Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मोबाइल चोरीची नोंद गहाळ रजिस्टरमध्येच

$
0
0
मोबाइल विसरला, पडला, चोरीला गेला तरी पोलिस ठाण्यात मोबाइल हरवल्याची नोंद गहाळ रजिस्टरमध्येच होत असल्याचे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.

आउट ऑफ कंट्रोल

$
0
0
सकाळपासूनच लगबग दिसत होती. महाराष्ट्रीयन, दाक्षिणात्य, पंजाबी पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांमुळे कॅम्पसचा लूक खुलला होता. जीन्स आणि टी शर्ट परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरी फेटा, कोल्हापुरी चप्पल अशा पेहरावात पारंपरिकतेशी नाळ जोडली.

प्रकल्पग्रस्तांना सोलापुरात मिळणार जमीन

$
0
0
गेल्या ५५ वर्षांपासून पुनर्वसनाच्या लाभापासून दुर्लक्षित असलेल्या येथील कोयना प्रकल्पग्रस्तांमधील ३२७४ प्रकल्पग्रस्त खातेदारांचा न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सर्व खातेदारांना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे जमीन उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

वाळू उपशाच्या परवानगीमुळे दिलासा

$
0
0
सांगली जिल्ह्यातील १२६ वाळू उपसा प्लॉटना पर्यावरण प्राधिकरणाने मंजुरी दिल्यामुळे बांधकाम व्यावसायिक, घरे बांधणाऱ्या व्यक्त्ती, तसेच उपसा जलसिंचन योजनांना दिलासा मिळाला आहे. भडकेले वाळू दरही कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कवठेमहांकाळमधील पवनचक्क्या बंद

$
0
0
कवठेमहांकाळ तालुक्यातील पवनचक्क्यांसंदर्भात शेतकरी आणि सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या ३०० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्याबाबत बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीत तोडगा निघेपर्यंत पवनचक्क्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिकारी मुजोर झालेत, उचलबांगडी करू

$
0
0
‘जनतेसाठीच्या कामांची यादी लपविण्यामागचे गौडबंगाल काय? काही अधिकारी मुजोर झालेत. त्यांचा बोलविता धनी उपायुक्त ओमप्रकाश दिवटे हेच आहेत. त्यांचे बसणे उठणे कुणाकडे आहे. याची आम्हाला कल्पना आहे.

इचलकरंजीत नगराध्यक्षांना घेराव

$
0
0
इचलकरंजीतील नेहरूनगरमधील लाभार्थ्यांना तातडीने घरकुले बांधून देण्यात यावीत या मागणीसाठी बुधवारी बहुजन विकास संघाच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढून प्रवेशद्वार रोखले. तसेच नगराध्यक्षा सौ. सुमन पोवार यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली.

आधारच्या ऑपरेटर्सकडून नागरिकांची लूट

$
0
0
सरकारच्या सर्व योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असून यासाठी आधारकार्डसाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. सरकारी यंत्रणेकडून मोफत आधार कार्ड काढण्यात येत असताना चंदगड तालुक्यात आधारच्या ऑपरेटर्सकडून प्रति माणसी २० ते ५० रुपये उकळले जात आहे.

नियमन हटविल्यास बाजार समित्या अडचणीत

$
0
0
ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, त्या ठिकाणी फळे, भाजीपाला व कांदा स्वस्त होण्यासाठी या वस्तूंचे नियमन १५ जानेवारीपर्यंत उठवण्यात येणार असल्याची घोषणा सरचिटणीस राहूल गांधी यांनी केली होती.

महापालिका शाळा बनल्या चकाचक

$
0
0
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने नववर्षात स्वच्छता सप्ताहांतर्गत काही शाळा चकाचक झाल्या. महापालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सानेगुरुजी वसाहत विद्यामंदिर आणि राजोपाध्येनगर विद्यामंदिरात शाळा स्वच्छता करण्यात आली.

कळंबा कारागृहात कैद्यांचे उपोषण

$
0
0
आरोग्य सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी कळंबा कारागृहातील कैद्यांनी शुक्रवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, कळंबा कारागृह प्रशासनाने या वृत्ताचा इन्कार केला आहे.

मटण दुकाने अखेर सुरू

$
0
0
मटण व्यावसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद अखेर ११ दिवसांनी मागे घेतला आणि मटण मार्केटसह गल्ली-बोळांतील मटण दुकानांबाहेर रांगा लावत कोल्हापूरकरांनी बुधवारचा दिवस सार्थकी लावला.

जानकरांच्या भूमिकेने महायुतीची पंचाईत

$
0
0
महायुतीत पाचवा भिडू आणण्यासाठी आता रासप च्या महादेव जानकर यांच्याशी चर्चा वेगावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘रासप’ला विधान परिषदेच्या दोन जागा देण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे.

उपाहारगृहांनी वाजविले प्रवाशांचे १२

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जिल्ह्याताल बारा आगारांतील काही उपाहारगृहे आणि निवारा शेडनी प्रवाशांचे बारा वाजविले आहे. यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक तालुक्यातील आगार व्यवस्थापकांवर असते, पण त्यांच्याकडून जबाबदारी झटकली जात असल्याने प्रवाशांची आबाळच सुरू आहे.

विमानसेवा सुरू होणार

$
0
0
कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगावसह अन्य प्रमुख शहरांत विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांनी सुधारित आराखडा सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इच्छुक विमान कंपन्यांना दिला आहे, त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरला लवकरच विमानसेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बेमुदत उपोषणात आम्हीही उतरू

$
0
0
टोलला स्थगिती देण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे सांगत मुंबईला बैठकीसाठी बोलवलेल्या टोल विरोधी कृती समितीच्या तोंडाला सरकारच्या मंत्री गटाने पाने पुसली. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, श्रीमंत शाहू महाराज, गोविंद पानसरे, खासदार राजू शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळाला दोन तास तिष्ठत बसवून नंतर केवळ गोल गोल चर्चा केल्याने आता सरकार जो निर्णय घ्यायचा तो घेऊ दे.

रिक्षाचालकांना मिळणार ओळखपत्र

$
0
0
कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील तीन आणि सहाआसनी ऑटो रिक्षाचालकांना आता कॅबचालक ओळखपत्र मिळणार आहे. लायसन आणि बॅज असणाऱ्या ५०६७ रिक्षाचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) या महिन्यात ओळखपत्र देणार आहे.

अनुजाचा खोट्या अकाउंटचा ‘खेळ’

$
0
0
कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अनुजा पाटील हिला फेसबुकवरच्या खोट्या अकाउंटचा ‘खेळ’ भोवला आहे. सहकारी महिला क्रिकेटपटूच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडून बदनामी व अश्लील एसएमएसद्वारे तिच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाटील हिच्यावर पेठवडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रोटरी देणार मोफत तीनशे जयपूर फूट

$
0
0
अपघात, गँगरीन किंवा अन्य कारणामुळे पाय निकामी झालेल्या पेशंटना जयपूर फूटचा आधार वाटत असला तरीही आजपर्यंत एका जयपूर फूटसाठी किमान तीन हजार रुपये खर्च करावे लागत होते. मात्र, आता रोटरी क्लब ऑफ बाथ या लंडनस्थित रोटरीतर्फे कोल्हापुरातील रोटरी लोककल्याण मंडळाला तीन कोटी रुपयांचा निधी आल्यामुळे पहिल्या टप्प्यात तीनशे पेशंटना मोफत सेवा देत जयपूर फूटच्या आधाराने का असेना स्वतःच्या पायावर उभे राहता येणार आहे.

लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे भावगीत, नाट्यगीत स्पर्धा

$
0
0
दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे मदनमोहन लोहिया स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ११) आणि १२ जानेवारी रोजी रामगणेश गडकरी सभागृहात या स्पर्धा होणार आहेत. गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या ‘मी राधिका’ या मैफलीने स्पर्धेची सांगता होणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images