Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वैमानिकरहित बचावकार्य?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अत्यंत दुर्गम आणि जोखमीच्या भागांमध्ये हवाई मार्गाने केल्या जाणाऱ्या बचावकार्यात अनेक अडचणी उभ्या राहत असल्याचे अलीकडील काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. सन २०१३ मध्ये उत्तराखंडमधील महाप्रलयावेळी तर उंच भागात खराब हवामानात मदतकार्य करताना लष्करी हेलिकॉप्टरला अपघात होऊन मुंबईतील वैमानिकासह हवाई दलाच्या जवानांना प्राण गमवावे लागले होते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी बचाव व मदतकार्यात वैमानिकरहित विमानांचा (यूएव्ही) अर्थात 'ड्रोन'चा वापर करण्याचा विचार हवाईदलाने सुरू केले आहे. त्याअंतर्गत संकल्पना मागविण्यात आल्या आहेत.

एखादी नैसर्गिक आपत्ती आली की लष्करी दलांना बचावकार्यासाठी पाचारण केले जाते. सन २०१३चा उत्तराखंडातील महाप्रलय असो वा मागील वर्षी केरळमध्ये आलेला पूर किंवा नुकताच आलेला कोल्हापूर-सांगलीतील महापूर... या प्रत्येक ठिकाणी लष्करी दलांनी अहोरात्र बचाव व मदतकार्य केले होते. जमिनीवरील बचावकार्य प्रामुख्याने नौदल, लष्कर किंवा तटरक्षक दलाने केले असले तरी हवाईदलाच्या हेलिकॉप्टर्सची यात महत्त्वाची भूमिका होती. पूरग्रस्त शहरी भागात विजेच्या तारांचे जाळे असतानाही त्यात जोखीम पत्करून हेलिकॉप्टर खाली आणायचे व नागरिकांना वाचवायचे किंवा कमी उंचीवरून मदत साहित्याचे वाटप करायचे, अशी कार्ये हवाईदलाने प्रत्येक नैसर्गिक आपत्तीवेळी केली आहेत. मात्र, या प्रसंगी होणारी बचावकर्त्यांची जीवितहानी टाळण्यासाठीच 'यूएव्ही'चा वापर करता येईल का, याची चाचपणी हवाईदलाने सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरानंतर नाल्यांची स्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर ओसरल्यानंतर ठिकठिकाणांची स्वच्छता मोहीम हाती घेतल्यानंतर रविवारी महास्वच्छता अभियानांतर्गत जयंती नाला पात्राची स्वच्छता करण्यात आली. सलग १८ व्या रविवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात ४५ डंपर कचरा, गाळ उचल करण्यात आली. नाला पात्रात अडकलेले लाकडी ओंडके, प्लास्टिक कचरा दूर करण्यास महापालिका प्रशासनाला यश आले.

महापालिका प्रशासनाने महापुरानंतर शहरात आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत, त्यासाठी तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली. आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याने पूरबाधित क्षेत्रातील स्वच्छता जवळपास संपुष्टात आली आहे. त्याठिकाणी अद्यापही धूर व औषध फवारणी सुरू असताना महास्वच्छता अभियानांतर्गत नालापात्रात स्वच्छता केली. सकाळी सात वाजता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.

लक्ष्मीपुरी कामगार चाळ, मोकाशी पॅचेस, फोर्ड कॉर्नर, विल्सन पूल, जयंती नाला, पंचगंगा नदी घाट, सुतार वाडा, शाहूपुरी, गाडी अड्डा, रंकाळा तलाव परिसरात स्वच्छता केली. यावेळी विवेकानंद व केएमसी कॉलेजच्यावतीने जयंती नाला येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक आयुक्त संजय सरनाईक, दिवाकर कारंडे, डॉ. विजय पाटील, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, उदय गायकवाड, दिलीप देसाई, गीता हासुरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे २५० कर्मचारी सहभागी झाले होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरपत्नी कुसूम जगताप यांचे निधनकराड : वडगाव

$
0
0

वीरपत्नी कुसूम जगताप यांचे निधन

कराड :

वडगाव हवेली (ता. कराड) गावचे शहीद जवान, किर्तीचक्र प्राप्त हवालदार मेजर शहीद शिवाजी बाळू जगताप यांच्या वीरपत्नी कुसूम शिवाजी जगताप यांचे शनिवारी २४ ऑगस्ट रोजी वयाच्या ६२व्या वर्षी निधन झाले. सन १९९४ साली जम्मू काश्मीरमधील ऑपरेशन रक्षकमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना ते शहीद झाले होते. कुसूम जगताप यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, असा परिवार आहे.

...........

आबासाहेब वीर पुरस्कार

खताळ यांना प्रदान

सातारा :

भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ यांना प्रदान करण्यात आला. पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दर वर्षी जाहीर समारंभारत देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण यंदा खताळ यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आले. एक लाख रुपये रोख, शाल, पुष्पहार, श्रीफळ व मानपत्र, असे स्वरुप असणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पेटंट तज्ज्ञ प्रा. अ‍ॅड. गणेश हिंगमिरे यांना एकावन्न हजार रुपये रोख, शाल, पुष्पहार, श्रीफळ व मानपत्र, असे स्वरुप असणारा आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

.........

कोयना धरणग्रस्तांसाठी एक कोटींचा निधी मंजूर

म. टा. वृत्तसेवा, कराड

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांनी दिलेल्या लढ्यास यश मिळत आहे. कोयना प्रकल्पाच्या टप्पा एक व दोन मुळे बाधित झालेली पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणे तसेच वाढीव नवीन अधिकृत वसाहतींचा दर्जा मिळालेल्या एकूण ७४ पुनर्वसित वसाहतींची मोजणी करणे, हद्दीचे दगड बसविणे या कामांकरता कृष्णा खोरे विकास महामंडळाने या आराखड्यास तांत्रिक मान्यता देऊन या कामांसाठी १ कोटी ४२ लाख ५९ हजार ३२ रुपयांच्या निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

कोयना प्रकल्प टप्पा एक व दोन मुळे ९८ गावांमधील ९ हजार ६९ कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यात पुनर्ववसाहत वसाहतींची एकूण संख्या १४५ असून, त्यापैकी अधिकृत १२४ व नंतर अधिकृत केलेल्या वाढीव २१ इतकी आहे. साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये येथे २८ सप्टेंबर २०१८ रोजी कोयना पुनर्वसनाची बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीमधील चर्चेनुसार कोयना प्रकल्पांतर्गत पाटण तालुक्यात पुनर्वसित झालेली गावठाणे बहुतांशी खासगी जागेत वसलेली आहेत. गावठाणांचे मंजूर आराखडे नसल्याने सदर गावठाणांचे परीघ मोजण्याविषयी भूमी अभिलेख विभागाच्या सातारा जिल्हा अधीक्षक यांना सूचना देण्यात आली होती. त्या बाबतचा निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाने मंजूर करावा, असे सूचित करण्यात आले होते. त्या नुसार पाटण येथील भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयाने मंजूर यादीप्रमाणे सीमांकन करणे व हद्दींचे दगड बसवणे या कामांसाठी १ कोटी २० लाख २० हजार २३२ रुपये व गावठाण मोजणी फीसाठी २२ लाख ३८ हजार ८००, रुपये असा एकूण १ कोटी ४२ लाख ५९ हजार ३२ रुपयांचा निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मंजूर करण्यात आला आहे.

कोट

मागील पन्नास वर्षांपासून धरणग्रस्तांच्या वसाहतींची, त्यांच्या गावठाणांची मोजणी करण्यात आली नव्हती. मात्र, सातत्याने आंदोलने सुरू असल्यामुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि जलसंपदा विभागाने एकत्र येऊन धरणग्रस्तांच्या वसाहतींची आणि गावठाणांची हद्द ठरविण्यासाठी मोजणी करण्यात येणार आहे. गावठाणांची हद्द निश्चित झाल्यानंतर ही गावठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग होतील आणि धरणग्रस्तांवरील धरणग्रस्त हा शिक्का पुसला जाईल. आमचा आंदोलनाला मिळालेले हे मोठे

यश आहे.

डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष श्रमिक मुक्ती दल

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या कारभाराचाविद्यार्थ्यांना फटका

$
0
0

झेडपीच्या कारभाराचा

विद्यार्थ्यांना फटका

सोलापूर :

एकदा नव्हे तर दोनदा अचानक परीक्षा रद्द करण्यात येतात. परीक्षा का रद्द करण्यात आली याची पूर्वकल्पना व कारणही सांगण्यात येत नाही. परीक्षेला येणारे आम्ही सुशिक्षित बेरोजगार म्हणजे वेडे आहोत का? असा प्रश्न परीक्षार्थींनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे उपस्थित केला.

जि.प.प्राथमिक शिक्षण विभागात कंत्राटी पदभरतीसाठी रविवारी सोलापुरातील व्हीव्हीपी अभियांत्रिकी महाविदयालयात परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षेला आलेल्या विध्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याची माहिती देण्यात आल्याने जिल्हाभरातून व अन्य जिल्ह्यातून आलेल्या विध्यार्थ्यांचा संताप अनावर झाला. प्राथमिक शिक्षण विभागात एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी डेटा ऑपरेटर पदाच्या ६ जागांसाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी एकूण जिल्हा परिषदेकडे ३२७ उमेदवारांनी अर्ज केले होते. यापैकी २८२ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरल्याने त्यांना परीक्षेसाठी रविवारी सोरेगाव येथील परीक्षा केंद्रात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.

काही तांत्रिक कारणामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून, तसा संदेश परीक्षार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे काही परीक्षार्थींना हा संदेश न मिळाल्याने घोळ निर्माण झाला असल्याची माहिती शिक्षण विभागील कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली.

परीक्षा देण्यासाठी महिला उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती. कोणी आपल्या तानुल्याला घरी सोडले, कोणी शेजाऱ्यांकडे सोडले तर कुणी त्याला सोबतच आणले होते. मात्र, सलग दोन वेळा परीक्षा रद्द करण्यात आल्याने या महिला परीक्षार्थींचा संताप अनावर झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन डॉल्बी जप्त

$
0
0

दोन डॉल्बी जप्त

सातारा :

सातारा शहरानजीक शाहुपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहीहंडी उत्सवादरम्यान बेकायदा, विनापरवाना डॉल्बी लावून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले होते. या बाबत शाहूपुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून डॉल्बी सिस्टिम जप्त केली आहे. डॉल्बी सिस्टिम वापरास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले होते. त्या नुसार शाहुपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी शाहुपुरी परिसरात डॉल्बी न वापरण्याबाबत आवाहन केले होते. तरीही शनिवारी दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान शनी मारुती मंदिर बसप्पा पेठ येथे विनापरवाना डॉल्बी सिस्टीम लावण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून प्रकरणी आणखी सहा अटकेत

$
0
0

कराड :

रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन सोळवंडे याच्या खून प्रकरणी अल्ताफ पठाण, जुनेद शेखसह आठ संशयितांना या पूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आणखी सहा जणांना रविवारी ताब्यात घेतले. संशयित हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

सिकंदर शेख, महादेव मोकाशी, विजय पुजारी, नीरज पाणके, दिवाकर गाडे, प्रमोद जाधव अशी ताब्यात घेतलेल्या सहा जणांची नावे असल्याचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले. मंगळवारी मध्यरात्री पवन सोळवंडे याचा सहा ते सात हल्लेखोरांनी गोळ्या घालून खून केला होता. या प्रकरणी जुनेद शेख, समीर मुजावर, अल्ताफ पठाण, निहाल पठाण, शिवराज इंगवले, मजहर पिरजादे, हैदर मुल्ला, पप्पू काटे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे सलग दोन दिवस कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत आणखी काही नावे निष्पन्न झाली होती, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता.

..........

तलावात बुडून मृत्यू

कराड :

अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा पोहण्यास गेल्यानंतर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी वाघेरी तालुका कराड येथील चिंचमळा शिवारात घडली. आर्यन बापू गोड (मूळ रा. रेणुसेवाडी, ता. कडेगाव. सध्या रा. वाघेरी, ता. कराड) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. हवालदार महेश लावंड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर: फटाके निर्मिती कारखान्यात स्फोट

$
0
0

मंगळवेढा: मंगळवेडा तालुक्यातील भाळवणी गावातील प्रशासनाने सील केलेल्या फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याने खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास या कारखान्यात स्फोट होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परिसरात घबराट पसरली.

आज सकाळी नऊ वाजल्यापासून स्फोटास सुरुवात झाली. फटाक्यांचे आवाज व धुराने परिसर व्यापून गेला. कारखाना सील असतानादेखील स्फोट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी या कारखान्यात स्फोट झाले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत कारखाना सील केला होता.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल सेनेत

$
0
0

बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सोमवारी सकाळी जाहीर केले. सोपल यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला जबर हादरा बसला आहे. विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील व रश्मी बागल यांच्यानंतर सोपल यांनीही सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पडले आहे.

सोपल हे उद्या, मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. २८ ऑगस्ट रोजी मातोश्री येथे निवडक कार्यकर्त्यांच्या समवेत सोपल शिवबंधन बांधून 'जय महाराष्ट्र' म्हणतील. मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप सोपल यांच्या खेळीने माजी आमदार राजेंद्र राऊत यांची कोंडी झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांतील गळती सुरू आहे. राजकारणातील वाऱ्यांचा अंदाज घेऊन दिलीप सोपल हेही शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा काही महिन्यांपासून होती. सोपल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. 'सोपल आमच्या बरोबर आहेत,' असे खुद्द पवार यांनी मध्यंतरी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू होती. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सोपल यांनी पक्षांतराचा अंदाज घेतला होता. कार्यकर्त्यांनी 'जय महाराष्ट्र' म्हटल्याने सोपल यांनी शिवसेनेत जाणार असल्याचे जाहीर करून चर्चांना पूर्णविराम दिला.

लोकसभा निवडणुकीआधी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनीही चिरंजीवांची वाट धरली. गेल्या आठवड्यात करमाळा येथील राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी हातात शिवबंधन बांधले. पाठोपाठ सोपल शिवबंधन बांधणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष खिळखिळा झाला आहे.

'शिवसेनेत प्रवेश करावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीचा रेटा असल्याने शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. आगामी निवडणूक शिवसेनेकडून लढविणार आहे. शिवसेना विरुद्ध भाजप की आणखी कोणी या जर तरच्या चर्चा मी करणार नाही. शिवसेनेकडून निवडणूक लढवायची आहे, हेच मला कळते,' असे दिलीप सोपल यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

दरम्यान, युतीच्या वाटपात बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने सोपल हे शिवसेनेकडून लढणार हे स्पष्ट आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपवासी झालेले माजी आमदार राजेंद्र राऊत यापुढे आता आव्हान निर्माण झाले आहे. त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे. युती झाली नाही तर शिवसेना विरुद्ध भाजप अशी निवडणूक होऊ शकते. युती झाली तर राऊत हे सोपल यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमबीएचे १९८० जागांचे प्रवेश लटकले

$
0
0

विद्यापीठ लोगो

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर

एम. बी. ए.च्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीतील जागा वाटपातील व्यस्त प्रमाणामुळे मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील प्रवेश रद्द होणारे विद्यार्थी न्यायालयात गेल्यामुळे राज्यातील सर्व एमबीएची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. याचा परिणाम शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या २४ कॉलेजमधील एमबीए विभागातील प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. सप्टेंबर उजाडला तरी कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील एमबीएच्या १९८० जागांचे प्रवेश थांबले आहेत.

एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली निवड यादी २८ ऑगस्टपर्यंत स्थगित ठेवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला केल्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पहिली निवड यादी जाहीर केलेली नाही. या संपूर्ण प्रकारामुळे यंदा एमबीएचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याला ऑक्टोबर उजाडण्याची शक्यता असून, प्रक्रियेची माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त झाले आहेत.

शिवाजी विद्यापीठाअंतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यातील २४ महाविद्यालयांमध्ये एमबीए विभाग आहे. एमबीए पदवी घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल चांगला आहे. १४ ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती करावी असे जाहीर करण्यात आले होते. मात्र जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटने या प्रक्रियेविरोधात याचिका दाखल केल्यामुळे ठप्प झालेल्या प्रक्रियेचा फटका शिवाजी विद्यापीठातील एमबीएच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया थांबण्यावर झाला आहे. २८ ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार असून त्यानंतर निर्णय जाहीर होणार आहे. पुन्हा ही प्रक्रिया नव्याने घेतल्यास सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्रक्रिया पूर्ण होईल असे चित्र आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये एमबीएसाठी प्रवेश अर्ज दाखल केला आहे, त्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भविष्याचा धोका ओळखून अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर यंदा पहिल्या वर्षाचे वर्ग पूर्ण रिक्त राहण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

...

कोट

'एमबीएची प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू झाली आहे. त्यातच नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याला सुरूवात झाल्याने, साधारण दहा दिवसांनी प्रवेश प्रक्रिया लांबली होती. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रिया थेट २८ ऑगस्टपर्यंत 'जैसे थे' वर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दिव्या घोडके, विद्यार्थिनी

...

कोट

'एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवून न्यायालयात याचिका दाखल केली म्हणून राज्यातील सर्व कॉलेजमधील एमबीए प्रवेश प्रक्रिया थांबवणे योग्य नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रवेशप्रक्रियेबाबतच्या तक्रारीचे निराकरण संबंधित तक्रारदार विद्यार्थ्यांच्या पातळीवर हाताळता येऊ शकते. विद्यार्थ्यांमधील संभ्रवास्थेचा विचार करून तातडीने अन्य कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली पाहिजे.

प्रा. अनुराधा गायकवाड, सायबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी उद्योजकांना ट्रान वनच्या नोटिसा

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

वस्तू व सेवा करप्रणाली (जीएसटी) लागू झाल्यानंतर व्यापारी-उद्योजकांची व्हॅटमधील रक्कम जीएसटीमध्ये वर्ग करण्यात आली. खरेदी-विक्री झाल्यानंतर व्हॅटमधील शिल्लक रक्कम जीएसटीमध्ये अंतर्भाव न करता मूळ रक्कम, व्याज व दंड भरण्यासाठी जीएसटी विभागाकडून ट्रान वनच्या नोटिसा बजावल्या आहेत. कोल्हापूर, सांगलीतील अनेक व्यापारी-उद्योजक पुरामुळे उद्धवस्थ झाले असताना लाखो रुपये भरण्याच्या नोटिसा आल्याने त्यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जून २०१७ मध्ये व्हॅटचा समावेश जीएसटीमध्ये केल्यानंतर २० लाखांच्यावर उलाढाल असलेल्या (नंतरची मर्यादा ४० लाख) करदात्यांना केंद्रीय जीएसटी समितीने ट्रान वन व टू फॉर्म भरण्याची सूचना केली. करदात्यांनी टॅक्स कन्सलटंट यांच्याकडून अहवाल तयार करुन व्हॅटमधील शिल्लक रक्कम निश्चित केली. त्याबाबतचा अहवाल जीएसटी विभागाकडे सादर केला. त्याचे लेखापरीक्षण केल्यानंतर ही रक्कम जास्त असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार व्यापारी-उद्योजकांनी खरेदी-विक्रीचा व्यवहार केला. व्यवहारानंतरही त्यांची जीएसटीमध्ये रक्कम शिल्लक असताना पूर्वीची रक्कम, व्याज आणि त्यावरील दंडाची रक्कम भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

नुकत्याच येवून गेलेल्या महापुरामुळे व्यापारी-उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये आठ ते दहा दिवस पाणी राहिल्याने संपूर्ण साहित्याचे नुकसान झाले आहे. नुकसानींचे पंचनामे, सर्व्हे अद्याप अपूर्ण असताना पूर ओसरल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांत नोटिसा येवू लागल्याने व्यापारी-उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुरानंतर त्यांच्यावर कोसळल्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करुन जीएसटी भरण्यास एक महिन्याचा कालावधी वाढवून मिळाला. मात्र हा कालावधी वाढवून देताना तांत्रिक मुद्दा उपस्थित करुन व्हॅटमधील रक्कम भरण्यासाठी आदेश दिल्याने व्यापारी-उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे. पुरानंतर मदत मिळण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच नव्याने नोटिसींचा ससेमिरा मागे लागल्याने व्यापारी-उद्योजकांपुढे आणखी एक संकट निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकजण सीए कन्सलंटंटबरोबर विचारविनिमय करत आहेत.

दरम्यान, 'व्हॅटमधील शिल्लक रक्कम भरण्यासाठी एक वर्षापासून नोटीसी पाठवल्या जात आहेत. त्याला महापुराची जोड देता कामा नये. कार्यालयात आलेल्या महापुरानंतर जीएसटी समितीकडे अहवाल पाठवल्यानंतरच एक महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे,' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

...

कोट

'खरेदी-विक्रीतून राहिलेल्या रकमेबाबत सीएंच्याकडे अहवाल दिला आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन राबवली असताना ट्रान वनच्या नोटिसा पाठवल्या आहेत. त्या पूर्णत: चुकीच्या आहेत. नोटिसा पाठवण्यापूर्वी व्यापारी-उद्योजकांशी चर्चा करुन मार्ग काढणे अपेक्षित होते.

संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

...

कोट

'जीएसटी सिस्टिम व कायद्यामध्ये अनेक त्रुटी असताना प्रामाणिक करदात्यांनी सरकारला सहकार्य केले. नवीन करप्रणालीमधील तांत्रिक बाजू वगळून त्यांना दिलासा द्यावा. व्याज व दंड आकारणी करणे चुकीचे आहे.

अमित शहा, सीए

...

चौकट

नोटिसा मिळताच धावाधाव

व्हॅटमधील दहा लाख शिल्लक रक्कम जीएसटीमध्ये वर्ग केल्यास खरेदी-विक्रीतून एक लाख वजा झाल्यास नऊ लाख शिल्लक रक्कम राहते. शिल्लक राहिलेली नऊ लाख व त्यावरील तीन लाख व्याज असे १२ लाख रक्कम भरण्याची नोटीस एका व्यापाऱ्याला आली आहे. नोटिसा मिळताच त्यांनी तातडीने सीए, कन्सलटंट यांच्याकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार्शीचे आमदार दिलीप सोपल उद्या करणार शिवसेनेत प्रवेश

$
0
0

बार्शीचे आमदार दिलीप सोपल

उद्या करणार शिवसेनेत प्रवेश

सोलापूर :

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार व शरद पवार यांचे विश्वासू सहकारी दिलीप सोपल बुधवारी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई बोलावलेल्या बैठकीला सोपल यांनी दांडी मारली होती. सोमवारी त्यांनी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे जाहीर केले.

बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने आमदार सोपल सेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे सोपलांच्या सेना प्रवेशाने माजी आमदार राजा राऊता यांना ही धक्का बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित बहुजन आघाडीकडून साडेचार हजार जण इच्छुक

$
0
0

वंचित बहुजन आघाडीकडून

साडेचार हजार जण इच्छुक

सोलापूर :

अकोल्याचे माजी कॅबिनेट मंत्री दशरथ भांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित समीर कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातील सुमारे साडेचार हजार जण विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. संबंधितांनी मुलाखती ही दिल्या आहेत. या शिवाय सर्वच राजकीय पक्षांतील माजी आमदार, नगराध्यक्ष, माजी खासदार, झेडपीचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि दूध संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुलाखती दिल्या आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी सोमवारी सोलापुरात दिली.

अण्णाराव पाटील म्हणाले, 'एखादा भाजपचा असेल आणि खरोखर वंचित व ओबीसी समाजाचा आणि चारित्र्यसंपन्न असेल तर त्याला वंचितमध्ये घेण्यास काही हरकत नाही. सर्वांना निकष सारखेच राहणार आहेत. पार्लमेंट बोर्डासमोर गेल्याशिवाय कोणाला ही उमेदवारी मिळणार नाही. विधानसभेच्या २८८ जागांसाठी वंचितकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. राज्यभरात मुलाखती पार पडल्या आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील १४४ जणांना उमेदवारी अर्ज वितरित झाले असून, मुलाखती ही झाल्या आहेत. उमेदवाराचे चारित्र्य, सक्षम असणाऱ्या व वंचित असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येत आहे. एमआयएम वंचितसोबत राहणारच आहे. तरीही अंतिम निर्णय बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार ओवेसी घेतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूरचे पक्षीवैभव समृद्ध होईल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जैवविविधतेने समृद्ध आहे. विविध जातीचे पक्षीही पहायला मिळतात. 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'पक्षी वाचवा' मोहिमेतून नव्या पिढीला पक्ष्यांची ओळख करुन देण्याचा व संवर्धनाचा चालवलेला प्रयत्न स्तुत्य आहे. यातून कोल्हापूरचे पक्षी वैभव अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे,' असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले.

एप्रिल-मे महिन्यात उन्हाळ्यात 'मटा'ने 'पक्षी वाचवा' मोहिमेंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. तीन गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये अगदी पहिलीपासून ते तरुणांपर्यंत सहभागी झाले होते. त्यातील विजेत्यांना सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये पारितोषिक वितरण करण्यात आले. ट्रॉफी व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.

चित्रकला स्पर्धेसाठी चित्रकार विजय टिपुगडे व मनोज दरेकर तर निबंध स्पर्धेसाठी यतिश शहा यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांची पाणी व अन्नासाठी होणारी धावाधाव थांबवण्यासाठी 'पक्षी वाचवा' मोहीम राबवण्यात आली. पक्ष्यांसाठी दानशुरांकडून देण्यात आलेले धान्य, पाण्यासाठी मातीची भांडी यापूर्वी वितरीत केली होती. त्या दरम्यान पक्षी वाचवा या विषयावर चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, 'शहरात पक्ष्यांची संख्या चांगली आहे. पर्यावरण चांगले असल्याचे हे द्योतक आहे. पण त्यांच्या संवर्धनासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरणासाठी 'मटा' ने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत.या लोकोपयोगी उपक्रमांमुळे 'मटा' शहरवासीयांना आपला वाटत आहे. या उपक्रमातून नवीन पिढीला पक्ष्यांची ओळख होत असून ही संवर्धनाच्यादृष्टीने चांगली गोष्ट आहे.'

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'अचानक चांगले घडते असे होत नाही. त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. 'मटा' ने राबवलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतून भावी समाजमन तयार करण्याचे काम केले आहे. ही पिढीच आगामी काळात पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या विविध बाबींना अटकाव करेल. त्यातून पर्यावरण संवर्धन होईल. त्यामुळे अशा उपक्रमांची सध्याच्या काळात फार मोठी गरज आहे.'

चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांची नावे

पहिली ते चौथी

तन्वी कळंत्रे (प्रथम)

अनया कुलकर्णी (द्वितीय)

स्वरा मैंदरकर (तृतीय)

.....

पाचवी ते सातवी

मुफिजा मुल्ला (प्रथम)

सारा मुल्ला (द्वितीय)

समर्थ झेंडे (तृतीय)

........

आठवी ते दहावी

जियाना मुल्ला (प्रथम)

ओवी मिरजकर (द्वितीय)

तनिष्का कुलकर्णी (तृतीय)

.......................

निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे

पहिली ते सातवी

अंबिका गेंजगे (प्रथम)

स्वरा कोराणे (द्वितीय)

वसुंधरा इंगवले (तृतीय)

......

आठवी ते कॉलेज

कल्पना कुलकर्णी (प्रथम)

दिव्या माणगावे (द्वितीय)

प्रथम पाटील (तृतीय)

...........

खुला गट

शिवानी वकील (प्रथम)

समृद्धी जाधव (द्वितीय)

माणिक दानोळे (तृतीय)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केडीसीसीतील अनुकंपा भरती अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतील अनुकंपा तत्वावरील ७० जणांची भरती अंतिम टप्प्यात आली आहे. महापुरामुळे या भरतीला ब्रेक लागला असल्याने निवडणूक आचारसंहितेपूर्वी भरती व्हावी, यासाठी आर-पारची लढाई करण्याबाबत आंदोलकांची मन:स्थिती तयार केली आहे.

नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत घेण्याचा कायदा आहे. पण, सहकार विभागाने नोकरभरती बंद केल्याने अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार गेली दहा वर्षे लढा देत आहेत. बँक ऑफ एम्प्लॉइज युनियनसह जिल्हा बँकेतील कामगार संघटनांनी अनुकंपा तत्वावर भरती व्हावी, यासाठी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची भरती करावी असा आदेश दिला आहे. जिल्हा बँकेत अतिरिक्त कर्मचारी असल्याने २०१० पासून प्रशासनाकडून नोकर भरतीसाठी चालढकल करण्यात आली.

जिल्हा बँकेने अनुकंपा तत्वावरील भरतीसाठी बँकेचा आकृतीबंद सहकार विभागाला पाठवला आहे. पण सहकार खात्याकडून मोघम उत्तर आलयाने अनुकंपा तत्त्वावरील भरतीस परवानगी करता येत नाही, असे बँक प्रशासनाकडून उत्तर दिले जात आहे. वर्षभर उमेदवारांनी लोकशाही मार्गाने बँक प्रशासनाला निवेदन देऊन भरतीची मागणी केली जात आहे. गेल्या महिन्यात कामगारांनी बँकेच्या दारात बेमुदत साखळी उपोषण सुरू करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे, सरचिटणीस नारायण मिरजकर, आय. बी. मुन्शी, अशोक यादव यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी सहकार खात्याला अनुकंपान्त्त्वावरील भरती करण्याबाबत स्पष्ट सरकारी अध्यादेश काढण्याचा आदेश दिला. सहकार आयुक्तांनी याबाबत आदेश काढला असून तो महापुरामुळे सरकारी दप्तरात रेंगाळला आहे. बँक आणि कामगार संघटनांकडून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ते २० सप्टेंबर दरम्यान लागू होईल. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी सहकार खात्याचा अध्यादेश मिळावा, अशी मागणी अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांकडून होत आहे. अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर संचालक मंडळाने नोकर भरतीवर शिक्कामोर्तब करणे महत्वाचे ठरणार आहे. ही प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी व्हावी, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होण्याची गरज उमेदवारांकडून होत आहे.

अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री सकारात्मक आहे. बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने सहकार्य केले आहे. सहकार खात्याचा आदेश मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल.

- अतुल दिघे, अध्यक्ष, बँक एम्प्लॉइज युनियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाई टँकमधील पाण्याला हिरवा रंग

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या रंकाळा येथील अंबाई जलतरण तलावामागील ग्रहण सुटता सुटेना अशी स्थिती झाली आहे. तलावामधील फिल्टरेशन प्रक्रियेमध्ये पुन्हा बिघाड झाला आहे. त्यामुळे गुरुवारपासून (ता.२२) तलावातील पाण्याला काळपट हिरवा रंग आल्याने तलाव बंद करण्यात आला आहे. तलावातील जलशुद्धीकरण प्रक्रिया वारंवार बंद पडत असल्याने त्याचा फटका स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंसह मासिक पासधारकांना बसला आहे.

अंबाई जलतरण तलाव हौशी जलतरणपटूंसाठी उपयुक्त असला, तरी येथे लहान गटातील जलतरण खेळाडू सराव करत असतात. ऐन मे महिन्याच्या सुटीमध्ये तलाव बंद पडल्याने क्रिडाप्रेमींनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेवून दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्यांनी तातडीने तलावाची पाहणी करुन दुरुस्तीच्या सूचना दिल्या. त्यानुसार तलाव पोहोण्यासाठी खुलाही झाला. पण त्यानंतर पुन्हा जून महिन्यात तलावातील पाणी हिरवेगार झाल्याने बंद ठेवण्यात आला.

जुलै महिन्यात कसाबसा तलाव सुरू झाल्यानंतर शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तलाव बंद ठेवण्यात आला. पूर ओसरल्यानंतर तलाव सुरू होऊन आठ दिवस झाल्यानंतर पुन्हा तलावातील जलशुद्धीकरण प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे पुन्हा तलावातील पाण्याला काळपट हिरवा रंग आला आहे. त्यामुळे गुरुवारपासून पुन्हा तलाव बंद करण्यात आल्याचा फलक लावला आहे. वारंवार तलावातील पाणी खराब होत असल्याने त्याचा फटका सराव करणाऱ्या खेळाडूंना बसत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शालेय जलतरण स्पर्धा होणार आहेत. १४,१७, व १९ वयोगटातील स्पर्धेसाठी येथे सरावाला येणाऱ्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. स्पर्धेच्या तोंडावर तलाव बंद असल्याने त्यांचा सरावच थांबला आहे.

तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी सबमर्सिबल पंप व फिल्टर जोडला असल्याचे महापालिका कर्मचारी उत्तम कोळी यांनी सांगितले. मात्र त्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने स्पर्धेपूर्वी सराव कोठे करायचा,असा प्रश्न खेळाडूंसमोर निर्माण झाला आहे. खेळाडूंप्रमाणे येथे नियमित मासिक पास काढून पोहोणाऱ्यांची संख्या जास्त असताना वारंवार पाणी खराब होऊन तलाव बंद राहत असल्याने त्यांना फटका बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाज उत्कर्ष हेच कर्मवीरांचे ध्येय

$
0
0

समाज उत्कर्ष हेच कर्मवीरांचे ध्येय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजास जडलेल्या अज्ञानाच्या रोगापासून सुटका करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून रावसाहेब थोरातादी कर्मवीरांनी उदोजी वसतिगृहात सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन मूल्यसंस्कार, विषमतेला मूठमाती, चारित्र्य संवर्धन, मोफत शिक्षण, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन या उद्दिष्टांची अंमलबजावणी करीत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. समाज उत्कर्ष हेच जीवनध्येय मानून मविप्र व व्हॉलंटरी स्कूलच्या माध्यमातून जिल्हाभर शिक्षणाचे जाळे विणले, असे प्रतिपादन डॉ दिलीप पवार यांनी केले.

विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात समाजदिन कार्यक्रमात डॉ. पवार बोलत होते. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बापूराव देवरे, शिवाजी कांडेकर, जगन्नाथ राजोळे, संतोष नलगे, प्रा. डॉ. विद्या जाधव उपस्थित होते.

डॉ.पवार पुढे म्हणाले की, वसतिगृहापासून सुरु झालेल्या या संस्थेच्या मराठी, इंगजी प्राथमिक शाळांपासून फार्मसी, अभियांत्रिकी, कृषी, वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या ४८६ ज्ञानशाखा आहेत. उत्तर महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर असलेल्या या संस्थेची गुणवत्ता, शिस्त व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर नेत्रदीपक प्रगती सुरू आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास खोंडे यांनी तर आभार डॉ. विद्या जाधव यांनी मानले. मयूर खुळे व विशाल खुळे यांनी पसायदान सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहासक्तचा मुंबईत प्रयोग

$
0
0

देहासक्तचा मुंबईत प्रयोग

नाशिक : नाशिकच्या नम्रता कलाविष्कार संस्थेच्या देहासक्त नाटकाचा प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात रविवारी झाला. देवेन कापडणीस लिखित आणि धनंजय वाबळे दिग्दर्शित या नाटकात पूनम देशमुख, श्रुती चांदोरकर, धनंजय वाबळे, केदार रत्नपारखी, आशिष दळवी, डॉ. मोहन अमेसर यांच्या भूमिका होत्या. अविनाश देशपांडे यांचे नेपथ्य, कृतार्थ कन्सारा यांची प्रकाश योजना तर तेजस बिल्दीकर यांचे संगीत होते.डॉ. अ. ना. भालेराव पुण्यतिथीनिमित्त हा प्रयोग सादर करण्यासाठी नम्रता कलाविष्कार संस्थेला निमंत्रित करण्यात आले होते. नाशिकला हा बहुमान प्रथमच मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वराजिततर्फे संगीत मैफल

$
0
0

स्वराजिततर्फे संगीत मैफल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रागिणी कामतीकर संचालित स्वराजित संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी मंगला शेटे आणि आरती पाटील यांनी 'गाणी आपल्या आवडीची' हा हिंदी - मराठी गीतांचा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा हॉलमध्ये सादर केला. 'तुज मागतो मी आता' या गणेश प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिथे सागरा धरणी मिळते, झिणी झिणी वाजे बीन, अखेरचा हा तुला दंडवत, मेंदीच्या पानावर, दिल हुम हुम करे, रजनीगंधा फुल तुम्हारे,किसिलीये मैने प्यार किया, जा रे जा रे उड जा रे पंछी यासारखी हिंदी गीतेही सगळ्यांची मने जिंकून गेली. हसता हुवा नुरानी चेहरा या द्वंद्व गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. निवेदन धनेश जोशी यांनी केले. कार्यक्रमात गुरू रागिणी कामतीकर यांचा सत्कार त्यांच्या शिष्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कास पठारावरबिबट्याचे दर्शन

$
0
0

कास पठारावर

बिबट्याचे दर्शन

सातारा

कास पठारावर रविवारी पर्यटकांना बिबट्याचे दर्शन झाले. नवरा-नवरीच्या डोंगरावर एका दगडावर बिबट्या विसावला होता. पर्यटकांना कॅमेऱ्यातून त्याचे दर्शन होताच घबराट पसरली. दरम्यान, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. यंदा धुवाँधार पावसामुळे कास पठार हिरवेगार झाले आहे. पर्यटक फोटो काढण्यात मग्न असतानाच एका पर्यटकाला अचानक बिबट्या आपल्या कॅमेरात कैद झाल्याचे दिसले. स्थानिकांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर काहींनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत अंधार पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक नको’

$
0
0

'आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक नको'

सोलापूर :

गुणवत्ता वाचवा, देश वाचवा, हे आंदोलन कोणत्याही जाती अथवा धर्म, वा कोणत्याही राजकीय पक्षांविरुद्ध नाही. आरक्षण कोणालाही द्या, मात्र आरक्षण देताना ते पन्नास टक्क्यांच्या वर जाणार नाही याची काळजी घ्या, अशी मागणी करून याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रविवारी सोलापुरात सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला.

मूकमोर्चात मारवाडी, मुस्लिम, गुजराती, ख्रिश्चन, व्यापारी, शिक्षक, गृहिणी व डॉक्टरांचाही समावेश होता. विविध विद्याशाखांमधील खुल्या जागा पन्नास टक्केच राहाव्यात. कारण आरक्षणामुळे पन्नास टक्क्यांच्या पुढे मर्यादा ओलांडली आहे. खुल्या वर्गाला जागा कमी मिळत आहेत. पन्नास टक्क्यांहून अधिक असलेल्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटले सुरू आहेत. ही एक लोक चळवळ व्हावी, यासाठी रविवारी दत्त चौक येथून मूकमोर्चा काढण्यात आला. या वेळी डॉ. मिलिंद जोशी, डॉ. संजय देशपांडे, डॉ. माधुरी दबडे, डॉ. साधना देशपांडे, डॉ. विनायक देशपांडे, नवाज बक्षी, प्रा. मनीषा शहा, राहुल शहा, सलाम शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images