Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोठावळे सरपंचपदी

0
0

कोल्हापूर

गजापूर, विशाळगड (ता. शाहूवाडी) ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उज्ज्वला कोठावळे यांची बिनविरोध निवड झाली. विद्यमान सरपंच शाहीन मुजावर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर त्यांची निवड झाली. यावेळी बशीर मुजावर, मुस्ताक मुल्ला, योगेश केरकर, विजय कोठावळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साठी उलटलेल्या शारदा यांना सीपीआरने दिली उमेद

0
0

sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : साठी उलटलेल्या शारदा महेकर यांना कुटुंबाने वाऱ्यावर सोडले. नवऱ्याला दारूचे व्यसन आणि पोटच्या मुलीच्या अकाली निधनाने त्यांना जबर मानसिक धक्का बसला. मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी पाच वर्षे घराबाहेर काढली. कित्येक दिवस अंघोळ नाही, वाढलेले केस, अंगावर जखमा अशा अवस्थेतील महेकर यांचा सीपीआरमधील मानसोपचार विभागातील कर्मचाऱ्यांनी कुटुंबासारखा सांभाळ करत उपचार केले. बऱ्या झालेल्या महेकर यांची कुटुंबीयांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने त्यांचे सावली केअर सेंटरमध्ये पुनवर्सन केले जात आहे.

एका अज्ञात व्यक्तीने महेकर यांना १८ सप्टेंबरला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक औषधोपचारानंतर त्यांना मानसिक उपचारांसाठी मानसोपचार विभागात पाठवण्यात आले. त्यांना धड चालताही येत नव्हते. विभागातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी अंघोळ घालण्यापासून, केसांच्या जटा कापण्यापर्यंत सर्व कामे पार पाडली. सुरुवातीला त्यांना काहीच आठवत नव्हते. उपचारात प्रगती होत असताना त्यांनी यल्लमा मंदिराजवळ घर असल्याचे सांगितले. पोलिसात घटनेची नोंद करून सायबर कॉलेजच्या समाजसेवा विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना शोधण्याचा प्रयत्न केला. बहिणीचा पत्ता मिळाल्यानंतर तिने शारदा यांचे पती व सासू हयात असून टेंबलाईवाडीत रहात असल्याची माहिती दिली. पोलिसांकडून पत्रव्यवहार करूनही कुटुंबीयांनी तिची जबाबदारी घ्यायला प्रतिसाद दिला नाही.

सध्या त्या मानसिक आजारातून पूर्णतः बऱ्या झाल्या आहेत. मात्र, कुटुंबीयांनी स्वीकारायला नकार दिल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर आला. सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे यांनी पुढाकार घेत महेकर यांची जबाबदारी स्वीकारली.

महेकर यांच्या उपचारात डॉ. विशाल पाटील, स्नेहा गोरे, दस्तगिर जमादार, शीतल हारुगडे, समुपदेशक महेश्वरी पुजारी, सुदर्शन गांगुर्डे, राम शेंदारकर, मनीषा शेंदारकर, अमोल देसाई, विजय कोळी यांनी महत्वाची भूमिका बजावली. मानसिक आजारातून बरे झालेल्या महेकर यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते. तर कमी कालावधीत कर्मचाऱ्यांना त्यांचा लळा लागल्याने निरोपाच्या प्रसंगी मानसोपचार विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना गहिवरून आले.

ज्येष्ठांच्या पुनर्वसनाची समस्या

घरची गरीब परिस्थिती. नवऱ्याला दारूचे व्यसन. अशा स्थितीत अनेक ज्येष्ठ स्त्रिया बेघर होतात. साधारणतः पन्नासहून अधिक वय असलेल्या महिलांची संख्या अधिक असते. कुटुंबापासून दुरावलेल्या महिलांना बसस्टॉप, मंदिरे अशा मिळेल त्या जागेवर राहावे लागते. भीक मागून गुजराण करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो. औषधोपचाराचा अभाव असल्याने त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनते. अन् बेवारस म्हणून मरण त्यांच्या वाट्याला येते. मागे कोणीच कुटुंबिय नसलेले किंवा जबाबदारी झटकलेले कितीतरी पेशंट सीपीआरमध्ये उपचारासाठी येतात. नातेवाईक हॉस्पिटलमध्ये सोडून जातात. परत चौकशीसाठी फिरकत नाहीत. कुणाचाही आधार नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या पुनर्वसनाची समस्या आहे.

कुटुंबीयांनी जबाबदारी झटकलेल्या ज्येष्ठ नागरिकांना जबर मानसिक धक्का बसतो. त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यांचे मानसिक संतुलन कायमचे बिघडण्याची शक्यता असते. सध्या औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या पुनवर्सनाची मोठी समस्या आहे.

- डॉ. पवन खोत, मानसोपचार विभागप्रमुख, सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायाभूत सुविधांसाठीचा त्रास थांबवा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, एका तासात कर्जाची उपलब्धता अशा अनेक योजना जाहीर होतात. प्रत्यक्षात मात्र उद्योजकांना सरकारी यंत्रणांचे अनुभव उलटेच येतात. परवाने मिळवण्याची यंत्रणा ऑनलाइन केली तरी, अधिकारी, कर्मचारी त्रास देतात. अत्यावश्यक पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी औद्योगिक संघटनांना झगडावे लागते. उद्योजक रोजगारनिर्मिती करून सरकारला कराच्या रुपाने मोठी रक्कम देतात. याउलट सरकार उद्योजकांना काय देते? राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवावेत,' अशी अपेक्षा उद्योगांमधील प्रतिनिधींनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा जाहीरनाम्यात' व्यक्त केली.

वीजबिलात दुजाभाव का?

एकाच राज्यातील उद्योगांसाठी विजेच्या दरात सरकारने तफावत ठेवली आहे. हा दुजाभाव उद्योगांसाठी घातक आहे. विदर्भ, मराठवाड्यात सवलती देऊन पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांवर अतिरिक्त भार टाकणे चुकीचे आहे. येणाऱ्या सरकारने राज्यात सर्वत्र सारखेच विजेचे दर ठेवावेत. गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आम्हाला वीद दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात यातील काहीच घडले नाही. राजकीय पक्षांसह सरकारने दिलेल्या आश्वासनांची जाणीव ठेवावी.

- गजानन कडूकर, डायरेक्टर, अल्टेक अलॉईज प्रा. लि.

जाहीरनाम्याची पूर्तता करावी

प्रत्येक निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष जाहीरनामा सादर करतात, पण निवडून आल्यानंतर पहिले चार वर्ष याकडे त्यांचे सोयिस्कर दुर्लक्ष होते. आर्थिक मंदीमुळे उद्योगांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. जीएसटीची यंत्रणा अद्याप सुरळीत नाही. उद्योजकांना एक दिवस विलंब झाल्यास दंडाची आकारणी केली जाते. जीएसटी विभागाचे पोर्टल बंद का राहते, याचे उत्तर मिळत नाही. जीएसटी भरण्यासाठी आम्हाला दुप्पट पैसे खर्च करावे लागत आहेत. राजकीय पक्षांनी याकडे लक्ष देऊन सरकारी यंत्रणा सुलभ कराव्यात.

- दीपक पाटील, उद्योजक, सर्वोत्तम उर्जा प्रा. लि.

वस्त्रोद्योगाला मदतीची गरज

राज्यातील वस्त्रोद्योग कठीण परिस्थितीत आहे. निर्यातीसाठी अनेक देशांशी स्पर्धा करावी लागते. सरकारकडून मदत मिळत नसल्याने वस्त्रोद्योग डबघाईला आला आहे. देशातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निर्यात वाढवणे गरजेचे आहे. वस्त्रोद्योगात निर्यातीची संधी आहे. यासाठी सरकारने वस्त्रोद्योगास प्राधान्य द्यावे. कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, राजकीय हस्तक्षेप रोखणे, उद्योगांच्या वाढीसाठी पूरक वातावरण तयार करणे ही सरकारची जबाबदारी आहे.

- लिंगम श्रीणू, युनिट प्रमुख, इंडो काउंट

सरकारी यंत्रणांमध्ये पारदर्शकता आवश्यक

परवाने घेणे, निर्यात करणे यासह अनेक कामांसाठी सरकारी कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागतात. सरकारने ऑनलाइन कामकाज सुरू केले असले तरी, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांने इच्छाशक्ती दाखवल्याशिवाय काम पुढे सरकत नाही. क्षुल्लक त्रुटी काढून फाइल्स प्रलंबित ठेवण्याचा प्रमाण जास्त आहे. उद्योगांशी संबंधित एकाही कार्यालयात वेळेत काम होत नाही. सरकारी योजनांची माहिती वेळेत उद्योजकांपर्यंत पोहोचवली जात नाही. यामुळे अनेक योजनांचा लाभच मिळत नाही.

- सोमनाथ महानवर, एचआर मॅनेजर, मेनन अल्कॉप

बँका, सरकारी यंत्रणांमध्ये परिवर्तन व्हावे

बँका नागरिकांच्या सोयीसाठी आहेत, की त्रास देण्यासाठी आहेत असा प्रश्न पडतो. उद्योजकांना वेळेत कर्जपुरवठा करीत नाहीत. आमच्याच खात्यांची माहिती मागणीप्रमाणे दिली जात नाही. सरकारच्या अनेक योजनांची योग्य अंमलबजावणी होत नाही. नोकरशाहीकडून उद्योजकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. वरकमाई झाल्याशिवाय प्रस्ताव पुढे सरकत नाहीत, असा माझा अनुभव आहे. उद्योग भवनमध्ये दिलेले प्रस्ताव वर्षानुवर्षे धूळ खात पडतात. गतीमानता आणि पारदर्शकता ही अत्यावश्यक आहे.

- लता जैन, प्रमुख, डिव्हाईन बाम्बू

मूलभूत सुविधांना हवे प्राधान्य

औद्योगिक वसाहतींमधील अंतर्गत रस्ते, ड्रेनेजची कामे होत नाहीत. यामुळे दुर्गंधी पसरते. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये सरकारकडे भरले जातात. यापैकी दहा टक्के रकमेचाही लाभ आमच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायती कंपन्यांकडून नियमित करवसुली करतात. या बदल्यात आवश्यक सुविधा मिळत नाहीत. कचरा उठावही होत नाही. मूलभूत प्रश्नांसाठीही अनेकदा उद्योजकांना आंदोलन करावे लागते हे दुर्दैवी आहे.

- शंतनू गायकवाड, सचिव, मॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांकडून मतदान संकल्पपत्र

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विद्यार्थीच आता पालकांना मतदान हक्काची आणि जबाबदारीची जाणीव करुन देणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत पालकांकडून संकल्पपत्र भरुन घेण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेजना संकल्पपत्र भरुन घेण्याविषयी कळविले आहे.

इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा उपक्रम होणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या चार लाख आठ हजार ९७१ आहे. संकल्पपत्रामध्ये मतदाराचे नाव, मतदान केंद्र क्रमांक व विधानसभा क्रमांकांचा उल्लेख असणार आहे. 'भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करीन. देशहितासाठी सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करीन. मी अशीही शपथ घेतो की, कोणत्याही भितीपोटी, लालसेपोटी मतदान करणार नाही. तसेच धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी पार पाडीन' असा मजकूर संकल्पपत्रात आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यामार्फत संकल्पपत्र भरुन घेण्याविषयी कळविले आहे. शाळांनी उपशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चार ऑक्टोबरपर्यंत माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर कराव्यात असेही त्यांनी शाळांना सूचना केली आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थी

पाचवी ३९१०६

सहावी ४१४२४

सातवी ४२३७२

आठवी ५८६५६

नववी ६०८७६

दहावी ५९४६६

अकरावी ५४९६१

बारावी ५२११०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक साहित्याने बाजारपेठ फुलली

0
0

कोलहापूर टाइम्स टीम

शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (ता. २९) सुरुवात होणार आहे. यानिमित्त धार्मिक साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. उदबत्ती, धूप, कापूर, विड्याची पाने, सुपारी आणि गुलाब, मोगरा, शेवंती फुलांच्या सुंगध बाजारपेठेत दरवळू लागला आहे. नवीन वस्र, ताम्हण, दिव्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागली आहे. छोट्या व्यवसायिकांनी करवीरनिवासनी अंबाबाई मंदिर परिसरासह गंगावेश परिसरात स्टॉल मांडले आहेत. पूजेसाठी लागणारा साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

अश्विन प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नंतर दहा दिवस घरोघरी देवीची पूजा-अर्चा केली जाते. मातीवर ताह्मणमध्ये घटाची स्थापना केली जाते. दररोज सकाळी-संध्याकाळी देवीची आरती करण्यात येते. नवीन वस्र आणि विड्याच्या पानांवर देवांची प्रतिष्ठापना केली जाते. सलग नऊ दिवस घरामध्ये उदबत्ती, धूप यांचा सुंगध दरवळत असतो. नित्यनियमाने होणाऱ्या पुजेसाठी फुलांची खरेदी केली जाते. घटासाठी लागणारे सुगड, नवीन वस्त्र, ताम्हण खरेदी करण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. विड्याची पाने खरेदी करण्यासाठी पापाची तिकटी, पान लाइन परिसरातही गर्दी होऊ लागली आहे. समईसह नवीन दिवा खरेदी करताना भाविक दिसत आहेत.

अनेकांच्या घरोघरी तुळजाभवानी, अंबाबाई देवीची प्रतिष्ठापना केली जाते. विविध रुपात पूजा बांधली जाते. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी कापड दुकानात गर्दी होत आहे. रांगोळी, उदबत्ती, धूप, कापूर, सुगड आदी धार्मिक साहित्य विक्रीचे स्टॉल महाद्वार रोड, ताराबाई रोड, गंगावेश, लक्ष्मीपुरी आदी ठिकाणी मांडण्यात आले आहेत. सायंकाळी भाविक या परिसरात धार्मिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर टिकविण्यासाठी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’

0
0

पर्यावरणपूरक कोल्हापूरसाठी लोकचळवळ

'फ्रायडे फॉर फ्यूचर' मोहिमेतून एकवटले पर्यावरणप्रेमी नागरिक

पर्यावरणप्रेमींसह शाळा, कॉलेजांतून वाढला उपक्रमांना प्रतिसाद

Mahesh.patil@timesgroup.com

Tweet@:MaheshpMT

कोल्हापूर : स्वीडनमधील संसदेसमोर ग्रेटा थनबर्ग या अवघ्या १५ वर्षांच्या मुलीने ऑगस्ट २०१८ पासून सुरू केलेल्या पर्यावरण विषयक जनजागरण मोहिमेला सजग कोल्हापूरकरांकडूनही बळ मिळू लागले आहे. शाळा, कॉलेजांसह विविध संस्था, संघटनांपर्यंत जाऊन पर्यावरण रक्षणासाठीची जनजागृती करण्यात येत आहे. मुलांनी सुरू केलेली ही जागतिक लोकचळवळ येथे रुजू लागली आहे.

ग्लोबल वार्मिंग अर्थात पर्यावरण बदल यातूनच जगभरात दर आठवड्याला एक मोठ्या संकटांची मालिका सुरू झाली हे सिद्ध झाले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी मानवाच्या हातात फक्त पाच वर्षे आहेत असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग या १५ वर्षाच्या मुलीने पर्यावरण विषयक जनजागरण मोहीम सुरू केली. गेल्यावर्षी ऑगस्ट २०१८ मध्ये ती सलग ३ आठवडे एकटीच स्वीडन संसदेसमोर जाऊन बसत होती. पर्यावरण समस्येवर ठोस काहीच उपाय केले जात नाहीत यामुळे अस्वस्थ झालेल्या ग्रेटाने खासदारांना निवेदने दिली. नंतर दर शुक्रवारी तिने शाळाबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात केवळ ११ महिन्यांत १३१ देशांतील २० लाखांहून अधिक मुले सहभागी झाली.

ऑर्गनिक फार्मिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील नितीन डोईफोडे यांनी एप्रिल २०१९ मध्ये ग्रेटाच्या प्रयत्नांची माहिती वाचल्यानंतर तेही अस्वस्थ झाले. मानवी विकासाचा वेग अधिक असला तरी नजरेआड घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्याबद्दल जनजागृती मोहीम सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. फ्रायडे फॉर फ्यूचर - कोल्हापूर (FFF) व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे त्यांनी पर्यावरणासाठी सजग असलेल्या व्यक्ती जोडल्या. सर्वांच्या सहकार्याने पर्यावरणाची नेमकी हानी कशा पद्धतीने होत आहे, त्यासाठी काय केले पाहिजे? उपाययोजना काय आहेत यांची माहिती देणारी पोस्टर्स, छोटे माहितीपर लेख त्यांनी तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरूवात केली. यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक पेज असा सोशल मीडिया उपयुक्त ठरला. व्हॉट्सॅपवरील दोन ग्रुपनंतर प्रत्यक्ष उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी त्यांनी ९० जणांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. शहर-जिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन त्यांनी जनजागृती केली. पर्यावरणाबदल्लच्या समस्या आणि उपाय याबाबत ऑडिओ-व्हिज्युअल माहिती शाळा, कॉलेज, कंपन्या, सोसायट्यांसह सर्व संस्थांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी आयोजित मानवी साखळीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक शाळकरी मुले, पालकांनी यात सहभागी होत पर्यावरणपूरक जीवनाबाबतची माहिती देणारी पोस्टर्स बनवली. माहितीपत्रके आणि अन्य गोष्टींच्या माध्यमातून ते याच्याशी जोडले जात आहेत. आता माणूस वाचविण्यासाठी पर्यावरण वाचविणे आवश्यक असल्याचा संदेश सर्वत्र दिला जात आहे.

आपण सर्वजण एकत्र आलो, काही उपाययोजना केल्या तरच पर्यावरण टिकवता येईल. या मोहिमेमध्ये प्रत्येकजण उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. लोक एकत्र आले की मोठा बदल घडून येईल. कोल्हापुरात 'पर्यावरण बदल' हा विषय सर्वांना समजावून सांगून, जनजागरण करणे, प्रत्येक नागरिकाचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची लोकचळवळ उभी करणे, पर्यावरणपूरक विकास, पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मूलभूत सिस्टीम बदलाचा आग्रह धरणे हे ध्येय ठेवण्यात आले आहे.

- नितीन डोईफोडे, फ्रायडे फॉर फ्यूचर-कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा गाइड

0
0

\Bउमेदवारी अर्ज भरण्यासाठी ...\B

चौदाव्या विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया गतिमान झाली आहे. २१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आज, शुक्रवारपासून जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येत आहेत. जिल्हा निवडणूक प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जासोबत लागणारी कागदपत्रे, अर्ज दाखल करताना घ्यावयाची काळजी यावर टाकलेला प्रकाशझोत ...

...

उमेदवारी अर्जासोबतची कागदपत्रे आणि भरावी लागणारी प्रमुख माहिती

- विहीत नमुन्यातील उमेदवारी अर्ज

- उमेदवारांचे स्टॅम्प साईज ५ फोटो

- नामनिर्देशनपत्राची मूळ प्रत व झेरॉक्स तीन प्रती

- नमुना २६ मधील परिपूर्ण भरलेले शंभर रूपयांच्या मुद्राकांवरील प्रतिज्ञापत्र

- अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवार असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याचा जातीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत व साक्षांकित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.

- दुसऱ्या मतदारसंघातील उमेदवार असल्यास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा दाखला

- पक्षाकडून उमेदवारी असल्यास एबी फॉर्म

- आरक्षित प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला

- मालमत्ता विवरणपत्र

- शिक्षा, गुन्ह्यासंबंधीची माहिती

- उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती

- शैक्षिणक पात्रता, कुटुंबांतील सदस्यांची माहिती

- बँकेतील देय रक्कम, स्थावर आणि जंगम मालमत्ता

- विद्यमान आमदार, खासदार असल्यास सरकारी देणे देय नसल्याचा दाखला

- खुल्या गटातील उमेदवारासाठी दहा हजार डिपॉझिट

- अनुसूचित जाती, जमातीसाठी पाच हजार डिपॉझिट

...........

मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचे कार्यालय

कोल्हापूर उत्तर : छत्रपती शिवाजी सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय

दक्षिण : प्रांताधिकारी कार्यालय, करवीर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर

करवीर : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा

चंदगड : तहसील कार्यालय

राधानगरी : तहसील कार्यालय

कागल : तहसील कार्यालय

शाहूवाडी : तहसील कार्यालय

हातकणंगले : नवीन प्रशासकीय कार्यालय क्रमांक दोन

इचलकरंजी : प्रांताधिकारी कार्यालय

शिरोळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

.................

..................

...................

मतदानादिवशी पुराव्यासाठी कागदपत्रे

मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, बँक पासबुक, नोकरीतील फोटोसह ओळखपत्र, पॅन कार्ड, रोजगार हमी योजनेतील जॉब कार्ड, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, आधार कार्ड, फोटोसहीत असलेले पेन्शन कागदपत्रे. (यापैकी एक)

...

कार्यरत पथके

सेक्टर ऑफिसर :४१६, सहाय्यक खर्च निरीक्षक : १०, भरारी पथक : ४६, सीव्हीजीलवरील तक्रारींवर कारवाई करण्यासाठी पथके : ५०

...

मद्य विक्रीची

कोठे तक्रार कराल ?

येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे निवडणूक कालावधीत बेकायदेशीर दारू विक्रीच्या विरोधात माहिती देण्यासाठी दोन मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. १८००८३३३३३३ हा टोल फ्री तर ८४२२००११३३ हा वॉटसअॅप क्रमांक आहे.

...

सीव्हीजीलवर ऑनलाईन तक्रार

आचारसंहिताभंगाची ऑनलाईन तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हीजील अॅप कार्यान्वित केले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करता येते. यावर आलेल्या तक्रारीची १०० मिनिटांत दखल घेण्यात येत आहे. यावर वॉच ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय कक्ष जिल्हाधिकारी कक्षात सुरू केले आहे.

...

३ हजारांवर केंद्रे

मतदानासाठी जिल्ह्यात ३ हजार ३४२ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर १ मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ सहायक असेल. यासाठी एकूण २० हजार ६५ कर्मचारी लागणार आहेत. मात्र प्रत्यक्षात काम करणारे आणि राखीव असे एकूण २६ हजार ९८२ कर्मचारी उपलब्ध करण्यात येणार आहे.

...

२८, २९ रोजी प्रशिक्षण

मतदानादिवशी नियुक्त कर्मचाऱ्यांना २८, २९ सप्टेंबरला तालुक्याच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशिक्षण देतील. मतदार जागृतीची मोहीम राबवली जात आहे. सर्व केंद्रांवर बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट युनिट घेऊन जात मतदान प्रात्यक्षिकही दाखवले जात आहे.

...

निवडणूक प्रक्रिया अशी :

अधिसूचना प्रसिध्द : २७ सप्टेंबर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ४ ऑक्टोबर, छाननी : ५ ऑक्टोबर, उमेदवारी माघारीची अंतिम तारीख : ७ ऑक्टोबरपर्यंत, मतदान : २१ ऑक्टोबर, मतमोजणी : २४ ऑक्टोबर

...

खर्चाचा तपशील

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी त्यांना देण्यात आलेल्या विहीत नमुन्यातील खर्चाच्या नोंदवहीमध्ये आपला दैनंदिन खर्च नोंदवणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडील खर्च निरीक्षक यांनी विहित केलेल्या ठिकाणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या प्रतिनिधीस खर्चाच्या नोंदवह्या व इतर कागदपत्रे तपासणीस उपलब्ध करुन द्यावयाची आहेत.

...

कोट

'विधानसभा निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासह पाच जणांनाच प्रवेश राहील. शंभर मीटरच्या आत तीनच वाहनांना प्रवेश असेल. प्रत्येक उमेदवारास खर्चाची मर्यादा २८ लाख आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय, शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणधुमाळी आजपासून

0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघासाठी आज, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासह पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. शंभर मीटर परिसरात तीन वाहने आणि पाच व्यक्तींनाच प्रवेश असेल. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखलची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होत आहे. सर्वच राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला आहे.

२१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या एक दिवसआधी निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते काढणे बंधनकारक आहे. अशा स्वतंत्र बँक खात्याचा तपशील नामनिर्देशनपत्र दाखल करताना सादर करावयाचा आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावरील दाखल, प्रलंबित किंवा सिध्द असलेल्या फौजदारी गुन्ह्याचा समावेश केलेला आहे, त्यांनी याबाबतची विहित नमुन्यातील माहिती जास्तीजास्त खपाच्या स्थानिक वृत्तपत्रात तसेच दूरदर्शन वाहिन्यांवर मतदानाच्या दिवसापासून दोन दिवसआधी किमान तीन वेळा स्वत: हून सर्वांच्या माहितीसाठी स्वखर्चाने प्रसिध्द करावयाची आहे. उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्र दररोज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नोटीस बोर्डावर आणि निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावरही प्रसिध्द करण्यात येणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासन जागृती करीत आहे.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्यजित कदमांचा निर्णय युतीनंतर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे ताराराणी आघाडीचे विद्यमान नगरसेवक सत्यजित कदम यांचा उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय युतीच्या घोषणेनंतर होणार आहे. पण तत्पूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तर कार्यकर्त्यांनीही संपर्क मोहीम गतिमान केली आहे. कदम जर मैदानात उतरले तर उत्तरमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे महेश जाधव, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार आणि काँग्रेसचे सत्यजित कदम अशी ही लढत झाली. कदम यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असली, मतांची संख्या उल्लेखनीय होती. जिल्ह्यात आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील सत्तासंघर्षामुळे कदम यांनी काँग्रेस पक्षापासून फारकत घेतली. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निडणुकीमध्ये ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढवत ते विजयी झाले. त्यांच्याकडे आघाडीचे गटनेतेपदही आहे. गेल्या महिन्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कदम कोणत्या पक्षाकडून रिंगणार उतरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

कदम यांचा निर्णय भाजप-सेनेच्या युतीवर अवलंबून राहणार आहे. दोन्ही पक्षाची युती न झाल्यास भाजपकडून कदम यांची दावेदारी मानली जात आहे. मात्र युती झाल्यास कदम कोणती भूमिका घेणार याचे औत्सुक्य असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमकुवत उमेदवारांवर बड्यांची नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वंचित बहुजन आघाडी वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. परंतु उमेदवारीबाबत पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांनी यामध्ये बाजी मारली आहे. मतदारांशी संपर्क साधताना त्यांनी आता मतदारसंघातील ताकदीने छोट्या असलेल्या इच्छुक उमेदवारांना मॅनेज करण्यास सुरुवात केली आहे. मते फिक्स करण्यासाठी संभाव्य उमेदवारांना माघार घ्यायला लावून पाठिंबा मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात तर इच्छुक उमेदवारामध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी पाठशिवणीचा खेळ सुरू झाला आहे. 'दक्षिणे'त काँग्रेस आघाडीचे संभाव्य उमेदवार ऋतुराज पाटील आणि भाजपचे विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये थेट लढतीची चिन्हे आहेत. शिवसेनेकडून सुजित चव्हाण, विराज पाटील, राजू यादव यांची नावे चर्चेत आहेत. तर वंचितकडून दिलीप कावडे यांची उमेदवारी घोषित झाली आहे. कोल्हापूर दक्षिणची जागा जिंकण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा दक्षिणेत 'कमळ' फुलविण्यासाठी भाजप आणि महाडिक कुटुंबीय शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

पाटील व महाडिकांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे एकमेकांच्या खेळीवर लक्ष ठेवले जात आहे. या आठवड्यात एका राष्ट्रीय पक्षाच्या संभाव्य उमेदवाराने अन्य एका पक्षाच्या इच्छुक उमेदवाराच्या घरी भेट दिली. सायंकाळच्या सुमारास ही भेट झाली होती. याची वार्ता प्रतिस्पर्धी उमेदवाराला समजली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या इच्छुक उमेदवाराशी दुसऱ्या बड्या पक्षाच्या उमेदवाराच्या नातेवाईकांनी संपर्क साधला. दरम्यान, राधानगरी, शिरोळ, चंदगड, हातकणंगले मतदारसंघात विविध पक्षांकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. विविध भागात या मंडळीची ताकद आहे. त्या ताकदीचा आपणाला फायदा व्हावा यासाठी प्रबळ उमेदवार सरसावले आहेत. ठराविक भागावर वर्चस्व ठेवून असणाऱ्या अशा मंडळींना भविष्यकाळात ठिकठिकाणी संधी देण्याबाबत शब्द दिला जात आहे.

...

हमखास निवडून कोण येणार ?

चंदगड तालुक्यात सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या साऱ्या मंडळींनी अन्य एका ताकदीच्या उमेदवाराला विरोध केला. पक्षाच्या नेत्यांनी त्या इच्छुक उमेदवारांची एकत्र बैठक घेतली. त्या बैठकीतही साऱ्यांनी विरोधाचा ठेका कायम ठेवला. तेव्हा राज्यातील एका मोठ्या पक्षाच्या वजनदार नेत्यांनी, 'तुमचे म्हणणे ठीक आहे. पण तुमच्यापैकी हमखास निवडून कोण येणार आहे ?'अशी विचारणा केली. तेंव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. अखेर त्या बैठकीत सगळ्या इच्छुकांनी पक्ष सांगेल त्याच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.

...

वजनदार नेता आणि अपक्षांची भूमिका

बड्या उमेदवारांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने फिल्डिंग लावली जात आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये विविध पक्षांकडील मिळून इच्छुकांची संख्या दहाच्या आसपास आहे. शिवसेनेकडून आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव निश्चित मानले जाते. दरम्यान, उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी राज्यातील वजनदार नेत्याची चर्चा आहे. हा वजनदार नेता रिंगणात असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी काही अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. अपक्षांच्या भूमिकेमागे काय राजकारण दडले आहे, यासंबंधी चर्चा सध्या वेगावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर टिकविण्यासाठी 'फ्रायडे फॉर फ्यूचर'

0
0

पर्यावरणपूरक कोल्हापूरसाठी लोकचळवळ 'फ्रायडे फॉर फ्यूचर' मोहिमेतून एकवटले पर्यावरणप्रेमी नागरिक पर्यावरणप्रेमींसह शाळा, कॉलेजांतून वाढला उपक्रमांना प्रतिसाद Mahesh.patil@timesgroup.com Tweet@:MaheshpMT कोल्हापूर : स्वीडनमधील संसदेसमोर ग्रेटा थनबर्ग या अवघ्या १५ वर्षांच्या मुलीने ऑगस्ट २०१८ पासून सुरू केलेल्या पर्यावरण विषयक जनजागरण मोहिमेला सजग कोल्हापूरकरांकडूनही बळ मिळू लागले आहे. शाळा, कॉलेजांसह विविध संस्था, संघटनांपर्यंत जाऊन पर्यावरण रक्षणासाठीची जनजागृती करण्यात येत आहे. मुलांनी सुरू केलेली ही जागतिक लोकचळवळ येथे रुजू लागली आहे. ग्लोबल वार्मिंग अर्थात पर्यावरण बदल यातूनच जगभरात दर आठवड्याला एक मोठ्या संकटांची मालिका सुरू झाली हे सिद्ध झाले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी मानवाच्या हातात फक्त पाच वर्षे आहेत असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग या १५ वर्षाच्या मुलीने पर्यावरण विषयक जनजागरण मोहीम सुरू केली. गेल्यावर्षी ऑगस्ट २०१८ मध्ये ती सलग ३ आठवडे एकटीच स्वीडन संसदेसमोर जाऊन बसत होती. पर्यावरण समस्येवर ठोस काहीच उपाय केले जात नाहीत यामुळे अस्वस्थ झालेल्या ग्रेटाने खासदारांना निवेदने दिली. नंतर दर शुक्रवारी तिने शाळाबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात केवळ ११ महिन्यांत १३१ देशांतील २० लाखांहून अधिक मुले सहभागी झाली. ऑर्गनिक फार्मिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील नितीन डोईफोडे यांनी एप्रिल २०१९ मध्ये ग्रेटाच्या प्रयत्नांची माहिती वाचल्यानंतर तेही अस्वस्थ झाले. मानवी विकासाचा वेग अधिक असला तरी नजरेआड घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्याबद्दल जनजागृती मोहीम सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. फ्रायडे फॉर फ्यूचर - कोल्हापूर (FFF) व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे त्यांनी पर्यावरणासाठी सजग असलेल्या व्यक्ती जोडल्या. सर्वांच्या सहकार्याने पर्यावरणाची नेमकी हानी कशा पद्धतीने होत आहे, त्यासाठी काय केले पाहिजे? उपाययोजना काय आहेत यांची माहिती देणारी पोस्टर्स, छोटे माहितीपर लेख त्यांनी तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरूवात केली. यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक पेज असा सोशल मीडिया उपयुक्त ठरला. व्हॉट्सॅपवरील दोन ग्रुपनंतर प्रत्यक्ष उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी त्यांनी ९० जणांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. शहर-जिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन त्यांनी जनजागृती केली. पर्यावरणाबदल्लच्या समस्या आणि उपाय याबाबत ऑडिओ-व्हिज्युअल माहिती शाळा, कॉलेज, कंपन्या, सोसायट्यांसह सर्व संस्थांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी आयोजित मानवी साखळीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक शाळकरी मुले, पालकांनी यात सहभागी होत पर्यावरणपूरक जीवनाबाबतची माहिती देणारी पोस्टर्स बनवली. माहितीपत्रके आणि अन्य गोष्टींच्या माध्यमातून ते याच्याशी जोडले जात आहेत. आता माणूस वाचविण्यासाठी पर्यावरण वाचविणे आवश्यक असल्याचा संदेश सर्वत्र दिला जात आहे. आपण सर्वजण एकत्र आलो, काही उपाययोजना केल्या तरच पर्यावरण टिकवता येईल. या मोहिमेमध्ये प्रत्येकजण उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. लोक एकत्र आले की मोठा बदल घडून येईल. कोल्हापुरात 'पर्यावरण बदल' हा विषय सर्वांना समजावून सांगून, जनजागरण करणे, प्रत्येक नागरिकाचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची लोकचळवळ उभी करणे, पर्यावरणपूरक विकास, पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मूलभूत सिस्टीम बदलाचा आग्रह धरणे हे ध्येय ठेवण्यात आले आहे. - नितीन डोईफोडे, फ्रायडे फॉर फ्यूचर-कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ पासून ‘सेव्ह माय हार्ट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्याचे ताणतणावाचे जीवन, दैनंदिन जीवनात नागरिकांची होणारी धावपळ यामुळे आरोग्य विषयक तक्रारी वाढत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, अनेक नागरिक हे हृदयविकारांनी त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागृती आणि हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंबंधी महाराष्ट्र टाइम्स आणि माधवबाग क्लिनिक यांच्यातर्फे संयुक्त आरोग्य विषयक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 'सेव्ह माय हार्ट'या संकल्पनेनुसार हा मोफत आरोग्य विषयक उपक्रम होत आहे.

माधवबाग क्लिनिक, धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलसमोर ताराबाई पार्क व माधवबाग क्लिनिक क्रशर चौक सानेगुरुजी वसाहत रोड या दोन ठिकाणी शिबिर होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर २९ सप्टेंबर हा जागतिक हृदयदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी सर्वत्र आरोग्य विषयक उपक्रम, हृदयरोगाविरोधात प्रबोधन आणि हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या अनुषंगाने आरोग्य कार्यक्रम होतात. नागरिकांना आरोग्य विषयक नेमक्या टिप्स मिळाव्यात, त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निरसन व्हावे, यासाठी 'मटा'व 'माधवबाग' यांनी 'सेव्ह माय हार्ट'ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या आरोग्य शिबिरात हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी आणि गरज पडल्यास ईजीसी या सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. याशिवाय रक्तवाहिन्यातील अडथळे, ब्लॉकेजेस, मधूमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व मोफत सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांनी तपासणीसाठी येताना जुने रिपोर्टस व औषधे घेऊन यावेत. शिबिराचा कालावधी हा रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा असा आहे. या मोफत तपासणी शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी शिबिरासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी ताराबाई पार्कातील माधवबाग क्लिनिकच्या ८०५५८४६७७७ व क्रशर चौकातील माधवबाग क्लिनिकच्या ९७३०६०७३९१ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपाससंबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या शिबिरात बॉडी मास इंडेक्सची (बीएमआय) मोफत तपासणी होणार आहे. शिवाय ज्यांची यापूर्वी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास झाली असेल किंवा करायला सांगितले आहे अशा रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज भरण्याचा धडाका एक तारखेपासूनच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा धडाका एक ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सर्वच पक्षाच्या प्रबळ उमेदवारांनी तिकीट आपणालाच मिळणार म्हणून मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. २९ सप्टेंबरला घटस्थापना असून त्या दिवशी विविध पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या आधारे संभाव्य उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी वेगावली आहे. तीन आणि चार ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवित आहेत. दोन्ही काँग्रेसनी आघाडी केली आहे. तर भाजप, शिवसेनेतील युतीची चर्चा कायम आहे. या दोन्ही पक्षांचे नेते एकीकडे युती होईल असे जाहीरपणे सांगत असताना दुसरीकडे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणी करत आहेत. युती व आघाडीमध्ये उमेदवारीचा गुंता सुटू शकलेला नाही. यामुळे निर्णय होण्यास उशीर होत आहे. यामुळे उमेदवारांच्या याद्या लांबणीवर पडल्या आहेत. मात्र काँग्रेस आघाडी आणि भाजप, सेनेतील प्रबळ उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच येत्या दोन दिवसात उमेदवारी जाहीर होईल या शक्यतेने काहींनी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त निश्चित केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश क्षीरसागर यांनी तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी कंबर कसली आहे. एक ऑक्टोबर रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसकडून सध्यस्थितीला करवीरमधून माजी आमदार पी. एन. पाटील आणि कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. पी.एन. एक ऑक्टोबर तर ऋतुराज तीन ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे तीन ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. ते चार तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला सुरुवात करतील.

....

उमेदवार मतदारसंघ अर्ज भरणार

आमदार राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) एक ऑक्टोबर

माजी आमदार पी. एन. पाटील (करवीर) एक ऑक्टोबर

आमदार हसन मुश्रीफ (कागल) तीन ऑक्टोबर

ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण) तीन ऑक्टोबर

उद्योजक चंद्रकांत जाधव (कोल्हापूर उत्तर) चार ऑक्टोबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ हजार ११४ नवमतदारांचे नव्याने अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या पुरवणी मतदार यादीत नाव समावेशसाठी २११४ मतदारांनी निवडणूक प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांची छाननी केली जात आहे. आतापर्यंत १३९ अर्ज अवैध तर १०३२ अर्ज वैध ठरवण्यात आले. आलेल्या अर्जांची ४ ऑक्टोबरपर्यंत छाननी करण्यात येणार आहे. यातील पात्र मतदारांच्या नावाचा समावेश मतदार यादीत करण्यात येणार आहे. यादीतील मतदारांना या विधानसभेसाठी मतदान करता येणार आहे.

ऑगस्टअखेर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर एक महिन्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने आलेले अर्ज निवडणूक प्रशासनाकडे आहेत. १८ वर्षे पूर्ण झालेल्या २११४ नवमतदारांनी यादीत नाव समावेशसाठी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक ५८४ जणांनी दक्षिण तर सर्वात कमी ९१ इचलकरंजी मतदारसंघातून अर्ज आले आहेत. एकूण अर्जातील ९०१ अर्जांची छाननी प्रलंबित आहे. दुबार व इतर मतदारसंघात असलेल्या मतदारांचे नाव वगळण्यासाठी ८९२ अर्ज आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर दक्षिणमधूनच अर्ज आले आहेत. यातील ५८७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. नाव, पत्त्यातील दुरूस्तीसाठी १३९८ मतदारांनी अर्ज केले आहेत. ८५९ जणांच्या नाव, पत्त्यात दुरूस्ती करण्यात आली. इतर मतदारसंघात राहण्यासाठी गेल्याने स्थलांतरासाठीचे १५१ अर्ज आहेत. त्यापैकी ९६ अर्ज मंजूर तर ४३ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यातील पात्र मतदारांना विधानसभेसाठी मतदान करता येणार आहे. २४ सप्टेंबरनंतर केलेल्या अर्जदारास मतदान करता येणार नाही.

...

तालुकानिहाय नवमतदारांचे अर्ज असे : चंदगड : ११०, राधानगरी :१३५, कागल :१५३, कोल्हापूर दक्षिण : ५८४, करवीर :१५२, उत्तर : ४०१, शाहूवाडी :११०, हातकणंगले :१३८, इचलकरंजी : १३८, शिरोळ :२४०.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारी सूनेचा गळा आवळून खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलाने इच्छेविरुद्ध केलेला प्रेमविवाह, हदयविकाराचे ऑपेरशन झालेल्या सुनेवर होत असलेल्या औषधोपचाराचा खर्च आणि मूल होत नसल्याच्या कारणावरून सासू, सासऱ्याने सुनेचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. रिया बादल पाटील (वय ३५, रा. जयभवानी कॉलनी, फुलेवाडी) असे सुनेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित सासरा सरदार रामचंद्र पाटील, सासू सुनीता सरदार पाटील (दोघेही रा. जयभवानी कॉलनी, फुलेवाडी) यांच्यावर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

तपास अधिकारी अरविंद कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया आणि बादल यांचा प्रेमविवाह झाला असून, रियाला हृदयविकाराचा आजार होता. लग्नापूर्वी मुंबई येथील एका रुग्णालयात तिच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मूल होणार नसल्याचे सांगितले होते. त्याची माहिती सासू सुनीता आणि सासरे सरदार यांना कळाली होती. लग्नानंतर रियावर औषधोपचाराचा खर्च पेलवत नसल्याच्या कारणावरून सासू आणि सासऱ्यांनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. बुधवारी सकाळी बादल कामासाठी बाहेर गेला होता. तेव्हा रिया एकटीच घरी असल्याचे पाहून संशयितांनी तिचा झोपलेल्या अवस्थेतच गळा दाबून खून केला. याप्रकरणी रियाचे नातेवाईक चंद्रकांत यशवंत हिंदुळे (वय ३५, रा. क्रांती चौक, कंदलगाव, ता. करवीर) यांनी फिर्याद दाखल केली.

दरम्यान, रिया आजारी असल्याचे कारण सांगून तिला बेशुद्धावस्थेत सासू, सासऱ्यांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्याची माहिती नातेवाइकांना दिली होती. मात्र, पती बादलला संशय आल्याने त्यांनी करवीर पोलिसांत धाव घेतली. रियाच्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संशयितांवर गुन्हा दाखल केला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्यजित कदम यांचानिर्णय युतीनंतर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे ताराराणी आघाडीचे विद्यमान नगरसेवक सत्यजित कदम यांचा उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय युतीच्या घोषणेनंतर होणार आहे. पण तत्पूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तर कार्यकर्त्यांनीही संपर्क मोहीम गतिमान केली आहे. कदम जर मैदानात उतरले तर उत्तरमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे महेश जाधव, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार आणि काँग्रेसचे सत्यजित कदम अशी ही लढत झाली. कदम यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असली, मतांची संख्या उल्लेखनीय होती. जिल्ह्यात आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील सत्तासंघर्षामुळे कदम यांनी काँग्रेस पक्षापासून फारकत घेतली. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निडणुकीमध्ये ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढवत ते विजयी झाले. त्यांच्याकडे आघाडीचे गटनेतेपदही आहे. गेल्या महिन्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कदम कोणत्या पक्षाकडून रिंगणार उतरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. कदम यांचा निर्णय भाजप-सेनेच्या युतीवर अवलंबून राहणार आहे. दोन्ही पक्षाची युती न झाल्यास भाजपकडून कदम यांची दावेदारी मानली जात आहे. मात्र युती झाल्यास कदम कोणती भूमिका घेणार याचे औत्सुक्य असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमकुवत उमेदवारांवर बड्यांची

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर वंचित बहुजन आघाडी वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. परंतु उमेदवारीबाबत पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांनी यामध्ये बाजी मारली आहे. मतदारांशी संपर्क साधताना त्यांनी आता मतदारसंघातील ताकदीने छोट्या असलेल्या इच्छुक उमेदवारांना मॅनेज करण्यास सुरुवात केली आहे. मते फिक्स करण्यासाठी संभाव्य उमेदवारांना माघार घ्यायला लावून पाठिंबा मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात तर इच्छुक उमेदवारामध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी पाठशिवणीचा खेळ सुरू झाला आहे. 'दक्षिणे'त काँग्रेस आघाडीचे संभाव्य उमेदवार ऋतुराज पाटील आणि भाजपचे विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये थेट लढतीची चिन्हे आहेत. शिवसेनेकडून सुजित चव्हाण, विराज पाटील, राजू यादव यांची नावे चर्चेत आहेत. तर वंचितकडून दिलीप कावडे यांची उमेदवारी घोषित झाली आहे. कोल्हापूर दक्षिणची जागा जिंकण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा दक्षिणेत 'कमळ' फुलविण्यासाठी भाजप आणि महाडिक कुटुंबीय शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पाटील व महाडिकांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे एकमेकांच्या खेळीवर लक्ष ठेवले जात आहे. या आठवड्यात एका राष्ट्रीय पक्षाच्या संभाव्य उमेदवाराने अन्य एका पक्षाच्या इच्छुक उमेदवाराच्या घरी भेट दिली. सायंकाळच्या सुमारास ही भेट झाली होती. याची वार्ता प्रतिस्पर्धी उमेदवाराला समजली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या इच्छुक उमेदवाराशी दुसऱ्या बड्या पक्षाच्या उमेदवाराच्या नातेवाईकांनी संपर्क साधला. दरम्यान, राधानगरी, शिरोळ, चंदगड, हातकणंगले मतदारसंघात विविध पक्षांकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. विविध भागात या मंडळीची ताकद आहे. त्या ताकदीचा आपणाला फायदा व्हावा यासाठी प्रबळ उमेदवार सरसावले आहेत. ठराविक भागावर वर्चस्व ठेवून असणाऱ्या अशा मंडळींना भविष्यकाळात ठिकठिकाणी संधी देण्याबाबत शब्द दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक थेंब शाईचा...

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात मतदान मोठ्या संख्येने होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून 'आपले बोट... आपला आवाज ! एक थेंब शाईचा... कर्तव्य आणि अभिमानाचा' हा आणि 'मी तर नाही मतदान करु शकत पण तुम्ही करा, माझ्या भविष्यासाठी...' असे बोलके फलक झळकत आहेत. जिल्हा माहिती प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असे फलक लावण्यात आले आहेत.

जागृतीसाठी शाहूवाडी विधानसभा मतदार संघात शाहू हायस्कूल (शाहूवाडी) येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. मलकापुरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सरूड विद्यामंदीर केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली. दरम्यान, जागृतीसंबंधी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, दहा मतदार संघासाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. एकूण जिल्ह्यात १५ लाख, ६ हजार, ३०८ महिला, १५ लाख, ८४ हजार, २७१ पुरुष आणि ८१ तृतीयपंथी असे एकूण ३० लाख, ९० हजार, ६६० मतदार आहेत.

२४ सप्टेंबरपर्यंत ज्यांनी नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत, अशा पात्र मतदारास या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. मतदानाचा पवित्र हक्क संविधानाने दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. राज्यात मतदानाचा जिल्ह्याचा नावलौकिक कायम ठेवावा.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांचा दावा फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या गाळेधारकांना केलेली भाडेवाढ बेकायदेशीर असल्याने त्याविरोधात गाळेधारकांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. बुधवारी याबाबतचा निर्णय देताना भाडेवाढीचा निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचे नमूद करत गाळेधारकांचा दावा दिवाणी न्यायाधीश ए. एस. गरड यांनी फेटाळून लावला. या निर्णयामुळे रेडिरेकननुसार गाळेधारकांना भाडे द्यावे लागणार आहे. तसेच गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्न निकालात निघाल्याने महापालिकेला रेडिरेकनरनुसार भाडे आकारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात महापालिकेचे छत्रपती शिवाजी मार्केट, शाहू क्लॉथ मार्केट, कपिलतीर्थ मार्केट, ताराराणी मार्केटसह ३८ ठिकाणच्या मार्केटमधील विविध सुमारे २,५०० गाळे आहेत. त्यापैकी सुमारे १,७०० गाळेधारकांच्या भाडे कराराची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतरही पूर्वीच्या भाड्याप्रमाणे भोगवटा करीत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने कायद्यातील तरतुदीनुसार सुधारित भाडे आकारून गाळ्यांना मुदतवाढीबाबत प्रस्ताव ठेवला होता. सुधारित भाडे आकारणीसाठी ऑगस्ट २०१५ मध्ये ठराव सरकारकडे पाठवला होता. सरकारने ठराव विखंडीत करून भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता.

सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाने गाळ्यांची चालू रेडिरेकनर दराप्रमाणे भाडे आकारणी व मुदतवाढीच्या अनुषंगाने कागदपत्राची पूर्तता करण्याची सूचना गाळेधारकांना केली होती. याविरोधात काही गाळेधारकांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर न्यायालयात दावा दाखल केला होता. दाव्यामध्ये महापालिकेला बेकायदेशीर भाडेवाढ करता येणार नसल्याचे नमूद केले होते. त्यानुसार गाळेधारक व महापालिकेने बाजू मांडली. न्यायाधीश गरड यांनी दावा नामंजूर केला. महापालिकेच्यावतीने अॅड. प्रफुल्ल राऊत व अॅड. मुकुंद पवार यांनी काम पाहिले. 'कोर्टाच्या निर्णयामुळे थकीत गाळेधारकांवर कारवाई करण्याचा मार्ग महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार मोकळा झाला आहे. त्यानुसार मुदत संपलेल्या गाळेधारकांनी रेडिरेकनरप्रमाणे भाडे भरुन सहकार्य करावे,' असे आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार

0
0

संभाव्य उमेदवार

कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील

करवीर : पी. एन. पाटील

कागल: हसन मुश्रीफ

राधानगरी : के. पी. पाटील, ए. वाय. पाटील

कोल्हापूर उत्तर: दौलत देसाई, सागर चव्हाण

चंदगड : राजेश पाटील, एम. जे. पाटील

शिरोळ: राजेंद्र पाटील यड्रावकर

हातकणंगले: राजू आवळे

इचलकरंजी : राहुल खंजिरे,शशांक बावचकर,अमृत भोसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images