Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दीक्षान्त सभागृहास राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्राचे नामकरण राष्ट्रमाता जिजाऊ असे करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या मागणीची दखल घेत सायंकाळी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने लोककला केंद्रात राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय सभागृह नाव देण्यात आले.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतीचे जतन व्हाव यासाठी विद्यापीठातील दीक्षांत समारंभाच्या लोककला केंद्राला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गेल्या तीन वर्षापासून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा विशेष समिती आणि व्यवस्थापन समितीमध्ये लोककला केंद्राला जिजाऊ यांचे नाव देण्यास मंजुरी मिळाली. मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून लोककला केंद्रात जिजाऊ यांचे नाव देण्याची कार्यवाही करण्यात आली नव्हती. राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त सोमवारी मराठा महासंघाच्या महिला आघाडीकडून लोककला केंद्रात राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देऊन या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी लोककला केंद्राचे नामकरण राष्ट्रमाता जिजाऊ असे करण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात येईल असे आश्वासन डॉ. शिंदे यांनी दिले.

त्यानुसार सोमवारी सायंकाळी जिजाऊ यांच्या नावाचा फलक लोककला केंद्रावर लावण्यात आला. अखिल भारतीय मराठी मराठा महासंघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, विशाल लोंढे, तेजस्विनी नलवडे, बिना देशमुख,, नेहा मुळीक, अश्विनी पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपचे संदीप देसाई यांची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रीडा कोट्यातून तहसीलदारपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९८ लाख रुपये रोख, तर चार गुंठे जागा बळकावल्याप्रकरणी आलेल्या तक्रार अर्जाची छाननी करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी तक्रार अर्जात फसवणूक केलेला प्रसाद शिंदे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. सध्या त्याचा मोबाइल बंद असल्याने लोकेशन सापडत नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. भाजपचे माजी महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे.

या प्रकरणी १७ जून रोजी संबधित तक्रारदाराने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्याने अर्जात केलेल्या मागणीनुसार संबधितांची चौकशी सुरु केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित प्रसाद शिंदे हा आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या ओएसडींच्या नावाने बोगस फोन करण्याचा गंभीर प्रकार घडल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'शिंदे आणि माजी महानगर अध्यक्ष संदीप देसाई दोघेही मित्र आहेत. त्याने देसाई यांच्या मदतीने क्रीडा कोट्यातून तहसीलदारपद मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी चार ते पाच वेळा शिंदे याने तक्रारदाराला देसाई यांच्या कार्यालयाजवळ नेले. मात्र देसाई यांच्यासोबत भेट घडविली नाही. देसाई यांच्याशी चर्चा करुन शिंदे याने लवकरच काम होईल, असे आश्वासन दिले.' दरम्यान, फसवणूक झालेल्या युवकाकडून वेळोवेळी ९८ लाख रुपये घेतले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून संशयित शिंदे याला चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. त्याच्याकडून कागदपत्रे जप्त केली जाणार आहेत. तक्रारदाराने काही रक्कम त्याला रोख दिली. काही रक्कम बँकेच्या खात्यावर वर्ग केली आहे. ही रक्कम कोणाच्या खात्यावर वर्ग केली आहे, त्याचा तपास सुरु केला आहे. फसवणुकीत आणखी कोण पदाधिकारी आहेत का, याची चौकशीही केली जाणार आहे. देसाई यांच्याकडे चौकशी केली आहे. मात्र मुख्य संशयित असलेला प्रसाद शिंदे याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील एकूण चौघांचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता आहे.

...

शिंदेचे पुण्यातही पराक्रम

पोलिसांनी सांगितले की, शिंदे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याने दोन ते तीन वर्षे पुणे येथे काम केले आहे. त्या ठिकाणी त्याने काहींना गंडा घातला असण्याची शक्यता आहे. त्याच्याकडे करण्यात येणाऱ्या चौकशीत काहींचे नावे उघड होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ओएसडी यादव यांच्या नावाचा वापर कोणी केला? मुख्यमंत्र्यांच्या बनावट ओएसडीच्या नावाने कोणी फोन केला, या चौकशीबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीसाठी प्लॉट देण्याचा बहाणा करुन चार गुंठ्याचा प्लॉट लिहून घेतल्याची चौकशी सुरु केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामात हयगय केल्यास थेट निलंबन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्रत्येकाच्या हुद्यानुसार काम द्या. सुरक्षारक्षकांनी उद्यानात होणाऱ्या ओल्या पार्ट्यांवर निर्बंध आणावेत. कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असूनही धोकादायक झाडांच्या फांद्या छाटल्या का जात नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी उद्यान कर्मचाऱ्यांवर केली. तर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कामात हयगय केल्यास थेट निलंबन करण्याचा इशाराच दिला.

उद्यान विभागाकडे कर्मचारी अपुरे असल्याची तक्रार केली जात असल्याने मंगळवारी सभापती देशमुख यांनी छत्रपती ताराराणी सभागृहात ओळख परेड घेतली. विभागाकडे मुकादम तथा लिपिक, मुकादम, पहारेकरी, गवंडी, सहाय्यक सुतार, माळी, गाडीवान व कामगार असे १८६ कर्मचारी आहेत. उद्यानांच्या क्षेत्रानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याचे तसेच कामातही असमानता असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सभापती व आयुक्त चांगलेच भडकले.

सुरक्षारक्षकांचे पार्टी करणाऱ्या नागरिकांशी लागेबांधे असल्याने रात्रीपर्यंत ओल्या पार्ट्या होत असल्याचा आरोप करत सभापती देशमुख म्हणाले, 'मुकादम योग्य काम करत नसल्यास त्याला कामगाराचे काम द्या. सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती असताना बागेत काम केले पाहिजे.

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, ' कोणत्याही क्षणी उद्यानाला भेट दिल्यानंतर एखादा कर्मचारी कामात हयगय करत असल्यास थेट निलंबन केले जाईल. उद्यानामध्ये कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यास पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करा.'

.............

चौकट

बैठकीतून बाहेर जाण्याचे आदेश

ओळख परेडदरम्यान कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात एक कर्मचारी वारंवार पदाधिकाऱ्यांनाच सूचना देत होता. पदाधिकारी उद्यान कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत समाधानी नसताना या कर्मचाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे सभापती देशमुख चांगलेच संतप्त झाले. त्यांनी हस्तक्षेप करणाऱ्या कर्मचाऱ्याला थेट बैठकीतून बाहेर जाण्याचे आदेश दिले. तसेच प्रभाग व उद्यानातील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याची सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपसी, दुर्गम बदल्यात ‘डल्ला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑनलाइन बदली प्रक्रियेतील घोळ संपला नसताना आता आपसी, दुर्गम आणि रँडम राऊंडच्या बदल्यातही डल्ला मारल्याची चर्चा जिल्हा परिषदेत वेगावली आहे. शंभर शिक्षकांच्या बदल्या प्रक्रियेत आर्थिक उलाढाल झाली आहे. शिवाय आणखी शंभर बदल्या रखडल्या आहेत. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील दोघा कारभारी शिक्षकांनी या प्रकरणात मध्यस्थी केल्याचे वृत्त आहे.

नवीन शिक्षकांची बदली झाल्याशिवाय रँडम राऊंडच्या व दुर्गम शाळेत नियुक्त महिला शिक्षकांच्या बदल्या होऊ नयेत, असा सरकारी आदेश आहे. सरकारी नियमांना फाटा देत गेल्या पाच, सहा महिन्यात अनेक बदल्या केल्या आहेत. तसेच सोयीच्या शाळेत रिक्त पद नसल्यामुळे ठिकठिकाणच्या पदवीधर शिक्षकांनी पदावनती करून घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे. या तीनही घटकाच्या बदल्या नियमानुसार झाल्या नाहीत हे माहिती अधिकार कायद्याखाली समोर आले.

शिरोळ तालुक्यातील रिक्त पदांचा घोळ अजून संपला नाही. विविध गावातील दहा शिक्षक पदे रिक्त दाखवली नाहीत. यामध्ये चिंचवाड, कुरुंदवाड, खोतवाडी, तमदलगे, कुरुंदवाड शाळा नंबर ३, शिरढोण, यड्राव आणि उदगाव येथील शाळांचा समावेश आहे. समुपदेशनावेळी या जागा रिक्त दाखवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे सीईओ अमन मित्तल यांच्याकडे केली आहे. दरम्यान बुधवारी जिल्हा परिषदेत समुपदेशनाद्वारे बदल्या होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोट्या बसवा, अन्यथा दंड भरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण भागातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने धडक कारवाई सुरू केली आहे. 'नळांना तोट्या बसवा, अन्यथा दंड भरा' अशी मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी साठ गावांतील २९५ कुटुंबांना दंड केला. त्या माध्यमातून एक लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. शिरोळ, गगनबावडा आणि आजरा तालुक्यांत मोहिमेचा धडाका होता.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने १३ मे रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या संदर्भात नोटीस काढल्या होत्या. त्यानुसार १६ जूनपर्यंत नळधारकांनी तोट्या बसवाव्यात अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. जिल्हा परिषदेच्या सात डिसेंबर २०१८ रोजीच्या सर्वसाधारण सभेत नळांना तोट्या बसविण्याबाबत ठराव झाला. जे नळधारक तोट्या बसविणार नाहीत त्यांना पाच हजार रुपये दंड आणि प्रतिदिन २०० रुपये भरण्याच्या कारवाईचा ठरावाला मान्यता दिली होती.

केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात ३५० गावात नळांना तोट्या बसविल्या नाहीत अशी माहिती आहे. अशा गावांची संख्या वाढू शकते. ग्रामीण भागात अनेक कुटुंबीयांनी नळांना तोट्या बसविल्या नाहीत. नळांना तोट्या नसल्यामुळे पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते.

'पाण्याची बचत व्हावी, लोकांमध्ये पाण्याविषयी साक्षरता निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २९५ कुटुंबीयांना दंड केला आहे. नागरिकांनी पिण्याच्या नळांना तोट्या बसवाव्यात, पाण्याचा जपून वापर करावा,' असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी केले आहे. पाणी बचतीविषयी जागृती व्हावी हा मोहिमेचा उद्देश आहे.

कारवाईच्या पहिल्या दिवशी शिरोळ तालुक्यात ८१, गगनबावडा ७९, आजरा ५१, कागल २२, पन्हाळा १७, गडहिंग्लज १४, शाहूवाडी ९, भुदरगड ८, चंदगड आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी पाच आणि हातकणंगले तालुक्यात ४ नळधारकांना दंड करण्यात आला. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाची आर्थिक स्थिती नसल्यामुळे दंडाची रक्कम २०० रुपये इतकी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॅट’चा निकाल लोहर यांच्या बाजूने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या एकतर्फी कार्यमुक्त करण्याच्या जिल्हा परिषदेचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणने (मॅट) रद्दबातल ठरविला. 'मॅट'च्या आदेशाने लोहार यांना दिलासा मिळाला तर जिल्हा परिषद प्रशासनाला धक्का बसला.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या कार्यपद्धतीवरुन टीका झाली होती. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशीचा निर्णय झाला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी त्यांना पाच ऑक्टोबर २०१८ रोजी एकतर्फी कार्यमुक्त केले. त्यानंतर त्यांनी या कारवाईला 'मॅट'मध्ये आव्हान दिले. २३ ऑक्टोबर रोजी मॅटने प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

दरम्यान 'मॅट'मध्ये या प्रकरणी सुनावणी होती. बुधवारी झालेल्या सुनावणीत 'मॅट'ने जि. प. चा आदेश रद्द ठरविला. लोहार हे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ या प्रशासन शाखेचे राजपत्रित अधिकारी आहेत. यामुळे त्यांची बदली, कार्यमुक्त करण्याचे अधिकार राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नाही, असेही मॅटने आदेशात म्हटल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमदार पावसाने शहरात गारवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि परिसरात बुधवारी दुपारनंतर दमदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला. काहीकाळ विश्रांती घेऊन पावसाच्या जोरदार सरी येत राहिल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले. राजारामपुरी जनता बझार चौक, बसंत-बहार रोड, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, महावीर कॉलेजकडे जाणार रस्ता, जयंती नाल्यावरील पुलावर पाण्याची डबकी दिसत होती.

सायंकाळी चार ते साडेपाचच्या दरम्यान शाळा, सरकारी कार्यालये, बँका सुटल्यानंतर प्रमुख रस्ते, चौकात वाहतुकीची कोंडी झाली. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. शिवाजी पेठ, मंगळवारपेठ, कसबा बावडा येथील सखल भागातील पाण्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती.

दोन दिवसापासून हवेत बदल झाला. आकाशात ढगांची गर्दी होत राहिली. पहाटेपासूनच पावसाचे ढग भरून आले. कोणत्याक्षणी पाऊस सुरू होईल, असे वातावरण तयार झाले. सकाळी दहा वाजता पावसाला सुरुवात झाली. अकरापर्यंत पावसाने जोरदार सलामी दिली. त्यानंतर तीनपर्यंत उघडीप राहिली. सायंकाळी चारनंतर पावसाची रिपरिप सुरू राहिली. परिणामी दुचाकी, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाखाचा ऑनलाइन गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रेडिट कार्डवर चार हजार पाँइट जमा झाले आहेत. हे पाँइट बँक खात्यावर जमा करण्यासाठी मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक मागून घेत हैदराबाद येथील महिलेने बीपीसीएलच्या विभागीय व्यवस्थापकाला एक लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी मनोज गोवर्धन गुप्ता (वय २९ रा. पाचवा मजला, नक्षत्र हाइटस, शिवाजी पार्क) यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. १८ जून रोजी दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी मेहक शर्मा (हैदराबाद) या महिलेसह आणखी एका अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती, मूळचे उज्जैन (मध्यप्रदेश) येथील रहिवाशी असणारे गुप्ता भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. १८ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते कसबा बावडा रोडवरील पोलिसांच्या पेट्रोल पंपाकडे निघाले होते. त्या वेळी त्यांना एका राष्ट्रीयीकृत बँकेतून बोलत असल्याचा एका महिलेचा फोन आला. त्या महिलेने तुमच्या क्रेडिट कार्डवर चार हजार पाँइट जमा झाले आहे. ते पाँइट वापरता येण्यासाठी तुमच्या बँक खात्यावर जमा करायचे आहेत, असे सांगितले. त्यांच्याकडून नाव, मोबाइल क्रमांक, खाते क्रमांक, कार्ड क्रमांक विचारला. काही वेळाने मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक देण्यास सांगितले. गुप्ता यांनी ओटीपी क्रमांक त्या महिलेला दिल्यानंतर ४९९८ आणि ७९९९ रुपये ऑनलाइन कपात केली. पुन्हा अर्धा तासाच्या कालावधीत त्यांच्या खात्यावरील एक लाख पाच हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी रक्कम कपात झाल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या महिलेला जाब विचारला. मात्र 'मी तुमच्यापेक्षा स्मार्ट, हुशार आहे, यासाठीच तीन वेळा ओटीपी नंबर घेऊन पैसे काढले.' असे सांगत फोन ठेवला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शर्मा हिच्यासोबत असलेल्या एका अनोळखीवर गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा सायबर शाखेकडे वर्ग केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राधानगरी’तील खनिजउत्खननाची चौकशी करा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राधानगरी तालुक्यातील लिंगाचीवाडी, धाऊरवाडा येथील सिलिका वाळू आणि खनिज उत्खनाची चौकशी करावी, असा आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी राधानगरी तहसीलदारांना दिले आहेत.

लिंगाचीवाडीतील सरकारी गायरान, धाऊरवाडीतील सरकारी मुलकीपड दाजीपूर अभयारण्यात येते. येथे सिलिका वाळू, खनिज उत्खनन बेकायदेशीरपणे सुरू आहे. परिणामी सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे उलघंन होत आहे. यामुळे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सभापती दिलीप कांबळे यांनी १२ जून रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली होती. यानुसार जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र उत्खनन करणाऱ्यांना राजकीय आश्रय आहे. ते माजी जिल्हा परिषद पदाधिकारी आहेत. यामुळे तहसीलदार पारदर्शकपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीत भुदरगड ‘लय भारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांनी राज्यामध्ये गुणवत्ता सिद्ध केली. जिल्ह्यातील तब्बल ११७२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. भुदरगड तालुक्यातील १५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनल्याने जिल्ह्यात हा तालुका प्रथम क्रमांकावर आहे. भुदरगड, राधानगरी तालुक्यांतील शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यशाचा पॅटर्न निर्माण केला आहे. जिल्ह्यातील चार विद्यार्थी पाचवीच्या परीक्षेत ग्रामीण विभागात राज्याच्या गुणवत्ता यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सर्वांत कमी निकाल गगनबावडा तालुक्याचा आहे.

राज्याच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्येच चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. पाचवीच्या परीक्षेत आदित्य अनिल पाटील (आर.वाय. पाटील विद्यालय, सावर्डे), सक्षम सतीश तळेकर (विद्या मंदिर नावले), तृष्णा प्रदीप पाटील (नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय, कसबा वाळवे), सर्वेश क. मगदूम (कुमार विद्यामंदिर, हेरवाड) या चार विद्यार्थ्यांना ९७.९७३ टक्के इतके समान गुण मिळाले. चौघेही राज्य गुणवत्ता यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. तर हर्षद प्रवीण राऊल (विद्यामंदिर मेघोली), मैत्रेयी महेश कांबळे (विद्यामंदिर बहिरेवाडी), पृथ्वीराज सतीश अर्दाळकर (एस.एस. हायस्कूल, नेसरी) आणि आर्यन सुनील पसारे (विद्यामंदिर कपिलेश्वर) या विद्यार्थ्यांना ९७.२९७३ टक्के इतके समान गुण मिळाले आहेत. हे चारही विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. साईराज बाळासाहेब भादवणकर (शिवशक्ती हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अडकूर), आदित्य प्रवीण तांबे (शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे) या दोघांनी ९६.६२१६ टक्के गुण घेत चौथ्या स्थानी आहेत. कादंबरी जयदीय खवरे (विद्यामंदिर सुळेगाव), गायत्री विजय सावंत (विद्यामंदिर सोनाळी), दर्शिल विजय जाधव (कुमार विद्यामंदिर, खुपिरे), रुद्रप्रसाद रवींद्र पाटील (सेंट्रल स्कूल, केनवडे) या विद्यार्थ्यांनी ९५.९४५९ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.

०००

तालुकानिहाय शिष्यवृत्ती निकाल

तालुका पाचवी शिष्यवृत्तीधारक आठवी शिष्यवृत्तीधारक एकूण

भुदरगड ८५ ७१ १५६

राधानगरी ६९ ८१ १५०

कागल ७९ ४४ १२३

गडहिंग्लज ४६ ४० ८६

करवीर ३६ ४५ ८१

आजरा ३५ ४३ ७८

चंदगड २७ ३६ ६३

शिरोळ २८ २७ ५५

हातकणंगले १९ २६ ४५

पन्हाळा ५ २८ ३३

शाहूवाडी ७ १४ २१

गगनबावडा २ ४ ६

एकूण ४३८ ४५९ ८९७

०००००

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल (ग्रामीण विभाग इयत्ता आठवी)

आदिती अमर काशीद (पी. बी. पाटील हायस्कूल, ९१.६६ क्रमांक पाचवा), तर वैभव सीताराम गुरव (धनंजय विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, नागनवाडी), सायली संजय काटकर (पिंपळगाव विद्यालय) आणि मधुरा दशरथ पाटील (भावेश्वरी विद्यालय, बसरगे) यांनी ९०.२७ टक्के मिळवत गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावला. ऐश्वर्या रघुनाथ सारंग व प्रतीक्षा मोहन यादव यांनी ८९.५८ टक्के गुण मिळविले. त्या दोघी दहाव्या स्थानावर आहेत.

००००

इचलकरंजी नगरपालिकेतील

१०५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

कोल्हापूर शहरातील १७० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यामध्ये पाचवीतील विद्यार्थ्यांची संख्या १०३, तर आठवीतील संख्या ६७ आहे. इचलकरंजी नगरपालिकेतील १०५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. यामध्ये पाचवीतील संख्या ५०, तर आठवीतील ५५ इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटणी व्यवसाय शहराबाहेर हलवा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'शहराच्या विस्ताराबरोबर येथील सराफ व्यवसायाने स्वतंत्र ओळख निर्माण केली. दागिने बनवण्याबरोबर येथे अटणी व्यवसायाने चांगलीच भरारी घेतली. पण सोन्याची अटणी करताना वापरण्यात येणाऱ्या अॅसिड व केमिक्लसमुळे प्रदूषणाबरोबर मानवी आरोग्याला धोकादायक आहे. परिणामी हा व्यवसाय शहराबाहेर स्थलांतरीत करा' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे मंगळवारी केली.

निवेदनात म्हटले आहे, 'कोल्हापुरात तयार होणाऱ्या दागिन्यांना देशासह परदेशात चांगली मागणी आहे. परिणामी सोने वितळवून पुन्हा दागिने करणारा अटणी व्यवसाय तेजीत आहे. मात्र अटणी करताना आरोग्याला घातक अशा केमिक्लसचा वापर केला जातो. सोने वितळवताना निर्माण होणाऱ्या धुरांमुळे लहान मुलांना खोकला, नाकात व घशात दुखणे आदी प्रकार होऊ लागले आहेत. मध्यवस्तीत सुरू असलेल्या व्यवसायामुळे मानवी आरोग्य धोक्यात आल्याने हा व्यवसाय शहराबाहेर स्थलांतरीत करावा.'

शिष्टमंडळात फिरोज सरगूर, धनंजय चव्हाण, अमित भोसले, संजय पाटील, रोहित मोरे, प्रमोद ढोपे, आनंदा चव्हाण, सुहास मुदगल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन निश्चितीबाबत कॉलेजना पत्रे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून सातव्या वेतन आयोगानुसार अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापकांची वेतन निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत सातारा व सांगली जिल्ह्यातील वेतन निश्चितीचे काम पूर्ण झाले आहे. २१ जूनपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील प्राध्यापकांची वेतन निश्चितीसाठी कार्यालय प्रयत्नशील आहे. मात्र तिन्ही जिल्ह्यांतील विविध कॉलेज व प्राध्यापकांच्या प्रस्तावात त्रुटी आहेत, संबंधितांना सूचना करुनही त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. यामुळे त्रुटी कायम असून त्या दूर करण्यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी २५ जून व सांगली जिल्ह्यासाठी २६ जून रोजी वेतननिश्चितीसाठी कालावधी निश्चित केला आहे. ज्या शिक्षकांच्या वेतननिश्चिती प्रकरणी त्रुटी आढळल्या आहेत त्याची पूर्तता व वेतननिश्चिती करुन घेणे कॉलेजना बंधनकारक आहे. दरम्यान काही घटक जाणीवपूर्वक प्राध्यापक वर्गात गैरसमज निर्माण करत आहेत. शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या पारदर्शी कामकाजाविषयी चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कार्यालय प्रयत्नशील आहे. कुठल्याही अफवांना बळी न पडता, अपप्रवृत्तींना थारा न देता प्राध्यापकांनी प्राचार्यामार्फत आपली भूमिका कार्यालयास सादर करावी, जेणेकरुन कार्यालयीन कामकाजात विश्वासार्हता निर्माण होईल असे शिक्षण सहसंचालक अजय साळी यांनी पत्रकांत म्हटले आहे.

फाइलसाठी पैसे मागितल्याची

जिल्हा युवासेनेतर्फे तक्रार

कोल्हापूर : शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करण्यासाठी दोन ते सहा हजार रूपयांची मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे अशी तक्रार जिल्हा युवा सेनेच्यावतीने शिक्षण सहसंचालक अजय साळी यांच्याकडे करण्यात आली. शिक्षकांच्या वेतन निश्चितीच्या फाइल तयार करण्यासाठी अधिकारी शिक्षकांकडे सहा हजार रूपयांची तर कार्यालयीन कर्मचारी दोन हजार रूपयांची मागणी करत आहेत असे या तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मंजीत माने, गणेश पालकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथित लाचप्रकरणी तक्रारदाराचे लेखी म्हणणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दहा हजारांची लाच मागितलेल्या कथित प्रकरणाच्या चौकशीला बुधवारी सुरुवात झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास यांच्यासमोर झालेल्या सुनावणीप्रसंगी तक्रारदार विलास पाटील यांनी भालेराव यांच्या विरोधात म्हणणे मांडले.

ग्रामविकास निधी मंजूर करण्यासाठी भालेराव यांनी लाच मागितल्याचे म्हणणे त्यांनी लेखी स्वरुपात दिले. सुनावणप्रसंगी पाटील यांनी घटनाक्रम सांगितला. त्यांच्या पत्नी विद्या पाटील या जिल्हा परिषद सदस्या आहेत. चार जून रोजी सर्वसाधारण सभा संपल्यानंतर हा प्रकार घडला होता. याप्रकरणी चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी शिवदास यांची नियुक्ती केली. चौकशी प्रक्रियेतंर्गत भालेराव यांचेही म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यानंतर कारवाईचा अहवाल सीईओकडे सादर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या वतीने उद्या योगासन शिबिब

$
0
0

कोल्हापूर : भाजप कोल्हापूर महानगरच्या वतीने शुक्रवारी (ता.२१) जागतिक योग दिनानिमित्त मंडलनिहाय योगासन व सूर्य नमस्कार शिबिरांचे आयोजन केले आहे. यामध्ये शिवाजी पेठ येथे सुमन मंगल कार्यालय, ब्रह्मश्वर पार्क, मंगळवार पेठ येथे शुभंकरोती मंगल कार्यालय, उत्तरेश्वर मंडल येथे जोशी समाज हॉल, लक्ष्मीपुरी मंडलमध्ये गणेश मंगल कार्यालय, मिरजकर तिकटी, शाहूपुरी मंडल येथे नष्टे हॉल, राजारामपुरी मंडलमध्ये राजारामपुरी ३ री गल्ली येथे सरचिटणीस विजय जाधव यांचे कार्यालयात, कसबा बावडा येथे राम मंदिर कसबा बावडा मेन रोड येथे आयोजन केले आहे.

योग शिबिरांचा कार्यक्रम सकाळी ७ ते ९ या वेळेत वरील ठिकाणी घेण्यात येणार आहे. तरी वरील भागातील स्थानिक योगप्रेमी नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा व आरोग्य समृद्धीचा नव संकल्प या निमित्ताने सुरू करावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव यांनी केले आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर मोरेंचा राजीनामा

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर सरिता मोरे यांनी अपक्षेप्रमाणे बुधावारी महासभेत राजीनामा दिला. रिक्त झालेल्या जागेवर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नव्या महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे. महापौरपदी नगरसेविका अॅड. सुरमंजिरी लाटकर किंवा माधवी गवंडी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी प्रशासन गुरुवारी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवणार आहे.

महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून एक वर्षासाठी हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. पहिल्या सहा महिन्यांसाठी मोरे यांची निवड करण्यात आली होती. सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी महासभेत राजीनामा दिला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर मोरे यांनी कार्यकाळामध्ये सर्वांनी मदत आणि पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मोरे यांच्या राजीनाम्यामुळे महापौरपद रिक्त झाले असून पुढील सहा महिने हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडीदरम्यान पुढील सहा महिन्यांसाठी नगरसेविका अॅड. लाटकर यांना पद देण्याचे आश्वासन पक्ष नेतृत्वाने दिले होते. त्यामुळे सद्य:स्थितीत अॅड. लाटकर यांचे नाव आघाडीवर असून माधवी गवंडी यांच्या नावाचीही चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी प्रशासन गुरुवारी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवणार आहे. त्यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवड होण्याची शक्यता आहे.

.........

कोट

'महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी घरफाळा व पाणीपट्टी थकीत बिलामध्ये ५० टक्के सवलत देणारी योजना जाहीर केली. काळम्मावाडी थेट पाइपलाइन, गॅस दाहिनी आणि राजर्षी शाहू समाधीस्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पक्षनेतृत्वाने दिलेल्या पाठबळामुळे अनेक प्रकल्प मार्गी लावण्याची संधी मिळाली.

सरिता मोरे, मावळत्या महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यात शिष्यवृत्तीत कोल्हापूर अव्वल

$
0
0

दोन सिंगल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे फेब्रुवारी २०१९ मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये अव्वल स्थानावर आहे. पाचवीच्या परीक्षेत (शहरी विभाग) येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, जरगनगर विद्यालयाचा विद्यार्थी पियुष कुंभार राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभाग राज्य गुणवत्ता यादीत पहिल्या तीन क्रमांकातील ११ विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथील श्रीराम हायस्कूलची विद्यार्थिनी अनुष्का बाळकृष्ण ननवरे व सोलापूर जिल्ह्यातील सार्थक नवनाथ ताळे प्रत्येकी ९९.३२४३ टक्के इतके समान गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत.

राज्याच्या गुणवत्ता यादीत महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी स्थान पटकावित पुन्हा एकदा टॅलेंट सिद्ध केले. जिल्ह्यातील तब्बल ११७२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. शिवाय दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ११८ मुलांचा समावेश आहे. यामध्ये पाचवी ग्रामीण विभागातील ४५, शहरी विभागातून २८ तर एक विद्यार्थी हा सीबीएसई स्कूलमधील आहे. आठवी परीक्षेतही राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ग्रामीण विभागातून ३३ तर शहरी विभागातून दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

येथील जरगनगर विद्यामंदिरने यंदाही पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत आपला दबदबा कायम राखला. जरगनगर विद्यामंदिरचे आठ विद्यार्थी राज्य व पंधरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १८४२ शाळांतील २२,९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २२,७०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ९३७ शाळांतील १३,८४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३,६४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

.......

आठवीच्या परीक्षेत दोघे तृतीय क्रमांकावर

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्यस्तरीय ग्रामीण विभागाच्या गुणवत्ता यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे येथील किसनराव मोरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी दिग्विजय दगडू कुंभार व श्री ताम्रपणी विद्यालय, शिवणगे येथील शंतनू रानबा बेनके हे दोघे तृतीय क्रमांकावर आहेत. दोघांनी प्रत्येकी ९३.०५५६ इतके गुण मिळवले. दरम्यान, जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुका शिष्यवृत्ती निकालात प्रथम स्थानी आहे.

...........

जरगनगर विद्यामंदिरची कमाल

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जरगनगर विद्यामंदिरातील आठ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर १५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. राज्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या पियुष कुंभारचे आई, वडील हे जिल्हा परिषदेकडे प्राथमिक शिक्षक आहेत. जरगनगर विद्यालयातील श्रद्धा गणपत सुतार राज्यात पाचवी,साक्षी सचिन शिंदे राज्यात बारावी, अत्रेय राजेश शेंडे राज्यात बारावा, शार्दूल रघुनाथ कांबळे राज्यात १५ वा, ऋषिकेश किशोर पाटील व सुमेध सचिदानंद जिल्हेदार दोघेही राज्य गुणवत्ता यादीत १८ वे आले.

...........

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ११७२

जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी संख्या १०९४

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिगत वाहिनीवरुन खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावितरणकडून सुरू असलेल्या भूमिगत विद्यूत वाहिनीच्या कामाकडे महापालिका प्रशासनाचे होत असलेल्या दुर्लक्षावरून सभेत सत्तारुढ आणि विरोधी गटात चांगलीच खडाजंगी उडाली. रस्ते रिस्टोरेशनसाठी डिपॉझिट घेण्यावरुन सभागृहात वातावरण चांगलेच तापले. प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही सदस्यांनी बुधवारी महापालिकेच्या सभेत केला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी एमएसईबी अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला.

भूमिगत विद्युत वाहिनीसाठी एमएसईबीने रस्ते खोदाईसाठी आलेल्या प्रस्तावर राहुल माने लक्षतीर्थ वसाहतमधील थांबवलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच खोदाई केलेल्या ठिकाणी रिस्टोरेशन केले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी परवानगी न घेता कामे कशी सुरू केली? अशी विचारणा करत उपसूचनेसह विषय मंजूर करण्याची मागणी केली. त्याला किरण नकाते यांनी हरकत घेत डिपॉझिट भरल्यास निधी परत जाण्याची भीती व्यक्त केली. तर अजित ठाणेकर यांनी सभेतच उपसूचना देण्याची मागणी केली.

सत्यजित कदम यांनी प्रशासनाच्या निष्काळजीमुळे सात कोटीचा निधी परत गेल्याचा आरोप करत 'ना हरकत' प्रमाणपत्र देण्यास विलंब का? असा सवाल केला. तौफिक मुल्लाणी यांनी परवानगी न घेता केलेल्या कामानंतर रस्ते दुरुस्ती होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरसेवकांच्या या प्रश्नांच्या भिडीमारामुळे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांचा खुलासा करण्याचा प्रयत्न फोल ठरत होता.

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'कामावर लक्ष देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना प्रशासन जबाबदारी झटकत आहे.' त्यानंतर आयुक्तांनी याबाबत एमएसईबी अधिकाऱ्यांसमवेत त्वरित बैठक घेऊ, असे आश्वासन देत विकासात्मक कामाला नेहमीच पाठिंबा असल्याचे सूतोवाच केले.

महापालिकेच्या पद्माराजे उद्यान व सिद्धार्थ नगर प्रभागामध्ये पोटनिवडणूक असल्याने दोन्ही प्रभागासाठी आचारसंहिता लागू आहे. निवडणुकीवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय घेऊ शकत नसताना राजर्षी शाहू समाधीस्थळ नर्सरी बाग, सिद्धार्थनगर असा नामकरण करणारा सदस्य ठराव आला होता. यासह अन्य ठरावही चर्चेला येणार होते. पण आचारसंहिता असल्याने असे ठराव पास होऊ शकतात का? या विषयी नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्यावर सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. विजय सूर्यवंशी म्हणाले, 'सिद्धार्थनगर प्रभागाची निवडणूक कार्यक्रम सुरू असताना सदस्य ठराव आलाच कसा? चुकीचे काम का करता? रंकाळा विकू असा ठराव दाखल केल्यावर घेणार का?' असा संतप्त सवाल केला. ठाणेकर यांनी यापूर्वी झालेल्या सदस्य ठरावांवर कोणती कार्यवाही केली. किती ठराव मार्गी लागले. सदस्य ठरावांना प्रशासन केचारीच टोपली दाखवत आहे. हा सभागृहाचा अपमान आहे.' असा आरोप केला. संतोष गायकवाड यांनी कामगार चाळीच्या इमारतीवरुन इस्टेट अधिकारी व प्रशासनाला चांगलेच धारवेर धरले. जरगनगर विद्या मंदिरमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग प्रायोगिकतत्वावर सुरू करण्याच्या विषयावर गंभीरपणे चर्चा झाली. या विषयावर पुढील मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मेहजबीन सुभेदार,माधुरी लाड, रुपाराणी निकम, आश्विनी बारामते, राजसिंह शेळके यांनी विविध प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.

आणि पोवारांचा पारा चढला

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाबाबत सभागृहात चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान काँग्रेसचे सभागृह नेते दिलीप पोवार सावित्रीबाई फुले रुग्णालयाबाबत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे झालेला कायापालट स्पष्ट करत त्याच पद्धतीने प्राथमिक शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत होते. संवेदनशील विषयावर ते बोलत असताना सभागृहातील मागील बाजूचे काही सदस्य हास्यविनोदामध्ये रंगले होते. हास्यविनोदामध्ये आपल्यावरच शेरेबाजी झाल्याचा समज करून ते चांगलेच भडकले. अर्वाच्च भाषेचा वापर करण्याचा इशारा देत थेट चौकात गेल्यानंतर सोडणार नसल्याचा दमच त्यांनी दिला.

पाइपलाइनची चित्रफित

शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना अनेक अडथळ्याचा सामना करत आहेत. पदाधिकारी अडथळे दूर करत असताना ठेकेदार व सल्लागर कंपनी कामात वारंवार चुका करत आहे. धरणक्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या जॅकवेलमधील रॉफ्टच्या कामासाठी थेट वरुनच काँक्रिट टाकले जात असल्याची चित्रफित नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आयुक्तांना दाखवली. चित्रफित पाहून आयुक्तांसह सभागृह अचंबित झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्पातील बदलावरुन सभात्याग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समितीने महापालिकेला २०१९-२० च्या सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्याप्रमाणात बदल केला. अर्थसंकल्प किती कोटीचा आहे, याची माहितीच मिळत नसून बदल केलेला निधी गेला कोठे? अर्थसंकल्पामधून सदस्यांना न्याय मिळत नसेल, तर अर्थसंकल्पाचा उपयोग काय? अशी विचारणा करत अर्थसंकल्पामध्ये केलेल्या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाने बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला. निषेध म्हणून सभात्याग करण्यापूर्वी त्यांनी अर्थसंकल्पीय पुस्तिकेला हार, नारळ अर्पण करून व हळद-कुंकू लावून अनोख्या पद्धतीने निषेध केला.

ताराराणी आघीडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी विकासकामासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या निधीवरून मुख्यलेखापाल संजय सरनाईक यांना धारेवर धरले. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पीय पुस्तिकेत दिसत नाहीत. तर हा निधी गेला कोठे? कोणत्या विकासकामासाठी हा निधी वर्ग करण्यात आला. दोन वर्षापासून अर्थसंकल्पामध्ये मनमानीपणे बदल केले जात आहेत. सत्तेचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार सदस्यांची कोणती कामे झाली. सदस्यांवर अन्याय होत असून न्याय मिळावी अशी विनंतीही त्यांनी सभागृहात केली. महालेखापाल सरनाईक यांनी महापालिकेचा निधी कोणत्या कामावर खर्च होणार आहे, याची माहिती पुस्तिकेत दिली असल्याने वेगळी माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कदम यांच्यासह किरण नकाते, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर चांगलेच भडकले. कदम यांनी अर्थसंकल्पातील आम्हाला काही कळत नसून तुम्हीच माहिती द्या, अशी मागणी केली. सरनाईक यांच्या खुलाशावर समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.

तत्पूर्वी त्यांनी अर्थसंकल्पीय पुस्तिकेची होळी करणार नाही, ती आमची संस्कृती नसल्याचे स्पष्ट करत पुस्तिकेला हार, हळद-कुंकू लावून नारळ अर्पण केला. पूजा केलेली पुस्तिका आयुक्तांकडे सादर करत न्याय देण्याची विनंतीही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईडी’ चे कोल्हापुरात छापे

$
0
0

माजी नगरसेवक, ज्वेलर्स, डॉक्टर व बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या संशयावरुन सक्तवसुली संचलनालयाच्या चार पथकांनी (ईडी) कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर येथे बुधवारी सकाळी छापे टाकले. इचलकरंजी येथील माजी नगरसेवक, सराफ व्यापारी, जयसिंगपूर येथील डॉक्टर आणि कोल्हापुरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घर आणि कार्यालयावर छापे पडल्याचे समजते. त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. 'ईडी' ने टाकलेल्या छाप्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवक, सराफ व्यापारी, डॉक्टर आणि बांधकाम व्यावसायिकाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती 'ईडी'ला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री ईडीची चार पथके कोल्हापुरात दाखल झाली. दोन पथके इचलकरंजीला, एक पथक कोल्हापुरात तर एक पथक जयसिंगपूरला रवाना झाले. इचलकरंजी येथील एका नगरसेवकाने अवैधरित्या बेहिशेबी मालमत्ता कमविली असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्याने मोठ्या प्रमाणात सीजीएसटी आणि एसजीएसटी चुकविल्याची माहिती मिळाल्याने या नगरसेवकाच्या घरावर पथकाने छापे टाकले.

त्यानंतर पथकाने इचलकरंजी येथील एका मोठ्या सराफ व्यावसायिकाच्या दुकान आणि घरावरही छापा टाकला. त्याच्या दुकानातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. जयसिंगपूर येथील एक प्रसिद्ध डॉक्टरही दोन वर्षांपासून प्राप्तिकर विभागाच्या रडारवर होता. त्याच्या हॉस्पिटलवर छापा टाकण्यात आला. गेली पंधरा वर्षे कोल्हापुरात बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाचे घर, कार्यालय आणि प्रकल्पावर पथकाने छापा टाकला. या व्यावसायिकावर गेल्या वर्षीही प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून छापे टाकण्यास सुरुवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत ही कारवाई सुरु राहिली. कोट्यवधी रुपयांची माया जमविलेला व्यापारी, डॉक्टर, माजी नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिकाच्या घर आणि कार्यालयावर छापे पडल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांच्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी पथकाने सुरु केली असून या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. पथक आणखी दोन दिवस कोल्हापुरात थांबणार असून चौघांच्या मालमत्तेची चौकशी करणार आहे. बेहिशेबी संपत्ती कशा पध्दतीने कमविली आहे, त्याचीही चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी संशयितांना ताब्यात घेणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू मानेचे यश

$
0
0

कोल्हापूर: दिल्ली येथे सुरू असलेल्या १९ व्या कुमार सुरेंदर सिंग राष्ट्रीय खुल्या शुटिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत एक सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकून महाराष्ट्राला २ पदके मिळवून दिली. त्याने १० मी एअर रायफल प्रकारामधे ६२९:२ गुणांचा अचूक वेध घेऊन तृतीय स्थानासह अंतिम फेरी गाठली. अंतीम फेरीत २५०:१ गुण मिळवत सीनिअर गटात रौप्य पदक जिंकले. भारतीय नौसेनेचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्रीयन नेमबाज किरण जाधवने २५२:२ गुण मिळवुण सुवर्ण तर मध्य प्रदेशचा नेमबाज ऐश्वर्य प्रताप तोमरने २२८:७ गुणासह कांस्य पदक जिंकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images