Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शाळकरी मुलीचा तापाने मृत्यू

$
0
0

कोल्हापूर : शिवाजी पेठ मरगाई गल्ली येथील नंदिनी रोहित थापा (वय १४) या शाळकरी मुलीचा मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास तापाने मृत्यू झाला. ती नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये शिकत होती. नंदिनी गेले आठ दिवस तापाने आजारी होती. तीन दिवसांपूर्वी तिला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र,उपचार सुरू असताना पहाटे दीडच्या सुमारास मृत्यू झाला. सीपीआर प्रशासनाने तिचा मृत्यू तापाने झाल्याचे सांगितले. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.३) सकाळी नऊ वाजता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरी गुळाचे जीआय नावापुरतेच

$
0
0

udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

कोल्हापुरी गुळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी सहाय्यभूत असणारे जीआय मानांकन मिळून पाच वर्षे झाली तरी त्याच्या निकषाप्रमाणे गूळ उत्पादन करण्यासाठी आतापर्यंत मान्यताप्राप्त उत्पादक म्हणून एकाही शेतकऱ्याने नोंदणी केलेली नाही. या नोंदणीअभावी विविध बाजारपेठेतील विक्रीत वाढ करण्यासाठी मदत करणारा गुणवत्तेचा जीआयचा लोगो येथील गुळासाठी वापरता आलेला नाही. परिणामी कोल्हापुरी गुळाचे जीआय मानांकन केवळ नावापुरतेच राहिले आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून तयार करण्यात येत असलेल्या गुळाची बाजारपेठ म्हणून कोल्हापूरकडे अजूनही पाहिले जाते. देशात तसेच जगभरात या गुळाला मागणी आहे. पण कालांतराने इतर भागातही तयार केल्या जाणाऱ्या गुळाला कोल्हापुरी म्हणून बाजारपेठेत खपवण्यात येऊ लागले. कोल्हापुरात तयार होणाऱ्या गुळाप्रमाणे गुणवत्ता नसल्याने मूळ कोल्हापुरी गुळाचे नाव खराब होऊ लागले. त्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन जीआय मानांकनासाठी प्रयत्न चालवले. त्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे नोव्हेंबर २०१३ मध्ये कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन मिळाले. त्यानंतर गूळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे नोंद करायची आणि सर्टिफिकेट घेण्याची आवश्यकता होती. अशा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करुन त्या गुळावर जीआय मानांकनाचा गुणवत्तेचा लोगो वापरता आला असता. यामुळे देशातील तसेच जागतिक बाजारपेठेत त्या गुळाला मागणी वाढून दर मिळाला असता.

बाजार समितीने कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना जीआय मानांकनचे फायदे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांना विविध रासायनिक पावडर वापरुन गूळ तयार करण्याची सवय लागली आहे. परिणामी कोल्हापुरी गुळाची निर्मिती ज्या प्रकारे केली जाते त्यासाठी जे निकष पाळले जात होते, त्यापासून उत्पादक दूरच राहिले. जीआयचा फायदा घ्यायचा तर गुणवत्ता टिकवण्याची गरज होती. कोल्हापुरात सध्या जीआयच्या निकषाप्रमाणे म्हणजेच परंपरागत पद्धतीने गूळ तयार केला जात नसल्याने येथील व्यापारी वा सरकारही युरोप तसेच अन्य देशांच्या मोठ्या बाजारपेठेत तो पाठवू शकत नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे.

.. . ..

जीआयच्या लोगोमधून गुणवत्ता दर्शवली जाते. तो वापरण्यासाठी त्याबाबतचे निकष पाळले जातील हे शेतकऱ्याकडून सांगितले जाते. त्याचवेळी त्याला सर्टिफिकेट देऊन तो लोगो वापरण्याची परवानगी मिळते. यासाठी शेतकरी व बाजार समिती यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांना जीआयचा फायदा होणार नाही.

गणेश हिंगमिरे, अध्यक्ष, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी

. .. .. ..

जीआय मानांकन मिळाल्यानंतर बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. पण पाच वर्षांत एकाही शेतकऱ्याने त्यादृष्टीने प्रयत्न केला नाही व नोंदणीही केली नाही. बाजार समितीने जीआय मिळवले आता शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे गुळाचे उत्पादन केले पाहिजे.

मोहन सालपे, सचिव, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती

.....

जीआय मानांकन जाहीर

नोव्हेंबर २०१३

गूळ उत्पादक शेतकरी

२५ हजार

गुऱ्हाळघरांची संख्या

९०० च्या आसपास

जिल्ह्यात एकूण उसापैकी गूळ उत्पादनासाठी ऊस

२७ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायू-ध्वनी प्रदूषणाला हवा फाटा

$
0
0

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

प्रा. डॉ. पी. डी. राऊत

पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूर : हिंदू धर्मियातील सण, उत्सव हे ऋतूप्रमाणित आहेत. निसर्ग, पशूपक्षी, शेती यांच्याविषयी एक पूज्यभाव आणि कमालीची आस्था आहे. झाडाविषयीचे प्रेम व्यक्त करणारी वटपौर्णिमा, बैलाविषयी आपुलकी व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा, श्रावण महिन्यात तर सणांची मालिका असते. साधारणपणे जून महिन्यापासून सण, उत्सवाला सुरुवात होते. एकानंतर एक सण साजरे होतात. सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे झाल्यास हवा, ध्वनी, पाणी प्रदूषण टाळता येऊ शकते. प्रदूषण टाळणे म्हणजे निसर्ग संवर्धन, पर्यावरण संतुलन राखण्याचे काम आहे.

गणपती हे सर्वसामान्यांचे दैवत आहे. समाजातील सर्वच घटक गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. उत्सव घरगुती स्वरुपाचा असो की सार्वजनिक तो साजरा पर्यावरणपूरकता जपली पाहिजे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यांची संख्या मोठी आहे. वपर्यावरणाला धक्का बसणार नाही याची दक्षता अनेकजण घेतात. पर्यावरण संवर्धनाच्या कामाला व्यापकता लाभली तर साऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.

पूर्वी शाडूपासून गणेशमूर्ती बनविल्या जात. शाडू पाण्यात विरघळायचा. गेल्या काही वर्षात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेशमूर्ती तयार केल्या जातात. शाडूची मूर्ती बनवायला मेहनत लागते. त्यामानाने प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायला सोपी. मात्र प्लास्टर घट्ट झाले तर पाण्यात मिसळत नाही. वितळत नाही. शिवाय मूर्तीवरील रंग हे पाण्यात मिसळतात. अन्नसाखळीत उतरतात. रासायनिक रंगापासून जलचरांना धोका पोहचण्याची शक्यता आहे.

उत्सवाच्या कालावधीत हवा व ध्वनी प्रदूषण रोखण्याला प्राधान्य हवे. गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होते. मोठा आवाज ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत ठरतो. शाळा, हॉस्पिटल परिसरातून मिरवणूक काढताना संबंधित घटकांना त्रास होणार नाही याची जाणीव असायला हवी. फटाक्यामध्ये शिसे जास्त प्रमाणात असते. त्याचा परिणाम मेंदूवर होतो.

फटाक्यामध्ये कार्बनडाय ऑक्साइड व कार्बन मोनो ऑक्साईड असते. या दोन्ही घटकांच्या प्रमाणात वाढ झाल्यास हवेतील उष्णता वाढते. परिणामी तापमानात वाढ होते. वातावरणातील बदलाला हे सारे घटक परिणामकारक ठरत आहेत. उत्सव, सण साजरे करत असताना पर्यावरणाला हानी पोहचणार नाही, प्रदूषणात वाढ होणार नाही याची काळजी घेऊन उत्सव साजरे व्हायला हवेत. पर्यावरणपूरक उत्सव साजरे होण्यातही एक प्रकारचे पावित्र्य असते. सण, उत्सव साजरे करण्यात पूर्वजांचा वेगळा दृष्टिकोन होता. पूर्वीच्या कालावधीत निसर्गाला हानीकारक ठरेल, अशा पद्धतीने उत्सव कुणी साजरा करत नसे. उत्सवाची परंपरा जपताना पर्यावरणाची जोड दिल्यास ते साऱ्यासाठी उपयुक्त ठरेल.

सण, उत्सव हे ऋतूप्रमाणित आहेत

निसर्ग, पशूपक्षी याविषयी पूज्यभाव व आस्था

प्लास्टर पाण्यामध्ये मिसळत नाही, रंगाचा जलचरांना धोका

फटाक्यात शिसाचे प्रमाण जास्त, त्याचा मेंदूवर परिणाम होता

कार्बनडाय ऑक्साइड व कार्बन मोनो ऑक्साइडमुळे उष्णतेत वाढ

नैसर्गिक स्रोतांवर परिणाम, वाढते प्रदूषण बदलत्या वातावरणास कारणीभूत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात सरासरी१८८ मी. मी. पाऊस

$
0
0

साताऱ्यात सरासरी

१८८ मी. मी. पाऊस

सातारा :

जिल्ह्यात मंगळवारी पहाटे आणि सोमवारी दिवसभरात एकूण ३३१.९९ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी २४.७२ मी. मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटर मध्ये पुढीलप्रमाणे, सातारा ३१.४०, जावळी २९.०२, पाटण ३३.७३, कराड २२.६९, कोरेगाव ९.६७, खटाव ४.७३, माण ३, फलटण ६.७८, खंडाळा १६.९५, वाई १९.१७, महाबळेश्वर १५४.८५ या प्रमाणे आजपर्यंत सरासरी १८८.०८ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २०४२.०९ फूट झाली असून, १५.१४० टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. धरणक्षेत्रातील कोयना येथे १०७, नवजा १९० मी. मी. पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारी लालपरी’तून उलगडतोय एसटीचा प्रवास

$
0
0

'वारी लालपरी'तून उलगडतोय एसटीचा प्रवास

म. टा. वृत्तसेवा, कराड

सर्वसामान्य गरीबांसह श्रीमंतांच्या प्रवासाची सेवा करणाऱ्या एसटीचा इतिहास, एसटी महामंडळच्या बसमध्ये आतापर्यंत झालेले निरनिराळे बदल आणि आधुनिकरणाची माहिती एसटीच्या प्रवाशांना व्हावी, या हेतूने एसटी प्रशासनाने एसटीचा इतिहास मांडणारा 'वारी लालपरीची' हा उपक्रम राबविला असून, या उपक्रमांतर्गत एसटीची माहिती देणारी प्रदर्शनीय बस येथील बसस्थानकात सोमवारी दाखल झाली होती. या बसमधील प्रदर्शनास प्रवाशांसह युवक, युवती, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनातून एसटीतील बदल पाहिल्यानंतर अनेकांना याचे अप्रुप वाटले. मंगळवारी सकाळी ही बस पुढील प्रवासाठी रवाना झाली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि 'बस फॉर अस' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वारी लालपरीची या चालतात फिरत्या चित्ररथाचे येथील बसस्थानकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

...........

वारीसाठी 'कृष्णा'चा पाणी टँकर

कराड :

कृष्णा सहकारी साखर कारखान्याने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केली आहे. किल्ले मच्छिंद्रगड येथून श्री मच्छिंद्रनाथांच्या पालखीसोबत हा टँकर रवाना झाला आहे. मागील साठ वर्षांपासून कृष्णा कारखान्याने ही परंपरा अखंडीतपणे सुरू ठेवली आहे. किल्ले मच्छिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथाचे तीर्थक्षेत्र असल्याने या परिसराला मोठी वारकरी परंपरा लाभली आहे. श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी भागातील हजारो भाविक दर वर्षी जात असतात.

.........

नांदगावात वृक्षारोपण

कराड :

निसर्ग वैभवाने नटलेल्या कराड तालुक्यात मोठी वृक्षसंपदा आहे. पर्यावरणाच्या बाबतीत सजग असणाऱ्या तालुक्यातील वृक्षप्रेमी जनतेमुळेच हे शक्य झाले आहे. पुढील पिढीच्या रक्षणासाठी नागरिकांनी वृक्षसंवर्धनाची मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केले. वन विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा तालुकास्तरीय प्रारंभ मंगळवारी सकाळी नांदगाव येथे करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

................

बैलगाडी शर्यतींसाठी

पाठपुरावा करणार

नरेंद्र पाटील यांची माहिती

कराड :

बैलगाडी शर्यती हा शेतकऱ्यांच्या आवडीचा विषय आहे. काही चुकीच्या निर्णयांमुळे शर्यती बंद पडल्या आहेत, त्या सुरू करण्यासाठी बैलगाडी शर्यत प्रेमी शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. आता या शर्यती सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथे दिली.

सैदापूर येथे मंगळवारी दुपारी आयोजित बैलगाडी प्रेमी शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी म्हाडाचे संचालक आनंदराव मोहिते, बैलगाडी प्रेमी धनाजी शिंदे, सचिन भोसले आदी उपस्थित होते.

...........

रस्ते, पुलांसाठी तीन कोटी

कराड :

अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने पाटण तालुक्यातील विकास कामांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात रस्ते आणि पुलांच्या कामासाठी हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. पाटण तालुक्यातील निसरे-काळगाव-गुढे-भुरभुशी या जिल्हा रस्त्यासाठी आणि पुलासाठी दोन कोटी रुपये तर नाडे-सांगवड-मुंद्रुळकोळे या रस्त्यासाठी आणि पुलासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारमंत्र्यांच्या साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हा

$
0
0

सोलापूर :

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्यासह सोलापुरातील तीन साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसतोड कामगार आणि उस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी हा कारखान्यांनी भरावा, असे आदेश भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी दिले होते. या आदेशानंतरही साखर कारखान्यांनी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्यामुळे सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कराखाना, लोकमंगल शुगर, इथेनॉल अॅन्ड को. जनरेशन आणि लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज या तीन साखर कारखान्यांविरोधात कर्मचारी भविष्य निधी कायदा १९५२च्या अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नातेवाईकांचे लोकमंगलचे दोन साखर कारखाने आहेत तर सिद्धेश्वर साखर कारखाना हा सोलापुरातील मोठं प्रस्थ असलेल्या धर्मराज काडादी यांचा कारखाना आहे.

या तीनही साखर कारखान्यांनी २०१८-२०१९च्या गाळप हंगामामध्ये ऊसतोडणी करणाऱ्या आणि ऊस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. त्यामुळे या कारखान्यांविरुद्ध चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, कार्यकारी संचालक संतोष कुंभार, लोकमंगल शुगर, इथेनॉल अॅन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील, विवेक पवार, पराग पाटील, संजय घोरपडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भविष्य कर्मचारी निधीच्या अनुशंगाने दाखल करण्यात आलेल्या या गुन्हामध्ये तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शिक्षकांना दंडाची शिक्षा

$
0
0

दोन शिक्षकांना दंडाची शिक्षा

सातारा :

येथील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका व वर्ग शिक्षक असणाऱ्या दोघींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ ए. ए. जे. खान यांनी सहा महिने साधी कैद व प्रत्येकी दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्याला व पालकाला अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी शिक्षकांनाच शिक्षा लागण्याची ही पहिली घटना असल्याचे समोर येत आहे.

मुख्याध्यापिका सिस्टर लिम्नेट जॉन (वय ४८), वर्ग शिक्षिका रुसेरिया सिल्व्हेरा रोझ (वय ४९, दोघी रा. सातारा) अशी शिक्षा लागलेल्या शिक्षिकांची नावे आहेत. या बाबत तृप्‍ती सुशील कंठ (वय ३६, रा. सदरबझार) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली होती.

..........

कास तलाव चौदा फूट भरला

सातारा :

सातारा शहराची लाइफलाइन असणारा कास तलाव चौदा फूट भरला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने दररोज पाणी पातळी पावणेदोन फुटाने वाढत आहे. येत्या चार दिवसांत कास तलाव ओव्हरफ्लो होईल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. पाटबंधारे विभागाचे अभियंता आर. एस. मोमीन म्हणाले, कास तलावाचा पाणी साठा चौदा फूटावर असून, स्केलगेज प्रमाणे ओव्हरफ्लो हा बावीस फुटाचा आहे. येत्या चार दिवसांत कास ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. कास धरण उंचीचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, पुढच्या पावसाळी हंगामात कास तलावाचा पाणीसाठा १०७ दलघमी वरून ४४५ दलघमीवर जाणार आहे. कास धरण उंचीचे काम निधीसाठी रखडले असून, पालिकेकडून साडेतीन कोटी व राज्य सरकारकडून बावीस कोटी, असे पंचवीस कोटी रुपये येणे आहे. हा निधी वेळेत उपलब्ध झाल्यास कास धरणाचे काम फेब्रुवारी २०२०मध्ये पूर्ण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्राम विकास निधीतून कर्ज मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याच्या तक्रारीप्रकरणी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांची बुधवारी सुनावणी झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास हे चौकशी करत आहेत. जिल्हा परिषद सदस्या विद्या पाटील यांचे पती विलास यांनी चार जून रोजी, भालेराव यांच्याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. शिवदास यांनी यापूर्वी विलास पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले. बुधवारी त्यांनी भालेराव यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना चार दिवसात लेखी म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिंदू चौक ते देवल क्लब मार्गावर दुचाकींना प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेली अनेक वर्षे एकेरी असलेल्या बिंदू चौक ते देवल क्लब मार्गावर खासबाग मैदानाकडे ये-जा करण्यासाठी गुरुवार (ता. ४) पासून फक्त दुचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. अन्य रिक्षा, चारचाकी वाहनांना मात्र प्रवेशबंदी कायम राहणार आहे. शहर वाहतूक शाखेने घेतलेल्या या निर्णयामुळे दुचाकीस्वारांना दिलासा मिळाला आहे.

मिरजकर तिकटीहून बिंदू चौकाकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी एकेरी असल्याने बिंदू चौकातून खासबाग, केशवराव भोसले नाट्यगृह, मिरजकर तिकटीकडे जाणाऱ्या दुचाकीधारकांना आझाद चौक, शिवाजी स्टेडियम, टेंबे रोडमार्गे जावे लागत होते. त्यामुळे काही वाहनधारक बिंदू चौक ते करवीर नगर वाचन मंदिरमार्गे छोट्या गल्लीतून बालगोपाल तालीमीकडे निघत होते. हा मध्यवस्ती मार्ग रहिवाशीवस्तीचा असल्याने या वाहनधारकांचा येथील नागरिकांना नाहक त्रास होत होता. त्यांनी या प्रकरणी शहर वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या होत्या. बिंदू चौक ते देवल क्लब मार्ग एकेरी ठेवल्याने करवीर नगर वाचन मंदिर ते सबजेल रोड परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांत वादावादीचे प्रकारही घडले होते. त्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या परवानगीने बिंदू चौक ते देवल क्लब, खासबाग मैदानाकडे जाणाऱ्यांसाठी दुचाकी वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर दुचाकींना जाण्यासाठी हा मार्ग खुला केला आहे. त्यासाठी नागरिकांच्या काही हरकती असल्यास १५ दिवसांत द्याव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कामगार असुरक्षितच

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : डोक्यावर हेल्मेट नाही, धोकादायक कामाच्या ठिकाणी कमरेला सीट बेल्ट नाही, बांधकामाच्या ठिकाणी नेट नाहीत, असे सार्वत्रिक चित्र कोल्हापूरसह शहरासह, उपनगरे आणि जिल्ह्यातील बांधकामांच्या ठिकाणी पहायला मिळते. कामगारांच्या सुरक्षिततेकडे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम कामगार मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत.

बांधकाम उद्योगात सर्वात जास्त असंघटित कामगार आहेत. राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. बांधकाम कामगारांमध्ये गवंडी, सेंट्रिंग, सुतार, प्लंबर, फरशी कामगार, पॉलिश, वेल्डर, पेंटर यांच्यासह १८ कामगारांचा समावेश होतो. राज्यात दोन लाख बांधकाम कामगार असून कोल्हापूर जिल्ह्यात १८ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोल्हापूर शहर व उपनगर परिसरात सहा ते सात हजार कर्मचारी आहेत.

गवंडी, सेट्रिंग, पेंटर, फरशी फिटिंग करणाऱ्या कामगारांसह अन्य कामगारांना प्रशिक्षण दिले जात नाही. मजुरी करतच हे कामगार शिकत असतात. त्यामुळे कामावर सुरक्षितता कशी बाळगावी यांचे त्यांना प्रशिक्षण नसते. पण बांधकामाच्या साईटवरील बिल्डर, इंजिनीअर यांनी सुरक्षिततेचे ज्ञान घेतलेले असते. तसेच कायद्याने बांधकाम कामगारांसाठी कोणती सुरक्षितता बाळगावी याचे नियम आहेत. मोठ्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकाम कर्मचाऱ्यांना हेल्मेट, गमबूट, हॅन्डग्लोव्हज अशी साधने दिली जातात. तसेच बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या नेट बांधल्या जाव्यात असे अपेक्षित आहे. पण अशी सुरक्षितता सर्वच ठिकाणी घेतली जात नाही. त्यामुळे अनेक बांधकाम कामगार वर्षभर जायबंदी होतात. वर्षातून दहा ते कामगार बांधकामावरुन मृत्यूमुखी पडतात. बांधकामावरुन पडणे, विजेचा धक्का बसणे, ट्रॉली डोक्यात पडणे, डोक्यात फळी पडणे अशा घटनामध्ये कामगार जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

बांधकाम कामगारांची सुरक्षितता पाहण्याचे काम जिल्ह्यात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे आहे. या कार्यालयात फक्त तीन निरीक्षक आहेत. ज्या ठिकाणी कामगारांची सुरक्षितता पाळली जात नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकारही त्यांना आहेत. पण या कार्यालयाकडून बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासले जात असल्याने जीव धोक्यात घालून कामगारांच्या जिविताकडे दुर्लक्ष होत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक सुरक्षितता संच वाटण्याचे काम सध्या सुरू आहे. या संचात हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, शूजसह काही साहित्यांचा समावेश आहे. १० तालुक्यातील १४ हजार ८२७ कर्मचाऱ्यांना संच वाटण्याचे काम खासगी संस्थेकडे दिले आहे. सध्या रोज २५० ते ३०० कामगारांना साहित्य वाटले जात आहे. पण हे साहित्य कामगारांपर्यंत पोचते का ही पाहण्याची यंत्रणा नसल्याने या प्रक्रियेत घोटाळा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साहित्याचा वापर करावा यासाठी कामगार कार्यालयाकडून प्रबोधन करण्याचीही गरज आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

आठवड्यात दोन कामगारांचा मृत्यू

तांदूळवाडी (ता. पन्हाळा) येथील मंदिराच्या कळसाचे काम करत असताना ३० फूट उंचीवरुन खाली पडल्याने सुरेश सुतार या तरुण गवंड्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात अंबाई टँक परिसरात राजेंद्र रावत हा कामगार ठार झाला होता. रावत याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार विष्णू निषाद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कामगारांना कोणीच वाली नाही

स्थानिक बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून मदत मिळते. मंडळाकडे कामगाराची नोंदणी झाली असेल तर दुर्घटनेत बळी गेलेल्या कामगाराला दोन लाखांचा विमा मिळतो. तसेच कामगाराच्या कुटुंबाला पाच वर्षे वार्षिक २४ हजार रुपयांची निवृत्त वेतन मिळण्याची तरतूद आहे. पण परराज्यातील कामगारांना त्याचा लाभ मिळू शकत नाही. जिल्ह्यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम येथील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवप्रसादचे ध्येय कलेक्टर होण्याचे

$
0
0

मुलांच्या शिक्षणासाठी धुणीभांडी करत आई करतेय धडपड

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ना खासगी शिकवणी, ना वैयक्तिक मार्गदर्शन, दहा बाय बारा फुटाच्या एका खोलीत आई-बहिणीसोबत वास्तव्य. स्वयंपाक खोलीही तीच आणि अभ्याससुद्धा त्याच ठिकाणी. गरीब कुटुंबातील शिवप्रसाद बसय्या मुगडलीमठ या विद्यार्थ्याकडे शिकण्याची मोठी जिद्द आहे. खासगी शिकवणी, वैयक्तिक मार्गदर्शन यापासून कोसो दूर लांब असलेल्या या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविलेल्या, सातवीत शिकत असताना तलाठी, पीएसआय परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या शिवप्रसादला भारतीय प्रशासकीय सेवेत करिअर करायचे आहे. कलेक्टर होण्याचे त्याचे स्वप्न आहे.

शिवप्रसादच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची वाटचाल ही संघर्षमय आहे. बसय्या व गीता हे पती पत्नी, पंधरा सोळा वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी कोल्हापुरात दाखल झाले. राजारामपुरी तसेच खत्री लॉन परिसरात भाड्याच्या खोलीत संसार थाटला. गेली आठ नऊ वर्षे हे कुटुंब नेहरुनगर दत्त मंदिर परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. शिवप्रसाद सातवीत तर त्याची बहिण गिरिजा चौथीत शिकत असताना वडील बसय्या यांचे निधन झाले.

पतीच्या निधनानंतर कुटुंबांचा सारा भार आई गीता यांच्यावर आला. रहायला भाड्याची खोली, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. आभाळ कोसळल्यासारखी स्थिती निर्माण झालेली. या कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जात गीता यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ तर केलाच शिवाय त्यांच्या शिक्षणावरही लक्ष केंद्रित केले. आपण शिकलो नाही, मुलांनी शिकावं, नाव कमवावं ही त्यांची आंतरिक इच्छा आहे. धुणीभांडी करुन महिन्याला पाच हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. शिवप्रसादचे दहावीचे वर्ष असल्यामुळे त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नयेत म्हणून त्यांनी संबंध वर्षभर आणखी, तीन चार कुटुंबांत धुणीभांडी केली.

सुट्टीत काम करुन वह्या पुस्तके घेतली

शिवप्रसादला आईच्या कष्टाची जाणीव होती. नववीची परीक्षा संपल्यावर त्याने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत खासगी नोकरी केली. दोन महिने काम करुन मिळालेल्या पैशातून दहावीची पुस्तके, वह्या घेतल्या. दहावीच्या अभ्यासक्रमाचे नियोजन केले. नियमित अभ्यास,वाचन, लिखाणावर भर असा स्वयंअध्ययनचा पॅटर्न निश्चित केला. रोज सकाळी वाचन, रात्री दहा ते बारा एक वाजेपर्यंत लिखाण आणि नोट्स काढायच्या. काही शंका आल्यास दुसऱ्या दिवशी शाळेतील शिक्षकांकडून निरसन करुन घ्यायचे. महाराष्ट्र हायस्कूलमधील शिक्षकांनी त्याला नेहमीच प्रोत्साहित केले. त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या नेहरुनगर विद्यामंदिर येथे झाले. शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षेत यश मिळवत चुणूक दाखवली होती.

……………..

कोट

'मुलाने मोठ्या कष्टात शिक्षण घेतले. परीक्षेत त्याने मिळवलेल्या गुणामुळे ऊर भरुन आला. मुलांनी माझ्या कष्टाचे सार्थक केल्याचे समाधान वाटते. मात्र त्याचवेळी त्याच्या शैक्षणिक भवितव्याविषयी चिंता दाटून राहिलीय. कॉलेजचा खर्च कसा पेलणार, हा मोठा प्रश्न आहे.

गीता मुगडलीमठ, आई

………………………………………….........................

'सायन्स शाखेतून अकरावी, बारावी करायचे आहे. बारावीनंतर इंजिनीअरिंग अभ्यासक्रम शिकणार आहे. खरं सांगायचे तर, भारतीय प्रशासकीय सेवेत मला करिअर करायचे आहे. यूपीएससीची परीक्षा देऊन आयएएस व्हायचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी अभ्यास आणि कष्ट करायची माझी तयारी आहे.

शिवप्रसाद मुगडलीमठ, विद्यार्थी

……………………………….................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरीसह सात धरणांची स्थिती धोकादायक

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर :

रत्नागिरीतील धरणफुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील धरणांची सुरक्षा आणि स्ट्रक्चरला ऑडीटचा विषय चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षतेचा प्रश्नही गंभीर असल्याचे चित्र आहे. पाटबंधारे विभागाने केलेल्या मॉन्सूनपूर्व तपासणीत राधानगरीसह सात धरणांतून होणारी गळती गंभीर असून, भराव खचण्याबरोबरच सांडव्याजवळची माती मोठ्या प्रमाणात वाहून जाण्यासारख्या गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाल्यास या धरणांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

चांदोलीतील वारणा धरणाच्या डाव्या आणि उजव्या भिंतीच्या कठड्याला गळती आहे. सांडवाही खचला आहे. त्याचे काम सुरू आहे. दूधगंगा धरणाच्या गेटला २० क्यूसेक्स पाण्याची गळती आहे. उजव्या बाजूच्या कॅनॉलमधील माती प्रमाणपेक्षा मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. तसेच मोठे खड्डेही पडले आहेत. दऱ्याचे वडगाव, मानोली (आंबा), गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी, मेघोली (ता. भुदरगड) या लहान धरणांच्या मुख्य भिंतीला गळती आहे.

राधानगरी धरणाचे बांधकाम दगडामध्ये केले आहे. या धरणाचे स्वयंचलित दरवाजे धोकादायक असल्याचा निष्कर्ष नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेने नोंदवला आहे. धरणात अचानक पाण्याचा लोंढा वाढल्यास स्वयंचलित असल्याने एकाचवेळी सर्व दरवाजे उघडल्यास भोगावती, पंचगंगा नदीकाठावरील गावे बुडतात. म्हणून स्वयंचलित काढून मॅन्युअल दरवाजे बसवण्याचा प्रयत्न वर्षापूर्वी पाटबंधारे प्रशासनाने केला. मात्र स्थानिकांनी धरणाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत दरवाजे बदलण्यास विरोध केला. ते काम प्रलंबित राहिले. धोका कायम राहिला. शिवाय धरणांच्या भितींलाही गळती आहे. ते बंद करण्याचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात चार मोठे, ९ मध्यम आणि ५४ लहान धरणे आहेत. नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेच्या आदेशानुसार या धरणांची मॉन्सूनपूर्व आणि नंतरही तपासणी केली जाते. यावर्षी मे महिन्यातील तपासणीत सात धरणांना गळती वाढली, भिंती खचल्या आहेत. त्यांची दुरूस्तीही सुचवण्यात आली आहे. यातील काही धरणांची गळती काढण्याचे काम केले जात आहे. मात्र भरीव निधी नसल्याने केवळ डागडुजी केली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होऊन अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा दबाव वाढल्यास गळती मोठी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे प्रशासन या धरणांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास गळती राहते. दोन दशकात बांधलेल्या धरणांच्या मुख्य भिंतीस गळती आणि पाझर आहे. ही गळती दिवसेंदिवस वाढतच आहे. धरणाच्या आतील बाजूस आणि भिंतीच्या खाली गळती असल्याने ती पूर्णपणे दुरूस्त करणे अडचणीचे असते, असे पाटबंधारेच्या तांत्रिक विभागाचे मत आहे. पूर्ण क्षमतेने धरण भरल्यास पाण्याचा दबाव वाढून गळती मोठी होऊन धरणाला धोका पोहचतो.

.. . ..

सर्व धरणांच्या स्थितीची तपासणी पावसाळ्याआधी आणि नंतरही केली जाते. यंदा मे महिन्यात तपासणी केली आहे. काही धरणांत त्रुटी आढळल्या आहेत. त्या दूर करण्याचे काम केले जात आहे. मात्र सद्यस्थितीत धरणांना धोका नाही.

रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

.. . .



जिल्ह्यातील मोठे प्रकल्प



मध्यम प्रकल्प

५४

लहान धरणे

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात लवकरच सबजेल सुरु

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यात बंद असलेले सबजेल नव्याने चालू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी राज्यातील सहा महसूल विभागाच्या आयुक्तांसोबत पत्रव्यवहार केला आहे. बंद असलेली सबजेल पुन्हा सुरू होतील. कळंबा कारागृहाच्या विस्तारीकरणाचा प्रस्तावालाही लवकरच मंजुरी दिली जाईल', अशी माहिती कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. त्यांनी बुधवारी कळंबा कारागृहाला भेट दिली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

महासंचालक रामानंद म्हणाले, 'महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्यातील १७२ सबजेलपैकी १२२ सबजेल बंद आहेत. या जेलची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असून प्रांताधिकारी, तहसीलदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून सबजेल बंद आहेत. त्याचा परिणाम मध्यवर्ती कारागृहांवर होत असून क्षमतेपेक्षा कैद्याची संख्या जादा झाली आहे. अधिक संख्या असल्याने कैद्यांवर नजर ठेवली जात नाही. सबजेल सुरु करण्यासाठी आयुक्तांसोबत पत्रव्यवहार झाला आहे. येत्या काही दिवसात सबजेल सुरु होतील. कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी सबजेलची संख्या ७ होती, मात्र सध्या बिंदू चौक येथे एकमेव सबजेल सुरु आहे. त्याचा अतिरिक्त ताण कळंबा कारागृहावर पडत आहे. कळंबा कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता २ हजार आहे. मात्र सध्या २२०२ पुरुष कैदी, ६१ स्त्री कैदी व अन्य असे एकूण २२६५ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैदी झाल्याने कारागृहे हाऊसफुल्ल झाली आहेत. हीच स्थिती राज्यातील अन्य कारागृहांचीही आहे.

...

कर्मचारी आरोग्य तपासणी

'कारागृह प्रशासनाकडून प्रत्येक दोन महिन्याला कारागृह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यासह दर आठवड्याला ड्रील आणि परेड सुरु केली आहे. त्यासह कैद्याच्या गुन्ह्यानुसार पहिला आणि दुसरा वर्ग केला आहे. गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार त्याची रवानगी बराकमध्ये केली जाणार असल्याचेही रामानंद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांना ‘पदनाम’ भोवणार

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : राज्यातील सहा विद्यापीठांतील ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पदनाम बदल करून जादा वेतनश्रेणी घेतली त्यांना सद्य:स्थितीला सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही. पदनाम बदलप्रकरणी 'त्या' कर्मचाऱ्यांचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याने अशी पदे वगळून विद्यापीठ व संलग्न कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याबाबतचे प्रारुप तयार करुन सरकारकडे सादर करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांना दिले आहेत. प्रारूप तयार करण्यासाठी शिक्षण संचालकांच्या अखत्यारित सहाजणांची समिती नेमली आहे. मात्र, सरकारच्या नव्या आदेशामुळे पदनाम बदल प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्यातील पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, जळगाव आणि गोंडावना विद्यापीठ गडचिरोली या सहा विद्यापीठांतील मिळून हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पदांच्या पदनामात बदल करून जादा वेतनश्रेणी घेतल्याचे सरकारच्या लक्षात आले. राज्य सरकारने १७ डिसेंबर २०१८ रोजी आदेश काढून पदनाम बदल प्रक्रिया रद्द करून जादा वेतनश्रेणी वसूल करण्याचे आदेश दिले. दुसरीकडे विद्यापीठ कर्मचारी महासंघाने राज्य सरकारच्या त्या निर्णयाविरोधात औरंगाबाद व नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. पदनाम बदल प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचा दोष नसल्याची भूमिका घेत विविध संघटनांनी याचिका दाखल केल्याने सध्या मुंबई हायकोर्टात एकत्रित सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने, ज्या पदांचा समावेश कोर्टात दाखल याचिकेत आहे अशी पदे व संवर्ग वगळावीत व इतर कर्मचाऱ्यांची पदे व संवर्गांना ७ ऑक्टोबर २००९मधील वेतनश्रेणीशी समकक्ष सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणीबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आहेत.

वेतनाचे प्रारूपसाठी समिती

राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शिक्षण संचालकांच्या स्तरावर समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचे प्रारूप सरकारकडे सादर करावा, असे पत्र उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अवर सचिव विजय साबळे यांनी शिक्षण संचालकांना पाठविली आहेत. समितीत मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलीप भारड, पुणे विभाग सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी डॉ. प्रकाश बच्छाव, शिक्षण संचालनालयातील प्रशासन अधिकारी सुयश दुसाने, तर निमंत्रित सदस्य म्हणून पंढरीनाथ यादव सहायक संचालक शिक्षण संचालनालय लेखा एक, मनोज शिंदे लेखाधिकारी उच्च शिक्षण अनुदाने पुणे विभाग यांचा समावेश आहे. उच्च शिक्षण पुणे येथील वरिष्ठ लिपीक अरविंद भागवत हे समितीत आहेत. समितीची एक बैठक झाली.

शिवाजी विद्यापीठाकडून मागविली माहिती

विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आवश्यक माहिती हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये जमा करावी, अशी सूचना शिक्षण संचालनालय विभागातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी हरिभाऊ शिंदे यांनी केली आहे. यामध्ये आकृतिबंधानुसार वेतनश्रेणी, सात ऑक्टोबर २००९ नुसार दर्शविलेली वेतनश्रेणी, मंजूर आकृतिबंधांचा सरकारी निर्णय अशी माहिती मागविली आहे.

००००

कोट...

पदनाम बदल प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सरकारने शिक्षकेतर पदांच्या आढावा संदर्भातील पदनिहाय प्रस्ताव विद्यापीठाकडे मागविला होता. विद्यापीठाने प्रस्ताव पाठविल्यानंतर सरकारी पातळीवर त्याला मान्यता मिळाली होती. यामुळे कर्मचाऱ्यांनी यामध्ये कसलाही घोळ केला नाही. सातव्या वेतन आयोगासंदर्भात वेतन संरचना कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून लागू कराव्यात. चौथ्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटी सोडवून सातवा वेतन आयोग लागू करावा.

मिलिंद भोसले, महासचिव विद्यापीठ कर्मचारी महासंघ

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जासूद गल्लीतील धोकादायक इमारत उतरवली

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने धोकादायक इमारती उतरवण्याची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवली. बुधवारी जासूद गल्ली (मंगळवार पेठ) येथील दत्तात्रय शंकर चिले यांच्या इमारतीचा धोकादायक भाग कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केला. वांगीबोळ येथील इमारतीबाबत न्यायालयीन वाद असल्यामुळे पथकाला कारवाईविना माघारी परतावे लागले.

धोकादायक इमारती उतरवण्याबाबत प्रशासनाने यापूर्वी मिळकतदारांना नोटिसा बजावल्या आहेत. तरीही अनेक मिळकतदारांनी धोकादायक इमारती अथवा इमारतींचा भाग उतरवून घेतलेला नाही. परिणामी इमारतीमधील व परिसरातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सद्य:स्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने हा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी बिंदू चौक परिसरातील चार इमारतींचा धोकादायक भाग उतरवल्यानंतर बुधवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्यावतीने कारवाई करण्यात आली. मंगळवार पेठ जासूद गल्ली येथील दत्तात्रय चिले यांच्या इमारतीचा धोकादायक भाग कर्मचाऱ्यांनी काढून टाकला. त्यानंतर पथक वांगीबोळ येथील श्रीपाद दत्तात्रय पंडितराव यांच्या इमारतीवर कारवाई करण्यास गेले. पण इमारतीबाबत न्यायालयीन दावा सुरू असल्याने पथकाला कारवाईविना परतावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाळीस टक्के बांधकामास स्थगिती देऊ

$
0
0

मटा इम्पॅक्ट ....लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'औद्योगिक वसाहतींमधील भूखंडावर चाळीस टक्के बांधकाम करण्याच्या निर्णयास लवकरच स्थगिती देऊ व पुढील सुधारित निर्णय घेताना उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करूनच निर्णय घेऊ,' असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसीने) २१ जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील उद्योजकांना त्यांच्याकडे असलेल्या जागेच्या ४० टक्के बांधकाम करण्याची सक्ती करण्यात आली होती. या निर्णयाला राज्यातील सर्व उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंत्रालयामध्ये उद्योगमंत्री देसाई यांच्यासमवेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासमवेत विशेष बैठक झाली. यावेळी देसाई यांनी वरील आश्वासन दिले.

चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले, 'राज्यातील छोट्या व मध्यम तसेच मोठ्या उद्योगांनासुद्धा या निर्णयामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. उद्योगांची सध्याची परिस्थिती पाहता नवीन गुंतवणूक करणे उद्योगांना शक्य नाही. तसेच ज्या जमिनीवर कोणताही उद्योग उभारला गेला नाही अशा जमिनी सरकारने प्राधान्याने परत घ्याव्यात, ज्या ठिकाणी लहान अथवा मोठ्या स्वरूपात उद्योग प्रत्यक्षात कार्यरत आहेत, अशा उद्योगांना हा नियम लावणे अयोग्य आहे तरी या निर्णयास स्थगिती द्यावी.'

महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी एसईझेड अथवा अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी जर वापरात येत नसतील तर त्या जमिनींबाबत प्राधान्याने विचार करावा. सध्याच्या उद्योजकांना हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी केली..

मंत्री देसाई यांनी या निर्णयामुळे उद्योजकांना त्रास होणार असेल तर नक्कीच या निर्णयाचा फेरविचार केला जाईल व यासंबंधी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या परिपत्रकाला स्थगिती देऊ, असे आश्वासन दिले.

यावेळी माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर व अन्य उद्योजकांनी वीज दरासंबंधी चालू असलेल्या आंदोलनाची माहिती देऊन यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागातील उद्योगांना वीजदरात सवलत मिळाली पाहिजे, या मागणीशी आपण सहमत आहे असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. तसेच यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी महाराष्ट्र चेंबरच्या ट्रस्ट बोर्डाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, गोशिमाचे संचालक चंद्रकांत जाधव, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, फाउंड्री असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चौगुले, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे प्रदीप वरंबळे, 'आईमा नाशिक' चे विजय जोशी, 'निमा नाशिक'चे मिलिंद रजपूत, देवेंद्र दिवाण, चेंबरचे सचिव सागर नागरे उपस्थित होते.

..............

फोटो कॅप्शन

उद्योगांना चाळीस टक्‍के बांधकामाची सक्ती करू नये, या मागणीचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना देताना चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, ललित गांधी, आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, संजय शेटे, चंद्रकांत जाधव, राजू पाटील, हर्षवर्धन धोत्रे सुमित चौगुले मिलिंद राजपूत आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाहेरगावच्या मतदारांसाठी फिल्डींग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आता सर्वच इच्छुकांनी मतदार शोधून त्यांच्याशी संपर्क मोहिम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार यादीतील नाव कोल्हापूर जिल्ह्यात पण रहायला मुंबई व पुण्यासह इतर शहरात असलेल्या दोन लाखांवर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे.

ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. केवळ तीन महिन्याचा अवधी असल्याने इच्छुकांनी आतापासूनच हळूहळू प्रचारास सुरूवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मतदार संघातच प्रचार केला जातो. कारण एकेका मतदारसंघात शंभरावर गावे असल्याने प्रत्येक गावात मतदारांना भेटणे आवश्यक असते. त्यामुळे ज्या मतदारांची नोंद गावात आहे, पण ते बाहेरगावी वास्तव्य करत आहेत, अशांना भेटण्याची मोहिमच सुरू आहे. त्यासाठी मेळावे घेण्यास सुरूवात झाली आहे.

शाहूवाडी, राधानगरी, चंदगड व कागल मतदारसंघातील दोन लाखांवर मतदार मुंबई, पुणे, इचलकरंजी, गोवा यासह विविध शहरात राहतात. या सर्वांची नावे त्यांच्या गावातील मतदारयादीत आहेत. त्यामुळे त्यांना भेटून प्रचार सुरू केला आहे. शाहूवाडी मतदारसंघातील हे मतदार मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. हे मतदार पन्नास हजारांपेक्षा जास्त असल्याने निकालावर परिणाम करणारा हा आकडा आहे. यामुळे येथून इच्छूक असलेले माजी आमदार विनय कोरे व आमदार सत्यजित पाटील यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

कागल मतदारसंघातील तीस हजारांवर मतदार बाहेर आहेत. त्यामध्ये मुंबईत पंधरा हजार, पुण्यात दहा हजार तर इचलकरंजीत पाच हजार मतदार आहेत. याशिवाय राज्याच्या विविध भागात हे मतदार विखुरले आहेत. या मतदारसंघातून आमदार हसन मुश्रीफ व पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे इच्छूक आहेत. घाटगे यांनी मुंबईत मेळावा घेतला. मुश्रीफ यांनी देखील पुणे व मुंबईत स्वतंत्र मेळावे घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. चंदगड मतदारसंघातील चाळीस हजारावर मतदार बाहेर आहेत. शिवसेनेच्या वतीने लढण्यासाठी इच्छूक असलेले संग्राम कुपेकर यांनी मेळावे घेऊन प्रचार सुरू केला आहे.

राधानगरी मतदारसंघातील तीस हजारावर मतदार मुंबईत होते. पण तालुक्यात पाण्याची सोय झाल्यानंतर यातील बहुसंख्य मतदार गावी परतले. आता ही संख्या कमी झाली आहे. तरीही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची यंत्रणा सुरूच आहे. चंदगड, शाहूवाडी, कागल व राधानगरी वगळता इतर सहा मतदारसंघातील मतदारही बाहेरगावी आहेत. पण त्यांची संख्या फारच कमी आहे. यामुळे येथून इच्छूक असलेले उमेदवार त्यासाठी फार मोठी फिल्डींग लावत नाहीत.

..........

कोट

' कागलची लढाई नेहमीच चुरशीची असते. त्यामुळे एकेक मतासाठी प्रयत्न करावे लागतात. तीस हजारावर मतदार बाहेर असल्याने सहा महिन्यांपासूनच त्यांच्याशी संपर्क यंत्रणा राबवली जाते. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई व पुण्यात मेळावे घेतले.

हसन मुश्रीफ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखो नेत्रांनी अनुभवला उभा रिंगण सोहळा

$
0
0

लाखो नेत्रांनी अनुभवला उभा रिंगण सोहळा

चांदोबाचा लिंब येथे रंगले पहिले उभे रिंगण

अतुल देशपांडे, सातारा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबद्ध उभी रांग.., माउलींच्या अश्वांनी घेतलेली दौड.., दिंडीतील वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका.., टाळ-मृदंगांच्या गजरात रंगलेल्या फुगड्या अन् हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारीच्या वाटेवरच्या पहिल्या उभ्या रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा चांदोबाचा लिंब येथे उत्साहात पार पडला. हरी नामाच्या गजरात दुमदुमते आसमान व वरुण राजाचा हलका शिडकावा या अल्हाददायी वातावरणात लाखो नेत्रांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. आज, गुरुवारी पालखी सोहळा फलटण नगरीत प्रवेश करणार आहे. दरम्यान, या रिंगण सोहळ्यात स्थानिक कार्यकर्त्यांमुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाले आहेत.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथील मध्यान्ह आरती झाल्यानंतर बुधवारी दुपारी दीड दिवसाच्या मुकक्कामानंतर हरिनामाच्या गजरात तरडगाव मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. माउलींचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. फलटणच्या कापडगाव येथील सरदेचा ओढा येथे माउलींचे स्वागत फलटण तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर आदी मान्यवरांनी स्वागत केले. पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलभक्तांना वेध लागले होते ते या सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची व भाविकांची पावले लगबगीने चांदोबाच्या लिंब या दिशेने पडत होती. हा सोहळा जसा पुढे पुढे सरकत होता, तस तसे रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता. रस्त्याकडील शेतामध्ये ठिकठिकाणी भारुडे, भजने रंगली होती. भारुडात रंगत येत असतानच सोहळा पुढे सरकत चांदोबाचा येथे आला. या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक भक्त व वारकऱ्यांनी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दरम्यान, माउलींचा रथ चांदोबाचा लिंब येथे आला तेव्हा गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत होता. अखेर पालखी सोहळ्यातील बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सूचना न देता वारकऱ्यांच्या गर्दीतील लाखो वारकरी दुतर्फा झाले व मध्ये अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. रिंगण लावून घेतल्यानंतर रथाच्या पुढील २७ दिंड्यांमधून माउलींचा अश्‍व पुजाऱ्यांनी दौडत आणला. माउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्‍व मागील दिंड्यापर्यंत नेल्यांनतर पुन्हा परत माघारी पळत आला. माउलींच्या रथाजवळ अश्‍व आल्यांनतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबऱ्याचा नैवद्य दाखविला. या नंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माउलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व, अशी दौड पूर्ण झाली. अश्वास प्रत्यक्ष माउलींचा आशिर्वाद असतो, या भावनेने अश्व ज्या ठिकाणाहून गेला आहे, तेथील त्याच्या पाया खालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. अशा प्रकारे पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. यानंतर पालखी सोहळा तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी तरडगाव येथील पालखी तळावर एकदिवसाच्या मुक्कामाकरिता विसावला.

.......

सर्व फोटो अतुल देशपांडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिधोकादायक कैद्यांना अंडासेलमध्ये पाठवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कारागृहात मारामारी, खुनासारख्या गंभीर घटना रोखण्यासाठी अतिधोकादायक कैद्यांना अंडासेलमध्ये ठेवण्याच्या सूचना राज्याचे कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांना दिल्या. त्यांनी कारागृहाची पाहणी करुन अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याबाबत आदेश दिले.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या परमेश्वर ऊर्फ देवा नानासाहेब जाधव (वय २४, रा. कोळेगाव, सोलापूर) या कैद्याने दगड डोक्यात घातल्याने कैदी सुनील मारुती माने (वय ३८, रा. नातेपुते, ता. माळशिरस, सोलापूर) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे आणि भक्कम कारागृह म्हणून कळंबा कारागृहाकडे पाहिले जाते. या ठिकाणी खुनाचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी महासंचालकानी बुधवारी कारागृहाची पाहणी केली. त्यांनी भविष्यात अशा प्रकारच्या गंभीर घटना रोखण्यासाठी अतिधोकादायक कैद्यांना अंडासेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर कारागृहात चोवीस तास कडा पहारा ठेवण्याचे व कारागृहात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तिची तपासणी करुनच सोडण्याचे आदेश दिले. तसेच यापुढे सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरल्यास संबधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

...

कायमस्वरुपी डॉक्टरासाठी प्रयत्न

कारागृहात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्यास काही डॉक्टर नापसंती दर्शवितात. कैदी गंभीर आजारी पडल्यास त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागते. कारागृहासाठी कायमस्वरुपी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासह प्रत्येक कैद्याला महिन्याला दिल्या जाणाऱ्या ३५०० रुपयांच्या भत्त्यात एक हजाराची वाढ केली आहे.

...

कळंब्यातून १०० प्रस्ताव

बंदिस्त व खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असणाऱ्या ज्या कैद्यांच्या वर्तनात सुधारणा झाली आहे, त्या कैद्यांना शिक्षेत सूट मिळण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविले आहेत. राज्यात ५०० हून अधिक प्रस्ताव पाठविले असून त्यापैकी १०० प्रस्ताव कळंबा कारागृहाचे आहेत. त्यासह राज्यातील कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या अधिक आहे. त्यांना किरकोळ कारणामुळे जामीन मिळत नाही. जिल्हा प्राधिकरण किंवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जामिनासाठी प्रयत्न केल्यास कारागृहावरील ताण कमी होईल. त्यासाठी नियोजन सुरु असल्याचे रामानंद यांनी सांगितले.

...

देवा जाधवला आज अटक करणार

आरोपी देवा जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या मोक्काखाली शिक्षा भोगत आहे. त्याला अटक करण्यासाठी मोक्का कोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. त्याला गुरुवारी (ता. ४) अटक केली जाणार असल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. महासंचालक रामानंद यांच्यासोबत कैदी खून प्रकरणाच्या घटनास्थळाची पाहणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच अनधिकृत फलकांवर कारवाई करा

$
0
0

कोल्हापूर

'महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई करुन गुन्हे दाखल केले जात आहेत. प्रशासनाकडून होत असलेली कारवाई पक्षपातीपणाची असून सर्वच अनधिकृत फलकांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत,' अशी मागणी अॅड. चारुलता चव्हाण यांनी बुधवरी निवेदनाद्वारे केली.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना जाहिरात फलक लावले जातात. याद्वारे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने अशा अनधिकृत फलकांवर कारवाई करुन संबंधितावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र अशी कारवाई करताना प्रशासनाकडून पक्षपातीपणा होत आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी वाढदिवस, शुभेच्छा फलक लावले आहेत. पण कारवाई केवळ खासगी क्लासेसवर केली जात आहे. शहराचे विद्रुपीकरण केवळ याच फलकांवरुन होत नसून सर्वच फलकांमुळे होत आहे. त्यामुळे सर्वच अनधिकृत फलकांवर कारवाई करुन शहराचे विद्रुपीकरण रोखावे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images