Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नोटिसींचा केवळ फार्सच

$
0
0

गायरानावर डल्ला ... २

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

कदमवाडीतील सरकारी गायरानात अतिक्रमण करून विनापरवाना घर, शेड बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेच्या उपशहर रचनाकार विभागाने सहा महिन्यांपूर्वी ३२ जणांना नोटिसा काढल्या. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण काढण्यासंबंधीची कारवाई अर्थ आणि राजकारणामुळे 'म्यान' झाली. परिणामी नोटिसीचा केवळ फार्सच ठरला. महानगरपालिकेच्या सभागृहात दुसऱ्यांच्या अतिक्रमणावर जोरजोरात आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी आपल्या भागातील अतिक्रमणाकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.

गायरानातील अतिक्रमणाविरोधात अनेकदा महसूल, महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी झाल्या. मात्र हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत वेळ मारून नेत राहिले. प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने शेवटी स्थानिक शेतकरी अरूण कदम, नितीन कदम, विशाल कदम यांनी एप्रिल २०१९ मध्ये हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी महसूल विभागाचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, करवीर तहसीलदार, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह २८ अतिक्रमणधारकांना प्रतिवादी केले.

याचिकाकर्त्यांनी कोर्टात अतिक्रमण केलेल्यांची दुसऱ्या ठिकाणी असलेल्या घरांची माहितीही दिली आहे. कोर्टात दिलेल्या माहितीनुसार मालप, चव्हाण, मारूती पाटील यांचे महालक्ष्मी नगर, दादू पाटील यांचे भोसले पार्क, फाळके यांचे अयोध्या गल्लीत, सरनाईक, हाळदे यांचे विठ्ठल मंदिराजवळ, ढेरे यांचे उचगाव मणेरमळा, दामुगडे यांचे सोनल कॉलनी अशा २५ जणांची इतरत्र घरे आहेत. तरीही त्यांनी गायरानात अतिक्रमण केल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यावरून भविष्यात अतिक्रमण निघाल्यास दुसरा पर्यायही त्यांनी ठेवल्याचे स्पष्ट होते. न निघाल्यास मोफत जागा मिळेल, असाही अनेकांचा समज आहे. परंतु, आतापर्यंत राजकारण्यांतर्फे प्रशासनाला मॅनेज करून अतिक्रमणांना मिळालेले अभय कोर्टाच्या आदेशामुळे काढावे लागणार आहे. अन्यथा कोर्टाच्या आदेशाचा अवमान होणार आहे.

...

चौकट

अतिक्रमणधारक असे

रमेश सरनाईक, राजू तोरस्कर, रामचंद्र चव्हाण, श्रीपती मालप, महादेव आगळे, मोहन गुंड, संजय बावस्कर, बनुताई लाळगे, नाना शिंदे, जयसिंग कदम, नितीन रामुगडे, यशोदा ढेरे, जयवंत ढेरे, सुनिता मोरे, मारूती पाटील, किरण खराडे, दत्तात्रय पिलावरे, लहू पाटील, सुलोचना सरनाईक, सुमन बोईने, शिवरत्न मित्रमंडळ अध्यक्ष, दादू पाटील, भगवान पाटील, विष्णू दामुगडे, येसाबाई पाटील, पांडूरंग फाळके, प्रकाश पाटील, उत्तम पाटील, अनिल हळदे या अतिक्रमणधारकांना महानगरपालिका प्रशासनाने जून २०१८ मध्ये नोटिसा दिल्या होत्या. नोटिसीत प्रत्येकाने गायरानात विनापरवाना किती बांधकाम केले आहे, याची नोंदही केली आहे. इतके अतिक्रमणधारक प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा अधिकजणांनी अतिक्रमण केले आहे.

...

गट नंबर ७५४ गायरानच

महसूलच्या सातबारावर कदमवाडीतील रि.स.नंबर ७५४ गायरान म्हणूनच आजही नोंद आहे. १९८४ मध्ये यातील काही भाग पब्लिक हेल्थ को- ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीला देण्यास तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. मात्र सोसायटीला गायरान दिल्याने शर्थभंग झाल्याचे उघड झाल्यानंतर २००६ मध्ये सोसायटीला दिलेले गायरान पुन्हा सरकारी हक्कात घेण्यात आले. अजूनही सातबारा पत्रकी गायरान अशीच नोंद आहे.

...

कोट

'सरकारी जागेत दहापेक्षा अधिक वर्षे रहिवास असणाऱ्यांचे अतिक्रमण कायम करावे, असा सरकारचा आदेश आहे. यानुसार कदमवाडीतील अतिक्रमण नियमित करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. त्या अतिक्रमणासंबंधी हायकोर्टाने दिलेल्या आदेशास आव्हानही दिले जाईल.

सत्यजित कदम, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधानसभा न लढविण्याची गणपतराव देशमुखांची घोषणा

$
0
0

विधानसभा न लढविण्याची गणपतराव देशमुखांची घोषणा म. टा. वृत्तसेवा, सोलापूर तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आणि ५४ वर्षे विधानसभेत आपल्या कामाची छाप उमटविणारे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. सांगोला तालुक्यातील कोळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. मी निवडणूक लढविणार नसलो तरी शेतकरी कामगार पक्षाचा सांगोल्यातील बाल्लेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९४३७४ मते मिळवून शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील यांचा पराभव केला होता. शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतलेले गणपतराव देशमुख आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध आहेत. वयाची ९२ वर्षे पूर्ण केलेल्या गणपतराव देशमुख यांचा जन्म १० ऑगस्ट १९२७ रोजी झाला. १९६२ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. त्या नंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांना भरभरून मतांनी विजयी केले. विशेष म्हणजे २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सदस्यत्वाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता. महाराष्ट्रातील सर्वांत वयस्कर आमदार म्हणूनही गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. अकरा वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रमाची ही देशमुख यांच्या नावे नोंद आहे. नेहमीच विरोधी बाकावर गणपतराव देशमुख बहुतांश काळ विरोधी बाकांवरच राहिले. मात्र १९७८मध्ये शरद पवार यांच्या 'पुलोद' सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री होते. १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात पणनमंत्री म्हणून समावेश झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी प्रस्ताव सरकारकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत पाणीपट्टीप्रकरणी नऊ गावांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये, यासाठी आमदार अमल महाडिक यांनी मध्यस्थी केली. विलंब आकारणी माफ करावी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापना खर्चाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शिवाय एमजीपीने १५ रुपये या दराने प्रति एक हजार लिटर पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली. तर एमजीपीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मिळणाऱ्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असा खुलासा अधिकाऱ्यांनी केला.

पाचगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, वळीवडे आणि कणेरी या नऊ गावांनी तब्बल पाच कोटी ९० लाखांची पाणीपट्टी थकवली आहे. एमजीपीने या गावांचा पाणी पुरवठा एक ऑगस्टपासून बंद करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महाडिक यांनी मंगळवारी एमजीपी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यांनी 'एमजीपीने नऊ गावांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेऊ नये. थकीत पाणीपट्टीवर एमजीपीने जी विलंब आकारणी केली आहे. ती आकारणी सरकारने माफ करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत', असे सांगितले.

'एमजीपीकडून सध्या १८ रुपये ९० पैसे या दराने प्रति एक हजार लिटर पाणी पुरवठा होतो. ती कमी करुन १५ रुपये लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करावा', अशी मागणी सरपंचांनी केली. तसेच एमजीपीचा आस्थापना खर्च सरकारने करावा. यासंबंधी प्रत्येक गावांनी ठराव करुन तो सरकारला सादर करण्याचे ठरले. थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळावी अशीही चर्चा झाली. यावेळी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

...................

नऊ गावांतील पाणी पुरवठासंदर्भात झालेल्या बैठकीचा अहवाल मुख्य अभियंत्यांना सादर करण्यात येणार आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार निर्णय होईल.संबंधित ग्रामपंचायतीनी थकीत पाणीबिल भरुन सहकार्य करावे.

सी. एम. कागलकर, कार्यकारी अभियंता एमजीपी, कोल्हापूर विभाग

.....................

गावांना मीटर पद्धतीने पाणी

गांधीनगर पाणी पुरवठा योजनेंतर्गत १४ गावांना पाणी पुरवठा होतो. वितरण पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याचे ठरले. एमजीपीकडून गावांना पाणी पुरवठा करताना मीटर पद्धतीचा अवलंब करावा व त्यानुसार बिलाची आकारणी करण्याचा निर्णय यावेळी झाला. एक ऑगस्टपर्यंत एमजीपीने गावनिहाय पाणी पुरवठ्याचा अहवाल द्यायचा आहे.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत भालके, सिद्धाराम म्हेत्रेंचीमुलाखतीला दांडी

$
0
0

भालके, सिद्धाराम म्हेत्रेंची

मुलाखतीला दांडी

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी ही इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे दोघेही या मुलाखतीला अनुपस्थितीत राहिले. आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत विधानसभेसाठी इच्छुकांची मुलाखती सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून आमदार भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी मुलाखतींकडे पाठ फिरवल्याने या चर्चेत अधिक भर पडली आहे.

आमदार म्हेत्रे यांना पराभूत करण्यासाठी अक्कलकोटमध्ये एका महाराजांना उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे म्हेत्रे यांनी सावध पवित्रा घेतला असून, म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वाढली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामार्फत म्हेत्रे प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. अक्कलकोट येथे आयोजित मेळाव्यात ही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह धरला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी ही चाचपणी सुरू केली आहे. भालके यांनी काँग्रेस न सोडल्यास भाजप त्यांच्या समोर तगडा उमेदवार देऊ शकतो, त्यामुळे भालके द्विधा मनःस्थितीत आहेत. सोमवारच्या मुलाखतीला गैरहजर राहिलेले आमदार म्हेत्रे यांनी परगावी असल्याचे सांगितले आहे, तर आमदार भालके यांचा फोन नंबर बंद असल्याने संशय वाढला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मुलाखत दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्यादुसऱ्या

$
0
0

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्याचा आज सोलापुरातून प्रारंभ सोलापूर : युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्याचा प्रारंभ आज, बुधवारपासून सोलापुरातून होत आहे. आदित्य सकाळी साडेदहा वाजता सोलापुरातील वालचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य सिद्धेश कदम, दुर्वेश सरनाईक, रुपेश कदम आणि साईनाथ दुर्गे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्या नंतर उस्मानाबाद येथे आदित्य यांचा संवाद होणार आहे. बीडमध्ये महिलांसाठी तर हदगावमध्ये शेतकऱ्यांशी आदित्य संवाद साधतील असेही त्यांनी सांगितले. जळगाव-नाशिक या पहिल्या टप्यातील जनआशीर्वाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्यातील यात्रेला सुरुवात होत आहे. बुधवारी सोलापूर आणि उस्मानाबाद, त्या नंतर १ आणि २ ऑगस्ट रोजी लातूर, नांदेड आणि परभणी तसेच ३ ऑगस्ट रोजी परभणी शहर व हिंगोली आणि ४ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील विभागात जनआशीर्वाद यात्रा होणार आहे. या यात्रेच्या दरम्यान, विजय संकल्प मेळावा, गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकसभा, शेतकरी, महिला, विद्यार्थांचे प्रश्न जाणून घेण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत युतीला केलेल्या मतदानाबद्दल आभार मानण्यासाठी ही यात्रा असणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा: काशीळजवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण ठार

$
0
0

सातारा: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ येथे झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले आहेत. या अपघातात दोघे गंभीर जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांमध्ये कर्नाटकातील धारवाडच्या सौदागर कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ जवळील गांधीनगर येथे सौदारगर कुटुंबीयांची कार आली असताना गाडीचा ताबा सुटल्याने ही कार बाजूच्या झाडाला आदळली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला, या वरून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. या अपघातात सौदागर कटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर चालक आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन पुरूष, दोन महिला, सुमारे साडेतीन वर्षांच्या लहान मुलगा आणि पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर: महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळला; १ ठार, १५ जखमी

$
0
0

करमाळा: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

तालुक्याचं ठिकाण असलेल्या करमाळा शहरात मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्र बँकेची ही इमारत आहे. तीन मजल्याच्या या इमारतीत बँकेची शाखा तळमजल्यावर आहे. याच मजल्यावर स्लॅब कोसळला आहे. यात बँकेचे एक क्लार्क प्रशांत बागल यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जेसीबीच्या मदतीनं ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपातही भाजप प्रवेशाचे वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यभर सुरू असलेल्या भाजप प्रवेशाचे वारे कोल्हापूर महानगरपालिकेच्या दरवाजावरही येऊन ठेपले आहे. तीन वर्षांपासून महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या गोटात पुढील महिन्यात काही नगरसेवक दाखल होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील ताराराणी आघाडी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रवेशावेळी भाजपमध्ये विलीन केली जाईल अशी चर्चा आहे. तर राष्ट्रवादीतील काही असंतुष्टांवरही जाळे टाकण्यात येत असून पुढील पंधरा दिवसात त्याबाबत घडामोडी घडू शकतात. यामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण ऐन पावसाळ्यात गरम होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेत्यांचे भाजपमधील इनकमिंग सुरू झाले आहे. पुढील महिन्यात महाडिक यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक व चंद्रकांत पाटील यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांतून जिल्हा परिषदेची सत्ता भाजपला मिळाली. तसेच दक्षिण विधानसभा मतदारसंघातही अमल महाडिक यांच्या माध्यमातून भाजपचे ‘कमळ’ फुलवण्यात यश आले. आगामी वाटचालीतही महाडिक गट भाजपसोबत राहणार असेच चित्र आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी अगदी थोडक्यात हुकलेला धनंजय महाडिक यांचा भाजपमधील प्रवेश यावेळी होण्याची शक्यता आहे. कार्यक्रम झालाच तर केवळ महाडिक यांचा एकट्याचा प्रवेश होणार नाही. त्यांच्यासोबत त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा गटही असेल असे सांगण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिकेत महाडिक गटाची ताराराणी आघाडी असून त्यांचे १९ नगरसेवक आहेत. सध्या ताराराणी आघाडी भाजपसोबत असली तरी धनंजय महाडिक राष्ट्रवादीत असल्याने अनेकदा पेच निर्माण झाला आहे. त्यासाठीच महाडिक यांच्यासोबत ताराराणी आघाडीचे नगरसेवकही प्रवेश करुन आघाडी भाजपमध्ये विलीन केली जाईल, असे दिसते.
ताराराणी आघाडीतील नगरसेवक हे महाडिकांना मानणारेच असल्याने या प्रक्रियेला फारसा वेळ लागणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दोन वर्षांपासून जोरदार धुसफूस सुरू आहे. त्यातून भाजपकडून जोरदार प्रयत्न केला तर काही नगरसेवक सहज गळाला लागतील अशी परिस्थिती गेल्या काही महापौर निवडीवेळी होती. गेल्या महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी तर काहींनी पक्ष सोडून जाण्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला होता. त्यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी निमित्त शोधण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत दोन महापौर करण्याचा प्रयत्न आहे. सूरमंजिरी लाटकर यांना निम्मा कालावधी द्यायचा झाल्यास ऑगस्टमध्ये नवीन निवड केली जाऊ शकते. त्यातून घडामोडी घडवल्या जाण्याची शक्यता आहे. भाजप प्रवेशाबाबत महापालिकेत आगामी पंधरा दिवस उलथापालथीचे ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू माफियांना पकडायला गेलेल्या पोलिसांनी पकडली ४३ गाढवं

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर:

चंद्रभागेचे वाळवंट ओसाड बनवणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात पोलिसांनी कंबर कसली असून आज वाळू चोरी करीत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चक्क ४३ गाढवांना ताब्यात घेतले आहे तसेच ४ दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत .

पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंटाच्या प्रत्येक घाटावरून वाळू माफिया गाढवावरून वाळू तस्करीचा व्यवसाय करीत असतात . याबाबत अनेकवेळा तक्रारी झाल्यावर हे माफिया वाळू आणि गाढवे सोडून पाण्यातून पळून जात असल्याने पोलिसांना हाती काहीच लागत नसे . आता मात्र पोलिसांनी या बेकायदा वाळू वाहतुकीचे मुख्य साधन असलेली गाढवाचं जप्त करण्यास सुरुवात केली आहे. आज नगरपालिका पाणीपुरवठा केंद्राजवळ टाकलेल्या छाप्यात ४३ गाढवे आणि ३ ब्रास वाळू पोलिसांना मिळाली आहे. पोलीस येताना दिसताच हे वाळू माफिया पाण्यात उड्या टाकून पळून गेले असले तरी ४३ गाढवांसोबत त्यांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत . धक्कादायक बाब म्हणजे जप्त केलेल्या या दुचाकी मधील २ दुचाकी या चोरीच्या असल्याचे उघड झाले आहे .

पोलिसांनी वाळू माफियांना धडा शिकवण्यासाठी चक्क गाढवे जप्त केली असली तरी आता आज दिवसभर या गाढवांना चार पाणी देण्याची वेळ पोलिसांवर आली होती . पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ही सगळी गाढवे दिवसभर आणून ठेवल्याने पोलीस स्टेशनला कोंडवाड्याचे स्वरूप आले होते . थोड्या थोड्या वेळानी पोलीस कर्मचारी या गाढवांना चारा टाकायचे काम करीत होते . आता या गाढवांना प्राणीमित्र संघटनेच्या ताब्यात देण्याचा निर्णय पोलिसांनी न्यायालयाच्या सूचनेनुसार घेतला असला तरी आज दिवसभर पोलीस ठाण्यात या गाढवांचे आदरातिथ्य सुरु असल्याचे मजेशीर चित्र पाहायला मिळत होते . या गाढवांच्या अज्ञात मालकांवर आता बेकायदा वाळू चोरीसोबत मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराची कलमे लावल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे .

पंढरपूर शहरात ५ हजारापेक्षा जास्त गाढवांचा वापर हे वाळू माफिया वाळू उपशासाठी आणि वाहतुकीसाठी करीत असून एक गाढव मालकाला दिवसभरात ५ ते १० हजार रुपयाचा व्यवसाय करून देते . आता या बेकायदा व्यवसायावर टाच आणण्यासाठी शहरातील गाढवे पकडून त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम पोलीस हाती घेणार आहेत . यापूर्वी ४ वर्षाखाली गाढवांच्या वाळू चोरीचे वास्तव दाखवल्यावर तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी गाढवांवर कारवाई करायला लावली होती आणि याचे पडसाद विधानसभेत उमटले होते .


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक देता का शिक्षक?

$
0
0

शिक्षक देता का शिक्षक?
जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून लौकिक असलेल्या शाहूवाडी तालुक्यात मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांना ‘शिक्षक देता का शिक्षक’ म्हणण्याची वेळ आली आहे. डोंगराळ व दुर्गम भाग म्हणून या तालुक्यात नोकरी नको अशी मानसिकता शिक्षकांची बनली आहे. जिल्हा परिषद एकीकडे ‘माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा’ यासारखा अभिनव उपक्रम राबवित असताना जिल्ह्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पदवीधर अध्यापक व शिक्षक मिळून एक हजारहून अधिक पदे रिक्त आहेत. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना या प्रश्नाचे गांभीर्य कधी कळणार, असा सवाल शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित होत आहे.
शाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला, अद्याप शिक्षकांच्या नियुक्त्या न झाल्यामुळे त्याचा अभ्यासक्रम शिकवणी, शैक्षणिक उपक्रमावर परिणाम होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संख्या १९९६ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सेवानिवृत्त शिक्षकांच्या रिक्त आंतरजिल्हा बदली प्रकरण, शिक्षक बदलीतील घोळ यामुळे अनेक शाळेत शिक्षक पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील माहितीनुसार मुख्याध्यापक, पदवीधर अध्यापक व शिक्षकांच्या मिळून ७९८ इतक्या जागा रिक्त असल्याचे सांगितले जाते.
मात्र शिक्षकांच्या माहितीनुसार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पदवीधर अध्यापक व अध्यापक मिळून एक हजारच्या आसपास जागा रिक्त आहेत. एका शाहूवाडी तालुक्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पदवीधर अध्यापक व शिक्षक मिळून १९५ पदे रिक्त आहेत. तालुक्यातील तब्बल ४० शाळा एका शिक्षकावर सुरू आहेत. केदारलिंगवाडी, इजोली, घोटणे वसाहत, गवळेवाडी, धुमकेवाडी, गेळवडे, सावर्डी, भैरी धनगरवाडा या गावात शिक्षक नाहीत.
००००
रिक्त पदांवर दृष्टिक्षेप
जिल्ह्यात शिक्षकांची ५५० (मंजूर पदे ६१९१) रिक्त आहेत. पदवीधर अध्यापकांची २७४ (मंजूर पदे १८००) व मुख्याध्यापकांची १०० (मंजूर पदे ५१८) पदे भरण्याची प्रक्रिया झाली नसल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाकडील नोंदीनुसार आजरा तालुक्यात १८, भुदरगडमध्ये ३४, चंदगडमध्ये ३४, गडहिंग्लजमध्ये २३, गगनबावडामध्ये १७, हातकणंगलेत ३९, कागल ३८, करवीर ४८, पन्हाळ्यात ३७, राधानगरीत ४४ शिक्षक पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या वेगळीच आहे.
०००
शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे होणारे परिणाम
शाळा सिद्धी अभियान रखडले
शैक्षणिक गुणवत्ता वाढ थंडावली
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम संथगतीने
शिष्यवृत्तीसह अन्य स्पर्धेच्या परीक्षेच्या तयारीसाठी कमी वेळ
००००
बालकांचा मोफत हक्क कायद्यानुसार मुलांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा अधिकार कुणाला नाही. शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. शिक्षण ही कारखानदारीसारखी प्रक्रिया नाही, जेणेकरून ओव्हरटाइम करून भरून काढता येईल. योग्यवेळी अध्यापन, शैक्षणिक उपक्रम पूर्ण व्हायला हवे.
प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक पुरोगामी शिक्षक संघटना
०००
शाहूवाडी तालुक्यात नऊ शाळेत एकही शिक्षक नाही. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय मांडला. प्रशासनाकडे पत्रे दिली. तरीही प्रशासनाकडून शिक्षकांच्या नेमणुका झाल्या नाहीत. चाळीस दिवसापासून शिक्षक नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कुणाची ? शिक्षकाअभावी विद्यार्थी वाऱ्यावर आहेत. सीईओंनी या प्रश्नाकडे सकारात्मकतेने पाहावयास हवे होते. पालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही.
आकांक्षा पाटील, सदस्या जिल्हा परिषद
०००
३८० वर्गखोल्या धोकादायक
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळेतील तब्बल ११२० खोल्या नादुरुस्त आहेत. पावसाळ्यात गळतीची समस्या उद्भवत असल्यामुळे ठिकठिकाणी मंदिर, समाजमंदिर, सभागृहात खोल्या भरतात. ११२० पैकी ३८० वर्ग खोल्या धोकादायक आहेत. मोडकळीस आलेल्या खोल्यांची संख्या ७०० हून अधिक आहे. प्रशासनाने २१० वर्गखोल्यांचे निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर आहेत. मात्र, अनेक प्रस्ताव तांत्रिक प्रक्रियेत अडकले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरंजनात मोबाइलचा अडथळा नकोच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रंगमंचावर नाटक ऐन भरात आले असताना एखाद्या प्रेक्षकाचा फोन खणाणतो. कोणताही विचार न करता प्रेक्षक फोनवर मोठ्याने बोलू लागतो. प्रेक्षागृहातील माना त्याच्याकडे वळतात. रंगमंचावरील नाटकाचा प्रवाह तुटतो. मात्र आपल्या फोनमुळे नाटकात आलेल्या व्यत्ययाबाबत संबंधित प्रेक्षकाला काडीमात्र शल्य नसते. याचा प्रचंड त्रास कलाकारांना होतो. नुकत्याच आलेल्या अशा अनुभवातून उद्वीग्न झालेल्या सुबोध भावे यांनी नाटकाच्या प्रयोगादरम्यान फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकांविरोधात कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली. नाटक सोडण्यापर्यंत त्याचा राग शिगेला पोहोचला. इतकेच नव्हे तर पुढच्या प्रयोगाआधी सुबोधने सहकारी कलाकारांसह डोअरकिपर बनून प्रेक्षकांना सुनावले. या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील नाट्यकर्मींनीही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

रंगकर्मी म्हणून अशा बेजबाबदार प्रेक्षकांचा खूप त्रास होतो. दोन तासांच्या नाट्यप्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांनी यावेळेत फोन घेऊ नये याचे भान पाळायलाच हवे. पैसे देऊन तिकीट घेणे याचा अर्थ कलाकारांना गृहित धरणे असा होत नाही. अनेकदा फोनवरील संभाषण महत्त्वाचे नसते. आपला फोन म्यूट करा हे सांगण्याची वेळ येणेच दुर्दैवी आहे.

- डॉ. शरद भुथाडिया, अभिनेते, दिग्दर्शक

जे नाटक पहायला प्रेक्षक दोन तासांचा वेळ काढून येतात ते उभं करण्यासाठी कलाकार मागचे दोन महिने राबत असतात. एखाद्या भूमिकेत शिरणं काय असतं हे नाट्यकर्मीच जाणू शकतो. सध्या प्रेक्षकांना सांस्कृतिक शिष्टाचार उरलेला नसल्याचे या वर्तनातून दिसून येते. कलाकार आवाहन करतात तरीही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रेक्षकांनी नाटकाला येऊच नये.

- उमा नामजोशी, ज्येष्ठ नाट्यकर्मी

आजच्या काळात अनेक माध्यमातून मनोरंजन होत आहे. मात्र नाटक ही जीवंत कला आहे. आपल्यासमोर नाटकाचा प्रयोग सुरू असतो तेव्हा त्यामध्ये गिव्ह अँड टेक असते. जेव्हा एका प्रेक्षकाचा फोन मोठ्या आवाजात वाजतो, व त्यानंतर तो तितक्याच मोठ्याने फोनवर बोलतो तेव्हा कलाकार व इतर प्रेक्षकांचाही तो अवमान आहे. दोन तासांसाठी मोबाइल शिष्टाचार पाळत असताना म्यूट करणे, स्टेटस टाकणे अशा गोष्टी करण्याचे भान असले पाहिजे.

- संजय मोहिते, नाट्यअभिनेता

नाटकाचा प्रयोग सुरू असताना फोन वाजण्याचा काय त्रास होतो हे एखाद्या नाट्यकर्मीलाच कळू शकते. कलाकार त्याच्या भूमिकेशी समरस झालेला असतो अशावेळी वाजणारा फोन नाटकाच्या प्रवाहात खंड पाडतो. याचे भानही प्रेक्षकांना नसते. त्याबाबत माफी मागण्याचे सौजन्यही काही प्रेक्षक दाखवत नाहीत. अशाप्रकारचा सांस्कृतिक संस्कार नसलेल्या प्रेक्षकांना नाट्यगृहाचे पावित्र्य घालवू नये.

- सुबोध गद्रे, ज्येष्ठ रंगकर्मी

नाट्यप्रयोगादरम्यान प्रेक्षकांचा फोन वाजणे याचा राग येणे स्वाभाविक आहे. मात्र कलाकारांनी प्रयोगाशिवाय प्रेक्षकांशी संवाद वाढवला पाहिजे. सध्या सोशल मीडियाद्वारे कलाकार त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना सूज्ञ बनवण्यासाठी कलाकार व प्रेक्षक यांच्यातील कनेक्शन किती बळकट आहे याचा वापर व्हायला हवा. सामाजिक संवेदना आज हरवत चालल्या आहेत. त्यामुळे नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांमध्येही ती असेल याची अपेक्षा नाही. यासाठी कलाकारांनीच आपल्या प्रेक्षकांवर प्रेक्षक म्हणून कसे भान राखायचे याचे संस्कार करावेत.

- स्वप्नील राजशेखर, अभिनेता, दिग्दर्शक

नाटकाचा प्रयोग सुरू असताना, एखादा महत्त्वाचा प्रसंग रंगलेला असताना प्रेक्षकाचा फोन वाजणे याचा अनुभव खूप त्रासदायक आहे. मात्र हे प्रकार विशिष्ट नाट्यगृहातच घडतात. एनसीपीए, पृथ्वी थिएटरमध्ये होणाऱ्या हिंदी , इंग्रजी नाटकांदरम्यान एकही फोन वाजत नाही. मराठी नाटकांच्याबाबतीतच असे का होते याचा विचार केला पाहिजे. ही प्रेक्षकांच्या व्यक्तीगत आचरणाची गोष्ट आहे. प्रेक्षक केवळ रसिक असून चालणार नाही तर तो सूज्ञही असला पाहिजे.

- रोहित हळदीकर, नाट्यअभिनेता

नाटकच काय, मोबाइल वापराच्या शिष्टाचारांविषयी असणारे अज्ञान किंवा किमान जाणिवांचा अभाव आपल्या समाजाच्या बेजबाबदार प्रवृत्तीचे चिन्ह आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्यांना ही जाणीव नाही त्यांची बेदरकारी वाढत आहे आणि त्यांना कसलीही फिकीर वाटत नाही. मनोरंजनाच्या माध्यमांच्या गर्दीत नाटक टिकवून ठेवणाऱ्या कलाकारांना यामुळे होणाऱ्या त्रासाची अशा प्रेक्षकांना जाणीव नसणे हे वाईट आहे.

- प्रभाकर वर्तक, ज्येष्ठ रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने वाहतूक कोलमडली

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राधानगरी धरण भरल्याने पंचगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जोरदार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढल्याने जिल्ह्यातील ८१ बंधारे सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली राहिले, तर शहरातही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली. पुराने २५ मार्ग प्रभावित झाल्याने एसटीच्या १७ मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्या आहेत. पाच मार्गांवर अंशता, तर तीन मार्गांवरील फेऱ्या पर्यायी मार्गाने सुरू आहेत. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.१६ मिमी पाऊस पडला. सर्वाधिक ११४ मिमी पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला, सर्वात कमी २३ मिमी पाऊस शिरोळ तालुक्यात पडला. जून आणि जुलै या दोन महिन्यात सरासरी पावसाची नोंद १०६० मिमी होते. गेल्या दोन महिन्यात १०९५ मिलीमीटर पाऊस पडल्याने सरासरीपेक्षा जास्त झाल्याची नोंद आहे. दोन दिवसांतील अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात गतीने वाढ झाली. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. सहा आणि तीन क्रमांकाचे दोन दरवाजे उघडून त्यातून २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. धरणातील पाण्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरणक्षेत्रातील धुवॉँधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्री सात वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट चार इंच होती. बुधवारी दुपारी बारापर्यंत ही पातळी ३९ फूट सात इंचांवर पोहोचली. इशारा पातळीवर पाणी गेल्याने कोल्हापूर शहरातील सुतार मळा, कसबा बावडा, कदमवाडी, जाध‌ववाडी, जामदार क्लब, आदी परिसरात घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका ओळखून महानगरपालिका प्रशानाने नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी केली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे.

दरम्यान, पुराचे पाणी रस्त्यांवर आल्याने एसटीचे २५ मार्ग प्रभावित झाले आहेत. यापैकी १७ मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद करावी लागली. पाच मार्गांवर अंशत: वाहतूक सुरू आहे, तर तीन मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. गेल्या दोन दिवसात एसटीचे सुमारे दहा लाखांचे उत्पन्न पावसामुळे बुडाले, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. केर्ली ते जोतिबा मार्गावर रस्त्याला मोठी भेग पडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. खासगी वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला.

शहरातील कोंडी कायम

पावसामुळे शहरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, शाहूपुरी, राजारामपुरी, बागल चौक, जामदार क्लब, आदी परिसरात पाणी आहे. पेठांसह उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे बुधवारीदेखील शहरात वाहतूक कोंडी कायम होती. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. झाडांच्या पडझडीमुळे यात भरच पडली. शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चजवळ झाड पडल्याने हा मार्ग काही तास वाहतुकीसाठी बंद केला होता.

गेल्या चार वर्षातील सर्वाधिक पाऊस

जून आणि जुलै या दोन महिन्यातील सरासरी पावसाने ओलांडली आहे. या दोन महिन्यात गेल्या चार वर्षातील सर्वाधिक पाऊस पडला. २०१६ मध्ये ९०४.३ मिमी, २०१७ मधअये ७७८.५० मिमी, २०१८ मध्ये १०२९.४५, तर यंदा १०९५ मिमी पाऊस पडला. दोन महिन्यातील सरासरीपेक्षा अडीच टक्के जास्त पावसाची नोंद यंदा झाली.

शहरातील हे बंद मार्ग

- शिवाजी पूल ते गंगावेश

- कसबा बावडा ते वडणगे

आगारनिहाय जिल्ह्यातील बंद मार्ग

मलकापूर - गावडी ते सृष्टीवाडी

राधानगरी - आमजाई व्हरवडे, शिरगाव

कुरुंदवाड - इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ

गगनबावडा - मांडुकली, लोंघे, कासे फाटा, किरवे मंदिर

गडहिंग्लज - कोवाड, नांगनूर, ऐनापूर बंधारा, निलजी बंधारा

आजरा - आजरा ते साळगाव, देवकांडगाव, तिटवडे, साळगाव

चंदगड - इब्राहिमपूर, भुजवडे, दोडामार्ग, हेरे, गवसे, फार्णेवाडी

गारगोटी - मोरस्करवाडी, वाळवा, बाचणीमार्गे कोल्हापूर, म्हसवे ते बाचणी

कागल - हुपरी ते रंकाळा, मुरगूड, बाणगे, पट्टणकोडोली, बस्तवडे ते बाणगे

पॉईंटर्स

- सरासरीपेक्षा जास्त पाऊस

- सखल भागात पाणी कायम

- एसटीच्या फेऱ्या रद्द

- दहा लाखांचे उत्पन्न बुडाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीजनजागृती आवश्यक’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. त्याची सुरुवात स्वत:पासून करा,' असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी मंगळवारी केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पंचगंगा नदी आणि परिसर प्रदूषण निर्मूलनासाठी आयोजित जनजागृती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी दौलत देसाई अध्यक्षस्थानी होते.

डॉ. मुळीक म्हणाले, 'देशातील प्रदूषित २० नद्यांत पंचगंगेचा समावेश आहे. यामुळे नदी मृत झाली आहे. नैसर्गिक पाणी शुध्दीकरण करणारे घटकही मृत झाले आहेत. नदीमध्ये येणारा नायट्रोजन, फॉस्फरसचा स्त्रोत बंद झाला पाहिजे. पूर्वी हिंगणमिट्याने कपडे धुतले जात होते. मीठाच्या खड्याने दात घासण्यात येत होते. यामुळे पाणी दूषित होत नव्हते. आता उलटे चित्र आहे. शेतीमध्ये वापरलेले रासायनिक खतामधील विषारी घटकही प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. पंचगंगा कायम प्रवाही नसते. ती हंगामी प्रवाही असते. तिला प्रदूषण मुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना जनजागृती दूत बनावे.'

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, 'कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका कार्यक्षेत्र आणि औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा.'

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'रि-ड्यूस, रि- यूज, रि-सायकलवर भर दिला पाहिजे. प्रदूषणकारी घटक वापरू नये. प्रत्येक गावांनी पर्यावरण विकास आराखडा तयार करावा. जिथे जिथे शक्य आहे, तिथे पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा.'

पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी विविध उपाय योजनांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उप वनसंरक्षक हणमंत धुमाळ आदी उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण विभागाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज वाहिनीवर साप, कर्मचाऱ्यांना ‘ताप’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात बापट कॅम्प परिसरातील कत्तलखाना भागातील वीज वाहिनीवर चढलेल्या सापाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच बेजार केले.

बापट कॅम्प परिसरातील अतिउच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ केव्ही शाहू मिल वाहिनीद्वारे मेनन अँड मेनन कंपनीला वीज पुरवठा केला जातो. त्या वाहिनीला दुपारी बिघाड झाला. महावितरणच्या मार्केट यार्ड उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविंद्र महाद्वार, शाखा अभियंता सचिन गंगापुरे यांनी जनमित्र संतोष यादव, बाबासाहेब मुल्ला, विकास सूर्यवंशी, स्वप्नील जाधव व चंद्रशेखर परतके यांच्या मदतीने बिघाड शोधण्याचे काम सुरू केले. कत्तलखाना परिसर पुराने वेढला आहे. त्यामुळे पुरात जाऊन बिघाड शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. अग्निशमन विभागाने यासाठी बोट दिली. या बोटीतून काही खांब तपासले असता एका खांबावर साप लटकून दोन तारांमध्ये अडकल्याचे दिसून आले. सापामुळे वीज वाहिनी वारंवार ट्रीप होत होती. शेवटी एका लाकडी बांबूच्या मदतीने मेलेला साप काढून टाकला तेव्हा वीज पुरवठा सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा हजार नवमतदारांचे अर्ज

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे १५ ते ३० जुलैअखेर आयोजित विशेष मोहिमेत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा एकूण १९ हजार १९१ नवमतदारांनी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. छाननीत पात्र मतदारांचा सामावेश असलेली यादी १९ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. मतदारयादीत नाव असेल तरच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.

विधानसभेची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. त्याआधी निवडणूक प्रशासनातर्फे मतदार यादी शुद्धीकरण आणि नवमतदार नोंदणीची मोहीम ३० जुलैअखेर राबवण्यात आली. नवीन नावनोंदणी, नाव वगळणे, नाव आणि पत्त्यात दुरुस्ती करणे तसेच स्थलांतरासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय www.nvsp.in या वेबसाइटवर आलेले अर्जही स्वीकारण्यात आहे.

मोहिमेत यादीत नाव समावेशासाठी १९ हजार १९१, नाव वगळण्यासाठी ८ हजार ६१०, नाव, पत्त्यातील दुरुस्तीसाठी ३ हजार ७७९, स्थलांतरासाठी ७२२ अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी नोंदणी अधिकारी करीत आहेत. अर्जांची पडताळणी ५ ऑगस्टपर्यंत करण्यात येईल. नंतर आयोगाच्या वेबसाइटवर पात्र मतदारांची नावे अपलोड करण्याची प्रक्रिया केली जाईल. १९ ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल. यादीत नाव असलेल्यांनाच विधानसभेसाठी मतदान करता येणार आहे.

सर्वाधिक नोंदणी 'दक्षिण'मध्येच

शहरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत नेहमी चुरशीची असते. यावेळीही चुरशीने लढत होणार असल्याने इच्छुकांनी नविन मतदार नोंदणीसाठी आपली स्वतंत्र यंत्रणा लावली. परिणामी जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ०९६ नविन मतदारांचे अर्ज या मतदारसंघात आले आहेत. सर्वात कमी ४७१ अर्ज राधानगरी विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलासंगममध्ये होणार गीत-नृत्याची धमाल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

तरुणाईच्या कलाविष्कारांनी फुलणाऱ्या 'कलासंगम'मध्ये यंदा गीत, नृत्याची धमाल अनुभवता येणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त सार्थक क्रिएशन्सच्या सहकार्याने १७ ऑगस्ट रोजी 'कलासंगम' अंतर्गत गीत, नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता या जल्लोषी सांगितीक कार्यक्रमाला प्रारंभ होईल.

गीत, नृत्य आणि वादन अशा विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणामुळे 'कलासंगम' हा साऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. सार्थक क्रिएशन्सचे सागर बगाडे यांच्या संयोजनाखाली यंदाही 'कलासंगम'मध्ये विविध कलाविष्कारांची उधळण होणार आहे. यंदा, कलासंगमध्ये गार्गीदेवी निंबाळकर व सहकारी कथक नृत्य सादर करणार आहेत. के युनिट गांधीनगर या ग्रुपचे कलाकार पाश्चिमात्य नृत्य सादर करतील. बी ऑन इट ग्रुपचा लोकनृत्य हे विशेष आकर्षण आहे. स. म. लोहिया हायस्कूलचे विद्यार्थी शिवकालीन प्रसंगावर आधारित नृत्याविष्कार सादर करतील. कोंडोजी फर्जंद यांच्या जीवनावर आधारित प्रसंग नृत्यातून उलगडणार आहेत.

गायक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या गायक कलाकारांना ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. गायक दिपक चौगुले, निशांत गोंधळी, जितू पाटील, ऋचा गावंदे, रुपा शाळीबिद्रे, उषा पोतदार या कलाकारांचा समावेश आहे. प्रितेश शेवाळे व ग्रुप यांचे समूह गिटारवादन, सोहन सचिन जगतापचे संतूरवादन होईल. हा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वांना खुला आहे. कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही. शाहू स्मारक भवन येथे कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

रंगणार फॅशन शो

गीत, नृत्य आणि वादन आविष्कारासोबतच 'कलासंगम'मध्ये फॅशन शो रंगणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा श्रावणक्वीन'मधील सहभागी सौंदर्यवती 'कलासंगम'च्या मंचावर फॅशन शोसह कॅटवॉक करतील. 'मॅन हंट'तर्फे फॅशन शो होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणाने कोंडला श्वास

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : कदमवाडीतील पाच एकर २९ गुंठे गायरानात अतिक्रमण करून घर आणि जनावरांसाठी गोठ्याचे बांधकाम केले आहे. विनापरवाना असल्याने खुली जागा, रस्ता न सोडता बांधकाम झाले आहे. परिणामी कदमवाडीचा श्वास कोंडला आहे. गायरानामुळे सरकारचा योजनांतून मुलभूत सुविधांसाठी निधी खर्च करण्यात अडचण आहे. स्वच्छता नसल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. यामुळे मूळ रहिवाशी प्रचंड त्रस्त आहेत.

शहरामध्येच कदमवाडी असल्याने एका गुंठ्यांचा दर कमीत कमी दहा लाखांवर आहे. म्हणून गायरानची फुकटची जागा लाटून घरे बांधण्यासाठी चढाओढच लागली आहे. अतिक्रमणधारकांना वजनदार राजकीय वरदहस्त आहे. या जोरावर ते अतिक्रमण काढून घेण्याऐवजी नियमितीकरणासाठी तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करत आहेत. अतिक्रमणधारकांची संख्या वाढावी, तेथे मतदारांचा गठ्ठा वाढावा आणि अतिक्रमण नियमितीकरणाला बळ मिळावे, यासाठी काही अधिकाऱ्यांची फूस आहे. आर्थिक घडामोडीनंतर तेच खासगीत 'पहिल्यांदा शेड बांधा आणि नंतर घर बांधा', असा सल्ला देत असल्याचेही स्थानिक रहिवाशांचे मत आहे.

दरम्यान, गायरान, गुरचरण किंवा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील जमीन व्यक्ती, खासगी संस्था, संघटनाना कोणत्याही प्रयोजनासाठी देऊ नये, असा आदेश यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या आदेशाचाही भंग कदमवाडीतील अतिक्रमणधारकांनी केला आहे. याच कारणांमुळे ज्ञानू पाटील यांनी अतिक्रमण नियमितीकरणाचा केलेला अर्ज तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निकालात काढला होता. त्यानंतरही अतिक्रमण कारवाई करण्यात आली नाही. परिसरातील शेतकरी अरुण कदम यांच्यासह अन्य रहिवाशांनी अतिक्रमण हटवण्यासाठी २९ जानेवारी, २०१९ रोजी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन दिले. गायरान जमिनीत अतिक्रमण करून दोन मजली घरे बांधण्यात आली आहेत. अतिक्रमणधारकांची इतर ठिकाणी असलेली बंगले भाड्याने दिली आहेत. गायरानातील गोठ्यांतील जनावरांचे मलमूत्र उघड्यावर सोडले जात आहे. रस्ते बंद केल्याने लगतच्या ३० ते ३५ एकर क्षेत्रातील ऊस वाहतूक करण्यात अडथळा येत आहे. यामुळे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी यांनी निवेदनातून केली. तरीही अतिक्रमणाला हात लावण्याचे धाडस झालेले नाही. यावरून अतिक्रमणधारकांचे 'हात' किती बळकट आणि वरपर्यंत आहेत, हे उघड झाले आहे.

(समाप्त)

गायरानात अतिक्रमण करून जनावरांचे गोठे बांधण्यात आले आहे. गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र परिसरात उघड्यावर सोडले जाते. यामुळे दुर्गंधी सुटते. आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. गायरानातील रस्तेही बंद करण्यात आले आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासही अडचणी येत आहेत.

जयंत साळोखे, मूळ रहिवाशी

१७ वेळा पत्रव्यवहार

महानगरपालिका नगररचना आणि करवीर तहसीलदारांकडे अतिक्रमणासंबंधी तक्रारदारांनी दोन वर्षांत १६ वेळा पत्रव्यवहार केला आहे. पत्र आणि तक्रारीनुसार अतिक्रमण काढण्याऐवजी संबंधित अधिकारी हात झटकत राहिल्याचे दिसत आहे. महसूल, महानगरपालिकेतील वरिष्ठांनीही याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने संपूर्ण गायरानच हडप झाल्याचा आरोप होत आहे.

तक्रारदारांवर दादागिरी

गायरानावरील अतिक्रमण निघण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या तक्रारदारांना धमक्या, दादागिरीना सामोरे जावे लागत आहे. तक्रारदारांना गप्प बसवण्यासाठी पोलिस बळाचाही वापर करण्यात आला होता. या सर्वांवर मात करत तक्रारदारांनी हायकोर्टापर्यंत मजल मारली. याउलट सरकारच्या जागेचे संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी असलेले तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिकेचे अधिकारी बघ्याच्या भूमिकेत राहिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयातीलतळमजल्याला तळ्याचे स्वरूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यात बुधवारी दिवसभर पावसाचे पाणी घुसले. परिणामी तळमजल्यावरील पार्किंगतळाला तळ्याला स्वरूप आले आहे. दुपारनंतर विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी उपसण्यात आले. तरीही अजून बरेच पाणी साठून आहे.

चार वर्षांपूर्वी कोट्यवधी रूपये खर्च करून नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यात आले. तळमजल्यावर वाहनतळ आहे. त्याच इमारतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष आहे. सोमवार, मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे तळमजल्यावर पाणी घुसले. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तळे निर्माण झाले. पार्किंग केलेल्या वाहनांची चाके पाण्याखाली गेली. यामुळे दुपारी विद्युतपंपाच्या सहाय्याने पाणी उपसण्यास सुरुवात केली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाणी उपसण्याचे काम केले जात आहे. तरीही तेथील सखल भागात पाणी कायम राहिले. कार्यालय परिसरातही ठिकठिकाणी डबकी तयार झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गटारी’चा प्रवाशांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका सार्वजनिक उपक्रमातंर्गत (केएमटी) कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत धोरण ठरवण्यासाठी 'गटारीच्या' मुहूर्तावर एका संघटनेने बैठक घेतली. त्यामुळे तब्बल २५ चालक-वाहकांनी दांडी मारत या 'बैठकी'ला हजेरी लावल्याने केएमटीच्या नियोजित फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, परिणामी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्यात विशेषत: महिला वर्गाचे व्रतवैकल्य असल्याने मासांहार वर्ज्य असते. एक महिन्यानंतरच मासांहार मिळणार असल्याने शेवटचा दिवस म्हणून अनेकांनी जंगी पार्ट्यांचे आयोजन केले होते. अशाच पार्टीचे नियोजन केएमटी कर्मचारी संघटनेच्या एका नेत्याने केले. ही पार्टी करताना सातव्या वेतन आयोगाबाबत बैठक असल्याचे सांगत 'गटारी'ला गोंडस रूप देण्यात आले. सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी प्रशासनाबरोबर होणाऱ्या चर्चेची रणनीती ठरवण्यासाठी बैठक असल्याचा निरोप धाडला.

नेत्यांचा आदेश शिरसावंद मानून तब्बल २५ चालक-वाहकांनी दांडी मारून बैठकीला हजेरी लावली. मासांहारावर यथेच्छ ताव मारत चर्चाही झडली. पण त्याचा परिणाम केएमटीच्या फेऱ्यांवर झाला. अचानक विविध मार्गावरील चालक-वाहक नसल्याने प्रशासनाला बेस फेऱ्या बंद कराव्या लागला. बसफेऱ्या बंद केल्याने प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. पावसाची संततधार सुरू असताना शिवाजी चौक, खासबाग मैदान, शिवाजी रोड, महाराणा प्रताप चौक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. वेळेवर बस येत नसल्याने अनेक प्रवाशांनी केएमटी प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, बसेससाठी नियुक्त केलेले चालक, वाहक नसल्याने प्रशासनही हतबल झाले. सायंकाळी शालेय विद्यार्थी व नोकरदार महिलांना तर तास ते दीड तास बसची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे अनेक प्रवाशांना अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागला. चालक-वाहक नसल्याने दिवसभरात केएमटीच्या २०० फेऱ्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे तब्बल दीड लाखाच्या उत्पन्नावर केएमटी प्रशासनाला पाणी सोडावे लागले. केएमटी तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांचे वेळवर वेतन होत नाही हे वास्तव आहे. पण त्याला काहीअंशी कर्मचारीही जबाबदार असल्याचे बुधवारी झालेल्या घटनेवरुन सिद्ध होते. केवळ 'गटारी' पार्टी करण्यासाठी उत्पन्न बुडवून कर्मचाऱ्यांनी आपल्याच पायावर दगड मारून घेतल्याची चर्चा त्यांच्यामध्ये सुरू होती.

संघटनेतील वर्चस्वाचे पडसाद

जानेवारी महिन्यापासून केएमटी कर्मचारी युनियनवरील वर्चस्ववादातून कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर हा वर्चस्ववाद आणखी टोकाला गेला. कर्मचारी आपल्याच संघटनेच्या तुंबूत राहण्यासाठी विविध आमिषे दाखवली जातात. आजही सातव्या वेतन आयोगाचे अमिष दाखवूनच बैठक घेतली असल्याची चर्चा सुरू होती. मात्र हा वर्चस्ववाद कोणाच्या नोकरीवर गदा आणणारा नसावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

दुपारनंतर अनेक मार्गावरील ११ केएमटीच्या बस फेऱ्या बंद झाल्या. याबाबत ट्राफिक इन्स्पेक्टर यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. वारंवार कर्मचाऱ्यांकडून असे कृत झालेले असल्यास रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमचे तर कायमच्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ रोखली जाईल.

संजय भोसले, अतिरिक्त व्यवस्थापक, केएमटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुतारवाड्यातील कुटुंबांचे स्थलांतर

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाची संततधार आणि राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीचे पाणी शहरातील नागरी वस्त्यांत शिरण्याची शक्यता गृहीत धरुन महापालिका प्रशासनाच्या वतीने स्थलांतरासाठी यंत्रणा सज्ज ठेवली. रात्री उशिरा दसरा चौक येथील सुतारवाड्यात पाणी आल्यानंतर कुटुंबांचे मुस्लिम बोर्डिंग हॉल व चित्रदुर्ग मठामध्ये स्थलांतर केले. पाणी वाढत असताना दिवसभर येथील कुटुंबांनी स्थलांतरास विरोध केला, पण पाणीपातळी वाढल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने त्यांची समजूत काढून स्थलांतर केले.

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सायंकाळनंतर वाढ होऊन जयंती नाल्यातील पाण्याला फुगवटा येऊन पाणी सुतारवाड्यापर्यंत पोहोचले. पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाने पुराचा फटका बसणाऱ्या कुटुंबांच्या स्थलांतरासाठी नियोजन केले. सुतारवाड्यात पाणी आल्यानंतर अग्निशमनच्या पथकाने सकाळी व दुपारी पाहणी करून कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या, पण त्यांनी नकार दिला. रात्री मात्र पथकाने दिलेल्या सूचनेनंतर मुस्लिम बोर्डिंग व चित्रदुर्ग मठात सात कुटुंबांचे स्थलांतर केले. स्थलांतरित कुटुंबांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा येथे प्रशासनाच्यावतीने उपलब्ध केल्या आहेत.

सुतारवाड्यास उलपे मळा, बापट कँप, शाहूपुरी कुंभार गल्ली, रमणमळा, न्यू पॅलेस, जामदार क्लब, महालक्ष्मी नगर येथील रहिवाशांना पुराच्या पाण्याचा फटका बसू शकतो. सिद्धार्थनगर येथील सीता कॉलनीमध्ये नेहमीच पुराच्या पाण्याचा फटका बसतो. येथे मोठी भिंत बांधली असल्याने येथील नागरिकांना कमीप्रमाणात फटका बसण्याची शक्यता कमी आहे. जेथे पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांची महापालिकेच्या शाळा, समाज मंदिरामध्ये व्यवस्था केली आहे. लक्ष्मीपुरीतील कामगार चाळीमध्ये पाणी आल्यास त्यांची व्यवस्था हरिहर विद्यालय, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, महावीर गार्डन येथे पाणी आल्यास चित्रदुर्ग मठ व मुस्लिम बोर्डिंग, जामदार क्लब येथील नागरिकांचे शाहू विद्यालय व जगदगुरू मठ, दुधाळी व सीता कॉलनीतील नागरिकांचे रानडे विद्यालय व शनिवार पेठ येथील आंबेडकर हॉलमध्ये व्यवस्था केली आहे.

०००००

महापौरांकडून आज पाहणी

शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने गटर्स व चॅनेल चोकअप् होऊन पाणी रस्त्यावरून वाहत आहे. तसेच अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचबरोबर नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी महापौर माधवी गवंडी गुरुवारी (ता. १) सकाळी ११ वाजता करणार आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images