Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मुश्रीफांवर प्राप्तिकर छापे

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि आणि पुण्यातील निवासस्थानांबरोबरच कोल्हापुरातील नातेवाईकांच्या निवासस्थानी गुरुवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. या निवासस्थानांबरोबरच बेलेवाडा काळम्मा येथील संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज कारखान्यांवरही छापे टाकण्यात आले.

सकाळी साडेसातच्या सुमारास प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या कारवाईचे वृत्त क्षणार्धात जिल्हाभर पसरले. त्यामुळे खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत आला. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना दिलेले भाजप प्रवेशाचे आमंत्रण नाकारल्याने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती. त्याचा तपशील समजला नसून, ही कारवाई आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे.

मुश्रीफ सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईहून त्यांच्या कागल निवासस्थानी आले. यावेळी घरी बसलेल्या कार्यकर्त्यांना दोनच मिनिटांत येतो, असे सांगून ते आत गेले. एवढ्यात सात वाहनांचा ताफा अचानक त्यांच्या घरासमोर येऊन थांबला. त्यातून प्राप्तिकरचे २५ अधिकारी आणि १५ सहकारी अशा ४० जणांनी कार्यकर्त्यांना बाहेर जायला सांगितले. पहिल्यांदा आमदार मुश्रीफ यांच्या गाडीची झडती घेऊन घराचा ताबा घेतला. अत्यंत गोपनीय पद्धतीने पथकाने छाप्याची कारवाई सुरू केली. घराचा ताबा घेऊन कागदपत्रांची तपासणी सुरू केली. याच सुमारास मुश्रीफ यांचे कोल्हापुरातील साडू गुलाब हसन पटेल यांच्या टाकाळा येथील निवासस्थानी आणि संताजी घोरपडे कारखाना व गडहिंग्लज कारखानास्थळी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली. कागलमध्ये मुश्रीफ यांच्यासह सर्वांना घरातच थांबवण्यात आले. दिवसभर घरातील सर्व कागदपत्रांची पथकाने पडताळणी केली.

यादरम्यान मुश्रीफांच्या घरासमोरील बंदोबस्त वाढवण्यात आला आणि कार्यकर्त्यांची रीघ सुरू झाली. कागलमधील वातावरण तणावपूर्ण बनले. कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. यावेळी शंभरहून अधिक पेन्शनधारक वृद्ध महिलांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना अडवले. हा प्रकार समजताच आमदार मुश्रीफ यांनी त्यांना तेथून जायला सांगितले.

दरम्यान, दुपारी या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाने कागल बंदची हाक दिली. गुरुवारचा बाजार असल्याने शहरात गर्दी होती. पण बंदमुळे दुपारनंतर शहरात शुकशुकाट पसरला. सायंकाळनंतरही दारातील गर्दी हटत नव्हती. त्यामुळे शेवटी मुश्रीफ यांनी गैबी चौकात येऊन सर्वांना शांततेत आपापल्या घरी जाण्याचे आवाहन केले. सरकारी कारवाईला अडथळा आणू नये. विनाकारण माझी अडचण होईल, असे सांगितल्यानंतर गर्दी काही प्रमाणात पांगली.

मुंबईपासूनच पथकाचा पाठलाग

जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या घरावर प्राप्तिकरचा छापा पडणार असल्याची कुणकुण बुधवारी रात्रीच शहरातील काही अधिकाऱ्यांना लागली होती. पोलिस अधीक्षकांकडे बंदोबस्ताचीही मागणी केली होती. एकाचवेळी पाच ठिकाणी छापे टाकण्याचे नियोजन प्राप्तिकरच्या अधिकाऱ्यांनी केले होते. यानुसार पहाटेपर्यंत सर्व पथके ठरलेल्या ठिकाणी पोहोचली. एका पथकाने मुंबईपासून आमदार मुश्रीफ यांचा पाठलाग केला. अधिकाऱ्यांच्या दोन गाड्या कोल्हापुरात रेल्वे स्टेशनवर थांबल्या होत्या. दोन गाड्या कागलमध्ये गैबी चौकात थांबल्या होत्या. मुश्रीफ घरी पोहोचताच पथके त्यांच्या पाठोपाठ घरात पोहोचली. गाडीतील साहित्य काढण्यापूर्वीच पथकाने तपासणी सुरू केली. यामुळे मुश्रीफ यांच्यासह कुटुंबीय गोंधळून गेले.

आ. मुश्रीफ यांना गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखतो. ते अगदी साधे आणि सरळ आहेत. जो सरकारविरोधी बोलतो. सरकार पक्षाच्या आग्रहास बळी पडत नाही, त्याच्या मागे अशा पद्धतीने शुक्लकाष्ठ लावण्याचा सत्ताधारी मंडळींचा प्रयत्न दिसतो. कागलची जनता त्यांना जागा दाखवून देईल.

आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी

छापे कुठे

कागल आणि पुण्यातील निवासस्थान

संताजी घोरपडे व गडहिंग्लज कारखाना

टाकाळा, कोल्हापूर येथील साडूचे घर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारखाने खूश, शेतकरी नाखूश

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय मंत्री समितीने आगामी साखर हंगामात उसाच्या एफआरपीचा दर गतवर्षीप्रमाणेच २७५० रुपये केल्याने कारखानदारांनी स्वागत केले आहे, तर उत्पादन खर्च वाढल्यामुळे जादा एफआरपी मिळाली नसल्याने शेतकरीवर्गाने नाखुशी दाखवली आहे. एफआरपीचा दर कायम ठेवल्यामुळे आगामी हंगामात शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर धुराडी पेटण्यापूर्वी शेतकरी सघटना रस्त्यावर उतरणार की आहे त्या एफआरपीवर समाधान मानणार का हे पाहावे लागणार आहे.

कृषिमूल्य आयोगाने ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या शिफारशीचा विचार करून दर निश्चित केला आहे. गतवर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळलेले साखरेचे दर, देशांतर्गत बाजारपेठेत घटलेली मागणी आणि उसाचे वाढलेले उत्पन्न यामुळे कारखाने अडचणीत आले आहेत. कारखानदारांना मदत करण्यासाठी साखरेचा दर प्रतिक्विंटल २७०० रुपयांवरुन ३१०० रुपये केल्याने कारखान्यांना दिलासा मिळाला. यंदाही साखरेचे अतिरिक्त उत्पन्न झाल्याने लाखो क्विंटल साखर गोडाऊनमध्ये शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमूल्य आयोगाने गतवर्षीप्रमाणेच पहिल्या १० टक्के रिकव्हरीला २७५० रुपये एफआरपी निश्चित केली आहे. १० टक्क्यांपुढील प्रत्येक टक्क्याला प्रतिटन २७५ रुपये एफआरपी मिळणार आहे.

आयोगाच्या निर्णयाचे कारखानदारांकडून स्वागत होत आहे. गेली दोन वर्षे ऊस उत्पादकांना कारखान्यांनी कर्ज काढून एफआरपी दिली आहे. तसेच बफर स्टॉकची मर्यादा ४० लाख टनांपर्यंत वाढवली आहे. ही मर्यादा ५० लाख टनांपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी कारखान्यांनी केली होती. बफर स्टॉकच्या निर्णयामुळे साखरचे दर घसरणार नाहीत. साखरेचा दर प्रतिक्विंटल ३५०० रुपयांपर्यंत वाढवून द्यावा, अशी मागणी कारखानदार लावून धरणार आहेत. साखरेची निर्यात करण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज कारखानदारांनी व्यक्त केली. तसेच गोडाऊनमधील शिल्लक साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी देण्याचीही मागणी केली आहे. सध्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ५७ रुपये आहे. साखरेची वाहतूक करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली आहे.

एकीकडे साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्यावर सरकारने मदत केली असली तरी उत्पादन खर्च वाढल्यामुळे एफआरपीच्या दरात वाढ व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षांत रासायनिक खतांच्या किमतीत दहा ते वीस टक्के वाढ झाली आहे. नांगरणी, मशागत, कीटकनाशक फवारणी, कृषी पंपासाठी वाढलेले विजेचे दर, पाणीपट्टी, ऊसतोडणी, ओढणीसाठी कामगारांना द्याव्या लागणाऱ्या रकमेमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर एफआरपी वाढवून देण्याची मागणी होत आहे.

०००००

कोट...

गतवर्षी कारखान्यांनी कर्ज काढून एफआरपी दिली आहे. त्यामुळे कारखाने अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषिमूल्य आयोगाने गतवर्षीची एफआरपी कायम केल्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. केंद्र सरकारने साखरेचा दर प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवरून ३५०० रुपये केला तर कारखाने सुस्थितीत येतील.

पी. जी. मेढे, कार्यकारी संचालक, राजाराम कारखाना

००००००

गेल्या दोन वर्षांत रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे. कर्ज काढून शेतीची मशागत करावी लागते. त्यातच एफआरपीचे तुकडे केल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे एफआरपीत वाढ झाली पाहिजे.

रामभाऊ खोत, शेतकरी, चांदेकरवाडी

०००००

गतवर्षीची कारखान्यांनी एफआरपी (रु.)

कारखान्याचे नाव एफआरपी रक्कम

बिद्री-दूधगंगा ३०११

राजाराम २८३६

शाहू कागल २८३६

दत्त-शिरोळ २८७६

जवाहर २९०५

मंडलिक २९०८

कुंभी ३०५७

पंचगंगा २९६६

दत्त दालमिया ३०४९

गुरुदत्त २०७५

हेमरस २९१९

शरद २८८४

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची आज बैठक

0
0

कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीशजी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉल येथे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख यांची व्यापक आढावा बैठक होणार आहे. बैठकीत दोन्ही नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांना साकडे

0
0

कोल्हापूर : भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम त्वरित मिळावी म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना साकडे घालण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला. निवृत्त कर्मचाऱ्यांची ताराराणी गार्डन येथे सभा झाली. दरम्यान सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी संजय साळोखे यांची निवड झाली. साळोखे म्हणाले, 'बँकेकडून थकीत देणीसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना घेऊन पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊ. सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी संघटित प्रयत्न करू. निवृत्त कर्मचारी सध्या आर्थिक समस्येला तोंड देत आहेत. काहीजणांकडे औषधोपचारासाठी पैसे नाहीत. आर्थिक अडचणीमुळे मुलांचे शिक्षण, लग्ने थांबली आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळवून देण्यासाठी संघटितपणे लढा देऊ.' सभेला श्रीकांत कदम, नंदू पाटील, आर. पी. चौगले, सी. ए. पोवार, के. एम. कारवे, एस. सी. पाटील, एम. जी. शेख, बी. बी. महाजन उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावलीने दिले दिव्यांगांना आत्मभान

0
0

Anuradha.kadam@timesgroup.com
Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर : कुणी जन्मत: दृष्टीहिन तर कुणाला अपघाताने आलेले अंधत्व. स्नायूंचा शक्तीपात व असमन्वय यामुळे अचेतन झालेल्या अवयवांशी झगडणारे सेरेब्रल पाल्सीग्रस्त. परिणाम अर्थातच कमालीचे परावलंबी आयुष्य. वयाच्या पंचविशीलाही ज्यांनी स्पर्श केला नाही अशा तरुण अंध व सेरेब्रलपाल्सीग्रस्त मुलांचे सर्वकाही जागच्याजागी करण्याचा कंटाळा नाही, पण त्यांच्या 'अवलंबून' असण्याच्या भावनेच्या खोल जखमांसह एकेक दिवस काढणारे पालक. मात्र, हे चित्र बदलले आहे सावली केअर सेंटरच्या स्वावलंबी शिबिराने.

या शिबिरात सहभागी २२ अंध व ६ सेरेब्रलपाल्सीग्रस्त तरूणांना स्वावलंबी करण्याचे काम सावली या संस्थेने केले आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत जागेवरून हलण्यासाठीही ज्यांना इतरांचा आधार हवा असायचा, तीच मुलं आज दैनंदिन कामासोबत सार्वजनिक जीवनातही स्वावलंबनाने वावरत आहेत. वृद्धांच्या सुश्रृषेच्या कार्यात सक्रिय असलेल्या सावली केअर सेंटरच्या स्वावलंबी शिबिराने ही किमया केली आहे. वयाच्या साधारण अकरा ते तेवीस वर्षांपर्यंतच्या अंध व सेरेब्रलपाल्सी मुलांसाठी 'सावली'च्यावतीने स्वावलंबनाचे शिबिर घेण्याची कल्पना पुढे आली. दिव्यांग म्हणून दैनंदिन जीवन जगताना, समाजामध्ये वावरताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची दिव्यांगांचीही तयारी होती. 'सावली'चा विचार आणि दिव्यांगांची तयारी यामधून हे शिवधनुष्य पेलणारं शिबिर सुरू झालं.

तारुण्याच्या उंबरठ्यावरील २२ अंध मुलांच्या गरजा समजून घेत त्यांच्या स्वावलंबनाचे धडे सुरू झाले. स्वत:ची कामे स्वत: कशी करायची हे शिकवत असताना दैनंदिन विधींपासून ते घरातील वस्तूंपर्यंत पोहोचण्यासाठी पावलांचा अंदाज कसा घ्यायचा याचे तंत्र शिकवण्यात आले. अंध व्यक्तींना असलेले अंतराचे, वासाचे ज्ञान याचा यासाठी शिताफीने वापर करून घेण्यात आला. स्वयंपाकघरात सुरक्षितपणे काही पदार्थ ते पूर्ण जेवण बनवण्यापर्यंतचे शिक्षण अंध तरुणांना देण्यात आले. स्वावलंबनाचे धडे गिरवलेले सर्व अंध युवक आता स्वत:साठी जेवणही बनवत आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतरही या मुलांचे अंधत्व त्यांची समस्या बनणार नाही, यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. एखादे वाहन जवळून गेल्यानंतर त्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी, वाऱ्याचा झोत याद्वारे ते वाहन ओळखण्यापर्यंत अंध युवक तरबेज झाले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या काठीचा वापर रस्त्याचा पोत कोणता आहे, हे ओळखण्याची दृष्टी देत सावलीने या मुलांचा सार्वजनिक प्रवास सुकर केला आहे. रिक्षात कुणाचीही मदत न घेता कसे बसायचे? बसमध्ये चढउतर कशी करायची? याच्या टिप्सही अंध युवकांना कोणत्याही मदतीशिवाय रोजचा प्रवास करण्याचा आत्मविश्वास देत आहेत.

शिबिरात सहभागी ६ सेरेबल पाल्सीग्रस्तही १२ ते २० या वयोगटातील होते. या वयात पालकांच्या मदतीने दैनंदिन व्यवहार करण्यातील अवघडलेपण ही त्यांची समस्या होती. या आजारात स्नायूंमधील ताकद गेल्यामुळे नियंत्रण नसते. हातापायातील संवेदना जाणवत नाहीत. आजाराचा परिणाम मेंदूवरही होतो. एकतर दिव्यांग आणि त्यामुळे आलेलं परावलंबत्व अशा दोन्ही अपराधीपणाच्या भावनेमुळे तरुणाईत नैराश्याचे बीज रुजायला वेळ लागत नाही. अशा तरुण मुलांच्या पालकांचीही मानसिक घुसमट होत असते. याच विचारातून सेरेब्रलपाल्सी ग्रस्त युवकांना स्वावलंबी करण्यासाठी 'सावली' पुढे आली. आज पहिल्या टप्प्यात ६ सेरेब्रलपाल्सी युवक एकाही कामासाठी आईबाबांची किंवा कुटुंबातील सदस्यांची मदत न घेता आत्मभान जपत जगत आहेत.

आमचे मित्र स्वागत थोरात यांच्या कल्पनेतून दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्याचा विचार कृतीत आला. दिव्यांग व्यक्ती अपंगत्वासोबत जेव्हा तारुण्यात येते, तेव्हा त्यांना परावलंबत्वाचा जास्त त्रास होत असतो. अशा दिव्यांग तरुणांचे पालकही एका चक्रात अडकलेले असतात. त्यामुळे स्वावलंबनाच्या माध्यमातून दिव्यांग युवकांना आत्मभान देण्यासाठी केलेल्या या प्रयोगाला खूप चांगले यश आले.

- किशोर देशपांडे, संचालक, सावली केअर सेंटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावच्या पाणीपट्टीत शंभर रुपयांची वाढ

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

घरगुती वापराच्या पाणीदरात एकदम शंभर रुपयांनी वाढ केल्यामुळे पाचगाव ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. गावात नियमित आणि मुबलक पाणी येत नाही. पण बिलाचे मीटर मात्र भरमसाठ वेगाने वाढत आहे. आठवड्यातून दोन दिवस पाणी आणि बिल मात्र ५६० रुपये असा कारभार सुरू आहे. गेल्या दीड वर्षात दुसऱ्यांदा पाणीपट्टीत वाढ झाली आहे. जीवन प्राधिकरण आणि ग्रामपंचायत या दोघांमधील करार, अन्य तांत्रिक बाबीमुळे पाचगाववासियांना पाण्यासाठी जादा किंमत मोजावी लागत आहे. आमदार अमल महाडिक यांनी पाण्याचा दर कमी करण्यासाठी केलेली मध्यस्ती प्राधिकरणने न जुमानल्याने वाढीव दराने बिलांची आकारणी करण्यात आली आहे. त्याशिवाय जीवन प्राधिकरणच्या वाढीव दरानुसार पाचगावात ग्रामस्थांना १००० लिटर पाण्यासाठी २३ रुपये असा पाणीदर मोजावा लागणार आहे.

दरम्यान, गेल्या नऊ महिन्यांत पाचगाव ग्रामपंचायतीची २२ लाख रुपयांहून अधिक थकबाकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे झाली आहे. त्याच्या वसुलीसाठी प्राधिकरणने ग्रामपंचायतीला थकीत रक्कम भरा, अन्यथा पाणीपुरवठा खंडीत करू अशी नोटीस काढली आहे. त्यापोटी ग्रामपंचायतीने दरवाढ केली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाचगाव ग्रामपंचायत पाणी विकत घेते. जीवन प्राधिकरणने मे २०१८ मध्ये पाणीपट्टीत वाढ करून १८.९० पैसे दराने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र हा दर परवडणारा नसून शुल्कात कपात करावी यासाठी पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आमदार महाडिक यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या मध्यस्थीनंतर प्राधिकरणने १५.५० पैसे दराने पाचगावला पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले. मात्र याची प्रक्रियाच न झाल्याने प्राधिकरणने १८.९० पैसे एक हजार लिटर अशा दराची आकारणी केली.

थकित रकमेच्या नोटिशींनंतर पाचगाव ग्रामपंचायतीने गेल्या आठ महिन्यांतील तफावत भरून काढण्यासाठी सध्याच्या पाणीबिलात १०० रुपयांनी वाढ केली. साधारणपणे १०० रुपयांप्रमाणे आगामी आठ महिन्यांतील चार बिलांत मिळून प्रत्येक कनेक्शनधारकाकडून ४५५ रुपये वसूल करण्याचे नियोजन केले आहे. त्यातून प्राधिकरणचे थकीत बिल भागविण्याचे नियोजन ग्रामपंचायतीचे आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीची गुरुवारी बैठकही झाली. सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रवीण कुंभार, सदस्य भाग्यश्री डवरी, दिपाली पाटील, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, कोअर कमिटी प्रमुख नारायण गाडगीळ उपस्थित होते.

आठवड्यातून दोन दिवस पाणी

पाचगाव आणि आसपासच्या ६५ कॉलन्यामध्ये अपुरा पाणीपुरवठा कायम आहे. नवीन वसलेल्या कॉलन्यामध्ये सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा होतो. साधारणपणे एक तासभर पाणी वितरित केले जाते. ग्रामंचायतीने, पाण्याचा योग्य वापर व पाणी वापराचे रिडींग करण्यासाठी मीटर बसविले. प्रत्यक्षात मीटर बसविले असले तरी पाणी बिल मात्र सरसकट पद्धतीने होते. यापूर्वी शून्य ते २०,००० लिटर पाण्यासाठी ४६० रुपये इतकी पाणीपट्टी आकारणी व्हायची. तर २०००१ ते ३०००० लिटर पाण्यासाठी प्रति युनिट (एक हजार लिटर) २० रुपये दराने पाणी पुरवठा होतो.

पाणी पुरवठा विभागाकडील कामगारांचा पगार, गळतीची समस्या, देखभाल दुरुस्ती यावर ग्रामपंचायतीचा मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. पाचगावमध्ये ३१०० नळ कनेक्शनधारक आहेत. त्यांना साधारणपणे रोज बारा लाख लिटर पाणीपुरवठा होतो.

- युवराज पाटील, अध्यक्ष पाणीपुरवठा समिती

'ना नफा ना तोटा' या तत्वावर पाणीपुरवठा योजना चालविली जाते. जीवन प्राधिकरणकडून १८.९० पैसे दराने पाणीपुरवठा होतो. दर कमी करावा म्हणून प्रयत्नही केले. मात्र प्राधिकरणकडून दर कमी झालेला नाही. त्यामुळे नऊ महिन्यांतील थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी चार बिलांत १०० रुपयांप्रमाणे आकारणीवाचून पर्याय नाही.

- संग्राम पाटील, सरपंच पाचगाव

.....................

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा आणि बिल मात्र ५६० रुपये असा अजब कारभार पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे. घरगुती वापराच्या पाणी दराच्या बिलात एकदम शंभर रुपयांनी वाढ केल्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. पाचगाववासियांना नियमित आणि मुबलक पाणी पुरवठा होत नाही, पण बिलाचे मीटर मात्र भरमसाठ वेगाने वाढत आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत दुसऱ्यांदा पाणीपट्टीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे गेल्या नऊ महिन्यात पाचगाव ग्रामपंचायतीकडे १४ लाख रुपयांहून अधिक थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी प्राधिकरणने ग्रामपंचायतीला थकीत रक्कम भरा अन्यथा पाणी पुरवठा खंडीत करु अशी नोटीस काढली आहे.

जीवन प्राधिकरण व ग्रामपंचायत या दोघामधील करार व अन्य तांत्रिक बाबीमुळे पाचगाववासियांना मात्र पाण्यासाठी जादा किंमत मोजावी लागत आहे. १००० लिटर पाण्यासाठी २३ रुपये या दराने आता पाणी मिळणार आहे. दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाचगाव ग्रामपंचायत पाणी विकत घेऊन त्याचा पुरवठा करते. जीवन प्राधिकरणने गेल्या वर्षी मे महिन्यात पाणीपट्टीत वाढ करुन १८.९० पैसे दराने पाणी पुरवठा सुरू केला. मात्र हा दर परवडणारा नाही, पाणीशुल्कात कपात करावी यासाठी पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गेल्या वर्षी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. आमदार अमल महाडिक यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या मध्यस्थीनंतर प्राधिकरणने १५.५० पैसे दराने पाचगावला पाणी पुरवठा करण्याचे मान्य केले होते. मात्र कालांतराने प्राधिकरणकडून १८.९० पैसे दराने आकारणी केली.

थकित रकमेच्या नोटिसीनंतर पाचगाव ग्रामपंचायतीने गेल्या आठ महिन्यातील तफावत भरुन काढण्यासाठी सध्याच्या पाणी बिलात १०० रुपयांनी वाढ केली. साधारणपणे १०० रुपयाप्रमाणे आठ महिन्यातील चार बिलांत मिळून प्रत्येक नळकनेक्शनधारकाकडून ४५५ रुपये वसूल करुन जीवन प्राधिकरणचे थकीत बिल भागविण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा समितीची गुरुवारी बैठकही झाली. सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रवीण कुंभार, सदस्य भाग्यश्री डवरी, दिपाली पाटील, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, कोअर कमिटी प्रमुख नारायण गाडगीळ यांची उपस्थिती होती.

...................

पाचगाव आणि आसपासच्या ६५ कॉलन्यामध्ये अपुरा पाणीपुरवठा कायम आहे. नवीन वसलेल्या कॉलन्यामध्ये सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा होतो. साधारणपणे एक तासभर पाणी वितरित केले जाते. ग्रामंचायतीने, पाण्याचा योग्य वापर व पाणी वापराचे रिडींग करण्यासाठी मीटर बसविले. प्रत्यक्षात मीटर बसविले असले तरी पाणी बिल मात्र सरसकट पद्धतीने होते. यापूर्वी शून्य ते २०,००० लिटर पाण्यासाठी ४६० रुपये इतकी पाणीपट्टी आकारणी व्हायची. तर २०००१ ते ३०००० लिटर पाण्यासाठी प्रति युनिट (एक हजार लिटर) २० रुपये दराने पाणी पुरवठा होतो.

..........................

पाणी पुरवठा विभागाकडील कामगारांचा पगार, पाणी गळतीची समस्या, देखभाल दुरुस्ती यावर ग्रामपंचायतीचा मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. पाचगावमध्ये ३१०० नळकनेक्शनधारक आहेत. साधारणपणे रोज बारा लाख लिटर पाणी पुरवठा होतो.

युवराज पाटील, अध्यक्ष पाणी पुरवठा समिती

.............

'ना नफा ना तोटा'या तत्वावर पाणी पुरवठा योजना चालविली जाते. जीवन प्राधिकरणकडून १८.९० पैसे दराने पाणी पुरवठा होतो. हा दर कमी करावा म्हणून प्रयत्नही केले. प्राधिकरणकडून दर कमी झाला नाही. यामुळे प्राधिकरणच्या नऊ महिन्यातील थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी पाणीपट्टीच्या चार बिलात १०० रुपये प्रमाणे आकारणीवाचून पर्याय नव्हता.

संग्राम पाटील, सरपंच पाचगाव

.....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीवसुलीसाठी नऊ गावांत पाणीबाणी

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर :

ऐन पावसाळ्यात कोल्हापूर शहरालगतच्या नऊ गावांमध्ये एक ऑगस्टपासून पाणीबाणीची टांगती तलवार उभी ठाकली आहे. वर्षानुवर्षे पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याच्या कारणावरुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नऊ गावांना अंतिम नोटीसा लागू केल्या आहेत. शनिवार (ता.२७) अखेर संबंधित गावांनी थकीत रक्कम, विलंब आकार व जून महिन्याच्या पाणी बिलाचा भरणा करावा, अन्यथा एक ऑगस्टपासून गावचा पाणी पुरवठा बंद केला जाईल, असे पत्र धाडले आहे. जीवन प्राधिकरणने नऊ गावांकडील मिळून पाच कोटी ९० लाख ७० हजार ९३९ रुपयांच्या वसुलीसाठी पाणी खंडीत करण्याचे अस्त्र उपसले आहे.

प्राधिकरणच्या या नोटीसीमुळे ग्रामपंचायत यंत्रणेची धावपळ उडाली आहे. थकबाकीच्या कारणावरुन प्राधिकरणने पाणी पुरवठा खंडीत केल्यास पाचगाव, गांधीनगर, उचगाव, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, गडमुडशिंगी, गांधीनगर, वळीवडे, कणेरी गावाला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर वसुली मोहिम वेगवान करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात थकबाकीची रक्कम भरण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीने नोटीस लागू झाल्यानंतर पाच लाख रुपयांचा धनादेश जमा केला आहे.

जीवन प्राधिकरणमार्फत पाचगावसह १४ गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाचगाव वगळता अन्य तेरा गावात पाणी पुरवठा योजनेची दैनंदिन देखभाल दुरुस्ती, नियमित पाणी पुरवठ्याची कामे जीवन प्राधिकरणमार्फत होतात. दरम्यान, प्राधिकरणने गेल्या दीड, दोन वर्षाच्या कालावधीत दोन वेळेला पाणीपट्टीत वाढ केली. एक हजार लिटर पाण्यासाठी बारा रुपये या दरावरुन हा आकडा १५.५० पैसे व त्यानंतर १८.९० पैसेपर्यंत पोहचला आहे. प्राधिकरणच्या वाढीव पाणी दराला विरोधही झाला होता. प्राधिकरणने ३१ मे २०१९ अखेर नऊ गावांची थकीत पाणीपट्टी जाहीर केली. त्यावर विलंब आकार लागू केला.

...

कोट

'थकित रकमेचा भरणा करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना वेळावेळी लेखी व तोंडी कळविले आहे. तरी देखील थकबाकीची रक्कम भरलेली नाही. संबंधित ग्रामपंचायतींना ही अखेरची नोटीस आहे. २७ जुलैपर्यंत रक्कम न भरल्यास एक ऑगस्टपासून त्या गावांचा पाणी पुरवठा खंडीत करण्याची कारवाई होईल.

सी. एम. कागलकर, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण

...

सीईओ, बीडीओंना पत्र

नऊ गावांतील थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल जीवन प्राधिकरणने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना कळविले आहे. पाणी बिल थकबाकीची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीना मिळणाऱ्या सरकारी अनुदानातून कपात करावी आणि प्राधिकरणकडे जमा करावी, असा पत्रव्यवहार केला आहे.

...

गाव ३१ मे अखेरची थकबाकी जून बिल विलंब आकार एकूण

उजळाईवाडी १५१९००८५ ७८७१८५ ८९०१९ १६०६६२८९

गोकुळ शिरगाव ५४००११ १६३०१३ ५६६१ ७०८३७३

सरनोबतवाडी ३८८४५९ ५६१३३ ७६२६ ४५२२१८

उचगाव २२७४८३३८ ८०२४९४ १२२९७६ २३६७३८०८

गडमुडशिंगी ५६५१५१८ १९३७८० ३५५६२ ५८८०८६०

गांधीनगर ५३७३३९३ १५३०९० २८०९१ ५५२६४८३

वळीवडे २८०३३०८ ११६७०८ २५४४१ २९४५४५७

कणेरी १३७७९२५ १३३८१२ १४३०५ १५२६०४२

पाचगाव १५६४८५० ७२२९०८ १३५६१ २२९१४०९

एकूण ५५६३७९४५ ३११९१२३ ३४१९३२ ५९०६०९३९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून एफआरपीत वाढ नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्र सरकारचे साखर उद्योगाबाबत धोरण चुकल्याने साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. एकीकडे उत्पादन खर्चात वाढ झाली असतानाही यंदा उसाच्या एफआरपीत वाढ झाली नाही. शुगरलॉबी भाजपमध्ये गेल्याने एफआरपीत वाढ झाली नाही,' असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

शेट्टी यांनी पत्रकात असे म्हटले आहे, राहुरी कृषी विद्यापीठाच्या खर्चानुसार एक हेक्टर उसासाठी रासायनिक खतांचा खर्चामध्ये गतवर्षी पेक्षा हेक्टरी १५५६ रुपये वाढ झालेली आहे. तसेच पाणीपट्टी, वीजबिल, इंधन, मानवी श्रममूल्य, यांत्रिकीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तरीसुद्धा कृषीमूल्य आयोगाने यंदाच्या एफआरपीमध्ये कोणतीही वाढ केली नाही. उत्पादन खर्च वाढलेला असताना देखील केवळ साखरेचे दर वाढलेले नाहीत. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर गडगडणार असल्याची भिती व्यक्त करून यंदा केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने उसाची एफआरपी जैसे थे ठेवलेली आहे. कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा म्हणतात, गेल्या सात वर्षात यंदा उसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. २०१६-२०१७ मध्ये साखरेचा दर ३६०९ रुपये होता. २०१७- २०१८ मध्ये ३१८३ रुपयांवर आहे. भारत आणि थायंलड या देशात उसाचे उत्पादन जास्त असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेचे उत्पादन वाढणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर पडणार असल्याचे कारण पुढे करत यंदाच्या एफआरपीत वाढ केली नाही.

कृषीमूल्य आयोगाने उत्पादन खर्च काढताना तीन वर्षांची सरासरी राज्यवार जाहीर करतात. शेतकरी नेते पाशा पटेल यांची राज्याच्या कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी २०१७ मध्ये निवड झाली. राज्य सरकारने आयोगाला प्रतिहेक्टरी उसाचा उत्पादन खर्च एक लाख, ९० हजार, ४२२ रुपये खर्च सादर केला आहे. पण २०१६/२०१७ मध्ये उसाचा उत्पादन खर्च ३५ हजार रुपयाने कमी करून एक लाख ५४ हजार, ५३४ रुपये सादर करण्यात आला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तर दुसरीकडे शेजारच्या कर्नाटक राज्याने २०१५-१६ पेक्षा २०१६-१७ मध्ये प्रतिहेक्टरी ३२ हजार रुपयांची वाढ केली आहे. मग देशात उसाचा उत्पादन खर्च वाढलेला असताना महाराष्ट्रात तो कमी का दाखवण्यात आला?असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ब्राझील, पाकिस्तानातून साखर आयात

मोदी सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारने भारतात सहा हजार कोटी रुपयांची साखर आयात करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीस लावले आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे. ब्राझीलकडून सर्वाधिक साखर आयात केली असून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांकडून देखील साखर आयात केली आहे. केंद्र सरकारचे साखर उद्योगाबाबतीत असलेले धोरण चुकल्यामुळेच आज शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औषध कंपन्यांच्या गिफ्टवर ‘वॉच’

0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : आपल्याच फार्मास्युटिकल कंपनीची औषधे डॉक्टरांनी वापरावीत, यासाठी औषध कंपन्यांचे प्रतिनिधी डॉक्टरांना वेगवेगळी आमिषे दाखवत असल्याच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मार्केटिंगबाबतच्या होणाऱ्या अनैतिक गोष्टींना पायबंद घालावा यासाठी डॉक्टरांसाठी आचारसंहिता बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे भेटवस्तू, प्रवास सुविधा, आलिशान ठिकाणी मुक्काम तसेच फार्मास्युटिकल आणि संबंधित आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांकडून रोख रक्कम घेण्यावर निर्बंध येणार आहेत. दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

देशात औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यामध्ये वाढ झाली आहे. दिवसेंदिवस फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत आहे. औषधांचा खप वाढावा या हेतूने मार्केटिंगचे विविध फंडे वापरून डॉक्टरांना आपल्या कंपनीकडे खेचण्याची स्पर्धा चालू आहे. यासाठी खास प्रशिक्षित प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येते आहे. डॉक्टरांनी आपल्या कंपनीची औषधे रुग्णांना लिहून द्यावीत, यासाठी औषध कंपन्यांचे प्रतिनिधी डॉक्टरांची भेट घेऊन विविध आजारांवरील औषधांची माहिती प्रात्यक्षिकासह दाखवतात. तसेच भेटीदरम्यान काही औषधे प्रायोगिक तत्वावर डॉक्टरांना दिली जातात. डॉक्टरांनी आपल्या कंपनीच्या औषधांचा वापर सातत्याने सुरू करावा, यासाठी त्यांना गळ घातली जाते. प्रसंगी महागड्या भेटवस्तू डॉक्टरांना दिल्या जातात. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही समावेश असतो. ठराविक औषधांचा कोटा पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांना परदेशवारी घडवली जाते. तसेच विविध लकी ड्रॉ माध्यमातून डॉक्टरांना भुरळ पाडली जाते. मध्यंतरी कोल्हापुरातील एका नामवंत डॉक्टरांनी हॉस्पिटलचा वरचा मजला बांधून दिल्यास ठराविक कंपनीची औषधे वापरतो, असे एका कंपनीच्या प्रतिनिधींना सांगितल्याचे समजते. काही विशिष्ट औषध कंपन्यांशी ठराविक डॉक्टरांनी हितसंबंध ठेवल्याने त्याचा त्यांना आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे रुग्णाला औषधे देताना ठराविक कंपनीची लिहून दिली जातात. तसेच त्याच कंपनीची औषधे घेतल्यास गुण येईल, असे रुग्णाला सांगितले जाते.

तक्रारी वैद्यकीय परिषदेकडे

चुकीच्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी डॉक्टरांवर आचारसंहितेच्या माध्यमातून सरकार नजर ठेवणार आहे. भारतीय मेडिकल काउन्सिल (व्यावसायिक आचारसंहिता, शिष्टाचार व नैतिकता) नियमन, २००२ नुसार फार्मास्युटिकल आणि संबंधित क्षेत्रातील उद्योगांशी आर्थिक हितसंबंध ठेवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. डॉक्टरांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया व राज्य वैद्यकीय परिषदेला असणार आहे. औषध कंपन्याकडून डॉक्टरांना भेटवस्तू दिल्या जात असल्याच्या तक्रारी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडे करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारी राज्य वैद्यकीय परिषदेकडे पाठवण्यात आल्या असून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कंपन्यांमधील जीवघेण्या स्पर्धेमुळे हे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धेवर आळा घातला पाहिजे. भारतीय मेडिकल काउन्सिलच्या नियमासह व्यावसायिक नीतिमूल्यांचा विचार डॉक्टर व औषध कंपन्यांनी केला पाहिजे. चुकीच्या कृत्यांबाबत डॉक्टरांसह औषध कंपन्यांना देखील जबाबदार धरले जावे. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई केली पाहिजे.

कैलास तांदळे, अध्यक्ष महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिदुर्मिळ नामशेष होण्याच्या मार्गावर

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या आणि जैवविविधतेने भरलेल्या कोल्हापुरात काही वृक्षसंपदा अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही स्वयंसेवी संस्था, व्यक्तींकडून एक किंवा दोनच शिल्लक असलेल्या वृक्षांना जपले जात आहे. मात्र अशा दुर्मिळ वृक्षांची नव्याने लागवड करण्याची गरज आहे. त्याकरिता निसर्गमित्र संस्थेने रोपांची बँक तयार करुन प्रयत्न चालवला आहे. वृक्षप्रेमी नागरिकांनीही नेहमीच्या पठडीतील झाडांपेक्षा दुर्मिळ वृक्षांची लागवड करुन त्यांची जपणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरात विविध ठिकाणची उद्यान, काही संरक्षित जागांवर अजूनही दुर्मिळ वृक्ष तग धरुन आहेत. टाऊन हॉल, महावीर गार्डन, हुतात्मा गार्डन याबरोबरच अनेक ठिकाणी अशा वृक्षांची ओळख व्हावी यासाठी फलक लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण बहुतांश नागरिक त्यापासून अनभिज्ञ राहतात. ही वृक्षसंपदा आपल्याकडे कित्येक वर्षांपासून तग धरुन आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असे नाही. पण त्यांची नवीन रोपे तयार झाली नसल्याने नवीन झाडे तयार झालेली नाहीत. जुने वृक्ष कोणत्याही आपत्तीची शिकार बनू शकतात. त्यामुळे या वृक्षांची पुर्नलागवड महत्त्वाची आहे.

महापालिकेने केलेल्या गणनेतून शहरात झाडांच्या ६० जाती अतिदुर्मिळ गटात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या जातींच्या वृक्षांची संख्या एक किंवा दोनपेक्षा अधिक नाही. काही जातींचे तर प्रत्येकी एकच वृक्ष शिल्लक आहे. त्यामुळे तो वृक्ष नष्ट झाला तर शहरातून त्या जातीचे नाव पुसले जाणार आहे. शहराच्या जैवविविधतेच्यादृष्टीने ही बाब गंभीर आहे. अगदी अनेक वर्षांपासून होत आलेल्या नोंदीतून जर ही वृक्षसंपदाच गायब झाली तर शहराचा जैवविविधता क्षेत्रातील लौकीक कमी होण्याबरोबरच महत्वही कमी होणार आहे. परिणामी वेगळेपण पुसले जाऊ शकते.

त्यासाठी निसर्गमित्र संस्थेने रोपे तयार करण्यासाठी दरवर्षी अशा वृक्षांच्या बिया दिल्या जातात. त्यांची रोपे तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांच्या सहकार्याने काही रोपे तयार करण्यात आली असून त्यांचे रोपण करून अशा अतिदुर्मिळ वृक्षांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बिब्बा, मणिमोहर, हनुमानफळ, नागकेशर, शमी, बारतोंडी, अमृतफळ, सातवीन, कदंब, जारुळ, भोकर, सीताअशोक अशा दुर्मिळ जातींचे संगोपन केले जात आहे.

अनेक प्रकारचे दुर्मिळ वृक्ष, झुडुपांची संख्या वाढवण्यासाठी बियांच्या माध्यमातून नवीन रोपे तयार करण्याचा प्रयत्न आहे. हे वृक्ष त्यांना पोषक असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीतच तग धरतात. त्यामुळे अशा जागा संरक्षित करण्याची गरज आहे. त्याकरिता अशा मोकळ्या जागांवरील आरक्षण उठवले जाऊ नये यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत.
- अनिल चौगुले, निसर्गमित्र संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वातावरणातील बदलाचा ‘ताप’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सध्या वातावरणात ऊन आणि पाऊस असा हा खेळ सुरू आहे. संसर्गजन्य आजारामुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. याबरोबरच जलजन्य आजारांमुळे पोटाचे विकार वाढले आहेत. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, विलक्षण थकवा यांसारखी लक्षणे रुग्णांमध्ये आढळत आहेत. डेंगीसदृश्य लक्षणेही अधिक प्रमाणात आढळू लागली आहेत. अशा प्रकारची लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घेण्यास रुग्णांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

गेल्या महिनाभरात हवामानात सातत्याने बदल होत आहे. तीव्र ऊन आणि पाऊस यामुळे साथीच्या आजाराला पोषक वातावरण मिळते. यात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढू लागले आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही त्यात अधिक आहे. अतिसाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जलजन्य आजारांची बाधा लहान मुलांना अधिक होत असल्याचे आढळून आले आहे. पावसाळ्यात संसर्गाची भीती जास्त असल्याने पाण्याच्या शुद्धतेबरोबर स्वच्छता ठेवणे हाच सर्वात मुख्य प्रतिबंधक उपाय आहे. मात्र, पुरेशा स्वच्छतेअभावी शहरात डेंगीची लागण झालेले रुग्ण आढळू लागले आहेत. शहरातील ठिकठिकाणी उघड्यावर असलेले कोंडाळे, गटारी यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. परिसरात कचरा व पाणी साचणार नाही याची दक्षता घेतल्यास डेंगीच्या डासांची निर्मिती होणार नाही. रोगराईला आळा बसेल. याकामी प्रशासनासोबत नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे

व्हायरल फिव्हरची लक्षणे
मध्यम ते तीव्र स्वरुपाचा तसेच चढ-उतार होणारा ताप, तीव्र घसादुखी, डोळ्यांना लाली चढणे, डोळ्यांतून पाणी वाहणे किंवा नाक चोंदणे, उलटी व जुलाब होणे, अंगावर लालसर पुरळ येणे.

उपचार आणि प्रतिबंध

वैयक्तिक स्वच्छता राखावी. बाहेरून आल्यानंतर खाण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. दूषित पदार्थांचे सेवन टाळावे, भरपूर पाणी प्यावे. अतिथंड पदार्थांचे सेवन टाळावे. पौष्टिक आहार घ्यावा. ताजे व शिजवलेले अन्न खा. रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळावे. अनेकदा हे पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले पाणी नीट उकळलेले नसते. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. डासांपासून दूर ठेवणारे क्रीम वापरावेत. मच्छरदाणीचा वापर करावा. त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी आहारामध्ये भाज्यांचा अधिक समावेश करावा. तळलेले मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे. लिंबू पाणी, सरबत घ्यावा.

संपर्कजन्य आजारांची लक्षणे दिसतात तत्काळ उपचार घ्यावेत. आजार अंगावर काढू नये. स्वाइन फ्लू व डेंगूसारख्या आजारांवर लवकर उपचार मिळणे गरजेचे असते. पोटाचे विकार टाळण्यासाठी उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावेत. सकस आहार व हलका व्यायाम करण्यावर भर द्यावा.
- डॉ. विकास बनसोडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये ७५% आरक्षण: अजित पवार

0
0

सोलापूर:

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आमचं सरकार सत्तेत आल्यास राज्यातील भूमिपुत्रांना खासगी व शासकीय नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण दिलं जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मुद्दा लावून धरल्यास राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. त्या निमित्तानं सोलापूर दौऱ्यावर आले असताना पवार बोलत होते. आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवर आलेल्या जगनमोहन रेड्डी सरकारनं भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे. राज्यात पक्षाचा पाया भक्कम करण्यासाठी व राष्ट्रीय पक्षांना रोखण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जगनमोहन यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अजित पवार यांनी ही घोषणा केल्याचं बोललं जातंय.

देशात सध्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. त्यातही मोठ्या शहरांमध्ये विशेषत: मुंबई, पुण्यासारख्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये होणाऱ्या स्थलांतरामुळं स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यावरून स्थानिकांमध्ये असंतोषही आहे. या असंतोषाला सहज हवा देता येऊ शकते, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झालंय. त्यातून राष्ट्रवादीनं हा मुद्दा पुढं आणला आहे. निवडणूक प्रचारात हा मुद्दा प्रकर्षानं पुढं आल्यास भाजप-शिवसेनेची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएस फाउंडेशन परीक्षेत सुस्मिता पोवार देशात सातवी

0
0

सीएस फाउंडेशन परीक्षेत
सुस्मिता पोवार देशात सातवी


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे जूनमध्ये घेण्यात आलेल्या सीएस फाउंडेशन परीक्षेत कोल्हापूरच्या सुस्मिता पोवार हिने देशात सातवा क्रमांक मिळवला, तर इचलकरंजी येथील सोनल बियाणी हिने देशात अकरावा क्रमांक मिळवला. सीएस फाउंडेशनचा निकाल ६४.५३ टक्के लागला. कोल्हापूरमधून या परीक्षेस ११८ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सीएससाठी नोंदणी केल्यानंतर फाउंडेशन लेव्हल परीक्षा आठ महिन्यांनी घेतली जाते. या परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
...

कोट

‘सीएस होण्याच्या स्वप्नातील पहिला टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद आहे. फाउंडेशन परीक्षेत मिळालेल्या यशाने गेले वर्षभर केलेल्या मेहनतीचे चीज झाले. यापुढे भरपूर अभ्यास करून अंतिम परीक्षा यशस्वी व्हायचे आहे.
सुस्मिता पोवार
...

‘ सीएस परीक्षेच्या फाउंडेशनची तयारी करताना जे टेन्शन होते ते या यशाने निघून गेले. मात्र आता पुढच्या प्रत्येक टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बळ या यशाने मिळाले आहे. यासाठी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
सोनल बियाणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर आपल्या गावी...

0
0

डॉक्टर आपल्या गावी...
जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रापासून लांब अंतरावर असणाऱ्या लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, मोफत औषधोपचाराचा लाभ मिळावा म्हणून ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची ही मोहीम आहे. ५०० हून अधिक गावांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांची ही संकल्पना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पाच किलोमीटर अंतराबाहेरील लोकांना आरोग्य सुविधा द्याव्यात यासाठी आठवड्यातून एक दिवस डॉक्टर गावाला भेट देईल. लोकांची आरोग्य तपासणी, औषधोपचाराची सोय असणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून निधी मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ८० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
यासह जिल्ह्यात जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. सहा लाख ६८ हजार लोकांचे सर्वेक्षण झाले आहे. यासाठी आवश्यक गोळ्या जिल्हा परिषदेकडे उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाकडे सात लाख १५ हजार गोळ्यांचा साठा आहे. आरोग्य समितीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत विविध उपक्रमांवर शिक्कामोर्तब झाले. सदस्या शिल्पा पाटील, मंगल कांबळे, अश्विनी पाटील, पुष्पा आळतेकर, सविता भाटळे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे उपस्थित होते.
कळंबा आणि उचगाव येथे तापाची साथ उद्भवली होती. शिवाय डेंगीसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. दोन्ही गावांत आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत कळंबा येथे डेंगीचे ५२, तर उचगाव येथे १८ रुग्ण आढळले होते. दोन्ही गावांत आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
००००
शीत शवपेट्यांसाठी ४० लाख
नोकरी व व्यवसायानिमित्त अनेकजण बाहेरगावी असतात. नातेवाइकांना येण्यास उशीर झाल्यावर मृतदेह बराच वेळ ठेवावा लागतो. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात शीत शवेपट्या बसविण्याचा निर्णय झाला. यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
००००

ग्रामीण व डोंगराळ भागातील लोकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातील. यासाठी उपलब्ध निधीतून औषधांची खरेदी होणार आहे. १५ ऑगस्टपासून हा आरोग्यविषयक उपक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी या उपक्रमाचा प्रारंभ व्हावा या पद्धतीने नियोजन आहे.
सर्जेराव पाटील-पेरीडकर, सभापती आरोग्य समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एतिहीसिक वारसा धोक्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्यादृष्टीने ऐतिहासिक महत्त्व ठेवा असलेल्या बिंदू चौकातील तटबंदीकडे महापालिकेने अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. त्यामुळे तटबंदीवर उगवलेल्या मोठ्या झाडे, झुडपांमुळे ती झाकली गेली आहे. तसेच या झाडांमुळे दगडांमधील भेगाही वाढत चालल्या असल्याने खिळखिळीही बनली आहे. अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने तटबंदीखाली उभी केली जात आहेत. मात्र दुरवस्थेमुळे तटबंदी कधीतरी पर्यटक, वाहनांवर ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शहरातील ऐतिहासिक इमारतींबरोबरच बिंदू चौकात असलेली दगडी तटबंदी आणि बुरुज जुन्या कोल्हापूरची आठवण करुन देतात. मुख्य रस्त्याजवळ असलेल्या दोन बुरुजांबरोबरच भलीमोठी दगडी भिंत भक्कमपणाचे दर्शन घडवत आहे. या दर्शनी भागाचीच वर्षभरातून कधीतरी एकदा महापालिकेकडून स्वच्छता केली जाते. पण तिथून खासबाग मैदानाच्या दिशेने जाणाऱ्या भिंतीकडे ढुंकूनही पाहिले गेलेले नाही. या तटबंदीच्या आतील बाजूस बाराईमाम परिसराची वस्ती आहे. तर बाहेरील बाजूला अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी केएमटीचे पार्किंग आहे. या पार्किंग परिसरातील सर्व ठिकाणच्या तटबंदीवर उगवलेली झाडे अजूनपर्यंत तोडलीच नसल्याने मोठी झाली आहेत. त्यांची मुळे तटबंदीच्या दगडांमध्ये शिरुन ती खिळखिळी करत आहेत. झाडे-झुडुपांमुळे ती तटबंदीच झाकून गेली आहे.

संवर्धनाबरोबर सुरक्षा महत्त्वाची
विविध ठिकाणचे पर्यटन वाढवण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील असते. कोल्हापूर शहरात अंबाबाई मंदिराबरोबरच अन्य पर्यटनस्थळांच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण ऐतिहासिक पर्यटनाच्यादृष्टीने बिंदू चौकातील महत्त्वाच्या असलेल्या तटबंदीकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हा मोठा ठेवा नेस्तनाबूत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एक ठेवा वाचवण्याबरोबरच तिथे असणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा करण्यासाठी महापालिकेने मोठी मोहीम राबवण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जयंती नाल्यातील गाळ काढण्यासाठी साऱ्यांना जसे आवाहन केले. तसेच आवाहन या तटबंदीच्या स्वच्छतेबाबत, सुरक्षेसाठी करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्षवाढीसाठी नवीन लोकांना प्रवेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सध्याचा काळ भाजपच्यादृष्टीने महत्वाचा असून सर्वांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. पक्षवाढीसाठी नवीन लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे', असे सूतोवाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश होते.

भाजपच्यावतीने नवीन सदस्य मोहीम सुरु असून शुक्रवारी मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉल येथे भाजप कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवीन सदस्य नोंदणी व नव मतदार नोंदणी ताकदीने करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले, 'जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी समाज मेळावे घ्यावेत. केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती जनतेला देऊन त्यांच्यात विश्वास निर्माण करावा.'

भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांनी शक्ती केंद्र प्रमुखांशी चर्चा केली. तसेच शक्ती केंद्र व बूथ प्रमुखांचे कर्तव्य, कामकाज यांची माहिती दिली. आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांकडून केलेल्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, 'लोकसभेतील भाजपचे यश हे कार्यकर्ता व संघटन बांधणीतून प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्व समाज आणि सामान्य जनता यांना पक्षाबरोबर जोडण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.'

राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड सचिन पटवर्धन यांनी पदवीधर निवडणूक नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, संघटन मंत्री रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, बाबा देसाई, सरचिटणीस अशोक देसाई आदी उपस्थित होते. सरचिटणीस विजय जाधव यांनी स्वागत केले . महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आभार मानले.

भाजप सदस्यत्वाचे फॉर्म

भाजपने घरोघरी जाऊन पक्षनोंदणीस सुरुवात केली. सदर बाजार येथील अल्पसंख्याक समाजातील दोन घरांना प्रदेशाध्यक्ष पाटील, राष्ट्रीय मंत्री सतीश यांनी भेट दिली. दोन घरातील कुटुंबातील सदस्यांनी भाजपचे सदस्यत्वाचे फॉर्म भरले.

मुश्रीफांबाबत बोलण्याचे टाळले

कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर प्राप्तीकर खात्याचा छापा पडला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मुश्रीफांनी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मुश्रीफांच्या घरावर छापा पडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना लक्ष केले. मुश्रीफांच्या घरावरील छाप्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी या विषयावर बोलणार नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवेंद्रराजेंचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा?

0
0

सातारा :

सातारा भाजपचे नेते, जि. प. सदस्य दीपक साहेबराव पवार यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. दीपक पवारांच्या नियुक्तीमुळे शिवेंद्रराजेंचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दीपक पवार भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव करून ते जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. भाजपचे सातारा, जावली मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. मात्र, मधल्या काळात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवेंद्रराजेंना भाजपमध्ये सन्मानाने घ्यायचे असेल तर अगोदर दीपक पवारांचे पुनर्वसन करावे लागेल, असा विचार भाजप पक्षश्रेष्ठींनी केला असावा. त्यातूनच पवारांची महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे. या महामंडळाला राज्य मंत्रिपदाचा दर्जा असल्याने जावली तालुक्यातील भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पवारांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्यानंतर आता शिवेंद्रराजेंच्या प्रवेशाला अडकाठी राहणार नाही व त्यांचा भाजपमध्ये येण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएम ‘उत्तर’सह पाच जागा लढवणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वंचित बहुजन आघाडीतील घटक पक्ष असलेला ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (ए.आय.एम.आय.एम.) पक्ष कोल्हापूर उत्तरसह, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, शिरोळ, इचलकरंजी या पाच जागा लढवणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला राज्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आघाडी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभेच्या जागा लढवणार आहे. आघाडीचा घटक पक्ष असलेला एआयएमआयएम पाच जागा लढवणार आहे. वंचितचे अॅड बाळासाहेब आंबेडकर या बाबत अंतिम निर्णय घेणार आहेत, असे साळवे यांनी सांगितले.

प्रवक्ते साळवे म्हणाले, 'एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, अकिल मुजावर यांच्या आदेशानुसार पक्ष वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवडणूक लढवणार आहे. गेले दोन दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर अनेक इच्छुकांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ३० जुलैपर्यंत आघाडीचे नेते अॅड आंबेडकर यांच्याकडे तीन जिल्ह्याचा अहवाल देण्यात येणार आहे.

एमआयएमवर अनेक राष्ट्रीय पक्षांनी जातीयवादी पक्ष म्हणून शिक्का मारला होता. पण आमचा पक्ष संविधानाचा सरंक्षक म्हणून काम करणार आहे. भारत निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आमच्या पक्षाविरोधात असलेले गैरसमज दूर होत असून नागरिकांचा पाठिंबा आम्हाला मिळू लागला आहे, असे साळवे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला शब्बीर शेख, प्रा. शाहिद शेख, भैय्यासाहेब गजवणे, सागर शिंदे, इम्रान सनदी, मेहबूब जमादार, दिलावर मुल्ला, जकी मुल्ला, इरफान बिजली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॉकी स्टेडियमवर अॅस्ट्रोटर्फला निधी द्या’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या अॅस्ट्रोटर्फकरिता जास्तीत जास्त निधी मिळावा,' अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री रिजीजू यांच्याकडे केली.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर ग्रामीण व शहरी भागातील खेळाडू सरावासाठी येतात. त्यांचा दर्जेदार खेळ व्हावा, यासाठी ॲस्ट्रोटर्फ होण्याची गरज आहे. तसेच खेळाडूंना निवासासाठी सर्व सोयींनीयुक्त खोल्या व चेंजिंग रुम बांधण्यासाठी निधी लागणार आहे. खेलो इंडिया अंतर्गत निधी उपलब्ध व्हावा, यासाठी खासदार मंडलिक यांनी मंत्री रिजीजू यांची भेट घेऊन जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी केली. नामदार रिजीजू यांनी लवकरच याकरिता जास्तीत जास्त निधी केला जाईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारकाला ऐतिहासिक लूक

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक साकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्मारक परिसराला 'ऐतिहासिक लूक' देत पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्यातील मिळालेल्या दोन कोटी १२ लाख, ५१ हजार, ५६ रूपये निधीतून प्रवेशद्वार, माहिती केंद्र, मुख्य तक्का इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जात आहे. दक्षिण महाराष्ट्रातील पहिली दलित परिषद २१ आणि २२ मार्च, १९२० रोजी माणगाव येथे झाली होती. त्या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. आंबेडकर यांनी भूषवले होते. राजर्षी शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. म्हणून परिषदेच्या ठिकाणी डॉ. आंबेडकर आणि राजर्षी शाहूंचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी मागणी १९८५ पासूनची होती. वर्षांपूर्वी ११ कोटींचा स्मारक आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्यात आले.

पहिल्या टप्यात सरकारकडून दोन कोटी, १२ लाख, ५६ हजार रुपये मंजूर झाले. यातून सध्या तक्क्याचे दगडी बांधकामाचे काम पूर्ण झाले आहे. वीट बांधकाम आणि लाकडीकाम प्रगतीपथावर आहे. माहिती केंद्राचे तळ, पहिल्या मजल्याचे आरसीसीचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरून माणगावात प्रवेश करण्याच्या ठिकाणी भव्यद्वार उभारले जात आहे. त्याचे क्रॉक्रिटचे काम पूर्ण झाले आहे. डिझाईनचे काम प्रगतीत आहे. स्मारकाला भेट देणाऱ्यांना त्यावेळी झालेल्या परिषदेचा इतिहास डोळ्यासमोर यावा, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहूंच्या कार्याची माहिती व्हावी, यावर लक्ष केंद्रीत केले आहे. माहिती केंद्रात ग्रंथालय, शैक्षणिक दालन, अभ्यास केंद्र असणार आहे.

वडगावचे ठेकेदार

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली स्मारकाचे काम होत आहे. वडगाव येथील विनोद खोंद्रे हे ठेकेदार काम करीत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी काम मार्गी लावण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत आहेत. मात्र स्मारकाचे काम राष्ट्रीय दर्जाचेच व्हावे, अशी साऱ्यांचीच अपेक्षा आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने लक्ष द्यावी, अशीही मागणी होत आहे.

होलोग्राफिक शोसाठी सर्वाधिक निधी

स्मारक परिसरात माहिती केंद्र उभारण्यासाठी ५५ लाख ४९ हजार, तक्का इमारतीसाठी ३८ लाख २२ हजार, प्रवेशद्वारावर ११ लाख ८६ हजार खर्च होणार आहेत. होलोग्राफिक शोसाठी ९६ लाख, २१ हजार, ६९७ तर वास्तूविशारद फीसाठी सहा लाख, ९५ हजार रुपयांची तरतूद आहे. सर्वाधिक होलोग्राफिक शोसाठी निधीची तरतूद आहे. मात्र ते काम अजून प्रगतीपथावर नसल्याचे चित्र आहे.

माणगाव स्मारकाच्या ठिकाणी भव्य प्रवेशद्वार, तक्का इमारत, माहिती केंद्राचे काम प्रगतीत आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images