Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जोतिबाची नगरप्रदक्षिणा उत्साहात

0
0

म.टा. वृत्तसेवा पन्हाळा

'जोतिबाच्या नावानं चांगभलं...'च्या घोषात सोमवारी तिसऱ्या श्रावण सोमवारी दख्खनचा राजा जोतिबा देवाची नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळा झाला. वीणा, टाळ, मृदंग, ढोल, तसेच भजन-कीर्तनाच्या तालात पार पडला. प्रदक्षिणेसाठी दोन लाखाच्यावर भाविकांनी हजेरी लावली.

जोतिबा डोंगराभोवतालची बारा ज्योतिर्लिंगे व अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी भाविक प्रदक्षिणेत सहभागी होतात. रविवारपासूनच नगरप्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून भाविक दाखल झाले होते. सोमवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी झाला. भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता चांगभलंचा अखंड जयघोष झाला, त्यानंतर दिंडी मुख्य मंदिरातूत दक्षिण दरवाजातून गजगतीने मार्गस्थ झाली. अग्रभागी वीणाधारी गजानन डवरी सोबत पताका लाखो भाविकांच्या लवाजम्यासह सकाळी दहा वाजता दिंडी गायमुख तलाव येथे आली. तेथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला. दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. साडेअकरा वाजता दिंडी जोतिबा धडस खळा येथे आली. येथे भिवदर्णे मिटके यांच्या वतीने चहावाटप केले. तेथून दिंडी नंदीवन, आंबावन, नागझरी, व्याघजाई तीर्थ, तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन दिंडी मुरागुळा येथे आली. मुरगुळात झिम्मा फुगडीने रंगत आणली. काहींनी भजनांचे सूर व जोतिबाची भक्तिगीते गायिली.

विश्रांतीनंतर दिंडी पुन्हा दानेवाडी मार्गे सारकाळ येथून गिरोली (ता. पन्हाळा) येथे आली. तेथील श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी व आरती झाली. येथेच एका दगडावर सातार्डेकर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. तेथे भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर पुन्हा गायमुख येथे आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनुदानासाठी रांगोळीत फेरसर्व्हे म.टा.वृत्तसेवा,हातकणंगले -रांगोळी (ता.ह

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

रांगोळी (ता. हातकणंगले) येथे अपात्र लाभार्थ्यांची नावे सानुग्रह अनुदान यादीत समावेश होऊन अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात वसुलीस सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविल्याने वसुली बंद करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी फेरसर्व्हे सुरू करण्यात आला. गावात अजूनही तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रांगोळी गावाला मोठ्या प्रमाणात महापुराचा विळखा होता. यामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहून भेट देण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींनी गाव शंभर टक्के पूरग्रस्त यादीत घेण्याचे आश्वासन दिले होते. खरोखर ज्याच्या घरात पाणी होते त्यांची नावे सानुग्रह अनुदान यादीत समावेश न होता तलाठी, मंडल अधिकारी व ग्रामसेवकांच्या खासगी उमेदवारांनी पात्र लाभार्थीच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ केला. या यादीच्या आधारे दोनशे अपात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले. याच्या तक्रारी होताच रविवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्तात पूरग्रस्तांना वितरित करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम वसूल करण्याच्या प्रशासनाच्या धोरणाला ग्रामस्थांनी विरोध केला. त्यानंतर सोमवारी चार पथकांनी फेरसर्व्हे करण्यास सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची आत्महत्या

0
0

सोलापूर :

टिक-टॉकवर प्रसिद्ध असणाऱ्या सोलापुरातील आकाश जाधव ( वय २७, राहणार पटवर्धन चाळ, रामवाडी) याने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आकाश जाधव हा कार चालक म्हणून काम करीत होता. टिक-टॉक या सोशल मीडियावर आकाश प्रसिद्ध होता. वेगवेगळ्या विषयांवर तो व्हिडिओ तयार करायचा. त्याला मोठ्या संख्येने फॉलोअर होते. मानसिक तणावातून रविवारी रात्री आकाशने आत्महत्येसाठी गोळ्या खाल्या, विषही प्रशान केले. शेवटी तो रुळावर जाऊन झोपला. काही तरुणांनी त्याला पाहून आरडाओरडा केला. तरुणांनी हटकल्यानंतर आकाश काही अंतरावर जाऊन पुन्हा रेल्वे रुळावर झोपल्याने त्यांचा मृत्यू झाला. आकाश विवाहित असून, त्याला एक मुलगा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सजावटीचे साहित्य झळकले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या धक्क्यातून शहर हळू हळू सावरु लागले असून बाजारपेठेला गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. उत्सवासाठी सजावटीचे साहित्य दुकानात झळकू लागले असून ग्राहकांकडून साहित्याची विचारणा होऊ लागली आहे.

गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर आला आहे. महापुराने शहरातील व्यापार आणि बाजारपेठेवर परिणाम झाला होता. पण गेल्या आठवड्यात शहर सावरू लागले असून बाजारपेठेत उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. सजावट साहित्य खरेदीचे हुकमी स्पॉट असलेल्या महानगरपालिकेजवळील बाजारगेट गल्लीतील स्टेशनरीच्या दुकानात साहित्य मांडण्यात आले आहे. सर्व दुकानांच्या बाहेर प्लास्टिक फुलांच्या माळा मांडल्या आहेत. तसेच फोमच्या कमानी, बॉल, फोमच्या कमानी, लाइट बॉल आले आहेत. आकर्षक गोल मण्याच्या माळांची मांडणीही दुकानदारांनी केली आहे. पानलाइन आणि बाजारगेट परिसरातील दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे.

थर्माकोलला पर्याय म्हणून फोम शीटला मागणी वाढली आहे. फोम शीट महाग असल्याने ग्राहकांकडून कार्डशीट, गोल्डन पेपर, वेलवेट पेपरची मागणी होत आहे. बाजारगेट परिसरातील सजावटीच्या दुकानात गौरीला सजवण्यासाठी इमिटेशन ज्वेलरी खरेदीसाठी महिलांची पावले वळू लागली आहेत. कुंभार गल्ली परिसरात गौरी आणि शंकरोबाचे मुखवटेही मांडण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात खरेदीला जोर वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील २८५ घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुरात बुडालेल्या २८५ घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट सोमवारी पूर्ण झाले. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार केडीएमजी आणि असोसिएशन ऑफ अर्किटेक्चर असोसिएशनच्यावतीने ऑडिट सुरु आहे. एक आठवड्यात ऑडिट पूर्ण होण्याची शक्यता आहे.

उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यवेक्षण अधिकारी एन.एम. सुतार यांच्या उपस्थितीत स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू झाले आहे. गेले तीन दिवस शुक्रवार पेठतील मस्कुती तलाव, गुणे बोळ, शंकाराचार्य मठ, पंचगंगा तालीम, उत्तरेश्वर पेठ गवत मंडई, जाऊळाचा गणेश मंदिर परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. वर्ल्ड बँकेने जे नॉर्म आखून दिले आहेत, त्यानुसार ऑडिट करण्यात आले आहे. यापुढे सिद्धार्थनगर, सुतार मळा, रमण मळा, सीता कॉलनी, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, नागाळा पार्क परिसरातील ऑडिट करण्यात येणार आहे.

सोमवारी झालेल्या सर्वेक्षणात सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध झाले होते. या सर्वेक्षणात अजय कोराणे, डीओटीचे प्रा. महेश साळुंखे, प्रशांत हडकर यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूरफवारणीचे आदेश

0
0

कोल्हापूर

शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील पूरबाधित गावात रोगराई पसरू नये व डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी धूर फवारणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबत ग्रामपंचायतींना स्पष्ट आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेकडील धूर फवारणी मशिन्सही यासाठी उपलब्ध केली आहेत. आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यात साचलेले पाणी प्रवाहित करणे, गप्पी मासे सोडणे, जळके ऑइल टाकून डास नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या टप्प्यात पूरबाधित गावातील घरोघरी धूर फवारणी होणार आहे. हे काम जलदगतीने करण्याच्या सूचना आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसाठी एकवटली शिवाजी पेठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठेतील तालीम, मंडळे दरवर्षी गणेशोत्सवात मिरवणुकीत आपले वेगळेपण शक्तीप्रदर्शनाने दाखवतात. मात्र यंदा कोल्हापुरातील पूरपरिस्थीतीचे गांभीर्य व भान ओळखून उत्सवातील शक्तिप्रदर्शन टाळून आपत्ती कोसळलेल्या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांची शक्ती बनूया, असा निर्धार करत शिवाजी पेठेतील सर्व तालीम, मंडळे पूरग्रस्तांसाठी एकवटली. सोमवारी सायंकाळी शिवाजी तरुण मंडळ येथे शिवाजी पेठेतील सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून, पूरग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्याच्या आवाहनाला एकमुखी पाठिंबा देण्यात आला. यानुसार सर्व मंडळांनी त्यांच्या मदतीचे योगदान निश्चित करावे व त्यानंतर निधीमध्ये जमा होणाऱ्या रकमेच्या विनियोगाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील काही गावांसह शहरातील वसाहतींना पुराचा फटका बसल्याने ऐन तोंडावर आलेल्या गणेशोत्सवातील डामडौल टाळून पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन करत शिवाजी पेठेतील सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी तटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष महेश जाधव, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, नाथागोळे तालीम मंडळाचे अध्यक्ष सचिन चव्हाण, फिरंगाई तरुण मंडळाचे अध्यक्ष रविकिरण इंगवले, बीजीएम स्पोर्टसचे प्रकाश सरनाईक, खंडोबा तालीम मंडळाचे विक्रम जरग यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी पेठेतील सर्व मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, यंदा वर्गणी मागण्यात येणार नाही. मिरवणुकीतही कोणताही डामडौल असणार नाही. तसेच पूररेषेच्या आत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना व यंत्रणेला शिवाजी पेठेच्या स्टाइलने विरोध केला जाईल. मित्रप्रेम तरुण मंडळाच्यावतीने शिवाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. ऐतिहासिक देखावा सादर करून इतर कोणताही खर्च न करता गणेशोत्सवातून मदत या संकल्पनेला मंडळाचे योगदान दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. खंडोबा तालीम मंडळाच्यावतीने यंदा वर्गणी जमा करण्याला फाटा देण्यात येणार असून कायमस्वरुपी वर्गणीदारांकडून येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली जाईल, असे विक्रम जरग यांनी स्पष्ट केले.

लालासाहेब गायकवाड म्हणाले, 'पूरकाळात आजारी पडलेले अनेक रुग्ण सीपीआरमध्ये दाखल झाले आहेत. तेथे चादर, सलाइनचे स्टँड, गाद्या यांचा तुटवडा होत आहे. तसेच पूरग्रस्तांना औषधे व पूरग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. त्यामुळे या प्रकारच्या मदतीसाठीही मंडळांनी पुढाकार घ्यावा. राजे संभाजी तरुण मंडळातर्फे विकास जाधव यांनी शिवाजीपेठेतर्फे मदतीचा जो आराखडा निश्चित केला जाईल, त्यासाठी पाठिंबा दिला. मंजित माने व राजेश पाटील यांनी अवचितपीर तरुण मंडळातर्फे उत्सवातील खर्चाला फाटा देत पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यन मदत करण्यामध्ये वाटा उचलू असे सांगितले.

सामाजिक उत्सव बनवण्याची संधी...

उत्सवाला सामाजिक स्वरुप यावे हाच गणेशोत्सवाचा मुख्य हेतू आहे. उत्सवाला महिना उरला असताना पावसाने थैमान घातले आणि त्यानंतर पूरपरिस्थिती गंभीर बनली. गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर अनेक घरं कोसळली आहेत. संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त खर्च करून उत्सव साजरा करण्यापेक्षा यंदा गणेशोत्सवाला सामाजिक उत्सव बनवण्याची जबाबदारी कोल्हापूरच्या मंडळांवर आहे. पूरकाळात मदत करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्यच होते. पण अनेक तरूण, स्थानिक नागरिक, संघटना, मंडळे यांनी जीवाची पर्वा न करता पूरग्रस्तांच्या बचावासाठी जी मदत केली आहे त्यातून कोल्हापूरचे दातृत्व दिसून येते. ही कोल्हापूरची खरी शक्ती आहे. उत्साह नक्कीच असू दे पण विनाकारण होणाऱ्या खर्चाला आता अर्थ मिळेल अशी संधी गणपतीनेच दिली आहे अशा शब्दांत जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केले.

नाथागोळे, शिवाजी तर्फे ५१ हजार

तर फिरंगाईतर्फे घरे

लाड चौक येथील नाथागोळे तालीम मंडळाच्यावतीने शिवाजी पेठेच्या संयुक्त मदतनिधीमध्ये ५१ हजार रुपयांचा धनादेश देत असल्याचे सचिन चव्हाण यांनी जाहीर केले. तर शिवाजी तरुण मंडळाच्यावतीनेही या निधीमध्ये ५१ हजाराची देणगी सुजित चव्हाण यांनी घोषित केले. फिरंगाई तरुण मंडळाच्यावतीने शहरातील ज्या पूरग्रस्तांची घरे पडली आहेत, त्यांना घरे बांधून देण्यात येतील तसेच डागडुजीसाठीही मदत केली जाईल, असे अध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी जाहीर केले. चंद्रकांत यादव व विकास जाधव यांनी व्यक्तिगत आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रश्मी बागल यांचाराष्ट्रवादीला रामराम

0
0

रश्मी बागल यांचा

राष्ट्रवादीला रामराम

आज शिवबंधन बांधणार

सोलापूर :

करमाळ्यात सोमवारी बागल गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम करून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बागल आज, मंगळवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस सोबत काम करीत असताना सतत डावलले जात असल्याची भावना करमाळ्यातील बागल गटाच्या समर्थकांची आहे.

बागल गटाचा निर्णय शरद पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. बागल यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या करमाळा मतदारसंघात पवार समर्थक संजय शिंदे यांची एंट्री व त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा मिळणारा पाठिंबा यामुळे बागल गट नाराज होता. संजय शिंदे व पवार काका-पुतण्यांचे संबंध चांगले असून, त्यांनी २०१४च्या विधानसभेला राष्ट्रवादी सोडून स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढविली होती. शिंदे या निवडणुकीत पराभूत झाले होते. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बागल यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता. याचे शल्य बागल गटाला आहे. शिंदे निवडणूक रिंगणात नसते, तर कदाचित निकाल वेगळाच दिसला असता. या नंतर शिंदे यांनी जिल्हा परिषद अपक्ष लढविली व भाजपचा पाठिंबा घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले. या काळात ही राष्ट्रवादीने त्यांना पाठीशी घातले. लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभेला संजय शिंदे यांनी भाजपची साथ सोडली व थेट राष्ट्रवादीतून खासदारकीचे तिकिट आणले. परंतु, त्यांची खेळी यशस्वी झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा प्रतिष्ठेची करीत येथून भाजपचा उमेदवार विजयी केला. आता पुन्हा करमाळ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी देण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे बागल गट सावध झाला असून, त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील हे मोहिते-पाटील समर्थक असल्याने ते यंदा करमाळ्यात भाजपकडून लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येथे शिवसेनेला ही प्रभावी गटाची गरज आहे. संजय शिंदे शिवसेनेत जातील, अशी चर्चा होती. तत्पूर्वीच बागल यांनी आज शिवसेना प्रवेशाची घोषणा केली.

आमदार नारायण पाटील बंडखोरी करणार?

रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे करमाळ्यातील विद्यमान शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्या गटात मात्र तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना वेगळे लढूनही शिवसेनेने करमाळ्यातून नारायण पाटील यांच्या रूपाने विजय खेचून आणला होता. धनगर समाजाचा लढवैय्या नेता, अशी प्रतिमा असलेल्या नारायण पाटील यांच्या मागे धनगर समाज करमाळा मतदारसंघात नेहमीच निर्णायक भूमिका बजावत आला आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांची मोहिते-पाटील यांच्याशी असलेली जवळीक जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांना खटकत असल्याचे पाटील यांनी बोलून दाखवले होते. मात्र, शिवसेनेने माझे तिकिट कापले तर शिवसैनिकांशी चर्चा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असा बंडखोरी करण्याचा इशारा आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैद्यकीय अधिकाऱ्याला कार्यमुक्त करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. लता सरोळे यांच्या विरोधातील वाढत्या तक्रारी विचारात घेऊन आरोग्य विभागाने त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून कार्यमुक्त करून पुन्हा आरोग्य उपसंचालक विभागाकडे पाठविण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मान्यतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठविला आहे. तर अन्य एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची अन्य आरोग्य केंद्रात कामावर नियुक्ती केली आहे.

सीईओ मित्तल यांनी, डॉ. सरोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पण त्यांनी त्याला उत्तर न देता उलट जिल्हा परिषदेला कारवाई करण्याचा अधिकार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा त्यांना नोटीस काढली आहे. त्या नोटिशीला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सेवेतून कार्यमुक्त करण्याच्या विचारात प्रशासन आहे.

दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांच्या कार्यालयावर धडक दिली. सीईओंचा आदेश न पाळणाऱ्या त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली. याप्रसंगी साळे यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त पक्षकराचे वकील करणार मोफत काम

0
0

पूरग्रस्त पक्षकराचे वकील करणार मोफत काम कराड : मागील पंधरा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कराड तालुक्यातील अनेक गावांमधे पुराचे पाणी शिरून शेतीचे, घरांचे, मिळकतींचे मोठे नुकसान झालेले आहे. अनेक लोकांचे व शेतकरी यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. अशा पूरग्रस्त लोकांचे कराड येथील तालुका व जिल्हा कोर्टातील केसस मोफत चालविण्याचा निर्णय कराड वकील संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. कराड वकील संघटनेची बैठक शनिवारी झाली. या बैठकीमधे पूरग्रस्त गावांना आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ज्या पूरग्रस्त पक्षकरांना कायदेशीर मदतीची गरज आहे. त्यानी कराड कराड वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. अमित जाधव व सचिन अ‍ॅड. प्रतीभा माने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. ........... मठाच्या विश्वस्तांविरोधात गुन्हा कराड :श्री मारुतीबुवा मठ कराडकर येथे असणाऱ्या महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. या बाबतची फिर्याद महिलेने कराड शहर पोलिसात दिली असून, या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहन नानासो चव्हाण (रा. वारूंजी, ता. कराड), अशोक शिंगण (पूर्ण नाव समजू शकले नाही. रा. शुक्रवार पेठ, कराड), मोहन पंडितराव जाधव (रा. कापील, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकार भोसलेंना पेन्शनचा धनादेश

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भोसले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पेन्शनचा धनादेश देण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात धनादेश देऊन भोसले यांचा गौरव करण्यात आला. कोल्हापूर विभागातून ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची निवड समितीने समारंभासाठी निवड केली होती.

भोसले यांनी सत्यवादी, लोकसेवक आणि नवसंदेश दैनिकामध्ये वृत्तपत्र संपादक म्हणून काम केले आहे. त्याशिवाय त्यांनी प्रासंगिक लिखाण केले आहे. यापूर्वी कोल्हापूर प्रेस क्लबने त्यांना 'जीवनगौरव' पुरस्कारांने तर मराठी चित्रपट महामंडळाने 'चित्रमूर्ती' पुरस्कारांने गौरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकल्याण संकुलमध्ये रंक्षाबंधन सोहळा उत्साहात

0
0

रक्षाबंधन सोहळा

कोल्हापूर : जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना बालकल्याण संकुल येथे रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. शहरातील विविध शाळा, संस्था, संघटना, महिला मंडळे तसेच संस्थेतील कन्या निरीक्षणगृह विभागातील मुलींनी संस्थेतील अनाथ, निराधार बांधवांना राख्या बांधून त्यांचाप्रती आपले बंधूप्रेम व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये स्काउट गाइड, विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल, कळंबा गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर पब्लिक स्कूल, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व शौर्या आर्या प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्था सहभागी होत्या. अधीक्षक पद्मजा गारे, नजीरा नदाफ, टी. एम. कदम, द्रौपदी पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारने मंजूर केलेली मानधनवाढ लागू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने आदेश लागू केले आहेत. राज्य सरकारच्या आदेशांमुळे अंगणवाडी सेविकांना ८००० रुपये, मदतनीसांना ४२५० आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ५७५० रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे गेले दोन महिन्यांपासूनचे अहकार आंदोलन मागे घेतल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी घोषित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी मन की बातमध्ये एक ऑक्टोबर २०१८ पासून अंगणवाडी सेविकांना १५००, मदतनीससाठी ७५० आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी १२५० रुपये वाढ जाहीर केली. या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी राज्यभर आंदोलन पुकारले. मानधन वाढीसाठी संघटना विविध पातळीवर लढा देत होत्या. कर्मचाऱ्यांनी दीड महिन्यापासून दैनंदिन अहवाल पाठविण्याच्या कामावर बहिष्कार टाकला होता.

राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने एक ऑक्टोबर २०१८पासून मानधन वाढीस सरकार मंजुरी देत असल्याचा आदेश काढला आहे. ऑगस्टपासून नवीन मानधन मिळेल. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ म्हणाले, 'राज्य सरकारने मानधन वाढीस मंजुरी दिली आहे. सरकारच्या निर्णयानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी आंदोलन मागे घेत असल्याचे कळविले आहे.'

सीईओ अमन मित्तल, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनीही कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

मानधन वाढ अशी

पद केंद्राचे मानधन राज्य सरकारचे मानधन एकूण

अंगणवाडी सेविका ४५०० ३५०० ८०००

मदतनीस २२५० २००० ४२५०

मिनी सेविका ३५०० २२५० ५७५०

५५३

बाल विकास सेवा प्रकल्प

९७४७५

अंगणवाडी सेविका

९७४७५

मदतनीस

१३०११

मिनी सेविका

२,०७,९६१

एकूण कर्मचारी

०००

(मूळ कॉपी)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, जिल्ह्यातील सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना केंद्र सरकारने मंजूर केलेली मानधनवाढ लागू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने आदेश लागू केले आहेत. राज्य सरकारच्या या नव्या आदेशामुळे अंगणवाडी सेविकांना ८०००, मदतनीसांना ४२५० आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ५७५० इतके मानधन मिळणार आहे. यामुळे मानधनवाढीच्या अंमलबजावणी गेले दोन महिने सुरू असलेले अहकार आंदोलन मागे घेत असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी घोषित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी मन की बातमध्ये एक ऑक्टोबर २०१८ पासून अंगणवाडी सेविकांना १५००, मदतनीससाठी ७५० आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी १२५० रुपये इतकी वाढ जाहीर केली होती. त्यानुसार मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी राज्यभर आंदोलन पुकारले होते. यामुळे दैनंदिन अहवालाचे काम ठप्प होते. मानधन वाढीसाठी संघटना वेगवेगळ्या पातळीवर लढा देत होत्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दीड महिन्यापासून रोजचा दैनंदिन अहवाल पाठविण्याच्या कामावर बहिष्कार टाकला होता.

राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात एक ऑक्टोबर २०१८ पासून मानधन वाढ करण्यास सरकार मंजुरी देत असल्याचा आदेश काढला आहे.ऑगस्ट महिन्यापासून नवीन मानधन वाढ मिळेल. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ म्हणाले, 'राज्य सरकारने मानधन वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या निर्णयानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी आंदोलन मागे घेत असल्याचे कळविले आहे. सीईओ अमन मित्तल, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनीही कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.'

..............................

त्याचा तपशील पुढीलप्रमाणे...

मानधन वाढीचा तपशील पुढीलप्रमाणे

पद केंद्राचे मानधन राज्य सरकारचे मानधन एकूण

अंगणवाडी सेविका ४५०० ३५०० ८०००

मदतनीस २२५० २००० ४२५०

मिनी अंगणवाडी सेविका ३५०० २२५० ५७५०

..................

राज्यातील चित्र :

राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प : ५५३

अंगणवाडी सेविका : ९७४७५

मदतनीस : ९७४७५

मिनी अंगणवाडी सेविका : १३०११

एकूण मानधनी कर्मचारी संख्या : २,०७,९६१

...........................................

कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या ४३६९

अंगणवाडी कर्मचारी संख्या ८०००

.............................

दहा वर्षे सेवा झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनाच्या तीन टक्के, वीस वर्षे सेवा झाली असेल तर चार टक्के आणि तीस वर्षे सेवा झाली असल्यास पाच टक्के ही पूर्वी दिली गेलेली वाढ तशीच मिळत राहणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने एक वेळेसाठी दिलेली पाच टक्के वाढ ही तशीच मिळत राहणार आहे. मानधनवाढीच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांनी चालविलेल्या आक्रमक आंदोलनामुळे राज्य सरकारने लागू केली. मानधनासंदर्भातील मागण्या मान्य झाल्या आहेत, आणि पेन्शन बाबत चर्चा सुरू आहे.

सुवर्णा तळेकर, सचिव कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ

............................

कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी वर्षभर सातत्याने आंदोलने झाली. सरकारने त्याची दखल घेऊन मानधनवाढीचा निर्णय घेतला. त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन, मात्र ही मानधन वाढ करताना ऑक्टोबर २०१८ पासूनच्या फरकाचा निर्णय नाही. तसेच जुन्या अंगणवाडी सेविकांना दर पाच वर्षांनी जी वाढ होते ती यामध्ये नाकारली आहे. तसेच इतर मागण्याबाबतही निर्णय नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मानधन कमी आहे. इतर राज्यांच्या बरोबरीने मानधन द्यावे. तूर्तास असहकार आंदोलन मागे घेतले आहे.

कॉम्रेड आप्पा पाटील, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन

.........................

कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या ४३६९

अंगणवाडी कर्मचारी संख्या ८०००

.............................

दहा वर्षे सेवा झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनाच्या तीन टक्के, वीस वर्षे सेवा झाली असेल तर चार टक्के आणि तीस वर्षे सेवा झाली असल्यास पाच टक्के ही पूर्वी दिली गेलेली वाढ तशीच मिळत राहणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने एक वेळेसाठी दिलेली पाच टक्के वाढ ही तशीच मिळत राहणार आहे. मानधनवाढीच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांनी चालविलेल्या आक्रमक आंदोलनामुळे राज्य सरकारने लागू केली. मानधनासंदर्भातील मागण्या मान्य झाल्या आहेत, आणि पेन्शन बाबत चर्चा सुरू आहे.

सुवर्णा तळेकर, सचिव कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ

............................

कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी वर्षभर सातत्याने आंदोलने झाली. सरकारने त्याची दखल घेऊन मानधनवाढीचा निर्णय घेतला. त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन, मात्र ही मानधन वाढ करताना ऑक्टोबर २०१८ पासूनच्या फरकाचा निर्णय नाही. तसेच जुन्या अंगणवाडी सेविकांना दर पाच वर्षांनी जी वाढ होते ती यामध्ये नाकारली आहे. तसेच इतर मागण्याबाबतही निर्णय नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मानधन कमी आहे. इतर राज्यांच्या बरोबरीने मानधन द्यावे. तूर्तास असहकार आंदोलन मागे घेतले आहे.

कॉम्रेड आप्पा पाटील, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन

.........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॉर्चुनकोट, कझनकॅटसॉल कंपन्यांसमवेत सामंजस्य करार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातर्फे सोमवारी फॉर्चुनकोट आणि कझनकॅटसॉल या कंपन्यांसमवेत दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. फॉर्चुनकोट ही कंपनी एन्टीमायक्रोबियल पेंट निर्मिती क्षेत्रात तर कझनकॅटसॉल ही साखर कारखान्यांतील बॉयलरमधील इंधनाची क्षमतावर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी आहे. सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आणि फॉर्चुनकोट कंपनीच्या वतीने डॉ. संदेश काणेकर यांनी तर कझनकॅटसॉल कंपनीच्या वतीने पंकज देशपांडे यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व मकरंद देशपांडेही उपस्थित होते.

फॉर्चुनकोट कंपनीसमवेत झालेल्या सामंजस्य कराराअन्वये शिवाजी विद्यापीठात नॅनोमूलद्रव्ये आधारित मायक्रोबियल पेंट्सची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत अर्थसाह्य प्राप्त झाले आहे. एन्टीमायक्रोबियल पेंट्स हे नवीन तंत्रज्ञान असून त्यांचा मुख्य उद्देश पेंट्सच्या इतर गुणधर्मासोबत सूक्ष्म जीवजंतूंचा प्रसार रोखून त्यांना नष्ट करणे असतो. या नॅनो मूलद्रव्याधारित जंतूनाशकांची सूक्ष्मजीव प्रतिबंध किंवा नष्ट करण्याची प्रक्रिया ही सूक्ष्म जीवजंतू सदर मूलद्रव्याच्या संपर्कामुळे अगर अतिसूक्ष्म आकारामुळे सुलभरित्या सूक्ष्मजीवाच्या शरीरात घुसल्यामुळे होतो. त्यामुळे सदर जंतूनाशकास न जुमानणाऱ्या सुपरबग्जच्या निर्मितीसही अटकाव होतो. साहजिकच अनेक संसर्गजन्य किंवा साथीच्या आजारांना प्रतिबंध होतो. त्यासंदर्भातील संशोधन विद्यापीठात करण्यात येत आहे, अशी माहिती संशोधक डॉ. एस. डी. डेळेकर यांनी यावेळी दिली.

त्याचप्रमाणे संशोधक डॉ. डी. एस. भांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कझनकॅटसॉल कंपनीसमवेत झालेल्या सामंजस्य करारान्वये विद्यापीठात साखर कारखान्यांच्या बॉयलरच्या धुराड्यांमध्ये तयार होणाऱ्या काजळीचे प्रमाण कमी करण्याबरोबरच इंधनाची ज्वलनक्षमता वाढविण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंधनामध्ये मिसळण्यासाठी अशा प्रकारचे उत्प्रेरक तयार करण्यात येणार आहेत की जेणे करून बॉयलरमधील ज्वलनावेळी नायट्रोजन व सल्फरचे जे विविध प्रकारचे वायू प्रदूषक तयार होतात, त्यांचे प्रमाण कमी होईल. हे तंत्रज्ञान विकसित करून संबंधित कंपनीमार्फत कारखान्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. यामुळे साखर कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि इंधनाची ज्वलनक्षमताही वाढेल. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. ए. एम. गुरव, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. कामत यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे पाण्याच्या टाक्या वितरित

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आर्ट ऑफ लिव्हिंग, कोल्हापूर शाखेतर्फे पूरग्रस्त गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून टाक्या भेट स्वरुपात दिल्या आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, ५०० लिटर क्षमतेच्या ५० टाक्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केल्या. या टाक्या शिरोळ तालुक्यातील गावांना दिल्या जाणार आहेत. कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, आशा जैन, शेखर मुदंडा, अमोल येवले आदी उपस्थित होते.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पदाधिकाऱ्यांनी सीईओ मित्तल यांच्यासोबत आरोग्य शिबिर व अन्य मदत कार्याविषयी चर्चा केली. संस्थेतर्फे शिरोळ तालुक्यातील २५ गावात पशुधनासाठी बारा टन पशूखाद्य वितरीत केले आहे. याकामी विनायक मुरदंडे यांनी पुढाकार घेतला होता. शिवाय १५ ठिकाणी आरोग्य शिबिर घेतली. पूरग्रस्तांना स्थलांतरित केलेल्या ठिकाणी पूरग्रस्तांना मानसिक आधार देण्यासाठी नवचेतना शिबिर घेणार आहे. शिरोळ तालुक्यातील १५ हजार लोकांसाठी नवचेतना शिबिर पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्षा पाटील यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अशोक माने, राजेश पाटील, प्रकाश टोणपे, राजू मगदूम, वीरकुमार शेंडुरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापुराने केले शिल्पवैभव नष्ट

0
0

प्रा. बाळासाहेब पाटील

कोल्हापूर : कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या महापुराने आठ-दहा दिवस सांगली, कोल्हापूर शहरांसह या जिल्ह्यांतील बहुतांशी भागांत रौद्ररूप धारण केले होते. यावेळच्या महापुराने खूप काही गमावले आहे. केवळ पैशात भरून न येणारे असे अतोनात नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यामुळे आता त्याचे भयावह परिणाम दिसत आहेत. महापुरात आणखी एका छोट्याशा घटकाचे झालेले नुकसान वस्तू आणि पैशातही भरून न निघणारे आहे. दृश्यकलेतील चित्रकार, शिल्पकारांना महापुराने उद्ध्वस्त केले आहे.

विशेषत: कोल्हापुरातील शिल्पकारांना, मूर्तिकारांना या महापुराने अधिक उद्ध्वस्त झाले आहेत. कोल्हापुरातील बापट कॅम्पमध्ये अनेक शिल्पकारांचे स्टुडिओ आहेत. यातील बहुतेक स्टुडिओ, कारखाने यावेळच्या महापुरात जलमय झाले होते. ज्येष्ठ शिल्पकार संजय तडसरकर यांच्या स्टुडिओमध्ये सुमारे आठ फूट पाणी होते. त्यांच्या स्टुडिओचे या महापुराने सर्वाधिक नुकसान केले आहे. पीओपी आणि मातीचे अनेक पुतळे जाग्यावरच विरघळले आहेत. काही ऑर्डरची फायनल झालेली स्केल मॉडेल पाण्यात विरघळून वाहून गेली आहेत. तर त्यांनी तयार केलेल्या बऱ्याचशा जुन्या अभिजात दर्जाच्या शिल्पाकृती पाण्यात नष्ट झाल्या आहेत. वारंवार लागणारा शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचा ४ फुटी डाय वाहून गेला आहे. तर नुकतेच घेतलेले कर्नाटक येथील योगासनांच्या विविध प्रकारांच्या मानवाकृतींचे मातकाम पूर्णत: विरघळून गेले आहे. सुमारे तीन दशके शिल्पनिर्मिती करीत असलेल्या तडसरकर यांची बहुतांशी शिल्पसंपदा या महापुराने गिळंकृत केली आहे.

शिल्पकार संतोष खुपेरकर यांच्या स्टुडिओतही जवळपास सात फुटांपेक्षा अधिक पाणी होते. त्यांच्या स्टुडिओतील अनेक पुतळे विरघळून नष्ट झाले आहेत. जवळपास तीन महिने खपून केलेला ऑर्डरीचा फायनल झालेला एक पुतळा या महापुराने पूर्णत: नष्ट केला आहे. स्टुडिओतील उर्वरित साहित्य पुरात वाहून जाऊ नये म्हणून ते वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांना पुरातून आलेला साप चावला. साप चावल्याने खुपेरकर यांना दोन ते तीन दिवस दवाखान्यातच उपचार घ्यावे लागले. शिल्पकार किशोर पुरेकर यांच्या स्टुडिओतही पाणी शिरले होते. तर चित्रकार सुनील पंडित यांचा स्टुडिओ काही दिवस महापुराच्या पाण्यात होता. त्यांची बरीचशी चित्रे, दुर्मिळ छायाचित्रे या महापुरात नष्ट झाली आहेत. महापुराच्या आपत्तीमध्ये हजारो बेघर झाले तर लाखो लोकांचे सर्वस्व बुडाल्याचे चित्र आहे. प्रशासन आणि राज्यकर्तेही या महापुराबाबत किती गाफील आणि सुस्त होते, तेही दिसून आले आहे.

महापुरात ज्या शिल्पकार व चित्रकारांच्या कलाकृती नष्ट झाल्या. त्याचे मोल पैशांत होणार नाही, हे नक्की. मात्र त्या शिल्पाकृतीशिवाय स्टुडिओतील इतर साहित्याचे झालेले नुकसान नक्कीच मदतीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यातील अनेक कलासंस्था आणि कलावंतांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊ केला आहे. अनेक कलावंत आपल्या कलाकृतीच्या विक्रीतून अर्थसहाय्य करण्याच्या तयारीत आहेत. कलावंतांची ही सामाजिक बांधिलकी त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देणारी आहे.

मूर्तीकारांपेक्षा शिल्पकारांचे नुकसान वेगळ्याच प्रकारचे असते. मूर्तिकार एका डायपासून अनेक मूर्ती तयार करू शकतो. शिल्पकलेत मात्र तसे असत नाही. एखाद्या पुतळ्यासाठी एकच डाय पुरेसा असतो. त्या डायपासून पुन्हा तशाच प्रकारच्या पुतळ्यांचे काम असत नाही. या महापुरात शिल्पकारांच्या स्टुडिओमधील बरेचशे फायबर लिक्विड, माती, प्लास्टर पाण्यामुळे नष्ट झाले आहे.

माझ्या स्टुडिओचे आणि त्यातील शिल्पाकृती व पुतळ्यांचे झालेले नुकसान भरून न येणारे आहे. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे एखादा नवोदित शिल्पकार नक्कीच उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शिल्पकारांची एखादी संघटना असायला हवी. आम्ही संघटित नसल्यामुळे आमच्या समस्या, प्रश्न संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. इतर पूरग्रस्तांप्रमाणे चित्रकार, शिल्पकार यांना धरून चालणार नाही. कारण इथे आर्थिक नुकसानीपेक्षा त्या कलाकृतीवर घेतलेल्या मेहनतीची, कलेच्या साधनेची मोजता न येणारी हानी झालेली असते.

- संजय तडसरकर, ज्येष्ठ शिल्पकार

शिल्पकाराने एखादे काम ज्या तन्मयतेने व अभ्यासाअंती केलेले असते, तसेच आणि तेच काम पुन्हा होईल याची खात्री नसते. या महापुरात ज्या शिल्पकारांच्या शिल्पाकृती, पुतळे पाण्यात विरघळले आहेत, त्यांच्यासाठी हे सर्व काही वेदनादायी आहे. हे पुतळे हुबेहूब साकारताना घेतलेली मेहनत आणि त्या व्यक्तिमत्त्वाचे टिपलेले बारकावे पुन्हा नव्याने करावे लागणार आहेत.

- विजय पुरेकर, शिल्पकार

गेली तीन चार महिने ज्या कामावर मेहनत घेतली तेच काम महापुरात वाहून गेले. आपण जन्माला घातलेली कलाकृती आपल्यासमोर पाण्यात बुडाल्याचे पाहून अस्वस्थ तर आहेच, शिवाय पुन्हा नव्याने करताना वेळेत करण्याचे आव्हानही आहे. नष्ट झालेल्या कामाच्या दृश्य आठवणी ताज्या असल्याने ते शक्य होईल असे वाटते.

- संतोष खुपेरकर, शिल्पकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोमल गोळे यांची निवड

0
0

कोल्हापूर : कझाकिस्तान येथे होणाऱ्या सिनियर वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कोमल गोळे हिची निवड झाली आहे. १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर यांदरम्यान स्पर्धा होणार आहे. लखनौ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये ७२ किलो वजनी गटात गुणांवर विजय मिळवत सिनियर वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी ती पात्र ठरली. कोल्हापुरात राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सव साध्या पद्धतीने....नागाळा पार्क मित्र मंडळ

0
0

मुख्यमंत्री फंडाला अर्थसहाय

नागाळा पार्क मित्र मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. वाजतगाजत गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक निघते. यंदा, महापुराच्या परिस्थितीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचाा निर्णय घेतला आहे. मंडळातर्फे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मात्र उत्सव कालावधीतील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीतील खर्चालाही फाटा दिला आहे. मंडळातर्फे दरवर्षी होणारा महाप्रसाद रद्द केला आहे.

उत्सवासाठी जमलेली वर्गणीची अधिकाधिक रक्कम पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च केला जाईल. मुख्यमंत्री सहायत निधीला मदत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द करु. तसेच केव्हीज पार्क येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे कीटस देण्यात येणार आहेत.

- धर्मेंद्र निकम, संस्थापक अध्यक्ष, नागाळा पार्क मित्र मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पूरग्रस्तांच्या हिताचीवस्तूस्थिती मांडणारच’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जलप्रलयाचे राजकारण करणार नाही, अशी शिकवण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली आहे. मात्र, वस्तूस्थिती मांडून पूरग्रस्तांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. जनतेसाठी ते आम्ही करतच राहणार,' असे पत्रक राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहराचे अध्यक्ष आर के पोवार यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

पत्रकात असे म्हटले आहे की, 'पालकमंत्र्यांनी पुणे येथे हजर न राहता कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांच्या बरोबर झेंडावंदन केले असते तर सरकारी यंत्रणा वेगाने कामाला लागली असती, असे विधान आमदार हसन मुश्रीफ यांनी केले होते. त्यामध्ये त्यांची चूक काय होती? मुश्रीफ गेली वीस वर्षे सलग आमदार आहेत. त्यापैकी १५ वर्षे ते मंत्री आणि बरीच वर्षे विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीही होते. गेल्या तीस वर्षातील त्यांचे सामाजिक आणि राजकीय काम जनसेवेच्या भावनेतूनच सुरू आहे. पालकमंत्र्यांचा कार्यक्रम एक महिना आधी ठरला होता व तो रद्द करता येणार नाही असे हास्यास्पद विधान भाजपचे नेते करीत आहेत. पालकमंत्री पाटीत हे मंत्रिमंडळातील दोन क्रमांकाचे मंत्री आहेत. स्वातंत्र्यदिनी पूरग्रस्तांबरोबर राहणार असा निर्णय घेतला असता त्यांनी कोणी अडवले नसते. पालकमंत्री सात ऑगस्ट रोजी जिल्ह्यामध्ये पोहोचले. १२ ऑगस्ट रोजी मुंबईला गेले, तेव्हापासून ते बाहेरच आहेत. यापूर्वी जिल्ह्यावर आलेल्या आपत्तीच्यावेळी यापूर्वीचे पालकमंत्री जिल्ह्यात ठाण मांडून जनतेला अहोरात्र मदत केल्याची उदाहरणे आहेत. पालकमंत्री जिल्ह्यात ठाण मांडून बसले असते तर सकारी यंत्रणा अधिक कार्यक्षमतेने कामाला लागली असती.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारगेट ते बजाप तालीम वन वे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्त्यावर दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेजवळील बाजार गेट ट्रॅफिक चौकी ते पापाची तिकटी जवळील बजाप माजगावकर तालीम मंडळ (कुंभार गल्ली) हा मार्ग प्रायोगिक तत्वावर एकेरी केला आहे. त्याबाबत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. चार सप्टेंबरपर्यंत हा बदल लागू राहणार आहे.

बाजारगेट ट्रॅफिक चौकी ते बजाप तालीम कुंभार गल्ली चौक हा रस्ता जीप, कार आणि दुचाकी वाहनांना जाण्यासाठी एकेरी केला आहे. या मार्गावरुन येणाऱ्या वाहनांनी बजाप तालीम कुंभार गल्ली चौक ते पापाची तिकटी, माळकर चौक या मार्गाचा वापर करावा. एकेरी मार्गावर अन्य वाहनांना सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. या संदर्भात काही सूचना, हरकती असल्यास इच्छुकांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात १५ दिवसांच्या आत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

...

पार्किंगचे नियोजन

महापालिकेजवळील कै. राजेंद्र बकरे सभागृह ते श्री टॉइज दुकान (बजाप तालीम मंडळ) कॉर्नर सम तारखेला केवळ दुचाकी वाहनांचे पार्किंग.

बाजार गेट ट्रॉफिक चौकी ते सोनू पान शॉप (बजाप तालीम मंडळ) कॉर्नर विषम तारखेस केवळ दुचाकी वाहनांचे पार्किग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images