Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उत्सवासाठी गांधीनगर व्यापरपेठ सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

गांधीनगर बाजारपेठ नवरात्र उत्सव व दीपावलीसाठी सज्ज झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राची सर्वात मोठी कपड्यांची व्यापरपेठ अशी ओळख या बाजारपेठेने टिकवून ठेवली आहे. या बाजारातून होलसेल कपडे, इलेक्ट्रॉनिक, शोभेच्या वस्तू, फर्निचर तसेच कार्तिक दिवे, घरगुती सामानाची मोठ्या प्रमाणावर होलसेल तसेच रिटेल विक्री केली जाते. नवरात्रोत्सव आणि आगामी दिपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

कोल्हापूरमधील पूर परिस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग तब्बल अकरा दिवस बंद होता. त्यानंतरच्या महिनाभरात सर्वत्र बंदसदृश परिस्थिती होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने स्थिती पूर्वपदावर आली आहे. व्यापाऱ्यांनी पुराच्या काळात आणि नंतर दुकाने बंद राहिल्याने झालेले नुकसान नुकसान भरून काढण्यासाठी विविध आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. ग्राहकांनाही येणाऱ्या सणाचा आनंद घेता येईल यासाठी उपलब्ध स्टॉकवर भरपूर डिस्काउंट दिले जात असल्याचे फलक आतापासूनच झळकू लागले आहेत.

गांधीनगरातील छत्रपती शिवाजी मार्केट, गुरुनानक मार्केट, सिंधू मार्केट, गजानन मार्केट, स्वस्तिक मार्केट व लोहिया मार्केटमध्ये ग्राहकांची दिवसागणिक वर्दळ वाढत आहे. येथे गणेशोत्सवाआधी व्यापारातील उलाढालीला सुरुवात होते. डिसेंबर महिन्यापर्यंत ही बाजारपेठ खेळती राहते. यांदरम्यान होलसेल विक्रेते उत्सव व यात्रांच्या स्वरुपात कपड्यांची विक्री करतात. त्यामध्ये किरकोळ विक्रेत्यांना ठोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते. आतासुद्धा काही ठिकाणी असे उत्सव सुरू असून पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक, गोवा, कोकण येथील व्यापारी लोक त्यामध्ये सहभागी होत आहेत. किरकोळ विक्रेत्यांनी दुकानाबाहेर रंगीबेरंगी वस्त्रप्रावरणे लावून ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

निवडणुकीमुळे अपेक्षा

दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणूक होत असल्याने ग्राहकांकडे पैसे उपलब्ध असतील. त्यामुळे ग्राहकांची दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होणार असल्याची चर्चा बाजारपेठेत आहे. दीड महिन्यात पूरपरिस्थितीने झालेले नुकसान विसरून सर्वच व्यापारी वर्गाने दसरा व दिवाळी सणांसाठी होणाऱ्या मालाच्या विक्रीसाठी तयारी केली आहे.

महापुरामुळे तब्बल महिनाभर दुकान बंद राहिले. त्याकाळात उलाढाल झाली नाही. आता ग्राहकांना खरेदीसाठी जास्तीत जास्त डिस्काउंट देण्यात येत आहे. कपड्यांत नवीन व्हरायटी आणली आहे. लहान मुलांसाठी जीन्स, सिक्स पॉकेट, जॉगर्स, टी शर्ट, जॅकेट असे खूप नवीन पद्धतीचे फॅशनेबल कपडे आणले आहेत.

- लक्ष्मी धामेजा, वृंदावन कलेक्शन, गांधीनगर

नवरात्रोत्सवाची तयारी म्हणून माल खूप मोठ्या प्रमाणावर आणला आहे. यावेळी उलाढाल होईल अशी मोठी अपेक्षा आहे. सुरत, महू, बनारस, बेंगलोर, कलकत्ता, नागपूर आदी ठिकाणाहून कांजीवरम पैठणी, बेंगलोर सिल्क, झुला साडी, पेशवाई, वर्क, ब्रोकेड सिल्क, जरदोशी त्याचबरोबर सुटिंग, शर्टिंगमधील व्हरायटी उपलब्ध झाली आहे.

- रमेश वाछानी, रमेश साडी सेंटर, होलसेल रिटेल

फोटो ओळ

गांधीनगर व्यापारपेठेत सणाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील जिल्ह्यातील ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

फोटो : राहूल मगदूम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कडकनाथ कोंबडी प्रकरणी शेवाळेला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी गणेश शेवाळे (रा. बहे, ता. वाळवा) याला मंगळवारी रात्री इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात शेवाळेवर आधीच गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, मिरजेचे उपविभागीय अधिकारी संदीप गिल यांच्याकडे तपासाची सूत्रे आहेत. प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते अद्याप फरार आहे.

कडकनाथ कोंबडी व्यवसायात गुंतवणूक केलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो शेतकऱ्यांची महारयत अ‍ॅग्रो कंपनीने फसवणूक केली आहे. या प्रकरणी संस्थापक सुधीर मोहिते, संचालक संदीप मोहिते, गणेश शेवाळे, विनय शेंडे आणि हणमंत जगदाळे यांच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप मोहिते आणि हणमंत जगदाळे या दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. उर्वरित तिघे फरार होते. मंगळवारी रात्री शेवाळेला अटक करण्यात आली.

.. .. .. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीबी रूग्णांना औषधोपचार द्यावेत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी नियमानुसार टीबी रुग्णांना औषधोपचार द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

जिल्हास्तरीय टीबी फोरमच्या बैठकीत ते बोलत होते.

'खासगी डॉक्टरांनी टीबीवरील औषधे मोफत घेण्यास प्रोत्साहित करावे. औषधे मध्येच बंद करू नयेत, अशा सूचना द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी फोरमची सहा महिन्यांतून एकदा बैठक घेणे अपेक्षीत आहे, असे सांगितले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी फोरमच्या कामकाजाची माहिती दिली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार टीबीच्या उपचारासंबंधी सविस्तर माहिती दिली. कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अनिता सैबन्नावर, सुहास कोरे, विनायक भोई आदी उपस्थित होते.

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाद्वार चौकात पुन्हा वादावादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाद्वार चौक मोकळा ठेवण्याच्या अटीवर ताराबाई रोडवर पट्ट्याच्या आत फेरीवाल्यांना बसण्यास परवानगी देताना दिवळीपर्यंत अतिक्रमण मोहीम स्थगित ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झाला. निर्णय होऊन १२ तास होण्याच्या आतच काही फेरीवाल्यांनी चौकात स्टॉल मांडले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने साहित्य जप्त केल्यानंतर फेरीवाल्यांसह फेरीवाला नेते प्र. द. गणपुले यांनी सुमारे तासभर ठिय्या मारला. पोलिस निरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी आचारसंहितेचे कारण देत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महाद्वार चौकापासून तीनही बाजुला शंभर फूट अंतर सोडून फेरीवाल्यांना बसण्याची परवानगी मंगळवारी दिली. समन्वयाने निघालेल्या तोडगा बासनात गुंडाळत आवळा, चिंच व रांगोळी फेरीवाल्यांनी चौकात स्टॉल मांडले. याबाबतची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला मिळाल्यानंतर कारवाईला सुरुवात केली. चौकातील फेरीवाले ऐकत नसल्याने पथकांने मंगळ‌ारी दिलेल्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ताराबाई रोडवर तणाव निर्माण झाला. कारवाई सुरू असताना गणफुले यांनी काही फेरीवाल्यांसह रस्त्यावर ठिय्या मारला. काहीवेळात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतरही आंदोलन सुरू राहिल्याने सर्वांचीच पळापळ झाली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.

पथकाने साहित्य जप्त करताच फेरीवाल्या महिलांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पण कारवाईवर ठाम राहत पथकांने साहित्य जप्त केले. पोलिस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी आंदोलनावर ठाम असलेल्या गणपुले यांच्यावर आचारसंहितेच्या कालावधीत आंदोलन केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्याचा इशारा दिला. तसेच परवानगी घेऊन आंदोलन करण्याची सूचना दिली. त्याचवेळी अन्य फेरीवाले त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी कोल्हापुरात नसल्याने याबाबतचा निर्णय होणार नसल्याचे फेरीवाल्यांना सांगितल्यानंतर अखेर त्यांनी माघार घेतली. गुरुवारी पुन्हा महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी महाद्वार चौकात जाऊन फेरीवाल्यांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान महापालिका प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अनेक फेरीवाले नेते सहभागी झाले होते. पण काही मोजक्या फेरीवाल्यांमुळे प्रश्न चिगळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर चर्चेत सहभागी झालेले फेरीवाले नेते फिरकलेच नाहीत. तर काहींनी कारवाईचे समर्थन केले.

महाद्वार चौकात पुन्हा तणाव

मंगळ‌ावारी निघालेल्या तोडग्यानुसार चौकापासून शंभर फूट अंतरावर सकाळपासून फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. तोडगा मान्य नसलेल्या १५ ते १६ फेरीवाल्यांनी पुन्हा चौकात ठाण मांडले. त्यामुळे अन्य फेरीवाल्यांमध्ये अस्वस्थता पसरली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने चौकासह रोडवर बसलेल्या सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. परिणामी तणाव निर्माण होऊन फेरीवाले आपआपसात भिडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी महापौरांसह गटनेत्यांचा

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com tweet: @MarutipatilMT कोल्हापूर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अनेकांना आमदारकीचे स्वप्ने पडू लागली असून महापालिकेचे अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीची पहिली पायरी म्हणून अनेकजणांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपकडून मुलाखती दिल्या असून काहीजण वंचित बहुजन विकास आघाडीच्याही संपर्कात आहेत. काँग्रेसचे माजी महापौर सागर चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष व माजी महापौर आर. के. पोवार, आदिल फरास व ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम मैदानात उतण्याची शक्यता आहे. महापालिका क्षेत्रात विधानसभेच्या उत्तर व दक्षिण अशा दोन मतदारसंघाचा समावेश आहे. दक्षिण मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने महापालिकेचे अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी उत्तर मतदारसंघातून लढण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे दोन माजी महापौर, दोन माजी स्थायी समिती सदस्य व एक विद्यमान नगरसेवक व ताराराणी आघाडीचे गटनेते यांच्यासह नगरसेवकांचे भाऊ, पती उत्तरमधून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आपआपल्या पद्धतीने सर्व इच्छुक पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीबाबत दावेदारी पोहोचवत आहेत. शिवसेना-भाजपचा युतीबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पण उत्तर मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत कमालीची संभ्रमावस्था आहे. काँग्रेसकडून माजी महापौर सागर चव्हाण, त्यांचे बंधू व नगरसेविका जयश्री चव्हाण यांचे पती सचिन चव्हाण यांनी मुलाखत दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून माजी महापौर आरे. के. पोवार व माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी मुलाखत दिली आहे. फरास यांनी वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी मागितली आहे. त्याचवेळी गत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले व विद्यमान नगरसेवक सत्यजित कदम यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने कदम भाजपकडून लढण्याची शक्यता आहे. पण युती झाल्यास कोणता निर्णय घ्यायचा याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा लवकरच मेळावा होणार आहे. नगरसेवक संभाजी जाधव यांचे बंधू व विद्यमान नगरसेविका जयश्री जाधव यांचे पती ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत जाधव विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. युती, आघाडीचा निर्णय आणि जागांमध्ये आदलाबदल झाल्यानंतर इच्छुकांपैकी किमान तिघेजण बंडखोरीच्या पवित्र्यात दिसून येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ पासून ‘सेव्ह माय हार्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्याचे ताणतणावाचे जीवन, दैनंदिन जीवनात नागरिकांची होणारी धावपळ यामुळे आरोग्य विषयक तक्रारी वाढत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, अनेक नागरिक हे हृदयविकारांनी त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागृती आणि हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंबंधी महाराष्ट्र टाइम्स आणि माधवबाग क्लिनिक यांच्यातर्फे संयुक्त आरोग्य विषयक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 'सेव्ह माय हार्ट'या संकल्पनेनुसार हा मोफत आरोग्य विषयक उपक्रम होत आहे.

माधवबाग क्लिनिक, धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलसमोर ताराबाई पार्क व माधवबाग क्लिनिक क्रशर चौक सानेगुरुजी वसाहत रोड या दोन ठिकाणी शिबिर होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर २९ सप्टेंबर हा जागतिक हृदयदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी सर्वत्र आरोग्य विषयक उपक्रम, हृदयरोगाविरोधात प्रबोधन आणि हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या अनुषंगाने आरोग्य कार्यक्रम होतात. नागरिकांना आरोग्य विषयक नेमक्या टिप्स मिळाव्यात, त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निरसन व्हावे, यासाठी 'मटा'व 'माधवबाग' यांनी 'सेव्ह माय हार्ट'ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या आरोग्य शिबिरात हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी आणि गरज पडल्यास ईजीसी या सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. याशिवाय रक्तवाहिन्यातील अडथळे, ब्लॉकेजेस, मधूमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व मोफत सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांनी तपासणीसाठी येताना जुने रिपोर्टस व औषधे घेऊन यावेत. शिबिराचा कालावधी हा रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा असा आहे. या मोफत तपासणी शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी शिबिरासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी ताराबाई पार्कातील माधवबाग क्लिनिकच्या ८०५५८४६७७७ व क्रशर चौकातील माधवबाग क्लिनिकच्या ९७३०६०७३९१ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपाससंबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या शिबिरात बॉडी मास इंडेक्सची (बीएमआय) मोफत तपासणी होणार आहे. शिवाय ज्यांची यापूर्वी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास झाली असेल किंवा करायला सांगितले आहे अशा रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकरमान्यांच्या भेटीगाठीवर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून जिल्ह्यातील संभावित उमेदवारांची लगीनघाई सुरू झाली आहे. पहिल्या फळीतील कार्यकर्त्याकडे मुंबई, पुण्यात नोकरीनिमित्त असलेल्या मतदारांशी संपर्क व संवाद मेळाव्यांचे नियोजन केले जात आहे. मुंबईतील लोअर परेल, परळ, डिलाईल रोड, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतल्या चाकरमान्यांच्या भेटीगाठीवर भर दिला जात आहे. जिल्ह्यात नोकरीनिमित्त परगावी असलेल्या मतदारांची संख्या दोन लाखांहून अधिक आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उमेदवारांनी कामाला लावली आहे. विशेषतः शाहूवाडी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील दुर्गम भागात घरातील किमान एक सदस्य मुंबई-पुणे याठिकाणी नोकरीनिमित्त असतो. मात्र त्याचे मतदान गावात असते. जिल्ह्याचा काही भाग दुर्गम, डोंगराळ असल्याने नोकरीच्या संधी कमी प्रमाणात असतात. त्यामुळे कुटुंबातील कुणी ना कुणी मुंबईला नोकरीनिमित्त जातो. कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणही मुंबईची वाट धरतात. साधारणतः १९७० च्या दरम्यान मुंबईतील लोअर परेल, परळ, डिलाईल रोड परिसरात अनेक गावातील मुंबईस्थित नागरिकांनी लोकवर्गणीतून मंडळाच्या बैठ्या खोल्या खरेदी केल्या. यामागे नोकरीनिमित्त मुंबईत येणाऱ्याला निवाऱ्याची सोय उपलब्ध व्हावी हा उद्देश होता. मंडळाच्या माध्यमातून हजारो तरुण या खोल्यांमध्ये एकत्रित राहतात. तात्पुरते मुंबईकर झालेले तरुण गावाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. सामाजिक, धार्मिक इतर उपक्रमात चाकरमान्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. बहुतांशी कुटुंबातील कुटुंब प्रमुखच मुंबईत राहतो. त्यामुळे कुटुंब प्रमुखाला गाठून राजकीय नेते हक्काचे मतदान मिळवण्याचा प्रयत्न करतात. निवडणुकीचे वारे वाहताच सर्वात आधी मुंबईकरांची संपर्क साधला जातो. मुंबईस्थित मतदारांची मते निर्णायक ठरतात. शाहूवाडीतून विद्यमान आमदार सत्यजित पाटील, माजी मंत्री विनय कोरे तर राधानगरीतुन विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनीही संपर्क मेळाव्याचे आयोजन केले आहे.

चोख व्यवस्था

मुंबईतून मतदारांना खेचून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या वतीने जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. मतदारांना स्वखर्चाने आणून परत पोहचवण्याची सोय करण्यात येत आहे. यासाठी गावानुसार मुंबई, पुणे याठिकाणी असलेल्या मतदारांची यादी अपडेट करण्यात येत आहे. संपर्कासाठी व्हॉट्स अॅप ग्रुप बनवण्यात आले आहेत. ट्रॅव्हल संघटनांशी संपर्क साधून आगाऊ वाहनांची तजवीज केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना धरणातून विसर्ग

$
0
0

कोयना धरणातून विसर्ग

कराड :

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन धरणातून विसर्ग करावा लागत आहे. सध्या धरणाच्या सहापैकी दोन दरवाजे एक फुटांनी वर उचलून त्यातून ३१५४ व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१००, असे एकूण ५२५४ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. एक जूनपासून आतापर्यंत धरणात तब्बल २२६.५६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणातून विनावापर ११०.३२ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. सध्या धरणात एकूण १०४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, त्यापैकी उपयुक्त साठा ९९.९२ टीएमसी इतका आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे एकूण ७००४, नवजात ८११९ तर महाबळेश्वरात ७०५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी ८.१९ वाजता कोयना विभागात २.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १२ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यात कोडोली गावच्या पूर्वेला आठ किलोमीटर अंतरावर भूगर्भात पाच किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती भूकंप मापन केंद्रावरून देण्यात आली. भूकंप कोयना, पाटण, पोफळी, अलोरेसह सातारा व सांगली व रत्नागिरी जिल्ह्यातील काही विभागात जाणवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिल्या आंतरराष्ट्रीय टेरी टॉवेल प्रदर्शनाचे उद्घाटन

$
0
0

पहिल्या आंतरराष्ट्रीय टेरी टॉवेल प्रदर्शनाचे उद्घाटन

सोलापूर :

सोलापुरातील टेक्सटाईल उद्योगाला चालना द्यायची असल्यास सर्व असोसिएशनने एकत्रित येऊन प्रदर्शन भरविले पाहिजे, असे मत राज्य वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी व्यक्त केले.

टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल नेटवर्कच्या साहाय्याने आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय टेरी टॉवेल एक्स्पोचे बुधवारी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी गोविंदराज बोलत होते. या वेळी व्यासपीठावर भारत सरकारचे वस्त्रोद्योग संचालक सुशील गायकवाड, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पालिका आयुक्त दीपक तावरे, टेरी टॉवेल एक्सपोचे अध्यक्ष सिद्धेश्वर गड्डम आदी उपस्थिती होते.

डॉ. के एच गोविंदराज म्हणाले, टेक्सटाईलच्या मार्केटिंगसाठी आयोजित केलेले प्रदर्शन कौतुकास्पद आहे. या पूर्वी गारमेंटची प्रदर्शन झाली आहेत, वेगवेगळे प्रदर्शन भरविण्याऐवजी सर्व असोसिएशनने एकत्र येऊन प्रदर्शन भरविल्यास सोलापूरच्या टेक्सटाईल उद्योगाला निश्चित चालना मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक थेंब शाईचा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात मतदान मोठ्या संख्येने होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून 'आपले बोट... आपला आवाज ! एक थेंब शाईचा... कर्तव्य आणि अभिमानाचा' हा आणि 'मी तर नाही मतदान करु शकत पण तुम्ही करा, माझ्या भविष्यासाठी...' असे बोलके फलक झळकत आहेत. जिल्हा माहिती प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असे फलक लावण्यात आले आहेत.

जागृतीसाठी शाहूवाडी विधानसभा मतदार संघात शाहू हायस्कूल (शाहूवाडी) येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. मलकापुरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सरूड विद्यामंदीर केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली. दरम्यान, जागृतीसंबंधी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, दहा मतदार संघासाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. एकूण जिल्ह्यात १५ लाख, ६ हजार, ३०८ महिला, १५ लाख, ८४ हजार, २७१ पुरुष आणि ८१ तृतीयपंथी असे एकूण ३० लाख, ९० हजार, ६६० मतदार आहेत.

२४ सप्टेंबरपर्यंत ज्यांनी नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत, अशा पात्र मतदारास या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. मतदानाचा पवित्र हक्क संविधानाने दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. राज्यात मतदानाचा जिल्ह्याचा नावलौकिक कायम ठेवावा.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांचा दावा फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या गाळेधारकांना केलेली भाडेवाढ बेकायदेशीर असल्याने त्याविरोधात गाळेधारकांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. बुधवारी याबाबतचा निर्णय देताना भाडेवाढीचा निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचे नमूद करत गाळेधारकांचा दावा दिवाणी न्यायाधीश ए. एस. गरड यांनी फेटाळून लावला. या निर्णयामुळे रेडिरेकननुसार गाळेधारकांना भाडे द्यावे लागणार आहे. तसेच गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्न निकालात निघाल्याने महापालिकेला रेडिरेकनरनुसार भाडे आकारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात महापालिकेचे छत्रपती शिवाजी मार्केट, शाहू क्लॉथ मार्केट, कपिलतीर्थ मार्केट, ताराराणी मार्केटसह ३८ ठिकाणच्या मार्केटमधील विविध सुमारे २,५०० गाळे आहेत. त्यापैकी सुमारे १,७०० गाळेधारकांच्या भाडे कराराची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतरही पूर्वीच्या भाड्याप्रमाणे भोगवटा करीत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने कायद्यातील तरतुदीनुसार सुधारित भाडे आकारून गाळ्यांना मुदतवाढीबाबत प्रस्ताव ठेवला होता. सुधारित भाडे आकारणीसाठी ऑगस्ट २०१५ मध्ये ठराव सरकारकडे पाठवला होता. सरकारने ठराव विखंडीत करून भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता.

सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाने गाळ्यांची चालू रेडिरेकनर दराप्रमाणे भाडे आकारणी व मुदतवाढीच्या अनुषंगाने कागदपत्राची पूर्तता करण्याची सूचना गाळेधारकांना केली होती. याविरोधात काही गाळेधारकांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर न्यायालयात दावा दाखल केला होता. दाव्यामध्ये महापालिकेला बेकायदेशीर भाडेवाढ करता येणार नसल्याचे नमूद केले होते. त्यानुसार गाळेधारक व महापालिकेने बाजू मांडली. न्यायाधीश गरड यांनी दावा नामंजूर केला. महापालिकेच्यावतीने अॅड. प्रफुल्ल राऊत व अॅड. मुकुंद पवार यांनी काम पाहिले. 'कोर्टाच्या निर्णयामुळे थकीत गाळेधारकांवर कारवाई करण्याचा मार्ग महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार मोकळा झाला आहे. त्यानुसार मुदत संपलेल्या गाळेधारकांनी रेडिरेकनरप्रमाणे भाडे भरुन सहकार्य करावे,' असे आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार

$
0
0

संभाव्य उमेदवार

कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील

करवीर : पी. एन. पाटील

कागल: हसन मुश्रीफ

राधानगरी : के. पी. पाटील, ए. वाय. पाटील

कोल्हापूर उत्तर: दौलत देसाई, सागर चव्हाण

चंदगड : राजेश पाटील, एम. जे. पाटील

शिरोळ: राजेंद्र पाटील यड्रावकर

हातकणंगले: राजू आवळे

इचलकरंजी : राहुल खंजिरे,शशांक बावचकर,अमृत भोसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नविन महाबळेश्‍वर प्रकल्पाला विरोध

$
0
0

नविन महाबळेश्‍वर प्रकल्पाला विरोध

सातारा :

राज्य सरकाने जाहीर केलेला नवीन महाबळेश्‍वर प्रकल्पातील महाबळेश्‍वर या नावाला महाबळेश्‍वर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रकल्पातून महाबळेश्‍वर हे नाव वगळण्यात यावे, या मागणीसाठी महाबळेश्‍वर तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली असून, या आंदोलनात तालुक्यातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजित बैठकीत करण्यात आले आहे.

.............

वंजाळी तलाव फुटून

शेतकऱ्यांचे नुकसान

सातारा :

ठेकेदारांने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे वंजाळी तलाव फुटून शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदाराकडून ही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी उपळवे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. गेली तीन महिने पावसाळा सुरू होऊन ही फलटण तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने आपले पशूधन व शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांकडे मागणी केल्याने उपळवे (ता. फलटण) येथील वांजाळी तलावात धोम बलकवडीचे पाणी सोडले होते. वांजळी तलावात पाणी सोडल्यानंतर तलावातून गळती सुरू झाली होती. या बाबत तलावाचे निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या, मात्र याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले होते. अखेर सोमवारी २३ रोजी तलाव फुटून १५० एकर क्षेत्रावर असणाऱ्या बाजरी, मका, ऊस व जनावरांना केलेला चारा वाहून गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड-विटा वाहतूक विस्कळीत

$
0
0

कराड-विटा वाहतूक विस्कळीत

कराड : परतीच्या पावसाने मंगळवारी रात्रभरासह बुधवारी दुपारीही काहीकाळ कराड शहरासह परीसरातील ग्रामीण भागाला झोडपून काढले. कमी कालावधीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील कराड-विटा मार्गावरील सैदापूर (ता. कराड) गावाच्या हद्दीतील कृष्णा कॅनॉल परिसरात सखल भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी उशीरा सुरू झालेल्या पावसामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा खंडीत झाला होता. बुधवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा विस्कळीत होता. मंगळवारी रात्री नऊ नंतर पावसाने ढगांच्या गडगडांसह मुसळधार पाऊस सुरू झाला होता. सखल भागांसह शेतांमध्ये पावसाचे पाणी तुडूंब भरल्याने शेतांना अक्षरशः तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. मुसळधार पावसाने कराड शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. कराड-विटा मार्गावरील सैदापूर गावाच्या कृष्णा कॅनॉल परिसरात रस्त्यावर कंबरे इतके पाणी होते. विटा व कराड या दोन्ही बाजूंची वाहतूक काहीकाळ ठप्प होती. त्या नंतर ही वाहतूक पार्ले, बनवडी, विद्यानगर मार्गे वळविण्यात आली.

फोटो ओळ :

कराड-विटा मार्गावरील कृष्णा कॅनॉल परिसरात सखल भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर...........

$
0
0

सातारा शहर आणि परिसरात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. साताऱ्यातील आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. पवारांवर सूड बुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप ही कार्यकर्त्यांनी केला.

सोलापूर शहर-जिल्हा राष्ट्रवादीतर्फे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पाट्या लावून तासभर मूक आंदोलन करण्यात आले. आंदोलन संपल्यानंतर पोलिस राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी पुढे सरसावल्यानंतर मात्र, पोलिस आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने आले. बराचवेळ अटकेवरून गोधळ उडाला, घोषणाबाजी झाली. त्यामुळे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी अध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी गटनेते दिलीप कोल्हे आदींनी पोलिसांना जाब विचारत आक्रमक पवित्र घेतला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांच्या वाहनात बसण्यास तयार नव्हते. पोलिस दबावाखाली येऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक अटक करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र, पोलिसांनी काही वेळानंतर सर्वांची समजूत काढली आणि त्यांना वाहनात बसविले. तरीही घोषणाबाजी सुरूच होती. या गोंधळामुळे काहीकाळ वातावरण तंग बनले होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. हा सर्व प्रकार महात्मा गांधी पुतळासमोरील रस्त्यावरच सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधानसभेसाठी ‘सीव्हीजील’ पहिल्यांदाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आचारसंहिता भंगाची तक्रार ऑनलाइन करण्यासाठी पहिल्यांदाच यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत सीव्हीजील (cvigil) अॅप कार्यान्वित केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अॅपवर आलेल्या तक्रारीची दखल १०० मिनिटांत घेण्यासाठी जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत ५० पथके कार्यरत झाली आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.

ऑनलाईन तक्रार करण्यासाठी आयोगाने सीव्हीजील अॅप तयार केले आहे. अॅपवरील प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांत कारवाई होणार आहे. कारवाईसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाचप्रमाणे एकूण दहा मतदारसंघांत ५० पथकांतील ५०० कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक पथकात पोलिस असतील. त्यांच्याकडे वाहन असेल. अॅपवर तक्रार केल्यानंतर ऑनलाइनच संबंधित पथकाला ठिकाणासह मेसेज जाईल. कारवाईच्या प्रत्येक टप्प्याचा मेसेजही तक्रारदारास जाणार आहे. यामुळे घर बसल्याच २४ तासांत कधीही तक्रार करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच या अॅपद्वारे तक्रारीची दखल घेण्यात येणार आहे.

सार्वजनिक किंवा वैयक्तिक मालमत्तेवर जाहिरात करणे, पोस्टर्स, कटआऊट, होर्डिंग्स, बॅनर्स, झेंडे, पैसे आणि जेवणावळी वाटपासंबंधीची तक्रार फोटो, व्हिडिओ स्वरूपात करण्याची सुविधा अॅपवर आहे. आचारसंहितेसंबंधीच्या तक्रारी तरी किमान त्वरित निकालात निघाव्यात, लालफितीचा अनुभव तक्रारदारांना येऊ नये यासाठी हे अॅप तयार केले आहे. अॅपवर अलेल्या तक्रारी, त्यावर काय कारवाई केली, यासंबंधीची माहिती ऑनलाईन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिसते. यामुळे अॅपवरील प्रत्येक तक्रारीची दखल घेणे जिल्हा निवडणूक प्रशासनास बंधनकारक आहे.

०००

अपलोड कसे कराल?

मोबाइल किंवा संगणकावरील इंटरनेटवर गुगलवरील प्ले स्टोअरवर cvigil असे टाइप करून अॅप अपलोड करून घेता येते. अॅप कार्यान्वित झाले असून, दोन दिवसांत 'दक्षिण'मधील ३ आणि 'इचलकरंजी'तील १ अशा चार तक्रारी आल्या होत्या. राजकीय नेत्याचे फलक लावल्याच्या या तक्रारी होत्या.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दक्षिण’ची जबाबदारी तुमच्यावर

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या वीस वर्षांपासून माझ्या राजकीय वाटचालीमध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिले. असेच प्रेम दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना द्या. माझा पुतण्या म्हणून नव्हे, तर कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मागे उभे रहा,' असे भावनिक आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केले. जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीमुळे आघाडीचे जास्तीत-जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी फिरावे लागणार असल्याने 'दक्षिण'ची जबाबदारी तुमच्यावर सोपवत असल्याचे त्यांनी सांगितले. ऋतुराज यांचा गुरुवारी (ता.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी बैठक झाली.

'मिशन दक्षिण - २०१९' अंतर्गत वॉटर पार्क येथे झालेल्या महापालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महापौर माधवी गवंडी यांची प्रमुख उपस्थिती होती. एकाच कुटुंबात दोन उमेदवार नको, असा विचार पुढे आल्यानंतर घेतलेल्या भूमिकेनंतर बोलताना आमदार पाटील म्हणाले, 'विधानपरिषदेला आपण टीम वर्कने सामोरे गेल्याने यश मिळाले. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. नोटबंदी, कृषी, बेरोजगारी या विषयावर चर्चा न करता भाजप विषयांतर करत आहे. पुरामुळे जिल्ह्यातील तीन हजार नागरिक बेघर झालेली असताना त्यांना अद्याप मदत झालेली नाही. शहराला थेट पाइपलाइनद्वारे पिण्याचे पाणी देण्याचे माझे स्वप्न आहे. योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन गावातील अडचण लवकरच दूर होईल. गणेशोत्सवामध्ये युवकांना सुटी मिळत नव्हती. पण नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये अनेक शिफ्ट बंद असल्याने सुटी मागण्याची वेळ युवकांवर आली नाही. बेरोजगारीची संख्या वाढलेली असल्याने भविष्यात मुलां-मुलींना नोकरी देण्याचा अजेंडा घेऊन ऋतुराज यांनी निवडणुकीला सामोरे जावे.'

ऋतुराज पाटील म्हणाले, 'जिल्ह्यात शेतकरी, महिला, युवकांची बेरोजगारी बरोबर बंद व कमी केलेली पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्याचा सकारात्मकदृष्टीने विकास करताना २०२४ मध्ये युवकांना नोकरीची किती संधी दिली, ही आकडेवारी घेऊनच समोर येणार आहे.'

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीमध्ये 'आमचं ठरलंय' म्हणून काम केले. विधानसभा निवडणुकीमध्ये 'आमचं ठरलंय पार्ट-२' म्हणून सामोरे जायचे आहे. आजी-माजी नगरसेवकांची ही लगान टीम विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही.' माजी महापौर अॅड. महादेवराव अडगुळे म्हणाले, 'विरोधकांचा सरकारी यंत्रणांचा वापर करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप पाच वर्षातील कामगिरी आणि त्यांच्या कुटनीतीमुळे सरकारविरोधात जनतेमध्ये रोष आहे. हा रोष मतपेटीतून व्यक्त केला जाईल.' माजी नगरसेवक दिलीप शेटे म्हणाले,' केवळ दक्षिण मतदारसंघ नव्हे, तर उत्तरमध्येही मोट बांधा. कोल्हापूर वासियांनी नेहमीच सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊ.'

मेळाव्यात माजी महापौर मारुतराव कातवरे, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण, माजी उपमहापौर उदय पोवार, माजी नगरसेवक अशोक भंडारी, प्रकाश पाटील, भारती पोवार, सुभाष जाधव यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक मोहन सालपे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक नेते भरत रसाळे यांनी आभार मानले.

'पक्षाने भरभरून दिले'

'काँग्रेस पक्षाने आमदार, मंत्री केले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानपरिषदेचे तिकिट दिले. पक्षाने भरभरून दिले असताना पक्षनिष्ठा बाजूला का ठेवायची. प्रत्येक निवडणुकीत पक्ष आणि झेंडे बदलणारे आणि आपल्यात फरक राहिला नसता. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहताना जिल्ह्यात आघाडीच्या जास्तीत-जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.' असे आमदार पाटील म्हणाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाव्य उमेदवार

तरुणीची पंचगंगेत आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीपात्रात मनीषा बाळू वडर (वय २९, रा. जगदाळे शाळेजवळ, दौलतनगर) या तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. गरीबी आणि कर्जाबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

मनीषाच्या वडिलांचा लहानपणीच मृत्यू झाला. सध्या ती आई रेखा आणि भाऊ मनोज यांच्यासमवेत भाड्याच्या राहत होती. घरची परिस्थिती गरीबीची असल्याने धुणी भांडी करुन ती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. भाऊ मनोज हा सकाळी सेंट्रिगच्या कामासाठी गोवा येथे गेला होता. घरी आई आणि मनीषा या दोघीच होत्या. बुधवारी सकाळी ती अकराच्या सुमारास धुणी भांड्याची कामे करण्यासाठी जातो, असे आईला सांगून घराबाहेर पडली. दुपारी दोनच्या सुमारास तिने शिवाजी पुलावरून उडी घेतली. त्यानंतर लक्ष्मीपुरी आणि करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पुलावर दगड घालून ठेवलेली कापडी पिशवी मिळाली. त्यामध्ये चप्पल, दुपट्टा व चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवरुन तिची ओळख पटली. दरम्यान मनीषाने आत्महत्या केल्याचे समजताच आई भोवळ येऊन पडली. दौलतनगर येथील रहिवाशांनी शिवाजी पुलावर मोठी गर्दी केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी बोटीच्या सहायाने नदीपात्रात शोध घेतला, मात्र मृतदेह सापडला नाही. दलाचे फायरमन तानाजी कवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय जाधव, सर्जेराव लोहार, सुरेंद्र जगदाळे, चंद्रकांत पाटील, मेहबूब जमादार यांनी शोध मोहीम राबवली. मात्र, रात्र झाल्याने थांबविण्यात आली.

मायलेकांनी फोडला हंबरडा
साऱ्या कुटुंबाची जबाबदारी मनीषावर होती. बहिणीने आत्महत्या केल्याचे समजताच भाऊ मनोजने हंबरडा फोडला. ‘माझ्या बाळा परत ये, तू असं का केलसं, आमचा आधारचं निघून गेला’ असे म्हणून जमिनीवर डोक आपटून हंबरडा फोडणाऱ्या आईची घालमेल पाहून अनेकांचे डोळे भरून आले.

कर्जबाजारीतून आत्महत्या ?
दौलतनगर येथील एका महिला बचतगटाकडून मनीषाने कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते थकले होते. दसऱ्याच्या दिवशी या बचतगटाकडून भिशीचे वाटप केले जाणार होते. त्यासाठी थकलेले हप्ते बचतगटाच्या प्रमुखांने देण्याचा तगादा लावला होता. गरीबी आणि कर्जबाजारीच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडळकरांची 'वंचित'ला सोडचिठ्ठी, भाजपत जाणार?

$
0
0

सांगली: वंचित बहुजन आघडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. मी आजपासून वंचित बहुजन आघाडीचे काम बंद केले असून मी राजीमाना दिलेला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार सकारात्म आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे. येत्या दोन दिवसांत मी माझी भूमिका स्पष्ट करणार असून सर्व पक्षांकडून मला ऑफर आल्याची माहिती पडळकर यांनी दिली आहे. पडळकर लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये पडळकर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत. पडळकर यांना वंचित बहुजना आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळाली आहेत. आता पडळकर विधानसभा निवडणुकीत आपला करिश्मा दाखवण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पडळकर हे जत किंवा खानापूर मतदारसंघात उमेदवार म्हणून उभे राहतील असे सांगितले जात आहे.

धनगर समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध

पडळकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी धरगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर तुटून पडले होते. मात्र, सत्ताधारी पक्ष असलेला भारतीय जनता पक्षच धनगर समाजाचे प्रश्न सोडवू शकतो असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. याच कारणामुळे पडळकर यांनी भाजपत प्रवेश करावा असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images