांगली) यास शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून वाठार (ता. हातकणंगले) येथील बसस्थानकात पकडले. गेल्या दोन वर्षांपासून तो पसार होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उदगाव येथे जबरी दरोडा टाकून एका तरुणाचा खून झाला होता. त्यामध्ये मानेसाहेब उर्फ मान्या चरण पवार हा मुख्य संशयित असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तेव्हापासून पवार हा पसार झाला होता. दोन वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यासाठी चार ते पाच पथके तैनात केली होती. एलसीबीचे पोलिस नाईक श्रीकांत पाटील यांना पवार हा वाठार बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे सापळा रचला होता. तो बसस्थानकावर येताच त्याला झडप टाकून ताब्यात घेतले. त्याला जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, विजय गुरखे, विजय कारंडे, किरण गावडे, वैभव पाटील, प्रदीप पोवार, सुजय दावणे यांनी सहभाग घेतला.

घटनेची पार्श्वभूमी

उदगाव (ता. शिरोळ) येथे १८ ऑगस्ट, २०१७ रोजी निकम मळा येथे टेरेसवरील उघड्या दरवाज्यातून प्रवेश करून चोरट्यांनी ७ लाख ५२ हजार ५०० रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. चोरट्यांनी झोपलेल्या अरुणा बाबूराव निकम (वय ५५ रा. मदरसासमोर उदगाव) यांच्यावर हल्ला केला होता. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचे पती बाबुराव नारायण निकम (५५) हे गंभीर जखमी झाले होते. त्याच्या तिजोरीतील सोन्याच्या पाटल्या, बिलवर, कर्णफुले, दोन मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, तीन चेनसह ४७ हजारांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी आकाश नामदेव पवार (२०) मैनेश पवार (३५), शेळक्या पवार (४९), विशाल पवार (२३), योगेश काळे, तलतापडी काळे आणि मानेसाहेब उर्फ मान्या चरण्या पवार याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून पवार हा पसार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेब पाटील यांचा पालमधून आज प्रचार प्रांरभ

$
0
0

बाळासाहेब पाटील यांचा

पालमधून आज प्रचार प्रांरभ

कराड :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ पालीच्या श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या मंदिरातून आज, सोमवारी दुपारी साडेचार वाजता होणार आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विरोधकांच्या बेगडी प्रेमालाजनताच उत्तर देईल’

$
0
0

'विरोधकांच्या बेगडी प्रेमाला

जनताच उत्तर देईल'

कराड :

'विरोधकांनी लोकसभेला जो भावनिक प्रचार केला. तसाच या ही वेळेस होईल. विरोधकांना जनतेचा पोकळ कळवळा आहे. नोकऱ्या दिल्याचे सांगून एकप्रकारे भीती दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या जनतेविषयीच्या बेगडी प्रेमाला जनताच २१ तारखेला उत्तर देईल,' असे प्रतिपादन आमदार चव्हाण यांनी केले.

विंग (ता. कराड) येथील श्री मारुती मंदिरात काँग्रेस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील व विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारास शनिवारी सायंकाळी प्रारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. या वेळी ते श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

...............

अतुल भोसलेंचा उंडाळेत प्रचार

कराड :

महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी रविवारी उंडाळे परिसरात प्रचार केला. गेल्या पाच वर्षांत केंद्रामध्ये व राज्यांमध्ये भाजप सरकारच्या माध्यमातून विविध विकास योजना मतदारसंघात राबविल्या जात आहेत. विकासकाम हेच राजकारण, असे सूत्र बाळगून मी कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भोसले यांनी या वेळी केले. उंडाळे भागातील शिंदेवाडी, घारेवाडी, पोतले, किरपे आणि धोंडेवाडी या परिसरात प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने भोसले यांनी रविवारी मतदारांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images