Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शहा-फडणवीसांचे बेकायदा डिजिटल काढले

0
0

शहा-फडणवीसांचे बेकायदा डिजिटल काढले

महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात अनेक ठिकाणी अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजिटल फलक लागले आहेत. नो-डिजिटल झोनमध्ये लागलेले फलक महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी हटविले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महापालिका आयुक्त दीपक तावरे यांना बेकायदा डिजीटल फलक हटविण्याची विनंती केली होती. पोलिस बंदोबस्तात सात रस्ता, पार्क चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, चार पुतळा परिसर येथील बेकायदा डिजिटल हटविण्यात आली. विशेष म्हणजे सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता असून ही डिजिटल हटविण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांधीनगरात अतिक्रमणावर हातोडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

सुप्रिम कोर्टाचा 'जैसे थे'चा आदेश डावलून तावडे हॉटेल ते रुकडी बंधारा या प्रमुख जिल्हा मार्गावर सुरू असलेल्या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शनिवारी कारवाई करण्यात आली. चिंचवाड हद्दीतील गोपालदास दर्यानी यांच्याकडून शटर लावून फरशीचे काम सुरू होते. जेसीबीच्या सहाय्याने शटर आणि फरशा काढण्यात आल्या.

तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकामांबाबत प्रफुल्ल घोरपडे व सुनील पाटील यांच्या जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टाने या मार्गावरील अनियमित बांधकामांवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर संबंधित बांधकामे असलेल्या व्यापारी, नागरिकांनी सुप्रिम कोर्टात दाद मागितली. कोर्टाने बांधकामे 'जैसे थे'चा आदेश दिला. येथे बांधकामे पुन्हा होऊ नयेत याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नवी बांधकामे होऊ नयेत आणि कोर्टाने दिलेल्या 'जैसे थे'च्या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित बांधकामधारकांना नोटिसाही काढल्या. मात्र त्याला न जुमानता काहींनी बांधकामे सुरूच ठेवली. त्यापैकी दर्यानी यांच्या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सी. एन. भोसले-पाटील व एस. बी. इंगवले यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महारयत अ‍ॅग्रो’चा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो लि. या कंपनीविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास शाहूपुरी पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे शनिवारी वर्ग केला. फसवणुकीचा आकडा कोटीच्या घरात असल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक पवन मोरे यांनी दिली.

पोलिसांनी या कंपनीचे कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कार्यालय शुक्रवारी दुपारी सील केले. त्यासह संशयितांची बँकखाती गोठवली आहेत. 'कडकनाथ' कोंबडी पालन व्यवसाय प्रकरणी इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो लि. कंपनीच्या संचालकांविरोधात शेतकऱ्यांची ३ कोटी ९४ लाख ५९ हजार ९३० रुपये फसवणूक केल्याबद्दल शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संशयित सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यासह अन्य संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोर्तुगीजमध्ये करिअरच्या अनेक संधी: डॉ. सिल्वा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः 'पोर्तुगीज भाषेतील ज्ञान व कौशल्य युवकांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करुन देऊ शकते. पोर्तुगीज भाषेचे अभ्यासक्रम सुरू करणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव आहे' असे प्रतिपादन गोवा विद्यापीठातील पोर्तुगीज भाषा विभागप्रमुख डॉ. डेल्फीम कोरेइया द सिल्वा यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यंदापासून पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व जपानी भाषा पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. डॉ. सिल्वा यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन झाले.

तत्पूर्वी उपस्थितांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. डॉ. सिल्वा यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. 'भारत-पोर्तुगाल संबंध, पोर्तुगीज भाषा व करिअर संधी' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. विदेशी भाषा विभागात कार्यक्रम झाला.

डॉ. सिल्वा म्हणाले, 'भारत व पोर्तुगाल या दोन राष्ट्रांतील संबंध २१ व्या शतकात नव्या पर्वावर पोहोचले आहेत. सरकारी पातळीवर सामंजस्य करार झाले आहेत. व्यापाराची देवाण-घेवाण होते. पोर्तुगीज संस्कृतीचा गोव्यावर विशेष प्रभाव आहे. वास्तूशिल्प, पाककला, सांस्कृतिक क्षेत्रावरही प्रभाव आढळतो. पोर्तुगालमध्ये मोठ्या संख्येने भारतीय आहेत. त्यामुळे या दोन देशांमध्ये परस्पर संवाद, व्यापार व्यवसायाची देवाण-घेवाण आहे. विद्यापीठातील पोर्तुगाल अभ्यासक्रमामुळे भाषेच्या ज्ञानासोबतच करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत.'

प्र-कुलगुरू शिर्के यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम आणि युवकांना करिअरच्या संधी या अनुषंगाने मार्गदर्शन केले. चॉइस बेस्ड क्रेडिट कोर्स अभ्यासक्रम शिकण्याच्या प्रक्रियेंतर्गत इतर भाषेसोबत पोर्तुगीज भाषेचाही समावेश असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कला व सामाजिक शास्त्र शाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, शिक्षिका ऐश्वर्या चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविकात रशियन, जर्मनी, जपान भाषा या अभ्यासक्रमांपाठोपाठ आता पोर्तुगीज शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना असल्याचे सांगितले. सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी होईल. पुढील वर्षापासून फ्रेंच भाषा अभ्यासक्रमाची सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले.

शीतल कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. नंदा पारेकर, डॉ. निलांबरी जगताप, डॉ. मंजुश्री पवार, शाहीर राजू राऊत यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेतून विसर्ग सुरू

0
0

कोयनेतून विसर्ग सुरू

कराड :

पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात १०३.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात ११,३१४ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गेल्या दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी दीड वाजता धरणाचे सहा ही वक्र दरवाजे एका फुटाने उचलून ९.०३४ क्युसेक, असा एकूण ११,१३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाऊस वाढल्यास विसर्ग वाढवावा लागणार आहे.

.............

विजेच्या धक्क्याने

दोघांचा मृत्यू

कराड :

पाटण तालुक्यातील वरची शिबेवाडी (गुढे) येथे शेतातील पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत धनाजी राजाराम बोबडे (वय ४६) आणि अविनाश महादेव झोळमकर (वय ४२) अशी मृत झालेल्या दुदैवी शेतकऱ्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड दक्षिणमधून अतुल भोसले उमेदवार: पाटील

0
0

कराड : 'ऑक्टोबर महिन्याच्या १५ ते २० या तारखेदरम्यान महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील. गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्व निवडणुका जिंकलेल्या आहेत. कराड दक्षिण मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असणार आहेत. त्यांना जनतेने आमदार करावे, आम्ही मंत्री करतो,' अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

कराड येथे आयोजित बुथ कमिटी व शक्ती केंद्रस्थान यांच्या बैठकीत ते बोलत होते. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनोज घोरपडेच असणार आहेत. युतीमध्ये ही जागा कोणत्याही पक्षाला मिळाला तरीही उमेदवार मनोज घोरपडेच असतील, अशी घोषणा पाटील यांनी केली. चालू वर्षात देशात एकही मोठा प्रश्न किंवा वैचारिक अजेंड्यावरील विषय शिल्लक राहणार नाही. रामजन्मभूमीचा प्रश्न या वर्षात न्यायालयाच्या माध्यमातून सुटेल. मुले पळवण्याचा आरोप आमच्यावर केला जातो. तुम्ही कोणाला मुल म्हणता, उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे ही काय पोर आहेत का? येत्या विधानसभेला विरोधाकडे उभे राहण्यासाठी माणसंच शिल्लक राहणार नाहीत, असेही पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जनसेवा प्रतिष्ठान'चा ५५१ पूरग्रस्तांना मदतीचा हात

0
0

म.टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, सांगलीतील महापूरानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत पूरग्रस्त भागात मदत पोहोचत आहे. मुंबईतील अशाच 'जनसेवा प्रतिष्ठान' या स्वयंसेवी संस्थेने सामाजिक भान जपत पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊ केला.

कोल्हापुरात शिरोळ येथील कुटवाड आणि जवळच्या गावांना 'जनसेवा प्रतिष्ठान'च्या वतीने ५५१ जणांना अन्नधान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली. यात तांदूळ, डाळ, साखर, साबण, टूथपेस्ट अशा दैनंदीन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.

कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या कुटवाड गावाला महापूराचा फटका बसला आहे. गावात जवळपास १० ते १२ फूट पाणी साचलं होतं. अनेकांच्या घरांचं नुकसान झालं. पूर ओसरल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यात नागरिकांना मदतीचा हातभार लागावा यासाठी जनसेवा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन मदत देऊ केली. कुटवाडसोबतच हरपूर आणि येलावी गावातील पूर बाधितांनाही मदत करण्यात आली.

"कोल्हापूर-सांगलीतील महापूराची भीषण परिस्थिती लक्षात घेता पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करणं हे स्वयंसेवी संस्थांचं कर्तव्यच आहे. पूर ओसरला असला तरी गावकऱ्यांचं झालेलं नुकसान हे काही भरून निघणारं नाही. त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करणं गरजेचं आहे. "
- शशिकांत जाधव ( जनसेवा प्रतिष्ठान, संस्थापक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनंजय महाडिक, गोरे, राणांचा भाजपमध्ये प्रवेश

0
0

सोलापूरः राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह माण-खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज समारोप करण्यात आला. या समारोपाला अमित शहा आवर्जून उपस्थित होते.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या तिघांना भाजपचा झेंडा हाती दिला. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही विरोधकांची झोप उडवणारी यात्रा आहे. तसेच पाच वर्षात काय काम केले याचा हिशोब देण्यासाठी, आभार मानण्यासाठी आणि सूचना मागण्यासाठी ही यात्रा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पक्षातील अनेक लोक भाजप-शिवसेनेत जात असल्याने शरद पवार हे वैतागले आहेत, त्यामुळेच ते पत्रकारावर चिडले आहे, अशा शब्दांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे लवकरच भाजपत प्रवेश करतील, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३७० कलमला विरोध की पाठिंबा? राहुल-पवारांनी खुलासा करावा: शहा

0
0

सोलापूर: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध आहे की पाठिंबा आहे, याचा खुलासा करावा, असं आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि हिताचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा तेव्हा काँग्रेस वेगळी भूमिका घेते. चांगल्या निर्णयाला साथ देता येत नसेल तर किमान गप्प तरी बसा, असा हल्लाही शहा यांनी केला.

सोलापूर येथे महाजनादेश यात्रेला संबोधित करताना अमित शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवत केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची जंत्रीच सादर केली. ३७० कलम हटविल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात निवडणुका होत असल्याने राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचं आवाहनही शहा यांनी केलं.

70937658

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएम नव्हे तर तुमची खोपडी खराब: फडणवीस

0
0

सोलापूर: २००४ ते २०१४ पर्यंतच्या निवडणुका ईव्हीएमवर झाल्या, या सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकल्यात. तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, पण जेव्हा मोदींनी धोबीपछाड दिला तेव्हा ईव्हीएम वाईट झालं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, पण जयसिद्धेश्वर महाराज निवडून आले तर ईव्हीएम वाईट, हा कोणता न्याय आहे?', असा सवाल करतानाच ईव्हीएम खराब नाही, तर तुमची खोपडी खराब आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सोलापूर येथे जनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी ईव्हीएमवरून काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दोन्ही काँग्रेसच्या पैलवानांना चीत करण्यात आलं आहे. त्यांचे पैलवान उठायला तयार नाहीत. आमची सन्मानाची यात्रा असून त्याला जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात्रा काढल्या पण त्यांची अवस्था वाईट होती, अशी टीका फडणवीस यांनी केली.

यावेळी वेंद्र फडणवीस यांनी आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास बोलून दाखवला. अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं त्यांच्या भाषणात सांगितलं. 'पराभवानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुधारले नाहीत. आम्हाला जनतेने नाही तर ईव्हीएम मशिनने हरवलं असं सांगतात, अशी टीकाही त्यांनी केली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणीपाडण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

0
0

सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी

पाडण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

सोलापूर : सोलापूर येथील सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी प्रस्तावित विमानतळाच्या कामात तसेच विमानांच्या ये-जा मार्गात अडथळा ठरणारी असल्याचे विमान वाहतूक प्राधिकरणाचे (डीजीसीए) निरीक्षण योग्य आहे. त्यामुळे कारखान्याने ही चिमणी आगामी साठ दिवसांत पाडावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाविरूद्ध अपील करण्यासाठी कारखान्याला साठ दिवसांचा अवधी ही दिला आहे.

न्या. अजय खानविलकर व न्या. डी. के. माहेश्‍वरी यांच्या पीठाने हा निकाल दिला. या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने अॅड. निशांत काटनेश्‍वरकर यांनी, डीजीसीएच्या वतीने पी. एस. नरसिंह तर कारखान्याच्या वतीने व्ही. गिरी यांनी युक्तिवाद केला.

सिद्धेश्‍वर कारखान्याची ही चिमणी प्रस्तावित विमानतळासाठी अडथळा ठरणारी असल्याने ती पाडली पाहिजे, असे डीजीसीएने म्हटले होते. त्या नंतर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कारखान्याला नोटीसही दिली होती. मात्र, अशी नोटीस देणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात येत नाही, असा युक्तिवाद करून कारखान्यायाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही चिमणी पाडण्याचे निर्देश कारखान्याला दिले. त्या निकालाला कारखान्याच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब करताना ही चिमणी दोन महिन्यांत पाडण्याचे निर्देश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकराज पक्ष जिल्ह्यात सहा जागा लढवणार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'लोकराज्य जनता पार्टीतर्फे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ लढवणार आहे. हातकणंगले, करवीर, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, शाहूवाडी, शिरोळ या सहा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे,' अशी माहिती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

अध्यक्ष चव्हाण म्हणाले, 'भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, अनाथांना आधार, बेघरांना निवारा, शेतमालास हमीभाव, रोजागार, उद्योगांना चालना, महागाईवर नियंत्रण, पारदर्शक प्रशासकीय कामकाज या मुद्यांवर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पार्टीच्या निवडणूक जाहीरनाम्यात या विषयांचा सामावेश करण्यात आला आहे. जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला आहे. पार्टीची ध्येयधोरणे पाहून अनेकजण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. याबाबत ८ सप्टेंबर रोजी मेळावा घेऊन मतदारसंघनिहाय नावे जाहीर करण्यात येतील.'

यावेळी ईश्वर चव्हाण, दिनकर चव्हाण, हिंदुराव पोवार, कृष्णात सातपूते, अमोल कांबळे, सुधाकर डोणोलीकर, अशोक चव्हाण, रुपेश सोरटे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळे, भाजी मंडईत मोठी उलाढाल

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गणरायाच्या आगमनासाठी करवीरनगरी सज्ज झाली असून रविवारी फळे आणि भाज्या खरेदीत मोठी उलाढाल झाली. पूजेसाठी सफरचंद, केळी या फळांना मोठी मागणी असून भाज्यांचीही मोठी आवक झाली. मंडईत कांद्याचे दर चांगलेच भडकले असून प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने विक्री झाली.

गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल आहे. रविवारी मंडईतही ग्राहकांची गर्दी झाली. गणरायाला मिठाईबरोबर फळांचाही नैवेद्य दाखवला जात असल्याने सफरचंदाला मोठी मागणी होती. सफरचंदाचा दर प्रतिकिलो १०० ते २०० रुपये दर होता. गणेशमूर्तीजवळ पाच फळे ठेवण्याची प्रथा असल्याने सफरचंद, चिकू, सिताफळ, पेरु, डाळींब अशा एकत्रित पाच फळांची किंमत ४० ते १०० रुपये इतकी होती. भाजी मंडईत फळभाज्या आणि पालेभाज्यांची मोठी आवक झाली. मटार, गवारीचा दर प्रतिकिलो ८० रुपये होता. वांग्याचा दर अजून तसाच असून प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांनी विक्री सुरू होती. फ्लॉवर गड्ड्याचा दर २० ते ४० रुपये होता. कोथिंबीर पेंढीचा दर २० रुपयांवर स्थिर होता. कांद्याचे दर गेले दोन आठवडे भडकले असून प्रतिकिलो ३० ते ४० रुपये होता. लसून प्रतिकिलो ८० ते १००, आले १०० ते १२० रुपयांवर स्थिर होता.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ८० ते १००

टोमॅटो : २०

भेंडी : ५० ते ६०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ६० ते ८०

कारली : ६०

वरणा : ४० ते ६०

हिरवी मिरची :६० ते ८०

फ्लॉवर : २० ते ४० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : ३०

लसूण : ८० ते १००

कांदा : ३० ते ४०

आले : १२०

पडवळ : १५ ते २० (प्रति नग)

मुळा : १२ ते १५ (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १०

कांदा पात : १०

कोथिंबीर : २०

पालक : १०

शेपू :१०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १०० ते २००

डाळिंब : ६० ते ८०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामसेवक संघाचे धरणे आंदोलन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ग्रामसेवकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसंदर्भात सरकारी पातळीकडून दिरंगाई होत असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, कोल्हापूर शाखेच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन ठेवत आंदोलनात सहभाग घेतला. संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना मागण्यांचे निवेदन दिले.

नोव्हेंबर २००५ नंतर नेमणुका झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. २० ग्रामपंचायतीसाठी एक विस्तार अधिकारी पदाची निर्मिती करावी. ग्रामसेवक हे पद रद्द करुन सर्वांना ग्रामविकास अधिकारी दर्जा मिळावा यासह आठ प्रमुख मागण्यासाठी आंदोलन केले. राज्य ग्रामसेवक संघाचे सरचिटणीस के. आर. किरुळकर, जिल्हा सरचिटणीस एस. एस. दिंडे, जिल्हाध्यक्ष एस. डी. पाटील, कार्याध्यक्ष नंदीप मोरे आदींच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलन झाले.

संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले. त्यामध्ये ग्रामसेवकांकडे दैनंदिन कामकाजाच्या व्यतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, स्वच्छता अभियान, रोजगार हमी योजना, निवडणुकीच्या कामासह अन्य प्रकारची कामे सोपविली जातात. अन्य विभागाची कामे सोपविल्यामुळे ग्रामसेवक तणावाखाली आहेत याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष विक्रम वगरे, महिलाध्यक्षा अश्विनी पाटील, माधुरी साळोखे, एल. एस. इंगळे, एम. व्ही. पाटील, शिवाजी पाटील आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई विमानसेवेचा श्री गणेशा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एप्रिल २०१८ नंतर तब्बल १६ महिने खंडित राहिलेली मुंबई कोल्हापूर विमानसेवा गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी सुरू झाली. पहिल्या फेरीत मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापुरात दाखल झाले तर ४२ प्रवासी मुंबईला रवाना झाले.

उडान योजनेअंतर्गत ट्रू जेट कंपनीने कोल्हापूर मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. कंपनीने ऑनलाइन बुकिंग सेवाही सुरू केली होती. गेले तीन दिवस विमान प्राधिकरणाकडून मुंबई-कोल्हापूर विमानसेवेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर हिरवा कंदील मिळाल्यानंतर विलंबाने का होईना विमानसेवेस सुरुवात झाली.

मुंबईतून टेकऑफची वेळ दुपारी १२.५५ मिनिटांची होती. प्रत्यक्षात एक वाजून २० मिनिटांनी ट्रू जेट कंपनीचे विमान हवेत झेपावले. दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी विमान कोल्हापुरात १५ मिनिटे विलंबाने लँड झाले. कंपनीकडून सुरू होणाऱ्या पहिल्याच विमानाचे प्रथेप्रमाणे वॉटर सॅल्यूटने स्वागत झाले. अग्निशमन दलाच्या दोन फायटरनी पाण्याच्या फवाऱ्यांनी कमान केली. कमानीतून विमान स्थिरावल्यानंतर उतरलेल्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय.पाटील, खंडेराव घाटगे यांच्यासह देश परदेशात स्थायिक झालेले कोल्हापूरच्या नागरिकांचा समावेश होता. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांनंतर कोल्हापुरातील ४२ प्रवाशांना घेऊन विमान मुंबईला रवाना झाले.

या संदर्भात कोल्हापूर एअरपोर्टचे डायरेक्टर कमल कटारिया म्हणाले, 'एप्रिल २०१८ नंतर मुंबई कोल्हापूर विमानसेवा सुरू झाली आहे. सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्यातील पाच दिवस ही सेवा कायम सुरू राहणार आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर स्वागत समारंभ न ठेवता साधेपणाने या सेवेला प्रारंभ केला. कोल्हापूरकरांना ही सेवा गणेशोत्सवाची भेट आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले.'

७७ वर्षीय आजींच्या हस्ते विमानसेवेचा प्रारंभ

महापुरामुळे विमानसेवेचे उद्घाटन साधेपणाने केले. कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या ७७ वर्षीय आजींच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून आणि केक कापून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विमानतळावरील अधिकारी उपस्थित होते.

मुंबई-कोल्हापूर ही विमानसेवा सुरू झाल्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. प्रवास सुखकर आणि वेळेत झाला. कोल्हापूरच्या विकासाच्यादृष्टीने ही एक चांगली सुरुवात झाली. ही सेवा अशीच कायम सुरू राहिली पाहिजे.

डॉ. डी. वाय. पाटील, माजी राज्यपाल बिहार

विमानसेवेला थोडा विलंब झाला असला तरी कोल्हापूर-मुंबई सुरू झालेली विमानसेवेचा सर्वांना फायदा होणार आहे. विमानसेवेत खंड पडता कामा नये. विमान कंपनीने वेळापत्रकाच्या नियोजनाप्रमाणे सेवा दिली पाहिजे.

के. के. खराडे, प्रवासी, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजी विक्रेत्याची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाद्वार रोडनजीक दत्तमहाराज गल्लीत भाजी विक्रेत्याने राहत्या घरी तुळईला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आले. संतोष राजाराम कुंभार (वय ३६) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी सांगितले की, कुंभार हा अविवाहित होता.तो विश्वनाथ बावडेकर यांच्या घरी भाड्याने राहत होता. गंगावेश येथील कुंभार गल्ली, शाहू उद्यान रोडवर त्याचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. तर रात्रीच्यावेळी वॉचमनचे काम करीत होता. रविवारी सकाळी तो भाजी विक्री करून दुपारी घरी आला. त्यावेळी त्यांची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास आई परत आल्यानंतर संतोषने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले. आईने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी संतोषला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी चुलतभाऊ अनिकेत तानाजी कुंभार यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगल्याच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उत्सवाला पर्यावरणपूरकता आणि विधायक कार्याची जोड देत कोल्हापुरातील सार्वजिनक गणेशोत्सवाची तयारी शिगेला पोहचली आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक तरुण मंडळांच्या गणेशमूर्तीचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले. सोमवारी, गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. घरोघरी गणेशोत्सवाची लगबग सुरू असून थाटामाटात गणरायाची स्थापना करण्यासाठी अख्खे कुटुंब सज्ज झाले आहे. उत्सवाच्या निमित्ताने शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

पूजा व सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी नागरिक बाहेर पडल्याने बाजारपेठेलाही झळाळी लाभली. चौकाचौकात, प्रमुख बाजारपेठेत गणेशमूर्ती विक्रीची थाटलेली दुकाने आणि सजावट साहित्याने उत्सवाची शोभा आणखी वाढली आहे. अतिवृष्टी आणि महापुराच्या आपत्तीचे सावट यंदाच्या उत्सवावर दिसून येत होते. सार्वजनिक गणेश मंडळांनी 'वर्गणीची रक्कम पूरग्रस्तांसाठी' अशी साद घातली आणि उत्सवाला विधायक स्वरुप देतानाच संवेदनशील मनाचे दर्शन घडविले. संकटकाळात एकमेकांना आधार आणि पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदतीचा हात देत कोल्हापूरकर नव्या उमेदीने सुखकर्त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते रविवारी मंडप उभारणी, देखाव्यांच्या तयारीत व्यग्र होते. शहरातील काही तरुण मंडळांनी वाजतगाजत गणेशमूर्ती भागात आणल्या. तत्पूर्वी गणेशमूर्ती नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यामुळे कुंभारगल्ल्या गजबजल्या. दुसरीकडे घरोघरी गणेशाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. काही कुटुंबीयांत दीड दिवसाच्या गणपतीची प्रथा आहे. काहींनी कुंभार गल्लीतून मूर्ती घरी नेल्या.

...

कोट

'गणेश पूजन मध्यान्ह वेळी करावे अशी प्रथा आहे. सुर्योदयापासून दुपारी अडीच वाजेपर्यंतची वेळ पूजनासाठी योग्य आहे. या कालावधीतील कोणत्याही वेळेला गणेश पूजन करता येऊ शकते.

मेघश्याम लाटकर, पंचागकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ विधानसभा मतदारसंघासाठी ५८ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

0
0

आठ विधानसभा मतदारसंघासाठी

५८ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

सातारा :

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून लढण्यासाठी ५८ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामध्ये ५१ पुरुष व ७ महिला उमेदवारांचा समावेश आहे. आमदार रवी असोले यांच्या उपस्थितीत विश्रामगृहात मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रवी असोले, संघटना मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत मुलाखती घेतल्या.

फलटण तालुक्यातून सर्वाधिक अकरा उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले आणि दीपक पवार यांनी मुलाखती दिल्यामे दीपक पवार- शिवेंद्रराजे आमनेसामने उभे ठाकले आहेत. जयकुमार गोरे यांना रोखण्यासाठी चंग बांधलेले डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांनी मुलाखतीच्या दरम्यान परखड मते मांडली. आमदारकीचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपच्या तंबूत दाखल होत आहेत, असे झाल्यास आम्ही गोरे विरोधात प्रचार करणार आहेत, असा पवित्रा घेतल्याने माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील आंतरविरोध स्पष्टपणे समोर आला आहे. कोरेगावमधून सात, कराड उत्तरमधून सात, सातारा-जावळी मतदारसंघातून सात, वाई मतदारसंघातून अकरा,

माण-खटाव मतदारसंघातून पाच, पाटण मतदारसंघातून आठ, कराड दक्षिण मतदारसंघातून दोन, फलटण मतदारसंघातून अकरा जणांनी

मुलाखती दिल्या आहेत. सर्वच मतदारसंघातून इच्छुकांनी गर्दी केली होती. एकूण ५८ जणांनी मुलाखती दिल्या.

...............

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग

सातारा

बाप्पांच्या स्वागताची तयारीला पूर्ण झाली आहे. सजावटीच्या विविध साहित्यांमुळे बाजारपेठेत झगमगाट दिसू लागला आहे. साताऱ्याच्या बाजारपेठेत सजावट साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. सजावटीच्या साहित्यात दरात यंदा १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. खरेदीसाठी नागरिकांची आतापासूनच गर्दी वाढत आहे. वेगवेगळ्या मखरांनी व सजावटीच्या फुलांनी बाजारपेठा सजल्या आहेत. थर्माकोलच्या जागी कपड्यांचे मंडप, फुलांच्या माळा, चीन फुले, मण्यांच्या माळा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कुंभारवाड्यात गणपती व गौरींचे मुखवटे विक्रीसाठी सज्ज आहेत. लुकलुकणाऱ्या विद्युत दिव्यांच्या माळा, कलात्मक पंख, फुले, विविध प्रकारच्या माळा, तोरणे, सजावटीच्या शेकडो वस्तूंबरोबरच आकर्षक कागदी वस्तू व विविध प्रकारच्या माळा विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत.

गौराईसाठी मुखवट्यांबरोबरच वेगवेगळे दागिने व तयार साड्या बाजारात उपलब्ध आहेत. गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मिठाईची दुकाने सजली आहेत. सार्वजनिक मंडळांच्या मंडप उभारणीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. कार्यकर्ते तयारी पूर्ण करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

0
0

कराड : शेतात युरिया टाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर उच्च दाब वाहिनीच्या तार पडून त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुढे (ता. पाटण) येथे घडली. तात्यासो जगन्नाथ कदम (वय ४२) असे शेतकऱ्याचे नाव आहे. गुढे येथे घडलेली ही दुसरी घटना आहे. तात्यासो कदम कराड धेबेवाडी रस्त्यावरील आपल्या शेतात पिकाला युरिया टाकण्यासाठी गेले होते. पिकाला युरिया टाकताना अचानक अर्थिंगची तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. विजेचा जोरदार झटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तात्यासो कदम यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. दरम्यान, गुरुवार रात्री गुढे येथे विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेतून पाऊस वाढला

0
0

कोयनेतून पाऊस वाढला

कराड :

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटावरून वाढवून ते अडीच फुटांवर नेण्यात आले. दरवाजांतून विना वापर २२९३७ व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१००, असे एकूण २५०३७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात १०४.२८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची साठवण क्षमता संपुष्टात आल्याने पाण्याची आवक जशी वाढेल, तसा विसर्ग ही वाढवावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images