Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मुलगा कृष्‍णेत वाहून गेला

$
0
0

मुलगा कृष्‍णेत वाहून गेला

धीरज तुकाराम शिंगटे (वय २०) हा युवक कृष्णा नदीच्या पुरात पोहत असताना वाहून गेल्‍याची माहिती समोर आली आहे. मर्ढे येथील पुलावरून कृष्णा नदीच्या पुरात सुमारे दहा ते पंधरा मित्रासोबत धीरज शिंगटे पोहण्यास गेला होता. धीरज याने मित्रांसमवेत नदीच्या पुराच्या पाण्यात पुलावरून उडी मारली. पोहताना त्याला दम लागल्याने तो पुराच्या पाण्यात गटांगळ्‍या खाऊ लागला. तो बुडत असल्‍याचे पाहून त्‍याच्या मित्रांनी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या आधीच तो पाण्यात बुडून दिसेनासा झाला. दरम्यान, इतर मित्रांनी पाण्यातून बाहेर येऊन त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो दिसून आला नाही. या घटनेची माहिती मर्ढे गावात मिळताच नदीकाठी ग्रामस्थांसह महिलांनी गर्दी केली होती. त्याचा शोध नदीकाठावर सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीरमधून विसर्ग; नीरेवरील अनेक पूल पाण्याखाली

$
0
0

वीरमधून विसर्ग; नीरेवरील अनेक पूल पाण्याखाली

सातारा :

वीर धरणातून मोठ्या प्रमाणात नीरा नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने पूरस्थिती निर्माण होऊन फलटण तालुक्यातील नीरा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेले असून, नदी काठच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नीरा खोऱ्यातील धरणे भरली असून, गुंजवणी ९५, देवघर ९८ तर भाटघर ९७ व वीर ९५ टक्के भरले आहे. मागील चोवीस तासात गुंजवणीवर १०० तर देवघर प्रकल्पावर १४२ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. रविवारी ही पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने आता पाठीमागील धरणातून वीर धरणात पाणी सोडले जात असल्याने वीरचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. ६० हजार ३४० क्युसेकहुन अधिक विसर्ग सुरू आहे. वीरच्या पाण्याने नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील होळ येथील पूल तसेच खुंटे, कांबळेश्वर येथील बंधाऱ्यावरील पूल पाण्याखाली गेलेले आहेत.

..........

मांढरदेव परिसरात जमीन खचली

वाईच्या पश्चिम भागासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, तालुक्यातील अनेक ओढे-नाल्यांची पाण्याची पातळी वाढल्याने शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कित्येक शेताचे बांध व दगडी ताली ढासळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी जमिनी खचण्याच्या घटना घडल्या आहेत. वेरुळी (ता. वाई) येथील शेतकऱ्यांची जमीन खचली आहे. मांढरदेव पठारावर वसलेले गाव प्रचंड पावसाच्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमिनी खचल्या आहेत.

.............

धोममधून दहा हजार क्युसेक विसर्ग

सातारा :

सातारा जिल्ह्यासह संपूर्ण वाई तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. बलकवडी, धोम धरण भरले आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता धोम धरणातून दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे धोम पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले आहे. सध्या धरणात १६ हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून, धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. खंडाळा तालुक्याला दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कालव्यातून करण्यात आला आहे. धोम धरणात १३.३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ हजार लिटर दूध संकलन घटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसामुळे रस्ते बंद झाल्याने जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी संघाना दूध संकलनाचा फटका बसला आहे. रविवारी सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात अंदाजे ७५ हजार लिटर दूध संकलन घटले आहे. संघांचे दूध संकलन बंद झाल्याने ग्रामीण भागात घरोघरी असलेल्या दुधाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दमदार पावसाने जिल्ह्यातील पूर संकट सर्वदूर पसरल्याने राज्य, जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. ८७ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), शिरोळ तालुका दूध संघ हे सहकारी तर वारणा आणि शाहू दूध संघ संकलन करते. स्वाभिमानी, अन्नपूर्णा, प्रतिभासह छोटे मोठे दहा संघ आहेत. प्रतिदिवशी १५ लाख लिटर दूध संकलन होते. जिल्ह्यातील रस्ते पाण्याखाली गेले असले तरी पर्यायी मार्गावरून संकलन केले जात आहे. पुराचा सर्वात जास्त फटका गोकुळ दूध संघाला बसला आहे. गेल्या पाच दिवसांत त्यांचे दूध संकलन नऊ लाख, ३६ हजार लिटरवरून आठ लाख, ९२ लिटरवर आले आहे.

सकाळच्या सत्रात गोकुळचे ११ हजार, ७३५ लिटर दूध कमी आले. म्हशीचे ७ हजार १४८ लिटर तर गायीचे ४ हजार ५८८ लिटर दूध संकलन कमी झाले आहे. सायंकाळच्या सत्रातही दूध संकलनावर परिणाम झाला आहे. पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा, काळजवडे, शाहूवाडीतील शिरगाव, पाल, सोंडोली, अनुस्कुरा, आंबा, कांटे, पाल, चंदगड तालुक्यातील हेरे, आसगाव, कदनूर, कोवाड, नागरदळे या मार्गावरील दूध संकलन बंद होते. शनिवारी गगननबावडा रस्ता बंद होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित आघाडीच्याआज मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता.५) मुलाखती होत आहेत. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांत वंचितच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाल्याने विधानसभेला अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. हातकणंगले मतदारसंघातील एक माजी आमदार, शहरातील एक माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांच्या नावाची चर्चा वंचितकडून आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील एका पदाधिकाऱ्याच्या नावाची चर्चा आहे.

आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अॅड अण्णाराव पाटील, अशोक सोनोने, रेखा ठाकूर, प्रा. किसन चव्हाण या चौघांच्या उपस्थितीत सोमवारी सर्किट हाउस येथे मुलाखती होणार आहेत. जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतून इच्छुकांचे मोठ्या संख्येने अर्ज आल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी १० वाजता मुलाखतींना प्रारंभ होईल.

भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी वंचित आघाडीकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. सध्या ते राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीची तयारी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघ, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मिळालेला प्रतिसाद पाहून या ठिकाणाहून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. हातकणंगले, इचलकरंजी मतदारसंघातून काही जण इच्छुक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: पावसामुळे वीज पुरवठा खंडित, अनेक गावं अंधारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याला पुराचा विळखा पडल्यामुळे ठिकठिकाणच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला असून अनेक गावे अंधारात आहेत. पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १२ हजार ९७४ वीज जोडण्या बाधित झाल्या आहेत. त्यापैकी १२ हजार ८१० कृषीपंप आहेत. गेल्या काही दिवसांत पावसामुळे विजेचे २८६ खांब जमीनदोस्त झाले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी ७३ खांब दुरुस्त करून पुन्हा उभारले. सुरक्षेचा उपाय म्हणून १५१६ रोहित्रे बंद ठेवली आहेत. कासारी नदीला पूर आल्यामुळे शाहूवाडी पडसाळी धरण परिसरातील गावांतील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला.

कासारी नदीला पूर आल्यामुळे बाजारभोगाव येथील वीज पुरवठा बंद आहे. पुराचे पाणी वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणच्या कळे उपविभागांतर्गत पडळसाळी धरण परिसरातील चव्हाणवाडी, पोंबरे, पिसात्री, सोनारवाडी, गुरववाडी, मनवाड, आढाववाडी, खापनेवाडी, वाशी, कोलिक, पडसाळी, चाफेवाडी, घोटणे आणि धनगरवाडा येथील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. करंजफेण, पाल वडाचीवाडी, येळवडी आणि धनगरवाडा, दाभोळकरवाडी, सावर्डी, ईजोळी ही गावे अंधारात आहेत.

वारणा नदीला पूर आल्यामुळे नदी भागाच्या दानोळी व कवठेसार येथील वीज पुरवठा वाहिन्या बंद केल्या आहेत. शिवाय नदीकाठावर गावठाण वाहिनीवरून असलेल्या दानोळी, कवठेसार, निमशिरगाव, तारदाळ गावाचा पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा देखील बंद केला आहे. पुराचे पाणी वाढत असल्यामुळे जुने कवठेसार येथील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावच्या सावकारांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालक रमेश पांडुरंग पाटील (वय ४२, रा. मगदूम कॉलनी, पाचगाव) यांनी आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाचगावच्या तिघा सावकारांना करवीर पोलिसांनी रविवारी कोर्टासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. संशयित तुषार कृष्णा गाडगीळ (२७), शुभम मारुती भोळे (२५), धीरज आनंदा गाडगीळ (२५) अशी त्यांची नावे आहेत.

मृत रमेश पाटील यांनी मुलगी प्रतीक्षाच्या लग्नासाठी संशयित सावकारांकडून ३० टक्के व्याजाने पैसे घेतले होते. काही रक्कम त्यांनी परत केली होती. मात्र संशयित व्याज आणि मुद्दलसाठी त्यांच्याकडे वारंवार तगादा लावत होते. त्यांनी या त्रासाला कंटाळून २ ऑगस्ट रोजी रात्री आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पैकी तिघांना रविवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणातील चौथा संशयित उत्तम महादेव गोंगाणे हा खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात बिंदू चौक कारागृहात आहे. दरम्यान रविवारी पोलिसांनी संशयितांच्या घराची झडती घेतली. काही कागदपत्रे मिळतात का, याची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरमोडी भरले, विसर्ग

$
0
0

सातारा :

परळी खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिसरातील लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. उरमोडी प्रकल्प भरला असून, या प्रकल्पातून रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाच्या पहिल्या अन् चौथ्या वक्र दरवाज्यातून पाणी सोडण्यात आले.

उरमोडीच्या सांडव्यातून २३६४ क्युसेक, तर विद्युत प्रकल्पातून ४५० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. एकूण २८१४ क्युसेक विसर्ग करण्यात आला असून, प्रकल्पामध्ये ८.४५ टीएमसी (८७.५६ टक्के) इतका पाण्याचा साठा आहे. उरमोडी प्रकल्पातून पाणी सोडण्याआगोदर सर्व गावांना कृष्णा सिंचन विभागाच्या वतीने सतर्क करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंनिस’वर कारवाई करा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या सहा वर्षांपासून सीबीआय आणि विशेष तपास पथके दाभोलकर, पानसरे हत्येसंदर्भात तपास करत आहेत. मात्र, एकाही यंत्रणेला सनातन संस्थेच्या सहभागाचा पुरावा मिळालेला नाही. तरीही अंधश्रध्दा निर्मूलन समिती 'सनातन'वर कारवाईची मागणी करीत आहे. त्यामुळे 'अंनिस'वरच कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्त्वनिष्ठ संघटनांतर्फे शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या खटल्यास विलंब होत आहे. त्यांचे कुटुंबीय विविध कारणे सांगून वेळ लावत आहेत. त्यांच्याकडून हिंदुत्त्ववादी संघटना आणि सनातन संस्थेवर खोटे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे गुन्हे अन्वेषण यंत्रणांनी कोणत्याही दबावास बळी न पडता नि:ष्पक्षपातीपणे चौकशी करावी. नेहमीप्रमाणे अविवेकी वृत्तीतून 'सनातन'चे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्यावर कारवाईची मागणी 'अंनिस'ने केली आहे. 'अंनिस'चे कार्यकर्ते नक्षलवादी कारवायांत सहभागी असल्याच्या कारणावरून अटक झाले आहेत. अशा नक्षल समर्थक अंनिसवरच सरकारने कारवाई करावी.

निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, किशोर घाटगे, हिंदू महासभेचे जिल्हा अध्यक्ष मनोहर सोरप, शहर अध्यक्ष जयवंत निर्मळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसामुळे शहरातील अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडीने वाहनचालकांसह नागरिक हैराण झाले. वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलिस रस्त्यांवर नसल्याने वाहन कोंडीने नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. आपत्ती व्यवस्थापनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा फेल गेल्याचे चित्र पहायला मिळाले.

व्हीनस कॉर्नर चौक, फोर्ड कॉर्नर, जयंती पूल, कोंडाओळ, शाहूपुरी कुंभार गल्ली, बसंत बहार असेंब्ली रोड, कसबा बावडा-शिये रोड हे बंद झाल्याने वाहतूकीचा ताण शाहूपुरीतील दुसरी, तिसरी आणि चौथ्या गल्लीवर पडला. शहरातील बहुतांशी सरकारी कार्यालये ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कसबा बावडा रोडला असल्याने लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, न्यू शाहूपुरी मार्गे कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागला. त्यामुळे स्टेशन रोड, गवत मंडई, पार्वती टॉकीज रस्त्यांला काटकोनात जोडणाऱ्या रस्त्यांवर कोंडी झाली होती. दोन मिनीटांच्या प्रवासाला अर्धा तास लागत होता. वाहतूक कोंडी फोडताना बंदोबस्तास असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली होती. परिसरातील मंडळाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी वाहतूक नियोजनास सुरुवात केली. दरम्यान पोलिस प्रशासनाने विल्सन पुलाकडून शाहूपुरीकडे जाण्यास वाहतूक बंद केली. त्यामुळे फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज, सुभाष रोड, गोखले कॉलेज रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली. नागाळा पार्क, ताराबाई पार्ककडे जाण्यासाठी उमा टॉकीज, बागल चौक, परिख पूल मार्गे एसटी स्टँड, न्यू शाहूपुरी रस्त्यांवरुन वाहतूक सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे न्यू शाहपूरी रस्त्यांवर वाहतूक कोंडीला वाहनधारकांना सामोरे जावे लागले.

स्टेशन रोडवर वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून ताराराणी चौक कावळा नाका ते स्टेशन रोड हा मार्ग वाहतूकीस बंद ठेवण्यात आली. या मार्गावरील वाहतूक उड्डाणपूलाकडे वळवण्यात आली. त्यामुळे राजारामपुरी जनता बाजार चौकात वाहतूक कोंडी जाणवत होती. दिवसभर मोजक्या पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी वाहतूकीचे नियोजन केले.

अवघे १५ पोलिस रस्त्यांवर

मंगळवारी (ता.६) जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा असून दीड ते दोन लाख भाविक यात्रेला येतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे ७५ टक्के पोलिस डोंगरावर बंदोबस्तास गेले आहेत. त्यामुळे शहरात अवघ्या १५ पोलिसांना वाहतूकीचे नियोजन करण्यास रस्त्यांवर यावे लागले. त्यांच्या मदतीला होमगार्डही देण्यात आले होते. पण शहरातील १७ हून अधिक रस्ते बंद असल्याने शाहूपुरी, राजारामपुरी, उमा टॉकीज, बिंदू चौक, मंगळवार पेठ, गोखले कॉलेज रस्त्यांवर ताण पडला होता.

केएमटीच्या चालकांची कोंडी

सकाळी अकरा वाजता कोणते रस्ते सुरू आहेत आणि कोणते रस्ते बंद केले याबाबत पूर्वसूचना नसल्याने केएमटीच्या चालकांचे हाल झाले. व्हीनस कॉर्नरला पाणी वाढल्याने वाहतूक अडकली. याचवेळी दाभोळकर कॉर्नरकडून वाहने येत होती. मात्र, पुढे जागा नसल्याने गोकुळ हॉटेलपर्यंत ट्रॅफिक जॅम झाले. त्यामुळे केएमटी चालकांनी वृंदावन हॉटेलसमोरून बस शाहूपुरीत वळवल्या. या मार्गावर प्रचंड कोंडी झाल्यानंतरही वाहतूक पोलिस अथवा अन्य कोणतीही माहिती देणारी, सूचना अथवा व्यवस्थापन करणारी यंत्रणा उपलब्ध नव्हती. परिणामी वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या शहराला पुराचा वेढा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहराचे जनजीवन विस्कळित झाले. पुराच्या पाण्याने निम्म्या शहराला वेढा दिल्याने जयंती नाल्यावरील दोन्ही पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे कसबा बावडा मार्गे शहरात येणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवली. पुराच्या पाण्याने दैना उडालेली असताना व्हीनस कॉर्नर व शाहूपुरीतील तीन रस्त्यावर पाणी आले. शाहूपुरी कुंभार गल्ली व व्हीनस कॉर्नर परिसरातील ५९ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. पुरामुळे शहरातील अनेक मार्ग बंद झाले असून तेथे पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

गेल्या दहा दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पुराचे पाणी घुसले. पुराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविताना प्रशासनासह नागरिकांची रविवारी मध्यरात्रीपासून तारांबळ उडाली. जयंती नाल्याला फूग येऊन शाहूपुरी कुंभार गल्लीसह आणखी दोन गल्ल्यांत पाणी शिरले. लक्ष्मीनारायण मंदिर ते माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या घरापर्यंत पाणी आले आहे. गुडघाभर पाण्यातून नागरिक ये-जा करत होते. त्यामुळे नाईक अँड नाईक कंपनींकडून व्यापारी पेठेकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले. पावसाचे पाणी कुंभार गल्लीत मोठ्या प्रमाणात घुसल्यानंतर रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत ५९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. अनेक घरांत पाणी आल्याने प्रापंचिक साहित्य पाण्यावर तरंगत होते. हाताला लागेल साहित्य घेऊन नागरिक घरातून बाहेर पडत असल्याचे चित्र सकाळच्या टप्प्यात होते. परिसरातील निवासी घरांसह अनेक दुकानांत पाणी शिरल्याने येथील व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक घरांसमोर लावलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. पुराच्या पाण्यातून बाहेर पडताना नागरिकांची त्रेधातिरपीट उडत होती.

पंचगंगा नदीची पाणीपातळी ४३ फुटांच्या पुढे गेल्यानंतर अप्सरा ते व्हीनस चित्रपटगृहापर्यंत पाणी येते. आता पाणीपातळी ४६ फुटांपर्यंत गेल्याने व्हीनस कॉर्नरपासून भारत पेट्रोल पंपाच्या पुढे पुराचे पाणी थडकले. चौकातील छत्रपती राजाराम महाराज पुतळा परिसरात तीन ते साडेतीन फूट पाणी आहे. त्यामुळे दसरा चौक व फोर्ड कॉर्नरकडून दाभोळकर कॉर्नरकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. कसबा बावडा ते शिये मार्गावर पाणी आल्याने गेल्या चार दिवसांपासून हा रस्ता बंद झाला. रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलीत दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढला. परिणामी पुराचे पाणी जयंती नाल्याच्या दोन्ही पुलांवर आले.

वाहतूक रात्रीच बंद

रविवारी साडेआकरा वाजता पुलाचे पाणी नवीन पुलावर आल्यानंतर दसरा चौक व सीपीआरकडून कसबा बावड्याकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू होती. मध्यरात्री मात्र दोन्ही पुलांवर पाणी आल्याने संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. बावड्याकडून शहरात येणासाठी व शहरातून बावड्याकडे जाण्यासाठी वाहनधारकांना दाभोळकर कॉर्नरमार्गे जावे लागले. शहराच्या उत्तरेकडील भागात अनेक ठिकाणी पाणी आल्याने शहरात बहुतांशी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनेक अपार्टमेंट्सच्या बेसमेंटमध्ये शिरले पाणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

धुवाँधार पावसांमुळे शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिला असून अनेक मोठ्या अपार्टमेंट्सच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. रंकाळा येथील डी-मार्टच्या भिंतीला पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी लागले. रमणमळ्यातील जावडेकर अपार्टमेंट्सह पवार, भोसले व वागळे मळा परिसरातील अनेक अपार्टमेंट्सच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले आहे.

शहरातील अनेक अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी आल्याने रहिवशांना ये-जा करता येत नसून अनेक वाहून पुराच्या पाण्यात अडकून पडली आहेत. उत्तरेकडील आणि पूररेषेच्या आत-बाहेर बांधलेल्या अपार्टमेंट्सच्या बेसमेंटमध्ये एक फुटांपासून पाच फुटापर्यंत पाणी घुसले आहे. बेसमेंटमध्ये पाणी आल्याने फ्लॅटमधील नागरिकांना त्याचा त्रास होत नसला, तरी येण्याजाण्यासाठी मार्ग नसल्याने त्यांची दिनचर्या ठप्प झाली. जाधववाडी, बापट कँप, रमणमळा, दुधाळी, लक्षतीर्थ वसाहत येथील सुतारमळा परिसरातील सर्वच अपार्टमेंटमध्ये पाणी शिरले आहे. नैसर्गिक आपत्तीचा फटका पूररेषतील बांधकामाला बसला आहे. रंकाळा येथील डी-मार्टच्या भिंतीला पुराचे पाणी येऊन थडकले. त्यामुळे डी-मार्ट मागील बाजूल असलेल्या नवीन अपार्टमेंट बांधकामांना पुराच्या पाण्याने वेढा दिला.

ड्रेनेज तुंबल्याने पाणी

सिद्धाळा गार्डन येथील ड्रेनेज लाइन चोकअप झाल्याने कोथळे बिल्डिंगसमोरील बळवंत अपार्टमेंटमध्ये पाणी आले. न्यू महाद्वार रोडवरील बळवंत अपार्टमेंटमध्ये हे पाणी घुसले. येथील ड्रेनेजलाइन चोकअप झाली. अपार्टमेंटमध्ये आलेले पाणी तीन विद्युत पंपाच्या मदतीने बाहेर काढले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट, अन दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुपारी साडेबाराची वेळ... अचानक कुणालाही कल्पना न देता जिल्हाधिकारी दौलत देसाई कक्षाबाहेर पडतात. वाहनात बसल्यानंतर चालकास भेटीची ठिकाणे सांगतात आणि पूरपरिस्थिती जाणून घेत स्थानिक रहिवाशांशी थेट संवाद साधतात. कोणताही लवाजमा न घेता वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका पाठोपाठ एक असे जयंती नाला, व्हीनस कॉर्नर, कदमवाडी परिसराला भेट दिली आणि प्रशासनाच्या मदतीसंबंधी विचारणा केली.

शहरातील नागरी भागात पाणी घुसल्याचे कळल्यानंतर देसाई यांनी अचानक भेट देऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. महावीर गार्डनसमोरील रस्त्यावर पाणी कशामुळे येते याची माहिती जाणून घेण्यासाठी ते पहिल्यांदा खानविलकर पंपाजवळील जयंती नाल्याजवळ दाखल झाले. तेथे पेट्रोल पंप परिसरात घुसलेले पाणी, जयंती नाल्याचा प्रवाह थांबल्याने पसरलेल्या पाण्याची पाहणी केली.

तेथून व्हीनस कॉर्नरकडे त्यांचे वाहन मार्गस्थ झाले. नागाळा पार्क कमान रोडवरून सासने ग्राऊंड रोडमार्गे ते जावू लागले. मात्र तेथील वाहतुकीच्या कोंडीमुळे डी मार्टजवळून धैर्यप्रसाद रोडवरून ते बसस्थानकासमोरील रस्त्यावरून व्हीनस कॉर्नरला पोहचले. तेथील परिस्थितीची पाहणी करताना त्यांना स्थानिक नगरसेवक राहुल चव्हाण भेटले. त्यांच्याकडून पाणी थांबलेल्या परिसरातील रहिवाशांची त्यांनी माहिती घेतली. त्यावेळी नगरसेवक चव्हाण यांनी महावीर गार्डन आणि नष्टे हॉलजवळील काही अपार्टमेंटच्या तळमजल्यावर पाणी थांबल्याचे सांगितले. तेथील रहिवाशांना अत्यावश्यक वस्तू आणि सुविधांसाठी बाहेर जाता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर देसाई यांनी मदतीची गरज असल्यास सांगा, जिल्हा प्रशासन त्यांना मदत करेल, असे आश्वासन दिले.

तेथून कावळा नाकामार्गे कदमवाडीच्या दिशेने त्यांचे वाहन मार्गस्थ झाले. त्याठिकाणी जाधववाडी रस्त्यावर आलेले पाणी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची त्यांनी पाहणी केली. तेथे पाण्यात जाऊन सेल्फी काढणाऱ्या शालेय मुलांना पाण्याबाहेर येण्याचे आवाहन केले.

...

साहेब, अलमट्टीतून

पाणी विसर्ग होत आहे, नव्हे

स्थानिक महापालिका प्रशासन, महसूल, पोलिस प्रशासनास कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता जिल्हाधिकारी देसाई यांनी गंभीर पूरस्थिती असलेल्या भागांची पाहणी केली. त्यावेळी पाण्यातून लोक जाऊ नयेत यासाठी बॅरीकेट लावल्याचे दिसले. व्हीनस कॉर्नर, जयंती नाला परिसरात वाहतूक पोलिसही तैनात होते. मात्र अचानक त्यांनी भेट दिल्यामुळे बंदोबस्तावरील पोलिस आणि महानगरपालिकेच्या कर्मचारी धावाधाव करत असल्याचे पाहायला मिळाले. व्हीनस कॉर्नरजवळील पाणी पाहण्यासाठी कुटुंबासह आलेले एकजण जिल्हाधिकारी देसाई यांना भेटून 'साहेब, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर देसाई यांनी तीन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे सांगताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वंचित’च्या उमेदवारीसाठी ७२ जणांच्या मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इचलकरंजीतील काँग्रेसचे नगरसेवक नितीन लायकर, नगरसेवक अब्राहम आवळे, भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, प्रा. बी. जी. मांगले आदींनी वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात ७२ जणांनी वंचितच्या उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. हातकणंगलेमधून १४ जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.

प्रा. मांगले यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी केली आहे. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती विलास कांबळे यांनी शिरोळ तर माजी सभापती शामराव गायकवाड यांनी हातकणंगले मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शविली आहे. वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य आण्णासाहेब पाटील, अशोक सोनोने, रेखा ठाकुर यांनी मुलाखती घेतल्या. करवीर तालुक्यातील ७, हातणंगलेमधून १४, राधानगरी ३, कागल ६, कोल्हापूर दक्षिण ८, शिरोळ ९, इचलकरंजी ३, शाहूवाडी ६, चंदगड ७ आणि कोल्हापूर उत्तरमधून नऊ जणांनी उमेदवारी मागितली. हातकणंगले येथून डॉ. मिलिंद हिरवे, अॅड. प्रेमकुमार माने, अॅड. इंद्रजित कांबळे यांनी उमेदवारी अर्ज केला.

यावेळी अण्णाराव पाटील म्हणाले, 'वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित घटकांची मोट बांधून राज्यात तिसरा समर्थ पर्याय निर्माण केला आहे. विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या चाव्या वंचितकडे असतील. वंचित आघाडी २८८ जागा लढविणार आहे. भाजप शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी हे समान शत्रू आहेत. वंचित आघाडी ही कुणाचीही बी टीम नाही. असा आरोप करणाऱ्या काँग्रेसने ते सिद्ध करुन दाखवावे.'

...

ईव्हीएममुळेच आंबेडकरांचा पराभव

'ईव्हीएम मशिनमधील घोटाळ्यावरुन विविध पक्ष एकत्रित लढा देत आहेत. मात्र ईव्हीएमविरोधात पहिल्यांदा लढाई वंचित बहुजन आघाडीने सुरू केली आहे. मशिनमधील मतांच्या घोळाविरोधात ३७ याचिका दाखल केल्या आहेत. ईव्हीएममुळेच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला. त्या विरोधात आमच्या पद्धतीने लढाई सुरू केली आहे. आम्हाला कुणासोबत जाण्याची आवश्यकता नाही. गरज असेल तर इतरांनी आमच्यासोबत यावे. ईव्हीएम मशिनमधील घोळाची सुरुवात काँग्रेसच्या कालावधीत झाली,' असा आरोपही अण्णाराव पाटील यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा बंद

$
0
0

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर ही पाणी उपसा केंद्रे सोमवारी सकाळनंतर बंद पडली. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला. मंगळवारपासून ठणठणाट असेल. शहरवासीयांना पिण्याचे पाणी देण्यासाठी महापालिकेच्यावतीने २० खासगी टँकर घेण्यात येणार आहेत. कळंबा तलावातून कळंबा फिल्टर हाउसमध्ये येणारे पाणी या टँकरद्वारे पुरवण्यात येणार आहे.

पुराच्या वाढत्या पाण्याचा झटका पाणीपुरवठ्याला सोमवारी सकाळी बसला. शिंगणापूर पंपिंगमधील काही पंप बंद पडले. आठनंतर बालिंगा, नागदेववाडी पंपिंगही बंद झाले. तीनही उपसा केंद्र बंद झाल्याने जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारे पाणी बंद झाले. त्याचा परिणाम सायंकाळपासून अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर झाला. पुराची पातळी वाढतच आहे. पंपिंग सुरू होण्यासाठी किमान सात फूट पाणी कमी होण्याची आवश्यकता आहे. तसेच पाणी कमी झाल्यानंतर दोन दिवस पंपांची दुरुस्ती करुनच ते सुरू केले जातील. त्यामुळे पुराचे पाणी उतरण्याची वाट पहावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने टँकरचे नियोजन केले आहे. महापालिकेकडे मोजके टँकर आहेत. २० टँकर भाड्याने घेण्यात येणार आहेत. कळंबा फिल्टर हाउसमधून पाणी देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिलह्यात १२९ गावे पूरबाधित

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

जिल्ह्यातील नऊ नद्यांना पूर आल्याने काठावरील १२९ गावांतील १४ लाख ५१ हजार १२२ जण बाधित झाले आहेत. त्यांच्यात पुराच्या पाण्याने भय निर्माण झाले आहे. पाणीच जिवावर उठल्याने नको बाबा पाऊस, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

आठवड्याहून अधिक काळ जोरदार पाऊस पडत आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सर्वच मध्यम आणि लहान धरणे ८० टक्क्यांहून अधिक भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. परिणामी सहा नद्यांतील पाणी पात्राबाहेर पडले आहे. साडेतीन हजारांवर लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. नदीकाठांवरील १२९ गावांना पूर वेढत आहे. यामुळे तेथील एकूण साडेचौदा लाखांपेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षणे त्रास सहन करावा लागत आहे. तेथील अत्यावश्यक सेवेवर परिणाम होत आहे. अनेक रस्ते बंद झाल्याने दळणवळण मंदावले असून जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. काठावरील ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ येत आहे. काठावरील सर्वच गावात जलजन्य आजारांचा फैलाव होत आहे. यामुळे तेथे भीतीचे वातावरण आहे. काठावरील सर्व १२९ गावांतील नागरिकांना पूर ओसरण्याचे वेध लागले आहेत. यासाठी ते हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून आहे. मात्र पाऊस कमी होण्याऐवजी वाढतच आहे. धरणातून विसर्ग वाढल्याने आणि पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता संपल्याने पावसाचा प्रत्येक थेंब वाहताना दिसत आहे. यातूनच नद्यांचे पाणी वाढत आहे.

...

शहरालाही फटका

जिल्ह्यातील नऊ नद्यांपैकी सर्वाधिक पंचगंगा नदीकाठावरील २९ गावे बाधित झाली आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहराचाही समावेश आहे. शहराच्या मध्यापर्यंत पंचगंगा नदीचा फुगवटा आल्याने रहिवाशांचे हाल सुरू आहेत.

...

कोट

'जिल्ह्यातील नदी काठावरील पूरबाधित १२९ गावांतील लोकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज आहे. काठाजवळील ज्या गावांच्या वेशीत पाणी आले आहे, तेथील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.

प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

...

नदीचे नाव पूरबाधित गावांची संख्या बाधित लोकांची संख्या

कृष्णा २२ ९९१७७

वारणा १७ १०६६०९

कडवी २ ६८८८

कासारी ६ १६५०४

कुंभी १७ २४२३२

भोगावती १७ ५०४५३

पंचगंगा २९ १०७३६३८

दूधगंगा १२ ५२४९६

वेदगंगा ७ २११२५

...

जिल्ह्यातील पूरबाधित गावे

शिरोळ : कोथळी, उमळवाड, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, शिरटी, नृसिंहवाडी, बस्तवाड, अकिवाट, राजारापूर, खिद्रापूर, मजरेवाडी, गणेशवाडी, शेडसाळ, कवठेगुलंद, गौरवाड, औरवाड, बुबनाळ, आलास, दत्तवाड, दानवाड, कवठेसार, दानोळी, टाकवडे, शिरदवाड, अब्दुललाट, शिरोळ, कुरूंदवाड, धरणगुत्ती, नांदणी, शिरढोण, तेरवाड, हेरवाड.

राधानगरी : फेजिवडे, पडळी, राधानगरी, गुडाळ, गुडाळवाडी, आणाजे, आवळी बु., घोटवडे, टिटवे, सरवडे, कसबा वाळवा,

करवीर : हळदी, आरे, बालिंगे, नागदेवाडी, साबळेवाडी, खुपीरे, शिंदेवाडी, हणमंतवाडी, पाडळी खु., निटवडे, केर्ले, केर्ली, वरणगे, चिखली, शिंगणापूर, आंबेवाडी, कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीकाठाजवळील वसाहती, वडणगे, निगवे, कसबा बावडा, शिये, भुये, वळीवडे.

पन्हाळा : बाजारभोगाव, कळे, मल्हारपेठ, सावर्डे तर्फे असंडोली, भामटे, तांदूळवाडी, आकुर्डे, गोठे, आसगांव, परखंदळे, घरपण.

गगनबावडा : अणदूर, खोकुर्ले, मार्गेवाडी, निवडे, साळवण, मांडुकली पैकी पडवळवाडी, वेतवडे.

कागल : वंदूर, सुळकूड, सिध्दनेर्ली, बामणी, करनूर, शंकरवाडी, एकोंडी, निढोरी, कुरूकली, बाणगे, चिखली.

भुदरगड : पाटगांव, शेणगांव, खानापूर.

शाहूवाडी : सोडोली, थेरगाव, मलकापूर, पाटणे, करंजफेण.

हातकणंगले : निल्लेवाडी, पारगाव, चावरे, घुणकी, किणी, भादोली, लाटवडे, भेंडवडे, खोची, वाठार तर्फे वडगाव, कुंभोज, हिंगणगाव, शिरोली पुलाची, हालोंडी, इंगळी, रूई, चंदूर, रांगोळी, हुपरी, इचलकरंजी, रेंदाळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज पुरवठा खंडीत, अनेक गावे अंधारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याला पुराचा विळखा पडल्यामुळे ठिकठिकाणच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला असून अनेक गावे अंधारात आहेत. पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १२ हजार ९७४ वीज जोडण्या बाधित झाल्या आहेत. त्यापैकी १२ हजार ८१० कृषीपंप आहेत. गेल्या काही दिवसांत पावसामुळे विजेचे २८६ खांब जमीनदोस्त झाले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी ७३ खांब दुरुस्त करून पुन्हा उभारले. सुरक्षेचा उपाय म्हणून १५१६ रोहित्रे बंद ठेवली आहेत. कासारी नदीला पूर आल्यामुळे शाहूवाडी पडसाळी धरण परिसरातील गावांतील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला.

कासारी नदीला पूर आल्यामुळे बाजारभोगाव येथील वीज पुरवठा बंद आहे. पुराचे पाणी वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणच्या कळे उपविभागांतर्गत पडळसाळी धरण परिसरातील चव्हाणवाडी, पोंबरे, पिसात्री, सोनारवाडी, गुरववाडी, मनवाड, आढाववाडी, खापनेवाडी, वाशी, कोलिक, पडसाळी, चाफेवाडी, घोटणे आणि धनगरवाडा येथील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. करंजफेण, पाल वडाचीवाडी, येळवडी आणि धनगरवाडा, दाभोळकरवाडी, सावर्डी, ईजोळी ही गावे अंधारात आहेत.

वारणा नदीला पूर आल्यामुळे नदी भागाच्या दानोळी व कवठेसार येथील वीज पुरवठा वाहिन्या बंद केल्या आहेत. शिवाय नदीकाठावर गावठाण वाहिनीवरून असलेल्या दानोळी, कवठेसार, निमशिरगाव, तारदाळ गावाचा पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा देखील बंद केला आहे. पुराचे पाणी वाढत असल्यामुळे जुने कवठेसार येथील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पात्राबाहेर पडून नागरी वस्तीत पसरलेले पंचगंगेचे पाणी, पाण्याखाली गेलेले नाल्यांवरील पूल, शहरातंर्गत बंद झालेले मार्ग अशा गंभीर पूरपरिस्थितीत स्थलांतरीत करण्यात आलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला प्रशासकीय यंत्रणेसोबत मदतीचे हात सरसावले. शहरातील कदमवाडी, जाधववाडी, न्यू पॅलेस परिसर, शाहूपुरी येथील ज्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीही अनेक तरुण प्रशासनाच्या मदतीला पुढे आले. बाहेर मुसळधार सर कोसळत असताना पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मदत कार्याचाही पाऊस सुरू होता.

रविवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस सोमवारी दिवसभर सतत कोसळत असल्यामुळे सोमवारी सकाळीच शहरातील दोन टोकांना जोडणारे अनेक मार्ग बंद झाले. नागरी वसाहतीमध्ये पाणी घुसले. यामध्ये कदमवाडी, जाधववाडी, कसबेकर पार्क, शाहूपुरी, नागाळा पार्कातील काही भाग येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यामुळे सकाळी घराच्या दारातच पाणी साचल्याचे पाहून नागरीक भयभीत झाले. अशा नागरिकांच्या मदतीला भागातील युवक धावून आले.

लक्ष्मीपुरीतून स्टँडकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी व्हीनस कॉर्नर चौक, शाहूपुरीतील सहाव्या गल्लीचा मार्ग बंद झाल्याने बागल चौक मार्गे शाहूपुरीतून वाहतूक वळवावी लागली. त्यामुळे सकाळपासून शाहूपुरीतील चौथी व पाचवी या गल्लीत वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी अनेक तरूणांनी पुढाकार घेत वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम केले.

अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदी परिसरातील नागरिकांना घरातून सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मदत केली. तसेच ज्या पूरग्रस्त भागातील घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक, मुले, रुग्णांना नातेवाइकांच्या घरी, स्थलांतरीत लोकांसाठी सोय करण्यात आलेल्या ठिकाणी हलवण्यासाठी मदत केली. बिंदू चौक, फोर्ड कॉर्नर, राजारामपुरी या भागात काही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची भूमिका बजावली. चित्रदुर्ग मठ, मुस्लिम बोर्डिंग येथे सुतारमळ्यातील स्थलांतरीत नागरिकांसाठी सोमवारी सकाळपासून अनेकांनी जेवण दिले.

क्रिडाईतर्फे मदत

कोल्हापूर क्रिडाईच्यावतीने मुस्लिम बोर्डिंगमधील स्थलांतरीत पूरग्रस्तांसाठी चपाती भाजी व ब्लँकेट भेट दिले. शाहूपुरी मध्ये तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका वृद्ध महिलेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावरून सुरक्षितस्थळी आणले, तर गोरगरीब कुंभार समाजातील नागरिकांची उपजीविका असणाऱ्या गणेशमूर्तीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षित ठिकाणी नेत कुंभाराना आधार देण्याचे काम केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेहाल..!

$
0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

मुसळधार पावसामुळे शहराची दैना उडवली आहे. महापुराच्या वाढत्या पाण्यामुळे सोमवारी शहर बेहाल झाले आहे. शहरातील ४० पेक्षा अधिक भागात पुराचे पाणी घुसले आहे. प्रमुख १३ मार्ग बंद झाल्याने शहराची कोंडी होत आहे. पुराचे पाणी घुसलेल्या भागातून नागरिकांना स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १२९ गावे पूरबाधित असून, जवळपास १४ लाख लोक पुराच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. वारणा, कोयनेतील विसर्गामुळे शिरोळ आणि सांगली शहराची अवस्थाही वाईट झाली आहे.

पाण्याने वेढा दिलेल्या काही हॉस्पिटलमधील रुग्णांना यांत्रिक बोटी आणि जेसीबी मशिनमध्ये बसवून बाहेर काढण्यात आले. महावीर कॉलेज, रमण मळा, न्यू पॅलेस परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये पुराचे पाणी घुसले. महापुराच्या संकटामुळे जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ पथकाला पाचारण केले होते. ते सोमवारी संध्याकाळी दाखल झाले.

जयंती नाल्याच्या दोन्ही पुलावर पाणी आल्याने कसबा बावडा ते भाऊसिंगजी रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पंचगंगा तालीम मंडळ, न्यू पॅलेस, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी कुंभार गल्ली, सहावी गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय, कोंडा ओळ, उत्तरेश्वर ते शिंगणापूर रोड, सुतारमळा, पंचगंगा स्मशानभूमी ते जुना बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, मस्कुती तलाव आदी प्रमुख मार्ग बंद झाले. शहराच्या उत्तरेकडील भागातील रस्ते बंद झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दाभोळकर कॉर्नर आणि राजारामपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. न्यू पॅलेस, सिद्धार्थनगर, रमणमळा, बापट कँप, सुतारमळा, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर येथे पुराचे पाणी वाढत आहे. तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. दिवसभरात शहरातील विविध भागांतून १४५ कुटुंबांतील ६०० जणांना हलवण्यात आले. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि न्यू पॅलेस रोडवरील हॉस्पिटलमधून ५५ रुग्णांना यांत्रिक बोटीतून बाहेर काढण्यात आले.

जावडेकर प्लाझा आणि डायना पार्क परिसरातील नागरिकांनी स्थलांतर करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाला नकार दिला. दुपारनंतर पाणी पातळी वाढल्याने येथील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यामुळे पथकाची चांगलीच पळापळ झाली.

.. .. ... ....

एसटीचे २८ मार्ग बंद

शहरातील १४५ तर जिल्ह्यातील १,६५१ कुटुंबांचे स्थलांतर

शिरोळमधील १६०० नागरिकांना हलवले

दूध, भाजीपाल्याची आवक मंदावली

शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुटी

रेल्वे, केएमटी, एसटीसेवेवर परिणाम

पाटणे फाटा येथे १२ जणांना वाचवले

'एनडीआरएफ' दाखल

पूरबाधितांच्या मदतीसाठी संध्याकाळी एनडीआरएफ पथक दाखल झाले. मंगळवारपासून पथकातील जवान प्रत्यक्ष कामगिरीवर तैनात होतील, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली विविध स्वयंसेवी संस्थांचे ५०० हून अधिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. मात्र पूरस्थिती गंभीर असलेल्या करवीर, शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांपर्यंत तातडीने पोहचण्यात प्रशासनावर मर्यादा येत आहेत. यामुळे एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे.

.. . .

हायवे अंशत: बंद

पुणे-बेंगलोर हायवेवर शिरोली पुलाची येथे पाणी आल्याने वाहतूक एका बाजूने सुरू ठेवण्यात आली. दोन्ही बाजूचा सेवा मार्ग रविवारीच बंद झाला आहे. रस्त्यावर पाण्याची पातळी वाढल्यास वाहतूक पूर्ण बंद करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

.. . . .

सांगलीत ५६९ कुटुंबांचे स्थलांतर

सांगलीतील ५६९ कुटुंबातील ३००० जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कृष्णेने धोका पातळी ओलांडली असून, सोमवारी साडेआठच्या सुमारास पाणीपातळी ४७.५ वर गेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’ची प्राथमिक फेरी गुरुवारी

$
0
0

'श्रावणक्वीन'ची प्राथमिक फेरी गुरुवारी

कोल्हापूर टाइम्स टीम

गायन, वादन, नृत्य, अभिनय या कला आणि मॉडेलिंगमध्ये तुम्ही 'स्टार' आहात असे वाटत असल्यास 'श्रावणक्वीन'चे व्यासपीठ तुमची वाट पाहतेय. या व्यासपीठावर स्वत:मधल्या कलाकाराला सिद्ध करून ग्लॅमर जगतात स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी आहे. ही प्राथमिक फेरी ८ ऑगस्ट रोजी, गुरुवारी कोल्हापुरात होणार आहे. न्यू शाहूपुरी येथील हॉटेल रेडियन्ट येथे सकाळी दहा वाजता ही फेरी होईल.

नामवंत परीक्षकांच्या परीक्षणाखाली या स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडणार असून, यातील विजेत्यांची अंतिम फेरीसाठी निवड होईल. प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणीसाठी अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे तारीख जवळ येत असून, लवकरच तुमचे नाव निश्चित करा. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने दरवर्षी 'श्रावणक्वीन' या पर्सनॅलिटी काँटेस्टचे आयोजन करण्यात येते. यामधून आत्तापर्यंत मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्राला बरेच चेहरे मिळाले आहेत. निसर्गाला साज चढवणाऱ्या श्रावणाप्रमाणे साजेशा व्यक्तिमत्त्वाला श्रावणक्वीनच्या निमित्ताने दाद मिळते. त्यामुळे ही स्पर्धा दरवर्षी ऑगस्टमध्ये आयोजित केली जाते. प्राथमिक फेरीमध्ये तीन राउंड होणार आहेत. पहिला इंट्रोडंक्शन, दुसरा टॅलेंट आणि तिसरा क्यू अँड ए... यामधून स्वत:ची प्रतिभा दाखवा आणि अंतिम फेरीमध्ये स्वत:ची जागा निश्चित करा. या फेरीसाठी सिनेमा, नाटक, मालिकेमधील नामांकित परीक्षक परीक्षण करणार आहेत. टॅलेंट राउंडमध्ये तुमच्यातील नृत्य, गायन, अभिनय असे कोणतेही कलागुण सादर करण्याची मुभा आहे. सोबत बुद्धीमत्ता, व्यक्तिमत्त्व, तर्कबुद्धी यालाही गुण आहेत.

अंतिम फेरीमधील विजेत्यांना महाअंतिम फेरीचीही पायरी चढण्याची संधी मिळते, अर्थात प्रसिद्ध ग्रुमिंग एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली. अभिनयासोबतच फॅशन रॅम्पवरही झळकण्यासाठी ही स्पर्धा आदर्श प्रवेशद्वार ठरत असल्याचे सिद्ध होते आहे. फक्त यासाठी तुमच्यामध्ये हवी योग्य प्रतिभा.

नावनोंदणीसाठी...

या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी mtshravanqueen.com या वेबसाइटवर लॉगइन करा. नावनोंदणीसाठी २९९ रुपयांचे प्रवेशशुल्क असून, त्यासोबत 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'चे सदस्यत्त्व मोफत मिळणार आहे. या 'कल्चर क्लब'अंतर्गत आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतो, त्यामुळे त्याचीही पर्वणी मिळेल.

स्पर्धेच्या अटी आणि नियम

- १८ ते २५ वयोगटांतील अविवाहित तरुणींनाच नोंदणी करता येईल.

- नोंदणी केलेल्यांपैकी निवडक स्पर्धकांना प्राथमिक फेरीसाठी बोलाविले जाईल. ही निवड आमचे ज्युरी सदस्य करणार आहेत.

- नावनोंदणी करताना मेकअप नसलेला किमान एक फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे.

- फेरीचे राउंड एकापाठोपाठ होणार असून, मेकअप, टचअप, ड्रेपरी चेंजसाठी वे‌ळ मिळणार नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क -

ई-मेल आयडी -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत महापुराने हाहाकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मागील १२ दिवसांपासून संततधार पावसामुळे शहर आणि परिसरात पुराने हाहाकार उडाला आहे. बघेल तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली असून वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. शहरातील बहुतांशी शाळा-महाविद्यालयांना सुटी होती. पूराचे पाणी शिरलेल्या नागरी वस्तीतील कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येत आहे. दोन दिवसांत १७५ कुटुंबांना १० छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पावसाचा जोर कायम असल्याने २००५ पेक्षाही पूर परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, पावसामुळे शहरात काही ठिकाणी भिंती पडण्याचे प्रकार घडत आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास विक्रमनगर परिसरातील गणेश जाधव यांच्या घराची तसेच गावभागातील एका घराची भिंत पडली. तर कापड मार्केट हाउसिंग सोसायटी परिसरातील झाड उन्मळून पडले.

सन २००५ मध्ये पाण्याने ७६ फुटाची पातळी गाठल्याने महापूराची परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी सायंकाळी पुराच्या पाण्याची पातळी ७३.३ फुटावर पोहोचली होती. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्तांसाठी तयार केलेल्या १० छावण्यांमध्ये १७५ कुटुंबातील ८०४ नागरिकांचा समावेश आहे.

पूरग्रस्त छावण्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या कुटुंबीयांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाच्या आवाहनानुसार शहरातील अनेक सेवाभावी संस्थांनी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार योग्य ते नियोजन करून सेवाभावी संस्थांना छावणीची ठिकाणे निश्‍चित करून दिली आहेत. त्यानुसार मंगळवारपासून व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. त्याचबरोबर या कामाच्या नियोजनासाठी तहसीलदार चैताली सावंत यांची नियुक्ती केली असून ज्यांना या कामात मदत द्यावयाची आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही शिंगटे यांनी केले आहे.

वाहने अडकली

धरण पाणलोट क्षेत्रातील दमदार पाऊस आणि सर्वच धरणांतून मोठ्या प्रमाणात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे. येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी वेगाने वाढत चालली असून पाण्याने शनिवारी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीचे पाणी जुना नदीवेस नाका मरगुबाई मंदिरापर्यंत आले आहे. परिसरातील शेळके मळा, बागवान पट्टी, मुजावर पट्टी, तोडकर मळा आदी भागातील कुटुंबांचे स्थलांतर केले जात आहे. त्याचबरोबर टाकवडे वेस भागातील राणाप्रताप चौकात काळ्या ओढ्याचे पाणी आले आहे. तसेच जुना सांगली नाका ते आमराई रस्त्यावरही ओढ्याचे पाणी आले. काळा ओढानजीक भुयारी गटार योजनेसाठी खुदाई केलेला रस्ता खचला असून त्यामध्ये एक चारचाकी वाहन अडकून पडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images