Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

७७ हजार जण स्वस्त धान्यापासून वंचित

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : तालुका ते जिल्हा पातळीवरील पुरवठा प्रशासनातील लालफितीच्या कामकाजामुळे जिल्ह्यातील ७७ हजार ८३० जण स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर शहरातील ३३ हजार ८६६ आहेत. पात्र असतानाही त्यांना दोन वर्षांहून अधिक काळ धान्य मिळालेले नाही. यामुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत त्यांना शिधापत्रिका देऊन धान्यपुरवठा करण्यात येईल. यासाठी पुरवठा विभागाकडून १४ ऑगस्टअखेर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानुसार धान्य न मिळणाऱ्या लोकांची ही आकडेवारी सरकारने जिल्हा पुरवठा प्रशासनाकडे पाठवली आहे.

पात्र कुटुंबास नवीन शिधापत्रिका देणे, नावे कमी करणे, वाढविणे, स्वस्तातील धान्यवाटप करण्याची जबाबदारी तालुका, शहर पुरवठा विभागाची आहे. मात्र, या पातळीवर प्रशासकीय दिरंगाईपणा आहे. सामान्य, गरिबास सहजपणे शिधापत्रिका मिळत नाही. चिरीमिरीही वसूल केली जाते. अनेक ठिकाणी दलालांचा विळखा आहे. अशा विविध कारणांमुळे शिधापत्रिका न मिळाल्याने दर महिन्याचे स्वस्तातील धान्याला यांना मुकावे लागले आहे.

अंत्योदय शिधापत्रिकेस माणसी ५ किलो धान्य ३ रुपये किलोने, तर लाभार्थी शिधापत्रिकाधारकास २ रुपये किलाने २ किलो तांदूळ, प्रतिकिलो ३ रुपयांनी ३ किलो गहू दिला जातो. यासाठी शिधापत्रिका असणे बंधनकारक आहे. याशिवाय संबंधित कुटुंबातील सदस्य आधार कार्ड क्रमांकासह पॉस मशिनला कनेक्ट असणे आवश्यक आहे. हे नसल्याने 'अंत्योदय'चे ६०२ तर 'लाभार्थी' पत्रिकेचे ७७ हजार २२८ जणांना स्वस्तातील धान्य मिळत नाही. हे लाभार्थी गरीब, सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांचा 'आवाज' प्रशासनापर्यंत पोहोचला नव्हता.

दरम्यान, विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या वंचित लोकांनाही धान्य मिळण्यासाठी पात्र सर्व कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करणे आणि धूरमुक्त महाराष्ट्रासाठी शंभर टक्के गॅस कनेक्शन जोडणीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान राबविण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. चार सदस्यांची एक शिधापत्रिका असल्यास ७७ हजार २२८ जणांचा धान्य वितरणात सामावून घेण्यासाठी सुमारे २० हजार शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येईल. यासाठी येथील जिल्हा पुरवठा प्रशासन नियोजन करत आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांच्याशी संपर्क साधण्याचा आणि भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

००००

कोट...

पुरवठा विभागातील प्रशासनाच्या लालफितीच्या कामकाजामुळे पात्र असूनही ७७ हजार ८३० जण स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

चंद्रकांत यादव, सचिव, ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन

००००

धान्यापासून वंचित लोकसंख्या

आजरा : ३४८३ , भुदरगड : ६३३७, चंदगड : ४३१८, गडहिंग्लज : १९२२ , गगनबावडा : ५३४, हातकणंगले : ८०२८, इचलकरंजी : १७३४, कागल : २७३७, करवीर : ३९४५, पन्हाळा : ८६३७, राधानगरी : १४४८, शाहूवाडी : १५,७७५, शिरोळ : १६५२, कोल्हापूर शहर : ३३,८६६.

०००००

५,३७,५१

'अंत्योदय'मधील लाभार्थी

२२,३५,६६२

लाभार्थी शिधापत्रिकेतील लाभार्थी संख्या

७७,८३०

शिधापत्रिका नसल्याने धान्य न मिळणारे

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रेक फेल केएमटीची तीन वाहनांना धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उमा टॉकीज सिग्नलजवळ ब्रेक फेल झालेल्या केएमटीने दोन रिक्षा, मोपेडला धडक दिली. या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले. मात्र, वाहनांचे नुकसान झाले. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर तरुणांनी केएमटीचा चालक राजेंद्र ओतारी (रा. शुक्रवार पेठ) यांना मारहाण केल्याने सुमारे अर्धा तास तणाव निर्माण झाला. यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. रिक्षाचालक सुनील लवटे, मोपेडस्वार महिला मीरा पाटील जखमी झाल्या.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, कणेरी मठावरील धार्मिक कार्यक्रमासाठी केएमटीने गंगावेश ते कणेरी मठ अशी विशेष बससेवा सुरू केली आहे. दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास चालक ओतारी हा बस घेऊन दसरा चौकमार्गे जात होता. बसमध्ये २० प्रवासी होते. ही बस बारा वाजण्याच्या सुमारास उमा टॉकीज सिग्नलजवळ आल्यानंतर ब्रेक फेल झाल्याचे चालक ओतारी यांच्या लक्षात आले. त्यांनी बस थांबविण्याचा प्रयत्न करत डिव्हाडरव घालण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बसच्या समोर उभी असलेल्या दोन रिक्षा आणि मोपेडस्वाराला जोरात धडक दिली. यामध्ये रिक्षाचे नुकसान होऊन मोपेड बसखाली सापडली. त्यावेळी मोपेडस्वार मीरा पाटील यांनी आरडाओरडा केला. काही तरुणांनी त्यांना बाजूला काढले. रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने रिक्षाचालक सुनील लवटे जखमी झाले. यानंतर काही तरुणांनी केएमटी बसचालकाला शिवीगाळ करीत केबीनबाहेर ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. येथे तैनात असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी गुलाब मुल्लाणी यांनी तरुणांच्या तावडीतून सोडविले. यानंतर केएमटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बंद पडलेली केएमटी दुरूस्त करुन मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी जखमींना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. तर चालक ओतारी याला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणले.

\Bचौक ठरतोय ब्लॅक स्पॉट

\B२४ मे, २०१७ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता एसटीच्या स्टेअरिंग रॉड तुटल्याने हुपरीकडे जाणाऱ्या एसटीने दिलेल्या धडकेत दोन ठार आणि ९ जण जखमी झाले होते. यामध्ये १२ वाहनांचे नुकसान झाले होते. २०१८ मध्ये एका एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला होता. उमा टॉकीज चौकात होत असलेल्या अपघतांच्या मालिकांमुळे चौक ब्लॅक स्पॉट ठरत असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज शोकसभा

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश हिंदुराव देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय शोकसभा होणार आहे. महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये होणाऱ्या शोकसभेस महापौर माधवी गवंडी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शहरातील सर्व कामगार संघटना, राजकीय पक्ष तसेच महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर गवंडी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः प्रसिद्ध उद्योगपती राम मेनन यांचे निधन

$
0
0

कोल्हापूरः

ज्येष्ठ उद्योगपती राम मेनन यांचे बुधवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. प्रसिद्ध मेनन ग्रुपच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.

मेनन यांच्या निधनाचे वृत्त समजताज उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मेनन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मेनन यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. दुपारी २.३० वाजता मेनन यांची अंत्ययात्रा निघणार असून, अंत्यविधी कसबा बावडा येथील पंचगंगा घाटावर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिवीर नागनाथअण्णा यांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी यांचे निधन

$
0
0

इस्लामपूर

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पत्नी श्रीमती कुसुमताई नायकवडी यांचे बुधवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. त्यांना मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्या ८८ वर्षाच्या होत्या.

गुरुवारी (ता. १८) सकाळी वाळव्याच्या हुतात्मा किसन अहिर विद्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी १२.३० वाजता हुतात्मा विद्यालयापासून साखर शाळेच्या प्रांगणातील नागनाथअण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळापर्यंत अंत्ययात्रा निघेल. दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुईंज, आनेवाडीत जल्लोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेरगिरीच्या खोट्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. स्थगितीचा निकाल येताच जावली तालुक्यातील आणेवाडी आणि भुईंज येथे पेढे, साखर वाटून, फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. ४९ वर्षीय जाधव भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असून, सातारा जिल्ह्यातील आनेवाडी गावचे सुपुत्र आहेत. बुधवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानने ठोठावलेल्या शिक्षेस स्थगिती दिल्याची माहिती मिळताच आनेवाडी ग्रामस्थांनी आनेवाडी फाट्यावर फटाक्यांची आतषबाजी करीत साखर वाटप केले. 'भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबद'च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आनेवाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात मेडिकल कॉलेजसुरू करण्यासाठी मान्यता

$
0
0

साताऱ्यात मेडिकल कॉलेज

सुरू करण्यासाठी मान्यता

सातारा :

साताऱ्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी तीन वर्षांकरिता क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय हस्तांतर करण्याच्या निर्णयाला सरकारने मान्यता दिली आहे. या संदर्भातील सरकारी अध्यादेश १५ जुलै २०१९ रोजी जाहीर करण्यात आला आहे. मेडिकल कॉलेजच्या कामाला सरकारी स्तरावर हालचाली सुरू झाल्याने त्या बद्दल सर्वस्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

तीनशे खाटांचे रुग्णालय आवश्‍यक सुविधांसह उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील सातारा जिल्हा रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास तीन वर्षांसाठी हस्तांतरित करण्याच्या आदेशाला राज्य सरकारने हिरवा कंदिल दिला आहे.

जिल्हा रुग्णालय हस्तांतरणाच्या तब्बल २३ अटी घालण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा आदेश पारित झाल्यानंतर औषधी द्रव्य विभाग व सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाची तातडीची बैठक मुंबईत पार पडली. वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात सार्वजनिक आरोग्य व द्रव्य औषधी विभागाचे अवर सचिव व जिल्हा शल्यचिकित्सक सातारा, नोडल ऑफिसर व वैद्यकीय अधिष्ठाता मेडिकल कॉलेज यांची मॅरेथॉन बैठक झाली.

.........

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सातारा :

रहिमतपूर परिसरातील एका गावात इयत्ता दहावीत शिकत असणाऱ्या चौदा वर्षांय अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका युवकाने विनयभंग केल्याची फिर्याद संबंधित मुलीच्या आईने रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. १६ जुलै रोजी दुपारी दोन वाजता संबंधित मुलगी शाळेतून जेवण करण्यासाठी घरी येत असताना संबंधित युवकने तिचा पाठलाग केला. पुन्हा शाळेत जाताना तो पाठलाग करताना आढळून आला. मुलीच्या आईने त्याला जाब विचारला असता, तो तेथून पळून गेला. काही दिवसांपासून शाळेत जाता- येता वारंवार आपल्या मुलीचा वाईट हेतूने पाठलाग करीत, लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या त्या युवकाविरूद्ध अखेर मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

...........

जिल्हा परिषदेच्या 2019-20 आर्थिक वर्षासाठी 100 कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी.

जिल्हा परिषदेच्या 2019-20 आर्थिक वर्षासाठी 100 कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्पात मोठी वाढ झाली आहे. अर्थसंकल्पाच्या वाढीसाठी आवश्‍यक उत्पन्नामध्ये अनुदानावरील व्याज ही बाब केंद्रस्थानी राहिली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पामध्ये बांधकाम विभागासाठी सर्वाधिक 25 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन छ. शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्हा परिदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. 2019-20 च्या अर्थसंकल्पामध्ये अनुदान, कर, इमारती भाडे आणि ठेवीवरील व्याजाच्या माध्यमातून 101 कोटी 25 लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित ठेवण्यात आले आहे.

त्यापैकी 99 कोटी 88 लाख 90 हजार रूपये खर्चाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक तरतूद बांधकामसाठी 25 कोटी 65 लाख, सदस्यांच्या मानधनासाठी 87 लाख 40 हजार, सामान्य प्रशासनसाठी 23 लाख, शिक्षणसाठी नऊ कोटी 25 लाख, लघुपाटबंधारेसाठी सहा कोटी 25 लाख, आरोग्यसाठी दहा कोटी, कृषीसाठी पाच कोटी 80 लाख, समाजकल्याणसाठी पाच कोटी 94 लाख, महिला व बालविकाससाठी दोन कोटी 53 लाख, अपंग कल्याणसाठी दोन कोटी 55 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध विभागांसाठी करण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी व सदस्यांना सेस फंडाचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

दरम्यान, यंदा अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या वाढीचे सदस्यांनी स्वागत केले. तर प्रदीप विधाते यांनी कटगुण (ता. खटाव) येथे साजऱ्या होणाऱ्या महात्मा फुले जयंती महोत्सवासाठी निधीची तरतूद वाढविण्याची मागणी केली. महिला व बालकल्याण विभागातून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा कितपत लाभ मिळतो, याची पाहणी करणे आवश्‍यक असल्याची मागणी सुरेंद्र गुदगे यांनी केली.

============================

जि.प.अध्यक्ष निवासस्थान परिसरात होणार कॉम्प्लेक्‍स.

सातारा - जिल्हा परिषद मालकीच्या जागेतून उत्पन्न सुरू होण्याचा मार्ग मोकळा होत आहे. त्या मार्गाची सुरुवात खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानापासून होणार आहे. निवासस्थान परिसरात तीन मजली व्यावसायिक इमारत उभारण्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण व उत्तर विभागातील काम पेपरलेस करण्याच्या दृष्टीने सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून आता अंदाजपत्रकाच्या मंजुरीपासून ते कंत्राटदाराला बिले जमा करण्याचे काम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही विषयांचे प्रोजेक्‍टरव्दारे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर सदस्यांच्या शंका व प्रश्‍नांची उत्तरे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर दोन्ही विषयांना मंजुरी देण्यात आली. सातारा-कोरेगाव मार्गावरील विसावानाका परिसरातील 10 हजार 400 चौ.मी. क्षेत्रात जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान आहे. त्यापैकी 415 चौ.मी.जागेत निवासस्थान आहे तर उर्वरित 9 हजार 985 चौ.मी.जागेचा परिसर रिकामा आहे.परिसरात व्यावसायिक इमारत उभारण्यासाठी वास्तूविशारदाची नेमणूक दि. 14 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आली होती. वास्तूविशारदांनी तयार केलेल्या तीन मजली इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आले. आराखड्यानुसार दोन फेजमध्ये इमारत तयार होणार आहे. एका फेजमध्ये तीन मजल्यांवर प्रत्येकी 37 प्रमाणे 111 गाळे बांधण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या फेजमधील इमारतीमध्ये देखील तीन मजले असून त्यामध्ये प्रत्येकी 31 प्रमाणे 93 गाळे बांधण्यात येणार आहेत.

एकूण 204 गाळ्यांच्या बांधकामसाठी 24 कोटी 26 लाख 33 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. सर्व गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून प्रति चौरसफुटासाठी 2 हजार रूपये प्रमाणे अनामत रक्कम जमा करून घेण्यात येणार असून त्याची संख्या 15 कोटी 92 लाख 558 रूपये इतकी होत आहे. एकूण 79 हजार 627 चौरस फुट जागेचे भाडे शासकीय दरानुसार प्रति चौरस फुट 112 रूपये प्रमाणे प्रति महिना उत्पन्न मिळणार आहे. सद्यःस्थितीत संपूर्ण कामासाठी 24 कोटी 26 लाख 33 हजार रूपये खर्च होणार आहे. त्यासाठी जिल्हापरिषदेच्या अंदाजपत्रकात तूर्त 5 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

=======================

पुणे-बेंगलोर महामार्गावर दुचाकी घसरुन दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

पुणे-बेंगलोर महामार्गावर दुचाकी घसरुन दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांची मृत्यू झाला आहे. अशोक दत्ताराम गावकर (वय 50, रा. कोळीवाडी, मुंबई) व आनंद दिवाकृष्ण जाधव महाराज (वय 42, रा. प्रभादेवी, मुंबई) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, अशोक गावकर आणि आनंद जाधव हे गुरुपौर्णिमेसाठी कराडला जाण्यासाठी रात्री दहा वाजता मुंबईहून दुचाकीवरुन निघाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते शिरवळ गावच्या हद्दीमध्ये आले असताना त्यांची दुचाकी महामार्गावरुन घसरली आणि दुभाजकावर जाऊन आदळली.यावेळी पाठीमागून आलेल्या एका खाजगी बसचालकाने बस थांबवून तात्काळ रुग्णवाहिकेला पाचरण केले. मात्र दुचाकी चालक अशोक गावकर यांचा जागीच मृत्यू झाला तर आनंद जाधव यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद बसचालक रुमीद विनायक जाधव (रा.सारोळा जि. पुणे) यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एच. भोईटे व पोलीस हवालदार धीरज यादव हे करीत आहे.

==================

नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत

सातारा - जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी पदोन्‍नती झाली आहे. त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची नियुक्ती झाली आहे.

डॉ. शिंदे यांचा स्वच्छता दर्पण 2017, स्वच्छता सर्वेक्षण 2018, स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा हे केंद्रस्तरावरील महत्त्वाचे पुरस्कार मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा आहे.जिल्ह्यातील 137 गावांमध्ये कचरा वर्गीकरण व गांडूळ खत निर्मितीचे प्रकल्प उभारून राज्याला दिशादर्शक काम केले आहे. या प्रकल्पांना राज्यातील व राज्याबाहेरील किमान 5 हजार ग्रामपंचायत व 24 जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी भेटी दिल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडीमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र स्थापन केले.तसेच जिल्ह्यातील यात्रा स्थळ, बाजारपेठ, मोठ्या ग्रामपंचायती, पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबविली. स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्‍या टप्प्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली.

समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील वंचित वस्त्यांना 10 ते 15 वर्षांपासून विकास निधी मिळाला नव्हता, त्यांना निधी देऊन विकासकामे करण्यास यश मिळाले. शालेय मुलींना सायकल वाटप, पिण्याच्या पाण्यासाठी निधी, सातारा जिल्ह्यात ड्रोनमार्फत सर्व्हे, शाळा बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी, पुणे विभागात शिक्षणासाठी समृद्धी पर्व हा कार्यक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला.

आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेर वाशिण योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले. अर्थ विभागासह विविध विभागातील कामात सुधारणा व्हावी यासाठी वर्क अ‍ॅन्ड अकौटंट मॅनेजमेंट सिस्टिम ही प्रणाली विकसीत केली. तसेच विविध विभागात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले.

नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच बदली झाली आहे. यापूर्वी रत्नागिरी, चंद्रपूर, लातूर, वर्धा, सिडको, म्हाडा, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट या ठिकाणी विविध पदांवर काम केले आहे. डॉ. राजेश देशमुख, डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्हा परिषदेमध्ये जे उपक्रम राबवले ते उपक्रम पुढे चालूच ठेवणार आहे. पदाधिकारी व अधिकार्‍यांना बरोबर घेवून काम करणार आहे. येत्या आठवड्याभरात पदाचा कार्यभार स्वीकाणार असल्याचे त्यांनी सांगितले

====================

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुईंज, आनेवाडी फाट्यावर फटाक्यांची आतषबाजी

$
0
0

भुईंज, आनेवाडी फाट्यावर फटाक्यांची आतषबाजी

कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर जल्लोष

म. टा. वृत्तसेवा, सातारा

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेरगिरीच्या खोट्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. स्थगितीचा निकाल येताच जावली तालुक्यातील आणेवाडी आणि भुईंज येथे पेढे, साखर वाटून, फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. ४९ वर्षीय जाधव भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असून, सातारा जिल्ह्यातील आनेवाडी गावचे सुपुत्र आहेत.

बुधवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्यावरील पाकिस्तानने ठोठावलेल्या शिक्षेस स्थगिती दिल्याच्या निकालाची माहिती मिळताच आनेवाडी ग्रामस्थांनी आनेवाडी फाट्यावर फटाक्यांची आतषबाजी करीत साखर वाटप केले. 'भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबद'च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आनेवाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते. भुईंज पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

भुईंज येथेही आनंदोत्सव

कुलभूषण जाधव यांचे कुटुंब मूळचे भुईंज (ता. वाई) येथील असून, आनेवाडी (ता. जावली) येथे शेती घेऊन वास्तव्यास आहेत. भुईंज येथील ग्रामदैवत देवी महालक्ष्मीच्या दर्शनसाठी जाधव कुटुंबीय नेहमी मंदिरात येत असतात. 'आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला हा निकाल भारत मातेचा विजय असून, देशासाठी ही स्वाभिमानाची बाब आहे. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांची देवी महालक्ष्मीवर मोठी श्रद्धा होती, म्हणूनच आम्ही ग्रामस्थांच्या वतीने देवी महालक्ष्मीच्या मंदिरात सकाळपासूनच पूजा-अभिषेक घालून देवीला साकडे घातले होते,' अशी भावना भुईंज ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पा भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव यांनी व्यक्त केली़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सैन्यदलात मुलींनानोकरीच्या संधी कराड :

$
0
0

सैन्यदलात मुलींना

नोकरीच्या संधी

कराड :

'भारतीय सैन्यदलासह त्याच्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये मुलींना नोकरीच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत,' असे मत १९ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. चे येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रशांत पवार यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज आणि येथील विजय दिवस समारोह समिती यांच्या संयुक्त सहभागातून येथील स. गा. म. कॉलेजमध्ये बुधवारी आयोजित भारतीय सैन्यदल व पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये मुलींना नोकरीच्या संधी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल प्रशांत पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. आर. सावंत उपस्थित होते.

कर्नल पवार म्हणाले, 'कोणतेही ध्येय गाठण्यासाठी तळमळ आणि निश्चित ध्येय असणे आणि ते मिळवण्यासाठी मेहनत, कष्ट करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही सर्व विद्यार्थिनी नशीबवान आहात की तुम्ही एवढ्या सुसज्ज सोयीनींयुक्त महाविद्यालयात शिकता, या ठिकाणी मुलींचे एन.सी.सी आणि वुमेन्स मिलिटरी अकॅडमीचे शिक्षण दिले जाते. या संधीचे सोने करा आणि उज्वल भविष्य घडवा.'

....

वडिलांकडून अत्याचार

कराड :

पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील एका गावात घडली. मुलगी अडीच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी नराधमाचे नाव उघड करण्यास नकार दिला. संशयित उत्तर कोरेगावच्या एका गावात पत्नी व दोन मुलींसमवेत राहत असून, मोठी मुलगी (वय १५) दहावी तर दुसरी मुलगी सातवीमध्ये शिकत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ उद्योजक राम मेनन यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ उद्योजक आणि मेनन ग्रुपचे संस्थापक राम कृष्ण मेनन (वय ९०) यांचे बुधवारी (ता. १७) सकाळी वृद्धापकाळाने निधान झाले. प्रकृती खालावल्याने आठवड्यापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत …कसबा बावडा येथील स्माशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी, कदमवाडी येथील लक्ष्मीनारायण नगरातील त्यांच्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. श्रीमंत शाहू महाराज, मधुरिमाराजे छत्रपती, सतीश घाटगे, बाबाभाई वसा, प्रताप पुराणिक, अतुल आरवाडे, आदी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी राधामणी, मुले सचिन व नितीन, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १९) सकाळी आहे.

केरळमधील पण्णंगड या गावात २५ फेब्रुवारी १९३० मध्ये राम मेनन यांचा जन्म झाला. श्रीनारायणपूरम हे त्यांचे मूळ गाव. वाणिज्य शाखेतून पदवी शिक्षण घेतल्यानंतर मोठे बंधू चंद्रन मेनन यांच्यासोबत ते १९५१ मध्ये कोल्हापुरात आले. एका फाउंड्रीत कामगार म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. नावीन्याचा ध्यास असल्याने त्यांनी फाउंड्रीत अवघड उत्पादने तयार करण्यास प्राधान्य दिले. मोठे बंधू चंद्रन मेनन यांच्यासोबत त्यांनी १९५४ मध्ये मेनन अँड मेनन ग्रुपची सुरुवात केली. सिलिंडर हेड व ब्लॉक्स, पिस्टन, रिंग, बेअरिंगचे उत्पादन सुरू केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली मेनन अँड मेनन ग्रुपचा विस्तार आणि निर्यात वाढली. या ग्रुपची वार्षिक उलाढाल सध्या ७०० कोटींवर आहे, तर अडीच हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

कोल्हापूरच्या उद्योगविश्वाला मोठी स्वप्ने दाखवून ती सत्यात उतरवण्याचा मार्ग दाखवणारे राम मेनन यांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, स्मॅक, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन, राष्ट्रीय अंध कल्याण संघ यांसह केआयटी कॉलेज, दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केले. कोल्हापूर महापालिकेने त्यांना 'करवीर भूषण' पुरस्कार देऊन गौरविले आहे. शिवाय 'इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फाउंड्रीमेन', इचलकरंजी येथील 'फाय फाउंडेशन पुरस्कार' त्यांना प्रदान करण्यात आला आहे. मेनन कुटुंबीयांनी चार जुलै रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला होता.

00 00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोलीतील सांडपाणी प्रकल्पाला गती द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला गती द्या. प्रकल्पासाठी उपलब्ध पाच कोटी चार लाख रुपयांचा निधी परत जाऊ नये या पद्धतीने जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीने कामाचे नियोजन करावे, अशी सूचना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. याप्रश्नी मुंबईत बुधवारी बैठक झाली. मंत्री खोत यांनी सांडपाणी प्रकल्प प्रक्रियेच्या कामात दिरंगाई झाली तर खपवून घेणार नाही, प्रसंगी ठेकेदारावर कारवाई करू असेही अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त आहे.

आमदार अमल महाडिक व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या प्रयत्नातून जून २०१६ मध्ये ग्रामपंचायतीने रितसर ठराव करून सरकारला प्रकल्प अहवाल सादर केला. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तांतर होऊन शशिकांत खवरे सरपंच बनले. मात्र, गेल्या अडीच तीन वर्षांत महाडिक गट व खवरे या दोन्ही गटांतील कुरघोडीच्या राजकारणामुळे प्रकल्प सुरू होऊ शकला नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी मंत्री खोत यांनी मुंबईत एमजीपीचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व शिरोली ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला सरपंच खवरे, महेश यादव, महेश चव्हाण, संग्राम कदम, अविनाश कोळी, आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रकल्पासाठी आवश्यक जागा खरेदी व प्रत्यक्ष कामाला विलंब होत असल्याच्या कारणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सरपंच खवरे व ग्रामविकास अधिकारी एम. आर. पाटील यांनाकारवाई का करु नये अशी नोटीस काढली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवठा कार्यालयात एजंटगिरी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहर, ग्रामीण स्वस्त धान्य पुरवठा कार्यालयात नवीन शिधापत्रिका देण्यासाठी पैसे उकळणारी एजंटगिरी मोडून काढावी, पुरवठ्यामधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी येथील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर शिष्टमंडळाशी चर्चा करताना देसाई यांनी एजंटगिरीसह इतर बेकायदेशीर प्रकरणाची चौकशी करावी, असा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांना दिला.

खानविलकर पेट्रोल पंपापासून मोर्चाला प्रारंभ झाला. 'मनसे'चे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली. निवेदनात म्हटले आहे की, पुरवठा अधिकारी, पुरवठा हवालदार, वॉर्ड इन्स्पेक्टर यांच्याशी संगनमत करून दुकानदार राजरोसपणे स्वस्त धान्याची लूट आहेत. शिधापत्रिका काढून देण्यासाठी दलाल निर्माण झाले आहेत. त्यांना हाकलावे, पुरवठा हवालदार लोकरे, परवाना विभागाचे हेमंत पोटींडे, ऑपरेटर केतन माळी यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, जिल्हा पुरवठा कार्यालयातील खासगी दलालांची हकालपट्टी करावी.

मोर्चात राजू बागवान, बबन सावरे, किरण पोतदार, मनीष क्षीरसागर, रंजना खाडे, ज्योती सावरे, आदी सहभागी झाले होते.

००००

एजंटांवर कारवाई करा

शहर पुरवठा कार्यालयात किल्लेदार, ग्रामीण पुरवठा कार्यालयात कुरणे चार ते पाच हजार रुपये घेऊन पिवळी शिधापत्रिका देत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांना संबंधित अधिकाऱ्यांचा अशीर्वाद आहे, अशी माहिती जाधव यांनी जिल्हाधिकारी देसाई यांना सांगितले. त्याची गंभीर दखल देसाई यांनी घेतली. त्यांनी पुरवठा अधिकारी ताटे यांना शहर, ग्रामीण पुरवठा कार्यालयास अचानक भेट द्या, एजंटांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना दिल्या.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस महासंचालकांचाकोल्हापूर दौरा लांबणीवर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांचा बुधवारपासून सुरू होणारा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा लांबणीवर पडला आहे. ते कोल्हापूर पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी कोल्हापुरात येणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील बैठकीला जायसवाल उपस्थित राहणार असून, दिल्ली येथील बैठकीसाठी जाणार असल्याने त्यांचा दौरा लांबणीवर पडल्याचे समजते.

पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जायसवाल पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने पोलिस दलाने जय्यत तयारी केली होती. पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. पोलिस ठाण्यांतर्गत कामकाजाचे महासंचालक स्वत: मूल्यांकन करणार असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील रेकॉर्ड अद्ययावत करण्यासह प्रलंबित गुन्ह्यांची उकल करण्यासाठी प्रयत्न केले होते. अंबाबाईच्या दर्शनानंतर ते जुना राजवाडा पोलिस ठाण्याला भेट देणार होते. त्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली होती. बुधवारी सकाळी पोलिस महासंचालक कार्यालयातून जायसवाल यांचा दौरा काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. ते ऑगस्टमध्ये दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक देशमुख यांनी दिली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमताई नायकवडी यांचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

पद्मभूषण, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पत्नी श्रीमती कुसुमताई नायकवडी (वय ८८) यांचे बुधवारी रात्री उपचार सुरू असताना निधन झाले. सोमवारी, नागनाथअण्णांच्या ९७ व्या जयंती दिवशी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने वाळव्यासह परिसरातील गावांच्यावर शोककळा पसरली.

क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सर्व चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. अण्णांच्या प्रत्येक आंदोलनात त्या सहभागी होत्या. त्यांचा जन्म ९ एप्रिल १९३२ चा. आण्णांच्या सोबत १३ फेब्रुवारी १९४९ रोजी कोल्हापुरात साध्या पद्धतीने त्यांचा विवाह झाला होता. अण्णा भूमिगत असताना अनेकदा पोलिसांचे छापे त्यांच्या घरावर पडले. त्यावेळी न डगमगता क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या साथीने त्या संघर्ष करत राहिल्या. नागनाथआण्णा नायकवडी यांनी १९५२ ला पहिली विधानसभा लढविली. त्यावेळीच्या प्रचारात त्या हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. अण्णांच्या आग्रहावरूनच लग्नानंतरही त्यांनी शिक्षण घेतले. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा म्हणून त्यांनी हुतात्मा विद्यालयात नोकरी पत्करली. त्या विद्यालयात मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी २६ वर्षे जबाबदारी सांभाळली. त्यांना कै. व्दारकाबाई हरी पवार, गोदावरी हरी बियाणी आदर्शमाता पुरस्कार, कै. बयाबाई श्रीपती कदम आदर्शमाता पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. हुतात्मा संकुलातील प्रत्येक संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. अतिशय ओघवती वक्तृत्व शैली असल्याने हुतात्मा संकुलातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे मार्गदर्शन होत असे.

त्यांच्या पश्चात हुतात्मा बॅंकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी हे दोन मुलगे व विशाखा कदम, प्रगती पाटील या दोन विवाहित मुली, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती डॉ. सुषमा नायकवडी, हुतात्मा बाजारच्या कार्यवाहक नंदिनी नायकवडी या सुना तर हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी हे नातू असा परिवार आहे.

त्यांच्यावर गुरुवारी दुपारी दोन नंतर नागनाथआण्णांच्या समाधीस्थळीशेजारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुवारी सकाळी आठ ते नऊ दरम्यान त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी त्यानंतर नऊ ते बारा हुतात्मा विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी बारा ते दोन यावेळेत अंत्ययात्रा व दोन नंतर अंत्यविधी केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी असूनही रस्ता ‘खड्ड्यात’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : कोल्हापूर -सांगली रस्त्यावरील जिवघेणे खड्डे बुजवण्यासह विविध कामांना उन्हाळ्यात सरकारमान्य कंपन्यांकडून डांबराचा पुरवठा झाला नाही. परिणामी २० कोटींचा निधी मंजूर होऊनही या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम रेंगाळले. याची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. आठवड्यापूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून कामाच्या दिरंगाईबद्दल जाब विचारला. मात्र, आता वेळ निघून गेल्याने रस्ता 'खड्ड्यात'च आहे. त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अपघातांची मालिका कायम आहे.

कोल्हापूर-सांगली रस्त्याचे दुपदरी, चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच ठेकेदार असलेल्या सुप्रिम कंपनीने टोलविरोधी आंदोलनाच्या शक्यतेने गाशा गुंडाळला. त्यामुळे रस्त्याचे काम अपूर्ण राहिले. रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा रस्ता वर्ग करण्यात आला. मात्र 'सुप्रिम' कंपनीने केलेल्या कामांच्या बिलांसाठी न्यायालयात दावा दाखल केल्याने रस्त्याचे हस्तांतरण लटकले. त्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची देखभाल, दुरूस्ती करत आहे.

गेल्या चार-पाच महिन्यांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अवजड वाहनांमुळे काही ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग दबला गेला आहे. या कामांसाठी २० कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

पुण्याच्या कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मंजूर निधीच्या १३.१३ टक्के कमी दराने म्हणजे १५ कोटी २७ लाख रुपयांत काम करण्याची तयारी दाखवली. त्यांना २६ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचा आदेश देण्यात आला. काम गतीने सुरू केल्यानंतर मार्च, एप्रिल-मे महिन्यांत आवश्यक त्या प्रमाणात सरकारमान्य आयओसी, एचपीसीएल, बीपीसीएल कंपन्यांकडून डांबर पुरवठाच झाला नाही. काम रेंगाळल्याने केवळ ३० टक्के म्हणजे ५ कोटी ९८ लाखांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ७० टक्के कामे अपूर्ण आहेत. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ प्रचंड आहे. पावसाने खड्ड्यांची संख्याही वाढली. ठेकेदार पावसाळी डांबराने खड्डे भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ती केवळ मलमपट्टी ठरत आहे.

चौकट

प्रमुख कोणती कामे ?

जयसिंगपूरमार्गे बसवान खिंड ते अंकली रस्त्यावर सीलकोट करणे, कठिण मुरुमाने बाजूपट्या तयार करणे, मोऱ्यांचे रुंदीकरण करणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे, वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी स्पीडब्रेकर तयार करणे, दिशादर्शक फलक लावणे ही कामे अपेक्षीत आहेत. अंकली ते सांगलीपर्यंचा रस्ता काही ठिकाणी रुंद करणे, सील कोट करणे, सूचना फलक लावणे याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी गटर खोदाई, रेडीयम कागद लावणे, दानोळीजवळ खचलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण, जैनापूरजवळ १२ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण ही कामे यात केली जाणार आहेत.

कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम आणि इतर कामांसाठी वेळेत डांबर मिळू शकले नाही. त्यामुळे काम अपेक्षित गतीने झाले नाही. सध्या ठेकेदार पावसाळी डांबराने खड्डे भरत आहे. पाऊस कमी झाल्यानंतर खराब रस्त्याच्या भागाची बांधणी करण्यात येईल. काम पूर्ण करण्यास २४ महिन्यांचा कालावधी आहे. मात्र वाहनांची वर्दळ अधिक असल्याने शक्य तितक्या लवकर रस्ता दुरुस्तीची सूचना कंपनीला केली आहे.

- संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

कोल्हापूर - सांगली दृष्टिक्षेपातील रस्ता

ऑक्टोबर २०१२

मूळ कामाला मंजुरी

५२.६१

एकूण रस्ता (किमी)

१९६ कोटी ५ लाख

प्रकल्प खर्च

मे २०१६

राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे वर्ग

२० कोटी

खड्डे भरणे, इतर कामासाठी निधी

१५ कोटी २७ लाख

ठेकेदाराने घेतलेल्या कामांची रक्कम

००००००००००

(मूळ कॉपी)

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : कोल्हापूर - सांगली रस्त्यावरील जिवघेणी खड्डे बुजवण्यासह विविध कामांसाठी उन्हाळ्यात सरकारमान्य कंपन्यांकडून डांबराचा पुरवठा झाला नाही. परिणामी २० कोटींचा निधी मंजूर होऊनही खड्डे भरण्याचे काम रेंगाळले. त्याची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. त्यांनी आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना धारेवर धरून कामाच्या दिरंगाईबद्दल जाब विचारला. मात्र वेळ निघून गेल्याने रस्ताच खड्ड्यात गेला आहे. त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अपघाताची मालिका कायम आहे.

कोल्हापूर - सांगली रस्त्याचे दुपदरी, चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच ठेकेदार सुप्रिम कंपनीने टोल विरोधी आंदोलनामुळे गाशा गुंडाळला. यामुळे रस्ता अपूर्ण राहिला. देखभाल दुरूस्तीचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाला. मात्र सुप्रिम कंपनीने केलेल्या कामांच्या बिलांसाठी न्यायालयात गेल्याने रस्ता हस्तांतर लटकले. त्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग देखभाल, दुरूस्ती करत आहे. गेल्या चार, पाच महिन्यांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अवजड वाहनांमुळे काही ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग दबला आहे. या कामांसाठी २० कोटी मंजूर झाल्यानंतर निविदा प्रसिध्द करण्यात आली.

पुण्याच्या कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मंजूरी निधीच्या १३.१३ टक्के कमीने म्हणजे १५ कोटी २७ लाखांत काम करण्याची तयारी दाखवली. त्यास २६ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचा आदेश देण्यात आला. काम गतीने सुरू केल्यानंतर मार्च, एप्रिल, मे महिन्यांत आवश्यक त्या प्रमाणात सरकारमान्य आयओसी, एचपीसीएल, बीपीसीएल कंपन्यांकडून डांबर पुरवठा झाला नाही. काम रेंगाळल्याने केवळ ३० टक्के म्हणजे ५ कोटी ९८ लाखांचे काम पूर्ण झाले आहे. ७० टक्के कामे अपूर्ण आहेत. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ प्रचंड आहे. पावसाने खड्यांची संख्याही वाढली. ठेकेदार पावसाळी डांबराने खड्डे भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ती केवळ मलमपट्टी ठरत आहे.

--------

चौकट

प्रमुख कोणती कामे ?

जयसिंगपूर मार्गेच्या बसवान खिंड ते अंकली रस्त्यावर सीलकोट करणे, बाजू पट्या कठिण मुरूमणे तयार करणे, मोऱ्यांचे रूंदीकरण करणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे, वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार करणे, दिशा दर्शक फलक लावण्यात येणार आहे. अंकली ते सांगलीपर्यंच्या रस्ता काही ठिकाणी रूंदी करणे, सील कोट करणे, सूचना फलक लावण्यात येईल. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी गटर खोदाई करणे, रेडीयम कागद लावणे, दानोळीजवळ खचलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे, जैनापूरजवळ १२ किलोमीटर रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येईल.

----------

कोल्हापूर - सांगली रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम आणि इतर कामांसाठी डांबर मिळू शकले नाही. काम अपेक्षित गतीने झाले नाही. सध्या ठेकेदार पावसाळी डांबराने खड्डे भरत आहे. पाऊस कमी झाल्यानंतर खराब रस्ता भागाची बांधणी करण्यात येईल. काम पूर्ण करण्यास २४ महिन्याचा कालावधी आहे. मात्र वाहनांची वर्दळ अधिक असल्याने शक्य तितक्या लवकर रस्ता दुरूस्तीचे काम करण्याची सूचना ठेकेदार कंपनीस दिले आहे.

संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

--------------------

कोल्हापूर - सांगली दृष्टिक्षेपातील रस्ता

ऑक्टोबर २०१२

मूळ कामाला मंजुरी

५२.६१

एकूण रस्ता (किमी)

१९६ कोटी ५ लाख

रस्ता प्रकल्प खर्च

मे २०१६

राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे वर्ग

२० कोटी

खड्डे भरणे व इतर कामासाठी मंजूर निधी

१५ कोटी २७ लाख

ठेकेदाराने घेतलेल्या कामांची रक्कम

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण हटाओ सुरुच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल येथून पथकाने दोन अनधिकृत केबिन हटवल्या. दरम्यान सोमवारी (ता. २२) खासगाब मैदान येथील खाऊ गल्लीतील अनधिकृत केबिन हटवण्यात येणार आहेत. त्यासाठी बुधवारी पथकाने परिसराची पाहणी केली.

मंगळवारपासून अतिक्रमण विभागाने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली आहे. कारवाई धडाक्यात नसली, तरी रहदारीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या व अनधिकृत केबिन ताब्यात घेतल्या जात आहेत. बुधवारी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, मिरजकर तिकटी, देवल क्लब येथे मोहीम राबवली. पथकाने आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल परिसरातून दोन अनधिकृत केबिन ताब्यात घेतल्या. तर अन्य ठिकाणी फूटपाथवरील फेरीवाल्यांना हटवण्यात आले. दरम्यान, सोमवारी खासगाब मैदान येथील खाऊ गल्लीमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार आहे. खाऊ गल्लीमध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी येथे अनधिकृत केबिनधारकांची संख्या प्रचंड वाढली आहे. येथील अनधिकृत केबिन हटवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ उत्पादनासाठी हवे सुसूत्र मॉडेल

$
0
0

udaysing.patil@timesgroup.com

Tweet@:udaysingpatilMT

कोल्हापूर : उसाच्या विविध जाती आणि जमीन, पाणी देण्याचे प्रकारही वेगवेगळे. त्यामुळे रस उकळण्यासाठीचे तापमानही वेगळे आहे. अशा विविधतेतून निर्माण होणाऱ्या गुळासाठी जीआय मानांकनाचे सर्टिफिकेशन होण्यासाठी प्रथम उत्पादन पद्धतीचे मॉडेल शेतकऱ्यांसमोर ठेवण्याचे मोठे आव्हान बाजार समिती, पणन मंडळासमोर आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागणार आहे. यासाठी सरकारच्या मदतीसह बाजार समिती, पणन मंडळाचा पुढाकार आवश्यक आहे.

गुळाला जीआय मानांकन मिळाल्यानंतर त्याचे सर्टिफिकेशन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यानुसार गूळ उत्पादन करण्याची आवश्यकता आहे. ते सर्टिफिकेट मिळवायचे असल्यास जीआय मानांकनाप्रमाणे गूळ उत्पादन करण्यासाठीची पद्धत रुढ व्हायला हवी. बाजार समितीने केवळ कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना जीआयची माहिती दिली. पण कोणत्या पद्धतीने गूळ तयार केला पाहिजे हे सांगितलेच नाही. उसाच्या विविध जाती आहेत. त्यांचा रस उकळवण्यासाठी वेगवेगळे तापमान लागते. तसेच तो ऊस कोणत्या जमिनीत तयार झाला. त्याकरिता कशा पद्धतीने पाणी, खते वापरली गेली यावरही तयार होणाऱ्या गुळाची चव ठरते. या घटकांबरोबर गुळव्या, चुलवाणवाला व रसातील मळी काढणाऱ्या व्यक्ती यांचाही सहभाग महत्वाचा असतो. त्यामुळे विविध भागांत तयार होणारा गूळ वेगळा ठरतो. जीआयचे सर्टिफिकेशन घेण्यासाठी एकसारखा गूळ आवश्यक आहे. याकरिता स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागणार आहे.

विविध ठिकाणच्या तोडलेल्या उसापासून तयार होणारा गूळ जीआय मानांकनाच्या निकषांमध्ये बसत नाही. उत्पादन पद्धती निश्चित झाल्यानंतर हे निकष पाळणे व त्यानुसार त्या-त्या भागातील गुळाची तपासणी करणे शक्य होईल. त्यासाठी प्रथम मॉडेल तयार करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. बाजार समितीच्या माध्यमातून गूळ खरेदी-विक्रीचे बहुतांश व्यवहार होत असल्याने त्यांनाच सरकारकडून सहाय्य घेऊन त्यासाठीची यंत्रणा उभी करावी लागणार आहे.

यासंदर्भात शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव म्हणाले, 'एकाच प्रकारचा गूळ उत्पादन करायचा असेल तर त्यासाठी समान पद्धती अवलंबण्याची आवश्यकता आहे. उसाच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत देखरेख करणारी यंत्रणा विकसीत केली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून विशिष्ट पद्धतीच्या, जमिनीच्या तसेच वेगवेगळ्या पाणी दिलेल्या उसापासून गूळ तयार करण्यासाठीची विविध मॉडेल्स बनवली पाहिजे. त्या मॉडेलनुसार शेतकऱ्यांनी गूळ उत्पादन करावे असे सांगितले तर शेतकरी निश्चितच त्याचा वापर करतील. त्यासाठी बाजार समिती व पणन मंडळानेच पुढाकार घेऊन सरकारच्या माध्यमातून यंत्रणा उभी केली तर मॉडेल बनवणे सहज शक्य होईल.'

गुळाचा हमीभाव कुठे आहे?

सरकारच्या तारण योजनेत गुळाचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गूळ उत्पादकांना योग्य दर मिळू शकेल. यासाठी सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. जीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दराचा लाभ मिळवण्यासाठी बराच कालावधी घालवावा लागणार आहे. त्यापूर्वी जर सरकारने तारण योजनेत गुळाचा समावेश केला तर चांगले दर असतील त्यावेळी गुळाची विक्री करुन शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होईल असे गूळ उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एकाच प्रतिचा गूळ तयार करण्यासाठी ऊसाच्या जाती, पिकाची पाणी पद्धती लक्षात घेऊन विविध मॉडेल्स विकसित केली पाहिजेत. त्या मॉडेल्सनुसार शेतकऱ्यांनी गूळ उत्पादन केला तर त्याद्वारे जीआय मानांकनाचा वापर करणे शक्य आहे. यासाठी शासन स्तरावरच प्रयत्न हवेत.

- डॉ. ए. एम. गुरव, समन्वयक

कौशल्य विकास केंद्र, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगर रस्त्याशेजारीनवी २० अवैध बांधकामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराला जोडणाऱ्या मुडशिंगी, चिंचवाड, गांधीनगर जिल्हा रस्त्याच्या मध्यापासून ४७ मीटर अंतरातील अवैध बांधकामांची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी केली. प्रथमदर्शनी त्यांना गांधीनगर, चिंचवाड या पाच किलोमीटर रस्त्यावर अवैधपणे नव्याने २० बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांना शुक्रवारी 'बांधकामे जैसे थे ठेवावीत, का पाडण्यात येऊ नये,' अशा आशयाची पत्रे देण्यात येणार आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर बांधकामे पाडण्यासाठी स्थळ पाहणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली होती. त्यानुसार अभियंता सोनवणे, उपअभियंता चतुर भोसले, धनंजय जाधव यांनी दुपारी भेट दिली. त्यांनी गांधीनगर ते चिंचवाडपर्यंत रस्त्याशेजारील बांधकामांची पाहणी केली. त्यामध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून २० पेक्षा अधिक बांधकाम केले जात असल्याचे दिसून आले. या संबंधित मिळकतदारांची नावे घेऊन त्यांना पहिल्यांदा नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर व्हिडिओ शुटिंग, फोटो काढण्यात येईल. पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यास ती अवैध बांधकामे पाडण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने महाराट्र टाइम्सशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज प्रारंभ

$
0
0

कोल्हापूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत गडहिंग्लज येथे साकारलेल्या २.४२ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१९) प्रारंभ होत आहे. गडहिंग्लज, हलकर्णी व शिनोळी येथील वीज उपकेंद्राच्या मोकळ्या जागेत लघू सौरऊर्जा प्रकल्प साकारले आहेत. या तिन्ही सौर प्रकल्पांचा एकत्रित प्रारंभ सकाळी ११ वाजता होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायकोर्टाने बदली प्रकरणातील शिक्षकांना मूळ ठिकाणी नियुक्ती करावी, असा आदेश जिल्हा परिषदेला दिला होता. मात्र प्रशासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, ही बाब कोर्टाची अवमान करणारी आहे. येत्या सात दिवसांत प्रशासनाने हायकोर्टाच्या आदेशानुसार निर्णय घेतला नाही तर राज्यसरकारसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, अशी नोटीस दिल्याची माहिती याचिकाकर्ते शिक्षकांचे वकील डी. एन. कुलकर्णी यांनी दिली.

गेल्या वर्षी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या होत्या. बदलीसाठी १५८ शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीचे ठिकाण मिळवले अशा तक्रारी झाल्या. प्रशासनाने संबंधित शिक्षकांना नोटिसा काढून म्हणणे ऐकून घेतले. त्यामध्ये ११८ शिक्षकांनी बदलीसाठी खोटी माहिती भरल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

सीईओ मित्तल यांनी संबंधित शिक्षकांच्या सुनावणी घेऊन त्यांची अन्यत्र बदली व कायमस्वरुपी एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. या कारवाईच्या विरोधात ७३ शिक्षकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. याप्रश्नी हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या. नऊ जुलै रोजीच्या सुनावणीप्रसंगी कोर्टाने, संबंधित शिक्षकांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा व आयुक्तांनी चार आठवड्यात निर्णय घेण्याविषयी सूचित केले होते. दरम्यान याचिकाकर्ते शिक्षकांतर्फे जिल्हा परिषदेला दिलेल्या नोटीसीत 'बदली प्रकरणात शिक्षकांची बदनामी झाली आहे. प्रशासनाने, विभागीय आयुक्त त्या शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात निर्णय घेईपर्यंत त्यांची मूळ ठिकाणी नियुक्ती करावी, असे हायकोर्टाने म्हटले होते, मात्र प्रशासनाने त्याचे पालन केलेले नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images