Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरची निमिशा चव्हाणस्टार लाइफ मिस इंडिया

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'स्टार लाइफ' या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या 'स्टार लाइफ मिस्टर अँड मिस इंडिया २०१९' (फॅशन शो) स्पर्धेत कोल्हापुरातील निमिशा राजेश चव्हाण ही अव्वल ठरली. आग्रा येथे रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात तिने सौंदर्य व बुद्धिमत्ता या बळावर 'मिस इंडिया २०१९'या किताबाची मानकरी ठरली. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरु, हैदराबाद अशा मोठ्या शहरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ७० स्पर्धकांची निवड झाली होती. पुरुष व महिला अशा दोन गटात स्पर्धा रंगली. अंतिम फेरीत एकूण सहा टप्प्यातील परफॉमॅन्स पाहून दोन्ही गटातील विजेतेपदे ठरविले. या स्पर्धेत सहभागी युवतींचे उत्कृष्ट रॅम्पवॉक, गीत संगीताचा बहारदार कार्यक्रम यामुळे स्पर्धेची शोभा आणखीनच वाढली. मुलाखत फेरी, व्यक्तीमत्व विकास व प्रश्नोत्तरे अशा फेऱ्यामध्ये छाप पाडत निमिशाने 'मिस इंडिया'चा किताब पटकाविल्यानंतर कार्यक्रमातील जल्लोष शिगेला पोहचला.

दरम्यान या स्पर्धेसाठी देशभरातील २५ मोठ्या शहरात ऑडिशन्स घेतल्या होत्या. त्यामध्ये ६००० स्पर्धकांनी भाग नोंदविला होता. या स्पर्धेच्या पुरुष गटात धरम सवलानी हे 'मिस्टर इंडिया २०१९' चे विजेते ठरले. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापुरातील युवा टँलेंट पुन्हा उजळले. निमिशाने नुकतेच पुणे येथील आयआयएचएम या कॉलेजमधून हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम या अभ्यासक्रमातून पदवी शिक्षण घेतले आहे. तिचे शिक्षण होलीक्रॉसमध्ये दहावीपर्यंतचे घेतले आहे. विवेकानंद कॉलेजमध्ये ज्युनिअर शिक्षण घेतले. विज्ञान शाखेतून अकरावी, बारावीचे शिक्षण घेत असताना तिने, शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र विभागातून भरतनाट्यमधून डिप्लोमा पूर्ण केला आहे. निमिशाचे वडील राजेश हे कारखानदार आहेत.निमिशाला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. शाळा, कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याविष्कार सादर केला होता. याशिवाय विविध प्रकारच्या फॅशन शो गाजविल्या आहेत.

लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची तिला आवड होती. खेळामध्ये तिनेही चमकदार कामगिरी केली आहे. 'स्टार लाइफ'या संस्थेने आयोजित केलेल्या सौंदर्यवती स्पर्धेमुळे तिला मोठे व्यासपीठ मिळाले. या ठिकाणी तिने आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. कोल्हापूरचे नाव उंचावले.

- राजेश चव्हाण, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३५ हजार रुपयांचा दंड वसूल

$
0
0

कोल्हापूर: महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे प्लास्टिक पिशवी प्रतिबंधात्मक मोहिमेंतर्गत शहरात विविध ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. झोरबा हॉटेल, ट्रुथफल, परिवार मॅचिंग सेंटर, राधिका मॅचिंग सेंटर, सोसायटी शर्टिंग, स्वस्तिक क्लॉथ यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड केला. दिवसभराच्या कारवाईत ३० हजार रुपयांची वसुली झाली. मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. मोहिमेत विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, मुनीर फरास, करण लाटवडे, नंदकुमार पाटील, स्वप्निल उलपे, सुशांत कांबळे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरण प्रतिक्षेतच

$
0
0

udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

कोल्हापूर : स्थापन होऊन दोन वर्षे उलटली तरी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाला गतीच आलेली नाही. प्राधिकरणातील विकासकामांसाठी जागेची गरज असून त्यासाठी सरकारकडे ११० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. प्राधिकरणासाठी २७ पदे मंजूर झाली असली तरी त्यापैकी दोनच पदांवर नेमणूक झाल्या आहेत. प्राधिकरणासाठी २५ हेक्टर सरकारी जमीन मिळावी म्हणून दिलेल्या प्रस्तावावर अद्यापही निर्णय झालेला नाही. नवीन बांधकाम नियमावलीचाही प्रश्नच आहे. त्यामुळे प्राधिकरणातील गावांत नवीन बांधकामांना परवानगी दिली जात नाही. यामुळे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून निर्णयांसाठी प्रतिक्षाच अनुभवास येत आहे. नागरिकांची अवस्था 'ना घर का, ना घाट का' अशी झाली आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला झालेल्या विरोधामुळे शहरालगतच्या ४२ गावांसाठी २०१७ मध्ये क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले. यातून शहराप्रमाणे शेजारील गावांचा विकास होऊन नागरीकरणाचा ताण विभागला जाईल, अशी सरकारची अपेक्षा होती. पण या निर्णयाला नंतर गावांमधून तीव्र विरोध झाला. यात सहभागी बहुतांश गावांनी प्राधिकरण नको म्हणून ठराव करुन दिले. त्यातून प्राधिकरणाची वाटचाल जवळजवळ थंडावलीच. कार्यालयात केवळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरीत अधिकारी, कर्मचारी, निधी व साधनसामग्री नसल्याने काहीच काहीच करता आलेले नाही.

समाविष्ट गावांमध्ये विरोध होत असल्याने सरकारी जमिनीवर काम करण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी जमिनींची माहिती घेतली. काहीच गावांमध्ये बऱ्यापैकी सरकारी जमीन उपलब्ध असल्याने किमान ती जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रथम काम सुरू केले. पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी अशा दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमधील २५ हेक्टरच्या आसपास सरकारी जमिनीची मागणी प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ही जमीन उपलब्ध झाल्यानंतर तिथे एसटीपीसारखे प्रकल्प राबवण्याचा मानस आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असला तरी त्यावर निर्णय झालेला नाही.

प्राधिकरणाने सरकारकडे जमीन मागणी केली असताना ती उपलब्ध झाल्यानंतर त्यावर विकासकामांसाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठीही निधीची मागणी केली आहे. विविध कामांसाठी ११० कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून प्रस्ताव दिला आहे. हा निधी भूसंपादनासाठी तसेच एसटीपींसाठी वापरण्यात येणार आहे. त्याबाबत पुढील महिन्यापर्यंत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. या दोन महत्वाच्या विषयांवर अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे नवीन कार्यालय झाल्यानंतर २७ पदांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. पण अद्यापपर्यंत त्यांच्या नेमणूक झालेल्या नाहीत. या महिन्यात एक नगररचनाकार व एक स्वीय सहाय्यक रुजू झाले आहेत. पुढील महिन्यापर्यंत आदेश निघतील, अशी शक्यता आहे. या अवस्थेमुळे प्राधिकरण केवळ नावापुरतेच राहिले आहे.

प्राधिकरणालाही समान नियमावली

राज्यामध्ये समान बांधकाम नियमावली करण्यात येत आहे. त्यासाठी सध्या हरकती व सूचनांवर सुनावणी सुरू आहे. ही नियमावली प्राधिकरणालाही लागू होणार आहे. यापूर्वी प्राधिकरणाकडून ४२ गावांमधील विकासकामांना तसेच सुधारणांना चालना मिळावी यासाठी विशेष सवलत देणारी नियमावली तयार करण्यात आली होती. ती मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आली आहे. पण राज्य सरकारने सर्वत्र समान बांधकाम नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतल्याने प्राधिकरणाने तयार केलेल्या नवीन नियमावलीचा उपयोग होणार नाही. मात्र उपनियमांमध्ये काही बाबींचा अंतर्भाव करता येण्याची शक्यता आहे. यासाठी समान बांधकाम नियमावली लागू होण्याची प्रतिक्षा केली जात आहे. त्यानंतर प्राधिकरणाची वाटचाल सुकर होणार की खडतर हे स्पष्ट होणार आहे.

लोगो : मटा भूमिका

क्षेत्र प्राधिकरणातून

विकासाला गती हवी

शहराच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या हद्दवाढीला चालना मिळत नसल्याने राज्य सरकारने प्राधिकरणचा नवा मार्ग अवलंबला. पण सरकार त्या नव्या मार्गावरही नीट वाटचाल करु शकले नाही. यासाठी सत्ताधाऱ्यांचे नेते, लोकप्रतिनिधी यांनी नजीकचा परिणाम न पाहता भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करुन प्राधिकरणासाठी वेळ देण्याची गरज आहे. प्राधिकरणाचे कार्यालय केवळ नावापुरते राहिले असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. यामध्ये समाविष्ट ४२ गावांमधील जमीन जाणार, राजकीय स्थान शिल्लक राहणार नाही व बांधकामाची परवानगी अडचणीची होणार अशा कारणांनी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तो विरोध कमी करण्यासाठी सरकारने काही कामे करण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात पूर्वीपेक्षाही वाईट प्रशासनाचा अनुभव येऊ लागला. यातून ग्रामस्थांची मानसिकता पूर्वीपेक्षाही कणखर झाली. याकरिता सरकारने त्या ग्रामस्थांची कामे सुरळीत व लवकर होतील हे पाहण्याची गरज होती. त्यातून वातावरण निवळले गेले असते, पण सरकारला हेच होऊ द्यायचे नव्हते असेच वाटत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारमध्ये वजन वापरून प्राधिकरण मंजूर करून घेतले. आता ते मार्गी लावण्यास त्यांना फार अडचण येईल असे वाटत नाही. यातून विकासाला गती यावी ही अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूविचारच देशाला प्रगतीपथावर नेतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शंभर वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरच्या कुर्मी समाजाच्या केवळ एका निवेदनाचा मान राखत दळणवळणाची कोणतीही प्रगत साधने नसताना शाहू महाराज दीड हजार किलोमीटर अंतर पार करून कानपूरला आले. शेतकऱ्यांचा उद्धारक अशी ख्याती असलेल्या शाहू महाराजांना दिलेल्या राजर्षी या पदवीचा त्यांनी केवळ स्वीकारच केला नाही तर आयुष्यभर ही बिरूदावली त्यांनी कार्याने सन्मानित केली. सद्यस्थितीत राजर्षी शाहूंचे विचारच देशाला प्रगतीपथावर नेतील', असा विश्वास अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे मंडल अध्यक्ष कैलासचंद्र पटेल यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर व कानपूर यांच्यातील आत्मीय बंध शाहू महाराजांमुळेच आजही टिकून आहेत व यापुढे ते अधिक दृढ होतील, असेही पटेल म्हणाले.

उत्तरप्रदेशातील कानपूर येथे शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल केलेल्या घटनेचे यंदा शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित राजर्षी कृतज्ञता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे ही परिषद झाली. यावेळी पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते.

यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव यांना शाहू महाराज यांच्या हस्ते राजर्षी शाहू विचार पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर व्यंकाप्पा भोसले, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, भीकशेठ पाटील, डॉ. पद्मा पाटील यांना राजर्षी शाहू विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाहूकालीन संस्था, वसतिगृह, शाहूचे विचार कार्य व प्रसार करणाऱ्या संस्था राजर्षी शाहू सन्मान पत्र प्रदान करण्यात आले.

पटेल म्हणाले, 'विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यापासून ते महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यापर्यंत तसेच दलित, बहुजनांना शिक्षित करण्यापासून जागतिक स्तरावरील विकासात्मक उपक्रम राबवण्यापर्यंत असंख्य कायद्यांचे जनक राजर्षी शाहू महाराज होते. त्यांचे विचारच देशाला प्रगतीपथावर नेतील. माणसाला जात किंवा त्याच्या कामामुळे क्षुद्र समजण्याच्या काळात शाहू महाराजांनी समाजाला दिलेली वैचारिक आधुनिकतेची दिशा आमच्यासाठी आदर्श आहे. आजच्या काळात स्त्री अत्याचार, जातीवरून होणारी अवहेलना, बेरोजगारी अशा अनेक समस्यांवर शाहूंच्या विचारातून काम होण्याची गरज आहे. जे सरकार केवळ भांडवलदारांचा विचार करेल, त्यांना जागा दाखवण्याची ताकद कायम सबळ ठेवली तरच समाज घडू शकेल.' अॅड. शशिकांत सचान यांनीही मनोगत व्यक्त केले.

महापौर सविता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, शाहू महाराजांनी साडे पाचशे एकर जागा कुष्ठरोग्यांसाठी दिली. वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत त्याच जागेत उभी राहिली आहे. ही जागा धनदांडग्यांनी बळकावण्याचा प्रयशाहू विचारच देशासाठी प्रगतीकारकत्न झाला. तो हाणून पाडला. नर्सरी बागेतील शाहू राजांच्या समाधी स्थळासाठी सरकारने कोणतीही मदत केली नाही. आतापर्यंत तीन कोटी रुपये खर्च केले असून, सात कोटी रुपये खर्च करणार आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे समाधी स्थळ होईल. शाहू महाराजांच्या ऋणाचे पांग फेडण्यासाठी त्यांचा विचार हाच मोठा ठेवा आहे.

अध्यक्षीय भाषणात शाहू महाराज म्हणाले, 'शाहू महाराजांचा विचार केवळ भाषणपुरता सीमित न राहता तो कृतीत आला तरच समाजात परिवर्तन होईल. लोकशाहीत उत्तर प्रदेशमधील अनेक गोष्टी शाहू विचारानुसार बदलता येतील. त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.'

यावेळी कुर्मी क्षत्रिय महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. राजकुमार सचान, संजेशकुमार कटियार आदी उपस्थित होते. मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक यांनी प्रास्ताविक केले. बबनराव रानगे यांनी स्वागत केले. डॉ. पद्मा पाटील यांनी महासंघाच्या निमंत्रकांचा परिचय व या भेटीचे संयोजन सांगितले. इंद्रजित सावंत यांनी परिषदेमागील मनोदय व्यक्त व्यक्त केला. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. इंद्रजित माने यांनी आभार मानले.

मला तुमच्यातीलच एक समजा

'शंभर वर्षापूर्वी कानपूरमधील परिषदेत शाहू महाराज म्हणाले होते की, 'मला तुमच्यातीलच एक समजा. शेतकऱ्यांसाठी मी शेतकरी आहे, मजुरांसाठी मी मजूर आहे. माझ्या पूर्वजांनी शेतीच केली आहे. त्यांच्या या मनोगताचा इतिहास आजही आमच्या समाजात आळवला जातो. सर्वसामान्यांमध्ये रमणारे, त्यांच्या व्यथा आपल्या मानून काम करणारे राजेपण कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाले ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे,' अशा शब्दांत पटेल यांनी शाहू महाराजांच्या कार्याची महती सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्तेचा ‘जरगनगर’पॅटर्न

$
0
0

लीड...

सरकारी शाळा म्हटल्या की काहीजण शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र, कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या अनेक शाळांनी गेल्या काही वर्षांत खासगी शिक्षणसंस्थांना मागे टाकत चमकदार शैक्षणिक कामगिरी केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता असो की शिष्यवृत्ती परीक्षा, मैदानावरील कामगिरी असो की नाविन्यापूर्ण शैक्षणिक उपक्रम यामध्ये या शाळांनी वेगळा मानदंड निर्माण केला आहे. विद्यार्थीप्रिय ठरलेल्या अशा शाळांची ओळख....

कोल्हापूर टाइम्स टीम

पहिली ते सातवीपर्यंत सेमी इंग्रजी व मराठी माध्यमातील शिक्षण, डिजिटल क्लासरुम आणि कम्प्युटर लॅब, मीना राजू मंच अंतर्गत जीवन कौशल्य शिक्षण अशा उपक्रमामुळे जरगनगरातील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरने कोल्हापूरच्या शैक्षणिक वर्तुळात वेगळी ओळख तयार केली आहे. यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. जरगनगर विद्यामंदिर म्हणजे गुणवत्तेचा पॅटर्न असे नवे समीकरण बनले आहे.

महापालिकेच्या मालकीच्या शाळेचा नावलौकिक वाढविण्यात जरगनगर विद्यामंदिराने मोलाची कामगिरी बजावली आहे. अन्य शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू होते. मात्र, गेल्या काही वर्षात जरगनगर विद्यामंदिरात गुढीपाडव्याला पहिलीचे प्रवेश फुल्ल होतात. प्रवेशासाठी रांगा लागतात. सरकारी शिष्यवृत्तीसह अन्य परीक्षेतही यशाचा चढता आलेख आहे.राज्य सरकारच्या राज्यातील १०० शाळांमध्ये दर्जेदार शाळा म्हणून नामांकन आहे. विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग प्रोजेक्ट रुम व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो. कला, कार्यानुभव व शारीरीक शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षक आहेत.

यंदापासून आठवीचे वर्ग शक्य

जरगनगर विद्यामंदिर येथे यंदापासून आठवीचे सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. पाचवीच्या वर्गाप्रमाणे आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती वर्ग घेण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत. शिक्षकांनी यासंदर्भात पालकांशी चर्चा केली आहे. महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर सरिता मोरे, इतर पदाधिकारी व नगरसेवक हे सगळेजण इयत्ता आठवीचे सेमी इंग्रजीचा वर्ग सुरू करण्यासाठी सकारात्मक आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचे गमक

मुलांची चौथीची परीक्षा संपल्यानंतर लगेच पाचवीचे शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू करण्यात येतात. प्रारंभी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी निवड, नंतर शिक्षकांची निवड करून जबाबदारी सोपविली जाते. शिष्यवृत्तीची पूर्ण परीक्षा होईपर्यंत शिक्षक एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. सराव प्रश्नपत्रिकेवर भर असतो. शिक्षकांचे कष्ट आणि विद्यार्थ्यांची साथ यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत जरगनगर पॅटर्न तयार झाला आहे. यावर्षी विद्यामंदिराचे आठ विद्यार्थी राज्य गुणवत्ता तर १५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले.

शिष्यवृत्तीपरीक्षेत विद्यार्थी वरच्या क्रमांकांने उत्तीर्ण होणे ही जरगनगर शाळेची परंपरा खूप वर्षाची आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा स्तरावर सूक्ष्म नियोजन केले जाते. जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे चमकतील याकडे जास्त लक्ष दिले जाते. योग्य नियोजन आणि शंभर टक्के अंमलबजावणी यामुळे यशाची चढती कमान आहे.

- उत्तम गुरव, मुख्याध्यापक जरगनगर विद्यामंदिर

दृष्टिपथात शाळा

शाळेच्या स्थापनेवेळी : ११ एप्रिल १९९४

स्थापनेवेळी पटसंख्या : ४२

सध्याची पटसंख्या : १७३६

बालवाडीतील विद्यार्थी : ४५०

शिक्षक ४२

कर्मचारी ४

- पहिली ते सातवीपर्यंत शिकणाची सुविधा

- पहिलीचे प्रवेश गुढी पाडव्यादिवशी फुल्ल

- ३५० विद्यार्थी सरकारी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत

- सलग दोन वर्षे खेळात शहरस्तरावर सर्वसाधारण विजेतेपद

- यंदापासून आठवीची सेमी शिष्यवृत्ती, एनएनएमएसचे वर्ग सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईच्या खजिन्यात वर्षभरात एक कोटीचे दागिने

$
0
0

कोल्हापूरः

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या वर्षभरात एक कोटी नऊ लाख ७५ हजार किंमतीचे सोने व चांदीचे दागिने जमा झाले. वर्षभरात भाविकांकडून देणगीदाखल आलेल्या दागिन्यांची मूल्यांकन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. या दिवशीच्या सोनेदराप्रमाणे दागिन्यांची किंमत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जाहीर केली. गेल्यावर्षीपेक्षा सोन्याच्या दागिन्यांमध्ये ८०० ग्रॅमने वाढ झाली असून, चांदीच्या अलंकारांमध्ये २४ किलोंनी घट झाली आहे.

देवीच्या दागिन्यांबाबत माहिती देताना जाधव म्हणाले की, देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या अंबाबाई देवस्थान आणि श्री जोतिबा देवस्थानाला दरवर्षी लाखो भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करतात. त्यात अनमोल पाचू, खडे, हिरे माणिकांचाही समावेश आहे. या सर्व दागिन्यांचे मूल्यांकन दरवर्षी जून महिन्यात करण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षी २०१८-१९ मध्ये देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांचे मूल्यांकन १७ ते २० जून दरम्यान गरुड मंडप येथे पूर्ण करण्यात आले. सरकारमान्य अधिकृत मूल्यांकनकार पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे, उमेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

२०१७-१८ च्या तुलनेत सन २०१८-१९ मध्ये जमा झालेल्या दागिन्यांमध्ये वाढ झाली आहे. यात सोन्यामध्ये १७-१८ च्या तुलनेत ८०० ग्रॅमची वाढ होऊन एकूण सोने तीन किलो ४३२ ग्रॅम झाले आहे. तर चांदीमध्ये घट होऊन यावर्षी केवळ १० किलो ११६ ग्रॅम चांदी भाविकांकडून देणगी स्वरुपात आली आहे. गेल्या वर्षी देवीला ३४ किलो वजनाचे चांदीचे दागिने देणगी म्हणून आले होते. जोतिबा देवस्थान कडे २०१८-१९ मध्ये सोने १ किलो ७३ ग्रॅम सोने जमा झाले तर १ किलो ५३४ ग्रॅम चांदी जमा झाली आहे. यावेळी देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य संगीता खाडे, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

३२ लाखांचा किरीट आणि ११ तोळ्यांचे बिस्कीट

गेल्या वर्षात नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ व उन्हाळी सुट्टीतील पर्यटक भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. लाखो भाविक देवीच्या दर्शनाला आले. मंदिरात सध्या १७ दानपेट्या आहेत. यामध्ये भाविकांकडून दान स्वरुपात दागिनेही अर्पण करण्यात आले. यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांचा समावेश आहे. कर्नाटकातील एका भाविकाने अंबाबाईला ३२ लाखांचा ९८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा किरीट अर्पण केला आहे. तर नवग्रहाचा सोन्याचा हारदेखील लक्षवेधी आहे. ११ तोळे वजनाचे व तीन लाख ३६ हजार किमतीचे सोन्याचे बिस्कीट भाविकाने दान स्वरुपात दिले आहे. काळ्या मण्याची पोत आणि सोन्याचे दोन मण्यासह वाट्या गाठवलेली मंगळसूत्रे मोठ्या संख्येने आली असून सध्या तीन पोती मंगळसूत्रे देवीच्या खजिन्यात आहेत. चांदीमध्ये जोडव्या, निरांजने, पानाचा विडा अशा दागिन्यांसह पूजा साहित्याचा समावेश आहे.

अंबाबाई देवस्थानकडे वर्षभरात जमा झालेले दागिने

सोनेः ३ किलो ४३२ ग्रॅम ७२० मिली
एकूण किंमत: १ कोटी ९ लाख ७५ हजार ४०३ रुपये
चांदीः १० किलो ११६ ग्रॅम, ९०० मिली
किंमत : ४ लाख १० हजार ७४६ रुपये

जोतिबा देवस्थानकडे जमा झालेले दागिने (सन २०१८-१९)

सोने : १७ तोळे
एकूण किंमत: ५ लाख ५० हजार ८१९ रुपये
चांदी : १ किलो ५३४ ग्रॅम ८०० मिली
एकूण किंमत: ६२ हजार ३१२ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर संघ विजयी

$
0
0

कोल्हापूर : जळगाव येथे सुरू असलेल्या राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने बीड संघाचा १०-० अशा गोलने धुव्वा उडवला. अधिका भोसलेने तीन गोल नोंदवले. प्रतीक्षा मिठारी, निशा पाटील यांच्या पासवर तिने गोल नोंदवले. प्रतीक्षा मिठारीने चार गोलची नोंद केली. ऋतुजा सूर्यवंशी, जुलेखा बिजलीने दिलेल्या पासवर गोल केले. ज्योती ढेरेने दोन, तर पौर्णिमा साळेने एक गोल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीसाठीयंत्रणा सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पद्माराजे उद्यान व सिद्धार्थनगर प्रभागाच्या रविवारी (ता. २३) होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत प्रत्येकी पाच मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. शनिवारी (ता. २२) कर्मचारी मतदान साहित्य घे‌ऊन मतदान केंद्रावर दाखल होणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'सिद्धार्थ नगर प्रभाग क्रमाक २८ साठी पचायत समिती कार्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्रे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथील एक केंद्रावर सुमारे साडेपाच हजार मतदान मतदानाचा हक्क बजावतील. तर पद्माराजे उद्यान प्रभागातील मतदान सावित्रीबाई फुले कन्याशाळा येथे चार तर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघच्या इमारतीमधील एका केंद्रावर मतदान होणार आहे.'

'सोमवारी सकाळी सासने ग्राउंड येथील दौलतराव देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी ११ वाजता दोन्ही प्रभागांचा निकाल जाहीर केला जाईल.' दरम्यान सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही प्रभागांतील मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी निवडणूक अधिकारी वैभव नावडकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील व अधिकारी उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार

$
0
0

सिंगल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रंकाळा सुशोभिकरणाच्या कामास गती देण्यासह शहर, जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी अधिकाधिक निधी खेचून आणणार आहे', असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी दिले.

विकासकामांसंबंधी माहिती सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्षीरसागर म्हणाले, 'नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद मिळाल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल. काही दिवसात विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असल्याने कमी कालावधी आहे. यामुळे लवकरच महत्वाच्या विभागांच्या सचिवांची मुंबईत बैठक घेऊन सुरू असलेल्या कामांना गती दिली जाईल. रंकाळा सुशोभिकरणाचे काम केले जात आहे. यासह राजाराम, कोटीतीर्थ तलावांचेही सुशोभिकरण केले जाईल. शहरातील खुल्या जागा विकसित केल्या जातील. सुसज्ज असे मैदान तयार केले जाईल. यासंबंधी महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कल्लशेट्टी, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. दरम्यान, शहरातर्गंत भूमीगत विद्युत वाहिनीचे काम वेळेत न झाल्याने २१ कोटींचा निधी परत गेला. तो पुन्हा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. विदर्भ वैधानिक, मराठवाडा वैधानिक विकास, उर्वरित महाराष्ट्रातील मंडळे आणि रोजगार हमी योजना, डोंगराळ क्षेत्र विकास, प्रादेशिक बँकांना भाग भांडवल पुरवणे, आमदार, खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस पाठपुरावा केला जाईल.'

........

पुन्हा आमदार होणार

'तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पुन्हा राज्यात भाजप, शिवसेनेचेच सरकार येईल. शहराचा आमदार मीच होईन असे', असाही विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला. विकासकामांत कोणीही राजकारण आणू नये, असेही त्यांनी आवाहन केले. थेट पाईपलाईनमध्ये आलेले सर्व प्रशासकीय अडथळे दूर केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरीश शहाची जामिनासाठी हायकोर्टात धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिशेबात तूट आलेल्या रकमेच्या वसुलीसाठी अभियंता तरुणास मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला बांधकाम व्यावसायिक गिरीश शहा याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी फेटाळल्याने त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या अर्जावर २४ जून रोजी सुनावणी होत आहे.

शहा याने केलेल्या मारहाणीतून विष प्राशन केलेल्या अभियंता अतीश रवींद्र गिरीबुवा (वय २४, रा. सावर्डे तर्फ असंडोली, ता. पन्हाळा) याचा आठ जून रोजी एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहा याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो साथीदारासह पसार आहे. पोलिसांनी त्याच्या कोल्हापूर, सांगली येथील बांधकाम प्रकल्प, घरी छापे टाकले. मात्र तो पसार झाला. त्याने अॅड. शिवाजीराव राणे यांच्यातर्फे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्या अर्जावर सुनावणी होऊन फेटाळल्याने अटक टाळण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजपत्रित अधिकारी संघाचे ९ जुलैला मौन आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सरकारच्या विविध खात्यांत १ लाख ९१ हजार पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम प्रशासनावर होत आहे. शेती, उद्योगांचा विकास दर मंदावला आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे कर्मचाऱ्यांना अडचणीचे झाले आहे. यामुळे रिक्त पदे त्वरित भरण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ९ जुलै रोजी मुंबईत मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे मौन आंदोलन केले जाईल', अशी माहिती राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 'सामाजिक बांधिलकी मानून दुष्काळग्रस्तांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा जून महिन्यातील एक दिवसाचा पगार दिला जाणार आहे. यातून ४० कोटीं रूपये दुष्काळग्रस्तांसाठी मिळतील, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

देसाई म्हणाले, 'सरकारी अधिकाऱ्यांच्या ७२ संघटनांची शिखर संस्था असलेल्या महासंघातर्फे रिक्त जागा भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आर्थिक पाहणी अहवालात विकास कमी असल्याचे सांगितले आहे. त्यामागे रिक्त जागा हेदेखील एक कारण आहे. गेल्या वर्षी सरकारने ७२ हजार रिक्त जागांची मेगा भरती करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात साडेतीनशेही कर्मचारी कामावर रूजू झालेले नाहीत. आताच्या अधिवेशनात पुन्हा दीड लाख जागा भरण्याची घोषणा सरकारने केली आहे. अशा फसव्या घोषणा करण्यापेक्षा सरकारने रिक्त जागा भरण्याची प्रत्यक्षातील कार्यवाही सुरू केली पाहिजे. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याची गरज आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्नही कायम आहे. अनेक वर्षांपासूनच्या निवड प्रक्रियेला छेद देऊन सरकार मागील दाराने अधिकारीपदावर काहीजणांना बसवत आहे, हे चुकीचे आहे. कंत्राटी पध्दत बंद झाली पाहिजे. सरकारी सेवेतील डॉक्टरांची वेळ निश्चित झाली पाहिजे. सध्या एकूण महसूली उत्पन्नापेक्षा १४ टक्के खर्च प्रशासनावर होतो. शिक्षक, शिक्षकेतर आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरल्यानंतर खर्च २० टक्यांपर्यंत जाईल. आतापर्यंत रिक्त जागा भरण्यात सरकारला अपयश आले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी पहिल्या टप्प्यात २७ जूनला जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, मुख्य सचिवांना निवेदन दिले जाईल. त्यानंतर ९ जुलैला एक दिवस मौन आंदोलन केले जाईल.' यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष विनायक लहाडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह संघाचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

...

चौकट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस कार्डधारकांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरात अनेक फेरीवाल्यांकडे बोगस बायोमेट्रिक कार्ड असून कार्डचा वापर करून व्यवसाय न करता इतर व्यावसायिकांकडून भाडे आकारणी केली जाते. बसस्थानक परिसरात एका फेरीवाल्यांकडून तब्बल १,१०० रुपये भाडे घेतले जात असून याठिकाणी एका व्यक्तीच्या दहा-दहा केबिन्स आहेत. केबिनधारक जर व्यवसाय करत नसतील, तर त्यांची केबिन रद्द करुन त्यांच्यावर कारवाई करा,' अशी सूचना शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती शारंगधर देशमुख व सदस्य सत्यजित कदम यांनी केली.

अतिक्रमण कारवाईनंतर पुन्हा मध्यवर्ती बसस्थान परिसरात केबिन व फेरीवाल्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत सभापती देशमुख व कदम म्हणाले, 'अनेक केबिनधारकांकडे बोगस बायोमेट्रिक कार्ड आहेत. या कार्डचा वापर करून ते स्वत: केबिन न चालवता भाडेतत्वावर देत आहेत. त्यांचा परवाना रद्द करून कारवाई करा.'

संजय मोहिते म्हणाले, 'अमृत योजनेच्या रिस्टोलेशन कामाची काय परिस्थिती आहे. पाण्याच्या टाक्यांच्या कामाचे काय झाले. शाहूपुरी येथील पाचबंगला परिसरात काम अपूर्ण आहे. पाऊस नसेल तर डांबरीकरण करा.' यावार 'ड्रेनेज लाईनची खोदाई केलेल्या कामाचे रिस्टोरेशन सुरू आहे. टी उपलब्ध नसल्याने काम प्रलंबित आहे. डब्ल्यूबीएम डांबरीकरण पावसाळ्यानंतर सुरू होईल. बीबीएमचे काम सुरू असून पावसाचा अंदाज घेऊन दोन दिवसांत डांबरीकरण केले जाईल,' असा खुलास प्रशासनाने केला.

दीपा मगदूम म्हणाल्या, 'अतिक्रमण मोहीम बंद करण्याचे कारण काय. शहरात अनेक दुकानांसमोर वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळे ठरतील असे बोर्डे लावले जात आहेत.' तर कदम व देशमुख यांनी प्रादेशिक परिहवन कार्यालयासमोर अनाधिकृत केबिन्सची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. 'फुटपाथवरील कारवाई सोमवारपासून पुन्हा सुरू होईल. पुढील आठवड्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील अनाधिकृत केबिन हटवल्या जातील.' असे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले.

सभापती देशमुख यांनी घरफाळा व इस्टेट विभागाकडून सुरू असलेल्या सर्व्हे कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुढील बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले. 'कचरा संकलन करण्यासाठी टीपर खरेदी केल्या आहेत. तीन महिन्यानंतर त्यांची दुरुस्ती कोण करणार. सार्वजनिक ठिकाणावरील कंटेनर स्थलांतरित करू नका तसेच दुरुस्तीसाठी निविदा काढा,' अशी सूचना देशमुख, कदम व मगदूम यांनी केली. 'कचरा संकलनासाठी १०४ टीपर घेतल्या असून ९० टीपर ५० प्रभागातून कचरा संकलन करतील. १४ टीपर राखीव ठेवल्या असून दुरुस्तीसाठी वेगळी एजन्सी नेमावी लागेल,' असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

'ईएसएसएल कंपनीकडून एलईडी दिवे बसवण्याचे सुरू असलेल्या कामामध्ये गती नाही. कंपनीबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. महापालिकेवर कंपनी लादली असून कंपनी काम करत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करा. आठ दिवसांत सर्व ठिकाणी कामे सुरू झाली नाही, तर येथून पुढे काम करू दिले जाणार नाही,' अशा इशारा देशमुख व सचिन पाटील यांनी दिला. याबाबत कंपनीला लेखी पत्र देणार असल्याचे विद्युत विभागाने सांगितले.

शास्त्रीनगर मैदानाला कुलूप

शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शास्त्रीनगर मैदनावरुन सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शास्त्रीनगर मैदान भाड्याने दिले आहे का? असा प्रश्न उपस्थित करत छाया पोवार म्हणाल्या, 'परिसरातील मुलांना मैदान खेळण्यासाठी उपलब्ध होत नसून एका व्यक्तीने त्याला कुलूप घातले आहे. मुलांकडून स्पर्धेसाठी तीन हजार रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला अटकाव करुन महापालिकेने त्वरित मैदानाचा ताबा घ्यावा.' मैदान भाड्याने दिले नसून समक्ष पाहणी करुन निर्णय घेऊ, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 18

अंबाबाईच्या खजिन्यात कोटीचे दागिने

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या वर्षभरात एक कोटी नऊ लाख ७५ हजार किंमतीचे सोने व चांदीचे दागिने जमा झाले. वर्षभरात भाविकांकडून देणगीदाखल आलेल्या दागिन्यांची मूल्यांकन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. आजच्या सोनेदराप्रमाणे दागिन्यांची किंमत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जाहीर केली. गेल्यावर्षीपेक्षा सोन्याच्या दागिन्यांमध्ये ८०० ग्रॅमने वाढ झाली असून चांदीच्या अलंकारांमध्ये २४ किलोंनी घट झाली आहे.

देवीच्या दागिन्यांबाबत माहिती देताना जाधव म्हणाले,'देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या अंबाबाई देवस्थान आणि श्री जोतिबा देवस्थानाला दरवर्षी लाखो भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करतात. त्यात अनमोल पाचू, खडे, हिरे माणिकांचाही समावेश आहे. या सर्व दागिन्यांचे मूल्यांकन दरवर्षी जून महिन्यात करण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षी २०१८-१९ मध्ये देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांचे मूल्यांकन १७ ते २० जून दरम्यान गरुड मंडप येथे पूर्ण करण्यात आले. सरकारमान्य अधिकृत मूल्यांकनकार पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे, उमेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

२०१७-१८ च्या तुलनेत सन २०१८-१९ मध्ये जमा झालेल्या दागिन्यांमध्ये वाढ झाली आहे. यात सोन्यामध्ये १७-१८ च्या तुलनेत ८०० ग्रॅमची वाढ होऊन एकूण सोने तीन किलो ४३२ ग्रॅम झाले आहे. तर चांदीमध्ये घट होऊन यावर्षी केवळ १० किलो ११६ ग्रॅम चांदी भाविकांकडून देणगी स्वरुपात आली आहे. गेल्या वर्षी देवीला ३४ किलो वजनाचे चांदीचे दागिने देणगी म्हणून आले होते. जोतिबा देवस्थान कडे २०१८-१९ मध्ये सोने १ किलो ७३ ग्रॅम सोने जमा झाले तर १ किलो ५३४ ग्रॅम चांदी जमा झाली आहे. यावेळी देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य संगीता खाडे, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

देवस्थानकडे वर्षभरात जमा झालेले दागिने

सोने ३ किलो ४३२ ग्रॅम ७२० मिली

एकूण किंमत: १ कोटी ९ लाख ७५ हजार ४०३ रुपये

चांदी १० किलो ११६ ग्रॅम, ९०० मिली

किंमत : ४ लाख १० हजार ७४६ रुपये

जोतिबा देवस्थानकडे जमा झालेले दागिने (सन २०१८-१९)

सोने : १७ तोळे

एकूण किंमत: ५ लाख ५० हजार ८१९ रुपये

चांदी : १ किलो ५३४ ग्रॅम ८०० मिली

एकूण किंमत: ६२ हजार ३१२ रुपये

३२ लाखांचा किरीट आणि ११ तोळ्यांचे बिस्कीट

गेल्या वर्षात नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ व उन्हाळी सुट्टीतील पर्यटक भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. लाखो भाविक देवीच्या दर्शनाला आले. मंदिरात सध्या १७ दानपेट्या आहेत. यामध्ये भाविकांकडून दान स्वरुपात दागिनेही अर्पण करण्यात आले. यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांचा समावेश आहे. कर्नाटकातील एका भाविकाने अंबाबाईला ३२ लाखांचा ९८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा किरीट अर्पण केला आहे. तर नवग्रहाचा सोन्याचा हारदेखील लक्षवेधी आहे. ११ तोळे वजनाचे व तीन लाख ३६ हजार किमतीचे सोन्याचे बिस्कीट भाविकाने दान स्वरुपात दिले आहे. काळ्या मण्याची पोत आणि सोन्याचे दोन मण्यासह वाट्या गाठवलेली मंगळसूत्रे मोठ्या संख्येने आली असून सध्या तीन पोती मंगळसूत्रे देवीच्या खजिन्यात आहेत. चांदीमध्ये जोडव्या, निरांजने, पानाचा विडा अशा दागिन्यांसह पूजा साहित्याचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईसह जोतिबा देवस्थानचे उत्पन्न २२ कोटींवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यटक भाविकांची वाढती संख्या, महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, गोवा, गुजरात येथील पर्यटकांकडून मिळणारे देणगीमूल्य, वर्षभरातील विविध उत्सवांना भाविकांकडून मिळणारा प्रतिसाद यामुळे गेल्या वर्षभरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई व जोतिबा देवस्थान व उर्वरित छोटी मंदिरे यांना एकत्रित २२ कोटी ६१ लाख ५७ हजार ६५३ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षीच्या उत्पन्नापेक्षा यंदा दीड कोटी रूपयांनी वाढ झाली असून वर्षभरातील खर्च वगळता देवस्थानच्या खात्यात यंदा १४ कोटी रूपयांची शिल्लक राहिली आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील साडेतीन हजारांहून अधिक मंदिरांपैकी अंबाबाई मंदिर व वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर ही दोन महत्त्वाची मंदिरे आहेत. दरवर्षी जून महिन्यात देवस्थान समितीच्यावतीने या दोन्ही मंदिरांच्या उत्पन्नस्त्रोताच्या माध्यमातून खात्यात येणाऱ्या रकमेची मोजदाद केली जाते. जूनमध्ये वर्षभरातील उत्पन्नाची मोजणी झाल्यानंतर देवस्थान व्यवस्थापनाच्यावतीने श्रावण, नवरात्रोत्सव, दिवाळी, नाताळ व उन्हाळी सुटीतील पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधांचे नियोजन केले जाते.

अंबाबाई व जोतिबा देवस्थानपैकी अंबाबाई देवस्थानला १९ कोटी ८१ लाख १८ हजार १४४ रूपये उत्पन्न मिळाले आहे. तर जोतिबा देवस्थानला मिळालेल्या उत्पन्नाची रक्कम १ कोटी ३० लाख १७ हजार ४५१ रूपये इतकी आहे. देवस्थानच्या अखत्यारीतील उर्वरित छोट्या मंदिरांना गेल्या वर्षभराच्या कालावधीत १ कोटी ५० लाख २२ हजार ५८ रक्कम उत्पन्नापोटी मिळाली आहे.

.........

ऑनलाइन खात्यातही रक्कम जमा

अंबाबाई व जोतिबा देवस्थानला मिळालेल्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत पर्यटक व काही स्थानिक भाविकांकडून येणारे देणगीमूल्य हा आहे. यामध्ये भाविक जी रोख रक्कम अर्पण करतात त्याची पावती देवस्थानकडून दिली जाते. तसेच अभिषेक विधी, अन्नदानासाठी करण्यात येणारे आर्थिक दान व मंदिरात देवस्थानतर्फे ठेवण्यात आलेल्या १७ दानपेट्यांमध्ये भाविकांकडून अर्पण होणारी रोख रक्कम यातून हे उत्पन्न जमा झाले आहे. तसेच देवस्थानच्यावतीने परराज्यातील भाविकांना देवीला घरबसल्या देणगी देता यावी यासाठी तीन ऑनलाइन खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यातही भाविकांकडून जमा केली जाणारी रक्कम उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

.......

१४ कोटींवर शिल्लक

गेल्या वर्षभरात उत्पन्नापोटी जमा झालेल्या २२ कोटींवर देणगीतून अंबाबाई व जोतिबा देवस्थानचा स्वतंत्र खर्च वगळता यंदा १४ कोटी ११ लाख २१ हजार ४५८ रूपये देवस्थानच्या खात्यात शिल्लक राहिले आहेत. यामध्ये अंबाबाई देवस्थानसाठी एकूण १९ कोटी उत्पन्नापैकी साडेदहा कोटी खर्च झाला आहे. यामध्ये देखभाल, पूजा, नवरात्र, दिवाळी, रथोत्सव, सुरक्षायंत्रणा यावरील खर्चाला प्राधान्य दिले आहे. तर जोतिबा देवस्थान खर्च उत्पन्नापेक्षा ५२ लाखांनी वाढला आहे. यामध्ये जोतिबाच्या षष्ठी यात्रा व चैत्रयात्रेसाठी मोठ्या प्रमाणात उत्सव व सुविधा यासाठी खर्च केला आहे.

कोटींचे दागिणे

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या वर्षभरात एक कोटी नऊ लाख ७५ हजार किंमतीचे सोने व चांदीचे दागिने जमा झाले. वर्षभरात भाविकांकडून देणगीदाखल आलेल्या दागिन्यांची मूल्यांकन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. आजच्या सोनेदराप्रमाणे दागिन्यांची किंमत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जाहीर केली. गेल्यावर्षीपेक्षा सोन्याच्या दागिन्यांमध्ये ८०० ग्रॅमने वाढ झाली असून चांदीच्या अलंकारांमध्ये २४ किलोंनी घट झाली आहे.

देवीच्या दागिन्यांबाबत माहिती देताना जाधव म्हणाले,'देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या अंबाबाई देवस्थान आणि श्री जोतिबा देवस्थानाला दरवर्षी लाखो भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करतात. त्यात अनमोल पाचू, खडे, हिरे माणिकांचाही समावेश आहे. या सर्व दागिन्यांचे मूल्यांकन दरवर्षी जून महिन्यात करण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षी २०१८-१९ मध्ये देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांचे मूल्यांकन १७ ते २० जून दरम्यान गरुड मंडप येथे पूर्ण करण्यात आले. सरकारमान्य अधिकृत मूल्यांकनकार पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे, उमेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

२०१७-१८ च्या तुलनेत सन २०१८-१९ मध्ये जमा झालेल्या दागिन्यांमध्ये वाढ झाली आहे. यात सोन्यामध्ये १७-१८ च्या तुलनेत ८०० ग्रॅमची वाढ होऊन एकूण सोने तीन किलो ४३२ ग्रॅम झाले आहे. तर चांदीमध्ये घट होऊन यावर्षी केवळ १० किलो ११६ ग्रॅम चांदी भाविकांकडून देणगी स्वरुपात आली आहे. गेल्या वर्षी देवीला ३४ किलो वजनाचे चांदीचे दागिने देणगी म्हणून आले होते. जोतिबा देवस्थान कडे २०१८-१९ मध्ये सोने १ किलो ७३ ग्रॅम सोने जमा झाले तर १ किलो ५३४ ग्रॅम चांदी जमा झाली आहे. यावेळी देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य संगीता खाडे, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

देवस्थानकडे वर्षभरात जमा झालेले दागिने

सोने ३ किलो ४३२ ग्रॅम ७२० मिली

एकूण किंमत: १ कोटी ९ लाख ७५ हजार ४०३ रुपये

चांदी १० किलो ११६ ग्रॅम, ९०० मिली

किंमत : ४ लाख १० हजार ७४६ रुपये

जोतिबा देवस्थानकडे जमा झालेले दागिने (सन २०१८-१९)

सोने : १७ तोळे

एकूण किंमत: ५ लाख ५० हजार ८१९ रुपये

चांदी : १ किलो ५३४ ग्रॅम ८०० मिली

एकूण किंमत: ६२ हजार ३१२ रुपये

३२ लाखांचा किरीट आणि ११ तोळ्यांचे बिस्कीट

गेल्या वर्षात नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ व उन्हाळी सुट्टीतील पर्यटक भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. लाखो भाविक देवीच्या दर्शनाला आले. मंदिरात सध्या १७ दानपेट्या आहेत. यामध्ये भाविकांकडून दान स्वरुपात दागिनेही अर्पण करण्यात आले. यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांचा समावेश आहे. कर्नाटकातील एका भाविकाने अंबाबाईला ३२ लाखांचा ९८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा किरीट अर्पण केला आहे. तर नवग्रहाचा सोन्याचा हारदेखील लक्षवेधी आहे. ११ तोळे वजनाचे व तीन लाख ३६ हजार किमतीचे सोन्याचे बिस्कीट भाविकाने दान स्वरुपात दिले आहे. काळ्या मण्याची पोत आणि सोन्याचे दोन मण्यासह वाट्या गाठवलेली मंगळसूत्रे मोठ्या संख्येने आली असून सध्या तीन पोती मंगळसूत्रे देवीच्या खजिन्यात आहेत. चांदीमध्ये जोडव्या, निरांजने, पानाचा विडा अशा दागिन्यांसह पूजा साहित्याचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डायरी २२ जून

$
0
0

योग शिबिर : जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिर, स्थळ : प्रभातीर्थ अपार्टमेंट, ताराबाई रोड, वेळ : सकाळी ७ व सायंकाळी ५ वा.

पुस्तक प्रदर्शन : ग्रंथ कॉर्नर यांच्या वतीने पुस्तक प्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सकाळी १० ते रात्री ९ वा.

सभा : ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्न्मेंट पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा, स्थळ : मंगलधाम, ब्राह्मण सभा करवीर, वेळ : दुपारी २ वा.

मासिक सभा : निवृत्त पोलिस कल्याण संस्थेची मासिक सभा, स्थळ : अलंकार हॉल, पोलिस मुख्यालय, वेळ : १०.३५ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीच्या ताफ्यात येणार ५० इलेक्ट्रिक बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या पर्यावरण संवर्धन कार्यक्रमातंर्गत महापालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये (केएमटी) ५० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिकेचा या उपक्रमात समावेश करण्यासाठी १८ जुलैपर्यंत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार आहे. बस खरेदी करण्यापूर्वी परिवहन समिती सदस्यांसह आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुणे महापालिकेच्यावतीने चालवण्यात येत असलेल्या उपक्रमाची गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली.

पर्यावरण संवर्धन आणि धुरापासून प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून सरकाने फेम-२ ही इलेक्ट्रिक बस खरेदीची योजना जाहीर केली. शहरातंर्गत वाहतुकीसाठी पाच हजार बसेस अनुदानावर देण्यात येणार आहेत. सुमारे अडीच कोटी किंमत असलेल्या एक बसच्या किंमतीपोटी महापालिकेला ५० लाखाचे अनुदान मिळणार आहे. त्यासाठी १८ जुलैपर्यंत अंतिम प्रस्ताव पाठवण्याची तारीख आहे.

सद्य:स्थितीत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने इलेक्ट्रिक बसद्वारे सार्वजनिक वाहतूक केली जात आहे. पुणे महापालिका सध्या २५ इलेक्ट्रिक बसेस वापरत आहे. अशा बसेस महापालिकेच्या ताफ्यात घेण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यापूर्वी परिवहन समिती सदस्यांसह आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करुन योजनेची माहिती घेतली.

बसेसची उत्पादक ओलेक्ट्रा-बीवायडी कंपनीने डेमो बसद्वारे प्रात्यक्षिक केले. चाचणीदरम्यान महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वारगेट ते कात्रज घाट प्रवास केला. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी व माहिती कंपनी प्रतिनिधींनी शिष्टमंडळाला दिली. पीएमपीएमएलच्या प्रधान कार्यालयात सी.एम.डी. नयना गुंडे यांनी बसेसविषयी सविस्तर माहिती दिली. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट यांच्या अधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशन सादर करुन सविस्तर प्रकल्प अहवाल व स्वायत्त अभिव्यक्ती प्रस्ताव कशा पद्धतीने याबाबत माहिती दिली. त्यानुसार केएमटीने सल्लागार कंपनी नियुक्त करुन प्रकल्प अहवाल पाठवण्याची कार्यवाही सुरू केली.

अभ्यास दौऱ्यात सभापती अभिजीत चव्हाण, शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव, परिवहन समिती सदस्य चंद्रकांत सूर्यवंशी, तांत्रिक सल्लागार प्रतापराव भोसले, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, दीपक पाटील यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉमनवेल्थमधून नेमबाजी हटवल्याने संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजी खेळाला हटवल्याने कोल्हापुरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या स्पर्धेत कोल्हापूरची सुवर्ण कन्या तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबत यांनी पदाकांची लयलूट केली होती, त्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन अनेक खेळाडू याचा सराव करत होते. गेल्या काही वर्षांत कोल्हापुरातील अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धांत यश मिळवून आगामी दिशा स्पष्ट केली होती.

इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत नेमबाजी खेळाला हटवला आहे. यापूर्वी झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेमबाजीमध्ये पदकांची लयलूट केली आहे. २०१८ मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने १६ पदके पटकावली होती.

नेमबाजीत कोल्हापूरने मोठे यश मिळवले आहे. दुधाळी येथील कोल्हापूर महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजीराजे छत्रपती शूटिंग रेंजवर सराव करणाऱ्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, राधिका बराले, नवनाथ फरताडे, फुलचंद बांगर, गिरीजा देसाई यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरचा दबदबा सिद्ध केला.

तेजस्विनीने २००६ मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धंत १० मीटर एअर रायफलमध्ये एकेरी व दुहेरी सुवर्णपदक पटकावून कोल्हापूरचा ठसा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उमटवला. २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये एकेरी व दुहेरीमध्ये रौप्य पदक मिळवले होते. त्यानंतर आठ वर्षानंतर गतवर्षी झालेल्या गोल्डकोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये सुवर्ण तर प्रोन प्रकारात ब्राँझ पदक मिळवले.

तेजस्विनीच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या राही सरनोबतने दिल्लीतील स्पर्धेत २५ मीटर पिस्टल प्रकारात दुहेरीत सुवर्णपदक पटकावले तर एकेरी रौप्य पदक मिळवले होते. त्यानंतर २०१२ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी ती पात्र ठरली होती. ऑलिपिंक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी राहीला कॉमनवेल्थचा अनुभव फायदेशीर ठरला होता. २०१४ मध्ये ग्लासगो येथील स्पर्धेतही तिने सुवर्णपदकाची कमाई केली होती.

मात्र कॉमनवेल्थ स्पर्धेतून हा खेळच काढल्याने खेळाडूंना फटका बसणार आहे. सध्या कोल्हापुरचा शाहू माने, अनुष्का पाटील, जान्हवी पाटील, अभिज्ञा पाटील यांच्यासह ज्युनिअर खेळाडू शूटिंगचा सराव करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे. २०२२ ची कॉमनवेल्थ स्पर्धा ही त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. पण या क्रीडा प्रकार नाकारल्याने खेळाडूंतून नाराजीबरोबर संताप व्यक्त होत आहे.

यजमान संघाला कोणत्या खेळाचा समावेश करायचा हा अधिकार असतो. पण इंग्लंडने नेमबाजीला डावलल्याने भारताला मोठा फटका बसणार आहे. एका चांगल्या स्पर्धेला खेळाडू मुकणार आहेत. १५ ते २० पदकांना भारत मुकणार आहे.

राही सरनोबत, आंतरराष्ट्रीय खेळाडू

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आम्ही चमक दाखवत असून सीनिअर संघात समावेश व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी वगळल्याने धक्का बसला आहे. एका चांगल्या स्पर्धेला उदयोन्मुख खेळाडू मुकणार आहेत.

शाहू माने, आंतरराष्ट्रीय खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी वाहनचालकांना दंड आणि कैद

$
0
0

कोल्हापूर: मद्यपान करून वाहन चालविण्याबद्दल कोर्टाने १२ जणांना २१०० रुपये दंड आणि दोन दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी झेड. झेड. खान यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली होती. या वाहनधारकांवर कारवाईसाठी कोर्टात खटला दाखल केला होता. संशयित १२ जणांना मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार मद्यपान करुन वाहन चालविण्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. अभिजित चौगले (रा. पोहाळे, ता. पन्हाळा), प्रकाश जोतिराम खांडेकर (व्हीनस कॉर्नर), स्वप्नील जाधव (बहिरेवाडी, ता. पन्हाळा), कुमार लोहार (दसरा चौक), राहुल भोसले (इंगळी, ता. हातकणंगले), पांडुरंग फाले (रिंगरोड, फुलेवाडी), बसप्पा देसाई, उदय चौगले (राजारामपुरी), रोहित लोकरे (चंबुखडी), संदीप साळवी, रणजित सर्वगोडे, संभाजी सारंग (पूर्ण पत्ता नाही) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुष्य वाढविण्यासाठी योगासने करा

$
0
0

आयुष्य वाढविण्यासाठी योगासने करा

सातारा :

'आपल्या जीवन शैलीमुळे आयुष्यमान कमी होत चालले आहे. निरोगी आयुष्यासाठी व आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगासने केला पाहिजे,' असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील आयुष विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी उपस्थित होते.

शक्ती आणि युक्तीची सांगड घातली तर माणूस निरोगी राहू शकतो व निरोगी आयुष्यामुळे ठरवलेले ध्येय गाठू शकतो यासाठी प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करावी, असे सांगून भोसले यांनी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

........

पिस्टल, काडतुसे जप्त

सातारा :

पोवईनाक्यावर बेकायदा पिस्टल बाळगून फिरत असलेल्या रूपेश संजय वारे (वय २०, रा. कालगाव, ता. कराड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जीवंत काडतुसे, असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. कराड येथून साताऱ्याकडे येणाऱ्या बसमध्ये एक युवक पिस्टल व काडतूस घेऊन साताऱ्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images