Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

Live: कोल्हापुरात पूरपरिस्थिती; जनजीवन विस्कळीत

0
0

कोल्हापूर: मुसाळधार पावसाने शहरात थैमान घातले आहे. धरणांतून होणारा विसर्ग आणि नद्यांनी धारण केलेल्या रुद्रावतारामुळे पुराच्या पाण्याने निम्मे शहर व्यापले आहे. कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दूध, भाजीपाला, पेट्रोलसह अन्य अत्यावश्यक सुविधांवर परिणाम झाला असून वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे.

>> जाणून घ्या लाइव्ह अपडेट्स

>> महापुरामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक ठप्प

>> गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी दाखल; जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

>> कोल्हापूर पाण्याखाली...



>> पूरग्रस्तांना स्वच्छ पिण्याचे पाणी आणि जेवण देण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

>> मुख्यमंत्र्यांकडून पूरपरिस्थीतीचा आढावा; पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याचे आदेश

>> पूरग्रस्त कोल्हापुरला दिलासा; राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद

>> डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजसमोर साचले पाणी
70566370

>> कोल्हापुरातील पूरस्थिती बिकट; ५१ हजार कुटुंबांचं स्थलांतर

>> शहरांतील १२ पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपले; वाहनचालकांचे हाल

>> बचावकार्य करताना उलटली बोट



>> महापुराच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी भारतीय नौसेनेचे पथक दाखल
70566275


>> कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

>> महापुराच्या तडाख्याने पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई

>> शहरातील अनेक भागांत घुसले पुराचे पाणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'तुझ्यात जीव रंगला'च्या कलाकारांना सुरक्षित स्थळी हलवले

0
0

कोल्हापूरः कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, कलाकारांनाही याचा फटका बसला आहे. कोल्हापूर येथे चित्रिकरण सुरू असलेल्या 'तुझ्यात जीव रंगला'च्या कलाकारांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे चित्रिकरण कोल्हापूरमध्ये सुरू आहे. या मालिकेची टीम नागाळा पार्क येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. मात्र, कोल्हापूरमधील पूर परिस्थिती गंभीर झाली. त्यातच ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्या भागातील पुराचे पाणी वाढल्याने हार्दिक जोशी (राणादा), अक्षया देवधर (पाठक बाई), धनश्री काडगावकर (वहिनी), यांच्यासह अन्य कलाकारांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या कलाकारांना सुरक्षित स्थळी हलवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पुराच्या पाण्यातून वाट काढत जाताना ही सगळी कलाकार मंडळी दिसत आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर, सांगलीत हाहाकार, नौदल, लष्कर आणि एनडीआरएफची पथकं दाखल

0
0

कोल्हापूर: गेल्या १३ दिवासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्यात पूर आल्याने या चारही जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. पूर आणि पाऊस यामुळे या चारही जिह्यातील गावांचा संपर्क तुटला असून येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या चारही जिल्ह्यातील हजारो लोकांचं युद्धपातळीवर पुनर्वसन करण्यात आलं असून इतरही पूरग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे जवान आणि नौदलाचं पथक कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत दाखल झालं आहे. गोव्याहूनही एनडीआरएफची चार पथकं कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाली आहेत. येत्या तीन दिवसांत सांगली आणि कोल्हापूरमध्ये अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी नौदलाच्या दोन विमानातून एका बोटींसह २२ जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह कोल्हापुरात दाखल झाले. सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. काल जिल्ह्यातील २०४ गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. काल रात्री लष्कराचे एक पथक दोन बोटींसह तसेच एनडीआरएफचे आणखी एक पथक चार बोटींसह कोल्हापुरात दाखल झाले. परंतु महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे त्यांनाही मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या. आज पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह ही पथकं रवाना झाली. तर कोल्हापुरात दोन बोटींच्या सहाय्याने बचावकार्य करण्यात येत आहे. आज सकाळी नौदलाच्या दोन विमानांमधून एका बोटीसह २२ जणांचे पथकही कोल्हापुरात दाखल झाले. त्याशिवाय मुंबई-पुण्याहून नौदलाच्या १४ बोटीही कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. प्रयाग-चिखलीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरू करण्यात आली आहे. कोल्हापुरात एकूण २०४ गावांना पूराचा फटका बसला आहे. काल या गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांमधील ५१ हजार ७८५ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येत आहेत. प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.

उद्या-परवा शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी याबाबत आज आदेश जारी केला आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थिती याचा विचार करून यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतरही जिल्ह्यातील पूरस्थिती कायम राहिल्याने ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अजूनही अतिवृष्टी आणि पूरस्थिती कायम असल्यामुळे आता ८ आणि ९ ऑगस्ट रोजी येथील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, शैक्षणिक आस्थापना आणखी दोन दिवस बंद राहणार आहेत.

पेट्रोलचा तुटवडा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहेत. गावांना पूराचा वेढा पडला असून रस्तेही पाण्याखाली गेल्याने इतर गावं आणि जिल्ह्यांशी कोल्हापूरचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कोल्हापुरात पेट्रोल, डिझेलचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. सीबीएस परिसरातील ३, कावळा नाक्यावरील २, पार्वती टॉकीज परिसरातील ३, कसबा बावड्यातील ३ आणि राजारामपुरीतील एक अशा शहरातील सर्व १२ पंपांवरील पेट्रोल संपल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत.

सांगलीतही दाणादाण

सांगलीतही पावसाने थैमान घातल्याने येथील जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे. सांगलीत महापुराने बुधवारी सकाळी २००५च्या सर्वोच्च पूर पातळीचा रेकॉर्ड मोडला. आयर्विन पुलाजवळ बुधवारी सकाळी ५५ फूट पाणी पातळीची नोंद झाली. चौदा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३.९ फूट इतकी पाणी पातळी होती, या महापुराने निम्मे शहर पाण्याखाली गेले आहे. जिल्ह्यातील ७५००० हून अधिक नागरिक बाधित झाले असून १३० गावांचा संपर्क तुटला आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज. एनडीआएफ, आर्मीच्या जवानांकडून मदतकार्य सुरू आहे. वाळवा तालुक्यातील बिचूद, रेठरे हरणाक्ष, बोरगाव, ताकारी, वाळवा, भिलवडी, औदुंबर येथे हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगलीत पावसाचा जोर कमी असला तरी कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सांगलीला धोका कायम आहे.

उजनी धरण भरले

दरम्यान, धुवांधार बरसणाऱ्या पावसामुळे सोलापूरमधील उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. हे धरण शंभर टक्के भरल्याने त्यातून १,२०,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात अफवांना ऊत

कोल्हापूर, सांगलीपाठोपाठ पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील नद्या, नाले तसेच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मावळातही पावसाचा जोर वाढला असून पवना धरण पुन्हा ९८ टक्के भरल्याने पवना धरणातून ९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पवना नदीवरील काही पूल पुन्हा पाण्याखाली गेले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला. दरम्यान, मात्र या कालावधीत धरण फुटले, रस्ता खचला तसेच पूल कोसळला असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे. तसेच आवश्यक माहिती तसेच खात्रीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाला ( ०२० २६१२६२९६ ) या तसेच व्हॉटस्अॅप क्रमांक ८९७५२८३१०० यावर संपर्क साधावा. खोटी माहिती पसरवून घबराट निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही वेंकटेशम यांनी दिला आहे.

साताऱ्यात सहा गावांचा संपर्क तुटला

साताऱ्यातही पूरस्थिती कायम असल्याने येथील सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पूरस्थितीमुळे साताऱ्यातील काही शाळा आजही बंद ठेवण्यात आल्या आहेत. साताऱ्यातही शेकडो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून या ठिकाणीही मदतकार्य मोठ्याप्रमाणावर सुरू आहे.

कोल्हा'पूर' स्थिती

>> कसबा बावड्यात डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज परिसरही पाण्याखाली गेला आहे. त्र्यंबोली कॉलनी, पद्मा चौक, लाइन बाजार परिसरातील शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

>> भगवा चौक ते लाइन बाजार रसत्यावरील वाहतूक बंद करणयात आली आहे.

>> शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, नागाळा पार्कात हजारो लोक पुरात अडकले आहेत.

>> न्यू पॅलेसच्या मेन गेटपर्यंत पाणी आले आहे. त्यामुळे पॅलेसचा प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे. अंतरंग हॉस्पिटल गल्लीतून मुख्य रस्त्यावर पाणी आले असून शेकडो वाहने पाण्यात बुडाली आहेत. अनेक नागरिक, महिला पुरात अडकले आहेत. स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे.

>> शिरोली येथील पुलाच्या जोडच्या ठिकाणी भेग पडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.

>> व्हिनस कॉर्नर येथे बचावकार्य करताना बोट पलटल्याची घटना घडली. या ठिकाणी अडकलेल्या तीन महिलांना बाहेर काढत असताना अचानक ही बोट पलटली. मात्र बचाव पथकाने वेळीच मदत करत त्यांना सुरक्षितस्थळी हलवले.

>> व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी परिसरात बारा फूट पाणी भरले. अनेकांचे बोटीतून स्थलांतर. स्थानिक तरूण मंडळाचे कार्यकर्ते, महापालिका आणि आपत्तकालीन कक्षातर्फे मदतकार्य सुरू

>> नितवडे मार्गे वाकीघोल (ता.राधानगरी)कडे जाणारा रस्ता एरंडपे (ता.भुदरगड) या गावाजवळ भूस्खलनामुळे खचला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

>> रंकाळ्यातील सांडव्याचे आणि पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी अंबाई टँक आणि फुलेवाडी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये घुसले. बचाव कार्याला सुरवात.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरः पुरामुळे पूलांवर पाणी; वाहतूक ठप्प

0
0

पंढरपूर: पंढरपूरमधील पूरस्थिती सध्या नियंत्रणात असून, शहरातील काही भागात पाणी शिरले आहे. मात्र, या पाण्यामुळे सोलापूरसह अहमदनगर आणि मंगळवेढ्यासह विजापूरकडे जाणाऱ्या पुलांवर पुराचे पाणी आल्याने ही वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. सध्या सोलापूरकडे जाणाऱ्या चंद्रभागा पूल आणि अहिल्या या दोन्ही पुलावर पाणी आल्याने संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली असून, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

दरम्यान पुरामुळे शेतातील उभ्या पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे आश्वसन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज दिले. पालकमंत्र्यांनी पंढरपूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

अहिल्या पुलाशेजारी असलेल्या एका मठात एक वारकरी अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळताच त्याला पोलिसांनी दुसऱ्या इमारतींवर चढून यशस्वीपणे बाहेर काढले. मंगळवेढा मार्गे विजापूर आणि कर्नाटकात जाणारी वाहतूक गोपाळपूर येथील पुलावर पाणी आल्याने बंद झाली. उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग थोडा कमी झाला असून, सध्या शहरातील व्यास नारायण, आंबाबाई, लखुबाई या झोपडपट्टींसह आंबेडकर नगर परिसरात पाणी शिरले. पंढरपूर शहर आणि तालुक्यातून जवळपास ५ हजार कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आले आहे .

गेल्या दोन दिवसांपासून उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरातील काही भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, उजनी धरणातील विसर्ग दीड लाखांवरून १ लाख ३० हजार क्युसेकपर्यंत कमी केला तर वीर धरणातून ९४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या शहरातील काही भागाला पुराचा फटका बसला. विठ्ठल मंदिराच्यावतीने या पूरग्रस्तांना भोजन देण्यात येत असून, शिवसेनेकडून या कुटुंबांना सकाळी नाश्ता दिला.

पुणे आणि सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पंढरपुरावर हे पुराचे संकट ओढवले असून, वीर धरणातून सोडलेले पाणी निरनरसिंगापूर येथे भीमेच्या पात्रात मिसळत आहे. तर, उजनीतून सोडलेले पाणी थेट भीमा नदीत येत आहे. दोन्ही धरणातून सोडण्यात येणार पाण्याचा विसर्ग अडीच लाखांवरून २ लाखापर्यंत कमी होऊ लागल्याने उद्या दिवसभरात पाणी थोडे कमी होण्यास सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कराच्या मदतीने पूरग्रस्तांना बाहेर

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहर, परिसर आणि जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ११०जणांचे लष्कराचे पथक बुधवारी पहाटेपासून सक्रिय झाले. सर्वप्रथम त्यांनी करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, सोनतळी, आंबेवाडीतील पूरग्रस्तांना स्थलांतरीत करण्यास सुरूवात केली. सकाळपासूनच नौसेनेची २२ जणांची टीम बोटीसह बचाव कार्यात सक्रीय आहे. आम्हाला पुराच्या विळख्यातून सोडवा अशी ठिकठिकाणाहून होणारी विनवणी आणि सरकारी मदत तुलनेने अत्यल्प असे चित्र दिवसभर राहिले. त्यामुळे स्थानिक तरुण, स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांना प्रचंड मदत करताना दिसत होते. शेवटी प्रशासन हतबल झाल्याचे चित्र बुधवारी सायंकाळपर्यंत राहिले.

नौदलाच्या दोन विमानांतून एका बोटीसह २२ जणांचे पथक सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह आले. एनडीआरएफचे पथक चार बोटींसह शहरातील पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवित आहेत. मंगळवारी दिवसभर मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रयाग चिखलीला पहाटे बोटीसह पथके रवाना झाली. तेथील पूरग्रस्तांना जुना बुधवार पेठेतील कल्याणी हॉल येथे स्थलांतर करण्यात आले. शहरातील नागाळा पार्क, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्कातील अनेक अपार्टमेंट्समध्ये पाणी घुसले. तेथील पूरगस्तांना मदत करण्यासाठी स्थानिक तरुणांची मोठी मदत झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आल्याने जिल्हा प्रशासनाचे कामकाज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातून सुरू राहिले. पूरस्थिती गंभीर बनल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा प्रशासनाशी सातत्याने संपर्क राहिला. त्यांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंकुमार काटकर कक्षात तळ ठोकून राहिले. दुपारनंतर एनडीआरएफ, लष्कर, नेव्हीचे पथक शहर, करवीर, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तैनात राहिले.

मुख्यमंत्र्याकडून आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून आढावा घेतला. आवश्यक तिथे मुंबईतून वैद्यकीय पथक पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार नरकेही

पुरात अडकले

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांना स्थलांतर करण्यासाठी घटनास्थळी आमदार चंद्रदीप नरके मंगळवारी दिवसभर प्रयत्न करीत राहिले. त्यामुळे त्यांना सायंकाळी उशीर झाला. तेथून बोटीद्वारे बाहेर काढण्यास एनडीआरएफच्या पथकाने अंधारामुळे नकार दिला. तेही काहीकाळ पुराच्या पाण्यात अडकले. कोल्हापुरातील निवासस्थानी पोहोचू शकले नाही. शेवटी त्यांनी वडणगे येथील कार्यकत्यांच्या घरी मुक्काम करून बचाव कार्याची मोहीम गतिमान केली.

जनावरे पुरातच सोडून दिली

आंबेवाडी, प्रयाग चिखलीतून ग्रामस्थांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांची जनावरे आणण्याची सोय नव्हती. परिणामी त्यांनी दोरी कापून २००हून अधिक जनावरांना पुराच्या पाण्यातच सोडून जड अंत:करणाने गाव सोडले. दुपारी तीन वाजेपर्यंत तेथील बहुतांशी पूरगस्तांना बाहेर काढण्यास प्रशासनास यश आले.

कोट

एनडीआरएफ, लष्कर, नेव्हीच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरगस्तांना काढण्याची कार्यवाही सुरू आहे. दुपारपर्यंत जिल्ह्यात २०४ गावे पूरबाधीत झाली आहेत. त्यातील ११ हजार ४३२ कुटुंबांमधील ५१ हजार ७८५ व्यक्तींना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले.

- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर परिस्थितीमुळे पंपावरील पेट्रोल, डिझेल संपले

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या तीन दिवसांपासून पुणे-बेंगळुरू हायवेवरील वाहतूक बंद पडल्याने बुधवारी शहरातील पंपांवरील पेट्रोल - डिझेल संपले. बहुतांश पंप बंद झाल्याने आणि महापूर वाढत असल्याचा धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने रेस्क्यू टीमसाठी उर्वरीत पेट्रोल पंप ताब्यात घेतले. टंचाईमुळे पेट्रोल शोधताना वाहनधारकांची वणवण सुरू राहिली.

सांगली जिल्ह्यातील भिलवडी, हजारवाडी येथील प्रकल्पातून कोल्हापुरातील पेट्रोल आणि डिझेल पंपांना टँकरद्वारे इंधन पुरवठा होतो. कोल्हापूरला येण्याचे काही मार्ग बंद असल्याने पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होणार नसल्याच्या भीतीने मंगळवारी पंपांवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल पंपावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे काही पंपांवर दुपारी पेट्रोल संपले. राजारामपुरी, कावळा नाका, उमा टॉकीज, उद्यमनगर, फुलेवाडी, देवकर पाणंद, पुईखडी रोडवरील पंपांवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी रांग लागल्याने पंपावरील व्यवस्थापन कोलमडले. काही ग्राहकांनी रांगेतून पुढे जाऊन वाहनांत पेट्रोल टाकल्याने वाद झाले.

बुधवारी सकाळ मात्र पेट्रोल, डिझेलचा खडखडाट करूनच उजाडली. कसबा बावड्यातील दोन पंप आणि पोलिस मैदानासमोर असलेल्या पंपावरही पेट्रोल नव्हते. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दाभोळकर कॉर्नरवरील एक, राजीव गांधी पुतळा परिसरातील दोन, कावळा नाक्यावरील दोन पंपातही पेट्रोल नव्हते. त्यामुळे नागरिकांनी राजारामपुरी, बागल चौकापर्यंत धाव घेतली. पार्वती टॉकीज परिसरातील तीन पंपही बंद आहेत.

पेट्रोल संपत आल्याचे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पेट्रोल-डिझेल असोसिएशनला सर्व पंपांतील उर्वरीत इंधनाचा साठा रिझर्व्ह स्टॉक ठेवा अशा सूचना दिल्या. एनडीआरएफसह बचाव पथकांना या पेट्रोलची गरज भासणार आहे. त्यामुळे सर्वसामांन्य नागरिकासांठी इंधन विक्री बंद करावी असे आदेश देण्यात आल्याने पेट्रोल विक्री बंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीनस कॉर्नरवर बारा फूट पाणी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पंचगंगा नदीचा पूर पसरल्याने बुधवारी व्हीनस कॉर्नर परिसर पूर्ण पाण्यात बुडाला. दुपारपर्यंत या परिसरात तब्बल बारा फूट पाणी होते. चौकातील छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा पाण्यात बुडाला. तर शाहूपुरीतील पहिली गल्लीपासून सहाव्या गल्लीपर्यंत पाणी झपाट्याने वाढले. या परिसरातील तब्बल दोन हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अद्याप दोनशेहून अधिक कुटुंबे काही अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर आहेत.

लक्ष्मीपुरी कोंडा ओळ, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरीतील मॉल परिसरात पाणीच पाणी झाले. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला पाण्याच्या वेढा लक्ष्मीपुरी, शाहूपुरीच्या सहावी गल्लीपर्यंत मंडई रोडपासून बागल चौक रोडपर्यंत पसरले. या परिसरातील काही दुकानगाळे बुडाले. पाचशेहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्याच्या अडकली आहे. शाहूपुरीच्या दुसऱ्या गल्लीत सुमारे बारा फूट पाणी आहे. या परिसरातील बहुतांश कुटुंबांना महापालिका आणि स्थानिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षितस्थळी हलविले. पाण्याचा प्रवाह अधिक वाढल्याने पुराच्या पाण्याच्या वेढा शहरातील प्रमुख मार्गांना आहे. जयंती नाला, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, गाडी अड्डा परिसरात मंगळवारी सहा ते सात फूट पाणी होते. बुधवारी त्यात झपाट्याने वाढ झाली. शाहूपुरी कुंभार गल्लीत दहा फूट पाणी होते. व्हीनस कॉर्नर परिसराला मोठे तळ्याचे रुप आले. व्हीनस कॉर्नर, स्टेट बँक ऑफ इंडिया, शाहूपुरी पहिली ते सहावी गल्ली, गवत मंडई परिसराला पाण्याने वेढा दिला आहे. या ठिकाणी सुमारे दहा ते बारा फूट पाणी होते. येथील बैठी घरे, अपार्टमेंट, दुकानगाळे, दवाखान्यांचा पहिला मजला पाण्याखाली गेला. सहाव्या गल्लीतून पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने मदतकार्य करण्यात स्थानिक नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या. शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील रुकडे चेंबर्समधून दोन रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

दसरा चौक, लक्ष्मीपुरी टायटन शोरुम, कोंडा ओळ, बसंत बहार रोड परिसर पाण्याखाली बुडाला. या रस्त्यावर सुमारे पाच फूट पाणी होते. शाहूपुरीच्या सहाव्या गल्लीपर्यंत पाणी येणार नसल्याचा अनेकांना खात्री होती. मात्र पाणी झपाट्याने वाढल्याने या परिसरातील रहिवाशांची मोठी तारांबळ उडाली. काही अपार्टमेंटमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली.

शाहुपूरी कुंभार गल्लीतही सुमारे दोन हजारांहून गणेशमूर्ती पाण्यात बुडाल्या. परिसरातील काही रहिवाशी अपार्टमेंटमध्ये थांबून होते. त्यांना बुधवारी सकाळपासून दोन बोटींच्या सहायाने बाहेर काढण्याचे काम सुरू होते. रात्री उशीरापर्यंत घरात पाणी येण्याची धाकधूक रहिवाशांच्या मनात राहिली. शाहूपूरीच्या रस्त्यावरुन नदीच वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले. या ठिकाणी गुडघाभर पाण्यातून काही रहिवाशांची धोकादायक पद्धतीने ये-जा सुरू राहिली. काहींनी बेसमेंटमध्ये साचलेले पाणी जनरेटरच्या सहायाने बाहेर काढण्याचे काम सुरू केले. मात्र प्रत्येक तासाला पाण्याची पातळी वाढत होती. काहींनी कुटुंबानी भांड्यांसह अन्य साहित्य हलविण्याचे काम सुरू केले.

भीतीच्या छायेखाली

कुंभार गल्लीत बहूतांश गणेशमूर्ती पाण्यात बुडाल्या. पंचमुखी गणेश मंदिर परिसरातील कुटुंबे दिवसभर भीतीच्या छायेखाली होती. व्हीनस कॉर्नरपासून सुरू झालेला पाण्याचा लोट सहाव्या गल्लीपर्यंत पसरला. प्रत्येक गल्लीत सुमारे तीन ते चार फुटांपर्यंत पाणी पसरले. गणेशमूर्ती घडविण्याचे काम सुरू असताना कालपासून मूर्ती अन्यत्र स्थलांतरीत करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. पाणी काही घराच्या उंबऱ्याला, दुकानाला, पायरीला लागले. दुपारपर्यंत ५०० हून अधिक कुटुंबांना पाण्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

तरुणांचे सहकार्य

पाण्यातून सुटका करुन घेण्यासाठी काहींनी दूरध्वनी करून महापालिकेकडे मदत मागितली. स्थानिक तरुणांच्या मदतीने त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. व्हीनस कॉर्नरवर पाण्यात येणाऱ्या उत्साही नागरिकांना पोलिसांनी हटकले. शाहूपुरी परिसरातील दुकाने, व्यवसाय ठप्प झाल्याने अघोषित बंदचे चित्र होते. तरुण मंडळाचे कार्यकर्ते अमर समर्थ, गणेश पाटील, प्रथमेश पाटील, निलेश खोत, संदीप जाधव आदी सहकार्य करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात सर्वत्र महापुराच्या पाण्याने थैमान घातलेले असताना पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई जाणवू लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी तीनही उपसा केंद्रे पुरात बुडाल्याने सोमवारी महापालिकेची संपूर्ण यंत्रणाच कोलमडली. कळंबा तलावातून होणारा पाणीपुरवठा वगळता अन्य कोणत्याही भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी शहरवासियांना टँकरचा आधार घ्यावा लागला. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी हजारो हात सरसावले असताना, खासगी टँकरचालकांनी मात्र शहरवासियांची लूट केली. १०० ते १५० रुपयांना मिळणाऱ्या टँकरचा दर ५०० रुपयांच्या पुढे गेला होता.

गेल्या ११ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू झाल्यांतर महापुराचे संकेत मिळाले. शनिवारपासून पावसाने अधिकच जोर पकडल्यानंतर पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली. त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठ्यावर होणार असल्याची शक्यता गृहीत धरुन बालिंगा व शिंगणापूर उपसा केंद्रातील प्रत्येकी दोन पंप उंचावर ठेवले. पण राजाराम बंधाऱ्याने ४९ फुटांची पातळी गाठल्यानंतर पर्यायी व्यवस्थाही पाणीखाली गेली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सोमवारी सकाळपासून पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याचे जाहीर केले.

उपसा केंद्रे बंद पडल्याने तातडीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या पाच टँकरसह भाडेतत्वावर घेतलेल्या २० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. मंगळवारी दिवसभर ३० टँकरच्या फेऱ्या झाल्या. बुधवारी मात्र टँकरच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली. दुपारपर्यंत टँकरच्या ४५ फेऱ्या झाल्या. त्यानंतरही टँकरच्या मागणी सातत्याने होत होती. पाणीपुरवठा बंद होऊन दोन दिवस झाले असून घरातील शिल्लक पाणी संपू लागले आहे. बुधवारी पावसाने थोडीशी उसंत घेतली असली, तरी पूरपातळी अद्याप एका इंचानेही कमी झालेली नाही. त्यामुळे आणखी किती दिवस महापुराचा ‌विळखा राहणार याबाबत प्रचंड अनिश्चितता आहे. पावसाने पूर्ण उघडीप देवून तीन ते चार दिवसात पूर ओसरला तरी, बुडालेल्या मोटरपंपांची दुरुस्ती होऊन नियमित पाणीपुरवठा होण्यास किमान दहा ते १२ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील काळात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंबेवाडी, चिखली ग्रामस्थांसाठी शर्थीचे प्रयत्न

0
0

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराचा सर्वात जास्त तडाखा बसलेल्या आंबेवाडी व चिखली गावातील पूरग्रस्तांना बुधवारी सकाळपासून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. एनडीआरएफ व लष्कराचे एक पथक पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी झटत होते. चिखली येथील पूरग्रस्तांना सोनतळी येथे हलवण्यात आले, तर आंबेवाडी येथून पूरग्रस्तांना शिवाजी पुलावर आणून सोडले जात होते. रेस्क्यू बोटमधून सुरक्षितस्थळी येताच अनेकांना अश्रू अनावर झाले. पाण्यातून बाहेर येताच त्यांच्यासाठी मदतीचे हजारो हात सरसावत होते.

पावसाने रुद्रावतार धारणे केल्याने नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषत: आंबेवाडी आणि चिखली गावात पाण्याने ४० ते ५० फुटांची पातळी गाठली आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी दुमजली घरात आश्रय घेतला असला, तरी पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने प्रचंड भिती निर्माण झाली आहे. आंबेवाडी व चिखलीमधील पूरग्रस्तांना मंगळवारी दुपारपासून बाहेर काढण्यास सुरुवात झाली असली, तरी मदतकार्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रेस्क्यू बोटमधून एकावेळी दहा ते बाराच लोकांना बाहेर येता येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे.

बुधवारी सकाळपासून मात्र एनडीआरएफची सहा रेस्क्यू बोट व लष्कराची मोठी बोट पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वापरली. मंगळवारी रात्रीपासून चिखली गावात तब्बल तीन हजार नागरिक असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रथम चिखली येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. चिखली येथून पूरग्रस्तांना सोनतळी येथे सुखरुप आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तर आंबेवाडी येथून थेट शिवाजी पुलावर पूरग्रस्तांना आणून सोडले जात होते. सोनतळी येथे दुपारपर्यंत १,५०० तर आंबेवाडीतील ३०० लोकांना शिवाजी पूल येथे आणण्यात आले. प्रत्येक अर्धा तासाला एक रेस्क्यू बोट शिवाजी पुलावर येत होती. सुखरुपस्थळी आणल्यानंतर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात मदतीसाठी पुढे येत होते. नाष्टा, जेवण, पाण्याची बाटली देवून स्वयंसेवी कार्यकर्ते त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. सर्व पूरग्रस्तांना शाळा, महाविद्यालय येथे पाठवण्यात आले.

...

चौकट

इंजिनमध्ये बिघाड

दहा लष्करी जवानांसह एक बोट पूरग्रस्तांना बाहेर आणण्यासाठी तैनात होती. दुपारी एक वाजता बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. सुमारे पाऊण तास दुरुस्ती करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला यश आले नाही. पाऊण तासानंतर दुसरे इंजिन बसवले. पण तेही लवकर सुरू होत नव्हते. त्यामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळा आला. दीड तासानंतर इंजिन सुरू झाल्यानंतर बोट मार्गस्थ झाली.

...

अनेकांना अश्रू अनावर

महापुराच्या विळख्यातून सुटका झाल्यानंतर अनेकजण सुटकेचा निश्व:स सोडत होते. पण पाठीमागे राहिलेल्या नातेवाईकांच्या आठवणीने गहिवरुन जात होते. दुभती जनावरे डोळ्यासमोर वाहून गेल्याने अनेकांना अश्रू आनावर होत होते. त्यांच्या डोळ्यांतून टपकणारे अश्रू पाहून मदत करणारेही हवालदिल होत होते.

...

कोट

'गावात अद्याप ३०० ते ४०० लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. आंबे गल्लीत नागरिक अडकून पडले आहेत. गावातील दोन मजली घराच्या दुसऱ्या मजल्यावर दोन ते तीन फूट पाणी असून कौलारु व पत्र्याची घरे पूर्णपणे बुडाली आहेत. अन्न-पाण्याविना लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.

लता धामणेकर, आंबेवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३९० गावांचा पाणी पुरवठा बंद

0
0

कोल्हापूर : महापुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र नजरेस पडत असताना जिल्ह्यातील तब्बल ३९० गावांमधील पाणी पुरवठा बंद झाला आहे. गावपातळीवरील पाणी योजनेच्या यंत्रसामग्रीला पुराचा फटका बसला आहे. पाणी उपसा करणाऱ्या मोटारी अन्यत्र हलवल्या आहेत. काही ठिकाणी बिघाड झाला आहे. पन्हाळा तालुक्यातील ७६ गावांमधील पुरवठा बंद आहे. ग्रामीण भागातील पाणी योजना बंद झाल्यामुळे नागरिकांना बोअर आणि विहिरीतील उपसा करुन गरज भागवावी लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील गावांची माहिती मागवली आहे. यामध्ये आजरा तालुक्यातील १६, भुदरगडमध्ये १४, चंदगड १८, गडहिंग्लज ३९, गगनबावडा १९, हातकणंगले ४१, कागल २५, करवीर ४२, पन्हाळा ७६, राधानगरी ६, शाहूवाडी ४५ आणि शिरोळ तालुक्यातील ४९ गावांतील पाणी पुरवठा बंद आहे.

पूर ओसरल्यानंतर संबंधित गावातील मोटारींची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी पुरवठा लवकर सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मनीष पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामानंदनगरात शंभरावर घरांना फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रामानंदनगर मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर, दत्तात्रय कॉलनी, जाधव पार्क, मेघमल्हार अपार्टमेंट, यशवंत कमळनगर परिसरातील शंभरावर घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. मंगळवारी दिवसभर अनेक घरामध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी होते. वाढता प्रवाह आणि पाऊस यामुळे मंगळवारची रात्री नागरिकांनी जागूनच काढली. बुधवारी भागातील पाणी ओसरले. मात्र नागरिक अद्याप धास्तावलेलेच आहेत. काही प्रमाणात पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

जोरदार पाऊस आणि कळंबा सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे पाचगाव, रामानंदनगरमधून वाहणारे नाले मंगळवारी सकाळपासूनच ओव्हरफ्लो झाले. बारा ते पंधरा फूट उंचीच्या रिटेनिंग वॉलवरुन पाणी नागरी वस्तीत घुसले. त्यामुळे शंभरावर घरांना फटका बसला. जाधव पार्क परिसरातील घरांत दोन फुटांवर पाणी होते. ओढ्यालगतच्या घरात तीन फुटांहून अधिक पाणी शिरल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली. पहाटे चारच्या सुमारास प्रवाह पुन्हा वाढत असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी धोका ओळखून साहित्याची आवराआवर सुरू केली. सकाळी आठच्या सुमारास पाणी प्रचंड वेगाने वाहू लागले. ओढ्याकाठावरील घरे पाण्याखाली बुडाली. संसारोपयोगी साहित्य वरच्या मजल्यावर व अन्यत्र पोहचविताना नागरिकांना कसरत करावी लागली. काही नागरिकांना दुसऱ्याच्या घरात आसरा घेतला.

सकाळी साडेनऊनंतर महापालिका कर्मचारी, बचाव पथके रामानंदनगरात पोहोचली. नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी यंत्रणेची धावपळ सुरू होती. रामानंदनगर पुलाजवळ महापालिकेने उभारलेल्या केबिनना पाण्याचा फटका बसला. नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक सतीश लोळगे, संदीप कदम, सतीश भाले, संजय वाडकर, प्रमोद कदम, प्रवीण सुरगोंड, धुलेंद्र पोवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. रामानंदनगर तालीम मंडळ येथे नागरिकांसाठी चहा, नाष्ट्याची सोय केली होती. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी भेट देऊन आढावा घेतला. मंगळवारी सायंकाळनंतर पाणी ओसरु लागले. मात्र नागरिकांत पाण्याची भीती कायम राहिली. बुधवारी पाणी ओसरुन नालापात्रातून वाहू लागले.

रेणुका मंदिर परिसरातही पाणी

जवाहरनगर परिसरातील रेणुका मंदिर परिसरही पाण्याखाली गेला. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मंदिरातील पायऱ्यापर्यंत पाणी पोहचले होते. मंदिरानजीकच्या पुलावरुन मंगळवारी दिवसभर कंबरेइतके पाणी होते. रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता.

०० ०० ० ०

.. . .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटणमध्ये पूरस्थिती जैशे-थे

0
0

पाटणमध्ये पूरस्थिती जैशे-थे

कराड :

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने काही प्रमाणात उसंत घेतल्याने कोयना जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे १६ फुटांवर उचलण्यात आलेले कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे बुधवारी सकाळी ११ वाजता २ फुटाने कमी करून १४ फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहे. मात्र, पाटणसह कोयना नदी काठावरील पूरस्थिती जैसे-थे आहे. अद्याप ही अनेक गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. पाटण-कराड तालुक्यांतील दीड हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

कोयना जलाशयात तब्बल १०३ टीमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणात ९१ हजार ३४ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. बुधवारी धरणाच्या दरवाजांतून १ लाख ९ हजार ९० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पाटण शहरासह तालुक्याच्या विविध भागात रस्ते खचले आहेत, दरडी कोसळन्याचे प्रकार होत आहेत. घरात पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझडी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तुचा तुटवडा जाणवू लागले आहे. दुध पुरवठा, वाहतूक बंद आहे. मागील चार दिवसांपासून कराड-चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावर हेळवाक, पाटण, म्हावशी, येरफळे आदी भागात पाणी साचून आहे. कोयना, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, दापोली मार्ग पूर्णपणे बंद आहेत.

कराडमध्ये चार फुटांनी पूर ओसरला

कराड :

कराड शहरात कृष्णा, कोयनाचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते. शहरातील दत्त चौकापर्यंत आले होते. पण आता ते चार फुटांनी पुराचे पाणी कमी झाले आहे. पूर ओसरत आहे, त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कराडचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले. कराड शहर आणि तालुक्यातील गावांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याला प्राथमिकता असेल. शिंदे आळीतील गणपती बनविणाऱ्या कारागिरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली. कराड-पाटणमधून सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे.

नवीन कृष्णा पुल सुरक्षित

कराड-विटा मार्गातील नवीन कृष्णा पूल वाहतुकीस सुस्थितीत आहे. पुलाला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. अभियंत्यांनी केलेल्या पाहणीत कोणतीही चीर, फट आढळली नाही. नवीन पूल वाहतुकीस सुरक्षित आहे. समाज माध्यमांवरील कोणत्याही अफवेस बळी पडू नये व अफवा पसरवू नये. कृष्णा नदीवर पूर पाहण्यास गर्दी करू नये. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कर, नौदल सक्रीय

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती अत्यंत बिकट झाली असून, शहराच्या अनेक भागांत पाणी दहा फुटांपर्यंत पाणी आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे ११०जणांचे पथक बुधवारी पहाटेपासूनच सक्रिय झाले. पहिल्यांदा करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, सोनतळी, आंबेवाडीतील पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरूवात केले. नौदलाची २२ जणांची टीमही बोटीसह बचाव कार्यात सक्रीय आहे. स्थानिक तरुण आणि स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांना प्रचंड मदत करताना दिसत होते. लष्कर, नौदलामुळे मदतकार्याला वेग आला आहे.

नौदलाच्या दोन विमानांतून एका बोटीसह २२ जणांचे पथक बुधवारी सकाळी दाखल झाले. गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टरही बोटीसह आले. एनडीआरएफचे पथक चार बोटींसह शहरातील पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवत आहे. मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रयाग चिखलीला बुधवारी सकाळी बोटीसह पथके रवाना झाली. तेथील पूरग्रस्तांना जुना बुधवार पेठेतील कल्याणी हॉलमध्ये स्थलांतर करण्यात आले. शहरातील नागाळा पार्क, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्कातील अनेक अपार्टमेंट्समध्ये पाणी घुसले. तेथील पूरगस्तांच्या मदतीसाठी स्थानिक तरुणांची मोठी मदत झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आल्याने जिल्हा प्रशासनाचे कामकाज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातून सुरू राहिले. पूरस्थिती गंभीर बनल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा प्रशासनाशी सातत्याने संपर्क राहिला. त्यांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंकुमार काटकर कक्षात तळ ठोकून होते. दुपारनंतर एनडीआरएफ, लष्कर, नौदलाचे पथक शहर, करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तैनात राहिले.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून आढावा घेतला. आवश्यक तिथे मुंबईतून वैद्यकीय पथक पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे बंद

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून, सध्या मुख्य दरवाजातून ७,४०० क्युसेक्स, चांदोलीतून २२,८५७, कोयना १,०९०९० तर अलमट्टी धरणातून ४,००२१७ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

.. .. . .

एनडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरगस्तांना काढण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात २०४ गावे पूरबाधीत झाली आहेत. त्यातील ११ हजार ४३२ कुटुंबांमधील ५१ हजार ७८५ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवले आहे.

- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

०० ०० ०० ००० ० ०० ०० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरीतील सराफ दुकान फोडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुजरी येथील पुखराज बाबूलाल ओसवाल या सोने चांदी विक्रीचे दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने ८५ तोळे सोने आणि सव्वा किलो चांदी असा २१ लाख रुपयांचा सोने, चांदीचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी नरेंद्र ओसवाल (रा. कणेरकर पथ, राजोपाध्ये बोळ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली. या प्रकाराने सराफ बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल यांचे गुजरी येथे शा. पुखराज बाबुलाल ओसवाल नावाचे सोने चांदी खरेदी विक्रीचे दुकान आहे. पुराच्या पाण्यामुळे गुजरी सराफ व्यापारी बाजारपेठेतील बहुतांशी दुकाने बंद आहेत. ओसवाल यांचेही दुकान बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूने कुलूप कटावणीने उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरटे दुकानात सुमारे वीस मिनिटे असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसत आहे. चोरट्यांनी दुकानातील दीडशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दहा मंगळसूत्र, पाच सोन्याचे लक्ष्मीहार, नेकलेस, मोहन माळा, ६० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या चेन, सोन्याचे ६० ग्रॅम वजनाचे लहान मंगळसूत्र, सोन्याचे सुट्टे पेंडल, ५५ ग्रॅम वजनाच्या २४ सोन्याच्या रिंगा, ९० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लहान मोठ्या ४८ अंगठ्या, २४ सोन्याच्या बाली, २४ सोन्याचे डूल, १२ कोईमतूर झुबे, ३६ कान चेन, १२ कारवारी,३२ सोन्याचे बंगाली टॉप्स, ६० चांदीचे सैलम पैंजण लंपास केले. या सर्व सोन्या चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे २१ लाख ८ हजार २०० रुपये आहे. दरम्यान, पोलिसांनी दुकान आणि दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. चोरटे तोंडाला मास्क लावून चोरी करत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंतचे गुजरी, भाऊसिंगजी रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरु केले आहे. पोलिसांनी या परिसरात श्वास पथकाला पाचारण केले. मात्र श्वान परिसरातच घुटमळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतीसाठी टाहो...

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह आंबेवाडी आणि चिखली येथे हजारो लोक महापुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांचा मदतीसाठी टाहो सुरू असल्याचे चित्र बुधवारी अनुभवायला मिळाले. बुधवारी सकाळपासून पावसाने थोडी उसंत दिली. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे बंद झाले. मात्र शहरातील पाणीपातळी इंचानेही कमी झालेली नाही. शहराच्या निम्म्यापेक्षा अधिक भागाला पाण्याने वेढा दिला आहे. कसबा बावड्यातील त्र्यंबोली कॉलनी, नवीन कोर्ट इमारत, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजपासून श्री कॉलनीकडे पाणी घुसू लागले आहे. कदमवाडी, जाधववाडी, अॅपल सरस्वती हॉस्पिटल तसेच व्हीनस कॉर्नरपासून शाहूपुरीतील चार गल्ल्यांतून पाणी गवत मंडईपर्यंत आले आहे. व्हीनस कॉर्नर ते सिंडिकेट बँक आणि लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉल व बँक ऑफ इंडियापर्यंत पाणी आले आहे. दुधाळी एसटीपी प्लांट, शुक्रवार पेठ, मस्कुती तलाव, दुधाळी, सुतारमळ्याला (लक्षतीर्थ वसाहत) पाण्याने वेढा दिला आहे. रंकाळ्याच्या सांडव्यातील पाणी अंबाई टँकमधील अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये शिरले आहे.

पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असल्याने अनेक अपार्टमेंटच्या दुसऱ्या ते तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेले आहे. प्रथम स्थलांतरास विरोध करणारे अनेकजण मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षांशी वारंवार संपर्क साधून मदतीसाठी टाहो फोडत होते. वेळेत मदत मिळत नसल्याने हजारो नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे नागरिक स्वत:हूनच काहिली, लाकडी नाव, टायर ट्यूब, रिक्षाचे टफ, ट्रॅक्टर, जेसीबी, डंपरमधून सुरक्षितस्थळी जात आहेत.

.. ... ... .. .. ...

शहराच्या ९० भागांत पुराचे पाणी

राष्ट्रीय महामार्ग पाच फूट पाणी

व्हीनस कॉर्नर येथे १२ फूट पातळी

शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद

राष्ट्रीय महामार्गावर हजारो वाहने अडकली

वीज, दूरध्वनी सेवा बंद

दळणवळण यंत्रणा ठप्प

१९५ गावांचा संपर्क तुटला

३८ एसटीचे मार्ग बंद

दूध, पाण्याविना हाल

.. ..

११०

लष्करी जवान

८०

एनडीआरएफ जवान

४६

नौदल जवान

२५

प्रशिक्षित पाणबुडे

..................

स्थलांतर

१,१३२

शहरातील कुटुंबे

४,४५३

स्थलांतरित नागरिक

५४५

नातेवाईकांकडील स्थलांतरित नागरिक

११,४३२

जिल्ह्यातील स्थलांतरित कुटुंबे

५१,७८५

स्थलांतरित नागरिक

........

आमदार नरकेही

पुरात अडकले

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांना स्थलांतर करण्यासाठी घटनास्थळी आमदार चंद्रदीप नरके मंगळवारी दिवसभर प्रयत्न करीत राहिले. त्यामुळे त्यांना सायंकाळी उशीर झाला. तेथून बोटीद्वारे बाहेर काढण्यास एनडीआरएफच्या पथकाने अंधारामुळे नकार दिला. तेही काहीकाळ पुराच्या पाण्यात अडकले. कोल्हापुरातील निवासस्थानी पोहोचू शकले नाही. शेवटी त्यांनी वडणगे येथील कार्यकत्यांच्या घरी मुक्काम करून बचाव कार्याची मोहीम गतिमान केली.

जनावरे पुरातच सोडून दिली

आंबेवाडी, प्रयाग चिखलीतून ग्रामस्थांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांची जनावरे आणण्याची सोय नव्हती. परिणामी त्यांनी दोरी कापून २००हून अधिक जनावरांना पुराच्या पाण्यातच सोडून जड अंत:करणाने गाव सोडले. दुपारी तीन वाजेपर्यंत तेथील बहुतांशी पूरगस्तांना बाहेर काढण्यास प्रशासनास यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा प्रशासनाने दिले पंचनाम्याचे आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. पिके वाहून गेली असून घरांची पडझड झाली आहे. जिल्हा प्रशासनाने, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनाम्याचा अहवाल तत्काळ पाठविण्याचे आदेशही आहेत. जिल्ह्यातील विविध भागाला महापुराने विळखा घातला आहे. पूर ओसरल्यानंतर पंचनाम्याच्या कामाला गती येण्याची चिन्हे आहेत.

महापालिका हद्दीतील नुकसानीचे पंचनामे होणार आहेत. पावसाचा फटका अनेकांना बसला आहे. शहर आणि जिल्ह्यात मोठ्या संख्येने घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी जनावरे सोडून दिली असून महापुरात जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पंचनामे करताना या सर्व घटकांची माहिती संकलित होणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातार-कास रस्ता खचला

0
0

सातार-कास रस्ता खचला

सातारा

कास पुष्प पठाराकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचला आहे. गेली अनेक दिवस कास परिसरात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. त्यातच साताऱ्याहून कास पठारकडे जाताना पारंबे फाटा, एकीव फाटा तिथून पुढे कास पठारकडे जाताना हेरिटेजवाडी हॉटेलशेजारी आटाळी गावाच्या डाव्या बाजूला संपूर्ण सपाट असणारा रस्ता मध्यातून खचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरे, हॉटेलांसह दुकाने पाण्याखाली

0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोली फाट्यापासून उचगावपर्यंतच्या हायवेवर दोन ठिकाणी आलेले चार फुटांहून अधिक वाढलेले पाणी, शिरोली टोल नाक्यापासून तावडे हॉटेलपर्यंतचा पाण्याखाली गेलेला रस्ता, तावडे हॉटेल चौकाला आलेल्या तळ्याच्या स्वरुपामुळे चौकातील जवळपास पन्नासहून अधिक घरे, हॉटेल, दुकाने तसेच अनेक वाहने पाण्याखाली गेलेली, अशी परिस्थिती पुणे ते बेंगळुरु महामार्गावरुन शहरात येणाऱ्या प्रवेशमार्गाची झाली आहे. शिरोली टोल नाका परिसर, लोणार वसाहतीजवळील काही इंडस्ट्रीज व हॉटेल्सचा एक मजला पाण्याखाली गेला आहे. या परिसरात प्रथमच पुराचे इतके पाणी आल्याने आणखी काय होणार आहे माहिती नाही, असे सांगत नागरिक भीती व्यक्त करत आहेत.

मुंबई, पुण्यापासून हैदराबाद, सांगली, मिरजकडून हायवेवरुन तावडे हॉटेलमार्गे शहरामध्ये येण्याचा मार्ग सोमवारी रात्री अकरा वाजता दर्ग्याजवळ दोन्ही बाजूला पाणी आल्याने बंद करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या चार तासात पुराचा तडाखा तावडे हॉटेल परिसर व शिरोली टोल नाक्याकडे येणाऱ्या रस्त्याला बसला. दोन्ही ठिकाणी इतक्या झपाट्याने पाणी वाढले की, अनेक व्यावसायिक व नागरिकांना वाहनेसुद्धा सुरक्षितस्थळी हलवता आली नाहीत. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास गांधीनगरकडून हायवेवर उचगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी येण्यास सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत तावडे हॉटेल परिसरातील सर्व रस्त्यांवर दोन ते चार फुटापर्यंत पाणी होते. तावडे हॉटेलकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास अर्धा किलोमीटर पाणी आहे. त्यामुळे तेथील अनेक घरांमध्ये, शोरुम्स, दुकानांमध्ये पाणी गेले आहे. तावडे हॉटेल चौकात असणाऱ्या अनेक इमारतींचे पहिले मजले अर्धे पाण्याखाली आहेत. तसेच उचगावकडून शिरोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी आले असून दोन्हीबाजूचे रस्ते बंद झाले आहे. शिरोली टोल नाक्याकडून तावडे हॉटेलकडे जाणाऱ्या जवळपास अर्धा किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरही चार फूट पाणी आहे. पोलिसांनी टोल नाक्यावरच बॅरिकेडस लावून नागरिकांना अडवले आहे. तर ताराराणी चौकातही हा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे नेहमी वर्दळीचा असणाऱ्या या रस्त्यावर शुकशुकाट आहे.

उचगाव हायवेवर मोठे ट्रेलर तसेच खासगी आराम बस आडव्या लावून वाहतूक थांबवली आहे. दुसऱ्या बाजूची वाहतूक अडवण्यासाठी पोलिसांची वाहने लावण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी २४ तास पोलिस बंदोबस्त असून त्यांच्यासाठी चहा, नाष्टा, जेवणाची सोय सामाजिक संस्थांनी चालवली आहे.

.....

कोट

'तावडे हॉटेल परिसरातून उचगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर २००५ सालीही पाणी आले नव्हते. पण यंदा पहाटेपासून पाणी आले असून आणखी पातळी वाढत आहे. पलिकडच्या रस्त्यावरही पाणी येण्याची शक्यता आहे.

सुनील कोठावळे, स्थानिक नागरिक

....

पर्यटकांनी हॉटेल्स फुल्ल

शिरोलीपासून पुढे जाणारे व बेळगावकडे जाणारे अनेक पर्यटक कोल्हापुरात अडकले आहेत. त्यांना जाण्यासाठी कोणताच मार्ग उपलब्ध नसल्याने रस्त्यावर थांबून राहण्यापेक्षा जिथे मिळेल त्या लॉजवर, हॉटेलवर, यात्री निवासवर पर्यटक थांबले आहेत. अनेकांनी खाद्यपदार्थांचा स्टॉक घेऊन ठेवला आहे. पाणी कमी झाल्याशिवाय रस्ते सुरू होणार नसल्याने तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. अनेकजण पूर पाहण्यासाठी ये जा करत असून अनेकजण अंबाबाई दर्शनही करत आहेत. काहींनी हायवेवरील हॉटेल, लॉज निवडले आहेत. त्यामुळे तिथे गर्दी झालेली दिसून येत आहे. अनेक ट्रकचालक धाब्यांवर व पेट्रोल पंपावर थांबून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पश्‍चिम महाराष्ट्राला पुराचा तडाखा

0
0

कोल्हापूर:

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवल्याने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात महापूर आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात १६ जणांचे बळी गेले असून आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या चारही जिल्ह्यात पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे जवान, टेरिटोरियल आर्मीची पथके आणि नौदल दाखल झालं आहे.

>> जाणून घ्या LIVE अपडेट्स :

>> कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी सुट्टी जाहीर

>> कोल्हापूर: प्रयाग-चिखलीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरू

>> कोल्हापूर: नौदलाची २२ जणांची टीमही बोटीसह बचाव कार्यात सक्रीय

>> शहराच्या अनेक भागांत पाणी दहा फुटांपर्यंत पाणी

>> कोल्हापूर, सांगली, सातारा शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती अत्यंत बिकट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या प्रयाग चिखलीत भीषण पूरस्थिती

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images