Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

धनगर समाजाने जनादेश का द्यावा?

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली. मात्र, त्यानंतर समितीची एकही बैठक झालेली नाही. धनगरांचे एसटी आरक्षण सरकारने बासनात टाकल्याचे स्पष्ट होते आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ खुलासा करावा, धनगर समाजाने देवेंद्र फडणवीस यांना जनादेश का द्यावा?' अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

संयोजक ढोणे म्हणाले, 'धनगर समाजाने देवेंद्र फडणवीस यांना जनादेश का द्यावा? तसेच त्यांनी तो का मागावा? अशी परिस्थिती सध्या आहे. समाजाची मते डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षांपूर्वी बारामतीत पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यानंतर शेकडो बैठका होऊनही आरक्षण मिळालेले नाही. आवश्यकता नसतानाही मुख्यमंत्र्यांनी टाटा समाज विज्ञान संस्थेकडे सर्वेक्षणाचे काम सोपवले. त्यात दोन वर्षे घालवली. संस्थेने वर्षांपूर्वी अहवाल सादर करूनही तो जाहीर केला जात नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र, यामध्ये मूळच्या एसटी आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली नाही. यावरून सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा विषय गुंडाळल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडावी.'

यावेळी संदीप लवटे, श्रीकृष्ण बोरुंगले, सुरेश कोकरे, किशोर पिराई, नितीन वाघमोडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘यूथ बँकेच्या ठेवीदारांची गळचेपी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिझर्व्ह बँकेकडून यूथ बँकेवर निर्बंध आल्याने सामान्य ठेवीदारांची गळचेपी होत आहे, असे पत्रक ज्येष्ठ नागरिकांनी प्रसिद्धीस दिले आहे. रिझर्व्ह बँकेने ज्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन नाही त्यांची खात्री करुन यूथ बँकेतून रक्कम काढण्यावरील निर्बंध त्वरीत मागे घ्यावेत. अन्यथा ज्येष्ठ नागरिकांना नाईलाजास्तव उपोषण करावे लागेल, असा इशारा पत्रकातून दिला आहे.

अॅड. पी.डी. कुंभार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थकबाकी वाढल्याने रिझर्व्ह बँकेने यूथ बँकेवर प्रथम सहा महिने निर्बंध लादले, त्यानंतर आणखी सहा महिने निर्बंध वाढविले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बचत खाते अथवा मुदतबंद ठेव खात्यावरुन रक्कम काढता येत नाही. निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युएटीची रक्कम ठेवीत गुंतवली होती. पण गेले सात महिने ज्येष्ठ नागरिकांसह ठेवीदारांचे प्रचंड हाल होत आहेत. औषधे खरेदीसाठीही पैसे उपलब्ध होत नाहीत. बँकेत १२० कोटी रुपयांच्या ठेवी असून १७ कोटी थकबाकीपैकी नऊ कोटी वसूल झाले आहेत, असे बँकेने निवेदन प्रसिद्धिस दिले आहे. रिझर्व्ह बँकेने पुन्हा सहा महिने निर्बंध लादल्याने मासिक खर्चासाठी बँकेतून रक्कम काढता येत नसल्याने ठेवीदारांचे हाल होत आहेत. राष्ट्रीयकृत बँकेतून हजारो कोटी रुपये घेऊन चोर पळून जात आहेत. निरव मोदी, चोक्सी यांनी १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मात्र १२० कोटी रुपये ठेवी असलेल्या छोट्या बँकेवर काही नियम दाखवून घाला घातला जात आहे. रिझर्व्ह बँकेस सामान्य ठेवीदारांचे हाल करण्याचा अधिकार नाही, असे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ची सभा पुढे ढकलण्याचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या संचालकाच्या बैठकीत घेण्यात आला. सभेची तारीख ठरवण्याचे सर्वाधिकार अध्यक्ष रविंद्र आपटे यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, ३० ऑक्टोबरला सभा होण्याची शक्यता आहे.

सहकार विभागाने महापूर, अतिवृष्टी आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ ऑक्टोबरपर्यंत घेण्यास मुदतवाढ दिली आहे. हा आदेश येण्यापूर्वी सभा घेण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. गोकुळची सभा ३० सप्टेंबरला होणार होती. पण गतवर्षी मल्टिस्टेट प्रश्नांमुळे सभेत झालेला गोंधळ लक्षात घेऊन यावर्षीही त्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. तसेच गोकुळचे नेते, काही संचालक, संचालकांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मल्टिस्टेटचा प्रश्न निवडणूक प्रचाराच्या अजेंड्यावर येऊ नये याची काळजी घेत नेते व संचालक मंडळाने सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी झालेल्या सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. सभेची तारीख ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी २० ते २५ ऑक्टोबरच्या कालावधीत होण्याची शक्यता आहेत. तसेच दीपावली २७ ऑक्टोबरला असल्याने ३० ऑक्टोबरला सभा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

...

दिवाळीनंतर डिव्हिडंड

दिवाळीपूर्वी दूध उत्पादकांना फरक मिळणार आहे. पण सर्वसाधारण सभा झाली नसल्याने डिव्हिडंड देता येत नाही. सर्वसाधारण सभेत डिव्हिडंडला मंजुरी मिळाल्यानंतर दिवाळीनंतर सभासदांच्या खात्यावर डिव्हिडंड जमा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीमवर्कमुळे महाप्रलयाचा यशस्वी सामना

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अतिवृष्टीनंतर आलेल्या महापुरामध्ये जीवाची बाजी लावत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण धावून आले. पूर ओसरल्यानंतर त्याच तत्परतेने स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेवून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्येला परतवून लावले. महाप्रलंयकारी स्थितीत शहरवासियांनी टीमवर्कचे सुंदर दर्शन घडविले. त्याचा सार्थ अभिमान वाटतो,' असे गौरवोद्गार महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी काढले.

सोमवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात महापालिकेच्यावतीने पूरस्थिती व त्यानंतर झालेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्था, संघटना व व्यक्ती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'महापुरासारख्या आपत्तीवेळी महापालिकेकसह विविध सामाजिक संस्था, संघटनांनी कौतुकास्पद काम केले. मदतीच्या कोल्हापुरी पॅटर्नची राज्यात दखल घेतली आहे. केडीएमजीसारख्या संस्थेचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. महापुरामध्ये सर्वच घटकांचे नुकसान झाले. विशेषत: व्यापारी वर्गाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यांना उभारी देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. सुतारवाडा, लक्ष्मीपुरी येथील पुरग्रस्तांचे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल देवून स्थलांतर करण्यात येणार आहे.'

ते पुढे म्हणाले, 'कितीही टिका झाली तरी स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल. स्वच्छ शहर तर आरोग्य उत्तम अशी आपली धारणा आहे. त्यामुळेच महिन्याभरात शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी प्लास्टिक विक्री व निर्मिती करु नये.'

उपमहापौर शेटे म्हणाले, 'प्रशासकीय यंत्रणा जेथे पोहोचण्यास विलंब झाला, तेथे नागरिक स्वत:हून पुढे आले. जीव धोक्यात घालून मदत करण्याचे उदाहरण कोल्हापूरकरांनी घालून दिले आहे. राजर्षी शाहू महाराज हयात असते, तर त्यांनी शहरवासियांची हत्तीवरुन मिरवणूक काढली असती.' शारंगधर देशमुख म्हणाले, 'महापूर व त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत कोल्हापूरकरांनी एकजूट दाखवली. भविष्यात अशीच एकजूट ठेवावी लागेल. आयुक्तांच्या स्वच्छता मोहिमेला नगरसेवकांचे बहुमोल सहकार्य लाभत आहे. त्यामुळेच प्लास्टिकविरोधी कारवाई करताना कोणतीही आडकाठी आणली जाणार नाही.'

यावेळी व्हाईट आर्मी, शिवाजी विद्यापीठ, देवराज बोटिंग, धनंजय महाडिक युवा शक्ती, संयुक्त जुना बुध‌वार पेठ, अजिंक्यतारा ग्रुप, गोकुळ दूध संघ, केडीएमजी, मराठा महासंघ, महालक्ष्मी अन्नछत्र यांच्यासह सुमारे ७४ सामाजिक संस्था, संघटनांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका रुपाराणी निकम, मुख्यलेखापाल संजय सरनाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. सोहळ्यास विरोधी पक्षनेते विलास वास्कर, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, माजी महापौर हसिना फरास, नगरसेवक अशिष ढवळे, इश्वर परमार, स्मिता माने, सुरेखा शहा यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा कर्मचाऱ्यांना नवीन वर्षापासून वेतन आयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांना एक जानेवारी २०२० पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. वेतन आयोग लागू करण्यासाठी सोमवारी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख व उपमहापौर भूपाल शेटे यांनी प्रशासनाला उपसूचना सादर केली. या उपसूचनेमुळे महापालिका, पाणीपुरवठा, केएमटी व स्कूल बोर्डाकडील ४,२०९ कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर वर्षाला महापालिकेच्या तिजोरीवर ५३ कोटी ४० लाखाचा बोजा पडणार आहे.

२३ जुलै २०१९ रोजी राज्य सरकारने महापालिका व नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जाहीर केला. सरकारच्या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. महापालिकेची आर्थिक स्थिती व अस्थापनावर होणारा खर्च पाहता यातून कशा पद्धतीने मार्ग निघाणार याबाबत त्यांना उत्सुकता होती. त्यासाठी दोनवेळा विशेष सभाही बोलवण्यात आली, मात्र सभेमध्ये ठराव समंत झाला नाही. शुक्रवारी (ता. १३) झालेल्या सभेत उपसूचनेसह वेतन आयोग लागू करण्याचा ठराव केला. त्यानुसार स्थायी सभापती देशमुख व उपमहापौर शेटे यांनी प्रशासनाला उपसूचना सादर केली.

'कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील शिफारसीनुसार एक जानेवारी २०१६ पासून वेतन निश्चित करुन एक जानेवारी २०२० पासून वेतन आयोग लागू करावा. मात्र जानेवारी २०१६ पासून फरक रक्कम देय राहणार नाही. सरकारकडून फरकाची रक्कम देण्यासाठी अनुदान प्राप्त झाल्यास सदरची रक्कम देण्यास कोणतीही हरकत नाही. तसेच सरकारकडून अन्य कारणासाठी अनुदान प्राप्त झाल्यास त्याचा विनियोग वेतन आयोगाची फरक रक्कम देण्यास करता येणार नाही,' अशी उपसूचना प्रशासनाला सादर करण्यात आली.

उपसूचनेद्वारे जानेवारी २०२० पासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्यार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जानेवारीपासून कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याला २२ कोटी तर वर्षाला २६४ कोटी ४० लाख रुपये खर्च होणार आहे.

...

चौकट

४,२०९

कायम व सेवानिवृत्त कर्मचारी

३,२०९

महापालिका कर्मचारी

४००

पाणीपुरवठा विभाग

४००

प्राथमिक शिक्षण मंडळ

२० ते २२ टक्के

सरासरी वेतनवाढ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागल पं.समितीतील दोन कर्मचारी निलंबित

$
0
0

कोल्हापूर

कागल पंचायत समितीतील बांधकाम उपविभागातील कनिष्ठ सहाय्यक श्रीमती शालन माने (रा.केनवडे फाटा, कागल)व मैल कामगार बाळू निकम (रा. व्हन्नूर, ता. कागल) यांच्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या महिन्यात लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले होते. प्रशासनाने सोमवारी त्या दोघांवर निलंबनाच्या कारवाईचा आदेश काढला. कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याकडून आयकरचा सोळा नंबरचा फॉर्म तसेच सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार काढण्यासाठी या दोघांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. यासंबंधी संबंधित महिला कर्मचाऱ्याने लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचून या दोघांना लाच घेताना ३० ऑगस्टला रंगेहात पकडले होते. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुरिमाराजेंच्या उमेदवारीचा फैसला दोन दिवसात

$
0
0

सिंगल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांच्या निवडणूक लढवण्याबाबतचा फैसला एक ते दोन दिवसांत होणार आहे. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती कोल्हापुरात आल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबतची उत्सुकता आणखी दोन दिवस कायम राहणार आहे.

छत्रपती घराण्यातील मधुरिमाराजे यांनी उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विविध समारंभाच्या निमित्ताने मधुरिमाराजे लोकांच्या संपर्कात असल्या, तरी निवडणुकीबाबत त्यांच्याकडूनही अद्याप कोणताही संदेश मिळालेला नाही. २००९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये अनुक्रमे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये सल लागून राहिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत अनपेक्षीतपणे मालोजीराजे यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून छत्रपती घराणे राजकीय क्षेत्रापासून अलिप्त राहिले आहे. युवराज संभाजीराजे यांची राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नियुक्ती केली. त्यांनी राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्रात काम करण्यास अधिक पसंती दिली. त्यामुळे मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांच्या आग्रह कायम आहे.

या आग्रहातूनच रविवारी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने बैठक घेवून मधरिमाराजे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली. त्यांनी तातडीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेवून निवडणूक लढवण्यासाठी संमती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. सोमवारी काही कार्यकर्त्यांनी मालोजीराजे यांच्याशी संपर्क साधून निवडणूक लढवण्याबाबतची आग्रही मागणी केली. मात्र त्यांनीही थेट निवडणूक लढवण्याबाबत कोणतेही भाष्य केले नसले, तरी एक ते दोन दिवसांत कार्यकर्ते त्यांची भेट घेणार आहेत. भेटीदरम्यान निवडणुकीबाबतची दिशा ठरवण्यात येणार आहे.

...

कोट

'सोमवारी काही कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. नियोजित कार्यक्रमामुळे बाहेरगावी असल्याने सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. एक ते दोन दिवसांत कोल्हापुरात आल्यानंतर समक्ष भेटून दिशा ठरवता येईल.

मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिलीच्या विद्यार्थ्यावर अश्लीलतेचा ठपका

$
0
0

पंढरपूर: येथील इंग्रजी माध्यमाच्या एका खासगी शा‌ळेने पहिलीतील विद्यार्थ्यावर खोडकरपणा, मुलींची छेडछाड आणि शिक्षिकेशी अश्लील व लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवून त्याला शाळेतून काढून टाकले आहे. शाळेने निर्णयाचे समर्थन केले असून, पालकांत मात्र संतापाची लाट उसळली आहे.

'शाळेतून काढून टाकायचे असल्यास बेशिस्तपणाचे आरोप मान्य करू; पण पहिलीचा विद्यार्थी शिक्षिकेशी अश्लील व लाजिरवाणे कृत्य कसा करू शकतो,' असा सवाल मुलाच्या वडिलांनी उपस्थित केला आहे. संबंधित विद्यार्थ्याला शिक्षणाच्या अधिकारांतर्गत (आरटीई) शाळेत प्रवेश देण्यात आला होता. त्याच्या पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची असून, त्यांनी शाळेचे इतर शुल्कदेखील भरली आहे. तरीही गेल्या बुधवारी (११ सप्टेंबर) अचानक पालकांना शाळेत बोलावून मुलावरील आरोप असलेले पत्र त्यांच्या हाती सोपविण्यात आले. मुलाला शाळेतून काढून टाकल्याचाही उल्लेख पत्रात आहे.

शाळेकडून समर्थन

'माझा मुलगा लहान असून, त्याच्यावर शाळेने केलेले आरोप धक्कादायक आहेत. मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीचा विचार न करता असे घाणेरडे आरोप करण्यात आले आहेत,' असे संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी म्हटले आहे. 'शाळेची शिस्त कायम रहावी. इतर मुले बिघडू नयेत म्हणून, आम्ही हे पाऊल उचलले आहे,' असे समर्थन शाळेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यांवर कोंबड्या फेकल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

महाजनादेश यात्रेदरम्यान रस्त्यावर प्रचंड बंदोबस्त असताना सुरक्षा यंत्रणेला चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकून निषेध व्यक्त केला. पलूस तालुक्यातील घोगाव फाट्यावर हा प्रकार घडला. कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने केलेल्या आंदोलनाने पोलिसही चक्रावले. अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने सर्वांचीच तारांबळ उडाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ढकलून बाजूला केले. या झटापटीत स्वाभीमानीचे दोन कार्यकर्ते जखमी झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सोमवारी सांगली जिल्ह्यात आली. दुपारी बाराच्या सुमारास इस्लामपूरची सभा आटोपून यात्रा बोरगाव, ताकारीमार्गे पलूसकडे जात होती. घोगाव फाटा येथे वाहनाचा ताफा येत असताना अचानक हे शेतकरी रस्त्यावर आले. काही समजायच्या आतच प्रचंड घोषणाबाजी करत त्यांनी कोंबड्या आणि अंडी ताफ्याच्या दिशेने भिरकावली. मुख्यमंत्र्यांची गाडी पाठीमागे होती. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराने ताफ्यातील सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस चक्रावले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा उभारली होती. या कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बाजूला ढकलले. या ढकलाढकलीत महेश खराडे आणि ज्योतीराम जाधव जखमी झाले.

कुंडल पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक संगीता माने या प्रकाराबाबत म्हणाल्या, 'पोलिसांना चकवा देऊन या शेतकऱ्यांनी हा प्रकार केला. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर कोंबड्या आणि अंडी फेकली नसून ती प्रसिद्धी विभागाच्या गाडीच्या समोर फेकली आहेत. या प्रकरणी महेश खराडे, ज्योतीराम जाधव यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या अन्य चार ते पाच सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.'

कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील संबंधितांना तत्काळ अटक करावी, या घोटाळ्यातील सर्वांची मालमत्ता जप्त करून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन केल्याचे स्वाभीमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत म्हटले आहे.

.. .. ... .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदय विद्यालयातील प्रवेश चाचणीला मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीसाठी २०२० या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेला अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी www.navodaya.gov.in व www.nvsadmissionclasssix.in या संकेतस्थळावर सविस्तरपणे माहिती दिली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना ते इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून योग्यरित्या भरलेले प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. ज्यावर विद्यार्थ्याचा अलीकडे काढलेला फोटो, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकांकडून साक्षांकित केलेले प्रमाणपत्र जेपीजी स्वरुपात अपलोड करायचे आहे, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य अशोक साळी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याच्या हद्दवाढीला मंजुरी

$
0
0

साताऱ्याच्या हद्दवाढीला मंजुरी

सातारा :

गेल्या अनेक वर्षांपासून सातारा शहराचा हद्दवाढीचा विषय प्रलंबित राहिला होता. सोमवारी हद्दवाढीचा प्रश्‍न मार्गी लागला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. सातारा येथील भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्‍न निवडणुकीपूर्वा तातडीने मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत सातारा शहराच्या हद्दवाढीला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले होते. तशा सूचना नगरविकास खात्याला दिल्या होत्या. सोमवारी नगरविकास विभागाने शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

.......

फोटो ओळ

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित जागर दुर्ग इतिहासाचा अंतर्गत सज्जनगडावरील पहिल्या महाद्वारास श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार हे नाव देण्यात आले. या ठिकाणी भव्य दरवाजा बसवण्यात आला असून, या दरवाजाचे उद्घाटन छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सिद्धाराम म्हेत्रेंचागुरुवारी भाजप प्रवेश?

$
0
0

आमदार सिद्धाराम म्हेत्रेंचा

गुरुवारी भाजप प्रवेश?

अक्कलकोटमध्ये भाजप नेत्यांसोबत 'चाय पे चर्चा'

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी गळती लागली असतानाच आता काँग्रेसला ही खिंडार पडले आहे. अक्कलकोट काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे येत्या गुरुवारी भाजपप्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी आमदार म्हेत्रे यांनी अक्कलकोटमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत 'चाय पे चर्चा' केल्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.

सिद्धाराम म्हेत्रे यांनी अनेक दिवसांपासून काँग्रेसची साथ सोडली आहे. कॉँग्रेसने विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या, या मुलाखतीला ही म्हेत्रे यांनी दांडी मारली होती. त्याच वेळी त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले होते. आमदार म्हेत्रे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी खुद्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपली ताकद वापरली आहे. म्हेत्रे भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात अनेक दिवसांपासून असून, सोमवारी त्याला पुष्टी मिळाली. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे एकूण तीन विद्यमान आमदार आहेत, त्यापैकी आमदार म्हेत्रे भाजपच्या वाटेवर आहेत. पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतुल भोसलेंना विठ्ठलाचा आशिर्वाद मिळणार

$
0
0

कराड

'माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पेक्षा जास्ती निधी आमदार नसताना डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आणला आहे. सत्तेत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कामे न केल्यामुळे त्यांची वाईट अवस्था झाली आहे. अतुल भोसलेंनी आवाज दिला की २० हजार लोक येतात. मात्र माजी मुख्यमंत्र्यांची अवस्था 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे' अशीच झाली आहे,' अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली.

छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर महाजनादेश यात्रेच्या सातारा जिल्ह्यातील सांगता सभेप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, 'कराड दक्षिणमध्ये आपल्याला या वेळी चूक करायची नाही. सातारा जिल्ह्यात परिवर्तन करून दाखवायचे आहे. या वेळेस प्रत्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या सोबत आहेत. यामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. मागच्या वेळेस अतुल भोसले एकटे होते. मात्र, आता महाराजांची ताकद पाठिशी आहे. अतुल भोसलेंनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी समितीचे अध्यक्ष केल्यानंतर निस्वार्थपणे सेवा केली आहे. त्यामुळे पांडुरंगाचा आशिवार्द मिळाल्याशिवाय राहणार नाही.'

'पवारांनी देशविरोधी वक्तव्य करणे योग्य नाही'

'शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांनी बोलताना त्यांच्या वक्तव्याचा फायदा भारताला होईल की पाकिस्तानला यांचा विचार करणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांनी जम्मू काश्मिरमध्ये असेच काही वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात भारतीय नेते आमच्यासोबत असल्याचे सांगितले होते. निवडणुका येणार-जाणार परंतु, मते मिळवण्यासाठी अशी देशविरोधी वक्तव्ये करणे चांगले नाही. भारतीय मुलमान हा देशाविषयी अभिमान राखणारा आहे. पवारांनी पाकिस्तानचे कौतुक केले म्हणून मुस्लिम लोक त्यांना मते देतील, असा विचार करणारा राष्ट्रवादी पक्ष कोणत्या मानसिकतेत आहेत, हे समजते,' अशी टीका फडणवीस यांनी केली. सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

.........

मुख्यमंत्र्यांनी खोटे बोलणे बंद करावे : पृथ्वीराज चव्हाण

'महापुरादरम्यान पडलेल्या पावसासह विकास कामांसाठी वापरलेला निधी, उद्योग धंद्यामध्ये आलेल्या मंदीमुळे घसरलेला विकास दर व त्यामुळे वाढत्या बेरोजगारीचे वाढते प्रमाण यासह अनेक बाबींची चुकीची आकडेवारी देत मुख्यमंत्री धादांत खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलून लोकांना फसविणे बंद करावे,' अशी टीका कराड दक्षिणचे आमदार पृथ्वारीज चव्हाण यांनी केली आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा पुनरूच्चारही चव्हाण यांनी केला.

चव्हाण म्हणाले, 'मुख्यमंत्री भाषणांतून खोटी माहिती देत आहेत. मी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. या बाबत मी पक्ष श्रेष्ठींना पूर्वकल्पना दिली आहे. लोकसभेच्या पोट निवडणुकीला उभे राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कराड दक्षिण मतदारसंघातील लोकांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखविला आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघातील मतदार माझ्यावरती पुन्हा विश्वास दाखवित निवडून देतील. उदयनराजे भोसले यांनी गेल्या दहा वर्षांत आयआयटी सारख्या प्रकल्पांची मागणी किती वेळा केली होती? त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे किती मुद्दे लोकसभेत उपस्थित केले? विकास कामांच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी दिलेला पेन मी खिशात घातला, असा त्यांचा दावा पोरकटपणाचा आहे. मेडिकल कॉलेजचा प्रश्न केवळ जागेच्या अभावी इतकी वर्षे रेंगाळला आहे. तेथील सरकारी जागा मेडीकल कॉलेजसाठी देण्यामध्ये काही प्रशासकीय व कायदेशीर अडचणी आल्याने तो प्रश्न रेंगाळत पडला आहे.'

........

कोयनेतून विसर्ग

कराड :

कोयना धरण पाणलोट परिसरात पावसाचा जोर कमी अधिक होत आहे. धरणातून विनावापर पाणी सातत्याने सोडावे लागत आहे. सध्या धरणाच्या सहापैकी दोन दरवाजे एक फुटांनी उचलून त्यातून ३१५४ व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१००, असा एकूण ५२५४ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना धरणात सध्या १०४.८२ टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. दरम्यान सोमवारी सकाळी कोयना परिसरात २.७ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून ३२ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यात तनाली गावच्या पश्चिमेला तीन कि.मी.अंतरावर भूगर्भातील १५ किलोमीटर अंतरावर होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्त्रोद्योगासाठी सुधारित आराखडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

नव्या वस्त्रोद्योग धोरणात काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या दूर करुन सुधारित आराखडा करण्यात येईल. त्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत दहा लाख रोजगार निर्माण केले जातील. त्याचबरोबर इचलकरंजीचा लौकिक देशाचे मँचेस्टर असा व्हावा, यासाठी भाजप सरकार कटिबद्ध राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पेनतील समृद्ध महाराष्ट्र उभारणीसाठी महायुतीला पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सोमवारी इचलकरंजीत दाखल झाली. त्यावेळी थोरात चौकात आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला याआधी जनतेतून मताधिक्य मिळत होते. त्यावेळीही इव्हीएमवरच मतदान होत होते. आता आगामी विधानसभेसाठी आमचे पैलवान तयार असताना समोरचे पैलवान मात्र लढण्यासाठी तयार नाहीत. विरोधक यश झाकण्यासाठी इव्हीएमला दोष देत आहेत. परंतु हा दोष यंत्रात नसून विरोधकांच्या खोपडीत आहे. आमची यात्रा संवादासाठी आहे. याउलट विरोधकांनी संघर्षाची यात्रा सुरू करुन मतदारांना खोटी आश्‍वासने देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पाच वर्षांत पश्‍चिम महाराष्ट्रातील बंद पडलेली सिंचनाची अनेक कामी आम्ही मार्गी लावली. पुढील २५ वर्षे विरोधी पक्षच राहणार नाही, अशी तजवीज केली. आगामी विधानसभेवेळीही भाजपचाच झेंडा फडकणार आहे. इचलकरंजीतून आमदार हाळवणकर यांनाच जनता पुन्हा साथ देईल.'

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, जनादेश यात्रेने यापूर्वीच्या यात्रांचा विक्रम मोडल्याचे सांगून हाळवणकरांच्या विजयाची ही पोहोच पावती असल्याचे सांगितले. राज्यात पुन्हा फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

आमदार सुरेश हाळवणकर यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा नामोल्लेख टाळत डोमकावळा अशी उपाधी देत त्यांनी सरकारच्या कोट्यवधीच्या अनुदानाचा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.

दरम्यान, यड्राव फाटा येथे यात्रेचे स्वागत आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. तेथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते.

याप्रसंगी माजी मंत्री भरमू पाटील, माजी खासदार धनंजय महाडीक, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. निता माने, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, शहाजी भोसले, हिंदुराव शेळके, बाबा देसाई आदी उपस्थित होते.

अतिरिक्त पाणी वळवणार

मुख्यमंत्री म्हणाले, 'कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीवर दीर्घकालीन उपाययोजनेसाठी तज्ज्ञांशी चर्चा झाली आहे. त्या संदर्भात प्रोजेक्ट तयार करण्याचे काम सुरु झाले असले तरी तो पूर्ण होण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे तीन जिल्ह्यातील पुराचे अतिरिक्त पाणी कालव्याच्या माध्यमातून दुष्काळी भागात वळवण्याचा प्रयत्न होणार आहे. यातून भविष्यात दुष्काळी भागही सुजलाम सुफलाम होईल. पूरस्थितीचा प्रश्‍नही कायमस्वरुपी निकाली निघेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक गळती काढण्यास यश

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर योजनेच्या जलवाहिनीला दोन ठिकाणी लागलेल्या गळतीपैकी एक गळती दुरुस्त करण्यास सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाला यश आले. मात्र विद्युत केबलमुळे गणेश कॉलनीमधील (म्हसोबा देवालयजवळ) गळती काढण्यास अडथळा निर्माण झाला. दुरुस्तीच्या कामामुळे पाणी उपसा बंद राहिल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागला. दिवसभरात १५ टँकरच्या फेऱ्यांद्वारे पिण्याच्या पाणीपुरवठा करण्यात आला. मंगळवारपासून दोन पंपांद्वारे पाणी उपसा होण्याची शक्यता आहे.

चंबुखडी (दत्त कॉलनी) व गणेश कॉलनी अशा दोन ठिकाणी ९ सप्टेंबरपासून शिंगणापूर योजनेला गळती लागली आहे. गळती दूर करण्याचे काम सुरू करण्यास तब्बल आठवडा लागला. या कालावधीत लाखो लिटर पाणी गटारीवाटे वाहून गेले. अखेर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसांचे शटडाऊन घेत दुरुस्तीला सुरुवात केली. उपसा बंद राहिल्याने सोमवारी ए, बी व 'ई' वॉर्डातील पाणीपुरवठा बंद राहिला.

सोमवारी सकाळी नियोजनानुसार दत्त कॉलनी येथील गळती काढण्यास सुरुवात केली. जेसीबी मशिनद्वारे खोदाई करुन जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. सायंकाळी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर काँक्रिट टाकण्यात आले. तसेच अन्य कर्मचारी गणेश कॉलनी येथील गळती काढण्याचे काम करत होते. मात्र जलवाहिनीजवळच भूमिगत विद्युत केबल असल्याने काम करण्यात अडथळा निर्माण होऊ लागला. विद्युतपुरवठा खंडीत करण्यासाठी महावितरणशी संपर्क साधला. पण त्याला यश आले नाही. परिणामी दिवसभर येथील गळती दूर होऊ शकली नाही. रात्री उशीरा जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी दुरुस्ती कामाची पाहणी केली. एक गळती काढण्यात यश आल्याने मंगळवारपासून शिंगणापूर योजनेतील चारपैकी दोन उपसा पंप सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिवसभर पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. कळंबा व कसबा बावडा फिल्टर हाउस येथून अनुक्रमे ९ व ६ अशा १५ टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. उद्यमनगर, राजारामपुरी मातंग वसाहत, एनसीसी कँप, कपूर वसाहत, घाटगे कॉलनी, शाहू मिल चौक, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, शहाजी वसाहत, मोहिते कॉलनी आदी भागात टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टर्न टेबल लॅडरसाठी एक कोटीचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका क्षेत्रातील ५४ मीटरपर्यंत उंचीच्या इमारतीमध्ये एखादी आपत्ती ओढवल्यास आपत्ती निवारणासाठी अग्निशमन दलाच्या ताफ्यात टर्न टेबल लॅडर (वाहन) दाखल होण्यासाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे दहा कोटीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी एक कोटीचा निधी सोमवारी प्राप्त झाला. चार कोटी निधी मंजूर असताना फक्त एक कोटी निधी मिळाल्याने सत्तारुढ काँग्रेस आघाडीने नाराजी व्यक्त केली.

शहराचा झपाट्याने विकास होत असताना उंच इमारती उभ्या राहत आहेत. मात्र ५४ मीटरपर्यंत उंचीच्या इमारती आपत्ती ओढवल्यास त्याचा सामना करण्यासाठी अद्ययावत टर्न टेबल लॅडरची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेच्या ताफ्यात अशी सुविधा नसल्याने उंच इमारती उभारणीमध्ये अडथळा निर्माण होत होता. तसेच बांधकाम परवानगी दिली जात नव्हती. यातून मार्ग काढण्यासाठी २०१४ पासून महापालिका निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सरकारकडे दहा कोटींचा प्रस्ताव दाखल करुन सातत्याने निधीसाठी पाठपुरवा केला जात होता. २५ टक्के हिस्सा महापालिकेला घालावा लागणार होता. नंतर सरकारने त्यामध्ये बदल करत ५० टक्के निधी देण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे पाच कोटी निधी मिळणे अपेक्षित होते. पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर चार कोटी निधी मंजूर झाल्याचे पत्र जिल्हा प्रशासनामार्फत महापालिकेला प्राप्त झाले. चार महिन्यानंतर त्यापैकी एक कोटीचा निधी महापालिकेला प्राप्त झाला. महापालिकांना मुलभूत सोयीसुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानातून हा निधी देण्यात आला आहे. त्यानुसार ई-निविदा काढण्याची सूचनाही प्रशासनाला केली आहे.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार निविदा प्रक्रिया राबवली जाईल. मात्र अपुऱ्या निधीमुळे वर्क ऑर्डर काढणे प्रशासनाला जिकिरीचे ठरणार आहे. त्यामुळे उर्वरीत निधी मिळाल्यानंतरच टर्न टेबल लॅडरचा मार्ग मोकळा होणार आहे.

...

कोट

'टर्न टेबल लॅडरसाठी दहा कोटींचा प्रस्ताव अनेक दिवसांपूर्वी पाठवला होता. त्यापैकी चार कोटींचा निधी मंजूर झाला. पण प्रत्यक्षात एक कोटीच निधी मिळाला. निधीतून निविदा काढता येईल, पण वर्कऑर्डर काढता येणार नाही. राज्य सरकारने उर्वरित निधी त्वरीत द्यावा.

शारंगधर देशमुख, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदय विद्यालय, अर्ज कसा भरावा

$
0
0

नवोदय विद्यालय समितीच्या सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम विभागाच्या अधीकृत वेबसाइटवर जावे. वेबसाइटवर गेल्यानंतर अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करावे. अप्लिकेशन लिंकवर क्लिक करताच एक नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी संबंधित माहिती भरुन सबमिट करा. अशा सूचना विद्यालयातर्फे करण्यात आल्या आहेत. सहावीच्या प्रवेशाची प्रत डाऊनलोड करा आणि ते ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार म्हेत्रेंचा गुरुवारी भाजप प्रवेश?

$
0
0

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी गळती लागली असतानाच आता काँग्रेसला ही खिंडार पडले आहे. अक्कलकोट काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे येत्या गुरुवारी भाजपप्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी आमदार म्हेत्रे यांनी अक्कलकोटमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत 'चाय पे चर्चा' केल्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांनी अनेक दिवसांपासून काँग्रेसची साथ सोडली आहे. कॉँग्रेसने विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या, या मुलाखतीला ही म्हेत्रे यांनी दांडी मारली होती. त्याच वेळी त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले होते. आमदार म्हेत्रे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी खुद्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपली ताकद वापरली आहे. म्हेत्रे भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात अनेक दिवसांपासून असून, सोमवारी त्याला पुष्टी मिळाली. पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लेसर लाईट, ढोल पथकाचा गडगडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांच्या वर्षावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे महाराणी ताराराणी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. 'केंद्रातील मोदी सरकार आणि पाच वर्षे राज्यात पारदर्शक कारभार केल्याबद्दल कोल्हापूरकरांच्या भेटीस आलो असून भाजपला पुन्हा आशीर्वाद द्यावेत', अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजीत घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महडिक उपस्थित होते.

सांगलीहून जिल्ह्यात जनादेश यात्रेचे स्वागत अंकली पुलावर झाले. जयसिंगपूरमार्गे यात्रा इचलकरंजी येथे आली. तिथे जाहीर सभेला संबोधन करुन मुख्यमंत्री कोरोची, हातकणंगलेमार्गे कोल्हापुरात आले. तावडे हॉटेल येथे यात्रेचे स्वागत महानगर अध्यक्ष राहुल चिकाडे, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई यांनी केले. त्यानंतर मोटारसायकल रॅलीने यात्रा ताराराणी चौकाकडे रवाना झाली. फटाक्यांच्या आतषबाजीने ताराराणी चौकात जंगी स्वागत झाले. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. 'देवस्थान'चे अध्यक्ष महेश जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचे भलामोठा पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी उपस्थित भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी जनसमुदायाला संबोधित करताना महाराणी ताराराणींना अभिवादन केले. ते म्हणाले, 'गेले अनेक दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यात महाजनादेश यात्रा घेऊन जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा घेऊन जनतेपुढे जात आहे. गेली पाच वर्षे आम्ही पारदर्शी कारभार करुन प्रामाणिकपणाने काम केले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या विकासाचे काम केले आहे. विकासाकामांच्या जोरावर आम्ही पाच वर्षानंतर जनादेश घेण्यासाठी आलो आहे. कोल्हापूरकरांनी आम्हाला आशिर्वाद द्यावा, या आशिर्वादाच्या जोरावर राज्यात पुन्हा भाजप महायुतीचा झेंडा फडकवणार आहे. त्यानंतर पुन्हा राजर्षी शाहू महाराजांचा आशिर्वाद घ्यायला येणार आहे.'

यावेळी सरचिटणीस दिलीप मैत्राणी, संतोष भिवटे, माजी महापौर सुनील कदम, महानगरपालिका भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, अजित ठाणेकर, नगरसेविका रुपाराणी निकम, सविता भालकर, स्मिता माने आदी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...

महाडिक, जाधव, घाटगेंना आशीर्वाद द्या

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी, पालकमंत्री पाटील यांना कोल्हापूरच्या जनतेने आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले. तसेच आमदार अमल महाडिक, समरजीत घाटगे, महेश जाधव, धनंजय महाडिक यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन करताच कार्यकर्त्यांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवून पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात पावसाची हजेरी

$
0
0

जालना : जिल्ह्यात १६ सप्टेंबरच्या सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांत सरासरी ०.६० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. जालना ३, बदनापूर १.८०, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगीत पावसाची नोंद झाली नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८ मिलिमीटर एवढी असून १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४०२ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images