Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरः ७२ तासांत ८,६४३ नागरिकांचे स्थलांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः महापुरात अडकलेल्या हजारो लोकांना वाचवण्याची जिगर अनेकजण दाखवत आहेत. महापालिकेचा अग्निशमन आणि पवडी विभागही बचावकार्यात आघाडीवर आहे. सलग ७२ तास मदतकार्यात राहून त्यांनी तब्बल ८,६४३ नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. बोटी, तराफा, जेसीबी आणि डंपर अशा साधनांचा वापर करत कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होऊ लागले आहे.

जिल्ह्यात २९ जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. गुरुवार (दि. १ ऑगस्ट) पावसाने रौद्ररुप धारण केले. बघता-बघता राधानगरी धरण ओव्हर-फ्लो होऊन पंचगंगा नदीचे पात्र झपाट्याने विस्तारले. नदीने इशारा आणि धोका पातळी ओलांडून नागरी वस्तीत शिरकाव केला. त्याचवेळी कळंबा तलावातून सुरू झालेल्या विसर्गामुळे जयंती नालाही पात्राबाहेर पडला. शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले. पूररेषेत बांधकामे झालेल्या जयंती नाल्याच्या परिसराबरोबरच जाधववाडी, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, शुक्रवार पेठ या भागांसह रमणमळा, न्यू पॅलेस, कसबा बावडा, केव्हीज पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागाळा पार्कच्या काही भागात पाणी घुसले. सुरुवातीला बंगल्यांच्या पायरीपर्यंत आलेल्या पाण्याने काही तासांत दहा ते १२ फुटांची पातळी गाठली आणि सर्वांचीच भीतीने गाळण उडाली.

पूरबाधितांना बाहेर काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह सर्व पदाधिकारी सोबत असल्याने कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला. दिवसरात्र नागरिकांना बाहेर काढत असताना अनेक कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या. अनेकजण तापाने फणफणू लागले. पण कर्तव्य बजावत अनेक नागरिकांना सुखरुप बाहेर काढले.

पुरातून बाहेर काढल्यानंतर अनेकांनी नातेवाईकांकडे जाणे पसंद केले. तर बहुतांशी नागरिकांची मदत केंद्रांमध्ये सोय केली आहे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे आल्याने त्यांच्या जेवण आणि पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाली आहे. दोन दिवसांपासून पाणीपातळी कमी होऊ लागल्याने सर्वांना आता घरी परतण्याची आस लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरः ६८ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील तब्बल ६८ हजार हेक्टर पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सर्वाधिक फटका उसपिकाला बसला आहे. त्यासह भात, सोयाबीन, भुईमुगाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडील प्राथमिक टप्प्यातील माहितीनुसार ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

उसाचे तब्बल ४७,८०० हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महापुरामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे सुरू होतील. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सेवकांमार्फत पंचनामे करण्यात येणार आहेत. करवीर, शिरोळ, हातकणंगले, कागल, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, आजरा, चंदगड, पन्हाळा अशा सर्वच तालुक्याला अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुराचा फटका बसला. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात ६८,००० हेक्टवरील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये उसाचे क्षेत्र ४७,८०० हेक्टर आहे. ११०० हेक्टरवरील भातपिक पाण्याखाली आहे. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे सुरू होतील, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे पूरग्रस्तांना ६१ लाख

$
0
0

सोलापूर : पूरग्रस्तांसाठी मदतीचे अनेक हात पुढे येत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आज पुरग्रस्तांना ६१ लाख रुपयांची मदत जाहीर केली. समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पुराच्या पाण्यात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १२ जण मृत्युमुखी पडले होते तर ६ जण बेपत्ता आहेत. या पूरबाधितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती करणार आहे. त्यासाठी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले.

पाच पूरबाधित गावे दत्तक घेऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांची म्हणजेच २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. प्रशासनाशी सल्लामसलत करून लवकरच ही गावे निश्चित करण्यात येतील, असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून मदतीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही भोसले यांनी पुढे नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीव धोक्यात घालून हवाईदलाची पूरग्रस्तांना मदत

$
0
0

कोल्हापूरः कोल्हापूर आणि सांगलीत अडकलेल्या नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून हवाई दलाने आपले कार्य सुरू केले आहे. अभूतपूर्व नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दलाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपली विमाने व हेलिकॉप्टर्स उतरवली आहेत.

महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नौदल, हवाईदल व तटरक्ष दलाच्या वैमानिकांनी धावपट्टीवर विमाने आणि हेलिकॉप्टर्स उतरवली आहेत. महापुरामुळे कोल्हापूरचा संपर्क केवळ हवाईमार्गेच साधता येऊ शकत होता. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अत्यंत गतिने देशभरातील विविध ठिकानाहून मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री हवाई मार्गाने कोल्हापूर येथे पोहोचवण्यात येत आहे. पावसामुळे हवामान खराब असताना तसेच नव्या हवाईपट्टीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून भारतीय नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दलांनी अजोड अशी कामगिरी बजावली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर विमानतळावर हवाईदल, नौदल, तटरक्षक दलाची विमाने मदत साहित्य घेऊन पोहचत आहेत. बुधवारी हवाईदल व नौदलाची ११ विमाने व हेलिकॉप्टर्स, गुरुवारी १४ विमाने व हेलिकॉप्टर्स तर शुक्रवारी १६ विमाने व हेलीकॉप्टर्स कोल्हापूर विमानतळावर उतरवली आहेत.

यातून कोल्हापूर, कराड, सातारा व सांगलीमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाने गोवा, हुबळी, मुंबई, पुणे, भटींडा, भुवनेश्वर, विशाखापट्टणम येथून हवाई मार्गाने हेलिकॉप्टर व विमानातून विविध पथकांसह बोटी व इतर मदत सामग्री या दोन्ही जिल्ह्यांना पाठविली आहे. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करणे व मदत साहित्य पोहोचविणे शक्य झाले. स्थानिक जिल्हा प्रशासन महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ, महाराष्ट्र सुरक्षा दल सुध्दा नागरिकांच्या मदत आणि सहाय्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.

विविध दलांचे १०४ पथके कार्यरत

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कर, नौदल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) च्या १०४ टीम कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून दिली आहे. कोस्ट गार्डची १६ पथके, एनडीआरएफची २३, एसडीआरएफ ०३, नेव्ही-४१, सैन्यदल-२१ असे एकूण १०४ पथके सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात कार्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांना १०० टक्के मदत मिळावीः शरद पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शनिवारी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. नुकसानीचे पंचनामे तातडीने व्हावेत, तसेच पूरग्रस्तांना १०० टक्के मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडे व्यक्त केली. पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावे पुराने वेढली असून, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने पूरग्रस्त हवालदिल आहेत. राष्ट्रवादीच्य नेत्यांकडून पूरग्रस्तांची भेट घेऊन दिलासा दिला जात आहे. शनिवारी दुपारी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी वाळवा तालुक्यातील तांबवे, बिचूद, रेठरे हरणाक्ष या गावांमधील पूरस्थितीची पाणी करून पूरग्रस्तांची विचारपूस केली. पूर ओसरताच पूरबाधित घरे, शेती यांचे तातडीने सरकारने पंचनामे करावेत. याशिवाय पूरग्रस्तांना विनाअट १०० टक्के मतद मिळावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बिचूद येथील पूरग्रस्तांनी गावातील पूर संरक्षक भिंत आणि गावातून बाहेर पडणाऱ्या मुख्य रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी केली. शरद पवार यांच्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही बिचूद, ताकारी, रेठरे हरणाक्ष येथील पुराची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेली चार दिवस पूरग्रस्त भागात तळ ठोकून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तब्बल चार दिवसांनी भाजीपाला कोल्हापुरात आल्यानंतर विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दर लावून ग्राहकांची लूट सुरू झाली आहे. श्रावण घेवड्याचा दर प्रतिकिलो २०० रुपये तर टोमॅटोचा ८० ते १२० रुपये किलो दर होता. एरव्ही कोबी गड्ड्याची विक्री १५ ते २० रुपयांना होत असताना आज कोबीची प्रतिकिलो ८० ते १०० रुपये किलो दराने झाली. त्यामुळे ग्राहक हवालदिल झाले आहेत.

गेल्या चार दिवसानंतर भाजी मंडई ओस पडली होती. फक्त कांदे, बटाटे आणि मोड आलेल्या कडधान्यांची विक्री सुरू होती. शुक्रवारी शेती उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी भाजी आणली. मात्र शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने भाजी खरेदी केलेल्या व्यापारी व विक्रेत्यांनी भाजी मंडईत दर वाढवले.

शेती उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी कोबी गड्ड्याची ४० ते ५० रुपयांना खरेदी केला. पण हाच कोबी गड्डा बाजारात दाखल झाला तेव्हा त्याचा दर प्रतिकिलो १०० रुपये दाखवण्यात आला. एरव्ही गड्डा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कापलेला पावकिलो आणि अर्धा किलोचा गड्डा २५ ते ५० रुपये मोजून घ्यावा लागला. शेतकऱ्यांकडून ३० ते ४० रुपये प्रतिकिलो खरेदी केलेल्या टोमॅटोची विक्री भाजी मंडईत ८० ते १२० रुपयांनी विक्री सुरू होती. भेंडीचा दरही १०० रुपये होता तर घेवड्याचा दर प्रतिकिलो १६० ते २०० रुपये होता. कपिलतीर्थ मार्केटमध्ये फ्लॉवर गड्ड्याचा दर १०० रुपये होता.

बटाटा आणि कांद्याच्या दरात पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. बटाटा आणि कांद्याची प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांनी विक्री झाली. पालेभाज्यांची आवक कमी झाली. कोथंबीर पेंढीचा दर ३० ते ५० रुपये होता. कांदा पात, शेपूचा पेंढीचा दर २० रुपये होता. भाज्यांची आवक कमी झाल्याने दर कडाडल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजार समितीचा कर, दलाली आणि प्रवासी खर्चामुळे मंडईत दर वाढतात असे विक्रेत्यांनी सांगितले.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : १००

टोमॅटो : ८० ते १२०

भेंडी : ८० ते १००

ढबू : ५० ते ६०

वरणा : ६० ते ८०

हिरवी मिरची : २००

फ्लॉवर : १०० (प्रति गड्डा)

कोबी : १०० (प्रति गड्डा)

बटाटा : ३०

लसूण : ८० ते १००

कांदा : ३०

आले : १०० ते १२०

मुळा : १० ते २० (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

कांदा पात : २०

कोथिंबीर : ३० ५०

शेपू :१० ते २०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १०० ते १४०

डाळिंब : ६० ते ८०

केळी : ३० ते ७० (डझन)

जवारी केळी : २० ते ८० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरात नेते उतरले मदतीसाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या आपत्तीच्या कालावधीत विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. कुणी प्रत्यक्ष महापुरात उतरुन पूरग्रस्थांचे स्थलांतरण केले. कुणी कमरेइतके पाण्यात उतरुन लहान मुले, वृद्धांना पुरातुन सुरक्षित बाहेर काढले. काहींनी स्थलांतरित ठिकाणच्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली. अन्नाचे तयार पॅकेटस करुन ते पूरग्रस्तापर्यंत पोहचविले. प्रत्यक्ष नेतेच महापुरात उतरुन मदतीसाठी उतरले अन् कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला. जीवाची पर्वा न करता गेले सहा दिवस असंख्य हात संकटग्रस्तासाठी हेल्पिंग हँड म्हणून सेवा करत आहेत.

आमदार चंदद्रीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी शहर आणि परिसरात मदत यंत्रणा सक्रिय केली. आमदार नरके यांनी आंबेवाडी, प्रयाग चिखलीत तळ ठोकून होते. एकीकडे प्रशासनासोबत समन्वय आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांसोबत पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविणे अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

आमदार सतेज पाटील यांनी शहराच्या विविध भागात पाण्यात उतरुन प्रत्यक्ष मदत कार्य राबविले. कसबा बावडा, रमणमळा परिसर, गांधीनगर, चिंचवाड, वळिवडे भागाचा दौरा केला. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. पूरग्रस्तांना आवश्यक साहित्याचा पुरवठा केला. अजिंक्यतारा येथे मदत कक्ष उघडून कार्यकर्त्यांना मदतकार्यात सक्रिय केले. ऋतुराज पाटील यांनी पूरग्रस्त भागात मदतकार्य राबविले.

आमदार अमल महाडिक हे, महापुराच्या आपत्तीच्या कालावधीत विविध पातळीवर सक्रिय राहिले. महामार्गावर अडकलेले प्रवासी, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान, पूरग्रस्तांसाठी नाश्ता, भोजनाची सोय केली. त्यांच्या निवासाच्या सुविधेकडे लक्ष दिले. शिरोली, कोल्हापूर शहर, वळीवडे, आंबेवाडी, प्रयाग चिखलीसाठी त्यांनी रसद पुरविली. प्रशासनासोबत समन्वय ठेवला.

माजी खासदार धनंजय महाडिक आणि कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. शहराच्या विविध भागातील पूरग्रस्तांना दिलासा दिला. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून फूड पॅकेटसचे वाटप, जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. पूरग्रस्तांना स्थलांतरित केलेल्या ठिकाणी तयार पाकिटे पोहचवली. भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक या मदतकार्यात सक्रिय होत्या.

माजी खासदार राजू शेट्टी हेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय होते. शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसाठी मदतीची यंत्रणा राबवली. पूरग्रस्तांना जेवणाच्या मदतीसह शेतकऱ्यांना मदतीवर विशेष भर देत जनावरांसाठी पशूखाद्य, वैरणीची मदत केली.

संभाजीराजेंची धावाधाव, मंडलिक, मानेंचाही दौरा

महापुराने जिल्ह्याला विळखा घातल्यानंतर पूरग्रस्तांची सुटका करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संरक्षण खात्यापर्यंत पाठपुरावा केला. लष्कराचे पथक कोल्हापुरात लवकर दाखल होण्यासाठी वरिष्ठ स्तरावर चर्चा केली. स्वत: पथकासोबत पूरग्रस्त भागाचा दौरा करत नागरिकांना दिलासा दिला. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायी, म्हशींसाठी त्यांनी सोडले नाही गाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुरात जीव वाचवण्यासाठी माणूस आटापिटा करतो. स्वत:ला वाचविण्यासाठी आकांत करतो. मात्र काहींनी पुरांची तमा न बाळगताही भूतदयेने घरं सोडली नाहीत. गायी, म्हशींच्या मायेचे बंध त्यांना सोडवत नव्हते. गाय, वासरांसाठी प्रयाग चिखली, आंबेवाडी आणि शिरोळ तालुक्यातील हसूरसह अनेक गावांतील बाया-बापड्यांनी गाव सोडण्यास नकार दिल्याने भूतदयेचे अनोखे दर्शन पहायला मिळाले. उंच बिल्डिंगच्या टेरेसवर जनावरे बांधून ती जगविण्यासाठीची धडपड सुरू आहे. शहरात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनीही गायींची चिंता वाटत असल्याने मठ सोडला नाही.

सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसाने शहरात पंचगंगा नदीची पातळी अचानक वाढली. त्यामुळे शहरात शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठाचा तळमजला बुडाला. चौकात पाणी साचले. बुधवारी ही घटना कळताच महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला शंकराचार्यांच्या मदतीसाठी कॉल आला. परवाना विभागाचे अधीक्षक राम काटकर यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी, परिसरातील नागरिक काहील घेऊन मठात गेले. पहिल्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या विद्यानृसिंह भारती यांना बाहेर पडण्याची विनंती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली. मात्र मठात २०हून अधिक गायी असून एक गाय व्यायली आहे. त्यामुळे मला मठ सोडता येत नाही, असे शंकराचार्यांनी सांगितले. 'गायींची व्यवस्था आम्ही बघतो, तुम्ही सुरक्षित स्थळी चला' असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर त्यांनी त्यास नकार दिला. गायींची काळजी घेण्यासाठी शंकराचार्यांचा मठात राहण्याचा निर्धार केल्याचे पाहून अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उर भरुन आला.

दरम्यान, कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील प्रयाग चिखली गावाला पुराला वेढल्याने बचाव पथकांनी तेथील चार हजार नागरिकांना बाहेर काढले. तरीही गावातील १५० हून अधिक पुरुष, ५० महिलांनी गाव सोडण्यास नकार दिला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी विनंती करुनही ही मंडळी गावातच आहेत. ज्यांची घरे दोन ते तीन मजली आहेत, अशा घरांत हे नागरिक राहिले आहेत. गावात सुमारे ४०० ते ५०० जनावरे असून ती उंच बिल्डिंगच्या टेरेसवर बांधली आहेत. या जनावरांचे खाणे, पिणे, औषधांची व्यवस्था ही मंडळी करत आहेत. गोकुळ आणि शिवसेनेकडून बोटीने जनावरांसाठी पशुखाद्य पुरवले जात आहे. पशुवैद्यकीय सेवाही पुरवली जात आहे. अशीच अवस्था शिरोळ तालुक्यात आहे. अनेक गावांत गावकऱ्यांनी जनावरांना टेरेसवर बांधून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. जनावरांची ही काळजी पाहून प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही हेलावले आहेत. आपलं घर दूध दूभत्यांनी जगलेल्या जनावरांविषयी असलेली भूतदया पाहून प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही काळजावर दगड ठेवायला लावणारी असल्याचे चित्र महापुरात पहायला मिळत आहे.

शिरोळ तालुक्यातील हसूर, शिरटी, खिद्रापूर, बस्तवाड, राजापूरवाडी, जुने कवठेसार अशा गावांतही अनेकांनी घर सोडलेले नाही. मोठ्या बिल्डिंगच्या टेरेसवर जनावरे बांधून त्यांची निगा राखली जात आहे. त्यांच्यासाठी पशूखाद्य, चाऱ्याची उपलब्धता होईल यासाठी कार्यकर्ते राबत आहेत. शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या एकमेकांच्या जनावरांची राखण करण्यास सुरुवात केल्याचे या भागातून दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीवनावश्यक वस्तूंची टंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवारपासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. शनिवारी सूर्यदर्शन झाल्यानंतर अनेकांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. महापुराच्या पाणीपातळीत घट होत असली, तरी अद्याप दळणवळण यंत्रणा ठप्पच आहे. त्यामुळे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. दूध वगळता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, पिण्याचे पाणी व भाजीपाला या अत्यावश्यक सुविधांअभावी नागरिकांचे मोठे हाल होऊ लागले आहेत.

मुसळधार पावसाच्या तडाख्याने गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याचे जनजीवन विस्कळित झाले आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि कोकणातून येणारी सर्व वाहतूक ठप्प झाल्याने शहवासियांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पुराच्या पाण्याने शहराला विळखा घातल्यानंतर सोमवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले. सांगली फाटा व कोगनोळी नाक्यावर पुराचे पाणी आल्याने शहरात येणारा भाजीपाला, इंधन पूर्णपणे थांबला आहे. हजारो मालवाहू ट्रक रस्त्यावर अडकून पडले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलअभावी नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे.

मंगळवारी, बुधवारी पेट्रोल व डिझेलसाठी सर्वच पेट्रोलपंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. दोन दिवसात शिल्लक साठा संपला. त्यानंतर नागरिकांची वणवण सुरू झाली. पेट्रोल संपल्याचे फलक दिसले तरी नागरिक पेट्रोल मिळेल या आशेने पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लावत आहेत. अशीच स्थिती भाजीपाल्याबाबत शहरात पहायला मिळत आहे. शहरात घटप्रभा व जयसिंगपूर भागातून भाजीपाल्याची आवक होते. आवक पूर्ण थांबली असल्याने भाजीपाल्याची टंचाई, दरवाढ झाल्याचे दिसले. सोमवारी व मंगळवारी खरेदी केलेला भाजीपाला व्यापाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा किंमतीत विकला. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संताप पाहयला मिळत आहे.

सोमवारी महापालिकेची उपसा केंद्रे पुराच्या पाण्यात बुडाल्यानंतर पाणीपुरवठा होणार नसल्याने प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे मंगळवार पेठ, शिवाजी पेठ व संभाजीनगर भाग वगळता सर्वच ठिकाणच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली. महापालिकेने स्वत:च्या चार टँकरसह २० भाडेतत्वावर घेतलेल्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. मात्र त्यावर अनेक मर्यादा आहेत. काही स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींकडून टँकर, ट्रॅक्टरद्वारे मोफत पाणी दिले जात आहे. पण मागणी जास्त असल्याने संपूर्ण यंत्रणाच हतबल झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिंगा उपसा केंद्रातील विद्युत पंप बाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे महापालिकेचे तिन्ही उपसा केंद्रे बंद पडली आहेत. महापूर ओसरल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी शनिवारी बालिंगा उपसा केंद्रातील चार विद्युत पंप पुराच्या तीन फूट खोल पाण्यातून कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. दोन नियमित व दोन स्टँडबाय विद्युत पंपांची दुरुस्ती केली जात आहे. पूर कमी झाल्यानंतर मंगळवार अथवा बुधवारपासून शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न शहर पाणीपुरवठा विभागाने सुरू केले आहेत.

गेल्या १२ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर आला. महापुरामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे शिंगणापूर, बालिंगा व नागदेवाडी येथील उपसा केंद्रे पाण्यात बुडाली आहेत. उपसा होऊ शकत नसल्याने सोमवारी (ता. ५) महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला, तरी त्यावर मर्यादा येत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

शुक्रवार व शनिवारी पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने महापुराच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. शनिवारी पाणीपातळी कमी झाल्यानंतर त्वरीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली. त्यासाठी सकाळपासून यांत्रिक विभागाचे उप जलअभियंता रामदास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तीन फूट खोल पाण्यात जाऊन अरविंद यादव, अशोक मेंगाणे, पाटलू पाटील, सुनील चौगले यांनी चार विद्युत पंप बाहेर काढले. पंप बाहेर काडल्यानंतर भिमराव कांबळे, दिनकर जाधव, राजेंद्र पाटील, निवास माळी, आनंदा पुजारी यांनी ते सुरक्षितस्थळी आणले. सहाय्यक अभियंता जयेश जाधव व वर्कशॉप विभागाचे चेतन शिंदे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चारही विद्युत पंपांची दुरुस्ती केली जात आहे.

उपसा केंद्रांबरोबर पुराची पातळी कमी झाल्याबरोबर पंप बसवून पाणीपुरवठा केला जाणार आहे. बालिंगा येथून उपसा केंद्र सुरू झाल्यानंतर सी, 'डी' वॉर्ड, शाहूपुरी व रिंगरोडचा काही भाग आणि आपटेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या भागाला पाणी मिळेल. दोन दिवसांत पुराची पातळी कमी झाल्यानंतर मंगळवारी किंवा बुधवारी शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरविळखा सैल; कोल्हापूर, सांगलीत बचावकार्य गतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले चार दिवस दाणादाण उडवून देणाऱ्या पावसाने शनिवारी काहीशी विश्रांती घेतली. प्रमुख धरणांतील विसर्गही घटला. त्यामुळे जिल्ह्यासह शहराला पडलेला महापुराचा विळखा किंचितसा सैल होऊ लागला आहे. अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीला आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठा महापूर आला आहे. जिल्ह्यावर ओढवलेल्या आपत्तीतून नागरिकांची सुटका करताना प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली. रेस्क्यू ऑपरेशनसाठी लष्कर, नौदल, एनडीआरएफचे पथक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अद्यापही महापुरात लाखो पूरग्रस्त अडकले असून विशाखपट्टणमवरुन नौदलाचे १५ जणांचे आणखी एक पथक शनिवारी दाखल झाले. महापुराचा विळखा सैल होत असला, तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. नागरिकांचे पिण्याचे पाणी, भाजीपाला, इंधन आणि गॅस सिलिंडर या अत्यावश्यक वस्तूंसाठी प्रचंड हाल होत आहेत. मात्र शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी प्रमुख धरणातील विसर्ग घटल्याने काहीसा दिलासा मिळाला.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रापंचिक साहित्य, शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी लष्कर, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. महापुराचा विळखा कायम असल्याने नौदलाचे आणखी एक पथक शनिवारी दाखल झाले आहे.

धरणक्षेत्रासह शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने महापुराची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. सकाळी आठच्या सुमारास राजाराम बंधाऱ्यावरची पाणीपातळी ५२.१ फूट होती. ती रात्री सात वाजता ५१.७ फुटांपर्यंत कमी झाली. त्यामुळे पाण्याला उतार पडत असून, पाणी ओसरलेल्या ठिकाणी महापालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम सुरू केली. मात्र अद्याप हायवेवर पाणी असल्याने भाजीपाला, पेट्रोल, डिझेल जीवनावश्यक वस्तूंसाठी तर उपसा केंद्रे बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विस्थापितांसाठी मदतीचा ओघ सुरू असून दुर्गम भागात मात्र अनेक नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विस्थापितांची नियमित आरोग्य तपासणी होत असून राज्यातून आणखी शंभर डॉक्टरांचे पथक रविवारी दाखल होणार आहे.

दोन दिवसांत पाणीपुरवठा

पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. उपसा केंद्रातील बुडालेले चार पंप कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात जाऊन बाहेर काढले. दोन दिवसांत पंपांची दुरुस्ती करुन पूरपातळी याच वेगाने कमी झाल्यास मंगळवारी किंवा बुधवारी सी, डी व आपटेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या भागाला पाणीपुरवठा होणार आहे.

धरणातील विसर्ग

धरण विसर्ग (क्युसेक्स)

अलमट्टी ५, ००,०००

कोयना ४४,८५३

वारणा १०,९७१

राधानगरी ५,६८४

दूधगंगा ५,४७५


महामार्ग आज सुरू होण्याची शक्यता

कोकण, सांगलीकडे जाणारे मार्ग बंदच

दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

लष्कर, एनडीआरएफकडून सरकारी मदत पोहोच

वjजपुरवठा सुरळीत करण्यासाठी १०० पथके

दळणवळण अद्यापही विस्कळित

पूरग्रस्तांना मदतीचा ओघ कायम

बीव्हीजी ग्रुप स्वच्छतेसाठी शहरात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फाकटवाडी’च्या सांडव्याची भिंत कोसळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चंदगड तालुक्यात आज दिवसभर पावसाने काहीशी उसंत दिली. त्यामुळे पुराचे पाणी कमी होत आहे. मात्र, आजही दाटे येथे पुराचे पाणी असल्याने चंदगड-बेळगाव मार्ग बंद राहिला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे फाटकवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची खालील बाजूची भिंत खचल्याने डोंगराकडील बाजूची माती घसरत आहे. त्यामुळे नदीकाठच्या २० गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर तरुण मंडळे व प्रशासनाने हिंडगाव, फाटकवाडी व इनाम सावर्डेतील ६०० ग्रामस्थांना चंदगडला स्थलांतरीत केले.

आज दिवसभरात चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील अडकूर पुलावर पुराचे पाणी ओसरल्याने नेसरीपर्यंतची वाहतूक सुरू झाली. मात्र, भडगाव पुलावर अद्यापही पुराचे पाणी असल्याने गडहिंग्लजला जाणाऱ्यांना चंदगड-नेसरी-आजरा उत्तूरमार्गे गडहिंग्लज असा वळसा घालून जावे लागत आहे. फाटकवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची खालच्या बाजूची भिंत खचल्याने तालुक्यात गोंधळ उडाला. या मार्गात सुमारे वीस गावे आहेत. त्यांना धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने स्थलांतराचा इशारा दिला. त्यापैकी हिंडगाव, फाटकवाडी, इनाम सावर्डे येथील ग्रामस्थांना हलविण्यात आले. इतर गावांतील लोकांनी गावातील उंच ठिकाणी आपण स्थलांतरीत होणार असल्याचे सांगितले. स्थलांतरीत तीन गावांतील सहाशे नागरिकांच्या खाण्यापिण्याची व रहाण्याची व्यवस्था चंदगड येथील रवळनाथ ट्रस्ट भक्त निवास व माडखोलकर महाविद्यालयात करण्यात आली आहे. चंदगड शहरातील विविध तरुण मंडळे व मुस्लिम समाजाचे युवक या लोकांची सर्व व्यवस्था पाहत आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत आहे.

गडहिंग्लज येथील विविध सामाजिक संस्था व चंदगड शहरातील तरुण मंडळांनी आपापल्या परीने लोकांच्या रोजच्या खाण्यापिण्यासाठी तेल, रवा, तांदूळ, तिखट व चहापूडची व कपड्यांची व्यवस्था केली आहे. अतिवृष्टीमुळे फाटकवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची खालील बाजूची भिंत खचली असली तरी सतर्कता म्हणून प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. सद्यस्थितीला फाटकवाडी प्रकल्प परिसरात चंदगडच्या इतर क्षेत्रांपेक्षा दुप्पट पाऊस पडतो. चंदगडपेक्षा फाटकवाडी येथे जंगल क्षेत्र अधिक असल्याने या ठिकाणी नेहमीच पावसाचे प्रमाण अधिक असते. सद्यस्थितीला धोका नसला तरी या ठिकणचा पाऊस वाढत राहिल्यास धोका कायम रहाणार आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी स्थलांतरीत लोकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. फाकटवाडी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी त्यामुळे कोणाचेही नुकसान अद्याप झाले नाही. घटप्रभा नदीची पाणीपातळीतही घटत आहे.

प्रांतांकडून पाहणी

गडहिंग्लज प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यासह फाटकवाडी प्रकल्पाला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. आज दिवसभर त्या चंदगड तालुक्यात पूरपरिस्थीची पाहणी करत होत्या.

४२८ घरे कोसळली

चंदगड तालुक्यात पुराने बाधीत होवून घराची पडझड झाल्याने वीस ते पंचवीस गावातील ४२८ घरे बाधित झाली आहेत. त्यामुळे या घरातील २०३५ लोकांना तालुक्यात ठिकाठिकाणी स्थलांतरीत केल्याचे नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांनी सांगितले.

पुरामुळे घरांचे नुकसान झालेली गावे

कोवाड, किणी, नागरदळे, कडलगे खुर्द, कडलगे बुद्रुक, ढोलगरवाडी, मांडदुर्ग, कार्वे, सुंडी, करकुंडी, नांदवडे, कोनेवाडी, तांबुळवाडी, किणी, निट्टूर, शिनोळी खुर्द, कानडी, कोरज, चंदगड, फाटकवाडी, माणगाव, धुमडेवाडी, सडेगुडवळे, कुदनुर, घुल्लेवाडी, तळगुळी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळकडून संकलन सुरू

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) शनिवारपासून दूध संकलनास सुरुवात केली. सायंकाळच्या सत्रात ५० हजार लिटर दुधाचे संकलन केले. पुराचे पाणी ओसल्याने जे मार्ग मोकळे झाले आहेत, त्या मार्गांवरील गावांतून रविवारपासून (ता.११) दूध संकलन सुरू ठेवण्यात येणार आहे. शनिवारी जिल्ह्यातील काही मार्ग खुले झाल्यानंतर सायंकाळच्या सत्रातील दूध संकलन सुरू केले. शाहूवाडीतील गोगवे येथे चिलिंग सेंटरमध्ये गेले दोन दिवस संकलन सुरू आहे. या दुधावर प्रक्रिया करुन ते पुण्याकडे पाठविले आहे. रविवारी राष्ट्रीय महामार्ग खुला झाल्यास मुंबई आणि पुण्याला दूध पाठविण्यात येणार असल्याची माहिती, गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरस्थितीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने छतावरुन पडून जखमी झालेल्या सर्जेराव आनंदा खवळे (वय ५० रा. बाजारभोगाव) यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उपचारासाठी दोन तास धडपड करूनही खवळे यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला.

पोलिसांनी सांगितले की, खवळे कोल्हापुरात एका नारळ दुकानात काम करत होते. ते शनिवारी सकाळी राहत्या घराची स्वच्छता करत होते. त्यावेळी छतावर पाय घसरल्याने तोल जाऊन पडल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी आणि गावातील नागरिकांनी प्रयत्न केले. बाजारभोगाव ते कोल्हापूर मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पोहाळवाडी, काटेभोगावमार्गे बालिंगा येथे आणले. तेथून बोटीने दोनवडेतून बोटीने कोल्हापुरात आणले. राजारामपुरीत एका खासगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी दुपारी बारा वाजता दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी पूरस्थितीमुळे वेळेत उपचार मिळाले नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान, घटनेची नोंद सीपीआर चौकीत झाली. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खवळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमतरता सांगितल्या, राजकारण नव्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'महापुराचे राजकारण कुणी करण्याचे कारण नाही, तसे कुणी करतही नाही. यंत्रणेतील त्रुटी सांगणे म्हणजे राजकारण नव्हे', असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शनिवारी सत्ताधाऱ्यांना लगावला.

पवार यांनी सातारा, कराड आणि सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. त्यानंतर संध्याकाळी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नुकसानीचे पंचनामे तातडीने व्हावेत, तसेच पूरग्रस्तांना १०० टक्के मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडे व्यक्त केली.

ते म्हणाले, 'राज्यावर महापुराचे एवढे मोठे संकट यापूर्वी कधीही आले नव्हते. जेव्हा आपत्ती आली तेव्हा राज्यातील प्रशासकीय यंत्रनेने चांगले काम केले. मात्र राज्यात यंत्रणा चांगली असतानाही यंत्रणेने लोकांकडे लक्ष दिले नाही. शासन कमी पडले असले तरी पूरग्रस्तांना मदत करण्यात स्वयंसेवी संस्था आणि अन्य लोक कमी पडले नाहीत. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिके आणि मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने केले पाहिजेत.

लोकांचे संसार आणि कपडे वाहून गेले आहेत. तेही पूरग्रस्तांना द्यावे लागेल. राज्याचे प्रमुख लक्ष देणारे असतील तर यंत्रणा व्यवस्थित काम करत असते. मात्र नेते सेल्फी काढत फिरत असतील तर कसे होणार, असा सवालही पवार यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे-बेंगळुरू हायवेवर अद्याप चार फूट पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अद्याप तावडे हॉटेल ते पुलाची शिरोली या भागात पाणी असल्याने वाहतूक बंद आहे. सायंकाळी महामार्गावर चार फूट सहा इंच पाणी असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. रविवारी उशीरा अथवा सोमवारपर्यंत महामार्ग खुला होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

महामार्गाच्या दोन्ही बाजूस एकूण पंचवीस हजार वाहने थांबली आहेत. त्यांना स्थानिक नागरिक आपल्या परीने मदत करीत असून त्यांच्या जेवणाची व चहा, नाश्त्याची सोय करत आहे. तावडे हॉटेल ते शिरोली पुलाची या भागात चार दिवसांपासून सुमारे आठ फूट पाणी होते. महार्गावरील पाणी ओसरल्यावर रस्ते विकास मंडळाकडून पुलांची तपासणी करूनच येथील वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. गुरुवारी सुमारे दीड फूट तर शुक्रवारी अडीच फुटांनी पाणीपातळी कमी झाली. सायंकाळी मार्गावर साडेचार फूट पाणी होते. तावडे हॉटेल चौकात अद्याप पाच फूट पाणी आहे. दरम्यान, सोशल मीडियावर महामार्ग चालू झाल्याची अफवा पसरली होती. दूध, भाजीपाला घेऊन जाणारी वाहने सोडण्यात येत असल्याचे मेजेस फिरत होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे आणि प्रसिद्धी माध्यमांकडे चौकशीसाठी संपर्क साधला. मात्र, नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पूर्ण पाहणी करूनच वाहतूक सुरू करणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवी ती मदत देऊ, सर्वकाही ठीक होईल

$
0
0

शरद पवारांचा वाळव्यात पूरग्रस्तांना दिलासा

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'तुम्हाला जी-जी मदत लागेल, ती-ती देऊ. तुम्ही मोठ्या धैर्याने पुरास तोंड देत आहात. २००५च्या पुरावेळी राज्यात व केंद्रात आपले सरकार होते. त्या वेळी आपण पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत तातडीने केली होती. आता आपले सरकार नाही. मात्र, तुम्ही काळजी करू नका. अजून केंद्रात आणि राज्यातही माझे ऐकले जाते. सर्वकाही ठीक होईल,' असा दिलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाळवा तालुक्यातील पूरग्रस्तांना दिला.

शनिवारी खासदार पवार यांनी वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष गावास भेट दिली. त्यांच्या समवेत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील होते पवार म्हणाले, '२००५पेक्षाही आजची परिस्थिती गंभीर आहे. तुम्ही हातबल होऊ नका. तुम्हाला जी-जी मदत लागेल, ती-ती देऊ. तुम्ही मोठ्या धैर्याने पूरस्थितीस तोंड देत आहात. जयंत पाटील तुमच्या बरोबर आहेत. आम्ही सुद्धा सर्व शक्ती तुमच्या पाठिशी उभी करू.'

आमदार जयंत पाटील म्हणाले, 'सद्याची पूर परिस्थिती भीषण आहे. मात्र, सरकार पुराबद्दल फारसे गंभीर दिसत नाही. आता आम्हा सर्वांच्यासाठी पवारसाहेब हेच एकमेव आशेचे केंद्रबिंदू आहेत.'

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाळवा तालुक्यातील बोरगाव, बहे व वाळवा गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांना दिलासा दिला. त्यांनी अनेक घरांमध्ये जावून किती नुकसान झाले आहे? याची पाहणी केली. सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती भीषण असून, सरकारी यंत्रणा कुठेही दिसत नाही. राज्य सरकारने पूरग्रस्तांना आधार देणे अपेक्षित असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सेल्फीचा आनंद घेत आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देवून २४ तास सेल्फी काढत फिरावे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली सोकणकर यांनी केली.

............

माझ्याच घरात मदत साहित्य उतरवा

कराड तालुक्यातील जिंती येथील ग्रामस्थांनी वाळवा तालुक्यातील पुरग्रस्तांना मदत म्हणून शनिवारी काही वस्तू आणि धान्य, असा साहित्याचा टेम्पो भरून आणला होता. हे साहित्य माझ्याच घरात उतरवा म्हणून वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथील एका आडदांड पुढाऱ्याने आग्रह धरला. साहित्य त्याच्या घरात उतरवायला नकार दिल्याने त्याने साहित्य घेऊन आलेला तो टेम्पो परत पाठविला. इथे मदत वाटायची नाही. आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही. तुमची मदत नदीत नेऊन टाका, अशी भाषाही त्य‍ाने वापरली. या प्रकारामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. दुसऱ्या जिल्ह्यातून थोडी-थोडी मदत गोळा करून टेम्पोभर साहित्य घेऊन आलेल्या युवकांचा या घटनेने हिरमोड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेचे दरवाजे पाच फूटावर

$
0
0

कोयनेचे दरवाजे पाच फूटावर

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयनेच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याची आवक घटली आहे. सांगली जिल्ह्यातील महापूराच्या परिस्थितीला काहीसा दिलासा मिळावा, या उद्देशाने कोयना धरणाचे दरवाजे शनिवारी सकाळी पहिल्यांदा नऊ फुटावरून आठ तर नंतर ते पाच फुटांपर्यंत कमी करण्यात आले. सध्या धरणात ४५२६७ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. दरवाजातून विनावापर व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ४५२६७ क्युसेक्स कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

दरम्यान, कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने पाटण तालुक्यातील नदीकाठच्या गावात घुसलेले पाणी आता बहुतांशी ठिकाणी ओसरले आहे. स्थानिकांचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. घरांचे, संसारोपयोगी वस्तू, दुकानदारांचे माल, पिके, खासगी शेती तसेच सार्वजनिक पाण्याचे पंप, सार्वजनिक मालमत्तांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. यासाठी आता सरकारने सर्व निकष बाजूला ठेवून पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. सरसकट पंचनामे करून कर्जमाफी व शक्य तेवढी सर्वोतोपरी मदत जाहीर करावी, अशी सार्वत्रिक मागणी होत आहे. कराड-चिपळूण महामार्गासह अनेक पर्यायी रस्तेही खुले होवून वाहतूक सुरळीत झाली आहे. अनेक गावांच्या रस्त्यावर मोठ्य़ा प्रमाणात भेगा पडल्या असून, अनेक ठिकाणी रस्ते, त्यावरील छोटे पुल, मोऱ्या खचल्याने त्या ठिकाणचा प्रवास धोकादायक बनला आहे.

.............

पूरग्रस्त गावांची कर्जमाफी करा

शरद पवार

कराड :

पूरग्रस्त गावांची कर्जमाफी करावी. शेती, व्यवसाय, बलुतेदारांची कर्जे माफ करण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.

पवार सांगली व कराड भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आले होते. पाहणीपूर्वी येथील सरकारी विश्रामगृहात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली.

विठ्ठल-रुखमाई देवस्थानकडून ६१ लाखांची मदत

कराड :

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात उदभवलेल्या पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीने ६१ लाख रुपयांची मदत विविध स्वरूपात दिली जाणार असल्याची माहीती समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. येथील सरकारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भोसले यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फाटकवाडी’च्या सांडव्याची भिंत कोसळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चंदगड तालुक्यात आज दिवसभर पावसाने काहीशी उसंत दिली. त्यामुळे पुराचे पाणी कमी होत आहे. मात्र, आजही दाटे येथे पुराचे पाणी असल्याने चंदगड-बेळगाव मार्ग बंद राहिला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे फाटकवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची खालील बाजूची भिंत खचल्याने डोंगराकडील बाजूची माती घसरत आहे. त्यामुळे नदीकाठच्या २० गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर तरुण मंडळे व प्रशासनाने हिंडगाव, फाटकवाडी व इनाम सावर्डेतील ६०० ग्रामस्थांना चंदगडला स्थलांतरीत केले.

आज दिवसभरात चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील अडकूर पुलावर पुराचे पाणी ओसरल्याने नेसरीपर्यंतची वाहतूक सुरू झाली. मात्र, भडगाव पुलावर अद्यापही पुराचे पाणी असल्याने गडहिंग्लजला जाणाऱ्यांना चंदगड-नेसरी-आजरा उत्तूरमार्गे गडहिंग्लज असा वळसा घालून जावे लागत आहे. फाटकवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची खालच्या बाजूची भिंत खचल्याने तालुक्यात गोंधळ उडाला. या मार्गात सुमारे वीस गावे आहेत. त्यांना धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने स्थलांतराचा इशारा दिला. त्यापैकी हिंडगाव, फाटकवाडी, इनाम सावर्डे येथील ग्रामस्थांना हलविण्यात आले. इतर गावांतील लोकांनी गावातील उंच ठिकाणी आपण स्थलांतरीत होणार असल्याचे सांगितले. स्थलांतरीत तीन गावांतील सहाशे नागरिकांच्या खाण्यापिण्याची व रहाण्याची व्यवस्था चंदगड येथील रवळनाथ ट्रस्ट भक्त निवास व माडखोलकर महाविद्यालयात करण्यात आली आहे. चंदगड शहरातील विविध तरुण मंडळे व मुस्लिम समाजाचे युवक या लोकांची सर्व व्यवस्था पाहत आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत आहे.

गडहिंग्लज येथील विविध सामाजिक संस्था व चंदगड शहरातील तरुण मंडळांनी आपापल्या परीने लोकांच्या रोजच्या खाण्यापिण्यासाठी तेल, रवा, तांदूळ, तिखट व चहापूडची व कपड्यांची व्यवस्था केली आहे. अतिवृष्टीमुळे फाटकवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची खालील बाजूची भिंत खचली असली तरी सतर्कता म्हणून प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. सद्यस्थितीला फाटकवाडी प्रकल्प परिसरात चंदगडच्या इतर क्षेत्रांपेक्षा दुप्पट पाऊस पडतो. चंदगडपेक्षा फाटकवाडी येथे जंगल क्षेत्र अधिक असल्याने या ठिकाणी नेहमीच पावसाचे प्रमाण अधिक असते. सद्यस्थितीला धोका नसला तरी या ठिकणचा पाऊस वाढत राहिल्यास धोका कायम रहाणार आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी स्थलांतरीत लोकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. फाकटवाडी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी त्यामुळे कोणाचेही नुकसान अद्याप झाले नाही. घटप्रभा नदीची पाणीपातळीतही घटत आहे.

प्रांतांकडून पाहणी

गडहिंग्लज प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यासह फाटकवाडी प्रकल्पाला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. आज दिवसभर त्या चंदगड तालुक्यात पूरपरिस्थीची पाहणी करत होत्या.

४२८ घरे कोसळली

चंदगड तालुक्यात पुराने बाधीत होवून घराची पडझड झाल्याने वीस ते पंचवीस गावातील ४२८ घरे बाधित झाली आहेत. त्यामुळे या घरातील २०३५ लोकांना तालुक्यात ठिकाठिकाणी स्थलांतरीत केल्याचे नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांनी सांगितले.

पुरामुळे घरांचे नुकसान झालेली गावे

कोवाड, किणी, नागरदळे, कडलगे खुर्द, कडलगे बुद्रुक, ढोलगरवाडी, मांडदुर्ग, कार्वे, सुंडी, करकुंडी, नांदवडे, कोनेवाडी, तांबुळवाडी, किणी, निट्टूर, शिनोळी खुर्द, कानडी, कोरज, चंदगड, फाटकवाडी, माणगाव, धुमडेवाडी, सडेगुडवळे, कुदनुर, घुल्लेवाडी, तळगुळी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

LIVE: पूरविळखा सैल; कोल्हापुरात बचावकार्य गतीने

$
0
0

कोल्हापूर/सांगली/पुणे: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रापंचिक साहित्य, शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी लष्कर, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. महापुराचा विळखा कायम असल्याने नौदलाचे आणखी एक पथक शनिवारी दाखल झाले आहे.

जाणून घ्या LIVE अपडेट्स:

>> कोल्हापूर: पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या २५ नागरिकांना वाचवण्यात महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना यश; शिरोली पुलाजवळची घटना
70626880

>> कोल्हापूर: राधानगरी धरणातून ४२५६ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू

>> कोल्हापूर: शिरोली येथील रस्ता अजूनही पाण्याखाली...
70626837

>>कोल्हापूर: महामार्ग आज सुरू होण्याची शक्यता

>> कोल्हापूर: कोकण, सांगलीकडे जाणारे मार्ग बंदच

>> कोल्हापूर: दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

>> कोल्हापूर: लष्कर, एनडीआरएफकडून सरकारी मदत पोहोच

>> कोल्हापूर: वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी १०० पथके

>>कोल्हापूर: पूरग्रस्तांना मदतीचा ओघ कायम; दळणवळण अद्यापही विस्कळित

>> कोल्हापूर: बीव्हीजी ग्रुप स्वच्छतेसाठी शहरात

>>कोल्हापूर: धरणक्षेत्रासह शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने महापुराची पाणीपातळी कमी होऊ लागली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images