Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सेवाभावी संस्था, कॉलेजांकडून स्वच्छता

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्यावतीने दर रविवारी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला कॉलेजियन्स व सेवाभावी संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जयंती नाला, रंकाळा तलावासह अन्य ठिकाणी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये विविध कॉलेजांतील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भर पावसात राबवलेल्या मोहिमेतून सहा डंपर कचऱ्याची उचल करण्यात आली. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

करवीर पंचायत समिती कार्यालयात महावीर कॉलजेच्या विद्यार्थ्यांनी शहर स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन मोहिमेला सुरुवात केली. पंचगंगा नदीजवळील गायकवाड बंगल्यानजीक महापौर माधवी गवंडी व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. सिद्धार्थ नगर, जयंती नाला, रंकाळ्यासह शहरातील नाल्यांच्या पात्राजवळ स्वच्छता केली. सकाळी पावसाची संततधार सुरू असतानाही एनसीसी, एनएसएस विद्यार्थ्यांसह सेवाभावी संस्थांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत मोहिमेला बळकटी दिली. शहरातील महावीर, गोखले, केआयटी, न्यू पॉलिटेक्निक, विवेकांनद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेनंतर ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. त्यांच्यासह स्वरा फाउंडेशन, नेशन फर्स्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वृक्षप्रेमी ग्रुप, राष्ट्र प्रथम फाउंडेशन, समस्त हिंदुत्ववादी संघटना, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, भारतीय किसान संघांचे अनेक कार्यकर्ते रविवारच्या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'शहर सुंदर व हरित शहर करण्यासाठी शाळा, महाविद्यालये व विविध संघटनांचा सहभाग फार मोलाचा आहे. शाळा, महाविद्यालयांचा परीसर स्वच्छ ठेवून शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून संगोपन करावे. एक ते १५ ऑगस्ट यांदरम्यान राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरावड्यामध्ये सहभागी व्हावे.'

नगरसेवक जय पटकारे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, महावीर कॉलेजचे प्राचार्य आर. पी. लोखंडे, प्रा. उमेश बागंदरे, प्रा. रवींद्र पाडवी, प्रा. डॉ. गोपाळ गावडे, प्रा. जावेद मिस्त्री, न्यू पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य व्ही. बी. शिंदे, गोखले कॉलेजचे प्राचार्य पी. डी. पाटील, प्रा. ए. एन. बचाटे, केआयटीचे गुरुप्रसाद चव्हाण, शीतल वरुर, पंचगंगा घाट संवर्धन समितीचे महेश कामत, दिलीप देसाई, उदय गायकवाड, अजय कोराणे, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांसह महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यावा’

$
0
0

'सोलापूर शहर मध्यमधून

काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यावा'

सोलापूर :

'मुस्लिम समाजातील अनेक ज्येष्ठ व मातब्बर नेत्यांनी आजपर्यंत काँग्रेस पक्षाकडे वेळोवेळी उमेदवारीची मागणी केली. मात्र, मुस्लिम समाजाला प्रत्येक वेळी डावलण्यात आले. त्यामुळे मुस्लिम समाजात मोठा असंतोष आहे. हा असंतोष दूर करण्यासाठी शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी,' अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे केली असल्याची माहिती माजी महापौर ॲडव्होकेट बेरिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरात जवळपास चार लाख मुस्लिम मतदार आहेत. तरी ही काँग्रेस पक्षाने लोकसभा विधानसभा किंवा विधान परिषदेवर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली नाही, असा आरोप ही यु. एन. बेरिया यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने आमदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अथवा त्यांच्या विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, असेही बेरिया यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाम यांच्या जीवनावर ‘अॅप’ची निर्मिती ‘सफल’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दिवंगत राष्ट्रपती, अणूशास्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे विचार, कार्य सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेऊन इयत्ता पाचवीतील एका मुलाने मोबाइलअॅपची निर्मिती केली आहे. 'दि मिसाइलमॅन ऑफ इंडिया डॉ. एपीजे अब्दुल कलाम' या नावांनी अॅपची निर्मिती करणारा सफल संजय सावंत हा इयत्ता पाचवीत शिकतो. सावंत कुटुंबीय मूळचे कोल्हापूरचे असून सध्या ते पुण्यात राहतात. दरम्यान कलाम यांच्या नावाने फॅन क्लब स्थापण्याचे नियोजन सुरू आहे. लवकरच फॅन क्लबची घोषणा केली जाईल असे सफलचे वडील संजय सावत यांनी सांगितले.

संजय सावंत हे आयटी क्षेत्रात नोकरीला आहेत. त्यांचा दहा वर्षांचा मुलगा सफल हा नांदेड सिटीतील पवार पब्लिक स्कूलमध्ये शिकतो. डॉ. अब्दुल कलाम हे त्याचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जीवनावरील व्हिडीओ, ऑडिओ ऐकण्याची व पुस्तक वाचण्याची त्याला लहानपणापासूनच गोडी लागली. एप्रिल २०१९ मध्ये सुट्टीच्या कालावधीत त्याने मोबाइल अॅप बनविण्याच ऑनलाइन कोर्स केला. त्यानंतर लगेच मोबाइल अॅपची निर्मिती केली. डॉ. कलामांचे लहानपण ते राष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास, त्यांची ठिकठिकाणची भाषणे, पुस्तके व पुरस्कारांची माहिती अॅपमध्ये उपलब्ध आहे.

'डॉ. कलाम यांचे आदर्श, शिक्षणाबद्दलची ओढ, त्यांची वैज्ञानिक क्षेत्रातील कामगिरी या साऱ्या गोष्टीची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी यासाठी नुकताच अॅप लाँच करण्यात आले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 'असे सावंत यांनी सांगितले. याप्रसंगी समृद्धी सावंत, सुमन सावंत, विजयमाला शिंदे आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणात ८५, तर चांदोली धरणात ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीच्या पाणीपातळीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी ३३ फूट ९ इंच होती. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७९.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, पुढील दोन दिवस दमदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पावसाने जिल्ह्यात कोणती दुर्घटना घडली नसली तरी सकाळी आठ वाजता कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने वाहतूक दीड तास बंद ठेवण्यात आली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड हटविल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाने उघडीप घेतली होती. सायंकाळनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. पंचगंगा नदीचे पाणी सलग दुसऱ्यांदा पात्राबाहेर आले असून, पाणी गायकवाड पुतळ्याजवळ आले आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ रविवारी सकाळी सात वाजता ३२ फूट ८ इंच पाण्याची पातळी होती. रात्री नऊ वाजता ही पातळी ३३ फूट ९ इंचांवर होती. दिवसभरात एक फूट एक इंच पातळी वाढली. पाणी वाढत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्था विभाग पुराच्या पाण्यावर नजर ठेऊन आहे.

आजरा तालुक्यातील चित्री तर चंदगड तालुक्यातील जांबरे, शाहूवाडी तालुक्यातील कासारी, राधानगरी, तुळशी, दूधगंगा, पाटगाव, चिकोत्रा, कोदे धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. चित्री धरणक्षेत्रात १२२, तर जांबरे धरणक्षेत्रात १०६ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रात पावसाने सातत्य ठेवल्याने धरणांच्या साठ्यात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण ८५, तर चांदोली धरण ७४ टक्के भरले आहे. कडवी आणि जंगमहट्टी धरणे ९० टक्के भरली असून, पुढील आठवड्यात ही धरणे पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

००००

तालुकानिहाय पाऊस मि.मी. असा...

हातकणंगले १४.२५

शिरोळ .४३

पन्हाळा ४०.५७

शाहूवाडी ५०.५०

राधानगरी ४८.००

गगनबावडा ७९.५०

करवीर ३७.१८

कागल ३१.५७

गडहिंग्लज १५.८६

भुदरगड ४९.६०

आजरा ३१.७५

चंदगड १६.३३

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणि डोळ्याला धारा लागल्या...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुणी महत्त्वाच्या कामासाठी तर कुणी लग्नसोहळ्यासाठी मुंबईतून कोल्हापूरच्या प्रवासाला निघाले होते. मुंबईत नोकरी करणारे तरुण-तरुणी विकेंडसाठी आईवडिलांना भेटण्यासाठी येत होते. कुणी आजारी नातेवाईकांसाठी भर पावसात प्रवास करत होते, तर कुणी नोकरीची संधी आल्यामुळे मुलाखत देऊन परतीच्या मार्गाला लागले होते, या सगळ्यांची बदलापूरजवळ पावसाने कोंडी केली आणि नातेवाईकांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली. हे सगळे प्रवाशी रविवारी दुपारी कोल्हापुरात पोहोचले आणि नातेवाईकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये कोल्हापूरचे प्रवासी अडकले होते. त्यांच्या कोल्हापुरातील कुटुंबीयांसाठीही प्रत्येक क्षण काळजीत जात होता. अखेर कल्याण ते कोल्हापूर ही विशेष रेल्वे रविवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूरच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचली आणि प्रवासी आणि त्यांना नेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या डोळ्यातून आनंदाचा पाऊस बरसला. ही रेल्वे कोल्हापुरात ही ५८ प्रवाशांना घेऊन उतरली. ३६ तासांच्या खडतर प्रवासानंतर ही रेल्वे कोल्हापूर स्थानकावर पोहोचली. स्थानकावर पोहचल्यानंतर काही प्रवाशांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.

मी मुंबईत शिक्षण घेतो. माझ्या डब्यातील चार ते पाच तरुणांनी रेल्वेच्या शेवटच्या डब्यापासूनचा ट्रॅक पकडून गुडघाभर पाण्यातून सुमारे दीड किलोमीटर पर्यंत पाण्यातून पोहत गेलो. जवळच्या गावात थांबलो. पोहताना साप, विंचू अंगावर येत होते. मात्र परिस्थितीवर मात करून शेवटी गाव गाठले. त्यानंतर प्रशासनाच्या बोटी आल्यानंतर जीव वाचला.

सचिन रोकडे, शिराळा

मुंबईतील एका कंपनीत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी गेले होते. मात्र पावसामुळे मुलाखती पुढे ढकलल्या. मोजकेच पैसे शिल्लक होते. परतीच्या प्रवासासाठी महालक्ष्मीचे तिकीट काढले. मात्र आलेला प्रसंग हा आयुष्यभर आठवणीत राहणारा आहे. रेल्वेच्या डब्यातील सर्व प्रवाशांचे मोबाइलचे चार्जिग संपले होते. त्यामुळे संपर्क तुटला. केवळ दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो.

अरबाज गवंडी, शिवाजी पेठ

माझे कुर्ला (मुंबई) येथे साहित्य विक्रीचे दुकान आहे. लक्षतीर्थ वसाहत येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी पत्नी आणि एक वर्षाच्या मुलासोबत येत होतो. पावसाळ्यात दरड कोसळतात म्हणून कार घरात लावून महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली. मात्र प्रवाशांनी एकमेंकांना धीर देत रात्र जागून काढली. नातेवाईकांच्या लग्नाचा मुहूर्त रविवारी सकाळचा होता. लग्नाची वेळ चुकली, मात्र नैसर्गिक आपत्तीतून वाचलो.

मोहसीन पटेल

मी मुंबईत खासगी नोकरी करतो. शनिवार पेठेतील बुरुड गल्लीत नातेवाईकांना भेटण्यासाठी येत होतो. डब्याच्या पायरीला पाणी लागण्याची शक्यता निर्माण झाली. काहींचे मोबाइल सुरू होते. त्यांनी चित्रीकरण करुन सोशल मीडियावर व्हायरल करुन मदतीचे आवाहन केले. अखेर प्रशासनाकडून आणि स्थानिक ग्रामस्थांकडून मदत मिळाल्याने मृत्यूच्या दाढेतून परतलो.

अरविंद खैरे, मुंबई

माझे पती ॲड. जयप्रकाश पवार यांचे कोल्हापुरात कोर्टात काम होते. आम्ही दोन दिवस कोल्हापुरात थांबणार होतो. बदलापुरात रेल्वे थांबल्यानंतर जाग आली. मोबाइलही बंद पडल्याने कोणासोबतही संपर्क होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी आलेले हेलिकॉप्टर आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके पाहून धीर मिळाला.

ज्योती पवार, मुलुंड,मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पाणीपुरवठ्याचा बोजवारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा पंपिंग स्टेशनमधील डीओ फ्यूज व विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने शनिवारी मध्यरात्रीपासून पाणीपुरवठा बंद झाला. बालिंगा पंपिंग हाऊसवर अवलंबून असणाऱ्या सी व डी वॉर्डात तर ए, बी व 'ई' वॉर्डामधील काही प्रभागात रविवारी महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा झाला नाही. दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते, पण सायंकाळपर्यंत त्याला यश आले नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला. परिणामी बालिंगा उपसा केंद्र व नागदेववाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती अनिश्चित काळासाठी पुढे टाकण्यात आली.

गेल्या आठ दिवसांपासून बालिंगा पंपिंग हाऊसमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे सी, डी वॉर्डातील संपूर्ण तर ए, बी व 'ई' वॉर्डातील पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. आठ दिवसांत चारवेळा दुरुस्ती करूनही बिघाड झाला. शनिवारी पंपिंग स्टेशनमधील बिघाड दूर करून पाणी उपसा सुरू झाल्यानंतर मध्यरात्री डिओ फ्यूजसह विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रविवारी दिवसभर बालिंगा येथून होणारा पाणी उपसा बंद ठेवला. त्यामुळे शहरातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा करणात आला.

शहर पाणीपुरवठा विभागाने बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार होती. त्यासाठी प्रथम शुक्रवारी व नंतर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. पण आठवड्यापूर्वी बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये झालेला बिघाड काढण्यास पूर्ण यश येत नसल्याने प्रथम शुक्रवारऐवजी सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर पुन्हा तेथे बिघाड झाल्याने उच्च दाबाची विद्युत वाहिनी दुरुस्तीचा निर्णय अनिश्चित काळासाठी पुढे टाकण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काळोखाचे सोबती’ ऐतिहासिक ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दलित मित्र व्यंकाप्पा भोसले यांनी लिहिलेले 'काळोखाचे सोबती' पुस्तक ऐतिहासिक ठेवा आहे. यामध्ये भटक्या, विमुक्त समाजाचे जगणे जिवंतपणाने जाणवते. म्हणून भविष्यात विविध जातीच्या अभ्यासावेळी भोसले यांच्या या पुस्तकाला विशेष महत्त्व येईल,' असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले.

दक्षराज प्रकाशनतर्फे रविवारी आयोजित 'काळोखाचे सोबती' पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.

डॉ. पवार म्हणाले, 'भटक्या, विमुक्तांसह विविध परिवर्तन, समाजवादी चळवळीत भोसले यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचा मूळ पिंड कार्यकर्त्याचा असतानाही त्यांनी भटक्या समाजाचे जगणे, त्यांचे प्रश्न पुस्तकरूपाने मांडले. त्यांनी लिहिलेले साहित्य कोणत्या प्रकारात मोडते, ही चर्चा निरर्थक आहे. त्यांचे लिखान स्वयंभू, जिवंतपणाची अनुभूती देणारे आहे. शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. अनेक भटक्या समाजातील लोकांना आपल्या दरबारात नोकरी दिली. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्याची गरज आहे. भटक्या, विमुक्त समाजाचे आजही अनेक प्रश्न, रूढी परंपरा आहे. त्यातून मार्ग निघण्यासाठी त्या समाजातील तरुणांनी लढले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा नाहीशा झाल्या पाहिजेत.'

शाहू महाराज म्हणाले, 'आजही भटके, विमुक्त समाजातील लोकांचे प्रश्न गंभीर आहेत. ते सोडविण्यासाठी ज्या ठिकाणी आमची मदत लागेल तिथे येण्यास तयार आहे. तुलनेत भटक्या समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. भोसले यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून भटक्या, विमुक्त समाजातील लोकांचे जगणे समोर येते. हे पुस्तक समाजशास्त्राचा अभ्यास करतानाही उपयोगी ठरेल.'

विद्रोही साहित्यिक राजा शिरगुप्पे म्हणाले, 'खोटे, काल्पनिक साहित्य लिहिण्याचे दिवस संपले आहेत. वास्तव जगणेच साहित्यात आले पाहिजे. ते भोसले यांनी केले आहे.' डॉ. गिरीश मोरे म्हणाले, 'वंचित घटकांच्या वेदना, प्रश्न, रूढी, परंपरा पुस्तकात मांडण्यात भोसले यशस्वी झाले आहेत. माणूसपण बनविण्यास पुस्तक मदत करते. प्रस्थापित, राजकीय नेते, भ्रष्ट प्रशासनही या पुस्तकाने भानावर येईल.'

लेखक भोसले म्हणाले, 'मागास समाजास अस्पृश्यतेची वागणूक मिळत होती. संशयित गुन्हेगार म्हणून भटक्या जमातीवर शिक्का होता. यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी पुस्तक लिहिले.'

सुनील भोसले यांनी प्रास्ताविक केले. सज्जन चतुडिया, सुरेश चव्हाण, रामचंद्र पोवार, महेश मचले, तानाजी नंदीवाले, निहाल शिप्पूरकर, दशरथ पारेकर, शैलजा मंडले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सुरेश शिप्पूरकर, चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डीतील कार्यशाळेला सरपंच, उपसरपंच जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिर्डी येथे ३० जुलैला सरकार पुरस्कृत होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतीच्या खर्चाने जातील. त्यांना नेण्याची सोय जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्रशासन करणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे समन्वयक अनिल गीते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणााले, 'अर्थ संकल्पात सरकारने सरपंच मानधनासाठी २०० कोटींची तरतूद केली आहे. या महिन्यांपासून सरपंचांना पाच हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले आहे. यासह उपसरपंचांना अडीच हजार, सदस्यांना दीड हजार रुपये मानधन द्यावे, जिल्हा परिषदेत सरपंच भवन उभारावे, प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे राज्यातून सरपंचातून थेट सहा आमदारांची नियुक्ती करावी, आदी मागण्यांवर कार्यशाळेत चर्चा होईल. दिवसभर दोन सत्रात कार्यशाळा होईल. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते उद्घाटन होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सांगता कार्यक्रम होणार आहे.' यावेळी सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्ष राणी पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रा. शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोयनेत ७८ हजार क्युसेक्सने पाण्याची आवक

$
0
0

कोयनेत ७८ हजार क्युसेक्सने पाण्याची आवक

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर प्रचंड वाढत असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सध्या कोयना धरणाच्या शिवाजीसागर जलाशयात ७८ हजार ९२८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा ६३.२९ टीएमसी झाला आहे. गेल्या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात ३.१६ टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरण ६० टक्के भरले आहे.

पाटण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवॉँधार पावसामुळे पाटण तालुक्यातील मणदुरे विभागातील साखरी-चिटेघर, मोरगिरी विभागातील मोरणा-गुरेघर, ढेबेवाडी विभागातील महिंद, वांग-मराठवाडी, काळगाव, चाफळ येथील उत्तरमांड, तारळे येथील तारळी ही धरणे ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता संपलेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे ९७, नवजा १३४ आणि महाबळेश्वरात १४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात एकूण ७३.१८ टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर धरणातील पाणी सहा वक्र दरवाजांना लागते.

पाटणसह कराड परिसरातही रविवारी सकाळपासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कोयना, केरा, काफना, काजळीसह कृष्णा आदी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नदीकाठी असणाऱ्या भात शेतांमध्ये पुराचे पाणी साचून राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

..........

५९ रिक्षाचालकांकडून

वसूल केला दंड

कराड :

वाहतुकीस अडथळा करत रस्त्यावर प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या येथील रिक्षा चालकांना येथील शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. बेशिस्त वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईची मोहीम राबवित वाहतूक पोलिसांनी सुमारे ५९ रिक्षा चालकांकडून दंड वसूल केला. यापुढे ही रिक्षा चालकांवर कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्याने बेशिस्त रिक्षा चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

शहरातील प्रवासी रिक्षांची संख्या वेगाने वाढली असून, त्यामुळे अनाधिकृत रिक्षा थांबे तयार झाले आहेत. प्रवासी घेण्यासाठी चालक रिक्षा रस्त्यात कोठेही उभ्या करतात. रस्त्यामध्येच मनमानी पद्धतीने रिक्षा थांबवल्याने वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोडी होते. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होते. रिक्षा बाजूला लावण्याची सूचना केल्यास रिक्षा चालकांकडून अनेकदा दादागिरी होते. या विरोधात काही नागरिकांनी येथील वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या नुसार येथील शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

..........

मानवहित पक्ष

भाजपसोबत जाणार नाही

सचिन साठे यांची माहिती

कराड :

'साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांना केवळ शाहिरीपुरते मर्यादित ठेवण्याचे कारस्थान आखले गेले आहे. भाजप सरकारने आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ बंद केले. निधीच्या केवळ घोषणा केल्या, प्रत्यक्षात निधी दिला नाही. अण्णा भाऊंच्या जन्मभूमीला भेट देण्यात ही या सरकारला रस नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत जाणार नाही,' अशी भूमिका मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आण्णा भाऊंचे नातू सचिन भाऊ साठे यांनी घेतली आहे.

सचिन साठे म्हणाले, 'येत्या एक ऑगस्टपासून साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होत आहे. त्या निमित्त पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एक ऑगस्ट रोजी आण्णा भाऊ साठे अभिवादन सभा वाटेगाव (ता. वाळवा) येथे होणार आहे. या अभिवादन सभेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कन्हैया कुमार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, लक्ष्मण माने, मिलिंद आव्हाड आदी उपस्थित राहणार आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षक भिंत कोसळूनमहिलेचा मृत्यू

$
0
0

संरक्षक भिंत कोसळून

महिलेचा मृत्यू

सातारा : वाई तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पांडे (ता. वाई) येथे संरक्षक भिंत कोसळून शकुंतला दादासाहेब चव्हाण (वय ६५) यांचा मृत्यू झाला. शेतजमीन आणि घर यांचे संरक्षण व्हावे म्हणून संरक्षक भिंत बांधली होती. दुपारपासून भिंत खचत असतानाही त्या हळदीचे गंडे बाजूला करीत होत्या. काम करीत असतानाच भिंत अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

'चंद्रकांत पाटलांनी

माणमधून लढावे'

सातारा : 'महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. माण मतदारसंघातील दुष्काळ, दारिद्र्य, हटवण्यासाठी त्यांची मदत होईल, माण-खटाव सुजलाम सुफलाम होईल,' अशी मागणी माणदेश जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. जे. टी. पोळ व डॉ. महादेव कापसे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली. दुष्काळी जनतेला न्याय देण्यासाठी व तालुक्याचे अश्रू पुसण्यासाठी मातब्बर नेत्याची गरज आहे. माण व खटावच्या पाणी योजना, एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी माण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी. आमच्या मागणीसाठी लवकरच एक शिष्टमंडळ चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असेही डॉ. पोळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. अरुणा ढेरे यांनादत्ता हलसगीकर पुरस्कार प्रदान

$
0
0

डॉ. अरुणा ढेरे यांना

दत्ता हलसगीकर पुरस्कार प्रदान

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. अरुणा ढेरे यांना रविवारी सायंकाळी किर्लोस्कर सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

अकरा हजार रुपये रोख, जनार्दन बिटला यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे चांदीचे कमळ आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यकारी विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांच्या हस्ते आणि म. सा. प. पुण्याचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली ढेरे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. या समारंभापूर्वी अरुणा ढेरे आणि स्व. दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचे वाचन प्रकाश पायगुडे आणि मसाप जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्षा सायली जोशी यांनी केले. या वेळी हलसगीकर यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या ब्लॉगचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात यंदाच्या वर्षीच्या राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण पार पडला. लक्ष्मीबाई माणिकराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुण्याच्या अक्षरधारा या दिवाळी अंकांला. श्रीनिवास कृष्णाजी जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिकच्या शब्दमल्हार या दिवाळी अंकाला. पिंपरी-चिंचवडच्या अक्षरवेध या दिवाळी अंकाला सुमतीबाई दत्तात्रय येळेगावकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. नाशिकच्या सुभाषित या दिवाळी अंकाला इंदिरा नारायण कुलकर्णी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्ता हलसगीकर पुरस्कार अरुणा ढेरे यांना प्रदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. अरुणा ढेरे यांना रविवारी सायंकाळी किर्लोस्कर सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

अकरा हजार रुपये रोख, जनार्दन बिटला यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे चांदीचे कमळ आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यकारी विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांच्या हस्ते आणि मसाप पुण्याचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली ढेरे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. या समारंभापूर्वी अरुणा ढेरे आणि दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचे वाचन प्रकाश पायगुडे आणि मसाप जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्षा सायली जोशी यांनी केले. या वेळी हलसगीकर यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या ब्लॉगचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यावा'

$
0
0

'सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यावा' सोलापूर : 'मुस्लिम समाजातील अनेक ज्येष्ठ व मातब्बर नेत्यांनी आजपर्यंत काँग्रेस पक्षाकडे वेळोवेळी उमेदवारीची मागणी केली. मात्र, मुस्लिम समाजाला प्रत्येक वेळी डावलण्यात आले. त्यामुळे मुस्लिम समाजात मोठा असंतोष आहे. हा असंतोष दूर करण्यासाठी शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी,' अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे केली असल्याची माहिती माजी महापौर ॲडव्होकेट बेरिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरात जवळपास चार लाख मुस्लिम मतदार आहेत. तरी ही काँग्रेस पक्षाने लोकसभा विधानसभा किंवा विधान परिषदेवर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली नाही, असा आरोप ही यु. एन. बेरिया यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने आमदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अथवा त्यांच्या विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, असेही बेरिया यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारी गायकाला शिक्षक मंचची लाखमोलाची मदत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापुरातील गायन क्षेत्रातील अवलिया गायक सॅमसंग झारी यांच्या आजारपणाच्या उपचारासाठी विविध शाळा व कॉलेजमधील शिक्षक व कर्मचारी एकवटले आहेत. नोकरीसोबतच गायनाचा छंद जपणाऱ्या या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, वेगवेगवळ्या पतसंस्थेतील कर्मचारी व लोकांनी तब्बल दोन लाख रुपयांची मदत गोळा केली आणि शनिवारी सायंकाळी ही संपूर्ण रक्कम गायक झारी यांच्याकडे सुपूर्द केली. गायक शिक्षक मंचच्या केलेल्या या लाखमोलाच्या मदतीने गायक झारी गहिवरले.

गायक झारी हे गेल्या दोन वर्षापासून आजारी आहेत. त्यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवतो. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरूआहेत. यासाठी तीन लाखाहून अधिक रक्कम खर्च आहे. ते गरीब कुटुंबातील आहेत. महापालिकेत रोजंदारी तत्वावर काम करत होते. आजारपणाचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा. लोकांकडून उधार उसनवारी करुन त्यांनी हॉस्पिटलचा खर्च भागविला. मात्र रोजचा उपचाराचा खर्च व लोकांची उसनवारी यामुळे कुटुंबांची अवस्था बिकट बनली होती. पैशाअभावी कलाकार कुटुंबीयांची ओढाताण सुरू असल्याची बातमी समजताच त्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक पुढे सरसावले. गायक शिक्षक मंचतर्फे १८ ते २५ जुलै दरम्यान संगीत सप्ताहाचे आयोजन केले होते. शिक्षक मंचने गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमधील ग्रंथालय सभागृहात 'कराओके'हा गाण्याच्या कार्यक्रमांचा सप्ताह करुन मदतनिधी उभारली.

कार्यक्रमाद्वारे आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्याला समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनी प्रतिसाद दिला. गायक शिक्षक मंचमध्ये प्राथमिक, माध्यमिकचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक, पतसंस्थेचे कर्मचारी सहभागी आहेत. 'मंच'मध्ये जवळपास १८० जणांचा समावेश आहे. निधी जमविण्यासाठी मंचचे मार्गदर्शक प्रशांत सॅलियन, राम भोळे, राजेंद्र कोरे, कुमार पाटील, बाळ डेळेकर, रवि सुर्यवंशी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. दुसरीकडे आनंद इव्हेंटसचे सरदार पाटील यांनी 'निराळी मैफल' या गाण्याच्या कार्यक्रमातून मदत केली.

शनिवारी सायंकाळी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील निवृत्त सहायक संचालक संपत गायकवाड आदींच्या हस्ते गायक शिक्षक मंचने जमविलेला निधी गायक झारी यांच्याकडे सुपूर्द केला. गायकवाड म्हणाले, 'गायक कलाकार सॅमसन झारी यांच्या आजारपणाच्या कालावधीत शिक्षक मंचने पुढाकार घेऊन लाखो रुपयांची मदत केली. संकटकाळात मदतीचा हात देणे हे चांगुलपणाचे लक्षण आहे. शिक्षक मंचने सामाजिक बांधिलकी जपत वेगळा आदर्श निर्माण केला. शिक्षकांची प्रतिमा उंचावली.'

शिक्षक संघटनेचे नेते दादा लाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, निवृत्त सहायक संचालक संपत गायकवाड, आनंदा हिरुगडे, प्राचार्य पी. के. पाटील, प्रा. समीर घोरपडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडमध्ये दमदार पावसाची हजेरी

$
0
0

नांदेड- जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात शनिवारी दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत असलेली मुसळधार पावसाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायमच आहे.

नांदेड जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. काही वेळ विश्रांती घेत पावसाच्या सरी बरसत होत्या. संततधार पावसाने शहरातले अनेक रस्ते निसरडे झाले असून काही ठिकाणी खड्डे उघडे पडल्याने मोठ्या प्रमाणाता पाणी साचले आहे. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने विष्णुपूरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातल्या अन्य भागात तसेच लगतच्या परभणी, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असताना नांदेडमध्ये मात्र पावसाचा जोर अजूनही नाही. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणपतराव देशमुखांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार

$
0
0

पंढरपूर:

महाराष्ट्र विधिमंडळातील जेष्ठ सदस्य आणि तब्बल ५५ वर्षे सांगोला मतदारसंघाचे आमदार गणपतराव देशमुख यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाहीत. प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सांगोला मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला असल्याने पक्षातील नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचे गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट केले. सांगोल्याचा दुष्काळ हटवण्यासाठी टेंभु म्हैसाळ सहअनेक योजनांचे पाणी आणण्यात आपल्याला यश आले असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. गणपतराव देशमुख यांनी १९६२ साली पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर आजवर १२ निवडणुकांमध्ये विजय मिळवला. देशमुख यांना आपल्या संसदीय राजकारणाच्या कारकिर्दीत केवळ १९७२ आणि १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. त्यापैकी १९७२ साली झालेल्या पराभवानंतर १९७४ च्या पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाले होते. प्रदिर्घ कारकिर्द असलेले गणपतराव देशमुख आता आगामी विधानसभा लढवणार नसल्याने शेकापमध्ये मोठी अस्वस्थता आहे.

सत्तेसाठी पक्षांतर

सध्या सुरु असलेल्या पक्षबदलावर गणपतराव देशमुख यांनी हे सत्तेसाठी पक्षबदल सुरू असल्याची टीका केली. असे पक्ष बदल करणारे कायमस्वरूपी राहत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड मार्गावरील जुना कृष्णा पूल वाहून गेला

$
0
0

सातारा :

कराडमधील सैदापूर कॅनॉल येथील जुना कृष्णा पूल आज दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला. गेल्या आठवड्यापासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही व मोठा अनर्थ टळला.

पूल वाहून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पूल पडलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात एकजण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा; शाहूवाडी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील डोणोली (ता. शाहूवाडी) गावाजवळ अवजड मालवाहू ट्रकची प्रवासीरिक्षाला जोराची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले. कृष्णात रामचंद्र चव्हाण (वय ४५, रा. खुटाळवाडी, ता. शाहूवाडी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. शाहूवाडी पोलिसांत अपघाताची नोंद झाली असून ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या अपघातात सविता दिलीप पाटील (वय ३५), सोहम दिलीप पाटील (वय ६, दोघे रा. बिऊर, ता. शिराळा) सुनीता माणिक किटे (वय ३५, रा. खुटाळवाडी, ता. शाहूवाडी) दिनकर कांबळे (वय ४५, रा. सुपात्रे, ता. शाहूवाडी), राधिका आनंदा बोरगे (वय २१, रा. वारेवाडी, ता. शाहूवाडी व अन्य एकजण जखमी आहे.

यातील सविता व सोहम या मायलेकरांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन नाक व कानातून रक्तस्राव झाल्याने तर सुनीता किटे यांच्या डोक्याला व पायाला मार लागल्याने प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बांबवडे (ता. शाहूवाडी) बाजारपेठेतून सोमवारी सायंकाळी वडाप रिक्षा (एम. एच. ०९, इएल १५२०) मधून सर्व प्रवाशी सुपात्रे गावाकडे निघाले असता एक किलोमीटर अंतरावर रत्नागिरीकडे भरधाव निघालेल्या अवजड मालवाहू ट्रक (केए २८ डी ३८४५) ची डोणोली गावाजवळच्या अरुंद रस्त्यावर जोरदार धडक बसली. यावेळी रिक्षा फरपटत गेल्याने प्रवाशांना गंभीर इजा झाली. ग्रामस्थांनी १०८ दूरध्वनीवरून दिलेली माहिती मिळताच मलकापूर येथून डॉ. प्रकाश लव्हटे व बांबवडे येथून डॉ. बालाजी पाटील हे दोन रुग्णवाहिकांसह अपघातस्थळी तातडीने दाखल झाले. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सोबतचे अमोल व रवींद्र या चालकांसह नागरिकांना मदतीला घेत अपघातग्रस्तांना तत्परतेने सीपीआरमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कदमवाडीतील ५ एकर गायरान हडप

$
0
0

लीड

सरकारी गायरानावर अतिक्रमण होऊ नये म्हणून त्याची खबरदारी महसूल प्रशासनाने घेणे बंधनकारक असते. मात्र प्रशासनालाच धनशक्ती आणि राजकीय शक्तीच्या जोरावर खिशात घालत कदमवाडीतील ५ एकर २९ गुंठे जमीन हडप केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हायकोर्टाने यावरील अतिक्रमण सहा महिन्यात काढण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय पुढारी, महसूल यंत्रणा, महापालिका प्रशासनातील रॅकेट चव्हाट्यावर आले आहे. या गायरानावर अतिक्रमण कुणी, कसे आणि कधीपासून केले, याविरोधात तक्रारदार करत असलेली धडपड आणि महसूल अधिकाऱ्यांची भूमिका यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून ...

...

गायरानावर डल्ला ... लोगो

...

राजकीय वरदहस्त, महसूल, महानगरपालिका प्रशासनाचे अभय

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

येथील कदमवाडीमधील ५ एकर २९ गुंठे गायरान अतिक्रमण करून हडप करण्यात आले आहे. कोट्यवधींच्या या जमिनीवरील अतिक्रमणधारकांना राजकीय वरदस्त आहे. परिणामी महसूल आणि महापालिका प्रशासनाचे अतिक्रमण काढण्याचे आणि रोखण्याचे धाडस झाले नाही. यामुळे स्थानिक तीन शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सहा महिन्यात अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशाने बघ्याच्या भूमिकेतील महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. शहरालगत असल्याने कदमवाडीत नागरी वस्तीचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्या ठिकाणी मध्यवस्तीतच दोन त्रिकोणाच्या आकारात गायरान आहे. एका बाजूला उसाची शेती आणि तिन्ही बाजूला मूळ रहिवाशांच्या वसाहती आहेत. दरम्यान, तेथील जागेला सोन्याला भाव आल्याने दहा वर्षांपासून सरकारी गायरानात अतिक्रमण वाढत आहे.

महालक्ष्मीनगर, भोसले पार्क, अयोध्या गल्ली, उचगाव मणेर मळा, विठ्ठल मंदिर गल्ली यासह राजकीय पाठबळ असलेल्या २९ जणांनी गायरानावर अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत. घर आणि जनवारांचा गोठा असल्याने शेणामुताचा त्रास जवळच्या कुटुंबांना होत आहे. त्यातून २०१७ पासून विशाल कदम यांच्यासह इतर रहिवाशी अतिक्रमणाविरोधात महसूल, महानरपालिका, नगररचना विभागाकडे तक्रार करत आहेत. मात्र प्रशासन वेळोवेळी केवळ नोटीस काढून वेळ मारून नेत राहिले. पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याचा दिवस निश्चित झाल्यानंतरही राजकीय दबाव आणि अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अतिक्रमण जैसे थे राहिले आहे. (क्रमश:)

...

पहिल्यांदा गोठा,

नंतर मोठी इमारत

गायरानावर अतिक्रमणधारक पहिल्यांदा छोटा गोठा बांधत आहेत. प्रशासनाचा विरोध होत नसल्याची खात्री झाल्यानंतर त्याच ठिकाणी पक्के बांधकाम करत मोठी इमारत बांधली जात आहे. अशाप्रकारे दहा बारा वर्षांपसून ५० पक्क्या बांधकामांची घरे झाली आहेत. नियमबाह्य बांधकामांमुळे मूळ नकाशावरील रस्याच्या दोन्ही बाजूलाही अतिक्रमण झाले आहे. त्याचा त्रास सहन करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

...

आदेशाला केराची टोपली

गायरानावर अतिक्रम करून बांधकाम होत असताना तेथील तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि त्या त्या वेळचे जिल्हाधिकारी काय करत होते, असा प्रश्न सामान्यांच्या मनात येत आहे. त्यांच्याशी तक्रारदारांनी पत्रव्यवहार करूनही सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले. बघ्याची भूमिका घेत अतिक्रमणधारकास अप्रत्यक्षपणे पाठबळ दिल्याचा आरोप मूळ रहिवाशांचा आहे. अरूण कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून डिसेंबर २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी गायरानावरील अतिक्रमणासंबंधी तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला होता. मात्र या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याने अतिक्रमणावर हातोडा पडला नाही.

...

कोट

'गायरानावरील अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार ते जिल्हाधिकारी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र राजकीय आणि धनशक्तीपुढे संबंधित अधिकारी झुकल्याने सर्व अतिक्रमणे निघाली नाहीत. याउलट अतिक्रमणधारकांकडून तक्रारदारांवर दादागिरी करण्यात येत आहे. म्हणून शेवटी हायकोर्टात याचिका दाखल केली. आता कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित सर्व अतिक्रमणे पाडावीत.

विशाल कदम, याचिकाकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० बंधारे पाण्याखाली, दोन घरे पडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. नदी पाणी पातळीत वाढ झाली असून ४० बंधारे पाण्याखाली गेले. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोतिबा डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील मार्केट यार्ड येथील राजीव गांधी वसाहतीतील दोन घरे पडल्याने अंदाजे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. राधानगरी, तुळशी आणि पाटगाव धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण ८८ टक्के भरले आहे. पुढील चार दिवसांत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी इशारा हवामान खात्याने दिला आहे. नद्यांना पूर आल्याने १५ मार्गावरील वाहतूक बंद केली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी सकाळपासून दमदार पावसास सुरुवात झाली आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हाते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील राजीव गांधी वसाहतीतील दोन घरे पडली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत प्रापंचिक साहित्य बाहेर काढले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरातील काही सदस्यांना किरकोळ दुखापती झाली आहेत. अक्काताई दत्तात्रय देसाई यांचे तीन ते चार लाखांचे तर सावित्री शंकर पाटील यांचे दीड लाख रुपये प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे.

ग्रामीण भागालाही पावसाचा फटका बसला आहे. नदी, ओढे, नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली. पुरामुळे आठ राज्यमार्ग तर ११ ग्रामीण रस्ते बंद झाले आहेत. पर्यायी मार्गावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत राधानगरी धरणक्षेत्रात ९१, तुळशी धरणक्षेत्रात ९७, पाटगांव धरणक्षेत्रात ९६ मिली मीटर पावसाची नोंद झाली. कासारी धरण ८७ टक्के भरल्याने सकाळपासून १७९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

कळंबा भरला

कोल्हापूर शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणारा संस्थानकालीन कळंबा तलाव भरला असून आज सकाळी भरला. त्यानंतर सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. दिवसभर झालेल्या पावसाने दुपारनंतर सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले. नागरिकांनी तलाव परिसरात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images