Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्मार्ट कार्ड सक्ती रद्द करा

$
0
0

कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी बस सवलत योजनेसाठी स्मार्ट कार्डची सक्ती रद्द करावी, या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बस तिकीट सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डची सक्ती केली आहे. यासाठी ३०० रुपये घेतले जातात. कार्डवर सवलतीमध्ये केवळ ४००० कि.मी.चा प्रवास करावा लागणार आहे. यामुळे किलोमीटरची अट रद्द करावी, ज्येष्ठ महिलांना बस प्रवास मोफत करावा. निवेदन देताना संदीप देसाई, उत्तम पाटील, इलाही शेख, डॉ. सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यानात सांडपाण्यामुळे दलदल, दुर्गंधी

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराबाई पार्कातील महाराष्ट्र उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी अनेक हात एकवटले. वृक्षारोपण, सेंद्रीय खत निर्मितीतून उद्यानाचा कायापालट करण्याचा प्रयत्न झाला. श्रमदानातून उद्यानाचे रुपडे पालटत असताना महापालिकेच्या गलथान कारभारांचा फटका बसला आहे. उतारावरुन आलेले सांडपाणी थेट उद्यानात आल्याने येथे प्रचंड दलदल निर्माण झाली. तसेच गटारीतून ओव्हर फ्लो झालेले पाणी परिसरातील दोन बंगल्यांच्या आवारात घुसून निर्माण झालेल्या दलदलीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महाराष्ट्र उद्यानातून मोठे गटर जाते. सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटर्स दोन्ही बाजूंनी बंदिस्त करत शहरातील काही सामाजिक संस्थांनी उद्यानाचे सुशोभिकरण केले. उद्यानात वृक्षारोपण, सेंद्रीय खत असे उपाय करुन उद्यानाला नवसंजीवनी दिली. त्यामुळे परिसरासह कॉलेजीयन्स येथे विरंगुळासाठी दररोज येत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून उद्यानात सांडपाण्याचा फ्लो वाढल्याने पाणी उद्यानात घुसले आहे. उद्यानाच्या पश्चिमकडील बाजूला मोठ्या डबक्यात पाणी साचले आहे. तसेच हे पाणी गटारीतून बाहेर येत दोन बंगल्यांच्या परिसरात घुसले आहे.

दोन वर्षांपूर्वी उद्यानातून येणारे पाणी बाजुच्या गटारीमध्ये सोडण्यासाठी मोठा नळ टाकला. पण गटारीसह नळामध्ये प्लास्टिकसह अन्य कचरा अडकून पडल्याने येथील रस्त्यावरून पाणी वाहत आहे. गॅस गोडावून पासून सांडपाणी थेट सीताराम बंगल्याच्या परिसरात गेले असून येथे प्रचंड दलदल निर्माण झाली आहे. शहरात साथीच्या आजारासह डेंगीची साथ असताना येथे डासांच्या उत्पत्तींसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सायंकाळच्यावेळी परिसरातील नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास डेंगीच्या रुग्णामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता बाझार चौकात पाइपमध्ये प्लास्टिकचा खच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दरवर्षीच्या पावसाळ्यात राजारामपुरी जनता बाझार चौकात पाणी साचून राहते. गटर्स् व नळ्यातील रस्त्यावर आलेल्या सांडपाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते. पण गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून पाइप व गटारी प्रवाहित केल्या. पाइपमधून प्लास्टिक, लोखंडी पत्रा, खराब पोती बाहेर काढल्यानंतर पाणी प्रवाहित झाले.

व्ही. टी. पाटील सभागृहाकडून येणाऱ्या गटराची पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने जनता बाझार चौकात पाणी साचून राहिले होते. साचलेले पाणी खाऊ गल्लीपर्यंत पोहोचले होते. गेल्या तीन दिवसांपासून नळ्यातील घाण काढण्याचे काम सुरू होते. गुरुवारी मोठा सिमेंटचा गठ्ठा बाहेर काढल्यानंतर शनिवारी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाहेर काढण्यात आले. नळातील कचार बाहेर काढताना आरोग्य कर्मचाऱ्यांची अक्षरश: दमछाक झाली. नळा प्रवाहीत झाल्यानंतर चौकातील पाणी कमी झाले. नागरिकांना आवाहन करूनही प्लास्टिक कचरा गटारी अथवा कोंडाळ्यात टाकला जातो. कचरा विलगीकरण हे प्रशासनाचेच काम असल्याचा समज झाल्याने नागरिकांकडून असे कृत होत असल्याने पावसाळ्यात गटारी, पाइप तुंबण्याचे प्रकार घडतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज वाहिन्यांची दुरुस्ती

$
0
0

कोल्हापूर: नागाळा पार्कातून अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या विद्युत वाहिनीत शनिवारी सकाळी बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जयंती नाल्यात उतरून काम करावे लागले. महावितरणचे जनमित्र दोरखंड बांधून जयंती नाल्यात उतरले आणि रुतलेल्या वाहिनीला वर काढले. यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. भूमिगीत असलेल्या भवानी मंडप एक्सप्रेस वाहिनीद्वारे सीपीआर, जुने कोर्ट, करवीर तहसील कार्यालय, करवीर पोलिस ठाणे, बीएसएनएल कार्यालय, अंबाबाई मंदिर व गुजरी परिसरात वीज पुरवठा केला जातो. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाहिनीत बिघाड झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी विद्यार्थी सरसावले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेने सलग बाराव्या रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत शहर स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील शिस्तीचे दर्शनही घडविले. शहाजी आणि कमला कॉलेज कॅम्पसमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पाच डंपर कचरा संकलीत करण्यात आला.

जयंती नाला संप व पंप हाउस येथे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेची विद्यार्थी व उपस्थितींना शपथ देऊन मोहिमेला सुरुवात केली. रविवारच्या स्वच्छता मोहिमेमध्ये एनसीसी व एनएसएस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहाजी कॉलेजच्या कॅम्पसची स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले. कमला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राजारामपुरी परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर कॉलेज कॅम्पसमध्ये वृक्षारोपण केले. स्वच्छता मोहिमेत १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विल्सन पूल लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व रिलायन्स मॉल पिछाडीस आणि रंकाळा तलावाच्या दोन्ही बाजूला स्वच्छता करून वृक्षारोपण केले. पाच डंपर कचरा गोळा करुन सरवळीमध्ये टाकण्यात आला. उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, केएमसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश गवळी, शहाजी कॉलेजचे प्राचार्य आर. के. शानेदिवाण, कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, अनिल घस्ते, डॉ. सुजय पाटील, प्रा. रेखा पंडीत, वर्षा साठे, रोटरी कल्बचे गिरीश जोशी, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संततधार पावसाचा वीज पुरवठ्याला फटका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील संततधार पावसामुळे तीन हजार शेतीपंप जोडण्या बाधीत झाल्या आहेत. शिवाय जिल्ह्यातील विविध भागातील १७३ विजेचे खांब कोसळले आहेत.

पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. 'महावितरण'ने सुरक्षेच्या कारणास्तव नदीकाठी असलेल्या ४२४ वीज रोहित्रांचा वीज पुरवठा बंद केला आहे. ठिकठिकाणी वीजेचे खांब कोसळले आहेत. विद्युत वाहिन्यांवर पडलेल्या झाडांमुळे उच्चदाबाचे ३७ व लघुदाबाचे १३६ खांब जमीनदोस्त झाले. दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ६५ खांब पुन्हा उभारले. पावसाने ठिकठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. विद्युत उपकरणात बिघाड झाल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन लाइनमधील बिघाड दुरुस्त केली. कर्मचारी मनोज सोनोने, सुनील कदम, युवराज कोकितकर, सतीश पळसे, राम शिरढोणे, अजित परीट यांनी लाइन दुरुस्तीची कामे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्मिळ आजारांवरील उपचार खर्चात वाढ

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : जिल्ह्यात दुर्मिळ आजारांना बळी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या आजारांवरील उपचाराचा खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. जिल्ह्यातील हिमोफिलिया आणि थॅलेसेमिया सोसायटीकडे हिमोफिलियाचे ३६९ आणि थॅलेसेमियाच्या १५० रुग्णांची नोंद आहे. अशा रुग्णांना दरवर्षी एक ते दोन लाख रुपयांपर्यंत खर्च उपचारांसाठी करावा लागत आहे.

हिमोफिलिया, थॅलेसेमियाचे रुग्ण दीर्घकाळ उपचार घेतात. हिमोफिलिया सिव्हिअर रुग्णावरील उपचाराचा वार्षिक खर्च पाच लाखांहून अधिक तर तर थॅलेसेमिया रुग्णाला दरवर्षी दोन लाख रुपये खर्च येतो. देशातील ९.६ कोटी लोक दुर्मिळ आजाराचे शिकार असल्याचे निदर्शनास आले आहे. तर २०पैकी एक व्यक्ती दुर्मिळ आजाराला बळी पडत आहे. इंडिया नॅशनल पॉलिसी फॉर ट्रीटमेंट ऑफ रेअर डिसीज २०१७च्या अहवालानुसार देशात ४५० दुर्मिळ आजारांची नोंद झाली आहे. प्रामुख्याने राज्यात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात हिमोफिलीया, थॅलेसेमियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील आदिवासी समुहांमध्ये सिकलसेल अॅनिमिया हा आजार प्रामुख्याने अधिक आढळला आहे.

वैद्यकीय क्षेत्रापुढे अशा दुर्मिळ आजारांचे मोठे आव्हान आहे. अशा आजारांना लहान बालके अधिक बळी पडतात. दुर्मिळ आजारांमुळे ३५ टक्के बालकांचा मृत्यू वयाच्या एका वर्षाच्या आत होतो. पुरेशा उपचाराच्या सुविधा न मिळाल्याने त्याच्या संख्येत वाढ होत आहे. दुर्मिळ आजारांचे ८० टक्के मूळ अनुवंशिक आहे. नव्याने आढळत असलेल्या दुर्मिळ आजारांमध्ये ५० टक्के मुलांचा समावेश आहे. आजाराबाबत जाणिव जागृतीचा अभाव, निदानाच्या पुरेशा नसलेल्या यंत्रणा, दुर्मिळ आजाराबाबतचे सरकारचे कमकुवत धोरण यामुळे अशा आजारांनी ग्रस्त लोकांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागते.

जिल्ह्यात स्थिती गंभीर

जिल्ह्यात हिमोफिलिया व थॅलेसेमिया आजारावर दीर्घकाळ उपचार घेणारे अनेक रुग्ण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. तपासणीनंतर 'थॅलेसेमिया मेजर'चे निदान झाल्यानंतर बाळाला १५ ते ३० दिवसांनी बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो. वेळेत रक्तपुरवठा झाला नाही तर रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. हे उपचार कायमस्वरूपी घ्यावे लागत आहेत. बाहेरून रक्तपुरवठा केल्यास त्याचे दु:ष्परिणाम दिसतात. लोहाचे साठे शरीरात वाढले की रुग्णासह कुटुंबीयांना त्रासाला सामोरे जावे लागते. कायमस्वरूपी औषधे, नियमित चाचण्या, बोन स्कॅन, एमआरआय, तर कधीकधी रुग्णालयात भरती होऊन उपचार यामुळे रुग्णासह कुटुंबीयांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागते. त्यामुळे घरातला आनंद, स्वास्थ्य हरवते तर कुटुंबाला मानसिक, आर्थिक आणि सामाजिक समस्यांनासुद्धा तोंड द्यावे लागते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणज बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट पण तो खर्च करणे जिल्ह्यातील एकाही रुग्णाला शक्य नाही. अनेकदा ग्रामीण भागातील डॉक्टरांना अशा आजाराचे लवकर निदान होत नाही. मग रुग्णाला लक्षणानुसार उपचार दिले जातात किंवा मोठ्या रुग्णालयात पाठवले जाते. वेळेत योग्य निदान न होता रुग्णांची फरफट होते. दुर्मिळ आजारांबाबत मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती होत नाही. त्यामुळे औषधांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आबे. परिणामी कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबांवर कर्जाचा भार वाढतो.

काही दुर्मिळ आजारांवर दीर्घकाळ उपचार घ्यावे लागत असल्याने त्यांच्या खर्चात वाढ होते. जिल्ह्यात हिमोफिलिया व थॅलेसेमिया सोसायटीच्या माध्यमातून रुग्णांना माफक दरात औषधे उपलब्ध करून दिली जातात. दुर्मिळ आजारांचे वेळेत निदान झाल्यास तत्काळ उपचारांना सुरुवात करून रोग नियंत्रण ठेवता येतो. त्यामुळे होणारा खर्च कमी करता येईल.

- डॉ. वरुण बाफना, रक्तविकार तज्ज्ञ, सीपीआर

थॅलेसेमिया आजारावरील उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. सरकारकडून औषध पुरवठा केला जातो. मात्र खासगी उपचार प्रचंड महाग आहेत. अनेकदा सरकारकडून दिल्या जाणाऱ्या औषधांचा गुण येत नसल्याचे सांगून रुग्णांची दिशाभूल केली जाते. बोनमॅरो ट्रान्सप्लान्टसारख्या उपचाराचा खर्च २० लाख रुपयांपर्यंत जातो. दुर्मिळ आजारांवरील उपचार खर्चात वाढ झाल्याने रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

- धनंजय नामजोशी, अध्यक्ष, थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारीत झाडे लावण्याचा जागतिक विक्रम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'राज्यभरात वनविभाग विविध कार्यक्रमांतून ३३ कोटी वृक्षांची लागवड करीत आहे. मात्र, त्यांचे संगोपन महत्वाचे आहे. कोल्हापूर, सोलापूर, पुणे विद्यापीठातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांवर झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी दिली आहे. या विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या आषाढी वारीत वारकरी मुक्कामाला असलेल्या ठिकाणी एकाच वेळी, एकाच प्रकारची १५ हजार झाडे लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे' असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केला. वनविभागाच्या नागाळा पार्कातील वन विश्रामगृह आणि वन्यजीव रेस्क्यू व्हॅनच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती अध्यक्षस्थानी होते. महापौर माधवी गवंडी यांची प्रमख उपस्थित होत्या.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'पर्यावरणाच्या निकषांनुसार ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. सध्या देशात केवळ २० टक्के जंगल अस्तित्वात आहे. त्यामुळे वन प्रशासन वृक्ष लागवड मोहीम राबवित आहे. जिल्ह्यातही या मोहिमेला गती देण्यात आली आहे. जंगलक्षेत्रालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यांना ममत्व दाखवत पकडण्यासाठी तीन रेस्क्यू व्हॅन तयार केल्या आहेत. या व्हॅन सुसज्ज आहेत. त्यामध्ये पोटॅटो गन, पिंजरा आहे. या वाहनांची गरज असलेल्यांनी '१९२६' या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. हे वाहन जाग्यावर पोहोचून उपद्रव करणाऱ्या माकडांसह इतर प्राण्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडेल. वन अधिकाऱ्यांसाठी चांगले विश्रामगृहही बांधण्यात आले आहे. ते केवळ वन अधिकाऱ्यांसाठीच राखीव ठेवावे. इतर कोणालाही दिले जाऊ नये.'

प्रधान वन सचिव विकास खारगे म्हणाले, 'राज्यात १ जुलैपासून साडेआठ कोटी झाडांची लागवड केली आहे. त्याचेर ऑनलाइन मॉनिटरींग केले जात आहे. प्रत्येक झाडाची माहिती सरकारच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे. झाडे लावण्यासह जगविणे, संगोपन महत्वाचे आहे. हे काम जबाबदारीने केले पाहिजे.'

यावेळी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कर्मचारी सलिम मुल्ला, सुशीलकुमार शिंदे, वनरक्षक विश्वास पाटील, हणमंत काळवेल, उमा जाधव, दत्तात्रय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांन प्रास्ताविक केले. आमदार सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वनसंरक्षक सत्यजित गुजर, डॉ. व्ही. क्लेमेंट बेन आदी उपस्थित होते.

कृत्रिम पावसाची निविदा

'विदर्भ, मराठवाड्यातील कमी पर्जन्यमानाच्या जिल्ह्यांत कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. पुढील महिनाभरात पावसाचा अंदाज घेण्यात येईल. त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल,' असे पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 'पक्षात ज्यावेळी काही घडामोडी होत असतात, त्यावेळी माझे नाव घेतले जाते,' असे सांगून त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या प्रश्नाला बगल दिली.

००००००००००००

(मूळ कॉपी)

कोल्हापूर टाइम्स टीम

वनविभाग ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातून रोपांची लागण करत आहे. मात्र त्यांचे संगोपन महत्वाचे आहे. त्यासाठी कोल्हापूर, सोलापूर, पुणे विद्यापीठातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांवर झाडे लावून जगवण्याची जबाबदारी दिली आहे. त्या विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या आषाढी वारीत वारकरी मुक्कामाला असलेल्या ठिकाणी एकाच वेळी एकाच प्रकारची १५ हजार झाडे लाऊन गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड करून विक्रम केल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केला.

येथील वनविभागाच्या नागाळा पार्कातील वनविश्राम गृह आणि वन्यजीव रेस्क्यू व्हॅन उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती अध्यक्षस्थानी होते. महापौर माधवी गवंडी यांची प्रमख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, नियमाप्रमाणे ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. सध्या केवळ २० टक्के आहे. म्हणून वन प्रशासन वृक्ष लागवड मोहिम राबवत आहे. जिल्ह्यातही या मोहिमेला गती देण्यात आली आहे. जंगलक्षेत्र असलेल्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. ते मनुष्यावर हल्ला करतात. पिकांचे नुकसान करतात. त्यांना ममत्व दाखवत पकडण्यासाठी तीन रेस्क्यु व्हॅन तयार केले आहेत. हे व्हॅन सुसज्ज आहेत. त्यामध्ये पोटॉटो गण, पिंजरा आहे. या वाहनाची गरज असलेल्यांनी १९२६ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा. हे वाहन जाग्यावर पोहचत उपद्रव करणाऱ्या माकडांसह इतर प्राण्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल. वन अधिकाऱ्यांसाठी चांगले विश्रामगृहही बांधण्यात आले आहे. हे केवळ वन अधिकाऱ्यांसाठीच राखीव ठेवावे. इतर कुणाला देऊ नये.

प्रधान सचिव (वने) विकास खारगे म्हणाले, राज्यात १ जुलैपासून साडे आठ कोटी झाडांची लागवड केली आहे. यावर ऑनलाइन मॉनिटर केले जात आहे. प्रत्येक झाडाची माहिती सरकारच्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. झाडे लावण्यासह जगवणे, संगोपन करणे महत्वाचे आहे. हे काम जबाबदारीने केले पाहिजे.

यावेळी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त सलिम मुल्ला, सुशीलकुमार शिंदे, वनरक्षक विश्वास पाटील, हणमंत काळवेल, उमा जाधव, दत्तात्रय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांन प्रास्ताविक केले. आमदार सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वनसंरक्षक सत्यजित गुजर, डॉ. व्ही. क्लेमेंट बेन आदी उपस्थित होते.

---------

चौकट

कृत्रिम पावसाची निविदा

विदर्भ, मराठवाड्यातील कमी पर्जन्यमानच्या जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. पुढील महिनाभरात पावसाचा अंदाज घेण्यात येईल. त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पक्षात ज्या ज्यावेळी घडामोडी होत असतात त्यावेळी माझ्या नाव घेतले जाते, असे सांगून त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या प्रश्नाला सोयीस्करपणे बगल देत वेळ मारून नेली.

---------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निवडणूक भत्याची जबाबदारी तहसीलदारांची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गडहिंग्लजमधील निवडणूक कर्मचाऱ्यांना भत्ता अदा करण्याच्या कामकाजाचे नियंत्रण करण्याची जबाबदारी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान काम केलेल्या शिक्षकांनी केलेल्या आरोपांशी माझा काहीही संबंध नाही', अशी माहिती गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली आहे.

लोकसभा मतदानादिवशी गडहिंग्लज येथे काही शिक्षकांनी कमी भत्ता मिळाल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे तक्रार केली होती. यासंबंधी प्रांताधिकारी पांगारकर यांनी खुलासा केला आहे. निवडणूक खर्चासाठी चंदगड, गडहिंग्लज तहसील कार्यालयाकडे निधी आला होता. त्याच्या खर्चासंबंधीच्या कामकाजाचे अधिकार तहसीलदारांचे असतात. माझ्या कार्यालयाकडून खर्चाला मान्यता, आदेश देण्याची तरतूद नाही. निवडणूक कर्मचाऱ्यांना भत्ता देण्याची कार्यवाही तहसीलदार चव्हाण यांची आहे. यामुळे मी निवडणूक राखीव कर्मचाऱ्यांना भत्ता कमी दिला, असे संबंधित शिक्षकांनी केलेला आरोप चुकीचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रॉपर्टी कार्डसंबंधीचा प्रस्ताव सादर करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पिवळ्या पट्ट्यातील जमिनीतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्डसाठी सरकारकडे प्रस्ताव द्यावा, अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी सोमवारी महसूल प्रशासनास केली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्‍नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

आमदार महाडिक म्हणाले, 'शहरातील लक्षतीर्थ वसाहत, जोशीनगर, राजेंद्र नगर, वारे वसाहत यासह सर्वच झोपडपट्टींतील रहिवाशांचे अतिक्रमण नियमित करावे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे. याशिवाय शहरातील पिवळ्या पट्ट्यातील जमिनींच्या रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा. कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नियमानुसार पिवळ्या पट्ट्यातील जमिनींचे बिगरशेती आदेशाशिवाय प्रॉपर्टी कार्ड करता येणार आहे. त्यासाठी महसूल प्रशासनाने सरकारकडे प्रस्ताव द्यावा. वाढीव गावठाण हद्द आणि महानगरपालिकेच्या हद्दीतील मिळकतींची मोजणी करावी.' यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी झोपडपट्टीतील अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात सरकारी आदेशानुसार तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा भूमीअभिलेख अधीक्षक वसंत निकम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशोभीकरण कामाचा अहवाल दर आठवड्याला द्या

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी स्मारकातील कामे वेगाने पूर्ण करुन दर आठवड्याला कामाचा अहवाल देण्यात यावा,' अशी सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ठेकेदार व आर्किटेक्ट यांना सोमवारी केली.

महापौर माधवी गवंडी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी समाधी स्मारकाच्या कामाची पाहणी केली. 'परिसरातील समाधी मंदिरावरील झाडे, झुडपे काढून तसेच भिंतीला केमिकल लावून परिसर स्वच्छ करा. लोकार्पण सोहळ्यासाठी प्रवेशद्वारपर्यंत काँक्रिटीकरण करुन पार्किंगसाठी संरक्षक भिंतीबाहेर नियोजन करा. कामाच्या प्रगतीचा अहवाल महापौर यांच्यासह आपल्याकडे दर आठवड्याला द्या,' अशा सूचना आयुक्तांनी ठेकेदार व्ही. के. पाटील व आर्किटेक्ट अभिजित जाधव यांना दिल्या.

समाधीस्थळ स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याचे समाधान व्यक्त करताना महापौर माधवी गवंडी म्हणाल्या, 'दहा ऑगस्टनंतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. तत्पूर्वी अपुरी कामे त्वरीत पूर्ण करावीत.' ठेकेदार पाटील म्हणाले, 'पेव्हिंग व लँडस्केपिंगचे काम अंतिम टप्प्यात असून लॉनसह फरशी बसवण्याचे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण केले जाईल.'

यावेळी नगरसेवक जय पटकारे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अदिल फरास, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, पुराअभिलेख विभागाचे गणेश खोडके, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, रियाज सुभेदार, निशिकांत सरनाईक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुऱ्हाड घेऊन माजी सैनिकाची दहशत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

माजी सैनिक असलेल्या एका व्यक्तीने सोमवारी भरदिवसा हातात कुऱ्हाड घेऊन आरगे मळा परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दादासाहेब शिवाजी येटाळे (वय ४५ रा. आरगे मळा) असे संशयिताचे नाव असून त्यांनी घराशेजारील नागरिकांच्या दुचाकीसह प्रापंचिक साहित्याची नासधूस केली. त्याचबरोबर पादचारी नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले दादासाहेब येटाळे आरगे मळा परिसरात वास्तव्यास आहेत. काही दिवसांपासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे वारंवार असे प्रकार घडत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. सोमवारी दुपारी हातात कुऱ्हाड घेऊन येटाळे यांनी भागातील नागरिकांच्या दुचाकी तसेच प्रापंचिक साहित्याची नासधूस केली. त्याचवेळी रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या संदर्भात नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर गावभाग पोलिसांनी घटनास्थळी येऊन नागरीकांच्या मदतीने येटाळे यांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत वृद्धासह तिघे गंभीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

थांबलेल्या मारुती इको मोटारीतील टेप रेकॉर्डर चालू करण्याच्या नादात गाडी सुरू होऊन भाग्यरेखा चित्रमंदिर परिसरात थरारनाट्य घडले. कारने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धासह तिघेजण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाला. त्यामध्ये एका युवतीचा समावेश आहे. तर पाच दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोटार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मोकळ्या जागेत शिरल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

कुलगोंडा शिवगोंडा पाटील (वय ७० रा. यशवंत प्रोसेसजवळ) मधुकर जोतीराम जगताप (वय २१ रा. देना बँकेजवळ), योगिता अरविंद शिंदे (वय २२ रा. प्रतिक प्लाझा) अशी गंभीर जखमींची नावे असून राहुल रामचंद्र बावडेकर (वय २८ रा. एएससी महाविद्यालय परिसर) हा किरकोळ जखमी झाला.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नाईक मळा परिसरात रामदेव राठी यांचे कन्फेक्शनरीचे गोदाम आहे. बेकरीचे साहित्य घेवून इंगळे नामक चालक व त्यांच्या सोबत सत्यनारायण नथमल मोदाणी (रा. झेंडा चौक) हे ईको कार (क्र. एमएच ०९ ईयू ६९६५) मधून भाग्यरेखा चित्रमंदिर परिसरातील एका बेकरीसमोर साहित्य देण्यासाठी आले होते. साहित्य देण्यासाठी चालक खाली उतरल्यानंतर मोटारीतच बसलेल्या मोदाणी यांनी टेपरेकॉर्डर सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु चुकून गाडी सुरू झाली आणि भरधाव पुढे गेली. यावेळी रस्त्यावरून निघालेल्या मधुकर जगताप यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर मोटार आणखीन तीन ते चार मोटरसायकलींना धडक देत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. मोटारीने भाग्यरेखा चित्रमंदिरालगतच्या औषध दुकानाजवळून जात असलेल्या कुलगोंडा पाटील या पादचाऱ्याला व योगिता शिंदे हिला जोराची धडक दिली. त्यानंतर मोटार नवल झंवर यांच्या गोदामासमोर असलेल्या रिकाम्या जागेत सुमारे शंभर फुटाहून अधिक आत घुसून झाड व भिंतीच्या चिंचोळ्या जाग्यात घुसल्यानंतर थांबली. दरम्यान औषध दुकानासमोरील एक दुचाकी सुमारे ७० ते ८० फुटापर्यंत फरफटत नेली. वर्दळीच्या रस्त्यावर काही क्षणातच झालेल्या या विचित्र अपघातामुळे वाहनधारकांसह नागरिकांची भीतीने गाळण उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोळेकर तिकटी येथे क्रॉस ड्रेन कामाला सुरुवात

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंगळवार पेठ, कोळेकर तिकटी येथील गटर्स व चॅनेलच्या क्रॉस ड्रेन कामाला महापालिकेने सोमवारपासून सुरुवात केली. काम पूर्ण होण्यास आठवड्याचा कालावधी लागणार असल्याने मिरजकर तिकटीपासून पाण्याचा खजिन्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. मात्र याबाबतची माहिती नसल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे साई मंदिर परिसरात सकाळी वाहतूक कोंडी झाली .

कोळेकर तिकटी ते शाहू बँकेपर्यंत गेल्या आठवड्यात नवीन गटर्स बांधण्यात आल्या. पूर्वेकडील बाजूने येणारे सांडपाणी पश्चिम बाजूकडे सिमेंट पाइपद्वारे सिद्धाळा गार्डनकडे वळवण्यात येणार आहे. त्यासाठी चॅनेल बांधून क्रॉस ड्रेन करण्यात येणार आहे. सोमवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सुमारे चार फूट व्यासाची सिमेंट पाइप टाकण्यासाठी दिवसभर सुमारे तीन बाय अडीच फुटाची चर जेसीबी मशिनद्वारे खोदण्यात आली. ऐन पावसाळ्यात कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असताना, त्यामध्ये वाहनधारकांचीही भर पडली.

कामाला सुरुवात होण्यापूर्वी मिरजकर तिकटी व पाण्याचा खजिना येथे रस्ता बंद असल्याचे फलक लावत एका बाजूला महापालिका व शहर वाहतूक शाखेने बॅरीकेटही लावले. पण त्याबाबतची माहिती नसल्याने वाहनधारक साई मंदिरापर्यंत आले. पण तेथे काम सुरू असल्याने सर्व वाहनधारकांनी राम गल्लीतून जाण्याचा प्रयत्न केला. असाच प्रकार शिंगोशी मार्केट परिसरात झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मंगळवार पेठेतील सर्व लहान-लहान गल्ल्यांत वाहनांच्या रांगा लागल्या. त्याचा फटका शालेय विद्यार्थी व नोकरदारांना बसला. क्रॉस ड्रेन कामाच्या कालावधीत खासबाग मैदानाकडून संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक विठ्ठल मंदिरापासून खरी कॉर्नरकडे वळवण्यात आली आहे. तर संभाजीनगरकडून येणारी वाहतूक पाण्याचा खजिना ते नाथागोळे तालीममार्गे वळवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभारी जलअभियंता कुलकर्णी यांची बदली

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेचे प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांची बदली पुन्हा त्यांच्या मूळ जागी उपजलअभियंता म्हणून झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे उपजलअभियंता म्हणून असलेल्या कुलकर्णी यांच्या बदलीचे आदेश जून महिन्यात निघाले. पण अद्याप त्यांना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कार्यमुक्त केलेले नाही. जलअभियंता मनीष पवार यांची जिल्हा परिषदेकडे नियुक्ती झाल्यानंतर डिसेंबर २०१२ मध्ये प्रभारी जलअभियंता म्हणून कुलकर्णी यांची महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडे नियुक्ती झाली. काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना, अमृत योजना आणि शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठ्या वरुन अनेकदा त्यांना स्थायी व महासभेत सभागृहाच्या रोषाला सामोरे जावे लागले. विशेषत: शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्य जलअभियंत्याची नियुक्ती करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याबाबत प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असतानाच जून महिन्यामध्ये कुलकर्णी यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यांची पुन्हा एमजीपीकडे उपजलअभियंता म्हणून बदली झाली आहे. मात्र अद्याप त्यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त केलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुरुस्ती झाली तरी पाणीपुरवठा अपुराच

$
0
0

टँकरचा फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये चार दिवसांपूर्वी झालेला तांत्रिक बिघाड सोमवारी (ता.१५) पहाटे दूर करण्यात महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाला यश आले. दुरुस्तीनंतर तीनही पंपांतून उपसा सुरू झालेला असला, तरी अद्यापही शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा होणाऱ्या भागात कमी दाबाने पाणी आल्याने नागरिकांकडून टँकरची मागणी केली जात होती.

बुधवारी पहाटे बालिंगा पंपिंग स्टेशनमधील ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तीन पैकी दोन पंप सुरू असल्याने संपूर्ण शहराला पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात टँकरमागे धावपळ करावी लागली. शुक्रवारी दुरुस्ती झाल्यानंतर तीन पंप सुरू केले. पण डीओ फ्युज निकामी झाल्याने पुन्हा एक पंप बंद झाला. त्यामुळे उपनगरासह शहरातील सर्वच भागात पाणीपुरवठा ठप्प झाला. दुरुस्तीसाठी शहर पाणीपुरवठा विभागाकडे कुशल मनुष्यबळ नसल्याचाही फटका शहरवासियांना बसला.

पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने नागरिक पदाधिकाऱ्यांकडे पाण्याबाबत विचारणा करत होते. रविवारी दिवसभर बिघाड काढण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कार्यन्वित केली होती. पण त्याला यश येत नव्हते. सोमवारी पहाटे मात्र तांत्रिक बिघाड काढण्यात यश आले. पहाटे पाच वाजता एक पंप सुरू केल्यानंतर पुढील अर्ध्या तासात टप्प्याटप्प्याने तीनही पंप सुरू केले. जलशुद्धीकरणातून सकाळी पाणी वितरणास सुरुवात झाली. सकाळी 'सी' व 'डी' भागात पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली असली, होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. चार दिवसांचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी दोन दिवस लागणार असल्याने पुढील दोन दिवसांत पाणी येणार असले, तरी ते कमी दाबाने येणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस शहरवासियांना काही प्रमाणात टँकरचा आधार घ्यावा लागेल. दरम्यान, दुपारपर्यंत कळंबा फिल्टर हाउस येथून पाच तर कसबा बावडा फिल्टर हाउस येथून सात अशा १२ टँकरच्या फेऱ्यांद्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अननस, सफरचंदाची आवक

$
0
0

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत) वांगी : ४० रु. टोमॅटो :२० ते ४० रु. भेंडी : ६० रु. ढबू : ४० रु. गवार : ८० रु. दोडका : ४० ते ६० रु. कारली : ६० रु. वरणा : ६० रु. हिरवी मिरची : ४० ते ५० रु. फ्लॉवर : २० ते ४० रु. पालेभाजी दर

(पेंढी रुपयांत) मेथी : १५ रु. कांदा पात : १० रु. कोथिंबीर :२० ते ३० रु. पालक : १० रु. शेपू :१० रु. पोकळा : १० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेलनाडे बंधूच्या याचिकेवर उद्या सुनावणी तेलनाडेच्या याचिकेवर सुनावणी बुधवारी

$
0
0

इचलकरंजी : खंडणी, बलात्कार, धमकावणे यासह मटका व बेटिंगचे गुन्हे दाखल झाल्यानंतर मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या नगरसेवक संजय, सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पोलिस कारवाईला आव्हान दिले आहे. सोमवारी यावर सुनावणी झाली. कोर्टाने बुधवारी पुन्हा सुनावणी ठेवली आहे.

तेलनाडे बंधूसह वकील उपाध्ये यांनी उच्च न्यायालयात सात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाने या सर्व याचिकेवर एकत्रित सुनावणी घेण्याचे निश्चित केले, त्यानुसार सोमवारी सुनावणी झाली मात्र न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली आहे. बुधवारच्या सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागून राहील्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाला कानपिचक्या

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील डेंगीसदृश रुग्णांची वाढती संख्या, साथीच्या आजारामुळे रुग्णांच्या आरोग्यविषयक वाढलेल्या तक्रारींवरुन आरोग्य विभागाला बैठकीत प्रभावी उपाययोजनेवरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानपिचक्या दिल्या. जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात जिल्हा परिषदेत आढावा बैठक झाली. जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी विभागनिहाय आढावा घेतला. जिल्ह्यातील पीकस्थितीचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यातील विविध भागात डेंगीसदृश रुग्णांच्या संख्येतील वाढ ही चिंताजनक बाब आहे. डेंगीच्या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरालगतच्या कळंबा गावात पंधरा जूनपासून तापाची साथ आहे. डेंगीसदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. या भागात प्रभावी उपाययोजना करावी, रुग्णांवर औषधोपचार करावेत, धूरफवारणी करावी अशा सक्त सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना केल्या. बांधकाम विभागातर्फे संभाव्य पूरस्थिती व उपाययोजनेची माहिती दिली. कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील पीक परिस्थितीची माहिती सादर केली. जिल्ह्यातील दहा जुलैअखेर २ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, सोयाबीन, भुईमुग अशा विविध पिकांची पेरणी झाली आहे.

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, मनीष पवार, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी विविध योजनांची माहिती दिली. साथीच्या आजारापासून रुग्णांचा बचाव करण्यासाठी आरोग्यविषयक प्रभावी उपाययोजना करा, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा महाडिक यांनी केल्या.

...

महिला सदस्यांना अभ्यास दौऱ्याची संधी

राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील विविध समित्यांच्या अभ्यास दौऱ्याला ब्रेक लावला आहे. कृषि, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण विभागातील सदस्यांचे अभ्यास दौरे बंद झाले आहेत. समिती सदस्यांचे अभ्यास दौरे बंद करण्याचा विषय सर्वसाधारण सभेतही गाजला होता. सदस्यांनी अभ्यास दौऱ्याला मान्यता मिळावी अशी मागणी केली होती. अन्य समिती सदस्यांच्या अभ्यास दौऱ्याला मंजुरी मिळाली नाही. दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाला अभ्यास दौऱ्यासाठी परवानगी मिळाली आहे. यामुळे समितीतील महिला सदस्यांना अभ्यास दौरा करण्याची संधी मिळणार आहे. अभ्यास दौऱ्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेचा धक्क्याने बैल ठार

$
0
0

पन्हाळा: येथील सातवे पैकी आमतेवाडी येथे विजेचा धक्का बसल्याने बैलाचा मृत्यू झाला. आमतेवाडी येथील शेतकरी दत्तात्रेय बापू पाटील यांच्या मालकीचा तो बैल असून अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. आज बेंदराच्या दिवशीच बैलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाटील यांनी बैलाला सकाळच्या वेळी चरण्यासाठी सोडले होते. त्यावेळी विजेच्या खांबाच्या तारेतून उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसला. तसेच सोबतच्या आणखी एका कुत्र्याचाही मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images