Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांगली: बचावकार्य करताना बोट उलटली; १६ जणांचा मृत्यू

0
0

सांगली: पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू असताना येथील ब्रह्मनाळ गावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन पुरुष, पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. तर, काही जण थोडक्यात बचावले आहेत. सर्व नागरिक ब्रह्मनाळचे रहिवासी आहेत.

कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पुरानं थैमान घातलं असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हे बचावकार्य सुरू असतानाच पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात आज बोट उलटली. उलटलेल्या बोटीची क्षमता ३० ते ३२ जणांना वाहून नेण्याची होती. मात्र, पुरातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी त्यावर क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते. त्यातून तोल जाऊन हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. बोटी उलटल्यानं एकच हल्लकल्लोळ उडाला. स्थानिक नागरिक बुडालेल्यांना वाचवण्यासाठी धावले. बचाव यंत्रणांच्या मदतीनं स्थानिकांनी काही जणांना बाहेर काढलं. काहींनी झाडांना पकडून व पोहून स्वत:चा जीव वाचवला. तर, इतरांचा मृत्यू झाला. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.

पलूस सांगली येथे उलटलेली बोट ही ग्रामपंचायतीची असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती एनडीआरएफनं दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नियमित स्तनपानामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी

0
0

Sachin.patil1@timesgroup.com
Tweet@sachinpMT

कोल्हापूर :

महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात तरुण वयातील महिलांचे प्रमाण अधिक आहे. स्तनांचा कॅन्सर झालेल्या महिलांमध्ये मृत्युदर अधिक आहे. नियमितपणे बाळाला स्तनपान केल्यास कॅन्सरचा धोका कमी होत असल्याचे निरीक्षण ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉ. स्नेहल पाटील यांनी नोंदवले आहे.
देशात स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण ३२ टक्के इतके आहे. मात्र, वेळीच निदान झाल्यास योग्य औषधोपचार घेतल्यास हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो, याबाबत दिवसेंदिवस संशोधन होत आहे, जितक्या लवकर प्रमाणात स्तनदा माता बाळाला स्तनपान करू लागतील तेवढे मातेच्या दृष्टीने ते चांगले असते. स्तनपान बाळासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आईचे दूध हे बाळाला सुदृढ बनवते. स्तनपानाने बाळासोबत आईचेही स्वास्थ बळकट होते. अलीकडे स्तनपानाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन रुजत आहे. स्तनपान केल्याने आईला पुढील आयुष्यात मुख्यतः स्तनाचा व अंडाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. स्तनपान सुरु असताना महिलेचा शरीरात बरेच संप्रेरके हार्मोनल बदल होत असतात. शरीरातील इस्ट्रोगेन हार्मोनची पातळी कमी राहते. स्तनाचा कॅन्सरचा बहुतांश वेळा या हार्मोनवर अवलंबुन असल्याने गर्भधारणा व स्तनपानाने कॅन्सरचा रोग टळू शकतो. नियमित स्तनपानाने गरोदरपणामध्ये वाढलेले वजन पूर्ववत होण्यासाठी मदत होते. विशिष्ट संप्रेरकांमुळे (हार्मोन्स) गर्भाशय आकुंचन पावते आणि गर्भाशय पूर्वस्थितीमध्ये येण्यास मदत होते, तसेच यामुळे वारदेखील लवकर सुटून गर्भाशयापासून वेगळी होते आणि प्रसूतीनंतर होणाऱ्या अतिरिक्‍त रक्‍तस्रावाला आणि पर्यायाने रक्‍तक्षयाला प्रतिबंध करता येतो.

यासंदर्भात डॉ. पाटील म्हणाल्या, आईने कमीतकमी सहा महिने बाळाला केवळ स्तनपान केले पाहिजे. तोपर्यंत आईच्या दूधातुन बाळाला पोषण आवश्यक सर्व घटक योग्य प्रमाणात मिळतात. कमीत कमी एक वर्ष तरी प्रत्येक महिलेने बाळाला स्तनपान करावे लागणार आहे. प्रत्येक १२ महिन्याच्या स्तनपानाने ४.३० टक्के स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. तर तेरा महिन्याहून अधिक बाळाला स्तनपान केल्यास अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका ६३ टक्यांनी कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रत्येक नव्या आईला स्तनपानासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी नवजात बालक असलेल्या मातेला घरी, दवाखान्यात व सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यासाठी योग्य सोय व सुरक्षित ठिकाण उपलब्ध केले पाहिजे. जेणेकरुन आई आपल्या बाळाला निःसंकोचपने स्तनपान करू शकेल.’

आईच्या दुधामध्ये योग्य पोषणमूल्ये असतात. त्यामुळे भावी आयुष्यामध्ये स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्‍तदाब इत्यादी आजारांपासून देखील बाळाचे संरक्षण होते. आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक इतर दुधावर वाढणाऱ्या मुलांच्या तुलनेमध्ये अधिक असतो. स्तनपान करणाऱ्या आईला देखील अनेक फायदे स्तनपानामुळे होतात. त्यामुळे दीर्घकाळ स्तनपान द्यावे. तसेच स्तनाच्या कॅन्सरबाबत विशेष खबरदारी घेऊन तपासणीला प्राधान्य द्यावे.
- डॉ. स्नेहल पाटील, ब्रेस्ट ऑन्कोसर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरातून वाट काढतच त्याने घेतला पहिला श्वास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवारच्या मध्यरात्री पावसाने थैमान घातले असताना पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील २४ वर्षीय रूपाली नाईक यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्या. वीज नसल्याने सर्वत्र अंधार, कोसळणारा पाऊस, रस्ते खचल्याने प्रवासाचा धोका अशा परिस्थितीत रूपाली यांची तळमळ सुरूच होती. कोणत्याही क्षणी तिची प्रसूती होईल, अशी अवस्था असताना पुढचा काहीच मार्ग तिच्या कुटुंबीयांना दिसत नव्हता. अखेर ‘१०८’ ची वैद्यकीय टीम मदतीला धावली आणि महापुरातून वाट काढत रूपालीला सीपीआरमध्ये आणण्यात यश आले. काही वेळातच तिची प्रसूती होऊन मुलगा झाला. महापुरातून वाट काढत हॉस्पिटल गाठलेल्या आईच्या पोटातून बाहेर पडत भर पावसात त्या इवल्याशा जिवाने पहिला श्वास घेतला.

पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे राहणाऱ्या रूपालीच्या मातृत्वाला पुराने चांगलेच आव्हान दिले होते. पावसामुळे रस्ते बंद झाले असताना तसेच मुख्य रस्ताच खचल्याने रूपालीला प्रसववेदना सुरू झाल्या. तिला दवाखान्यापर्यंत कसे पोहोचवायचे अशी चिंता नाईक कुटुंबीयांना लागली. प्राथमिक आरोग्य केंद्रातही पाणी आल्याने वैद्यकीय सेवा ठप्प झाली होती. दिवस भरल्याने तिला सोमवारी रात्री प्रसववेदना सुरू झाल्या. रेस्क्यू टीमला पाचारण केले असता त्यांना पोहोचण्यासाठी चार तासांचा अवधी लागणार अशी स्थिती होती. अशावेळी वैद्यकीय पथकाच्या डॉ. अभिजित देशपांडे यांच्या टीमला माहिती मिळताच त्यांनी वाघवेकडे मोर्चा वळवला. पोर्लेजवळील ओढ्यावर तीन फूट पाणी होते. रूपालीला घेऊन त्यांनी तीन फूट पाण्यातच गाडी पुढे घालून सीपीआरचा रस्ता धरला. दरम्यान, अॅम्ब्युलन्समध्येच रूपालीची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने डॉक्टरांनाही काळजी वाटू लागली. एका क्षणी रस्त्यात गाडी थांबवून प्रसूती करण्याचा विचारही डॉक्टरांच्या पथकाने केला. मात्र रात्रीची वेळ, पावसाचा जोर आणि वाढता गारठा याचा परिणाम प्रसूतीदरम्यान झाल्यास परिस्थिती अधिकच गंभीर होण्याचा धोका ओळखून सीपीआरपर्यंत रूपालीला सुरक्षित आणण्याला महत्त्व देण्यात आले. पुढे हायवेमार्गे उचगांव उड्डाणपूलमार्गे अखेर सोमवारी पहाटे सीपीआरपर्यंत गाडी सुरळीत पोहोचली आणि रूपालीची प्रसूती करण्यात आली. पाच ते सहा तासांच्या पुरातील प्रवासानंतर जन्माला आलेल्या नवजात बाळाच्या जन्माचा आनंदोत्सव मंगळवारी पहाटे सीपीआरमधील सर्व डॉक्टर आणि परिचारिकांनी साजरा केला.
... ..

पूरग्रस्त भागामधील गर्भवतींचे दिवस भरले असतील किंवा त्या नवव्या महिन्याच्या गर्भवती असतील तर त्यांना सुरक्षितस्थळी आणण्यासाठी नातेवाईकांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन त्यांना इमर्जन्सीमधे वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील पूरग्रस्त परिसरात रात्रीच्यावेळी बोट ठेवावी.

डॉ. अभिजीत जाधव, महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरला दिलासा; पुराचे पाणी ओसरू लागले

0
0

पंढरपूर: दोन दिवसांनंतर पंढरपूरमधील पुराचे पाणी आता ओसरू लागले असले तरी अजूनही रस्ते बंद असल्याने शेकडो वाहने पंढरपूरमध्ये अडकून पडली आहेत. उजनी आणि वीर या दोन धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे बुधवारपासून पंढरपूरमधील अनेक भागांत पाणी शिरल्याने शहरातील दीड हजार कुटुंबाना प्रशासनाने विविध ठिकाणी स्थलांतरित करावे लागले होते.

शहरातील घोंगडे गल्ली, रामबाग, सरकारी दवाखाना, जुनी पेठ, आंबेडकरनगरसह आंबाबाई, लखुबाई झोपडपट्टीला पुराचा फटका बसला होता. शहरातून सोलापूर, नगर, बार्शी आणि विजापूरकडे जाणाऱ्या पुलांवर दोन फुटापेक्षा जास्त पाणी असल्याने गेल्या दोन दिवसापासून शेकडो ट्रक व इतर वाहने पंढरपूरमध्ये अडकून पडली होती. आज दुपारपासून पुराचे पाणी झपाट्याने ओसरायला सुरुवात झाल्याने आता शहरात शिरलेल्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. याशिवाय मुख्य मार्गावरील पुलावरील पाणी देखील कमी झाल्याने आज सायंकाळनंतर ठप्प झालेली वाहतूक देखील सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सातारा व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहिल्यास पुढच्या दोन दिवसांत पुराचे पाणी पूर्णपणे ओसरेल, अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच कोल्हापूर, सांगलीत बचावकार्य: CM

0
0

कोल्हापूर: सांगली आणि कोल्हापूरमधील पुरस्थिती अतिशय गंभीर असून पूरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी पंजाब, गोवा, गुजरातमधून एनडीआरएफची अतिरिक्त पथकं मागविण्यात आली आहेत. एनडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या मदतीने पूरग्रस्तांची सुटका करण्यात येत असून अनेक ठिकांनी पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन करतानाच कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरात १८ गावांना पुराचा वेढा पडला असून या पुरामुळे २८ हजार लोक बाधित झाले आहेत. या पुरामुळे कोल्हापुरात चौघांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे ६७ हजार हेक्टर जमिनीवरील पीकं नष्ट झाली असून ऊसालाही धोका निर्माण झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली. तसेच अधिकारी आणि पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं. कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मदतीसाठी पंजाब, गोवा आणि गुजरातमधून एनडीआरएफची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. सांगलीत परिस्थिती अत्यंत गंभीर असून खराब हवामानामुळे सांगली दौरा रद्द करावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


२८ हजार लोक बाधित, ३ हजार घरे पडली

कोल्हापुरात मी स्वत: शिवाजी पुतळ्याजवळ जाऊन रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी केली. तसेच बोटीतून आलेल्या लोकांशी आणि संक्रमण शिबिरात असलेल्या लोकांशीची चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरात पुरामुळे १३० गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे २८ हजार लोक बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार ९२३ लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून ९७ हजार लोकांनी पूरस्थितीचा अंदाज घेऊन स्वत:हून गावं सोडली आहेत. १५२ ठिकाणचे ३८ हजार लोक नातेवाईकांकडे आश्रयाला गेले आहेत. या पुरामुळे कोल्हापुरात ३ हजार ८१३ घरे पडली आहेत. ८९ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. कोल्हापूरमध्ये पुरात ४ जणांचा मृत्यू झाला आहेत. त्यात दोघांचा पुरात तर इतर दोघांचा झाड अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती देतानाच ६० बोटींच्या सहाय्याने बचावकार्य सुरू असून एअर लिफ्टिंगही करण्यात येत असल्याचं ते म्हणाले.


२ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

पूर परिस्थितीमुळे २ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे. तो कसा चालू करता येईल यावरही विचार सुरू आहे. तसेच पाणी ओसरल्यानंतर दोन तासांत वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी अधिक कुमक पुरविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच आवश्यक औषधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गरज भासल्यास हवाई मार्गाने औषधे पुरवली जाणार असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर, सांगली या ठिकाणी सध्या पेट्रोल डिझेलची टंचाई आहे. ज्या ठिकाणी पूरस्थिती अधिक आहे, तिथे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सर्वात आधी करण्यात येणार आहे. शुक्रवारपर्यंत महामार्ग खुला झाल्यास पेट्रोल-डिझेल पोहोचवण्यात येईल. अन्यथा दुसरा पर्याय विचारात घेतला जाईल, या संदर्भात पेट्रोलियम मंत्र्यांशीही चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी

0
0

कोल्हापूर/मुंबई:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई पाहणी करून कोल्हापुरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. तसंच त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी संपर्क साधला आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक्स पाणी सोडण्याची तयारी येडियुरप्पांनी दर्शवली आहे. त्यामुळे सांगलीतील पूरस्थिती आटोक्यात येणार आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला. राज्यातील पूरस्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन शहांनी त्यांना दिले आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थिती गंभीर असून, बचावकार्यासाठी पंजाब, गोवा आणि गुजरातमधून एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफ, लष्कर, नौदलाच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. पूरस्थिती अतिशय गंभीर असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन होते. मदतकार्य आणि बचावकार्याचा आढावा घेत त्यांनी पूरग्रस्तांची विचारपूसही केली. शिवाजी पूल येथे त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर कल्याणी हॉल येथील शिबिराला भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली.




अमित शहा, बी. एस. येडियुरप्पांशी चर्चा

कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक्स पाणी सोडण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे सांगलीतील परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. याशिवाय फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही संपर्क साधला आहे. महाराष्ट्रातील पूरस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करायला तयार आहोत, असं आश्वासन शहा यांनी फडणवीस यांना दिले आहे.

महाजनादेश यात्रेतील कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील अखेरच्या दिवसाचे म्हणजेच, शुक्रवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, फडणवीस आज गुरुवारीच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. त्यांनी हवाई पाहणी करून कोल्हापुरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. 'मूळ नियोजनानुसार महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा शुक्रवारी संपणार होता. त्या दिवशी धुळे व नंदूरबार जिल्ह्यात कार्यक्रम नियोजित होते. तथापि, राज्याच्या काही जिल्ह्यांतील पूरस्थिती लक्षात घेऊन मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारीच मुख्यमंत्र्यांनी अकोला येथून महाजनादेश यात्रेतून मुंबईकडे प्रयाण केले. बुधवारी त्यांनी पूरग्रस्त जिल्ह्यातील मदतकार्याचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गुरुवारी सकाळी त्यांनी कोल्हापुरात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत,' अशी माहिती यात्रा प्रमुख सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केविलवाणे चेहरे, आर्त विनवणी... कोल्हा'पूर'ची आँखो देखी

0
0

कोल्हापूर: नजर जाईल तिकडे लाल भडक गढूळ पाणी... सणकून येणाऱ्या पावसाच्या सरीसोबत वाढणारी पाणीपातळी... प्रवाहात बुडालेल्या झाडांच्या दिसणाऱ्या काही फांद्या... निम्मी बुडालेली दोन व तीन मजली घरे आणि त्यामध्ये अडकलेली माणसं... त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रचंड भीतीची छाया... बोट येईल आणि आपल्याला सुरक्षितस्थळी नेईल असे चिमुकल्यांना सांगणारी आई... आम्हाला वाचवा असे म्हणत हात जोडून होणारी आर्त विनवणी... लहान मुलांचे केविलवाणे चेहरे... वाहत जाणारी मृत जनावरे... एनडीआरएफ, सैन्यदलाच्या बोटीकडे लागलेल्या नजरा... सुरक्षित बाहेर पडण्याची लागलेली आस.... आंबेवाडी आणि प्रयाग चिखली परिसरातील हे हृदयद्रावक चित्र.

सकाळी ७ वाजल्यापासूनच भारतीय नौदल, एनडीआरएफच्या बोटी आंबेवाडी व प्रयाग चिखलीकडे रवाना झाल्या. पुलावर पोलिस अधिकाऱ्यांसह खासदार संभाजीराजे, आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते ठाण मांडून होते. वारा, पाऊस याची तमा न बागळता सैनिकांना लागेल ती मदत पुरवत ते मदतीचा हात देत होते. पंचगंगेच्या कवेत आलेल्या चिखली आणि आंबेवाडी या दोन्ही गावातील परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. त्यामुळे बोटीतून महिला व लहान मुले सुखरूप शिवाजी पुलावर येताच परिस्थितीचे गांभीर्य दिसत होते. त्यांचे चेहरेच या जीवघेण्या परिस्थितीची साक्ष देत होते. दोन्ही गावात अजूनही दीड दोन हजारावर माणसं घरात अडकून पडली आहेत, त्यांना लवकर बाहेर काढा, असं बाहेर आलेल्या प्रत्येक महिला सांगत होत्या. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एनडीआरएफच्या बोटीत बसून आम्ही आंबेवाडीच्या दिशेने निघालो. पंचगंगा नदीच्या प्रवाहात जाताच पाण्याच्या जोरदार लाटांनी बोट हेलकावे खाऊ लागली. वीस ते पंचवीस फूट पाणी, ते देखील जोरात वाहणारे, तयार होणाऱ्या लाटा, नजर जाईल तिकडे दिसणारे पाणीच पाणी.. धडकी भरेल अशी स्थिती.

बोट वडणगे फाट्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर गेली आणि पंचगंगेचे रौद्र रूप आणखी वाढल्याचे दिसू लागले. पेट्रोल पंप पूर्णपणे बुडाला होता. पंपाला लागून असलेल्या मंगल कार्यालयाचे वरचे केवळ छत दिसत होते. रस्ता नेमका कोणता हे कळायला मार्ग नाही अशी स्थिती. अंदाज घेत एनडीआरएफचे जवान बोट चालवत होते. पण तरीही अंदाज चुकत होता. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह अधिक असायचा. यामुळे बोट हेलकावे खायची. पेट्रोल पंपाच्या पुढे जाताच टेलिफोनच्या खांबाला बोट धडकली. आमच्या मनात धस्स झाले. काळजी करू नका, आपण सुरक्षित परत येऊ म्हणत जवानाने आम्हाला धीर दिला. आमच्या मागे नौसेनेचे जवान होते. दहा बारा जवान मागे असल्याने त्यांचाच आम्हाला आधार वाटत होता. काही झालेच तर आमचा जीव वाचवण्यास हे सैनिक धावून येतील याची खात्री होती. त्यामुळे प्रचंड प्रवाहातही मार्ग काढत आमची बोट पुढे जात होती.

प्रवाहाची तीव्रता अधिक असल्याने बोटीचा वेगही कमी होत होता. आंबेवाडीत पोहोचलो. तेथील पेट्रोल पंपही पाण्यात होता. शेजारीच तीन मजली इमारत होती. तिसऱ्या मजल्यावर दोन महिला व एक युवती सुटका व्हावी म्हणून प्रतीक्षा करत होती. त्याच्या शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर दोन माणसे, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा म्हणत हाक मारत होते. आख्ख्या आंबेवाडीत प्रत्येक इमारतीवर हीच स्थिती होती. प्रत्येकाला तेथून लवकर बाहेर यायचे होते. अडकलेल्यांची संख्या तीन हजारात होती. एका बोटीत एका फेरीत दहा ते बारा माणसेच बसू शकत होते. बोट घराजवळ आली की, आम्ही उडी मारून बसतो, पण आम्हाला आधी बाहेर काढा म्हणत प्रत्येकजण हात जोडून विनंती करत होता. महिला आणि लहान मुलांना प्राधान्य देत त्यांना बोटीत घेतले जात होते. चिखलीतून सर्वांना सोनतळीवर हलवण्यात येत होते. भुकेल्या पोटी सुरू असलेली आर्त विनवणी ह्रदयाला पिळ घालत होती. लहान मुलांचे कोमजलेले चेहरे, जीव वाचवण्यासाठी धडपडणारी जनावरे, पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणारी भटकी कुत्री, प्रवाहात वाहणारी मृत जनावरे सारेच चित्र भयंकर. अंगावर काटा आणणारे. कमी न होणारा पावसाचा मारा तरीही भिजलेल्या अंगापेक्षा प्रत्येकाला काळजी ती पुराच्या वेढ्यातून सुटण्याची.

आंबेवाडीतील प्रत्येकाला सकाळपासूनच सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी जवान प्रयत्न करत होते. भर पावसातही देखील मोहीम थांबली नव्हती. प्रयाग चिखलीची अवस्था अतिशय बिकट. पन्हाळा रस्त्यावरून आत वळताच प्रत्येक इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेले नागरिक दिसत होते. जो तो आपली सुटका व्हावी यासाठी विनंती करत होता. प्रत्येकाला तातडीने या जीवघेण्या पुरातून बाहेर पडायचे होते. त्यांना जवान धीर देत होते. ‘आपको निकालेंगे, फिकर मत करो’ असे म्हणत त्यांचे बचावकार्य अव्याहतपणे सुरूच होते.

70590903

‘जोपर्यंत शक्य होते, तोपर्यंत चिखलीत जनावरांची काळजी घेतली. पण पूर ओसरणार नाही याची खात्री झाल्यानंतर सकाळी सर्व जनावरे सोडून दिली. जे जगतील ते आपले म्हणत आम्ही गाव सोडले. काही जनावरे आमच्या नजरेसमोरून वाहून गेली. जिवापाड प्रेम असतानाही त्यांना भयंकर स्थितीत सोडून आम्ही आमचे प्राण वाचवले.
- अरूण मांगलेकर, प्रयाग चिखली

70590942

‘प्रयाग चिखलीत पुरात अडकलेल्यांची संख्या मोठी आहे. जवान सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक व्यक्ती आणि संस्थांकडून मदत सुरू आहे. सर्वांना जेवण, औषधे पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गावात प्रचंड भितीची छाया आहे. प्रत्येकजण लवकर सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे.
- अनिल आंबी, प्रयाग चिखली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग पाचव्या दिवशीही कोल्हापूर ठप्प, महापुराचा धोका कायम

0
0

कोल्हापूर: महापुरामुळे आज सलग पाचव्या दिवशी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ठप्प होता. सैन्यदलासह एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य करत पुरात अडकलेल्या ९७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने महापुराचा धोका कायम आहे. सर्व मार्ग पाण्याखाली असल्याने एसटीच्या आगारांमधील एकही बस रस्त्यांवर धावू शकली नाही. दरम्यान, अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गेल्या २४ तासात चंदगड तालुक्यात सर्वाधिक २६५ मिमी पाऊस पडला. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी या तालुक्यांमधील धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम होता. बुधवारी सायंकाळी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले होते. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने रात्री उशिरा पुन्हा पाच दरवाजे उघडले, तर मुख्य दरवाजे दोन फुटाने उचलले. धरणातून एकूण १३११२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी राजाराम बंधारा येथे पुराची पातळी ५३ फूट १० इंच एवढी होती. जिल्ह्यातील २३३ गावात पूर असून, १८ गावांना पुराचा वेढा आहे. २० हजार ९३३ कुटुंबांना पुराचा धोका पोहोचला आहे. सैन्यदल व एनडीआरएफच्या ४२५ जवानांनी गेल्या तीन दिवसात ९७ हजार १०२ पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हवलवे. गुरुवारी दिवसभर प्रयाग चिखली, आंबेवाडी, शिरोळ येथे बचावकार्य सुरू होते. गेल्या चार दिवसात अतिवृष्टी आणि झाडे पडून जिल्ह्यात चार लोक दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरासह जिल्ह्यात १५२ ठिकाणी पूरग्रस्तांची राहण्याची सोय केली आहे. जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी जेवण, पाणी यासह अंथरुण-पांघरूनही पोहोचवले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी शिवाजी पूल येथून पूरबाधित परिसराची पाहणी केली. याशिवाय न्यू पॅलेस याथील पूरग्रस्तांची विचारपूसही केली. महापुरामुळे सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प होती. एसटीच्या १२ आगारांमधील एकही बस धावू शकली नाही. रेल्वे सेवाही कोलमडून पडली आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-अहमदाबाद आणि कोल्हापूर-बेंगळुरू या रेल्वे रद्द केल्या आहेत. तिरुपती-कोल्हापूर, बेंगळुरू-कोल्हापूर या रेल्वे मिरजपर्यंत धावणार आहेत. सोलापूर-कोल्हापूर ही गाडीही मिरजपर्यंत धावणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली विमानसेवा गुरुवारी सुरू झाली. अलाएन्स एअर कंपनीचे विमान हैदराबादहून कोल्हापूरला पोहोचले. बेंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू राहिली.

70591116

पाणी ओसरण्यास सुरुवात

पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली, मात्र याची गती खूपच कमी आहे. दोन दिवसात केवळ अडीच फूट पाणी ओसरले. शहरातील कसबा बावडा, बापट कॅम्प, जाधववाडी, कदमवाडी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी येथील पाण्याची पातळी कमी होत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास शुक्रवारी पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

70591117

बचावकार्यातील जवानांची संख्या - ४२५
बोटी - ६०
पाण्याखालील रस्ते - १५८
महामार्ग - १
राज्यमार्ग - २९
प्रमुख जिल्हामार्ग - ५६
इतर जिल्हामार्ग - ३७
ग्रामीण मार्ग - ३५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरः बचावकार्यात तरुणाईचा पुढाकार

0
0

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात महापुराने थैमान घातले आहे. ज्या ठिकाणी पाणी येण्याची सूतराम शक्यता नव्हती, अशा ठिकाणी पाच ते सहा फूट पाणी आल्याने अनेक नागरिक महापुरात अडकले. अशा वेळी प्रशासनाच्या पोकळ दाव्यांवर अवलंबून न राहता कोल्हापूरची तरुणाई रस्त्यावर उतरली आणि बचावकार्य सुरू केले. कुणी तराफा तयार केला, कुणी रिक्षाचा हूड उलटा करून त्यात टायर ट्यूब ठेवल्या, एवढेच काय स्मशानभूमीतून वाहून आलेल्या काठ्यांचा तराफा आणि वल्हे तयार करून वृद्ध, महिला आणि मुलांना पुरातून बाहेर काढले.

रविवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले होते. हे पाणी हळूहळू वाढत होते. जामदार क्लब, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, रमणमळा, जाधववाडी, शाहूपुरी अशा भागांत रविवारी पाणी आले होते. हे पाणी वाढत जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले. तेथून ते वाढत नागाळा पार्कातील केव्हीज पार्क, न्यू पॅलेस परिसर, कसबा बावडा आदी भागांत घुसले. मंगळवारी सकाळी या परिसरात वेगाने पाणी वाढू लागले. खानविलकर पेट्रोल पंप, नागाळा पार्क, महावीर कॉलेज आदी परिसरात अनेक मोठी हॉस्पिटल्स आहेत. जोरदार पाऊस असूनही जिल्हा प्रशासन केवळ महापालिकेच्या अग्निशमन दलावर अवलंबून होते. कोल्हापूर आणि आसपासच्या गावांत भयंकर परिस्थिती असतानाही एनडीआरएफला बोलवायला दोन दिवस गेले. त्यामुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागला.

70591709
पुराचे वेगाने पाणी वाढत असताना लोकांना मदत मिळत नव्हती. अशा वेळी धावली ती तरुणाई. काही तरुणांनी वृद्धांना पाठकुळी बसवून बाहेर काढले. अनेकांच्या गाड्या बाहेर काढल्या. रिक्षाचे हूड उलटे करून त्यात ट्यूब ठेवल्या. त्यातून महिला आणि वृद्धांना बाहेर काढले. चार ते पाच फूट पाण्यातून चालताना पाय भरून येत असतानाही अखंड काम सुरू होते. चालणे अशक्य झाल्यानंतर काठीच्या आधाराने पोहत जात नागरिकांना बाहेर काढले जात होते. केव्हीज पार्क येथून स्मशानभूमी जवळ असल्याने तेथून वाहून आलेल्या काठ्या जमा करून टायर ट्यूबच्या सहाय्याने तराफा तयार केला. या तराफ्यावर साहित्य ठेवून नागरिकांना बाहेर काढले. अनेकजण पाणी वाढणार नाही या आशेवर राहिल्याने तिसऱ्या मजल्यावर थांबून होते. मंगळवारी दुपारी त्यांना बाहेर काढले. अनेकांची दुचाकी वाहने कॉलन्यांमध्ये अडकल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणांनी कपडे सुकविण्यासाठी बांधलेल्या दोऱ्या तोडून गाड्या बांधल्या. अनेक तरुण तळमजल्यावरील साहित्य दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर नेऊन ठेवत होते.

गेले दोन दिवस कोल्हापुरातील तरुण आणि सामाजिक संस्था अखंड बचावकार्य करत आहेत. ज्या ठिकाणी जाणे शक्य आहे, आणि जिथे नागरिक आहेत तेथे खाण्याचे पदार्थ पोहोचवत आहेत. सोशल मीडियावर आपला पत्ता आणि मोबाइल नंबर शेअर करून राहण्यास येण्याचे आवाहन करत आहेत. एकीकडे प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री बचावकार्याचा दावा करत असताना ज्या ठिकाणची माहिती सांगितली जात आहे, तेथील व्हिडिओ शेअर करून पोलखोल केली जात आहे. प्रशासन आपल्या पठडीतील काम करत असताना तरुणाई आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगेच्या पाणी पातळी ८० फुटांवर, कोल्हापूरकर धस्तावले

0
0

राधानगरी: कोल्हापुरात गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातलेले असतानाच धरणांमधूनही पाणी सोडण्यात आल्याने कोल्हापुरात हाहाकार माजला आहे. सातत्या सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ८० फुटापर्यंत गेली आहे. त्यातच राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आल्याने येथील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंचगंगा नदीच्या महापूराच्या पाण्याची पातळी ८० फुटाच्या पुढे गेली आहे. संध्याकाळपर्यंत पावसाने काही अंशी उसंत दिल्यांने महापूर कधी ओसरण्यास सुरुवात होणार, अशी विचारणा आता येथे प्रत्येकजण करीत आहे. दरम्यान, आजही महापूराचे पाणी वाढत असल्यामुळे नागरिकांचे स्थलांतर सुरू होते. अखेर ३३ छावण्यांमध्ये ८ हजार नागरिक दाखल झाले आहेत. तर एकूण स्थलांतरीत नागरिकांच्यी संख्या १२ हजारांच्या पुढे गेली आहे. महापूराचे पाणी वाढत असल्यांने नागरीक धास्तावले आहेत. जेसीबी व डंपरच्या सहाय्याने महापुराच्या पाण्यातून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. महापुराचे पाणी शहरातील नागरी वस्तीत वाढतच असून महापुरात घरांची पडझड होण्यास सुरुवात होत आहे.

पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुख्य दरवाजा आणि स्वयंचलित दरवाजातून १३ हजार क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. हळदी, सडोली, राशिवडे, भोगावती येथे रस्त्यावर पाण्याची स्थिती जैसे थे असल्याने हे सर्वच मार्ग बंद आहेत. तालुक्यातील केळुशी खुर्द येथे गावाशेजारी असणाऱ्या म्हाळुंगी नावाच्या शेतातील डोंगराचा काही भाग खचला असून भात, ऊसशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगराला मोठ्या भेगा पडल्या आहेत. या प्रकाराने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापुरात ज्या ठिकाणी पाणी येण्याची सूतराम शक्यता नव्हती अशा ठिकाणी पाच ते सहा फूट पाणी आल्याने अनेक नागरिक महापुरात अडकले. अशा वेळी प्रशासनाच्या पोकळ दाव्यांवर अवलंबून न राहता कोल्हापूरची तरुणाई रस्त्यावर उतरली आणि बचावकार्य सुरू केले. कुणी तराफा तयार केला, कुणी रिक्षाचा हूड उलटा करून त्यात टायर ट्यूब ठेवल्या, एवढेच काय स्मशानभूमीतून वाहून आलेल्या काठ्यांचा तराफा आणि वल्हे तयार करून वृद्ध, महिला आणि मुलांना पुरातून बाहेर काढले. रविवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले होते. हे पाणी हळू हळू वाढत होते. जामदार क्लब, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, रमणमळा, जाधववाडी, शाहूपुरी अशा भागांत रविवारी पाणी आले होते. हे पाणी वाढत जावून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले. तेथून ते वाढत नागाळा पार्कातील केव्हीज पार्क, न्यू पॅलेस परिसर, कसबा बावडा आदी भागांत घुसले. मंगळवारी सकाळी या परिसरात वेगाने पाणी वाढू लागले. खानविलकर पेट्रोल पंप, नागाळा पार्क, महावीर कॉलेज आदी परिसरात अनेक मोठी हॉस्पिटल्स आहेत. जोरदार पाऊस असूनही जिल्हा प्रशासन केवळ महापालिकेच्या अग्निशमन दलावर अवलंबून होते. कोल्हापूर आणि आसपासच्या गावांत भयंकर परिस्थिती असतानाही एनडीआरएफला बोलवायला दोन दिवस गेले. त्यामुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागला.

पुराचे वेगाने पाणी वाढत असताना लोकांना मदत मिळत नव्हती. अशा वेळी धावली ती तरुणाई. काही तरुणांनी वृद्धांना पाठीवर बसवून बाहेर काढले. अनेकांच्या गाड्या बाहेर काढल्या. रिक्षाचे हूड उलटे करून त्यात ट्यूब ठेवल्या. त्यातून महिला आणि वृद्धांना बाहेर काढले. चार ते पाच फूट पाण्यातून चालताना पाय भरून येत असतानाही अखंड काम सुरू होते. चालणे अशक्य झाल्यानंतर काठीच्या आधाराने पोहत जात नागरिकांना बाहेर काढले जात होते. केव्हीज पार्क येथून स्मशानभूमी जवळ असल्याने तेथून वाहून आलेल्या काठ्या जमा करून टायर ट्यूबच्या सहाय्याने तराफा तयार केला. या तराफ्यावर साहित्य ठेवून नागरिकांना बाहेर काढले. अनेकजण पाणी वाढणार नाही या आशेवर राहिल्याने तिसऱ्या मजल्यावर थांबून होते. मंगळवारी दुपारी त्यांना बाहेर काढले. अनेकांची दुचाकी वाहने कॉलन्यांमध्ये अडकल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणांनी कपडे सुकविण्यासाठी बांधलेल्या दोऱ्या तोडून गाड्या बांधल्या. अनेक तरुण तळमजल्यावरील साहित्य दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर नेऊन ठेवत होते.

गेले दोन दिवस कोल्हापुरातील तरुण आणि सामाजिक संस्था अखंड बचावकार्य करत आहेत. ज्या ठिकाणी जाणे शक्य आहे, आणि जिथे नागरिक आहेत तेथे खाण्याचे पदार्थ पोहोचवत आहेत. सोशल मीडियावर आपला पत्ता आणि मोबाइल नंबर शेअर करून राहण्यास येण्याचे आवाहन करत आहेत. एकीकडे प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री बचावकार्याचा दावा करत असताना ज्या ठिकाणची माहिती सांगितली जात आहे, तेथील व्हिडिओ शेअर करून पोलखोल केली जात आहे. प्रशासन आपल्या पठडीतील काम करत असताना तरुणाई आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवत आहे.

अनेक यंत्रमाग कारखान्यामध्ये महापूराचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आज दिवसभरात मदतीचा ओघ कायम राहिला. जेवणाबरोबरच चटई, ब्लँकेट, चारा, पशुखाद्य, वैद्यकीय सेवा देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. शहरात पेट्रोल, घरगुती गॅस सिलींडर यांची टंचाई भासत आहे. अनेक ठिकाणी त्यासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. पाणी टंचाईची वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभमीवर महापूराची तीव्रता कधी कमी होणार, याचीच विचारणा सर्वत्र केली जात आहे. त्यामुळे महापूर ओसरण्याची आस आता शहरवासियांची लागली आहे.

पन्हाळगडवासीयांची कोंडी कायम

पन्हाळ्यावर जाणारा मुख्य रस्ता खचल्यामुळे सध्या सुरू असलेला तात्पुरता पर्यायी रस्ताही खचायला सुरू झाल्यामुळे पन्हाळ्याची पूर्ण कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पन्हाळ्यावर प्रवेश करण्यासाठी असलेला मुख्य रस्ता पूर्णपणे खचल्यामुळे गडावरील दुसरे प्रवेशद्वार म्हणजे तीन दरवाजा या पर्यायी रस्त्याचा वापर केला जात होता. हा रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा असल्यामुळे या रस्त्यावरून फक्त छोटी वाहने जाऊ शकत होती. हा रस्ता गुडे, सोमवार पेठ, इंजोळे, निकमवाडी, राक्षी, वाघबीळ या ठिकाणी जातो. निकमवाडीजवळ हा रस्ताही खचू लागल्याने पन्हाळागडाचा संपर्क पूर्णपणे तुटण्याची शक्यता आहे. गडावर जाण्यासाठी असलेला हा एकमेव मार्ग बंद झाला तर गडावरील रहिवाशांची मोठीच कोंडी होणार आहे. शिवाय तालुक्याची सरकारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील खडेखोळ या गावचा मुख्य रस्ता जवळपास आठ ते नऊ फूट खचला आहे. गडावरून खाली मंगळवार पेठ गावामध्ये जाण्यासाठी असलेली पायवाटही आज दरड कोसळल्याने बंद झाली आहे.

गडहिंग्लजमध्ये ४८ गावांचा संपर्क तुटला

आठवडाभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडहिंग्लज तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, हिरण्यकेशी नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे ४८ गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील आठ गावांतून ९३६ कुटुंबांना व ५६० जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे.

गडहिंग्लजच्या इतिहासात हिरण्यकेशी नदीने पहिल्यांदाच आपले रौद्र रूप धारण केले असून, गडहिंग्लज शहरासह दुंडगे, जरळी, हेब्बाळ, हिटणी, आरळगुंडी, नांगनूर, ऐनापूर, भडगावसह अनेक गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. नागरिकांना सुरक्षेच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. गडहिंग्लज शहरातील काळू मास्‍तर विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय व वि. दि. शिंदे हायस्कूल येथे बाधितांना ठेवले आहे. आपत्ती व्यवस्थापन, गडहिंग्लज नगरपालिका व अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या भोजनाची सोय केली आहे.

हिरण्यकेशी नदीकाठच्या अनेक गावांत नदीचे पाणी घुसले असून, खेड्यातील अवस्था खूपच गंभीर आहे. वीज प्रवाह बंद पडला आहे. संपर्क माध्यमे तुटलेली आहे. गावातील बाधितांनाही सुरक्षित ठिकाणी त्यांच्या त्यांच्या जनावरांसह हलविण्यात आले आहे. सद्य:स्थितीत पावसाने जोर लावल्यामुळे पुराचे पाणी ओसरण्याचे प्रमाण अत्यंत मंदगतीने आहे.

गगनबावड्यात जोर ओसरला

गगनबावड्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थिती कायम आहे. पुराचे पाणी हळूहळू कमी होत आहे. रात्रीपासून सुमारे पाच फुटाने पाण्याची पातळी कमी झाली आहे. मात्र, तालुक्यात अद्याप वीजपुरवठा खंडित असून, मोबाइल सेवाही ठप्प आहे. परिणामी तालुक्यात संपर्क होऊ शकत नाही. टेकवाडीतील काही पुरुष मंडळींनी बाहेर येण्यास नकार दिल्याने तेथेच आहेत.

चार दिवस थैमान घातलेल्या पावसाचा बुधवारी रात्रीपासून जोर थोडा कमी झाला. मात्र, गुरुवारी दिवसभर रिपरिप चालूच राहिली. तालुक्यात गेल्या चोवीस तासांत १२४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात वीज व मोबाइल सेवा बंद असल्याने कोणाशीही संपर्क होऊ शकत नाही. तालुक्याच्या ठिकाणी सकाळी अकराच्या सुमारास मोबाइल सेवा थोड्या वेळासाठी सुरू होती. प्रशासनाने पूरग्रस्त गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. दिवसभर वीज व मोबाइल सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तहसीलदार कोडे यांनी सांगितले.

पुराच्या पाण्याने वेढा दिलेल्या टेकवाडी गावातील महिला व काही पुरुषांना तिसंगी शाळेत स्थलांतरित केले आहे. तिसंगीच्या ग्रामस्थांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. टेकवाडीतील काही ग्रामस्थांनी बाहेर येण्यास नकार दिल्याने ते तेथेच राहिले आहेत. साळवण, असळज व कळे बाजारपेठेमधील पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील सर्वच नागरिक सुरक्षित आहेत. बाहेरगावी असलेल्या गावातील काहींनी मेसेज व्हायरल करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. पण गावातील एका व्यक्तीने उंच ठिकाणी येऊन सर्वच ग्रामस्थ सुखरूप असल्याची माहिती फोन करून दिल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. धामणी खोरा अद्यापही संपर्कहीन आहे.

हातकणंगलेत पूरस्थिती जैसे थे

पंचगंगा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ महापुरांची धोका पातळी ओलांडून नदीकाठावरील हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीसह जुने पारगाव, जुने चावरे, घुणकी, रांगोळी, इंगळी या गावांना महापुराचा विळखा अधिकच घट्ट बसल्याने अख्खी गावेच स्थलांतरित करण्यात आली. खोची, भादोले, किणी, भेंडवडे, लाटवडे, जुने पारगाव, रुई, हुपरी, आदी गावांतील काही भागात पुराचे आल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, निलेवाडीत जनावरांसाठी राहिलेल्या शंभरभर नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत लवकरच बाहेर काढणार असल्याचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनी सांगितले.

गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रशासने निलेवाडी गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी महसूल विभाग, आर्मी, पोलिस दलाने शर्तीचे प्रयत्न करून सहाशेहून अधिक कुटुंबातील नागरिकांना आपत्कालीन यांत्रिक स्पीड बोटीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे काम दिवस-रात्र सुरू होते. अजूनही जनावरांच्या देखरेखीसाठी शंभरभर नागरिक तेथे अडकून आहेत. त्यांना प्रशासनाने विनंत्या केल्या पण ते काही बाहेर आलेले नाहीत. या नागरिकांना शुक्रवारी सकाळी सक्त सूचना देऊन जनावरांसह बाहेर काढण्यात येणार आहे. इंगळी गावाला स्थलांतरित करण्यात प्रशासनाला यश आले असून, त्यांना हुपरीसह परिसरातील शाळेत वास्तव्य करून देण्यात आले आहे. रांगोळी गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला असून सत्तर टक्के गाव पाण्याने व्यापलेले असून पाण्याची पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

तालुक्यातील स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्तांना अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय नेतेमंडळी, तरुण मंडळे, दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून राहण्याची व जेवणाची तसेच जनावरांच्या साठी चारा-पाण्याची सोय उपलब्ध केली आहे. सध्या तालुक्यातील पंचगंगा व वारणा नदीकाठावरील पूरस्थिती जैसे थे असून, प्रशासनाने नियोजनबद्ध काम केल्यामुळे अडचणी निर्माण होत नसल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले.

आरेत तीन बोटींसह आर्मी पथक दाखल

करवीर तालुक्यातील आरे गावाला सोमवारी रात्रीपासून पुराचा वेढा पडला होता. ग्रामस्थांनी एकमेकांना मदत करत अंधाऱ्या रात्रीतून कशीबशी सुटका करून घेण्यात यश मिळविले. कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या मदतीशिवाय सर्वांची बचावासाठी धावाधाव सुरू होती. संपूर्ण गावातील लोक धनगरवाडी वसाहतीत बाहेर पडले. अखेर गुरुवारी तीन बोटींसह आर्मी पथक गावात दाखल झाले. गावातील दोन कुटुंबे अत्यंत धोकादायक स्थितीत घरात अडकलेली होती. आर्मी पथकाने त्यांची सुटका केली.

मुसळधार पाऊस आणि भोगावती व तुळशी नद्यांना आलेल्या महापुरामुळे सोमवारी रात्री करवीर तालुक्यातील आरे गाव पुराच्या पाण्यात बुडाले गेले. झपाट्याने वाढलेल्या पुराच्या तडाख्यातून बचाव करण्यासाठी एकच पळापळ सुरू झाली आणि त्यातूनच आरे ग्रामस्थांचा सोमवारी रात्री सात ते मंगळवारी सकाळी सात हा बारा तासांचा चित्तथरारक प्रवास अंधाऱ्या रात्रीत सुरू होता. कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या मदतीशिवाय गावातील युवक, ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने सहा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने रात्रभर गावातील लोकांना घरातील साहित्यासह बाहेर काढण्याचे काम सुरू ठेवले होते. त्यानंतर सर्व जनावरांनाही बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते. गेले दोन दिवस ग्रामस्थ एकमेकांना मदत करत परिस्थितीचा सामना करत होते. बुधवारी सायंकाळनंतर आणि गुरुवारी गावातील पाणीपातळी थोडी कमी झाली होती. उशिरा का होईना, पण गुरुवारी तीन बोटींसह आर्मी पथक दाखल झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. या पथकाने अडचणीत असलेल्या सर्वांची मदत करण्याचे काम केले. पुराच्या तडाख्यातून गावातील अनेक घरांची पडझड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरीतील विद्यालयात १५० पूरग्रस्त

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शाहपुरी कुंभार गल्लीसह दुसरी आणि तिसरी गल्ली तसेच सुतारवाडा परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना शाहूपुरी पहिल्या गल्लीतील तात्यासाहेब मोहिते विद्यालयात (अंबाबाई विद्यालय) १५० जण आश्रय घेत आहेत. लहान मुले, वयस्कर मंडळी, एकत्र कुटुंब असलेल्या मंडळींना येथे आणले आहे. गेले पाच दिवस त्यांचा या केंद्रात मुक्काम आहे.

व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी पहिल्या गल्लीपासून ते सहाव्या गल्लीपर्यंत पाणी पसरले आहे. कुंभार गल्लीचा परिसर पाण्याखाली गेला आहे. सुतारवाडा परिसरातील ४० कुटुंबातील ५० हून अधिक या ठिकाणी आहेत. दरवर्षी पूर येण्याची भीती असलेल्या कुंभार गल्ली, पहिल्या गल्लीसह लक्ष्मीपुरीतील नाल्याचा काही येथे येतो. या भागातील ८० हून अधिक कुटुंबे संसारोपयोगी साहित्य घेऊन याठिकाणी आश्रयाला आले आहे. विद्यालयाच्या पहिल्या तळमजल्यावरील चार खोल्या, पहिल्या मजल्यावरील चार खोल्या आणि समोरील काही भागात पूरग्रस्तांची व्यवस्था केली आहे. एका खोलीत दहा ते बारा लोकांना ठेवले आहे. ५ ऑगस्ट रोजी अंबाबाई विद्यालयात ३५ पूरग्रस्त होते. नंतर दिवसेंदिवस ही संख्या वाढत गेली. गुरुवारी सकाळी येथील एक दहा वर्षांचा मुलगा आजारी पडल्याने कुटुंबाची धावपळ उडाली. महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेने तत्काळ दखल घेऊन त्या मुलावर उपचार केले. दरम्यान या विद्यालयात दोनवेळा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याची नोंद घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा कायम ठेवला. शाहूपुरी परिसरातील काही सामाजिक संस्था, संघटनांनी या ठिकाणी मदतकार्य सुरु केले आहे.

शाहुपूरी सहाव्या गल्लीत पाणी आल्याने आम्ही तात्यासाहेब मोहिते विद्यालयात आश्रय घेतला आहे. या ठिकाणी सामाजिक संस्था, स्थानिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मोलाची मदत मिळत आहे. माणुसकीचे दर्शन या ठिकाणी घडत आहे.

- मदन शेलार, पूरग्रस्त

अन्नाची नासाडी नको

येथे नागरिकांना भोजनाची सोय होण्यासाठी समर्थ ग्रुपने रजिस्टर तयार केले आहे. ग्रुपतर्फे त्यांना दररोज नाष्टा आणि भोजन दिले जाते. त्यासह दानशूरांकडून दिली जाणाऱ्या मदत स्वीकारली जाते. अन्न्नाची नासाडी होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे' असे अमर समर्थ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेवर सहा हजार वाहने अडकली

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पुणे-बेंगळुरू महामार्गावर पुराचे पाणी आल्याने सातारा ते कागल यांदरम्यान सहा हजारांहून अधिक मालवाहू ट्रक, अवजड वाहने अडकली आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून महामार्गावरील वाहतूक थांबली आहे. या मार्गावर विविध संस्था, संघटनांनी मदतकार्य सुरू केले आहे. गेले चार दिवस त्यांचा मुक्काम परिसरातील महामार्गालगतच्या काही मंदिरांत आणि सभागृहात आहे.

शिवाजी पुलावर पाणी आल्याने पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहने रविवारी रात्रीपासून रस्त्यावरच थांबून आहेत. दूध, धान्य आणि भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. पंचगंगा नदीचे पाण्यात झपाट्याने वाढ झाल्याने सांगली फाटा, पंचगंगा नदीवरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. पाण्याचा जोर वाढल्याने पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली. जम्मू-कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत मालवाहतूक करणारी दोन हजारांहून अधिक मालवाहू वाहने रोडवर थांबली आहेत. आंध्र प्रदेशमधील पर्यटकांची एक बस अडकली आहे. त्यामध्ये ४० प्रवासी आहेत.

महामार्गावरील वाहतूक बंद झाल्याने सातारा ते कागल यांदरम्यान रस्त्यावर असलेली सर्व वाहने जागा मिळेल तिथे थांबली. बहुतांश वाहने पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि लॉजच्या परिसरात थांबवली आहेत. यात सुमारे पाच हजार ट्रकचा समावेश आहे. धान्य, भाजीपाला, सिमेंट, स्टील, इंधन यांसह काही दुधाचे टँकरही महामार्गावर थांबून आहेत. खासगी ट्रॅव्हल्सही अडकल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रवाशांनी कणेरी मठात आश्रय घेतला, तर महामार्गावरील सर्वच लॉजमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. महामार्गावर गर्दी होऊन आपत्कालीन वाहनांना अडथळे येऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. जोपर्यंत पुराचे पाणी ओसरत नाही, तोपर्यंत वाहतुक सुरू न करण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला. त्यामुळे मोठ्या रांगा लागल्या आहेत.

महामार्ग वाहतूक पोलिसांकडून दिवसभरात चार ते पाच वेळा यामार्गावर पेट्रोलिंग सुरू आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी अद्याप पाणी आहे. किणी टोलनाका येथे वारणा नदीचे आणि कराड तालुक्यातील वाठार येथे कृष्णा नदीच्या पुराचे पाणी आल्याने वाहतूक थांबविली आहे.

मदतकार्य सुरु

राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेलपासून ते कागलपर्यंत जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, शिरोली नागाव ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे मदत कार्य सुरू आहे. ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चपाती भाजी, खिचडी देण्यात आली. शिरोली नागाव ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलभूषण कोळी यांनी मदतकार्य केले. उचगाव येथील दत्त मंदिरात जयभवानी ट्रान्स्पोर्टचे अजित माने यांनी निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अशी केली आंबेवाडीच्या गावकऱ्यांची सुटका

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पुराचे पाणी कापत तब्बल आठवड्यानंतर येणारी लष्कराची बोट शिवाजी पुलावर येत असताना जवानांकडून 'भारत माता की, जय', 'वंदे मातरम', 'जय बोले सो निहाल, सत् श्री आकाल'चा घोष सुरू झाला. बोटीतून पाण्यात भिजलेले, कुडकुडत गावकरी बाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावरील भीती पुराची भयानकता स्पष्ट दिसत होती. महिलांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आपण वाचलो तरी महापुरात काय भोगले? याची भावना स्पष्ट करत होती. भेदरलेल्या मुलांच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. शिवाजी पुलावर पाय ठेवताच लष्कर, नाविक दल आणि एनडीआरपी विषयी कृतज्ञता व्यक्त करणारे निशब्द भावना 'भय इथे संपत नाही' हेच सांगून जात होते.

शहरासह ग्रामीण भागातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडीतील नागरिक वाचवण्यासाठी प्रशासनाकडे मदत याचना करत होते. गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफ, आर्मी, नाविक दलाच्या बोटी आणि जवान कोल्हापुरात दाखल झाल्यावर बचाव मोहीम सुरू करण्यात आली. आर्मीच्या लोखंडी बोटी आणि एनडीआरफच्या स्पीड बोटींकडून आंबेवाडीत तर नाविक दल, आर्मी, एनडीआरएफकडून चिखली ते सोनतळी मोहीम सुरू ठेवली आहे.

आज, गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता आर्मीच्या चार बोटींनी शिवाजी पुलावरुन मोहिमेस प्रारंभ केला. त्यांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी, महसूल, पोलिस, होमगार्ड आणि एनजीओ सज्ज होते. मुसळधार पावसात बोटी पाण्यात सोडल्या. सव्वासात वाजण्याच्या सुमारास दोन बोटींतून आंबेवाडीतील पुरात अडकलेल्या नागरिकांची पहिली तुकडी दाखल झाली. चेहऱ्यावर भीती असलेल्या नागरिकांनी शिवाजी पूल परिसरात पाऊल टाकल्यावर सुटकेची भावना व्यक्त केली. महिला, मुलांचे रडणे सुरूच होते. वृद्ध पुरुष आणि महिलांची पावले जड झाली होती. त्यांना जवान आधार दिला जात होता. भेदरलेली लहान मुले आपल्या भावडांचे हात घट्ट धरुन बाहेर येत होती. महिला, लहान मुलांना बोटींतून उचलून बाहेर काढण्यात आले. आजारी रुग्णांना रुग्णवाहिकेतून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नागरिकांना नेण्यासाठी टेम्पोची व्यवस्था केली होती. तर गर्भवती महिलांना चालकाशेजारी बसविले जात होते. केएमटीने यासाठी बसची सोय करण्यात आली आहे.

नागरिकांना सोडल्यानंतर परत बोटी आंबेवाडीकडे जात होत्या. पूरग्रस्तांना परत घेऊन आलेल्या बोटीतील जवानांकडून जयघोष करण्यात येत होता. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत चारशेहून अधिक लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले. महिला, वृद्ध, रुग्ण, लहान मुलांना सर्वात प्रथम बाहेर काढण्यात येत असून सर्वात शेवटी पुरुष आणि युवकांना बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

अशी आखली मोहीम

आंबेवाडी आणि चिखलीचा मार्ग आखताना अधिकारी व जवानांनी प्रथम पाण्याचा प्रवाह तपासला. दोन्ही गावात जाताना विजांच्या खांबांना ब्लायंडर आणि रिफ्लेक्टर लावण्यात आले. चिखलीजवळ पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चिखली ते सोनतळी अशी मोहीम राबवण्यात येत आहे. आंबेवाडीतून पूरग्रस्तांना कोल्हापुरात आणले जात आहे. बोटीत बसलेल्या प्रत्येक जवानांना लाइफ जॅकेट तर पूरग्रस्तांनाही लाइफजॅकेट घालूनच बोटीत बसवले जात होते. बोटीची क्षमता १६ असली तरी वृद्ध, लहान मुले अशा ३० जणांना आणले गेले. बोटीत नागरिकांची संख्या जास्त असल्याने परत येताना वेगही कमी करण्यात येत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरभर पाणी मात्र पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव अशी स्थिती कोल्हापुरात उद्भवली आहे. महापुरामुळे, महापालिकेचा पाणी पुरवठा गेल्या पाच दिवसापासून बंद आहे. यामुळे शहरांतर्गत पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांनी पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात केली आहे. साठविलेले पाणी उकळून तहान भागवित आहेत. दरम्यान शिवाजी विद्यापीठ, विविध संस्था, संघटना नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. वीस लिटरचे जार, पाण्याच्या बाटल्या वितरित करत आहेत.

पालिकेचा पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांनी पाणी बचतीचे फंडे शोधले. पावसाच्या पाण्याची साठवणूक व त्याचा पिण्यासाठी वापर सुरू केला. साठवलेले पाणी उकळून पिण्यासाठी व स्वयंपाकीसाठी वापरले जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ घरोघरी पाहावयास मिळत आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे लक्षात येताच काही वॉटर एटीएम सेंटरने अव्वाच्या सव्वा दराने पाणी विक्री सुरू केली. एरव्ही दहा रुपयेला वीस लिटर पाणी मिळायचे. महापुराच्या कालावधीत काही विक्रेत्यांनी दुप्पट दराने पाण्याची विक्री केली. अन्य ठिकाणाहून वाहतूक करुन प्रक्रिया केलेले पाणी नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्याची कामगिरी काही विक्रेत्यांनी पार पाडली.

दरम्यान शहरातील विविध संस्था, सामाजिक संघटनांनी लोकांची गरज ओळखून आपल्याकडील पाणीसाठा खुला केला. शिवाजी विद्यापीठाने, गुरुवारपासून नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले. नागरिकांनी येताना कॅन घेऊन यावे असे आवाहन प्रशासनाला विद्यापीठ प्रशासनाने केले. विद्यापीठ परिसरातील नागरिकांची यामुळे सोय झाली. राधानगरी रोड आपटेनगर येथील भिवसे कार वॉश अँड पॉलिशतर्फे पिण्यासाठी मोफत पाणी उपलब्ध करुन दिले.

मार्केट यार्ड येथेही समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या निवासाची, भोजनाची सोय केली आहे. तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केल्याचे जितू शहा यांनी सांगितले. युवासेनेतर्फे ५०० पिण्याचे बॉक्स नागरिकांना वितरित केले. आंबेवाडी, सीपीआर, विठ्ठल मंदिर उत्तरेश्वर पेठ, वाघाची तालीम येथे पिण्याच्या पाण्याचे बॉक्स वितरीत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनेवाडी टोलनाक्यावर शुकशुकाट

0
0

आनेवाडी टोलनाक्यावर शुकशुकाट

सातारा :

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील हद्दीत सुमारे आठशे ते नऊशे विविध प्रकारची चार चाकी अवजड वाहने तसेच आराम गाड्या अडकून पडल्या आहेत. या वाहन चालक, क्लीनर व इतर प्रवाशांना निवारा व अन्न-पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली आहे. काही अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केंद्र उभारली नाहीत. सेना दल, जिल्हा प्रशासन, पोलिस दल, स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा भार उचलला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पूरस्थिस्तीच्या पार्श्वभूमीवर पूर ओसरू लागल्यानंतर गुरुवारी कराडला भेट दिली. सध्या आनेवाडी व तासावडे येथील टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ नसल्यामुळे टोल वसूल करणाऱ्या कामगारांची मोठी कपात झाली आहे.

..........

वाईत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करा, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने बळीराजाकडे सहानुभूतीपूर्वक पाहवे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर आस्मानी संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतीच्या नुकसानीची, घरांच्या पडझडींची, वाहून गेलेल्या म्होऱ्यांची, भात शेतीची पाहणी करून पंचनामे त्वरित करून वाई तालुक्याच्या पश्चिम भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

.......

तरुण वाहून गेला

सातारा :

बुधवारी केसुर्डी येथे एक तरुण मोटारसायलवरून ओढ्यावरचा पूल ओलांडत असताना वाहून गेला. सतीश सोमा कचरे (वय ४५), असे त्याचे नाव आहे. सतीश कचरे याने लोकांच्या समोरच नायगाव-केसुर्डी ओढ्यावरील पूराच्या पाण्यात गाडी घातली. मात्र, पाण्याच्या प्रवाहाला वेग अधिक असल्‍याने पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर सतीश वाहून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कराडमध्ये पूर ओसरला; धावपळ वाढली

0
0

\Bकराडमध्ये \Bपूर ओसरला; धावपळ वाढली

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड आणि पाटण परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाने थोडीशी उघडीप दिल्यामुळे कृष्णा-कोयना नदी पात्रातील पाणीपातळी कमी होत आहे. कराडला महापुराने वेढले होते, मात्र, पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. आकाश ही पांढरे शुभ्र दिसू लागले आहे. त्यामुळे लोकांनी आता सुटकेचा निस्वास सोडला आहे. या नैसर्गिक आपत्तीपासून आपली सुटका होईल, अशी अशा पूरग्रस्त व्यक्त करीत आहेत.

कराड नगरपालिका, महसूल विभाग आणि पोलिस दल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून दिवस-रात्र मेहनत घेऊन पूरग्रस्तांसाठी अथक प्रयत्न करीत आहेत. महापुराच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना स्थलांतर करावे लागले, अशा लोकांची कराडमधील स्वयंसेवा संस्था व प्रशासनाने चांगली काळजी घेतली. स्थलांतरित कुटुंबीयांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. पुराचे पाणी कमी होऊ लागल्यावर आता त्यांना घरी परत जाण्याची आस लागली आहे.

कोयनेतून विसर्ग कमी केला

बुधवारपासून जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात पावासाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे १६ फुटांवर उघडण्यात आलेले कोयना धरणाचे दरवाजे गुरुवारी आठ फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे बुधवारी रात्री नऊ वाजता धरणातून १ लाख २३ हजार ८२३ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. गुरुवारी विसर्ग कमी करून ६९ हजार ७५ क्युसेक करण्यात आले. कराड आणि पाटण तालुक्यातील कोयना आणि कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कराड तालुक्यातील पूरस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली. कोयना, धोम, कण्हेर, तारळी, उरमोडी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, या धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पूरचा फटका कोयना काठच्या पाटण, नावडी, तांबवे या गावांसह कराड शहराला बसला आहे. कृष्णा नदीकाठी असणाऱ्या कार्वे, आटके, दुशेरे, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, बेलवडे बुद्रुक, मालखेड, वाठार आदी गावांना बसला आहे.

कृष्णा आणि कोयना काठावरील कराड आणि पाटण तालुक्यातील सात हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोल्हापूरहून हेलिकॉप्टरने येऊन पूरबाधित झालेल्या गावांची हवाई पाहणी केली. कराड शहरातील प्रितीसंगम परिसर, कार्वे, दुशेरे, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, मालखेड वाठार आदी गावांची पाहणी त्यांनी केली.

पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत

कराड : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतने मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केले आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती ही गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस कराड दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीचे हवाई सर्वेक्षण आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या ठिकाणांना भेट दिली. पूरग्रस्तांच्या निवारा शिबिरामध्ये जाऊन त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

बचावकार्याची अवस्था

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्ड आदींच्या टीम कार्यरत आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण २२ मदत पथके कार्यरत असून, त्यामध्ये एनडीआरफ ५, नेव्ही १४, कोस्टगार्ड १, आर्मी कॉलम १, एसडीआरएफ १ आदींचा समावेश आहे. सांगलीमध्ये एकूण ११ पथके कार्यरत असून, त्यामध्ये एनडीआरएफ ८, कोस्टगार्ड २, आणि आर्मी १ आदींचा समावेश आहे. मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून, पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली असून, कोल्हापूर व सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत. तसेच त्यातील एक पथक पुण्यात कार्यरत आहे. कोस्टगार्डची आणखी दोन पथके कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची पाच व एसडीआरएफची दोन पथके सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ टीम मागविण्यात आल्या असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष रेल्वे गाडी

कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहतूक विस्कळित झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रताप गंगावणे यांना मातृशोक

0
0

प्रताप गंगावणे यांना मातृशोक

सातारा :

स्वराज्य रक्षक शंभूराजे, या बहुचर्चित मालिकेचे संवाद-पटकथा लेखक प्रताप गंगावणे यांच्या मातोश्री आणि मेजर जयसिंगराव गंगावणे यांच्या पत्नी बायनाबाई (सोनके, ता. कोरेगाव) यांचे वयाच्या ८३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री निधन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्यावर संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात प्रताप व प्रवीण ही दोन मुले, सुना नातवंडे, असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

LIVE: कोल्हापूर, सांगलीत अतिवृष्टीचा इशारा

0
0

कोल्हापूर/सांगली/पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम असून राज्यात आतापर्यंत महापुरामुळं २८ जणांचा जीव गेला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं आज (९ ऑगस्ट ) पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.

>> जाणून घ्या LIVE अपडेट्स:

...अशी केली आंबेवाडीच्या गावकऱ्यांची सुटका

>> हवाइमार्गे जाणे शक्य न झाल्याने बचावपथके रस्तामार्गे रवाना. सर्व पथकांना सांगलीपर्यंत ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून देण्यात आला

>> सांगलीतील बचावकार्यासाठी नौदलाची आणखी १२ पथके रात्री मुंबईहून रवाना

>> पुणे: खडकवासला धरणातून मुठा नदीत अवघे ८५६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठची स्थिती पूर्वपदावर

>> पुणे: टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांच्या परिसरात पावसाचा जोर कमी

>>सामाजिक संस्थांमार्फत नाष्टा, जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे
70598704


>> सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुखही पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात पोहोचणार

>>शिरोळीत सहा फूट पाणी; पुणे- बंदळूरु महामार्ग बंद

>>कोल्हापूर: चारही बाजूंनी पाण्यानं वेढलेल्या खिद्रापूर गावात प्रशासनाची मदत नाही; २००० नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत

>>सांगली: पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मध्यरात्री सांगलीत दाखल

>> कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अद्याप घट नाहीच, पातळी ५७.८ फुटांवरकोल्हापूर: चारही बाजूंनी पाण्यानं वेढलेल्या खिद्रापूर गावात प्रशासनाची मदत नाही; २००० नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत

'राधानगरी'चे ४ दरवाजे उघडले; कोल्हापूर अजूनही पुरात

>>कोल्हापूर: पंचगंगा नदीच्या पातळीत २ फुटांनी घट, पाण्याची पातळी घटल्यानं बचाव कार्यांना वेग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: पूरपाहणीवेळी मंत्री महाजन सेल्फीत गुंग

0
0

कोल्हापूर/सांगली:

कोल्हापूर, सांगली, सातारासह पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांवर महापुराचं महासंकट कोसळलं आहे. नौदल, लष्कर आणि एनडीआरएफसह पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी स्वतःला बचावकार्यात झोकून दिलं आहे. असं असताना कोल्हापुरात बचाव पथकासोबत पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेले मंत्री गिरीश महाजन पूरस्थितीतही बोटीत बसून सेल्फी काढण्यात गुंग असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसंच मदत न मिळाल्यानं सांगलीतील पूरग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला असून, त्यांनी महाजनांना घेराव घातला आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना अतिवृष्टीमुळं पुराचा फटका बसला आहे. घरांमध्ये पाणी घुसून प्रचंड नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी नौदल, लष्कर आणि एनडीआरएफसह पोलीस विभागातील कर्मचारी-अधिकारीही दिवस-रात्र कार्यरत आहेत. अशा वेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बचाव पथकासोबत गेलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सेल्फी काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळं विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.



कार्यकर्त्यानं काढला व्हिडिओ

कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना कार्यकर्त्यानं हा व्हिडिओ काढला आहे. बचाव पथकाच्या बोटीमध्ये महाजनांसोबत हा कार्यकर्ताही होता, असं सांगितलं जातं. पूरग्रस्त भागाची पाहणी करताना कार्यकर्ता मोबाइलद्वारे चित्रण करत होता. पण महाजन यांनी त्याला रोखलं नाही. या व्हिडिओत महाजनही 'स्माइल' देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

सांगलीत महाजनांना पूरग्रस्तांचा घेराव

सांगलीलाही पुराचा वेढा आहे. राज्याचे मंत्री महाजन हे पूरग्रस्त सांगलीवाडीत आज पोहोचले. तेथील परिस्थितीचा आणि मदतकार्याचा आढावा घेतला. मदत पोहोचली नसल्यानं पूरग्रस्तांनी संताप व्यक्त करत महाजन यांना घेराव घातला. आम्हाला मदत कधी मिळणार असा जाब त्यांनी महाजन यांना विचारला. सर्वांपर्यंत मदत पोहोचवण्यास प्राधान्य दिलं जात आहे. सर्वांना मदत देण्याचे प्रयत्न आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे. पुरातून बाहेर काढलेल्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. आरोग्याच्या दृष्टीनंही खबरदारी घेतली जात आहे. रोगराई पसरू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. औषधं, डॉक्टरांच्या पथकांना पाचारण करण्यात आलं आहे, असं महाजन यांनी सांगितलं.

सेल्फी व्हिडिओवर स्पष्टीकरण

पूरग्रस्त भागाची पाहणी करताना अनेक जण सेल्फी काढण्यासाठी आग्रह करत असतात. किती जणांना थांबवणार असा प्रश्न पडतो. सेल्फी व्हिडिओ काढताना मी हात पुढे करून थांबवण्याचा प्रयत्नही केला. आम्ही येथे मदतीसाठी आलो आहोत. पूरग्रस्तांना मदत देण्यास आमचे प्राधान्य आहे. उगाच कुणीही कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करू नये. सांगलीतील शेवटच्या माणसाला पुरातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरमध्ये ट्रकच्या धडकेत तिघे ठार

0
0

कोल्हापूर: शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर-कोकरूड मार्गावरील पेरीड येथे गुरुवारी दुपारी ट्रक आणि मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन तरूण जागीच ठार झाले. अमर वसंत कदम (वय १८), दीपक मारुती कदम (वय १८) आणि अजय कृष्णा बिळासकर (वय १९) अशी मृतांची नावे असून हे तिघेही शाहुवाडी तालुक्यातील अमेणी पैकी खोंगेवाडी येथील रहिवासी आहेत.

अतिवृष्टीमुळे गावात वीज पुरवठा खंडित असल्याने मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी अमर, दीपक आणि अजय हे तिघेही गुरुवारी दुपारी मलकापूरला निघाले होते. यावेळी यावेळी बांबू भरून कराडकडे निघालेला ट्रक (एमएच ०९ एल ७५९८) आणि त्यांच्या मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच तिन्ही मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर या तिघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले असून रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे तिघेही मलकापुरातील श्रीमान ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होते. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images