Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मंडपम डेकोर एक्स्पो शुक्रवारपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मंडप डेकोरेशनमध्ये झालेल्या बदलांची आणि व्यवसायाभीमुख करण्यात येणाऱ्या सजावटीची माहिती स्थानिक डेकोरेशन व्यावसायिकांना होण्यासाठी २८ ते ३० जूनअखेर 'मंडपम डेकोर एक्स्पो'चे आयोजन मार्केट यार्डातील रामकृष्ण हॉल येथे केले आहे. एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे' अशी माहिती जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष सागर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन व जिल्हा असोसिएशनच्यावतीने हा एक्स्पो आयोजित केला आहे.

अध्यक्ष चव्हाण म्हणाले, 'पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या एक्स्पोचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाऱ्या एक्स्पोमध्ये सुपर स्ट्रक्चर मंडप, डेकोरेशन साहित्य, फायबर साहित्य, फुलांचे तयार डेकोरेशन, कर्टन्स, गालिच्यांची आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात येणार आहे. याद्वारे व्यवसायामध्ये झालेले बदल अधोरेखित करण्यात येतील. सकाळी उद्घाटन समारंभ झाल्यानंतर दुपारी चार वाजता व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात येईल. तर रात्री आठ वाजता लोककला आणि संगीतसंध्या कार्यक्रम होईल.'

'शनिवारी (ता. २९) सायंकाळी चार वाजता जीएसटीविषयी माहिती देऊन व्यावसायिकांची खुली चर्चा होईल. रविवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसात वाजता निमंत्रकांसाठी सांस्कृतिक व समारोप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एक्स्पोला पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे तीन हजार मंडप व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत' असे चव्हाण यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला प्रणय तेली (सिंदुधुर्ग), अमरीश सावंत (रत्नागिरी), गोरख करपे (सातारा), शिवकुमार पाटील (सोलापूर), सुनील माळी (सांगली), विनायक सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, तुकाराम पाटील, सुनील व्हनागडे, अनिल काटे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोकुळ नोकर भरतीचीतीन जुलै रोजी सुनावणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) गेल्यावर्षी भरती करण्यात आलेल्या ६२४ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयाने 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी तीन जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. भरती प्रक्रियेविरोधात कर्मचारी संघटनेने दाद मागितली आहे.

गोकुळ संघ व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेत नोकर भरतीच्या आकृतीबंधाबाबत करार झाला आहे. या कराराला २०१८मध्ये दोघांनी मान्यता दिली आहे. गोकुळचे रोज २० लाख लिटर दूध संकलन झाल्याखेरीज नवीन भरती करायची नाही, असे करारात नमूद होते. मात्र संचालक मंडळाने कराराला बगल देत गेल्यावर्षी ३२० जणांना ठोक मानधनावर तर ३०४ प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची भरती केली. भरती प्रक्रियेत मोठी आर्थिक उलाढाल झालाची चर्चा होती. ठोक मानधन व प्रशिक्षणाचा कालावधी संपत आल्याने कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या हालचाली गोकुळ संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाने सुरू केला. या प्रक्रियेविरोधात कर्मचारी संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. भरती प्रक्रिया जैसे थे ठेवावी, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. हा निर्णय तात्पुरता असून पुढील सुनावणी तीन जुलैला होणार आहे. या सुनावणीकडे भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्द्राची दमदार हजेरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी शहरात अर्धा ते पाऊण तास दमदार हजेरी लावली. आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. सायंकाळी झालेल्या जोरदार सरींमुळे फेरीवाल्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. गडहिंग्लज, गारगोटी आणि चंदगड परिसरातही पावसाने चांगली हजेरी लावली. पाटगाव धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून, बारवे ते भुदरगड किल्ला आणि मठगाव ते तांबाळे मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली.

मान्सूनचा सुरुवातीचा टप्पा चक्री आणि वायू चक्रीवादळामुळे कोरडाच गेला होता. शनिवारी आर्द्रा नक्षत्र सुरु झाले. या नक्षत्रात तरी पाऊस होणार की नाही, अशी शंकाही उपस्थित होत होती. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र प्रचंड उष्माही होता. दुपारी तर कडक ऊन पडल्याने आर्द्राचा पहिला दिवस कोरडाच जाणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र सायंकाळी पाचनंतर मात्र पुन्हा ढगाळ वातावरण झाले. हवेत प्रचंड गारवा निर्माण होऊन सायंकाळी सातच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी कोसळल्या. पेरण्याची कामे बहुतांशी पूर्ण झाल्याने पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

0
0

पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पद्माराजे उद्यान व सिद्धार्थ नगर प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकी पाच केंद्रावर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान सुरू राहील.

पद्माराजे उद्यान प्रभागातून सहा उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अजित राऊत, शिवसेनेचे पीयूष चव्हाण, शेकापचे स्वप्नील पाटोळे, अपक्ष राजेंद्र चव्हाण, महेश चौगले, शेखर पोवार यांचा समावेश आहे. तर सिद्धार्थ नगर प्रभागातून काँग्रेसचे जय पटकारे ताराराणी आघाडीचे नेपोलियन सोनुले व अपक्ष म्हणून सुशील भांदिगरे निवडणूक लढवत आहेत. रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी (ता. २४) सासने ग्राउंड येथील दौलतराव देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंगदाणे, वेलदोडे दरात वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

या आठवड्यात शेंगदाणे, शेंगतेल आणि वेलदोड्याच्या दरात वाढ झाली आहे. तर तुरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपयांनी घट झाल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

दुष्काळ, अवेळी झालेला पाऊस यामुळे गेल्या पाच महिन्यांत डाळी व कडधान्याच्या दरात मोठी वाढ झाली. गेल्या महिन्यात तुरडाळीचा दर १०० रुपयांवर पोचला होता. पण डाळींची आयात झाल्याने दरात घट झाली आहे. तुरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपये घट झाल्याने सध्या ९२ रुपये किलो दराने विक्री होत आहे. शेंगदाणा दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो ११० रुपयांनी विक्री होत आहे. शेंगदाणा दरात वाढ झाल्याने शेंगतेलाच्या दरातही प्रतिकिलो तीन रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या भुईमुगाची पेरणी सुरू असल्याने शेंगदाणा दरवाढ झाली आहे, असे दुकानदारांनी सांगितले. वेलदोड्याच्या दरातही प्रतिकिलो ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. वेलदोड्याचा दर प्रतिकिलो ३६०० रुपयांवरुन ४००० रुपयांवर पोचला आहे. ग्राहकांना दहा ग्रँम म्हणजेच एक तोळा वेलदोडे खरेदीसाठी ४० रुपये मोजावे लागत आहे. गेल्या आठ महिन्यांत वेलदोडा दरात प्रतिकिलो दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. केरळमध्ये झालेल्या महापुराने वेलदोड्याचे पीक भुईसपाट झाल्याने दरवाढ झाली असून दिपावलीपर्यंत हा दर प्रतितोळा ५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : ११०

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ४४ ते ५०

साबुदाणा : ८४

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ९२, १००

मूगडाळ :, ९२

उडीद डाळ : ७२

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६४

मसूर : ७० ते

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९०

काळा वाटाणा : ६४

मूग ८४

मटकी : ८० ते १२०

छोले : ९० ते १००

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : २८ ते ३४

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : ३२

नाचणी : ३६ ते ४०

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १२८

सरकी तेल : ८६

खोबरेल : २४०

सूर्यफुल : ९० ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १६०

जिरे : २४०

खसखस : ९००

खोबरे : १८० ते २००

वेलदोडे : ४०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर भाजप शहराध्यक्षपदी विक्रम देशमुख

0
0

सोलापूर भाजप शहराध्यक्षपदी विक्रम देशमुख

सोलापूर

सोलापूर भाजपच्या शहराध्यक्षपदी पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाचे विक्रम देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत या बाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. विक्रम देवशमुख यांच्या या अनपेक्षित निवडीने सोलापुरातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोलापूर भाजपमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. निंबर्गी यांचा राजीनामा मंजूर करू नये म्हणून महापौरांसह नगरसेवकांनी सिव्हिल चौकातील भाजप कार्यालयात दोन दिवस ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाची भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून दाखल घेण्यात न आल्याने अखेर निंबर्गी यांचा राजीनामा मंजूर करून विक्रम देशमुख यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर परिसरात सरी

0
0

सोलापूर :

सोलापूर शहर आणि परिसरात शनिवारी मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास मान्सूनच्या सरी बरसल्या. १२. ६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. ७ जूनला सोलापूर परिसरात मान्सूनपूर्व जोरदार पाऊस झाला होता. त्या नंतर उकाडा वाढला होता. शनिवारच्या पावसाने तापमान थोडे खाली आले आहे. मात्र, हवेतील उकाडा कायम असून, ढगाळ हवामान आहे. सोलापूर शहरासह उत्तर आणि दक्षिण तालुका तसेच बार्शी, अक्कलकोट, मोहोळ परिसरात पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरः रक्तदान करणाऱ्यांना ५ लीटर पेट्रोल फ्री

0
0

सोलापूर

रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे यासाठी सामाजिक संस्थाकडून विविध उपक्रम राबवले जातात. सोलापुरात मात्र रक्तदान करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्याती आली. रक्तदान करणाऱ्यांना चक्क पाच लीटर पेट्रोल भेट देण्यात येत असल्याने रक्तदान करण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.

सोलापुरातील सिद्धेश्वर हायवे सेंटर पेट्रोल पम्पातर्फे दिवंगत गिरीश सतीश जम्मा यांच्या सन्मानार्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाचे शिबीर भरवल्यानंतर एरवी लोक त्याकडे पाठ फिरवतात. जाहिरातबाजी केल्यानंतरही रक्तदान शिबिरास हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना पाच लीटर पेट्रोल मोफत मिळत असल्याने सोलापुरातील लोकांनी या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसत आहेत.

रक्तदान केल्यानंतर कोणी थेट गाडीत पेट्रोल भरून घेत होते. तर काहींनी पेट्रोलसाठी चक्क डबे सोबत आणले होते. अवघ्या काही तासात ७०० लोकांनी रक्तदान केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. प्रलोभन दाखवून रक्तदान करवून घेणे कायद्याने गुन्हा आहे. असं असली तरी प्रोत्साहन म्हणून रक्तदात्याला भेट वस्तू दिली तर त्यात गैर काय?, असे रक्तदान करण्यासाठी आलेल्या काही लोकांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासाचा कालबद्ध कार्यक्रम आखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्ह्याचा विकास एका टप्प्यानंतर आडव्या पद्धतीने म्हणजे ज्याला जसे सुचेल तसा सुरू आहे. शाश्वत विकासासह कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी इंडस्ट्री, कृषी, शिक्षण, खेळ, संशोधन, पर्यटन अशा दहा क्षेत्रांतील विकासाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करा. कारखानदार, उद्योजकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, अंमलबजावणीला सरकार प्राधान्यक्रम देईल,' अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर प्रेस क्लब आणि कोल्हापूर हॉटेल मालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 'व्हिजन कोल्हापूर २०२५ कॉन्क्लेव्ह'चा आराखडा प्रकाशित करण्यात आला. हॉटेल पॅव्हेलियन येथे कार्यक्रम झाला. याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, 'कोल्हापुरातील उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी विकासवाडीजवळील २५० एकर जागा औद्योगिक वसाहतीसाठी आरक्षित केली आहे. या जागेवर एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा डोळा होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन कोल्हापूरच्या इंडस्ट्रीजसाठी जागा आवश्यक असल्याने पटवून दिले. आता या ठिकाणी मोठ्या इंडस्ट्रीजने गुंतवणूक करावी यासाठी प्रयत्न आहेत. २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १५०० तरुणांना रोजगार असा प्रकल्प कार्यान्वित व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमसाठी आठ ते दहा एकर जागा शोधावी, जागा विकत घेणारा माणूस आम्ही देऊ. स्टेडियम उभारण्याची संपूर्ण जबाबदारी बाळ पाटणकर यांनी घ्यावी.'

यावेळी खासदार संजय मंडलिक, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव यांची भाषणे झाली. खासदार संभाजीराजे यांनी जिल्ह्याच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचना केली. चर्चेत उद्योजक सुरेंद्र जैन, लक्ष्मीकांत पटेल, चंद्रकांत जाधव, संजय शेटे, बाळ पाटणकर, क्रिडाईचे विद्यानंद बेडेकर, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, आशुतोष देशपांडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे, उदय गायकवाड, दिलीप देसाई यांनी सहभाग घेतला. प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी आभार मानले.

००००

तज्ज्ञांची समिती, २८ जुलैला बैठक

बैठकीत कारखानदारी, पायाभूत सुविधा, पर्यटन, कृषी, शिक्षण, पर्यावरण, खेळ अशा विविध क्षेत्रांतील विकासाचा अजेंडा ठरविण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा समिती नेमली. त्या अनुषंगाने आमदार सतेज पाटील म्हणाले, 'व्हिजन कोल्हापूर' संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील विकासाचे सूक्ष्म नियोजन करायला हवे. तज्ज्ञांच्या समितीने प्रत्येक क्षेत्राच्या विकासाकामासाठी आवश्यक योजना, सद्य:स्थितीसंबंधीचा सविस्तर आराखडा तयार करावा. २८ जुलैच्या बैठकीत सादरीकरण करावे.'

००००

पालकमंत्री म्हणाले...

अवकाश संशोधनासाठी कोल्हापुरात रॉकेट लॉचिंग सेंटर साकारणाार

भाजप कार्यालयाच्या जागेत अद्ययावत आय हॉस्पिटलची उभारणी

सिद्धगिरी हॉस्पिटला दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून हृदयशस्त्रक्रियेसाठी आवश्यक सहा कोटी रुपयांची वैद्यकीय मशिनरी

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्तदानानंतर मिळालेमिळाले पाच लीटर पेट्रोल

0
0

सोलापूर :

लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे यासाठी सामाजिक संस्थाकडून विविध उपक्रम राबवले जातात. सोलापुरात रक्तदान करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी रक्तदान करणाऱ्यांना चक्क पाच लीटर पेट्रोल भेट देण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

सिद्धेश्वर हायवे सेंटर पेट्रोल पम्पाच्या वतीने दिवंगत गिरीश सतीश जम्मा यांच्या सन्मानार्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाचे शिबीर भरवल्यानंतर एरवी लोक त्याकडे पाठ फिरवतात. जाहिरातबाजी केल्यानंतरही रक्तदान शिबिरास हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना पाच लीटर पेट्रोल मोफत मिळत असल्याने सोलापुरातील लोकांनी या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसत आहेत.

रक्तदान केल्यानंतर लोक थेट गाडीत पेट्रोल भरून घेत होते. तर काहींनी पेट्रोलसाठी चक्क डबे सोबत आणले होते. अवघ्या काही तासात ७०० लोकांनी रक्तदान केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. प्रलोभन दाखवून रक्तदान करवून घेणे कायद्याने गुन्हा आहे, असे असले तरी प्रोत्साहन म्हणून रक्तदात्याला भेट वस्तू दिली तर त्यात गैर काय?, असे रक्तदान करण्यासाठी आलेल्या काही लोकांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्यातील पाण्याला पुन्हा हिरवा रंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलावातील सांडपाणी रोखण्यासाठी केलेले जाणारे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. परताळ्याकडील बाजूने सांडपाणी तलावात येत असल्याने पाण्याला हिरवा रंग आणि तवंग दिसू लागला आहे. परिणामी रंकाळ्यातील जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रंकाळ्यात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधीचा निधी खर्ची घातली. श्याम सोसायटीकडून येणारे सांडपाणी रोखण्यास यश आले असले तरी परताळ्याकडील बाजूने येणारे दुर्गंधीयुक्त पाणी रोखण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट रंकाळ्यात येत असल्याने पाण्याला हिरवा रंग आणि पाण्यावर एक प्रकारचा तवंगही दिसत आहेत.

रंकाळ्यामध्ये यापूर्वी तीन नाल्यांतून थेट सांडपाणी मिसळत होते. त्यापैकी श्याम सोसायटी व सरनाईक कॉलनीकडून येणारे सांडपाणी दुधाळीकडे जाणाऱ्या ड्रेनेजलाइनला जोडले आहे. मात्र परताळ्यामध्ये साचणारे पाणी वळविण्यात आलेले नाही. त्यामुळे वर्षभर येथे येणारे पाणी साचून राहते. त्यामुळे या पाण्याला दुर्गंधी येते. मात्र गेल्या काही दिवसांत तुरळक पाऊस पडल्याने परताळ्यातील सांडपाणी थेट रंकाळ्यात येऊ लागले आहे. त्यामुळे पूर्ण रंकाळ्यातील पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ब्लू ग्रीन अल्गीचा प्रार्दूभाव दिसून आला होता. त्यामुळे तलावातील जलचरांना धोका निर्माण झाला होता. त्यानंतरही प्रशासनाने योग्य ती काळजी न घेतल्याने पुन्हा रंकाळ्याला प्रदूषणाचा विळखा बसू लागला आहे. रंकाळा संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी कोट्यवधीचा निधी खर्च केला जात असताना प्रदूषण रोखण्यास मात्र प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'वानरवाडी तलावाच्यादुरुस्तीचा फायदा होईल'

0
0

'वानरवाडी तलावाच्या

दुरुस्तीचा फायदा होईल'

कराड :

वानरवाडी (ता. कराड) येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी मी मुख्यमंत्री असताना ल. पा. वानरवाडी योजनेस ४ कोटी १८ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. त्या नंतर सरकार बदलल्यानंतर राज्यातील महामंडळाच्या सर्व कामांना स्थगिती दिली. परंतु, तलावाच्या दुरुस्तीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करून हे काम अतिशय महाप्रयासाने अखेरीस मंजूर करून आणले आहे. यामध्ये विरोधकांनी खूप उलटसुलट वावड्या उठवल्या, परंतु सद्यस्थितीत पूर्वीचा जुना पाझर तलाव लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित केला आहे व वाढीव पाणीसाठा व पूर्वीची तलावाची भिंत काढून त्या ठिकाणी नवीन भिंत व पाझर तलावाच्या खाली दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ६ कोटी ८५ लाख १९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पाझर तलावामुळे वानरवाडी परीसरातील शेकडो हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

शुक्रवारी सायंकाळी वानरवाडी जुन्या पाझर तलावाच्या कामाचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे कराड तालुका दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे आदी उपस्थित होते.

...........

कराडमध्ये पावसाची दमदार हजेरी

कराड :

गेले कित्येक दिवस उन्हाने लाही लाही झालेल्या कराडकरांना रविवारी दुपारी पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे गारवा मिळाला. शहरासह परिसरातील शेतकऱ्यांनी नुकत्याच केलेल्या पेरणी, टोकणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

गेले कित्येक दिवस परिसरात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची गरज होती. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करत होते. मात्र, रविवारी पावसाने हजेरी लावल्याने कराड शहरातील लोकांना पावसाचा आनंद घेता आला, या आनंदात शेतकरी देखील चिंब न्हावून गेले. आजच्या पावसाने खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता धुळ वाफेवर भात व सोयाबीन पेरणी केली होती. काहींनी टोकणी उरकून घेतली होती. मात्र, पाऊस नसल्याने शेतात घातलेले बी उगविणार की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले होते. पाऊस पडला नसता तर शेतातील बी उगवण्याची क्रिया थांबून मोठा फटका बसला असता. मात्र रविवारचा पाऊस पेरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

........

धूम स्टाईलने चोरी

कराड :

पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याच्या दोन सोनसाखळ्या दुचाकीवरील चोरट्याने चोरून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास वारुंजी फाट्यावरील महामार्गालगत घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्वे येथील महिला आपल्या विवाहित मुलीसह काही दिवसापूर्वी नातेवाईकांकडे पुण्याला लग्नसमारंभासाठी गेली होती. त्या दोघी पुण्याहून परतताना शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वारुंजी फाट्यावरील महामार्गालगत असलेल्या माऊली हॉटेलसमोर गाडीतून उतरल्या. तेथून त्या उपमार्गावरून उड्डाणपुलाकडे जाताना त्यांच्या पाठीमागून पल्सर गाडीवरून एकजण वेगाने आला. त्याने महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस व अर्ध्या तोळ्याची बोरमाळ हिसकावून सातारा दिशेने धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारामारीत एक ठार

0
0

सातारा

पुसेसावळी येथून औंधकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन युवकांत झालेल्या मारामारीत दीपक शिवाजी मोरे (वय-३५, रा. पुसेसावळी, मूळ रा. खटाव) याच्या गुप्तांगावर जोराचा मार लागल्याने तो जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मारहाण केलेला संशयित अमर अनिल चौगुले (वय ३२, रा. पुसेसावळी, मूळ जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. या बाबत नामदेव आनंदा चव्हाण यांनी पुसेसावळी पोलिसांत तक्रार दिली आहे. दीपक व अमर यांच्यात सकाळपासून बाचाबाची सुरू होती. दरम्यान, पळशी येथून पैसे आणले का? या बाबत दोघांत संभाषण सुरू होते. अमर याने पैसे आणले नाहीत, असे सांगितल्यावर दोघांत झटापट सुरू झाली होती. त्यात अमर याने गुप्तांगावर लाथ मारल्याने दीपक जागीच कोसळला व जागेवर मयत झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋणमुक्तेश्वर भाजी मंडईचा त्रास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऋणमुक्तेश्वर तालीम परिसरातील भाजी मंडईमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. रस्त्यावरील भाजी मंडईला शिस्त लावून नागरिकांच्या सोयीसाठी परिसरातील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी होत आहे.

गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर तालमीच्या परिसरात भाजी मंडई भरते. या परिसरात राजर्षी शाहू उद्यानात आणि ऋणमुक्तेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. परिसरात सुमारे ६०० घरे आहेत. महापालिकेने या परिसरात भाजी मंडई वसवली. मंडईमुळे परिसरातील नागरिक व मंदिरात येणाऱ्या भक्तांना येण्यास जाण्यास अडथळा येतो. गर्दीच्या ठिकाणी चोरी, पाकिटमारी, मोबाइल चोरट्यांचा येथे सातत्याने वावर असतो. भाजी मंडईमुळे मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. एखादी व्यक्ती आजारी पडली तर तातडीने रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी वाहन व रिक्षा परिसरात येऊ शकत नाही. बाजार संपल्यानंतर परिसरात घाणीचे साम्राज्य असते. पावसाळ्यात कुजलेला पालापाचोळा, भाजीची दुर्गंधी पसरते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मंडईत ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात. काही स्थानिक नागरिकांनाही भाजी मंडईपासून रोजगार मिळत असला तरी महापालिकेकडून शिस्त लावण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. मंदिरासमोर महानगरपालिकेने रिकाम्या जागेत गाळे बांधले आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. महानगरपालिकेने नागरिकांना ये-जा कारण्यासाठी मार्ग उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आहे.

महिलांच्या छेडछाडीचे प्रकार

भाजी मंडईत अनेक ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. त्यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी सातत्याने महापालिकेकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. २००३पासून भाजी मंडईतील समस्येबाबत परिसरातील नागरिक आवाज उठवत असताना महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. नगरसेवकांकडूनही प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मंडईला शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा डंपर गाळ काढला

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जयंती नाला आणि रंकाळा तलाव परिसरात राबवलेल्या स्वच्छता मोहिमेला रविवारी शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जयंती नाला पंपिंग हाऊस व रंकाळा परिसरातून तब्बल सहा डंपर गाळाची उचल केली. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे नाला पात्राशेजारी चिखल असूनही नागरिकांनी स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.

सकाळी सात वाजता लक्ष्मीपुरी येथील कोरे हॉस्पिटल येथे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आणि शहरातील तालीम संस्था, सामाजिक संस्था, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता करण्यास सुरुवात केली. विल्सन ब्रीज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, रिलायन्स मॉल पिछाडीस, सिद्धीविनायक गणपती मंदिर, आयर्विन ब्रीज, टायटन शोरुम, दफनभूमी, जयंती नाला पंपिंग व रंकाळा पूर्व आणि पश्चिम भागात स्वच्छता केली. यावेळी सहा डंपर गाळ व प्लास्टिक कचऱ्याची उचल केली.

दसरा चौक येथील मैदानाची वृक्षप्रेमी ग्रुपच्यावतीने स्वच्छता केली. यावेळी लहान मुलांचा सक्रिय सहभाग होता. स्वच्छता मोहिमेदरम्यान केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिशनच्यावतीने हँग्लोज पुरवण्यात आले. यावेळी पुणे उपजिल्हाधिकारी अशोक पाटील, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, संजय सरनाईक, जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांच्यासह ३०० कर्मचारी उपस्थित होते. तसेच तनिष्का ग्रुप, एकटी, कोल्हापूर क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे आदींनी सहभागी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाल्यांच्या पात्रात अतिक्रमणे

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील प्रमुख १२ मोठ्या नाल्यांसह छोट्या नाल्यांचे पात्र बदलण्याबरोबर अतिक्रमणे करून त्यांचे पात्रही आकसले जात आहे. भूखंड विकसीत करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आर्शीवाद आणि राजकीय वरदहस्ताचा खुबीने वापर करत नाल्यांवरील अतिक्रमणे वाढली आहेत. नाल्याचे पात्र अरुंद होत असल्याने गेल्या काही वर्षांत पावसाळ्यामध्ये नागरी वस्तीमध्ये पावसाचे पाणी शिरून प्रापंचिक साहित्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. दरवर्षी अशा घटना घडत असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. दिवसेंदिवस नाल्यांवरील अतिक्रमणे वाढतच चालल्याची स्थिती आहे.

शहराच्या दक्षिण बाजूकडून पावसाचे किंवा सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठे नाले आहेत. पूर्वी या नाल्यांची नोंद नदी अशी आढळत असली, तरी नागरी वस्तीमध्ये झालेली वाढ आणि त्यातून सांडपाणी वाहत असल्यामुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे त्यांना नाल्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शहराचा विस्तार वाढण्यापूर्वी नाल्यांचे पात्र विस्तीर्ण होते. पण अलिकडे नाला परिसरातील भूखंड विकसीत करण्यात आले. शहरात निवासी जागा उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागासह अन्य जिल्हे, राज्यांतील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केल्या. अनेक ठिकाणी टोलेजंग अपार्टमेंट उभ्या राहिल्या. मात्र अशा अपार्टमेंट उभारताना नाला पात्रात बेकायदेशीरपणे भराव टाकून पात्र अरुंद केले गेले. तर काही ठिकाणी त्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आला.

महापालिकेच्या नगररचना विभागानेही ले-आऊट मंजूर करताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. काही ठिकाणी राजकीय नेत्यांच्या दबावापोटी ले-आऊटला मंजुरी देण्यात आली. परिणामी अनेक नाल्यांच्या परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. शहरातील सर्वच भागात अशी स्थिती दिसत असल्याने अलीकडे पावसाचे पाणी थेट नागरी वस्तीमध्ये घुसत आहे.

गिरगाव, कळंबा, मोरेवाडी, पिरवाडी, लक्षतीर्थ वसाहत या उंचावरील भागातून पावसाच्या पाण्याचा प्रवाह मोठा असतो. त्यामध्ये शहरात सांडपाण्याची भर पडते. अशावेळी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यानंतर नाल्यातील पाण्याला फुगवटा निर्माण होतो. हा फुगवटा केवळ पात्र अरुंद केल्यामुळे किंवा पात्र वळविल्यामुळे येतो. परिणामी हे पाणी नागरी वस्तीमध्ये घुसून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.

जयंती नाला पंपिंग स्टेशनपासून सुरुवात झालेली अतिक्रमणे नाल्यांचा उगमस्थानापर्यंत पोहोचली आहेत. दरवर्षीच्या मोठ्या पावसात नाल्याचे पाणी नागरी वस्तीमध्ये घुसते. नागरी वस्तीमधील पाणी काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाच्या उपाययोजना केल्या जातात. पण, नाल्यावर झालेली अतिक्रमणे हटवली जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशा आपत्तींना सामोरे जावे लागत आहे.

नाल्यांवर अतिक्रमण झालेली प्रमुख ठिकाणे

आयसोलेशन हॉस्पिटल, पंचमुखी गणेश मंदिर, मनोरा हॉटेल परिसर, रामानंद नगर, बालाजी पार्क, जाधव पार्क, शास्त्रीनगर, महालक्ष्मी नगर, पाचगाव रोड, वर्षा नगर, राजेंद्र नगर आदी.

- प्रवाह जास्त असूनही नाल्यावर अतिक्रमणे

- भराव टाकून अनेकांनी केली जागा विकसित

- अतिक्रमणे केल्यामुळे नाल्याचे पात्र बनले अरुंद

पत्रव्यवहार ठरला कुचकामी

महापालिकेच्यावतीने शहरात गेल्या एक महिन्यापासून श्रमदानातून नालेसफाई सुरू आहे. शहरांसह उपनगरातील नाल्यांची स्वच्छता सुरू असताना काही सजग नागरिकांनी रामानंद नगर परीसरातील बालाजी पार्क व जाधव पार्क परीसरात एका बड्या बांधकाम व्यवसायिकाने केलेली अतिक्रमणे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. नंतर संबंधीतांनी प्रशासनाला पत्रव्यवहार करुन होणारे परिणाम सांगीतले. पण एक महिन्यानंतरही नाल्यावर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीबाबत कोणताही निर्णय किंवा कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात रामानंद नगर परिसरातील वस्तीमध्ये पाणी घुसण्याची शक्यता कायम आहे.

लोगो : मटा भूमिका

अतिक्रमणे हटवा,

प्रवाह मोकळा करा

वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील नालेही आपले अस्तित्व हरवून बसतील की काय अशी स्थिती निर्माण होत आहे. लोकवस्ती वाढल्याने दिवसेंदिवस सांडपाण्यामध्ये भरच पडत आहे. शहरात असणारे नाले सांडपाणी वाहून नेण्यासाठी सक्षम होते. मात्र कालांतराने विस्तार वाढत गेल्यानंतर नागरी क्षेत्र झपाट्याने वाढले. परिणामी शहराच्या फुगवट्यासह उपनगरांची संख्या वाढत असताना मोकळे भूखंड मोठ्या प्रमाणात विकसीत होऊ लागले. मात्र, अशा जागा विकसीत करताना विशेषत: नाल्यांच्या पात्रालगत अतिक्रमणे होऊ लागली. अशा अतिक्रमणांना लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळू लागले. यातून भ्रष्टाचाराची साखळी निर्माण झाली. त्याचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. नाल्यांच्या पात्रातील पाणी रोखण्यासाठी उंच संरक्षक भिंती बांधण्याबरोबरच अनेक ठिकाणी त्याचे नैसर्गिक पात्रही वळवले गेले. परिणामी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरी वस्तीत पाणी शिरू लागले आहे. एकीकडे शहरातील रस्ते अतिक्रमणांनी गजबजून गेले असताना नाल्यांवरील विळखाही कमी झालेला नाही. अशा अवैध प्रकारांना महापालिकेने वेळीच आळा न घातल्यास पुन्हा-पुन्हा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. त्यासाठी संबंधीत यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यासाठी नागरिकांनीसुद्धा तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे आले पाहिजे. अतिक्रमणे हटवून प्रवाह मोकळा करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी मंडईचा नागरिकांना त्रास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऋणमुक्तेश्वर तालीम परिसरातील भाजी मंडईमुळे त्रास होऊ लागला आहे. या परिसरात रस्त्यांवर भाजी मंडई असल्याने पर्यायी मार्गावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर तालीम परिसरात भाजी मंडई भरते. या मंडईत ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात. भाजी मंडई परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ये जा करताना त्रास होत आहे. परिसरातील नागरिकांना वाहने बाहेर लावावी लागतात. भाजी मंडई बंद झाल्यावर नागरिकांना वाहने घरी आणावी लागतात. आजारी पडल्यावर नागरिकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रिक्षाही येत नाहीत. या मंडईत येण्यासाठी राजर्षी शाहू उद्यानाच्या पूर्व बाजूला सरंक्षक भिंतीजवळ महानगरपालिकेने रस्त्यांवर अतिक्रमण करुन दुकान गाळा बांधला आहे. त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करुन महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. हा रस्ता नागरिकांसाठी खुला करुन द्यावा, अशी मागणी परिसरातून नागरिकांकडून केली जात आहे.

सोळा वर्षे पाठपुरावा

महानगरपालिकेने अतिक्रमण करून रस्त्यावर गाळा बांधण्यात आला आहे. परिसरातील काही संस्था व नागरिकांनी हे अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी २००३ पासून पाठपुरावा केला आहे. पण महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिकेने अतिक्रमण केलेला गाळा हटवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्थानिक नगसेवकांनीही याबाबत पाठपुरावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी वाटपात पक्षपातीपणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा नियोजन समितीमधील निमंत्रित आणि जिल्हा परिषद सदस्यांना भरीव निधी मिळत नाही. निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याची तक्रार रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी केली. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून मागणी करूनही निधी मिळाला नाही. राधानगरी तालुक्यातील दुर्गम गावे, वाड्यांतील रस्ते करण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जालिंदर पाटील यांनी सभात्याग करून नियोजन समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समिती बैठकीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. खासदार संभाजीराजे छत्रपती, संजय मंडलिक, धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थित होती.

बैठकीत सदस्य प्रविण यादव, स्वाती सासने, पांडुरंग भांदिगरे, नगरसेविका माधुरी लाड यांनी नियोजन समितीचे सदस्य असूनही जादा निधी मिळाला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. समितीमधील बहुतांशी सदस्यांनी उभे राहून यावर्षी समितीमधील सदस्यांना २० लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी केली. पालकमंत्री पाटील यांनी आठ दिवसांत कोणत्या सदस्यास किती निधी यापूर्वी दिला, त्याची माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

जालिदंर पाटील म्हणाले, 'अडीच वर्षांपासून सातत्याने सभागृहात निमंत्रित सदस्यांना निधी देण्याची मागणी केली. मात्र अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडूनही दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची वेळ येणे हे प्रशासनाचे अपयश आहे. पाणलोट योजनेमधून झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. यातील दोषींना पाठिशी न घालता कारवाई करावी. राधानगरी तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांमधील रस्ते झाले नसल्याने पावसाळ्यात प्रचंड गैरसोय होते. याकडे लक्ष वेधूनही कार्यवाही न झाल्याने मी सभात्याग करून सदस्यपदाचा राजीनामा देत आहे.'

उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, 'पंतप्रधान आवास योजनेतून घरे मंजूर झालेल्या ३८६ लाभार्थिंची घरे पाडण्यात आली. त्यांना सरकारकडून दुसऱ्या हफ्त्यापोटीचे ८ कोटी रुपये मिळालेले नाहीत. परिणामी त्यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा. शहरातील दलीत वस्तीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी आलेला दोन कोटींचा निधी अखर्चित आहे. महानगरपालिकेतील निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे अनेक कामे रेंगाळली आहेत. त्यामध्ये पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावे.'

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'महानगरपालिकेकडे वर्ग केलेला निधी खर्च होत नाही. शहरातील रेल्वे ब्रिजसाठी ८० लाख रुपये वर्ग केला आहे. मात्र, महानगरपालिकेने त्यास ना हरकत दाखला दिलेला नाही. अशा अनेक रेंगाळलेल्या प्रकल्पांसाठी आयुक्तांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल.'

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी जिल्ह्यात बसविण्यात आलेली वॉटर एटीएम बंद असल्याचे निदर्शनास आणले. आमदार उल्हास पाटील, अरुण इंगवले, जीवन पाटील, रसिका पाटील, अनिता चौगुले, हेमंत कोलेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस पुणे विभागाचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयु्क्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह खातेप्रमुख सदस्य उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी सूत्रसंचालन केले.

खासदार संभाजीराजेंनी केल्या मागण्या

'७५ वर्षांपूर्वी वळिवडे येथे आलेल्या पोलंडवासियापैकी १३ जण ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तेथील राष्ट्राध्यक्षांसह येणार आहेत. ते जुन्या आठवणींना उजाळा देतील. त्यासाठी पोलंडवासी राहिलेल्या ठिकाणी सेवा-सुविधा निर्माण कराव्यात' अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली. ते म्हणाले, 'पन्हाळा ते पावनखिंड पदयात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरुंसाठी मुलभूत सुविधा द्याव्यात, जुन्या शिवाजी पुलाच्या संवर्धनासाठी आराखडा करावा, सुसज्ज क्रीडा संकुलासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव तयार करून द्यावा. उन्हाळ्यात पाणवठ्यांत पाणी राहण्यासाठी जंगलांतील नदीजोड उपक्रम राबवावा. सामुदायिक ठिंबक सिंचनसाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी संभाजीराने यांनी केली.

३८६ कोटी खर्च

करण्याचे उदिष्ट

'२०१९-२०साठी जिल्हा नियोजन समितीने तयार केलेल्या ३८६ कोटी ३८ लाखांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १२७ कोटी ८८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त व मंजूर निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले. गेल्यावर्षी ३६७ कोटी ५५ लाख निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ३४२ कोटी ३० लाखांचा निधी खर्च झाला आहे,' असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

शहरात पाइपद्वारे गॅस

केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकासासाठी दीड कोटींचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल खासदार संभाजीराजे यांचा अभिनंदनाचा ठराव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मांडला. यावेळी 'घराघरात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठ्याचे काय झाले?' असा खोचक प्रश्न आमदार हसन मुश्रीफ यांनी विचारला. हा धागा पकडून पालकमंत्री पाटील यांनी शहरात लवकरच पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा होईल, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंगदाणे, वेलदोडे दरात वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

या आठवड्यात शेंगदाणे, शेंगतेल आणि वेलदोड्याच्या दरात वाढ झाली आहे. तर तुरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपयांनी घट झाल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

दुष्काळ, अवेळी झालेला पाऊस यामुळे गेल्या पाच महिन्यांत डाळी व कडधान्याच्या दरात मोठी वाढ झाली. गेल्या महिन्यात तुरडाळीचा दर १०० रुपयांवर पोचला होता. पण डाळींची आयात झाल्याने दरात घट झाली आहे. तुरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपये घट झाल्याने सध्या ९२ रुपये किलो दराने विक्री होत आहे. शेंगदाणा दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो ११० रुपयांनी विक्री होत आहे. शेंगदाणा दरात वाढ झाल्याने शेंगतेलाच्या दरातही प्रतिकिलो तीन रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या भुईमुगाची पेरणी सुरू असल्याने शेंगदाणा दरवाढ झाली आहे, असे दुकानदारांनी सांगितले. वेलदोड्याच्या दरातही प्रतिकिलो ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. वेलदोड्याचा दर प्रतिकिलो ३६०० रुपयांवरुन ४००० रुपयांवर पोचला आहे. ग्राहकांना दहा ग्रँम म्हणजेच एक तोळा वेलदोडे खरेदीसाठी ४० रुपये मोजावे लागत आहे. गेल्या आठ महिन्यांत वेलदोडा दरात प्रतिकिलो दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. केरळमध्ये झालेल्या महापुराने वेलदोड्याचे पीक भुईसपाट झाल्याने दरवाढ झाली असून दिपावलीपर्यंत हा दर प्रतितोळा ५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : ११०

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ४४ ते ५०

साबुदाणा : ८४

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ९२, १००

मूगडाळ :, ९२

उडीद डाळ : ७२

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६४

मसूर : ७० ते

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९०

काळा वाटाणा : ६४

मूग ८४

मटकी : ८० ते १२०

छोले : ९० ते १००

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : २८ ते ३४

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : ३२

नाचणी : ३६ ते ४०

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १२८

सरकी तेल : ८६

खोबरेल : २४०

सूर्यफुल : ९० ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १६०

जिरे : २४०

खसखस : ९००

खोबरे : १८० ते २००

वेलदोडे : ४०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथिंबीर पन्नास रुपये पेंढी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाने ओढ घेतली असल्याने आणि आवक कमी झाल्याने भाजी मंडईत पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. कोथिंबीर प्रति पेंढी ५० रुपयांना विकली गेली. मेथी पेंढीचा दर २० ते ३० रुपये तर पालक, पोकळ्याचा दर १५ रुपये होता.

बाजारात वांगी, दोडका, भेंडीची चांगली आवक असून प्रति किलो ४० ते ६० रुपये दर आहे. फ्लॉवर आणि कोबीची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. कोबीचा लहान आकाराचा गड्डा १० रुपयांना तर मोठा गड्डा १५ ते ३० रुपयांना विकला गेला. फ्लॉवर गड्ड्याचा दर २० ते ४० रुपये इतका आहे. दुधी भोपळा प्रतिनग १० ते २० तर पडवळाचा दर १५ ते २० रुपये आहे.

कोथंबिरीची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. प्रति पेंढी ५० रुपयांना विक्री झाली. ग्राहकांना परवडण्यासाठी विक्रेत्यांनी पेंढीत विभागणी करून १० रुपयांना विक्री केली. कांदा आणि बटाट्याचे दर प्रतिकिलो २० रुपये इतके स्थिर आहेत. बाजारात रानमेवा अजूनही टिकून आहे. जांभूळ, करवंद, फणसाची आवक कायम आहे. रायवळ आंब्याबरोबर तोतापुरी आंब्याचे आगमन झाले आहे. १० ते १५ रुपये प्रतिनग अशी तोतापुरीची विक्री झाली. गेले महिना बाजारात गायब असलेली जवारी केळीचे आगमन झाले आहे. २० ते ५० रुपये डझन असा दर होता.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ४० ते ६०

टोमॅटो : २० ते ३०

भेंडी : ४०

ढबू : ४०

गवार : ४० ते ६०

दोडका : ४० ते ६०

कारली : ६०

वरणा : ३०

हिरवी मिरची : ६०

फ्लॉवर : २० ते ४०

कोबी : १० ते २०

बटाटा : २०

लसूण : ८०

कांदा : २०

आले : १०० ते १२०

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : २० ते ३०

कोथिंबीर : ५०

पालक : १५

शेपू :१० ते १५

पालक : १५

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १६०

डाळिंब : ६० ते ८०

चिकू : ८० ते १००

केळी : २० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६०(डझन)

आंबा : १०० ते २५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images