Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोस्ट पेमेंट बँकेत तीन कोटींच्या ठेवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बँकिंग व्यवस्था ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय डाक सेवेच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची स्थापनी केली. सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झालेल्या बँकेमध्ये जिल्ह्यातील सव्वा लाख खातेदारांनी तीन कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. जिल्हा पोस्ट कार्यालयाने पार केलेला ठेवीचा टप्पा देशातील सर्वोत्तम ठरला आहे,' अशी माहिती शनिवार पेठ पोस्ट कार्यालयाचे पोस्ट मास्तर पी. आर. कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कुलकर्णी म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सप्टेंबर २०१८ मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची घोषणा केली. त्यासाठी देशात सर्वाधिक ग्राहक असलेल्या भारतीय डाक सेवा विभागाची निवड केली. ग्रामीण भागातील खातेदारांना बँकिंग प्रणालीशी जोडणे हा उद्देश होता. जिल्ह्यात सुरू झालेल्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये सव्वा लाख खातेदारांनी आपले खाते सुरू केले. त्याद्वारे बँकेत तीन कोटींच्या ठेवी जमा झाला आहेत. देशातील इतर जिल्ह्यांतील पोस्ट कार्यालयांपेक्षा कोल्हापूर पोस्ट कार्यालयामध्ये जमा झालेल्या ठेवी इतर पोस्ट कार्यालयापेक्षा सर्वोत्तम आहेत. याची दखल घेत बँकेचे व्यवस्थापकांनी जिल्हा प्रवर अधिक्षक आय. डी. पाटील यांचा गौरवही करण्यात आला.'

'डिजीटल सेवा अल्प व वेगवान करण्याचा मानस पोस्ट विभागाचा आहे. याद्वारे जास्तीतजास्त डिजीटल सेवा देण्यावर भर असेल. 'बँक तुमच्या दारी' संकल्पनेद्वारे खातेदारांना घसबसल्या पैसे जमा व काढणेही सुलभ प्रक्रिया राबवण्यात येणार आहे,' असे कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँक ऑफ बडोदाची २३ कोटींची फसवणूक

$
0
0

सांगली ः बँकेला कर्जतारण असलेला कोल्ड स्टोअरेजमधील हळद आणि बेदाणा साठा परस्पर विक्री करुन बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेची २३ कोटी १२ लाख ७४ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य शाखा प्रबंधक विजयकुमार यज्ञानंद उपाध्याय यांनी दहाजणांविरोधात शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयितांमध्ये मुंबईच्या नरीमन पॉइंटमधील सीएनएक्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती निरुपमा पेंडुरकर यांचा समावेश आहे.

बँक ऑफ बडोदाच्या येथील मुख्य शाखेतून कोल्ड स्टोअरेजमधील बेदाणा आणि हळद तारण घेऊन संबधित शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. कर्जदार शेतकरी, कोल्डस्टोअरेज चालक आणि बँक यांच्यात सीएनएक्स मध्यस्थ आहे. कर्ज परतफेडीचे हप्ते कर्जदार शेतकऱ्यांकडून येणे बंद झाल्याने बँकेने पाहणी केली असता कोल्डस्टोअरेजमध्ये माल नव्हता. त्यानंतर बँकेने सीएनएक्सच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे बँकेने पोलिसांत धाव घेतली.

फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी श्रीमती पेंडुरकर यांच्यासह अजित नारायण जाधव (रा. हसने आश्रमजवळ), दीपक मधुसुदन गुरव (साई अॅग्रोटेक कोल्ड स्टोअरेज, कवठेएकंद आणि राधाकृष्ण अॅगोटेक चिंचणी), पवनकुमार आदीनाथ चौगुले (लक्ष्मी अॅग्रोटेक, कवठेएकंद), लखनगोंडा जिगोंडा पाटील (रा. शेडबाळ, ता. अथणी, साई कोल्ड स्टोअरेजचा भागीदार), रुपाली वृषभनाथ शेडबाळे (मालगाव, मिरज), प्रद्युम्न बाळगोंडा पाटील (वसगडे, अभ्युदय कोल्ड स्टोअरेज), राहुल दिनेश मित्तल (बी. एल. कोल्डस्टोअरेज, कवठेएकंद), अनिता पारीसा सुगन्नावर (गोमटेश कोल्डस्टोअरेज), जयपाल बाबू शिरगावे (रा. गणेशवाडी, शिरोळ, लक्ष्मीअॅग्रोटेक) आदींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

०० ०० ० ० ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 22

मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत सहा गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनधिकृतपणे जाहिरात, होर्डिंग्ज करणाऱ्या सहा वैयक्तिक व संस्थांवर मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यातंर्गत महापालिकेच्या इस्टेट विभागाने गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे शहरातील ऐतिहासिक इमारती होर्डिंग्जच्या विळख्यातून सुटण्याच्या आशा पल्लवीत झाला आहेत.

इस्टेट विभागाच्यावतीने २८ जूनपासून विनापरवाना जाहिरात फलक, पोस्टर्स, होर्डिंग्ज व बॅनर्स काढून जप्त करण्यात येत आहेत. केवळ जप्तीची कारवाई न करता विनापरवाना जाहिरातबाजी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी बिंदू चौक येथील जोशी वडेवाले, शैलेश जोशी, सिद्धाळा गार्डन जवळील ऊर्जा अॅकॅडमी, बेकर गल्लीतील फिजिक्स क्लासेस, व्ही. बी. चौगले यांचा बायोलॉजी क्लासेस, दाभोळकर कॉर्नर येथील साईलक्ष्य अॅकॅडमी, नागाळा पार्क येथील आर. एम. मोहिते, फोर्ट इंटरनॅशनल अॅकॅडमी या व्यक्ती व संस्थावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, तात्पुरत्या स्वरुपातील डिजिटल फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स लावण्यापूर्वी संबंधितांनी विभागीय कार्यालयातून परवानगी घ्यावी, असे आवाहन इस्टेट विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडीची औपचारिकता

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या ४८ व्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका माधवी प्रकाश गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. मंगळवारी झालेल्या विशेष सभेत पीठासन अधिकारी तथा सभाध्यक्ष अमन मित्तल यांनी गवंडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड जाहीर केली. राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात सभा झाली. निवड झाल्यानंतर महापौरांच्या समर्थकांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये जल्लोष साजरा केला.

शुक्रवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याऐवजी गवंडी यांच्या गळ्यात महापौरपदाच्या उमेदवारीची माळ पडली. त्यांना उमेदवारी जाहीर होताच विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने महापौरपदासाठी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी गवंडी यांची बिनविरोध निवड होण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांची औपचारिक घोषणा महापालिकेच्या विशेष सभेत पीठासन अधिकारी मित्तल यांनी केली.

तत्पुर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयातून आराम बसमधून सभेला उपस्थित झाले. गवंडी यांनी तिरंगी फेटा व पक्षाचा स्कार्प घालून सभागृहात प्रवेश केला. सभेची वेळ ११ वाजता असूनही त्यानंतर काही नगरसेवक सभागृहात प्रवेश करत होते. महापौर निवडीला मतदान होणार नसल्याने सदस्यही निवांत होते. कोरम पूर्ण झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून निवडीवर हरकत नोंदवण्यासाठी पाठीसन अधिकाऱ्यांनी १५ मिनिटांचा अवधी दिला. या दरम्यान कोणतीही हरकत न आल्याने त्यांनी गवंडी यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी गवंडी यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यानंतर गवंडी यांच्या समर्थकांनी महापालिका चौकात ढोल ताशांच्या गजरात गुलाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. मधुरिमाराजे छत्रपती व भगनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी नूतन महापौरांचा त्यांच्या दालनात सत्कार केला. त्यानंतर जीपमधून पंचगंगा प्रभागातून मिरवणूक काढण्यात आली. निवडीपूर्वी पंचगंगा तालीम प्रभागातील सर्व ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक गुलाबी फेटे परिधान करून मुख्य इमारतीसमोर आले होते. गवंडी यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर सर्वजण महापालिका चौकात आले. युवक गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला.

२०१३ नंतर प्रथमच बिनविरोध निवड

ताराराणी आघाडीवतीने उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने महापौरपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका गवंडी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे शुक्रवारी अर्ज दाखल करताना स्पष्ट झाले होते. गेल्या दहा वर्षांत २०१३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता राऊत यांची बिनविरोध निवड झाली होती. सहा वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. प्रत्येक महापौर निवडी दरम्यान फोडाफोडीचे प्रकार होतात. परिणामी कोट्यवधी रुपये दिल्याच्या चर्चा झडतात. या पाच वर्षांत दर सहा महिन्याला महापौर निवडी दरम्यान कमालीची ईर्ष्या निर्माण होत होती. पण आजच्या निवडणुकीत ईर्ष्या दिसून आली नाही.

दिलेला शब्द पाळला

पंचगंगा तालीम प्रभाग सर्व साधारण महिला राखीव प्रवर्गासाठी राखीव होता. यापूर्वी प्रकाश गवंडी यांनी प्रभागाचे प्रतिनिधित्व केले असले, तरी २०१५ च्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली होती. आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर ते पत्नी माधवी यांनी निवडणूक रिंगणात उतरवण्यास तयार झाले. चर्चे दरम्यान आनंदराव गवंडी यांचे स्वप्न साकार करण्याच्या शब्द त्यांनी दिला होता. याची आठवण त्यांच्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक निवडीनंतर करून देत होते.

अनेक नगरसेवक गैरहजर

महापौर निवड बिनविरोध होणार असल्याने अनेक नगरसेवकांनी निवड सभेकडे पाठ फिरवली. तर अनेक नगरसेवक राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी काही मिनिट अगोदर उपस्थित राहिले. महापौर निवडी दरम्यान मतदान होणार नसल्याने नगरसेवकांची उपस्थिती कमी असल्याची चर्चा महापालिका चौकात सुरू होती. निवड बिनविरोध असल्याने नेहमीप्रमाणे तणाव किंवा उत्साहाचे वातावरण दिसून आले नाही.

अॅड. लाटकर सर्वप्रथम सभागृहात

महापौरपदाने सलग दोनवेळा हुलकावणी दिल्याने अॅड. सूरमंजिरी लाटकर नाराज असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून होती. अॅड. लाटकर आणि गवंडी या दोघींची मैत्री घट्ट असल्याचा प्रयत्य आजच्या सभेत आला. पण आजच्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच प्रथम त्यांनी सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर इतर नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. निवडीनंतर त्यांनी गवंडीचे अलिंगन देऊन अभिनंदन केले. सभागृहाने लाटकर व गवंडी यांच्यातील मैत्री नेहमीच अनुभवली आहे. उमेदवारी जाहीर होताना प्रचंड राजकीय घडामोडी सुरू असताना या दोघी नेहमी एकत्र दिसत होत्या. उमेदवारीनंतरही या दोघींतील मैत्री कायम दिसून आली.

आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे महापौरपदाची संधी मिळाली. महापौरपदाच्या कालावधीत काळम्मावाडी थेट पाइपलाइन, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि राजर्षी शाहू समाधीस्मारक कामाच्या पूर्णत्वाला प्राधान्य दिले जाईल. तसेच शहर आणि उद्याने स्वच्छ करण्यावर भर देण्यात येणार आहे.

माधवी गवंडी, नूतन महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. मध्ये घंटानाद आंदोलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेतील विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी घंटानाद करत निदर्शने केली. मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन झाले.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन कोल्हापूर जिल्हा शाखा, लिपिकवर्गीय संघटना, ग्रामसेवक संघटना, लेखा संघटना आणि शिक्षक संघटनेचा समावेश होता. कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष महावीर सोळांकुरे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. सोळांकुरे, कृष्णात किरुळकर, निलेश म्हाळुंगेकर, फिरोजखान फरास, किरण निकम, कृष्णात कारंडे, नामदेव रेपे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आंदोलन झाले. कर्मचाऱ्यांनी 'हम सब एक है, आमच्या मागण्या मान्य करा' अशी घोषणाबाजी केली. मागण्याबाबत चालढकल केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

सरकारकडून कर्मचाऱ्यांशी निगडीत २९ मागण्यांची सोडवणूक झाली नाही. सातवा वेतन आयोगांतर्गत जानेवारी ते मे २०१९ या कालावधीचा पगार रोखीने या महिन्याच्या वेतनाबरोबर मिळावे, लिपिक, लेखा, परिचर वाहन चालक, आरोग्य व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पेमध्ये सुधारणा व्हावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात अमोल घाटगे, जितेंद्र वसगडेकर, अण्णासाहेब दिंडे, संजय पुजारी, राजीव परीट आदींचा समावेश होता. आंदोलनात महिला कर्मचारी सहभागी झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४४ टक्के डॉक्टर तणावाखाली

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर

वाढती रुग्णसंख्या, अपुरे कर्मचारी, कामाचा अतिरिक्त ताण, रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना यामुळे डॉक्टरांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांत वाढ होत असून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरानांच मनोविकारांचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ४४ टक्के डॉक्टर तणावाखाली असल्याचे आढळले आहे. तर १५ टक्के डॉक्टरांना तीव्र नैराश्याला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये सर्वाधिक ५९ टक्के महिला डॉक्टरांचा समावेश आहे. तर ३९ टक्के पुरुष डॉक्टर तणावात आहेत.

नॅशनल फिजिशियन बर्नआउट डिप्रेशन अँड सुसाईड रिपोर्टसाठी घेण्यात आलेल्या डॉक्टरांच्या मानसिक आरोग्य सर्वेक्षणात २९ विषयांतील १५ हजार डॉक्टरांनी सहभाग घेतला. विविध सर्जरी करणाऱ्या तज्ज्ञांच्या तणावात २३ टक्क्यांहून ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिकीकरण वेगाने होत असताना मानसिक ताणतणावाला समाजातील सर्वच घटकांना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागत आहे. शाळकरी मुले, तरूण, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, पत्रकार अशा विविध घटकांत काम करणाऱ्यांना मानसिक तणाव झेलावा लागत आहे. वैद्यकीय शिक्षणावर होणारा अमाप खर्च, करिअरचा ग्राफ उंचावताना होणारी घुसमट, तुटपुंज्या सोयीसुविधा, औषधांची उपलब्धता नसणे आणि रुग्ण दगावल्यास नातेवाईकांकडून होणारे जीवघेणे हल्ले अशा कात्रीत सापडलेल्या डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर आघात होत आहे.

...

या वैद्यकीय तज्ञांचा समावेश

सर्वाधिक तणावाखाली असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये युरोलॉजिस्ट ५४ टक्के, न्यूरोलॉजिस्ट ५३, फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिएशन स्पेशालिस्ट ५२, इंटर्नल मेडिसिन ४९, एमर्जन्सी मेडिसिन तज्ज्ञ ४८, फॅमिली मेडिसिन तज्ज्ञ ४८, डायबेटीस स्पेशालिस्ट ४७, सर्जरी व जनरल तज्ज्ञ ४६ टक्के, गायनाकॉलॉजिस्ट ४५, रेडिओलॉजिस्ट ४५ टक्के यांचा समावेश आहे. तणावाचे सर्वात कमी प्रमाण आय स्पेशालिस्ट, प्लॅस्टिक सर्जन, नेफ्रोलोजिस्ट यांच्यात आढळून आले आहे.

...

तणावामागील कारणांचा शोध

सर्वेक्षणात मानसिक तणावामागील कारणांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ६० टक्के डॉक्टरांना इतर कामात गुंतवले जाते. तर ३४ टक्के डॉक्टर कामाच्या ठिकाणी सर्वाधिक वेळ उपस्थित असतात. कामावर होणारा अनादर ३० टक्के, वेतन कमी मिळणे २९ टक्के आणि रुग्णांकडून मिळणारी चुकीची वागणूक १६ टक्के ही मुख्य कारणे आढळून आली आहेत. ताणामुळे ४२ टक्के डॉक्टर स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवतात. ताणतणाव कमी करण्यासाठी ४८ डॉक्टर व्यायाम तर ४३ टक्के कुटुंब-मित्रपरिवाराशी संवाद साधतात. ३९ टक्के जण झोपण्यास प्राधान्य देतात तर खेळणे, संगीत याचा वापर ३२ टक्के डॉक्टर्स करतात. १४ टक्के डॉक्टरांनी मनात आत्महत्येचा विचार येऊन गेल्याचे सांगितले आहे. तर ८० टक्के डॉक्टरांनी असे विचार येत नसल्याचे सांगितले. सहा टक्के डॉक्टरांनी उत्तर देण्यास नकार दर्शविला. फक्त १३ टक्के डॉक्टर ताणतणावावर तज्ज्ञांची मदत घेतात.

.......

कोट:

'डॉक्टर व रुग्ण यांच्यातील गुणोत्तर प्रमाण भिन्न आहे. त्यामुळे डॉक्टरांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. उपचाराबाबत रुग्णांच्या डॉक्टरांकडून अपेक्षा वाढल्या असून आजाराबाबतची वस्तुस्थिती स्वीकारली जात नाही. त्यातून अनुचित घटना घडतात. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक व डॉक्टर्स यांच्यात समन्वय व संवाद हवा.

डॉ. पवन खोत, मानसोपचार तज्ज्ञ, सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी आधार केंद्रे निराधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी कार्यालयातील आधार केंद्रे दोन महिन्यांपासून विविध कारणांनी बंद झाली आहेत. तेथील अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने केंद्रच निराधार बनले आहेत. परिणामी सामान्यांना खासगी केंद्रात नवे आधार कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे, पत्ता, नावांतील दुरूस्तीसाठी मागेल तितके पैसे द्यावे लागत आहेत. याकडे महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून सर्व सरकारी कार्यालयात आधार केंद्र सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

पोष्ट कार्यालय आणि काही राष्ट्रीयकृत बँकांत आधार केंद्रे आहेत. याशिवाय १०५ खासगी व्यक्तींना नविन आधार कार्डसाठी आणि दुरूस्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचा परवाना देण्यात आला आहे. सर्वच केंद्रांत नवीन आधार कार्ड काढण्यासाठी अर्ज भरून घेणे मोफत तर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक बदलणे, दुरूस्त करण्यासाठी ५० रूपये शुल्क आकारणी केली पाहिजे. प्रत्यक्षात खासगी केंद्रात दुप्पट, तिप्पट पैसे घेतले जातात. नव्या 'आधार'साठी २०० ते ३०० रूपये घेतले जात आहेत. याला चाप लावण्यासाठी सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागानेच सर्व आधार केंद्रे सरकारी कार्यालयांच्या आवारात सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गडहिंग्लज, गगनबावडा, कागल, हातकणंगले येथील तहसील कार्यालयात केंद्र सुरू करण्यात आले. तेथे सामान्यांची लूट होण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र केंद्रात मूलभूत सुविधा देणे, अत्याधुनिक संगणक, प्रिंटर, थंब यंत्र नसल्याच्या तक्रारी वाढल्या. त्याकडे संबंधित कार्यालयातील वरिष्ठांनी वेळीच लक्ष दिले नाही. परिणामी सरकारी केंद्रांना कुलूप लागले. तेथील केंद्रचालक आपल्या खासगी आधार केंद्रावरून अर्ज भरून देत पैसे कमवत आहे.

.....

लालफितीत फाइली

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ३, जिल्हा परिषदेत २, प्रत्येक तहसील, पंचायत समितीत प्रत्येकी एक, महानगरपालिकेत ५, सर्व नगरपालिकांत २, ग्रामपंचायतीत १ आधार केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातच प्रलंबित आहेत. अनेक महिन्यांपासून प्रस्ताव लालफितीत अडकण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

...

कोट

'आधार'साठी आवश्यक संगणक, प्रिंटर, थंब यंत्र अत्याधुनिक नसल्याने सरकारी कार्यालय परिसरातील अनेक आधार केंद्रे बंद झाली आहेत. पुन्हा ती सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

जयंत पाटील, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, आयटी विभाग

---------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाल्यांचा सर्व्हे

$
0
0

कोल्हापूर

शहरात पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) नियम २०१६ नुसार पथविक्रेत्यांच्या (फेरीवाला) सर्वेक्षणाचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरु आहे. सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात असून फेरीवाल्यांची कागदपत्रे सिस्टिममध्ये अपलोड केली जात आहेत. अद्याप ज्या फेरीवाल्यांनी आपला सर्व्हे करून घेतलेला नाही, त्यांनी १५ जुलैपर्यंत महापालिकेच्या इस्टेट विभाग येथे संपर्क साधून सर्व्हे पूर्ण करुन घ्यावा लागणार आहे. त्यानंतर सर्व्हेचे काम थांबवण्यात येणार आहे. मुदत संपण्यापूर्वी फेरीवाल्यांनी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन इस्टेट विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा मिळकतदारांकडून खर्च वसूल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुख्य रस्ते स्वच्छ करुन कंटेनर सभोवतालचा कचरा तातडीने उठाव करा. त्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करा. खासगी जागांतील स्वच्छता करण्यासाठी मिळकतदारांना नोटिसा द्या. नोटिशीनंतरही स्वच्छता न केल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करुन संबंधितांकडून खर्च वसूल करा,' असे निर्देश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाला दिले.

गेल्या चार दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थितीसह आरोग्य सेवेची आढावा बैठक आयुक्तांनी ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात घेतली. नालेसफाई, स्वच्छ भारत अभियान, ओडीएफ प्लस आदी विषयांवर आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. 'पावसामुळे दलदल निर्माण झालेल्या मुख्य रस्त्यांची सर्व आरोग्य निरीक्षकांनी स्वच्छता करावी. कंटेनरभोवती पडलेला कचरा तातडीने उचलण्यासाठी विशेष पथक तयार करावे. शौचालयांची नियमित स्वच्छता करुन डासांच्या आळ्यांची पैदास होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. आढावा बैठकीस उपायुक्त मंगेश शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा एकत्रीकरणप्रश्नी अटी शिथिल

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा.........

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेतील काही शाळांची पटसंख्या कमी आहे, एकाच गावात कुमार आणि कन्या विद्यामंदिर असूनही पटसंख्या १०० च्या पुढे नाही. अशा शाळा एकत्रीकरण करण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. शाळा एकत्रीकरणासाठी ज्या त्या गावातील शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता आवश्यक होती. जिल्हा परिषदेने नव्या प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेची अट बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांची पटसंख्या ७५ पेक्षा कमी आहे, अशा दोन शाळांचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

प्रशासनाकडून कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती संकलित करण्यात येत आहे. शाळा एकत्रीकरणासाठी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता आवश्यक आहे. मात्र गावातील राजकारण, गटातटांचे वर्चस्व यामुळे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एखाद्या विषयावरुन एकमत होत नाही. यामुळे शाळा एकत्रीकरणाची प्रक्रिया रखडते, यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेची अट शिथील करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने केला आहे. जिल्हा परिषदेतील असंख्य शाळांनी गुणवत्ता, पटसंख्यासह अन्य शैक्षणिक उपक्रमांमध्ये खासगी शाळांना लाजविणारी कामगिरी केली आहे.

मात्र तालुकास्तरावरील, मोठ्या गावातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या काही शाळेतील घसरती पटसंख्या चिंतेचा विषय बनत आहे. एकाच गावात, एकाच परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कुमार आणि कन्या विद्यामंदिर स्वतंत्रपणे सुरू आहेत. या दोन्ही शाळेतील पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे. यामुळे पात्र मुख्याध्यापक, जादा शिक्षकांच्या नियुक्तीच्या समस्या आहेत. दोन स्वतंत्र शाळा असल्यामुळे एकीकडे मुले कमी आणि शिक्षक जादा असे चित्र तर दुसरीकडे काही शाळेत विद्यार्थी संख्या जादा आणि शिक्षक कमी अशी स्थिती आहे. दुर्गम भागातील शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे.

एकाच गावातील कुमार आणि कन्या विद्यामंदिर एकत्र आणायच्या व उर्वरित वर्ग खोल्यांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालय सुरू करण्याचा विचार आहे. शिवाय दोन शाळा एकत्रीकरणामुळे जादा शिक्षकांची अन्यत्र नियुक्ती करता येईल का असाही विचार सुरू आहे.

.........

चौकट

सर्वसाधारण सभेची मान्यता महत्वपूर्ण

शिक्षण विभागाकडून ज्या शाळा एकत्रीकरणास तयार आहेत, त्यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. शाळांचे प्रस्ताव, मुख्याध्यापकांचे म्हणणे विचारात घेतले जाणार आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांची शिफारस मागविली जाणार आहे. तीस सप्टेंबरपर्यंत इच्छुक शाळेकडून प्रस्ताव मागवायचे तसेच सगळ्या घटकांचे म्हणणे ऐकून अखेरीस जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव मांडला जाणार आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता महत्वपूर्ण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी पदासाठी १५४७उमेदवारांनी दिली परीक्षा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील रिक्त ६७ तलाठी जागांसाठी १५४७ उमेदवारांनी मंगळवारी ऑनलाइन परीक्षा दिली. दहा केंद्रावर सकाळी १० ते १२ आणि दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत परीक्षा झाली. परीक्षेस १०१४ उमेदवार गैरहजर राहिले.

सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे ई महापरीक्षा पोर्टलवरून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. ६७ जागांसाठी २५६० जणांनी अर्ज भरले होते. यापैकी १५४७ जणांनी परीक्षा दिली. केंद्रनिहाय परीक्षा दिलेल्यांची संख्या अशी : अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी (पेठवडगाव) : १९४, सायबर (कोल्हापूर): ३२७ , डीकेटीई संलग्नित यशवंतराव चव्हाण, पॉलिटेक्निक (इचलकरंजी) :११८, डॉ. डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेज (साळोखेनगर, कोल्हापूर) : ७२, डॉ. जे. जे. मगदूम इजिनीअरिंग कॉलेज (जयसिंगपूर): २०१, केआयटी कॉलेज (गोकुळ शिरगाव, कोल्हापूर) : १५९, संजीवन इंजिनीअरिंग कॉलेज (पन्हाळा): १०१, संत गजानन महाराज कॉलेज (महागाव, ता. गडहिंग्लज) :१३६, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (यड्राव) :११३, श्री विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पाल, ता. भुदरगड): १२५.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुवारी बैठक

$
0
0

कोल्हापूर: देवस्थान इनाम जमिनीबाबत चर्चा करण्यासाठी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत गुरुवारी (ता. ४) मंत्रालयात बैठक होणार आहे. फडणीवस यांचे पत्र सभेला नुकतेच मिळाले. अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोनवेळा लाँगमार्च काढला. मोर्चादरम्यान राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले होते. या मागण्यांबाबत चर्चा होणार आहे. शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, राज्याध्यक्ष किसन गुजर, डॉ. उदय नारकर व उमेश देशमुख यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. चौधरी प्राचार्यपदी

$
0
0

कोल्हापूर: रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील आबा सावंत आर्टस, कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. शशिकांत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. चौधरी यांनी यापुर्वी येथील न्यू कॉलेजमध्ये २६ वर्षे प्राध्यापक, मराठी विभागप्रमुख म्हणून काम केले. लेखक, नाट्यसमीक्षक व सिनेमा संगीताच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या तीन कादंबऱ्या व सहा कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघे अट्टल चेन स्नॅचर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर, उपनगरात रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून लंपास करणाऱ्या तिघा अट्टल चेन स्नॅचरना पोलिसांनी अटक केली. संशयित निकेश ऊर्फ बबलू नारायण वडार (वय २३, रा. माळभाग, नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली), सचिन श्रीकांत हिंगणे (२९, रा. बांबवडे, ता. वाळवा), सुनील मोहन रणखांबे (२२, रा. नागेवाडी गल्ली, नेर्ले, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी २५ चेन स्नॅचिंग आणि दोन घरफोड्या अशा २७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १९ लाखांचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. देशमुख म्हणाले, 'स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल संतोष माने यांना खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की, रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसडा मारून चोरी करणारा टोळीप्रमुख निकेश वडार हा मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सह्याद्री हॉटेलजवळ येणार आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार व त्यांच्या पथकाने २१ जूनला या परिसरात सापळा रचून वडारला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, हिंगणे आणि रणखांबे यांच्या मदतीने दुचाकीचा (एम. एच. १०, सी. झेड ८१०३) वापर करून एकूण १२ गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. चोरलेल्या दागिन्यांची रणखांबे याने विक्री केली. त्यातून मिळालेले पैसै तिघांनी वाटून घेतले. वडारला मदत करणाऱ्या या दोन साथीदारांनी १३ गुन्ह्यांची कबुली दिली.

...

दागिने चोरीला गेलेले फिर्यादी

शहाजी रामाराम देसाई (रा. हळदी, ता. करवीर), सखुबाई भाऊसो खडके (रा. मौजे आगर, ता. शिरोळ), सुरेखा अमृत मडके (रा. जयसिंगपूर) राजश्री अशोक शंभुशेटे (शाहूनगर), ज्योती दीपक परब (रा. मंगळवार पेठ), बयाबाई कोंडिबा पाटणे (रा. शित्तूर वारुणपैकी राघुचा वाडा, ता. शाहूवाडी), प्रियांका संतोष केसरकर (रा. सोनारवाडी, ता. शाहूवाडी), सविता दिनकर शिंदे (कसबे चरण, ता. शिरोळ), शोभा गंगाराम सुतार (रा. संभाजीनगर), अमृता अवधूत मुंगळे (मुक्तसैनिक वसाहत), सुष्मिता अनिल पंडित (रा. नारायण पार्क, रुक्मिणीनगर), अलका शिवानंद उत्तुरे, रेश्मा विनायक घाडगे (दोघी, रा. आर. के. नगर) वसंतकुमार रमणीकभाई मानानी (रा. सरुड, ता. शाहूवाडी), सीमा तिमाप्पा शेट्टी (रा. कावळा नाका), जयश्री इरगोंडा बिराजदार (यशवंत नगर), राजश्री दीपक पाटील (रुईकर कॉलनी), सुजाता राजेंद्र पाटील (रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले), शोभा सुर्यकांत कोरवी (रा. गणेशनगर पेठवडगाव), शर्मिष्ठा रामराव नलवडे (राजारामपुरी नववी गल्ली), विमल भोपाल सईबन्नावर, प्रतिमा प्रशांत गांधी (दोघी, रा. माळी कॉलनी, टाकाळा), रुक्मिणी परमानंद ढाले (रा. शिवाजी पेठ), कुसुम गणेश राजुरीकर (रा. शिवगंगा कॉलनी, साळोखेनगर), सुलभा शशिकांत खलप (रा. मराठा कॉलनी, पाचगाव).

...

तिघेही सुशिक्षित बेकार

मुख्य संशयित वडार हा दहावी नापास असून सध्या तो गवंडी काम करीत होता. हिंगणे याने इतिहास विषयातून एम. ए. ची पदवी घेतली आहे. सध्या तो शेती करतो, २०१४ पासून तो चोरी करू लागला. सुनील रणखांबे हा वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात आहे. तिघांच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. सर्वजण सुशिक्षित बेकार असून नोकरी मिळाली नसल्याने चोरी, चेन स्नॅचिंगकडे वळल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून ज्या सराफांनी सोने विकत घेतले, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धोकादायक इमारती उतरवण्यास सुरुवात

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धोकायदायक इमारती उतरवण्यासाठी नोटिसा पाठवून कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानणाऱ्या महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून थेट कारवाईला सुरुवात केली. बिंदू चौक परिसरातील चार इमारतींचा धोकादायक भाग जेसीबी मशिनच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आला. या कारवाईद्वारे धोकादायक इमारतींच्या मिळकतदारांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही दिला. त्यापूर्वी सुमारे शंभर इमारती उतरवून घेण्याच्या व स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिशी प्रशासनाने बाजवल्या आहेत.

पावसाळा आणि गणेशोत्सव मिरवणुकीपूर्वी महापालिका प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक इमारती उतरवण्यासाठी नोटिसा बजावते. अशा इमारती ठरवण्यासाठी यापूर्वी प्रशासनाने सर्व्हेही केला आहे. पण कारवाईच्या पातळीवर नेहमीच अनास्था दाखवली जात होती. न्यायालयीन निवाड्यांमुळे अडचणी येत असल्या, तरी अशा किरकोळ इमारती असतानाही इतर धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष केले जात होते. पुणे आणि मुंबई येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मात्र प्रशासनाने तत्परता दाखवली.

गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पुणे, मुंबईसारखी घटना कोल्हापुरातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात पावसाळ्यांपूर्वी धोकादायक इमारतींच्या मिळकतदारांनी इमारती उतरवाव्यात अथवा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटिसा पाठवल्या. त्याबाबतचे जाहीर प्रकटनही देण्यात आले. पण दरवर्षीप्रमाणे मिळकतदारांनी नोटिसींची दखल घेतली नाही. मात्र प्रशासनाने कारवाईचा धडाका लावत बिंदू चौक सबजेल परिसरातील चार इमारतींचा धोकादायक भाग जेसीबी मशिनच्या मदतीने जमिनदोस्त केला.

पोलिस बंदोबस्तात वसंतराव जामदार यांच्या दोन कमल सूर्यवंशी यांची एक व आणखी एका अशा चार इमारतींचा धोकादायक भाग काढून टाकला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपअभियंता एस. के. माने यांच्यासह सुमारे २० कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. 'महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम २६५ 'अ' नुसार नोटीस मिळालेल्या मिळकतदारांनी स्ट्रक्चरल ऑडिट करुन प्रशासनास प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांना २५ हजाराचा दंड करण्यात येणार आहे,' असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

......

कोट

'धोकादायक इमारती उतरवण्यापूर्वी ज्या इमारतींना ३० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मिळकतदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. धोकादायक इमारती मिळकतदारांनी स्वत: न उतरवल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढवांसह मोर्चा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील भटके, विमुक्त जातीमधील लोकांना जातीचे दाखले मिळावेत, रेशनकार्ड द्यावेत, यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी येथील भटका समाज मुक्ती आंदोलन संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढवांसह मोर्चा काढला. यावेळी येत्या १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपड्या बांधून राहणार असल्याच्या इशाऱ्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले.

आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चातील महिला, लहान मुलांनी मागण्यांच्या घोषणा देत परिसरत दणानून सोडले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर जोरदार निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली. दरम्यान, निवेदनात म्हटले आहे, भटक्या, विमुक्तांच्या घरांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही त्वरित करावी, सध्या राहत असलेल्या ठिकाणीच घरासाठी जागा द्यावी, हातकणंगले तालुक्यातील वडगावातील नाथपंती, डवरी, गोसावी, गोपाळ, भटक्या, विमुक्त समाजातील कुटुंबांना घर देण्यासाठी सर्व्हे झाला आहे. मात्र अजूनही घरे मिळालेली नाहीत. ती द्याव्यात, शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे नाथपंती समाजातील लोक राहत असल्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुल बांधून द्यावे, नेहमी भटकंतीवर असल्याने ठोस पुरावा नसतो, यामुळे पुरावा नाही, म्हणून अनेक प्रांताधिकारी जातीचे दाखले देत नाहीत. असे न करता उपलब्ध पुरावा ग्राह्य मानून दाखले द्यावीत. मोर्चात नंदकुमार साठे, प्रदीप लोंढे, अमित पोवार, युवराज पोवार, रमेश जाधव, गुलाब पोवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्राथमिक’च्या सभापतिपदी श्रावण फडतारे

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी काँग्रेसचे नगरसेवक श्रावण फडतारे तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन पाटील यांची निवड झाली. फडतारे यांनी भाजपचे नगरसेवक व सभापतिपदाचे उमेदवार विजयसिंह खाडे-पाटील तर पाटील यांनी ताराराणी आघाडीच्या नगरसेविका व उपसभापतिपदाच्या उमेदवार अर्चना पागर यांचा पाच विरुद्ध तीन मताने पराभव केला. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांनी काम पाहिले. निवडी दरम्यान उपसभापतिपदाच्या उमेदवार पागर अनुपस्थित राहिल्या.

स्थायी समिती सभागृहात शिक्षण मंडळ पदाधिकारी निवडीची सभा झाली. सभापतिपदासाठी फडतारे व खाडे-पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पीठासन अधिकाऱ्यांनी अर्जांची छाननी करुन अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. तसेच माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला. दोन्ही अर्ज राहिल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यामध्ये फडतारे यांना पाच तर खाडे-पाटील यांना तीन मते मिळाली. सभापती निवडीमध्ये फडतारे विजयी झाल्याचे मित्तल यांनी जाहीर केले. उपसभापतिपदाच्या उमेदवार पागर निवडणुकीलाही त्या अनुपस्थित राहिल्या.

उपसभापतिपदासाठी पागर व पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. पीठासन अधिकारी यांनी अर्जांची छाननी करून अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुन्हा माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला. अर्ज माघार न घेतल्याने निवडणूक घेण्यात आली. प्रथम पागर यांना हात उंचावून तीन सदस्यांनी मतदान केले. तर पाटील यांना पाच मते मिळाली. त्यानंतर मित्तल यांनी उपसभापतिपदी पाटील विजयी झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर फडतारे व पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. निवड सभेस आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकऱ्यांना पुरवणार वैद्यकीय सुविधा

$
0
0

शुभवर्तमान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आषाढी यात्रेतील वारकऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. प्रशासनाने, दोन वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे. या पथकामध्ये आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी वैद्यकीय पथकामार्फत सहा हजार रुग्णांवर उपचार केले होते.

आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरला जातात. ठिकठिकाणाहून दिंड्या निघतात. आषाढी यात्रेसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. दिंडीमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुषांचा समावेश असतो. सलग पंधरा, वीस दिवस पायी चालत जावे लागत असल्यामुळे अनेक वारकऱ्यांच्या पायात गोळे येणे, पाय दुखणे, ताप, पोट विकार अशा तक्रारी उद्भवतात.

'अशा वारकऱ्यांना आरोग्यविषयक सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेने दोन वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे. अध्यक्षा शौमिका महाडिक, सीईओ अमन मित्तल, आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांच्या संकल्पनेनुसार पथके काम करतील,'असे जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली पथक कोल्हापूर, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, मिरज मार्गे पंढरपूरला जाईल. वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण गवळी यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय कोल्हापूर ते मिरज, लोणंद, नातेपुते, माळशिरस, वेळापूरमार्गे पंढरपूरकडे रवाना होईल.

......

सीईओ मित्तल करणार पायी वारी

सीईओ मित्तल यांच्या हस्ते वैद्यकीय पथकाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी मित्तल यांनी सर्व नागरिकांना सुख, समाधान व आरोग्यदायी जीवन मिळावे असे पांडूरंगाला साकडे घातल्याचे सांगितले. आषाढी यात्रा कालावधीत पायी वारी करण्याचा मनोदय व्यक्त केला. वारीत वैद्यकीय पथकाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेऊ. तसेच वारीमध्ये एक प्रकारची शिस्त, सहकार्याची वृत्ती, आपआपली जबाबदारी पार पाडण्याची भूमिका यामुळे वारीवषयी मला आकर्षण असल्याचे त्यांनी सांगितले. मित्तल हे आरोग्य अधिकाऱ्यांसह येत्या शनिवारी वेळापूर येथे वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. याप्रसंगी आरोग्य अधिकारी साळे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, एम. एम. पाटील, मार्केट यार्ड येथील विठ्ठल मंदिराचे प्रमुख वारके, येवती येथील दिंडीप्रमुख बी. डी. पाटील, रंगा वायदंडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनबाबत सरकारची याचिका फेटाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाने '२३ ऑक्टोबर १९९२ ते चार एप्रिल २००० या कालावधीत नियुक्त झालेल्या बिगर नेट-सेट प्राध्यापकांना पेन्शन मिळावी,' असा दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. नेसरी येथील प्रा. एम. डी. पाटील यांनी पेन्शन मिळण्यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना पेन्शन मंजूर केली होती. मात्र, राज्य सरकारने २७ जून २०१३ च्या अध्यादेशानुसार संबंधित कालावधीत नियुक्त प्राध्यापकांना पेन्शन देता येत नाही म्हणून हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टाने ही याचिका एक जुलै रोजी फेटाळली. दरम्यान, हायकोर्टाने तीन ऑक्टोबर २०१८ रोजी प्रा. एम. डी. पाटील यांच्या याचिकेच्या बाजूने निर्णय दिला होता. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. बिगर नेट-सेट प्राध्यापक तसेच एमफील, पीएचडीप्राप्त नसलेल्या प्राध्यापकांना पेन्शन देता येणार नाही, या कारणाखाली याचिका दाखल केली होती.

त्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व इंद्रा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर एक जुलैला सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली. 'सुप्रीम कोर्टाने पेन्शन मिळविण्यासाठी प्राध्यापकांची सलग सेवा विचारात घ्यावी आणि त्यांची नेमणूक २००५ पूर्वी असल्यामुळे त्यांना पेन्शन लागू होते. बिगर नेट-सेट प्राध्यापकांना पेन्शन द्यावा, असा निर्णय दिला आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व 'सुटा'कार्यकारिणी सदस्य डॉ. आर. जी कोरबू यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images