Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पालिकेसाठी ७५० अर्ज

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी झुंबडच उडाली. अखेरच्या टप्प्यात उमेदवारांची पळवा-पळवी टाळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या याद्या शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवल्या.

खंडणी मागणा-यांवर कारवाईची मागणी

$
0
0
चंदगड तालुक्यातील कार्वे येथील टिंबर व्यावसायिक अर्जुन पटेल व त्यांची मुले जयंतीलाल आणि मणीलाल यांच्याकडे चाळीस लाखाच्या खंडणीची मागणी करत मारहाण करणा-या खंडणीबहाद्दर अशोक गावडे (रा.वाळकोली) व साथीदारांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघातर्फे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली.

टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

$
0
0
बोरपाडळे-कोडोली रस्त्यावर बोरपाडळे येथे टेम्पो आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत मोटरसायकलस्वार संभाजी बाळासो चौगले-पाटील (वय ३७, रा. बोरपाडळे ता. पन्हाळा) हे जागीच ठार झाले.

पंचगंगा नदीला प्रदूषणमुक्त करा

$
0
0
पंचगंगा नदी पात्र केंदाळमुक्त आणि प्रदुषणमुक्त व्हावे यासाठी मंगळवारी यशोदा पुलावर शहर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भर पावसात सुमारे अर्धा तास झालेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र-कर्नाटक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

चंदगडला पावसाची उसंत; शेतीकामांना गती

$
0
0
मागील आठवडाभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीकामे खोळंबली होती. आज दिवसभर पावसाची उघड झाप सुरु असल्याने शेतीच्या कामांना गती आली आहे. चंदगड तहसिल कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसर मंगळवारी दिवसभरात २९ मि.मी. तर आजपर्यंत ४८६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

सातवेत बाटली आडवी

$
0
0
सातवे (ता. पन्हाळा) येथे मंगळवारी झालेल्या दारूबंदी मतदानासाठी महिलांनी १५२४ भरघोस मते टाकून दारूची बाटली आडवी केली आणि गेले दोन महिने केवळ पन्हाळा तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दारूबंदीवर शिक्कामोर्तब केले. गावातील महिलांच्या निश्चयाचा विजय झाला.

विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

$
0
0
सासरच्या जाचाला कंटाळून रेश्मा प्रभाकर पाटील (रा. आमशी, करवीर) या विवाहितेने मंगळवारी विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

सीरियल किलरकडून चार खून

$
0
0
शहरातील चार भिकाऱ्यांचे डोक्यात दगड घालून खून झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र त्यापूर्वीच्या तीन बेवारसांचा मृत्यू हा उंचावरून खाली पडून झाल्याची शक्यता आहे.

आणखी एका तरुणाला डेंगीची लागण

$
0
0
संभाजीनगर एन.सी.सी. ऑफीस जवळील सुशांत देवेंद्र कुलकर्णी (वय २१) या तरूणाला डेंगीची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्याच्यावर १६ जूनपासून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

जान्हवी सराटे यांना समर्थन मानवी हक्क पुरस्कार

$
0
0
विविध सामाजिक समस्यांना वाचा फोडून उपेक्षितांच्या मूलभूत हक्कांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांना मुंबईतील समर्थन संस्थेतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘सम‌र्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार जान्हवी सराटे यांना जाहीर झाला आहे.

सहा बंधारे पाण्याखाली

$
0
0
मंगळवारी दिवसभरात पावासाचा जोर थोडा ओसरला असला तरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नऊ मार्ग अंशतः बंद करण्यात आले आहेत, पाच मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे.

मुलाच्या खुनाची आईकडून सुपारी

$
0
0
दारू पिऊन रोज मारहाण व छळणाऱ्या मुलाच्या खुनाची सुपारी आईनेच दिल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी पोलिसांच्या तपासात उघडकीस आली.

फुलपाखरे आकर्षित करण्यासाठी...

$
0
0
पर्यावरणाच्या सुदृढतेचे लक्षण असणाऱ्या फुलपाखरांचे संवर्धन करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नांची गरज आहे. फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या वनस्पतींची अधिक जाणीवपूर्वक लागवड केली जावी.

घरकामाचा गाडा ओढत दहावीतही आघाडी

$
0
0
आई-वडिलांचे छत्र हरपलेले, शिरावर ओझे घरकामाचे आणि मनावर दारिद्र्यावर मात करण्यासाठी दहावीत चांगले मार्क मिळवण्याचे. शेवटी मनाचाच विजय झाला. शुभांगीने पहाटे तीन वाजता अभ्यास करून दहावीत ९१.०९ टक्के मार्क मिळवले.

विद्यार्थी मुकणार फी सवलतीला

$
0
0
इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेतंर्गत मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सादर करावयाची नॉन क्रिमिलेअर, डोमिसाईल दाखले वेळीच उपलब्ध न झाल्याने संबंधित अनेक विद्यार्थ्यांना आता खुल्या गटातून प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.

राजोपाध्येनगरात पोस्ट ऑफिस सुरू

$
0
0
उपनगरांसह परिसरातील ग्रामीण भागाला पोस्ट ऑफिसचा लाभ घेता येईल. पोस्ट खात्याची विश्वासार्हता हेच आमचे भांडवल आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी राजोपाध्येनगरात पोस्ट कार्यालय सज्ज असल्याचे प्रवर डाक अधीक्षक डी. व्ही. ठकार यांनी सांगितले.

सरकारी कर्मचा-यांची टोलविरोधात निदर्शने

$
0
0
शहरातंर्गत रस्त्यांचा विकास करणे ही महापालिकेची व सरकारची जबाबदारी असताना खाजगीकरणाच्या माध्यमातून केलेल्या रस्त्यांच्या प्रकल्पाला विरोध दर्शवत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

शिराळ्यात पावसाचा जोर ओसरला

$
0
0
शिराळा तालुक्यात सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. चांदोली धरण परिसरात गेल्या चोवीस तासांत ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत ६०.१५ मिलीमीटर एकूण पाऊस पडला आहे.

सोलापूरकडे पावसाने पाठ फिरवली

$
0
0
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. पेरण्या सुरू आहेत. पण, दुष्काळात सर्वाधिक होरपळलेल्या सोलापूरवर मात्र अद्याप वरूण राजाची कृपा झालेली नाही. मात्र, पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी पाऊणेपाच 'टीएमसी'ने वाढली आहे.

उत्तराखंडमधील साता-याचे ७० यात्रेकरू सुरक्षित

$
0
0
उत्तर भारतात पावसाच्या थैमानामुळे आणि केदारनाथ, रुद्रप्रयाग येथे झालेल्या तुफानी ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील ७० प्रवासी सुरक्षित आहेत. चारधाम, केदारनाथ तसेच बद्रिनाथच्या यात्रेला गेलेल्या या यात्रेकरूंशी संपर्क झाला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images