Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पवार पीएम झाल्यास आनंदच!: शिंदे

$
0
0
‘शरद पवार पंतप्रधान झाल्यास आपल्याला ते आवडेलच,’ असे विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी येथे केले. एका कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती.

वाचन संस्कृती चळवळ घराघरांत पोहोचवा

$
0
0
वैचारिक परिवर्तनासाठी पुस्तके मोलाची भूमिका बजावित असल्याने वाचन संस्कृतीची चळवळही घराघरात पोहोचवा,’ असे आवाहन ज्येष्ठ कथाकार वामन होवाळ यांनी केले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने तुरुंग आणि न्यायालये जोडणार

$
0
0
राज्यातील तुरूंग आणि न्यायालये टॅब्लेटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सिस्टीमनी जोडणार असून पॅरोलवर जाऊन पुन्हा न परतणाऱ्या आरोपींना ३२४ कलम लावणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

‘बॉलिवूड शताब्दी’मधून साकारला शतकाचा प्रवास

$
0
0
स्टेजवर गाणं सादर करणारे कलाकार आणि सोबतीला त्या गाण्याच्या माहितीसह त्याकाळातील किस्से अशा वातावरणात रंगलेल्या ‘बॉलीवूड शताब्दी’ या संगीतमय कार्यक्रमाने भारतीय सिनेमाच्या शंभर वर्षाचा प्रवास श्रवणीय बनवला.

सावकाराच्या त्रासापायी आत्महत्या

$
0
0
खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनमोल मुरलीधर भोसले (वय ३०) असे त्या तरुणाचे नाव आहे.

कोल्हापूरकरांच्या आंदोलनाचे यश

$
0
0
शहरांतर्गत एकात्मिक रस्ते प्रकल्पाचा प्रयोग असलेल्या रस्ते प्रकल्पासाठी कारणीभूत असलेल्या महापालिका, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सल्लागार कंपनी सोव्हिल, मंत्री, सरकारचा गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूरकरांनी अक्षरश‍ः पिच्छा पुरवला. कराराच्या कागदपत्रांमधील ओळीनुसार कीस काढला गेला.

देखभाल दुरुस्तीचे काय ?

$
0
0
जे रस्ते तयार करण्यात आले आहेत, त्याच्या देखभालीचा खर्च तीस वर्षे आयआरबी करणार होती. आता जर एकाचवेळी त्यांची रक्कम दिली तर यापुढे देखभालीचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

‘टोल’जंग विजय

$
0
0
गेल्या चार वर्षापासून सुरु असलेल्या टोलविरोधी आंदोलनाला शनिवारी यश आले. कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी रस्तेप्रकल्पाला आलेला सर्व खर्च महापालिकेच्यावतीने देण्याची घोषणा केली.

कोल्हापूर ‘टोल फ्री’

$
0
0
कोल्हापूरकरांसाठी अस्मितेचा विषय ठरलेली टोलविरोधातील लढाई अखेर जनआंदोलकांनी जिंकली. सहा दिवसांपासून ‘करो या मरो निर्धाराने सुरू झालेल्या बेमुदत उपोषणात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील शनिवारी सहभागी झाले, ही घटना कलाटणी देणारी ठरली.

कोल्हापूरात टोल नाके फोडले

$
0
0
कोल्हापूरातील टोलविरोधातील लढाई जनआंदोलकांनी जिंकली असे चित्र शनिवारी रात्री निर्माण झाले होते. मात्र आज सकाळपर्यंत टोल नाक्यांवर वसूली सुरू असल्याचे दिसताच आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी फुलेवाडी, शिरोली टोल नाके फोडले. शिरोली टोलनाका तर आंदोलकांनी पेटवला.

‘क्लिक’ आपल्याच हातात

$
0
0
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियामध्ये गुंतत चाललेली तरुणाई, फेक अकाउंटमधून निर्माण होणारे प्रॉब्लेम्स, फोटोवरून होणारा गोंधळ, कमेंट्स, लाइक्समधून होणारी छेडछाड अशी ब्लॅक साइड समोर येत आहे.

वांगी, गाजराला मागणी‌

$
0
0
मकरसंक्रातीच्या पर्वसंध्येला ओवसा पुजनासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. तर मकरसंक्रातीला देण्यात येणाऱ्या तिळगूळ रेवडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.

मागण्या त्याच मात्र आंदोलने वेगळी

$
0
0
अंगणवाडी सेविका व मदतनीसच्या प्रलंबित मागण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप पाचव्या दिवशीही सुरू होता. संघटनांच्या एकीअभावी एकाच मागण्यासाठी वेगवेगळ्या संघटना कोल्हापुरात वेगवेगळी आंदोनल करत असल्यामुळे आंदोलनाचे बळ कमी पडत असून संघटनांमधील एकीचा अभाव असल्याचे या संपामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

फ्री एनर्जी

$
0
0
‘हरीश्चंद्रगडावर ह्या वाटेने जाण्यातली मजा काही औरच !’ समोरच्या शेकोटीत छोट्या काटक्या सारत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. ते सगळे पट्टीचे प्रस्तरारोहक होते. त्यांच्यातल्या काहींनी ह्या नळीच्या वाटेने याआधीही काही वेळा हरीश्चंद्रगड गाठला होता.

नामोनिशाण मिटवले

$
0
0
सरकारमधील मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला आयआरबीने वाटाण्याच्या अक्षता लावत टोल वसुली सुरुच ठेवल्याने संतप्त कोल्हापूरकरांनी रविवारी टोलनाक्यांवर जोरदार हल्ला चढवत कोल्हापुरी हिसका दाखवला.

‘दौलत’बाबत गुरुवारी चंदगडमध्ये मोर्चा

$
0
0
दौलत कारखान्याचे सरकारी खर्चाने लेखापरिक्षण व्हावे, दोषी संचालकावर कारवाई व्हावी व मार्गदर्शक संचालक गोपाळराव पाटील यांनी राजीनामा द्या या मागणीसाठी दौलत कारखाना बचाव संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (ता. १६) चंदगड तहसील कार्यालयावर दुपारी एक वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती संघर्ष समितीचे डॉ. सुभाष जाधव यांनी दिली.

शेतक‍ऱ्यांना ‘आत्मा’चा हात

$
0
0
शेतकरी बचत गटातर्फे शाहूवाडी तालुक्यातील सहा गावामध्ये पाच लाख ऊसाची रोपे तयार केली जाणार आहेत. सरूड, कोतोली, निळे, रेठरे, वारूळ, व उचत या सहा गावात ही रोपे तयार केली जाणार आहेत.

पारपोली शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा

$
0
0
आजरा तालुक्यातील पारपोली प्राथमिक शाळेला उद्या (ता. १३) टाळे ठोकण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून आजरा पंचायत समितीच्या सभापती अनिता नाईक यांना दिला आहे.

यंत्रमाग कामगार संपावर

$
0
0
इचलकरंजी येथील राष्ट्रवादी यंत्रमाग कामगार संघटनेच्या यंत्रमाग कामगारांनी कामगार मंत्री सहन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढून आपले गाऱ्हाणे मांडले. मंत्री मुश्रीफ यांनी, कामगार आयुक्त सुहास कदम यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करतो, असे आश्वासन दिले.

सहायक वनसंरक्षक कातकरांची बदली करा

$
0
0
कोल्हापूर वनविभागातील सहायक वनसंरक्षक सूर्यकांत वसंत काटकर एकाच जिल्ह्यात वर्ग एकची पदोन्नती नाकारून २७ वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून आहेत. जिल्हा परिसरातील वनपाल, वनरक्षक, लाकूड ठेकेदार व सॉमिलधारकांवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक पिळवणूक करण्याचे ते काम करीत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images