Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कृष्णावर फक्त पन्नास कोटींचे कर्ज

$
0
0

अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

'कारखान्यावरील ५० कोटींचे मध्यम मुदतीचे कर्ज वगळता कोणतेही कर्ज नाही. आम्ही सभासदांना अक्रियाशील ठरवणार नाही. घटनादुरुस्तीनुसार आलेल्या आदेशाने सभासदांना नोटीस दिल्या आहेत. या बाबतच्या अटी शिथिल केल्या आहेत. प्रति मेट्रीक टन ५० रुपये मागील ऊसबिलाची तरतूद झाली आहे. ती आम्ही आताही देऊ शकतो. परंतु, ते बील दिवाळीसाठी ठेवले आहे. त्यामध्ये तीस रुपयांची वाढ करून एकूण ८० रुपयांचे बील दिवाळीत देणार आहे,' अशी ग्वाही कृष्णेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६३व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. दरम्यान पुढील वर्षी कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सभेस विरोधक उपस्थित राहून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतील, अशी अपेक्षा होती. परतु, सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करीत सभा शांततेत पार पडली. व्यासपीठावर अतुल भोसले, जगदीश जगताप, लिंबाजी पाटील आणि संचालक उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी विचारलेल्या १६ लेखी प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, प्रश्न विचारणाऱ्या अविनाश मोहिते यांचे मी धन्यवाद मानतो. गेल्या चार वर्षांत त्यांनी तोंड उघडले नव्हते. सभासदांना पाठवलेल्या नोटीसद्वारे सभासद रद्द होऊ शकत नाहीत. सभासदांनी पाच वर्षांतून किमान एकवेळ सभेस उपस्थित रहावे व एकवेळ ऊस द्यावा, अशी अट आहे. सभेस उपस्थित राहण्याची व ऊस घालण्याची अट शिथिल केली आहे. एकूण ३७२० सभासदांना नोटीस दिल्या आहेत. त्यापैकी ३९७ मृत सभासद आहेत. १६२१ सभासदांनी गेली बारा वर्षे कारखान्याला ऊस दिलेला नाही. १४४३ सभासदांनी दहा वर्षे ऊस घातलेला नाही. प्रश्न विचारणाऱ्यांच्या सत्तेच्या काळापासून ही परिस्थिती आहे. दरम्यान, सभा सुरू झाल्यानंतर प्रवेश गेटवर माजी अविनाश मोहिते समर्थकांसह थांबून होते. समर्थकांना ओळखपत्र असल्याशिवाय आत येऊ न दिल्यामुळे जोरदार घोषणाबाजी झाली. सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्याने वातावरण तापले. पोलीस यंत्रणेने मोहिते समर्थकांना रोखल्यानंतर वातावरण शांत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आशा’ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन हजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना राज्य सरकारकडून दरमहा दोन हजार रुपयांचे अतिरिक्त मानधन दिले जाईल. यासंदर्भात तत्काळ आदेश लागू करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. राज्य सरकारच्या निर्णयाला प्रतिसाद देत आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी तीन सप्टेंबरपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. मंगळवारपासून (ता.१७) आशा वर्कर्स कामावर रुजू होणार आहेत. संपूर्ण राज्यभरात ७० हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार कर्मचारी संपात सहभागी झाले होते.

आशा वर्कर्सला दहा हजार, गटप्रवर्तकांना १५ हजार मानधन मिळावे आणि सरकारी सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन सुरू होते. सध्या आशा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून २५०० आणि गटप्रवर्तकांना आठ हजार मानधन मिळते. दरम्यान, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनने मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.

रात्री पंचशील हॉटेल येथे युनियनच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, संगीता पाटील, उज्ज्वला पाटील, सुरैय्या तेरदाळ, विमल अतिग्रे, ज्योती तावरे आदींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली. 'सरकारकडून सन्मानजनक निर्णय अपेक्षित होता. अपेक्षित वाढ नसली तरी राज्याकडून २००० रुपयांचे मानधन सुरू झाले हे ही नसे थोडके', अशी प्रतिक्रिया नेत्रदीपा पाटील यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठात पीएचडीसाठी ३४८७ अर्ज

$
0
0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनाचा टक्का येत्या काही वर्षांत वाढणार आहे. पीएचडी पदवीसाठी यंदा आलेल्या ३४८७ अर्जांपैकी सर्वाधिक अर्ज विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील विद्यार्थ्यांचे आहेत. सामाजिक शास्त्र व भाषा या विषयांच्या तुलनेत अभियांत्रिकी, शास्त्र, वस्त्रोद्योग, नॅनोसायन्स, संख्याशास्त्र याविषयातील संशोधनाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे या प्रवेशअर्जांवरून स्पष्ट होत आहे.

शिवाजी विद्यीठातील विविध ४२ विषयांच्या एम. फिल., पीएचडी प्रवेशप्रक्रिया बुधवारी (ता. १८) पासून सुरू होणार आहे. २० सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर, सांगली व सातारा येथील केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. यंदा पीएचडीच्या ७०३ जागांसाठी तीन हजार ४८७ अर्ज आले असून एम. फिलच्या १८८ जागांसाठी १०२ अर्ज दाखल झाले आहेत. पीएचडी व एम.फिल. या दोन्ही प्रवेशपरीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९४१ असून एकूण ४५३० विद्यार्थी एम.फिल. व पीएचडी पदवीसाठी प्रवेशपरीक्षा देणार आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील संशोधनाला भविष्यात स्टार्टअप, कौशल्य विकास या संकल्पनेच्या आधारे निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये संधी असल्याने या विषयातील संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. संशोधन समाजयोगी होण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधनातून मांडलेल्या गृहितकांवर प्रत्यक्ष काम करण्यासाठी विपुल पर्याय असल्याचे संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या विषयांमधून अधोरेखित होत आहे.

यावर्षी पीएचडीसाठी असलेल्या ७०३ जागांसाठी पाचपट अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पीएचडीसाठी प्रवेश मिळवणे विद्यार्थ्यासाठी आव्हान ठरणार आहे. मात्र एम.फिल.च्या १८८ जागांसाठी ७६ अर्ज कमी आल्याने यंदा या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकी विभागात इलेक्ट्रीकल, टेक्सटाइल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, केमिकल, इलेक्ट्रॉनिक या विषयातील संशोधनासाठी अर्ज आले आहेत. तंत्रज्ञान विभागातून बायो टेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स, बायोकेमिस्ट्री, अॅग्रो केमिकल अँड पेस्ट कंट्रोल याविषयातील संशोधनासाठी अर्जांची संख्या लक्षणीय आहे. शास्त्रविभागातून पर्यावरणशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, गृहशास्त्र या विषयातील संशोधनासाठी विद्यार्थ्यांना स्वारस्य आहे. भाषाविषयात इंग्रजी, मराठी, इतिहास यातील संशोधनासाठी विद्यार्थ्यांचा टक्का तुलनेत कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी

$
0
0

कोल्हापूर:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पोस्टर झळकावली आहेत. ‘मी पुन्हा येणार तुमच्या कोंबड्या चोरताना पाहायला’, ‘पक्षात येताय की ईडी पाठवू, ज्यांचे नाव घेऊन सत्तेत आले त्यांचेच किल्ले विकायला काढले, हे माझे सरकार’ या आशयाचे हे पोस्टर संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात ही पोस्टरबाजी केली. या पोस्टरच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं फसवी कर्जमाफी, कडकनाथ कोंबडी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
‘जादूगार मोदी आले, जादूची कांडी फिरवली आणि सगळं बदलून गेलं’ अशी उपरोधिक टीकाही केली आहे. ‘मी पुन्हा येणार फसवी कर्जमाफी द्यायला, तुम्ही पुरात बुडा आम्ही सेल्फी घेणार’ या पोस्टरच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला.

सध्या कोल्हापूर आणि सांगली परिसरात कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण गाजत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विषयावरून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच, त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. सोमवारी पलूस तालुक्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कोंबड्या फेकत निषेधही केला होता. मात्र भाजप सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. सरकारच्या या धोरणावर टीका करताना ‘मी पुन्हा येणार तुमच्या कोंबड्या चोरताना पाहायला’ असे फलक लावले आहेत. मंगळवारी सकाळी हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आला. महाजनादेश यात्रेच्या मार्गावरील हे सगळे पोस्टर पोलिसांनी यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच हटविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मावळणाऱ्यांची चिंता करू नका, पवारांचा सल्ला

$
0
0

सोलापूर: राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या लोकांची नावं कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उजाडणाऱ्यांची काळजी घेऊ या. गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सोलापूर येथे जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांवर सडकून टीका करतानाच कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं कामही केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच पवार यांनी सोलापूरमधील आठवणींना उजाळा दिला. बऱ्याच दिवसांनंतर मी सोलापूरकरांसमोर बोलायला उभा राहिलो आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापुरातून झाली. १९६५ साली मी तरुणांचं नेतृत्व केलं. तेव्हा सोलापूरची जबाबदारी माझ्यावर होती, अशी आठवण पवारांनी सांगितली.

सोलापूर कामगारांचा व शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा, चार हुतात्म्यांचा हा जिल्हा आहे. इतिहासात सुवर्णाक्षरात नाव लिहावं, असा हा जिल्हा आहे. अशा या स्वाभिमानाचा पुरस्कार करणाऱ्या जिल्ह्यात काही नेत्यांनी लाचारी पत्करली. या स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना लोक जागा दाखवतात. त्यांना त्यांची जागा दाखवा, असं आवाहन पवारांनी केलं.


संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात १९५७ साली काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, सोलापुरात काँग्रेस जिंकली. त्यामुळे विधानसभेत इतर ठिकाणी काय झालं याची काळजी न करता, इथं सोलापूरमध्ये इतिहास घडवू, असं सांगतानाच सत्ता येते-जाते, त्याची काळजी नाही. मी ५२ वर्षांपासून निवडून येतो. निवडून येण्याचा हा विक्रम आहे. जनतेमुळे इतके यश प्राप्त झालंय. त्यामुळे यश मिळणारच आणि इतिहास घडवणारच, असा विश्वास मला आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणास लुटले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये घेऊन तरुणास चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार सोमवारी (ता. १६) पहाटे तावडे हॉटेल ते हालोंडीदरम्यान घडला. याबाबत अमोल विष्णू खंडागळे (वय ३४, रा. पत्रकारनगर, सांगली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. लुटारूंनी खंडागळे यांच्याकडील सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाइल, घड्याळ असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल खंडागळे हे मूळचे सांगलीचे असून, पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. कामाच्या निमित्ताने ते बेंगलोर येथे गेले होते. काम आटोपून ते सोमवारी सायंकाळी बेंगलोरमधून खासगी ट्रॅव्हल्सने बाहेर पडले. पहाटे साडेतीनच्या सुमारास ते तावडे हॉटेल येथे पोहोचले. तेथून ते सांगलीला जाणार होते. पावणेचारच्या सुमारास त्यांच्याजवळ पांढऱ्या रंगाची टाटा बोल्ट कार आली. लिफ्ट देतो, असे सांगत कारचालकाने खंडागळे यांना कारमध्ये घेतले. महामार्गावर पंचगंगा पुलाजवळ आणखी तीन लोकांना कारमध्ये घेतले. काही अंतर पुढे गेल्यानंतर शेजारी बसलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून खंडागळे यांच्याकडील सोन्याच्या दोन अंगठ्या, घड्याळ, मोबाइल काढून घेतला.

नंतर दुसऱ्या व्यक्तीने खंडागळे यांची बॅग काढून घेतली. यातील पैशांचे पाकीट, कंपनीचे सॉफ्टवेअर, एटीएम कार्ड, स्मार्ट कार्ड, पॅनकार्ड काढून घेतले. लुटारूंनी सांगली नाका ते हेर्ले या मार्गावर कार दोनदा फिरवली. यानंतर पुन्हा सांगलीच्या दिशेने जाऊन खंडागळे यांना हालोंडीजवळ सोडले. अचानक घडलेल्या प्रकाराने खंडागळे घाबरले होते. त्यांनी सोमवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तावडे हॉटेल ते हालोंडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, अंधारामुळे कारचा नंबर मिळाला नाही. शहरासह सांगली मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. लवकरच लुटारूंच्या टोळीचा सुगावा लागेल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक फडणीस यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलेवाडीत दिव्यांगांच्या स्वावलंबनाची ‘उन्नती’

$
0
0

लोगो : युवा मुद्रा

कोल्हापूर टाइम्स टीम

प्रथमदर्शनी पाहिल्यावर ते इतरांसारखे सायकल, दुचाकी, चारचाकीचे पंक्चर काढायचे, सर्व्हिसिंगचे दुकान वाटते. मात्र कामानिमित्त दुकानात पोहचले आणि पंक्चर काढणे, टायर बदलणे, वाहनांचे सर्व्हिसिंग व पॉलिशिंग ही सगळी कामे सहजपणे करणारी मुले पाहिली की वाहनधारकांचा क्षणभर डोळ्यावर विश्वास बसत नाही. कारण येथील मुले ही दिव्यांग, मूकबधीर व गतीमंद आहेत. फुलेवाडीच्या पहिल्या बसस्टॉपवरील श्रावण टायर अँड सर्व्हिसिंग सेंटर येथे दिव्यांगाच्या व्यावसायिक कौशल्याचा हा प्रयोग पाहावयास मिळत आहे.

फुलेवाडीतील महेश शामराव सुतार या तरुणांने सात दिव्यांग, गतीमंद व मूकबधिर मुलांमध्ये स्वावलंबनाची उर्मी जागविली आहे. व्यावसायिक कौशल्यातून उन्नती साधण्याचा हा कृतिशील उपक्रम सध्या या भागात कौतुकाचा विषय ठरला आहे. महेशचे एमएबीपीएड पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. पण नोकरी मिळत नाही हे लक्षात आल्यावर स्वस्थ न बसता वडिलांचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय पुढे सुरू केला. वाढवला.

सायकल दुरुस्ती व सर्व्हिसिंग सेंटर चालविताना महेशने दिव्यांग, गतिमंद आणि मूकबधिर मुले स्वावलंबी बनावीत म्हणून त्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकवण्याचे ठरविले. याकामी त्यांना खुपिरे येथील एकनाथ पाटील यांची मदतनीस म्हणून चांगले साथ लाभली. महेशने या वेगळया कामाची सुरुवात स्वत:च्या भावांपासून केली. लहान भाऊ सुजित हा गतीमंद. त्याव्यतिरिक्त आणखी सात मुलांना त्यांनी दुकानात रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. ही सगळी मुले सर्व्हिसिंग सेंटरमध्ये विविध प्रकारची कामे करतात.

यामध्ये नागदेववाडी येथील संभाजी भिवसे, फुलेवाडीतील चौथा बसस्टॉप येथील अक्षय केसरकर, बोंद्रेनगर रिंगरोड परिसरातील अनिल खटावकर, महावीर कॉलेज परिसरातील अजिंक्य फाटक आणि शिवाजी पार्क येथील आशुतोष भोईटेचा समावेश आहे. त्यांच्यापैकी भिवसे हा मुलगा मूकबधिर तर खटावकर, भोईटे व फाटक हे गतीमंद आहेत. लक्षतीर्थ वसाहत येथील ओंकार मोरे हा साधारण दृष्टीहीन आहे.

सेंटरचे मालक महेश सुतार यांनी पहिल्यांदा या सातही तरुणांना हवा भरणे, पंक्चर काढणे, वाहनांचे सर्व्हिसिंग सेंटर व पॉलिशिंगची कामे शिकली. सुरुवातीच्या कालावधीत ग्राहकांना या मुलांच्या कामाविषयी शंका निर्माण व्हायची. पण मुले प्रामाणिकपणे सगळ्या प्रकारची कामे करतात, वाहनांची देखभाल करतात हे लक्षात आल्यावर वाहनधारकांचा विश्वास दुणावला. आता तर इतर सर्व्हिंसिंग सेंटरमधील मुले ज्या कुशलतेने कामे करतात तितक्याच सहजपणे ही मुले हवा भरणे, पंक्चर व सर्व्हसिंगची जबाबदारी पार पाडतात. उत्पन्नातील ठराविक रक्कम त्यांना वेतन म्हणून दिले जाते.

दिव्यांग, गतीमंद व मूकबधिर मुलांना स्वावलंबी बनविण्याचा हा प्रयत्न आहे. प्रारंभीच्या कालावधीत लोकांना सगळी चेष्टा वाटायची. काहीजण मस्करी करायचे. पण या मुलांनी विविध प्रकारची कामे आत्मसात केली. आज प्रत्येकजण सहजपणे वाहनांचे पंक्चर काढायची, पॉलिशिंग, सर्व्हिशिंगची कामे करतात. आता नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. भागातील तरुणही या मुलांना रस्ता ओलांडताना मदत करतात.

- महेश सुतार, मालक श्रावण टायर अँड सर्व्हिसिंग सेंटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा बँकेतर्फे दहा टक्के लाभांश

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'गेल्यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. पण त्यामध्ये नागरी सहकारी बँकाकडील कर्जदार शेतकरी वंचीत राहिले. महापुरानंतर पूरग्रस्त शेतकरी, व्यापारी, उदयोजक यांच्यासाठी सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यामध्ये नागरी सहकारी बँकांचे कर्जदारांचा समावेश करावा,' असा एकमुखी ठराव करून तो सरकारकडे पाठविण्याचा निर्णय वारणा सहकारी बँकेच्या ५४ व्या वार्षिक मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष निपूण कोरे होते. वारणानगर येथील लालबहादुर शास्त्रीभवन येथे झालेल्या सभेत सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बँकेने सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केला.

वार्षिक सभेत नैसगिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेले निकष व मार्गदशक सूचनांनुसार नुकसान झालेल्या सभासदांच्या कर्जखात्यांची पुनर्रचना करणार आहे' असे यावेळी अध्यक्ष कोरे यांनी जाहीर केले.

अध्यक्ष निपुण कोरे म्हणाले, 'बँकेच्या गेल्या ५४ वर्षांच्या वाटचालीमध्ये सभासद, ग्राहकांनी मोलाचे सहकार्य मिळाल्याने प्रतिकूल परीस्थितीत ही बँकेने सर्व क्षेत्रात उल्लेखनिय प्रगती केली आहे. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये सात कोटी रुपयांचे भागभांडवल वाढविले आहे. बँकेने भागभांडवलामध्ये ३४ कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण केला आहे. सभासदांना दहा टक्के इतका डिव्हिडंड जाहीर करण्यात येत आहे. त्यास सभासदांनी मंजुरी द्यावी.'

यावेळी हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर सभा संपताच डिव्हिडंडची रक्कम अवघ्या १० मिनीटांत सर्व सभासंदाचे खात्यावर जमा झाली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी माजी संचालक प्रमोद कोरे, बसवेश्वर डोईजड, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, मुख्य व्यवस्थापक प्रकाश डोईजड, हेमंत बोंगाळे, राजीव रणदिवे आदी उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी स्पोर्ट्स अॅकॅडमीतर्फे मदत

$
0
0

कोल्हापूर : शिवाजी स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि शिवाजी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे पूरग्रस्तांना रोख रक्कम, गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. गगनबावडा तालुक्यातील धामणी खोरे,बावेली, हरपवडे गावातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू वितरित केले. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. हरपवडेचे सरपंच रायसिंग चौगुले यांनी भाषणात 'स्वत:च्या कुटुंबांपुरता मर्यादित विचार न करता समाजाला मदत करण्याचा शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांचा गुण अनुकरणीय आहे' असे नमूद केले. जयेश कदम यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविला आहे. यासाठी दीपक सावंत, प्रदीप कापडिया, राजेंद्र मोरे, सुहास शेलार आदींचे सहकार्य लाभल्याचे अॅकॅडमीचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. पत्रकार ताज मुल्लाणी, सत्यजित पाटील, अनघा पाटील, विक्रांत इंगवले, स्नेहल वणकुद्रे, विजय सरदार, किरण साळोखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघाची सभा गाजणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिरोळ, पुनाळ, पडळ शाखेतील अपहारप्रकरणी संशयितांवर कारवाईबाबत कोणतीच ठोस कारवाई केली नसल्याने शेतकरी संघाच्या बुधवारी (ता. १८ ) सभेत विरोधकांकडून संचालकांना जाब विचारण्यात येणार आहे. प्रश्न विचारणाऱ्यांचे सभादसदत्व रद्द केल्याने संचालक मंडळाच्या एकतंत्री कारभाराविरोधात सभा गाजण्याची शक्यता आहे.

शेतकरी संघाच्या इतिहासात प्रथमच भवानी मंडपातील शेतकरी बझारच्या हॉलमध्ये अध्यक्ष अमरसिंह माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी दोन वाजता सभा होईल. सभेपूर्वी माजी संचालक अॅड अशोकराव साळोखे आणि सुरेश देसाई यांनी लेखी प्रश्न विचारले आहेत. संघाच्या शिरोळ शाखेत ३६ लाख ७२ हजार रुपयांचा अपहार झाला. पुनाळ शाखेत साडेचार लाख तर पडळ शाखेत चार लाख रुपयांचा अपहार झाला. या घटना संबधित तपासणीवेळी लेखा परीक्षकांना कशी समजली नाही? असा प्रश्न साळोखे आणि देसाई यांनी उपस्थित केला आहे. लेखापरीक्षकांना संघाने सहा लाख रुपये फी दिली. तरीही त्यांनी कर्तव्यात कसूर केली असा आक्षेप आहे.

अपहार करण्याऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहकार विभागाकडून दिले जात असताना लेखा परीक्षकांकडून स्पष्ट अहवाल संचालक मंडळ आणि प्रशासनाला प्राप्त न झाल्याने अपहार करणाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न अधिकारी व काही संचालकांकडून सुरू असल्याची चर्चा आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च वाढला असून त्याचाही खुलासा मागितला आहे. गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी पेट्रोल पंपाजवळील जागेचे व्यवहार झाले आहेत. या जागा किती वर्षांनी भाड्याने दिल्या? याची सविस्तर माहिती मागण्यात आली.

सध्या शेतकरी संघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे. सध्या जनसुराज्यचे अमरसिंह माने अध्यक्ष असले तरी कारभारी म्हणून राष्ट्रवादीचे संचालक कार्यरत आहेत. संघाच्या कारभाराव शंका उपस्थित करणाऱ्या संचालकांचे सभासदत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने बुधवारच्या सभेत संचालक मंडळाला विरोधी संचालकांकडून जाब विचारण्याची शक्यता आहे.

देसाई यांचे सभासदत्व रद्द

संचालकांच्या कारभारावर सातत्याने सभा आणि सहकार विभागाकडे दाद मागणारे माजी संचालक सुरेश देसाई यांचे संचालकपद रद्द केले आहे. त्यांना अहवालही पाठवलेला नाही. त्यांनी लेखी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण देसाई यांचे सभासदत्व रद्द केल्याने प्रश्नांचे उत्तर देता येत नाही, असे सांगून गैरव्यवहाराचा प्रश्न टाळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संघाला मोठा इतिहास असून संघाच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवत असल्याने माझे सदस्यत्व रद्द केले आहे. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली असल्याने त्याविरोधात दाद मागणार आहे.

- सुरेश देसाई, माजी संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्याविरोधात पोस्टरबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पोस्टरबाजी केली. सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात केलेली ही पोस्टरबाजी शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे. 'मी पुन्हा येणार... तुमच्या कोंबड्या चोरताना पाहायला...', 'पक्षात येताय की ईडी पाठवू..., 'ज्यांचे नाव घेऊन सत्तेत आले त्यांचेच किल्ले विकायला काढले', 'हे माझे सरकार' या आशयाची पोस्टरबाजी करत भाजप सरकारच्या विरोधातील रोष व्यक्त केला. 'मी पस्तावलोय' या शीर्षकाखालील पोस्टर्सनी खळबळ उडवून दिली.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. दरम्यान रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात पोस्टरबाजी केली. फसवी कर्जमाफी, कडकनाथ कोंबडी घोटाळा वरूनही त्यांनी लक्ष्य केले. दरम्यान मंगळवारी सकाळी हा प्रकार पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आला. महाजनादेश यात्रेला प्रारंभ होण्याआधीच पोलिसांनी ही पोस्टर्स हटविले.

शहरातील गजबजलेल्या भागातील आणि प्रमुख मार्गावरील या पोस्टरबाजीची शहरभर चर्चा रंगली आहे. कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर चौक, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौक, बिंदू चौक, उमा टॉकिज परिसर, गोखले कॉलेज चौकात पोस्टर्स लावले होते. 'महाजनादेश यात्रेसाठी जेवढी सरकारी यंत्रणा लावली तेवढी महापुरात लावली असती तर ब्रह्मनाळसारखी घटना घडली नसती,' 'राज्यात शिक्षक व एमपीएससी उमेदवार इच्छा मरण मागत आहेत,' 'महाराष्ट्र विकणे आहे' अशा मजकुराच्या चित्रमय पोस्टरमधून राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचेही राष्ट्रवादीने वाभाडे काढले आहेत. 'अन्य देशातून कांदा आयात करुन देशातील लाखो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले' अशी टीका केली. तसेच पोस्टरमधून भाजपमधील वाचाळवीरांचाही समाचार घेतला आहे.

पंतप्रधानांवरही टीका

'जादूगार मोदी आले, जादूची कांडी फिरवली आणि सगळं बदलून गेलं' अशी उपरोधिक टीकाही केली आहे. 'मी पुन्हा येणार... फसवी कर्जमाफी द्यायला, 'तुम्ही पुरात बुडा आम्ही सेल्फी घेणार...'या पोस्टरच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला. सध्या कोल्हापूर आणि सांगली परिसरात कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण गाजत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याविषयावरुन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. सोमवारी पलूस तालुक्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कोंबड्या फेकत निषेधही केला होता. मात्र भाजप सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. सरकारच्या या धोरणावर टीका करताना 'मी पुन्हा येणार... तुमच्या कोंबड्या चोरताना पाहायला' या मजकुराचा फलक लक्ष वेधून घेत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरण दीड वर्षे पगाराविना

$
0
0

मटा विशेष ... लोगो

udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

कोल्हापूर

गावचा नियोजनबद्ध विकास, विविध विकास प्रकल्प साकारुन शहराशेजारील गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल दीड वर्षापासून वेतन व भत्ते मिळालेले नाहीत. विकासकामांसाठी कोट्यवधीच्या निधीची घोषणा करणाऱ्या सरकारला आतापर्यंत कार्यालयीन खर्चाची तजवीज करता आलेली नाही. त्यामुळे ही अवस्था ओढवली असून कर्मचाऱ्यांना आतापर्यंतच्या शिलकीवरच दिवस काढण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूरच्या हद्दवाढीऐवजी ४२ गावांचे प्राधिकरण ऑगस्ट २०१७ मध्ये स्थापन करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शिवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यालयीन कामासाठी अन्य काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी जानेवारी २०१९ पर्यंत केवळ पाटील यांचेच पद नियमित आस्थापनेवर होते. सध्या आणखी तीन अधिकारी रुजू झाले आहेत. यामुळे सध्या पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या सहा झाली आहे. २०१७-२०१८ या सालासाठी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व अन्य खर्चासाठी पाच लाख ३९ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. तर २०१८-२०१९ या सालासाठी वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन ५४ लाख रुपयांच्या निधीची मागणी सरकारकडे केली आहे. पण अजून वेतन व भत्ते दिलेले नाहीत.

प्राधिकरणाकडे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महिन्याला वेतन व अन्य खर्चासाठी किमान चार ते पाच लाख रुपयांची आवश्यकता असते. पण खर्चासाठी काहीच तरतूद केली नसल्याने कार्यालयासाठी आवश्यक असलेली खरेदीही करता येत नसल्याची परिस्थिती आहे. जे अधिकारी व कर्मचारी आहेत, ते सरकारकडून निधीची मंजुरी मिळेल व आतापर्यंतचे वेतन मिळेल या आशेवर काम करत आहेत. नागरिकांकडून जमा होणाऱ्या विविध शुल्कामधून प्राधिकरण तीन ते पाच वर्षात स्वयंपूर्ण होईल, असे सांगितले जात असले तरी त्यासाठी वाटचाल करण्यासाठी सरकारकडून बीज भांडवल आवश्यक आहे. त्याबाबत कोणतीही मंजुरी दिलेली नसल्याने प्राधिकरण केवळ नाममात्रच राहिले आहे. यानंतर विकासकामांसाठी निधी देण्यावर विचार होईल असे वाटते.

...

कोट

'सरकारने नवीन कार्यालय सुरू केल्यानंतर ते सुरळीत सुरू होण्यासाठी काही कालावधी जातो. आस्थापना खर्च मंजूर होण्यासाठी सरकारच्या पातळीवरील प्रक्रिया राबवावी लागते, सध्या ती सुरू आहे. एकदा त्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला की पुढे नियमित निधी मिळत जाईल.

शिवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी

.....

'विकासाला सुरुवात करायची असल्यास प्राधिकरणाचे काम सुरळीत सुरू झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. कामकाज सुरू करण्यासाठी किमान शंभर कोटी सरकारने देण्याची आवश्यकता आहे.

प्रा. बी. जी. मांगले, सदस्य, प्राधिकरण नागरी कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी पुन्हा सत्ता द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ढोलताशांच्या गजरात शहरातून निघालेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौकाचौकात कार्यकर्ते आणि नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. कळंबा (ता.करवीर) येथे छोट्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांना चांदीची गदा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देण्यात आला. आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी महाजनादेश यात्रेद्वारे मुख्यमंत्र्यांनी भाजपचा प्रचाराचा नारळ फोडत विकासासाठी जनतेला पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन केले.

महाजनादेश यात्रेचे सोमवारी रात्री जंगी स्वागत झाले होते. रात्री मुख्यमंत्री कोल्हापुरात मुक्कामाला होते. मंगळवारी सकाळी सात वाजता ते औरंगाबाद येथील हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला विमानाने गेले होते. औरंगाबाद येथील कार्यक्रम आटपून ते परत खास विमानाने कोल्हापुरात दहा वाजता आले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजीत घाटगे, माजी आमदार भरमू पाटील आदी उपस्थित होते.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर मंदिराजवळ सकाळी सव्वा अकरा वाजता महाजनादेश यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या खास रथामध्ये मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक होते. ढोल ताशांच्या गजरात आणि भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या विजयाच्या घोषणा देत यात्रेची जल्लोषी वातावरणात सुरुवात झाली. मिरवणुकीच्या पुढे मोदी आणि फडणवीस यांची प्रतिमा असलेले टी शर्ट घातलेले कार्यकर्ते बाईकवरुन होते.

महाजनादेश यात्रेच्या मार्गावर नागरिकांची दुतर्फा गर्दी होती. पालकमंत्री पाटील हे माईकवरुन राज्य सरकारने कोल्हापुरात केलेल्या विमानतळ, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कोल्हापूर वैभववाडी लोहमार्ग, नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड या विकासकामांची माहिती देत होते. स्टेशन रोड, व्हिनस चौकासह दसरा चौकात यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. दसरा चौकात मुख्यमंत्र्यावर महिलांनी पुष्पवृष्टी केली.

यात्रेच्या मार्गावरील वाहतूक थांबवली असल्याने यात्रा वेगाने पुढे सरकत होती. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. बिंदू चौकात भाजप महानगर कार्यकारणीने यात्रेचे स्वागत केले. यावेळी 'देवस्थान' चे सदस्य राजू जाधव, नगरसेवक अजित ठाणेकर, सुरेश जरग यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना शिवप्रतिमा भेट दिली. बिंदू चौकातून रॅली आझाद चौकात आली. कॉमर्स कॉलेजवळ कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम यांनी मुख्यमंत्र्यांचे बुके देऊन स्वागत केले. उमा टॉकीज चौकात भाजपचे कार्यकर्ते आणि महिलांनी फुलांची वृष्टी केली.

सुभाष रोडवरुन यात्रा जाताना दुतर्फा उभारलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री हात उंचावून अभिवादन करत होते. गोखले कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यात्रेवर पुष्पवृष्टी केली. रेणुका मंदिर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौकात खेळाडूंनी हॉकी स्टिक उंचावून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. माजी नगरसेवक विजय साळोखे , प्रशिक्षक मोहन भांडवले यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ दिला. हॉकी स्टेडियम ते संभाजीनगर पेट्रोल पंप मार्गावर गणेश देसाई, भाजप गटनेते नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी स्वागत कले.

संभाजीनगर चौकात महानगर सरचिटणीस माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली. त्यानंतर महायात्रा वेगाने कळंब्याकडे रवाना झाली. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भगवे फेटे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

...

यात्रेमुळे वाहतुकीची कोंडी

महाजनादेश यात्रेमुळे शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती. ताराराणी चौकातून वाहतूक धैयप्रसाद मंगल कार्यालय, उड्डाण पुलाकडे वळवण्यात आली. त्यामुळे एसटी, केएमटी बसेस ताराबाई पार्कमधील दिसेल त्या रस्त्यांवरुन मार्गक्रमण करत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जात होत्या. यात्रेच्या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कळंबा येथे झालेल्या छोट्या सभेमुळे कोल्हापूर गारगोटी मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

...

विद्युत पुरवठा खंडीत

यात्रेसाठी उभारण्यात आलेल्या रथाची उंची मोठी असल्याने विद्युत तारांचा अडथळा येण्याची शक्यता गृहित धरुन मार्गावरील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारा उंचावण्यात आल्या होत्या. मार्गात येणाऱ्या झाडांच्या फांद्याही छाटण्यात आल्या होत्या. चौकाचौकात वीज मंडळाचे वायरमन आणि अधिकारी उपस्थित होते.

...

फलकावर महाडिकांचा फोटो

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चौकाचौकात फलक लावण्यात आले होते. फलकावर मुख्यमंत्र्यासह पालकमंत्र्यांचे फोटो होते. ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे लावण्यात आलेल्या फलकावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा फोटो होता. नगरसेविका सविता घोरपडे आणि माजी नगरसेवक सतीश घोरपडेंनी हा फलक उभारला होता.

...

यात्रेकडे खासदार संभाजीराजेंची पाठ

महाजनादेश यात्रेकडे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी पाठ फिरवली आहे. संभाजीराजे हे राज्यसभेवर नियुक्त असले तरी ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकले असतानाही संभाजीराजे कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहिले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, संभाजीराजे हे छत्रपती घराण्यातील असल्याने प्रचार,सभा यांचे बंधन त्यांच्यावर घातलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांनी उपस्थित रहावे, असे पक्षाकडून कोणतेही बंधन नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या बातमीला जोड...

$
0
0

................

कोट

'भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केवळ लोकांसमोर भुलभुलैय्या उभा केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची सरकारने पूर्तता केली नाही. पोस्टरबाजी, बॅनरबाजी करत लोकांची दिशाभूल केली आहे. पोस्टरच्या माध्यमातून आम्ही लोकभावना मांडली आहे.

रोहित पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचा जिल्हास्तरीययुवा महोत्सव आजपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठातर्फे यंदाचा कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव बुधवारी (ता. १८ सप्टेंबर) जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे रंगणार आहे. विद्यापीठ व विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने होणाऱ्या या महोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ५६ कॉलेजांमधील १२०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते महोत्त्सवाचे उदघाटन होणार आहे. आमदार डॉ. सुजित मिणचेकर व विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी प्रमुख उपस्थित आहेत.

उदघाटन कार्यक्रमानंतर सकाळी साडेदहा वाजता महोत्सवातील सांस्कृतिक स्पर्धांना सुरूवात होईल. महोत्सवाच्या मुख्य सभामंडपात सकाळी साडेदहा वाजता लोकसंगीत वाद्यवृंदाने महोत्सवाचा पडदा उघडणार आहे. तर दुपारी एक ते रात्री आठपर्यंत लोककला व लोकनृत्यांचा माहोल रंगणार आहे. संस्थेच्या ड्रॉइंग हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता लघुनाटिकांचा मंच रंगणार असून दुपारी एक वाजता मूकनाट्यातून सकस अभिनयाची कसोटी लागणार आहे. दुपारी तीन ते पाच यावेळेत नकलाकार विद्यार्थ्यांच्या कला पाहण्याची संधी मिळणार आहे.

सकाळी ११ ते १ या कालावधीत हिंदी वक्तृत्व, मराठी वक्तृत्व स्पर्धा होणार असून याचवेळी सेमिनार हॉलमध्ये सुगमगायनाचे सूर घुमणार आहेत. भारतीय समूहगान स्पर्धा दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहे. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा सकाळी ११ वाजता होणार आहे तर दुपारी १ ते ४ यावेळेत वादविवाद स्पर्धा होणार आहे. सिद्धीविनायक ट्रस्ट हॉलमध्ये सकाळी ११ ते रात्री ८ वाजेतर्यंत विविध विषयांवरील एकांकिका स्पर्धा होणार आहे. तर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या मैदानावर पथनाट्यातून सामाजिक प्रबोधनाचा जागर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाकपचा शनिवारी मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय कम्युनिस्ट पक्ष इतर डाव्या पक्षांसोबत आघाडी करुन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यासाठी मुंबई येथे गुरुवारी (ता.१९) राज्यस्तरीय प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यासाठी शनिवारी (ता. २१) दुपारी १२ वाजता शाहू स्मारक भवन येथे मेळावा होणार आहे,' अशी माहिती पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कांबळे म्हणाले, 'अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा, शाहू मिल, शहरातील रस्ते, वाहतूक व कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकारमधील वजनदार मंत्री कोल्हापुरात होणाऱ्या सततच्या आंदोलनामुळे विकास प्रकल्प आले नसल्याचे सांगत शहरवासियांना दोष देत आहेत. त्यांनी असे किती प्रकल्प आंदोलनामुळे आले नाहीत, त्याची यादी जाहीर करावी. तर 'उत्तर'चे आमदार शहरातील प्रश्न तडीस न लावता स्वत:च सत्तेत असून आंदोलन करत आहेत. शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी डाव्या विचारांचे उमेदवार विधानसभेत पाठवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व डाव्या पक्षांना सोबत घेवून विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार आहे. शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात स्मिता पानसरे, राम बाहेती व राज्य सेक्रटरी नामदेव गावडे मार्गदर्शन करणार आहेत.'

जिल्हा सहसचिव गिरीष फोंडे म्हणाले, 'पुरामुळे पडझड झालेल्या शहरातील कुटुंबांचा सर्व्हे केला आहे. अशा कुटुंबांना मेळाव्यादरम्यान धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे.' पत्रकार बैठकीस अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, दिनकर सूर्यवंशी, नामदेव पाटील, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यड्रावकरांना राष्ट्रवादीकडून ग्रीन सिग्नल

$
0
0

यड्रावकर, मादनाईक फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे होम पिच म्हणून शिरोळची ओळख आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना उमेदवारीबाबतचे ग्रीन सिग्नल दिल्याचे समजते. यामुळे आघाडीच्या जागा वाटपात 'शिरोळ' कुणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीच्या संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. जिल्ह्यातील पाच जागांवर स्वाभिमानीचा दावा आहे. मात्र आघाडीच्या सूत्रानुसार स्वाभिमानीला एक किंवा दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. स्वाभिमानीसाठी शिरोळ विधानसभा मतदारसंघ महत्वाचा आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत संघटनेला विजय महत्वाचा आहे. या मतदारसंघातून स्वाभिमानीकडून गेल्या वेळी निवडणूक लढविलेले उमेदवार सावकार मादनाईक पुन्हा रिंगणात असतील असे सध्याचे चित्र आहे. शेट्टी यांच्यानंतर संघटनेत शिरोळ तालुक्यात मादनाईक यांचा क्रमांक लागतो. त्यांनी निवडणूक लढवायची म्हणून सुरुवात केली आहे. संघटनेत शेट्टी यांनी निवडणूक लढवावी की नाही याविषयी मंथन सुरू आहे.

२०१४ मध्ये प्रत्येक पक्षाने विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती. त्यावेळी स्वाभिमानीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविताना राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दुसऱ्या क्रमांकांची मते मिळवली होती. त्या बळावर राष्ट्रवादीने या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. यड्रावकर यांनी पक्षाकडे यंदाही उमेदवारी मागितली आहे. शिवाय जाहीर कार्यक्रम व पक्षाच्या व्यासपीठावरुन राष्ट्रवादीने वेळावेळी यड्रावकर यांची संभाव्य उमेदवार म्हणून प्रतिमा उभी केली आहे. निवडणूक लढवायची म्हणून त्यांनी गेल्या पाच वर्षात तयारी केली आहे. राष्ट्रवादीतील एका वरिष्ठ नेत्याने त्यांना उमेदवारीविषयी ग्रीन सिग्नल दिला आहे. निवडणुकीच्या कामाला लागा असा मेसेज दिल्यामुळे यड्रावकर तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीकडून यड्रावकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

...

कोट

'नैसर्गिक न्यायाप्रमाणे शिरोळ विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा हक्क आहे. गेल्या निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून मतदारसंघात कार्यरत आहे. शिवाय लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी यांचा प्रामाणिक प्रचार केला. विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होणार असली तरी शिरोळच्या जागेसाठी राष्ट्रवादी पक्ष दावेदार आहे.

राजेंद्र पाटील, यड्रावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

..................................................

सावकार मादनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

...

२०१४ मधील विधानसभा निवडणूक निकाल

उमेदवार पक्ष मते

उल्हास पाटील शिवसेना ७०,८०९

राजेंद्र पाटील यड्रावकर राष्ट्रवादी काँग्रेस ५०,७७६

सावकार मादनाईक स्वाभिमानी शेतकरी संघटना ४८,५११

सा.रे.पाटील, राष्ट्रीय काँग्रेस ४८,०६६

सुरेश कुडाळे, अपक्ष २५८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात होणार नवीन महाबळेश्वर

$
0
0

सातारा: 'स्ट्रॉबेरी'चे माहेरघर आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर शेजारीच नवे महाबळेश्वर निर्माण करण्यात येणार आहे. जागतिक वारसास्थळ म्हणून नावाजलेल्या काससोबत सातारा, पाटण, जावळी या तीन तालुक्यांतील ५२ गावांना या प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकलपाअंतर्गत तीन तालुक्यातील तब्बल ३७ हजार २५८ हेक्टर क्षेत्र विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सातारा येथे नवीन कार्यालय सुरू केले जाणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी सरकारची मालकी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची असणार आहे.

या प्रकल्पात सातारा तालक्यातील ८, जावळी तालुक्यातील १५, आणि पाटण तालुक्यातील २९ गावांचा समावेश करण्यात येणार आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची उभारणी करण्यात आल्यावर या सर्वच गावांतील पर्यटनाला चालना मिळून या गावात नवीन रोजगरनिर्मिती होणार आहे.

या प्रमुख गावांचा समावेश

नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारणीत सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, केलवली, नावली, धावलीसह जावळी तालुक्यातील वेळे, वासोटा, उंबरे वाडी, सावरी, कसबे बामणोली, अंधेरी, कास, म्हावशी, माजरे, शेवांदी, फळणी, देवूर, वाघळी, मुनवले, जांब्रुख. पाटण तालुक्यातील आंबेघर, गढवखोप, नहींबे, देवघर तर्फ हेलवाक, चिरंबे, रासाती, कारवट, दस्तान, वांझोळे, दिवशी खुर्द, काठी, नानेल, घणबी, सावरघर, वाटोळे, गोजेगाव, खिवशी, बाजे, भांबे, घेरादाते गड, केर या ५२ गावांचा समावेश असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बरी-वाईट कामे केली, पण, तुरुंगात गेलो नाही

$
0
0

बरी-वाईट कामे केली, पण, तुरुंगात गेलो नाही

सोलापुरातील मेळाव्यात शरद पवारांचा गृहमंत्री अमित शहांना टोला

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केले हे सांगू नये. मी आजवर अनेक बरी-वाईट कामे केली, पण तुरुंगात गेलो नाही. तुरुंगात जाणारे विचारतायेत शरद पवारांनी काय केले?,' असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला. 'राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडून गेलेल्यांना बघून घेतो. घरात सांगून निघालोय, घराकडे तुम्ही बघा, मला पक्ष सोडून गेलेल्यांकडे बघायचे आहे,' असा इशारा ही पवारांनी पक्ष बदलूंना दिला. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप सोलापुरात शहा यांच्या उपस्थितीत झाला होता. या वेळी बोलताना 'शरद पवारांनी आजवर काय केले? अशी टीका शहा यांनी केली होती. शहा यांच्या टीकेला मंगळवारी पवारांनी उत्तर दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत सोलापूरसह महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी भाजप आणि शिवसेनेत दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. सोलापूर शहर आणि मोहोळ मतदारसंघ सोडला तर आता कुठेच राष्ट्रवादी दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी ही पक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा गड ढासळू लागल्याने शरद पवार अस्वस्थ झाले आहेत. पडझड रोखण्यासाठी व कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी शरद पवारांनी मंगळवारपासून सोलापुरातून बैठक आणि मेळाव्यांना सुरुवात केली आहे.

पवारांनी राष्ट्रवादी सोडणाऱ्यांना चांगलाच दम भरला. पवार म्हणाले, 'सोलापूर स्वाभिमानी जिल्हा आहे, लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना लोक जागा दाखवतील. जे पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांचे नाव कशाला घेता, गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा. गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत, जे मावळणार आहेत त्यांची चर्चा नको, जो उगवणार आहे, त्याचे दर्शन घ्या. भलत्याच दारात जाण्याची ज्यांनी सुभेदारी घेतली त्यांना जनता जागा दाखवेल. तरुणाईच्या ताकदीच्या जोरावर महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करीत राज्यभर फिरतोय. मला काही लोकांकडे बघायचे आहे. जोपर्यंत यांच्याकडे बघत नाही, तोपर्यंत घरी परतणार नाही.'

बबन शिंदे, दीपक साळुंखेंनी फिरवली पाठ

शरद पवारांच्या मंगळवारच्या दौऱ्याकडे माढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले दीपक साळुंखे पाठ फरवली. शिंदे भाजपमध्ये, तर साळुंखे शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवारांनी उघड्या जीपमधून रॅली काढली. या रॅलीत मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार प्रणिती शिंदेशरद पवारांना भेटल्या

$
0
0

आमदार प्रणिती शिंदे

शरद पवारांना भेटल्या

सोलापूर :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते. हुतात्मा स्मृती मंदिरातील मेळावा संपल्यानंतर पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथे शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पवार यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून निवडणुकीत सहकार्य मिळावे यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images