Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंचगंगा इशारा पातळीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नद्या आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने रविवारी सायंकाळी सहा वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली. राजाराम बंधाऱ्यावर रात्री नऊ वाजता ३९ फूट ३ इंच पाणीपातळी होती. पावसाचा जोर असाचा राहिल्यास धोका पातळी ओलांडून महापुराचा धोका असल्याने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पूरबाधित कुटुंबांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले आहे. महिन्यापूर्वी आलेल्या महापुरात वेळीच जनावरांचे स्थलांतर न केल्याने मोठी हानी झाली होती. त्या कटू अनुभवामुळे करवीर तालुक्यातील चिखलीतील कुटुंबांनी जनावरांसह सुरक्षित स्थळी जाणे पसंत केले.

दिवसभरात तेथील २५० कुटुंबांतील ३९० जण सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले. त्यात ९० पुरुष, ३०० स्त्रियांचा समावेश आहे. ४५० जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले. शिरोळ तालुक्यातील गोठणपूर (कुरुंदवाड) मधील चार, राजापूरमधील ४८, राजापूरवाडीमधील १८ व खिद्रापूरमधील २७ अशा चार गावांना ९७ कुटुंबातील ३७५ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. यामध्ये ११७ पुरुष, १४९ स्त्रिया आणि १०९ लहान मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबरच ११६ जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले.

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजांमधून ७११२ क्सुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. दोन दिवसांच्या तुलनेत शहर, परिसरात पावसाचा जोर कमी राहिला तरी पंचगंगा नदीतील पाणी पातळी इंचाइंचांनी वाढत होती. सकाळी नऊ वाजता राजाराम बंधाऱ्यावर ३८ फुट ५ इंच पाणी पातळी होती. त्यामध्ये दुपारी एकपर्यंत तीन इंचांची वाढ झाली. सायंकाळी पाच वाजता ३८ फूट ११ इंच त्यानंतर एका तासात ३९ फुटावर पाणीपातळी जात इशारा पातळी गाठली. रात्री उशिरापर्यंत प्रती तासाला एक इंच पाणी वाढत राहिले. शहरातील नदीकाठावरील कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे.

जिल्ह्यातील सर्वच नद्यांमधील पाणी वाढल्याने ७१ बंधारे पाण्याखाली गेले. परिणामी चार राज्यमार्ग आणि १८ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. आजरा, चंदगड तालुक्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाल्याने घटप्रभा नदीवरील कानडी सावर्डे, अडकूर, हिंडगाव, तारेवाडी हे बंधारे वाहतुकीसाठी सायंकाळी खुले झाले.

प्रमुख धरणातील विसर्ग क्युसेक्समध्ये

तुळशी -१९५६

वारणा- ११८९४

दूधगंगा- ९५००

कासारी-११००

पाटगाव : १८७४

कुंभी -१८५०

कोयना : ६९७३९

अलमट्टी :२३००००.

आपत्ती व्यवस्थापन

पथक सज्ज

संभाव्य पूरस्थिती गृहीत धरून जिल्हा आपत्ती निवारण कक्ष सज्ज आहे. बचाव पथकातील जवान दिवसभर कार्यालयात सर्व सामुग्रीसह सज्ज होते. शिरोळ तालुक्यात दोन आणि करवीर तालुक्यात एक एनडीआरएफचे पथक तैनात होते. गरज भासल्यास बचाव कार्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे, असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पत्र देताच

जनावरांचे स्थलांतर

पुढील तीन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे चिखलीतून जनावरे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन पशूधन विकास अधिकाऱ्यांनी सरपंच, ग्रामसेवकांना दिले. त्यानंतर दिवसभर वाहनांतून जनावरांचे स्थलांतर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूरबाधित कुटुंबांचे स्थलांतर सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर, परिसर आणि जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर कमी राहिला तरी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कायम आहे. यामुळे पंचगंगा नदीने पाणी इशारा पातळी ओलांडली. रात्री नऊ वाजता राजाराम बंधाऱ्यावर ३९.३ इंच पाणी राहिले. यामुळे शहरातील दसरा चौक परिसरातील सुतारवाडा, करवीर तालुक्यातील चिखली आणि शिरोळ तालुक्यातील पूरबाधित कुटुंबे जनावरांसह स्थलांतरीत होत आहेत. शहरातील नदीकाठ परिसरातील गायकवाड वाडा, जामदार क्लब, शंकाराचार्य मठाची मागील बाजू तसेच शिंगणापूर रोडवर पाणी आले आहे. नदीतील पाणी धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने प्रशासन बचाव कार्यासाठी सज्ज झाले आहे.

शहरात दिवसभर ऊन, पावसाचा खेळ राहिला. सायंकाळी जोरदार पावसाच्या सरी आल्या. यामुळे गेल्या महिन्यात पूर आलेल्या भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. नदीने इशारा पातळी ओलांडल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील सुतारवाड्यातील ९ कुटुंबांना मुस्लिम बोर्डिंगमध्ये स्थलांतर केले. चिखली गावातील २५० कुटुंबातील ३९० व्यक्तींना तर शिरोळ तालुक्यातील गोठणपूर (कुरुंदवाड) मधील ४, राजापूरमधील ४८, राजापूरवाडीमधील १८ व खिद्रापूरमधील २७ अशा चार गावांतून ९७ कुटुंबांतील ३७५ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाजातून ७११२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी वाढते आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांतील पाणी पात्राबाहेर पडल्याने ७१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे ४ राज्यमार्ग आणि १८ प्रमुख बंद आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने अलमट्टी धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यासंबधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र अजून कर्नाटक प्रशासनाने त्याची गांभार्याने दखल न घेतल्याने अलमट्टीतून १ लाख ८२ हजार क्सुसेक्सच पाण्याचा विसर्ग होत आहे. विसर्ग कमी असल्याने पुराचा धोका वाढतो आहे. त्याची धास्ती गेल्या महिन्यात पाण्याखाली गेलेल्या भागातील रहिवाशांनी घेतली आहे. रात्रीत कधीही पाणी वाढेल हे गृहीत धरून चारचारी, दुचाकी वाहने उंच ठिकाणी पार्क केली जात आहेत. जिल्हाधिकारी देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गरज लागल्यास तातडीने बचाव कार्य सुरू करण्यासाठी शिरोळ तालुक्यात दोन आणि शहरात एक एनडीआरएफचे पथक तैनात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भामट्याच्या शोधासाठी पथके रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अमेरिकन डॉलर बदलून देण्याच्या बहाण्याने शाहूपुरी येथील व्यापाऱ्याला १० लाख, ६० हजारांचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या शोधासाठी रविवारी पोलिसांची दोन पथके केरळ, बेंगलोरला रवाना झाली. संशयित स्टीव्ह गॉडवीन डी. (रा. राममूर्तीनगर, बेंगलोर) असे त्याचे नाव आहे.

शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पद्धतीने पुणे, मुंबईमध्ये व्यापाऱ्यांना गंडा घालणारा केरळ येथील सराईत गुन्हेगार पिल्ले (पूर्ण नाव नाही) आहे. त्याचा फोटो संशयित भामट्याशी मिळता-जुळता आहे. हा भामटा तोच आहे का, याची खात्री पोलिस करीत आहेत. बेंगलोरमधील भामटा स्टीव्ह डी याने व्यापारी सुनील भूपाल सन्नके (रा. शाहूपुरी, तिसरी गल्ली) यांना अमेरिकन १५ हजार डॉलरचे परकीय चलन बदलून पाहिजे असल्याचे सांगून त्यांच्याकडून १० लाख, ६० हजार रुपये घेतले व त्यानंतर तो हॉटेलमधून पसार झाला. याप्रकरणी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये भामटा अस्पष्ट दिसत आहे. अशाच पद्धतीने व्यावसायिक, गुंतवणूकदांची या प्रकारची फसवणूक करणारा केरळ येथील एक पिल्ले नावाचा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे येथील पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्याचा फोटो सन्नके यांना दाखविला असता त्यांनी 'तो' भामटा पिल्लेसारखा दिसत असल्याचे सांगितले. त्यामुळे पिल्ले याच्यावर संशय बळावला आहे. त्याच्या शोधासाठी दोन पथके केरळ व बेंगलोरला रवाना केली. सन्नके यांच्या मोबाइलवर आलेला भामट्याचा क्रमांक बंद असल्याने त्याचे लोकेशन मिळून येत नाही. त्याने वापरलेला मोबाइल क्रमांकही दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेतून ५३ हजार क्युसेकने विसर्ग

$
0
0

कराड :

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अद्याप सुरूच आहे. शिवाजीसागर जलाशयात ५९ हजार ७०८ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे आवक होईल तितके पाणी धरणांतून सोडावे लागत आहे. धरणाचे सहा वक्री दरवाजे सहा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले असून, या दरवाजातून ५१ हजार ७८२ व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१००, असे एकूण ५३ हजार ८८२ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

दरम्यान, कोयना नदीला पूर आल्याने मूळगाव पूल व मोरणा विभागाला जोडणारा नेरळे पूल अद्याप पाण्याखालीच आहेत. त्यामुळे या पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रविवार सायंकाळी पाचपर्यंत कोयनानगर येथे २६, नवजा येथे ३३, तर महाबळेश्वर येथे २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एक जूनपासून आजपर्यंत धरणात एकूण १९७.४१ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर यापैकी तब्बल ९०.७४ टीएमसी पाणी विनावापर कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅबतर्फे पूरग्रस्त अंधांना वाटप

$
0
0

कोल्हापूर

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब), कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे जिल्ह्यातील ३५ पूरग्रस्त अंधांना दहा हजार रुपये व संसारोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते मदतीचे वाटप झाले. या कार्यक्रमासाठी नॅब इंडिया व महाराष्ट्र शाखेचे सहकार्य लाभले. 'नॅब'महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मंगला कलंत्री, मानद सचिव आनंद आठलेकर, सुहास कर्णिक, कार्यकारी संचालक पल्लवी कदम यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी देसाई यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. राजेश वोरा यांनी सूत्रसंचालन केले. विजय रेळेकर यांनी आभार मानले. यावेळी 'नॅब'चे संचालक अॅड. धनंजय पठाडे, दीपक बोगार, शिवानंद पिसे, डॉ. अंजली निगवेकर, डॉ. मीना डोंगरे, सतीश पाठारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुष्ठरुग्ण ड्रेसरच्या मानधनात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुष्ठरुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जखमा असलेल्या कुष्ठरुग्णांवर ड्रेसिंग करण्यासाठी नेमलेल्या ड्रेसरच्या मंजूर अनुदानात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे मानधन प्रतिमहा तीन, पाच, सहा हजार रुपये असे असणार आहे. जिल्ह्यात शेंडा पार्क येथे स्वाधारनगर कुष्ठ वसाहत, तर इचलकरंजी येथे महात्मा गांधी कुष्ठ वसाहत आहेत.

राज्यातील ३० स्वयंभू कुष्ठ वसाहतीत राहणाऱ्या आणि जखमा असलेल्या कुष्ठ रुग्णांवर वेळेत ड्रेसिंग व्हावे यासाठी ड्रेसर नेमले आहेत. बहुतांश ड्रेसर औषधोपचाराने बरे झालेले पूर्वाश्रमीचे कुष्ठरुग्ण असतात. कुष्ठरुग्णांवर ड्रेसिंग करण्यास इच्छुक असलेल्या प्रशिक्षित कुष्ठरुग्णांना सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. त्यानुसार अत्यल्प वेतनावर ड्रेसिंग करणाऱ्या ड्रेसरच्या मानधनात वाढ करण्याची मागणी वारंवार केली जात होती. त्या अनुषंगाने मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या निकषात कुष्ठरुग्णांचे ड्रेसिंग करण्यास इच्छुक असणारी व्यक्ती स्वतः कुष्ठरुग्ण असणे आवश्यक आहे. तसेच इच्छुक कुष्ठरुग्णाला कुष्ठरोग सहायक संचालकांच्या माध्यमातून डीएनटीमार्फत ड्रेसिंग करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्वयंभू कुष्ठ वसाहतीतील ड्रेसिंग करण्यासाठी इच्छुक आणि पात्र कुष्ठरुग्णांचे नाव कुष्ठरोग सहायक संचालकांना वसाहतीमधून कळवावे लागणार आहे. कुष्ठ रुग्णांवरील ड्रेसिंगसाठी सरकारकडून मोफत औषधे पुरवली जात आहेत.
...

कुष्ठरुग्णांसाठीच्या ड्रेसरचे पूर्वीचे मानधन तुटपुंजे होते. पूर्वाश्रमीचे कुष्ठरोगी ड्रेसरचे काम सेवाभावी पद्धतीने करत होते. त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून केली जात होती. सरकारने मानधनवाढीचा निर्णय घेतल्याने कुष्ठरुग्णांना चांगल्या सेवा देण्यासाठी ड्रेसर अधिक उत्साहाने काम करतील.
संतोष नागपूरकर, अवैद्यकीय पर्यवेक्षक, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकादशीला यान सोडल्यानेच अमेरिकेची मोहीम यशस्वी: भिडे

$
0
0

सोलापूर: अमेरिकेने एकादशीच्या दिवशी अंतराळात यान सोडलं म्हणून अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली, असा अजब दावा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला आहे. त्यामुळे भिडे यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला संबोधित करताना संभाजी भिडे यांनी हा अजब दावा केला. ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीला संतुलित असते. त्यामुळेच अमेरिकेने एकादशीच्या दिवशी त्यांचे यान अंतराळात सोडल्याने त्यांची मोहीम यशस्वी झाली. भारतीय कालमापण पद्धतीमुळेच हे शक्य झाल्याचा दावा भिडे यांनी केला आहे.

भारतीय कालमापन पद्धतीत एका सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची क्षमता आहे. त्यामुळेच चांद्रमोहीम राबविताना अमेरिकेने आपल्या कालमापन पद्धतीचा आधार घेतला. चंद्रावर उपग्रह सोडण्याचे अमेरिकेचे ३८ प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर नासाच्या वैज्ञानिकांनी आपल्या कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि एकादशीच्या दिवशी उपग्रह अंतराळात सोडून चांद्रयान मोहीम फत्ते केली, असं तर्कटही त्यांनी मांडलं. भारताच्या चांद्रमोहीमेला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर भिडे यांनी हा दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्माल्यातून ‘अवनि’ करणार १०० टन खतनिर्मिती

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

घरगुती गणेशमूर्ती विसर्जनावेळी संकलित करण्यात आलेल्या दीडशे टन निर्माल्यापासून अवनि संस्थेच्यावतीने १०० टन खतनिर्मितीला सुरूवात करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव या संकल्पनेतून निर्माल्यदानाच्या आवाहनाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अवनि संस्थेच्या ३५ महिलांची टीम खतनिर्मितीमध्ये कार्यरत झाली आहे.

पाच वर्षापूर्वी कोल्हापुरात निर्माल्य दान ही चळवळ सक्रिय झाली. नदी, तलाव यामध्ये निर्माल्य न टाकता त्यासाठी विसर्जनस्थळी कुंड ठेवण्यात आले होते. गेल्या पाचवर्षापासून महापालिका प्रशासनाच्यावतीने ही मोहीम राबवली जाते. जमा होणारे निर्माल्य महापालिका प्रशासन डंपिंगग्राउंडवर टाकत होते. दरम्यान अवनि संस्थेच्यावतीने कचरा वेचक महिलांच्या सहकार्याने हे सर्व निर्माल्य एकत्रित करण्याचे काम सुरू केले. यावर्षी शहरातील रंकाळा, पंचगंगा नदी, कोटितीर्थ, लक्षतीर्थ, तांबट कमान येथून १५५ टन निर्माल्य अवनि संस्थेच्यावतीने जमा करण्यात आले. संस्थेच्या वाशी येथील कार्यालयाच्या परिसरात या निर्माल्यापासून खतनिर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. यंदा संकलित झालेल्या निर्माल्यापासून शंभर टन खत तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात निर्माल्य कापून भुकटी स्वरूपात केले जाणार आहे. त्यानंतर ते स्वच्छ करून त्यावर बायोक्लीन पावडर टाकली जाणार आहे. जुने खत काही प्रमाणात मिसळून ठेवण्यात येणार आहे. पूर्ण खतनिर्मिती होण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

जगवली ४५० झाडे

अवनि संस्थेने गेल्या पाच वर्षात निर्माल्याच्या खतातून साडेचारशे झाडे जगवली आहेत. तसेच दीड एकर जागेत सेंद्रीय पद्धतीने शेती फुलवली आहे.

पर्यावरणपूरक उत्सव व विसर्जन ही काळाची गरज आहे. त्यामुळे निर्माल्यापासून खतनिर्मितीसाठी अवनिने केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. यामुळे अनेक कचरावेचक महिलांना रोजगार मिळाला आहे. खतविक्रीतून महिलांना पैसे मिळतात. शिवाय दरवर्षी दीडशे टन निर्माल्य नदीत टाकण्यापासून अवनि संस्थेने वाचवले आहे.

- अनुराधा भोसले, अध्यक्ष, अवनि संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाची उघडीप, देखावे फुलले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाची उघडीप मिळू लागल्याने देखावे, गणेशमूर्ती पाहण्यासाठी नागरिक उत्साहाने बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही हुरुप आला असून शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त सजावट, रोषणाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राजारामपुरीत आकर्षक प्रतिकृतींबरोबर वेगळ्या रुपातील गणेशमूर्ती पाहण्यासाठी खुल्या आहेत. तर शिवाजी चौक, जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ परिसरात २१ फुटी मूर्ती व पूर परिस्थितीवर भाष्य करणारे तांत्रिक देखावे साकारले आहेत. शिवाजी पेठ व मंगळवार पेठ परिसरात यंदा नेहमीप्रमाणे सजीव देखाव्यांची लगबग नसली तरी प्राचीन तसेच वेगळ्या रुपातील गणेशमूर्ती पाहता येणार आहेत. शाहूपुरीमध्ये देखाव्यांपेक्षा विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. विसर्जनाला दोनच दिवस राहिल्याने हे तांत्रिक देखावे तसेच आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.

लक्ष्मीपुरीत यंदा आकर्षक गणेशमूर्ती

प्राचीन मंदिराच्या प्रतिकृती, पौराणिक कथेवर आधारित देखावे उभारण्याची परंपरा जपणाऱ्या लक्ष्मीपुरी परिसरातील सार्वजनिक तरुण मंडळांनी यंदा वैविध्यपूर्ण रुपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. कोंडाओळ येथील शिवशाही मित्र मंडळाची नंदीवर आरुढ गणेशमूर्ती भाविकासाठीआकर्षण ठरत आहे. सोमवार पेठेतील सोमवार पेठेतील गाइड फ्रेंडस सर्कलने उत्सवातून पर्यावरणाचा जागर केला आहे. या मंडळाची 'वृक्ष आपली माता' असा संदेश देणारी गणेशमूर्ती, सत्यनारायण तरुण मंडळाची शंकर रुपातील गणेशमूर्ती या विलोभनीय आहेत. कौंतेय ग्रुपची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ, लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ, कट्टा ग्रुप, देशप्रेमी तरुण मंडळाच्या गणेशमूर्ती वैविध्यपूर्ण आहेत. भागातील विविध मंडळांनी पर्यावरण वाचवा आणि सामाजिक बांधिलकीची हाक दिली आहे. पूलगल्ली तालीम मंडळाची २१ फुटी गणेशमूर्ती भाविकांसाठी आकर्षण ठरली आहे.

शाहूपुरीत लक्षवेधी विद्युत रोषणाई

शाहूपुरी परिसरात यंदा भव्य देखाव्यांना फाटा देत सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. लक्षवेधी विद्युत रोषणाई केली आहे. यामुळे गणेश भक्त सायंकाळी मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागातील शाहूपुरीत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. महापुरामुळे मोठे देखावे नसले तरी मूर्तीचे वेगळेपण यंदाही कायम ठेवण्यात आले आहे. विविध रूपांतील पूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पहिल्या गल्लीतील श्री गणेश मित्रमंडळाने कमळावरील मूर्ती, व्हीनस कॉर्नरवरील त्रिमूर्ती गणेश मंडळाने आणि व्यापारी पेठेतील शाहूपुरी युवक मंडळाने बैठी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. इतर मंडळांनीही वैविध्यपूर्ण मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंडप, परिसरातील विद्युतरोषणाई, विविध रंगांच्या प्रकाशझोतांनी रात्री शाहूपुरी उजळून निघते आहे. मूर्ती पाहण्यासाठी अबालवृध्द, सहकुटुंब भक्तांची वर्दळ वाढली आहे.

देखाव्यांमध्ये उमटले महापुराचे प्रतिबिंब

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुरामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांसाठी जुना बुधवार पेठेतील मंडळे, तालमींच्या कार्यकर्त्यांनी झोकून देत मदतकार्य केले होते. महापूराचे संकट संपल्यानंतरही महापुरा भान कार्यकर्त्यांना कायम राहिले असून त्यांनी गणेशोत्सवात आपल्या भावना देखाव्यातून मांडल्या आहेत. बहुतांश मंडळाच्या देखाव्यात महापुराचे प्रतिबिंब उमटले आहे. हे देखावे पाहण्यासाठी गर्दी होत असून मंडळांनी पूरग्रस्त निधीसाठी सढळ हाताने मदत करून सामाजिक बांधीलकीही जपली आहे.

पंचगंगेला पूर आल्यानंतर शुक्रवार पेठेतील घरे पाण्याखाली गेली. तसेच चिखली, आंबेवाडीतील नागरिकांना बाहेर काढण्यास पेठेतील कार्यकर्त्यांनी जोखीम पत्करुन नागरिकांना बाहेर काढले. एनडीआरएफ, लष्कर आणि नेव्हीने बाहेर काढलेल्या नागरिकांना आधार देण्याचे काम करताना आठवडाभर त्यांना वास्तव्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या. सकाळ, सायंकाळ चहा, पाणी, नाष्टा आणि दोन वेळा जेवणाची सोय केली. महापुराने झालेला विध्वंस लक्षात घेऊन उत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला. शिपुगडे तालीम मंडळ, डांगे गल्ली तरुण मंडळाने थेट २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. साधेपणाने उत्सव साजरा करताना अनेक मंडळांनी देखावे सादर केला आहेत. तोरस्कर चौकातील सोल्जर ग्रुपने आपत्ती व्यवस्थापनात सहभागी गणेश हा देखावा सादर केला आहे. लष्कराच्या वेषातील गणेश पूरग्रस्तांना वाचवत असलेला देखावा भाविकांना भावला आहे. महापूर, भूंकप, वादळ अशा आपत्तीत कोणती काळजी घ्यावी याचे प्रबोधनपर फलकही देखाव्यात मांडले आहेत.

न्यू अमर तरुण मंडळाने पुराचा देखावा सादर करताना आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या एनडीआरएन, लष्कराला सलाम केला आहे. स्वत: गणराया नावेतून महापुरात बचावसाठी उतरले आहेत अशी देखाव्याची मांडणी केली आहे. नरसोबा सेवा मंडळाने देखाव्यात गणपती मोठ्या रबरी ट्यूबमधून लहान बालकाला वाचवत असल्याचा देखावा मांडला आहे.

महापुरात अनेकांची घरे पडली, व्यवसाय नष्ट झाले असताना त्यांना उभारी देण्यासाठी समाज एकवटला आहे. स्वत: गणराय हातात वीट घेऊन घरबांधणी करत असून त्यांच्या मदतीला कुटुंबातील सर्व सदस्य मदत करत असल्याचा डांगे गल्ली तरुण मंडळाचा देखावा दाद मिळवणारा ठरला आहे. तोरस्कर चौकातील नुक्कड तरुण मंडळाने बुडालेले कोल्हापूर हा देखावा मांडला असून गणराय मदतीला धावले आहेत असा देखावा साकारला आहे. अशाच आशयाचा देखावाही गिरणी कॉर्नर मित्र मंडळाने मांडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिसेस इंडिया स्पर्धेत ममता ओसवालांना दोन किताब

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दिवा मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन या संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर आयोजित मिसेस इंडिया स्पर्धेत येथील ममता प्रकाश ओसवाल यांनी 'क्विन ऑफ वेस्ट' आणि 'मिसेस कॅटवॉक' असे दोन मानाचे किताब पटकाविले. पुणे येथे झालेल्या अंतिम फेरीसाठी देशभरातील ४२ सौंदर्यवतींना निवडले होते. सौंदर्य आणि बुद्धीमत्तेची मोहर उमटवत सौंदर्यवती स्पर्धेत कोल्हापूरचे नाव उंचावले आहे.

स्पर्धेचे परीक्षक अश्मित पटेल व अभिनेत्री आदिती गोवित्रीकर यांच्या हस्ते ओसवाल यांना क्राऊन देऊन गौरविले. ममता ओसवाल या विवाहित आहेत. त्या मूळच्या राजस्थानमधील आहेत. येथील बाबुजमाल परिसरात पती, तीन मुलांसह त्या राहतात. त्या, गुजरीजवळ घुंघट हे महिलांसाठीचे कपड्यांचे दुकान चालवितात. साडी विक्रीचा व्यवसाय करत त्यांनी मॉडेलिंग, अभिनय व सौंदर्य स्पर्धांची आवड जोपासली.

स्पर्धेविषयी ममता ओसवाल म्हणाल्या, 'लग्नानंतर मुलांचे संगोपन व व्यवसायामुळे आवडत्या छंदासाठी वेळ मिळाला नव्हता. दरम्यान काही महिन्यापूर्वी दिवा मिसेस इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या पात्रता फेरीत चुणूक दाखविली. २९ ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत अंतिम फेरी झाली. कुटंब, व्यवसाय सांभाळत असताना जिद्द, मेहनत आणि परिश्रमाच्या बळावर यशाचा मुकुट पटकाविला. माझ्या यशात कोल्हापूरचा वाटा मोठा आहे. संसाराची जबाबदारी सांभाळत आवडता छंद जोपासता येतो हे सिद्ध झाले. आता बिग बॉस स्पर्धेत सहभागी होणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्माल्यापासून गावपातळीवरखत निर्मितीच्या सूचना

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पर्यावरणपूरक गणेशोत्सवांतर्गत 'विसर्जित मूर्ती दान करा' या उपक्रमापाठोपाठ ग्रामीण भागात निर्माल्य दानला मोठा प्रतिसाद लाभला आहे. घरगुती गणेश विसर्जनावेळी जिल्ह्यात जमा झालेल्या निर्माल्यापासून गाव पातळीवर खत निर्मिती करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना केल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ११८८ ट्रॅक्टर ट्रॉली व १७१ घंटागाडी निर्माल्य जमा झाले आहे.

ग्रामपंचायत पातळीवर निर्माल्यापासून खत निर्मिती होणार आहे. सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जनादिनीही मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलित होते. त्यानंतर निर्माल्यापासून खत निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. वाहत्या पाण्यात, जलस्त्रोत असलेल्या ठिकाणी निर्माल्य टाकू नये या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद मिळाल्याची माहती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. करवीर तालुक्यात सर्वाधिक निर्माल्य जमा झाले आहे. तालुक्यात २७४ ट्रॅक्टर ट्रॉली व घंटागाडी निर्माल्य जमा झाले.

ग्रामसेवकांच्या संपाचा अडथळा

सध्या ग्रामसेवक संपावर आहेत. त्याचा परिणाम ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजावर होत आहे. घरगुती गणपती विसर्जनादिनी संकलित गणेशमूर्ती व निर्माल्याची नेमकी आकडेवारी आजही प्रशासनाकडे उपलब्ध नाही. जिल्ह्यात घरगुती गणेशमूर्तीची संकलीत संख्या २ लाख ३२ हजार १२२ आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. त्यानंतर संकलीत मूर्ती व एकूण किती निर्माल्य जमा झाले याची आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे४३ ट्रक साहित्य वाटप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या आवाहनानुसार पक्षातर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य, कपडे वाटप करण्यात आले. पक्षातर्फे, आतापर्यंत ट्रक आणि टेंपो मिळून ४३ वाहने भरुन साहित्य जिल्ह्यातील पूरग्रस्तांना वाटप केले. पक्षातर्फे साहित्य वाटपाची जबाबदारी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्यावर सोपवली. त्यांच्यासह कुटुंबीय मदतकार्यात सक्रिय होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध भागातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मदत करण्यात आली. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, कपडे व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आहे. पक्षातर्फे, जमा होणारे साहित्य वाटपाची जबाबदारी साळोखे यांच्यावर सोपवली. जमलेल्या साहित्याची वर्गवारी, कीट्स बनविणे यासाठी पक्षाचे निवडक कार्यकर्ते आणि साळोखे कुटुंबीयांनी काम केले. त्यांच्या पत्नी शशिकला, मुले निलेश, निलिमा, गायत्री, भाऊ सुनील आदींनी नियोजन केले. जमलेले साहित्य पॅकिंग करून कार्यकर्त्यांमार्फत पूरग्रस्त भागात पोहोच केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची उसंत, पूर कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले आठवडाभर सुरू असलेल्या जोरदार पावसाने सोमवारी उसंत घेतली. दिवसभर काही तुरळक सरी वगळता उघडीप राहिली. तरीही धरणांतून विसर्ग सुरूच असल्याने पूरस्थिती कायम आहे. काळम्मावाडी धरण आणि पाटगाव धरणातून विसर्ग सुरूच असल्याने कागल-निढोरी मार्ग, चार बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.

करवीरमधील सहा बंधारे पाण्याखाली

कुडित्रे: सोमवारी दिवसभरात अपवाद वगळता पावसाने उघडीप दिल्यामुळे पावसाने व महापुराने हैराण झालेल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला. पाऊस कमी असला तरी राधानगरी व तुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती व तुळशी नद्यांच्या पाणीपातळीतील वाढ कायम आहे. सकाळी कसबा बीड बंधाऱ्याच्या परिसरात पाण्याच्या पातळीत वाढच झाल्याची दिसून आली. त्यामुळे महापुराची स्थिती कायम आहे. तालुक्यातील कसबा बीड, आरे, बहिरेश्वर, कोगे, शिंगणापूर, राजाराम हे बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे.

गडहिंग्लजमध्ये उघडीप

गडहिंग्लज: तालुक्यात सोमवारी पावसाने पूर्ण विश्रांती घेतली. हवामान स्वच्छ राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गेले चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. निलजी, नांगनूर व ऐनापूर बंधाऱ्यावरचे पाणी पूर्ण कमी झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. उघडिपीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध उपक्रम राबविण्यास मदत झाली.

पूरपरिस्थिती स्थिर.

शाहूवाडी:तालुक्यात पावसाने सोमवारी पुन्हा जोर धरल्याने रविवारच्या तुलनेत सोमवारी वारणा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली. त्याचवेळी कडवी नदीची पाणीपातळी साडेआठ मीटरवर स्थिरावली होती. या नदीवरील पाटणे, सौते-सावर्डे, शिरगाव हे बंधारे व वारणा नदीवरील शित्तूर वारुण-आरळा पूल तसेच रेठरे बंधारा आजही पाण्याखाली होते. रविवारी सकाळी घेतलेल्या पर्जन्यमापकावरील नोंदीनुसार तालुक्यात सरासरी ३५.५० मिलिमीटर पाऊस झाला.

शिरोळमध्ये पाणीपातळीत वाढ

जयसिंगपूर: शिरोळ तालुक्यात सोमवारी किरकोळ हलक्या सरी वगळता दिवसभर पावसाने उघडीप दिली. मात्र तालुक्यातील कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कृष्णा नदीच्या पातळीत तीन फुटांनी वाढ झाली असून अंकली पुलाजवळ सायंकाळी ३७.९ फूट इतकी पातळी होती. तालुक्यातील ९७ कुटुंबांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संततधार पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे शिरोळ तालुक्यात सोमवारी कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या चारही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. अंकली पुलाजवळ कृष्णा नदीची पातळी रविवारी सायंकाळी ३४.१० फूट होती. २४ तासांत यामध्ये तीन फुटांनी वाढ झाली. पंचगंगा नदीची पातळी तेरवाड बंधाऱ्याजवळ ५७.६ फूट, नृसिंहवाडी येथे ५५.६ फूट, शिरोळ बंधाऱ्याजवळ ५६ फूट होती. दिवसभर पाणी स्थिर होते. नृसिंहवाडी येथे इशारा पातळी ६५ फूट आहे. दरम्यान, प्रशासनाने गोठणपूर वसाहत कुरूंदवाड, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर येथील ९७ कुटुंबांतील ३७५ जणांचे स्थलांतर केले.

राधानगरी: सोमवारी पावसाने उघडीप दिली असून राधानगरी ,काळम्मावाडी जलाशय परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सुरु असलेले तीन स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून दोन दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी धरणातून विसर्ग नऊ हजार क्युसेक्सने कमी करण्यात आले. त्यामुळे पाणीपातळी कमी झाली आहे. भोगावती, दूधगंगा नद्यांच्या पुलावरील पाणी कमी झाले असून बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. सलग १६ दिवस पावसाने हाहाकार माजवला होता. रविवारपासून पावसाने उसंत घेतली. सोमवारपर्यंत राधानगरी धरणातून पाच स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता. सोमवारी सकाळी सातपैकी दोन दरवाजांतून विसर्ग सुरू आहे. यातून २८५६ आणि वीज गृहातून १४०० क्युसेस असा ४२५६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. पडळी, पिरळ पुलावरील पाणी ओसरले असून शिरगाव,तारळे, राशिवडे येथील बंधारे पाण्याखाली आहेत. दूधगंगा नदीवर असलेले बिद्री, डेवाडी येथील पाणी ओसरले आहे तर मालवे, सुलंबी येथील बंधाऱ्यावर पाणी आहे.

गगनबावडा वाहतूक सुरू

गगनबावडा: तालुक्यात सोमवारी पावसाने उसंत घेतली. मात्र कुंभी नदीवरील गोठे पूल व वेतवडे, मांडूकली व अणदूर हे बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प आहे. गगनबावडा मार्गावर मांडूकली दरम्यान रस्त्यावर आलेले पाणी रात्रीच ओसरल्याने सकाळपासून गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. धामणी खोऱ्यातील वाहतूक आज अंबर्डे व गवशी बंधाऱ्यावरून सुरू झाली आहे.

पावसाची विश्रांती

गारगोटी: गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज सकाळपासूनच विश्रांती घेतली. काहीकाळ ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडला. आज अधिककाळ वातावरण स्वच्छ राहिले. नदीतील पाण्याचा ओघ कमी झाला आहे.

पन्हाळ्याला दिलासा

पन्हाळा : पन्हाळा परिसरात एक दोन सरींचा अपवाद वगळता दिवसभर पूर्णपणे उघडीप होती. त्यामुळे पावसाने अक्षरश: बेजार झालेल्या पन्हाळावासीयांना थोडा दिलासा मिळाला. आठवडाभर झालेल्या पावसाने नद्यांची पातळी वाढून पुन्हा पुराचे संकट उभे राहिले होते. रविवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीपातळी कमी होत आहे.

चंदगडमध्ये वाहतूक सुरळीत

चंदगड: गेले चार-पाच दिवस संततधार सुरू असलेल्या पावसाने पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याने. त्यामुळे गवसे, हल्लारवाडी हे बंधारे व चंदगड व हिंडगाव पूल सोमवारी वाहतुकीला खुले झाले. तरीही जांबरे मध्यम प्रकल्प परिसरात झालेल्या पावसामुळे कोनेवाडी बंधारा सलग चौथ्या दिवशीही पाण्याखालीच राहिल्याने या गावांचा संपर्क तुटलेलाच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकादशीला यान सोडल्याने अमेरिकेला यश

$
0
0

सोलापूर : 'एकादशीच्या दिवशी चांद्रयान अंतराळात सोडल्यानेच अमेरिकेची चांद्रमोहीम यशस्वी झाली,' असे अजब तर्कट शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मांडले. या वक्तव्यामुळे भिडेंवर चौफेर टीका होत आहे. नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी हा अजब दावा केला. भिडे म्हणाले, 'ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीला संतुलित असते. त्यामुळेच अमेरिकेने एकादशीच्या दिवशी त्यांचे चांद्रयान अंतराळात सोडल्याने त्यांची मोहीम यशस्वी झाली. भारतीय कालमापन पद्धतीमुळेच हे शक्य झाले. भारतीय कालमापन पद्धतीत एका सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची क्षमता आहे. त्यामुळेच चांद्रमोहीम राबविताना अमेरिकेने आपल्या कालमापन पद्धतीचा आधार घेतला. चंद्रावर उपग्रह सोडण्याचे अमेरिकेचे ३८ प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर नासाच्या वैज्ञानिकांनी आपल्या कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि एकादशीच्या दिवशी उपग्रह अंतराळात सोडून चांद्रयान मोहीम फत्ते केली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटर एटीएममध्ये ढपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जलव्यवस्थापन समिती तसेच स्थायी समितीची मंजुरी न घेता चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषदेत दोन कोटी ६२ लाख ६६ हजार रुपयांची वॉटर एटीएम मशिन्सची खरेदी झाली आहे. येथील कारभाऱ्यांनी सर्वसाधारण सभेतही हा विषय अजेंड्यावर आणला नव्हता. केवळ चर्चा झाल्याचे दाखवून ही सगळी प्रक्रिया राबवली असून यामध्ये कारभाऱ्यांनी सुमारे ५० लाख रुपयांचा ढपला पाडल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी पत्रकार परिषदेत केला. वॉटर एटीएममुळे संबंधित कंपन्यांचा फायदा होत असून ग्रामपंचायतीला फटका बसत असल्याचे ते म्हणाले.

खोत म्हणाले,' ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यात ७१ गावांत पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, तसेच समाजकल्याणकडून निधी उपलब्ध झाला होता. या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे यासाठी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. या प्रकरणात कोण कोण आहेत हे समोर आले पाहिजे. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी ११ इतके सर्वाधिक वॉटर एटीएम मशिन्स बसविले आहेत. शिरोळ तालुक्यातील आठ, गडहिंग्लजमध्ये सहा गावात मशिन्स बसविली आहेत.'

खोत पुढे म्हणाले, 'जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील सदस्यांना आपल्या भागात वॉटर एटीएम मशिन बसविल्याचे माहितही नाही. ५० लाख रुपयांच्या आतील खरेदीला विषय समिती परवानगी देते. ५० लाखापुढील रकमेच्या खरेदीसाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक आहे. मात्र कारभाऱ्यांनी वॉटर एटीएम खरेदी प्रकरणी सगळे नियम धाब्यावर बसविले. इतक्या मोठ्या रकमेची खरेदी होत असताना सदस्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते.' पत्रकार परिषदेला काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे सदस्य सदस्य सुभाष सातपुते, मनोज फराकटे, भगवान पाटील, बजरंग पाटील, सतीश पाटील, उमेश आपटे व जनसुराज्यचे शंकर पाटील उपस्थित होते.

दरम्यान, खोत यांच्या आरोपामुळे जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सत्तारुढ भाजप आघाडी व विरोधी काँग्रेस,राष्ट्रवादीतील संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी आघाडीतील कारभाऱ्यावर निशाणा साधला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (ता.११) होत आहे. या सभेतही हा विषयाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. खोत हे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आहेत.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केडीसीसीचा ५० शाखांचा प्रस्ताव

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५० नवीन शाखा सुरू करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम बँक प्रशासनाने सुरू केले आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या सहकार विभागाला पाठवण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर सर्व्हे करून शाखा सुरू करण्यात येतील असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात बँकेच्या १९१ शाखा असून २००१ नंतर एकही नवीन शाखा स्थापन झालेली नाही. उलट गेल्या २० वर्षांत बँकेच्या १६ शाखा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा बँकेवर प्रशासन नेमल्यानंतर कमी उलाढाल असलेल्या १६ शाखा बंद करण्यात आल्या होत्या. यातील बहुतांश शाखा दुर्गम भागातील होत्या. या शाखा बंद करू नयेत यासाठी अनेकांनी विरोध केला होता. २०१५ मध्ये प्रशासकीय कारकीर्द संपल्यानंतर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाने ठेवींचे प्रमाण वाढवले असून एनपीएचे प्रमाण कमी झाले आहे. कर्जवसुलीचे कामही योग्य रीतीने सुरू असून बँकेकडून व्यवसाय वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या नवीन ५० शाखा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सर्वप्रथम बंद केलेल्या १६ शाखा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांत अनेक गावे मोठी झाली असून लोकसंख्या वाढली आहे. तसेच बँक व्यवहारात नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. राष्ट्रीय आणि खासगी बँकांपेक्षा जिल्हा बँकेवर ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा विश्वास आहे. त्यादृष्टीने बँकेने नवीन शाखा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम केले जाणार आहे.

बँकेचे व्यवस्थापन व निरीक्षक गाववार सर्व्हे करणार आहेत. नवीन शाखा सुरू करणाऱ्या गावाची लोकसंख्या, तेथील लोकांची क्रयशक्ती, नवीन ठेवीदार, चांगले कर्जदार, गावातील अन्य बँका व संस्थांना अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर नवीन शाखा तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या सहकार खात्याला पाठविण्यात येणार आहे. सहकार खात्याच्या परवानगीनंतर नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहे. नवीन शाखेसाठी भाड्याने इमारती घेण्यात येणार आहेत. सध्या बँकेतून अनेक कर्मचारी निवृत्त झाले असून अनेकांनी व्हीआरएस घेतली आहे. बँकेत नवीन कर्मचारी आणि अधिकारी भरतीसाठी १६४२ कर्मचाऱ्यांचा स्टाफिंग पॅटर्नचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर नवीन शाखा सुरू करण्यास गती येणार आहे.

बँकेत ठेवीचे प्रमाण वाढले असून व्यवसाय वृद्धीसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे अध्यक्षांनी नवीन ५० शाखा सुरू करण्याची घोषणा केली आहे. नवीन शाखा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले असून त्यानंतर तो प्रस्ताव राज्य सरकारच्या सहकार खात्याकडे पाठवण्यात येईल.

डॉ. ए.बी. माने, मुख्य कार्यकारी अधिकारी

दृष्टिक्षेपात बँक

एकूण शाखा: १९१

नफ्यातील शाखा: १८९

एटीएम: ९

एकूण सभासद: १२,२५०

ठेवी: ४७४० कोटी

कर्ज वाटप: ३८५३ कोटी

प्रतिकर्मचारी व्यवसाय: ५.७३ कोटी

ढोबळ नफा: ७४ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरावर आधारीत देखाव्यांवर भर

$
0
0

दोन फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संततधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी उसंत घेतली आणि सोमवारी सायंकाळपासून यंदाच्या सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने बहर आला. महापुराच्या बचावकार्यावर आधारित देखावे, उद्यमनगरातील तांत्रिक देखावे, राजारामपुरीत प्राचीन मंदिराच्या प्रतिकृती, रामायणकालीन प्रसंगावर आधारित तांत्रिक देखाव्यांचा आविष्कार पाहताना नागरिकही थक्क झाले. पावसाने उघडीप दिल्यामुळे सायंकाळनंतर नागरिक सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत रस्ते गर्दीने फुलले होते. राजारामपुरी परिसरही बहरला होता.

राजारामपुरीतील प्राचीन मंदिराच्या प्रतिकृती, वीर हनुमानाचा तांत्रिक देखावा, महापुरात मदत करणारा गणपतीची आबालवृद्धांमध्ये उत्सुकता होती. शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी परिसरात यंदा विविध रुपातील गणेशमूर्ती भाविकांना आकर्षित करत आहेत. शिवाजी चौकातील महागणपती आणि संयुक्त चौक मित्र मंडळाची आकर्षक गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौक गर्दीने फुलला. कोल्हापुरातील गणेश उत्सवाची प्रत्येक पेठेची एक खासियत आहे. शिवाजी पेठेत तरुण मंडळे ज्वलंत विषयावर सजीव देखावे सादर करतात. शिवकालीन प्रसंगावर आधारित ऐतिहासिक देखावे सादर करून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यंदा मात्र महापुराच्या आपत्तीमुळे काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. दरम्यान पावसाच्या अडथळ्यावरही मात करत तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने देखाव्यांची उभारणी केली आहे. मंगळवार पेठेतील जय पद्मावती, राधाकृष्ण तरुण मंडळाची आकर्षक व प्राचीन गणेशमूर्ती यंदाही आकर्षण ठरली आहे. प्रिन्स क्लब खासबागने पूरग्रस्तंना मदतीचा देखावा करत वेगळेपण जपले आहे. जुना बुधवार पेठेतील तरुण मंडळाने महापुरावर आधारित देखाव्यांची निर्मिती केली आहे. शहरातील विविध भागातील २१ फुटी गणेशमूर्तींविषयी मोठी उत्सुकता दिसून येत आहे. सर्वच ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उद्यमनगरात तांत्रिक देखाव्याची कमाल थक्क करणारी आहे.

...

इच्छुक उमेदवारांनी साधली प्रचाराची संधी

शहरातील प्रमुख मार्गांवर स्वागत कमानींची गर्दी झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या छबी स्वागत कमानीवर झळकत आहेत. यामध्ये सर्वच पक्षीय इच्छुकांचा समावेश आहे. उत्सव आणि गर्दी कॅश करण्यासाठी अनेकांनी स्वागत कमानीच्या माध्यमातून केलेली खटपट नागरिकांच्या नजरेतून सुटली नाही. स्वागत कमानीवर पक्षाचे नेते, घोषवाक्ये आणि उमेदवारांच्या छबी ठसठशीतपणे दिसतात.

...

खाऊगल्ली फुल्ल

बाप्पाच्या उत्सवाचा थाटमाट पाहण्यासाठी बाहेरगावाहून लोक आले होते. चारचाकी वाहने, जीपमधून त्यांनी सहकुटुंब उत्सवाचा सोहळा डोळ्यात साठविला. स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने बाहेर पडल्यामुळे मोठ्या चौकातही काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शहरातील खाऊ गल्ल्या फुल्ल झाल्या होत्या. खासबाग मैदान, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक नजीकच्या खाऊगल्लीसह प्रमुख मार्ग आणि चौकातील खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉलवर खवय्यांनी गर्दी केली.

...

लेटेस्टतर्फे १५० कुटुंबांना मदत

मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळातर्फे १५० पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे कीटस वाटप करण्यात आले. तसेच वसंतराव दगडे व नटराज मोरे यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत केली. उमाकांत राणिंगा यांना ११ हजार तर राजर्षी शाहू तरुण मंडळाला पूरग्रस्तांच्या घराच्या बांधकामाला मदत म्हणून २१ हजार रुपयांचा धनादेश दिला. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गजानन यादव, उपाध्यक्ष प्रविण फडतारे, अजित पवार, राजेंद्र दळवी, जीवन चोडणकर, संदीप शेलार यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ. राजेंद्र चिंचणेकर यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री विजयकुमार देशमुखांविरोधातसोलापूरच्या महापौर करणार बंडखोरी

$
0
0

मंत्री विजयकुमार देशमुखांविरोधात

सोलापूरच्या महापौर करणार बंडखोरी

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना भारतीय जनता पक्षाने सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास मी त्यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहे,' असा स्पष्ट इशारा सोमवारी सोलापूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिला आहे.

मागील दोन वर्षांत अनेकदा बनशेट्टी यांनी शहर उत्तरमधून आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. विविध जाहीर कार्यक्रमांत बोलताना ही त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा मनोदय व्यक्त केला होता. सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर त्यांनी पालकमंत्री देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला. 'देशमुख यांनी सध्याच्या कार्यकाळात अपेक्षित लोकोपयोगी कामे केली नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू. याच मतदारसंघातून भाजपकडून अॅड. मिलिंद थोबडे इच्छुक आहेत. पक्षाने त्यांना किंवा अन्य कोणाला उमेदवारी दिल्यास आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करू. मात्र, पुन्हा देशमुख यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे,' असेही बनशेट्टी म्हणाल्या. दरम्यान, विद्यमान आमदार तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सलग तीन वेळा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत देशमुख विक्रमी मतांनी विजयी झाले होते.

बनशेट्टी मंत्री सुभाष देशमुखांच्या समर्थक…

महापौर शोभा बनशेट्टी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कट्टर समर्थक आहेत. शिवाय त्यांना अक्कलकोटमधून ही रसद मिळू शकते. त्यामुळे बनशेट्टी यांनी बंडाची घोषणा करण्यामागे पालकमंत्री व सहकारमंत्र्यांमधील 'स्नेहसंबंध' कारणीभूत असल्याचे मत भाजप समर्थक व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावच्या ग्रामसभेत गोंधळ

$
0
0

कोल्हापूर: प्रार्थनास्थळाच्या बांधकामावरुन पाचगाव ग्रामसभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वादग्रस्त बांधकामावरुन ग्रामसभेत जोरदार खडाजंगी उडाली. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली. केएमटी कॉलनी येथील बांधकामावरुन नागरिकांनी, ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. सरपंच संग्राम पाटील ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते.

तारा कॉलनी, केएमटी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, भारतमाता कॉलनी, व गवळीनगर येथील नागरिकांना त्या बांधकामास आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीररित्या बांधकाम सुरू असताना ग्रामपंचायत गप्प राहण्यामागील कारण काय अशी विचारणा काहींनी केली. तसेच त्या बांधकामावर तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली. तेव्हा सरपंच पाटील यांनी संबंधितावर योग्य ती कारवाई करू. नोटीस काढू असे उत्तर दिले. दरम्यान विकासकामासंदर्भात ग्रामपंचायतीकडून मुदतीत ठराव मिळत नसल्याचा आरोप महाडिक गटाने केला. यामुळे गदारोळ निर्माण झाला. तसेच भोगवटा प्रमाणपत्र देताना भेदभाव सुरू असल्याचा आरोपही झाला. दरम्यान ग्रामसेवक संपावर असल्यामुळे पाचगाव केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पाटील यांनी सचिव म्हणून काम पाहिले. ग्रामसभेदरम्यानच्या चर्चेत सतीश पाटील, अतुल गवळी, विशाल पाटील, भिकाजी गाडगीळ, अजिंक्य पाटील यांनी सहभाग घेतला. सभेला उपसरपंच प्रवीण कुंभार, संग्राम पोवाळकर, धनाजी सुर्वे, सागर दळवी, प्रकाश गाडगीळ, शितल गवळी, विष्णू डवरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या चुकीच्या बदल्या रद्द करा

$
0
0

फोटो आहे...

..............

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी आदेश डावलून समुपदेशन न घेता ६० शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या केल्या आहेत. या बदल्या रद्द कराव्यात यासाठी विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे याबाबतचे निवेदन दिले. चुकीच्या पद्धतीने बदल्या रद्द झाल्या असतील तर त्या रद्द करु, असे आश्वासन मित्तल यांनी दिले.

'बेकायदेशीररित्या झालेल्या बदल्या रद्द कराव्यात, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर उपोषण करु. तसेच विभागीय आयुक्त व ग्राम विकास विभागाकडे न्याय मागितला जाईल,' असा इशारा प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी दिला. जिल्हा परिषदेने आंतरजिल्हा बदलीने मे २०१८ मध्ये पदस्थापना दिलेल्या ६० शिक्षकांच्या सोयीच्या ठिकाणी नेमणुका केल्या. समुपदेशन पद्धतीने नियुक्ती न करता गुपचुपपणे बदल्या केल्या असल्याचे संघटनेच्या शिष्टमंडळाने सीईओंच्या निदर्शनास आणले. यावेळी शिक्षक बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, शिक्षक संघटनेचे मामा भोसले, संभाजी बापट, अर्जुन पाटील, गुरुराज हिरेमठ, रवी पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images