Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शहराचा कचरा कळंब्यात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम कचरा कोंडाळे नाहीत आणि अॅटो टिपर येत नसल्याची सबब पुढे करत जीवबा नाना पार्कमध्ये प्लास्टिक, शिल्लक अन्न आणि अन्य कचरा थेट रस्त्यावरच टाकला जात आहे. रस्त्यावर टाकलेला कचरा उंचावरून येणाऱ्या सांडपाण्यामुळे थेट कळंबा तलावात मिसळण्याची शक्यता आहे. नागरिकांची यातून बेपर्वाई दिसून येत असताना महापालिकेसह कळंबा ग्रामपंचायनेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. हा कचरा तलावात येण्याची शक्यता असल्याने पाणी प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. बापूराम नगर बीएड कॉलेजपासून जीवबा नाना जाधव पार्काची हद्द सुरू होते. या पार्कचा भाग असलेल्या नंदनवन पार्क व कृष्णकृपा अपार्टमेंटमध्ये सुमारे ३० ते ३५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथे कचरा टाकण्यास कंटेनर नसल्याने आणि घरोघरी कचरा संकलन करणारी टीपर येत नसल्याने नागरिक बिनदिक्तपणे प्लास्टिक पिशव्या, घरातील शिल्लक अन्नपदार्थ रस्त्यावर टाकून देत आहेत. त्यामुळे उंचावरील या दोन्ही ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचला आहे. त्यावरच पुन्हा कचरा टाकला जात आहे. कचऱ्याभोवती भटकी कुत्र्यांचा वावर वाढला असूना दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात सुटली आहे. उंचावर टाकलेला कचरा मोठ्या पावसात थेट गटारीतून कळंबा तलावात येण्याची शक्यता आहे. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्याची निर्गत महापालिका व कळंबा ग्रामपंचायतीने करायला हवी. मात्र, परिसरातील अपार्टमेंटधारकही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते. अपार्टमेंट बांधताना परवानगी घेताना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे हमीपत्र घेतले जाते. महापालिका सातत्याने ओला व सुका कचरा वेगळा करण्याबरोबरच उघड्यावर कचरा टाकू नका असे आवाहन करते. पण अपार्टमेंट्स व नंदनवन पार्कातील काही कुटुंबांनी आवाहनाची पूर्णपणे वासलात लावली आहे. दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या हद्दीत असली तरी कचरा कळंबा हद्दीतील रस्त्यावर टाकला जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीने नागरिकांना अटकाव करण्याची आवश्यकता असताना पदाधिकारी त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. दिवसेंदिवस कचरा रस्त्यावर टाकला जात असताना त्याकडे ग्रामपंचायत आणि महापालिका दोन्ही घटक दुर्लक्ष करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भालकर स्मारक प्रस्तावहेरिटेज कमिटीकडे देऊ’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केशवराव भोसले नाट्यगृहात दिवंगत दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे स्मारक उभारण्यासाठी महापालिकेच्या सभेत सदस्य ठराव करण्यात आला आहे. तो हेरिटेज कमिटीस सादर करण्यात येईल, असे महापौर माधवी गवंडी यांनी सांगितले. भालकर स्मारकाच्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी आयोजित समिती सदस्यांच्या बैठकीत त्यांनी माहिती दिली.

माजी महापौर सरीता मोरे यांनी भोसले नाट्यगृह येथे स्मारक करण्याचे नियोजन असून त्यासाठी बजेटमध्ये २५ लाखांची तरतूद केली असल्याचे सांगितले. समिती सदस्यांनी नाट्यगृहाजवळील खाऊ गल्लीतील कमानीजवळची जागेची पाहणी केली. पुन्हा याबाबत बैठक घेऊन जागा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेता विलास वास्कर, रिना कांबळे, शिक्षण सभापती श्रावण फडतारे, ईश्वर परमार, अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अखिल भारतीय मराठा चित्रपट महामंडळाचे सदस्य सतीश बीडकर, संग्राम भालकर, शिल्पकार किशोर पुरेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीपीतील कारभारावर शिवसेनेचे ताशेरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर शहरातील खराब रस्ते आणि नगररचना (टीपी) विभागातील भ्रष्ट साखळीचा पाढा शिवसेनेच्यावतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमोर वाचण्यात आला. सामान्य नागरिकांची टीपीतील अधिकारी गळचेपी करत असल्याचे शिष्टमंडळाच्यावतीने निदर्शनास आणून देत मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले. निवेदनात म्हटले आहे, 'शहरातील नेहमीच रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसते. रस्ते खराब होण्यास अतिवृष्टीचे कारण पुढे केले जात असले, तरी त्याला भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत. ठेकेदारांशी संगनमत करुन त्यांनी रस्त्यांची नेहमीच वाट लावली आहे. त्याचबरोबर टीपीमधील अधिकारी फाइलवर पैसे ठेवल्याशिवाय काम करत नाहीत. भ्रष्टाचार उघडून काढण्यासाठी पवडी व टीपीतील अधिकाऱ्यांची संपत्तीची चौकशी करुन त्याचा अहवाल संबंधीत विभागाला पाठवा. तसेच एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा.' यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, शशिकांत बिडकर, सुजीत चव्हाण, अवधुत साळोखे, दिलीप देसाई, दिलीप जाधव, रणजीत आयरेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्लास्टिक वापर टाळा, अन्यथा दंड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हार, बुके व फेरीवाल्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा अन्यथा सरकारच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाई करणात येईल,' असा इशारा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. फुल विक्रेते व फेरीवाल्यांच्या संयुक्त बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. 'अनेक फुल व फळे विक्रेते प्लास्टिक व नॉन व्होअन बॅगचा वापर करतात. प्लास्टिक पर्यावरणाला अत्यंत घातक असून त्यावर राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी प्लास्टिकचा वापर केल्यास प्रथम पाच हजार नंतर दहा हजाराचा दंड करण्यात येईल. तसेच तिसऱ्यावेळी २५ हजारांचा दंड करताना गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.' असे आयुक्तांनी सांगितले. बैठकीस आरोग्याधिकरी डॉ. दिलीप पाटील, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियदर्शिनी कंपनीतर्फे पूरग्रस्तांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोली औद्योगिक वसाहत येथील नेमिचंद संघवी ग्रुप तथा प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स लिमिटेड कंपनीतर्फे जिल्ह्यातील विविध गावातील पूरग्रस्तांना मदत वाटप करण्यात आले. एकूण पाच हजार लोकांना मदत वाटप करण्याचे नियोजन आहे. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांनाही मदतीचा हात दिला जाणार आहे.

दरम्यान पहिल्या टप्प्यात प्रयाग चिखली, आंबेवाडी, वडणगे, वरणगे, पाडळी, नवे पारगाव, निलेवाडी, शिरोली, निगवे, शिये, केर्ले, रुई, इचलकरंजी आदी गावांत मदत करण्यात आली. कर्नाटकातील जुगूळ गावांतही जीवनावश्यक साहित्य वितरित केले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नेमिचंद संघवी यांच्या मर्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. कंपनीचे संचालक शीतलकुमार संघवी, प्रीतम संघवी, वैशाली संघवी यांच्या उपस्थितीत प्रयाग चिखली येथे साहित्य वाटप केले. संघवी ग्रुप व कंपनीतर्फे जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदत कार्य राबविले जात आहे. आणखी काही दिवस मदत कार्य सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. एच आर विभागप्रमुख एस. जी. बुधले, महाव्यवस्थापक टी. के. सिंग, संदीप संकपाळ, उमेश मिश्रा, प्रसाद थोरात, प्रवीण लोंढे, महादेव पाटील, राकेश गवळी, कुणाल चौगुले हे मदत वाटप कामात सक्रिय आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित आघाडी-आवाडे गट साथ साथ ?

$
0
0

दोन सिंगल फोटो ... प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आवाडे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ' हा सहकारातील मूलमंत्र यंदा इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ पट्ट्यात राजकारणात अवलंबिला जात आहे. वंचित बहुजन आघाडी आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर ताराराणी आघाडीत या तीन मतदारसंघात एकत्र लढण्याची प्रक्रिया वेगावली आहे. विजयाचे आडाखे बांधण्यासाठी त्यांच्यामध्ये 'गिव्ह अँड टेक'चा फॉर्म्युला आकाराला येत आहे. इचलकरंजी व शिरोळ मतदारसंघात 'वंचित'ची साथ आवाडे गटाला आणि 'हातकणंगले'मध्ये वंचितच्या उमेदवाराला आवाडेंचा पाठिंबा हे सूत्र निश्चित होण्याचे संकेत आहेत.

दुसरीकडे शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी मतदारसंघात आवाडे गटाची ताकद असल्याने या जागा ताराराणी पक्षासाठी सोडाव्यात आणि जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात वंचित आघाडीला आवाडे गट पाठिंबा देईल असा एक मतप्रवाह आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 'वंचित'ला लक्षणीय मते मिळाल्याने या मतदारसंघावर ते हक्क सांगत आहेत. हातकणंलेतून लढण्यासाठी वंचितकडे १४ जणांनी तयारी दर्शविली आहे. येत्या दोन दिवसांत दोन्ही आघाड्यांतर्फे कोण कुठल्या मतदारसंघातून लढणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्याभरात वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व 'ताराराणी' चे नेते प्रकाश आवाडे यांच्या दोन बैठका झाल्या.

इचलकरंजीसह हातकणंगलेसाठी आवाडे गट प्रयत्नशील आहे. कारण याच मतदारसंघात आवाडे यांची जुन्या मतदारसंघातील १३ गावे समाविष्ठ आहेत. या मतदारसंघात आवाडे यांच्या संस्था आहेत. शिवाय त्या १३ पैकी १२ गावात आवाडे गट सत्तेत आहे. यामध्ये माणगाव, साजणी, तिळवणे, रुई, इंगळी, पट्टणकोडोली, यळगूड, तळंदगे, हुपरी, जंगमवाडी, रांगोळी, रेंदाळ या गावांचा समावेश आहे. यापैकी चार ते पाच ठिकाणी ते अन्य घटकांसमवेत सत्तेत आहेत, तर उर्वरित ठिकाणी आवाडे गटाकडे बहुमत आहे. या गावात मिळून जवळपास ४० हजार मतदार आवाडे यांना मानणारे असल्याचा दावा केला जातो. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर आवाडे गट प्रतिनिधीत्व करत आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार अस्लम सय्यद यांना ४१,२०० मते पडली होती. लोकसभा निवडणुकीतील प्राप्त मतांमुळे 'वंचित'चा आत्मविश्वास दुणावला आहे. यामुळे ते हातकणंगलेसाठी आग्रही आहेत. लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 'वंचित'च्या उमेदवारांना १७,२४८ तर शिरोळमध्ये २०,४४२ मते पडली होती याकडेही कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत. या तीनही ठिकाणी वंचितच्या मतांना महत्व राहणार आहे.

आवाडे यांच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी यंदाची निवडणूक महत्वाची आहे. इचलकरंजी मतदारसंघ हा त्यांचा होम पिच समजला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत आवाडे यांना ७०,०३८ इतकी मते मिळाली होती. इचलकरंजीत त्यांना मानणारा मोठा गट आहे. शहरातील नागरिकांचा कानोसा घेऊन त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इचलकरंजीतील काँग्रेस दुभंगली. काँग्रेस नगरसेवकांतही दोन गट आहेत. यंदा निवडणूक जिंकायचीच या इराद्याने आवाडे गट व्यूहरचना आखत आहे. वंचित आणि आवाडे गट एकत्र आल्यास वेगळ्या निकालाची शक्यता कार्यकर्त्यांनी गृहित धरली आहे.

...

राजकीय पक्षाच्या

मान्यतेसाठी प्रयत्न

आवाडे यांनी कोल्हापूर ताराराणी आघाडीची नोंदणी केली आहे. विधानसभेला सामोरे जाताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे 'ताराराणी पक्ष'म्हणून मान्यता मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडी पन्हाळ्यात ‘कांटे की टक्कर’

$
0
0

दोन सिंगल फोटो सत्यजित पाटील, विनय कोरे

sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर

शाहूवाडी- पन्हाळा मतदारसंघात विद्यमान आमदार सत्यजित पाटील यांनी गड राखण्यासाठी कंबर कसली आहे तर गतनिवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी मंत्री विनय कोरे सरसावले आहेत. गतनिवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या बिनीच्या शिलेदारांच्या माथी गुलाल लावत कोरे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तरुणांत कार्यसम्राट आमदार म्हणून क्रेझ असलेल्या सत्यजित पाटील यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

तालुक्याचे राजकारण गायकवाड, सरूडकर आणि आता कोरे गटांशी संबंधित राहिले आहे. मतदारसंघात कर्णसिंह गायकवाड, मानसिंगराव गायकवाड गटाची ताकद कमी असली तरी निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. सध्या मानसिंग गायकवाड गट विद्यमान आमदारांच्या पाठीशी ठाम आहे. मानसिंग गायकवाड यांचे चिरंजीव रणवीरसिंग यांनी शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद लढवली होती. त्यामुळे सेनेचा हात धरण्याशिवाय त्यांच्या गटाकडे दुसरा पर्याय नाही.

दुसरीकडे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून दिवंगत आमदार संजयसिंह गायकवाड यांचा वारसा चिरंजीव कर्णसिंह यांनी चालवला आहे. दोनदा काँग्रेसच्या तिकिटावर खिंड लढवली. पदरी अपयश आल्याने आणि गटाची पडझड झाल्याने त्यांनी विद्यमान आमदारांना विरोध म्हणून कोरेंच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अप्रत्यक्षरीत्या सत्यजित पाटलांना पराभूत करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. भाजपचा घटक पक्ष म्हणून सत्तेत सहभागी झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन महत्त्वाची पदे मिळाली. त्यात कोरेंनी कर्णसिंह यांना यंत्रमाग महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन आपल्याकडे खेचले. वडगावच्या भाई भारत पाटलांना शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. आघाडीचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांच्याकडून मनधरणी चालू आहे. त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.

मतदारसंघात दोन नगरपालिका येतात. पन्हाळा नगरपालिकेवर जनसुराज्यची तर मलकापुरात जनसुराज्यच्या मदतीने भाजप सत्तेत आहे. पन्हाळ्यात दोनवेळा अमर पाटील यांनी विधानसभा लढवली. यंदा ते कोरे गटात सामील झाले आहेत. कोडोलीचे भारत पाटील उभे राहण्याची शक्यता आहे. मतविभागणीसाठी विद्यमान आमदार त्यांना पाठबळ देतील अशी शक्यता आहे. बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचीही सोबत आमदार सत्यजित पाटील यांना मिळाल्यास ती जमेची बाजू राहील.

विधानसभेसाठी भाजप शिवसेनेची युती झाल्यास विद्यमान आमदारांना त्याचा फायदा होईल. मात्र, युती तुटल्यास त्यांच्यासमोर आव्हान असेल. तरुणांची सोबत ही सत्यजित पाटील यांच्यासाठी जमेची बाजू आहे. सत्तेचे केंद्रीकरण, औद्योगिकरणाला फाटा, बेरोजगारी, उच्च शिक्षणाच्या संधीचा अभावया बाबी आमदारांना तोट्याच्या ठरणार आहेत. मतदारसंघात ९७५ कोटींची विकासकामे केल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे माजी मंत्री कोरे यांना विविध संस्थांमधील नाराज कामगारांचा फटका बसू शकतो. पन्हाळ्यातील अंतर्गत वाद मिटवता आले तर ते त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल.

...

२०१४ चे मतदान

सत्यजित पाटील (शिवसेना): ७४ हजार ७०२

विनय कोरे (जनसुराज्य): ७४ हजार ३१४

कर्णसिंह गायकवाड (काँग्रेस): २१ हजार ३००

अमर पाटील (स्वाभिमानी): २७ हजार ९५३

बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी): ४ हजार ६७१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे ९५ कर्मचारी निवडणूक शाखेकडे वर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेचे ९५ कर्मचारी निवडणूक शाखेकडे सोमवारी वर्ग करण्यात आले. उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी ७५ व दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी २० अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन कामकाजामध्ये सहभागी होतील. उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, अधीक्षक व वरिष्ठ लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा पदभार तात्पुरत्या स्वरुपात अन्य कर्मचाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेने महापालिकेकडील आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. शहरातील उत्तर व दक्षिण मतदारसंघाच्या कार्यालयीन कामकाजासाठी अनुक्रमे ७५ व २० कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी सर्व अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी हजर झाले. त्यामध्ये उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रावसाहेब चव्हाण, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे, महादेव फुलारी, अरुण गुजर, उमेश बागुल, अधीक्षक सुधाकर चल्लावाड, सुनील बिद्रे, अशोक यादव, विधी अधिकारी संदीप तायडे यांच्यासह वरिष्ठ लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पैरा’ फेडण्याच्या हालचालींना ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीत 'आमचं ठरलयं' म्हणून पक्ष आणि आघाडी धर्माच्या पुढे जाऊन विरोधी उमेदवारांना पाठिंबा दिला. त्या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत पैरा फेडण्याची घोषणा झाली. मात्र राज्य पातळीवर शिवसेना आणि भाजपमधील युतीचा फैसला होण्याअगोदर परस्पर पाठिंबा देण्याच्या हालचालींना शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन तात्पुरता 'ब्रेक' लावण्यात आला आहे. शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीला पक्षाकडून स्पष्ट सूचना केल्याचे वृत्त आहे. पैरा फेडण्यावरुन कोल्हापूर दक्षिण, कागल आणि चंदगड तालुक्यात नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची आघाडी झाली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची अद्याप घोषणा झालेली नाही. दोन्हीकडील नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यामुळे युतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जागा वाटपावरुन बिनसले तर भाजप, शिवसेनेकडून स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू आहे.

दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीतील मदतीची परतफेड करण्यासाठी जिल्ह्यातील काही नेते पुढे सरसावले आहेत. त्यांनी पक्षीय चौकट ओलांडून पाठिंबा जाहीर केला. कोल्हापूर दक्षिण, चंदगड आणि कागल तालुक्यात लोकसभा निवडणुकीत वेगळी समीकरणे आकाराला आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंडळींनी व्यूहरचना आखली. स्थानिक राजकारणाचे संदर्भ, महाडिक कुटुंबांकडून मतदारसंघातील हस्तक्षेप आणि राजकारणातील जुने हिशेब चुकते करण्यासाठी अनेकांनी उघडपणे भूमिका घेतली आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला.

दरम्यान, शिवसेना भाजप युतीबाबत २९ सप्टेंबरपर्यत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपशी युती झाली नाही तर प्रत्येक जागा महत्वाची ठरणार आहे, हे जाणून शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन स्थानिक नेत्यांना अन्य उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये, अशी सूचना केली आहे. युतीबाबत निर्णय होईपर्यंत पाठिंब्याची घोषणा आणि अन्य उमेदवारांच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शवू नये, असेही संबंधितांना कळविले आहे. यामुळे पक्षीय, युती व आघाडीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करु पाहणाऱ्यांच्या हालचाली सध्या थंडावल्या आहेत. कोल्हापूर दक्षिण, चंदगड आणि कागल येथे पैरा फेडण्याच्या चर्चा वेगावल्या होत्या. युती न झाल्यास काही नेत्यांनी या मतदारसंघात कुणाकुणाचा पैरा फेडायचा यावरुन कोंडी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी महाराज पुतळ्याला कोरीव दगडांचे संरक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या लोखंडी ग्रीलला मागील आठवड्यात दोनवेळा अवजड वाहनाने धडक दिल्याने पुतळ्याच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटनांना अटकाव करण्यासाठी पुतळ्याच्या तीनही बाजूने कोरीव दगडांचे एक ते दीड फूट उंचीचे संरक्षण देण्यात येणार आहे. सायंकाळी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

सुशोभीकरणानंतर पर्यटकांसह स्थानिकांचे आकर्षण ठरत असलेल्या शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या संरक्षक ग्रीलला दोनवेळा अज्ञात वाहनाने धडक दिली. रात्रीच्यावेळी झालेल्या घटनेमुळे पुतळ्याच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुशोभीकरण अबाधित राहण्याबरोबरच पुतळ्याला कोणतीही इजा पोहोचू नये, त्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल याबाबत सायंकाळी शहर अभियंत्यांनी पाहणी केली. यावेळी ठेकेदार सुरज जाधव यांच्यासह शिवसेनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. पुतळ्याला संरक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज व जिजाऊसाहेब महाराज यांच्या पुतळ्यासोभवती असलेल्या कोरीव दगडी बांधकामाप्रमाणे एक ते दीड फूट उंचीचे दगड उभा करण्याचा निर्णय घेतला. कोरीव व सुबक आकारातील दगड बसवणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवाले गेले, रिक्षावाले आले

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई मंदिराच्या पश्चिम दरावाजामधील व ताराबाई रोडवरील मित्रप्रेम मंडळापर्यंतच्या फेरीवाल्यांना शनिवारी हटवण्यात आले. फेरीवाल्यांचे कपिलतीर्थ मार्केटमधील पार्किंगमध्ये पुनर्वसन करण्यात आले. पण फेरीवाल्यांना हटवल्यानंतर ताराबाई रोडवर रिक्षावाल्यांनी ठाण मांडले आहे. फेरीवाल्यांना हटवल्यामुळे प्रशस्त झालेला रस्ता रिक्षावाल्यांनी अडवून ठेवला आहे. परिणामी 'फेरीवाले गेले आणि रिक्षावाले आले' अशी स्थिती अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर झाली आहे.

अंबाबाई मंदिराच्या पश्चिम दरवाजापर्यंत आवळे, चिंचा, बांगडी व लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य विक्रीसाठी फेरीवाले बसलेले असतात. फेरीवाल्यांमुळे दरवाजातून भाविकांना प्रवेश करणेही मुश्किल बनते. रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी पश्चिम दरवाजासह ताराबाई रोडवरील मित्रप्रेम मंडळापर्यंतचे अतिक्रमण हटवण्यात आले. अतिक्रमणविरोधी मोहिमेला फेरीवाल्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे वादावादीही झाली, पण कारवाईवर महापालिका अधिकारी ठाम राहिले. त्यामुळे ताराबाई रोड मोकळा झाला. अतिक्रमणानंतर फेरीवाल्यांचे कपिलतीर्थ मार्केटच्या पार्किंगमध्ये पुनर्वसन करण्यात आले. रस्त्यावरील सर्व फेरीवाल्यांना हटवल्यानंतर रस्ताही प्रशस्त दिसू लागला.

फेरीवाल्यांना हटवून फक्त एकच दिवस झाला असताना सोमवारी याच रस्त्यावर रिक्षावाल्यांनी ठाण मांडले. इतरवेळी एक ते दोन दिसणाऱ्या रिक्षांची सोमवारी चांगलीच रांग लागली होती. सर्व रिक्षा वाहतुकीला अडथळा ठरतील अशा ठिकाणी उभा असल्याने अन्य वाहनांना त्यातून मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागत होती. ताराबाई रोडवरुन फेरीवाल्यांना हटवल्यानंतर रस्ता मोकळा राहील याची खबरदारी वाहतूक शाखेने घेण्याची आवश्यकता होती. पण वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे एका दिवसांत रिक्षावाल्यांची संख्या वाढली. फेरीवाल्यांना हटवल्यानंतर दुपारपर्यंत अतिक्रमण विभागाचे पथक रस्त्यावर थांबून असते. त्यामुळे पुन्हा फेरीवाल्यांनी रस्त्यावर बसण्याचे धाडस केलेले नाही. मोकळ्या झालेल्या रस्त्यावर रिक्षा थांबू लागल्याने अतिक्रमण निर्मूलन कारवाई कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.

...

चौकट

फेरीवाल्यांनी घेतली

शहर अभियंत्यांची भेट

ताराबाई रोडवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई केल्यानंतर फेरीवाल्यांचे कपिलतीर्थ मार्केट येथे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे ताराबाई रोडवरील फेरीवाल्यांचा प्रश्न संपुष्टात आला अशी स्थिती निर्माण झाली होती. पण एका दिवसांत फेरीवाले विविध मार्गाने महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुन्हा रोडवर बसण्याची परवानगी मागू लागले आहेत. सायंकाळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे शिवाजी महाराज पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले असता, तेथे फेरीवाल्यांनी त्यांची भेट घेतली. पण सरनोबत यांनी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर बसू देणार नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील १५९ फलक हटवले

$
0
0

कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील १५९ बॅनर आणि डिजीटल फलक हटवले. राजकीय पक्षांच्या डिजीटल फलकांसोबत अनेक मंडळांचे वार्ताफलक बंदिस्त करण्यात आले. मंगळवारीही फलक हटवण्याची मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही शहरातील अनेक महत्वाच्या चौकांसह अन्य ठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर, डिजीटल फलक, झेंडे आणि वैयक्तिक स्वरुपातील वाढदिवसाचे फलक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याने निवडणूक आयोगाने फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने फलक हटवण्यास सुरुवात केली. दिवसभरात १०० बॅनर व ५९ डिजीटल फलक हटवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव ऑक्टोबरमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दहावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. देशातील सहा राज्यात २८ शहरांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने हा महोत्सव आयोजित केला जातो. यंदा, प्लास्टिकला नकार, वसुंधरेला होकार या मध्यवर्ती संकल्पनेवर महोत्सवातील चित्रपट प्रदर्शनासह स्पर्धा, प्रदर्शनांचे आयोजन केले आहे,' अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष उदय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 'प्लास्टिकबंदीच्या कायदा निर्मितीमध्ये सहभागी असलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. खडकवासला धरणाच्या पुनरुज्जीवनासाठी झटणारे निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे. तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना श्रीमंत संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते वसुंधरा सन्मान, वसुंधरा मित्त व वसुंधरा गौरव या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे महोत्सवातील सर्व कार्यक्रम होणार आहेत. यापूर्वी, वाघ वाचवा, जैव विविधता वाचवा, पर्यावरणपूरक जीवनशैली, जलसंवर्धन..भविष्य रक्षण, रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकव्हर, शून्य कचरा, माझे शहर...स्मार्ट शाश्वत शहर, नदी वाचवा जीवन वाचवा, प्रदूषण रोखा या संकल्पनांवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा प्लास्टिकला नकार, वसुंधरेला होकार या संकल्पनेला पूरक उपक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.'

महोत्सवात 'प्लास्टिक बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी: अडथळे व उपाय','प्लास्टिक वेष्टणाला पर्याय' याविषयावर परिसंवाद होणार आहे. कागदी पिशव्या बनवा, कागदी फोल्डर बनवा व पर्यावरणपूरक खेळणी तयार करा या विषयावर खुल्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी आलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन व छायाचित्र प्रदर्शन, हेरीटेज वॉक, अभ्यास सहली व व्याख्याने असे कार्यक्रम होणार आहेत.

या महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठ, केआयटी कॉलेज, सायबर, न्यू आर्किटेक्ट कॉलेज, दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेज यांचा सहभाग आहे. तर किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड उद्योग समूह व पर्यावरण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते संयोजन करत आहेत.

महोत्सवातील स्पर्धा, उपक्रम यामध्ये सहभागी होण्यासाठी अनिल चौगुले ९४२३८५८७११ किंवा वीरेश शिवपूजी ९७६२९४७४७६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस किर्लोस्कर ऑइल इंजिनचे सहाय्यक उपाध्यक्ष धीरज जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक रमेश चव्हाण, एम.ई. कोयल, राहुल पवार, भाऊसाहेब सूर्यवंशी, विजय टिपुगडे, ऐश्वर्या मुनीश्वर, अनिल गुरव, केदार मुनीश्वर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०० सुरक्षारक्षक, ६० कॅमेरे

$
0
0

२०० सुरक्षारक्षक

६० सीसीटीव्ही कॅमेरे

१५ बिनतारी संदेश यंत्रणा

१०० हँडमेटल डिटेक्टर

२ लाख लाडूप्रसाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात २०० सुरक्षारक्षकांसह ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात नवरात्र काळात होणाऱ्या गर्दीत भाविकांच्या सुरक्षेसाठी यावर्षी सुरक्षाकुमक वाढवण्याबाबत देवस्थान समितीच्यावतीने पोलिस प्रशासनाला प्रस्ताव देण्यात आला आहे. दरम्यान, मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात झाली असून आज मंगळवारी सकाळी ११ वाजता अंबाबाईचे पूजा साहित्य व दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. सोमवारी मंदिर परिसरात अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

रविवारी (ता.२९) घटस्थापनेपासून अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाचे पारंपरिक विधी सुरू होणार आहेत. पहिल्या दिवसापासूनच अंबाबाईच्या दर्शनासाठी परगावच्या शहरातून भाविक येतात. तसेच नवरात्रकाळात स्थानिक भाविकांची संख्याही वाढते. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, देवस्थानचे सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिस प्रशासन, होमगार्ड यांची २०० जणांची टीम तैनात ठेवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजातून दर्शनरांगेद्वारे भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत असल्याने याठिकाणी दोन मेटल डिटेक्टर दरवाजे कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. तसेच याठिकाणी पोलिसांची कुमक वाढवण्यात येणार आहे. उत्सवकाळात मंदिर परिसरात चारही दरवाजाबाहेर पोलिसांचा खडा पहारा असेल. पूर्व दरवाजाबाहेर दोन व अन्य तीन ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे पाच डीएफएमडी यंत्रणा म्हणजे मेटल डोअर डिटेक्टर असणार आहेत. गेटवरील प्रत्येक सुरक्षारक्षकाकडे हॅन्ड मेटल डिटेक्टर असणार आहेत. बिनतारी संदेश यंत्रणेचे १५ संच कार्यान्वित असणार आहेत. याशिवाय शेतकरी संघ व राजवाडा पोलिस स्टेशन अशा दोन ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा कक्ष सतर्क ठेवण्यात येणार आहेत.

अंबाबाई मंदिरात उत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून सोमवारी दुपारी मंदिर परिसरातील उद्यानात अग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अचानक आग लागली, तर ती विझवायची कशी, हे यावेळी दाखविण्यात आले. तसेच मंदिराच्या आवारातील विद्युत तारांची पाहणी करण्यात आली. मंदिराच्या स्वच्छतेसाठी आधुनिक मशीनसह मंदिर धुलाई करण्यासाठी संजय मेंटेनन्सचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. २५ जणांची टीम मंदिराचा बाह्यपरिसर व गाभारा येत्या तीन दिवसांत स्वच्छ करणार आहेत. तर नवरात्रकाळात पावसाची शक्यता गृहीत धरून दर्शनरांगेत पत्र्याच्या शेडसह मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षीही दर्शनरांगेतील भाविकांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी देवस्थान समितीच्यावतीने नियोजन केले आहे. नवरात्रकाळातील ललितापंचमी, अष्टमीची नगरप्रदशिणा या महत्त्वाच्या दिवसांच्या विधीची तयारी पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.

दोन लाख लाडू प्रसादाची तयारी

नवरात्रोत्सवात देवस्थान समितीच्यावतीने भाविकांना लाडूप्रसाद सुविधा उपलब्ध केली आहे. नऊ दिवसांसाठी दोन लाख लाडू बनवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अंबाबाईच्या प्रसादाचे लाडू बनवण्याचे काम कळंबा कारागृहातील महिला कैद्यांना दिले जाते. लाडू विक्रीतून महिला कैद्यांना रोजगारही मिळाला आहे. यावर्षीच्या लाडू प्रसादाची तयारी करण्यासाठी १०० महिला कैद्यांना काम सोपवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. रवींद्र भारती-झुटिंगयांचा राजीनामा

$
0
0

डॉ. रवींद्र भारती-झुटिंग

यांचा राजीनामा

सातारा : काँग्रेसचे सातारा शहराध्यक्ष व नगर परिषदेच्या विविध समित्यांचे माजी सभापती डॉ. रविंद्र भारती-झुटींग यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. झुटींग गेली १९ वर्ष काँग्रेस पक्षाचे काम करीत होते. सातारा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष, सातारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. भविष्यातील वाटचाली बाबत लवकरच निर्णय घेणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

......

......

वडूज आगारात ठिय्या आंदोलन

सातारा

वेळेत बस सोडत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वडूज आगारात ठिय्या आंदोलन करून आगारातील सर्वच बसेस अडवल्या. अचानक झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. बोंबाळे (ता. खटाव) गावाकडे जाणारी एसटीचे वेळापत्रक कोलमडून गेले असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासासह शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या बाबत त्यांनी अनेक वेळा प्रशासनाला याची कल्पना दिली होती. डांबेवाडी, बोंबाळे, डाळमोडी, निसळबेंद गावच्या विद्यार्थ्यांनी थेट वडूज आगाराकडे मोर्चा वळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापुरात मुसळधार पावसाने दाणादाणरविवारी रात्री ११८ मि.मी पावसाची नोंद

$
0
0

सोलापुरात मुसळधार पावसाने दाणादाण

रविवारी रात्री ११८ मि.मी पावसाची नोंद

सोलापूर

सोलापूर शहरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. दोन तासांत सुमारे ११८ मिलीमीटर पाऊस पडल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मंगळवार पेठ, मोदी, भैय्या चौक, कुमार चौक, अवंती नगरी या भागामध्ये पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग पूर्णतः बंद झाल्याने शहरवासियाची तारांबळ उडाली.

दोन तासांत तब्बल ११८ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हा पाऊस शहर परिसरातच पडला. पावसाने काहीवेळ शहर जलमय झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी रात्रीच्या सुमारास शहरात फिरून परिस्थितीची पाहणी केली. दिवसभर पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. उन्हाचा कडाका आणि उखाडा जाणवत होता. मात्र, सायंकाळी आभाळ भरून आले आणि रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विजेच्या प्रचंड गडगडाटासह आडवा तिडवा बेफाम पाऊस सुरू झाला. पावसाचे रुद्ररूप पाहून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास दीड ते दोन तासांत पावसाने हाहाकार माजवला. निराळे वस्ती, लष्कर भागातील नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने आणि त्यातील पाणी थेट रस्त्यावर येऊन आजूबाजूच्या घरात शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. वैदू वस्ती येथे रात्रीच्या सुमारास मोठे झाड घरावर पडले. पूर्व भागात एक दुचाकी नाल्यात वाहून ती सकाळी एका ठिकाणी सापडली. रात्रीच्या पावसाने अद्यापही शहरातील प्रमुख चौक पाण्यातच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक आव्हानांचा यशस्वी सामना केला

$
0
0

आर्थिक आव्हानांचा यशस्वी सामना केला

दि कराड अर्बन को. ऑप. बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांचे प्रतिपादन

कराड :

'दि कराड अर्बन को. ऑप. बँकेने आजवरच्या शतकोत्तर वाटचालीत काळानुरूप आलेल्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. अनुभवातून नवीन प्रेरणा व चैतन्य मिळवून बँकेचा पाया अधिकच भक्कम केला आहे. शतकपूर्ती करणाऱ्या या बँकेची आता शतकोत्तर वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सभासद, खातेदार, ठेवीदार व कर्जदारांसह प्रशासन व संचालक मंडळाचे मोठे योगदान आहे,' असे प्रतिपादने बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी केले.

रविवारी दुपारी कराड अर्बन बँकेची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील पंकज मल्टीपर्पज हॉल येथे बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव आणि सर्व संचालकांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एरम म्हणाले, 'बँकिंग क्षेत्रामध्ये नोटाबंदी, जीएसटी कर प्रणाली, थकीत कर्जांमुळे हा कालखंड अत्यंत आव्हानात्मक राहिला आहे. या पार्श्वभूमीवरती मार्च २०१९अखेर बँकेने केलेली कामगिरी उत्तम आहे. गतवर्षी सरकारी कर्जरोखे व्यवहार बाजारातील चढ-उतारांमुळे कराव्या लागलेल्या तरतुदींची रक्कम प्रमाणापेक्षा जास्त असल्याने बँकेला ३१ कोटी रुपयांच्या व्यावहारिक जमा खर्चामुळे तोटा झाला होता. मात्र केवळ एक वर्षांच्या अल्पावधीतच बँकेने या तोट्यापैकी ७० टक्के तोटा भरून काढला आहे. जून २०१९अखेर तोट्याची उर्वरित रक्कम भरून काढणारा ढोबळ नफा देखील बँकेने मिळविला आहे.'

मार्च २०१९अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ४५६० कोटी रुपये असून, ४५.५५ कोटी रुपयांचा ढोबळ तर आयकर व इतर तरतुदी वजा जाता २१.४२ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या २१ शाखांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे. सभासद संख्येत २२१२ने वाढ झाली आहे. भाग भांडवलामध्ये ४.६१ कोटींची वाढ झाली आहे, असेही एरम म्हणाले.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड काँग्रेसला मोठे खिंडार

$
0
0

कराड काँग्रेसला मोठे खिंडार

कराड :

कराड परिसरातील कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटांतील अनेक स्थानिक नेत्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी माजी खासदार किरीट सोमय्या, सुजितसिंह ठाकूर, प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, अतुल भोसले आदी उपस्थितीत होते.

काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र व काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक सुनील पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर. टी. स्वामी, संतकृपा उद्योग समुहाचे संस्थापक अशोकराव भावके, विंगचे माजी सरपंच वसंतराव शिंदे, विजयनगरचे सरपंच सचिन मोहिते, उपसरपंच विश्वास पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे, विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या उंडाळेच्या उपसरपंच अनुसया शेवाळे, गोवरेचे माजी उपसरपंच निसार मुल्ला, माजी नगरसेवक हरिभाऊ जोशी, आरपीआय अध्यक्ष आप्पासो गायकवाड, गोवरे सोसायटीचे चेअरमन सतीश पवार, गोवरे ग्रा. पं. सदस्य गणेश जाधव, मुंढेचे उपसरपंच भीमराव जमाले, गोवरे ग्रा. प सदस्य रशीद मुल्ला, पवारवाडीचे सरपंच लक्ष्मण धोत्रे, नितीन पाटील, विकास कुंभार, अभिजित पवार, रमेश जगताप, अवधूत डुबल, सागर डुबल, अर्जून हुबाले, आशिष माने, अमोल चव्हाण, प्रशांत चव्हाण, सचिन पवार, दिलीप पवार, डॉ. प्रकाश पाटील, चंद्रकांत शेवाळे, सुनील जाधव, कुलदीप निकम, मारुती शेवाळे, उत्तमराव साळुंखे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफआरपी न दिलेल्यांना परवाने देऊ नका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत एफआरपी आणि १५ टक्के व्याज दिल्याशिवाय आगामी साखर हंगामात कोणत्याही साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात येऊ नयेत, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. तसेच तीन टप्प्यातील एफआरपीप्रश्नी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना विचारणा करण्यात आली.

अंकुश, जय शिवराय किसान संघटना व बळीराजा शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज सोमवारी पुणे येथे साखर आयुक्त गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी १५ टक्के व्याजाबाबत कारखान्यांवर स्वतंत्र कारवाई या महिनाअखेरीस करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. साखर संघाने एक डिसेंबरला गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे. पण १० नोव्हेंबरपूर्वी हंगाम सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

शिष्टमंडळात धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, बी. जी. पाटील, मनोज राजागिरे, दत्तात्रय जगदाळे, विकास शेसवरे, सुनील चोपडे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ पासून ‘सेव्ह माय हार्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्याचे ताणतणावाचे जीवन, दैनंदिन जीवनात नागरिकांची होणारी धावपळ यामुळे आरोग्य विषयक तक्रारी वाढत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, अनेक नागरिक हे हृदयविकारांनी त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागृती आणि हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंबंधी महाराष्ट्र टाइम्स आणि माधवबाग क्लिनिक यांच्यातर्फे संयुक्त आरोग्य विषयक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 'सेव्ह माय हार्ट'या संकल्पनेनुसार हा मोफत आरोग्य विषयक उपक्रम होत आहे.

माधवबाग क्लिनिक, धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलसमोर ताराबाई पार्क व माधवबाग क्लिनिक क्रशर चौक सानेगुरुजी वसाहत रोड या दोन ठिकाणी शिबिर होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर २९ सप्टेंबर हा जागतिक हृदयदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी सर्वत्र आरोग्य विषयक उपक्रम, हृदयरोगाविरोधात प्रबोधन आणि हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या अनुषंगाने आरोग्य कार्यक्रम होतात. नागरिकांना आरोग्य विषयक नेमक्या टिप्स मिळाव्यात, त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निरसन व्हावे, यासाठी 'मटा'व 'माधवबाग' यांनी 'सेव्ह माय हार्ट'ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या आरोग्य शिबिरात हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी आणि गरज पडल्यास ईजीसी या सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. याशिवाय रक्तवाहिन्यातील अडथळे, ब्लॉकेजेस, मधूमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व मोफत सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांनी तपासणीसाठी येताना जुने रिपोर्टस व औषधे घेऊन यावेत. शिबिराचा कालावधी हा रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा असा आहे. या मोफत तपासणी शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी शिबिरासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी ताराबाई पार्कातील माधवबाग क्लिनिकच्या ८०५५८४६७७७ व क्रशर चौकातील माधवबाग क्लिनिकच्या ९७३०६०७३९१ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपाससंबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या शिबिरात बॉडी मास इंडेक्सची (बीएमआय) मोफत तपासणी होणार आहे. शिवाय ज्यांची यापूर्वी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास झाली असेल किंवा करायला सांगितले आहे अशा रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>