Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जयसिंगपूर येथे अपघातात महिला ठार

$
0
0
अपघातग्रस्त ट्रक घेवून जाणाऱ्या क्रेनने मोटारसायकलला ठोकरल्याने सुनीता सुनील पाटील (वय ४५ , रा.पंचगंगा कारखाना वसाहत, गंगानगर, इचलकरंजी) या ठार झाल्या. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

वनमजुरांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

$
0
0
कोल्हापूर वनविभागातील ७५ वनमजूर व मयत वनमजुरांचे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून वनखात्याच्या प्रधान कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते.

इचलकरंजीलाही काळम्मावाडीतून पाणी द्या

$
0
0
शहरासाठी स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी काळम्मावाडी थेट पाइप लाइन योजना राबवा, असा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्याचा ठराव गुरुवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

उभे पीक जमीनदोस्त

$
0
0
शहरासाठी स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी काळम्मावाडी थेट पाइप लाइन योजना राबवा, असा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्याचा ठराव गुरुवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

प्रकल्पग्रस्तांची जमीन लाटण्याचा मुश्रीफांचा डाव

$
0
0
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आठ एकराच्या स्लॅबप्रमाणे जमीन संपादन केल्यास झुलपेवाडीचे राहिलेले आठ, नागनवाडीचे १३७ आणि चांदोलीच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होवून काही जमीन शिल्लक राहते. परंतु चार एकरच्या स्लॅबची मागणी अव्यवहार्य आहे.

कागलमध्ये गुटखा पकडला

$
0
0
कागल पोलिसांकडून १४ हजार रुपयांचा स्टार गुटखा पकडला. बेळगांवहून बत्तीस शिराळा (सांगली) या ठिकाणी मारुती ८०० (क्र.एमएच४३, पी ५१३०) गाडीतून हा गुटखा नेण्यात येत होता. खबऱ्याद्वारे माहिती मिळाल्याने कागल पोलिसांनी महामार्गावर येथील मुरगूड फाट्यावर रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई केली.

महागाईविरोधात हल्लाबोल

$
0
0
महागाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज प्रांतकार्यालयावर फटाके वाजव व हलगीच्या कडकडाटात निषेध मोर्चा काढला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तर काही आंदोलकांनी प्रतिकात्मक राक्षक तयार करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

हुपरीच्या चांदीला ज्ञानाची झळाळी

$
0
0
चांदीच्या दागिन्यांची बाजारपेठ म्हणून हुपरीची सर्वत्र ओळख आहे. नाजूक कलाकसूर आणि घाटदार अलंकार यामुळे येथील व्यवसायाची व्याप्ती वाढली. येथील कारागिरांनी बनविलेल्या आभूषणांना देशभर मागणी आहे.

अस्वच्छ जागेत महागडे जेवण

$
0
0
‘वाट पाहीन पण एसटीनेच जाईन’, म्हणून आग्रह धरणाऱ्या प्रवाशांना रस्त्यात ठिकठिकाणी एसटीत का बसलो असा प्रश्न पडतो. रात्रीच्यावेळी प्रवास करताना तर याचा हमखास अनुभव येतो. अगोदरच वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर रात्रीचे अधिक तिकिट आणि जेवणासाठी कोठेही थांबणारी एसटी खरेच डोकेदुखी होते.

गळती, चोरी रोखल्यास परवडणाऱ्या दरात पाणी

$
0
0
‘कळंबा तलावातून उताराने पाणीपुरवठा होणाऱ्या कोल्हापूरची लोकसंख्या जशी वाढत गेली, तशी पाणीपुरवठा योजना उपसा केंद्रांवर अवलंबून राहिली. त्यामुळे सध्या पाणी​ बिलातून जमा होणाऱ्या उत्पन्नातील जवळपास ६० ते ७० टक्के वाटा वीज बिल, आस्थापना तसेच देखभालीवर खर्च होतो. उपसा केल्या जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास २५ एमएलडी पाण्याचे बिलिंगच होत नाही.

एक शिक्षक, दोन वर्ग

$
0
0
जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक त्रैवार्षिक अधिवेशनासाठी गेल्याने शाळा सुरू आहेत, पण शिक्षक नाहीत असे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रत्येक शाळेतील ​पन्नास टक्क्याहून अधिक शिक्षक अधिवेशनाला गेल्याने उर्वरित शिक्षक संयुक्त वर्ग भरवून शाळा चालवित आहेत.

बहेलिया टोळीला तीन वर्षांची कैद

$
0
0
चांदोली राष्ट्रीय उद्यान वनक्षेत्रात ३ ऑक्टोबर २०१३ रोजी अटक केलेल्या बहेलिया शिकारी टोळीतील दोन महिला व एका पुरुष आरोपीस मोराची हत्या केल्याप्रकरणी शिरोळ न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दोन महिन्यांत या खटल्याचा झटपट निकाल लागला.

‘नीरी’कडून पंचगंगेच्या पहिल्या टप्प्याची पाहणी

$
0
0
पंचगंगा प्रदूषणाबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल मांडण्यासाठी नेमलेल्या दि नॅशनल एन्व्हायर्मेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्युट (नीरी) चा पाहणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आणखी दहा दिवसांनंतर दुसऱ्या टप्प्यात पाहणी केली जाणार आहे.

आंदोलनाची धार वाढली

$
0
0
टोलविरोधातील बेमुदत उपोषणाचे दिवस जसजसे वाढत आहेत, तसेच आंदोलनाची धारही वाढत आहे. मागणीबाबत सरकारने नकारात्मक भूमिका घेतल्याने उपोषणकर्त्यांनी प्रकृती खालावत असूनही सरकारी डॉक्टरांकडून तपासणी करुन घेण्यास नकार दिला आहे. कोल्हापूर जनशक्ती व शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ महापालिकेच्या दारात मुंडण केले.

किडनी निकामी होण्याच्या प्रमाणात वाढ

$
0
0
दहा वर्षांपूर्वी किडनी निकामी होण्याच्या एकूण तक्रारींपैकी तीस वयोगटातील तरूण तरूणींचे प्रमाण हे दहा टक्के होते, मात्र आज हेच प्रमाण ३० टक्क्यांहून पुढे पोहोचले आहे.

गॅस ए‌जन्सीवर कारवाई करा

$
0
0
कामगारांची नोंद न दाखवणे, कमी पगार देणे तसेच बेकायदेशीरीत्या विविध कंपन्यांच्या वस्तू ग्राहकांच्या गळ्यात मारणे असे प्रकार गॅस एजन्सीकडून सुरु आहेत. या गॅस एजन्सींच्या कारभाराची चौकशी करुन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाव्दारे सहाय्यक कामगार आयुक्त सुहास कदम यांच्याकडे गुरुवारी करण्यात आली.

मटका अड्डा छापा : सिंह यांची नोटीस

$
0
0
गांधीनगर मटका अड्ड्यावर पडलेल्या छापासत्र प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधिक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विलास सुपे यांना आठ दिवसात खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

राजू शेट्टींची भूमिका जातीयवादी

$
0
0
शाहू, फुले व आंबेडकरांचे नाव घेऊन स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना-भाजपच्या गोटात जावून स्वत:ची विचारसरणी दाखवून दिली आहे.

जलसंपदाचा महापालिकेला दणका

$
0
0
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्याप कार्यान्वित न झाल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला दुप्पट दराने पाणी बिल आकारणी केली आहे. परिणामी, एरवी दरमहा ३० लाख रुपयांच्या आसपास असणारे बिल आता ५२ लाखांवर गेले आहे.

२ शाळकरी मुले जयसिंगपुरातून बेपत्ता

$
0
0
येथील राजीव गांधीनगरमधील आफताब झाकीरहुसेन अत्तार (वय १३) व आदर्श जयपाल बेळवी (वय१४) या दोन शाळकरी मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार आफताबची आई अनिसा झाकीरहुसेन अत्तार यांनी दिली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images