Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिवशाही बसला अपघात दोन ठार, १४ प्रवाशी जखमी

$
0
0

शिवशाही बसला अपघात

दोन ठार, १४ प्रवाशी जखमी

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या शिवशाही बसला शेटफळ हद्दीत अपघात झाला. वीज मंडळाच्या कार्यालयाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने शिवशाही बसने समोरच्या चालत्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर बस एका लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दोन जण ठार, तर चौदा जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शेटफळजवळ घडली.

पुण्याहून सोलापूरकडे येणारी शिवशाही बस एम. एच. ४७, २०५० ही शेटफळ हाद्दीत आली असता ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने समोर असणाऱ्या एम. पी. ९ एच. जी. २२५८ या ट्रकला बसने मागून धडक दिली. ट्रकला धडक देऊन रस्त्याच्याकडेला असलेल्या गार्ड स्टोनला धडक देऊन समोरच्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन बस आदळली. या अपघातात बसच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे.

अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. मृतामध्ये मल्लिकार्जुन सिद्रामप्पा अंबुसे (वय ७२, रा सोलापूर) हे माजी सैनिक जागीच ठार झाले. नितीन लक्ष्मण कांबळे (वय २५, रा. भुताष्टे, ता. माढा) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व अपघात पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने सोलापूरला पाठवून दिले. या बाबत बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

......

चौफुलाजवळ शिवशाहीचे टायर फुटले

गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता बार्शी-स्वारगेट या मार्गावरील शिवशाही बसचे टायर फुटले. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस सावकाश बाजूला घेतल्याने बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. बस रस्त्याच्या बाजूला घेऊन उभी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बसचे फुटलेले टायर बदलण्यात आले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संभाजी भिडेंनी घेतली उदयनराजेंची भेट

$
0
0

सातारा :

खासदार उदयनराजे भोसले यांची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भेट घेतली. जलमंदिर येथे भेट झाली. उदयनराजे राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, 'मी राजकारणातून अलिप्त व्हायचा विचार करतो आहे.'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते पक्षांतर करीत आहेत. भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे. खासदार उदयनराजे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह याला कारणीभूत आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भिडे तुमच्या भेटीला आलेत का? या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले, 'असे काही नाही, हे माझे एकट्याचे घर नाही, मला कोणीही भेटायला येऊ शकते.' भाजप प्रवेशाची तारीख कधी निश्चित होईल, या प्रश्नावर बोलताना राजे म्हणाले, 'अजून काहीही ठरले नाही. आता राजकारणापासून अलिप्त व्हायचा विचार करतो आहे. तुमच्या सारख्या मित्रांसमवेत राहायचा विचार करतो आहे, असे ही ते म्हणाले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१ उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी बढती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेवा ज्येष्ठतेनुसार राज्यातील १५५८ पोलिस उपनिरीक्षकांची सहायक निरीक्षकपदी बढती झाली. त्यानुसार जिल्ह्यातील ३१ उपनिरीक्षकांचा पदोन्नतीमध्ये समावेश आहे. पोलिस महासंचालक सु. कु. जायस्वाल यांनी यांसबधीचा आदेश शुक्रवारी काढला.

पदोन्नती झालेले अधिकारी असे : सचिन अशोक पंडित (औरंगाबाद), पवन सतीश मोरे, सतीश महादेव पाटील, रमेश शहाजी हत्तीगोटे, रणजित हणमंतराव पाटील, शरयू नारायणराव देशमुख, शिल्पा मारुती यमगेकर, मनोज गुलाब कवडे, (नागपूर शहर), राणी गणपती पाटील , पूनम बापूसाहेब रुगे, सरिता सोपान जाधव, किरण ब्रह्मदेव दिडवाघ, आस्मा मकबुल मुल्ला, मनीषा तुकाराम गभाले, रणजित रघुनाथ तिप्पे, पूनम संतपराव माने (मुंबई शहर), श्रीधर भगवतराव जगताप (नवी मुंबई), शशिकांत स्वामी गिरी, सत्यजित रामचंद्र धवटराव, (कोकण महामार्ग सुरक्षा पथक), राहुल अशोक पाटील (कोकण), राजेंद्र अशोक सानप (नाशिक), दादा कचरू पवार, चंद्रकांत गोविंद गोसावी, (पुणे शहर), प्रमोद प्रकाश सुर्वे, ज्योत्स्ना शंकरराव भांबिष्टे, शिवाजीराव मारुतीराव विभूते, सागर तुळशीदास काटे, संदीप बाळासाहेब जोरे, श्रद्धा शंकर बर्गे, विकास गोरख अडसूळ (पुणे), दादासाहेब अनिल मोरे (सोलापूर शहर).

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजकारणातून अलिप्त व्हावेसे वाटतेय’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 'राजकारणातून अलिप्त व्हावे असे वाटत आहे,' असे सूचक विधान शुक्रवारी केले. 'राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात जायचे असे काही नक्की नाही आणि असे काही असेल तर तुम्हाला नक्की सांगेन, असेही उदयनराजे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजीराव भिडे यांनी सातारा येथे उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. खासदार उदयनराजे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह याला कारणीभूत आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भिडे तुमच्या भेटीला आले होते का? या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले, 'असे काही नाही, हे माझे एकट्याचे घर नाही, मला कोणीही भेटायला येऊ शकते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणीपाडण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

$
0
0

सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी

पाडण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

सोलापूर : सोलापूर येथील सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी प्रस्तावित विमानतळाच्या कामात तसेच विमानांच्या ये-जा मार्गात अडथळा ठरणारी असल्याचे विमान वाहतूक प्राधिकरणाचे (डीजीसीए) निरीक्षण योग्य आहे. त्यामुळे कारखान्याने ही चिमणी आगामी साठ दिवसांत पाडावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाविरूद्ध अपील करण्यासाठी कारखान्याला साठ दिवसांचा अवधी ही दिला आहे.

न्या. अजय खानविलकर व न्या. डी. के. माहेश्‍वरी यांच्या पीठाने हा निकाल दिला. या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने अॅड. निशांत काटनेश्‍वरकर यांनी, डीजीसीएच्या वतीने पी. एस. नरसिंह तर कारखान्याच्या वतीने व्ही. गिरी यांनी युक्तिवाद केला.

सिद्धेश्‍वर कारखान्याची ही चिमणी प्रस्तावित विमानतळासाठी अडथळा ठरणारी असल्याने ती पाडली पाहिजे, असे डीजीसीएने म्हटले होते. त्या नंतर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कारखान्याला नोटीसही दिली होती. मात्र, अशी नोटीस देणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात येत नाही, असा युक्तिवाद करून कारखान्यायाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही चिमणी पाडण्याचे निर्देश कारखान्याला दिले. त्या निकालाला कारखान्याच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब करताना ही चिमणी दोन महिन्यांत पाडण्याचे निर्देश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'राजकारणातून अलिप्त व्हावेसे वाटतेय'

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 'राजकारणातून अलिप्त व्हावे असे वाटत आहे,' असे सूचक विधान शुक्रवारी केले. 'राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात जायचे असे काही नक्की नाही आणि असे काही असेल तर तुम्हाला नक्की सांगेन, असेही उदयनराजे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजीराव भिडे यांनी सातारा येथे उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. खासदार उदयनराजे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह याला कारणीभूत आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भिडे तुमच्या भेटीला आले होते का? या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले, 'असे काही नाही, हे माझे एकट्याचे घर नाही, मला कोणीही भेटायला येऊ शकते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजींनी घेतली उदयनराजेंची भेट

$
0
0

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भेट घेतली. जलमंदिर येथे भेट झाली. उदयनराजे राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, 'मी राजकारणातून अलिप्त व्हायचा विचार करतो आहे.' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते पक्षांतर करीत आहेत. भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे. खासदार उदयनराजे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह याला कारणीभूत आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भिडे तुमच्या भेटीला आलेत का? या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले, 'असे काही नाही, हे माझे एकट्याचे घर नाही, मला कोणीही भेटायला येऊ शकते.' भाजप प्रवेशाची तारीख कधी निश्चित होईल, या प्रश्नावर बोलताना राजे म्हणाले, 'अजून काहीही ठरले नाही. आता राजकारणापासून अलिप्त व्हायचा विचार करतो आहे. तुमच्या सारख्या मित्रांसमवेत राहायचा विचार करतो आहे, असे ही ते म्हणाले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचार

$
0
0

आपलं जीवन कितीही कष्टप्रद असू दे, पण काही करून दाखवण्याची एकतरी संधी प्रत्येकाला मिळतेच - स्टीफन हॉकिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप-संघाचा गरिबांचे आरक्षण रद्द करण्याचा डाव: काँग्रेस

$
0
0

कोल्हापूर: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गरिबांचे आरक्षण रद्द करण्याचा डाव आहे. दुसरीकडे उच्च वर्णियांना दहा टक्के आरक्षण मिळावे, यासाठी संसदेत निर्णय घेतला जातो. ही विसंगती देशासाठी धोकादायक आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी, खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. तसेच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात भाजपचा जनाधार वाढत असल्याबद्दलही खरगे यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

कोल्हापुरात बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. शिव्या देऊन काँग्रेस संपणार नाही. काँग्रेस हा विचार आहे. काँग्रेसमध्येही हिंदू आहेत. पण आम्ही हिंदुत्वाचा चुकीचा अर्थ लावत नाही. हिंदुत्वाचा मक्ता केवळ संघ आणि भाजपनंच घेतला आहे काय? असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानला पराभूत करण्याचं काम काँग्रेसच्याही काळात झालं. पण त्याचं श्रेय लाटण्याचं काम आम्ही केलं नहाी, असं सांगतानाच काँग्रेस नेत्यांच्या घामामुळेच महाराष्ट्र घडला, असंही त्यांनी सांगितलं.

वंचितही सोबत येईल

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी निश्चित झाली आहे. घटक पक्षांसोबतही चर्चा सुरू आहे. जागावाटपाबाबत मंगळवारी चर्चा होणार असल्याची माहिती देतानाच स्वाभिमानी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीही आमच्यासोबत असेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

विरोधी पक्षनेता फडणवीसांनी ठरवू नये

पुढील विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचाच असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा थोरात यांनी यावेळी समाचार घेतला. पुढील विरोधी पक्षनेता कोण असेल ते फडणवीसांनी ठरवू नये. त्यांनी स्वत: आरशासमोर उभे राहावे. त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल, असा टोला लगावतानाच पुढील मुख्यमंत्रीही आघाडीचाच असेल, असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिरीचे गहू, ड्रायफ्रुट्स, गूळाला मागणी

$
0
0

लोगो : बाजारभाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किराणा मार्केटमध्ये खिरीचे गहू, गूळ आणि ड्रायफ्रुट्सला मागणी वाढली आहे. धान्य आणि कडधान्याचे दर कमी असले तरी बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याचे दुकानदार, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवात घरोघरी गव्हाची खीर, मोदक, लाडू, पुरणपोळी, थापट वडी हे पदार्थ केले जातात. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खिरीचे गहू बाजारात उपलब्ध झाले आहेत. गव्हाची किंमत प्रतिकिलो ८० रुपये आहे. गुळालाही मागणी वाढली असून प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर आहे. किंमत जास्त असून ड्रायफ्रुट्सची मागणी वाढली आहे. काजू प्रतिकिलो ७०० ते १००० रुपये, बदाम ८०० रुपये, खारीक २०० ते ५००, चारोळे १५०० रुपये, खसखस १२०० रुपये तर वेलदोड्याचा दर ६००० रुपये किलो आहे. खाद्यतेलाच्या दरात किरकोळ वाढ आहे. सरकरी तेलाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. गहू, हरभरा डाळ, तूरडाळ, रवा, आटा आणि कडधान्याचे दर स्थिर आहेत.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : १२०

मैदा : ३४

आटा : ३४

रवा : ३४

गूळ : ४० ते ५०

साबुदाणा : ८८

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ९२,

मूगडाळ :, ९२

उडीद डाळ : ६८

हरभरा डाळ : ६४

मसूर डाळ : ६४

मसूर : ७० ते १४०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६

काळा वाटाणा : ६८

मूग ८८

मटकी : १२०

छोले : ९० ते १००

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : ३० ते ३४

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : ३२

नाचणी : ३६

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १३५

सरकी तेल : ९०

खोबरेल : २४०

सूर्यफूल : ९५ ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १६०

जिरे : २८०

खसखस : १२००

खोबरे : १८० ते २००

वेलदोडे : ६०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्विनी बिद्रे हत्याकांड

$
0
0

सर्व आरोपींवरील आरोप निश्चित

नवी मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात सहभागी असलेल्या अभय कुरुंदकरसह चारही आरोपींवर पनवेल जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी आरोप निश्चित केले. त्यामुळे या खटल्याच्या नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या हत्याकांडाच्या न्यायालयीन कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे अश्विनी गोरे यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केला आहे.

बिद्रे यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना न्यायालयाने जून महिन्यामध्ये पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवलेल्या कलमांमध्ये वाढ करुन या हत्याकांडातील सर्व आरोपी विरोधात कलम निश्चित केले होते.

दरम्यान, या हत्याकांडातील आरोपी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी हे सर्व आरोपी एकाच दिवशी न्यायालयात हजर राहणे आवश्यक होते. मात्र या आरोपींनी न्यायालयात एकाच दिवशी हजर राहणे टाळले होते. त्यामुळे या आरोपींवर आरोप निश्चित झाले नव्हते. मात्र, खटला पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सर्वच आरोपी पनवेल सत्र न्यायालयात हजर झाल्यामुळे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर यांनी सर्वांचे आरोप निश्चित केले. खटल्याची सुनावणी येत्या १३ सप्टेबरला होणार आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणपूरक उत्सवासाठी मनपा सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला भाविकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षीचा उत्सवही शंभर टक्के पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गौरी गणपती विसर्जनस्थळी अर्पण केलेले सुमारे १५० टन निर्माल्य संकलीत करण्यासाठी १२ पथके तयार करण्यात आली आहेत. विसर्जनस्थळी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. शनिवारी महापालिकेच्या अधिकारी व सामाजिक संस्थांच्या बैठकीत पर्यावरणपूरक उत्सवाबाबत चर्चा झाली. दान केलेल्या मूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंचगंगा घाट, कसबा बावडा घाट, बापट कॅम्प, राजाराम तलाव, कोटितीर्थ तलाव, रंकाळा, कळंबा तलाव व गंजीवली खण येथे पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. पर्यायी व्यवस्थेच्या ठिकाणी मूर्ती विसर्जित करण्यासाठी स्वयंसेवकामार्फत आवाहन करण्यात येईल. संकलीत मूर्ती योग्य पद्धतीने इराणी खण येथे विसर्जित करण्यात येणार आहेत. गौरी गणपती विसर्जनावेळी संकलीत निर्माल्य खत निर्मितीसाठी एकटी व अवनी संस्थेला देण्यात येणार आहे. प्लास्टिक थर्माकोलचे अनेक दु:ष्परिणाम समोर आले आहेत. त्यामुळे यावर बंदीही घालण्यात आली आहे. सजावट करताना प्लास्टिक व थर्माकोलचा वापर न करता पत्रावळ्या व वाट्याही सार्वजनिक मंडळांनी करू नये असे बैठकीत आवाहन करण्यात आले.

दान केलेल्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सजवलेले ट्रॅक्टर व पवडी विभागाचे २०० कर्मचारी कार्यरत असतील. आपत्कालीन व्यवस्थेसाठी अग्निशमन विभागाने ५० कर्मचारी व रेस्क्यू बोट तैनात ठेवली जाणार आहे. मिरवणूक मार्गावरील पॅचवर्कचे काम लवकरच पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले आदी उपस्थित होते.

भाविक व सार्वजनिक गणेश मंडळांनी शाडूच्या मूर्तींना पसंती द्यावी. घरगुती मूर्तींचे विसर्जन पर्यायी व्यवस्थेच्या ठिकाणी करावे. सार्वजनिक मंडळांनी पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीमध्ये मूर्ती विसर्जन करुन पर्यावरणपूरक उत्सवाला बळ द्यावे.

- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समरजित घाटगेंनी मागितली भाजपकडे उमेदवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यातील माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती हॉटेल पॅव्हेलियन येथे झाल्या. कागल विधानसभा मतदारसंघातून समरजित घाटगे, कोल्हापूर उत्तरमधून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव, चंदगडमधून माजी आमदार भरमू पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. 'इचलकंरजी'मधून एकमेव आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुलाखत दिली. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार अमल महाडिक यांच्यासह जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी उमेदवारीची मागणी केली.

शनिवारी सकाळी अकरा वाजता माजी खासदार शिरोळे यांचे कोल्हापुरात आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी शहर आणि ग्रामीण कोअर कमिटीची बैठक घेतली. पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा प्रदेश उपाध्यक्ष मकरंद देशपांडे व प्रदेश सरचिटणीस आमदार हाळवणकर यांनी घेतला. बैठकीला देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटन सरचिटणीस बाबा देसाई, अशोक देसाई आदी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघातून आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीच्या निमित्याने इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. ७० इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

मुलाखती दिलेले प्रमुख इच्छुक

कोल्हापूर उत्तर : महेश जाधव, आर. डी. पाटील, उद्योगपती चंद्रकांत जाधव.

कोल्हापूर दक्षिण : आमदार अमल महाडिक, राहुल चिकोडे, सुभाष रामुगडे, प्रा. बी. जी. मांगले.

इचलकरंजी : आमदार सुरेश हाळवणकर.

राधानगरी : बाबा देसाई, नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, राहुल देसाई, दीपक शिरगावकर.

हातकणंगले : अशोकराव माने, तानाजी ढाले, देवानंद कांबळे.

शाहुवाडी-पन्हाळा : राजाराम शिपुगडे, प्रवीण प्रभावळकर, अजितसिंह काटकर.

करवीर : के. एस. चौगले, पी. जी. शिंदे, संभाजी पाटील, हंबीरराव पाटील.

चंदगड : गोपाळराव पाटील, हेमंत कोलेकर, भरमू पाटील, अशोक चराटी.

कागल : समरजित घाटगे, परशुराम तावरे.

शिरोळ : जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, अनिल यादव, रामचंद्र डांगे, विजय भोजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्या व्यवसायासाठी नेपाळी अल्पवयीन मुलीचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेश्या व्यवसायासाठी नेपाळमधून आलेल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा वापर करून कुंटणखाना चालविल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना अटक केली. एजंट सरिता रणजित पाटील (वय ३८, रा. शेवटचा बस स्टॉप, पाचगाव), विवेक शंकर दिंडे (२८, शाहूनगर, राजारामपुरी) आणि वैभव सतीश तावस्कर (२५, रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, कळंबा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी दुपारी ही कारवाई कळंबा येथील दत्तोबा शिंदे अपार्टमेंटमध्ये छापा टाकून दोन पीडितांची सुटका केली.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस उपनिरीक्षक विभावरी रेळेकर यांनी सांगितले की, कळंबा येथील दत्तोबा शिंदे नगर येथील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. या ठिकाणी वैभव तावस्करने भाड्याने फ्लॅट घेतला आहे. यामध्ये सरिता पाटील आणि विवेक दिंडे हे दोघे बेकायदेशीरपणे मुलींनी आणून कुंटणखाना चालवित असल्याची माहिती कळाली. त्यानुसार सापळा रचून टाकलेल्या छाप्यात एजंट सरिता पाटील, तावस्कर आणि दिंडे या तिघांना ताब्यात घेतले. कुटुंणखान्यातील दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी नेपाळमधील आहे. संशयितांकडून रोख रक्कमेसह अन्य साहित्य असा सुमारे ४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमांतर्गत करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईत आनंदा गोडसे, यशवंत उपराटे, रवींद्र गायकवाड, मीनाक्षी पाटील, जयश्री पाटील, माधवी घोडके, शीतल लाड, ए. जे. सातार्डेकर, डी. ए. गावीत यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसात १७३ फाईल्सचा निपटारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी प्रलंबित फाईल्स निर्गत करण्यासाठी शनिवारी विशेष कॅम्पचे आयोजन केले होते. यामध्ये विकासकामांच्या १७३ फाईल्स दिवसभरात निर्गत केल्या. त्यामुळे ९३ कामांच्या वर्कऑर्डर निघून ८० कामांच्या निविदा प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे शहर विकासाच्या प्रलंबित कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या सभागृहात विशेष कँप पार पडला.

प्रशासकीय दिरंगाईमुळे विविध विकासकामांच्या फाईल्स प्रलंबित असल्याच्या तक्रारी महापालिकेच्या विविध बैठकीमध्ये झाल्या होत्या. त्यांचा निपटारा करण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्याची सूचना स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी केली होती. त्यानुसार दिवसभर विभागीय कार्यालयानुसार कॅम्पमध्ये फाईल्सचा निपटारा करण्यात आला. एकही फाइल शिल्लक राहू नये, यासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या भोजन, चहा आदीची व्यवस्था केली होती.

मुख्य रस्ते, क्रॉसड्रेन, गटर, चॅनल बांधणे, पॅसेज क्राँक्रिट, रस्ते पॅचवर्क, रिटेनिंग वॉल बांधणे, ड्रेनेज व पाइप लाइन टाकणे, हायमास्ट दिवे बसवणे, सार्वजनिक बांधकाम, औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा देणे आणि विद्युत विभागाकडील प्रलंबीत कामांचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, मुख्य लेखापाल, मुख्य लेखापरिक्षक व त्यांच्या अधिनिस्त कर्मचारी यांनी फाईल्सचा निपटारा केला. त्यामुळे ९३ कामांची वर्कऑर्डर निघण्याचा मार्ग मोकळा झाला. तर ८० विकासकामांच्या निविदाही प्रसिद्ध होणार आहेत.

उपमहापौर भूपाल शेटे, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण, गटनेता विजय सूर्यवंशी, रिना कांबळे, शोभा कवाळे, राजसिंह शेळके आदींसह नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक, थर्माकोल विक्रेत्यांना ३० हजारांचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लास्टिक, थर्माकोलपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर, वितरण आणि साठवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर शनिवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने दंडात्मक कारवाई केली. बंदी असूनही प्लास्टिक व थर्माकोलची विक्री केल्याप्रकरणी सहा व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे त्यांच्याकडून ३० हजारांचा दंड वसूल केला. दत्त ट्रेडर्स लक्ष्मीपुरी, अजय वादवाणी ट्रेडर्स बाजार गेट, सागर नॉव्हेलटीज, अमीर कटलरी, हॉट चिप्स पापाची तिकटी येथील विक्रेत्यांचा समावेश आहे. मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, सहायक आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महारयतच्या अध्यक्षासह संचालकांवर गुन्हे

$
0
0

कडकनाथ प्रकरण

.. . .. . .. ..

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायांतून कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी 'महारयत अॅग्रो'च्या संस्थापकांसह संचालकांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर) हणमंत शंकर जगदाळे, सीइओ विनय ज्ञानदेव शेंडे तसेच गणेश शेवाळे व कंपनीच्या इतर संचालकांचा गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबतची फिर्याद तानाजी निवृत्ती कदम (रा. पेठ) व त्यांचा मुलगा सुदर्शन यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेत २४३ शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली आहे. पोलिसांनी 'महारयत'सह रयत अॅग्रो इंडिया, इंडस ऑइल फूड, महारयत निधी, झेडेम मल्टी सर्व्हिस, महारयत अॅग्रो फिडस अँड फूडस प्रा. लि. या कंपनीच्या कामकाजाचा तपास पोलिसांनी चालू केला आहे.

तानाजी कदम यांच्याकडून एक लाख ९१ हजार ५०० रूपये व त्यांचा मुलगा सुदर्शन याचे कडून दोन लाख ८ हजार ५०० रुपये व इतर शेतकऱ्यांकडून चार कोटी ५६ लाख ४२ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. केलेल्या करारातील कोणत्याही अटीचे पालन न करता शेतकऱ्यांना वेळोवेळी पैसे परत देण्याची खोटी आश्वासने देऊन फसवणूक झाली आहे. कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार संशयितांकडे काम करणारे कामगार वसीम इबुसे, दमामे, हर्शद शंकर पाटील, प्रीतम रमेश माने, जितेंद्र रामचंद्र पाटील, मृगेश कदम यांच्याकडे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख तपास करीत आहेत.

\Bफिर्याद देण्याचे आवाहन

\Bया संशयितांकडून आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास तर त्यांनी तक्रारी दाखल कराव्यात, असे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी केले आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाचा तपास सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडू होणार आहे.

.. .. . ..

\Bसदाभाऊंकडून दोघांविरोधात फिर्याद

\Bदरम्यान, या प्रकरणी काढलेल्या मोर्चावेळी बदनामी केल्याप्रकणी दोघांविरोधात सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिग्विजय दिनकर चव्हाण-पाटील (रा. येलूर) व स्वप्नील जालिंदर पाटील (रा. वशी) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. माझा व महारयत अॅग्रो किंवा त्यांच्या संचालक, पदाधिकाऱ्यांशी कोणताही संबंध नसताना या प्रकरणात माझे नाव घेऊन या दोघांनी बदनामी केल्याचा आरोप खोत यांनी फिर्यादित केला आहे.

... .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या खुनाचा प्रयत्नाबद्दलपत्नीसह प्रियकराला शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रेमप्रकरणात पतीचा अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोर्टाने दोघांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. शोभा तानाजी पाटील (रा. विचारेमाळ) आणि प्रियकर राजेंद्र बाळासाहेब विटेकर (वय २८ रा. खाटांगळे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्याचा साथीदार विनायक उर्फ बापू महादेव जाधव ( ३९ रा. नावली, ता. पन्हाळा) याला सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली.

सरकार पक्षातर्फे ॲड. मंजुषा पाटील यांनी काम पाहिले. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, शोभा आणि तानाजी पाटील दोघेही पती-पत्नी होते. आरोपी शोभा पाटील आणि राजेंद्र विटेकर (वय २८ रा. खांटागळे, ता. करवीर) यांच्यात २०१४ मध्ये प्रेमसंबध जुळले. या कारणावरून पती-पत्नीत वाद होता. प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकर विटेकर आणि त्याचा मित्र विनायक याने तानाजी पाटील यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्याच्या तावडीतून पाटील सुटले. त्यांनी तिघांविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी शनिवारी झाली. सरकार पक्षातर्फे १९ साक्षीदार तपासण्यात आले. अॅड. पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून तिघांना शिक्षा सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जौंदाळमळा वडणगे येथे सात घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे वडणगेतील जौंदाळमळ्यात (ता. करवीर) नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेलेल्या पूरग्रस्तांची सात घरे फोडून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित आकाश चव्हाण, धोंडिराम पाटील, योगेश संकपाळ (तिघेही रा. वडणगे, ता. करवीर) या तिघांना अटक केली. चोरीचा हा प्रकार ६ ते १० ऑगस्ट यांदरम्यान घडला.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे चिखली, आंबेवाडी, वडणगे ही गावे पाण्याखाली गेली. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने येथील रहिवासी स्थलांतरित झाले होते. वडणगेपैकी जौंदाळ मळा येथेही महापुराचे पाणी घुसल्याने येथील रहिवासी विनोद संपत जौदाळ, बाळासाहेब शिवाजी जौंदाळ, माणिक महादेव जौंदाळ, विश्वास महादेव जौंदाळ, बाळासो बापूसाहेब शेलार, जानिक महादेव जौंदाळ, दिलीप राजाराम जौंदाळ यांच्यासह अन्य कुटुंबे वडणगे येथील नातेवाईकांच्याकडे राहण्यासाठी गेले. घरात कोणीही नसल्याचे पाहून संशयित चोरट्यांनी टायर ट्यूबवरून जाऊन बंद घरे फोडून तिजोरीतील सोने, चांदीचे दागिने लंपास केले. पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार घडल्याचे लक्षात आले. एकाच वसाहतीमधील सात घरांमध्ये घरफोडीचा प्रकार घडल्याने करवीर पोलिस भांबावून गेले. नागरिकांतही भीती पसरली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पंधरा दिवस शोधमोहीम सुरू केली. परिसरातील काहींकडे चौकशी सुरू होती. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गावातील दोघा चोरट्यांना शोधून काढले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली देऊन ऐवज पोलिसांकडे जमा केला.

कुटुंबियांना धक्का

संशयित चव्हाण हा मजुरीचे कामे करतो. धोंडीराम हा गावच्या मध्यवस्तीमध्ये राहतो. दोघांनी मिळून चोरी केल्याचे कबुली दिल्याने केल्याने ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. दोघे सराईत नसून त्यांनी केलेल्या चोरीचा धक्का त्यांच्या कुटुंबियांना बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमित शहांच्या उपस्थितीतसोलापुरात आज जाहीर सभा

$
0
0

अमित शहांच्या उपस्थितीत

सोलापुरात आज जाहीर सभा

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपची महाजनादेश यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप रविवारी सायंकाळी सहा वाजता पार्क स्टेडियम येथे जाहीर सभेने होणार आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यतेखाली ही सभा होणार आहे. या निमित्त पुणे नाका-पार्क स्टेडियमपर्यंत मिरवणूक काढण्यात येईल. रविवारी रात्री अमित शहा सोलापुरात मुक्काम करणार आहेत,' अशी माहिती भाजप संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा २२ ऑगस्ट रोजी धुळे-नंदूरबारमधून सुरू झाला होता. यात्रा दहा ठिकाणी थांबली. यात्रेदरम्यान ३३ सभा, एक रोड शो, नऊ पत्रकार परिषदा झाल्या. एकूण १८८४ किमी अंतर कापून यात्रेने ५० विधानसभा मतदारसंघातून मार्गक्रमण केले आहे.

यात्रा उस्मानाबादमार्गे सोलापुरात येणार आहे. जुना पुणे नाका येथे स्वागत होईल. त्या नंतर मिरवणूक निघेल. मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत. पार्क मैदान येथे सुमारे २५ हजार श्रोते येतील, असे कुलकर्णी यांनी सांगितले. यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दुसऱ्या टप्प्याच्या समारोपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तिसऱ्या टप्प्याच्या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, येणार आहेत, असा दावा कुलकर्णी यांनी केला.

सोलापुरात मुसळधार पाऊस

सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आज सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. मात्र, शनिवारी मध्यरात्री आणि दुपारी बराच वेळ जोरदार पाऊस झाल्याने मैदानावर मोठ्या प्रमाणावर दलदल झाली आहे. मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे या मैदानावर शहा यांची जाहीर सभा होईल की नाही, अशी चर्चा सोलापुरात सुरू झाली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मैदानावरील दलदलीची पाहणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images