Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निपाणी-कोल्हापूर महामार्ग सुरू

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, कागल

गेले आठ दिवस बंद असलेला निपाणी-कोल्हापूर महामार्ग सोमवारी सुरू झाला. अतिवृष्टी आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी आणि कागलदरम्यानच्या वेदगंगा आणि दूधगंगा नदीचे पाणी पुलाजवळ आल्याने वाहतूक बंद होती. रविवारी दुपारी हे पाणी कमी झाल्याने किरकोळ वाहनांना होळीपर्यंत सोडले जात होते. कागल जवळील आयबीपी पेट्रोल पंपाजवळील पाणी आज सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कमी झाल्याने निपाणी-कोल्हापूर महामार्ग अखेर सुरू झाला.

राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी नदी पुलाजवळ गेल्या सोमवारी रात्री रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वेदगंगा नदीचे पाणी आले होते. शिवाय हे पाणी प्रवाही असल्याने वाहनधारकांना होणाऱ्या धोक्याची खबरदारी घेऊन पोलिसांसह महसूल खात्याने सहा दिवसांपासून या महामार्गावरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळे मांगूर फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहने थांबवून होती. याशिवाय बेळगाव कडून येणारी सर्वच वाहने तवंदी घाट, निपाणी महामार्ग आणि परिसरात थांबून होती. रविवारी सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास अवजड वाहनांव्यतिरिक्त सर्वच वाहने सोडली होती. मात्र कोगनोळीच्या पुढील बाजूस असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पाणी असल्याने सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत वाहतूक थांबली होती. अखेर सकाळी दहा वाजता पाणी कमी झाल्याने निपाणी कोल्हापूर महामार्ग सुरू करण्यात आला आहे. तब्बल सहा दिवसानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने बऱ्याच दिवसांपासून खोळंबलेली वाहने एकाच वेळी रस्त्यावर धावू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गडहिंग्लज अंशत: पूर्वपदावर

$
0
0

गडहिंग्लज: गडहिंग्लज तालुक्यात १९८३ आणि २००५ साली आलेल्या पुराचे विक्रम मोडीत काढून कोसळलेल्या पावसाने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिरण्यकेशी नदीच्या महापुरामुळे भडगाव येथे पुलावर आलेले पाणी पूर्ण ओसरल्यामुळे गडहिंग्लज-चंदगड हा मुख्य मार्ग सुरू झाला आहे. जरळी, ऐनापूर, निलजी व नांगनूर बंधाऱ्यावर पाणी असल्याने हे मार्ग अद्याप बंद आहेत. गडहिंग्लज संकेश्वर मार्गावर केवळ बस सेवा सुरू आहे.

गडहिंग्लज परिसरात गेले आठ दिवस सारे काही ठप्प होते. गडहिंग्लज ही मुख्य बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र आहे. पण तालुक्यातील ऐनापूर, गिजवणे, जरळी, निलजी, नांगनूर हे बंधारे पूर्ण पाण्याखाली गेल्याने तालुक्याचा निम्मा संपर्कच ग्रामीण भागाशी तुटला. चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. कोकणात पावसाचा जोर वाढला त्यामुळे हिरण्यकेशी नदीनेही आपले रूप दाखविले. भडगाव येथे पुलावर आठ दिवस पाणी राहिल्यामुळे गडहिंग्लज चंदगड या मुख्य रस्त्याची वाहतूक ठप्प झाली. गडहिंग्लज आजरा रस्त्यावरही अनेक कोडे रस्त्यावर आले आणि मार्ग बंद झाला होता.

हिरण्यकेशी नदीकाठच्या गावातील दुंडगे, हेब्बाळ, हिटणी या गावांना मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला. तर भडगाव, जरळी, ऐनापुर व मुत्नाळ ही गावे या चक्रातून सुटली नाहीत. गडहिंग्लज शहरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. त्यामुळे शेकडो कुटुंबांना स्थलांतरित करण्यात नगरपालिका प्रशासन आणि तरुण मंडळानी घेतलेली भूमिका कौतुकास्पद होती.

दोघांचा मृत्यू, पडझडीने नुकसान

अतिवृष्टी आणि महापुरामुळे सुमारे ४५ घरांना फटका बसला.१०१६ कुटुंबातील ४५०७ सदस्यांना स्थलांतरित करावे लागले. ३६ गावातील१४७० हेक्टर पिकं पाण्याखाली गेली. पडझड आणि पिकांच्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण व्हायचा आहे. दरम्यान दुंडगे (गडहिंग्लज) येथील घराची भिंत कोसळली या धसक्याने रामगोंडा देसाई यांचा मृत्यू मनाला चटका लावून गेला. तर पाच ऑगस्ट रोजी पुराच्या पाण्यात सायकलसह वाहून गेलेल्या चिंतामणी मारुती कांबळे (रा. कडलगे) याचा मृतदेह मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत पावसाचा जोर मंदावला

$
0
0

कराड :

पाटण तालुक्यातील कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असून, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विना वापर साडेसात फुटांनी सोडण्यात येणारा विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी चार फुटापर्यंत दरवाजे कमी करण्यात आले आहेत. सध्या धरणातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात ३६३१० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात ३०८८७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात एकूण १०२.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे पावसाने पाच हजार मी. मी. चा टप्पा पार केला आहे. आजपर्यंत कोयनानगर येथे ५५१३, नवजा येथे ५980, महाबळेश्वरात ५४४७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

.........

पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे तत्काळ करावेत, पाटण तालुक्यातील ४७ गावांमध्ये वीज पुरवठा सुरू करण्यासाठी कारवाई करावी तसेच पिण्याच्या पाणी पुरवठा योजना पुरामुळे नादुरुस्त झाल्या आहेत, त्या दुरुस्त करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम करावे, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या आहेत. पाटण शहराचा डिपी प्लॅन करण्याचे काम सुरू आहे. पाटण शहरात वारंवार पूरस्थिती का निर्माण होते, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी व त्यांच्याकडून तसा अहवाल घ्यावा. या कामासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. पाटण शहरात ओढया नाल्यांवर ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत, त्यांना तत्काळ नोटिसा द्या, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरस्थितीचा गैरफायदा घेऊन जादा दराने विक्री करणाऱ्या तिघा विक्रेत्यांवर वैधमापनशास्त्र पथकाने सोमवारी कारवाई केली. श्रीकांत इंडस्ट्रीज (श्रीकृष्ण कॉलनी कळंबा), श्री. एजन्सीज अँड बेकर्स, सुप्रिम फुड्स (रेसकोर्स नाका, संभाजीनगर) यांच्यावर उत्पादन जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली.

पत्रकात म्हटले आहे, पूरस्थितीत विक्रेत्यांकडून छापील किंमतीपेक्षा जादा दर आकारुन विक्री केल्याचे प्रकार सुरु होते. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वैधमापन शास्त्र विभागाच्या पथकाने शहर आणि परिसरातील २७ दुकानांची तपासणी केली. त्यात श्रीकांत इंडस्ट्रीज यांनी २० लिटर पाण्याच्या २ नगावर ७५ रुपयांचे अतिरिक्त स्टीकर लावल्याचे तर ई-मेल आयडीचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले. श्री एजन्सीज अँड बेकर्समधील रॉयल आणि सुप्रिम फूऱ्सच्या केळी चिप्सवरही वजनाचा उल्लेख नव्हता.

दरम्यान, भाऊसिंगजी रोडवरील मोहक लस्सी विक्री केंद्रातून खिचडी, शाबूवडा ५० रूपयास विक्री करण्यात येत असल्याने ग्राहकांची लूट केली असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय करजगार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची झुंबड

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात पिण्याची पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गल्लीत महापालिकेचा पाण्याचा टँकर आल्यानंतर नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. आपल्याच प्रभागात टँकर देण्यासाठी नगरसेवकांकडून टाकण्यात येत असलेल्या दबावामुळे अधिकारी, कर्मचारी हैराण झाले आहेत. नगरसेवकांच्या या कृतीमुळे अनेक प्रभाग पाण्यापासून वंचित राहत आहेत. सोमवारी नगरसेवकांच्या अरेरावीला काहीसा चाप बसला असला, तरी पिण्याच्या पाण्याची समस्या मात्र अधिकच गंभीर होऊ लागली आहे.

महापुराच्या पाण्यात महापालिकेची तीनही उपसा केंद्रे बुडाल्यापासून शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नैसर्गिक संकटातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने स्वत:च्या टँकरसह भाडेतत्वावर घेतलेल्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मागणी जास्त असल्याने संपूर्ण यंत्रणा हतबल झाली आहे. संपूर्ण शहरात अशी स्थिती असताना काही नगरसेवक अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन टँकर पळवत आहेत. त्यामुळे काही प्रभागातील नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळेना झाले आहे. शहराला नैसर्गिक आपत्तीने झोडपले असताना प्रशासनही पाण्याचे नियोजन करण्यास स्पशेल अपयशी ठरले आहे. नागरिक केवळ महापालिकेच्या टँकरवर अवलंबून न राहता स्वत:च्या वाहनातून कळंबा व बावडा फिल्टर हाऊस येथून पाणी घेवून जात आहेत.

एकीकडे महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असताना त्याचा फायदा खासगी टँकरचालकांनी उचलला आहे. मनमानी पध्दतीने दराची आकारणी करुन पिण्याचे पाणी दिले जात आहे. शहरवासियांच्या पुढे अन्य कोणताच पर्याय नसल्याने म्हणेल त्या दराने टँकरची खरेदी करत आहेत. वॉटर एटीएमसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या असून जारच्या मागणीमध्येही वाढ झाली आहे.

दरम्यान, 'बालिंगा पंपिंग स्टेशनमधील पंप दुरुस्तीचे काम सुरू आहे. उपसा केंद्रात केबल व पॅनेल सोमवारी बसवून चाचणी घेण्यात आली. ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती झाली असून सकाळी आठपासून रात्री दहापर्यंत २५ कर्मचारी उपसा केंद्र सुरू करण्यासाठी काम करत आहेत,'अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या यांत्रिक विभागाचे उपजलअभियंता रामदास गायकवाड यांनी दिली.

...

चौकट

आयुक्तांची कळंबा फिल्टर हाउसला भेट

शहरात सर्वत्रच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याच प्रभागात टँकर देण्यासाठी नगरसेवक अधिकारी व टँकरचालकांना दमदाटी करत आहेत. परिणामी अनेक प्रभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नगरसेवकांच्या दमदाटीला अनेक अधिकारी अक्षरश: वैतागले आहेत. अनेक कर्मचारी त्यामुळे तणावात वावरत आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात आल्यानंतर सोमवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कळंबा फिल्टर हाउसला भेट दिली व समान पाणीवाटप करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.

...

गुरुवारपासून पाणीपुरवठा शक्य?

बालिंगा पंपिंग स्टेशन वरुन 'सी', 'डी' वॉर्डसह आपटेनगर टाकीवर अवलंबून असलेला भाग आणि रिंगरोड, फुलेवाडी, अंबाई टँक परिसरातील भागाला फायदा होणार आहे. बालिंगा पंपिंग स्टेशनवरुन उपसा सुरू झाल्यानंतर किमान निम्म्या शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. त्यामुळे शिंगणापूर उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या नागरिकांना टँकरद्वारे मुबलक पाणी पुरवता येईल. तसेच शिंगणापूर पंपिंग स्टेशन परिसरातील पाणीपातळी कमी होऊ लागली असून येथील विद्युतपंप मंगळवारी किंवा बुधवारी बाहेर काढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरीचे सर्व दरवाजे बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी तालुक्यात तुरळक पडणाऱ्या सरी वगळता पावसाने उसंत घेतली. राधानगरी धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्व स्वयंचलित दरवाजे कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. दूधगंगा, तुळशी जलाशयातून कमी प्रमाणात विसर्ग झाल्याने नदीची पाणीपातळी कमी होत आहे. पाणी ओसरल्याने तालुक्यातील वाहतुकीचे सर्व मार्ग खुले झाले आहेत.

राधानगरी जलाशयाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून विजगृहातून १४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. भोगावती नदीच्या महापुराची पातळी कमी होत आहे. राधानगरी जलाशयातून विसर्ग कमी झाल्याने रस्त्यावरील पाणी उतरत आहे. हळदी वगळता रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. काळम्मावाडी येथील राजर्षी शाहू सागर जलशयातून ३५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. दुधगंगा नदीचा महापूर कमी होत आहे. तर धामोड येथील तुळशी तलावातून सुरू असलेला एक हजार क्युसेस सोमवारी सायंकाळी चार वाजता थांबवण्यात आला आहे. भोगावती, तुळशी, दूधगंगा आणि धामणी नदीचा महापूर ओसरू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांत वकूब नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा वकूब नाही. जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे आपत्ती व्यवस्थापन केंद्र असते. पण यंदा जिल्हाधिकारी कार्यालयातच पुराचे पाणी शिरले हाच मोठा विनोद आहे,'असा टोला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी लगाविला. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी महाराष्ट्र सरकारचे 'वॉटर मॅनेजमेंट' चुकल्यामुळेच महापुराची स्थिती निर्माण झाल्याची टीका करत भाजप, सेनेच्या राज्यकर्त्यांना घरचा आहेर दिला असल्याचे मुश्रीफ यांनी निदर्शनास आणले.

मुश्रीफ म्हणाले, 'जुलैअखेरीस जिल्ह्यातील धरणे ७० टक्के भरली असून पाण्याचा विसर्ग सुरू करावा व अलमट्टी धरणातून पाच लाखपेक्षा जादा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यासाठी कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करावा म्हणून चार तारखेलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी देसाई यांना पत्र दिले होते. मात्र सरकार आणि प्रशासनाकडून कसलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे जिल्ह्याला भयंकर संकट भोगावे लागले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराची आपत्ती कोसळल्यानंतर सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख पुण्यात पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त होते तर मुख्यमंत्री जनादेश यात्रेत मग्न होते. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना तर आपत्तीचे गांभीर्यच कळले नाही.'

ते पुढे म्हणाले, 'शिरोळ तालुक्यातील स्थिती अजूनही गंभीर आहे. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यात बचाव पथके उशिरा आली. अडीच लाख पूरग्रस्तांचे स्थलांतरित करण्यात स्थानिक संघटना, तरुण मंडळाचा मोठा सहभाग राहिला. जवानांसह स्थानिक कार्यकर्त्यांना सलाम करतो.' पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, बाबासाहेब पाटील , अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात भूस्खलनाचा धोका

$
0
0

सातारा :

भैरवगड (ता. सातारा) या गावांतर्गत टोळेवाडी, मानेवाडी, पिरेवाडी व गवळणवाडी या चार वाड्या येतात. या वाड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या भेगा पडल्या आहेत. या लोकांची भैरवगड व आसपासच्या गावांमधील घरांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या अतिवृष्टी बाधितांना जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. प्रशासनाकडून गहू, तांदूळ व डाळ तसेच विविध संस्थाकडून मिळालेल्या वस्तूंचे वाटप भैरवगड येथे करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, 'भैरवगड गावांतंर्गत येणाऱ्या टोळेवाडी, पिरेवाडी आणि गवळणवाडी या वाड्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यांची घरे राहण्या योग्य राहिली नाहीत. इतर घरांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. चार वाड्यांची १२३ कुटुंबातील ५८९ नागरिकांचे तात्पुरती राहण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शेती व घरांचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.'

...........

खरीप पिकांचे, फळबागांचे नुकसान

सातारा : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेती पिकांचे व फळपिकांचे झालेल्या नुकसानीचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी प्राथमिक नजर सर्वेक्षणाच्या आधारे व गावनिहाय असलेल्या पेरणी क्षेत्राचा आधार घेऊन अहवाल तत्काळ सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहेत.

मोरेवाडी डोंगर खचला

सातारा :

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, सातारा तालुक्‍यातील मोरेवाडी येथे डोंगर खचल्याने माळीण सारखी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेमुळे मोरेवाडी येथील अनेक घरे बाधित झाली आहेत. या घरांवर डोंगराचा काही भाग कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने मोरेवाडी येथे जावून पाहणी केली. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बाधित कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिवृष्टीमुळेच सांगलीत पूर

$
0
0

अलमट्टीबाबत गैरसमज नकोत; सुभाष देशमुख यांचा खुलासा

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे सांगली परिसरात पूर आला किंवा सांगलीतील पुराला अलमट्टी धरण शंभर टक्के कारणीभूत नाही. कमी दिवसांत कित्येक पटीने अधिक पाऊस झाल्यामुळे सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या चांगला समन्वय होता. आपल्या मागणी नंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला होता,' अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

देशमुख म्हणाले, 'सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर मन हेलावून टाकणारा आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही पुराची तीव्रता कमी झालेली नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत सांगली आणि कोल्हापूरचा पूर ओसरू लागेल. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास किमान महिना लागेल.'

२००५ साली आलेला पूर आणि आजच्या पुराची तुलना होऊ शकत नाही. २००५ सालात ४७ फूट पाणी होते, आज ते ५७ फुटांवर गेले आहे. २००५च्या तुलनेत अडीच पटीने पाऊस झाला आहे. आजच्या पुराने सांगली आणि कोल्हापूरला मोठी झळ पोहोचली आहे. सांगली शहरासह जवळपास १०१ गावे पुराने बाधित झाली आहेत. जवळपास सांगलीतील २५ हजार कुटुंबातील १ लाख ३० हजार बाधित नागरिकांना हलविले आहे. शिवाय ३५ हजार जनावरांना वाचविण्यात आले आहे. बोट उलटून १२ जणांचा मृत्यू झाला असून, काही जण बेपत्ता आहेत. बोट दुर्घटनेची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकारी कुठे कमी पडले याची ही चौकशी करण्यात येणार आहे. सांगलीमधील १३० निवारा शिबीरांत पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. पुरामुळे ४५० किलोमीटरचे रस्ते खराब झाले असून, अनेक पूल आजही पाण्याखाली असल्याने त्याची नेमकी परिस्थिती समजायला वेळ लागणार आहे. सांगलीसाठीची सुमारे २५ कोटींची मदत तहसीलदारांकडे सुपूर्द केली असून, त्याचे वाटपही सुरू झाले आहे.

साठ हजार जनावरांचा मृत्यू

पुरामध्ये ३० हजार दुभती जनावरे, ५ हजार छोटी जनावरे, २५ हजार बैलांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी शेजारी राहणारे लोक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन पशुपालकांना मदत करण्यात येणार आहे. बाधित झालेल्या शहरातील नागरिकांना १५ हजार तर ग्रामीणमधील नागरिकांना १० हजारांची मदत देण्यात येणार आहे. त्यातील ५ हजार रुपये रोख स्वरूपात देणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले.

हरीपूरसाठी सोलापुरात मदत संकलन

सांगली जिल्ह्यातील सुमारे १० ते ११ हजार लोकवस्तीचे हरीपूर गाव पुरामुळे उध्वस्त झाले आहे. त्या गावाला पुन्हा उभे करण्यासाठी सोलापूर जिल्हा सरसावला आहे. हरीपूर गाव सोलापूर जिल्ह्याने दत्तक घेतले असून, सोलापुरातील चेंबर ऑफ कॉमर्स, जिल्हा यंत्रमागधारक संघ अक्कलकोट रोड एमआयडीसी, होटगी रोड औद्योगिक वसाहत आणि विकास नगर लोकमंगल फाउंडेशन या ठिकाणी नागरिकांनी मदत द्यावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. सांगली चेंबर ऑफ कॉमर्स एक गाव, पंढरपूर देवस्थान पाच गावे दत्तक घेणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून बँका सुरु होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुराचे पाणी ओसरु लागल्यानंतर मंगळवारी पूर्ण क्षमतेने बँका सुरु होण्याची शक्यता आहे. वीज पुरवठा सुरळीत नसल्याने अनेक बँकाच्या कामकाजावरही परिणामही होण्याची शक्यता आहे. पाण्यात असलेल्या बँकांच्या शाखा सुरू होण्यास थोडा विलंब लागणार आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी (ता. ५)आणि मंगळवारी (ता.६) झालेल्या पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पुराने वेढा टाकला. त्यामुळे अनेक बँकांचे काम ठप्प झाले. शहरात राष्ट्रीय, सहकारी आणि नागरी बँकांत काम करणारे कर्मचारी शहराशेजारील गावांत वास्तव्यास आहेत. रस्ते बंद झाल्याने कर्मचारी येऊ शकले नव्हते. महापुराने वीज पुरवठा खंडीत केल्याने बँकेतील संगणकांचा बॅकअप संपला होता. सर्वच बँकांचे संगणकीकरण झाल्याने नेटवर्क ठप्प झाले होते. त्यातच ग्राहकांची संख्या रोडावल्याने बँकाच्या व्यवहाराला मर्यादा आली होती. तरीही अनेक बँकांची एटीएम सुरू होती. पण एटीएममधील पैसे संपल्याने खडखडाट झाला होता.

बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी अनेक बँकांनी जनरेटरचा आधार घेतला. पण डिझेलचा तुटवडा भासू लागल्याने काही बँकांनी काम थांबवले होते. शहराबाहेर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना गावाशेजारील बँकांच्या शाखेत काम करण्याची सूचना करण्यात आली. पण पुराचे पाणी काही बँकांच्या शाखांत शिरल्याने बँकांना कुलूप लावण्यात आले. शहरातील व्हिनस चौक, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, असेंब्ली रोड, कोंडाओळ परिसरातील बँका बंद ठेवण्यात आल्या. शनिवारी आणि रविवारी बँकांना सुट्ट्या होत्या. सोमवारी बकरी ईदची सुट्टी होती. तीन दिवसाच्या सुट्टीनंतर मंगळवारी बँका सुरु होत आहेत.

मंगळवारी बँका सुरु होणार असल्या तरी त्यांना नेटवर्क सुरळीत करण्यास विलंब लागणार आहे. व्यापारी व उद्योजकांचे व्यवहार सुरळीत करण्यास बँका प्राधान्य देणार आहेत. काही भागात वीज नसल्याने जनरेटरची सोय करावी लागणार आहे. येणाऱ्या अडचणीवर मात करत बँका सुरु कराव्या लागणार आहेत.

...

कोट

'महापुरामुळे उद्भवलेल्या अडचणी आणि तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरू होत आहेत. वीज पुरवठा सुरळीत राहिला तर बँकांना अडचण भासणार नाही. व्यापारी व उद्योजकांचे क्लिअरन्स बँकांना कोणत्याही परिस्थितीत करावे लागणार आहेत.

अनिल नागराळे, सचिव, नागरी बँक असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरएसएसमध्ये कधी प्रवेश केला ?

$
0
0

जयंत पाटील यांची पत्नी व मुले सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तयार अन्नाचे पाकीट वाटप करत आहेत. त्यांच्या मदतकार्याचे फोटो घेऊन कुणीतरी 'पूरग्रस्तांसाठी स्वयंपाक बनविताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'अशी पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल केली आहे. याविषयी विचारल्यावर पाटील यांनी 'आरएसएसच्या कार्याबद्दल मला माहिती आहे. पण दुसऱ्यांच्या सेवेचे फोटो घेऊन स्वत:चा नावलौकिक करुन घेणे हा कसला प्रकार? आरएसएसच्या समर्थकांनी अशा पद्धतीने फोटो वापरणे चुकीचे आहे. अशा क्षुल्लक गोष्टींसाठी गुन्हा दाखल करुन वेळ वाया घालविणे मला पटत नाही. मात्र घरी गेल्यानंतर, 'आरएसएसमध्ये कधी प्रवेश केला ?' हे पत्नीला विचारणार असल्याची मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलत स्थगित

$
0
0

कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे कृषीपंपाच्या वीज सवलतीसाठी बुधवारी (ता. १४) राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा पुलाजवळ चक्का जाम आंदोलन पुकारले होते. दरम्यान, जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावे, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अजूनही पूरस्थिती गंभीर असल्यामुळे बुधवारी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावसहित तेरा गावांना पाणी पुरवठा लवकरच

$
0
0

कोल्हापूर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे दूधगंगा नदीच्या पुराच्या पाण्यातून वाट काढत वीज पुरवठा व रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमधून पिण्याचे पाणी उपसा करण्यास सुरुवात केली. यामुळे पाचगावसह शहरालगतच्या तेरा गावांना पाणी पुरवठा होण्याचा मार्ग सुकर झाला.

महापुरामुळे पाचगाव, गांधीनगर, उचगाव, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी मिळून तेरा गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. आमदार अमल महाडिक यांनी आपत्कालीन यंत्रणेकडून बोट मागवून घेतली. बोटीतून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पंपिंग स्टेशन येथे पोहचले. ३०० एचपीच्या तीन मोटारींपैकी एक मोटर सुरू केली. उर्वरित दोन मोटारींची दुरुस्ती करुन लवकर पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करा, अशा सूचना त्यांनी केल्या. एमजीपीचे कार्यकारी अभियंता सी. एम. कागलकर, शाखा अभियंता बी.जी. पाटील, बी.डी.चौगले, व्ही. एन. घेवडे, महावितरणचे गणेश पोवार यांनी यासाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठातर्फे जनावरांसाठी मोफत चारा

$
0
0

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातर्फे पूरबाधित भागातील जनावरांसाठी मोफत चारा व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात विद्यापीठाच्या आवारातील ३० ट्रॉली चारा कदमवाडी व कसबा बावडा येथील चारा छावण्यांमध्ये पाठवण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापुरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे जनावरांवरही स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. पूरग्रस्तांना मदतीचा ओघ वाढत आहे. या परिस्थितीत जनावरांना चारा मिळावा यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आवारातील गवत असलेले प्लॉट खुले केले आहेत. ज्यांना आपल्या जनावरांसाठी चारा हवा आहे त्यांनी स्वत: विद्यापीठात येऊन गवत कापणी करून जनावरांसाठी चारा घेऊन जावा, असे आवाहन केले आहे. कसबा बावडा व कदमवाडी येथे असलेल्या चारा छावणीतील जनावरांसाठी ही मदत उपयुक्त ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरामुळे शहर आणि परिसरात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महानगरपालिका आणि तलाठी यांच्या संयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांची पथकातर्फे पंचनामे करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरातील पूरग्रस्तांना १५ हजार आणि ग्रामीणमधील पूरग्रस्तांसाठी १० हजार रूपये देण्याची कार्यवाही सुरू आहे. यातील पाच हजार रूपये रोख स्वरूपात देण्यात येईल, उर्वरित रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

देसाई म्हणाले, 'राष्ट्रीय महामार्ग सकाळी सुरू झाला. यामुळे शहरात १८ हजार ३०० सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. शहरातील विविध पंपांवर पेट्रोल २ लाख ७० हजार तर डिझेलचा २ लाख ४० हजार लिटरचा पुरवठा झाला. आता इंधन आणि सिलिंडरची टंचाई भासणार नाही. तातडीने नुकसान भरपाई देण्याची तयारी केली आहे. पूरग्रस्तांना निर्वाह भत्ता म्हणून दर दिवसा प्रती मोठ्या व्यक्तीस ६० रूपये आणि लहान मुलास ४५ रूपये देण्यात येईल. याशिवाय शहरात प्रापंचिक साहित्य आणि कपड्यांसाठी १५ हजार आणि ग्रामीण भागात १० हजार रूपयांच्या वाटपाचे काम त्वरित करण्यात येईल. यातील पाच हजार रूपये रोख देण्याचे आदेश सरकारचे आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३ लाख ७१ हजार खातेदारांचे १ लाख ५ हजार हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक शिरोळमध्ये ८० टक्के, करवीरमध्ये ४० टक्के तर उर्वरित तालुक्यात ३५ टक्क्यांपर्यंत पिकांचे नुकसान झाले आहे.

...

येथे होणार पंचनामे

पंचनाम्याचा परिसर आणि कंसात संबंधित सरकारी कर्मचाऱ्याचे नाव : रमणमळा, नाईक मळा, पुंगावकर मळा, माळी मळा, न्यू पॅलेस परिसर, पोलो ग्राऊंड (तलाठी विपीन उगलमुळे, सचिन लोखंडे), शाहूपुरी कुंभार गल्ली, गवत मंडई (तलाठी राजेश कुंटे, मनपाचे प्रमोद कांबळे), यादवनगर, शास्त्रीनगर, ओढ्यालगतचा भाग (तलाठी प्रताप पाटील, मनपाचे सचिन सूर्यवंशी), जवाहरनगर, बुध्द गार्डननजीकचा परिसर (तलाठी समीर माळी, मनपाचे श्रीकांत चव्हाण), रिलायन्स मॉल, गणपती मंदीर लगतचा परिसर, व्हीनस कॉर्नर, गाडी अड्डा, बसंत बहार रोड, दिप्ती कॉम्लेक्स, टायटन शोरूम, अश्विनी हॉस्पिटल, विल्सन पूल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हॉटेल पाटील वाडा, केव्हीजी पार्क परिसर (तलाठी किरण दराडे, हरिश शिंदे, मनपाचे सॅमसन भोसले), केएमसी वर्कशॉप, वाय पी पोवारनगर ओढयाचा परिसर (तलाठी बाळासाहेब सरगर, मनपाचे गणेश भोसले), लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, सुतार वाडा, कोंडाओळ, विल्सन पूल, शाहू पूल ते चित्रदुर्ग मठामागे, हरीपुजानगर परिसर, राजहंस प्रेस परिसर, महावीर कॉलेज, डायमंड हॉस्पिटल, विन्स हॉस्पिटल, नागाळा पार्क परिसर, खानविलकर पेट्रोल पंप परिसर (तलाठी अमित पाडळकर, एस. एस. इंद्रेकर, मनपाचे विजय मिरजे), पोवार कॉलनी, वसंतराव जाधव पार्क, रामानंदनगर (तलाठी शर्मिला काटकर, मनपाचे सुभाष ढोबळे), सिध्दार्थनगर, सीता कॉलनी, जुना बुधवार पेठ (तलाठी संतोष पाटील, मनपाचे अविनाश कांबळे), शुक्रवारपेठ, पंचगंगा तालीम, मस्कुती तलाव, दुधाळी मैदान परिसर, उत्तरेश्वर गवत मंडई (तलाठी प्रल्हाद यादव, तलाठी पांडुरंग धोत्रे, मनपाचे सचिन इंगवले, विनोद रूईकर), लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा, शिंगणापूर नाका परिसर, लक्षतिर्थ वसाहत परिसर, मिराबाग, डीमार्टमागील बाजू (तलाठी तानाजी जाधव, मनपाचे सुनील सूर्यवंशी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बकरी ईदवर पुराचे सावट

$
0
0

बकरी ईदवर पुराचे सावट

टीम मटा, पुणे

सांगली, मिरज, कराड, सातारा आणि सोलापुरात बकरी ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. बकरी ईदवर यंदा कोल्हापूर, सांगलीच्या महापुराचे सावट होते. सांगलीत मुस्लिम समाजाने ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता. मिरजेत साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. महापुरामुळे हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले असून, या संकटातून सावरण्याची आणि पुन्हा नव्याने सर्व काही सुरळीत होण्यासाठी अल्लाकडे प्रार्थना करण्यात आली. सोमवारी सकाळी दहा वाजता मिरजेतील निमजगा माळावर असलेल्या इदगाह मैदानात सामूहिक प्रार्थना केली. मौलाना मिझाज यानी नमाज पठण केले तर मौलाना बुरानुद्दीन खतीब यानी खुदबा पठण केले. कराड आणि साताऱ्यात ईद साधेपणाने साजरी करून पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले. सोलापुरात सर्व पूरग्रस्तांना आर्थिक बळ मिळू दे, त्यांचे जीवन सुखी होऊ दे, अशी प्रार्थना अल्लाहडे करण्यात आली. शहरातील होटगी रस्त्यावरील आलमगीर ईदगाह मैदानावर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता परंपरेनुसार बकर ईदची नमाज अदा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरीत करोडोंच्या व्यवसायावर पाणी

$
0
0

udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

कोल्हापूर

शाहूपुरीतील कुंभार गल्लीत जसे पारंपरिक कुंभार व्यावसायिक आहेत, तशी सहावी गल्ली ही डिजीटल प्रिंटींगपासून अॅक्रॅलिक बोर्ड, रेडियम कटींग, लेझर राऊटर अशा नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या व्यावसायिकांची गल्ली म्हणून ओळखली जाते. येथे तरुण व्यावसायिकांनी लाखोंचे कर्ज काढून पंधरा लाखापर्यंतच्या मशिनरी घेतलेल्या तर काहींनी ऑर्डर मिळाल्या असल्याने लाखोंचे साहित्य घेऊन ठेवले होते. पण पूर आला व मशिनरीसह सर्व साहित्यच गिळून टाकत जवळपास ५० तरुण व्यावसायिकांवर करोडोंचा बोजा टाकून गेला. व्यवसायाची अवस्था पाहून अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. अजूनही काहींच्या दुकानात पाणी असून पुढे करायचे काय, असा प्रश्नांकित चेहरा घेऊन दिवसभर त्या परिसरात थांबून असलेल्या तरुणांची घालमेल वाढली आहे.

शाहूपुरी कुंभार गल्लीनजीक असलेल्या सहाव्या गल्लीत विल्सन पुलापासून गवत मंडईपर्यंत विविध प्रकारचे व्यावसायिक आहेत. त्यामध्ये सर्वाधिक आहेत ते रेडियम व अॅक्रलिकचे काम करणारे व्यावसायिक. त्यांच्यापाठोपाठ संख्या आहे मोठे होर्डिंग्जसाठी आवश्यक असलेल्या डिजीटल फलकांची छपाई करणाऱ्या डिजीटल प्रिटींग व्यावसायिकांची. यापैकी सर्वात जास्त गुंतवणूक डिजीटल प्रिटींगसाठीची आहे. एका मशिनची किंमत अकरा लाख असून अशा तीन मशीन काही व्यावसायिकांकडे आहेत. रविवारी रात्रीनंतर पहाटेपर्यंत वाढलेल्या पुराच्या पाण्यात तेरा व्यावसायिकांपैकी बाराजणांच्या मशिनरी गेल्या. फक्त पाचजणांना मशिनरी हलवण्याचा वेळ मिळाला. त्या रस्त्यावरील तळमजलाच पाण्याखाली गेल्याने मशिनरीबरोबरच इंक, कच्चा माल, तीन कम्प्युटर, फर्निचरही पाण्याखाली गेले आहे. एका व्यावसायिकाचे किमान वीस लाखांपासून ५० लाखापर्यंतचे नुकसान झाले आहे.

त्याबरोबरच अॅक्रेलिक फलक बनवणारे, रेडियम कटींग करणाऱ्या व्यावसायिकांची जवळपास ३० पर्यंत संख्या आहे. त्यांच्याकडे छोट्या मशिनरी आहेत. ७० हजार रुपयापर्यंतचा प्रिंटर, कम्प्युटर व कच्चा माल अशी जवळपास लाखभर रुपयांची मशिनरी पाण्यात गेली आहे. त्यांच्याशिवाय चार लेझर राऊटर व्यावसायिक आहेत. या सर्व व्यावसायिकांची दुकाने रस्त्यालगतच्या तळमजल्यावर आहेत. त्यामुळे या दुकानांमध्ये आठ दिवस पाणी साचून राहिले. या व्यावसायिकांबरोबरच त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेक तरुणांची दररोज घालमेल सुरू असायची. पुराचे पाणी कुठपर्यंत आले आहे, हे पाहण्यासाठी दररोज गवत मंडईत येऊन थांबायचे. सोमवारी पाणी कमी झाल्यानंतर काहींनी दुकान उघडण्याचा प्रयत्न केला. व्यवसायाची अवस्था पाहून अनेकांना रडू कोसळले. नैसर्गिक आपत्तीसमोर सारेच हतबल असतात, असे काहीजणांनी सांगून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न चालवला होता.

...

कोट

'अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून मोठ्या मशिनरी घेतल्या होत्या. तर कलात्मकता असणाऱ्या तरुणांनी रेडियम कटींगच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केले होते. साऱ्यांचेच व्यवसाय पाण्यात गेल्याने पाच कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रदीप पासमल, सेक्रेटरी, कोल्हापूर डिस्ट्रीक्ट डिजीटल प्रिटींग असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघांच्या जिवावर मदतीची सेफ ‘उड्डाणे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते, रेल्वे मार्ग बंद असल्याने सहा दिवसांपासून उजळाईवाडी विमानतळ हेच कोल्हापूर व शिरोळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महत्वाचे केंद्र बनले. त्यासाठी हवाई दल, नौदल, लष्कराची विमाने व हेलिकॉप्टरची ये जा सुरू होतीच,आता प्रवाशी विमानांचीही वाहतूक सुरू झाली आहे. त्यांच्या उतरण्याच्या व उड्डाणाच्या वेळांचे नियोजन करण्याची महत्वाची जबाबदारी विमानतळावरील दोनच कंट्रोलर दररोज तेरा तास सांभाळत आहेत. त्यांच्यामुळे विमानतळावरुन सेफ उड्डाणे केली जात आहेत.

सोमवारी दिवसभरात शिरोळ, उमळवाड, सांगली, कुरुंदवाड या ठिकाणी खाद्यपदार्थ तसेच अन्य साहित्य पोहचवण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने १६ उड्डाणे केली. त्याशिवाय हैदराबाद, तिरुपती, बेंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानाच्या आठ फेऱ्या झाल्या. त्यातून २८७ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.

पूरग्रस्तांसाठी मदत पोहचवण्याकरिता बुधवारपासून (ता.७ ) हवाई मार्गाचा वापर करण्यात येत असून त्यासाठी नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांची विमाने, हेलिकॉप्टर येत आहेत. शिरोळमधील अनेक गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांना खाद्यपदार्थ तसेच अन्य साहित्य पोहचवण्यासाठी हेलिकॉप्टरशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दररोज पूरग्रस्तांसाठी मदत पोहचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टरची उड्डाणे केली जात आहेत.

सकाळी नऊनंतर या फेऱ्या सुरू होत असल्या तरी त्यासाठी विमानतळावरील यंत्रणा पहाटे सहापासून कामाला लागते. प्रवाशी वाहतुकीच्या विमानांबरोबरच मदत कार्यासाठीच्या हेलिकॉप्टरची ये जा करण्यासाठी वेळेचे गणित जमवण्याचे काम विमानतळावरील दोन कंट्रोलरकडे असते. सकाळी सहा वाजता आलेले हे कंट्रोलर सायंकाळी सात वाजता सर्व काम संपल्यानंतरच जागेवरुन हलतात. तब्बल तेरा तास काम करणाऱ्या या दोघांमुळे व विमानतळावरील अन्य ३२ कर्मचाऱ्यांमुळे पूरग्रस्तांसाठी वेळेवर मदत पोहचवली जात आहे. त्यासाठी विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी १२ मे रोजी येथील विमानतळावर सुरू केलेली इंधन भरण्याची सुविधाही महत्वाची ठरली. अन्यथा येथील विमान व हेलिकॉप्टरना इंधन भरण्यासाठी पुणे वा अन्य पर्याय शोधावा लागला असता व मदतीमध्ये दिरंगाई झाली असती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त भागातील शाळांना १६ ऑगस्टपर्यंत सुट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुराचे पाणी ओसरण्यास सुरूवात झाली असली तरी अद्याप जिल्ह्यासह शहरातील पूरस्थिती आटोक्यात न आल्याने पूरग्रस्त भागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १६ ऑगस्टपर्यंत सुट्टी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

कोल्हापुरात तीन ऑगस्टपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे शहर व जिल्ह्यात महापूर आल्याने अनेक शाळांकडे जाणारे मार्ग पाण्याखाली आले होते. तर काही भागातील शाळाही महापुराच्या तडाख्यात सापडल्या. पूरबाधित कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. यामुळे ५ ऑगस्ट रोजी पुढचे दोन दिवस शाळा व कॉलेजला सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. पुराची तीव्रता कमी न झाल्याने सुट्टीचा कालावधी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला होता. दरम्यान, रविवारपासून पावसाचा जोर कमी आला असला तरी अद्याप शहर व जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी आहे. स्थलांतरीत कुटुंबांचे वास्तव्य छावणीत तसेच नातेवाईकांकडे आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजच्या सुट्टीत १६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज व्यवस्थापनाला पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, पूरबाधित भागातील शाळा व कॉलेजला अजून काही दिवस सुट्टी वाढवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात असल्यामुळे काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी १३ ऑगस्ट रोजी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनाने पालकांना मेसेज पाठवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात डोंगर फाटलं; दुसऱ्या 'माळीण'ची शक्यता

$
0
0

कोल्हापूर:

अतिवृष्टीमुळं कोल्हापूर महापुराच्या महासंकटात सापडला असून अनेकांचे बळी गेले आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागालाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या आजरा आणि भूदरगड तालुक्यावर पावसाची अवकृपा झाली आहे. या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवरील डोंगराच्या कुशीत वसलेल्या वाड्या-वस्त्यांमधील ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायेखाली जगत आहेत. या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे 'माळीण' दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोल्हापुरात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे बळी गेले आहेत. संसार उघड्यावर पडले आहेत. फाटक्या आभाळाखाली काही कुटुंब जीवन जगत आहेत. काही कुटुंब आपला विस्कटलेला संसार सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्य सरकार, नौदल, लष्कर आणि एनडीआरएफसह सर्व सामाजिक संस्था पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत. सध्या पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र, आजरा-भुदरगड सीमेवरील डोंगराला मोठ्या भेगा पडल्यानं तेथील वाड्यांमधील ग्रामस्थ भीतीच्या छायेत जगत आहेत. पेरणोली आणि वझरे दरम्यानच्या डोंगराला मोठी भेग पडल्याचे दोन दिवसांपूर्वीच निदर्शनास आले. शेळ्या आणि मेंढ्या चारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना हे लक्षात कळल्यानंतर त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. सडा डोंगराला पडलेली भेग अंदाजे दीड किलोमीटर लांब आहे. त्यामुळं डोंगर कोसळला तर, एका क्षणात होत्याचं नव्हतं होईल या भीतीनं पेरणोलीपैकी धनगरनवाडा आणि वजरेपैकी खोतवाडीतील ग्रामस्थांना ग्रासलं आहे. माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती असून, भूगर्भ आणि भूजलतज्ज्ञ या भागाचे सर्वेक्षण करणार असल्याचे समजते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images