Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आरोग्य शिबिर उद्या

$
0
0

कोल्हापूर : महापुरात बाहेर आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने सोमवारी (ता. २६) वीरशैव रुद्रभूमी परिसरातील सोमेश्वर मंदिरात दुपारी चार वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरामध्ये सिद्धार्थ नगर व परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सुनील गाताडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चले जाव मोर्चाच्या स्मृतिस्तंभास अभिवादनइंग्रज सत्ते विरोधातील चले जाव मोर्चा च्या स्मृतिस्तंभास अभिवादन

$
0
0

चले जाव मोर्चाच्या स्मृतिस्तंभास अभिवादन

कराड :

थोर स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली २४ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या ७७व्या स्मृतिदिनानिमित्त कराड तहसील कचेरीतील स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यात आले

कराड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सरकारच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रांताधिकारी हिम्मत खराडे तहसीलदार अमरदीप वाकडे, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, स्वातंत्र्य सैनिक हिंदुराव जाधव, शंकरराव जाधव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई. प्रा. धनाजीराव काटकर, माजी प्राचार्य गणपतराव कणसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात आणीबाणीपेक्षाही वाईट स्थितीखासदार सुप्रिया सुळे यांची टीका

$
0
0

देशात आणीबाणीपेक्षाही वाईट स्थिती

खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

सोलापूर :

'जम्मू-काश्मीरमध्ये बदल करायचे असतील तर जरूर करा, तो अधिकार सर्वांना आहे. मात्र, सर्वांना विश्वासात घेऊन बदल करा. कुणाला नजरकैद करून, डांबून ठेऊन करू नका. भाजप सरकारमुळे देशात आणीबाणीपेक्षाही वाईट स्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकार हुकूमशाहीप्रमाणे वागत आहे.' असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सोलापुरात केला. संवाद यात्रेच्या निमित्ताने खासदार सुळे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या.

सुळे म्हणाल्या, 'जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. मागील आठवडाभरापासून फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांचा कॉन्टॅक्ट होत नाही, त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात ओला आणि कोरडा दुष्काळ असताना राज्यातील भाजप सरकार मात्र, पक्ष प्रवेशाचे सोहळे करीत आहे. ईडी, सीबीआय, कारखान्यावरील व बँकेतील कर्जाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे नेते भाजप, शिवसेनेत जात आहेत. परंतु, जाणारे नेते राष्ट्रवादी किंवा शरद पवार यांच्यावर प्रेम व्यक्त करीत आहेत. एकाही नेत्यांने राष्ट्रवादीवर टीका केली नाही. या वरून असे स्पष्ट होते की, केवळ भीतीमुळे पक्षांतर होत आहे. पक्ष सोडून जाणारे पुन्हा परतणार असतील आता त्यांना रांगेत उभे राहून वाट पहावी लागेल. निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाईल.'

राज ठाकरेंवर सूडबुद्धीने कारवाई

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली आहे. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज यांची चौकशी झाली, तरी त्यांना काही होणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले होते. संकटकालीन परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून दोन बंधू एकमेकांना साथ देत आहेत, हे संस्कार बाळासाहेब ठाकरे यांनी रुजविले आहेत, असेही सुळे म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस खतप्रकरणी कृषी खात्याची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील योगेश कृषी सेवा केंद्रामध्ये बोगस खत आढळून आले असून, कृषी विभागाच्या जिल्हा गुणनियंत्रण पथकाने शनिवारी केलेल्या तपासणीत हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये जीवनावश्यक कायदा अधिनियम व खते नियंत्रण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

कृषी विभागाचे जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी आशिष काळुसे हे पथकासह ढोरेगाव येथील योगेश कृषी सेवा केंद्रामध्ये तपासणीसाठी गेले असता त्यांना एका पावतीवर 'डीएपी' खताची गोणी विक्री झाल्याचे आढळून आहे. ई पॉस मशीनची तपासणी केली असता संबंधित दुकानदाराला कुठल्याही प्रकारे 'डीएपी' खत वितरित झाले नसल्याचे समोर आले. त्यामुळे संशय वाढल्याने पथकाने दुकानाची तपासणी केली. तेव्हा दुकानांमध्ये सम्राट फर्टिलायझर कंपनीची एक बोगस खताची गोणी आढळून आल्याचे काळुसे यांनी सांगितले. याप्रकरणी गंगापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामकृष्ण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खत विक्रेते योगेश शिंदे, अंकुश दुबिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलीप माने, दिलीप सोपल जाणार शिवसेनेत

$
0
0

दिलीप माने, दिलीप सोपल जाणार शिवसेनेत

सोलापूर :

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळचे नागनाथ क्षीरसागर यांचा २७ ऑगस्टला, तर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचा ३१ ऑगस्टपर्यंत शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्ष सोडण्याची तयारी दाखविली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी माने यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्याशी पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली होती. त्यातील पाच जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे. त्यामुळे नेत्यांनी विनाअट पक्ष प्रवेश करावा, असा निरोप मातोश्रीवरून देण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयवंत शुगर्समध्येरोलर पूजन

$
0
0

जयवंत शुगर्समध्ये

रोलर पूजन

कराड :

धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात २०१९-२०च्या गळीत हंगामासाठी जयवंत शुगर्सचे संस्थापक आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत देसाई, विनायक भोसले, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुळेंच्या ताफ्यातील वाहनांवर कारवाई

$
0
0

सोलापूर : वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर सोलापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा सोलापूर दौरा सुरू आहे. या दौऱ्यात विविध क्षेत्रातील लोकांशी खासदार सुप्रिया सुळे संवाद साधत आहेत. सायंकाळी सात वाजता सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात संवाद ताईंशी, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुळे ज्या गाडीत आल्या होत्या. त्या गाडीसह ताफ्यातील सर्व गाड्यांवर वाहुतकीला अडथळा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. डफरीन चौक हा रहदारीचा भाग आहे. मात्र, रस्त्यालगत असलेल्या सभागृहामुळे रस्त्यावर गाड्या उभा करण्यात आला होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताफा रस्त्यावरून हलवण्याच्या सूचना केल्या. त्या नंतरही ताफा न हलल्याने ताफ्यातील सर्व आठ गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या मध्ये प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने नोंदणी असलेल्या गाडीचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जे दिली हा गुन्हा झाला काय?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'महाराष्ट्र राज्य ही सहकाराची पंढरी आहे. सहकारातील साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका आणि छोट्या-मोठ्या संस्थांवर हजारो लोकांचे संसार अवलंबून आहेत. अशा संस्थांना राज्य बँकेने त्यांच्या अडीअडचणीच्या काळात कर्जे दिली, हा काय गुन्हा झाला काय?' असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी त्यांनी हा खुलासा केला. म्हाकवे (ता. कागल) येथील श्री हनुमान विकास सेवा संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'उच्च न्यायालयाने राज्य सहकारी बँकेप्रश्नी दिलेल्या निकालाचा आम्ही आदरच करतो. गेल्या दोन दिवसांपासून बँकेच्या घोटाळ्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. त्यामध्ये विनाकारण माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये आणि सहकार क्षेत्रात झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठीच हा खुलासा करीत आहे. राज्य बँकेने केलेल्या कर्जपुरवठ्याबाबत माझ्याकडे पुरावे नाहीत; पण माझ्याकडे खात्रीशीर माहिती आहे, की राज्य बँकेने केलेल्या कर्जपुरवठ्यापैकी ९० टक्के कर्जांची वसुली झाली आहे. उर्वरित दहा टक्के थकहमीची होणारी एक हजार कोटींची रक्कम राज्य सरकारने बँकेला देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.'

ते पुढे म्हणाले, ' सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य सरकार बँकेला एक हजार कोटी रुपये देणार आहे. बँकेच्या वतीने चुकीचे कर्जवाटप झाले असेल तर त्याच्या वसुलीसाठी कायदेशीर मार्ग आहेत. सहकार कायदा कलम ८८ आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी आहे. बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला, अशा प्रकारचे वातावरण झाल्यामुळे बँकेचे संचालक हे पैसे घराकडे घेऊन गेलेत की काय? असा एक संभ्रम झाला आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. ही रक्कम कर्जवाटप झालेली आहे. त्यामुळे संचालकांचा त्यामध्ये काहीच संबंध नाही. कर्जाच्या थकीत रकमेपोटी काही संस्थांवर मालमत्ता विक्रीची कारवाई झालेली आहे, तर काही अद्यापही थकीत आहेत. अशा संस्थांच्या संचालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. राज्य बँकेची कलम ८८ नुसार चौकशी सुरू झाली होती. कायद्यानुसार अडीच वर्षांत ही चौकशी पूर्ण व्हायला हवी होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या लक्षात आले की, यापैकी ९० टक्क्यांहून अधिक रकमेची वसुली पूर्ण झालेली आहे. तोपर्यंत अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजे चौकशी सुरू झाल्याच्या तीन वर्षांनंतर सरकारने विधानसभेत कायदा आणला की, पूर्वलक्षी प्रभावाने याची मुदत वाढवा आणि चौकशी सुरू ठेवा. त्यावर पुन्हा संचालक मंडळाने न्यायालयात या गोष्टीला आव्हान दिले. पूर्वलक्षी प्रभावाने वाढविलेल्या मुदतीची वर्षभर सुनावणी झाली ती आजपर्यंत प्रलंबितच आहे. '

०००

मग राज्य बँक फायद्यात कशी?

पंजाब नॅशनल बँकेचे तब्बल २१ हजार कोटी रुपये घेऊन निरव मोदी भारतातून बाहेर पळाला. स्टेट बँकेपाठोपाठ देशातील मोठी बँक असा लौकिक व देशभर शाखा असलेली ही बँक अद्यापही फायद्यात नाही. मग जर २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असता तर राज्य बँक गेली पाच वर्षे फायद्यात कशी आली असती? असा सवाल आमदार मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईडीची नोटीस पाठवून दाखवाः सुप्रिया सुळेंचे आव्हान

$
0
0

सोलापूरः केंद्रातील सरकार हे विरोधकांवर सूडबुद्धीने ईडी आणि सीबीआयला हाताशी धरून कारवाई करीत आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षातील नेते सेना-भाजपत जात आहेत, असा आरोप होत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारला आव्हान दिले आहे. केंद्र सरकारने माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी असे त्या म्हणाल्या.

'संवाद ताईंशी' या कार्यक्रमानिमित्त सुप्रिया सुळे या सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला. सरकारच्या विरोधात तुम्ही बोलत आहात. जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर त्यानंतरही तुम्ही सरकार विरोधात बोलणार का?, असा सवाल पत्रकाराने विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे सरकारला आव्हान आहे. सरकारने माझ्याविरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी. मी जर काही केलेच नसेल तर मला कशाची नोटीस पाठवणार. सुरुवातील थोडासा त्रास होईल, पण अखेर मीच जिंकणार असंही त्या म्हणाल्या.

विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरू असलेल्या ईडीच्या चौकशीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. मला जर ईडी किंवा सीबीआयने नोटीस पाठवली तरी काही फरक पडणार नाही. मला संघर्ष करण्यात मजा येते. सरकारने माझ्याविरोधात ईडीची नोटीस पाठवून दाखवावी, असं म्हणत त्यांनी सरकारला आव्हान दिले आहे. दरम्यान, पक्षांतर केलेल्या नेत्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. यंदाच्या निवडणुकीच्या निकालाची मला प्रचंड उत्सुकता आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांना त्या पक्षात गेल्यानंतर किती मते मिळतात हे मला पाहायचे आहे, असं त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतीच्या महानायकांचा होणार सन्मान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अस्मानी पूरपरिस्थितीने जिल्ह्यातील अनेक नागरिक हवालदिल झाले. कोल्हापूर शहरासह अनेक गावांतील नागरिकांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असताना डोक्यावरील छतही पुराने नाहीसे केले. या संकटाचा सामना करायचा कसा? अशा विवंचनेत असल्याने पूरग्रस्तांचे डोळे पाणावले. पण, अशा बिकट प्रसंगी सर्वांनीच त्यांना मदतीचा हात दिला. देशभरातून आलेली मदत पारदर्शकपणे पूरग्रस्तांच्या हाती पडण्यासाठी हजारो हात अहोरात्र कामाला लागले. जेवण, कपडे, पाणी अशा अत्यावश्यक साहित्य पुरवून त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्या या कार्यातून माणुसकीचे दर्शन घडले. माणुसकीच्या धर्माची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढील काळातही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने त्यांचा सहृद्य सत्कार करण्यात येणार आहे. पूर परिस्थित महानायक ठरलेल्या संस्था व व्यक्तींचा परिचय.

महापालिकेचा स्वच्छतेवर भर

महापुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. पूर परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासह पूर ओसरल्यानंतर साथीच्या रोगांना पायबंद घालण्याचे प्रमुख आव्हान होते. महापालिका प्रशासनाने या आव्हानाचा सामना करत स्वच्छता मोहिमेवर अधिक भर दिला. मुंबई महापालिकेची अत्याधुनिक मशिनरी घेऊन ड्रेनेज लाइन स्वच्छ केली. रस्त्यावरील कचऱ्याची तातडीने निर्गत केली. कचरा व गाळ उचल केल्यानंतर औषध व धूर फवारणी करून रोग प्रतिबंधक उपाययोजना केल्या. त्यामुळे पूरानंतर शहरात साथीच्या रोगांचा फैलाव होऊ शकला नाही. महापालिकेने केलेल्या उपक्रमाचे अनुकरण इचलकरंजी, जयसिंगपूर या नगरपालिका आणि सांगली महापालिकेने केले.

कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप

महापूराच्या तडाख्यानंतर जनजीवन हळूहळू सुरळीत होऊ लागले आहे. लाखो पूरग्रस्तांना अनेकांनी मदतीचा हात दिला. जिल्ह्यासह राज्यभरातून आलेली मदत योग्य व्यक्तींच्या हातात पडण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपची स्थापना झाली. घरपयोगी साहित्य वाटपाबरोबर स्वच्छता मोहीम आणि औषध फवारणीचे योग्य मॅनेजमेंट ग्रुपने केले. त्यासाठी हजारो स्वयंसेवक अव्याहत राबत होते. पुरात हरवलेल्या कागदपत्रांसाठी वकिलांचे पथक नियुक्त करताना घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुरुस्ती करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली. ग्रुपच्या कार्यातून प्रेरीत होऊन अनेक संस्थांनी त्याचे अनुकरण केले.

'महावितरण' बनले प्रकाशदूत

पूरकाळात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न 'महावितरण'ने केला. मात्र, अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांसह ट्रान्सफॉर्मरही पाण्याखाली गेल्याने महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पूर ओसरताच विद्युत पूरवठा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अक्षरश: जिवाची बाजी लावली. पूरबाधित घरांमधील मीटर बदलून देणे, पुरामुळे कोसळलेले खांब पुन्हा उभे करण्याचे काम जलद झाले. या कार्यतत्परतेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

महाडिक युवा शक्तीने भागवली भूक

पूरग्रस्तांची भूक भागवण्याची जबाबदारी धनंजय महाडिक युवा शक्ती, भागीरथी महिला संघटना आणि महाडिक कुटुंबीयांनी स्वीकारली. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वत:च्या घरात रोज दहा हजार लोकांचे जेवण तयार केले. पूरग्रस्तांच्या निवारा केंद्रांसह पूरबाधित गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांनाही जेवण पोहोचवले. सुमारे ५० हजार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू दिल्या. महामार्गावरून इंधन शहरात पोहोचवण्याच्या कामातही पुढाकार घेतला.

डी. वाय. पाटील ग्रुपने घेतली जबाबदारी

आमदार सतेज पाटील, प्रतिमा पाटील सोशल वेल्फेअर आणि डी. वाय. पाटील ग्रुपने पूरक्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे महत्त्वाचे काम केले. शिवाय पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीही पुढाकार घेतला. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्य पाठवले जात आहे. पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी, त्यांना मानसिक आधार देणे, मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचे काम सुरूच आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघ

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघांने चांगले संघटन बांधले. या संघटन कौशल्याचा वापर करून महासंघाने पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत राज्य व सीमा भागातून मोठ्या प्रमाणात महासंघाकडे मदत झाली. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथून अखंडपणे पूरग्रस्तांना संसारपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यासाठी शहरातील महासंघाचे स्वयंसेवक रात्रंदिवस पूरग्रस्तांच्या मदत करत होते.

कोल्हापूर मेडिकल आणि केमिस्ट असोसिएशन

पुराच्या अस्मानी संकटामध्ये हजारो हात मदतकार्य व बचावकार्यात पुढे आले. वैद्यकीय क्षेत्रातील कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय संघटना, होमिओपॅथी, निमा, खासगी डॉक्टर्स, जनरल प्रॅक्टिशनर्स, हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम असोसिएशन एकवटल्या. आठ ते दहा दिवस पूरग्रस्तांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. महापालिकेच्या २८ पुनर्वसन केंद्रांमध्ये असोसिएशनचा सर्व स्टाफ कार्यरत होता. विशेषत: साथीच्या रोगांचा फैलाव होणार याची दक्षता असोसिएशनने घेतली. त्याचा हजारो रुग्णांना फायदा झाला.

मुस्लिम बोर्डिंग बनले आधारवड

शहरात पुराच्या पाण्याने वेढा दिल्यानंतर पूरग्रस्तांचे मुस्लिम बोर्डिंग हे निवारास्थान बनले. स्थलांतरित कुटुंबांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी बोर्डिंगच्या संचालक मंडळापासून युवा कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी स्वत:ला झोकून दिले. दररोज पूरग्रस्तांना पोटभर जेवण देताना साबण, पेस्ट, ब्रश, कपडे, स्वेटर, महिलांसाठी कपडे अशी मदत उभी करण्यात आली. शंभरपेक्षा जास्त कुटुंबांना नियमित सेवा दिली गेली. बोर्डिंगमधील एक खोली मदतीच्या साहित्याने भरून गेली. त्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींची मदत झाली.

कोल्हापूर हॉटेल मालक संघ

पूरग्रस्तांसाठी आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कोल्हापूर हॉटेल मालक संघ, कोल्हापूर कॅटरिंग वेल्फेअर असोसिएशन, सीए असोसिएशन आणि व्हाइट आर्मीच्या माध्यमातून भोजन, नाष्ट्यासह औषधे व गृहोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट मॅनेजमेंट करत संघाने धैर्यप्रसाद मंगल कार्यालयातून त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली. मदतीची व्याप्ती वाढल्यानंतर महासैनिक दरबार हॉल येथूनही गरजू पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ अखंड राहिला.

राजस्थानी जैन समाज

महापुराने वेढलेल्या भागातील नागरिकांची, जनावरांची स्थिती भयानक होती. यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजस्थानी जैन समाज पुढे सरसावला. जेवणाची पॅकेट्स, दोन हजार चादरी, पाण्याच्या पाच हजार बाटल्या व जनावरांसाठी पाच ट्रक चारा देण्यात आला. शहरातील छावण्यांबरोबरच शिरोली, आरे, शिरोळमधील ग्रामीण भागात मदत पाठवण्यात आली. गुजरी येथील मदत कक्षातून आवश्यक औषधांचा साठा, जनावरांसाठी पशूखाद्य, महिला व मुलांसाठी कपडे पाठविण्यात आली.

शिव सहाय्य योजना

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास शिवसेना कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावली. स्थलांतरित पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने शिव सहाय्य योजना जाहीर केली. योजनेमध्ये राज्यभरातून मदत आली. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदत वितरण करण्यात आले. त्यानंतर विविध शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या हाती मदत पोहोचवली.

भाजप सहाय्य योजना

स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी भाजप सहाय्य योजना जाहीर केली. पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी या योजनेत मदत दिली. सरकारच्या मदतीबरोबर विविध माध्यमातून आलेली मदत पूरग्रस्तांपर्यंत गेली. मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून आपत्कालीन काळात शहरवासियांना दिलासा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरला गरज अॅनिमल शेल्टरची

$
0
0

Mahesh.patil@timesgroup.com

Tweet:@MaheshpMT

कोल्हापूर : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळित झाले. पूरग्रस्त बनलेल्या अनेकांना घरदार सोडून विस्थापीत व्हावे लागले. या काळात शहरासह ग्रामीण भागात कुत्रा, मांजर यांसह पाळीव प्राण्यांचेही अतोनात हाल झाले. पुरात अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागला. शहरातील प्राणीप्रेमी नागरिकांकडून महापुराच्या काळात जमेल त्या पद्धतीने प्राण्यांना वाचविण्यासाठीचे प्रयत्न झाले. मात्र, शहरात प्राण्यांच्या देखभालीसाठी 'अॅनिमल शेल्टर'ची गरज यातून अधोरेखित झाली आहे.

शहर आणि ग्रामीण भागात बहुसंख्य नागरिक आवड, हौस अथवा घराच्या संरक्षणाच्या हेतूने कुत्रा पाळतात. अनेकजण आवड असल्याने मांजरेही पाळतात. काहीजण हौस म्हणून विविध जातींची कुत्री पाळतात. त्यांची देखभालही चांगल्या पद्धतीने केली जाते. या पाळीव प्राण्यांना अँटी रेबिजच्या लसी दिल्या जातात. त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते.

मात्र, शहरात फिरणाऱ्या अथवा रस्त्यावर आढळणाऱ्या मोकाट कुत्र्यांबाबतची स्थिती दयनीय आहे. शहरात अध‌िकृत श्वानगणना झालेली नसली तरी सुमारे २५ हजारांहून अधिक भटकी कुत्री असावीत असा अंदाज प्राणीप्रेमींचा आहे. मोकाट कुत्र्यांकडून माणसांवर, विशेषत: मुलांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला की यासंदर्भात चर्चा होते. महानगरपालिकेकडून काही काळ मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवली जाते. मात्र, नंतर काहीच होत नाही. मध्यंतरी मोकाट कुत्र्यांबाबतचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर २०१३ मध्ये, महापालिकेने मोहीम राबवली. कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी निर्बिजीकरणासाठी प्रयत्न झाले. 'उनाड व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व निर्बिजीकरणाचा २०११' हा कायदाही आहे. या कायद्यात मोकाट, भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा, याची निर्देश दिले आहेत. मात्र, कुत्री पकडणे अथवा निर्बिजीकरण यासाठी अत्यंत तोकडी यंत्रणा उपलब्ध आहे. कुत्री पकडण्यासाठी महापालिकेकडे केवळ दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी आणि एक व्हॅन आहे.

शहरातील प्राणीप्रेमींच्यावतीने कुत्रे, मांजर या प्राण्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. महापुराच्या काळात या प्राण्यांना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागले.

यासंदर्भात शहरातील प्राणीप्रेमींना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणणाऱ्या, प्राणी प्रेमी दीपा शिपूरकर म्हणाल्या, 'महापुराच्या कालावधीत आणि नंतरही जखमी कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. महापुरावेळी मुंबईहून आलेल्या प्राणीप्रेमी ओम राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूर, चिखली, आंबेवाडी, नृसिंहवाडी, कुरुंदवाडसह शिरोळपर्यंतच्या अनेक गावांत डॉग फूड आणि कॅट फूड उपलब्ध करून दिले. येथील प्राणीप्रेमींच्या मदतीने त्याचे वितरण केले गेले. अनेकांनी पुराच्या पाण्यातून प्राण्यांना वाचवले. त्यांना खाद्यपदार्थांची सोय केली. अलीकडे एरव्हीसुद्धा प्राणी कोंडाळ्यात सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. प्राणी प्रेमींच्यावतीने स्वखर्चातून त्यांच्यावर उपचार करतात. कुत्र्यांना अँटी रेबिज लसीकरण करून नंतर त्यांच्या नसबंदीसाठीही प्रयत्न केले जातात. रस्त्यावर सोडून दिलेल्या मांजर, कुत्रा या प्राण्यांचा सांभाळ नागरिकांनी करावा यासाठी प्रयत्न आहेत. मात्र, अशा प्राण्यांसाठी अॅनिमल शेल्टरची गरज आहे. यासाठी जागेपासून निधीपर्यंत सर्व बाबींची पूर्तता व्हायला हवी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरी, लक्ष्मीपुरी रुळावर

$
0
0

लोगो : ऑन दी स्पॉट

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुराने बुडलेल्या साहित्याची स्वच्छता करताना दुकानदार, व्यापारी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. खराब माल रस्त्यावर फेकताना जीवाची घालमेल होत असल्याची स्थिती आहे. मात्र व्यापारात पुन्हा नवीन इनिंग सुरी करण्यासाठी लाखो रुपयांचे नुकसान सोसून व्यापारी स्वच्छतेबरोबर पंचनामा, विम्याचे क्लेम भरण्यासह क्रेडिटवर माल भरुन नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागले आहेत. मात्र झालेले नुकसान कसे भरुन काढायचे याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते. शहरातील व्यापाऱ्याचे आर्थिक केंद्र असणाऱ्या शाहूपुरी, लक्ष्मीपुरीला महापुराचा इतिहासात सर्वात मोठा फटका बसला असून आगामी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणांसाठी व्यापारी, दुकानदार, छोटे विक्रेते छातीवर दगड ठेऊन पुन्हा कामाला लागले आहेत.

महापुराने शाहूपुरी कुंभार गल्ली, फोर्ड कॉर्नर, कोंडाओळ, व्हीनस टॉकीज या परिसरातील व्यापारी, उद्योजक, बँका, किरकोळ दुकानदारांना मोठा फटका बसला. पाणी ओसरू लागल्यानंतर परिसराचे भयाण चित्र पुढे आले. काही ठिकाणी तब्बल सव्वा फूट गाळ होता. येथे स्थानिक व्यापारी, नागरिकांसह महानगरपालिकेने आणि सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्याबरोबर प्रत्येक व्यापारी, दुकानदार स्वच्छतेच्या कामात गुंतला आहे.

कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील दुकानदार, व्यापाऱ्यांनी पुरात भिजलेला, खराब झालेला माल फेकून दिल्याचे दिसत आहे. कोंडोओळ परिसरात रंग व्यापाऱ्यांनी दुकानांतील साहित्याचा विमा उतरवला असला तरी पंचनामे अद्याप झालेले नाहीत. खराब माल दुकानाबाहेर रचून ठेवला आहे. पंचनाम्यासाठी कोणीच न आल्याने अनेकांना चिंता सतावत आहे. महसूल खात्याचे पंचनामे झाल्याशिवाय विम्याचे क्लेम करता येत नसल्याचे विमा एजंटांनी सांगितल्याने व्यापाऱ्यांची घालमेल सुरू आहे. कोल्हापूर रंग भांडार या दुकानात गणेशोत्सवासाठी रंग खरेदी करण्यासाठी ग्राहक येऊ लागले आहेत. मात्र रंग तयार करणारे खराब झाल्याने त्याची दुरुस्ती सुरू आहे. मशिन दुरुस्तीसाठी कंपनीने तंत्रज्ञ पाठविले असले तरी मशिनचे पार्ट्स व्यापाऱ्यांना स्वत:च्या खर्चाने बसवावे लागत आहेत. डिस्टेंपर, सिमेंट कलरचे लगदे झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

व्हीनस टॉकीज ते विल्सन पूल या रोडवर व्यापारी, दुकानदार दुकान, शोरुम स्वच्छ दिसावे यासाठी आटापिटा करीत आहेत. यूथ बँकेजवळील वेलनेस फॉरएव्हर या मेडिकल शॉपमध्ये खराब माल बदलून नव्याने औषधे व अन्य साहित्य आणण्यात आले. व्हीनस टॉकीजनजीकचे मलबार हे दागिन्यांचे शोरुम सुरू झाले आहे. शेजारील पु. ना. गाडगीळ सराफ ही शोरूम गणेश चतुर्थीपूर्वी सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर वायरिंग दुरुस्ती सुरू आहे. रंगरंगोटी केली जात आहे. दहा दिवस दुकान पाण्याखाली असल्याने सर्व दागिने सांगलीला पाठविण्यात आले. मातोश्री प्लाझातील नंदकुमार पान शॉपमधील सर्व साहित्य खराब झाले असून येथेही दुकानदाराकडून स्वच्छता सुरू आहे. सोळंकी कोल्ड्रिंक हाऊसमधील पुराच्या पाण्यामुळे खराब झालेले साहित्य बदलले जात आहे. फ्रीज, डीप फ्रीज निकामी झाल्याने नवीन फ्रीज आणण्याची तयारी केली जात आहे. व्हीनस कॉर्नर परिसरातील पुराचे पाणी सर्वात उशीरा कमी झाले. अजूनही त्या परिसरात स्वच्छता सुरू आहे. व्हीनस चौकातील हॉटेल व्हरायटीमधील गॅस शेगड्या, हॉटेलमधील डिश, काचेच्या साहित्यांची मांडणी सुरू आहे. पद्मा गादी कारखाना या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून नव्याने उश्या, गाद्या, पडदे आणून ग्राहकांसाठी दुकान सज्ज करण्यासाठी मालक, कर्मचाऱ्यांची धांदल सुरू आहे.

व्हीनस कॉर्नर ते विल्सन पूल रस्त्यावरील बहुतांश दुकानात स्वच्छता सुरू आहे. माणिकमोती या दुकानातील फरशी पॉलिश सुरू असून गणपतीपूर्वी दुकान सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. भोजराज हॉटेलमधील गॅस शेगड्या, भांड्यांची स्वच्छता सुरू आहे. महालक्ष्मी गोल्ड शोरुमही स्वच्छ झाले असून दागिन्यांची मांडणी केली जात आहे.

कुंभार गल्लीत अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत. कुंभार समाजाने भिजलेली गाडगी, मडकी, धुपाटणीसह कुंड्या दारात वाळवण्यास ठेवली आहेत. दिगंबर पुरेकर यांच्या स्टेशनरी दुकानातील साहित्य भिजल्याने आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. वह्या, पुस्तके, गाईड भिजून लगदा झाला आहे. गोळ्या, चॉकलेट, वेफर्स खराब झाले आहेत. स्टेशनरीमधील प्लास्टिक वस्तू धुण्याचे काम पुरेकर दाम्पत्य करत आहेत. परिसरातील चहाच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. गॅरेजमध्ये वाहने दुरुस्तीसाठी गर्दी झाले आहे. भिजलेले बॉक्स फेकून त्यातील स्पेअर पार्ट वाळण्यात येत आहेत. येथे अनेक रेडियमची दुकाने आहेत. ती आता सुरू झाली आहेत.

महापुरामुळे पंधरा दिवस आणि दुरुस्तीसाठी १० दिवस असा जवळपास एक महिना व्यवसाय बंद आहे. दसरा आणि दिवाळी हे सण तोंडावर असल्याने गणेश चतुर्थीपूर्वी शोरूम सुरू करण्यासाठी इलेट्रिक काम सुरू आहे. अंडर ग्राऊंड वायरिंगमुळे सर्व खबरदारी घेत आहोत.

- प्रशांत कुलकर्णी, अकाउंटंट, पु. ना. गाडगीळ सराफ

दुकानातील वह्या, पुस्तके, गाइड्स खराब झाली आहेत. प्लास्टिकचे साहित्य धुवून घेणे शक्य आहे. मात्र वेफर्स, मिनरल वॉटर, कोल्ड्रिंक बदलून देण्यास डिस्ट्रीब्युटर्सनी नकार दिला आहे. माल स्वच्छ करुन विका असा सल्ला दिला जात असला तरी खराब पदार्थ काढून टाकले आहेत. फक्त 'कॅटबरी'ने माल बदलून देण्याची तयारी दाखवली आहे. उधारीवर माल घेऊन गणपतीपूर्वी दुकान सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- दिगंबर पुरेकर, शाहूपुरी कुंभार गल्ली

नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. विम्याच्या क्लेमसाठी प्रयत्न सुरू आहेत. दुकानातील सर्वकाही भिजले असल्याने कागदपत्रे जमा करताना अडचणी येत आहेत. सध्या सात जिल्ह्यांत माल पाठवण्याचे काम सुरू आहे. नुकसान मोठे झाले असले तरी त्यातून सावरण्याचे प्रयत्न आहेत.

- अविनाश निगवेकर, कोल्हापूर रंगभांडार, कोंडाओळ

महापुरात दुकानातील मालाचे सव्वातीन लाख रुपयांचे नुकसान झाले. आठ दिवस पुरामुळे वाहून आलेला गाळ, कचरा काढताना नाकीनऊ आले. खराब पदार्थ टाकून दिले असून क्रेडिटवर नवा माल भरला आहे. ग्राहकांना नवीन, ताजे पदार्थ देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

- प्रमोद ढिसाळ, ढिसाळ स्वीट्स, व्हीनस कॉर्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलकांची प्रकृती खालावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध मागण्यांसाठी तब्बल २१ दिवस शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करूनही विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचलेला नाही. उपोषणकर्ते सचिन कांबळे, उत्तम जाधव, नारायण पारखे यांची तब्बेत खालावूनही प्रशासन तिकडे फिरकलेले नाही. शिक्षकांचा बळी घेऊनच निर्दयी सरकारला जाग येणार का? असा आर्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने अनुदान मागणीसाठी शिक्षक, पालक विद्यार्थ्यांसह शाळा बंद करून सोमवारी (ता. २६) दुपारी १२ वा. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

आपल्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी अनेक वर्षे विनाअनुदानित शाळांवरील शिक्षक लढा देत आहेत. अनेकांचा उमेदीचा काळ या संघर्षामध्ये गेला. संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना डोक्यावर कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढतो आहे. वाढत्या महागाईच्या काळात आता जगायचे कसे? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. राज्यात गेली २० वर्षे विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना विनावेतन काम करावे लागत आहे. या विरोधात कायम विनाअनुदानित कृती समितीच्यावतीने सरकारला जाग यावी व शाळांना अनुदान मिळावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून शासनासमोर शिक्षकांच्या भावना मांडल्या आहेत. मात्र त्यावर सरकारला जाग आली नाही. भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी संघटनेच्या आंदोलनात सहभागी होऊन तात्कालीन भाजपचे नेते व आता शासनामध्ये मंत्री म्हणून सहभागी असणाऱ्या अनेकांनी शिक्षकांना अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्यातील समस्त शिक्षक वर्ग त्यांच्या पाठीशी राहिला. मात्र, या सरकारनेही 'येरे माझ्या मागल्या' याप्रमाणे शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग केला आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात पुन्हा संघटनेला नाईलाजास्तव आंदोलनाचे हत्यार उपसावे लागल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

सत्तेवर आल्यावर तत्काळ अनुदान देण्याचे आश्वासन भाजपचे नेते विसरले. २०१६ मध्ये संघटनेच्यावतीने औरंगाबाद येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. मात्र, आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे सोडत आंदोलन उधळून लावले. यामध्ये अनेक महिला शिक्षिका गंभीर जखमी झाल्या, असे असताना संघटनेचे प्रमुख खंडेराव जगदाळे यांच्यासह ५९ शिक्षकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कोठडीत पाठवले. त्यावेळी राज्यातील एक हजार, ६२८ शाळांना २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक सर्वच विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी असताना शासन संघटनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.

२० टक्के अनुदान देतानाही अनेक निर्बंध शाळांवर घालण्यात आले. याशिवाय अनुदानाचे प्रचलित सूत्र या सरकारने बदलून टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. याशिवाय १ व २ जुलै रोजी पात्र शाळेत अनुदानाचा टप्पा देणे, कोणतेही कारण नसताना काही शाळा अपात्र करणे, पुणे स्तरावर व मुंबई मंत्रालय स्तरावर पात्र शाळांची यादी असताना ते घोषित करून अनुदान देण्याची भूमिका या सरकारकडून घेतली जात नाही. आंदोलनात सहभागी काही शिक्षकांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. तर काही शिक्षकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सरकारने विनाअनुदानित शिक्षकांचा तोंडाला पाणी पुसण्याची काम केले आहे वारंवार आंदोलन करूनही मागण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मतदानावर बहिष्कार टाकणार आहे.

खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैश्य समाजाचे आवाहन

$
0
0

कोल्हापूर : वैश्य समाज कोल्हापूर संस्थेच्यावतीने वैश्य समाजातील ५ व ८ वी शिष्यवृत्ती व दहावी, बारावी परीक्षेमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. पात्र विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाजाचे अध्यक्ष पांडुरंग पारकर व जयवंत वळंजू यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजवंतांच्या आधारासाठी धडपडणारा प्रशांत

$
0
0

गरजवंतांच्या आधारासाठी धडपडणारा प्रशांत

०००

माणुसकीनं ओतप्रोत भरलेलं, तेवढंच मिश्किल, गूढ आणि आपली सगळी मेहनत समाजासाठी अर्पण करणारं, प्रत्येक प्रश्नावर दिलखुलास उत्तर देणारं प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रशांत जोशी. ना नफ्यासाठी, ना स्वार्थासाठी... आमची मैफल गरजवंतांच्या आधारासाठी' हे ब्रिद त्यांनी जपलयं.

०००

विकास कुलकर्णी

०००

गेल्या महिनाभर हॉटेल झोरबाच्या पाचवा मजल्यावर आनंद हॉलमध्ये 'कराओके म्युझिक सिस्टीम'वर हिंदी प्रज्ञासंगीत कार्यक्रम सुरू आहे. प्रशांत जोशी यांच्या नेटक्या संयोजनातून, संकल्पनेतून गरजवंत व्यक्तींसाठी सुरू असलेला हा उपक्रम. 'ना नफ्यासाठी, ना स्वार्थासाठी, आमची मैफील, गरजवंतांच्या आधारासाठी' हे ब्रीद घेऊन समाजातील गरजूंसाठी धडपडणारे रंगकर्मी. नाट्यरंग संस्थेचे सर्वेसर्वा प्रशांत. विविध व्यासपीठांवरून ते समाजसेवेसाठी कार्यरत आहेत.

प्रशांत यांचे बालपण इथे कोल्हापुरातच गेले. 'पूर्वी आमची पारिजात लॉज, साधना गेस्ट हाऊस, बादशाही हॉटेल ही रॉयल टॉकीजजवळची हॉटेल्स व लॉज होते. आज हे सर्व आम्ही विकलं. पूर्वी या हॉटेल्स व लॉजमध्ये फिल्म इंडस्ट्रीतले, विशेषत: मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले नामवंत कलाकार यायचे आणि मला वाटत तिथंच हे सगळं नाट्यकलेचं बिजरोपण तिथंच झालं असावं, माझ्यात. शाळेत असताना तेव्हा चढाओढ असायची नाटकं बसविण्यासाठी. आम्हाला आमचे कलागुण सादर करायची संधी मिळायची. त्या काळात अनेक पारितोषिके मिळाली. पण अजूनही आपण कुठेतरी कमी आहोत ही भावना कायम सलायची.'

मग व्यावसायिक रंगभूमीकडे केव्हा वळलात? असे विचारल्यावर प्रशांत सांगतात, 'कॉलेजमध्ये असताना गॅदरिंग म्हणजे पर्वणीच असायची आमच्यासाठी. मी प्रदीप गबाले यांना मी गुरू मानतो. कारण कायिक व वाचिक अभिनयाची उत्कृष्ट तालीम त्यांनी माझ्याकडून करवून घेतली आणि मी व्यावसायिक रंगभूमीकडे वळलो. १९७६ ते १९८६ या कालावधीत असंख्य मराठी, हिंदी नाटक केली. यात जास्तीत जास्त नाटकं ही सवंग विनोदाधारीत होती. या काळात पैसा, प्रसिद्धी भरपूर मिळाली. पण अजूनही अतृप्तता जाणवत होती. कारण समाजसेवा करण्याचा मानस होता.'

समाजसेवेकडे कसे वळलात या बाबत प्रशांत सांगतात, 'मी याला समाजसेवा न म्हणता सहजसेवा म्हणतो. सहज वृत्तपत्र चाळताना कसबा बावड्यातील श्रीकांत केंबळे यांच्या किडनी रोपणासाठी मदत हवी आहे असे वाचनात आले. आणि पटकन माझ्या मनात आले की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केल पाहिजे. त्याचवेळी आमचं 'मिशन मम्मी-डॅडी' हे नाटक फुल्ल फॉर्ममध्ये होते. त्याचाच प्रयोग ठरला आणि एकरकमी ३२ हजार रुपये आम्ही श्रीकांत केंबळेंना दिले. माझ्या मते हीच माझी माझ्या आयुष्यातली सहजसेवा असावी. यानंतर आम्ही 'मिशन मम्मी डॅडी'चे जवळ जवळ ३०० प्रयोग विनातिकीट केले. तिथे फक्त आम्ही मदतपेटी ठेवली. हे सर्व पैसे गरजूंसाठीच देतो. आपण हजार रुपये म्हणतो, पण त्यांच्यादृष्टीने एक हजार म्हणजे एक लाख रुपये असतात इतके आपल्या आसपास लोक गरजवंत असतात.'

नवरात्री भगिनी कर्तव्य ही संकल्पना प्रशांत यांनी राबविली. ते सांगतात, 'नवरात्री भगिनी कर्तव्य ही एक अशी संकल्पना आहे की समाजात असंख्य भगिनी गरजवंत आहेत. त्यांच्यासाठी नवरात्रीत आपण रोज एका भगिनीस हजार रुपये द्यायचे. मी फक्त सुरवात केली. देणारे अनेक आहेत. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आज १८९ दिवस झाले. रोज एका भगिनीला जे काही मिळेल ते रोजच्या रोज देत आहोत. ३६५ दिवस ३६५ कार्यक्रम हा एक उपक्रम संगीत प्रज्ञा नावाने सुरू आहे. इथे हबीब सोलापूरे व त्यांचे सहकारी कार्यक्रम रोज सादर करतात. हॉटेल झोरबा हॉल मोफत देते. साऊंड मोफत मिळतो. कलाकार तर आपलेच आहेत. बाबा आमेटेंचे चरित्र वाचल्यानंतर आपणही सहजसेवा म्हणू ही सेवा करण्याचे ठरवले. त्यांनी अगदी हिमालयाएवढं काम करुन ठेवलय आणि आता त्यांची तिसरी पिढीही यातच आहे. त्या कुटुंबाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत असे मला वाटतं. तुम्ही चांगलं केलत, तर चांगलच होणार. वाईट केलत तर वाईट होणार. यासाठी वागणं चांगलं पाहिजे. आपण वाईट वागायचं आणि नंतर दैवाला दोष द्यायचा हे पूर्णत: चुकीचं आहे' असे प्रशांत सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपत्कालीन फंड उभाणार

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाप्रलंयकारी आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी व्यापारी, उद्योजकांना सरकारने प्रथमच मदतीचा हात दिला. उर्वरित मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाईल. संकटकाळात मदत कधी मिळेल, याची शाश्वती नाही. मात्र येथून पुढे देशात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास व्यापारी-उद्योजकांना मदत करण्यासाठी व्यापारी समाज फंड तयार करून मदत करू. त्यासाठी एलबीटी हटाव आंदोलनाप्रमाणे सर्वांनी एकजूट व्हावी,' असे आवाहन चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे चेअरमन मोहन गुरनानी यांनी केले.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने पूरग्रस्त व्यापरी, उद्योजक यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शिवाजीराव देसाई सभागृहात बैठक पार पडली. गुरनानी म्हणाले, 'सर्वात जास्त कर भारणाऱ्या व्यापारी, उद्योजकांना मदत करण्यास सरकार नेहमीच हात आखडता घेते. युरोपियन राष्ट्रांप्रमाणे ज्यादा कर भरणाऱ्यांना विशेष सवलत दिली पाहिजे. शेतकऱ्यांनंतर सर्वात मोठी वोट बँक असलेल्या व्यापारी, उद्योजकांनी सवलतीसाठी आपला आवाज बुलंद केला पाहिजे. पूरग्रस्त व्यापाऱ्यांना प्रथमच सरकारने ५० हजारांची मदत देऊन किमान सरकारी दप्तरी नोंद केली. यापुढेही मदत मिळण्यासाठी सामूदायिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.'

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले, 'कोणत्याही आपत्तीनंतर व्यापारी स्वत: उभारी घेतो. पण यावेळीची परिस्थिती अत्यंत भयानक असून मोठे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी सरकारकडे कधी मदत मागितली नाही, पण नुकसान मोठे असल्याने मदतीची अपेक्षा आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करू.'

सोलापूर चेंबरचे अध्यक्ष राजू राठी म्हणाले, 'आपत्कालीन परिस्थितीमुळे खचून जायचे नाही. सरकारकडे मागणी करताना मोठ्या मागण्या करा. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे कर्जमाफी दिली त्याप्रमाणे व्यापाऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्न करूया. पुरामुळे झालेल्या नुकसानाची पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना टिवट्द्वारे माहिती द्या. मागण्या पोहोचल्यानंतर त्या मान्य होतील.'

यावेळी व्यापारी बबन महाजन, सीए अमित शहा, आर्किटेक्ट विजय पाटील, वैशाली मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविकामध्ये पूरस्थितीची माहिती देऊन सरकारकडे करावयाच्या मागण्या मांडल्या. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, संजय पाटील, प्रदीपभाई कापडिया यांच्यासह व्यापारी व उद्योजक उपस्थित होते. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. जयेश ओसवाल यांनी आभार मानले.

व्यापारी, उद्योजकांच्या मागण्या

पूर्ण नुकसान भरपाई द्यावी

स्टार्टअपसाठी एक लाखाची मदत करावी

तीन दिवस पाणी असलेल्या ठिकाणी त्वरीत २५ हजार द्यावेत

१५ दिवसांचा स्थिर आकार माफ करावा

महिला उद्योजकांचे पूर्ण कर्ज माफ करा

ऑगस्टपासून सहा महिने कर्जाला व्याज माफ

उद्योगांना मिळणारे सरकारी अनुदान त्वरित द्यावे

वीजदर वाढ रद्द करावी

सरकारने व्यापाऱ्यांसाठी फंड तयार करावा

जीएसटीसाठी सहा महिन्यांची मूदत द्यावी

आणि सभागृह भावूक बनले

आंबेवाडी येथील प्रशांत पवार या युवकाने अनेक ठिकाणी नोकरी केल्यानंतर स्वत:चे वॉलपुट्टी व रंगविक्रीचे दुकान सुरू केले. तसेच पत्नीसाठी छोटे कोल्ड्रिंक दुकान सुरू केले. मात्र महापुराने दुकानातील संपूर्ण साहित्य, दोन मोठे फ्रीज, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, फर्निचरचे सुमारे १३ लाखांचे नुकसान झाले. नुकसानाची माहिती देताना पवार यांना अक्षरश: रडू कोसळले. त्यामुळे संपूर्ण सभागृहच भावूक बनले. अनेकांनी पवार यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

खासदार, आमदारांचे दुर्लक्ष

इचलकरंजी येथील संजय वठारे यांनी व्यथा मांडताना खासदार, आमदारांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. सर्व किरकोळ दुकानदारांचे प्रचंड नुकसान झालेल्या असताना अद्याप पंचनाम्यांना सुरुवात झालेली नाही. सर्व्हेही केलेला नाही. त्यामुळे सरकार मदत कशी करणार? असा सवाल उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

$
0
0

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

म. टा. वृत्तसेवा, सातारा

ढगाळ वातावरण...यवतेश्वर घाटातील धबधबे आणि सकाळचे आल्हाददायी वातावरणात रविवारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धकांमुळे यवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे स्वागत केले. स्पर्धेवर इथिओपिया व केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व राहिले.

खुल्या गटात फिक्रू अबेरा दादी (इथिओपिया) या धावपटूने १ तास १० मिनिटे आणि ६ सेकंद इतक्या सर्वांत कमी विक्रमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. केनियाचा हिलारी किप्टू किमोसोप दुसरा तर भारतीय धावपटूंमध्ये धन्वत प्रल्हाद रामसिंग याने पहिला, भारतीय महिला गटात स्वाती गाडवे हीने पहिला क्रमांक पटकावला.

सातारा रनर्स फाउंडेशन आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला पोलिस कवायत मैदानावरून सकाळी ६.०० वाजता उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. शौर्यचक्र विजेते सुभेदार त्रिभूवन सिंग, खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सातारा रनर्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे व रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव आदींच्या उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. गिनिज बुकमध्ये या स्पर्धेची नोंद झाली आहे. पुढील काळात विविध विक्रम प्रस्थापित करीत सातारा हिल मॅरेथॉन साताऱ्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावेल, अशा शब्दात उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. खासदार उदयनराजे भोसले, सुभेदार त्रिभूवन सिंग, जिल्हा सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत, दिलीप दोशी, गणेश देशमुख, राम कदम, लेफ्टनंट कर्नल रणजित नलावडे, किसनवीर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

असा होता मार्ग

पोवई नाका, कर्मवीर पथ मार्गे शेटे चौक, कमानी हौद, राजपथावरुन राजवाडा-समर्थ मंदिरमार्गे बोगदा-प्रकृती रिसॉर्ट. परत बोगदा, अदालतवाडामार्गे शाहू चौक, रविवार पेठ पोलिस चौकी, कर्मवीर पथावरून नाक्यावर धावपटू आल्यानंतर पोलिस मैदानावर स्पर्धेची सांगता झाली. २१ किलो मीटरच्या या स्पर्धेत हजारो तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यासाठी आंतरराष्ट्रीय धावपटू शनिवारीच साताऱ्यात दाखल झाले होते. सकाळी ९.०० वाजता 'फन रन' सुरू झाली. 'मै भी सिपाही' म्हणजे डॉक्टर, पोस्टमन, वकील, रिक्षाचालक आदी विविध व्यवसायिकांचा सन्मान करणारी थीम राबविण्यात आली होती. या वेळी चिमुरड्यांचा उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेत मोठ्यांबरोबरच शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. सुमारे ८ हजार ५०० स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

हिल मॅरेथॉनची क्षणचित्रे

बारा तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात

नऊवारी साडी नेसून धावणाऱ्या महिलेने वेधून घेतले लक्ष

स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी फुटांफुटांवर कार्यकर्ते व पोलिस उभे होते

तरुण मंडळे, गणेश मंडळांनी स्पर्धेकांचा उत्साह वाढविला

हलगी, तुतारीचा आव्वाज, समुह नृत्ये ठरले विशेष आकर्षण

सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा सविस्तर निकाल

खुला गट : पहिला क्रमांक : फिक्रू अबेरा दादी (इथिओपिया) वेळ : १ तास १० मिनिटे ६ सेकंद. बक्षीस रक्कम : ₹ दीड लाख रुपये. दुसरा क्रमांक : हिलारी किप्टू किमोसोप (केनिया) वेळ : १ तास ११ मिनिटे ३५ सेकंद. बक्षीस रक्कम : एक लाख रुपये. तिसरा क्रमांक : फ्रेसिव अस्फाव बेकल (इथिओपिया) वेळ : १ तास ११ मिनिटे ५६ सेकंद. बक्षीस रक्कम : ७५,०००रुपये.

महिला गट : पहिला क्रमांक : मर्सी जेलीमो टू (केनिया) वेळ : १ तास २४ मिनिटे ३० सेकंद. बक्षीस रक्कम : दीड लाख. दुसरा क्रमांक :

जेनेट अॅडेक अग्टेव (इथिओपिया) १ तास २५ मिनिटे ४८ सेकंद. बक्षीस रक्कम : एक लाख. तिसरा क्रमांक : झिनेबा कासिम गेलेटो (इथिओपिया) १ तास २९ मिनिटे ३५ सेकंद. बक्षीस रक्कम : ७५,००० रुपये.

भारतीय गट : प्रथम क्रमांक : धन्वत प्रल्हाद रामसिंग वेळ : १ तास १२ मिनिटे ५३ सेकंद. बक्षीस रक्कम : पन्नास हजार. दुसरा क्रमांक :

राहुल कुमार पाल, वेळ १ तास १३ मिनिटे १९ सेंकद. बक्षीस रक्कम : तीस हजार. तिसरा क्रमांक : आदिनाथ भोसले, वेळ : १ तास १५ मिनिटे ४ सेंकद. बक्षीस रक्कम : वीस हजार रुपये.

भारतीय महिला

गट : पहिला क्रमांक : स्वाती गाडवे, वेळ १ तास २५ मिनिटे १८ सेकंद, बक्षीस रक्कम : पन्नास हजार रुपये. दुसरा क्रमांक : रेश्मा केवटे

वेळ १ तास ३२ मिनिटे २९ सेंकद. बक्षीस रक्कम : तीस हजार रुपये. तिसरा क्रमांक : आरती देशमुख, वेळ १ तास ३३ मिनिटे ४० सेकंद, बक्षीस रक्कम : वीस हजार रुपये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहवाल तीन महिन्यांनंतर

$
0
0

लोगो : महापुरानंतर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आठवड्यापूर्वी आलेल्या महापुराची कारणे शोधणे आणि भविष्यकालीन उपाययोजनांचा अहवाल तयार करण्यासाठी सरकारने नुकतीच समिती स्थापन केली आहे. याचा अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. तीन महिन्यानंतर आलेल्या अहवालाची अंमलबजावणी नव्या सरकारच्या धोरणावरच अवलंबून राहणार आहे.

महापुरानंतर हजारो कोटींचे नुकसान झाले. यामुळे महापुराची कारणे कोणती असावीत, यासंबंधी उत्सूकता निर्माण झाली आहे. सन २००५ च्या महापुरानंतरही अशीच परिस्थिती होती. म्हणून तत्कालीन सरकार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त प्राधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करून पुराची कारणे आणि उपाय योजनासंबंधी अहवाल देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार समितीने २००७ मध्ये अहवाल दिला होता. त्यामध्ये धरणांतून पाणी सोडण्याचे व्यवस्थापन कसे करावे, त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे किती गरजेचे आहे, यावर भाष्य करण्यात आले होते. जुलैमध्येच धरणे पूर्ण क्षमतेने भरून घेऊ नये, असेही सूचित केले होते. हा अहवाल बासनात गुंडाळून ठेवल्यामुळे यावेळच्या महापुराने विद्ध्वसंक रूप धारण केले.

पाटबंधारे विभागाने कोयना, राधानगरी, वारणासह सर्वच धरणे जुलैअखेर पूर्ण क्षमतेने भरून घेत २००५ सालचीच चूक पुन्हा केली. अतीवृष्टी होणार असल्याची पूर्वकल्पना हवामान खात्याने देऊनही नियम डावलून अकाली धरणसाठा केला. पूरस्थिती गंभीर झाल्यानंतर धरणात पाणी साठवून पूरनियंत्रणात आणण्यात प्रशासनास अपयश आल्याचेही स्पष्ट झाले आहे. आताच्या भाजप, शिवसेना सरकारने पूर्वीच्या समितीचेच अध्यक्ष वडनेरे यांची नव्या समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. यामुळे ही समिती महापुराची नवीन कोणत्या कारणांचा शोध लावणार, याबद्दलही कुतूहल राहणार आहे.

समितीला अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांची म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. मात्र पुढील महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. अहवाल तयार होऊन सादर होण्यासाठी नव्या सरकारची स्थापना होणार आहे. नवे सरकार गांभीर्याने घेऊन समितीच्या अहवालातील उपाय योजना इतर तरतूदी अंमलबजावणी केली तरच महापुरावर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे, असे मत पर्यावरण आणि जलतज्ज्ञांतून व्यक्त होत आहे. अहवालाची अंमलबजावणी न झाल्यास समितीचे कष्टही वाया जाणार आहेत.

अलमट्टीबाबत

सरकार साशंक

कर्नाटकातील अलमट्टी धरणांतील पाणी फुगवट्यामुळे महापूर येतो, याबाबत सरकार साशंक आहे. म्हणून यासंबंधी जलशास्त्रीय अभ्यास करून स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्याचा आदेश समितीला देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणरायासाठी बाजारपेठ सज्ज

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवघा आठ दिवसांवर आलेला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळांबरोबर घरोघरी लगबग सुरू झाली आहे. घरगुती गणपतीची आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी रविवारी भाविकांनी गर्दी केली होती. महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाइन, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी येथे दिवसभर साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. अनेक सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असला, तरी विघ्नहर्त्याचे स्वागत करण्यासाठी घरोघरी उत्साहाचे वातावरण तयार होऊ लागले आहे.

महापुराच्या दणक्यानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. पूरग्रस्तही आपल्या घरी परतले आहेत. उत्साहावर अद्यापही पुराचे संकट असले तरी समाजाने त्यांच्या दु:खावर मदत रूपाने फुंकर घातली आहे. कितीही मदत मिळाली तरी त्यांचे नुकसान भरून निघणार नसले, तरी या नैसर्गिक आपत्तीमधून तेही हळूहळू सावरू लागले आहेत. महापुराच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी केली आहे. मात्र, घरगुती गणपती बाप्पांच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

घरगुती सजावटीसाठी मखर, सिंहासन, तयार पाना-फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या माळांनी बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. बाजारपेठेतील हे साहित्य लोकांना आकर्षित करत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेत साहित्यांची रेलचेल दिसू लागली आहे. गौराई, शंकराच्या मुखवट्यांचे स्टॉल कुंभार गल्लीत दिसू लागले आहेत. सोमवारी (२ सप्टेंबर) गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यापूर्वी रविवारी हरितालिका असल्याने खरेदीसाठी एकच सुटीचा रविवार असल्याने बाजारपेठेत भाविकांनी गर्दी केली होती.

गेल्या वर्षभरापासून थर्माकोल वापरावर बंदी असल्याने कापडी व प्लायवूडपासून बनविलेल्या सजावटीच्या साहित्यांना ग्राहक पसंती देत आहेत. प्लायवूडपासून बनविलेले मखर ५०० रुपयांपासून पाच हजारांपर्यंत विक्री केली जात आहे. तयार पाना-फुलांच्या हार व मोत्यांच्या माळांना चांगली मागणी बाजरपेठेत दिसत होती. आकर्षित विद्युत रोषणाईसाठी तयार माळाही बाजारपेठेचा उत्साह वाढवत आहेत.

०००

कार्यकर्त्यांची रात्र जागू लागली

महापुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवात होणारा खर्च पूरग्रस्तांना दिला जाणार असली, तरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यासाठी लागणारा मंडप उभारणीसाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. पूरग्रस्तांना मदत करून उसंत घेतलेले कार्यकर्ते नव्या जोमाने रात्ररात्रभर मंडप उभारणीसाठी काम करत आहेत.

०००

बाहेरगावच्या मूर्ती जिल्ह्यात दाखल

महापुराच्या पाण्यामुळे अनेक गणेशमूर्तींचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात मूर्तींचा तुटवडा जाणवण्याची शक्यताच आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई येथील तयार मूर्तींचे स्टॉल विविध ठिकाणी लागले आहेत, तर कुंभारवाड्यांत मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ला स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ज्याचा माल त्याचा हमाल, ज्याचा माल त्याचा विमा'च्या अंमलबजावणीस दोन महिने स्थगिती दिल्याचे कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे रविवारी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाल्याने अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले.

ट्रक व्यावसायिकांची बाजू मांडताना जाधव म्हणाले, 'सरकारच्या ६ सप्टेंबर २०१६ च्या आदेशात ट्रकधारकांनी मालाची भरणी-उतरणी देण्याचा उल्लेख नाही. ट्रकमध्ये साखर भरून देण्याची जबाबदारी साखर कारखान्यांची आहे. त्यांचे कामगार, हमालांची आहे. त्यांनी जबाबदारी पूर्ण करावी. कराड येथील मालट्रक वाहतूकदारांनी मालाच्या हमालीसह वाहतूक भाडे ट्रक व्यावसायिकांना परवडत नाही. त्यामुळे ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. व्यवसाय परवडण्यासाठी ट्रकधारक 'ज्याचा माल त्याचा हमाल, ज्याचा माल त्याचा विमा'ची अंमलबजावणी करणार आहेत. यापुढे मालाची वाहतूक भाड्याशिवाय हमालीची रक्कम जादाची घेण्यात येईल. यासंबंधीची जागृती असोसिएशनतर्फे करण्यात येईल.'

सांगली जिल्हा मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलाटे यांनी माल भरण्याची जबाबदारी ट्रक वाहतूकदार घेणार नसल्याचे सांगितले. राजाराम साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी. जी. मेढे यांनीही ट्रक व्यावसायिकांच्या मागणीला दुजोरा दिला. असोसिएशनच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले.

बैठकीस कोल्हापूर, सांगली, कराड साखर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय शहा, धान्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप शहा, नयन प्रसादे, वैभव सावर्डेकर, लॉरी असोसिएशनचे उपाध्यक्ष भाऊ घोगळे, दिनकर पाटील यांच्यासह जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images