Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मिरवणूक मार्गावरील धोकादायक इमारती बंदिस्त करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप घालण्यासाठी एक ऑगस्टपासून परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयांनी परवानगीसाठी मंडळांना लेखी पत्र द्यावे. तसेच गणेशोत्सव मिरवणुकीपूर्वी धोकादायक इमारती बंदिस्त करा व रस्त्यावरील खड्डे बुजवा,' अशी सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. बुधवारी निवडणूक कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'हायकोर्टाच्या आदेशानुसार गणेश चतुर्थीपूर्वी दहा दिवस अगोदर सार्वजनिक मंडळांना मंडप घालण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. एक खिडकीद्वारे शहर पोलिस उपाधीक्षक कार्यालयामध्ये एक ते २० ऑगस्टदरम्यान परवाना देण्यात येणार आहे. मुदतीनंतर परवानगी देण्यात येणार नसल्याने विभागीय कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील मंडळांना त्याबाबतच्या लेखी सूचना द्याव्यात. तसेच मंडप घालताना अॅम्ब्युलन्स किंवा अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी रस्ता सोडावा अशी सर्व मंडळांना सूचना करावी.'

'मुख्य मिरवणूक मार्गावरील धोकादायक इमारतीमधील नागरिकांना स्थलांतरीत करुन अशा इमारती बंदिस्त करा. गणेश आगमनापूर्वी शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवा. गणपती विसर्जनासाठी १९ ठिकाणी महापालिकेच्यावतीने व्यवस्था केली जाते. आवश्यकता वाटल्यास आणखी विसर्जन कुंड वाढवा. सार्वजनिक मंडळांनी पंचगंगा किंवा रंकाळ्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन न करता इराणी खणीमध्ये करावे. तसेच प्लास्टिक व थर्मोकॉलवर बंदी असल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा,' अशी सूचना आयुक्तांनी आरोग्य निरीक्षकांना केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, रमेश मस्कर, आर. के. जाधव, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चुकीची माहिती भरुन सोयीचे ठिकाण मिळवल्याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई केलेल्या ६८ शिक्षकांची आता विभागीय आयुक्तांसमोर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. बुधवारी आस्थापना विभागातील उपायुक्त पी. बी. पाटील यांनी येथील सर्किट हाऊस येथे संबंधित शिक्षकांनी भरलेल्या माहितीची तपासणी केली. तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून बदली प्रक्रिया, शिक्षकांवरील कारवाईची प्रक्रियेची माहिती घेतली.

उपायुक्तांकडून हा अहवाल २६ जुलैपर्यंत शिक्षण आयुक्त व विभागीय कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी बदलीदरम्यान चुकीची माहिती भरलेल्या ११८ शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्याची व अन्यत्र बदलीची कारवाई केली. या कारवाईच्या विरोधात ६८ शिक्षकांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या. कोर्टाने नऊ जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान शिक्षक बदली प्रकरण विभागीय आयुक्तांकडे सोपविले व त्यांनी चार आठवड्यात यासंबंधी निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत. संबंधित शिक्षकांवरील कारवाईचा निर्णय आता विभागीय आयुक्त घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपायुक्त पाटील यांनी बुधवारी कोल्हापुरात येऊन या साऱ्या प्रकरणाची माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दर्शन मंडप’चे काम लांबणीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील नियोजित दर्शन मंडपच्या ठिकाण निश्चितीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. विद्यापीठ हायस्कूलसमोर की जवळ दर्शन मंडपाचे ठिकाण असावे, त्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेतील, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. परिणामी मंडपाचे काम लांबणीवर पडले.

महापौर माधवी गवंडी, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत विद्यापीठ हायस्कूलजवळील नियोजित दर्शन मंडपाचा आराखडा आर्केटेक्ट सुरत जाधव यांनी सादर केला. हायस्कूलसमोरील आणि डी. डी. शिंदे यांच्या जागेजवळील नियोजित मंडपाचा आराखडा आर्कीटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी सादर केला. दोन्ही आराखड्यावर दीर्घ चर्चा झाली. मात्र ठिकाण आणि आराखडा कोणता असावा, यावर एकमत झाले नाही. मंदिराचा कळस दिसला पाहिजे, असा मंडप उभारला जावा, असा सूर देवस्थान समिती आणि महानरगपालिका प्रशासनाचा राहिला. परिणामी ठिकाणाबाबतचा निर्णय पालकमंत्री पाटील यांच्यासमोरच होईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

जाधव म्हणाले, 'दर्शन मंडप एकदाच उभारण्यात येईल. तो जास्तीत जास्त भाविकांच्या क्षमतेचा असावा. विद्यापीठ हायस्कूलजवळ मंडप उभारल्यास मंदिराचा कळस दिसणार नाही. यासंबंधी अनेकजणांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे हायस्कूलसमोरील शिंदे यांच्या जागेवर मंडप उभारणी करणे अधिक चांगले होईल. त्यासाठी शिंदे यांची जागा घ्यायची झाल्यास त्यांना मोबदला देण्यासाठी देवस्थान समिती अर्थसाहय्य करण्यास तयार आहे.'

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'दर्शन मंडपाच्या ठिकाणी पार्किंगसाठीचे आरक्षण असल्याने ते उठवावे लागेल. नवे ठिकाण निश्चित केल्यास सर्व प्रकारचे प्रशासकीय परवाने घ्यावे लागतील. नवरात्री दरम्यानच्या भाविकांची गर्दी गृहीत धरून मंडपाचा आराखडा असला पाहिजे. सरकारकडून मिळालेल्या निधीतून केवळ वाहनतळाचे काम सुरू केल्यास ते पूर्ण होण्यास तीन वर्षे लागतील. त्यानंतर दुसऱ्या कामासाठी निधी मिळेल. म्हणून एकाचवेळी आराखड्यातील अनेक कामांना सुरूवात करावी.'

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी म्हणाले, 'आराखड्यातील अनेक कामे एकाचवेळी सुरू करू. दर्शन मंडपाची जागा बदलल्यास विविध पातळीवरील परवान्यांसाठी विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून वाहनतळाचे काम सुरू करू.'

आर्कीटेक्ट निंबाळकर म्हणाल्या, 'अंबाबाई मंदिरावरील कळस दर्शनास अडथळा येणार नाही, असाच दर्शन मंडप असावा. शिंदे यांच्या जागेत मंडप उभारल्यास कळस झाकोळला जाणार नाही. मंडपातील भाविकांची क्षमताही वाढून दहा हजार होईल.'

आर्कीटेक्ट सुरत जाधव म्हणाले, 'विद्यापीठ हायस्कूलजवळ दर्शन मंडप उभारल्यास त्यात सहा हजार भाविक एकावेळी थांबतील. गर्दीच्यावेळी दहा हजारही थांबू शकतील. तेथील आराखड्यात तळमजल्यावर दुकानगाळे असतील.' बैठकीतील चर्चेत जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, शिवाजी जाधव, विजय पोवार, संगीता खाडे, हसीना फरास यांनी सहभाग घेतला.

...

मंदिरातील दुकानांचे पुनर्वसन

'अंबाबाई मंदिराच्या आतमधील ओवऱ्यांत दुकाने आहेत. त्यांचा भाविकांना त्रास होत आहे. त्यांचे दर्शन मंडपात पुनर्वसन करावे लागेल', असे जाधव यांनी सांगितले. ८० कोटींच्या अंबाबाई आराखड्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सरकार आवश्यकतेनुसार पैसे देण्यास बांधिल आहे. महानगरपालिकेने एकाचवेळी अनेक कामांना सुरूवात करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

...

बिंदू चौकातील

वाहनतळास अडथळा

बिंदू चौकात सबजेल आहे. त्याच्याजवळ कोणतेही नवीन बांधकाम करता येत नाही. हा अडथळा तेथील वाहनतळ बांधतानाही येणार असल्याचे आदील फरास यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सबजेल स्थलांतर करण्याचा प्रस्ताव आहे. असे झाल्यास अडथळा दूर होईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या चार दिवसांपासून शिंगणापूर पंपिंग स्टेशन येथील ट्रान्स्फॉर्मरमधील बिघाड निघाला नसल्याने 'ई' वॉर्डामधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. कसबा बावडा, नागाळा पार्क, राजारामपुरी व टेंबलाईवाडी परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी नसल्याने चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला. पाणी न आलेल्या भागातून दिवसभर टँकरची मागणी होत होती. कसबा बावडा फिल्टर हाउस येथून दहा टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला.

बालिंगा उपसा केंद्रामधील बिघाड दुरुस्त होऊन पाणीपुरवठा सुरळीत झालेला असतानाच पुन्हा शिंगणापूर येथील उपसा केंद्रात बिघाड झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून 'ई' वॉर्डातील पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. कसबा बावडा, रमणमळा, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, टेंबलाई वाडी, केव्हीज पार्क, राजारामपुरी, शाहू मिल परीसरात तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जाव लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी त्र्यंबोली यात्रांचे नियोजन सुरू असताना अपुऱ्या पाण्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासियांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. बुधवारी दिवसभर कसबा बावडा फिल्टर हाउस येथून दहा टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

...

चौकट

शुक्रवारऐवजी सोमवारी पाणीपुरवठा बंद

बालिंगा उपसा केंद्र व नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या वीजपुरवठा लाइनची दुरुस्ती शुक्रवारी (ता. २६) करण्यात येणार होती. त्र्यंबोली यात्रेमुळे दुरस्तीला सोमवारपासून (ता. २९) सुरुवात होणार आहे. दुरुस्तीमुळे ए. बी. सी. व 'डी' वार्डातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. सोमवारी दुरुस्ती पूर्ण होणार असली, तरी मंगळवारीही अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्याला ग्राहक दिन

0
0

कोल्हापूर: वीज सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी महावितरणतर्फे आठवड्यातून एकदा ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. यादिनी आलेल्या तक्रारी तत्काळ सोडवाव्यात, अशी सूचना महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी केली. महावितरणतर्फे कोल्हापूर शहर व इचलकरंजी विभागात ग्राहक मेळावा घेण्यात आला. दोन्ही ठिकाणी मिळून १४५ तक्रारी आल्या. त्यापैकी १२१ तक्रारींची सोडवणूक झाली. ग्राहक मेळाव्यात बोलताना मुख्य अभियंता भोसले यांनी महावितरणच्या नवीन संकल्पनाची माहिती दिली. विभागीय, उपविभागीय व शाखा अभियंतांना उद्देशून त्यांनी, 'कोल्हापूर शहरातील पाचही उपविभागीय कार्यालयात मंगळवारी तर ग्रामीण भागातील उपविभाग व शाखा पातळीवर स्थानिक आठवडी बाजाराच्या दिवशी ग्राहक दिनाचे आयोजन करावे. शिवाय ग्राहक दिनातील तक्रारींचा अहवालही त्याच दिवशी सायंकाळपर्यंत परिमंडल कार्यालयास देण्याची सूचना केली. सर्व प्रकारच्या वीज सुविधा ऑनलाइन झाल्या आहेत. महावितरण मोबाइल अॅप व www.mahadiscom.in या वेबसाइटच्या माध्यमातून घरबसल्या वापरता येतात. यामध्ये तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. नियोजित ग्राहक दिनी सरकारी अथवा स्थानिक सुट्टी असल्यास पुढील दिवशी ग्राहक दिन घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुरगूड, पन्हाळा पालिकेचा सत्कार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

हागणदारी मुक्त अभियानामध्ये राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशानंतर स्वच्छ भारत अभियानसर्वेक्षण नुसार मुरगूड शहराचा देशामध्ये सोळावा क्रंमाक, तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्ग मुंबई महानगरपालिकेबरोबर विभागून दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मुरगूड नगरपालिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या पुरस्काराने पालिकेला सुमारे दहा कोटींचा गौरव निधी मिळणार आहे. मुरगूड नगरपालिकेने २०१८ च्या स्वच्छ सर्वेक्षणमध्येही सहभाग घेतला होता पण अपयश आले. त्यामुळे पालिका पदाधिकारी, अधिकारी, सफाई कामगार व नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान जोमाने राबविले होते. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत जानेवारी मध्ये शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन झाले होते. या अभियानाचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. त्यात २५ हजार लोकवस्तीखालील शहरामध्ये मुरगूड शहराचा देशपातळीवर सोळावा क्रंमाक आला. तसेच येथील शेतकऱ्यांनी राबविलेल्या बायोगॅस प्रकल्प ही वैशिष्टयपूर्ण योजना राबविली, त्यास दुसरा क्रंमाक मिळाला. राज्यातील सर्व नगरपालिकामध्ये सहावा क्रंमाक मुरगूड नगरपालिकेला मिळाला होता. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पक्षप्रतोद जयसिंग भोसले, नगरसेवक संदीप कलकुटकी, विशाल सूर्यवंशी आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.

पन्हाळा नगरपरिषदेचा सन्मान

पन्हाळा: २०१९ च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पन्हाळा नगरपरिषदेने राष्ट्रीय पातळीवर सहावा क्रमांक मिळवला. २०१८ च्या सर्वेक्षणात नॉन अमृत शहरांच्या विभागात पन्हाळा नगरपरिषदेने ४६ क्रमांक मिळवला होता. या सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल पन्हाळा नगरपरिषदेचा राज्य सरकारतर्फे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान केला. नगराध्यक्षा रुपाली धडेल आणि मुख्याधिकारी कैलास चव्हाण, उपनगराध्यक्षा यास्मिन मुजावर, नगरसेविका सुरेखा गोसावी आणि नगरसेविका रुक्साना मुजावर यांनी पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने हा सन्मान स्वीकारला. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नॉन अमृत शहरांच्या विभागात पश्चिम विभागात पन्हाळा नगरपरिषदेचा ४६ वा क्रमांक आहे. तर २०१९ च्या नॉन अमृत शहरांच्या प्रवर्गात पन्हाळ्याचा राष्ट्रीय पातळीवर सहावा क्रमांक आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण

0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत निमंत्रित शिक्षक सदस्यांच्या उपस्थितीला काही जणांनी आक्षेप घेतला. यामुळे समितीची बैठक अर्ध्यावर सोडून निमंत्रित सदस्य प्रसाद पाटील, सुनील पाटील, रवीकुमार पाटील यांना बाहेर पडावे लागले. गेले काही महिने जिल्हा परिषदेत शिक्षक बदली प्रकरण गाजत आहे. यामध्ये शिक्षण समितीची विनाकारण बदनामी होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्यांचे म्हणणे आहे. बुधवारी समितीची बैठक झाली. प्रारंभी निमंत्रित शिक्षक सदस्यांनी काही विषय मांडले. दरम्यान काही जि. प. सदस्यांनी त्यांच्या बैठकीतील पूर्णवेळ उपस्थितीबद्दल आक्षेप नोंदविल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तिघेही सदस्य बैठकीतून बाहेर पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युनिटी कन्सलटंला ब्लॅक लिस्ट करा

0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

'काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेमध्ये सल्लागार कंपनी म्हणून काम करणाऱ्या युनिटी कन्सलटंटकडे एक वर्षापासून तांत्रिक विषयांची मागणी केली जाते. कंपनी तांत्रिक माहिती महापालिकेला देत नसल्याने कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे,' अशी मागणी भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे बुधवारी केली. त्यानंतर त्यांनी शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याची सूचना आयुक्तांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना केली.

भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी म्हणाले, 'भाजप व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नऊ जुलै रोजी थेट पाइपलाइन योजना गुणवत्तापूर्ण होण्यासाठी काही मुद्दे सुचवले होते. ठेकेदारांनी स्वीकारलेल्या अंडर प्रोटेस्ट बिलांबाबत प्रश्न उपस्थित करुन उपाययोजनाही सांगितली होती. त्याबाबत आठ दिवसांत उत्तर देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. पण स्मरणपत्र देवूनही अद्याप त्याबाबतचा खुलासा केला नाही. यापुढे प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने प्रशासनाला वठणीवर आणू,' असा इशारा त्यांनी दिला.

'सुकाणू समितीच्या बैठकीनंतर सल्लागार कंपनीने अद्याप कोणतीही तांत्रिक माहिती दिली नाही. कंपनीकडे पाठपुरावा करुनही माहिती देत नसल्यास कंपनीचा महापालिकेला कोणताही उपयोग नाही. त्यामुळे कंपनीला ब्लॅक लिस्ट करावे,' अशी मागणी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी केली. तर विजय खाडे-पाटील यांनी जोपर्यंत योजना कार्यन्वित होत नाही, तोपर्यंत जलअभियंत्यांना कार्यमुक्त करु नये, अशी मागणी केली.

शिष्टमंडळाने मांडलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने बोलताना आयुक्तांनी महापारेषणचे अभियंता, एमजीपीचे अधीक्षक अभियंता यांना तातडीने पत्र पाठवण्याची सूचना करत पंप्सच्या तांत्रिक माहितीसाठी ठेकेदार व सल्लागार कंपनीला त्वरीत पत्र देण्याचे आदेश जलअभियंता कुलकर्णी यांना दिले.

यावेळी नगरसेवक किरण नकाते, नगरसेविका उमा इंगळे, अश्विनी बारामते, गीता गुरव यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातामुळे रेंदाळवर शोककळा

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

कणेरीवाडीजवळ कंटेनर उलटून मंगळवारी दुपारी रेंदाळ येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी गावात समजली आणि गावाला धक्का बसला. ही बातमी कानावर पडते न पडते तोच रात्री साडेदहा वाजता येथील बोरगाव फाट्यानजीत ट्रक आणि तवेरा गाडीला अपघात होऊन गावडे व पोवार कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. कणेरीवाडीजवळ किरण पाटील हा ठार झाला तर बोरगवाजवळ चालक दत्तात्रय बाबुराव पाटील व कृष्णाबाई शामराव पोवार यांचा मृत्यू झाला.

नेताजी गावडे व पोवार कुटुंबिय रविवारी रात्री पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, हुलजती येथे देवदर्शनासाठी दत्तात्रय पाटील यांची तवेरा गाडी भाड्याने घेऊन गेले होते. सोमवारी दिवसभर देवदर्शन करून रात्री उशिरा गावी परतत होते. त्यावेळी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव फाट्याजवळ ट्रक व तवेरा गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तवेरा गाडीचा चालक दत्तात्रय पाटील हा जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झालेल्या कृष्णाबाई पोवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये अनिता नेताजी पोवार या गंभीर जखमी तर शारदा पोवार, शैलेश पोवार, श्रीकांत पुजारी, नेताजी गावडे, नक्षत्रा गावडे हे किरकोळ जखमी झाले. दत्तात्रय पाटील यांचा गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी मुलगा असा परिवार आहे. कृष्णाबाई पोवार या शेतमजुरी करत होत्या, त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणी सोडणाऱ्यांवर मेहेरनजर का?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नदीत सांडपाणी मिसळत असल्याच्या कारणावरून महापालिका आयुक्त, नगरपालिकेवर कारवाई होते, मग पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ३९ गावांना सवलत का? त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा परिषदेची त्या गावांवर इतकी मेहेरनजर कशासाठी? असा सवाल पंचायत राज समितीने केला. विधानभवनात बुधवारी पंचायत राज समितीसमोरील सचिवांच्या साक्षीदरम्यान पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती, नियुक्तीच्या ठिकाणी वास्तव्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईच्या मुद्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

विधानभवनातील कक्ष क्रमांक २००१ येथे जवळपास दोन तासांहून अधिक वेळ जवळपास १२ विभागांच्या सचिवांच्या साक्षी झाल्या. दुपारी दोन ते चार या साक्षी देण्याचा कालावधी सर्वच विभागासाठी परीक्षा देणारा ठरला. चार वाजण्याच्या सुमारास साक्ष संपली आणि गेले तीन दिवस मुंबईत ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पंचायत राज समितीने जिल्हा परिषदेला पाच ते सात सप्टेंबर २०१८ या कालावधी २०१३-१४ च्या लेखापरीक्षण अहवालाचे पुनर्विलोकन व २०१४-१५ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात भेट दिली होती. समितीने विविध विभागातील कामकाजासंदर्भात आक्षेप नोंदविले होते. त्यावर प्रशासनाकडून खुलासाही झाला होता. त्याआधारे बुधवारी विविध विभागांच्या सचिवांची साक्ष झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत, प्राथमिक शिक्षण, वित्त विभाग, शेती, पशुसंवर्धन, आरोग्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

पंचायत राज समिती प्रमुख आमदार सुधीर पारवे यांच्या नेतृत्वाखालील समिती सदस्यासमोर पहिल्यांदा ग्रामविकास विभागांशी निगडीत प्रश्नासंदर्भात सचिवांची साक्ष झाली. बहुसंख्य अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी वास्तव्याला नसतात. ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, कृषी सहायक अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य विभागातील बहुसंख्य अधिकारी नोकरी एका ठिकाणी आणि वास्तव्य अन्य शहरात करतात. ग्रामीण भाागातील लोकांची गैरसोय होते. याप्रश्नी संबंधितावर काय कारवाई केली असा सवाल समितीने केला. मात्र त्यावरील अधिकाऱ्यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नसल्याचे वृत्त आहे. समितीने या संपूर्ण प्रकरणाचा एका महिन्यात अहवाल द्यावा, असे सुचविले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सचिव पी. के. मिराशी यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसंदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली. ही साक्ष सुरू असताना समितीने, पंचगंगा नदीकाठावरील ३९ गावांतून सांडपाणी मिसळते. त्या गावावर आतापर्यत कोणती कारवाई केली, कारवाईतून त्यांना सवलत देण्यामागील कारण काय? अशी विचारणा करत महिनाभरात नदी प्रदूषण मुक्तीच्या उपाययोजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी सूचना केली.

प्राथमिक शाळेतील बेंच खरेदी प्रकरण, शिक्षक समायोजन, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या राज्यभरातील जवळपास ८०० रिक्त जागा यासंदर्भातील विषयांची चर्चा झाली. आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती सुरू असल्याचा खुलासा केला. ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सचिव पी. के. मिराशी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी साक्ष दिल्या.

पंचायत राज समितीसमोरील साक्षी जिल्हा परिषदेच्या दृष्टीने सकारात्मक झाल्या. बेंच खरेदीप्रकरणी चौकशीचे सर्वाधिकार मला दिले आहेत. चौकशीअंती कारवाईचा निर्णय घेऊ. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी विविध पातळीवरील उपाययोजना सुरू आहेत.

अमन मित्तल, सीईओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म.टा.हेल्पलाइन...

0
0

गरीब आणि होतकरू

मुलांना मदतीचा हात

'महाराष्ट्र टाइम्स' च्या वतीने होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचे जे कार्य सुरू आहे, ती खरोखरच एक स्पृहणीय समाजसेवा आहे. ज्यांनी झगडत, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत शिक्षण घेतले. अशा आमच्यासारख्या गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या लोकांना 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम खूपच भावतो.

पन्नास, साठ वर्षापूर्वी समाजात असे उपक्रम फारसे नव्हते. गरीब, होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्ती असत, पण त्या नगण्य. त्यामुळे अनेक होतकरु मुलांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागे. अशा मुलांसाठी त्याकाळी राजर्षी शाहू छत्रपतींनी स्थापन केलेल्या 'प्रिन्स शिवाजी मराठा वसतिगृह' येथे आश्रय मिळत आहे. आज 'महाराष्ट्र टाइम्स'अशा हुशार, होतकरु मुलांचा शोध घेऊन त्यांना मदतीचा हात देत आहे. यासाठी समाजातून भरभरून मदत होणे गरजेचे आहे.

समाजात अनेक लोकांना गरीब, होतकरू मुलांना मदत करण्याची इच्छा असते. पण त्यासाठी योग्य माध्यम नसते. 'महाराष्ट्र टाइम्स'ने असे माध्यम म्हणून एक सामाजिक व्यासपीठ बनून उत्तम कार्य चालविले आहे. यासाठी लाभार्थी विद्यार्थी धन्यवाद देतीलच, पण एकेकाळी आमच्यासारखे प्रतिकूल परिस्थितीत शिकलेले लोकही 'मटा'ला मनापासून धन्यवाद दिल्यावाचून राहणार नाहीत. मी,'महाराष्ट्र टाइम्स'च्या या उपक्रमास शुभेच्छा देतो.

डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास अभ्यासक

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुरगूड, पन्हाळा पालिकेचा सत्कार कुरुंदवाड येथे साख

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

हागणदारी मुक्त अभियानामध्ये राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशानंतर स्वच्छ भारत अभियानसर्वेक्षण नुसार मुरगूड शहराचा देशामध्ये सोळावा क्रंमाक, तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्ग मुंबई महानगरपालिकेबरोबर विभागून दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मुरगूड नगरपालिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या पुरस्काराने पालिकेला सुमारे दहा कोटींचा गौरव निधी मिळणार आहे. मुरगूड नगरपालिकेने २०१८ च्या स्वच्छ सर्वेक्षणमध्येही सहभाग घेतला होता पण अपयश आले. त्यामुळे पालिका पदाधिकारी, अधिकारी, सफाई कामगार व नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान जोमाने राबविले होते. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत जानेवारी मध्ये शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन झाले होते. या अभियानाचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. त्यात २५ हजार लोकवस्तीखालील शहरामध्ये मुरगूड शहराचा देशपातळीवर सोळावा क्रंमाक आला. तसेच येथील शेतकऱ्यांनी राबविलेल्या बायोगॅस प्रकल्प ही वैशिष्टयपूर्ण योजना राबविली, त्यास दुसरा क्रंमाक मिळाला. राज्यातील सर्व नगरपालिकामध्ये सहावा क्रंमाक मुरगूड नगरपालिकेला मिळाला होता. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पक्षप्रतोद जयसिंग भोसले, नगरसेवक संदीप कलकुटकी, विशाल सूर्यवंशी आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.

पन्हाळा नगरपरिषदेचा सन्मान

पन्हाळा: २०१९ च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पन्हाळा नगरपरिषदेने राष्ट्रीय पातळीवर सहावा क्रमांक मिळवला. २०१८ च्या सर्वेक्षणात नॉन अमृत शहरांच्या विभागात पन्हाळा नगरपरिषदेने ४६ क्रमांक मिळवला होता. या सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल पन्हाळा नगरपरिषदेचा राज्य सरकारतर्फे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान केला. नगराध्यक्षा रुपाली धडेल आणि मुख्याधिकारी कैलास चव्हाण, उपनगराध्यक्षा यास्मिन मुजावर, नगरसेविका सुरेखा गोसावी आणि नगरसेविका रुक्साना मुजावर यांनी पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने हा सन्मान स्वीकारला. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नॉन अमृत शहरांच्या विभागात पश्चिम विभागात पन्हाळा नगरपरिषदेचा ४६ वा क्रमांक आहे. तर २०१९ च्या नॉन अमृत शहरांच्या प्रवर्गात पन्हाळ्याचा राष्ट्रीय पातळीवर सहावा क्रमांक आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक कॉँग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा कोल्हापूर शहर युवक कॉँग्रेसने निषेध केला. उमा टॉकीज चौकातील पेट्रोल पंपावर बुधवारी (ता. २४) सकाळी पत्रके वाटून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इंधन करात वाढ केल्याचे जाहीर करताच पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर अडीच रुपयांनी वाढले. याचा परिणाम महागाईवर होत असल्याने कॉँग्रेसकडून या निर्णयाला विरोध सुरू आहे. कोल्हापूर शहर युवक कॉँग्रेसने उमा टॉकीज चौक येथे पेट्रोल पंपावर नागरिकांना पत्रके वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. इंधन दरवाढीमुळे अन्य सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होणार आहे. अन्नधान्य, भाजीपाला, एसटी, रिक्षा, रेल्वे यांच्या भाड्यात वाढ झाल्यास त्यात पुन्हा कपात होत नाही. याचा परिणाम नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर होतो. यामुळे केंद्र सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी युवक कॉँग्रेसने केली आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या.

युवक कॉँग्रस अध्यक्ष दीपक थोरात, कल्याणी माणगावे, किशोर आयरे, राकेश माळवी, मुकेश भाट, सनी सावंत, अक्षय शेळके, महेश कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चित्री’ प्रकल्पगस्तांचा लढा क्रांतिकारक

निमंत्रित शिक्षक सदस्य बैठकीतून बाहेर

0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत निमंत्रित शिक्षक सदस्यांच्या उपस्थितीला काही जणांनी आक्षेप घेतला. यामुळे समितीची बैठक अर्ध्यावर सोडून निमंत्रित सदस्य प्रसाद पाटील, सुनील पाटील, रवीकुमार पाटील यांना बाहेर पडावे लागले. गेले काही महिने जिल्हा परिषदेत शिक्षक बदली प्रकरण गाजत आहे. यामध्ये शिक्षण समितीची विनाकारण बदनामी होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्यांचे म्हणणे आहे. बुधवारी समितीची बैठक झाली. प्रारंभी निमंत्रित शिक्षक सदस्यांनी काही विषय मांडले. दरम्यान काही जि. प. सदस्यांनी त्यांच्या बैठकीतील पूर्णवेळ उपस्थितीबद्दल आक्षेप नोंदविल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तिघेही सदस्य बैठकीतून बाहेर पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीख पुलाजवळचा खड्डा बुजवला

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साइक्स एक्स्टेशनकडून परीख पुलातून एसटी स्टँडकडे जाताना असलेला धोकादायक खड्डा बुधवारी बंदिस्त करण्यात आला. रात्री लाइटच्या उजेडात सुमारे अडीच फूट रुंदीचा खड्डा सळी व पत्र्याचा वापर करून रस्त्याला समांतर केला. गुरुवारी त्यावर काँक्रिट टाकण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून परीख पूल नुतनीकरण व रुंदीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अत्यंत रहदारीच्या मार्गावरील पुलामधील समस्यांना वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. पुलाखाली साचून राहणारे सांडपाणी काढण्यास महापालिका यंत्रणेला यश आले. मात्र त्याचवेळी साइक्स एक्स्टेशनकडून एसटी स्टँडकडे जाताना मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे येथून जाताना वाहनधारकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. रात्रीच्यावेळी तर जाताना खड्डा दिसत नसल्याने अनेक वाहनधारकांचे अपघात होत होते.

मंगळवारी येथील गटारीची सफाई केल्यानंतर खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. पण खड्डा बुजवण्यासाठी वेल्डिंग करावे लागणार असल्याने विद्युत पुरवठ्याची गरज होती. जवळपास अशी शक्यता नसल्याने काम ठप्प झाले. बुधवारी राजलक्ष्मी अपार्टमेंटमधून लाइट घेण्याचा प्रयत्न झाला. पण वर्दळीमुळे कामात व्यत्यय येत होता. सायंकाळपासून मात्र या प्रयत्नला यश आले. ठेकेदार शशिकांत पवार यांनी पत्रा व लोखंडी बारचा वापर करून खड्डा बंदिस्त केला. नगरसेवक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री साडेआठच्या दरम्यान काम पूर्ण झाले. गुरुवारी खड्ड्यावर काँक्रिट टाकण्यात येणार आहे.

आज आयुक्तांसोबत बैठक

परीख पुलाबाबत रेल्वे अधिकारी व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर गुरुवारी (ता. २५) दुपारी एक वाजता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासोबत परीख पूल बचाव कृती समितीची बैठक होणार आहे. बैठकीत पुलाच्या नुतनीकरण आणि रुंदीकरणाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत पाऊस सुरू

0
0

कोयनेत पाऊस सुरू

कराड :

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पाटण तालुक्यातील इतर विभागांमध्येही थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. बुधवारी सायंकाळी कोयना जलाशयात ५१.७१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे ५०, नवजा ९८ व महाबळेश्वर येथे ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात ५०६१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.

..........

कराडमध्ये आठवड्यात ४५ जणांना श्वान दंश

कराड :

वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात सध्या श्वान दंशाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. सध्या कराड, मलकापूर, विद्यानगर, वडगाव हवेली, काले अशा सर्व भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, रुग्ण लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात येत आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात मागील दोन आठवड्यांत श्वानदंश झालेले रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिकांनी करणे गरजेचे झाले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात ८ जुलै ते १३ जुलै या आठवड्यात श्वानदंशांच्या लसीकरणासाठी सुमारे तीस रुग्ण आल्याची नोंद आहे. त्या नंतरच्या आठवड्यात ही रुग्ण संख्या ४५च्या घरात पोहोचली होती. या भटक्या कुत्र्यांच्या सर्वाधिक त्रास लहान मुले आणि वृद्धांना होत आहे.

..........

मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

कराड :

वांग मराठवाडी धरणात जमीन गेली, तिचा मोबदला म्हणून सरकारने लाभक्षेत्रात जमीन दिली, मात्र तिथे स्थानिक शेतकऱ्यांनी अडचणी निर्माण केल्या आहेत. जमिनीच्या बदल्यात रोख रकमेची मागणी केली, त्यावर आजअखेर निर्णय झाला नाही. असंवेदनशील सरकारने मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रकल्पग्रस्त सुभाष बाबुराव शिंदे यांनी केली आहे. त्या बाबतचे निवेदन शिंदे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुसळधार पावसाने ठाणेही जलमय

0
0

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

घोडबंदर, कळवा, मुंब्रा, नौपाडा, टेंभीनाका आणि उथळसर यांसह ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये बुधवारी कमरेपर्यंत येईल इतके पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. काहीची वाहने पाणी शिरल्यामुळे आहे तिथेच बंद पडली आणि त्यामुळे वाहतूककोंडी वाढली. पूर्व द्रुतगती महामार्गावर घोडबंदर परिसरात तर दिवसभर वाहनांची कोंडी झाली होती. मुंबई-नाशिक महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड, मुंब्रा बायपास आणि कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरही वाहने अडकून पडली होती.

पनवेल परिसरात १०० मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पनवेल शहाराजवळून वाहणाऱ्या घाडी आणि कासाडी नद्यांच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. सायन-पनवेल महामार्गवर कळंबोली सर्कल परिसरात वाहनांना वेगमर्यादा घालण्यात आली होती. ओएनजीसीच्या वाहनांमुळे परिसरात कोंडी निर्माण झाली होती. खांदा कॉलनी इथे सेक्टर आठमध्ये एक झाड कोसळले. तळोजा तुरुंग परिसरात पाणी तुंबले होते. कल्याण-डोंबिवलीमधील चाळींमध्ये पाणी घुसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. नवी मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी पाणी साचल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

सहा झाडे कोसळली

ठाणे शहरामध्ये दिवसभरामध्ये सहा झाडे कोसळली. दोन ठिकाणी झाडाच्या फांद्या आणि एका ठिकाणी संपूर्ण झाडच धोकादायक ठरले असल्याच्या तक्रारी आल्या. एका ठिकाणी जमीन खचल्याच्या प्रकाराचीही नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरांवर आयकर, ईडीचे छापे

0
0

कागल (कोल्हापूर):

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानासह साखर कारखाना आणि नातेवाईकांच्या घरांवर आज सकाळी आयकर विभाग आणि ईडीने छापे घातले. पथकातील अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत असून, अन्य मालमत्तांबाबत चौकशीही करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयकर आणि ईडीचे पथक आज सकाळी साडेपाचच्या सुमारास मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानावर धडकले. त्यांनी कागदपत्रांची तपासणी आणि इतर मालमत्तांची चौकशी सुरू केली आहे. ईडी आणि आयकरने छापा घातला त्यावेळी मुश्रीफ घरीच होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ईडी आणि आयकर विभागाचं एक पथक मुश्रीफ यांच्या निवासस्थानी चौकशी करत असतानाच, चार जणांच्या पथकानं सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना बेलेवाडी-काळम्मा या साखर कारखान्यावरही छापा घातला. तसंच आयकर विभागाचे पथक मुश्रीफ यांच्या मुलाच्या आणि कोल्हापुरातील टाकाळा परिसरात राहणाऱ्या साडूच्या घरी देखील पोहोचले. मुश्रीफ यांच्या घरासह साखर कारखाना आणि नातेवाईकांच्या घरांवर आयकर विभाग आणि ईडीने छापे घातल्याची माहिती जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरताच खळबळ उडाली असून, मुश्रीफ यांचे समर्थक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. दरम्यान, आयकर विभागाने मुश्रीफ यांच्या पुणे येथील निवासस्थानावरही छापा घातल्याचे सांगितले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदलीप्रकरणी उपायुक्तांची भेट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात दाद मागितलेल्या ६८ शिक्षकांची ३१ जुलै रोजी विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून संबंधित शिक्षकांवर जि. प. प्रशासनाने केलेली कारवाई, त्यांच्या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी पुणे येथील विभागीय कार्यालयातील आस्थापना विभागातील उपायुक्त पी. बी. पाटील यांच्यासोबत चर्चा केली.

प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक बदली प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे घेऊन पुण्याला पोहचले. ती संबंधित कागदपत्रे विभागीय कार्यालयाकडे सादर केली. शिक्षकांनी गेल्या वर्षी चुकीची माहिती भरून सोयीचे ठिकाण मिळवले होते. प्रशासनाने त्यांच्यावर कायमस्वरुपी एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images