Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

...तर सेना-भाजपचीही गय नाही!

$
0
0
शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे ‘एनडीए’च्या जाहीरनाम्यात घेण्यास भाजपाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊनच महायुतीला साथ देणार आहे. मात्र, ऊस दराबाबत सेना-भाजप नेत्यांच्या कारखान्यांनाही सुट्टी नाही, अशी स्पष्टोक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

‘आप’ची प्रभागनिहाय कार्यका‌रिणी स्थापन होणार

$
0
0
सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी व लोकशाही प्रणालीमध्ये सत्तेची संधी मिळावी यासाठी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाचा देशभर विस्तार वेगाने होत आहे. पक्षाचा कोल्हापुरातही विस्तार होण्यासाठी महापालिकेच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्डमधील ७७ प्रभागांत १० सदस्यांची कार्यकारणी निवडण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आप’चे शहर संयोजक पद्माकर कापसे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आई, शाई आणि चळवळ

$
0
0
महाराष्ट्र फाउंडेशनचा कार्यकर्ता विभागातील पुरस्कार कॉ. धनाजी गुरव यांना आज (शनिवार) पुण्यात प्रदान केला जाणार आहे. चळवळ हेच त्यांच्या विचार आणि व्यवहाराचे केंद्र आहे. ते कोणत्या कारणाने झाले, याविषयीचं अनुभवकथन...

दोष ट्रॅफिक पोलिसांनाच का?

$
0
0
सुमारे अडतीस लाख लोकसंख्या असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी रस्ते अपघातात ३१३ जणांचे बळी गेले, तर सव्वा कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत २८६ बळी गेले आहेत. अपघातांना मानवी चुका ९० टक्के, तर १० टक्के तांत्रिक चुका कारणीभूत असतात, पण बहुतांश दोष वाहनचालकांचे आहेत.

ही शेतकऱ्यांची फसवणूकच

$
0
0
राज्य सरकार आणि महावितरणने शेतकऱ्यांना एक रुपया दराने वीज देत असल्याची चुकीची जाहिरात करून शेतकऱ्यांची फसवणूक आणि इतरांची दिशाभूल केल्याचा आरोप राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष एन. डी. पाटील यांनी केला.

संजय घाटगेंनी पुरावे द्यावेत

$
0
0
माजी आमदार संजय घाटगे यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून घाटगे यांचे शेतकऱ्यांवरील प्रेम हे पुतनामावशीसारखे आहे, ते सव्वा वर्ष आमदार होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांना दिसला नाही. आताच हा साक्षात्कार कसा झाला असा सवाल कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

मंदीचा उद्योगांना ३० टक्के फटका

$
0
0
जागतिक स्तरावर गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मंदीचा राज्यातील उद्योगांवर सुमारे ३० टक्के परिणाम झाला असून, सर्वांत जास्त फटका ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला बसला आहे. तरीही नवीन औद्योगिक धोरणामुळे गेल्या वर्षभरात ४५ मेगा प्रोजेक्ट राज्यात आणण्यात सरकारला यश आल्याचे औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले.

रेल्वेत नोकरी लावण्यासाठी घेतले ६५ लाख

$
0
0
रेल्वे खात्यात नोकरी लावतो म्हणून ६५ लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या बिपिनकुमार शशिभूषण चौधरी उर्फ यादव (रा. रेल्वे क्वॉटर, रेल्वे स्टेशन) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

आम्हालाही कायदा मोडावा लागेल

$
0
0
शहरात टोलविरोधी बेमुदत उपोषण सुरु असताना जर टोल चालूच ठेवून सरकार कायदा मोडणार असेल तर आम्हालाही कायदा मोडावा लागेल. चार दिवसात जर सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास जीव घालवण्यापेक्षा जीव घेण्याची वेळ येईल.

सुर्वेंनी महामंडळाच्या खात्यातून २२ लाख काढले

$
0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सारस्वत बँकेच्या खात्यातून महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी अध्यक्षपदाच्या का​रकिर्दीत २२ लाख रूपयांची रक्कम काढली असल्याचा गौप्यस्फोट महामंडळ बचाव कृती समितीचे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला.

महिला हक्क समिती पालिकेवर नाराज

$
0
0
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांअभावी महिलांची होणारी कुचंबणा पदाधिकारी व नगरसेविकांनी शुक्रवारी विधीमंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीसमोर मांडली. या प्रकाराबरोबरच महिलांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर बजेटपैकी ५ टक्के निधी खर्च झाला नसल्याबद्दल समितीने महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेत आघाडी तूर्त कायम

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ताकारणात तूर्त तरी बदल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही पक्षांकडून आघाडी​ मोडण्याची गडबड काय, असा सवाल केला जात असल्याने सत्ताबदल बदल होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

५० किलो तांदळाच्या पोत्यांत सात किलोची तूट

$
0
0
जयसिंगपुरातील शाळांमध्ये शालेय पोषण आहारासाठी आलेल्या ५० किलो तांदळाच्या अनेक पोत्यांमध्ये पाच ते सात किलो तांदूळ कमी असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

बारा मोटेची विहीर

$
0
0
शिवकालात महाराष्ट्रातील बांधकामांनी एक उंची गाठली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच, अनेक किल्ल्यांची डागडुजीही केली. त्यावेळच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यांतूनच दिसते असे नाही तर या ठिकठिकाणी अन्य प्रकारची दर्जेदार बांधकामे झाली होती.

अत्याचारप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी

$
0
0
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजी मारुती पाटील (वय ४२, रा.कालकुन्द्री, ता.चंदगड) यास पाच वर्षाची सक्तमजुरीची व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. जगताप यांनी ठोठावली.

काहींना लॉटरी, काहींवर संक्रांत

$
0
0
चार राज्यात विधानसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. यामध्ये काही जिल्हा व शहराध्यक्षांवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक दर्जा उंचावेल

$
0
0
स्वतंत्र ‘तंत्रज्ञान विद्यापीठा’मुळे अ​भियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रमात संपूर्ण राज्यभर सुसूत्रता राहील. त्याचबरोबर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षणाचा दर्जा उंचावणार आहे. राज्यभरात एकसारखा अभ्यासक्रम लागू होणार असल्यामुळे शिक्षण संस्थेतून बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांचा दर्जा समान असेल.

कागदपत्रे परत देण्यासाठी खंडणी

$
0
0
उसने घेतलेल्या रकमेपोटी लिहून घेतलेली नोटरी व कोरे धनादेश काढून घेण्यासह ती कागदपत्रे परत देण्यासाठी एक लाख रुपये खंडणी उकळणाऱ्या सहाजणांच्या विरोधात गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंबा टीडीआरला स्थगिती

$
0
0
दोन वर्षांपासून वादग्रस्त बनलेल्या कळंबा स्मशानभूमी व दफनभूमी जागेच्या १ लाख ४२ हजार ७३१ चौरस फुटांच्या टीडीआरला (हस्तांतरणीय विकास हक्क) हायकोर्टाने शुक्रवारी स्थगिती दिली.

उद्योगांना मिळणार दिलासा

$
0
0
वीज आणि पाण्याच्या वाढलेल्या दराबाबत उद्योजकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. त्या बरोबरच कपाउंडिंग चार्ज ८० टक्के कमी करण्याबरोबरच मुदतवाढ आकारणी १० टक्के करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images