Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लेखिका प्रा. आशा आपराद यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ लेखिका व महिला दक्षता समिती चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. डॉ. आशा दस्तगीर आपराद (वय ६७) यांचे शुक्रवारी पहाटे फुलेवाडी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर डायलेसिसचे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

महापालिकेच्या केएमसी कॉलेजमधून हिंदी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून प्रा. आपराद निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी कोल्हापुरातील महिलांच्या विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या महिला दक्षता समिती या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. तसेच मुस्लिम सत्यशोधक चळवळीत हुसेन जमादार यांच्यासोबत त्यांनी सामाजिक कार्य केले.

विवाहानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणासाठी होणाऱ्या विरोधाचा सामना करत त्यांनी उच्चशिक्षण घेतले. त्यांच्या आयुष्यातील संघर्षकथा असलेल्या 'भोगले जे दु:ख त्याला' या आत्मकथन पुस्तकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मुस्लिम समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीच्या वाट्याला येणारे आयुष्य, त्यांना शिक्षणासाठी, स्वत:ची मते मांडण्यासाठी करावा लागणारा संघर्ष डॉ. आपराद यांनी या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाचे 'दर्द जो सहा मैने' असे हिंदी भाषांतरही झाले आहे. डॉ. आपराद यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट मराठी वाड:मय पुरस्कार, महाराष्ट्र सेवा संघ, भैरूरतन दमानी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात साडेपाच हजार पूरग्रस्त आजारी

$
0
0

साताऱ्यात साडेपाच हजार पूरग्रस्त आजारी

५० पूरग्रस्त गावांत अतिसार, ताप व इतर आजारांचे रुग्ण

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्ह्यात पन्नास पूरग्रस्त गावांचा सर्व्हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ५७ पथकांमार्फत करण्यात आला. यामध्ये अतिसार, ताप व इतर आजारांचे सुमारे ५६०० रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने उद्भवणाऱ्या आजारांचे नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभागाने कराडमध्ये २२, पाटणमध्ये १४, साताऱ्यात ८, जावलीत ३ व वाई तालुक्यातील ३, अशा एकूण ५० गावांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. कराड तालुक्यात २६, पाटण तालुक्यात १७, सातारा तालुक्यात ८, जावली व वाई तालुक्यात प्रत्येकी ३ पथके सध्या कार्यरत आहेत. २२ हजार १८१ घरांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी भेट दिली. अतिसाराचे २८०, तापाचे ६२०, इतर आजाराचे ४७००, असे एकूण ५६०० रूग्ण आढळून आले आहेत.

पूरग्रस्त भागात ६६ पाण्याचे स्त्रोत होते. पाण्याच्या ओटी टेस्ट घेण्यात आल्या, त्यामध्ये २७९२ पॉझिटिव्ह व ४५ ओटी टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. त्या ठिकाणी पुन्हा शुद्धिकरण करण्यात आले. जिल्हास्तरावर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे श्वानदंश, सर्पदंश लसीचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी दिली आहे.

पूरग्रस्त भागात जलजन्य व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना करण्यात आल्या. जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे. पूरग्रस्त भागात आढळून आलेल्या रुग्णांवर जागीच उपचार करण्यात आले. स्थलांतरीत करण्यात आलेल्या लोकांना आरोग्य पथकामार्फत आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या मदतीने सार्वजनिक स्वच्छता करण्यात आली. गरजेनुसार धुरळणी व फवारणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅँक दरोडाप्रकरणी दोघांना सक्तमजुरी

$
0
0

बॅँक दरोडाप्रकरणी

दोघांना सक्तमजुरी

कराड :

कराड दत्त चौकातील बँक ऑफ बडोदाची शाखा फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा दरोडेखोरांना कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. एस. ए. ए. आर. औटी यांनी दोन वेगवेगळया कलमांखाली दोन वर्षे व तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सदर दोन्ही आरोपींनी या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. रायचंद फत्तु वसुनिया (रा. मंगरडा, ता. कुकशी, जि. धार, मध्यप्रदेश), नवल जवान सिंग भुरया (रा. नाहवेल, ता. कुकशी, जि. धार, मध्यप्रदेश) अशी शिक्षा झालेल्यांची आहेत. कराड येथील भरवस्तीतील दत्त चौकामध्ये १७ सप्टेंबर २०१६ रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास वरील दोन दरोडेखोर तेथील पाटील हेरिटेज या बिल्डिंगमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होते. रात्र गस्तीवरील पोलिसांनी बँक ऑफ बडोदाची शाखा फोडण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना ताब्यात घेतले होते. दोन्ही दरोडेखोरांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

...............

अमृत महोत्सवानिमित्त बाजार

समितीत शेतकरी मेळावा

म. टा. वृत्तसेवा, कराड

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीत आज, शनिवारी अमृतमहोत्सवी शेतकरी मेळावा आणि पहिले लोकनियुक्त सभापती शामराव अण्णा पाटील-उंडाळकर त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता बाजार समिती आवारात होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव भूषविणार आहेत. कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व जि. प. सदस्य अॅड. उदयसिंह पाटील आदी उपस्थित असणार आहेत.

.........

मदत निधी सुपूर्द

कराड :

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा, या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातून वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे मदत स्वरूपात आलेले धनादेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून सुपूर्द करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विफा’च्या उपाध्यक्षपदी मालोजीराजे छत्रपती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) उपाध्यक्षपदी सलग चौथ्यांदा मालोजीराजे छत्रपती यांची निवड झाली. तर कार्यकारिणी समितीवर माणिक मंडलिक यांची निवड झाली.

नागपूर येथे झालेल्या 'विफा'च्या ७० व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची फेरिनवड करण्यात आली. तसेच पाच उपाध्यक्ष, तीन सहसचिव, एक कोषाध्यक्ष आणि १३ कार्यकारिणी सदस्यांची निवड झाली. या सभेसाठी कोल्हापूरचे प्रतिनिधी म्हणून मालोजीराजे, माणिक मंडलिक आणि राजेंद्र दळवी उपस्थित होते. मालोजीराजे, आमदार विश्वजीत कदम यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली.

निवड प्रक्रियेनंतर झालेल्या अध्यक्षीय भाषणात पटेल यांनी कोल्हापूरचे कौतुक केले. राज्यात स्वत:चे मैदान असणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा असून याठिकाणी फुटबॉल खेळाला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाला आहे. फुटबॉलच्या विकासाबद्दल केएसएकडून सातत्याने नवीन प्रयोग राबवले जात असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या निवडीबद्दल केएसएचे पेट्रन चीफ श्रीमंत शाहू छत्रपती यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मालोजीराजे हे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष असून माणिक मंडलिक हे सचिव आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेचा बिगुल १३ सप्टेंबरला?

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com
कोल्हापूर : विधानसभेसाठीच्या हालचालींना दक्षिण महाराष्ट्रात महापुरामुळे ब्रेक लागला होता. वीस दिवसानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे विधानसभेच्या प्रशासकीय कामांना गती आली आहे. येत्या १३ किंवा १४ सप्टेंबरलाच निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे १५ किंवा १६ ऑक्टोबरला मतदान घेण्याच्या दृष्टीने हालचाली वेगावल्या आहेत. मतमोजणी आणि दिवाळी यामध्ये केवळ आठ दिवसाचे अंतर राहणार असल्याने नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त मात्र दिवाळीनंतरच असणार आहे.

जुलैमध्ये राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना गती आली होती. युती, आघाडी करण्याच्या प्रक्रियेबरोबरच उमेदवार निश्चितीसाठी मुलाखतीही झाल्या. पण ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात महापुराने थैमान घातले. यामुळे राज्यभरातील राजकीय धुळवड थंडावली. आता पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. थांबलेले पक्षप्रवेश या आठवड्यात होणार असून, पक्षाच्या संपर्क यात्राही सुरू झाल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यालयांना प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कामाला गती आली आहे. दक्षिण महाराष्ट्र वगळता राज्याच्या इतर भागातील मतदार यादी तयार आहे. महापुरामुळे रखडलेली कोल्हापूरसह तीन जिल्ह्यांतील अंतिम मतदार यादी ३१ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात येणार आहे. कामाची ही गती पाहता १३ किंवा १४ सप्टेबरला निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याचे संकेत आहेत. अनंत चतुर्दशी १२ सप्टेंबरला आहे. ती होताच निवडणुकीचा बिगुल वाजेल. साधारणपणे १५ ऑक्टोबरला राज्यात एकाचवेळी मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये फक्त एक किंवा दोन दिवसाचा बदल होईल. त्यानंतर चार दिवसांतच मतमोजणी होईल. दिवाळी २५ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. निवडणुकीचा निकाल आणि दिवाळी यात आठ दिवसाचा कालावधी राहणार आहे. साहजिकच मंत्रिमंडळ यादी तयार करण्यास कमी वेळ मिळणार आहे. यामुळे नवीन मंत्रिमंडळ दिवाळीनंतरच अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.


२०१४ च्या निकालावेळचे बलाबल

भारतीय जनता पक्ष १२२

शिवसेना ६३

काँग्रेस ४२

राष्ट्रवादी ४१


सध्याच्या राजकीय घडामोडी

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप-सेनेत

आणखी काही आमदार सेना भाजपच्या मार्गावर

बहुजन वंचित आघाडी स्वबळावर मैदानात

मनसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार

डावी आघाडी दोन्ही काँग्रेससोबतच राहण्याची शक्यता


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधीस्थळाचे काम ऑगस्टअखेर पूर्ण करा

$
0
0

कोल्हापूर

'नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाचे काम ऑगस्टअखेर पूर्ण करा,' असे आदेश शुक्रवारी महापौर माधवी गवंडी यांनी ठेकेदारांना दिले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी (ता. २६) दुपारी तीन वाजता समाधीस्थळाची पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. समाधीस्थळाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी छत्रपती ताराराणी सभागृहात आढावा बैठक झाली. ठेकेदार व्ही. के. पाटील म्हणाले, ' संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, पार्किंग व लाईटचे काम पूर्ण झाले आहे. लॉनचे काम युद्धपातळीवर सुरू असून ३० ऑगस्टपर्यंत काम पूर्ण होईल.' तर 'समाधीस्थळाजवळील झाडांच्या फांद्या छाटाव्यात व मुख्य प्रवेशद्वाराजवळील विद्युत खांब हलवावा,' अशी सूचना माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी केली. यावेळी नगरसेवक अशोक जाधव, जय पटकारे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, उप शहर अभियंता रावसाहेब चव्हाण, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, उमेश बागुल, सहायक विद्युत अभियंता सारिका शेळके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात लवकरच एअरहब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्रात दोन ते तीन नवीन एनसीसी बटालियन स्थापन करणार असून, त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. एनसीसी छात्रसैनिकांना फ्लाईंग ट्रेनिंग देण्यासाठी कोल्हापूर एअर हब बनवण्याचा संकल्प आहे,' अशी माहिती मुंबई येथील एनसीसी महाराष्ट्र निदेशालयचे मुख्य अधिकारी मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरातील एनसीसी भवनला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, 'कोल्हापुरात बटालियन सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. बटालियनची संख्या वाढल्यास चाळीस ते पन्नास शाळांमधील छात्रसैनिकांना फायदा होईल. दोन ते तीन हजार छात्रसैनिकांना प्रशिक्षित करता येणार आहे. तसेच कोल्हापूर एव्हिएशन हब बनविण्याचा आमचा विचार आहे. तसेच सहा व्हायरस एअरक्राफ्टस येथे आम्हाला पार्क करायची आहेत. एअर हब बनवून येथे छात्रसैनिकांना फ्लाईंग ट्रेनिंग द्यायचे आहे.'

दरम्यान, नागपूर, पुणे, मुंबईला एअर विंग आहे. आर्मी व नेव्ही विंग कोल्हापुरात आहे. एअर विंगसाठी कोल्हापूर एनसीसी भवनतर्फे पाठपुरावा करण्यात येत होता. आता एअर विंग येथे सुरू होत असल्याने त्याचा फायदा छात्रसैनिकांना होईल, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतरिम ब्ल्यू लाइनसाठी पालिकेचे सरकारला पत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ना बांधकाम क्षेत्र निश्चित करण्यासाठी पाटबंधारे विभागाला महापालिकेने पत्र दिल्यानंतर १९८४, १९८९ व २००५ च्या पूरपातळ्या या क्षेत्रीय पाहणी व स्थानिक चौकशीच्या आधारावर विचारात घेण्याची सूचना केली होती. तसेच जुलै २०१९ च्या राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार त्याचआधारे अंतरिम निळी रेषा कायम करावी, अशी सूचना केली. त्यामुळे नेमकी महत्तम पूरपातळी कोणती अशी विचारणा करताना महापालिकेने १४ ऑगस्ट रोजी २०१९ मधील पूरपातळी विचारात घेवून अंतरिम ब्ल्यू लाइन निश्चित करण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे.

१९९९ मध्ये शहराची दुसरी सुधारित विकास योजना मंजूर झाली असून विकास योजना नकाशामध्ये नदीलगत ब्ल्यू लाइन निषिद्ध रेषा दर्शविण्यात आली आहे. नदीपात्रापासून ब्ल्यू लाइनपर्यंतचा भाग विकास योजनेमध्ये 'शेती विभाग' दर्शवला आहे. या क्षेत्रामध्ये कोणतीही विकास परवानगी नाही. नगररचना विभागाने आपत्कालीन परिस्थितीत पूररेषेने बाधित होणारे क्षेत्र व नियंत्रण रेषा दाखवण्याची विनंती केली होती. पाटबंधारे विभागाने तीनही पुराची स्थिती विचारात घेवून विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी महापालिकेने वैधानिक कार्यवाही पूर्ण केली व नियमावली सरकारच्या मंजुरीसाठी पाठवली. दरम्यान 'ड' वर्ग महापालिकांसाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मंजूर होऊन प्रतिबंधीत क्षेत्र व निषिद्ध क्षेत्रामध्ये बांधकाम नियमामध्ये तरतूद करण्यात आली. पाटबंधारे विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही त्याचा अंतर्भाव असल्याने त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे कोठेही उल्लंघन झालेले नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान,महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिाकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, सहायक संचालक नगररचना यांच्यासोबत बैठक घेवून ब्ल्यू लाइन लवकरात लवकर निश्चित करण्याबाबत प्रयत्न केले. तसेच राष्ट्रीय हरीत लवाद, मुंबई हायकोर्टमध्ये दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी होवून अंतिम पूररेषा आखणी होईपर्यंत अंतरिम ब्ल्यू लाइनची पूररेषा आखणी करण्यात यावी. त्यासाठी महापालिकेने १४ ऑगस्ट रोजी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. तसेच अंतरिम ब्ल्यू लाइन निश्चित होऊपर्यंत २००५ ची महत्तम पूररेषा गृहीत धरुन त्यापुढे ५० मीटरपर्यंत खबरदारीची उपाययोजना म्हणून बांधकाम परवानग्या देण्यात येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

...

चौकट

याचिका दाखल होणार

शुक्रवारी राजारामपुरी संयुक्त मंडळांची बैठक कोरगावकर हॉलमध्ये झाली. मंडळांच्या बैठकीत महापुराला जबाबदार असलेल्या अलमट्टी धरण व्यवस्थापन विरोधात सु्प्रीम कोर्टात तर शहरातील पुराला जबाबदार असलेल्या महापालिकेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'याचिका दाखल करण्यासाठी कागदपत्रे मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच याचिका दाखल करण्यात येणार आहे,' असे अॅड. बाबा इंदूलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील शांतता क्षेत्र घोषित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ध्वनी प्रदूषण नियम २००० कलम ३(५) नुसार राज्य सरकारने शहरातील नवीन शांतता क्षेत्र घोषित केले आहेत. हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, कोर्ट आदी परिसरांचा यामध्ये समावेश आहे. सण व महापुरुषांच्या जयंती दिवशी या परिसरात सूट देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी राज्य सरकारने काढले.

राज्यातील सर्वच शहरात ध्वनी प्रदूषण मोठ्याप्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुंबई हायकोर्टात डॉ. महेश बेडेकर यांनी राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. शहरातील शांतता क्षेत्र जाहीर करण्याबरोबर नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. याबाबतचा निर्णय झाल्यानंतर विविध शहरातील शांतता क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सीपीआर हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, अॅस्टर आधार नर्सिंग होम, मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जीवन नर्सिंग होम, शिवाजी विद्यापीठ, स. म. लोहिया हायस्कूल, पद्माराजे हायस्कूल, राधाबाई शिंदे इंग्लिश स्कूल, माईसाहेब बावडेकर प्राथमिक, महावीर इंग्लिश स्कूल, विमला गोयंका इंग्लिश मेडियम स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, श्रीमंत माईसाहेब बावडेकर अॅकॅडमी यासह कोर्ट इमारत परिसराचा समावेश आहे. सण व महापुरुषांच्या जयंती दिवशी शांतता क्षेत्रात सूट देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विटंबनाप्रकरणी निषेध

$
0
0

कोल्हापूर

दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या एनएसयुआय कार्यकर्त्यांचा भाजपच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत निषेध करण्यात आला. ३७० कलम रद्द केल्याने व्यथित झालेल्या एनएसयुआय कार्यकर्त्यांकडून विटंबना करण्यात आली, असा आरोप यावेळी करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे होते. पुतळ्याची विटंबना करणारा एनएसयुआयचा सचिव अक्षय लाकरा याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव,सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, संतोष भिवटे, दिलीप मेत्राणी, सुभाष रामुगडे, आर.डी.पाटील, अॅड. संपतराव पवार, भारती जोशी, किशोरी स्वामी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२००५ च्या महापुराचा अहवाल बासनात

$
0
0

Bhimgonda.Desai @timesgroup.com Tweet : bhimgondaMT कोल्हापूर : जिल्ह्यात २००५ मध्ये आलेल्या महापुराच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवला आहे. यावर्षी नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराने केलेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नवी समिती नेमली आहे. मात्र २००५ ला नेमलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींबाबत काय केले, याचे उत्तर अद्याप कुठल्याच पातळीवर मिळत नाही. २००५ च्या महापुराने शहरासह शिरोळ, हातकणंगले तालुका आणि सांगली जिल्ह्याला मोठा तडाखा बसला होता. या पुराच्या कारणांसाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने समिती नेमली. तिचा अहवाल आणि सूचवलेल्या उपाययोजना तत्कालीन आणि आताच्या सरकारनेही जाहीरच केलेल्या नाहीत. दरम्यान, यंदा पुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. चौदा वर्षांपूर्वीच्या समितीचा अहवाल जाहीर होण्यापूर्वीच पुन्हा समिती नेमल्यामुळे केवळ समिती स्थापन करायची आणि महापुराची चर्चा थांबल्यानंतर अहवाल, उपाययोजनांची अंमलबजावणी लालफितीत लटकत ठेवायची, असा सरकारचा कारभार समोर आला आहे. १९८९ पेक्षा २००५ मध्ये जिल्ह्यात महापुराची दाहकता उच्चांकी होती. त्यावेळीही महापुराचा मोठा फटका बसला होता. कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग न केल्याने पूर आला, असा त्यावेळी सार्वत्रिक सूर होता. म्हणून २००५ चा पूर नेमक्या कोणत्या कारणांमुळे आला, भविष्यात तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने समिती स्थापना केली होती. त्या समितीचा अहवालच दाबून ठेवला आहे. आता चौदा वर्षानंतर महापूर आला. तरीही पाटबंधारे, जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींना त्या अहवालाची आठवण झाली नाही. त्या अहवालातील उपाययोजना राबवल्या असत्या तर आताच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता कमी झाली असती, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता भाजप सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे आहेत. जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, केंद्रीय जल आयोगाचे नित्यानंद रॉय, 'निरी'चे संचालक, आयआयटी मुंबईचे संचालक, एमआरसॅकचे संचालक, मुंबई भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक, पुणे आयआयटीएम संचालक, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, लाभ क्षेत्र विकास सचिव आदींचा समितीत समावेश आहे. ही समिती पूर येण्याची कारणे, नुकसान, भविष्यातील उपाययोजना, पावसाचा अंदाज, पायाभूत सुविधांचा अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करणार आहे. या समितीच्या अहवालातील उपाययोजनांची अंमलबजावणी तरी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात आणीबाणीपेक्षा वाईट स्थिती: सुप्रिया सुळे

$
0
0

सोलापूर : जम्मू-काश्मीरमध्ये बदल करायचे असतील तर जरूर करा, तो अधिकार सरकार म्हणून तुम्हाला आहे, मात्र हे सर्वांना विश्वासात घेऊन व्हायला हवं. कुणाला अटक करून, डांबून ठेवून नव्हे, असे सांगत भाजप सरकारमुळे देशात अघोषित आणीबाणीपेक्षासुद्धा वाईट स्थिती निर्माण झाली आहे व भाजप सरकार हुकूमशाहीप्रमाणे वागत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.

जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. नागरिक भीतीच्या आणि चिंतेच्या सावटाखाली आहेत. मागील आठवडाभरापासून फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे अधिकच चिंता वाढली आहे, असे सुप्रिया म्हणाल्या.

संवाद यात्रेच्या निमित्ताने खासदार सुळे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. राज्यात ओला आणि कोरडा दुष्काळ असताना राज्यातील भाजप सरकार मात्र पक्षप्रवेशाचे सोहळे करत असल्याचा टोलाही सुळे यांनी लगावला.

ईडी आणि सीबीआय आमचे सरकार असताना माहितीसुद्धा नव्हते. मात्र, या सरकारमध्ये नवीन आलेली ईडी आणि सीबीआय ही संस्कृती देशासाठी घातक आहे, असे नमूद करत या दोन्ही संस्था दबावाखाली काम करत आहेत. भाजप सरकार या दोन्हींचा गैरवापर करत आहे, असा आरोप खासदार सुळे यांनी केला. ईडी, सीबीआय तसेच कारखान्यावरील व बँकेतील कर्जाच्या भीतीतून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील नेते भाजप आणि शिवसेनेत सामील होत आहेत. परंतु, पक्ष सोडणाऱ्या एकाही नेत्याने राष्ट्रवादीवर टीका केली नाही. यावरून दबावाचे राजकारण स्पष्टच आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पक्ष सोडून जाणारे पुन्हा परतणार असतील तर आता त्यांना रांगेत वाट पाहावी लागणार असल्याचे सांगत निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

राज ठाकरेंवर सूडबुद्धीने कारवाई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी केवळ सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असा आरोप सुळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी राज यांची चौकशी झाली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असे म्हटले होते. त्यावरही सुळे यांनी भाष्य केले. संकटकालीन परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून दोन बंधू एकमेकांना साथ देतात, हे संस्कार त्यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवलेत, असे सुप्रिया म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनं ४० हजारांवर जाणार? खरेदी थंडावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जगभरात सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. परदेशी बँकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याने सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली. शनिवारी सोन्याचा दर प्रतितोळा ३९ हजार ६५५ रुपयांवर पोहोचला. लवकरच सोने चाळीस हजारांवर जाण्याची शक्यता असल्याने सराफ व्यवसायात खरेदी थंडावली आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा दर ३२ हजार ५०० रुपये होता. सध्या हा दर ३९ हजार ६५५ रुपये आहे. वर्षभरात दरात सात हजार १५५ रुपयांची वाढ झाली. ही वाढ विक्रमी असल्याने सराफ व्यवसायात कमालीची शांतता आहे. भविष्यात आणखी दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने दागिने मोडण्यासही ग्राहक येत नाहीत. मंदी, महापुराचा फटका आणि त्यातच सोने दरात रोज वाढ होत असल्याने कोल्हापुरातील सराफ व्यवसायाची ७० ते ८० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे. या व्यवसायात शहरात सहा महिन्यांपूर्वी रोज सरासरी पाच कोटींची उलाढाल सुरू होती. ऑगस्ट महिन्यात ही उलाढाल एक कोटीपर्यंत खाली आली.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. सोन्याची आयात डॉलरमध्ये होत असल्याने जास्त पैसे मोजावे लागतात. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणामही सोने दरावर होत आहे. जागतिक बाजार अस्थिर झाल्याने बँका धास्तावल्या आहेत. भविष्यातील धोका ओळखून जागतिक बँकांनी सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. मागणीत वाढ झाल्याने दरात वाढ होत आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वीच सोन्याच्या आयात शुल्कात तोळ्याला अडीच टक्क्यांची वाढ करून ते साडेबारा टक्के केले. शिवाय तीन टक्के जीएसटी आहेच. यामुळे सोने दरात मोठी वाढ झाली. जागतिक बाजारात सोन्याचा सध्याचा दर ३४ हजार रुपये आहे. मात्र विविध करांपोटी ग्राहकांना पाच ते साडेपाच हजार रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत.

कोल्हापुरात सुमारे ५०० सराफी पेढ्या आहेत. कारागीर, अटणी असे अनेक पूरक व्यवसाय सराफी पेढ्यांवर अवलंबून असतात. खरेदी घटल्याने पूरक व्यवसायही अडचणीत आले आहेत. सोन्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने सराफ व्यवसायावर वितरित परिणाम होत आहे. येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सराफ व्यावसायिकांना अनेक क्लृप्त्या लढवाव्या लागणार आहेत.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी नियोजनाने महापुरातून सुटका शक्य

$
0
0

मालिका भाग तीन

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : भविष्यात विध्वसंक महापुरातून सुटकेसाठी केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबरपर्यंत सर्व धरणे शंभर टक्के भरून घेण्याची गरज आता ठळक झाली आहे. त्यासाठी पावसाळ्यात पाणी साठवणे आणि उन्हाळ्यात पाणी वापराच्या नियोजनासाठी राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकाच व्यासपीठावर यावे, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे खासगीत म्हणणे आहे. याचा लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स रिव्हर्स अँड पीपल (एसएएनडीआरपी) संस्थेने अतिवृष्टी आणि धरणांच्या पाणी व्यवस्थापनात समन्वय नसल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुरात वाढ झाल्याची ताशेरे ओढले आहेत. अतिवृष्टीने महापूर आल्यास पाऊस कमी झाल्यानंतर पाणी गतीने ओसरते. मात्र यावेळी पंचगंगा, कृष्णा नद्याबाबतीत तसे चित्र दिसलेले नाही. उपनद्यांचा महापूर अनेक दिवस राहिला. सर्व धरणांतील मोठ्या विसर्गांचा हा परिणाम दिसून आला. पूरस्थिती गंभीर असताना धरणातून विसर्ग थांबवला असता तर पूर थांबला नसता. मात्र, पुराचे परिणाम कमी दिसले असते. पूरानंतर महाराष्ट्र सरकार अलमट्टी धरणाकडे तर कर्नाटक सरकार कोयना धरणाकडे बोट दाखवत आहे. यावरून दोन्ही राज्यांत नियोजन आणि समन्वयाचा अभाव राहिला, असेही निरीक्षण एसएएनडीआरपीच्या अहवालात नोंदवले आहे.

अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला हे कुणीही नाकारत नाही. मात्र, धरणातील पाणी व्यवस्थापन न झाल्याने महापुराची तिव्रता वाढली, यावर अनेक पर्यावरणवादी, अभ्यासकांचे एकमत झाले आहे. अतिवृष्टीसुध्दा एकाच दिवशी झालेली नाही. आठ दिवस विभागून झाली आहे. त्यामुळे केवळ अतिवृष्टीच महापुराला कारणीभूत आहे, असे म्हणणे म्हणजे फक्त युक्तिवाद ठरणार आहे. सरकारलाही उशिरा का असेना, नियोजनातील त्रुटी निदर्शनास आल्या असाव्यात. म्हणूनच महापूर नेमका कोणत्या कारणांनी आला?, भविष्यात महापूर येऊ नये यासाठीच्या उपाययोजना काय असाव्यात, याच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना केली आहे. समितीचा अहवाल बाहेर येण्याआधीच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. म्हणून या समितीच्या अहवालाची प्रत्यक्षात अंमलबजावणी नव्याने येणारे सरकार करणार की २००५च्या अहवालाप्रमाणे नवा अहवालही लालफितीच राहणार हे पाहण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

धरणातील पाणी म्हणजे दुधारी तलवार

पुढे पाऊस होणार नाही, म्हणून जून, जुलैच्या पावसातच धरणांमध्ये पाणी अडवले जाते. आणि नंतर अतिवृष्टी झाल्यास सर्वच नद्यांमध्ये विसर्ग वाढविण्यात येतो. त्याचा महापुरालाचा हातभार लागतो. याउलट सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर, धरण न भरल्यास उन्हाळ्यात पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची मागणी कशी पूर्ण करायची असा प्रश्न उभा राहतो. उन्हाळ्यातील पाणी टंचाईवेळी आणि वेळेआधीच पाणी अडवून साठा केल्यास महापूर आल्यास जनतेत रोष निर्माण होतो. म्हणून धरणातील पाणीसाठा म्हणजे दुधारी तलवार असल्याचेही या महापुराने दाखवून दिले आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर महापुराची चाहूल लागली होती. म्हणूनच २७ जुलैला कोल्हापूर, सांगली जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन अलमट्टीमधून पाणी सोडण्याची विनंती केली. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने महापूर आला. प्रशासनाने धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन केले नाही. पुराचा महापूर होऊन त्याने रौद्र रुप धारण केले. यातून धडा घेऊन भविष्यात महापूर येऊ नये यासाठी उन्हाळ्यात धरणातून पाणी सोडण्याचे आणि पावसाळ्यात पाणी साठवण्याचे नियोजन झाले पाहिजे.

- उल्हास पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळ चार रुपयांनी महागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्रावण आणि भाद्रपद या सणासुदीच्या महिन्यांत तूरडाळ प्रतिकिलो चार रुपयाने महागली आहे. सूर्यफूल आणि सरकी तेलाच्या दरातही वाढ झाली असल्याने स्वयंपाकघरातील फोडणीला महागाईचा तडका बसला आहे.

महापूर ओसरल्यानंतर बाजारपेठ सावरू लागली असून किराणा मार्केटला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पण धान्य, कडधान्यांच्या दरात वाढ होऊ लागली आहे. तूरडाळीचा दरात चार रुपयांनी वाढ झाल्याने प्रतिकिलो ९६ रुपयांनी विक्री सुरू आहे. सणासुदीच्या काळात गव्हाचा वापर जास्त असल्याने ग्राहकांकडून मागणी वाढल्याचे दिसते. गव्हाच्या दरात क्वालिटीनुसार प्रतिकिलो दोन रुपये वाढ आहे. शेंगदाण्याचा दर १२० रुपयांवर स्थिर असून बेळगावी मसूरचा दर प्रतिकिलो १४० रुपये कायम आहे. गेल्या आठवड्यात मसुरच्या दरात २० रुपयांची दरवाढ झाली आहे. मसूरचा बेळगाव भागाला पूराचा फटका बसल्याने मसूरचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दरवाढ झाल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.

खाद्यतेलाच्या दरातही वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी तर सूर्यफूल तेलाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : १२०

मैदा : ३४

आटा : ३४

रवा : ३४

गूळ : ५०

साबुदाणा : ८८

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ९६,

मूगडाळ :, ९२

उडीद डाळ : ६८

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६४

मसूर : ७० ते १४०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६

काळा वाटाणा : ६८

मूग ८८

मटकी : १२०

छोले : ९० ते १००

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : ३२ ते ३६

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : ३२

नाचणी : ३६

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १३०

सरकी तेल : ९०

खोबरेल : २४०

सूर्यफूल : ९५ ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १६०

जिरे : २८०

खसखस : १२००

खोबरे : १६०

वेलदोडे : ६०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गगनबावड्यात सलग दोन दिवस अतिवृष्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरासह अन्य तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी गगनबावडा तालुक्यात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाली आहे. गुरुवारी ७१ तर शुक्रवारी ६८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून कर्नाटकातील अलमट्टी धरणातून १७ हजार ४९१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात आजअखेर २१८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

महापुराच्या विळख्यातून जिल्ह्याची सुटका झाल्यानंतर गेले आठ दिवस कडक ऊन आहे. अधूनमधून श्रावणातली रिमझिम सुरू असल्याने उन्हाळा आणि पावसाचा एकत्र अनुभव येत आहे. शिरोळ तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी गगनबावडा तालुक्यासह अन्य ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. सध्या पंचगंगा नदीवरील इचलकरंजी येथील एकमेव बंधारा पाण्याखाली आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असून सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात १०१.४७ टीएमसी, अलमट्टी धरणात १२३ टीएमसी पाणीसाठी आहे.

तालुकावर पाऊस

तालुका मि.मी

हातकणंगले १.२५

शिरोळ ०.००

पन्हाळा १.८६

शाहूवाडी १३.८३

राधानगरी १०.३३

गगनबावडा ६८.००

करवीर ४.००

कागल १.८६

गडहिंग्लज ३.५७

भुदरगड ९.६०

आजरा ६.००

चंदगड १०.६७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन ओळखपत्रासाठी ११४१ पूरग्रस्तांचे अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरातील कामे, शेतीचे पंचनामे आदी कामात व्यस्त असल्याने पूरग्रस्त भागातील मतदारांनी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या नवीन ओळखपत्र मोहिमकडे मतदारांनी पाठ फिरवली. नवीन ओळखपत्रासाठी जिल्ह्यातील ११४१ पूरग्रस्तांनी आज झालेल्या मोहिमेत अर्ज भरले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३३९ अर्ज आले. तर पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यातील अवघ्या दोन मतदारांनी अर्ज भरले. निवडणूक ओळखपत्रे नव्याने देण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील सुमारे ३७५ पूरबाधित गावांमधील जवळपास ४०० मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात आली.

महापुरामुळे अनेक घरी जमीनदोस्त झाली तर अनेक घरांत पाणी शिरल्याने कागदपत्रे भिजली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना नव्याने ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम आज आयोजित केली होती. सकाळी दहा ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रात बीएलओ उपस्थित होते. जिल्ह्यातील ११४१ मतदारानी नमुना क्रमांक आठचा फॉर्म भरून दिला. अद्याप पूरग्रस्त भागातील नागरिक घर सावरणे, शेतीचे पंचनामे आदी कामात व्यस्त असल्याने अनेक ठिकाणी अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नसल्याचे चित्र पहायला मिळाले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी मतदान केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली.

इचलकरंजी मतदारसंघात सर्वाधिक ३३९ अर्ज प्राप्त झाले. चंदगडमध्ये ९४, राधानगरीमध्ये १२, कागलमध्ये ४०, कोल्हापूर दक्षिणमध्ये १०१, करवीरमध्ये २८३, कोल्हापूर उत्तरमध्ये ४५, शाहुवाडीमध्ये ७०, हातकणंगलेमध्ये १५५, तर शिरोळमध्ये दोन अर्जांचा समावेश आहे. शिरोळ मतदारसंघात सर्वाधिक फटका बसला असला तरी येथील नागरिकांनी या मोहिमेकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले. विशेष मोहीम झाली असली तरी प्रत्येक तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत पुढील पंधरा दिवस यासंदर्भातील अर्ज स्वीकारणले जाणार आहेत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांच्या मदतीची हंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साउंड सिस्टिमचा दणदणाट, थिरकणारी तरुणाई, विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा दरवर्षीच्या वातावरणाला फाटा देत शनिवारी अत्यंत साधेपणाने दहीहंडी साजरी करण्यात आली. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे शहरातील अनेक मंडळांनी दहीहंडी साजरी न करता पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. महाद्वार रोडवर न्यू गुजरी मित्र मंडळाने पूरग्रस्तांना रोख रकमेसह अन्य मदत केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम हटाव, देश बचावचा नारा दिला. बक्षिसाची रक्कम कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंडाकडे सूपुर्द केली.

मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी महापुराच्या पाण्याने दैना उडवली. आठ ते दहा दिवसांनंतर पुराचा विळखा सैल झाला. आता पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला. पुराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी दहीहंडीसह सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्धार केला. उत्सवाला येणारा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार अनेक मंडळांनी दहीहंडीचा उत्सव साजरा न करता पूरग्रस्तांना मदत केली. न्यू गुजरी मित्र मंडळाने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते साधेपणाने दहीहंडी फोडली. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात मोलाची कामगिरी केल्याबद्दल आयुक्तांच्या हस्ते संजय गावडे, कल्लाप्पा गेरडे आणि आरडी ग्रुपला ११ हजार रुपये बक्षीस देवून सत्कार केला. मंडळाच्यावतीने आपत्कालीन स्थितीत मदत करण्यासाठी व्हाइट आर्मीला सुमारे साडेसात लाखांची यांत्रिक बोट देण्याची घोषणा केली.

अभिनेत्री मंजुश्री खेत्री, स्वामिनी तोडकर, सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरसेवक ईश्वर परमार, जयेश ओसवल, माजी नगरसेविका माधुरी नकाते यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक किरण नकाते यांनी प्रास्ताविक केले. निवेदक निनाद काळे व राजू मकोटे यांनी सूत्रसंचालन केले.

मनसेचा 'ईव्हीएम हटाव'चा नारा

आझाद गल्ली चौकात मनसेने 'ईव्हीएम हटाव, देश बचाव'चा नारा देत प्रतिकात्मक दहीहंडी फोडली. कार्यकर्त्यांनी ईव्हीएमविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते बाळकृष्ण मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर दहीहंडीसाठी असणारी २१ हजारांचे बक्षीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देण्यासाठी आयुक्तांकडे देण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार, संजय करजगार, प्रताप पाटील, तानाजी पाटील, राजन हुल्लोळी, आनंदराव जाधव, राजू पोवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची गणराया अॅवॉर्ड स्पर्धा रद्द

$
0
0

कोल्हापूर : हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणारा गणराया अॅवॉर्ड स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. २०१८-१९ स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष आर. के. पोवार होते. शहारात आलेल्या महापुरामुळे अस्मानी संकट निर्माण झाले आहे. शहरवासियांनी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पूरग्रस्तांना मदतीचा ओघ अखंडपणे सुरू असून अनेक मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये २०१९-२०ची गणराया अॅवॉर्ड स्पर्धा रद्द करण्याबरोबरच २०१८-१९ चा बक्षिस समारंभ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यघटना, लोकशाही धोक्यातज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे प्रतिपादन

$
0
0

राज्यघटना, लोकशाही धोक्यात

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, कराड

'भारतीय जनता शहाणी आहे. सत्तेच्या अतिरेकाचे परिणाम इंदिरा गांधींना भोगावे लागले, तेच नरेंद्र मोदी यांनाही पहावे लागेल. सद्यस्थितीत देशाची राज्यघटना, त्याची मूल्ये आणि लोकशाही धोक्यात आली आहे. राज्यघटना टिकवायची असेल तर केवळ सरकार नव्हे तर विरोधी पक्ष निवडण्याची जबाबदारी जनतेला पार पाडावी लागेल,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व हमाल मापाडी महामंडळाचे राज्याध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा अमृतमहोत्सव, स्वार्गिय स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व शेतकरी मेळावा, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कण्हेरी मठाचे मठाधिपती काठसिद्धेश्‍वर महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील उंडाळकर, आमदार संग्रामसिंह थोपटे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, पंचायत समिती सभापती फरीदा इनामदार, शामराव पाटील यांच्या कन्या शारदाताई कदम, शालनताई डुबल आदी उपस्थित होते.

डॉ. आढाव म्हणाले, 'देशात विषमता, गरीब-श्रीमंत भेद वाढला आहे. मुसलमान, ख्रिश्‍चन, समाजवादी विचारसरणी हे शत्रू आहेत, असे लिखित स्वरूपात बिंबवले जात आहेत. या परिस्थितीत राज्यघटना शाबूत राहील का, राज्यघटनेची मूल्ये जपली जातील का? हा प्रश्‍न आहे. बेरोजगारी वाढत आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. रुपयाचे मूल्य घसरले आहे, अशा परिस्थितीत जगात भारताची पत वाढली आहे, असे कसे म्हणता येईल. इस्त्राईलने विज्ञानाचा आधार घेतला नसता, तर तो देश उभा राहिला नसता. हे लक्षात घेऊन आपल्याला विज्ञानाची जोपासना करावी लागेल. जनतेच्या प्रश्‍नावर बोलावे लागेल. काँग्रेसने हे केले नाही तर या निवडणुकीतही त्यांची धडगत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करावे लागेल. शेती हा एकमेव उद्योग, असा आहे, जो रोजगार उपलब्ध करू शकेल. यासाठी शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे. नवीन हमीभाव योजनेत शेतमालाच्या वाहतुकीचा समवेत झाला पाहिजे. कर्जमाफीपेक्षा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. या प्रश्‍नावर काँग्रेसप्रमाणे भाजपनेही नकारर्थी भूमिका घेतली आहे.' कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, श्रीनिवास पाटील, उदयसिंह पाटील यानी ही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी कराड बाजार समितीच्या अमृत महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बाजार समिती सभापती महादेव देसाई व उपसभापती विजयकुमार कदम यांनी स्वागत केले. प्रा. गणपतराव कणसे यांनी प्रास्ताविक केले. महादेव देसाई यांनी आभार मानले.

.............

उंडाळकर-चव्हाण गटाचे वाद मिटविणार

'माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील वाद मिटवून दोन्ही नेत्यांमध्ये एकमत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे,' अशी माहिती कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी उंडाळकर आणि चव्हाण गटाने सुरू केली आहे. उमेदवारी कोणाला मिळणार, या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले, 'उमेदवारी कोणाला द्यायची यांचा विचार चालू आहे. मात्र, दोन्ही गटात एकमत करण्याचा प्रयत्न ही चालू आहे. दोघांशी ही माझे जवळचे संबंध आहेत, त्याचा उपयोग करून त्यातून मार्ग काढला जाईल.'

...........

फोटो :

राम जगताप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images