Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वाहनांची हवा सोडली

0
0

कोल्हापूर

जिल्हाधिकारी आवारातील बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकीची हवा मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सोडली. विशेष म्हणजे नो पार्किंगच्या ठिकाणी काही महसूल कर्मचारी आणि पोलिसांनीच वाहने लावली होती. हवा सोडण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांनी पळत येऊन आपली वाहने बाजूला केली. शिल्लक राहिलेल्या दोन ते तीन वाहनांच्या पुढील चाकांतील हवा शिंदे यांनी सोडली. जिल्हाधिकारी परिसरात वाहन पार्किंगसाठी शिस्त लावण्यासाठी अधिकारी, अभ्यागत यांनी कुठे वाहन पार्किंग करायची, कुठे करू नये, त्याचे मार्गदर्शनाचे फलक आहेत. तरीही अनेकजण रोज खुली जागा दिसताच वाहने पार्क करतात. मंगळवारीही असेच चित्र होते. हे निदर्शनास आल्यानंतर शिंदे यांनी स्वत:च नो पार्किंगमधील दुचाकीच्या चाकातील हवा सोडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीपीआर चौक बनला धोक्याचा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सीपीआर चौकाला जोडणाऱ्या चारही रस्त्यांच्या दुतर्फा थांबलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या गाड्या, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या, सर्रास होणारे चारचाकी वाहनांचे पार्किंग आणि सिग्नल सुरू झाल्यानंतर नियम धाब्यावर बसवून सुसाट जाणारे वाहनधारक यामुळे सीपीआर चौक धोक्याचा बनला आहे. या चौकात होणाऱ्या अपघातांत वाढ झाली असून या प्रकाराकडे शहर वाहतूक शाखा, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. येथील अवैध प्रवासी वाहतुकीसह अतिक्रमणे न हटविल्यास ही कोंडी नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि महापालिकेने अनेक रहदारीच्या ठिकाणावरील सिग्नलमध्ये समन्वय राखला आहे. मात्र वाहनधारकांकडून सिग्नलच्या परिसरात नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक चौक धोकादायक बनले आहेत. अशा बेदरकार वाहनधारकांवर वाहतूक पोलिस कारवाई करतात. मात्रत्यामध्ये सातत्य नसल्याने किंवा जुजबी कारवाई होत असल्याने अनेकांच्या जीवावर बेतू शकेल असे अपघातांचे प्रसंग वारंवार घडत आहेत.

वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सिग्नलचा कालावधी २० ते ८० सेकंदांपर्यंतचा आहे. मात्र यलो सिग्नल असतानाही वाहने सुसाट वेगाने रस्ते ओलांडत असतात. अनेकदा वाहनधारक सिग्नल रेड झाल्यानंतरही भरधाव वेगाने मोटारसायकल, चारचाकी वाहने पुढे दामटतात. सीपीआर चौक आणि दाभोळकर चौकात असे प्रसंग वारंवार घडतात.

सीपीआर चौकात चारही रस्त्यांवरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी चौकाला वळसा घालून जाणे अपेक्षित असले तरी बहुसंख्य वाहनधारक चौक न ओलांडता उजव्या बाजूने पुढे जातात. काही सेकंदाचा अवधी असताना दुसरा वाहनधारक दुसऱ्या बाजुने पुढे येत असल्याने हमखास अपघात घडतात. याचदरम्यान जर केएमटी, एसटी, आराम बस किंवा अन्य मोठे वाहन आल्यास शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी होते. परिणामी अपघातांची शक्यता अधिकच बळावते. अशावेळी पादचाऱ्यांना तर जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागतो. सिग्नलला थांबल्यावर डावीकडील बाजूला जाणाऱ्या वाहनधारकांसाठी रस्ता मोकळा सोडणे अपेक्षीत आहे. मात्र अलीकडे वाहनधारक सर्वच रस्ता अडवून ठेवतात असे दिसते. यातही रिक्षा व्यावसायिक आघाडीवर आहेत. त्यामुळे डावीकडील बाजूला जाणाऱ्या वाहनधारकांना विनाकारण ताटकळत थांबावे लागते.

प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलिस आहेत. मात्र पोलिसांकडून अशा वाहनधारकांवर कारवाई करत नाही. परिणामी अनेकवेळा वादाचे प्रसंगही उद्भवतात. ही स्थिती सर्वच चौकांमध्ये दिसून येते. चौकांतील अपघाताला अटकाव करण्यासाठी वाहनधारकांकडून नियमांची अंमलबजावणी होण्याबरोबरच वाहतूक पोलिसांनीही कडक धोरण स्वीकारण्याची गरज आहे.

रिक्षा स्टॉप, फळ विक्रेत्यांचा अडथळा

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील असणाऱ्या सीपीआर चौकापासून काही अंतरावरच एस.टी.चा स्टॉप आहे. त्याच्या दोन्ही बाजूला रिक्षा स्टॉप आहेत. तेथेच फळविक्रेते थांबलेले असतात. परिणामी सिग्नल सुटल्यानंतर येथे प्रचंड वाहतूक कोंडी होती. या कोंडीमध्ये सापडू नये, यासाठी वाहनधारक बेभान वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे सीपीआर चौकात दररोज छोटे अपघात होतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक आल्यानंतर येथील फळ विक्रेते निघून जातात. पण पथक गेल्यानंतर पुन्हा रस्त्यालगत ठाण मांडतात. रस्त्यावरील कोंडी कायम करण्यासाठी रिक्षा स्टॉप, फळ विक्रेत्यांना अटकाव करण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलकर्णी, सय्यदना फडकुले पुरस्कार

0
0

सोलापूर : सोलापुरातील निर्मलकुमार प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे साहित्यसेवा आणि समाजसेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. हेरंब कुलकर्णी (नगर) यांना साहित्यसेवा तर मुबारक सय्यद (भंडारा) यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रविवारी, २८ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रा. सुखदेव थोरात यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही मान्यवरांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन फडकुले पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे प्रा. विलास बेत, बाबुराव मैंदर्गीकर, रविकिरण पोरे आणि दत्ता गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याची आत्महत्या

0
0

विद्यार्थ्याची आत्महत्या

कराड :

रानामध्ये शेळ्या चरावयास घेऊन गेल्यानंतर तेथे एका शेळीला गळफास लागून तिचा मृत्यू झाला होता. या कारणावरून घरात आल्यावर आई रागविल्याने आदित्य बाबू कदम (वय १३) या विद्यार्थ्याने गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना कराड तालुक्यातील विंग येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कदम कुटुंब मूळचे म्हसवड येथील आहे, मोलमजुरी करून कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहे. आदित्य हा गावातील हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत होता. सोमवारी रानामध्ये शेळ्या चरावयास घेऊन गेला होता.

.........

अस्वलाचा वृद्धावर हल्ला

कराड : शेतात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या तारळे विभागातील जिमनवाडी (ता. पाटण) येथील शेतकरी यशवंत भैरू मोहिते (वय ७९) या वृद्धावर सोमवारी २२ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अस्वलने अचानक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील सरकारी क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यशवंत मोहिते यांच्यावर अस्वलाने पाठीमागून अचानक हल्ला चढविला. मोहिते यांच्या डोक्याला, पाठीला आणि हाता-पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांची टोळी गजांआड

0
0

दरोडेखोरांची टोळी गजांआड

सातारा :

सातारा जिल्ह्यातील सात पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच सांगली जिल्ह्यातील विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झालेल्या ८५ घरफोड्यांचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला घवघवीत यश आले आहे. या धाडसी कारवाईत अटक केलेल्या दोन आरोपीकडून ६ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे २०० ग्रॅमचे दागिने ४० हजार रुपये किंमतीचे १ किलो चांदीचे दागिणे, मोबाइल हॅण्डसेट, घड्याळे, वाहने, ८ जणांच्या या टोळीने केलेले ३ दरोडे आणि घरफोडीच्या ३४ गुन्ह्यांतील सुमारे १३ लाख ८५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात यश आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले असून, बक्षीस जाहीर केले आहे.

.........

साताऱ्यात डेगींचे तेरा रुग्ण

सातारा :

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लू, डेंगीच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू, डेंगी संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा कोमात आहे. गेल्या दोनच दिवसांत जिल्हा रुग्णालयात ५ स्वाइन फ्लू संशयित आणि १३ डेंगीचे रुग्ण आढळून आले आहे. अन्य रुग्णलयांमध्येही रुग्ण असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कदमवाडी गायरानवरीलअतिक्रमणप्रश्नी लवकरच बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील कदमवाडीमधील गायरान जमिनीवरील अतिक्रमणांवर सहा महिन्यात कारवाई करण्याचा कोर्टाचा आदेश मिळाला आहे. त्यानुसार लवकरच बैठक घेऊन अतिक्रमण झालेल्या मिळकतींची यादी तयार केली जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कदमवाडीत पाच एक गायरान जमीन आहे. तेथे ३३ पेक्षा अधिक कुटुंबांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. काहीजणांनी पक्के बांधकाम केले आहे. काहींनी जनवारांचा गोठा बांधला आहे. हे अतिक्रमण हटवण्याकडे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे कदमवाडीतील रहिवाशी अरूण कदम, नितीन कदम, विशाल कदम यांनी अॅड. धैर्यशील सुतार यांच्यातर्फे हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याच्या सुनावणीत पुढील सहा महिन्यात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याचा आदेश कोर्टाने दिला. त्यानुसार जिल्हा प्रशासन कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

...

कोट

'कदमवाडी गायरान जमिनीमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा आदेश हायकोर्टाने नुकताच दिला. या आदेशाचा आदर राखून जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करावी.

अॅड. धैर्यशील सुतार, याचिकाकर्त्यांचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रुईकर कॉलनी येथील बँक ऑफ बडोद्याच्या कार्यालयासमोर कर्ज मिळत नाही या कारणावरुन ग्राहकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शाहूपुरी पोलिसांनी ग्राहकाला आत्महत्या करण्यापासून रोखले. मारुती सोनवणे (रा. सदर बाजार) असे त्याचे नाव आहे.

सोनवणे याने बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. पण कर्जाच्या अटी पूर्तता होत नसल्याने बँकेने कर्ज नाकारले होते. त्यामुळे सोनवणे यांनी मंगळवारी आत्महदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे फौजदार पवन मोरे, एस.एन. पांढरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सोनवणे बँकेसमोर पेट्रोलची बाटली घेऊन आला असता हेडकॉन्स्टेबल कुंभार, संजय पाटील, सहाय्यक फौजदार डोंगरे यांनी झडप टाकून सोनवणे याच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेतली. यावेळी सोनवणे व पोलिसांच्यात झटापट झाली. पोलिसांनी सोनवणेला ताब्यात घेऊन त्याची मागणी समजावून घेतली. त्यानंतर पोलिसांनी बँक अधिकारी व सोनवणे यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या अटीपूर्ण केल्यानंतर सोनवणे यांना कर्ज देण्याची तयारी बँकेने दर्शवली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस

0
0

कोल्हापूर:

जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५२.५० मिली मीटर पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी ०.५७ मिली मीटर पाऊस शिरोळ तालुक्यात पडला.

शहरात आज सकाळपासून पावसाची उघडझाप होती. दुपारी तीन नंतर सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मध्यम व हलक्या सरींची रिमझिम पहायला मिळाली. दरम्यान राधानगरी धरणात ६.४१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या २४ तासांत मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हातकणंगले तालुक्यात २.१३ मिली मीटर, पन्हाळ्यात ८.७१, शाहूवाडीत ११.१७, राधानगरी ५.८३, करवीरमध्ये ५, कागलमध्ये ३.१४, गडहिंग्लजमध्ये २.२९, चंदगडमध्ये १८.१७ मिली मीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरवठा कार्यालयासमोरकाँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पंडित दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानात पूर्वीच्या सर्व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांचा सामावेश करावा यांसह विविध मागण्यांसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे मंगळवारी जिल्हा पुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पूर्वसूचना देऊनही निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे हजर न राहिल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्या धिक्काराच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

केसरी शिधापत्रिकाधारकांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा २ लाख ४० हजार रुपये तर पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी ५९ हजार रुपयांवरून १ लाख २० हजार रुपये उत्पन्न मर्यादा करावी या मागणीचे निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात गेले. तेथे जिल्हा पुरवठा अधिकारी ताटे गैरहजर असल्याचे दिसताच शिष्टमंडळातील कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी ताटे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. जबाबदार अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मारला. तेथे ताटे यांच्या कामकाजाविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. आंदोलनाची पूर्वकल्पना देऊनही त्या जाणीवपूर्वक हजर राहिलेल्या नाहीत, असा आरोप पाटील यांनी केला.

सुमारे अर्धा तास काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून निवेदन घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना येण्याची विनंती केली. शिंदे यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात अनिल कांबळे, तानाजी मोरे, मोहन पाटील, अभय मोरे, सावित्री कदम आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’तर्फे ११ ऑगस्टला शालेय चित्रकला स्पर्धा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त 'कलासंगम'च्या माध्यमातून शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. इयत्ता पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा चार गटांत ही चित्रकला स्पर्धा होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी पेटाळा येथील न्यू हायस्कूल आणि राम गणेश गडकरी सभागृहात स्पर्धा होणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित या शालेय चित्रकला स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघ, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन आणि दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना आवडत्या विषयांवर चित्र काढण्याची संधी मिळणार आहे. चारही गटांतील स्पर्धेसाठी विषय निश्चित केले आहेत. स्पर्धा सकाळी नऊ ते अकरा या वेळेत होईल. स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिले तीन क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत. त्यासह मूकबधीर, दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतंत्र बक्षिसांनी गौरविले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

स्पर्धा निशुल्क असून स्पर्धकांनी आपली नावे शाळेमार्फत १० ऑगस्टपर्यंत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नागाळा पार्क येथील कार्यालयात सादर करायची आहेत. स्पर्धेच्या ठिकाणीही नावे नोंदविण्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे. दरम्यान, स्पर्धेच्या ठिकाणी नावनोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एका कागदावर आपले नाव, शाळेचे नाव, मोबाइल नंबर लिहून संयोजकांकडे द्यावयाचा आहे. स्पर्धकांना चित्रांसाठी कागद मोफत पुरविला जाणार आहे. स्पर्धकांनी आपल्या आवडीच्या रंगाने चित्र रंगावायचे आहे. प्रत्येक गटासाठी वेगळे विषय आहेत.

इच्छुक स्पर्धकांनी कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे प्रशांत जाधव ९५०३१३८०७२ आणि आदित्य सरनाईक (९७६७८९०६२६) यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे

पहिली ते दुसरी गट :

१) फुलपाखरू

२) फूल

३) फुगे

तिसरी ते चौथी :

१) प्राणी

२)पक्षी

३ फळ

पाचवी ते सातवी :

१) आवडता खेळ

२) निसर्ग चित्र

३) भारतीय सण

आठवी ते दहावी :

१) माझं कोल्हापूर (ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळ)

२) स्वच्छता अभियान

३) महात्मा गांधींच्या जीवनातील प्रसंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या शहरात शुक्रवारपासून पाण्याचा ठणठणाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा उपसा केंद्र व नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाची वीजपुरवठा लाइनची दुरुस्ती शुक्रवारी (ता. २६) करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारसह शनिवारी ए, बी, सी व डी वॉर्डातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. महापालिका व शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.

बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या ११ के.व्ही दाबाच्या वीजपुरवठा करणाऱ्या लाइनमधील फोरपोलमध्ये बिघाड झाला आहे. फोरपोलमधील दुरुस्तीला शुक्रवारपासून सुरुवात होणार असल्याने दोन्ही उपसा केंद्रातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार असल्याने ए, बी, सी, व डी वॉर्डातील पाणीपुरवठा बंद राहील. शुक्रवारी दुरुस्ती पूर्ण झाली तरी, शनिवारीही निम्म्या शहरात अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

फुलेवाडी रिंगरोड परिसर व उपनगरे, साने गुरुजी वसाहत, आपटेनगर, तुळजाभवानी कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा तलाव परिसर, महालक्ष्मी मंदिर, महाद्वार रोड, पाण्याचा खजिन्यावरुन वितरण होणार भाग आणि लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, बिंदू चौक, पापाची तिकटी, खोलखंडोबा व जुना बुधवार पेठे परिसरात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील. तर शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. बंद काळात नागरिकांना टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच दुरुस्ती होईपर्यंत शहरवासियांनी काटकसरीने पिण्याचे पाणी वापरावे, असे आवाहन महापालिका शहर पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चांद्रयान’मध्ये जैन्याळचा तरुण शास्त्रज्ञ

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

भारताला अभिमानास्पद ठरलेल्या ‘इस्त्रो’च्या चांद्रयान मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील जैन्याळ (ता. कागल) येथील तरुण शास्त्रज्ञाने सहभाग नोंदवत कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले. यशवंत बांबरे असे त्याचे नाव आहे. यशवंत ‘इस्त्रो’मध्ये कनिष्ठ शास्त्रज्ञ आहे. सोमवारी प्रक्षेपण झालेल्या चांद्रमोहीम-२ मध्ये त्याचा सहभाग होता.
अत्यंत गरिबीत मामाच्या मदतीने शिक्षण घेऊन यशवंतने ‘इस्रो’पर्यंत मजल मारली. लहानपणापासूनच कष्टप्रद जीवन जगलेल्या यशवंतने मिळालेल्या संधीचे सोने करत प्रक्षेपण विभागातील २५ अभियंत्यांच्या गटात भाग घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.

प्रक्षेपण विभागात आराखडा, विकासापासून प्रत्यक्ष मोहीम यशस्वी होईपर्यंत त्याचा सहभाग होता. यापुढेही संपूर्ण मोहीम पूर्ण होईपर्यंत ज्या गटावर जबाबदारी राहणार आहे त्यामध्ये यशवंतचा सहभाग असणार आहे.
यशवंतचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण अर्जुननगर, निपाणी येथील देवचंद कॉलेज येथे पूर्ण केले. बीई मेकॅनिकल ते पुणे येथे झाले. २०१५मध्ये ‘इस्त्रो’ची परीक्षा दिली होती. १३ मे २०१६ मध्ये कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ‘इस्रो’मध्ये निवड झाली आहे.त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडील आणि भाऊही शेतीच करतो. बारावीनंतरच्या करिअरच्या सर्व टप्प्यावर त्याच्या मामाने मदत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग; शिक्षकास अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे माध्यमिक शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाने पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केला. याबाबत गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अब्दुल रहेमान मकतूम अत्तार वय (वय ३७) या शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेने हलकर्णी गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने संस्थेनेही शिक्षक अत्तारला तातडीने निलंबित केले.

हलकर्णी येथे हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये सकाळी दहाच्या सुमारास इयत्ता पाचवीत शिकणारी मुलगी बेंचमध्ये दप्तर ठेवत असताना अत्तार तिच्याजवळ गेला. तिच्याशी लगट साधत असता मुलीने ओडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लज्जा उत्पन्न होईल असे बोलून अत्तारने तिचा विनयभंग केला, अशी फिर्याद मुलीच्या आईने गडहिंग्लज पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना गावात समजताच शेकडो कार्यकर्ते शाळा परिसरात जमा झाले आणि शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. तेव्हा संस्थेचे सचिव नागेश मुंगूरवाडी यांनी अत्तारला निलंबित केल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’तर्फे ११ ऑगस्टला शालेय चित्रकला स्पर्धा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त 'कलासंगम'च्या माध्यमातून शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. इयत्ता पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा चार गटांत ही चित्रकला स्पर्धा होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी पेटाळा येथील न्यू हायस्कूल आणि राम गणेश गडकरी सभागृहात स्पर्धा होणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित या शालेय चित्रकला स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघ, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन आणि दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना आवडत्या विषयांवर चित्र काढण्याची संधी मिळणार आहे. चारही गटांतील स्पर्धेसाठी विषय निश्चित केले आहेत. स्पर्धा सकाळी नऊ ते अकरा या वेळेत होईल. स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिले तीन क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत. त्यासह मूकबधीर, दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतंत्र बक्षिसांनी गौरविले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

स्पर्धा निशुल्क असून स्पर्धकांनी आपली नावे शाळेमार्फत १० ऑगस्टपर्यंत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नागाळा पार्क येथील कार्यालयात सादर करायची आहेत. स्पर्धेच्या ठिकाणीही नावे नोंदविण्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे. दरम्यान, स्पर्धेच्या ठिकाणी नावनोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एका कागदावर आपले नाव, शाळेचे नाव, मोबाइल नंबर लिहून संयोजकांकडे द्यावयाचा आहे. स्पर्धकांना चित्रांसाठी कागद मोफत पुरविला जाणार आहे. स्पर्धकांनी आपल्या आवडीच्या रंगाने चित्र रंगावायचे आहे. प्रत्येक गटासाठी वेगळे विषय आहेत.

इच्छुक स्पर्धकांनी कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे प्रशांत जाधव ९५०३१३८०७२ आणि आदित्य सरनाईक (९७६७८९०६२६) यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे

पहिली ते दुसरी गट :

१) फुलपाखरू

२) फूल

३) फुगे

तिसरी ते चौथी :

१) प्राणी

२)पक्षी

३ फळ

पाचवी ते सातवी :

१) आवडता खेळ

२) निसर्ग चित्र

३) भारतीय सण

आठवी ते दहावी :

१) माझं कोल्हापूर (ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळ)

२) स्वच्छता अभियान

३) महात्मा गांधींच्या जीवनातील प्रसंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावरील मांसामुळे आरोग्याचा प्रश्न

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

शहरातील कत्तलखाने, मांस विक्री दुकानामधून निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची कोणतीही यंत्रणा नसल्याने सर्व कचरा जागा मिळेल तेथे टाकला जातो. या मांसावर घोंगावणाऱ्या माशा, सोभवती फिरणारी भटकी कुत्री आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघड्यावर टाकलेल्या जैविक कचऱ्याबाबत महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे तक्रारही करण्यात आली. पण तक्रारीची दखल न घेतल्याने ‌‌विभागीय आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली आहे.

शहरातील परवानाधारक कत्तलखान्यातून व किरकोळ मांस विक्री दुकानातून मटन व चिकनची दररोज विक्री होते. महापालिकेच्या दप्तरी त्याची नोंद किरकोळ प्रमाणात होत असली, तरी नोंदीपेक्षा कितीतरी पटीने जास्त जनावरांची कत्तल करुन मांस विक्री केली जाते. पण त्यातून निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने सर्व कचरा उघड्यावर किंवा शहरातून वाहणाऱ्या नाल्यात टाकला जातो. यापूर्वी जैविक कचरा कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर टाकला जात होता. त्यामुळे येथे भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. भटक्या कुत्र्यांनी अनेकवेळा लहान मुलांसह नागरिकांना लक्ष्य केले होते. त्यामुळे येथे जैविक कचरा टाकण्यास प्रतिबंध केला. पण आता हा कचरा जागा मिळेल तेथे कोठेही टाकला जात आहे. विशेषत: नाल्यामध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पंचगंगा प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपासून लाइन बाजार येथील एसटीपी प्लांटच्या मागील बाजूस १२ ते १५ मांस भरलेली पोती टाकण्यात आली होती. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व महापालिका प्रशासनाला माहिती दिल्यावरही कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यानंतर हा कचरा मंगळवारी रात्री लक्ष्मीपुरी येथील खराळा मार्केटच्या बाहेर पोत्यात भरुन टाकण्यात आला. टाकलेले मांस भटकी कुत्री रस्त्यावर विस्कटत होती. अशाच पद्धतीने जून महिन्यात उद्यमनगर येथील नाल्यात उघड्यावर मांस टाकले होते. रस्त्यावर किंवा नाल्यात टाकलेले मांस पाण्यावाटे पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे पाण्याच्या व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. याबाबतची तक्रार महापालिका व प्रदूषण मंडळाला देवूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही दोन्ही सरकारी यंत्रणांनी केलेली नाही.

जनावरांची कत्तल केल्यानंतर निर्माण होणारा जैविक कचरा जाळून टाकणे किंवा खड्डा काढून पुरणे या दोन पर्यायाद्वारे त्याची विल्हेवाट लावली जाणे अपेक्षित आहे. पण अशी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नसल्याने उघड्यावर मांस टाकण्याचे प्रकार शहरात वारंवार होत आहेत. वेळीच अशा प्रकारांना अटकाव न केल्यास शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.

...

चौकट

विभागीय आयुक्तांकडे तक्रार

शहरात ठिकठिकाणी जैविक कचरा व मांस उघड्यावर टाकले जात असल्याची तक्रार प्रजासत्ताक संस्थेच्या दिलीप देसाई यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त तथा देखरेख समितीचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. तक्रारीमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कायद्याची पायमल्ली होत असल्याचेही नमूद केले आहे.

...

देखरेख समिती असूनही ...

हायकोर्टाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती नेमण्यात आली. समितीमध्ये सर्वच महत्त्वाच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समितीच्या बैठकीमध्ये पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आदेश दिले जातात. मात्र त्यानंतर आदेशावर किती अंमलबजावणी झाली, याबाबतचा आढावा घेतला जात नाही. परिणामी समितीची स्थापना झाल्यापासून असलेली प्रदूषणाची स्थिती आजही कायम असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून होत आहे.

...

६००

चिकन विक्री दुकाने

२६५

मटण विक्री दुकाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोयना धरणात अपुरा पाणीसाठा

0
0

इंट्रो

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. २४ जुलै रोजी धरणात ५१.७१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. मागील वर्षी याच दिवशी ८३.५० टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. पाऊस उशिराने सुरू झाल्याने आणि पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे यंदा धरणातील पाणीसाठा अत्यंत संथ गतीने वाढत आहे. पिण्यासाठी, सिंचन योजनांसाठी, वीजनिर्मितीसाठी लागणारे पाणी आणि कर्नाटक-महाराष्ट्र पाणी वाटप करारातील तरतुदी पाहता हा पाणीसाठी अत्यंत तुटपुंजा आहे. पाऊस वेळेत सुरू न झाल्यास वीजनिमिर्तीसह पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

पाण्याचा असा होतो उपयोग

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. कोयना धरणाच्या पश्चिमेकडील एकूण चार टप्पे आणि पायथा वीजगृहाच्या माध्यमातून एकूण १९६० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. पाणीवाटप लवादानुसार १ जून ते ३१ मे या तांत्रिक वर्षांत धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी ६७.५ टीएमसी इतक्या पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. चिपळूण शहरासाठी उन्हाळ्यात टंचाई स्थितीत पिण्यासाठी दररोज ०.०५ टीएमसी पाणी सोडले जाते. पाच टीएमसी मृत पाणीसाठा आहे.

………

पाणीवाटप करार रखडणार?

कर्नाटकातील कृष्णा नदीच्या काठावरील गावांना दर वर्षी उन्हाळ्यात भेडसावत असणारी पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत पाणीवाटप करार करण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याचे कर्नाटकचे तत्कालीन जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले होते. महाराष्ट्र दर वर्षी कोयनेतून चार टीएमसी पाणी चिकोडी, बागलकोट आणि विजापूरला सोडते; तसेच चार टीएमसी पाणी कर्नाटकने अलमट्टी धरणातून सोलापूर आणि जतसाठी दर वर्षी सोडावे, अशी महाराष्ट्राची मागणी आहे. खरीप आणि रब्बी हंगामात दोन टीएमसी पाणी कर्नाटकने द्यावे, असा प्रस्ताव महाराष्ट्राकडून दाखल करण्यात आला आहे.

म्हैसाळ, टेंभू, योजना

कोयना धरणाच्या पूर्वेकडील म्हणजे धरणाच्या दरवाजातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर कोयना आणि कृष्णा नदीच्या काठावरील कराड शहरासह अनेक लहान-मोठी गावे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. दोन्ही नद्यांवरील उपसा सिंचन योजनांसाठी टंचाईच्या काळात पाणी सोडले जाते. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या मोठ्या सिंचन योजनांना उपसा करण्यासाठी लागणारे पाणी कोयना धरणातूनच सोडले जाते. २०१९च्या उन्हाळ्यात या तीन योजनांच्या माध्यमातून सुमारे ३५ टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला होता.

………

दुष्काळी भागांना कोयनेचा आधार

सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दुष्काळी तालुक्यांची तहान सिंचन योजनांच्या माध्यमातून भागवली जाते. सिंचन योजनांद्वारे लघु-मध्यम तलाव, नद्यांतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून दुष्काळी जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविला जातो. दर वर्षी उन्हाळ्यात कोयनेतून सोडलेले पाणीच दुष्काळग्रस्तांना दिलासा देते.

……

आकडे काय सांगतात?

१०५.२५ टीएमसी

कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता

……

५१.७१ टीएमसी

२४ जुलै रोजीचा पाणीसाठा

………

६७.५ टीएमसी

१ जून ते ३१ मे या तांत्रिक वर्षात धरणातील वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी

………

४ टीएमसी

मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात कोयनेतून कर्नाटकातील चिकोडी, बागलकोट आणि विजापूरला चार टीएमसी पाणी दिले जाते.

……

कोयनेच्या पाण्यावर सुरू असलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाची फी भरण्यासाठीपैसे नसल्याने आत्महत्या

0
0

शिक्षणाची फी भरण्यासाठी

पैसे नसल्याने आत्महत्या

सोलापूर :

शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने हतबल विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. रुपाली रामकृष्ण पवार, असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मोहोळ तालुक्यातील देगावची रहिवासी होती. रुपालीने कीटकनाशक प्राशन करून आयुष्य संपवले.

रुपाली रामकृष्ण पवार हिचा पंजाबच्या जालंधर शहरातील लव्हली प्रोफेशनल अकादमीला बीटेकसाठी प्रवेश निश्चित झाला होता. या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी पात्रता परीक्षेत रुपालीने ८९ टक्के गुण मिळवले होते. पंजाब इथे दहा हजार भरून रुपालीने आपला प्रवेश निश्चित केला होता. उर्वरित एक लाख रुपये भरण्यासाठी २० जुलैची मुदत होती. मात्र मुदतीत फी भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रुपालीने रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. रुपालीची फी भरण्यासाठी वडिलांनी शेती विकायला काढली होती. मात्र, शेतीला कवडीमोल भाव येत असल्याने शेतीची विक्री झाली नाही. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ आल्याचे गावकरी आणि नातेवाईकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाचा महिला पोलिसावर बलात्कार

0
0

सातारा :

आमिष दाखवून बलात्कार व ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल सुभाष पवार (वय २७, रा. शंभर फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) या सांगली पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिला पोलिस सध्या सातारा परिसरात राहत असून, शाहुपुरी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पोलिसावरच फसवणूक व बलात्कारचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार २२ वर्षांची तरुणी असून, ती सध्या पोलिस दलात कार्यरत आहे. पोलिस युवतीची अनिल पवार याच्याशी ओळख झाली. या ओळखीतूनच संशयित पवार याने पोलिस युवतीवर बलात्कार केला. त्या नंतर संशयिताने 'तुझ्याशी लग्न करतो, असे वचन दिले.' यातून संशयिताने पोलिस युवतीकडून घर बांधण्यासाठी ५० हजार रुपये घेतले. बराच कालावधी गेल्यानंतर पोलिस युवतीने अनिल पवार याला लग्नाबाबत विचारल्यानंतर त्याने नकार दिला. संशयिताला पैसे मागितले असता, त्याने पैसे देण्यासही नकार देऊन पोलिस युवतीला दमदाटी, शिवीगाळ केली.

दरम्यान, संशयित अनिल पवार या पोलिसाच्या कुटुंबीयांनीही पोलिस युवतीला दमदाटी, शिवीगाळ केली आहे. बलात्कार व फसवणूक झाल्याचे कळताच युवतीने शाहुपुरी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. ही घटना १७ जुलै २०१८ ते १४ जून २०१९ या कालावधीत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीवरुन पोलिसांनी सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अनिल पवार याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास महिला फौजदार वर्षा डाळींबकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएम विरोधात जनआंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्या मतदारांसाठी निवडणूक घ्यायच्या, त्याच्याच मनात ईव्हीएमबाबत शंका असल्याने निवडणूक बॅलेट पेपरवर घ्याव्यात, याबाबत जनजागृतीसाठी ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जन आंदोलन उभे रहात आहे. विविध शहरांमध्ये चर्चासत्रांचे आयोजन केले जात असून नऊ ऑगस्टला चैत्यभूमी ते ऑगस्ट क्रांती मैदान असा लाँगमार्चही काढण्यात येणार आहे. दरम्यान, यातील अराजकीय कार्यकर्त्यांबरोबर ईव्हीएमला विरोध असणाऱ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी होणार असल्याने या मागणीबाबत दबाव वाढणार आहे.

ईव्हीएमचे सत्य काय, ईव्हीएममध्ये कशी गडबडी केली जाऊ शकते यावर चर्चा करण्यासाठी ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्यावतीने येत्या शुक्रवारी (ता. २६ ) शाहू स्मारकमध्ये दुपारी एक ते पाच या वेळेत चर्चासत्र आयोजित केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या चर्चासत्रात राष्ट्रीय संयोजक प्रा. धनंजय शिंदे, फिरोज मिठीबोरवाला, संगणक तज्ज्ञ अनुपम सराफ , अ‍ॅड. असिम सरोदे , एम. खालिद हे प्रमुख वक्ते सहभागी होणार आहेत.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, 'भारत हा मोठी लोकशाही असलेला देश आहे. त्यामध्ये मतदारांची भूमिका महत्वाची आहे. त्या मतदारांच्याच मनात जर ईव्हीएमबाबत शंका निर्माण झाली असेल व निवडणूक आयोग जर ती दूर करण्यात अपयशी ठरत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचाच मार्ग आहे. ज्या देशांनी ईव्हीएमचा वापर केला, त्यांनी ते सोडून परत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास सुरुवात केली आहे. मतदारांचा यंत्रणेवर विश्वास नसेल तर ती यंत्रणा लादायची नाही असा निर्णय त्या देशांनी घेतला आहे. आपल्या देशातही मतदारांचा यंत्रणेवर विश्वास नसेल तर मतदारांसोबत रहावे लागणार आहे. जो पक्ष ईव्हीएमवर निवडणूक जिंकतो, त्याच पक्षाचा बॅलेट पेपरवर होत असलेल्या निवडणुकांत का पराभव होतो? त्याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही. यामध्येच सारे दडलेले आहे.'

दरम्यान, ईव्हीएमबाबतीत अनेक तक्रारी केल्या जात असून अनेक राजकीय पक्षांनीही त्याच्या वापरावर शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्यावतीने अनेक ठिकाणी चर्चासत्र घेण्यात येत आहेत. कोल्हापुरातील चर्चासत्रात माजी आमदार संपतबापू पाटील, जे.एफ. पाटील, चंद्रकांत यादव, भगवान काटे, प्रा. जालिंदर पाटील, संदीप देसाई, पीटर चौधरी, दिलीप मोहिते, दिलीप पोवार आदी सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नितीन देसाई

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. बुधवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश नगरविकास विभागाच्यावतीने काढण्यात आले. त्यानुसार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन देसाई यांची नियुक्ती झाली. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांची बदली मुंबई येथे झाली. तर उपायुक्त उमेश शिंदे यांची दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली. देसाई गुरुवारी अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून पाटणकर यांनी जून २०१६ मध्ये पदभार स्वीकारला होता. तीन वर्षे त्यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांची मुंबई येथे नगरपरिषद संचनालयाच्या उपसंचालकपदी नियुक्ती झाली. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०१६ रोजी मंगेश शिंदे यांची सहाय्यक उपायुक्तपदी वर्णी लागली. या पदाच्या माध्यमातून त्यांनी सरकारी सेवेला सुरुवात केली. नंतर तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी त्यांच्याकडे उपायुक्त क्रमांक दोनचा पदाचा पदभार सोपवला. अडीच वर्षानंतर त्यांची दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली. दोन्ही अधिकाऱ्यांनी महापालिकेतील सेवाकाळाबद्दल समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images